Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यातील चार दिवस नाशिक दौऱ्यावर होते. यात महापालिका कारभारातील नाराजीवरून महापौर, नगरसेवकांसह आमदारांना खडे बोल सुनावत त्यांनी सर्वांना कामाला लावले.

सुमठाणेकरांनी दिली बोकडबळीला तिलांजली

$
0
0
पारोळा तालुक्यातील सुमठाणे येथील ग्रामस्थांनी अनेक पिढ्यांपासून चालत आलेली बोकडबळीच्या प्रथेला तिलांजली दिली आहे. ग्रामस्थांनी सामुदायिक शेंडीच्या कार्यक्रम करून त्यात शाकाहारी नैवद्य देण्याचा संकल्प यावर्षापासून सुरू केला आहे.

सिंहस्थ ‘मार्ग’ अरुंदच!

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी रामकुंड परिसरात असलेल्या एकूण १३ रस्त्यांचे रुंदीकरण होणारच नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या रस्त्यांसाठी महापालिकेची इच्छाशक्ती कमी पडत असून या भागातील अतिक्रमणही येथील डोकेदुखीचा विषय ठरला आहे.

नगररचनेला महापालिकेच्या अभिप्रायाची प्रतीक्षा

$
0
0
तपोवनातील नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आरक्षित असलेल्या १६३ एकर जमिनी संदर्भांत नगररचना विभागाने मागिवलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणीचे काम पूर्ण झाले आहे.

शहर पोलिसांची हद्द वाढणार

$
0
0
वाढते शहरीकरण, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान, आणि कामात सुसुत्रता येण्यासाठी नाशिक शहरालगतची तब्बल १९ गावे पोलिस आयुक्तालयाच्या कवेत विसावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मनसेचे ‘इंजिन’ पोहोचलेच नाही

$
0
0
नाशिकमध्ये टपाल विभागाने आणलेल्या ‘माय स्टॅम्प’ योजनेत उपलब्ध काही पर्यायांपैकी एक पर्याय होता रेल्वे इंजिनचा. परंतु नाशिकमध्ये सत्ता असलेल्या मनसेच्या बालेकिल्ल्यात रेल्वेचे हे इंजिन पोहोचलेच नाही.

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

$
0
0
कायद्याने विक्रीसाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. शहराच्या मध्यवर्ती भागात पोल‌िसांनी तीन व‌िक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले तर स‌िडको व‌िभागात महापाल‌िकेच्या वतीने वीस दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईत मांजा जप्त करण्यात आला.

ऑर्डर नसल्याने तिकिटाची छपाई नाही

$
0
0
गेल्या दोन महिन्यांपासून पोस्टातून २५ पैशाचे तिकीट गायब झाले आहे. या तिकीटाच्या प्रिंटींगची ऑर्डर आली नसल्याने छपाई होत नसल्याची माहिती भारत प्रतिभुती मुद्रणालयाच्या सूत्रांनी दिली आहे. प्रिटींगची ऑर्डर आल्यास तत्काळ ती पूर्ण करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

अन्नसुरक्षेसाठी घरपोच सेवेचा बळी

$
0
0
जिल्ह्यात येत्या १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा लागू करण्यात येणार असल्यामुळे कार्यरत असलेली घरपोच धान्य योजना बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ७०० गावांमधील हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार आहे.

भंडारदरा रिसॉर्टचे नूतनीकरण

$
0
0
विकेण्ड डेस्टिनेशन असलेल्या भंडारदरा येथील रिसॉर्टला मिळणारा प्रतिसाद पाहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) या रिसॉर्टचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

'आप'ची भिस्त बुथ कमिट्यांवर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भिडलेल्या 'आम आदमी पार्टी'तर्फे(आप) नाशिक लोकसभा मतदारसंघात बूथ सक्षमीकरणाचे मिशन हाती घेण्यात आले आहे. मतदारसंघातील प्रत्येक बूथवर दोन कार्यकर्ते या सूत्रानुसार पक्षाचे काम सुरू असून याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे 'आप'चे ध्येय आहे.

उपायुक्तांची रजा, महापालिकेला सजा

$
0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे सांगत अनेकदा विकासकामांना कात्री लावली जाते. मात्र, याच महापालिकेतील उपायुक्त दीपक कासार मागील आठ महिन्यांपासून ठोस कारण न देता रजेवर गेले आहेत.

विकास शुल्कात २० टक्क्यांनी वाढ

$
0
0
राज्य सरकारने रेड‌िरेकनरचे दर वाढविल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतीतील जमिनीच्या विकास शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्वाधिक शुल्कवाढ अंबडमधील जागांना लागू होणार आहे.

नाटकाने जगणे समृध्द होऊ लागते

$
0
0
प्रायोगिक रंगभूमीसाठी गेली अनेक वर्ष सातत्याने काम करणारी आणि युवा पिढीमध्ये मराठी रंगभूमीविषयीची जिज्ञासा जागृत करणारी नाशिकची ‘दि जिनिअस’ संस्था सर्वश्रृत आहे.

बुकेवरही तोडगा

$
0
0
नाशिकरोडला काही दिवसापूर्वी एका पक्षाच्या मिटींगमध्ये आगामी महापाल‌िकेच्या निवडणुकीसाठी चाचणी मोहीम सुरू करण्यात आली. पक्षाच्या शहरातल्या आणि ग्र्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्वांना पाचारण करण्यात आले होते.

अंबडमध्ये २०० गाळ्यांचा प्रकल्प

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी अखेर २०० गाळ्यांचा प्रकल्प साकार होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) त्याचे टेंडर काढले असून येत्या मार्चपासून हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

नांदुरी, सप्तशृंग गड रस्त्यावरील टोल वसुली बंद करा

$
0
0
कळवण - नाशिक या मुख्य राज्यमार्गावरील नांदुरी व सप्तशृंग गड रस्त्यावरील टोल नाक्यासंदर्भात छावा संघटना आक्रमक झाली आहे. हे दोन्ही टोल २६ जानेवारीपर्यंत बंद न केल्यास तालुकाध्यक्ष प्रदीप पगार यांनी निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खं‌डित वीजपुरवठ्यामुळे पिळकोसचे शेतकरी त्रस्त

$
0
0
कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली केली. असे असूनही विजेच्या वेळेत ठेंगोडा सबडिव्हिजन अंतर्गत कृषीपंपासाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने परिसरातील कांदा लागवड उन्हाने होरपळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
सोमवारी दरेगावचा शेतकऱ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर दुसऱ्या ‌‌दिवशी मंगळवारी चौगाव येथे मालेगांव येथील बी. फार्मसीचा विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना घडली. या घटनेने सटाणा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मनमाडला दोघांना गावठी कट्ट्यासह अटक

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भगत‌िससिंग मैदान परिसरात ‌सिंगल बोअरचे गावठी बनावटीचा एक कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह शहर पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरात सापडलेल्या या गावठी कट्ट्यामुळे खळबळ उडाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images