Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘गोदावरी’च्या बाप्पाला थाटात निरोप

0
0

आज निलमणीची निघाणार मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड ते कुर्ला दरम्यानच्या सर्व प्रवाशांसाठी लाडक्या ठरलेल्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाला शनिवारी सायंकाळी मनमाड येथे भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पोलिस उप-अधीक्षक आर. रागसुधा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर 'गोदावरी राजा'ला रेल्वे स्थानकासमोर ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला.

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयजयकाराने रेल्वे स्थानक परिसर दुमदुमला होता. गोदावरी राजाच्या मिरवणुकीत विविध पथकांच्या प्रात्यक्षिकांनी मनमाडकरांचे लक्ष वेधले. यासह दिंडोरी, नाशिक येथील ढोलपथक हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. मिरवणुकीत सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच चाकरमाने, प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोदावरी राजा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला. रेल्वे प्रवासातील अडचणी दूर कर, रेल्वे प्रवास सुरक्षित व सुखकर राहू दे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे रेल्वेत उपाय करण्याचे रेल्वे व पोलिस प्रशासनाला सुचू दे, अशाच मागण्या जणू रेल्वे प्रवासी व चाकरमाने

गणरायाकडे करीत होते.

विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

मनमाड शहरात दत्त मंदिर मार्गावरील गणेश कुंड येथे घरगुती व मंडळांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश कुंडात पाणी सोडण्यात आले असून, विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी पालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पथके तैनात केली आहेत. रविवारी सकाळी निलमणी गणेशाची पुणेरी थाटात पालखीतून मिरवणूक निघणार असून, नेहमीप्रमाणे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल असे मंडळाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवस

0
0

२३ सप्टेंबर

अरुण शिरोडे

उद्योजक

महेंद्र पोद्दार

बांधकाम व्यावसायिक

देवांग जानी

अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

अजय ब्रह्मेचा

अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन

अनिल जाधव

उद्योजक

अभय ओझरकर

अध्यक्ष, जनस्थान ग्रुप

२४ सप्टेंबर

निर्मला गावित

आमदार

सचिन बागड

क्रेडाई सदस्य

स्वप्नील डांगरीकर

परीक्षक, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेसाठी शिक्षकांचे निषेध आंदोलन

0
0

➖➖➖➖➖➖➖➖म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा बंद करू नयेत, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांनी मंगळवारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण सरकार अवलंबत असल्याने याचे दूरोगामी परिणाम राज्याच्या ग्रामीण भागावर होतील, अशी भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायदा आणून सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न दाखवायचे आणि दुसरीकडे विरोधाभासी धोरणांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, असा प्रकार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला. समितीतर्फे जिल्हाभरातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभा मतदारसंघात तब्बल आठ उपमहानगप्रमुख

0
0

शिवसेनेत पदांची खैरात!

'मध्य विधानसभा'साठी ८ उपमहानगप्रमुख; २० शाखांसाठी ४० प्रमुख

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शिवसेनेतील खांदेपालटानंतर तब्बल सात महिन्यानंतर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारिणीला अखेर मुहूर्त लागला आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच एका विधानसभा मतदारसंघासाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात तब्बल आठ उपमहानगरप्रमुख, १४ विभागप्रमुख आणि चार संघटकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात २० च्या आसपास शाखा असताना, ४० शाखाप्रमुखांची घोषणा करण्यात आल्याचा दावा पक्षातीलच नेत्यांकडून करण्यात आल्या आहे. महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्या मर्जीतील लोकांचीच वर्णी लावल्याचाही आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या पक्षात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीनंतर तब्बल एक वर्षभरानंतर शिवसेनेने नाशिकमध्ये खांदेपालट केला. मार्चमध्ये अजय बोरस्ते यांना बदलून त्यांच्या जागी दोन महानगप्रमुखांची पदे निर्माण करीत या पदांवर सचिन मराठे आणि महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नाशिकवरील पकड अधिक मजबूत केली. परंतु, खांदेपालटानंतर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून येत सरळ दोन ते तीन गट पक्षात निर्माण झाले. एका गटाने तर थेट महानगरप्रमुखांच्या बैठकांकडेच पाठ फिरवली. विधान परिषद निवडणुकीत पक्षात कशीबशी एकी निर्माण झाली असली तरी ही निवडणूक संपताच पक्षाने आपली आक्रमकता गमावली. नागरिकांशी संपर्क आणि नागरी प्रश्नांवरील शिवसेनेची आक्रमकताच लयाला गेल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे पक्षावर टीका होत असतानाच मंगळवारी महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्याकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. येथे आठ उपमहानगरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजाभाऊ क्षीरसागर, शरद देवरे, वैभव खैरे, संतोष ठाकरे यांच्यासह सचिन बांडे, अजय चौगुले, दत्ता दंडगव्हाळ, शशीकांत कोठुळे या चौघांसाठी कार्यालयीन उपमहानगप्रमुख अशी नवीन पदे निर्माण करण्यात आली आहे. अनिल साळुंखे, कमलेश परदेशी, रवींद्र जाधव, वीरेंद्रसिंग टिळे यांच्यावर संघटकपदाचा भार सोपविण्यात आला आहे. तब्बल १४ विभागप्रमुख, ४० शाखाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठीची ही पहिलीच जम्बो कार्यकारिणी असल्याची पक्षातच चर्चा होते आहे.

निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप

निष्ठांवतांना डावलण्याची परंपरा खांदेपालटानंतरही कायम आहे. मध्य विधानसभा मतदारसंघासाठी जाहीर झालेल्या कार्यकारिणीत महानगर प्रमुख सचिन मराठे यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांचीच वर्णी लावण्यात आल्याचा आरोप कार्यकर्ते खासगीत करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या एका कार्यकर्त्याला थेट उपमहानगप्रमुख केल्याचा आरोप निष्ठांवताकडून करण्यात आला आहे. पक्षांतर्गत विरोधकांना पद्धतशीरपणे डावलण्यात आल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला असून, यामुळे गटबाजीत वाढच होईल असा दावा केला जात आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी मराठेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आता शहरातील अन्य तीन मतदारसंघांच्या कार्यकारिणीला कधी मुहूर्त लागणार याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल नोटिसीला कारवाईसाठी मंजुरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीज पुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे महावितरणच्या कारवाईचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे.

महावितरणने वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालात वीज पुरवठा खंडित करण्याबाबत ग्राहकाला दिलेली डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्याचा निर्णय आयोगाने दिला आहे. परिणामी आता यापुढे एसएमएस, व्हॉट्स अॅप, ई-मेलद्वारे पाठविण्यात येणारी नोटीस ग्राह्य ठरणार आहे. विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ अन्वये वीज पुरवठा तोडण्यापूर्वी महावितरणने ग्राहकाला लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. लेखी नोटीस ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी लागणारा अधिकचा कालावधी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात मोठा अडसर ठरत होता. त्यामुळे महावितरणने डिजिटल स्वरूपात पाठविण्यात येणारी नोटीस ग्राह्य धरण्याची मागणी आयोगाकडे केली होती.

महावितरणने काही वर्षांपासून वीज ग्राहकांचे मोबाइल क्रमांक तसेच ई-मेल नोंदवून घेतले आहेत. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वीजपुरवठा, मीटर रिडींग, वीजबिलाचा तपशील आदीची माहिती 'एसएमएस'द्वारे देण्यात येते. महावितरणकडे राज्यातील दोन कोटी पाच लाख ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ११ लाख ७०७ वीजग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत जवळपास ७७ टक्के ग्राहकांनी त्यांचे मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. त्यात कृषिपंप ग्राहकांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैमानिक, इंजिनीअरशीउच्चस्तरीय समितीची चर्चा

0
0

नेमक्या कारणांचा घेणार शोध

..

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील वावीठुशी गावाजवळ २७ जून रोजी कोसळलेल्या सुखोई ३० (एमकेआय) विमानामागची कारणमीमांसा उच्चस्तरावरून शोधली जात आहे. इंजिनातील बिघाडच कारणीभूत असला तरी त्यामागची नेमकी काय कारणे आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. वैमानिक नायर आणि इंजिनीअर बिस्वाल या दोघांशीही समितीने चर्चा केली. हवाई दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनातील बिघाडामुळेच सुखोई विमान कोसळले आहे.

'सुखोई'मधील दोन इंजिनांपैकी एका इंजिनातील बिघाडच या दुर्घटनेस कारणीभूत ठरला आहे. या इंजिनातील बिघाडाचा परिणाम दुसऱ्या इंजिनाच्या कार्यप्रणालीवर झाला, असे हवाई दलातील सूत्रांनी सांगितले. हवाई दलाच्या अनुभवी वैमानिकांनीही याला दुजोरा दिला आहे. इंजिनातील बिघाड त्वरित कळल्यामुळेच वैमानिक आणि इंजिनीअर यांना त्यांचे प्राण वाचविता आले.

ओझरमध्ये सुखोई विमानाची निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. त्याला १६ वर्षे उलटली आहेत. या कालावधीत पहिलाच अपघात झाल्यामुळे एचएएलकडूनही त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळेच संरक्षण मंत्रालयाच्या क्वालिटी अॅश्युरन्स विभागाच्या महासंचालकांसह अनेक तज्ज्ञ आणि इंजिनीअर यांच्या वतीने या अपघाताचे कारण आणि इतर बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य परिषदेतर्फे महापालिकेला पत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीविरोधात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. तर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व पक्षीय गटनेते, महपालिका आयुक्त तसेच महापालिका उपायुक्त यांना या पत्राची प्रत देण्यात येणार आहे.

कालिदास कलामंदिराची भाडेवाढ सर्वच रंगकर्मींना, नाट्यसंस्थांना आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांना व संस्थांना परवडणारी नसून, ती पूर्णपणे रद्द करून पूर्वीचे दर व नियमावली ठेवून सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच घटकांना दिलासा द्यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रावर अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे तसेच प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे पत्र आज महापालिकेत देण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत वाट बघून शनिवारी पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे धरणे

0
0

विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी

..

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड/ मालेगाव

वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून राज्यभर नोंदणी करावी आणि विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी नाशिकरोड, सातपूर, नाशिक शहर आणि सिडको या चारही वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे मंगळवारी (दि.२५) महसूल आयुक्त कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. महसूल उपायुक्त डॉ. दिलीप स्वामी यांनी या आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, नाशिकरोडचे अध्यक्ष सुनील मगर, सिडकोचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, सातपूरचे अध्यक्ष विनोद कोर यांनी या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी दिलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी झाली पाहिजे, पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, स्वतंत कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे यासारख्या घोषणांनी आयुक्तालय परिसर दणाणून सोडला होता. या धरणे आंदोलनात महेश कुलथे, गौतम सोनवणे, वसंत घोडे, भारत माळवे, मोहन कऱ्हाडकर, अनिल कुलथे, योगेश भट, रवि भोसले, सतीष आहेर, रवि सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांसह शहरातील सुमारे ३०० वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते.

..

प्रमुख मागण्या

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, असंघटित कामगारांचा दर्जा मिळावा, कल्याणकारी मंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करावे, गटई कामगारांप्रमाणे शहरात स्टॉलसाठी जागा द्यावी, अस्तित्वातील स्टॉल अतिक्रमणात धरू नये, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कोटा ठेवावा.

..........

मालेगाव येथेही आंदोलन

मालेगाव : मालेगाव वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने मंगळवारी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, पापता यादव, रवींद्र कुलकर्णी, अशोक नागमोती, वाल्मिक पगारे, संजय तरवटे, अनिल देशंपाडे, संतोष शर्मा, मधु यादव, गजानन यादव, मनोज कायस्थ आदींसह संघटनेचे पदाधिकारी सर्व वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हणे, कुशावर्त स्वच्छ करतोय...!

0
0

त्र्यंबक पालिकेच्या प्रयोगावर भाविक-नागरिक नाराज

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुशावर्तांकडे नगरपालिका प्रशासनाने दुलर्क्ष केले आहे. लोखंडी डब्यात कसल्या तरी गोळ्या ठेवून नगरपालिका केवळ स्वच्छतेचे 'प्रयोग' करीत आहे. ऐन पितृपक्षात नगरपालिकेने शुद्धिकरणाचे तोकडे 'प्रयोग' सुरू केल्यामुळे स्थानिकांसह भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुशावर्तातील पाणी शुद्धिकरणाबाबत त्र्यंबक नगरपालिका नेहमीच उदासीन आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे संपूर्ण देशभरातून भाविक येथे श्राद्धविधीसाठी येत आहेत. कुशावर्तातील पाण्याची शुद्धिकरणासाठी बायोसॅनीटायझेशनचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. श्रावण महिन्यापासूनच अशा प्रकारचे प्रयोग होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्ती केली आहे.

प्रकल्प धूळखात

सिंहस्थ २०१५ मध्ये कुशावर्ताच्या शुद्धिकरणासाठी शासनाने अडीच कोटी रुपये खर्च करून येथे फिल्टर प्लँट उभारला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तीन वर्ष हा प्रकल्प चालवायचा आणि नंतर नगरपालिकेस हस्तांतरीत करावयाचा असे त्यावेळी ठरविण्यात आले होते. या प्रकल्पाची क्षमता २.४ एमएलडी इतकी आहे. कुशवर्ताचा पाणीसाठा ९ लाख लिटर आहे. या शुद्धिकरण प्रकल्पात दर तासाला १ लाख लिटर पाणी शुद्ध होत असते. सिंहस्थकालावधीत हा प्रकल्प २४ तास सुरू ठेवण्यात आला होता. लाखो भाविकांचे स्नान झाले तरी देखील पाण्याची शुद्धता कायम ठेवण्यास यश आले होते. सिंहस्थ आणि त्यानंतर काही दिवस हा प्रकल्प व्यवस्थित सुरू होता. हा प्लँट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असताना काही महिन्यांपूर्वी येथील अल्ट्राव्हायलेट ट्यूब नादुरुस्त झाल्या आणि प्लँटचा काही भाग बंद पडला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हा प्रकल्प सुरू करून महिनाभर चालवावा व नंतरच आम्ही तो ताब्यात घेऊ, असे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पालिकेचा अजब दावा

नगर पालिका प्रशासनाने आता बायोसॅनीटायजेशनचे प्रयोग कुशावर्तात सुरू केले आहेत. संबंधित ठेकेदारास एक महिना मोफत प्रयोग करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. जाळी असलेल्या लोखंडी डबीत तीन गोळ्या याप्रमाणे दोन डबे कुशावर्तात ठेवण्यात आले आहेत. या काही ग्रॅम खड्यांमधून ऑक्सिजन बाहेर पडतो आणि त्याद्वारे पाणी शुद्ध होते, असा दावा पालिकेने केला आहे. हा बायोसॅनीटायजेशनचा डोस देण्यापूर्वी पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. महिन्याभरानंतर पुन्हा नुमने घेण्यात येणार आहेत. मात्र मध्यंतरी गर्दी झाली म्हणून कर्मचाऱ्यांनी परस्पर रसायनांचा डोस दिला. त्यानंतर काही दिवसांनी पाणी पुन्हा खराब होत आहे म्हणून कुशावर्तातील पाणी उपसण्यात आले. याचे पडसाद नगर पालिकेच्या सभेत देखील उमटले. कुशावर्तात बायो-सॅनीटायझेशनसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. असाच प्रयोग सांडपाणी केंद्रावरही सुरू आहे. कोट्यावधींची यंत्रणा बंद करून केवळ काही ग्रॅम वजन असलेले खडे पाण्यात सोडून पाणी शुद्ध होते, असा अजब दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

प्रयोगासाठी कुशावर्तच का‌?

इतर ठिकाणी अशा प्रकारे बायोसॅनीटायझेशनमुळे पाणी शुद्ध होत असेल मात्र त्याची तपासणी करण्यासाठी कुशावर्ताची प्रयोगशाळा करणे चुकीचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रयोग करावयाचे असतील तर ते शहरातील इतर तलावांमध्ये करण्यास हरकत नाही. कुशावर्तावर असलेल्या गंगागोदावरी मंदिराचे समोर कणखल तीर्थ आहे. येथे दुर्गंधीयुक्त पाणी साठले आहे. या पाण्यात का प्रयोग करत नाहीत असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

भावना दुखवू नये

शहरात गर्दी वाढते आहे. श्राद्धविधी करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने कुशावर्तावर स्नानासाठी येत असतांना तेथील पाण्याची अवस्थेमुळे नाराज होत आहेत. शासनाने सिंहस्थ कालावधीत दिलेला अडीच कोटी रुपयांचा शुद्धिकरण प्रकल्प बंद करून बायोसॅनीटायझेशनचे प्रयोग करणाऱ्या नगर पालिकेने भाविकांच्या भावना लक्षात घेणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या तीन शिक्षकांना ‘टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड ’

0
0

राज्यातील ५३ जणांची निवड

..

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'टीचर इनोव्हेशन ॲवॉर्ड २०१८' राज्यातील ५३ जणांना जाहीर झाला आहे. यामध्ये नाशिकमधील तीन शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये प्राथमिक विभागातून नाशिकमधील वैशाली सूर्यवंशी, माध्यमिक विभागातून जयवंत ठाकरे व मधुकर घायदार यांचा समावेश आहे.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी आदी पदांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार 'एज्युकेशन इनोव्हेशन बँक' या प्रकल्पांतर्गत हे ॲवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते. या पुरस्काराचे वितरण येत्या ६ व ७ ऑक्टोबर रोजी कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज, अक्कलकोट, (जि. सोलापूर) येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स' मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

..

विविध कार्यक्रमांची मेजवानी

या परिषदेत विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. यात व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी याठिकाणी सहभागी व्यक्तींना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात निर्माल्याचा खच

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि समाजसेवी संस्थांच्या वतीने गणेशमूर्ती दान करा, निर्माल्य कलशांतच टाका, असे आवाहन अनंत चतुर्दशीनिमित्त करण्यात आले. त्यास गणेशभक्तांनी चांगला प्रतिसादही दिला. मात्र, असे असले तरी काही गणेशभक्तांनी रामकुंड आणि गांधी तलावात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकले, तसेच मूर्तींचे विसर्जन केले. परिणामी मंगळवारी या भागात गोदापात्रात निर्माल्याचा खच, तसेच गणेशमूर्तीही आढळून आल्या. त्यामुळे गोदा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात गोदा प्रदूषण होत आहे. काही भक्तगण निर्माल्य, तसेच मूर्ती नदीपात्रात विसर्जित करीत असल्याने प्रदूषण होत आहे. हे चित्र पालटण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जनाच्या वेळी शहरातील सर्व विसर्जन केंद्रांवर सामाजिक संस्था, पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या पुढाकाराने गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन भक्तांना करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील काही भक्तांनी अट्टाहासाने गणेशमूर्तींचे गोदापात्रात विसर्जन केले. निर्माल्यही टाकले. गांधी तलाव स्वच्छ करण्यासाठी मंगळवारी तलावातील पाणी अडविण्यात आले. तलावातील त्यानंतर तळाशी निर्माल्याचा खच आणि मूर्ती दिसून आल्या. पात्रातील पाणवेलींत मूर्ती अडकल्याचेही चित्र होते. या प्रकाराबाबत गोदाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

--

सातपूर भागातही प्रदूषण

गंगापूररोड : सोमेश्वर धबधबा भागात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि मूर्ती आढळून आल्या. महापालिका प्रशासनाने येथील मूर्ती व निर्माल्य संकलित करावे, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे. नगरसेवक तथा गटनेते विलास शिंदे यांच्या शिव समर्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नंदिनी (नासर्डी) नदीकिनारीही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य पडलेले असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र व्यवस्था करून नदी किनारे स्वच्छ करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉल्सविरोधात शुक्रवारी एल्गार

0
0

भारत व्यापार बंदसाठी व्यापारी संघटनांची आज बैठक; निषेध नोंदविणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या ग्राहकांची ऑनलाइन शॉपिंगला पसंती अधिक आहे. घरगुती वापरातील छोट्या वस्तूंपासून फर्निचरसहित इतर मोठ्या वस्तूंपर्यंत आणि कपड्यांपासून तर खाद्यपदार्थांपर्यंत सर्व गोष्टींची ऑनलाइन खरेदी केली जात आहे. शहरातील विविध मॉल्समध्ये ब्रॅण्डेड वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहक आकर्षिले जात आहेत. यामुळे देशभरातील छोट्या व्यवसायांवर परिणाम होत आहे. छोटे व्यवसाय ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल्समुळे धोक्यात येऊ लागले आहेत. याचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.२८ सप्टेंबर) रोजी सर्व व्यापारी संघटनांनी भारत व्यापार बंदचे आवाहन केले आहे. यासंदर्भात शहरातील विविध ५२ संघटनांची बुधवारी नाशकात बैठक होत आहे.

वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमध्ये झालेल्या करारामुळे ऑनलाइन शॉपिंग अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे. मॉल्समध्ये ब्रॅण्डेड वस्तूंसहित छोट्या वस्तूंची विक्री देखील आता होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांवर याचा परिणाम जाणवत आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल्समुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक ताळेबंद बिघडल्याचे चित्र आहे. 'फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टला रिटेल सेक्टरची परवानगी सरकारकडून देण्यात येत आहे. यामुळे देशभरातील व्यवसायांवर मोठा आर्थिक परिणाम संभवणार आहे. त्याचा निषेध म्हणून भारत व्यापार बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जर सरकारने त्या दोन कंपन्यांना रिटेल सेक्टरची परवानगी कायम ठेवली. तर व्यापारांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,' असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.

राठी सभागृहात आज बैठक

कन्फेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेसर्सच्या वतीने शुक्रवारी संपूर्ण भारतात सर्व प्रकारचे व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी नाशिकमधील व्यापारी संघटनांची बैठक आज, बुधवारी (दि.२६) रोजी मेनरोड येथील सारडा संकुलमधील पद्मश्री बाबूभाई राठी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भारत व्यापार बंद आंदोलनावर चर्चा करुन नियोजन करण्यात येणार आहे.

५३ व्यापारी संघटनांचा सहभाग

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक धान्य किराणा गृह व्यापारी संघटना, नाशिकरोड देवळाली मर्चंट असोसिएशन, गंगामाई व्यापारी संघटना, भगूर मर्चंट असोसिएशन, नाशिक कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन, नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन, नाशिक होलसेल क्लॉथ अँड होजिअरी मर्चंट असोसिएशन, नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, नाशिक सराफ असोसिएशन, नाशिक मोटार मर्चंट असोसिएशन, नाशिक प्लायवूड मर्चंट असोसिएशन, नाशिक बूक सेलर्स, महाराष्ट्र प्लबिंग असोसिएशन, नाशिक मिठाई नमकिन असोसिएशन, लघु उद्योग भारती यांसह ५३ व्यापारी संघटना भारत व्यापार बंदच्या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत दीक्षित यांनी दिली.

मेडिकल राहणार बंद

२७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ पासून २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ पर्यंत ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात सर्व मेडिकल असोशिएन भारत व्यापार बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी शहरासह देशभरातील सर्व मेडिकल बंद राहणार आहेत. अत्यावश्यक औषधे खरेदी करुन घेण्याचे आवाहन असोसिएनतर्फे करण्यात आले आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर ऑनलाइन मेडिसिन विक्रीच्या विरोधात मेडिकल असोसिएशनतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ऑनलाइन मेडिसिन खरेदीचे तोटे याबाबत जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे. बंदच्या दिवशी अत्यावश्यक औषधांसाठी नाशिक केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात संपर्क साधल्यास औषधे उपलब्ध होतील, असे नाशिक केमिस्ट असोसिएनशचे संचालक नितीन दहीवलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी, मालेगावात शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांत दिंडोरी आणि मालेगाव या दोन तालुक्यांत दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ७४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे संदीप अशोक कदम (वय ३०) या शेतकऱ्याने विषप्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. दिंडोरी तहसील कार्यालयाने याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. अन्य घटनेत मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे मोठाभाऊ अण्णा शेलार (वय ३५) याने रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्याने कौटुंबीक कलहातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मालेगाव तहसील कार्यालयास मिळाली आहे. याबाबतचा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागडे मोबाइल चोरून ‘तो’ खेळायचा गेम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तो मूळचा केरळचा. फिरता फिरता चोऱ्या करीत काही वर्षांपूर्वी तो नाशिकला स्थिरावला. सराईत, तितकाच चलाख असलेल्या हसन कुट्टीला (हल्ली रा. म्हसरूळ) चार ते पाच भाषा येतात. मोबाइलची दुकाने फोडून त्यातील महागड्या मोबाइलवर गेम खेळण्याची त्याला भारी आवड. लहान मोबाइल तो झोपडपट्टी परिसरात टाकायचा. हा मोबाइल कोणाला सापडला की, साहजिकच ते त्यात सिम कार्ड टाकून चालू करीत आणि पोलिस त्या मोबाइल सापडलेल्यालाच चोर समजून पकडत. मात्र, हा उद्योग पोलिसांनी शोधून काढत मूळ चोरट्यास पकडलेच.

कुट्टीसह त्याचा साथीदार राजकिशार बोराल उर्फ राजू बंगाली यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. बंगाली हा मूळचा पश्चिम बंगालचा असून, मुंबईनंतर त्याने कुट्टीच्या मदतीने नाशिककडे मोर्चा वळवला. दुकान फोडण्यात तरबेज असलेल्या या दोघांनी त्यांच्या दोन साथीदारांसमवेत शहरात अनेक दुकाने फोडली. त्यात मोबाइल दुकानांचादेखील समावेश होता. मोबाइल दुकान फोडले की कुट्टी महागड्या मोबाइलचा वापर फक्त विविध गेम्स खेळण्यासाठी करायचा. एखादा छोटा मोबाइल झोपडपट्टी किंवा गुन्हेगारांचा वावर असलेल्या ठिकाणी सोडून द्यायचा. नवीन मोबाइल पाहून कोणीही तो उचलून घ्यायचा. त्यात सिमकार्ड टाकून मोबाइल सुरू झाला की पोलिस त्याच व्यक्तीपर्यंत पोहचायचे. तपासाची दिशा बदलण्यासाठी कुट्टीची ही ट्रीक काही प्रकरणांमध्ये यशस्वी झाली. पण, क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणत दोघांना अटक केली.

१२ गुन्हे उघडकीस

हसन आणि बंगालीच्या अटकेमुळे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्यांकडून सहा लाख ६६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात तीन लॅपटॉप, चार एलसीडी टीव्ही, ९८ ग्रॅम सोने, तीन किलो ५७० ग्रॅम चांदी, ७७ साड्या व ड्रेस मटेरियल, एक होकायंत्र, मोबाइल फोन तसेच रोख रकमेचा समावेश आहे. यामुळे पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील सहा, म्हसरुळचे दोन, गंगापूर, भद्रकाली, नाशिक तालुका तसेच औरंगाबाद येथील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला.

कापड व्यावसायिक असल्याचा बनाव

हसन कुट्टी हा म्हसरूळ परिसरात एका भाड्याच्या घरात पत्नीसह राहतो. दुकान फोडून मिळालेल्या साड्या व इतर साहित्याची फिरून विक्री करीत असल्याचा बनाव रचून त्याने घरमालकाचा विश्वास संपादन केला होता. हसन आणि बंगाली पंडीत कॉलनीत येणार असल्याची माहिती समजल्याने पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले आणि हा सगळा प्रकार समोर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अचानक कारवाईने धांदल

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पवित्र तीर्थस्थान असलेल्या रामकुंड परिसरात विविध व्यावसायिकांच्या टपऱ्यांचे मोठे अतिक्रमण आहे. ते काढून हा परिसरात मोकळा करण्याच्या उद्देशाने मंगळवारी येथे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक दाखल होताच परिसरातील व्यावसायिकांची धांदल उडाली. पथकाने दोन तासांच्या आत जागा मोकळी करून देण्यास सांगितल्याने अनेकांनी आपापल्या टपऱ्यांतील साहित्याची आवराआवर करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला.

भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे गजबजलेल्या रामकुंड परिसरात विविध व्यावसायिकांच्या टपऱ्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात त्यांचे व्यवसाय आहेत. अशा व्यावसायिकांना येथील जागा खाली करण्यासाठी सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास सुरक्षारक्षकांसह दोन ट्रक, एक जेसीबी घेऊन अतिक्रमण निर्मूलन पथक रामकुंड परिसरात दाखल झाले. त्यांनी तेथील व्यावसायिकांना आपापले साहित्य काढून जागा खाली करण्यास सांगितले. दोन तासांत जागा मोकळी करण्यास सांगितल्यामुळे या व्यावसायिकांची धांदल उडाली. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने गोदाकाठाच्या मार्गातील कपालेश्वर मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या दुकानांच्या विटा आणि सिमेंटच्या पायऱ्या जेसीबीच्या साह्याने काढून टाकल्या. या मार्गावरील एक हॉटेल आणि सलून दुकानासमोरील सिमेंटचे बांधकामदेखील तोडण्यात आले. त्यानंतर हे पथक म्हसोबा पटांगण परिसरात थांबले. मात्र, अचानक आलेल्या या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई होण्याच्या भीतीने व्यावसायिकांची विक्रीचे साहित्य तातडीने हलविले. याप्रश्नी आता आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इतिवृत्तापूर्वीच ठरावची अंमलबजावणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील लेटरबाँम्बसाठी परिचित असलेले भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी पुन्हा एक लेटर बाँम्ब टाकला असून, स्थायी समिती आणि महासभेत झालेल्या ठरावांचे इतिवृत्त मंजूर होण्यापूर्वीच त्याची अंमलबजावणी होत असल्याचा घरचा आहेर पक्षाला दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून इतिवृत्त मंजुरीशिवाय ठरावाची अंमलबाजणी करू नये, असे सांगत 'कायद्याच्या उल्लंघनाला प्रशासनच जबाबदार राहील,' अशा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. त्यामुळे पाटील यांच्या पत्राने भाजपसह प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.

महापालिकेत सर्वसाधारणपणे स्थायी समिती, महासभेने एखादा ठराव केल्यास, त्याचे इतिवृत्त मंजुरीशिवाय त्याची अंमलबजावणी केली जात नाही. परंतु सध्या प्रशासनाकडून स्थायी समिती आणि महासभेकडून मंजूर करण्यात आलेल्या सोयीच्या ठरावांची तातडीने अंमलबजावणी केली जाते. त्यासाठी इतिवृत्ताची वाट पाहिली जात नाही. परंतु गैरसोयीचे ठराव असले तर, त्यांना केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे याच विषयावरून पाटील यांनी एकाच वेळी भाजपसह प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कम्पाऊडिंग पॉलिसीच्या ठरावात भाजपला इतिवृत्तात दुरुस्ती करायची होती. परंतु प्रशासनाने इतिवृत्त येण्यापूर्वीच या ठरावाची अंमलबजावणी केली होती. प्रशासन आपल्या सोयीने ठरावाची अंमलबजावणी करत असून, भाजपमधील काही पदाधिकारी प्रशासनाला यात छुपी मदत करत आहेत. त्यामुळे पाटील यांनी कायद्यावर बोट ठेवत आता प्रशासनाचीच कोंडी केली आहे. महापालिकेत सध्या इतिवृत्त मंजूर होण्यापूर्वीच ठरावाची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप केला असून, हा प्रकार कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार समोर आल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारा दिला आहे. त्यामुळे एकाच वेळी प्रशासनासह भाजपचीही अडचण होणार आहे.

पक्षाला घरचा आहेर!

महापालिकेतील कामकाजावर भाजपचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पाटील यांच्या या पत्राने या आरोपाला दुजोरा मिळाला आहे. महापालिकेतील कामकाजात प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची कबुलीच या पत्राने दिली आहे. त्यामुळे पाटील यांचे पत्र प्रशासनासाठी जसे डोकेदुखी आहे, तसेच पक्षालाही घरचा आहेर असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई, बाबा पत्रास कारण की...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आई-बाबा तुमचे नाव मतदार यादीमध्ये आहे का..? तुम्ही मतदानाचा हक्क बजावला का..? मतदार यादीत नाव नसेल तर आताच नोंदवा... आणि हो दादा, ताईनेही वयाची १८ वर्ष पूर्ण केलीत ना.., मग त्यांचेही मतदार म्हणून यादीत नाव घेण्यासाठी आठवणीने अर्ज भरून द्या... हे अनोखे आवाहन केले आहे पाचवी ते नववीत शिकणाऱ्या १२०० विद्यार्थिनींनी... ते ही आई बाबांना सुंदर पत्र लिहून.... बागलाण तालुक्यातील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ही भावनिक साद घातली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली जात आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाचे नाव मतदार यादीमध्ये असावे यासाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखाही कामाला लागली आहे. मतदारांची जनजागृती करणारा चित्ररथ गावोगावी फिरविण्यात येतो आहे. याखेरीज अलीकडेच अपंग बांधवांची नोंदणी करून घेण्यासाठी दादासाहेब गायकवाड सभागृहात विशेष मोहीम राबविण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देखील मतदार जागृतीचे काम सुरू आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या बागलाण शहरातील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थिनींनी एक अभिनव उपक्रम राबवून सरकारच्या या मोहिमेला हातभार लावला आहे. शाळेत पाचवी ते नववीत शिकणाऱ्या तब्बल १२०० विद्यार्थिनींनी मंगळवारी एकाचवेळी आपल्या पालकांना पत्र लिहिले. लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेले मतदानाचे कर्तव्य आपण दरवेळी आठवणीने बजावता का? असा प्रश्न त्यांनी पालकांना विचारला आहे. तुमचे नाव मतदार यादीमध्ये आहे का? असल्यास त्यामध्ये काही दुरूस्त्या तर नाही ना, याची खातरजमा केली का अशी विचारणाही त्यांना करण्यात आली आहे. अलीकडेच वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या ताई, दादाचे नावही मतदार यादीमध्ये नोंदवायचे राहून गेले आहे. मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाची संधी दवडू नका. त्यांचेही नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी तहसील कार्यालय किंवा जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन अर्ज भरून द्या, असे या पत्रातून आपल्या आई-बाबांना सांगण्यात आले. बच्चेमंडळींनी दिलेले हे पत्र वाचून पालकही हरखून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दो पल’ मधून गानकोकिळेस मानवंदना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न गान सरस्वती लता मंगेशकर यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त फेदर टच स्टुडिओजच्या वतीने 'दो पल' या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. २९ सप्टेंबर) सायंकाळी ६.३० वाजता स्वर्णिमा सभागृह, बापू बंगल्यासमोर, इंदिरानगर येथे होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.

लता मंगेशकर यांनी सात दशकांत ९८० हिंदी चित्रपटांतून गाणी गायली आहेत. मदन मोहन आणि त्यांच्यातील सांगीतिक प्रवासाचे सुरेल रसग्रहण या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. लता मंगेशकर या ९० व्या वर्षात पदर्पण करीत असून, त्यांच्या ७५ वर्षांच्या सांगीतिक प्रवासाला नाशिककर कलावंतांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केवळ गाणी नाहीत तर संगीतकार मदनमोहन आणि लता मंगेशकर यांच्या प्रवासाचे अनोखे रसग्रहण सादर केले जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे असून, संहिता आणि निवेदन रुपाली देशमुख यांचे असेल. गायनाची बाजू रसिका नातू आणि शिवानी जोशी या सांभाळणार असून, त्यांना प्रमोद पवार आणि कृपा परदेशी वादनाची साथ करणार आहेत. तांत्रिक सहाय्य आदित्य राहणे आणि शुभम जोशी यांचे आहे. या कार्यक्रमाला विशेष सहाय्य तन्वी अमित यांचे लाभले आहे. तर स्वर्णिमा सभागृह यांचेही सहकार्य आहे. या कार्यक्रमासाठी शुभम जोशी, फेदर टच स्टुडिओज (मो. ८१४९८६३९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीचे गुजरात कनेक्शन

0
0

आणखी काही जणांना होणार अटक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल सिक्युरिटी आयडीशी गुन्हा लिंक झाल्याचा व्हाइस मॅसेज पाठवून त्याद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आले आहे. गुजरातमधूनच शहरातील कॉल सेंटरचे ठराविक दिवसांनी अमेरिकेतील १० ते १२ हजार बल्क मॅसेज मिळत होते. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी उपनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला. वास्तविक सायबर फसवणुकीचा प्रकार नवीन राहिलेला नाही. मात्र, देशातंर्गत फसवणुकी पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुनियोजित पध्दतीने सुरू असलेली गुन्हेगारी समोर आल्याने काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित होत आहे. अमेरिकेत सोसायटी सिक्युरिटी आयडी (अमेरिकन आधारकार्ड) बंधनकारक असून, त्याच्याशी गुन्हा लिंक झाल्याचे सांगत फसवणुकीचा प्रकार केला जात होता. यासाठी शहरातील शिखरेवाडीसमोरील पासपोर्ट कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या कॉल सेंटरचा वापर केला जात होता. येथे बसलेली मुले एकाचवेळी हजारो नागरिकांना याबाबतचा व्हाइस मॅसेज पाठवत होते. हा व्हाइस मॅसेज वाचून अमेरिकन नागरिकांनी संपर्क केला की त्यांना वॉलमार्टसह इतर काही ठिकाणावरील ५०० डॉलरचे कूपन घेऊन त्याचा क्रमांक पाठवण्यास सांगण्यात येत होते. अमेरिकेत अशा गिफ्ट कूपनचे पैशांमध्ये रूपांतर करता येणे शक्य असल्याने संघटित गुन्हेगारांचे फावले. यापूर्वी कॉल सेंटरमध्ये अटक केलेल्या मुलांकडे चौकशी सुरू असून, त्यातील काही तीन महिन्यांपासून तर काही अगदीच नव्याने काम करीत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्पष्ट केले. फसवणुकीचा गोरखधंदा दोन वर्षांपासून सुरू होता, अशी माहिती समजते. मात्र, या ठिकाणी काम करणारे मुले सातत्याने बदलत असल्याने त्यातील तथ्य अद्याप समोर आले नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

..

या गुन्ह्याचा विस्तार मोठा असून, गुजरात राज्यातील संशयितांचा यात सहभाग असल्याचे दिसते. या गुन्ह्यामध्ये आणखी काही जणांना अटक होऊ शकते.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाणी ‘पेटले’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील दत्त चौक भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने त्यांनी थेट नगरसेवकांकडेच तक्रार करून तातडीने उपाययोजना करण्याचे साकडे घातले. याप्रश्नी प्रसंगी आंदोलन छेडण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

दत्त चौक भागातील नाल्यालगत असलेल्या अनेक घरांमध्ये काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्‍त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही कोणीही याप्रश्नी लक्ष देत नसल्याने अखेरीस नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडेच नागरिकांनी तक्रार केली. शहाणे यांनी या ठिकाणी जाऊन बघितल्यावर अक्षरशः काळ्या रंगाचे पाणी नागरिकांच्या घरात आढळून आले. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक घरात एक तरी साथीच्या आजाराचा रुग्ण असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शहाणे यांनी कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने या ठिकाणी बोलावून घेतले. या परिसरात अशा प्रकारे पाणीपुरवठा होतोच कसा, असा जाब त्यांनी यावेळी विचारला. येथील दूषित पाणीपुरवठा तातडीने थांबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांच्या वतीने नगरसेवक शहाणे यांनी दिला. त्यावेळी कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी या ठिकाणी तातडीने काम सुरू करण्यात येऊन दोन दिवसांत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या ठिकाणच्या पाण्याच्या पाइपलाइनमधून ड्रेनेजचे अथवा नाल्याचे पाणी जात असावे, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला.

नागरिकांच्या जिवाशी खेळ

सिडकोतील ड्रेनेजच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने वेळोवेळी अशा समस्या निर्माण होत असल्याचे दिसते. महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. नियमितपणे घरपट्टी व पाणीपट्टी भरली जात असतानाही नागरिकांना अशाप्रकारचे दूषित पाणी का देण्यात येते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सिडकोतील बऱ्याच भागात अशाच प्रकारे दूषित पाणीपुरवठा यापूर्वीही झालेला असून, प्रशासन याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

--

दूषित व दुर्गंधीयुक्‍त पाणीपुरवठा दोन दिवसांत बंद न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनदेखील ते लक्ष देत नसल्याचे येथील प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

-मुकेश शहाणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images