Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरात आज मोहरम

$
0
0

शनिवारी ताजिया मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम धर्मियांचा मोहरम सण शहरात शुक्रवार व शनिवारी होणार आहे. यानिमित्ताने शहरात शुक्रवारी ताजियाचे दर्शन व शनिवारी मिरवणूक कार्यक्रम होतील. मुस्लिम धर्मियांच्या हिजरी संवत या वर्षातील मोहरम हा पहिला महिना असतो. त्याच्या दहाव्या व आकराव्या दिवशी मोहरम सण साजरा केला जातो व त्यानिमित्ताने ताजियाची मिरवणूक निघते. मुस्लिमधर्मीय कॅलेंडरनुसार शुक्रवारी हा दिवस येत आहे. इमान हुसेन यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची या दिवशी आठवण केली जाते. मुस्लिम बांधव शुक्रवारी ताजियाचे दर्शन घेण्यासाठी ते घराबाहेर आणून ठेवतील. शनिवारी ताजिया मिरवणूक व मातम होईल. ताजियाची सवाद्य मिरवणूक होवून गिरणा मोसम नदी संगमावर त्याचे विसर्जन केले जाईल. यानिमित्ताने शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जोशी यांची निवड

$
0
0

जोशी यांची निवड

नाशिक : इंदिरानगर येथील धनंजय भालचंद्र जोशी यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या शहर कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली. या निवडीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मंत्री महादेव जानकर, जिल्हाध्यक्ष डॉ. अरूण आव्हाड, शहराध्यक्ष डॉ. उल्हास कुटे, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता खरात, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अश्पाक कादरी व इतरांनी जोशी यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे कॅन्टीनधारक संपावर

$
0
0

\Bमनमाडमध्ये \Bसलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वे अधिकारी मनमानी करीत असल्याचा आरोप करीत मनमाड रेल्वे स्थानकातील कॅन्टीनधारकांनी बुधवारी सायंकाळनंतर अचानक संपाचे हत्यार उपसल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान गुरुवारीही संप सुरू असून, मागण्या मान्य होईपर्यंत कॅन्टीन सुरू न करण्याचा पवित्रा कॅन्टीनमालकांनी घेतला आहे.

रेल्वे स्थानकात कॅन्टीनधरकांना सिलेंडर वापरास काही महिन्यांपासून रेल्वे अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. विजेच्या शेगडीसाठी रेल्वे वीज देत नाही. रेल नीर या पाण्याची विक्री करण्याची सक्ती केली जाते. मात्र या पाण्याची उपलब्धता करून दिली जात नाही असे कॅन्टीन मालकांचे म्हणणे आहे. ताजे व गरम पदार्थ प्रवाशांना देणे शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने मागण्यांचा विचार करावा असे कॅन्टीन मालक सांगत आहेत. बुधवारी रात्री सुरू केलेला संप मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे घेणार नाही असा कॅन्टीनधारकांचा पवित्रा आहे. दरम्यान विक्री बंद असल्याने रेल्वे स्थानक कॅन्टीन व स्टॉलमध्ये शुकशुकाट आहे. दुसऱ्या दिवशी कॅन्टीन व स्टॉल बंद असल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले.

फूड प्लाझा सुरू

मनमाड रेल्वे स्थानकातील फूड प्लाझा सुरू असल्याने तसेच मनमाड स्थानकात अनधिकृत व्हेंडर कार्यरत असल्याने प्रवाशांना संपाचा फारसा फटका बसला नाही. मात्र नेहमीपेक्षा स्थानकातील विक्रेत्यांची वर्दळ कमी असल्यामुळे प्रवाशांना वेळेवर खाद्य पदार्थ मिळत नव्हते.

रेल्वेत अनधिकृत वेंडर

मनमाड रेल्वे स्थानकात एकूण सहा प्लॅटफॉर्म असून, कॅन्टीनसह एकूण १६ खाद्यपेय स्टॉल आहेत. त्यात कॅन्टीनचालक संपात उतरले तरी गुरुवारी स्थानकातील फूड प्लाझा सुरू होता. तसेच बहुतेक स्टॉल बंद असले तरी रेल्वे स्थानकात अनधिकृत व्हेंडर सक्रिय असल्याने व ते थेट रेल्वे डब्यात जाऊन विक्री करीत असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला नाही.

कोट

रेल्वे स्थानकातील कॅन्टीनधारकांना संप हा रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सुरू आहे. रेल नील पाण्याची सक्ती केली जाते, मात्र त्याचा पुरवठा कमी आहे.- गिरीश शर्मा, केटरिंग संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट आणि फोटोओळ

$
0
0

सात संशयितांना

पोलिस कोठडी

येवला : तालुक्यातील वनविभागाच्या ममदापूर वनक्षेत्रामधील वाळू चोरीदरम्यान वनकर्मचाऱ्यांवर हल्ला प्रकरणी मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींना तालुका पोलिसांनी बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सातही जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

0000

दत्तू भोकनळचा सत्कार

मनमाड : रोइंग पट्टू दत्तू भोकनळ याने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, कुणाल वाघ उपस्थित होते.

000

निर्माल्य संकलन

कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कळवण (मानूर) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कळवण शहर व परिसरातील गणेश मंडळांकडील निर्माल्य जमा केले. निर्माल्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी महाविद्यालयाने राबविलेली निर्माल्य संकलन मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कळवण नगर पंचायतचे गटनेते कौतिक पगार यांचे सहकार्य लाभले. प्राचार्या डॉ. उषाताई शिंदे, प्रा. एस. एम. पगार, डॉ. बी. एस. पगार, प्रा. एम. बी. घोडके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाराम मंदिर फोटो कॅप्शन

$
0
0

दक्षिणायनारंभ

दक्षिणायन सुरू झाले की, पंचवटीतील काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या राम मूर्तीच्या पायावर सूर्याची पहिली किरणे पडतात. दोन दिवसानंतर लक्ष्मण मूर्तीच्या पायावर पडतात. गुरुवारी भाद्रपद शुद्ध एकादशी असल्याने ही किरणे सितामाईच्या पायावर पडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखावे खुलले अन् गर्दीने फुलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाचे आगमन होईन आठ दिवस झाल्यानंतर ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी भाविकांची गुरुवारी सायंकाळनंतर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. मोहरमची सुटी अन् पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातील सायंकाळपासूनच मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते. गणेश विसर्जनापर्यंत गर्दीचा ओघ असाच सुरु राहील, असा आशावाद मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या गुरुवारी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर बहुतांश देखावे अपूर्ण असल्याने गर्दीचा ओघ सुरुवातीला कमी होता. मात्र, महालक्ष्मी स्थापनेचे १५, १६ व १७ सप्टेंबर हे तीन दिवस सोडल्यानंतर गर्दी वाढू लागली. बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी शहरात पावसाने जोर धरल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. गुरुवारी मोहरमची सार्वजनिक सुटी आल्याने नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. शहरातील सर्वच प्रमुख मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

या भागात उसळली गर्दी

रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, भद्रकाली, बी. डी. भालेकर मैदान, कॉलेजरोड येथे गर्दी झाली होती. जुन्या नाशकातही मोठ्या प्रमाणात देखावे असल्याने येथेही भाविक मोठ्या प्रमाणात जात होते. सोमवार पेठेत जिवंत देखावा असल्याने येथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे गुलालवाडी व्यायामशाळेत लेझीमचा सराव सुरू असल्याने येथे येणारे भाविक तो पाहण्यात दंग झाले होते. जुन्या नाशकातील तिवंधा चौक येथे असलेल्या हिंदमाता मित्रमंडळाच्या वतीने भव्य गणेश मूर्ती बसविण्यात आली आहे. नावदरवाजा येथे रोकडोबा मित्रमंडळाच्या वतीने गणेश देखावा सादर करण्यात आला आहे. भद्रकाली कारंजा येथे श्री साक्षी गणपती येथीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, भारत मित्रमंडळाच्या वतीने गणेश आरास देखावा सादर करण्यात आला आहे. टाकसाळ लेन येथील श्री गजानन महाराज मित्रमंडळाच्या वतीने कठपुतलीचा खेळ दाखविण्यात येत आहे.

गाडीवरून दर्शनाने कोंडी

गणपती पाहण्यासाठी भाविक पूर्वी पायी चालत जात होते. आता गाडीवर देखावे पाहण्याची पद्धत रूढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सुरू झाले होते. शालिमार परिसरातून गाडी काढण्यासाठी १५ ते २० मिनिटे वाट पाहावी लागत होती. त्यामुळे भद्रकाली व मेनरोड या भागात वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदना शिबीराचे आयोजन

$
0
0

उद्या वेदना शिबिर

नाशिक : नाशिक पेन केअर सेंटरतर्फे वेदना निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ सप्टेंबर रोजी नाशिक पेन केअर सेंटर, जुनी पंडीत कॉलनी येथे दुपारी १ ते ४ यावेळेत पार पडेल. शिबिरात वेगवेगळ्या वेदना, तपासणी करण्यात येणार असून, डॉ. विशाल गुंजाळ व डॉ. गायत्री गुंजाळ पेशंट्सला मार्गदर्शन करतील.

प्रा. डॉ. बच्छाव यांची नियुक्ती

नाशिक : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. अरूण बच्छाव यांची तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यास मंडळातील अनेक संशोधनात्मक बाबी, अभ्यास क्रम निर्मिती प्रकियेत २०१८-१९ ते २०२३ या कालावधीत ते काम करतील. प्रा. डॉ. बच्छाव हे लो. व्यं. हिरे कॉलेजमधून मानसशास्त्र विभागातून निवृत्त झाले आहेत. या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. बच्छाव यांचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येते आहे.

भटक्या श्वानांचा त्रास

नाशिक : अंबड परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, रात्री अपरात्री कामावर जाणाऱ्या कामगारांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे छोटे मोठे अपघात सातत्याने घडतात. परिसरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढली असून, महापालिकेने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणूक मार्गावर ‘विघ्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, रविवारी (दि. २३) शहरातून निघणाऱ्या गणपती विर्सजनाच्या मिरवणूक मार्गावर महापालिका व महावितरण या विभागांनी मूलभूत सोयी-सुविधांसंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने अडचणींचा डोंगर कायम आहे. विसर्जन मिरवणुकीला अवघे दोन दिवस बाकी असल्याने याप्रश्नी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी मंडळांनी केली आहे.

नाशिक शहरात दर वर्षी वाकडी बारव येथून मिरवणुकीला सुरुवात होते. वाकडी बारव, चौक मंडई, जहाँगीर मशीद, दादासादेब फाळकेरोड, महात्मा फुले मार्केट, बादशाह कॉर्नर, विजयानंद थिएटर, संत गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधीरोड, मेहर सिग्नल, जुना आग्रारोड, अशोक स्तंभ, तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशरामपुरियारोड, कपालेश्वर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण, विसर्जन ठिकाण असा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे.

वीजतारा, अतिक्रमणे ऐरणीवर

वाकडी बारव ते धुमाळ पॉइंट या मार्गावरच्या विद्युत तारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. मात्र, पुढील मार्गावर अद्याप काही ठिकाणी काम बाकी असल्याने उंच मूर्ती असलेल्या मंडळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत या विषयावर चर्चा होते. मात्र, वर्षभर हा प्रश्न प्रलंबित राहतो. मिरवणूक सुरू होण्याच्या काही तास अगोदर पोलिस व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मेनरोड परिसरात कारवाई करून फिरत्या विक्रेत्यांना येथून काढून दिले जाते. मात्र, कायमस्वरूपी अतिक्रमाणाला हात लावाला जात नाही. अनेक दुकानांचे बोर्ड दुकानाच्या बाहेर आले असल्याने वाहनांचा धक्का लागण्याचा संभव असतो. यावरही कारवाई करावी, अशी मंडळांची मागणी आहे. मागील वर्षी भद्रकाली भागात बोर्डामुळे मिरवणूक पुढे सरकण्यासाठी वेळ लागला होता.

खड्डे, स्वागत मंडपांचा तिढा

मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडलेले असून, अजूनही ते बुजविण्यात आलेले नाहीत. या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणीही होत आहे. मिरवणूक मार्गावर अनेक पक्ष, संघटना, सामाजिक संस्था यांच्या वतीने मंडप टाकण्यात येतात. अशा ठिकाणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे सत्कार केले जातात. मात्र, हेच मंडप अडचणीचे ठरू लागले आहेत. हे मंडप मिरवणुकीला अडथळा होणार नाहीत अशा ठिकाणी लावण्यात यावेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेक न वटल्याने सभासदास शिक्षा

$
0
0

कर्जफेडीबाबत सहा महिन्यांसह तीन लाखांचा दंड

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील हरियाअली अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोयायटी या पथसंस्थेचे कर्जापोटी सभासदाने दिलेला धनादेश अनादर झाल्याने कर्जदारास सहा महिने सक्तमजुरीसह तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये सभासद शरीफ शेख अजीज तेली यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अे. आर. कल्लापुरे यांनी शिक्षा सुनावली आहे.

हरियाअली अर्बन को. ऑप. सोसायटीच्या शहादा शाखेतून शरीफ शेख अजीज तेली याने दीड लाखांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज परतफेडीसाठी कर्जदार तेली यांनी पतसंस्थेकडे देना बँक शहादा शाखाचा धनादेश दिला होता. कर्जदाराने मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने संस्थेने तो धनादेश हस्ती बँकेत वटविण्यासाठी टाकला असता, तो वटला नाही. त्यामुळे तेली यांच्यावर कायदेशीर नोटीस पाठवून कर्जफेड करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यालाही शरीफ शेख यांनी प्रतिसाद दिलानाही. याबाबत कर्जदार तेली यांच्याविरुध्द शहादा प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी यांच्याकडे खटला दाखल करून फिर्याद संस्थेचे वसुली अधिकारी दिनेश अशोक पाटील यांनी दिली. त्यानुसार कर्जदार शरीफ शेख अजीज तेली यांना शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणामुळे शहादा शहारातील या पतसस्थेच्या कर्जदार, सभासदांनी थकीत कर्ज भरण्यासाठी सपाटा लावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून वृद्धाची फसवणूक

$
0
0

शहरातील स्टेट बँकच्या मुख्य शाखेच्या एटीएमवर पैसे काढल्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकाला बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्ड बदलवून त्याच्या खात्यातून सायंकाळी ४२ हजार रुपये परस्पर काढल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईनगर एक्स्प्रेसवर दरोडा; ८ लाखांची लूट

$
0
0

मनमाड:

शिर्डीहून काकीनाडा, आंध्र प्रदेश येथे जाणाऱ्या साईनगर एक्सप्रेसवर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. मनमाड-अंकाई दरम्यान सात ते आठ दरोडेखोरांनी रेल्वेत घुसून प्रवाशांना मारझोड करत महिला प्रवाशांचे ८ लाखाचे दागिने लुटले. या मारहाणीत दोन महिला जखमी झाले आहेत. या प्रकरणी औरंगाबाद रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनगर एक्सप्रेस मनमाडहून काकीनाडाकडे जाण्यास निघाली. मात्र, अंकाई स्थानका दरम्यान साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली. गाडी का थांबली हे पाहण्यासाठी रेल्वे कर्मचारी गाडीतून उतरले असता गाडीवर परिसरातून दगडफेक करण्यात आली. सात-आठ जणांनी एक्स्प्रेसमध्ये घुसून वेगवेगळ्या बोगीतील प्रवाशांना मारहाण केली. महिलांना धमकावत ८ लाखाचे सोन्याचे दागिने लुटून जंगलात पलायन केले. यानंतर गाडी नगरसुल स्थानकावर थांबली असता संतप्त प्रवाशांनी स्थानकात निदर्शने करत पोलिसांना सुरक्षेबाबत जाब विचारला. या लुटीच्या घटनेत दोन महिला जखमी असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. तर दरोडा प्रकरणी ७ ते ८ अज्ञतांविरोधात औरंगाबाद लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, प्रवाशांनी काही दरोडेखोरांना पकडले असून पोलिसांकडे त्यांना सुपूर्द केले असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत काही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. या दरोड्याबाबत मनमाड लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाला रात्री उशिरापर्यंत माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ब्राम्हण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'

$
0
0

नाशिक

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण आहेत त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार ते पंचांग बघूनच करतील', असे विधान शिवसेनेचे नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

राहू-केतू कोण आहेत हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून मुहूर्त काढला जाईल. आमचे श्रद्धास्थान एकमेव 'मातोश्री' असल्याने मला काय मिळणार हे शेवटपर्यंत कळणार नाही. परंतु, मुख्यमंत्री पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असं गुलाबराव पाटील म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या किंमती १०० रुपयांच्या वर जाण्याची मी वाट पाहतोय. सर्वांची मानसिकताही माझ्यासारखीच झाली आहे. आधीच्या तुलनेत पेट्रोलचे भाव खूप बदलले. पेट्रोल पंपावरील पोस्टरमध्ये दिसणारी बाई सुद्धा बदलली. आधी त्या पोस्टरवर म्हातारी बाई दिसायची आता मात्र त्या म्हाताऱ्या बाईची जागा एका मॉडेलने घेतली आहे. त्यामुळे साहजिकच भाव वाढतील अशी उपहासात्मक टीका गुलाबराव पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केलीय.

इंधन दरवाढीविरोधातील प्रतिक्रिया कितीही वाईट असली तरी तिचा काही उपयोग होत नाही. प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि मतपेटीतून व्यक्त होणे यात जमीनअस्मानचा फरक आहे. मतदारांनी आता मतांच्या शस्त्राचा वापर करायला हवा. राज्यातील २६ जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत. इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही अतिरिक्त भार उचलण्याची गरज आहे, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयांतून योजनांची माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात, यासाठी सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण योजना अमलात आणल्या असून, त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अखिल भारतीय युवक मराठा महासंघाने हाती घेतले आहे. केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. व्ही. बी गायकवाड यांच्या हस्ते लोकराज्य मासिकाचे वाटप करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या दोन्ही योजनांसह शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण आणि छत्रपती राजाराम उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियानासारख्या महत्त्वाच्या योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरणार आहेत. ज्या पालकांची वार्षिक उत्पन्नमर्यादा आठ लाख रुपये आहे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी लागणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून १०० टक्के शुल्क घेण्यात आल्याच्या तक्रारी येतील, त्यावर सरकार कारवाई करणार आहे. महानगरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३० हजार रुपये, तर शहराव्यतिरिक्त अन्य शहरांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक २० हजार रुपये वसतिगृह निर्वाहभत्ता देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यात अडथळा आल्यास तुषार जगताप, आप्पासाहेब गाडे आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमध्ये चढतांना महिलेची पोत खेचली

$
0
0

शिवशाहीत चढतांना

महिलेची पोत लंपास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवशाही बसमध्ये चढत असतांना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना जुने सीबीएस येथे घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

भीमाबाई सिताराम खांडबहाले (८०, रा. महिरावणी, नाशिक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. खांडबहाले या सोमवारी (दि. १०) सकाळी आपल्या घरी जाण्यासाठी सीबीएस बस स्थानकात आल्या होत्या. त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी त्या शिवशाही बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. घटनेचा अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.

वृद्धाच्या दीड लाखांवर डल्ला

डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्या माध्यमातून भामट्यांनी वृद्धांच्या बँक खात्यातून एक लाख ६० हजार रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत रघुनाथ कंसारा (७५, रा. नवीन तांबट आळी, रविवार कारंजा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. कंसारा यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. अज्ञात भामट्यांनी बुधवारी (दि. १९) मध्यरात्री त्यांच्या डेबिट कार्ड क्रमांकाचे क्लोनिंग केले. नवीन तयार केलेल्या कार्डच्या सहाय्याने त्यांच्या बँक खात्यातील सुमारे एक लाख ६० हजार रुपयांवर ऑनलाइन डल्ला मारला. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक कमलाकर जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

डॉ. मदनूरकरांचे व्याख्यान

नाशिक : रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे शनिवारी (दि. २२) डॉ. नागेश मदनूरकर यांचे व्याख्यान होणार आहे. 'प्रोटेस्ट ग्रंथींचा कॅन्सर' या विषयावर सायंकाळी पाच वाजता गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये हे व्याख्यान होईल. सोसायटीचे अध्यक्ष राधेय येवले यांनी ही माहिती दिली.

अथर्वशीर्ष पठण

नाशिक : जुने नाशिक येथील प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे गणेश अथर्वशीर्ष आवर्तन व पठण झाले. अथर्वशीर्ष आवर्तन व पठणासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बागूल, पश्चिम प्रभाग सभापती वैशाली भोसले, नगरसेविका वत्सला खैरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी महापौर विनायक पांडे आदी उपस्थित होते.

गणेश विसर्जन

नाशिक : पंचवटीतील तरुण ऐक्य मंडळातर्फे श्रीराम विद्यालयाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. दीडशे मुलींचे लेझीम पथक बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. लेझीमच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसमवेत नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष कारभारी मुखेडकर, सचिव बाबूराव मुखेडकर, मुख्याध्यापक सुरेश शिंदे, मुख्याध्यापिका पौर्णिमा पंडित उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषध विक्रेत्यांचा २८ ला बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारकडून लादण्यात येणाऱ्या जाचक अटींविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २८ सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. नाशिकसह देशभरातील औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

देशात आणि राज्यात सशर्तपणे बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाइन औषध विक्री व ई पोर्टल याबाबत सरकार व प्रशासनाची सकारात्मक भूमिका या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संटनेने शुक्रवारी बंदचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य सहसंचालकांची सुरगाण्यास भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा तालुक्यात घडलेल्या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. पुणे येथील आरोग्य विभागाचे सहसंचालक अर्चना पाटील यांनी शुक्रवारी या आदिवासी भागात भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली आणि चांगल्या आरोग्य सेवा देण्याची सूचना दिल्या.

पाटील यांनी आपल्या भेटीत सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, कुकरी आरोग्य उपकेंद्र, पळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्या. यामध्ये सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयातील औषध साठा, प्रसूती कक्ष, महिला कक्ष तसेच रुग्णालयातील अपुऱ्या जागेची माहिती घेतली. खोकरी आरोग्य उपकेंद्र, माणी येथील प्राथमिक येथील आरोग्य सेविकेची चर्चा करून उपकेंद्रातील औषधसाठा, उपलब्ध इंजेक्शन व गरोदर मातेला दिलेल्या सेवांची पडताळणी केली. यावेळी त्यांनी केंद्रातील अतिजोखमीच्या मातांची यादी तपासली तसेच उपस्थित डॉक्टरांना अधिकाऱ्यांना कमी हिमोग्लोबीन असलेल्या मातेला आयन सुक्रोज डोस कसा द्यावा, किती द्यावा, याविषयी बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू कमी कसे होतील याबाबत आपण सर्वांनी काय केले पाहिजे, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केल्या जाणाऱ्या उपाययोजना प्रामाणिकपणे राबवाव्यात व जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा द्यावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुरेश जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. डी. डी पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अदिती शिरोडेचे यश

$
0
0

नाशिक : मविप्रच्या अभिनव शाळेत चौथ्या इयत्तेतील विद्यार्थिनी अदिती शिरोडे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा, मविप्र टॅलेंट सर्च परीक्षा आणि ग्लोबल मॅथ्स ऑलिम्पियाड या तीन परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे. प्रज्ञाशोध परीक्षेत अदितीने नाशिक केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. मविप्र टॅलेंट सर्च परीक्षेत प्रथम, तर ऑलिम्पियाड परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला. मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, शिक्षिका नीलिमा गावित आदींनी तिचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोमो चॅलेंजसंदर्भात ‘नवशक्ती’ची जागृती

$
0
0

मोमो चॅलेंजसंदर्भात 'नवशक्ती'ची जागृती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मोमो चॅलेंजमुळे ब्लू व्हेल गेमसारखे नवे संकट निर्माण होत आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अशा आशयाचा फलक लावून गणेशोत्सवानिमित्त शहरात जनजागृती करण्यात येत आहे.

भाभानगर येथील नवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने 'सावध व्हा... मोमो चॅलेंजपासून सावध व्हा...' या आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकाच्या माध्यमातून 'पालकांनो, वेळीच सावध व्हा. ब्लू व्हेलनंतर मोमो चॅलेंज हा घातक गेम स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना टार्गेट करीत आहे. आपली पाल्ये मोबाइल वापरताना कोणते गेम खेळतात, याकडे वेळीच लक्ष द्या,' असे आवाहन करण्यात आले आहे.

फलकावर मोमो चॅलेंजचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्यास नंबर ब्लॉक करा, असा सल्ला देण्यात आला आहे. नगरसेवक संदीप लेनकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक प्रबोधनासाठी हा फलक मंडळाच्या वतीने लावण्यात आला आहे. गेल्या बावीस वर्षांपासून या मंडळांच्या वतीने सामाजिक प्रबोधनावर आधारित गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तरुणांसोबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट फोनचा वापर अधिक आहे. विद्यार्थी अनेकदा मोबाइलवरील कोणताही गेम डाऊनलोड करतात. मात्र, व्हर्च्युअल गेमचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यापासून पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेळीच सावध व्हावे, यासाठी गणेशोत्सवात हे फलक लावले असल्याचे लेनकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’ नाट्यसंमेलनाचेअध्यक्षपद प्रथमच खान्देशकडे

$
0
0

युवा रंगकर्मी हर्षल पाटील यांची निवड

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाराष्ट्र साहित्य परिषद युवा नाट्य संमेलन यावर्षी अमळनेर येथे होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तन सांस्कृतिक व साहित्यिक संस्थेचे हर्षल पाटील यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील नाट्यवर्तुळामध्ये या युवा नाट्य संमेलनाला मानाचे स्थान आहे. हे संमेलन यावर्षी जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला होणार असून, येथील मसाप शाखेला त्याचे यजमानपद मिळाले आहे. २९ व ३० सप्टेंबर ला होणाऱ्या या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जळगाव येथील परिवर्तनचे सचिव व युवा रंगकर्मी हर्षल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मसाप पुणेच्या मिलिंद जोशी, वि. दा. पिंगळे, सुनीता राजे पवार व तानसेन जगताप यांनी व मसाप, अमळनेर यांनी एकमताने हर्षल पाटील यांची निवड केली. याबाबत स्वागताध्यक्ष डिगंबर महाले, कार्याध्यक्ष रमेश पवार, कार्यवाह दिनेश नाईक व रंगकर्मी संदीप घोरपडे, शरद सोनवणे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ येथील सर्व रंगकर्मींमधून हर्षल पाटील यांच्या कार्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हर्षल पाटील यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही खान्देशच्या सांस्कृतिक व साहित्यिक विश्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. या पूर्वी खान्देशाला कधीही संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळालेला नव्हता. नाट्य क्षेत्रात खान्देशात होणारे नाट्यसंमेलन व अध्यक्षपदामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याच्या भावना जळगाव जिल्ह्यातील रंगकर्मींनी व्यक्त केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images