Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अतिक्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूररोडला लागून आनंदवली गावाच्या शिवारात संतकबीरनगरला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिका प्रशासनाने बुधवारी हटविली. तसेच कॅनॉलवरील पत्र्यांच्या शेडचेही हटविण्यात आली.

शासकीय भूखंडांवर वसलेल्या संतकबीरनगर झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत. तसेच गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावरही पत्र्यांचे शेड उभारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. याची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संतकबीरनगर भागात बुधवारी कारवाई केली. कॅनॉलवरील पत्र्यांचे शेड हटविण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवाशांनी अडथळा आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने रस्त्यात अडथळा ठरणारी सर्वच अतिक्रमणे हटविली. मोहिमेत महापालिकेच्या सातपूर विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिकेने संतकबीरनगर येथील मुख्य रस्त्यांवर येणारे शेड व कॅनॉलवरील अतिक्रमण काढले. तब्बल २३ किलोमीटरवरील कॅनॉलरोडवरील सर्वच अतिक्रमणे महापालिकेने हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहराच्या मध्य भागातून गेलेल्या कॅनॉलरोडवर बेसुमारे अतिक्रमणे वाढली आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनीच पाहणी करून कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या सरींनी दिलासा

$
0
0

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हजेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने मंगळवार पाठोपाठ बुधवारीही शहरात हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पावसाची नोंद झाली. तर राज्यात नाशिकसह जळगाव, नगर आणि पुण्यातही पावसाने उपस्थिती लावली. अद्यापही जिल्ह्याला चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

वातावरणात बुधवारी सकाळपासूनच उष्मा वाढला होता. शहरात कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसवर होता. पावसाने बुधवारी दुपारनंतर शहरात काहीवेळ जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात देवळा, त्र्यंबकेश्वर, मनमाड आदी भागात पावसाने हजेरी लावली. शहर व जिल्ह्यात झालेल्या पावसाची सरासरी १५.७ मिमी इतकी नोंद करण्यात आली. देवळा तालुक्यात पावसाने चांगली उपस्थिती दिली आहे. देवळ्यात ३४.६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली. सिन्नर तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र सायंकाळपर्यंत तेथे पावसाच्या सरी कोसळ्याच नाही. शहरात सलग दुसऱ्या दिवशीही झालेल्या पावसाच्या परिणामी गणेशोत्सवाचे देखावे बघणाऱ्यांच्या गर्दीवरही परिणाम झालेला दिसून आला. जिल्ह्याला परतीच्या पावसाची ओढ लागली आहे. खरिपाची पिके संकटात आली असून परतीच्या पावसासाठी वरुणराजाची आळवणी शेतकरी करताहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरा दिवसही पावसाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाचे शेवटचे चार दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्याची ओढ गणेश भक्तांना लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुपारी पावसाच्या धारा कोसळत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघता येत नाही. बुधवारी दुपारी शहरात पावसाच्या सरी कोसळ्याने सायंकाळी गणेशोत्सवावर त्याचा परिणाम जाणवला. शहरातील गणेश मंडळांत बुधवारीदेखील गणेशोत्सवाची धामधूम कमीच होती.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक विषयांवर देखावे साकारले आहेत. शहरातील बी. डी. कामगार, शालिमार, मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी या भागातील पारंपरिक गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी भक्तगण गर्दी करतात. यंदाच्या गणेशोत्सवात मात्र देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी हवी तशी दिसत नसल्याचे मंडळांचे कार्यकर्ते सांगतात. दोन दिवसांपासून शहरात दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे भक्तांचा हिरमोड होत आहे. रविवारी सुटी असूनही अनेकांच्या घरी महालक्ष्मी असल्याने भक्तांना देखावे पाहण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे इतर दिवशी सवडीप्रमाणे देखावे पाहण्यासाठी जाण्याचा प्लॅन अनेकांनी आखला होता. पण, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने गणेश भक्त देखावे बघायला जाणे टाळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेले देखावे भक्तांच्या गर्दी अभावी ओस पडल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

मंडळांच्या उत्साहावर विरजण

ऐन गणेशोत्सवात पावसाच्या सरी कोसळत असल्याने मंडळांचा उत्साहदेखील कमी झाला आहे. पावसामुळे अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे बाप्पांच्या मंडपातील रोषणाई आणि परिसरातील गणेशोत्सवावर पावसाचे सावट दिसते. बुधवारी सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने कॉलेजरोड, शालिमार, सातपूर, सिडको, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, पंचवटी, पेठरोड परिसरातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी काही भक्तांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती पोर्टल कार्यशाळा शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांची माहिती कॉलेज प्रशासनाला ऑनलाइन स्वरुपात सादर करावी लागते. ही माहिती https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टलवर दिलेल्या मुदतीत कॉलेजेसला भरणे अनिवार्य आहे.

अनेकदा विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करताना कॉलेजांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींचे निराकरण व्हावे, यासाठी उच्च शिक्षण, पुणे विभाग यांच्या वतीने कार्यशाळा होणार आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कॉलेजेससाठी शनिवारी (दि. २२) संगमनेर नगरपालिका महाविद्यालयात सकाळी साडेअकरा वाजता कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित या दोनही श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य, विधी व शिक्षणशास्त्र विभागाच्या कॉलेजांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, अशी सूचना पुणे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाच्या वतीने कॉलेजेसला करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांना क्लिन-चिट

$
0
0

महावितरणची विशेष तपासणी मोहीम; अधिकृत वीजवापरावर शिक्कामोर्तब

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

महावितरणतर्फे तपासणी केल्यानंतर महापालिकेने परवानगी दिलेल्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना क्लिन चीट मिळाली आहे. कोणतेही गणेश मंडळ अनधिकृत वीजवापर करीत नसल्याचे महावितरणला आढळून आले.

महावितरणने सोमवार आणि मंगळवारी विशेष तपासणी मोहीम राबवित गणेश मंडळांची पाहणी केली. असे असले तरी महापालिकेने परवानगी दिलेल्या व महावितरणने तपासणी केलेल्या गणेश मंडळांच्या संख्येत १०९ एवढी मोठी तफावत दिसून आली. त्यामुळे या १०९ गणेश मंडळांचा वीजपुरवठा अधिकृत की अनधिकृत यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेने ६३३ मंडळांना अधिकृत परवानगी दिली आहे. त्यापैकी अवघ्या २१५ मंडळांनी महावितरणकडून वीज पुरवठ्याची अधिकृत परवानगी घेतली होती. तर उर्वरित ४१८ मंडळांनी महावितरणकडून अधीकृत वीजजोडणी घेतली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर मंडळ एक व दोनमधील ५२४ मंडळांच्या वीजजोडणीची तपासणी केली. त्यापैकी २३४ मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घेतल्याचे तर २९० मंडळांनी खासगी वीज ग्राहकाच्या मीटरमधून वीजजोडणी घेतलेल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व मंडळांना महावितरणच्या तपासणी मोहिमेत क्लिन चिट मिळाली आहे.

१०९ मंडळांचे काय?

महावितरणने ५२४ गणेश मंडळांची तपासणी केली आहे. परंतु, महापालिकेने ६३३ मंडळांना परवानगी दिली. त्यामुळे उर्वरित १०९ मंडळांच्या वीजजोडणी अधिकृत की अनधिकृत, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. महावितरणकडूनही या उर्वरित गणेश मंडळांच्या वीजजोडणीबाबत अद्यापर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

..

महावितरणच्या तपासणी मोहिमेतील लेखाजोखा

उपविभाग....एकूण गणेश मंडळ....अधिकृत वीजजोडणीधारक....खासगी मीटरचा वापर

शहर....................५१....................२८............................२३

सिडको....................५६....................२२....................३४

सातपूर....................४४....................१६....................२८

पंचवटी....................८७....................२२....................६५

द्वारका....................६६....................२५....................४१

त्र्यंबक....................३१....................१०....................२१

जेलरोड....................५६....................३२....................२४

गंगापूर....................४८....................३२....................१६

देवळाली....................४३....................३३....................१०

शिंदे....................४२....................१४....................२८

एकूण....................५२४....................२३४....................२९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्राला फायदा

$
0
0

डॉ. उद्वय आहेर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लेप्रोस्कोप या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघड शस्त्रक्रिया कमी वेळात करणे शक्य झाले आहे. मुंबई व पुणे शहरातही नसलेली सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आजारांवर त्वरित उपचार करणे डॉक्टरांना शक्य होत आहे. मुंबई, पुण्यातील रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी येत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे मत लेप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. उद्वय आहेर यांनी मांडले.

नॅशनल इंडिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने शहरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांसाठी चर्चासत्र झाले. एमआयडीसीच्या डेप्युटी कलेक्टर हेमांगी पाटील, लेप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ.उद्वय आहेर व रेडिओलॉजिस्ट डॉ.प्रीती आहेर यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांसोबत संवाद साधला. डॉ. आहेर म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा होत आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे आजारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करता येत आहे. त्यामुळे रुग्णांचे आजार पूर्णपणे बरे होत आहेत. शहरातील वैद्यकीय सेवा अधिक भक्कम करण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी 'निमा'चे अध्यक्ष डॉ. राहुल पगार, सचिव ललित जाधव, माजी अध्यक्ष डॉ. भूषण वाणी, डॉ. सुहास कुलकर्णी यांच्यासह शंभरहून अधिक डॉक्टर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धक्कादायक! मार्क्स वाढवून देण्यासाठी सेक्सची मागणी

$
0
0

नाशिक:

बारावीच्या परीक्षेत वारंवार अपयशी होणाऱ्या विद्यार्थिनीस उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे दोन प्राध्यापकांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटीतील एका नामांकित महाविद्यालयात घडला. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आडगाव पोलिसांनी विनयभगांचा गुन्हा दाखल करीत बुधवारी दोघा प्राध्यापकांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण दादाजी सूर्यवंशी (वय ३४, रा. निर्माण नक्षत्र सोसायटी, औरंगाबाद रोड) व सचिन निशिकांत सोनवणे (वय ३४, रा. बलराम नगर, धात्रक फाटा) अशी संशयीत प्राध्यापकांची नावे आहेत. एका विद्यार्थिनीने २०१५ मध्ये या महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. बारावीत शिकत असताना वर्गात विद्यार्थ्यांना भविष्यात पुढे काय व्हायचे आहे ते कागदावर लिहून द्यावे असे सांगण्यात आले. या विद्यार्थिनीने लिहिलेला कागद घेताना सोनवणे यांनी तिचा हात पकडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इंग्रजीच्या परीक्षेच्या वेळी या विद्यार्थिनीचा तिसरा क्रमांक असतानाही ३० विद्यार्थ्यांमध्ये तिची परीक्षा सर्वात शेवटी घेण्यात आली. त्यावेळी सूर्यवंशी यांनी तिला इंग्रजीच्या चार ओळी वाचण्यास सांगितले. पुस्तक वाचत असताना बोलता-बोलता त्यांनी तिचा हात पकडला, हात झकटला असता तिच्या कमरेवर हात ठेवला, पास व्हायचे असेल तर सांगेल तसेच कर असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे मानसिक धक्का बसून विद्यार्थिनीने महाविद्यालयात जाणेच बंद केले. ती केवळ परीक्षेसाठी उपस्थित राहू लागली. ती वारंवार नापास होऊ लागल्याने घरच्यांनी तिची विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. आई-वडील इतर परिचितांसोबत मंगळवारी (दि.१८) रोजी महाविद्यालयात गेले. तेव्हाही सूर्यवंशी व सोनवणे यांनी तिला तशाच प्रकारे विचारणा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ कॉलेजच्या आवारात निदर्शने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात धावणार चारशे बस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर बससेवेबाबत राज्यातील अन्य महापालिकांचा तोट्याचा अनुभव पाठीशी असताना केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे सत्ताधारी भाजपने तोट्यात चालणारी शहर बससेवा चालविण्याच्या निर्णयावर बुधवारी बहुमताच्या जोरावर महासभेत शिक्कामोर्तब केले. बससेवेचे स्टेअरिंग प्रशासनाच्या नव्हे, तर परिवहन समितीच्या हातात असेल, अशी व्यवस्था या ठरावात करीत गोपनीय मतदानाची विरोधकांची मागणी महापौर रंजना भानसी यांनी फेटाळून लावली. या निर्णयामुळे आता राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातून सुटका होणार असून, महापालिकेची मान आता यात अडकणार आहे. बससेवेचा फायदा आणि तोट्यावरून सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षांमध्ये तब्बल पाच तास खल चालला. त्यामुळे आतापर्यंत पाच वेळा फेटाळण्यात आलेल्या बससेवेचा मार्ग सहाव्यांदा सुकर झाला आहे.

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवर परिणामकारक ठरणाऱ्या शहर बससेवेचा विषय बुधवारच्या महासभेत ठेवण्यात आला. मुख्यमंत्र्यांचाच आदेश असल्याने सत्ताधारी भाजपने आपली परिवहन समितीची मागणी पूर्ण होताच, या प्रस्तावाला बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली. प्रस्तावात अनेक तांत्रिक त्रुटी असून, तो परिपूर्ण नसल्याची पोलखोल विरोधकांनी सभागृहात केली. सभागृह नेता दिनकर पाटील यांनी शहर बससेवा ही शहराची गरज असून, या संदर्भातील प्रस्ताव परिवहन समितीसह मंजूर करणार असल्याचे सांगत, भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावरून विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि मनसे गटनेते सलीम शेख यांची पाटील यांच्यासोबत खडाजंगी झाली. महापौरांचे आदेश सभागृह नेते देत असल्याचा आरोप दोघांनी केला. कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी भाजपच्या या प्रस्तावाची चिरफाड केली. संपूर्ण नाशिककर आणि महापालिकेला वेठीस धरणारा हा प्रस्ताव असल्याचे सांगून त्याला कॉँग्रेसचा विरोध असेल, असे सांगितले. प्रस्तावाबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार गुप्त मतदान घ्यावे, असे त्यांनी सांगितले. गुरुमित बग्गा यांनी, महापालिकेला तोट्याची भरपाई द्या किंवा बससेवा ताब्यात घ्या, अशा प्रकारची मागणी करणाऱ्या महामंडळाची भूमिका चुकीची असल्याचे सांगतानाच ज्या महापालिकांनी बससेवा चालविण्यास घेतली, त्या सर्व तोट्यात असल्याची आकडेवारी सादर केली. पुणे महापालिकेच्या बससेवेचे काम तेव्हा आयुक्त मुंढे यांनी केले. ती सेवादेखील तोट्यातच असल्याचे सांगितले. आयुक्तांनी किलोमीटरमागे ठेकेदाराला पैसे देण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी त्यात किमान ७० कोटी रुपयांचा तोटाच होईल, असे त्यांनी सांगितले. महामंडळ तोट्यात आहे हे अर्धसत्य असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट ही पद्धत चुकीची असल्याचे सांगितले. तुम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे विचार करा, असे आवाहन त्यांनी केले. योगेश हिरे यांनी आयुक्तांच्या प्रस्तावातील परिवहन समिती वगळता असलेल्या त्रुटीच मांडल्या. भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी मात्र या बससेवेवर स्तुतिसुमने उधळत बससेवेचे समर्थन केले. त्यामुळे पाच तासांच्या चर्चेनंतर महापौर भानसी यांनी पहिवहन समिती नियुक्त करण्यासह प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे ठेकेदारामार्फत चारशे बस धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तुम्ही पाप करताहेत : बोरस्ते

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नाशिकवर विघ्न आले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही असे आयुक्त सांगतात; मग तोट्यात चालणारी बससेवा घेण्याचा प्रस्ताव कसा काय मांडतात, असा प्रश्न करीत राज्यातील विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातील तोट्यात गेलेल्या बससेवेची स्थिती मांडली. तेथे मुख्यमंत्री मदत करीत नाहीत, तर नाशिकला काय करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बससेवा उत्पन्नाचे साधन आहे का, हे आयुक्तांनी सांगावे असे आव्हान देत, बससेवेमुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही सेवा चालवू नये, अशी मागणी करीत बससेवेचे पाप भाजपवाले करीत आहेत. त्यामुळे आमचा विरोध नोंदवून हा ठराव फेटाळा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली.

खैरेंकडून पोलखोल

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शहर बससेवेचे समर्थन करणाऱ्या भाजपमधील आमदार आणि नगरसेवकांची पोलखोलच काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी सभागृहात केली. २००९ मध्ये बससेवेचा प्रस्ताव आल्यानंतर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सभागृह नेते दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे आणि शशिकांत जाधव यांचे बससेवा कशी तोट्यात आहे आणि ती घेतल्यास नुकसान होईल, असे पत्र तत्कालीन महापौर विनायक पांडे यांना दिले होते. त्या पत्राचे वाचन केल्याने बससेवेचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची फजिती झाली. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी मात्र यावर सारवासारव केली.

मोरुस्करांकडून प्रत्युत्तर

दरम्यान, खैरेंच्या आरोपाला भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी जशास तसे उत्तर देत विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटीअंतर्गत शहर बससेवा चालवण्याचा ठराव मनसेच्या सत्ताकाळातच झाल्याचे सांगत, या ठरावावर शाहू खैरे, अजय बोरस्ते, सलीम शेख यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे पत्रच सादर केले. स्मार्ट सिटीतल्या एसपीव्हीसोबतच्या करारातच शहर बससेवेची तरतूद केल्याचा दावा करीत मोरुस्करांनी खैरे, बोरस्तेंना जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकमेकांवर आपल्या जुन्याच ठरावांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

'साहेब, तुमची बदली निश्चित!'

बससेवेचा प्रस्ताव रेटणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढेंसह भाजपच्या प्रयत्नांवर अजय बोरस्ते आणि गुरुमित बग्गा यांनी टोलेबाजी केली. बससेवेच्या निर्णयानंतर आयुक्त मुंढे यांची बदली होणार असल्यापासून ते बससेवेसाठी मुंढेंना नाशिकमध्ये आणल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी सभागृहात केला. एकदा हा प्रस्ताव कार्यवाहीत आला, की आयुक्तांची बदली करण्यात येणार आहे, अशी महापालिका वर्तुळात सुरू असलेली चर्चा गुरुमित बग्गा आणि अजय बोरस्ते यांनी उघड स्वरूपात मांडली. त्यामुळे मुंढेंना हसू आवरले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान चार गणेश दर्शन

करवाढीची संहिता नाकारण्यासाठी आंदोलनाचा अंक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिरावर महापालिकेने लादलेली करवाढीची संहिता नाकारण्यासाठी नाशिकचे कलावंत आता आंदोलकाची भूमिका वठवणार आहे. नाशिक महापालिकेने प्रस्तावित केलेली महाकवी कालिदास कलामंदिराची करवाढ ही कलावंतांना पेलणारी नसून, सांस्कृतिक क्षेत्राचे कंबरडे मोडणारी आहे. या करवाढीमुळे नाशिकची सांस्कृतिक चळवळ धोक्यात येणार असून, बाहेरील नाटकांचे प्रयोगदेखील शहरात होणार नाहीत. ही करवाढ मागे न घेतल्यास नाशिकचे कलावंत कालिदास कलामंदिराबाहेर आंदोलन करतील, असा इशारा नाशिकच्या कलावंतांनी दिला आहे.

कालिदास कलामंदिराच्या बाहेर गुरुवारी सदानंद जोशी, सचिन शिंदे, लक्ष्मण कोकणे, अभय ओझरकर, विनोद राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ही माहिती देण्यात आली. नाशिक महापालिकेने कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करून कलावंतांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, महापालिकेचा दरवाढीचा प्रस्ताव ऐकल्यानंतर हिरमोड झाला. या कलामंदिराची दरवाढ झाल्यास येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. याबाबत नाशिकच्या काही कलावंतांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासमावेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. मात्र, त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने सोमवारी आयुक्त मुंढे यांनी दरवाढ मागे घ्यावी, असे कलावंतांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कलावंतांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की मुंबई-पुण्यात असलेल्या नाट्यगृहांच्या तुलनेत कालिदास कलामंदिराची दरवाढ ही हौशी प्रायोगिक नाट्य कलावंतांना न परवडणारी आहे. संगीत आणि नृत्याच्या क्षेत्रातील कलावंतांनाही याची झळ पोहोचणार आहे. ही दरवाढ झाल्यास बाहेरून येणारी व्यावसायिक नाटके नाशिकला येणार नाहीत. याचा परिणाम नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रावर होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ७ हजार रुपये भाडे कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आहे. महाराष्ट्रातील सर्वांत सुसज्ज असलेल्या नाट्यगृहाचे भाडे साडेचार हजारापेक्षा अधिक नाही. त्यामुळे त्या तुलनेत भाडेवाढ व्हावी. नाट्यगृहाची भाडेवाढ करताना प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, बालनाट्य, सेमिनार, मीटिंग, चर्चासत्र, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, गॅदरिंग, ऑर्केस्ट्रा, व्याख्यान, हौशी नाट्य संस्था, रंगीत तालीम आदींसाठी वेगवेगळे दर आहेत. नाशिक महापालिकेनेही त्याचप्रमाणे दर आकारणी करावी. कॉर्पोरेट सेक्टरच्या सेमिनारला वेगळे दर आहेत. त्याचे दर वेगळे असावेत.

नाटक होणे अशक्य

महापालिकेने कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण केल्याचा दावा केला असला तरीही ते तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही. नाटकासाठी लागणारे स्पॉट हे कमी दर्जाचे असल्याने स्टेजपर्यंत प्रकाशझोत येत नाही. त्याचप्रमाणे स्टेजच्या बाजूलाच पॉवरपॅक लावल्याने त्याचा आवाज रंगमंचावर येतो. त्यामुळे कलावंताला ते विचलित करणारे आहे, तसेच विंगा या लोखंडी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्टेजवर सेट लागू शकत नाही. नाटकाचा बॅकड्रॉप व विंगा या काळ्या रंगाच्या हव्यात. मात्र, त्या निळ्या रंगाच्या करण्यात आल्या आहेत. बहुतेक नाशिकमधील कालिदास कलामंदिर महाराष्ट्रातील एकमे‌व कलामंदिर अशा सुविधांनी युक्त असेल. या सुविधा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत येथे नाटकाचा प्रयोग होऊ शकत नाही.

महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा; नाही तर आम्हाला नाइलाजाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. या दरवाढीमुळे नाशिकची सांस्कृतिक चळवळ धोक्यात येणार आहे.

- सचिन शिंदे, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच करा विसर्जन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांनी घरातल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अशा पर्यावरणपूरक विसर्जनाकरिता महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांत चार टन अमोनियम बायकार्बोनेट मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिक आणि मंडळांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात आवर्जून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदी, विहिरी किंवा ओढ्यात विसर्जित करू नयेत, असे आवाहन करीत नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेटद्वारे घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील सहा विभागांसाठी महापालिकेने चार टन दोनशे किलो अमोनियम बायकार्बोनेट मोफत उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेकडून दर वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात येतो. त्यातच यंदा महापालिकेने नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तींवर भर द्यावा, असे आवाहन केले होते. मात्र, तरीही असंख्य नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना प्राधान्य दिल्याचे दिसले. प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही, त्याचे लहानलहान तुकडे जलस्रोतात जाऊन हे स्रोतच बंद करतात. नदी आणि विहिरींचे प्रदूषणही होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी म्हणून घरगुती गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करा, अशी चळवळ राबविण्यात येत आहे. पुण्यात या पॅटर्नला सुरुवात करण्यात आल्यानंतर महापालिकेनेही नागरिकांना आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयांमध्ये हे अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यालयांतून अमोनियम बायकार्बोनेट मोफत घेत घरगुती गणेश विसर्जन करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

काही तासांत होते विघटन

गणेशमूर्तीचा आकार लक्षात घेऊन त्या प्रमाणात बादलीत अथवा कुंडात अमोनियम बायकार्बोनेट टाकल्यास मूर्तीचे काही तासांमध्ये विघटन होते. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी सहा टन अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना मोफत उपलब्ध करवून देण्यात आले होते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे महापालिकेने यंदाही अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करवून दिले आहे.

--

विभागनिहाय साधावा संपर्क

नाशिक पूर्व : जयश्री सोनवणे- ९४२३१७९१२३ व सुनील शिरसाठ- ९४२३१७९१७३

नाशिक पश्चिम : नितीन नेर- ९४२३१३१३२१ व दिलीप चव्हाण- ९८८१०६२१६७

पंचवटी : जयश्री सोनवणे- ९४२३१७९१२३ व संजय दराडे- ८२७५०८८५१३

सिडको : डॉ. सुनीता कुमावत- ९४२३१७९१२१ व संजय गांगुर्डे- ९४२३१७९१७१

सातपूर : निर्मला गायकवाड- ७०३०९०२०१५ व माधुरी तांबे- ८९८३१५९०५६

नाशिकरोड : सोमनाथ वाडेकर- ८२७५०१५३९१ व संजय गोसावी- ९४२३१७९१७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश...

कंटेनर लुटणाऱ्या संशयितास बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चाकूचा धाक दाखवून कंटेनर चालकास लुटणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या साथीदारांचीही नावे उघड केली आहेत. पोलिस त्या संशयितांच्या मागावर असून, या टोळीने अनेक वाहन चालकांना लुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लुटीची घटना जुलै महिन्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे शिवारात घडली होती.

सागर सुनील पवार (२३ रा. पुरनाड फाटा, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. १९ जुलै रोजी वाडीवऱ्हे शिवारात रवींद्रकुमार श्रीगोविंदलाल यादव (रा. रामपूर, जि.जौनपुर, मध्य प्रदेश) या कंटेनर चालकास लाकडी दांड्याने मारहाण करीत टोळक्याने चाकूचा धाक दाखवून १८ हजार रुपयांची रोकड पळविली होती. रवींद्र कुमार यादव मालवाहू कंटेनर मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना ही घटना घडली होती. वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी नाशिक शहरासह, इगतपुरी तालुक्यात महामार्गावर गस्त घालत असताना एलसीबीचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे परिसरात संशयित वास्तव्यास असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्यास अटक केली. त्याने चोल्या भोसले, लाल्या पवार आणि राहुल पवार (रा. अकोला) या साथीदारांसमवेत लुटमारीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस उर्वरीत संशयितांच्या मागावर असून, या टोळीने हायवेवर अनेक गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशांत हिरे लेख - उत्तरार्ध

$
0
0

शिक्षणाचा

खेळखंडोबा!

डॉ. प्रशांत व्ही. हिरे

सगळे चुकीचे नियम लावून सरकारकडूनच शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला जात आहे आणि वर सरकारने शिक्षणातील कर्तव्य जबाबदारी निभावणे तर दूरच, उलट त्यास भिकेची उपमा द्यावी, हे देशातील शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

--

आज सुद्धा महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील ज्या अग्रगण्य शिक्षण संस्था आहेत. या सगळ्यांमध्ये सरकारने केलेल्या कुठल्याही सहकार्यापेक्षा खासगी शिक्षण संस्थांची गुंतवणूक कित्येक पटीत जास्त आहे. खासगी शिक्षण संस्थांबाबतीत स्पष्टपणे सांगायचे ठरले तर १०० टक्के गुंतवणुकीत फारतर फक्त ५.७ टक्के (तेही अनुदानित विभागात) सहकार्य सरकारचे असावे. काही संस्थांबाबतीत तर १०० टक्के गुंतवणूक ही केवळ शिक्षण संस्थांचीच असून, त्यात सरकारचा हिस्सा काडीमात्र नाही. विनाअनुदानित व अन्य शिक्षण अभ्यासक्रमांसाठी तर शिक्षण संस्थांना १०० टक्के आर्थिक तरतूद स्वतःलाच करावी लागते, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. प्रत्येक संस्थांतील शैक्षणिक भौतिक सुविधांचे (अनुदानित/विनाअनुदानित) मूल्यमापन केले तर ही गोष्ट तात्काळ सिद्ध होईल. ज्या शिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण प्रसारात अग्रेसर आहेत. अशा संस्थांनी सरकारी मदतीची कधी आसही धरलेली नाही. काही मोजक्या शिक्षण संस्थांना जमीन/जागा देण्याव्यतिरिक्त सरकारचे कुठलेच योगदान नाही वा संस्थांना विकासासाठी सरकारने काडीची मदत केलेली नाही, हे वास्तव आहे.

चुकत असेल त्यास अटकाव करणे, त्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे हे अनिवार्यच! पण नियंत्रण करणारी यंत्रणा (सरकार) तरी आज नेमकी कुठली जबाबदारी पार पाडते आहे, हेही आपण बघायला नको का? तटस्थपणे विश्लेषण केले तर राज्यात शालेय शिक्षण विभागाने दोन-तीन वर्षांत किती शासन निर्णय (जीआर)काढलेत? त्यांची संख्या तरी किती? यापैकी किती निर्णय कायम राहिलेत व किती बदललेत? कोणते निर्णय कायम राहूनही त्याची अंमलबजावणीच झाली नाही, ज्या शासन निर्णयांची अंमलबजावणी झाली, त्यांची आजची अवस्था काय? ज्या शिक्षकांनी फक्त शिकवणं अभिप्रेत असताना त्यांच्या मागे ऑनलाइन स्वरुपातील कोणकोणती (उद्योग) कामे आपण लावून दिलीत. शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ इंटरनेट कॅफेवर सक्तीच्या ऑनलाइन माहिती भरण्यातच जातो आहे, हे खरे नाही का? शासनाकडून ऑनलाइन कामासाठीचा खर्च व त्यासाठीच्या पूरक यंत्रणेसाठी कोणताही निधी दिला जात नाही, हे देखील खरे नाही का? आज शिक्षण क्षेत्रासमोर असलेला एक-एक प्रश्न-समस्या किती वर्षांपासून प्रलंबित आहेत? त्याचे निराकरण नक्की होईल का? झाले तर केव्हा? कुठेतरी या प्रश्नांचा विचार झालाच पाहिजे.

विनाअनुदानित शाळा व अभ्यासक्रमांविषयी म्हणून एक उदाहरण येथे उल्लेखीत करतो, ते म्हणजे राज्यात सन १९९५-१९९६ पासूनच्या विनाअनुदानित शाळा अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, हजारो शिक्षक गेल्या २३ वर्षांपासून अनुदानापासून वंचित आहेत. हजारो आंदोलने झाली, अनेक आत्महत्या घडल्या, चहाच्या दुकानांवर काम करणाऱ्या, वडापाव विकणाऱ्या बीए.बी.एड., एमए.बी.एड. उमेदवारांची छायाचित्रे वर्तमानपत्रात आली, पण सरकारचे हृदय द्रवले नाही. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे वेतन, जे परस्पर त्यांच्या बँक खात्यात जमा होते, त्या व्यतिरिक्त अनुदानित शाळा-महाविद्यालयांना अन्य वेतनेतर बाबींवरील (वीज/पाणी/दूरध्वनी/ म्युनिसिपल कर इ.) प्रत्यक्ष खर्चाइतकी प्रतिपूर्ती शासनाने कधीच केलेली नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. वेतनेतर अनुदानाचा मुद्दा निघाला म्हणून आठवते. राज्यात सन १९९५-१९९६ पासूनचे जवळपास सर्वच संस्थांचे (शाळा-महाविद्यालयांचे) वेतनेतर अनुदान तब्बल १४ ते १५ वर्ष थकविण्यात आले. यात एक-एका संस्थेची (शाखांची) थकबाकी कोट्यवधींच्या घरातील होती. प्रत्यक्ष खर्च केलेल्या बाबींवरील जर एक-एका संस्थेची इतकी मोठी रक्कम थकीत रहात असेल, तर शाळा-महाविद्यालयांनी खर्च तरी कुठून करावा? वर्षानुवर्षे वेतनेतर बाबींवर जो प्रत्यक्ष खर्च शाळा/महाविद्यालयांनी केला, तो बहुतांश प्रमाणात बुडीतच ठरला.

शैक्षणिक, भौतिक बाबींवरील खर्चासाठी अनुदान म्हणून खासगी संस्थांना शासनाकडून एक दमडी दिली जात नाही. स्वनिधीतूनच शिक्षण संस्थांनी जागा, इमारती, शैक्षणिक व भौतिक सुविधा उभ्या केल्या. याचे मूल्यमापन अतिप्रचंड स्वरुपाचे होईल. सरकारने हे योगदान विसरू नये. सरकारचे शिक्षण संस्थांवर कुठलेही उपकार नाहीत, तरीही पर्यायाने असंख्य बंधने घालून सरकारने उलट शिक्षण संस्थांना अडचणीत आणण्याचेच काम चालविले आहे. अजून एक उदाहरण महाराष्ट्रातील 'पवित्र पोर्टल' संगणकीय प्रणालीचे देता येईल. भरतीप्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून हे पोर्टल असल्याचे म्हटले जाते. पण, याआधी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत प्रत्येक प्राचार्य/मुख्याध्यापक/प्राध्यापक/शिक्षक/लिपिक यांना मान्यता देणारी यंत्रणा सरकारच्याच ताब्यात नव्हती तर कुणाच्या? प्रत्येक गोष्टीची शहानिशा, नियमांचे पालन करूनच संबंधित अधिकारी म्हणजे सरकारकडून मान्यता दिली जात. मग, आपल्याच अधिकाऱ्यांवर अविश्वास व्यक्त करणारे सरकार गजबच म्हटले पाहिजे. महाराष्ट्रासारख्या उच्च शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा राहिलेल्या राज्यासाठी हा सगळाच प्रवास दुःख व पिडादायक म्हणावा लागेल.

शिक्षणाच्या या अधोगतीवर शिक्षणतज्ज्ञ, चिंता करून थकले. पण, परिस्थिती बदलायला तयार नाही. महाराष्ट्रातील गंमतीचा एक भाग म्हणजे आधी माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवी व बी. एड. ही होती. बी. एड. पूर्वी एक वर्षाचे होते. ही व्यावसायिक पात्रता शिक्षकांना पुरेशी ठरत असे. नंतर बी.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा केला गेला. त्यानंतर नुसते बी. एड. करून चालणार नाही, तर टी.ई.टी. सक्तीची केली गेली. त्यापश्चात शिक्षक अभियोग्यता चाचणी द्यावी लागेल, मगच शिक्षकपदाच्या आवेदनासाठी तो उमेदवार पात्र ठरेल, हे सरकारचे विद्यमान धोरण हजारो सुशिक्षित युवकांची चेष्टा करणारे नाही तर काय म्हणावे. आजही नियमित मान्यता मिळाल्यानंतरही शालार्थ नाही म्हणून राज्यात हजारो शिक्षकांना वेतन मिळत नाही. गेली ८ ते १० वर्षे त्यांना वेतनाची प्रतीक्षाच आहे.

सगळे चुकीचे नियम लाऊन सरकारकडूनच शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणे सुरू आहे आणि वरून सरकारने शिक्षणातील कर्तव्य जबाबदारी निभावणे, तर दूर उलट त्यास भिकेची उपमा द्यावी, हे देशातील शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैवच म्हणावे लागेल दुसरे काय?

भारतीय शिक्षण व्यवस्था कधी नव्हे अशा संक्रमणातून जाते आहे. शिक्षणाबाबत कमालीची निराशाजनक स्थिती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली; पण अजून प्राथमिक शिक्षणाला नेमके स्वरूप आपण देऊ शकलेलो नाही. जगभरात सुमारे ८०० जागतिक दर्जाची शैक्षणिक केंद्रे आहेत. त्यातील पहिल्या २०० मध्ये भारताचे एकही शैक्षणिक केंद्र नाही. उर्वरित यादीतही फक्त ११ आयआयटीचा असलेला समावेश हीच काय ती जमेची बाजू! या यादीत चीन, जपान खूपच आघाडीवर आहेत. देशाच्या शैक्षणिक स्थितीचे हे चित्र आपल्यासाठी मुळीच बहुमानाचे नाही, म्हणून त्यासाठी सर्वात आधी शिक्षणावरील खर्च वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणातील विषमता वाढू नये म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची गरज असताना सरकारचे प्रतिनिधीच उलटसुलट विधाने करून संभ्रम पसरवतात, हे ठिक नाही. शिक्षणात सरकारचा अनास्था हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढतो आहे. देशाचे शिक्षणक्षेत्र समृद्ध व्हावे, असे सरकारला खरंच मनोमन वाटत असेल वा वाटले असते तर 'सहभाग व सहाय्य' हेच सूत्र महत्त्वाचे ठरते. पण, दुर्दैवाने परस्परपूरक नसलेली सरकारी धोरणे देशाच्या शिक्षणक्षेत्रासमोर आदळून त्यासाठीची सक्ती संस्थांवर लादली जाते आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे. व्यवस्थेने उच्चशिक्षणावर वस्तू व सेवाकर लावून आपल्या मर्यादेचे उदाहरण पूर्वीच दिलेले आहे. देशाची लोकसंख्या आणि उच्चशिक्षणाची उपलब्ध सोय याचे गुणोत्तर दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. यातून अवघ्या शिक्षणक्षेत्राचेच प्रकृतीमान बिघडले आहे. एक-एका विद्यापीठावर असलेल्या असंख्य संलग्न महाविद्यालयांचा बोजा शैक्षणिक अनागोंदी माजवू शकतो, पण त्याची फिकीर वा तमा बाळगली जात नाही. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. मुलांनी उच्चशिक्षण घ्यावे तरी कसे? याचा विचार करायला कुणी तयार नाही. म्हणून जावडेकरांनी अकलेचे तारे तोडलेलेच आहेत, तर आता काय तो निर्णयही एकदाचा घेऊन टाकावा! नुसतीच वल्गना करून शिक्षणक्षेत्राचे कुठलेच भले होणार नाही!

केंद्र सरकारचे धोरण विरोधाभास पहा : एका बाजूला शिक्षणसंस्थांना सरकारकडे भीक मागू नका, असं सांगणारे सरकार दुसरीकडे स्वनिधीकरिता बँकांना करदात्याच्या पैशांतील लाखो कोटी रुपये देते. आयडीबीआयसारख्या बुडणाऱ्या बँकेत एलआयसीला सर्वसामान्य विमाधारकांच्या पैशातून गुंतवणूक करायला सांगते. एअर इंडिया या आतबट्टयाच्या हवाई उद्योगात डोळे बंद करून पुनः पुनः कोट्यवधींचे रतीब घातले का? तर ही सर्व सरकारी बांडगुळे आहेत म्हणून? खासगी शिक्षणसंस्थांनी तब्बल ७५ ते १०० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीत राष्ट्राच्या जडणघडणीत व त्यापुढे प्रगतीत काय योगदान दिले, त्याचा सरकारने पयार्याने जावडेकरांनी जरूर मौन पाळून अभ्यास करावा. मगच मुक्त चिंतन करावे, असे सुचवावेसे वाटते. (उत्तरार्ध)

(‌‌‌लेखक हे माजी राज्यमंत्री आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघात

$
0
0

दुचाकी अपघातात

एक जण जखमी

नाशिकरोड : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत विजय मुरलीधर सोनवणे (वय ५०, रा. निवारा संकुल, चेहेडी पंपिंग स्टेशन) हे गंभीर जखमी झाले. नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथे मुंजोबा मंदिरासमोर हा अपघात घडली. अपघातानंतर जखमी सोनवणे यांच्या दुचाकीस धडक देणारा दुचाकीस्वार पळून गेला.

सोनवणे हे मुक्तीधाम जवळील अनिरुद्ध बापू संस्कार केंद्रातून रविवारी रात्री साडेआठ वाजता घराकडे त्याच्या दुचाकीने (एमएच १५ एफएस ८८६४) परतत होते. चेहेडी शिव येथे सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने येणारे रंजीत एकनाथ कांडेकर (रा. पळसखेडे. ता.संगमनेर)या दुचाकीस्वाराने (एमएच १५ सीएल ७९९२) विजय सोनवणे यांच्या दुचाकीस समोरून जोरात धडक दिली. विजय सोनवणे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले, तर समोरील दु्चाकीवरील रंजीत कांडेकर या चालकासह त्याच्यासोबत असलेले विष्णू कांडेकर आणि सागर सोनवणे हे तिघेही किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर हे तिघेही पळुन गेले. महामार्गावर जखमी अवस्थेत पडलेल्या सोनवणे यांना स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना जयराम हॉस्पिटल व नंतर अपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोलबॉल’मध्ये केटीएचएम, मराठा हायस्कूल विजयी

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नाशिक व नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने व मराठा हायस्कूलच्या सहकार्याने झालेल्या १४, १७ वर्षे मुलाच्या रोलबॉल स्पर्धेत मराठा हायस्कूल विजयी तर १९ वर्षा आतील गटात केटीएचएम कॉलेज विजयी झाले.

तिन्ही संघाची ६ व ७ ऑक्टोबर रोजी नंदूरबार येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे होते. मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे स्पर्धा संयोजक संजय होळकर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दिलीप खिल्लारे उपस्थित होते. का

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत महोत्सवातून नाशिककरांना पर्वणी

$
0
0

संगीत महोत्सवातून

नाशिककरांना पर्वणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अमर ओक यांनी बासरीच्या स्वरांनी तर आर्या आंबेकर यांनी सुमधुर आवाजाने डॉ. मो. स. गोसावी संगीत महोत्सवात नाशिककरांना स्वरपर्वणी लाभली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासरीवादक अमर ओक यांनी 'अमर बन्सी' हा कार्यक्रम सादर केला. 'सूर निरागस हो', 'काय बाई सांगू' यांसारखी गाणी त्यांनी बासरीवर लीलया पेश केली. तर दुसऱ्या सत्रात आर्या आंबेकर यांनी गणराज रंगी नाचतो, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, कधी रे येशील तू, शुक्राची चांदणी आदी गाणी सादर केली. 'अवघा रंग एक झाला' या भैरवीने त्यांनी मैफिलीचा समारोप केला. त्यांना अमोल पाळेकर व वाद्यवृंदाने साथसंगत केली.

एसएमआरके महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख अविराज तायडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीप्ती देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मो. स. गोसावी व डॉ. सुनंदा गोसावी, प्रा. डॉ. राम कुलकर्णी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. मोहिनी पेटकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनाच्या आरोग्यासाठी विनोद आवश्यक

$
0
0

डॉ. एकनाथ कुलकर्णी यांचे प्रतिपादन

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानवी शरीराला जसा षडरस आहार आवश्यक असतो, तसा मनाच्या आरोग्यासाठी विनोद आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक कवी डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी केले. प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने डिसुझा कॉलनीतील समाज मंदिरात आयोजित काव्य विनोद याविषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. कुळकर्णी यांनी स्वत:च्या व नामवंत कवींच्या कविता सादर करून हास्याचे कारंजे उडविले.

अनंतराव साळी, डॉ. शरद पाटील, सुरेंद्र गुजराथी, चंद्रकांत जामकर यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. अनिता कुलकर्णी यांनी केले. डॉ. कुलकर्णी म्हणाले, की हास्यरस हा जीवनाला आवश्यक आहे. वृद्धापकाळी चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या या विनोदाने नाहीशा होतात. हास्य रसाने मन टवटवीत होते. दीर्घायुषी होण्यासाठी हास्यरस हे टॉनिक असल्याचेही ते म्हणाले. हसा आणि निरोगी रहा असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला. यावेळी त्यांनी आचार्य अत्रे, रामदास फुटाणे, मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक उपकेंद्रासाठी ५० कोटींचा निधी द्या

$
0
0

नाशिक उपकेंद्रासाठी

५० कोटींचा निधी द्या

सिनेट सदस्यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजुरी द्यावी तसेच ५० कोटींचा निधी मंजूर करावा, यासाठी सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही या निवेदनाची प्रत देऊन नाशिकच्या उच्च शैक्षणिक वर्तुळासाठी तरतूद करण्याची मागणी केली.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे आहे. नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथे आहे. त्याच धर्तीवर नाशिक व अहमदनगर या उपकेंद्रांच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. याआधी यासंदर्भात सिनेट सदस्य अमित पाटील यांनी राज्यपाल व शिक्षणराज्य मंत्री तसेच कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना निवेदन दिले होते. यासंदर्भात नाशिकवर अन्याय होत असल्याची भावना नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधे आहे.

नाशिक शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. नाशिक जिल्हातील कृषिक्षेत्रामधे द्राक्षे व कांदा यांच्याशी निगडीत मोठे व्यापार केले जातात. विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये आल्यास वायनरी अभ्यासक्रम तसेच अन्नधान्य प्रक्रिया उद्योग अभ्यासक्रम, पर्यटन अभ्यासक्रम, आयात-निर्यात संदर्भात अभ्यासक्रम व नाशिक जिल्ह्यातील विविध मोठे कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम सुरू केले जाऊ शकतात. असे झाल्यास नाशिक जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकेल. तसेच व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ६३ एकर जागा नाशिकमधे आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यास या जागेवर त्वरित बांधकाम सुरू करता येईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने या बाबींवर लक्ष केंद्रित करावे व निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत तसेच पहिल्या टप्प्यात किमान १० कोटी रुपये निधी देऊन या कामास सुरुवात करावी, असे पाटील व आ. कदम यांनी म्हटले आहे.

Latest Images