रेखाटले कल्पनेतील बाप्पा (फोटो) म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड लहान मुले व गणेशाचे नाते अतूट आहे. आपल्या कल्पनेतील रंगसंगतीमध्ये बाप्पाला रंगवायला मुलांना नक्कीच आवडते. हाच निखळ आनंद त्यांना मिळावा या उद्देशाने उपनगर परिसरातील बालगोपालांसाठी जल्लोष फाउंडेशनतर्फे रविवारी 'आय लव्ह गणेशा' चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेत बच्चेकंपनीने कल्पनेतील बाप्पा रेखाटण्याची अनुभूती घेतली. स्पर्धेच्या तिन्ही गटांमध्ये १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेच्या अध्यक्षा नीलम हासे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ओम बोरसे याने प्रथम, हिमांशू अकोले याने द्वितीय व श्रेया बढे हिने तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून मानसी सागर आणि पूजा तुंगार यांनी काम पाहिले. प्रवीण अग्रवाल, शैलेश पाटील, विकास हासे यांनी संयोजन केले. तुषार पगारे यांनी सूत्रसंचालन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट