Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निफाड तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील कारसूळ येथे एका तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर बबन वाघचौरे (वय २४) असे त्याचे नाव आहे. या घटनेचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेला बुधवारी प्राप्त झाला.

जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. ज्ञानेश्वर याच्या वडिलांच्या नावे ५७ आर एवढी जमीन आहे. जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती दिली आहे. शेतकरी आत्महत्येची २१ प्रकरणे प्रलंबित असून पुढील आठवड्यात ती जिल्हा समितीपुढे ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेत नोकरीला लावून देण्यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला दीड लाख रुपये दिले. नोकरी न लागल्याने पैश्यांची परत मागणी केली. मागितले. मात्र, पैसे परत देण्यास त्या महिला पदाधिकारीने टाळाटाळ करीत मारहाण केली, असा आरोप करीत संतप्त झालेल्या पीडित महिलेने सोमवारी (दि. १०) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पंचवटीतील मालवीय चौकात राहणाऱ्या ज्योती सुधाकर जगताप यांनी काही वर्षांपूर्वी महापालिकेत नोकरी मिळणार या आशेपोटी परिसरातील शिवसेना महिला पदाधिकारी ज्योती देवरे यांना दीड लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे. नोकरी न मिळाल्याने जगताप यांनी देवरे यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. पैसे परत मिळत नसल्याने जगताप यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यावरून पोलिसांनी देवरे यांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली. यानंतर काही दिवसांनी देवरे यांनी त्यांच्या ओळखीच्या काही युवकांना घरी पाठवून देवरे यांनी बोलविण्याचा निरोप दिला. जगताप या देवरे यांच्या घरी गेल्या असता शिवीगाळ करून देवरे पती-पत्नीने बेदम मारहाण केली. खोलीत बंद करून ठेवले. तसेच आपल्यासह पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. या प्रकारानंतर संतापलेल्या ज्योती जगताप यांनी सोमवारी (दि.१०) रात्री घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या प्रयत्‍न केला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

आत्महत्या करण्यापूर्वी जगताप यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली असून, या चिठ्ठीत शिवसेना महिला पदाधिकारी देवरे तिचे पती व अन्य साथीदारांनी मारहाण करून धमकी दिल्याचे नमूद केले आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार सात कर्मचारी निलंबित

$
0
0

आरोग्य विभागाला झेडपी सीईओंचा झटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामचुकार करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी मंगळवारी दिले. नाशिक व त्रंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित आढावा बैठकीत हे आदेश देण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाला धारेवर धरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघडणीही करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सूचना देऊनही कामात प्रगती नसल्याने जातेगाव आरोग्य केंद्रातील पर्यवेक्षक राजेंद्र भानुसे, एकनाथ वाडे, शिंदे येथील आरोग्य पर्यवेक्षिका, लहवित येथील आरोग्य पर्यवेक्षक, आंबोली येथील आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती पाटील, जलालपूर येथील गैरहजर आरोग्यसेविका, रोहिले येथील आरोग्य पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. शिंदे आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका यांनाही सेवेतून कमी करण्याचे निर्देश देण्यात आले.

काही दिवसांपासून सीईओ डॉ. नरेश गिते यांनी तालुका आढावा बैठका घेऊन तालुका व ग्रामपंचायतस्तरीय यंत्रणेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नाशिक व त्रंबकेश्वर तालुक्याची मंगळवारी एकत्रित आढावा बैठक महिरावणी येथील दामोदर सभागृहात घेतली. यात गरोदर माता नोंदणी, मातृत्व अनुदान वाटप यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेत काही ठिकाणी काम कमी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी निलंबनाचे आदेश दिले.

कामची जबाबदारी निश्चित

विविध शासकीय मोहिमांना वेग देण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. तसेच जलयुक्त शिवार, मानव संपदा, पाणी पुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना आदी विषयांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व संबंधितांची झाडाझडती घेण्यात आली. घरकुल योजनेबाबत कमी प्रगती असलेल्या व अपूर्ण घरकुल असलेल्या सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांना 'सीईओं'नी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरितक्षेत्रात वसणार नवनगर

$
0
0

मखमलाबाद, हनुमानवाडीचा समावेश; महासभेवर प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानातंर्गत गावठाणांबरोबरच हरित क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत परिसराच्या विकासाला गती दिली जात आहे. शहरातील मखमलाबाद आणि हनुमानवाडी परिसरातील ७५४ एकर क्षेत्राकरीता नगररचना परियोजना राबविण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे. नाशिक महापालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीतर्फे या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निमित्ताने नवीन शहरच उभारले जाणार आहे.

स्मार्ट सिटीत नाशिकच्या निवडीला आता दोन वर्षे पूर्ण होत असून या काळात स्मार्ट सिटीकडून अद्यापही भरीव असे कामे झालेले नाही. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कंपनीच्या वतीने विकासकामांना गती देण्यात आली आहे. गावठाणातील प्रोजेक्ट तसेच गोदा प्रोजेक्टनंतर आता हरित क्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पुनर्विकास अर्थात रेट्रोफिटिंग, हरितक्षेत्र विकास आणि पॅनसिटीचा समावेश आहे. याअंतर्गत एकूण ५१ योजना प्रस्तावित होत्या. त्यापैकी हरितक्षेत्र विकासासाठी पंचवटीतील मखमलाबाद व नाशिक शिवारातील हनुमानवाडी या भागाची हरितक्षेत्र विकासासाठी कंपनीच्या वतीने निवड करण्यात आली. नगररचना परियोजनेच्या (टीपी स्कीम) अंमलबजावणीतून हा परिसर स्मार्ट केला जाणार आहे. सुरुवातीला हरितक्षेत्र विकासासाठी ३१५ एकर क्षेत्रफळ दर्शविण्यात आले होते. जुन्या शहर विकास आराखड्यात हे क्षेत्र ना विकास अर्थात हरित क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आले होते. नवीन विकास आराखड्यात हा परिसर रहिवासी क्षेत्रात परावर्तित झाला आहे. नगररचना परियोजनेसाठी मखमलाबाद आणि हनुमानवाडी परिसरातील ७५४ एकरक्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये नाशिक शिवारातील सर्व्हे नं. १६, १७, १८ (भाग), २४ ते ६९, ४२४, १००० ते १००३, मखमलाबाद शिवारातील सर्व्हे नं. ९६, ९८ ते ११०, १४१ (भाग), १४२, १४३ (भाग), ४७३, ४७८, ४७९ हे सर्वे नंबर समाविष्ट करण्यात आले आहेत. या योजनेमुळे या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होणार आहे.

टीडीआर, एफएसआय मिळणार

परियोजनेअंतर्गत रस्ते, विविध सेवा सुविधा, खुली जागा आणि एसपीव्हीस विक्रीसाठी ४० टक्के क्षेत्र दिले जाणार असून आर्थिक दुर्बल घटकांसाठीही १० टक्के क्षेत्र राखीव ठेवले जाणार आहे. मूळ जागा मालकास पुन:हस्तांतरित करावयाचे क्षेत्र ५० टक्के तसेच हस्तांतरित विकास अधिकार अर्थात टीडीआर व वाढीव एफएसआय देण्याची तरतूद असणार आहे. या सिटीतील सुविधा बघता हे संपूर्ण नवीन शहरच असणार आहे.

नव्या नगरीत असणार या सुविधा

- संपूर्ण स्मार्ट रोड

- पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका

- रोडला लागून स्वतंत्र सायकलट्रॅक

- सार्वजनिक शौचालये, स्मार्ट टॉयलेट

- घनकचरा व्यवस्थापन सज्जता

- सायकल शेअरिंग योजना

- २४ तास पाणीपुरवठा

- भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल

- सौर उर्जेच्या पॅनलची उभारणी

- स्मार्ट सिग्नल अन् दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपले सरकार’मध्ये नाशिक राज्यात सातवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींपैकी ८५ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून त्याबाबत संबंधित तक्रारदार समाधानी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तक्रार निवारणात यवतमाळ हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला असून नाशिक सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

आपले सरकार पोर्टलवर दाखल तक्रारी आणि त्यांच्या निराकरणाची सद्यस्थिती याबाबतचा आढावा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, पोलिस आयुक्त, महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. २६ जानेवारी २०१५ रोजी राज्य सरकारने आपले सरकार पोर्टल कार्यान्वित केले. तेव्हापासून नाशिक जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांना २ हजार ९९९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २ हजार ८३८ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून त्याबाबत तक्रारदारांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आली. सरकारी कार्यालयांकडून सेवा आणि सुविधा पुरविताना त्यामध्ये राहणाऱ्या त्रूटी हा साधारणत: तक्रारींचा सूर असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. १० दिवसांमध्ये तक्रारींचे निरसन करणे अनिवार्य असताना काही विभागांनी २१ दिवसांचा कालावधी घेतला. अशा काही तक्रारींच्या निरसनाबाबत तक्रारदारांत असमाधान असून त्यांची संख्या १५ टक्के आहे. तक्रारी निवारणात नाशिक सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष्णू मनोहर यांच्याकडून शिका रेसिपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने विविध वयोगटातील वाचकांसाठी मटा कल्चर कल्बच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी गृहिणींसाठी पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर यांच्या कुकरी शोचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कुकरी शो १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता हिरा हॉल, हॉटेल एमराल्ड पार्क येथे आयोजित केला असून, यावेळी गृहिणींना विष्णू मनोहर हे विविध प्रकारच्या रेसिपी शिकवणार आहेत. त्याचबरोबर विष्णू मनोहर यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. यावेळी ते स्टिम रोल, चनाडाळ खिरापत, नाचणीचे पुडींग, अॅपल फ्लॉवर, तांदळाचा चिवडा इत्यादी रेसिपी ते शिकवणार आहेत.

….

विनामूल्य कार्यक्रम

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मात्र, त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कल्चर क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यावे गणराया!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गणरायाच्या आगमनासाठी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. बाप्पाच्या स्वागताचा उत्साह लहान-थोरांमध्ये दिसून येत असून, पारंपरिक पद्धतीने गणेशाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाचे खास आकर्षण ठरणारे शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पूर्णत्वास पोहचले असून, सामाजिक तसेच धार्मिक देखाव्यांची पर्वणी यंदा बघायला मिळणार आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात धामधूम सुरू झाली.

आज गणेशचतुर्थीच्या निमित्ताने चैतन्यमय वातावरणात भक्तीभावाने विघ्नहर्ताचे स्वागत केले जाणार आहे. शहरात सहाशे ते आठशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आज, गुरूवारी होणार आहे. सुमारे दीड लाखाहून अधिक घरांत बाप्पांचे स्वागत होणार असून, इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे यंदा भक्तांचा अधिक कल वाढलेला दिसतो आहे. विशेषत: तरुणवर्ग पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य देताना दिसत आहेत. प्लास्टिकबंदीचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर थेट जाणवला. कायद्याने बंदी असली तरी चोरी छुपे थर्माकोल तसेच प्लास्टिकच्या डेकोरेशन विक्रीचे प्रकार समोर आले आहेत.

पोलिसांचा वॉच!

गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. सण-उत्सवांच्या धामधूमीवर शहर पोलिसांचा वॉच असणार आहे. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी खबरदारीचे उपाय राबविले असून, समाजकटंकांना रडारवर घेतले आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून, स्वंयसेवक नियुक्त करण्यास मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. गणेशोत्सवात वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊ नये, याकडे पोलिस लक्ष पुरविणार आहेत.

मंडपांत मूर्तींचे आगमन

गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्तींचे आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत बाप्पांचे धूमधडाक्यात स्वागत केले. घरच्या बाप्पांच्या मूर्तीदेखील अनेकांनी पूर्वसंध्येला घरी नेल्यात. 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत ताशाच्या गजरात बाप्पांच्या मूर्तीचे स्वागत करण्यात भक्त दंग झाल्याचे दिसले.

खरेदीची लगबग

गणेशमूर्तीच्या पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी मेनरोड, रविवार कारंजा, जुने नाशिक, डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोम, सातपूर, नाशिकरोड यासह इतर बाजारपेठेत भक्तांनी गर्दी केली होती. पूजाविधीसाठीच्या पत्री आणि फुलांची किंमत पंधरा रुपये होती. गणेशमूर्ती झाकण्यासाठीचे वस्त्र चाळीस ते ऐंशी रुपये किमतीला विकण्यात आले. बाप्पांच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या एकवीस भाज्या दहा ते पंधरा रुपये किमतीला विकण्यात येत होत्या. गणेशोत्सवासाठी मोदक आणि मिठाईसाठी दुकाने सजली आहेत. फळांची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. गणपती बाप्पांची पूजा आणि नैवेद्याच्या खरेदीची लगबग भक्तांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरे चारण्यावरून वाद

$
0
0

निजामपूरजवळ दोन समाजांमध्ये तेढ; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील निमाजपूर गावाजवळील माळगाव शिवारात मंगळवारी दुपारी पारधी समाजाने ठेलारींच्या वस्तीवर जोरदार हल्ला चढविला. गुरे चारण्यावरून झालेल्या या वादात दहा ते बारा जण जखमी झाले असून, यात काही जणांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.

माळगाव शिवारात मंगळवारी राईनपाडा हल्ल्याची पुनरावृत्ती पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपाने टळली. दरम्यान, मंगळवारी दुपारी दोन समाजांमध्ये वनजमिनीवर गुरे चारण्यावरून वाद झाला. यामध्ये हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. मात्र, दोन हल्लेखोर ताब्यात सापडले. त्यांना जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच निजामपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही हल्लेखोरांना वाचविल्याने त्यांचे प्राण वाचले. अन्यथा राईनपाडा घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता होती. या प्रकरणी घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनी पथकासह धाव घेत परिस्थिती नियंत्रणात मिळवून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, दोन्ही समाजांतील पंचवीसहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे ग. स. बँकेत पाच कोटींचा गैरव्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँक अर्थात ग. स. बँकेत ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी (दि. १२) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये बँकेचे गटनेते चंद्रकांत देसले यांच्यासह विद्यमान संचालक मंडळ आणि बँक अधिकारी अशा ४६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेतील आर्थिक घोटाळ्याबाबत सहकार खात्यासह पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या राजेंद्र शित्रे यांच्यासह बँक बचाव समितीला या कारवाईमुळे मोठे यश मिळाले असल्याचे समजते.

बँकेत सन २००८-२००९, २००९-२०१० आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४ कोटी ४४ लाख ५३ हजार २०५ रुपये, तर १ कोटी ४ लाख ६५ हजार रुपयांचा दुसरा गैरव्यवहार झाला आहे. यामध्ये सभासद व आरबीआयची फसवणूक तसेच एटीएमच्या खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी सरकारी लेखापाल वसंत प्रभाकर राठोड (रा. आनंदनगर, देवपूर, धुळे) यांनी फिर्याद नोंदविली आहे. बँक तोट्यात असताना ती नफ्यात असल्याचे दाखविण्यासाठी बँकेचे तत्कालीन चेअरमन चंद्रकांत देसले, संचालक तसेच अधिकाऱ्यांनी संगनमत करून कर्जाचे व्याज वसूल झाले नसताना ४ कोटी ४४ लाख ५३ हजार २०५ रुपये उत्पन्न दाखवून कर्जदारांच्या खात्यावर जमा नावे केले. प्रत्यक्षात उत्पन्न मिळाल्याचे भासवून दिशाभूल करणारी खोटी आर्थिकपत्रकेही तयार केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सन २०१५-१६ मध्ये बँकेने फेडरल, फायनान्शीअल, कन्सल्टंट कंपनी, नाशिक यांच्याकडून १ कोटी ४ लाख ६५ हजार रुपये चेकद्वारे पैसे देऊन एटीएम मशिनच्या खरेदीपोटी ही रक्कम अदा केली. एटीएम खरेदीबाबतीत रिझर्व बँकेने परवानगी नाकारली असताना ग. स. बँकेने अटी शर्ती न पाळता बँकेच्या निधीचा गैरव्यवहार केला व सभासदांची फसवणूक केली. अशा दोन्ही गैरव्यवहारात एकूण ५ कोटी ५० लाख १८ हजार २०५ रुपये अशा मोठ्या रकमेचा गैरव्यवहार करण्यात आल्याने शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

''बँकेच्या व्यवहाराबाबत अनियमितता आढळून आली असून, पोलिसांनी यापूर्वी केलेल्या तपासात काहीही आढळून आले नाही. केवळ विरोधकांनी राजकीय द्वेषापोटी पोलिसांवर दबाव आणून हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर खुलासा लवकरच करणार आहे.'' - चंद्रकांत देसले, गटनेते ग. स. बँक, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाचा प्रवाहो चालला...!

$
0
0

धुळ्यातील शिक्षकाचा शाळाबाह्य मुलांसाठी उपक्रम

पंकज काकुळीद, धुळे

राज्य सरकारने सन २००९ मध्ये सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध केले आहे. याला हातभार म्हणून धुळे शहरातील शिक्षक चंद्रकांत पाटील यांनी सुटीच्या दिवशी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू केले. त्यातून तालुक्यातील विविध ठिकाणांहून चार विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून शिक्षणाचा प्रवाहो चालविण्याचे व्रत हाती घेतले आहे.

शहरातील जिजामाता कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत तुकाराम पाटील उर्फ सी. टी. पाटील यांनी एम. एस्सी. मध्ये गोल्डमेडल प्राप्त करून बी. एड. पदवी घेतली. शिक्षकी सेवेत रुजू झाल्यावर मुलांना गणित आणि विज्ञानाचे धडे देऊ लागले. आपल्या रोजच्या शिक्षकी पेशात त्यांचे स्वप्न होते की, शाळाबाह्य असलेल्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणून त्यांना चांगले शिक्षण देणे. अखेर, पाटील यांनी गेल्या महिन्यांभरापासून शाळाबाह्य मुलांना तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शोधले आणि आठ दिवसांतच चार विद्यार्थ्यांना शाळेच प्रवाहात आणून त्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत.

पालकांची समजूत काढली
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशित करीत असताना पालकांचा विरोध होत झाला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पालकांची समजूत काढून मुलांना शाळेत दाखल करून घेतले. तसेच आमदार कुणाल पाटील यांनीदेखील शाळेत दाखल केलेल्या या विद्यार्थ्यांना मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. यांसह शिक्षण सहसंचालक शोभा खंदारे, प्रभाकर क्षीरसागर, प्राचार्या डॉ. विद्या पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, पी. जी. शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले.


शहरासह ग्रामीण भागातील बरेचसे शालेय सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थी हे गुरे चारणे, हॉटेलवर काम करणे यांसह विविध ठिकाणी काम करतात. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नाइलाजास्तव हे या मुलांना करावे लागते. परंतु, मोफत शिक्षणांची सर्व माहिती पालकांना दिल्याने मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यांना त्यांच्या जवळपासच्या शाळेत दाखल करून शालेय साहित्य मोफत पुरवून शिक्षणांची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-प्रा. चंद्रकांत पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवत्सरी पर्व मैत्रीचा महोत्सव

$
0
0

लोगो : चातुर्मास प्रवचन

संवत्सरी पर्व मैत्रीचा महोत्सव

सुशीलकुवरंजी म. सा. यांचे निरूपण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरूकडून प्राप्त होणारे ज्ञान, परमेश्वराची आराधना आणि आत्मा संवत्सरी पर्वात एकसूत्रीत येतात. या उत्सवात धर्म, अध्यात्म आणि संत साहित्याचा प्रसार करायला हवा. संवत्सरी पर्वात अध्यात्माला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे संवत्सरी पर्व हा मैत्रीचा महोत्सव आहे, असे निरूपण सुशीलकुंवरजी म. सा. यांनी केले.

जैन चातुर्मासानिमित्त जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघातर्फे चोपडा लॉन्स येथे चातुर्मास प्रवचन सोहळा सुरू असून, त्यात गुरुवारी सुशीलकुंवरजी म. सा. यांचे प्रवचन झाले. त्यांनी सांगितले, की संवत्सरी पर्वात तपश्चर्येला महत्त्व आहे. संवत्सरी पर्वात आराधनेला सुरुवात करण्यात येते. त्यासाठी अध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठीची जिज्ञासा प्रत्येकात रुजायला हवी. सहिष्णूता, समतेचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. भक्ती मार्गात केवळ सत्कर्म करून चालत नाही. तर संतांनी सांगितेल्या विचारांचे प्रबोधन करायला हवे. अहिंसा आणि सत्याची कास धरून संवत्सरी पर्वात अध्यात्माचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे निरूपणही त्यांनी केले. यावेळी शेकडो जैनबांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॉल्स विभागल्याने टळली गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेल्या वर्षापर्यंत एकाच ठिकाणी गणपतीचे स्टॉल लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची, मात्र यंदा स्टॉल शहराच्या अनेक भागात लागल्याने एकाच ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टळण्यास मदत झाली. अगोदरच बुक करून ठेवलेले गणपती आणण्यासाठी अनेक कुटुंबांनी बच्चेकंपनीसह गर्दी केली होती. काहींनी आदल्या दिवशीच गणपती घरी आणले. नाशिकरोडच्या बिर्ला मंदिराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत, पौर्णिमा बसस्टॉप, ठक्कर डोम, डोंगरे वसतिगृह, हिरावाडी येथे गणपतींचे स्टॉल लावण्यात आले होते. अनेक भक्तगण गणपतींच्या मूर्तीबरोबर पाट, वस्त्र, पूजेचे साहित्य, पत्री, देवाचे आसन इत्यादी खरेदी करताना दिसत होते. गणपती मूर्तीच्या खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी झाल्याने अनेक विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बहुतांश विक्रेत्यांच्या मूर्ती दुपारी १२ वाजेपर्यंत संपल्या होत्या. दुपारनंतर मंडळांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली. घरोघरी पूजेसाठी पौराहित्य करणारे ब्राह्मण मिळत नसल्याने अनेकांनी युट्यूब आणि मोबाइल अॅपचा आधार घेतला. त्यामुळे वेळेची बचत झाल्याने अनेकांनी सुस्कारा टाकला. यंदाही ढोलपथकांचा चांगलाच बोलबाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात आज कलाहोत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री व्यंकटेश बालाजी संगीत व नृत्य सेवेअंतर्गत कलाहोत्र या कार्यक्रमाचे २३ वे पुष्प शुक्रवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता ज्येष्ठ बासरी वादक अनिल कुटे यांच्या शिष्यांकडून गुंफले जाणार आहे.

श्री बालाजी मंदिर, कापड पेठ येथे सातत्याने सुरू असलेल्या कलाहोत्र कार्यक्रमात शहरातील शास्त्रीय नृत्य, वादन व गायन क्षेत्रातील गुरूंचे विद्यार्थी दर महिन्याला, श्री व्यंकटेशासमोर आपली सेवा रुजू करतात. या महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी अनिल कुटे यांच्या चिन्मय स्वरांजली या संस्थेचे शिष्य आपले बासरी वादन पेश करणार आहेत. यात ते समूह व एकल वादन करणार आहेत. कार्यक्रम रात्री साडेआठ वाजता सुरू होणार असून सर्वांसाठी प्रवेश खुला आहे. रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री बालाजी संगीत नृत्य परिवारातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शुक्ल यजुर्वेदिय’तर्फे दीपस्तंभ पुरस्कार सोहळा

$
0
0

'शुक्ल यजुर्वेदिय'तर्फे दीपस्तंभ पुरस्कार सोहळा

नाशिक : शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी आज, शुक्रवारी (दि. १४) दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी येथील यजुर्वेद मंदिरात दुपारी ४.३० वाजता हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास नाशिककरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

--

'एचपीटी'त रक्तदान

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. १५) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या कुसुमाग्रज हॉलमध्ये हे शिबिर होणार आहे. सकाळी ९ वाजता शिबिराचे उद्घाटन होईल. विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी शिबिरात सहभागी होत रक्तदान करावे, असे आवाहन प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले आहे.

--

आज धरणे आंदोलन

जेलरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकातील कंत्राटी सफाई कामगारांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आज, शुक्रवारी (दि. १४) सकाळी नऊला नाशिकरोड रेल्वेस्थानकात धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती युनियनचे सचिव भारत पाटील, आनंद गांगुर्डे यांनी दिली. स्टेशन मास्तरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कंत्राटी कामगारांना अपुरे वेतन देण्यासह इतर प्रकारे त्रास दिला जात आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी. कामगारांना पूर्ण वेतन द्यावे.

--

चारुहास घोडकेंची निवड

नाशिक : जिल्हा सुवर्णकार समाजाच्या हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या एकविसाव्या राष्ट्रीय मेळावा प्रमुखपदी चारुहास घोडके यांची निवड करण्यात आली. संस्थेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत घोडके यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घोडके यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.

--

'एनडीएत यश शक्य'

नाशिकरोड : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश मिळवून भारतीय संरक्षण दलात उज्ज्वल करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावीपासूनच तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन भोसला मिलिटरी स्कूलचे विंग कमांडर अनिलकुमार सिंगा यांनी केले. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये नववी, दहावी व अकरावी (शास्त्र) विषयाच्या आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी एनडीए परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले. व्यासपीठावर शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष मंगला जाधव, पर्यवेक्षक मदन शिंदे, रेखा हिरे, शकुंतला परदेशी उपस्थित होते.

--

साक्षरता रॅली

नाशिकरोड : जागतिक साक्षरता दिनानिमित्त नाशिकरोड येथील समता समाज विकास संस्था संचालित आदर्श विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरात रॅली काढली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या शाळेत स्वच्छता पंधरवडा सुरू असून, त्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रॅलीचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक रमेशचंद्र औटे यांच्या हस्ते, मुख्याध्यापिका मनीषा विसपुते यांच्या उपस्थितीत झाले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि साक्षरतेविषयक घोषणांद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले.

--

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोठेही घ्या हक्काचे धान्य!

$
0
0

रेशनिंगकार्ड पोर्टेबिलिटी; २७ हजार कुटुंबांनी घेतला लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन व्यवस्थेद्वारे वितरित होणाऱ्या धान्याचा लाभ घेणारे नागरिक आता कोणत्याही रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकणार आहेत. शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडल्याने ही किमया साधली जात असून, यामुळे रेशन दुकानदारांची वर्षानुवर्षांपासूनची मक्तेदारी संपुष्टात येण्याची शक्यता बळावली आहे. या रेशन पोर्टेबिलिटीचा लाभ जिल्ह्यातील २७ हजार ३१२ शिधापत्रिकाधारकांनी घेतल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागू नये यासाठी सरकार आग्रही आहे. म्हणूनच काही वर्षांपासून धान्य वितरण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला आहे. धान्य वितरण प्रणालीतील काळाबाजार, मक्तेदारी संपवून पारदर्शक पद्धतीने गरजूंना धान्याचे वितरण व्हावे याकरिता शिधापत्रिका पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडण्यात आल्याने आता लाभार्थी आपल्या हक्काचे धान्य कोणत्याही रेशन दुकानातून खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे लाभार्थींना आता ठराविक दुकान बंद असेल तर दुकान चालकाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. विशेष म्हणजे विविध कारणांमुळे वारंवार निवास बदलणाऱ्या लाभार्थींना त्याचा अधिक फायदा होणार आहे.

देशभर अंमलबजावणीसाठी आग्रही

आधार क्रमांकाच्या आधारे जुनी शिधापत्रिका दाखवून नव्या ठिकाणी देखील संबंधित लाभार्थी पुरवठा विभागाकडून धान्याचा लाभ मिळवू शकणार आहे. त्यामुळे लाभार्थी आता कोठेही असला तरी तेथील रेशन दुकानावरून त्याच्या हिश्शाचे धान्य घेऊ शकणार आहेत. या योजनेला रेशनिंगकार्ड पोर्टेबिलिटी म्हणून ओळखले जात असून, या पथदर्शी प्रकल्पाची देशभर अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पुरवठा मंत्रालय आग्रही आहे.

शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनइझी’मध्ये भाग घ्या अन् कार जिंका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्री गणरायाच्या आगमनाबरोबरच सगळ्या आसमंतात उत्साहाची आणि प्रसन्नतेची झुळूक पसरली आहे. गणपती ते दिवाळी म्हणजे आपल्याकडचे सणांचे, उत्सवाचे पर्वच! या आनंदकाळात नवनव्या वस्तूंची खरेदी सहज होत असते. आता ही खरेदी झाली आहे आणखी आनंददायी.... कारण, 'टाइम्स समूह' घेऊन येत आहे या काळातील खरेदीला बक्षिसांचे मखर! 'विनइझी' या कार्यक्रमाद्वारे गणेश चतुर्थी ते दिवाळी संपेपर्यंतच्या नऊ आठवड्यांच्या काळात आपण केलेल्या खरेदीवर आपल्याला आता वेगवेगळी आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.

या काळात 'टाइम्स समूहा'च्या प्रकाशनांमध्ये, म्हणजेच महाराष्ट्र टाइम्स, द टाइम्स ऑफ इंडिया, दी इकॉनॉमिक टाइम्स, नवभारत टाइम्स, एइ समय आणि विजय कर्नाटक या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कुठल्याही ब्रँडच्या उत्पादनांची २५०० रुपयांहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही स्पर्धा खुली राहणार आहे. एखाद्या प्रकाशन समूहाकडून राबविली जाणारी ही अशा प्रकारची पहिलीच ग्राहक बक्षीस स्पर्धा आहे. उत्सवकाळात ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे हाच या स्पर्धेचा हेतू आहे.

खरेदी केल्यानंतर ग्राहकांना www.wineasy.shop या वेबसाइटवर लॉग-इन करून आपली खरेदीची पावती अपलोड करावी लागेल. याशिवाय एक घोषवाक्यही त्यांनी लिहायचे आहे. हे केल्यानंतर तो ग्राहक संबंधित आठवड्यात निघणाऱ्या 'लकी ड्रॉ'साठी पात्र ठरेल. सोमवार ते रविवारची मध्यरात्र असा काळ संबंधित आठवड्यासाठी गृहित धरला जाणार असून, या काळात केल्या गेलेल्या खरेदीची पावती त्या त्या आठवड्याच्या 'लकी ड्रॉ'साठी पात्र समजली जाईल. 'लकी ड्रॉ'त दर आठवड्याला एक कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ४० इंची टीव्ही, स्मार्ट फोन आणि दोन ग्रॅमची सोन्याची नाणी अशी अन्य बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०१८ (मध्यरात्री १२ वाजेपर्यंत) आहे.

काही ना काही फायदा नक्की

'विनइझी' या स्पर्धेमुळे विविध उत्पादनांच्या ब्रँडना आता 'टाइम्स समूहा'च्या प्रकाशनांमध्ये जाहिरात करण्यासाठी आणखी एक सब‌ळ कारण मिळणार आहे. त्यांनी केलेल्या जाहिरातींवरूनच आता ग्राहक अधिकाधिक खरेदी करणार आहेत. तेव्हा ब्रँडची जेवढी जाहिरात अधिक, तेवढी त्यांची उत्पादने खरेदी केली जाण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. तेव्हा ग्राहक आणि जाहिरातदार या दोघांसाठीही येत्या उत्सवकाळात काही ना काही फायदा नक्की आहे. या स्पर्धेच्या अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी www.wineasy.shop या वेबसाइटला जरूर भेट द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूप्रश्नी जुंपली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरात डेंग्यू्च्या अळ्या आढळल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावत डेंग्यूच्या प्रादुर्भावास नागरिकांना जबाबदार धरण्यास नकार दिला असतानाही आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी मात्र नागरिकांवर कारवाई करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे डेंग्यूवरून \Bस्थायी व आरोग्य समिती आमनेसामने आल्याचे दिसून येत आहे.

\Bसभापती कुलकर्णी यांनी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांना पत्र लिहून या प्रस्तावावर फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत भाजपच्या सदस्यांनी दंडात्मक कारवाईस तीव्र विरोध केला असतानाही कुलकर्णी स्थायीच्या निर्णयावर समाधानी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्यावरून आता आरोग्य समिती विरुद्ध स्थायी समिती असा वाद रंगणार आहे.

शहरात सध्या डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक सुरू असून, ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांनी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १४८ बाधित, तर ३६८ संशयित रुग्ण आढळून आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या ८७ हजार घरांच्या तपासणी मोहिमेत १९७३ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय समितीने डेंग्यूच्या प्रसाराला नागरिकच जबाबदार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता. नागरिकांच्या घरात किंवा सोसायटी व इमारतीमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास प्रथम पाचशे रुपये दंड करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता. परंतु, स्थायी समितीत त्याला तीव्र विरोध करण्यात आला होता. डेंग्यूच्या उद्रेकास प्रशासन आणि पेस्ट कंट्रोलचा ठेकेदाराच जबाबदार असल्याचा आरोप करीत मलेरिया विभागातील अपुरी कर्मचारीसंख्या जबाबदार असल्याचा आरोप झाला. मलेरिया विभागाकरिता सरकारकडून ९५ पदे मंजूर असताना केवळ २३ कर्मचारी काम करीत असून, २२ जण पर्यवेक्षकांची जबाबदारी पार पाडत असल्याने डेंग्यू नियंत्रणात येणार कसा?महापालिकेच्याच दिव्याखाली अंधार असताना सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई कशासाठी, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. संतोष साळवे यांनी या प्रस्तावाचा निषेध करताना प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदारात साटेलोटे असल्याचा आरोप केला. सर्वसामान्य नागरिकांवर आधीच करवाढीचे ओझे लादण्यात आले असताना आता दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून त्यांना रक्तबंबाळ करायचे का, असा प्रश्न करीत प्रस्ताव नामंजूर करण्याची सूचना मुशीर सय्यद, कोमल मेहरोलिया, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, मीरा हांडगे यांनी केली. त्यामुळे सभापतींना हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

'आरोग्य' सभापतींची नाराजी

आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी स्थायीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, सभापती आडके-आहेर यांना पत्र लिहून या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. डेंग्यूच्या उत्पत्तीस आणि प्रसारास शहरातील काही बेजबाबदार नागरिकच जबाबदार असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला असून, नागरिकांच्या घरातील फुलदाण्या, फ्रीज, पाणीसाठा, झाडांच्या कुंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या अळ्या आढळून येत आहेत. याबाबतीत जे नागरिक दक्ष राहत नाहीत व काळजी घेत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई गरजेची असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे. काही नागरिकांच्या दुर्लक्षामुळे शहरातील अन्य नागरिकांना गंभीर आजारांना समोरे जावे लागत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत कुलकर्णी यांनी पत्रात व्यक्त केले आहे. मलेरिया विभागाच्या ठेकेदावारही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

--

स्थायीच्या निर्णयाला आव्हान

दरम्यान, स्थायी समितीने नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव फेटाळला असतानाही सतीश कुलकर्णी यांनी स्थायीला पत्र लिहून त्यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थायी समितीतील भाजपच्या सर्व सदस्यांनी एकमताने विरोध केला होता. त्यामुळे कुलकर्णी हे डेंग्यूबाबत नागरिकांना जबाबदार धरीत आहेत, तर स्थायी समिती प्रशासनाला जबाबदार धरीत आहे. त्यामुळे भाजपमध्येच या विषयांवरून एकमत नसल्याचे चित्र आहे. या पत्रप्रंपचामुळे स्थायी समिती आणि आरोग्य समितीतच दंडात्मक कारवाई वरून जुंपल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्या या निर्णयावर सभापती काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू तस्करीविरोधात ‘फौज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे वाळूचा तुटवडा निर्माण झाल्याने बांधकाम व्यावसायिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र असताना माफियांनी चोरीछुप्या पद्धतीने वाळू वाहतुकीस सुरुवात केली आहे. ही अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांनी नाशिक तालुक्यातील मंडळाधिकाऱ्यांची फौज कामाला लावली आहे.

चोरट्या वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांची आठ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, या पथकांनी अवैध वाहतुकीच्या संशयाने पाच वाहने ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्या आवारातून पळविण्यात आलेले वाहनही हाती लागले असून, त्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे वाळू उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर अनेक निर्बंध आले आहेत. मात्र, तरीही चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक सुरूच असून, मालेगाव तालुक्यातील सवंदगाव येथे वाळूचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. वाळूचोरीवेळी खाण कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याने महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाने पुन्हा मोहीम उघडली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधून वाळू वाहून आणणारी वाहने मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे जातात. भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिक वाळूची वाहतूक अवैध समजली जाते. अशा वाहतुकीवर यापूर्वी अनेकदा कारवाई झाली असली, तरी या प्रकारांना आळा घालणे जिल्हा प्रशासनाला शक्य झालेले नाही. त्यामुळेच वारंवार कारवाई करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर येऊ लागली आहे. नाशिक तालुका तहसीलदारपदाचा कार्यभार हाती घेतलेल्या शिवकुमार आवळकंठे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोहीम उघडली असून, नाशिक तालुक्यातील मंडळाधिकारी आणि तलाठी यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत.

वाहनांवर राहणार 'वॉच'

शहरात प्रमुख, तसेच आडमार्गे येणाऱ्या वाळू वाहनांवर 'वॉच' ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गौण खनिजांची वाहतूक करणारे पाच ट्रक गेल्या चार दिवसांमध्ये पकडण्यात आले आहेत. त्यामध्ये वाळूसह मुरूम आणि दगडाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. या वाहनांद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर पाच पट दंड आकारणीचा कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाईवेळी जप्त केलेली आणि रात्रीतून पळवून नेलेली वाहनेही या कारवाईदरम्यान पकडण्यात आली आहेत. या वाहनांकडून दुहेरी दंड आकारण्यात येणार असून, या वाहनाचा परवाना निलंबित करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातोहात संपल्या बंदीवानांच्या गणेशमूर्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींना उदंड प्रतिसाद लाभला. सर्व दीड हजार मूर्ती हातोहात संपल्या.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, धर्मदाय आयुक्त घुगे, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे तसेच न्यायाधीशांसह अनेक मान्यवरांनी बंदीवानांनी बनविलेल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली.

मागील वर्षी जेलमधील बंद्यांनी दीडशे मूर्ती केल्या होत्या. त्यावेळी प्रचंड मागणीमुळे अनेकांना मूर्ती मिळाली नव्हती. हे लक्षात घेऊन यंदा दीड हजार मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. नाशिकमधील हा अनोखा प्रयोग होता. बंद्यांनी तहानभूक हरपून, समर्पण भावनेने केलेल्या या मूर्ती अत्यंत सुबक, आकर्षक होत्या. मूर्तीसोबतच दर्जेदार लाकडाचा पाट आणि वस्त्र मोफत होते. शाडूच्या मूर्तींना जीएसटी नव्हता. त्यामुळे त्या खरेदी करण्यासाठी नाशिककरांची गर्दी झाली होती.

कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, अशोक कारकर, प्रवीण विभांडिक, वरिष्ठ अधिकारी गिते, फड, गायकवाड, आढे, कारागह रक्षक पठाडे, घोडे, सुलाने, चव्हाण, महाले, भुसारे, दुसाने, वीस बंदी आदींनी कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्टॉल लावला होता. तसेच डोंगरे वसतिगृहावर कारागृह कर्मचारी मोरे, काकळीज, अरुण साळी, चौधरी यांनी स्टॉल लावला होता.

गणेश मूर्ती विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल मिळाला. मात्र, विक्रीमागील मुख्य उद्देश बंद्याची कला समाजापर्यंत पोहचविणे हा होता. अनेकांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे उद्देश साध्य झाल्याचे कारागृह अधीक्षक राजकुमार साळी आणि पल्लवी कदम यांनी सांगितले.

बंदीवानांना रोजगार

मूर्तीकार सागर पवार याने सोळा बंद्यांना मूर्तीकला शिकवली. सर्वांनी नोव्हेंबरपासून गणेशमूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला. मे महिन्यात रंग देऊन मूर्ती तयार झाल्या होती. या मूर्तींमुळे सोळा बंद्यांना दररोज साठ रुपये रोजगार मिळाला. मूर्तीचा रंग मुंबईहून तर शाडू माती अहमदाबादहून आणली होती. साडेपाचशेपासून चार हजारांपर्यंत मूर्तींचे दर होते. गरुड गणपती, लालबागचा राजा, शंकर पार्वती, टिटवाळा गणपती, कमळ गणपती, जास्वंद गणपती, मोदक गणपती यांना चांगली मागणी होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही कैद्यांच्या मूर्तींसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले होते. बंद्यांना प्रोत्साहन म्हणून नागरिकांनी मूर्ती खरेदी केल्या. आता दिवाळी सेलवर कारागृहाने लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनुसूचित कल्याण’चा २८ पासून नाशिक दौरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याची अनुसूचित जाती कल्याण समिती २८ सप्टेंबरपासून जिल्ह्यात तीन दिवसांचा दौरा करणार आहे. सरकारी कार्यालयांमधील आरक्षण, भरती, पदोन्नती, अनुशेष, जात पडताळणी याबाबतचा आढावा ही समिती घेणार आहे.

आमदार हरिश पिंपळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. सरकारी विश्रामगृहावर बुधवारी (दि.२ ८) सकाळी नऊ वाजता ही समिती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिकांचा आढावा घेणार आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेत बैठक होईल. तर दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समाजकल्याण विभागाचा आढावा ही समिती घेणार आहे. दुपारी साडेतीन वाजता समितीचे सदस्य महापालिकेला तर साडेचार वाजता पोलिस आयुक्तालयाला भेट देतील. गुरुवारी (दि. २९) जिल्ह्यातील मागासवर्ग शाळा आणि वसतिगृहांची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी (दि. २८) सरकारी विश्रामगृहांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण विभाग तसेच आरोग्य आणि महावितरणचा आढावा ही समिती घेणार आहे. दुपारी दोन वाजता समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.

समितीत यांचा समावेश

समितीमध्ये आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, लखन मलिक, मिलिंद माने, राजू तोडसाम, संगीता ठोंबरे, ज्ञानराज चौगूले, बालाजी किणीकर, गौतम चाबुकस्वार, धनाजी अहिरे, संध्यादेवी कुपेकर, वर्षा गायकवाड, भाई गिरकर, प्रकाश गजभिये, उपसचिव ना. रा. थिटे, अवर सचिव आ. ब. राहाटे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images