Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बॅलेट-कंट्रोल युनिटची आज प्राथमिक चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकांसाठी आणण्यात आलेल्या बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्रथम चाचणी (फर्स्ट लेव्ह चेकिंग) मंगळवारी (दि. ११) केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या चाचणीसाठी निवडणूक शाखेने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असून त्यांना हे युनिट्स कसे काम करतात, हे दाखविले जाणार आहे.

पुढील वर्षी केंद्रात आणि राज्यात निवडणुका होणार असून त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने सुरू केली आहे. नाशिकसाठी ५ हजार ४७९ कंट्रोल तर ९ हजार ४२२ बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. अद्ययावत करण्यात आलेली ही मतदान यंत्र नेमकी कशी काम करतात याची प्रथम चाचणी अंबड औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या (वेअर हाऊसिंग) गोदामात घेतली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी घोळ असल्याच्या शंका उपस्थित केल्या गेल्या. ही यंत्र कसे काम करतात, त्यामध्ये काय करता येते, काय करता येऊ शकत नाही, अशी सर्व माहिती यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रमाणित २० इंजिनीअर्स नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही पगारी मातृत्व रजा

$
0
0

'मुक्त'च्या कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांची पगारी मातृत्व (प्रसूती) रजा देण्यात येईल, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी येथे केली.

विद्यापीठात सफाई , बागकाम , सुरक्षा रक्षक यासह विविध कंत्राटी कामे करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ही कंत्राटी कामे करून विद्यापीठातच सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्रात जिद्दीने शिकणाऱ्या या महिलांना शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र वितरण कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश अतकरे होते.

कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन म्हणाले की, विद्यापीठ आवारातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्राच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी आपले काम सांभाळून पुन्हा यशस्वीपणे शिक्षणाची वाट धरली आहे, हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात या कर्मचाऱ्यांना व्यावसायिक वा उद्योजकीय कौशल्य विकसित करून आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

सावित्रीबाई फुले केंद्र आदर्श अभ्यास केंद्र म्हणून उदयास आले असून इतर केंद्रासाठी ते 'रोल मॉडेल' असल्याचे प्रा. डॉ. अतकरे म्हणाले. वर्षभरापासून सुरू असलेला हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली असून हे कार्य पुढे नेण्याची गरज आहे, असे मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. उमेश राजदेरकर यांनी सांगितले.

यावेळी संगणक विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद खंदारे, संगणक विद्याशाखेचे प्रा. माधव पळशीकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण समन्वयक प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, ग्रंथालय व माहितीकेंद्राचे ग्रंथपाल प्रा. डॉ. मधुकर शेवाळे यांनीही मार्गदर्शन केले. कर्मचारी विद्यार्थ्यांपैकी सारिका वाघेरे-मौळे यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. निशिगंधा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद पवार यांनी आभार मानले.

गुणवतांचा गौरव

यशस्वीपणे शिक्षणक्रम पूर्ण केल्याबद्दल मूलभूत संगणक शाखेच्या नऊ व पूर्वतयारी शिक्षणक्रमाच्या १६ विद्यार्थ्यांना कुलगुरुंच्या हस्ते गौरवण्यात आले. अभ्यास केंद्राच्या पुढील शैक्षणिक उपक्रमासाठी प्रवेशित कर्मचारी-विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभ्यास साहित्याचे वाटप झाले. केंद्रात ५६ कर्मचारी मूलभूत संगणक प्रशिक्षण तर २५ जण एमए मराठी, एक जण एमए हिंदी, ३५ जण बीए, नऊ जण संगणक ऑफिस टूल्स, व ६ कर्मचारी पूर्वतयारीसाठी शिकत आहेत.

शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स हबची घोषणा लवकरच

$
0
0

संरक्षण राज्यमंत्र्याचे उद्योजकांना आश्वासन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील पहिला डिफेन्स इनोव्हेशन हब कोईम्बतूर येथे साकारला असून त्यांनतर दुसरा मान नाशिकच्याच वाट्याला आला आहे. या हबची घोषणा येत्या एक ते दोन आठवड्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी उद्योजकांनी घेतलेल्या भेटीत दिल्याची माहिती 'निमा'चे उपाध्यक्ष शशिकांत जाधव व मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.

या हबमुळे जे उद्योजक या क्षेत्रात लागणाऱ्या साहित्य सामग्रीचे उत्पादन (प्रोटो-टाईप) करू इच्छितात त्यांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे संशोधन व विकास करण्यास लागणारा सर्व खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. 'निमा'तर्फे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा होत असून 'निमा'च्या प्रयत्नांची डॉ. भामरे यांनी प्रशंसा केली. डिफेन्स इनोव्हेशन हब साकारल्यानंतर नाशिकमधील उद्योगांना निश्चितच चालना मिळेल व अनेक लघु व मध्यम उद्योगांना व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल तसेच राष्ट्रीय पातळीवर नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास 'निमा' उपाध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण व प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केला. डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला न होता नागपूरला होणार असल्याच्या उद्योजकांच्या शंकेचे डॉ. भामरे यांनी समाधान केले. हे हब नाशिकला होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाइन शॉपच्या मॅनेजरला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाइन शॉपच्या मॅनेजरकडील एक लाख ९० हजार रुपयांची रक्कम दुचाकीवरील तिघांनी चोरट्यांनी होतोहात लुटून नेल्याची घटना रविवारी (दि. ९) रात्री गंगापूररोडवरील बारदान फाटा येथे घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी राजेंद्र रघुनाथ चौधरी (गायत्री अपार्ट. ध्रुवनगर, गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी ध्रुवनगर येथील एका वाइन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. चौधरी हे रविवारी रात्री (दि. ९) रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास घराकडे परतत असताना बारदान फाट्याजवळ यामाहा कंपनीच्या एफझेड दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना गाठले. या तिघांपैकी एकाने राजेंद्र चौधरी यांना धक्का देऊन त्यांच्या हातातील एक लाख ९० हजार रुपये ठेवलेली बॅग बळजबरीने हिसकावून पळवून नेली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील २५ ते ३० वयोगटातील तिघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

हॉकी स्टिकने तरुणाला मारहाण

मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी एका तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण करीत ब्लेडने वार केलेत. ही घटना उपनगरच्या कॅनॉल रोड परिसरात घडली असून, या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली.

दीपक लक्ष्मण हिरवडे (२०), पंडित लक्ष्मण हिरवडे (३०), दत्तू अर्जुन हिरवडे (२०) आणि पवन प्रकाश ढगे (२०, सर्व रा. आम्रपाली झोपडपट्टी, गोसावीनगर कॅनॉल रोड, नाशिकरोड) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सुनील लिंबाजी कोळे (२२, रा. आम्रपाली झोपडपट्टी) याने फिर्याद दिली आहे. चौघा संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून कोळेला हॉकी स्टिक, फायटर व ब्लेडने वार करून मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. ८) घडली. पुढील तपास पोलिस हवालदार पगारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीची चोरी

$
0
0

दुचाकीची चोरी

नाशिक : नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील हांडोरे मळा येथून मनोज राजाराम चौहान यांची दुचाकी (एमएच १९ एएन ३७४४) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १९ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

मृतदेह आढळला

नाशिक : पंचवटीतील अमरधामजवळ असलेल्या अमृतधाम गेटसमोर ५० ते ६० वयोगटातील बेवारस मृतदेह आढळून आला. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. पोलिस नाईक योगेश देवरे हे अमरधाम परिसरात रविवारी गस्त घालत असताना मृतदेह आढळून आला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेह दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरास खरेदीची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशाचे स्वागत करण्यासाठीची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. लाडक्या बाप्पांची आरास करण्यासाठी विविध सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गणेश मूर्तींच्या खरेदीसोबतच आरास सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीची लगबग वाढलेली दिसते. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे कागदापासून तयार केलेल्या आरास वस्तूंची विक्री तेजीत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत मेनरोडसह कानडे मारूती लेन, दहीपूल परिसरात भक्तांची सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे.

पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत रूळला आहे. यंदा प्लास्टिक आणि थर्माकॉलच्या वस्तूंना बंदी असल्याने आरास करण्यासाठी कापडी व फोमच्या वैविध्यपूर्ण वस्तूंची विक्री होत आहे. मखर सजावटीसाठी कुलिंग प्रकारातील फुलांची विक्री होत आहे. ही कागदी फुले मखराच्या आजूबाजूला लावण्यासाठी प्लास्टिकच्या स्पंजचा वापर करता येणार नाही, म्हणून फोमची विक्री होत आहे. यामध्ये कागदी आणि कापडी फुले खोचून मखरांची सजावट भक्तांना करता येणार आहे. मखराच्या आकारानुसार फोम खरेदी केली जात आहे. दीडशे रुपयांपासून सातशेहून अधिक किमतीत फोम तर कागदी फुले सत्तर ते दोनशे रुपये डझनप्रमाणे उपलब्ध आहेत. त्यासोबतच गणेशासाठी मुकुट, फेटे व शेले खरेदीस भक्तांची पसंती आहे. फेटा आणि मुकुट साठ रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. शेल्यांची किंमत पन्नास रुपयांपासून सुरू होते. यंदा क्रिस्टल मण्यांचे तोरण भक्तांचे आकर्षण ठरत आहेत. प्लास्टिक बंदीमुळे कापडी आणि क्रिस्टल मण्यांच्या तोरणांची विक्री होत आहे. विविध रंगांतील ही सुबक तोरण दोनशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. खडे आणि शिपल्यांच्या तोरणांना मागणी अधिक आहे. यंदा बाजारात हत्ती, घोडे, मूषक, मोर यांसह इतर अनेक स्टॅच्यू उपलब्ध झाले आहेत. काही स्टॅच्यू बॅटरीवर तर काही विजेवर चालणारे आहेत. बाराशे ते पाच हजारांपर्यंत हे स्टॅच्यू उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्वी विभांडिकचे ‘जलतरण’मध्ये दुहेरी यश

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जलतरण स्पर्धेत अन्वी विभांडिक हिने १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत प्रथम क्रमांक तर ५० मीटर फ्री स्टाइल जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. १० सप्टेंबर रोजी १४ वर्षाखालील वयोगटात जिजामाता तरण तलाव, नाशिकरोड येथे ही स्पर्धा घेण्यात आली. ज्यात नाशिक शहरातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला. अन्वी जलतरण स्पर्धेच्या विभागीय फेरीसाठी पात्र ठरली आहे. विभागीय स्पर्धा पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. अन्वीला जलतरणपटू संकेत कंसारा आणि शाळेचे क्रीडाशिक्षक मच्छिंद्र सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रासबिहारी शाळेच्या मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये नवजात बालिकेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या हलगर्जीपणाने नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप बालिकेच्या कुटुंबीयांनी केला असून, चांदवड येथील शिवसेनेच्या शाखेने या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने चांदवड उपजिल्हा रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला वेळीच उपचार न दिल्याने नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

कानमंडाळे येथील निर्मला सचिन पवार (वय २६) यांना रविवारी (दि. ९) रात्री प्रसूती वेदना होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी डॉक्टर रुग्णालयात नव्हते. कर्मचाऱ्यांनी डॉ. अभिजित नाईक यांना महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्याची माहिती दिली. मात्र, डॉक्टर तातडीने रुग्णालयात आले नाहीत, असा निर्मला यांच्या नातेवाइकांचा आरोप आहे. दरम्यान, तीव्र प्रसूती वेदना होत असल्याने बेडवरच महिला प्रसूत झाली. मरणयातना भोगल्यानंतर मुलगी जन्माला आली; मात्र थोड्याच वेळात रुग्णालय प्रशासनाकडून तिला मृत घोषित करण्यात आले.

चांदवड उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघातातील जखमी दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, येथील १२ पैकी ५ डॉक्टर प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णांना नाशिक रुग्णालयात पाठविण्यात येते. हा मुद्दा संदीप उगले यांनी उपस्थित करताच, प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व पाचही डॉक्टरांना उद्यापासून चांदवड रुग्णालयात नियमित करणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी दिली.

प्राथमिक चौकशीत बालिकेचा मृत्यू हा आईच्या गर्भातच झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी चौकशी केली जाईल. दारू पिऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ड्युटी करणे ही गंभीर बाब आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती डॉ. नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. सध्या चांदवड उपजिल्हा रुग्णालयातून त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे

जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद कारखान्यांचा प्रश्न मार्गी लावा

$
0
0

आयमा वर्धापनदिनी संस्थापक कोतवाल यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेचा ३३ वा वर्धापनदिन बूब सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी, बंद पडलेल्या कारखान्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी 'आयमा'चे संस्थापक बी. ई. कोतवाल यांनी नव्या तरुण कार्यकारिणीकडे केली. तसेच त्यांनी बंद पडलेल्या कारखान्याचे उदाहरणही दिले.

यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आयमाचे अध्यक्ष तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, सरचिटणीस ललित

बूब, खजिनदार उन्मेष कुलकर्णी, योगिता आहेर व माजी अध्यक्ष राजेंद्र आहिरे आदी उपस्थित होते. देशभरात नावाजलेला कारखाना बंद पडल्याने स्थानिक शेकडो कामगारांचे नुकसान झाले. यासाठी आयमा संघटनेच्या पुढाकाराने एकजूट दाखवत असे बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, असे मत कोतवाल यांनी आपल्या भाषणात मांडले.

'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सुधारित 'आयमा' बुलेटिनसाठी अॅप आयमा डिरेक्टरी नवीन स्वरूपात आणण्यात येणार आहे. यामुळे आयमा पदाधिकाऱ्यांची नवीन कार्याची घौडदौड भविष्यात नक्कीच पहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जे. एम. पवार, बी. पी. सोनार, रमेश पवार, विजय तलवार, बिपीन बटाविया यांच्यासह माजी अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले.

पूजा अन् केक कटिंगही

वर्धापनदिनानिमित्ताने 'आयमा'चे अध्यक्ष तलवार सहपत्नी सत्यनारायण पूजेला बसले. दिवसभर आयमा सदस्यांनी प्रसादाचा लाभ घेतला. विविध संघटनांमध्ये निवड झालेल्या उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभागृहात सर्वच आय़मा पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आशिष नहार, अविनाश मराठे, संजय महाजन, ज्ञानेश्वर गोपाळे यांसह आयमा पदाधिकारी उद्योजक उपस्थित होते.

पांजरपोळच्या जागेसाठी आग्रह

नाशिक : आयटी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारखान्यांसाठी अतिरिक्त जागेची मागणी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासाठी पांजारपोळची किमान पाचशे एकर जागा नवीन उद्योगांसाठी द्यावी, अशी मागणीही एमआयडीसीकडे केल्याचे 'आयमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकेची एरियल घेतेय मलखांबाचे धडे

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील कोठुरे गावात सुरू झालेल्या मलखांबाला देशातून खेळाडू मिळत नसले तरीही परदेशातील खेळाडूंना याचे कायमच आकर्षण राहिले आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील सालेम शहराची रहिवासी एरियल विटनी ही यशवंत व्यायामशाळेत रोज सायंकाळी यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून, तिने मलखांबमधील अत्यंत अवघड प्रकार आत्मसात केले आहेत.

एरियल विटनी रोटरी क्लबच्या कल्चरल एक्स्चेंज या माध्यमातून नाशिक शहराचा अभ्यास करण्यासाठी आली आहे. येथे ती नाशिक शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडासंस्कृतीचा अभ्यास करणार आहे. नाशिकमध्ये ती म्हसरूळ येथील पराग झेलावत यांच्याकडे राहत असून, फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहे. एरियल ही खेळाडू असून, आतापर्यंत तिने कुस्ती, व्हॉलिबॉल, अॅथलेटिक्समध्ये प्रावीण्य मिळवले आहे. या शहराच्या क्रीडासंस्कृतीचा अभ्यास करताना मलखांब हा खेळ याच मातीत सुरू झाला असल्याचे तिला समजले. हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा वाटल्याने ती याकडे आकर्षित झाली. यशवंत व्यायामशाळेत तिने जाधव यांच्याकडे चौकशी केली. त्यांनीही तिला मार्गदर्शनाची तयारी दाखवली. दुसऱ्या दिवसापासूनच तिने मलखांबाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. तिची खेळाविषयी असलेली तळमळ पाहून रोज यातील शंका विचारून जास्तीत जास्त खेळ आत्मसात कसा करता येईल, याकडे ती लक्ष देत असते. व्यायामशाळेतील मलखांबाचे शिक्षकच फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवण्यास असल्याने तिचा दुहेरी फायदा झाला. नाशिकमध्ये येण्याअगोदर तिने पोल मलखांब कधीही पाहिलेला नव्हता. रोप मलखांबाबद्दल तिला जुजबी माहिती होती. बाणेश्वर अढी, पोलच्या टोकावर बसणे, दोरीच्या मलखांबावर क्लायंबिंग करणे, रोप मलखांबावर असलेला स्वर्डल एल होल्ड हा प्रकार ती लीलया करते आहे. पश्चिमोत्तानासान, पादहस्तासन, शवासन, हनुमानध्वज, रिकेब, धनुरासन हे प्रकार ती रोप मलखांबावर शिकते आहे. त्याचप्रमाणे दसरंग, अर्कण धनुरासन, तबकफाड, कुर्मासन हे प्रकार पोल मलखांबावर शिकते आहे.

तिच्या शरीराची ठेवण कुस्तीची असल्याने मलखांब करताना सुरुवातीला अवघड गेले. सुरुवातीला पायाच्या टाचा दुखत होत्या. आता मात्र सराव झाला, असे ती म्हणते. भारताच्या प्रत्येक शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. धार्मिक महत्त्व आहे, असे ती म्हणते. नाशिक शहरातील पंचवटीतील रामकुंड भागाला तिने भेट दिली असून, ती तबलादेखील शिकते आहे. नऊवारी साडीचे तिला आकर्षण असून, शहरातील छोटी छोटी दुकाने आवडत असल्याचे ती म्हणाली. येथील खाद्यपदार्थाविषयी तिला विचारले असता मला पावभाजी आणि मिसळ आवडत असल्याचे तिने सांगितले.

मलखांब तयार करणार

अमेरिकेत पोल मलखांब नाही. येथून ती रोप मलखांब घेऊन जाणार असून, पोल मलखांब कसा तयार करायचा याची माहिती घेणार आहे. तेथे ती मलखांब तयार करून तेथील मुलींना याचे शिक्षण देण्याचा तिचा मानस आहे.

तिची या खेळातील आवड वाखाणण्यासारखी आहे. फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलमध्येही ती सराव करते. तितक्याच जोमाने यशवंत व्यायामशाळेतही सराव करते आहे. येत्या काही दिवसांत शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही तिला खेळवण्याचा मानस आहे.

- यशवंत जाधव, मलखांब प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटमार करणारा सराईत जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात येऊन लुटमार करणाऱ्या अमळनेर (जि. जळगाव) येथील सराईतास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. एका साथीदाराच्या मदतीने त्याने काही दिवसांपूर्वी विहितगाव येथून मोटारसायकल चोरी करून शहरातील गडकरी चौकात लुटमार केली होती. संशयिताच्या ताब्यातून लॅपटॉप मोबाइलसह चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली.

आकाश शंकर शिंदे उर्फ वडार (१९, रा. श्रद्धानगर, प्रसादनगर, अमळनेर) असे या संशयिताचे नाव आहे. लुटमारीचा प्रकार १९ ऑगस्ट रोजी घडला होता. संगमनेर येथील संजय अशोकलाल ओहरा शहरात आले होते. मध्यरात्री गडकरी चौकात बसमधून उतरल्यानंतर ते गुरूद्वाररोडने शिंगाडा तलावच्या दिशने नातेवाइकांच्या घरी पायी जात असतांना ही घटना घडली होती. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा रस्ता अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवित त्यांच्या ताब्यातील बॅग बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला होता. त्यात मोबाइल, लॅपटॉपसह काही साहित्य असा सुमारे ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या लुटमार प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा शोध सुरू असतांना सहाय्यक निरीक्षक सतीश घोटेकर यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अमळनेर गाठून संशयिताच्या बेड्या ठोकल्या. संशयित सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, संशयिताचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयितांच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकला दोन सुवर्ण

$
0
0

ठाणे महापौर चषक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर असलेल्या अजिंक्य पाथरकर या आघाडीच्या बॅडमिंटनपटूने ठाणे महापौर चषक स्पर्धेतंर्गत झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षालालील गटात यश मिळविले आहे. दुहेरीतील अंतिम सामन्यात अजिंक्यने नागपूरच्या गौरव मिठे याच्या साथीने खेळताना मुंबईच्या अक्षण शेट्टी आणि विख्यात बांगेरा या जोडीचा २२-२०, १७-२१, २६-१४ असा पराभव करत विजेतेपद पटकाविले.

व्ही. एन. नाईक संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला अजिंक्य आणि नागपूरकर असलेला गौरव यांनी अत्यंत संयमी खेळ केला. ९ मॅच पॉईंट पर्यंत रंगलेल्या या अंतिम सेट सेटमध्ये अक्षण-विख्यात जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही बाजूने अवघड स्मॅशेज, ड्राइव्ह शॉट असे विविध फटके बघण्याची पर्वणी उपस्थितांना बघावयास मिळाली. त्याचबरोबर वेदांत काळे आणि शंतनू पवार या नाशिककर जोडीने १७ वर्षांखालील गटात आयुष खांडेकर आणि पार्थ घुगे या जोडीचा अंतिम सामन्याला साजेशा झालेल्या लढतीत २१-१७, २२-१४, २१-१४ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दणदणाटाची ‘कवायत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाप्पांचे स्वागत ढोल-ताशांच्या दणदणाटात करण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज झाली असून, स्वागत मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर करण्यासाठी शहरातील ठिकठिकाणच्या पथकांच्या सरावाने वेग घेतला आहे.

शहरातील विविध गणेश मंडळांच्या बाप्पांचे श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गुरुवारी (दि. १३) स्वागत मिरवणुकींद्वारे आगमन होणार आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी ढोल पथकांकडून सराव केला जात असल्याने सकाळ-सायंकाळच्या वेळेस अनेक ठिकाणी ढोल-ताशांचा गजर ऐकू येत आहे. शहरातील पंचवीसहून अधिक ढोल पथकांनी गणेशोत्सवासाठी केलेली जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ठिकठिकाणच्या ढोल पथकांकडून अनेक तास सराव सुरू आहे. जिल्हाभरात सुमारे पस्तीसहून अधिक ढोल पथके मिरवणुकीसाठीच्या वादनाचा सराव करीत आहेत. खास बाब म्हणजे ढोलवादनाच्या सरावात तरुणाईसोबतच बालक आणि प्रौढ व्यक्तींचाही सहभाग दिसून येत आहे. ढोल पथकांत आठ वर्षांच्या मुलामुलींपासून पन्नास वर्षांच्या महिला-पुरुषांचाही सहभाग दिसत आहे. विविध पथकांतील वादकांची संख्या शंभर ते तीनशे असल्याचा दावा पथकप्रमुखांकडून केला जात आहे.

गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावर निर्बंध लागू केल्यापासून मिरवणुकीची शोभा वाढविण्यासाठी ढोलवादनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पथकांच्या मेंन्टेनन्समध्ये ढोल आणि ताशांचे पान, वादकांचे फेटे, प्रवास खर्च आणि इतर वस्तूंसाठीचा खर्च समाविष्ट होतो. ढोलाचे एक पान एक हजार रुपयांचे, तर ताशाचे पान आठशे ते बाराशे रुपयांचे असते. प्रत्येक वादनावेळी वादकांसाठी नव्याने फेटे खरेदी करण्यात येतात, एक फेटा चाळीस ते साठ रुपयांचा असतो. पथकातील ध्वजाची किंमतही शंभर रुपयांहून अधिक असते. वादनावेळी प्रवास खर्चासाठी चार ते पाच हजार रुपये लागतात. हा सर्व आर्थिक ताळमेळ साधण्यासाठी ढोल पथकांचे मानधन काहीसे अधिक असल्याचे दिसून येत आहे. काही ढोल पथके एक तासाच्या वादनासाठी २१ ते ५१ हजार रुपये मानधन घेतात, तर काही ढोल पथके संपूर्ण मिरवणुकीच्या वादनासाठी ६१ हजारांहून अधिक मानधन घेत आहेत.

..

ढोल पथकांच्या वादनाला विशेष संस्कृती आहे. मिरवणुकीचा सोहळा अधिक चैतन्यमय करण्यासाठी ढोलवादन केले जाते. गणेशोत्सवातील मिरवणुकीत ढोलवादनामागे वादकांची प्रचंड मेहनत असते. त्यामुळे मिरवणुकीतील वादनाचा सोहळा जल्लोषमय होणार आहे.

-प्रीतम भामरे, अध्यक्ष, सिंहगर्जना ढोल पथक

..

गणेशोत्सवात ढोलवादनाची परंपरा रूढ होत आहे. तरुणाईसोबतच सर्व वयोगटांतील व्यक्तींचा समावेश ढोल पथकांत वाढत आहे. संस्कृतीची अभिजात परंपरा जतन करण्यासाठी ढोलवादन महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवाच्या मिरणुकींसाठी ढोल पथके सज्ज झाली आहेत.

-कुणाल भोसले, पथकप्रमुख, शिवसाम्राज्य ढोल पथक

--

आकडे बोलतात...

२५ : शहरातील ढोल पथकांचा सराव

३५ : जिल्हाभरातील पथकांची संख्या

२१ ते ५१ हजार : एक तासाचे मानधन

६१ हजारांपुढे : पूर्ण मिरवणुकीसाठीचे मानधन

--

०००००००००००

'डीजे'मुक्तीस प्रोत्साहन

--

ग्रामीण पोलिसांची मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना

---

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील गणेश मंडळांनी डीजे आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा यासाठी ग्रामीण पोलिस दलाने विघ्नहर्ता बक्षीस योजना जाहीर केली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे. गतवर्षी जिल्ह्यातील गणेश मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. यावर्षीदेखील जिल्ह्यातील आदर्श ठरणाऱ्या पाच गणेशोत्सव मंडळांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध दहा मुद्यांवर प्रत्येकी दहा गुण देण्यात येणार असून, यापैकी सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या मंडळाची बक्षिसासाठी निवड करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांतर्फे शांतता समिती सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, पोलिसमित्र आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठका घेऊन माहिती देण्यात आली असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. गणेश मंडळाजवळच ध्वनिप्रदूषणाची नॉइज मीटरच्या साहाय्याने तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दराडे यांनी दिला आहे. सार्वजनिक मंडळांनी डीजे आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पना राबवावी, तसेच गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन दराडे यांनी केले आहे.

या दहा मुद्यांवर होणार निवड

या पुरस्कारासाठी निवड करताना संबंधित गणेशोत्सव मंडळाने धर्मादाय आयुक्त आणि पोलिस दलाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मंडळाने केलेली स्टेज, प्रकाशव्यवस्था, विजेची पर्यायी सोय, मंडळाकडून वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून केलेले नियोजन, पोलिसांच्या विविध अटींचे पालन, गणेशमूर्तीच्या संरक्षणासाठी योग्य ती व्यवस्था, आरास बघण्यासाठी येणाऱ्या महिला-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा, ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन केले आहे का? आणि त्याबाबत जनतेमध्ये प्रबोधन केले आहे का? रात्री दहानंतर काटेकोरपणे ध्वनी व्यवस्था बंद केली आहे का? अशा दहा मुद्यांवर प्रत्येकी दहा गुण देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रीज फेडेरेशनच्या सहसचिवपदी हेमंत पांडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय ब्रीज फेडेरेशनच्या म्हैसूर येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील दोन वर्षांसाठी महाराष्ट्र ब्रीज फेडेरेशनचे सरचिटणीस नाशिकचे हेमंत पांडे यांची सहसचिवपदी निवड झाली आहे. सहसचिव पदाच्या दोन जगासाठी टी. सी. पंत, हेमंत पांडे आणि संदीप ठकराल असे तीन उमेदवार होते. यामध्ये टी. सी. पंत (२९ मते) आणि नाशिकचे हेमंत पांडे (२४ मते) यांना सर्वाधिक मते मिळाल्यामुळे या दोघांचीही भारतीय ब्रीज फेडेरेशनच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली. फेडेरेशनच्या अध्यक्षपदी एस. सुंदर्शन यांची आणि सरचिटणीस पदासाठी आनंद (के. एस.) सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठीच्या सहा जागांसाठी नऊ उमेदवार होते. या नऊमधून जास्त मतांच्या आधारे अनुक्रमे कवलजीतसिंग, कृष्णा गोयल, अरिजित गुहा, टी. देवेंद्रनाथ, सार्थक बरुआ आणि मनिष बहुगुणा या सहा जणांची निवड करण्यात आली. तर खजिनदार पदासाठी निर्मल राजगोपाल आणि केशव प्रसाद माथूर यांच्यात झालेल्या मतदानात निर्मल राजगोपाल यांना २४ तर माथूर याना केवळ चार मते मिळाल्यामुळे राजगोपाल यांची खजिनदार पदासाठी निवड झाली. भारतीय ब्रीज फेडेरेशनच्या या नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली सभा १२ सप्टेंबरला दिल्ली येथे होणार आहे अशी माहिती फेडेरेशनच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची पालिकेवर धडक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेती, मोकळे भूखंड आणि सर्वसामान्य नाशिककरांवर लादण्यात आलेली अवाजवी करवाढ रद्द करण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी महापालिकेवर भव्य जनआंदोलन मोर्चा काढून प्रशासनासह सत्ताधारी भाजपविरोधात आक्रोश व्यक्त केला. 'नागपूरचा होतोय विकास, दत्तक नाशिकला ठेवलंय भकास', 'वा रे भाजपा तेरा खेल, नाशिक का विकास हुआ फेल', 'गांधी लढे थे गोरों से, हम लडेंगे चोरो सें', 'घरपट्टी दरवाढ रद्द झालीच पाहिजे', 'मोकळ्या भूखंडासह शेतीवरील दरवाढ रद्द झालीच पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादीचा हा मोर्चा केवळ 'ट्रेलर' असून, नाशिककरांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन मुंढे यांनी कारभार न सुधारल्यास आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केली जाईल, असा खणखणीत इशारा छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

सहा महिन्यांपासून करवाढीने होरपळणाऱ्या नाशिककरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेसने जनआंदोलन मोर्चाद्वारे सोमवारी भाजपसह प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन करीत शहर व मोर्चा राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी भवनासमोरून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस, शरणपूररोडमार्गे महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनवर धडकला. छगन भुजबळ व समीर भुजबळ स्वत: मोर्चात उतरले होते. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे झेंडे व मागण्यांचे फलक हाती उंचावून धरले होते. मुख्यालयासमोर रस्त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या मांडत सत्तारूढ भाजप आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. पालिकेसमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर या ठिकाणी छगन भुजबळ यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. 'दत्तक विधान'कर्त्या मुख्यमंत्र्यांनीच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या करवाढीचे समर्थन केल्याचे नमूद करीत, भुजबळ हेच नाशिककरांचे खरे वाली असल्याचे गुरमित बग्गा यांनी सांगितले. मुंढेंच्या माध्यमातून नाशिककरांचे खिसे कापण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप गजानन शेलार यांनी केला, तर भाजपच्या कारभारावर टीका करताना 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?', असा सवाल कविता कर्डक यांनी केला. शेतकऱ्यांवरील करवाढ नाशिकचा विकास नव्हे, तर नाशिकला भकास करणारी असल्याची टीका नाना महाले यांनी केली. नाशिकमधील उद्योग नागपूरला पळविण्यासाठीच मुंढेंची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केल्याचा आरोप माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केला. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त मुंढे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा केली.

मोर्चातून शक्तीप्रदर्शन

आमदार भुजबळ तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत हा पहिलाच मोर्चा असल्याने या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन घडविले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतले सर्व गट-तट एकाच छताखाली आल्याचे चित्र दिसले. मोर्चात माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, भटक्या व विमुक्त जमातीचे नेते जी. जी. चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंत जाधव, दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, डॉ. भारती पवार, अर्जुन टिळे, श्रीराम शेटे, मनपातील गटनेते गजानन शेलार, माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, संदीप गुळवे, बाळासाहेब कर्डक, रत्नाकर चुंभळे, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, नगरसेविका समिना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, राजेंद्र महाले आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते. आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिलीप बनकर आदिंसह ग्रामीणचे नेते सहभागी झाल्याने मोर्चाची ताकद वाढली. शहराच्या मोर्चासाठी राष्ट्रवादीने ग्रामीणमधून ताकद आणल्याची चर्चा भाजपच्या नगरसेवकांमध्ये होती.

आजारी असतानाही 'भुजांत' बळ!

करवाढीसह विविध मागण्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक महापालिकेवर काढलेल्या या मोर्चात छगन भुजबळ हे आजारी असूनही सहभागी झाले. भुजबळांनी सुमारे तीन किलोमीटर पायी चालत मोर्चेकऱ्यांमध्ये उत्साह वाढवला. नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही सांगाल तितके किलोमीटर पायी चालायला आपण तयार आहोत, अशा शब्दांत भुजबळ यांनी नाशिककरांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. भुजबळांसोबत समीर भुजबळ आणि शेफाली भुजबळ हे ही रस्त्यावर उतरले होते.

या आहेत मागण्या...

- नाशिककरांवरील करवाढ रद्द करा

- सिडकोतील घरांवर कारवाई नको

- गावठाण विकासासाठी क्लस्टर राबवा

- अंगणवाड्या रद्दचा निर्णय मागे घ्या

- झोपडपट्टीवासीयांना राहत्या ठिकाणी घरकुले द्या

- मनपाने बससेवा चालविण्यास घेऊ नये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुतांची अंतरे नाशिक

$
0
0

खमके नेतृत्व हवे

पाऊल पडते पुढे... (मटा : ९ सप्टेंबर) हा लेख वाचला. योग्य व छान परामर्श घेतला आहे. विशेषतः आपण जे सूचित करू पाहताय (किती जणांना कळेल ते नाही माहीत), की नाशिकची प्रगती ही नाशिकच्या भौगोलिक स्थानामुळे, येथील आरोग्यदायी वातावरणामुळे व येथील स्थानिकांच्या कल्पक व उद्यमशील परिश्रमांनी हळूहळू होतच आहे. याला सरकारी अनास्था अथवा आकस हे खीळ नाही घालू शकणार, हे कळाले. पक्षांतील वरिष्ठांच्या पुढे नमणारे व नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी काय करणे आवश्यक आहे हे जाणणारे विरळच होते. नाशिकच्या जनतेचा दबावही या नेत्यांवर नव्हता व नसतो. इथे विविध संघटना आहेत. त्या केवळ विशिष्ट हेतूंसाठी काम करताना आढळतात. नाशिकच्या सर्वांगीण विकसाची फुलप्रूफ योजना तयार करून त्यात जनतेला जागृत व सहभागी करून एखादी चळवळ उभारण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. तेच तेच पक्ष व त्यांची तीच बोलभांड नेतेमंडळी हेच नाशिककरांना तूर्त पर्याय आहेत. सगळे एका माळेचे मणी. पक्षांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते येऊन अनेक आश्वासने देऊन व साखरपेरणी (दत्तक घेण्यासारखी) करणारी भाषणे ठोकून जनतेला फशी पाडतात! मग काय, नाशिकला गुणवत्तेने मिळणारे प्रकल्प इतरत्र पळवले जातात, तरी त्याची चर्चा होत नाही. झाली तरी जाब विचारण्याची हिंमत नाही. जनतेशी नाळ जुळलेले खमके नेतृत्व नाशिकला मिळेपर्यंत तरी नाशिककरांना आपल्या हिमतीवरच विकासाचा मेरू उचलावा लागणार आहे आणि नाशिककर तो पेलतील याची खात्री आहे.

- प्रभाकर पोरजे, नाशिकरोड

बंदची झळ

सर्वच विरोधी पक्षांनी भारत बंदची दिलेली हाक योग्य आहे; पण ज्यांना रोजीरोटीचे पडलेय त्यांचे काय ? सर्वसामान्यांना गावी जाणे असो वा नोकरदार व शालेय विद्यार्थी असोत. सर्वांनाच जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते. आपला विरोध दर्शवणे हा सर्वांचाच अधिकार आहे; पण आपणामुळे कुणाला त्रास होत असेल, तर त्याची सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात झळ पोहोचत असते. म्हणून मानवतेच्या नात्याने याची काळजी घ्यायला हवी.

- सुनील कन्नोर, नाशिक

कुपोषणाचा प्रश्न

महाराष्ट्र सरकारने १ सप्टेंबरपासून किशोरवयीन मुलींसाठी राबविण्यात येणारी पोषण आहारवाटप योजना बंद करायचा निर्णय घेतला आहे. आता भारतात जवळजवळ २० कोटी जनसंख्या दारिद्र्यरेषेखाली असताना सरकारने अदूरदर्शी निर्णय कसा घेतला हे कळत नाही. एक म्हणाल तर सरकारजवळ बजेटची कमी असेल तर तसेपण नाही. दुसरे म्हणाल तर देशातील गरिबी उच्चाटन झाले का? तर तसे नाही! तिसरे कारण असू शकते, की योजना राबविणारी यंत्रणा फेल झाली का? तरीदेखील तिच्यात बदल करून चांगले परिणाम दिले जाऊ शकतात हे तामिळनाडूतील अम्मा किचन योजनेतून सिद्ध झाले आहे. फक्त आणि फक्त राजनैतिक इच्छाशक्ती गरजेची आहे. पायाला जखम झाल्यास पाय कापणे योग्य नाही.

- विकास जोग. नाशिक

खेळात हेवेदावे नको

दक्षिण कोरिया, जपान हे देश सोडले तर आशिया खंडात भारतीय टेनिसला आव्हान नाहीच. या आशियाई खेळात भारताला पदक मिळविणे कठीण नव्हते. मनासारखा जोडीदार मिळत नसल्याच्या कारणास्तव लिअँडर पेसने माघार घेतली नसती तर दुहेरीत अथवा मिश्र दुहेरीत सुवर्णपदके निश्चित होती. युकी भांब्री एकेरीत खेळला असता तर त्यालाही एकेरीत मोठे आव्हान नव्हते. तेही सुवर्णपदक हुकले. भारताला जागतिक दर्जा किंवा भारतीय टेनिसला ग्लॅमर लूक दिला लिअँडर पेसने. महेश भूपती, सानिया मिर्झा, बोपण्णा यांनी आणखीच बहार आणली; पण याच खेळाडूंचा अहंकार व हेव्यादाव्यापायी भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले नाही. त्यांनी जह अहंकार व हेवेदावे बाजूला ठेवले असते तर सुवर्णपदकांत भरच पडली असती. त्यांना दोष देऊन फायदा नाही. टेनिस महासंघही त्याला कारणीभूत आहे. ठोस निर्णय घेऊन व कठोर नियमावली ठेवली असती तर भारताला फायदा झाला असता.

- गोपाळ बांगर, नाशिक

विचार दीपस्तंभाचे

ज्या महापुरुषामुळे भारताच्या संस्कृतीची ओळख संपूर्ण जगास झाली, असे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद होय. पारतंत्र्याच्या शृंखलांनी बद्ध झालेल्या भारतीय जनतेच्या मनात भारतीय धर्म, संस्कृती, आचार-विचार, सहिष्णुता, सर्वसमावेशकता व परंपरांचे दीप प्रज्वलित करणारे, मरगळलेल्या भारतीयांच्या नसानसांत चैतन्य निर्माण करून त्यांना स्वदेश स्वधर्म व सत्त्वांची जाणीवत्रून देणारे, दारिद्र्य व अज्ञानाच्या महानिद्रेतून भारतीयांना जागे करणारे, भारतीय तत्त्वज्ञानाची भव्य व उदात्त बैठक सर्वांना पटवून देणारे विवेकानंद हे पहिले भारतीय पुरुष होते. ११ सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत सर्वांना प्रभावित करून हिंदू धर्मातील महान व शाश्वत तत्त्वांची महतत्त्यांनी पटवून दिली होती. जगातील लोक भारतीयांना अशिक्षित समजत होते. त्यांनासुद्धा भारतीय संस्कृतीबाबत जिज्ञासा निर्माण झाली. स्वामींच्या या अलौकिक भाषणाला आज १२५ वर्षे पूर्ण झाली. तरुणांसाठी ते नेहमीच दीपस्तंभच आहेत.

- प्रशांत कुलकर्णी, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगाचा इतिहास मानवी मुल्यांमुळे प्रकाशतो

$
0
0

जगाचा इतिहास मानवी मुल्यांमुळे प्रकाशतो. जसा दृष्टिकोन तशी विचारसरणी. जशी विचारसरणी तशी कृती. जशी प्रतिभा तसे शब्द. मनाच्या सखोल एकाग्रतेत प्रेम भावनेने ओथंबलेले भाव, म्हणजे विवेकप्रभू स्वामी विवेकानंद यांनी सर्वधर्म परिषदेत केलेले व्याख्यान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघार गावात पुन्हा तणाव

$
0
0

बॅनरवरून दोन गटांत हाणामारी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील आघार बु. ढवळेश्वर गावात रविवारी रात्री दोन गटातील वाद उफाळून आला. राजकीय बॅनरवरून दोन गटात हाणामारीचा प्रकार झाला. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आघार व ढवळेश्वर गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ग्रामदेवतेचा ध्वज लावण्यावरून २६ ऑगस्ट रोजी तणाव निर्माण झाला होता. रविवारी पुन्हा आघार येथे तणाव निर्माण झाला. एका राजकीय बॅनरवर असलेल्या कार्यकर्त्याच्या फोटोवर अज्ञाताने काळे स्टीकर लावले. त्यामुळे रविवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. पाच जण जखमी झाले तर एका दुचाकीचे नुकसान झाले.

रात्री उशिरा पोलिस व महसूल प्रशासनाने गावात धाव घेतली. तहसीलदार ज्योती देवरे, प्रांत अजय मोरे, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, ग्रामीण पोलिस उपधीक्षक शशिकांत शिंदे, आनंद पिंगळे यांनी भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांनी देखील भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करून १६ जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी याबाबत गावातील एका समाजाच्या गटाने नायब तहसीलदार सायंकर यांना निवेदन देऊन खोटे गुन्हे मागे घ्यावेत, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्या निलंबित करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढे, दादागिरी बंद करा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दत्तक वडील आणि पालकमंत्र्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नाशिक सुधारण्यासाठी आणले की, बिघडविण्यासाठी, असा सवाल करीत, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंढे दादागिरी बंद करा, कामकाजात सुधारणा करा. अन्यथा लोकांनी कायदा हातात घेतल्यास तुम्हाला परवडणार नाही, असा सणसणीत इशारा दिला. आरोग्य, स्वच्छता करण्याची जबाबदारी आयुक्तांची असते असे सांगत खंडणीखोरांसारखा कारभार करू नका, असा टोलाही लगावला. करवाढीमुळे नागरिक भरडला जात असून, शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. उद्योग नाशिकबाहेर पडू पाहत आहेत. डॉक्टर आपला व्यवसाय बंद करीत आहेत. हुकूमशाही कारभारामुळे महापालिकेतील अभियंतेही आत्महत्या करीत आहेत, असा आरोप करीत, हा मोर्चा केवळ ट्रेलर असून, यापुढच्या लढ्याला विश्राम नाही असा 'अल्टिमेटम'च त्यांनी दिला.

जेलमधून बाहेर आल्यानंतर नाशिककरांच्या मागण्यांसाठी प्रथमच रस्त्यावर उतरलेल्या छगन भुजबळ यांनी मोर्चाला संबोधित करताना, भाजपसह मुंढेंवर चौफेर टोलेबाजी केली. महापौर आणि नगरसेवक कुठल्याही पक्षाचे असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कामकाज केले जाणे अपेक्षित आहे, असे सांगत भुजबळांनी एखादा धोरणात्मक निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनादेखील विधिमंडळाची, मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे नाशिककरांवर एकतर्फी बेकायदेशीर करवाढ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. चांगले काम केले, तर पाठीशी उभे राहू, अन्यथा संघर्षालाही तयार होऊ. सिडकोच्या घरांना हात लावाल तर याद राखा, अशा शब्दांत भुजबळ यांनी आव्हान दिले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या सत्तेत आधीच शेतीमालाला भाव मिळत नसताना मुंढेंच्या करवाढीच्या रुपाने शेतकऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी दुसरे संकट लादले. नाशिकमधील उद्योग नागपूरला पळविले जात असून, करवाढ त्यासाठी पोषकच आहे, असा टोला लगावला. मुंढेंच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

भाजपचा कणा मोडला

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. परंतु, भाजपचे लोक एक आयुक्त पेलू शकत नाहीत, असा टोमणा त्यांनी मारला. भाजपचा कणाच मोडला असून पालिकेतील कारभार दीड वर्षातच भरकटल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री साहेब आमच्या वडिलांप्रमाणे आहेत. परंतु, वडिलांचे मुलाकडे काही लक्षच दिसत नाही. केवळ नागपूरच्या विकासाकडे ते लक्ष देत आहेत. तुकाराम मुंढे साहेबांना त्यांनी नाशिकला पाठवून दिले. मात्र, नेमके त्यांना नाशिक सुधारायचे आहे की, बिघडवायचे हेच समजत नाही अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकाळी बंद, दुपारी सुरळीत

$
0
0

खान्देशात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; धुळे, साक्री, रावेरला आंदोलन

टीम मटा
देशात वाढत्या पेट्रोल-डिझेल दराविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व समाजवादी पक्षासह देशातील १९ पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला सोमवारी (दि. १०) खान्देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगावात दुकानदारांनी आपली दुकाने काही वेळ बंद ठेवली. रावेरला सरकारविरोधात घोषणाबाजी करीत निषेध मोर्चा काढण्यात आला. तर धुळ्यासह साक्रीत दरवाढीचा विरोध करीत निदर्शने करण्यात आली. साक्रीत पेट्रोलपंपावरील मशिनला हार चढवित काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. जळगावात दुपारनंतर बससेवा सुरळीत सुरू झालेली दिसून आली.

जळगावात तासाभरात मार्केट सुरू
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे व समाजवादी पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला सोमवारी जळगाव शहरात अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळी चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले. या वेळी व्यापाऱ्यांनी आंदोलकांसमोर शटर लावून घेत त्यांनी पाठ वळताच दहा मिनिटांत दुकाने उघडली. तेवढा काही मिनिटांचा अवधी वगळता दिवसभर बाजारपेठेचे सर्व व्यवहार सुरळीत होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष या आंदोलनात सहभागी होता. याबाबत चार दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेऊन बंद यशस्वी करण्याचा निर्धार केला होता.

जळगाव शहरात मात्र भारत बंदचे आवाहन असतानाही नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजेनंतर मध्यवर्ती बाजारपेठ व संपूर्ण मार्केटमधील दुकाने उघडली होती. सकाळी ११ वाजेनंतर काँग्रेस भवनात काँग्रेसचे, राष्ट्रवादी, समाजवादी व मनसेचे पदाधिकारी जमले. यात चव्हाण, राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ललित बागूल, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा सविता बोरसे, प्रतिभा शिरसाठ, माधुरी पाटील, नामदेव चौधरी, काँग्रेसच्या शहराध्यक्षा अरूणा पाटील, देवेंद्र मराठे, कल्पीता पाटील, उज्ज्वल पाटील, राजस कोतवाल, प्रा. संजय पाटील, जगदीश बढे, ज्ञानेश्‍वर कोळी, परवेज पठाण, अतुल पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली काढून आवाहन
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, समाजवादी पक्षाचे मुफ्ती हारून नदवी, मनसेचे जमील देशपांडे यांनी रस्त्यावर उतरून फुले व्यापारी संकुलापासून बंदच्या आंदोलनाला सुरुवात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फुले व्यापारी संकुल, दाणा बाजार, नवी पेठ, गोलाणी व्यापारी संकुल, टॉवर चौक, सराफ बाजार या ठिकाणच्या दुकानदारांना आवाहन करून बंद पाळण्यास सांगितले.

व्यापाऱ्यांकडून मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
फुले व्यापारी संकुलात बंदचे आवाहन करीत असताना या संकुलातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन ‘मोदी..मोदी..मोदी’, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, ?‘जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली. बंदच्या आंदोलनावेळी नेत्यांनी आवाहन केल्यानंतरही फुले व्यापारी संकुलातील काही दुकाने उघडली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही दुकाने बंद करण्यास सांगितले. या वेळी पोलिस, कार्यकर्ते आणि व्यापारी यांच्यात वाद झाला. ‘भारत बंद’च्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासून एसटीची तुरळक वाहतूक सुरू होती. ११ वाजेनंतर दुपारपर्यंत एसटी बस स्थानकातच थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना या बंदचा त्रास सहन करावा लागला.

टॉवर चौकात आंदोलकांचा ठिय्या
बंदच्या आवाहनानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात ठिय्या मांडला. या वेळी ‘मोदी सरकार हाय..हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांना उठवले.

रावेरमध्ये रास्तारोको

रावेर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांतर्फे शहरात पेट्रोल, डिझेल दरात झालेली दरवाढ, वाढती महागाईविरोधात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यादरम्यान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी, राजीव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोपान पाटील, रमेश पाटील, अॅड. एम. ए. खान, सुनील कोंडे, महिला तालुकाध्यक्ष माया बारी, ज्ञानेश्वर महाजन, लालचंद पाटील, प्रल्हाद बोंडे, निळकंठ चौधरी, समाधान साबळे, विश्वनाथ गायकवाड, गयासोद्दिन काझी, इरफान शेख, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

धुळे, साक्रीत इंधन दरवाढीविरोधात रॅली

धुळे : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीमध्ये दररोज होत असलेल्या भाववाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. सोमवारी काँग्रेसकडून भारत बंद पुकारण्यात आला. या बंदला धुळे शहरात अल्प प्रतिसाद मिळाला. तर जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद होता. यात प्रामुख्याने शहर वगळता इतर ठिकाणी बाजापेठ, एसटी सेवा दुपारपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. सायंकाळी सर्व सुरळीत सुरू झाले. दरम्यान भारत बंदच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनूचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, भारिप बहुजन महासंघ, डावी आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी एकत्र येत शहरातून प्रमुख मार्गाने रॅली काढून बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. या वेळी काँग्रेसचे माजी मंत्री रोहीदास पाटील, राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, महापौर कल्पना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करणकाळ, आलोक रघुवंशी, साबीर शेख, रमेश श्रीखंडे, मुजफफर हुसेन, प्रमोद सिसोदे आदींनी रॅलीमध्ये सहभागी होत इंधन दरवाढीबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

साक्रीत पेट्रोल मशिनवर हार अर्पण
शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोटारसायकल व गॅस सिलिंडरची मिरवणूक काढून सुरत-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर काही आंदोलकांनी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल मशिनला हार घातले. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, तालुकाध्यक्ष विलास बिरारी, जितेंद्र मराठे, पोपटराव सोनवणे, दिलीप काकुस्ते, सुभाष देसले आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images