Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आशा बेमिसाल मैफलीस दाद

$
0
0

लगीनघाई नको! -2

अंतराळ सप्ताहाची पर्वणी-३

शोध गोंधनापूर किल्ल्याचा -४

---

आशा बेमिसाल मैफलीस दाद

नाशिक : चेरीबेरी लाइव्ह मुंबई, ज्ञानेश वर्मा प्रस्तुत, रोटरी क्लब नाशिकरोड, सुसंस्कृती फांउडेशनच्या डी. जे. कराओके हब आणि ऋषभ होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'आशा बेमिसाल' मैफलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये ही मैफल पार पडली. ग्यानेश वर्मा, अश्विनी सरदेशमुख, समीर भावे, रोहिणी पांडे, जिशान शेख, धनंजय जैन यांनी आशाताईंची सुरेल गीते सादर केली.

--

आज वधू-वर मेळावा

नाशिक : सोनवणे फाउंडेशनतर्फे आज, रविवारी (दि. ९) उच्चशिक्षित बौद्ध, चर्मकार, मातंग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ११ वाजता हॉटेल सेलिब्रिटा, जुनी अंधशाळा, नाशिकरोड येथे होणार आहे. या मेळाव्याचा विवाहेच्छुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांनी केले आहे. माहितीसाठी ९४२३०७१२७७ किंवा ९४२११६७३६० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

--

आज सांगता

नाशिक : कालिका देवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, नाशिक यांची सर्वसाधारण सभा, तसेच श्रावणमासानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाचा सांगता सभारंभ आज, रविवारी (दि. ९) सकाळी १० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम कालिमा देवी सभागृहात होणार असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

--

आरोग्य तपासणी

सिडको : शिवरुद्र प्रतिष्ठान व नवसंजीवनी सेवाभावी संस्थेतर्फे श्रीगणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १४) माऊली लॉन्स येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. एस. व्ही. जावळेंसह विविध तज्ज्ञ डॉक्‍टर रुग्ण तपासणी करणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणरक्षणास सरसावली ‘पालवी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करीत असलेल्या पालवी फाउंडेशनतर्फे यंदाही विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, 'माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव' स्पर्धाही रंगणार आहे. पर्यावरणपूरक वस्तूंपासून गणेश कलाकृती, सजावट व पर्यावरणपूरक पद्धतीनेच विसर्जन अशा स्पर्धांचाही या उपक्रमांत समावेश राहणार आहे.

गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता शाडू मातीच्या मूर्ती वापराविषयी प्रचार-प्रसार केला जात आहे. परंतु, शाडू मातीच्या अतिउपशामुळे त्या परिसरातील पर्यावरण संतुलन बिघडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच आता शाडू मातीचा वापर थांबविणेदेखील गरजेचे झाले आहे. याविषयी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी पालवी फाउंडेशनकडून नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्ती बसविण्याविषयी जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर मूर्तिदान न करता विसर्जन हे घरच्या घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने करणे आवश्यक असून, घरी केलेली सजावटदेखील नैसर्गिक साधनांपासूनच करणे आवश्यक असणार आहे. अशा मूर्ती, तयार केलेल्या कलाकृती व सजावटीचा फोटो दि. १३ ते १५ सप्टेंबरपर्यंत ९८३४५६४४५४ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्याबरोबरच गणेश कलाकृती व सजावटीची माहिती १०० शब्दांत सोबत देणे आवश्यक आहे. या मूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीनेच करणे गरजेचे असून, विसर्जनाचा फोटो व २५ शब्दांत माहिती आयोजकांना पाठविणे बंधनकारक असणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धकांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, शाळा, कॉलेजही यात सहभाग घेऊ शकणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रशस्तिपत्रकाने गौरविण्यात येणार आहे.

यापासून केलेली सजावट अपेक्षित

कापूस, धान्य, नारळ, लाकूड, सुपारी, फुले, फळे, सुकामेवा आदी नैसर्गिक घटक, साहित्यापासून बनविलेल्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्यासाठी 'माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पूर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या मूर्ती, सजावटींनाच यात प्राधान्य दिले जाणार आहे. नैसर्गिक साहित्याबरोबरच हळद, कुंकू, बीट, फुलांचे रंग, वॉटर कलर अशा नैसर्गिक रंगांपासून केलेली सजावट स्पर्धेसाठी अपेक्षित असणार आहे.

----------------

गणपतीची इमेज वापरणे.

----

(बातमी आजच्या अंकात वापरली आहे.) पेंडिंग (सुधारित)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिपा महादेवकर यांचे निधन

$
0
0

दिपा महादेवकर

नाशिक : आर. पी. विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका दिपा रमाकांत महादेवकर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्या अॅड. रमाकांत महादेवकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

चंद्रमोहन यादव

नाशिक : कॉलेजरोड येथील उद्योजक चंद्रमोहन दिंगबर यादव (वय ६३) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नात असा परिवार आहे. प्रबोधनी स्कूलच्या खजिनदार पुनम यादव यांचे ते पती होत.

--

छबुबाई जाधव

नाशिक : नाशिकरोड येथील छबुबाई निवृत्ती जाधव (वय ६५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनपा कर्मचारी महेश जाधव यांच्या त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा चोरास सात महिन्यांची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताविरुद्ध सबळ साक्षी पुरावे समोर आल्याने कोर्टाने त्यास दोषी ठरवत सात महिने कारावास तसेच दंडाची शिक्षा ठोठावली. रिक्षा चोरीची घटना २८ जानेवारी २०१८ रोजी रात्री घडली होती.

अनिल पांडुरंग पाटील (रा. मोरे मळा, रामनगर, रामवाडी) असे कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अमर पांडुरंग कन्होजे (रा. भद्रकाली) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचोरी प्रकरणी फिर्याद दिली होती. कन्होजे यांनी आपली रिक्षा घराबाहेरील मोकळ्या जागेत उभी केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी ती हातोहात लंपास केली होती. भद्रकाली पोलिस स्टेशनचे हवालदार बी. एस. खरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून अनिल पाटील यास अटक केली. पाटील याच्याविरुद्ध प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. पी. केदार यांच्या कोर्टात दोषारोप सादर करण्यात आले. सरकारी वकील आर. आर. पाटील यांनी सबळ साक्षी पुरावे कोर्टासमोर सादर केले. त्याआधारे कोर्टाने आरोपी पाटील यास दोषी ठरवत सात महिने साधा कारवासाची तसेच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयीचा मामला, हळूहळू बोंबला!

$
0
0

सोयीचा मामला, हळूहळू बोंबला!

दत्तक नाशिकच्या विकासासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहिलेल्या नाशिककरांमध्ये दीड वर्षातच प्रचंड अस्वस्थता वाढीस लागली आहे. भाजपच्या सत्तेत प्रशासनानेच नाशिककरांवर कृत्रिम संकटे लादायची आणि भाजपच्याच आमदार, पालकमंत्र्यांनी संकटमोचकाची भूमिका निभावून आपणच कसे तारणहार आहोत, याचे स्वत:च ब्रँडिंग करायचे धोरण स्वीकारले आहे. शासन, प्रशासन, पदाधिकारी, आमदार आणि पालकमंत्र्यांच्या खेळात नाशिककरांची अवस्था 'आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना' अशी झाली आहे.

विनोद पाटील

vinod.patil@timesgroup.com

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककरांवर महापालिकेतील मुखंडानी दीड वर्षात पश्चातापाची वेळ आणली आहे. पदाधिकाऱ्यांनी पालिकेची सत्ता हातात मिळताच विकासावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी स्वत:चे खिसे भरतील, अशा लोकानुनयी योजंनावर भर दिला आहे. डांबरातूनही मलई ओरबडताना मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी शहर दत्तक घेतल्याचाही त्यांना सपशेल विसर पडला. पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षापूर्ती होत नसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनाच या बेलगाम कारभाराला आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रूपाने लगाम घालावा लागला. मुख्यमंत्र्याचे दूत म्हणूनच नाशिकमध्ये आलेल्या मुंढेंनी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी पाठवल्याचे सांगून त्याची पुष्टी दिली. तसेच येथून पुढे शहर हितालाच प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्टही केले. त्यामुळे पुन्हा विकास रूळावर येईल, अशी आशा नाशिककरांमध्ये निर्माण झाली होती. मुंढेंनी पदभार घेतल्यापासून महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावून आणि पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षी आणि अनावश्यक योजनांना ब्रेक लावल्याने नागरिकांना हायसे वाटले. मुंढेंच्या त्रिसूत्रीने तर सत्ताधारी पुरते घायाळ होवून कारभारातील त्यांचा हस्तक्षेप पूर्णपणे बंद केला. काहींवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करून पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊल टाकले. त्यामुळे नागरिकही सुखावल्याचे चित्र निर्माण झाले. इथपर्यंत सगळे काही व्यवस्थित सुरू असतानाच, मुंढेंनी करवाढीचा मोठा बॉम्ब नाशिककरांवर टाकला अन् पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये अधिकाराची लढाई सुरू झाली. एवढी करवाढ नाशिककरांना परवडणारी नसल्याचे सांगत विरोधकांसोबत भाजपनेही या करवाढीला विरोध केला. के‌वळ विरोधच केला नाही तर, थेट आमदारच रस्त्यावर उतरल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे महापालिकेत मुंढेंविरुद्ध भाजप पदाधिकारी असे चित्र निर्माण होवून करवाढीचा मुद्दा हा मुंढे आणि भाजपसाठी प्रतिष्ठेचा झाला अन् त्याचे रुपांतर अविश्वास प्रस्तावात झाले. अखेर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या मध्यस्तीने चार महिन्यांच्या वादानंतर पडदा पडून निम्मी करवाढ मागे घेण्याचे दातृत्व आयुक्तांनी दाखवले. या सगळ्या प्रकारात भाजपसह विरोधकांची बदनामी होत असताना, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची प्रतिमा उजळून निघाली. या निर्णयाने नाशिककर, भाजप, पदाधिकारी हारले आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री जिंकल्याचा आभास निर्माण झाला.

पालिकेतील गेल्या सहा महिन्यांतील कारभाराचे अवलोकन केले तर, एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असे कामकाज सुरू आहे. प्रशासनाकडून कृत्रिम संकटे उभी करायची आणि आणि भाजपचे आमदार, पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी थेट संकटमोचकासारखे नाशिककरांच्या मदतीला धावून यायचे. यासाठी खुद्द आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही वेळप्रसंगी तोंडघशी पाडले जात आहे. मुंढेंनी सर्वप्रथम अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली. मुंढेंनी अचानक आपली दृष्टी सिडकोतल्या बांधकामांवर वळवली आणि सगळाच माहोल बिघडला. सिडकोवर अतिक्रमणावर हातोडा चालवण्याच्या प्रयत्न होताच, आमदार सीमा हिरेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेवून स्थगिती मिळवली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशावरून बरेच नाट्य घडले. आमदारविरुद्ध आयुक्त असे चित्र रंगले. जास्तीचा वाद नको म्हणून आयुक्तांनी या प्रकारात आस्तेकदम घेवून हिरेंना एकप्रकारे दिलासाच दिला. त्यामुळे सहाजिकच हिरेंनी लढाई जिंकल्याने जनमानसात त्यांची प्रतिमा उजळून निघाली. हा वाद शांत होत नाही, तोच करवाढीच्या निर्णयाने शहराचे वातावरण अशांत झाले. करवाढीतून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर डल्लाच टाकण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांतही आमदार, पालकमंत्र्यानी आपले ब्रँडिंग करून घेतले. त्यानंतर शिस्तीचा भाग म्हणून आयुक्तांनी १३५ अंगणवाड्यांना टाळे लावले. यातही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उडी घेत, हा विषय पालकमंत्र्यांपर्यंत नेला. तसेच, महासभेत स्थगितीचा ठराव करण्यात आला. तरीही प्रशासन ऐकत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रास्तारोको आंदोलन करावे लागले. त्यातही त्यांना अटक होण्याची शक्यता असतानाच, आमदारांनीच मध्यस्ती करीत, संभाव्य कारवाई टाळली. या विषयासोबतच अनधिकृत धार्मिक स्थळांचा विषय पदाधिकारी आणि आमदारांच्या मदतीला धावून आला. हायकोर्टाच्या आदेशाने प्रशासनाने कारवाई सुरू करताच, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. इथे दिलासा मिळाला नाही, म्हणून थेट पुन्हा हायकोर्टात धाव घेण्यात आली. भाजपचे सरकार असतानाही, आमदार देवयानी फरांदे यांना स्थगितीसाठी हायकोर्टातच जावे लागले. सुदैवाने हायकोर्टानेही फरांदेना दिलासा दिला. धार्मिक स्थळांसोबतच मंडप धोरणाचा राग आवळण्यात आला. मुंढेंनी शासकीय परिपत्रकाचा आधार घेवून नियमावली जाहीर केल्याने मोठाच आगडोंब उसळला. त्यातच बी. डी. भालेकर मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे थेट धार्मिक विषयावरूनच महिनाभर वातावरण तापत राहिले. आमदार फरांदेनी पुढाकार घेत, आयुक्त ऐकत नसल्याने थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्या मंडळांना घेवून गेल्या. पालकमंत्र्यांनी सर्व सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी चक्रे फिरवली आणि सरतेशेवटी बी. डी. भालेकर मैदानाबाबत आयुक्तांना यूटर्न घ्यावा लागला. त्यामुळे हे मैदान गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर पुन्हा रस्त्यावरील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी नाकारण्यात आली. पुन्हा आमदार फरांदे आणि पालकमंत्री महाजन यांचा हस्तक्षेप होवून इथेही आयुक्तांना दोन पावले माघारी येण्यास भाग पाडले. त्यामुळे पालकमंत्री आणि आमदारांची शिष्टाई यशस्वी झाल्याचे दावे प्रतिदावे करण्यात आले अन् तारणहार म्हणून दोघांची प्रतिमा उंचावली गेली.

सिडको, करवाढ, धार्मिक स्थळे, गणेश मंडळांचा वाद, आमदार निधीचा वाद कसाबसा शांत होत असतानाच, पुन्हा महाकवी कालिदास कला मंदिराच्या अवाजवी दरवाढीवरून अस्वस्थता निर्माण झाली. रंगकर्मीमध्ये या निर्णयावरून असंतोष वाढत असताना त्यांना चक्क आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. त्यामुळे या विषयात विरोधकांनी उडी घेत, भाजपला घेरण्याची तयारी करीत आंदोलनांचा मार्ग पत्करला. असंतोष वाढीस लागत असतानाच, मग आमदार फरांदेंनी यात उडी घेवून कलावंतांना सोबत घेत आयुक्तांची भेट घेतली. यातून स्थायीत तोडगा काढला जाईल, असे सांगत असंतोषाची धग कमी करण्याची शिष्टाई पार पडली. त्यामुळे येथेही मुंढेंना युटर्न घेण्यास निश्चित भाग पाडले जाईल. त्यामुळे पुन्हा भाजपसह आमदारांची प्रतिमा उंचावलली जाईल. परंतु, आता हा सगळा प्रकार नाशिककरांना केविलवाणा वाटायला लागला असून, हा सारा प्रकार नागरिकांच्या लक्षात यायला लागला असून, कुठेतरी नागरिकांचीच फसवणूक होताना दिसत आहे. पालिकेत भाजपची सत्ता असतानाही प्रशासन निर्णय घेते, सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत असा भास निर्माण केला जात आहे. प्रशासनाने घेतलेला निर्णय हा जाचक व कठोर असल्याची बोंब पुन्हा नागरिकांमध्ये जावून करायची आणि आंदोलनात सहभागी होवून प्रशासनाविरोधात भूमिका वठवायची, असा नवा उद्योग भाजपच्या नेत्यांनी शहरात सुरू केला आहे. आयुक्तांच्या चुकीच्या निर्णयात कसा 'त्या' लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे, असे भासवण्याची स्पर्धाच भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या सुरू आहे. त्यातून पक्षासकट पालिकेतील लोकप्रतिनिधींची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळत चालली असून, कारभारात प्रशासन भारी पडले आहे.

शहर विकासाला आकार देतील आणि नवी ओळख निर्माण करतील, अशी ठोस कामे उभारण्यात भाजपच्या आमदारांना अद्यापही फारसे यश आलेले नाही. कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा केला असला तरी दोन-चार कामांव्यतिरिक्त नागरिकांच्या हाती भोपळाच पडला आहे. नाशिकमध्ये नवीन काही येण्याऐवजी येथील उद्योग, व्यवसाय आणि शासकीय कार्यालयांची पळावापळवी मात्र मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी शासन दरबारी तीन आमदारांनी भांडणे अपेक्षित असताना, पक्ष आणि पालिकेतील वर्चस्वावरूनच भांडणे आणि वाद पहायला मिळत आहेत. त्यासाठी शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर प्रशासक असलेल्या मुंढेंसह पक्षालाही तोंडावर पाडण्याचे पातक त्यांच्याकडून केले जात आहे. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर तर या वर्चस्ववादाने भूमिगत होण्याची वेळ आणली आहे. करवाढ आणि अविश्वास नाट्याने तर भाजपची प्रतिमा पुरती डागाळली गेली असून, शहरात पक्ष नावाची संस्थाच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. 'दत्तक' आणि 'पालक' या दोन शब्दाभोवतीच महापालिकेचा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. आमदारांमधील राजकारणामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवरच हातावर हात धरून बसण्याची वेळ आली असून, पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील अस्तित्वच संपुष्टात आले आहे. पक्षांतर्गत राजकारणामुळे भाजपचे नगरसेवक कोमात गेले आहेत. एकीकडे पालिकेत काम शिल्लक नाही, तर दुसरीकडे पक्षाकडूनच अन्याय होत असल्याची भावना त्यांच्यात बळावत चालली आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांनी तर पालिकेपासून अंतर ठेवले आहे. निर्णय घेताना लोकप्रतिनिधांनीही विचारात घेतले जात नसल्याने बहुतांश निर्णयाबाबत तोंडघशी पडण्याची वेळ येते आहे. अशा वेळी आमदार आणि पालकमंत्री हे पदाधिकारी आणि नगरसेवकांनाच चुकीचे ठरवून आपली प्रतिमा उजळवून घेत आहे. आपली प्रतिमा उजळवण्याच्या नादात, पक्षाची प्रतिमा डागाळण्याचेही भान त्यांना आता राहिलेले नाही.

विकासावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी कुठेतरी कृत्रिम संकटाची मालिका तर, निर्माण केली जात नाही ना, अशी शंका आता नागरिकांना येवू लागली आहे. प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे जाणे आणि त्यासाठी आमदारांची मध्यस्ताची भूमिका घेणे हे आता कुठेतरी शंकास्पद वाटू लागले आहे. त्यामुळे भाजप हा नौटंकी पक्ष असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना कुठेतरी भाजपच्या अशा कारभारामुळे दुजोरा मिळत आहे. हा सारा प्रकार नागरिकांच्याही आता लक्षात येत असून, लोकांच्या भावनांशी खेळ करणे भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला मोठा फटका बसणार असल्याची लक्षणे दिसू लागल्याची चर्चा पक्षातूनच ऐकू लागली आहे.

vinod.patil@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोका टाळण्यासाठी बसविले स्पेशर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

विद्युततारा एकमेकांना चिटकून स्पार्किंग होऊ नये याची खबरदारी म्हणून वीजवितरण कंपनीने पिंपळगाव बसवंत शहरातील विद्युत तारांमध्ये स्पेशर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या स्पेशरमुळे तारांमध्ये सुरक्षित अंतर तयार झाले आहे. त्यामुले वादळ वारा आदी कारणाने स्पार्किंग होण्याचा धोका आता टळणार आहे. वीज कंपनीच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, शहरात साधारण दहा हजार पथदीप कार्यरत आहेत. या पथदिपांच्या पोल वरूनच वीज वाहकाचे काम केले जाते. चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन वाडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, सहाय्यक अभियंता नितीन पगारे यांनी पिंपळगाव शहरात ही मोहीम राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षकपदासाठी मायभूमीलाच प्राधान्य!

$
0
0

इराणला जेव्हा विजेतेपद मिळाले, तेव्हा त्यावेळी झालेल्या आनंदाला दु:खाची किनार होती... भारत ही माझी जन्मभूमी आहे, त्या संघाची हार मला मानवणारी नव्हती... मात्र, मी प्रशिक्षित केलेला संघ विजयी झाला याचा मला आनंद होता... भारत आणि इराण या दोन्ही देशांनी मला महिलांच्या संघाचे प्रशिक्षकपद देऊ केले, तर मी भारताला प्रथम प्राधान्य देईन, अशी स्पष्टोक्ती इराणच्या महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन यांनी केली. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा संवाद' या उपक्रमात त्या बोलत होत्या.

----

इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या महिला कबड्डी संघाने भारतीय महिला कबड्डी संघाला हरवून सुवर्णपदक पटकावले. इराणसारख्या नवख्या कबड्डी संघाच्या विजयामागे त्यांच्या प्रशिक्षक मूळच्या नाशिककर असलेल्या शैलजा जैन यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे जैन यांच्यासंदर्भात नाशिककरांमध्ये कुतूहलाची भावना निर्माण झाली होती. त्यांच्यासंदर्भात अनेकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने खास नाशिककरांसाठी 'मटा संवाद' या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यात जैन यांनी नाशिककरांशी दिलखुलास चर्चा केली. हा कार्यक्रम शुक्रवारी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथरावजी अभियांत्रिकी महाविद्यालयात रंगला. यावेळी नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आयर्न मॅन किताब पटकावल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कारविजेते नरेंद्र छाजेड, आनंद खरे, अंबादास तांबे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, हेमंत धात्रक, तानाजी जायभावे, 'एनडीसीए'चे विनोद शहा, कबड्डी असोसिएशनचे प्रशांत भाबड, विलास पाटील, शरद पाटील यांच्यासह प्रशिक्षक, खेळाडू, संघटक व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

गुलालवाडी व्यायामशाळेत सराव

शैलजा जैन यांच्याशी खो-खो संघटनेचे माजी कार्यवाह मंदार देशमुख यांनी संवाद साधला. जैन म्हणाल्या, की मला लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. लग्न झाल्यानंतर नाशिकला आल्यावरही मी गुलालवाडी व्यायामशाळेत सराव करीत होते. मात्र, 'एनआयएस'चे प्रशिक्षण झाल्यानंतर माझ्यातील प्रशिक्षकला संधी मिळाली. याच कामगिरीच्या आधारे मी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात प्रशिक्षक म्हणून काम करू शकले. २०१४ मध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीनंतरचा वेळ मला कबड्डीच्या कोचिंगसाठीच द्यायचा होता. सुदैवाने मला इराणकडून बोलावणे आल्याने क्षणाचाही विलंब न लावता मी त्यांना होकार दिला.

--

इराणमध्ये स्वत:ला सिद्ध करताना...

इराणमध्ये जाताना माझी एकच अट होती, माझ्या कामात कुणीही हस्तक्षेप करायचा नाही. ते त्यांनी मान्य केले. तेथील फेडरेशनने मला मोकळीक दिली आणि मग मी कामाला सुरुवात केली. २०१७ च्या जानेवारीमध्ये मी इराणला गेले. तेथे उतरल्यानंतर त्यांनी मला सर्वप्रथम डोक्यावर ओढणी घ्यायला सांगितले. इराणचा प्रवास तसा सोपा नव्हता. अनेक अडचणींचा सामना करीत मला स्वत:ला सिद्ध करायचे होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे स्पर्धेचा साचा असतो, तसा साचा या ठिकाणी नव्हता. आपल्याकडे एखादा खेळाडू जिल्हा पातळी, विभागीय पातळी, राज्य पातळीवर खेळतो, त्यानंतर तो राष्ट्रीय स्तरावर खेळतो. तसा प्रकार इराणमध्ये नाही. या ठिकाणी महिलांचे सामने पुरुष पाहू शकत नाहीत व पुरुषांचे सामनेही महिला पाहू शकत नाहीत. महिलांच्या सामन्याच्या वेळी फोटोग्राफरदेखील महिलाच असतात. तेथे पालकांचे बंधन कमी, तर कायद्याचे बंधन जास्त आहे, असेही जैन यांनी नमूद केले.

--

भाषा, जेवण अन् संघनिवडीचे स्वातंत्र्य

जैन म्हणाल्या, की भारतात आपण ज्याप्रमाणे इराणला समजतो तसा इराण नाही, तेथे महिलांना कामाच्या जास्त संधी आहेत. या ठिकाणी सिल्व्हर मेडल, ब्राँझ मेडल याला फारसे महत्त्व नाही, तर खेळाडूंना गोल्ड मेडलच हवे असते. त्यासाठी जिवाचे रान करावे लागले तरीही त्याला ते तयार होतील. तेथील संघाकडे फक्त चढाई करणारे खेळाडू होते, लेफ्ट आणि राइटचा त्यांनी विचार केलेला नव्हता. माझ्याकडे प्रारंभी त्यांनी ४५ मुली दिल्या आणि मला सांगितले, यातील तुम्हाला ज्या योग्य वाटतील त्या तुम्ही संघात घ्या. एका राष्ट्राचा संघ मला निवडायचा होता. ही माझी एकटीची जबाबदारी असल्याने जिंकले तरी माझी जबाबदारी व हरले तरीही माझीच जबाबदारी होती. त्यामुळे काम करताना थोडे दडपण होते. भारताला हरवायचे हे मोठे 'टार्गेट' त्यांच्यासमोर होते. या काळात भाषेची अडचण होती. येथील रस्त्यांवरचे फलकदेखील इराणी भाषेत होते. जेवणाचीही अडचण होती. कधी भात-लोणचे, चटण्या, खाकरे असे खाऊन मी दिवस काढले. तुम्ही प्रशिक्षक असूनही नॉनव्हेज का खात नाहीत, असे प्रश्न तेथील मुली विचारायच्या. त्यांचे काही शब्द समजायचे, काही समजत नव्हते. हातवारे करूनच कम्युनिकेशन करावे लागत होते. काही कालावधीनंतर मीही थोडीफार इराणी भाषा शिकले. या संघात एक मुलगी अतिशय अस्खलित हिंदी बोलायची.

--

...असा घडविला विजेता संघ

इराणचा संघ घडविताना दररोज सकाळी सात वाजता प्रशिक्षणाला सुरुवात व्हायची. सकाळी ७ ते ८ फिटनेस, १० ते १२ कबड्डीचा सराव, १२ ते १ स्वीमिंग, सायंकाळी पुन्हा ५ ते ७ कबड्डीचा सराव, त्यानंतर विविध प्रकारचे मोटिव्हेशनल व्हिडीओ बघणे. सामन्यांचे शूट केलेले व्हिडीओ पाहून काय चुका होताहेत, याचा अभ्यास करणे असा दिनक्रम होता. काही वेळा समुद्राच्या पाण्यातदेखील त्यांच्याकडून सराव करवून घेतला. त्यावेळी ध्येयपूर्तीसाठी मी ज्या बाबी मागितल्या त्या मला फेडरेशनने पुरविल्या. फिजिओथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, डाएटेशियन, मॅनेजरसह कोचेस असा स्टाफ त्यांनी दिला होता. स्वीमिंग पूल वापरासाठी उपलब्ध होता. कबड्डीत अॅँगल आणि टायमिंग महत्त्वाचे असते, त्यावर मी जोर दिला.

तेथे प्रत्येक खेळाडूचे फिजिकल फिटनेस ट्रेनर आहेत. इराणच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्या मुलींकडे प्रचंड फिटनेस आहे, फक्त त्यांना टेक्निक समजावून सांगणे गरजेचे होते, ते मी प्रामुख्याने केले. त्यांच्याकडून योगा, प्राणायाम आदी करवून घेतले. इराणने मला ४५ मुली दिल्या होत्या त्यातील १८ मुली या शेवटपर्यंत खेळविताना त्यांच्याकडून विजयी कामगिरी करून घेताना मनस्वी समाधान लाभले. मला भारतीय संघाची कमतरता काय आहे, हे माहिती होते. त्या तुलनेत इराणचा संघ काय करू शकतो हेदेखील माहिती होते. इराणी खेळाडू ब्लाइंड गेम खेळत होत्या. आदल्या दिवशी कोरिया, बांगलादेशबरोबर सामने झाले, ते जिंकले होते. त्यानंतर एक सामना आम्ही हरलो. हाच हरलेला सामना आम्हाला विजयाकडे घेऊन गेला. शेवटच्या वेळी कव्हर कुठे आहे, आपल्याला कोणत्या डावाने खेळायचे आहे, हे त्यांच्या मनावर बिंबविले. मेडल आपलेच आहे, हे त्यांना सांगितले. ज्यावेळी विजय मिळाला, त्यावेळी एकीकडे माझा संघ विजयी झाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे मी ज्या देशातून आले त्या देशाला हार पत्करावी लागते याचे दु:ख होते...

--

उपस्थितांशी ठळक मुद्यांवर साधलेला संवाद...

--

-फिटनेस जमेची बाजू

-इराणी खेळाडूंमध्ये लवचिकता आहे. प्रत्येक खेळाडूला ही दैवी देणगी असल्याचेच मी मानते. प्रत्येक खेळाडूचा फिटनेस पाहण्यासारखा आहे. त्यांच्याकडे फिटनेस आहे. मात्र, टेक्निक नव्हते, त्याच्यावर मी जोर दिला.

…--

-खेळांवर राजकीय प्रभाव

-इराणमध्ये असलेल्या राजकीय अस्थिरतेचा खेळांवर परिणाम होत नाही. किंबहुना त्याबद्दल कधी वाच्यतादेखील केली जात नाही.

--

-फेडरेशनला मुभा

-इराणच्या फेडरेशनला प्रचंड मुभा आहे. प्रशिक्षक म्हणेल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते. प्रशिक्षकाच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. खेळासाठी प्रचंड पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते.

--

-सरकारी प्रशिक्षकांबद्दल...

-भारतीय प्रशिक्षकांवर प्रशिक्षणासोबतच इतरही जबाबदाऱ्या टाकल्या जातात. त्यामुळे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्याचा परिणामा संघावर होतो. त्यामुळे प्रशिक्षकांवर इतर जबाबदाऱ्या देऊ नयेत असे वाटते.

--

-भारताने कोणता धडा घ्यावा...

-कबड्डीत आपण अजिंक्य नाही. इराणसह कोरिया, थायलंड, तैवान या देशांनीही कबड्डीत प्रगती केली आहे. आपल्याकडे सामन्याच्या दोन महिने अगोदर तयारी केली जाते, इतर देशांमध्ये मात्र संपूर्ण वर्षभर तयारी होते. त्यामुळे इतर देशांना भारताने कबड्डीत कमी लेखू नये.

---

लोगो : मटा संवाद

शब्दांकन : फणिंद्र मंडलिक

-----------------------------------------------------------------------

ध्येय निश्चित करा, यश तुमचेच!

--

पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची तरुणाईला साद

--

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजची तरुणाई देशाची शान आहे. देशातील प्रत्येक तरुणाला यशस्वी व्हायचे असेल, तर ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, अशी साद पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तरुणाईला घातली.

फ्रान्स येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला, त्याबद्दल 'मटा'तर्फे त्यांचा 'मटा संवाद' उपक्रमांतर्गत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, की माझा सत्कार इराणच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक आणि मूळच्या नाशिककर शैलजा जैन यांच्या सोबत होत आहे, ही भाग्याची गोष्ट आहे. मी जेव्हा विजयी झालो आणि भारताचा तिरंगा घेऊन येत होतो त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी इंडिया-इंडिया असा नारा दिला. त्यावेळी मला जो अभिमान वाटला तो शब्दांत व्यक्त होण्यासारखा नाही. प्रत्येकाने आपली स्वत:ची एक ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. सुरुवातीला मी शूटिंगमध्ये सहभागी झालो, त्यानंतर सायकल रेस केली. या सर्वांमध्ये मी प्रावीण्य मिळविले. आपल्या प्रत्येकात पुरेपूर क्षमता आहे, त्याचा आपण योग्य वापर करीत नाही. प्रत्येकाने अभ्यास तर केलाच पाहिजे, त्याचबरोबर खेळदेखील खेळले पाहिजेत.

सोशल मीडियाचा अतिवापर टाळा

आज प्रत्येक विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करताना दिसतो. मात्र, सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा, असेही आयुक्त सिंगल म्हणाले. यू ट्यूबवर अनेक नेत्यांची भाषणे आहेत, ती ऐकली पाहिजेत. स्वीमिंगचे टेक्निक आपण यू ट्यूबवर पाहूनच शिकलो. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने करावा, असा सल्ला विद्यार्थ्यांना देतानाच आई-वडील, गुरुजी यांच्या प्रत्येकाकडून अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आपल्या शरीराला मान द्या, तरच तुमची प्रगती होईल, असेही आयुक्त सिंगल यांनी अधोरेखित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा, पत्रास कारण की...!

$
0
0

बुद्धीचा कारक असलेल्या श्रीगणेशाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. वैशाखाचा तडाखा बसून गपगार झालेले कार्यकर्ते श्रावणसरींनी न्हाऊन नवचैतन्याने भरून निघाले आहेत. या कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप. त्याला तोडच नाही! मात्र, बाप्पा या कार्यकर्त्यांच्या उत्साहाआड मोठा समाज दडला असून, आपल्या आगमनाने त्यांना अच्छे दिन मिळो, ही तुमच्या चरणी प्रार्थना!

अरविंद जाधव

arvind.jadhav@timesgroup.com

बाप्पांचे आगमन हा लहानथोरांच्या, सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांचा आवडता उत्सव! श्रावणसरींची मोकळी वाट करून येणाऱ्या भाद्रपदातील गणेशोत्सव समाजाला एकसंध करणारा आणि समाजात चैतन्याची भावना जागवणारा! सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात याचमुळे झाली. इंग्रजांनी हिंदू धर्मावर सुरू केलेल्या अतिक्रमणांचा उघड मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली; पण बाप्पा मागील वर्षापूर्वी एक अडचण निर्माण झाली. हा सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला, याबाबत मोठा धुरळा उडाला. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. बुद्धिवंत दाखले देण्यास आणि नाकारण्यासाठी पुढाकार घेत होते; पण बाप्पा, खरं सांगायचे तर या वादाचा कोणताही परिणाम झालाच नाही. गेल्या वर्षी जेवढ्या जोरात डीजे वाजायचे ते वाजलेच! मंडळांची संख्याही सालाबादप्रमाणे वाढत गेली. काही वर्षांपासून असे नवनवीन वाद, त्यातून निर्माण होणारे राजकारण आणि त्यावर पोळी भाजून घेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले राजकारणी यांचा सुळसुळाटच झाला आहे. राजकारणात 'राम' राहिला नाही आणि असेल तर आस्ते 'कदम' तो दूर जाताना दिसतो आहे. यंदा तर म्हणे लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकींमुळे आतापासूनच जोरात तयारी सुरू झाली आहे. डीजे, भव्य मंडप आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहास हवा पाणी देण्याच्या तयारीत असलेल्या मंडळींना मात्र तुकारामांचे विघ्न आले.

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी कायद्याची अंमलबजावणी व्हावी एवढी मागणी केली आणि एकच गदारोळ उडाला. बी. डी. भालेकर मैदानाचा प्रश्नही होताच! नियम पाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वास्तविक नियमबाह्य असते तेच मंडळ म्हणून शोभून दिसते, असा साधा नियम मुंढेना समजला नाही. पालकमंत्री गिरीशभाऊंनी अनेकदा मध्यस्थी करून मुंढेंना माघार घेण्यास भाग पाडले. महापालिकेचा हा जाच दूर होताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बाजी मारल्याचा आनंद पदाधिकारी साजरे करीत असताना पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक बोलवली. त्यात डीजेचा मुद्दा उपस्थित झाला. डीजेवरून आठवलं, गेल्या वर्षी शहर पोलिसांनी डीजेचालकांवर मोठी कारवाई केली होती. मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी 'नाना' पद्धतीने गुन्हे दाखल केले. डीजेही जप्त झाले. आता तर म्हणे एक लाख रुपये दिवसाला देऊनही डीजेचालक मिरवणुकीत सहभागी होण्यास तयार होत नाहीत. किंबहुना पोलिसांनी कारवाई केली तर संबंधित मंडळाने पुढील जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र बाप्पा, पोलिसांनी यंदाही कायद्याची अंमलबजावणी होणारच असा दम भरला आहे. बरं या पोलिसांनी गेल्या वर्षी बोलले तसेच केले. यंदाही तशीच परिस्थिती राहणार असल्याने याचा आंनद मानायचा की दु:ख हे तूच ठरव रे बाप्पा! सर्वसामान्य म्हणून आम्हाला याचे फार सोयरसुतक नसते. जास्त आवाज झाला की कानात कापसाचे बोळे घालून आम्ही मार्ग बदलून पुढे जातो. तुझं तसं नाही. सहन करायची तुझ्याकडे ताकद आहे. झिंगाट असो की मुन्नी बदनाम हुई...! तू कार्यकर्त्यांच्या लीला याची देही याचि डोळा अनुभवतो आणि आपले दहा दिवस आंनदाने घालवतो. मागच्या वर्षी डीजेचे प्रमाण कमी होते. वाजवले त्यांच्यावर कारवाई झाली. डीजेच्या ठणठणाटाशिवाय बाप्पा करमेल ना तुला!

बरीच वर्षे झाली, पारंपरिक गणेशोत्सव काळाआड जाऊन. नाटक, समाजाला मार्गदर्शक ठरतील अशी डेकोरेशन्स दिसत नाहीत. खरं तर बाप्पा, सार्वजनिक या शब्दाचा आम्हाला विसरच पडला. आता सार्वजनिकचा अर्थ आता एका पुढाऱ्यापुरता सीमित झाला आहे. पुढाऱ्याने त्याच्या मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपल्या पैशांमधून आणि बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्त्यांच्या उत्साहासाठी केलेल्या नियोजनास सार्वजनिक गणेशोत्सव म्हंटले तर वावगे ठरणार नाही. स्पॉन्सरचे काम झाले, की सर्व यथाशक्ती पार पडते. त्यात कार्यकर्त्याला डोके लावण्याचा आणि जीव ओतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग रिकाम्या कार्यकर्त्याला अडकून ठेवण्यासाठी आणि त्याच्या मनोरंजनासाठी डीजेसारखी सुविधा निर्माण करण्यात आली होती. अगदी दहा दहा फुटांवर दोन मंडळांच्या डीजेमध्ये रस्सीखेच सुरू असायची. यात कोणाचा जीव गेला तरी बेहत्तर, अशी स्थिती होती. सुदैवाने कोर्टाने त्यावर अंकुश आणला. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांनी या कायद्याची अंमलबजावणी काटेकोर केली. बाप्पा, तुला अशा गोंगाटाची सवय असावी किंवा तू येतानाच कानात हेडफोन तर घालून येत नाही ना, अशी शंका मनात उपस्थित व्हायची. मात्र, तुझ्यावरच आणि पर्यायाने आमच्यावरचं संकट तूच टाळलं बाप्पा! शेवटी विघ्नहर्ता अशी तुझी ओळख थोडी अशीच निर्माण झाली आहे. कोर्ट, पोलिसांनी मिळून किमान नाशिककरांना दिलासा दिला. मात्र, बाप्पा कायद्याने नको, तर कार्यकर्त्यांच्या इच्छेने हे व्हावे, अशी तमाम भक्तांची अपेक्षा आहे. त्यास तू पाठबळ देणे महत्त्वाचे झाले आहे. मागील दोन वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर-गैरवापर, वेगवेगळे समाज, त्यांचे प्रश्न, मागण्या, इंधनाचे वाढते दर, न्यूटनच्या सफरचंदापेक्षाही वेगाने खाली कोसळणारा रुपया, या विपरित परिस्थितीत वाढत जाणारा सेन्सेक्स, तुकाराम मुंढे बरे की नगरसेवक, असे अनेक प्रश्न समाजासमोर आ वासून उभे आहेत. त्याची उत्तरे तुझ्याकडे असतील तर नक्की घेऊनच ये! कसे आहे, येथे सोशल मीडियाचा जोर सध्या वाढला आहे. इंटरनेट फ्री की आपण, असा प्रश्न उपस्थित करणारा ही पोस्ट किमान १० ग्रुपमध्ये टाकतो. यावरून तुला या आयुधाचा वापर करणाऱ्यांचा एक अंदाज येऊ शकतो. असो, बाप्पा प्रश्न तसे भरपूर आहेत. त्याची काही उत्तरे सामाजिक आहेत, काही वैयक्तिक, तर काही राजकीय. उत्तरांची संख्या मोठी आहे; सण- उत्सव गरजेचा आहे. त्यात शंकाच नाही. पण बाप्पा समाजाला एकसंध ठेवण्याची ताकद ठेवणारे सण-उत्सव जातीजातींत विखुरले आहेत. एका जातीचा, धर्माचा माणूस दुसऱ्याला माणूस म्हणून स्वीकारत नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. बाप्पा, तू येतोस हा नुसता विचारच मनाला आंनद देतो. आता तुझ्या येण्याची वेळ जवळ आली असून, यंदा तू राज्यावरील, देशावरील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणुसकीवर येणारी संकटे दूर कर, हीच एक प्रार्थना!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहक न्यायमंचचा रेल्वेला दणका

$
0
0

चोरीच्या घटनेतील ४२ हजार देण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरक्षित प्रवासादरम्यान रेल्वेतून चोरीला गेलेल्या सामानाबद्दल रेल्वेला जबाबदार धरत जिल्हा ग्राहक न्यायमंचाने ३७ हजाराची नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च ५ हजार रुपये असा १५ हजाराचा दंडही ठोठावला आहे.

आर्टिलरी सेंटर रोडवर हरिओम नगर येथे राहणाऱ्या दिप्ती त्रिपाठी यांनी याबाबत जिल्हा ग्राहक निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली. त्रिपाठी यांनी नाशिकरोडहून मणीपूर येथे जाण्यासाठी १७ नोव्हेंबर २०१५ मध्ये सेंकड एसी कोचचे तिकीट बुक केले. त्यांच्यासोबत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा होता. प्रवासा दरम्यान रात्री त्यांची पर्स चोरीस गेली. पर्समध्ये दोन मोबाइल, दोन एटीएम कार्ड, चष्मा व रोख रक्कम असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज होता. सदर घटना कटनी ते सतना यादरम्यान झाली असल्याने त्याबाबतची फिर्याद मिर्झापूर येथे जीआरपी पोलिसांकडे दिली. मात्र या चोरीचा तपास केला नाही. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाले. रेल्वेत सुरक्षा पुरविण्याचे काम रेल्वेचे आहे. असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवर रेल्वेने आपली बाजू मांडली. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ग्राहक न्यायमंचाने रेल्वे राष्ट्रीय आयोगाच्या केसचा दाखला देत रेल्वेने प्रवास करणाऱ्या ग्राहकांच्या शारीरिक व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे, असे सांगत ३७ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च ५ हजार रुपये असा १५ हजाराचा दंडही ठोठावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृती जोपासणारी ‘श्री सूर्यशक्ती’

$
0
0

महाराष्ट्रातील विविध समाजघटकांतील बांधव वास्तव्यास असलेल्या दिंडोरीरोड भागातील श्री सूर्यशक्ती सोसायटीने एकोपा जपला आहे. महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करून देण्याचा आदर्श या सोसायटीने घालून दिला आहे. सण आणि उत्सवांत एकत्र येऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना करण्याचे काम येथे श्रद्धापूर्वक केले जाते. खंडेरायाची उपासना करणारे या सोसायटीमधील रहिवासी स्वच्छतेचे पुजारीही आहेत. वृक्षारोपणावरच नव्हे, तर वृक्षसंवर्धनावरदेखील त्यांचा भर दिसून येतो. या सोसायटीविषयी थोडेसे...

संकलन : रामनाथ माळोदे

--

दिंडोरीरोडवरील गोरक्षनगरमधये १९९८ मध्ये श्री सूर्यशक्ती सोसायटीची स्थापना करण्यात आली. सोसायटीमध्ये वन रूम किचनच्या तीन, वन बीएचकेच्या दहा, तर टू बीएचकेच्या तीन अशा १६ सदनिका आहेत. सर्वच सदनिकांमध्ये मराठी बांधव गुण्यागोविंदाने राहातात. दिंडोरीरोडच्या आरटीओ कॉर्नरपासून आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या भागात ही सोसायटी आहे. सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी सदस्यच सांभाळीत असल्यामुळे रखवालदार नेमण्याची गरज भासलेली नाही. देखभाल-दुरुस्तीसाठी सदस्यांकडून महिन्याला २५० रुपये घेतले जातात. त्यातून वीजबिल, स्वच्छता, पाणीमीटर आणि इतर खर्च भागविला जातो. दर वर्षी सोसायटीचे ऑडिट होते. महिलांना नेतृत्वाची संधी देण्याचे मोठेपण सोसायटीतील पुरुषांनी दाखविले आहे. सध्या सोसायटीचा कारभार महिला अध्यक्षा सांभाळत असून, कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो.

रहिवासी क्षेत्रात असलेल्या या सोसायटीचा परिसर अत्यंत शांत आहे. नोकरदार वर्ग आणि काही व्यावसायिक अशा सर्वसाधारण मध्यवर्गीय रहिवाशांची ही वस्ती आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे या परिसरात असलेले जागृत देवस्थान येथील रहिवाशांचे श्रद्धास्थान आहे. सकाळ-सायंकाळ भाविकांची दर्शनासाठी येथे गर्दी होते. गोरक्षनगर उद्यानासारखे भव्य उद्यान या सोसायटीच्या जवळच असल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

--

भक्तिरसात डुंबणारी सोसायटी

सोसायटीच्या आवारातील खंडेराय महाराज मंदिर परिसरात चंपाषष्ठीला यात्रोत्सव साजरा केला जातो. सोसायटीतील प्रत्येक सदस्यासह आसपासचे रहिवासीदेखील त्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. यावेळी पालखी मिरवणूक काढण्यात येते. वाघ्या-मुरळीचे गाणे, जागरण आणि गोंधळ यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांनी हा परिसर दुमदुमून जातो. गणेशोत्सवात गणपती अथर्वशीर्ष पठण, श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांच्या सामुदायिक पठणाचे आयोजन केले जाते. हे पठण करण्यासाठी रोज वेगवेगळी ठिकाणे ठरविली जातात. त्या ठिकाणी महिला एकत्र येऊन भगवद्गीता, विष्णूद्स्रनाम, गणवती अथर्वशीर्ष आदींचे सामुदायिक पठण करतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची स्थापना करून बेलपत्र अर्पण करून पूजा केली जाते. गुढीपाडव्याला प्रभातफेरी काढण्यात सोसायटीचे सभासद पुढे असतात. त्यामध्ये मुले, मुली, महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. नूतन मराठी वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करताना ध्वज, पताका, घोडेस्वार, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. सायंकाळी सांजपाडवासारख्या बहारदार गीतमैफलीचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रातील प्रत्येक सण आणि उत्सवांचा सोसायटीचे सर्व सभासद एकत्रितरित्या आनंद लुटतात.

--

सामाजिक उपक्रमांत पुढाकार

गोरक्षनगर परिसरातील मोकळ्या जागेत, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यावर सोसायटीने भर दिला आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता त्या वृक्षांची वाढ जोमाने व्हावी याकडे, जनावरांपासून त्यांचे संरक्षण करण्यावरही सोसायटीतील सभासद आवर्जून लक्ष पुरवितात. त्यामुळेच येथे वृक्षारोपण केलेली रोपे शंभर टक्के जगली आहेत. परिसराच्या स्वच्छतेवरही सभासद भर देतात. वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ ठेवला जातो. विशेषत: सुटीच्या दिवशी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन परिसर लख्ख करतात. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची जबाबदारीदेखील सदस्य आपापल्या पातळीवर पार पाडतात. त्यामुळे कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होते.

--

सोसायटीची कार्यकारिणी

अध्यक्षा : वैशाली घुगे

सचिव : दिलीप वांजोळ

माजी अध्यक्ष : दत्तात्रय राऊत

सदस्य : शोभा मांडवगणे, अजित काळे, शोभा बागूल

......

लोगो : आमची सोसायटी आमची शान

सूचना : सोसायटीबाबतचे आवाहनही घ्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांची शक्तीपरीक्षा

$
0
0

इंधनदरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे बंद; जनआंदोलनातून राष्ट्रवादीचा करवाढीला विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिल्याने सोमवारी (दि. १०) नाशिक बंद राहणार आहे. दुसरीकडे, महापालिकेविरोधात जनआंदोलनाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव गांधी भवनावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही आंदोलनामुळे नाशिकचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या आंदोलनात विरोधी पक्षांच्या एकजुटीसह शक्तीपरीक्षाही होणार आहे.

काँग्रेसने भारत बंदची घोषणा दिल्यानंतर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं यांनी पाठिंबा दिला आहे. 'राष्ट्रवादी'च्या आंदोलनालाही यातील बहुतांश पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादी भवन येथून दुपारी एक वाजता 'राष्ट्रवादी'चा मोर्चा निघेल. तर काँग्रसचे बंद आंदोलन सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे. बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, उपाध्यक्ष विजय राऊत, सरचिटणीस सुरेश मारू, राजकुमार जेफ, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, रमेश पवार, मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, गोपाळराव जगताप, किशोर बाफना यांच्यासह विरोधी पक्षांनी केले आहे. तर जनआंदोलनात सामील होण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

भुजबळ मैदानावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे जनआंदोलनाच्या माध्यमातून पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. त्यामुळे जनआंदोलनाच्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवाजवी लादलेली करवाढ व महापालिकेसंबधी अलेल्या विषयावर हा मोर्चा असून यात सर्वच विरोधी पक्षांना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंढे विरोधात भुजबळ

महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात वातावरण शांत होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनआंदोलनामुळे मुंडेचा करवाढीचा निर्णय आता पुन्हा चर्चेत येणार आहे. या आंदोलनातून आयुक्त मुंढे विरोधात भुजबळ असे चित्रही समोर येणार आहे.

जिल्हा बंदसाठी पत्रके

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे नाशिक शहर परिसरातील मेनरोड, एम. जी. रोड, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड येथील व्यावसायिकांना पत्रक वाटून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिशा’ची आज बैठक; राज्यमंत्री घेणार आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक सोमवारी (दि. १०) केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी दोन वाजता ही बैठक होईल. यात केंद्रपुरस्कृत विविध ३० योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीचे नियोजन आणि संनियंत्रण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे असून, केंद्राच्या विविध योजना तळागाळापर्यंत जातात की नाही, याचा आढावा भाजप सरकार सातत्याने घेत आहे. योजनांसाठी मंजूर होणारा निधी, प्रत्यक्षात उपलब्ध होणारा निधी आणि खर्च होणारा निधी, लाभार्थी निवडीचे निकष आणि त्याची अंमलबजावणी याबाबतचा आढावा घेण्यासाठी दिशा समितीची स्थापना करण्यात आली आहे. योजनांचा आढावा घेण्याची जबाबदारी संबंधित भागातील केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकडे असून, यापूर्वी डिसेंबर २०१६ मध्येही आढावा बैठक झाली होती. त्या वेळी अनेक केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. विशेषत: कृषी विभागाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुन्हा एकदा ही बैठक होत असल्याने सरकारी कार्यालयांमधील यंत्रणांकडून तयारी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वपक्षीयांकडून सहभागासाठी साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढीविरोधात देशभर पुकारलेल्या बंद संदर्भात महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारिप, रिपाइं (गवई गट) तसेच विविध व्यापारी संघटना, कामगार संघटना, रिक्षा, टॅक्सी चालक संघटना, नाशिक ट्रेडर्स असोसिएशन, जिप्सम असोसिएशन यांची बैठक झाली. यावेळी सर्वांनी बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.

बैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शाहू खैरे, सुरेश मारू, बबलू खैरे, 'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जयंत जाधव, गजानन शेलार, नाना महाले, निवृत्ती अरिंगळे, माकप नेते डॉ. डी.एल. कराड, सुनील मालुसरे, तानाजी जाधव, मनसेचे प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, शहराध्यक्ष अनिल मटाले, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, भाकपचे राजू देसले, महादेव खुडे, भास्कर शिंदे, प्रताप भालके, 'सप'चे सय्यद अहमद, इम्रान चौधरी, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. मनीष बस्ते, केरू पाटील, पी. बी. गायधनी, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, नाना बच्छाव, बसपचे अरुण काळे, भारतीय बहुजन महासंघचे बाबा केदारे, विनायक कटारे, नितीन भुजबळ, नाशिक ट्रेडर्स असोसिएशनचे आलम खान, अक्रम खान आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारठा वाढला, पाऊस लांबला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या १० वर्षांतील सप्टेंबरमधील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद रविवारी (दि. ९) झाली. किमान तापमान १७.५ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककर घेत असून, आठवडाभर पाऊस विश्रांती घेणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी पिवळी पडू लागलेली पिके हातची जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाऊस लहरी झाला आहे. तब्बल साडेतीन महिने उलटूनही नाशिककरांनी यंदा मुसळधार पाऊस अनुभवलेला नाही. जून, जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने कशीबशी सरासरी गाठली. ऑगस्टमध्येही अशीच परिस्थिती होती. सप्टेंबरमध्ये पाऊस दिलासा देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, या महिन्याचा पंधरवडाही कोरडाच जाण्याच्या मार्गावर आहे. याउलट गेल्या तीन ते चार दिवसांपासून किमान तापमान २० अंश सेल्सियसपेक्षा कमीच राहिले आहे. विशेष म्हणजे शनिवारी १९.५ अंश सेल्सियसवर असलेले जिल्ह्यातील किमान तापमान एकाच दिवसांत दोन अंशांनी खाली उतरून १७.५ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. २ सप्टेंबर १९५२ रोजी १६.१ एवढे नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे. उत्तर भारतात मान्सून असला तरी महाराष्ट्रात परतीच्या पावसाला विलंब होत आहे. त्यामुळे किमान तापमानावर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली.

..

१६ सप्टेंबरपर्यंत पाऊसप्रतीक्षा

हवामानातील गारठा वाढू लागल्याने पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला असून, १६ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस सप्टेंबरची आणि चालू वषाची सरासरी गाठणार का याची चिंताही व्यक्त होऊ लागली आहे.

..

वर्ष किमान तापमान

२००८ २३.६

२००९ २४.५

२०१० २५.२

२०११ २५.७

२०१२ २५.२

२०१३ २२.७

२०१४ २४.०

२०१५ २४.०

२०१६ २४.७

२०१७ २६.८

२०१८ १७.५

...

पीक उत्पादनावर परिणाम

हवामानातील गारव्याचा पिकांवर थेट परिणाम होणार नसला तरी पाऊस लांबणीवर पडल्याने पीक उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतीतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याच्या काही भागात कांद्यावर दव पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे करपाचा प्रादुर्भाव वाढतो. रोपे खराब होत आहेत. काही शेतकरी औषधे मारून रोपे सांभाळत असले तरी अनेक शेतकऱ्यांना ती हातची जातील याची चिंता सतावू लागली आहे. कांद्यासह टोमॅटो, मिरचीला भाव नाही. चांदवड, नांदगाव, येवला, देवळा, बागलाण, निफाड या तालुक्यांसह पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्याच्या बहुतांश शेतकऱ्यांचे वर्तमान वाईट आणि भविष्यही अंधारलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलत्या हवामानाचा नाशिककरांना ‘ताप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा सुरू असला तरी गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात गारठा निर्माण झाला असून, त्यामुळे अनेकजण आजारी पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान अचानक १७.५ अंश सेल्सियसवर पोहचले असून, शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे.

पावसाळा असला की काही प्रमाणात दमट वातावरण असते. मात्र, गेल्या आठवड्यापासून वातवरणात बदल झाला आहे. सकाळी, रात्री गारठा आणि दिवसा ऊन यामुळे अनेकांना ताप येऊ लागला आहे. या गारठ्याने स्वेटर घालावे की रेनकोट घालावा अशा द्विधा मनस्थितीत नाशिककर सापडले आहेत. गारठ्याचा परिणाम आरोग्यावर होत असून घसादुखी, थंडी, ताप अशा आजारांनी अनेकजण त्रस्त आहेत. यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

महापालिकेने पावसाळी आजार म्हणजेच गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, विषमज्वर आणि डेंग्यूला आळा घालण्यासाठी बरीच मोठी मोहीम आखली होती. त्याचा गाजावाजाही प्रचंड प्रमाणात झाला होता. प्रत्यक्षात मात्र त्याचा प्रभाव दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून डेग्यूच्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात मलेरिया व डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठी आहे. या काळात ऊन नसल्याने विषाणू वाढतात. याला अप्पर रेस्ट्रॉ ट्रॅक इन्फेक्शन असेही म्हणतात. या काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत, तसेच गरम पाणी प्यावे. घसादुखीचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

डॉ. प्रफुल्ल सोमठाणकर, होमिओपथी तज्ज्ञ

सध्या होणारे आजार प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होताना दिसतायेत. यासाठी पाणी उकळून प्यावे. आइसक्रिम, ज्यूस, दही असे पदार्थ खाऊ नयेत. लहान मुलांना कफाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. टायफॉइड, कावीळ यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आजार होण्याच्या आधी काळजी घ्यावी.

- वैद्य राजश्री कुलकर्णी

सध्या थंडी तापाबरोबरच तरुणांमध्ये नागिन, कांजण्या अशा प्रकारच्या आजारांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. या काळात आहारावर नियंत्रण ठेवावे. तेलकट, तिखट, आंबट पदार्थ टाळावेत. मिरे व आलं यांचा जेवणात जास्त समावेश करावा. ज्येष्ठांनी तळलेला लसूण खावा. त्याच प्रमाणे लहान मुलांच्या आहारात गायीच्या तुपाचा समावेश जास्त प्रमाणात करावा.

डॉ. विक्रांत जाधव, आयुर्वेत तज्ज्ञ

तापमानातील घट

दिनांक- कमाल-किमान

४ सप्टेंबर-२६.४-२०.२

५ सप्टेंबर-२६.५-२०.६

६ सप्टेंबर-२७.३-२०.४

७ सप्टेंबर-२८.३-१९.६

८ सप्टेंबर-२७.५-१९.५

९ सप्टेंबर-२८.५-१७.५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेबारा हजार प्रकरणांचा ‘निकाल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत १२ हजार ५१४ दावे निकाली निघाले. लोकअदालत शनिवारी पार पडली. यामध्ये दावा दाखलपूर्व १० हजार ५९७ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९१७ प्रकरणांचा निपटारा झाला. या लोकअदालतीत प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १६ कोटी ९७ लाख ३५ हजार ७८७ रुपयांची तडजोड रकमेची वसुली झाली

लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी सहा हजार ६७० प्रकरणे, तर दावा दाखलपूर्व ८९ हजार ४५८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण प्रकरणांची संख्या जवळपास ९६ हजारांच्या घरात पोहचली होती. नाशिकसह जिल्ह्यांच्या सर्वच कोर्टांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दावा दाखल प्रकरणांमध्ये सात कोटी २२ लाख ८९ हजार ४०६ रुपये, मोटार अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी ७३ लाख ८१ हजार ५१९ रुपये, एनआय अ‍ॅक्टमध्ये चार कोटी ३० लाख ७६ हजार ६ असे एकूण ९ कोटी ७४ लाख ४६ हजार ३८१ रुपयांची नुकसानभरपाई व दंडापोटी वसुली करण्यात आली. शनिवारी सकाळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते लोकअदालतीची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी लोकअदालतीत सहभागी होऊन आपसांतील वाद मिटविण्याचे आवाहन केले होते़ जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर बुक्के, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांचे परिश्रम तसेच वकील व पक्षकारांनी केलेल्या सहकार्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीत दावे निकाली काढण्यात यश मिळत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. लोकअदालतीत सहभाग घेतल्यास न्यायपालिकेवरील ताण कमी होतोच पण पक्षकारांचीसुद्धा आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासातून सुटका होत असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अशी झाली वसुली

दावा दाखल- ७ कोटी २२ लाख ८९ हजार ४०६

मोटार अपघात - २ कोटी ७३ लाख ८१ हजार ५१९

एनआय अॅक्ट- चार कोटी ३० लाख ७६ हजार ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्ताकर्षक रुपाची मोहिनी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते विविध रुपांतील गणेशमूर्तींचे. दर वर्षी नव्याने अनेक रुपांतील गणरायाच्या मू्र्तींची विक्री केली जाते. भक्तांची विशेषतः लहानग्यांची या आकर्षक गणेशमूर्तींना मोठी पसंती मिळत असते. यंदादेखील वासुदेव, सरस्वती, बालगणेश, बाजीराव आदी रुपांतील बाप्पांच्या वैविध्यपूर्ण मू्र्ती बाजारात उपलब्ध आहेत. गणेशाची ही विविध रुपे भक्तांना आकर्षित करीत आहेत.

शाडू मातीच्या मूर्ती खरेदीकडे नाशिककरांचा वाढता कल असला, तरीही पारंपरिक पद्धतीने (पीओपी) तयार केलेल्या विविध रुपांतील गणेशमूर्तींचीही विक्री होत आहेत. मेनरोड, डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोम यासह शहरातील इतर बाजारपेठांमध्ये गणेशाच्या विविध रुपांतील मू्र्तींची विक्री होत आहे. शाडू मातीच्या मूर्ती नऊशे रुपयांपासून, तर 'पीओपी'च्या मूर्ती सातशे रुपयांपासून विकल्या जात आहेत. येत्या गुरुवारी (दि. १३) बाप्पांची घरोघरी प्रतिष्ठापना होणार असल्याने येत्या दोन दिवसांत बाप्पांच्या मूर्तींची अधिक विक्री होईल, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

सार्वजनिक सुटीच्या दिवशी नाशिककरांची खरेदीस पसंती दिसून येते. रविवारीही बाजारपेठेत नाशिककरांची गर्दी होईल, अशी शक्यता होती. पण, बाप्पांच्या मूर्ती खरेदीसाठी भक्तांची तुरळक गर्दी दिसली. पोळा आणि अमावास्या असल्याने रविवारी गणेशमूर्तींची हवी त्या प्रमाणात विक्री न झाल्याचे दिसले. यंदा अनेक समाजसेवी मंडळांकडून शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यातील बहुतांश कार्यशाळांना नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा कार्यशाळेत साकारलेल्या मूर्तींचीच घरी प्रतिष्ठापना करण्याकडेही अनेक भक्तांचा कल दिसून येत आहे.

--

या मूर्तींचे आकर्षण

गणेशमूर्तींच्या बाजारपेठेत यंदा सिंहासनावरील गजानन, मूषक, तसेच वाघ यावर स्वार असलेला गणपती, चौरंगावर ऐटीत विराजमान झालेले बाप्पा, हातात मोरपीस घेतलेला विघ्नहर्ता या गणेशमूर्ती भक्तांना आकर्षित करीत आहेत. ताम्र गणपती, शेंदूर गणपती मूर्तीलाही भक्तांची पसंती मिळत आहे. मूर्तींसोबतच वेलवेट पावडरचा वापर करीत विनायकाचे सोहळे तयार करण्यात आले आहे. अशा मूर्ती प्रकाशात अधिक चमकतात. लाइट्सचा वापर करीत मखर सजावट केल्यास या मूर्तींचे रूप अधिक खुलते. त्यामुळे गजाननाच्या या मूर्तींनाही भक्तांची पसंती मिळत आहे.

--

लोगो : वेध गणेशोत्सवाचे

(लीड, फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीवायकेत गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा

$
0
0

गणेशोत्सवानिमित्त

बीवायकेत स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी विकास समितीतर्फे पाच दिवसीय गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत कॉलेजमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात समितीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (१३ सप्टेंबर) अथर्वशीर्ष पठण व मोदक स्पर्धा, शुक्रवारी (१४ सप्टेंबर) संगीत खुर्ची, शनिवारी (१५ सप्टेंबर) मेहेंदी, रांगोळी आणि एक मिनिट शो स्पर्धा होणार आहेत. कॉलेजच्या ढेकणे हॉलमध्ये सकाळी १० वाजता स्पर्धा होतील. शुक्रवारी सकाळी ८ वाजता योग प्रात्यक्षिक शिबिर होईल. सोमवारी (१७ सप्टेंबर) कॅम्पसमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक निघेल, अशी माहिती विद्यार्थी विकास समितीने दिली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश काळे, रिद्धी भावसार, मृणाल पाटील, शिवम येवलेकर, विनीत पंडित, अनुजा सुराणा, अनिरुद्ध लोंढे गणेशोत्सवाचे संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाणी समाज अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण

$
0
0

पुण्यात नोव्हेंबरमध्ये होणार दोन दिवसीय कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लाडशाखीय वाणी समाजाच्या महाधिवेशनाच्या लोगोचे अनावरण महाकवी कालिदास कलामंदिरात अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यभरातील विविध शहरांमधून समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी संघटन हे अतिशय महत्त्वाचे असते. राज्य आणि देशाच्या वाटचालीत लाडशाखीय वाणी समाजाचे योगदान मोठे आहे. शिस्तबध्दता आणि समर्पित वृत्तीने काम करण्याची इच्छाशक्ती यामुळे आजवर समाजाने प्रगती केली आहे. संघटीत व्हा आणि देशासाठी भरीव योगदान द्या, असे आवाहन तरडे यांनी केले. यावेळी मंचावर अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर. एल. वाणी, खजिनदार श्याम शेंडे, सचिव राजेश कोठावदे, जिल्हा समन्वयक सचिन बागड उपस्थित होते.

पुण्यात २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाधिवेशनाला राज्यभरातून सुमारे ४० हजार समाजबांधव उपस्थित राहतील, असा दावा अधिवेशनाचे खजिनदार श्याम शेंडे यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजीच्या सत्रांमध्ये उद्योजक हणमंतराव गायकवाड, बाबा कल्याणी, संजय बजाज, सुभाषचंद्र गोएल आदी मान्यवर उद्योजकता या विषयावर समाजबांधवांना मार्गदर्शन करतील. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी २५ रोजी दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मार्गदर्शक अण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

असा आहे लोगोचा अर्थ

महाअधिवेशनाच्या लोगोचा अर्थ सांगणारी चित्रफित सभागृहापुढे प्रदर्शित करण्यात आली. मानवी देहात प्रविष्ट आणि सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्ती आणि षट्चक्रांच्या संकल्पनेवर हा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोस असलेल्या १६ पाकळ्या या समाजाचे कुलदैवत असणाऱ्या १६ कुलस्वामीनींचे प्रतिक असून यामध्ये संघटन, कुटुंबसंस्था, एकोपा, परस्पर सहकार्य, समृद्धी सद्गुणांचा अर्थ या रचनेतून अभिप्रेत असल्याचे सांगण्यात आले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेतील कार्यशाळेतून ‘घडला’ मूर्तिकार!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

आपल्या आयुष्यात येणारा कोणता क्षण आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जाईल, हे सांगता येत नाही. असेच काहीसे घडलेय नानेगावच्या सतीश बाळू रोकडे या अवघ्या १७ वर्षांच्या युवकाच्या बाबतीत. देवळालीतील नूतन विद्या मंदिरमध्ये शिक्षण घेत असताना २०१२ साली शाळेत पर्यावरणपूरक शाडूमाती गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत त्याने सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याला मूर्ती बनविण्याचा जो छंद लागला, तो आजतागायत त्याच्या कलात्मक जीवनाला वेगळे वळण देणारा ठरला आहे. यंदा त्याने स्वत: १८० पर्यावरणपूरक मूर्ती घडविल्या आहेत.

माणसातील कलेचा उगम हा त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीतून होतो, असे अनेकदा म्हटले जाते. आपले वडील बाळू व आई सुनीता शेतात कष्ट करीत असल्याची जाणीव असलेला सतीश शाळेत जेव्हा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायला शिकला व तो थेट वळाला तो मूर्ती बनविण्याच्या या कलेकडे. घरात कोणालाही या कलेचे ज्ञान नसल्याने शाळेतील शिक्षक संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या मूर्तिकलेचा विकास केला. २०१३ पासून सलग पाच वर्ष तो नियमित कला आत्मसात करण्यासाठी धडपडत होता. गतवर्षी नाशिकरोड येथील एका गणेशमूर्ती बनविण्याच्या कारखान्यात त्याने काही हाताने तर काही साच्याच्या माध्यमातून शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविल्या व त्यासोबत संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कलेतील बारकावे आत्मसात केले. यावर्षी त्याने तब्बल तब्बल १८० पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती साकारल्या आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या उत्पन्नामधून ५० हजार रुपयांची मदत केली. शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्यास प्रोत्साहन दिले. त्याने साकारलेल्या मूर्ती हातोहात विकल्या जातील, असा त्याला विश्वास आहे.

स्वतःच बनविला मूर्तीचा साचा

पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीपासून विविध गणेशमूर्तींचा साचा बनविण्यात त्याचे मार्गदर्शक संदीप गायकवाड यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून शाडूमातीच्या मूर्तींसाठी लागणारा साचा बनविण्यातही सहकार्य केले. पीओपीपासून साचासाठी लागणारे विविध प्रकारचे कप्पे निर्माण करून एक साचा तयार करण्यात आला. असे दहा प्रकारचे साचे त्याने तयार केले आहेत. त्यामुळे त्याने बनविलेल्या या मूर्ती अगदी आखीव-रेखीव आहेत.

सतीश आठ वर्षांपासून आमच्या शाळेत शिकत आहे. तो मेहनती व होतकरू असल्याने अल्पावधीतच त्याने कला आत्मसात केली. कोणतेही काम करण्याची इच्छा व जिद्द असेल तर ते पूर्ण होतेच, हे त्याने दाखवून दिले आहे.

- संदीप गायकवाड

गणेशमूर्ती कार्यशाळेत मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आज या कलेमुळे आपण मूर्ती बनविण्यात यशस्वी झालो आहोत. प्रत्येकाने शिकण्याचे स्वप्न बाळगल्यास काहीही अशक्य नाही.

- सतीश रोकडे, मूर्तिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images