Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आम्हीही बजावणार मतदानाचा हक्क!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिव्यांग बांधवांनी मतदार नोंदणीला आवर्जून हजेरी लावली. भाभानगर येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मतदार नोंदणी अभियानामध्ये शहरातील तब्बल ५०० दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला. यंदा आम्हीही मतदान करणारच, असा निश्चयच जणू दिव्यांगांनी केल्याचे दिसून आले.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिव्यांग बांधवांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. ६) दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी १० वाजता या नोंदणीला सुरुवात झाली. नाशिकचे प्रांताधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यावेळी उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी गायकवाड सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच एक टेबल लावण्यात आला होता. संबंधित बांधव कोणत्या परिसरात वास्तव्यास आहेत, याबाबत विचारणा करून तेथील कर्मचारी त्यांना संबंधित टेबलवर जाऊन नाव नोंदणी करावी याबाबत मार्गदर्शन करीत होते. येथे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार टेबल लावण्यात आले. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीमध्ये असलेल्या माहितीत दुरुस्तीकरीता दिव्यांग बांधवांनी अर्ज भरून दिले. ४२२ बांधवांनी अर्ज भरून ते आवश्यक त्या कागदपत्रांसह सादरही केल्याची माहिती नायब तहसीलदार आवारी यांनी दिली. तर ११० बांधव अर्ज घेऊन गेले आहेत. आठ दिवसांत हे अर्ज जमा होतील. त्यामुळे या शिबिराचा ५०० दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. दुपारी ३ वाजता या शिबिराची सांगता झाली.

संघटनांनी केले सहकार्य

हे शिबिर यशस्वी व्हावे यासाठी दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या संघटनांनीदेखील परिश्रम घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दिव्यांग बांधवांना रांगेत उभे करणे, त्यांचे अर्ज भरून देणे, कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही हे तपासणे यांसारख्या कामांमध्ये आम्ही मदत केल्याची माहिती प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्थेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी दिली. त्यासाठी प्रत्येक टेबलवर स्वयंसेवक नेमण्यात आले होते. त्यांनी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शक्य ती मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमित व्यावसायिक हटविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिकरोड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवाजी पुतळा ते देवीचौक या रस्त्यावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. अचानकपणे पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात दाखल झाल्याचे बघून व्यावसायिकांची त्रेधा उडाली. महिनाभरात याठिकाणी दुसऱ्यांदा मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमणे पुन्हा 'जैसे थे' होतात.

शुक्रवारी सायंकाळी शिवाजी पुतळा येथे पोस्टाच्या इमारतीभोवती असलेले अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले. यावेळी काही व्यावसायिकांनी या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध केल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पोलिसांनाही प्रथम विरोध करण्याचा काही व्यावसायिकांनी प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच व्यावसायिकांची फजिती उडाली. या रस्त्यावरील मीना बाजार पूर्णपणे उठविण्यात आला. ज्या व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वतःहून काढून घेतली नाहीत, त्यांचे दुकानातील साहित्य पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जप्त केले. या मोहिमेत अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी, विद्युत विभागाचे कर्मचारी, पोलिस पथक, तीन वाहनांसह एका जेसीबीचा सहभाग होता. काही व्यावसायिकांच्या दुकानांचे शेड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

व्यावसायिकांची धावपळ

शिवाजी पुतळा येथे सायंकाळी पोलिस फौजफाटा घेऊन पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोहचताच देवी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. काही व्यावसायिकांनी आरडाओरडा करीत साहित्याची आवरासावर करण्यास सुरुवात केली. काहींनी दुकानातील विक्रीचे साहित्य वाचविण्यासाठी थेट पुलाखाली नेऊन ठेवले. काहींनी तर आपले साहित्य पोस्ट कार्यालयाच्या भिंतीवरून आत फेकले. या धावपळीमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातून दागिने लंपास

$
0
0

देवळाली कॅम्प : लहवितच्या पंचशीलनगर येथे राहणाऱ्या धृपदा सुनील कांबळे यांच्या घरातून १ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.

कांबळे यांच्या घरी रक्षाबंधनिमित्त माहेरी आलेल्या कन्या योगिता हिने सोबत आणलेले दागिने बेडरुमधील लाकडी कपाटात ठेवले होते. बुधवारी (दि. ५) कपाट तपासले असता तिच्याकडील सोन्याची गंठण पोत आढळून आली नाही. यासोबत ठेवलेले ४५ हजार रुपयांचे दीड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, ७.५ ग्रामचे सोन्याचे लॉकेट, एक तोळ्याचे १० ग्रामचे सोन्याची मोरमाळ, एक तोळ्याचे कानातील झुमके, एक तोळ्याचे सोन्याचे पॅडल तर अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मणी असे दागिने चोरट्याने लाकडी कापत उघडून चोरून नेले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिकूलतेच्या कायापालटाची ताकद शिक्षणामध्ये

$
0
0

डिजिटल मॅन हर्षल विभांडिक यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केवळ शिक्षण हेच आपली कोणतीही परिस्थिती बदलवू शकते. प्रतिकूलतेच्या कितीही पायघड्या असल्या तरी त्याचा कायापालट शिक्षण करू शकते. इंजिनीअरिंगपर्यंत कोणताही पुरस्कार न मिळवलेला मी आज प्रमुख पाहुणा म्हणून येथपर्यंत येऊ शकलो याला केवळ शिक्षण कारण आहे, असे प्रतिपादन डिजिटल मॅन हर्षल विभांडिक यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या वतीने आयोजित ४९ व्या नागरिक शिक्षक गौरव सोहळ्यातील पुरस्कारमूर्ती शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी आयोजित सोहळ्यात विभांडिक बोलत होते. प. सा. नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास मंचावर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सावानाचे पदाधिकारी तसेच गौरव समितीचे माजी अध्यक्ष रमेश देशमुख, अध्यक्ष प्रा. यशवंतराव पाटील यांची उपस्थिती होती.

विभांडिक म्हणाले की, हा ४९ वा सत्कार आहे मी या सत्कारापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण धुळ्याला घेऊन २००६ मध्ये मी अमेरिकेत गेलो. १० वर्षे न्यूयार्कमध्ये होतो. या दहा वर्षांत सर्व सुखे होती; परंतु आपल्याला पुन्हा भारतात परतायचे आहे या हेतूने इकडे लक्ष ठेवून होतो. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुलांचे शिक्षणाचे प्रमाण अचानक घटत असल्याचा सर्व्हे युनायटेड नेशनने केला आणि मी भारतात येण्याचा निश्चय केला. अनेकांनी मला वेड्यात काढले. अमेरिकेत असताना मी येथील व्यवस्थेत शिरण्यासाठी काहीतरी जागा शोधत होतो. ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शाळा या तिघांच्या माध्यमातून मी व्यवस्थेत शिरू शकणार होतो. मी प्राथमिक शाळेची निवड केली. शाळा डिजिटल करण्याच्या ध्यासाने मला पछाडून टाकले. आज मागे वळून पाहताना काम खूप झालेले नसले तरी समाधानकारक असल्याचेही विभांडिक म्हणाले.

कार्यक्रमात डॉ. सिंगल यांच्या मातापित्यांसह त्यांची कन्या रविजा सिंगल हिचादेखील सत्कार करण्यात आला. परदेशात असणारे सर्व उपक्रम आपल्या नाशिक शहरात सुरू करण्याचा मानस असल्याचे डॉ. सिंगल यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रोईंग क्वाड्रापल शर्यतीत सुवर्णपदक मिळवून देणारे दत्तू भोकनळ, योगप्रसार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान विशेष पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वासराव मंडलिक यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात येणार आहे. प्रा. यशवंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यांचा झाला सत्कार

दीपाली रायते, प्रमिला आहेर, मोहिनी भगरे, सुनीता जाधव, पुष्पा चोपडे, विजय म्हस्के, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर महाजन, मीनाक्षी पानसरे, डॉ. अशोक बोराडे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. वसंत वाघ, चंद्रकांत भाग्यवंत, प्रा. संजय बागूल, शशिकांत मुजुमदार, विद्या फडके, रमेश जाधव, डॉ. जय बिरारी, उत्तमराव देवरे, वासुदेव शिंगणे, प्रा. हर्षवर्धन कडेपुरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सण आला रे माझ्या ‘सर्जा-राजा’चा

$
0
0

पोळ्याच्या खरेदीसाठी ग्रामीण बाजारात लगबग

संजय लोणारी, येवला

आला आला...आला रं पोळा आला

माझ्या सर्जा-राजासाठी साज घेऊ चला

बाशिंग, केशरी, छंबी गोंडे

घुंगरमाळ, म्होरकी, माथवटी, वेसन, कासरा सर्वच नवं नवं घेऊ या

शेतशिवारात सोबतीनं घाम गाळणाऱ्या सोबत्याचा मान राखूया...

अशी मनाशी पक्की खुणगाठ बांधत शेतकरी श्रावणात खरेदीसाठी घराबाहेर पडला की, समोर चित्र येते 'पोळा'आल्याचे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा असलेला यंदाचा पोळा सण उद्यावर येवून ठेपल्याने सध्या सर्वत्रच बळीराजाची अगदी मोठी लगबग दिसत आहे. 'सर्जा-राजा'करिता नवा साज खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. म्होरकी, माथवटी, वेसन, कासरा, घुंगरमाळ, छबी-गोंडे, केशरी, तोडे अन् डौलदार बाशिंग आदी साहित्याने बाजारात रंग भरले आहेत.

बदलत्या काळानुरूप ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत होत असतानाही शेतकरी अन् बैलजोडीचं नातं आजही कायम असल्याचे चित्र 'पोळा' सणाच्या निमित्ताने समोर येते. रविवारी साजरा होणाऱ्या पोळा सणासाठी ढवळया-पवळयाला, सर्जा-राजाला खऱ्या अर्थाने सजवून थोडेसे का होईना त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. असे असले तरी, शेतकरी सर्जा-राजाच्या साजशृंगारासाठी पुढे सरसावला आहे. येवला शहरात मंगळवारचा (दि.४) आठवडे बाजार शेतकऱ्यांनी गजबजला होता.

आकर्षक साजांनी बाजार खुलला

येवल्यातील आठवडे बाजारात बैलांसाठी आलेल्या विविधरंगी साज आला आहे. बाजारातील हे विविध साज अन् त्यांचे यंदाचे भाव बघता गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक साजाच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ६० रुपयांना मिळणारी मध्यम आकारातील लहान म्होरकीची जोडी यंदा ७० रुपये, मध्यम आकारातील म्होरकी जोडी ९० रुपयांवरून शंभरवर, वेसण ६० ते ८० वरून ७० ते १०० रुपयांवर गेली आहे. कोरडे रंगात यंदा ५ रुपयांनी वाढ होताना १० ते १५ रुपये तोळा आहेत. बैलजोडीचे शिंगासाठीचे छोटे गोंडे यंदा दहा रुपयांनी वाढून ४० रुपये, शिंगासाठी रंगाचा १०० ग्रॅमचा रंगाचा डबा ४० वरून ४५ रुपये झाला आहे.

'चवर' खातेय यंदा भाव

पोळ्याला बैलांसाठी गळ्यात बांधण्यात येणारं 'चवर' म्हणजे एक मानाचं पान. आपल्या बैलाला कुणाची दृष्ट लागू नये या भावनेपोटी शेतकरी पोळा सणात आपल्या बैलास हे चवर हमखास बांधतात. पळसाच्या झाडाच्या मुळापासून तयार होणारे हे चवर यंदाच्या पोळयात अधिकच भाव खात आहे. विशेषतः जंगलात व आदिवासी भागात बहरणाऱ्या या पळस वृक्षतोडीस शासनाने घातलेले निर्बंध, बरोबरच गेल्या काही वर्षातील अत्यल्प पाऊस यामुळे यंदा हे चवर महागले आहे. एक बर आकारातील हे चवर यंदा गतवर्षापेक्षा ५० रुपयांनी वाढ होताना शंभर रुपयांवर गेले आहे. येवला बाजारात मोजून काही ठिकाणी हे चवर दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिल्यादेवींची आज पुण्यतिथी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शनिवारी (दि. ८) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशिकरोड येथील दुर्गामाता मंदिराशेजारील अहिल्यादेवींच्या पुतळ्याजवळ सकाळी दहाला कार्यक्रम होणार आहे. नितीन धानापुणे, नवनाथ ढगे, प्रकाश लांडे, रामदास भांड, आप्पा माने, सुनील ओढेकर, रामदास रहाटळ, शशिकांत वाघ, विनायक काळदाते, किशोर वाघ, आण्णा रहाटळ, मयूर भगत, अविनाश वाघ आदी उपस्थित रहाणार आहेत. नागरिक आणि धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगाराच्या पैशांवरून चॉपरने तिघांवर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जुगारात जिंकलेले पैसे मागितल्याच्या रागातून झालेल्या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान रेल्वे मालधक्का परिसरातील जियाउद्दीन डेपो येथे घडली. या हल्ल्यात चॉपरचा वापर झाल्याने तिघेजण बालंबाल बचावले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने जुगार अड्डे सुरू असल्यानेच अशा प्रकारची घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या घटनेत फिर्यादी शहानवाज मुश्ताक सय्यद (वय ३५, रा. गोसावीवाडी) याच्यासह त्याचा मित्र आदिल सय्यद आणि वसीम सय्यद हे तिघेजण डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर हल्ला करणारा रिजवान खान जियाउद्दीन डेपो येथे अकबर सोडा या दुकानात मोबाइलवर खेळला जाणारा बिंगो नावाचा जुगार अड्डा चालवितो. या जुगार अड्ड्यावर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आदिल सय्यद याचा मित्र विशाल मानकर (रा. चंपानगरी, जेलरोड) हा २ लाख ७० हजार रुपये जिंकला होता. हे पैसे रिजवानकडून घेण्यासाठी विशालने त्याचा मित्र आदिल सय्यद यास सांगितले होते. हे पैसे घेण्यासाठी आदिल त्याचा मित्र फिर्यादी शाहनवाज सय्यद यांच्यासह रिजवानकडे गुरुवारी रात्री गेला असता या जुगार अड्ड्यावर रिजवानने व त्याचा मित्र नियामद खान यांनी पैसे देण्यास नकार देत चॉपरने आदिल व शहानवाजवर हल्ला केला. यावेळी

या हल्लेखोरांच्या तावडीतून आदिल व शहानवाज यांना सोडविण्यासाठी आलेल्या वसीम सय्यद यांच्यावरही घटनास्थळी उपस्थित असलेल्या इरफान उर्फ इप्या याने चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी मोठा जमाव जमा झाला होता. दगडफेकही झाली. या हल्ल्यात जखमी तिघांना स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकाराची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच पोलिसांनी जियाउद्दीन डेपो परिसरात येऊन जमाव शांत केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या हल्लेखोरांपैकी दोघांना ताब्यात घेतले. तिसऱ्या हल्लेखोराचा शोध पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातही मंडळांना ऑनलाइन परवाने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाभरातील गणेश मंडळांना परवान्यांसाठी पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारण्याची गरज राहिलेली नाही. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंडळांना प्रथमच ऑनलाइन पद्धतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांचा वेळ आणि पैसे वाचणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी मंडळामार्फत सुरू आहे. यात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांकडून तसेच संबंधीत विभागांकडून विविध परवाने मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची दमछाक होते आहे. यापूर्वी अशा परवान्यांसाठी वारंवार चकरा माराव्या लागत. त्यात बराच वेळही जातो. यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरबसल्या आपल्या मोबाइलवरून किंवा घरातील लॅपटॉप, संगणकावरून नोंदणी करून पदाधिकाऱ्यांना पोलिस परवाना मिळवता येणार आहे.

अशी आहे पद्धत

परवान्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर गणेश मंडळांची नोंदणी हे ऑप्शन दिसेल. त्यावर किंवा थेट सिटिझन पोर्टलवर जाऊन लॉग-इन आयडी व पासवर्ड तयार करावा. त्यानंतर मंडळाची माहिती विचारणारा फॉर्म समोर येईल. त्यात मंडळाच्या स्थापनेपासून विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनापर्यंतची माहिती भरायची आहे. महापालिका, महावितरण यांच्यासह इतर आवश्यक परवाने घेतले असल्यास ते लगेच अपलोड करायचे आहेत. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानुसार तो त्या-त्या भागातील पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना पहायला मिळेल. ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलिसांकडून लगेचच कार्यकर्त्यांच्या ई-मेलवर परवाना पाठवला जाणार आहे. त्यामुळे सदर परवाना यंदा पेपरलेस झाला आहे.

पोलिसांना खास प्रशिक्षण

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिटिझन पोर्टलचे प्रशिक्षण देण्यात आले आले आहे. नाशिक जिल्ह्यात गतवर्षी 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमात दोन हजार ९८५ मंडळांनी सहभाग नोंदवला होता. मंडळांनी आपले ऑनलाइन परवाने लवकरात लवकर काढून घ्यावेत, असे आवाहन अधीक्षक दराडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदलांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या काळानुसार शैक्षणिक क्षेत्रातील माहिती, तंत्रज्ञानाची माहिती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या बदलांची जाणीव त्यांच्यात रुजल्यास तो स्वीकारण्यास अधिक सहजता त्यांना प्राप्त होईल, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी केले.

डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे कै. ताराबाई साळी स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत साळी होते. देशासाठी विधायक कार्य करण्याची भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे, असेही सभापती म्हणाल्या. चारुदत्त दीक्षित व गायिका मृदुला पिंगळे यांनी 'ज्ञानदिव्याने ज्ञान वाढते' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. सावनी कुलकर्णी, मनीषा इनामदार, वंदना पवार, सुवर्णा पाटील, शोभा कोठावदे, वैशाली चौधरी आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका नीता पाटील, सोमनाथ पाटील, स्वाती काळे, मार्तंडराव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते, गल्ल्या अन् घरांनाही डिजिटल क्रमांक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील प्रत्येक नागरिकाला आधारकार्डमुळे एक स्वतंत्र यूआयडी क्रमाकांच्या माध्यमातून ओळख मिळाली असतानाच, त्याच धर्तीवर शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ल्या, घरे आणि महापालिकेच्या मिळकतींना स्वतंत्र डिजिटल क्रमांक मिळणार आहे. नगरसेविका वर्षा अनिल भालेराव यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली असून, तो अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणेच शहरातील घरांनाही आता आधारच्या धर्तीवर स्वतंत्र ओळख क्रमांक मिळणार आहे.

शहर सुधारणा समितीची सभा सभापती पूनम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीच्या सदस्या आणि नगरसेविका प्रा. वर्षा अनिल भालेराव यांनी बृहन्मुंबईच्या धर्तीवर शहरातील घरांना डिजिटल क्रमांक देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. ही योजना बृहन्मुंबई महापालिकेने अगोदरच अंमलात आणली आहे. पुणे महापालिकेनेदेखील यासंदर्भातील प्रस्तावाला काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्मार्ट नाशिकमधील घरांनादेखील डिजिटल क्रमांक देण्याची मागणी भालेराव यांनी सभेत केली. हा क्रमांक गुगल मॅपवर आपोआप लोकेट होणार असून, घराचा पत्ता सापडण्यास मदत होईल. त्यामुळे घरांचे पत्ते शोधण्यासाठी डिजिटल क्रमांक उपयुक्त ठरणार आहेत. या डिजिटल कोडमध्ये संबंधित घराचा पत्ता, फोटो, घरपट्टी भरल्याबाबतची माहिती, क्षेत्रफळ, एसटी कोड, शहराचा कोड, अशी इत्थंभूत माहिती असेल. करवसुलीत सुसूत्रता येईल, असा दावा भालेराव यांनी केला. त्यामुळे यावर चर्चा होऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचे सभापती सोनवणे यांनी जाहीर केले. उपसभापती अंबादास पगारे, रवींद्र धिवरे, सुमन भालेराव, पूनम मोगरे, राधा बेंडकुळे यांनीही या विषयाला अनुमोदन दिले. हा ठराव करून प्रशासनाला पाठविला जाणार असून, त्याची अंमलबजावणी करण्याचेही आदेश सभापतींनी दिले आहेत.

मिळकती होणार ऑनलाइन 'ट्रॅक'

एखाद्या मिळकतीमध्ये कोणताही बदल झाला तरी डिजिटल नंबर जुनाच राहणार आहे. त्यामुळे मिळकतीत होणारे सर्व बदल ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहेत. तसेच नवीन मिळकतींनाही ही प्रणाली लागू केल्यास सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन मिळकतीची माहिती प्राप्त होण्यात पारदर्शकता येईल. तसेच मिळकत कर वसुलीत त्याचा भविष्यात फायदा होईल. शासकीय यंत्रणांसाठीही त्याचा मोठा उपयोग होणार आहे.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना घरांनाही डिजिटल क्रमांक देणे आवश्यक आहे. या क्रमांकामुळे घर शोधताना येणाऱ्या अडचणी दूर होतील. थेट गुगल मॅपवर जाऊन घरांपर्यंत पोहचणे सोपे होईल.

- वर्षा भालेराव, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादन

$
0
0

ठाकरेंना अभिवादन

नाशिक : मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार कारंजा येथे शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, मामा ठाकरे, श्यामला दीक्षित, मंगला राठोड, अजय चौघुले, देवा जाधव आदी उपस्थित होते.

गणेश फोटोचे अनावरण

नाशिक : श्री नरहरीचा राजा सामाजिक संस्थेतर्फे संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त श्री नरहरी राजाच्या गणेशाच्या फोटोफ्रेमचे अनावरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विजयशेठ बिरारी यांच्या हा कार्यक्रम झाला. राजेंद्र घोडके, राकेश दुसाने, सुनील दुसाने, गोपाळराव खरोटे, रमेश वडनेरे, नीलेश बाफना आदी प्रमुख पाहुणे होते. उपाध्यक्ष राकेश दुसाने यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएट’समोरील पुलास मंजुरीनंतरही लाभेना मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सत्ता कुणाचाही असो, शहराची अर्थवाहिनी असलेल्या सातपूर एमआयडीसीच्या रस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष कायम असल्याची स्थिती आहे. सीएट कंपनीसमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील पुलास काही वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेली असूनदेखील मुहूर्तच लाभत नसल्याने कामगार व उद्योजकांची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सीएटसमोरील रस्ता रुंदीकरणाची मागणी कामगारांकडून केली जात आहे. त्याकडेही महापालिका लक्ष देत नसल्याने या अरुंद रस्त्यावरून जाताना कामगारवर्गाला रोजच कसकत करावी लागत आहे. स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. सातपूर एमआयडीसीत अनेक मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे कच्चा माल घेऊन येणाऱ्या व पक्का माल घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांची रोजच एमआयडीसीत वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी पावसाळ्याच्याच दिवसांत सीएटच्या अगदी बाजूला लागून असलेल्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग ढासळला होता. त्यावेळी मालट्रक पुलाच्या ढासळलेल्या ठिकाणी घसरून नाल्यात पडला होता. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी पुलाचे काम महापालिकेने तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली होती. त्यावेळी पुलाच्या कामाची पाहणी करून काम मंजूरही करण्यात आले होते. परंतु, हे काम अद्यापही झालेले नाही. वारंवार मागणी करूनही रस्ता रुंदीकरणाचे कामदेकील होत नसल्याच्या कामगारांच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथील पुलासह रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरत आहे.

वाढलेल्या वाहनांमुळे सीएटसमोरील रस्ता अरुंद झाला आहे. याच रस्त्यावरील छोटा पूल कमकुवत झाला असल्याने तो नव्याने करण्याची गरज आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देत पुलाची दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लावले पाहिजे.

-कांतिलाल जाधव, कामगार

(२ कॉलम, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीवरून जाणार पद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे मैदान मारूनही विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या तब्बल ३०४९ लोकप्रतिनिधींचे पदच धोक्यात आले आहे. अशा सदस्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याबाबतचे आदेश निर्गमित करावेत, हा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला असून, याविरोधातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही पदे रद्द होण्याची शक्यता असून लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहे.

ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, नगरपालिकांपर्यंतच्या निवडणुकांमध्ये दंड थोपटत अनेक उमेदवारांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. शह काटशहाच्या राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारीत विजयाची माळही गळ्यात पाडून घेतली. ग्रामपंचायतींपासून नगरपालिकांपर्यंत मागासवर्गीयांसाठी आरक्षित जागांवर मैदान मारणाऱ्या उमेदवारांना विहीत मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. परंतु, ही प्रमाणपत्रे सादर न केल्याचे किंवा ते सादर करण्यास विलंब केल्याचे प्रकार जिल्ह्यात अनेक लोकप्रतिनिधींकडून घडले आहेत. अशा सदस्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याबाबतचे आदेश उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने ९ डिसेंबर २०१६ रोजी दिले होते. या निर्णयास अनुसरून हे आदेश राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ काढले. परंतु, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. त्यास अंतरिम स्थगिती देण्यात आली. याबाबत दाखल विशेष अनुमती याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित आदेश दिले असून, या विशेष याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे १६ डिसेंबर २०१२ च्या पत्रान्वये ही पदे रद्द करावीत अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकूण १४ हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींपैकी तब्बल ३०४९ लोकप्रतिनिधींची पदे धोक्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांसह नगरपंचायत आणि नगर परिषदांमधील १७ नगरसेवकांचाही समावेश आहे. पंचायत समितीच्या दहा तर ग्रामपंचायतींच्या ३०१९ सदस्यांना या आदेशामुळे आपले पद गमवावे लागणार आहे. सटाणा, इगतपुरी, सुरगाणा येथील प्रत्येकी तीन, सिन्नर येथील दोन तर चांदवड, मनमाड, येवला, नांदगाव, पेठ, देवळा येथील प्रत्येकी एका नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. या लोकप्रतिनिधींची माहिती संकलीत करण्यात येत असून, ती सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था-अपात्र पदे

ग्रामपंचायत-३०१९

नगरपंचायती-१७

पंचायत समित्या -१०

जिल्हा परिषद-०३

जात वैधता प्रमाणपत्रे मुदतीत सादर न करणाऱ्यांची पदे रद्द करण्याबाबतचे निर्देश आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नगर पंचायती आणि नगर परिषदांमधील १७ नगरसेवकांची पदे अपात्र ठरविली जाऊ शकतात.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमोशनल मॅनेजमेंटवर११ सप्टेंबरला सेमिनार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (आयमा) 'इमोशनल मॅनेजमेंट, की टू सक्सेसफुल इंटरप्रिनरशिप' या विषयावर ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सेमिनार होणार आहे. अंबड एमआयडीसीच्या आयमा रिक्रिएशन हॉलमध्ये हा सेमिनार होईल. सेमिनारमध्ये इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग, इंटरपर्सनल स्किल्स, निगोशिएशन स्किल्स, पर्सनल इफेक्टिव्हनेस या विषयाबाबत बी. जी. तुषार मार्गदर्शन करतील. इच्छुकांनी महाराष्ट्र चेंबर किंवा आयमा येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाल, जनरल सेक्रेटरी ललित बूब, चेंबरच्या सदस्या दीपाली चांडक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात १८ जुगारी जेरबंद

$
0
0

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सक्रिय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तीन ठिकाणी छापे मारून १८ जुगारींची धरपकड केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने कारवाई होते आहे. संशयित आरोपींकडून रोख रक्‍कम व जुगाराचे साहित्य जप्‍त करण्यात आले आहे.

शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्र्यंबक रोडवरील वेदमंदिराजवळील गायीच्या गोठ्याशेजारी मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी (दि. ६) दुपारी चार वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात संशयित मधुकर गंगाराम जाधव (५४, रा. गंगापूर गाव), दादा नामदेव घोडेराव (६१, रा. शहा, ता. सिन्नर), नंदू नथू गुंबाडे (५५, रा. महात्मा फुले सरकारी वसाहत, शरणपूर रोड), धर्मा श्याम उज्जैनवाला (४६, रा. वरीलप्रमाणे), मिलिंद वसंत भडांगे (६०, भद्रकाली पोलिस स्टेशनमागे), अन्वर राजमहम्मद शेख (५९, रा. भद्रकाली) हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून नऊ हजार ६०० रुपये जप्‍त करण्यात आले. या प्रकरणी युनिट एकचे पोलिस शिपाई राहुल पालखेडे यांनी मुंबई नाका पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत.

पंचवटीत कारवाईचा धडाका

पंचवटी पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमहारास खैरे मळ्यातील चक्रधरनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा मारून तिघांना अटक केली. काशीनाथ तुकाराम निमसे (४५, रा. नांदूर, माडसांगवी), संतोष कारभारी खैरे (४२, रा. खैरे मळा, चक्रधरनगर) आणि कैलास धोंडीराम तांदळे (५३, रा. नीलगिरी बाग, पंचवटी) हे संशयित पोलिसांच्या हाती लागले. पोलिस शिपाई सचिन म्हसदे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस हवालदार व्ही. के. बस्ते करीत आहेत.

संशयितांना जामीन मंजूर

पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि. ५) रात्री पावणेबारा वाजता पंचवटीतील चिंचबनमध्ये असलेल्या गोदावरी कॉम्प्लेक्सच्या भिंतीलगत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक केली. संशयित सुखलाल कुमावत (२९, माने बाई शाळेमागे, मखमलाबाद), सागर रामभाऊ मुर्तडक (२७, रा. वडजाई मातानगर, मखमलाबाद रोड), मुकुंद ऊर्फ तुषार दत्तू गाडेकर (२४, रा. पोटिंदे चाळ, क्रांतीनगर), अक्षय राजेंद्र साळुंके (२२), सागर भागवत बडगुजर (२९, दोघे रा. वरीलप्रमाणे), प्रवीण सुखलाल कुमावत (३१, रा. पोटिंदे चाळ, क्रांतीनगर), योगेश रामसिंग बुधेला (४०, रा. चिंचबन, पंचवटी), निकेत दत्ता शिंदे (२२, रा. साई अपार्टमेंट, रामवाडी), निशांत सतीश दोंदे (२०, रा. मु. पो. दरी-मातोरी) हे संशयित जुगार खेळताना आढळून आले. संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. संशयितांची जामिनावर सुटका झाली असून, पोलिस शिपाई विलास चारोस्कर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार ए. बी. गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस व्हॅनच्या धडकेत दोन ठार

$
0
0

चार पोलिसांसह एक कैदी जखमी; जळगावा अपघात

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव उपकारागृहातील कैदांना भुसावळ कोर्टात घेवून गेलेली पोलिस व्हॅनने जळगावात परतत असतांना शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजता महामागार्वरील टीव्ही टॉवरजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत व्हॅन उलटली. या अपघातात दुचाकीवरील तरुण व तरुणी दोघांचा मृत्यू झाला. एक कैद्यासह चार पोलिस जखमी झाले आहेत. उमेश संजय वारुळे (वय २२, रा. चंदनवाडी, शनीपेठ) व जयमाला प्रभाकर गायकवाड (वय २६, रा. हिवरखेडा, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.

जळगाव उपकारागृहात असलेल्या सात कैद्यांना मुख्यालयातील पोलिस पथक शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता भुसावळ कोर्टात कामकाजासाठी घेवून केले होते. व्हॅनमध्ये (एमएच १९ एम ०७१३) सात पोलिस कर्मचारी व सात कैदी असे १४ जण बसलेले होते. कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजता पुन्हा कारागृहात येण्यासाठी निघाले. जळगाव शहराजवळच असलेल्या महामागार्वरील टीव्ही टॉवरजवळ समोरून येणाऱ्या उमेश संजय वारुळे याच्या दुचाकीस (एएमच १९ सीसी ८८३३) व्हॅनचालकाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वारचा उजवा पाय जबर मार लागून तो जागेवरच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेली जयमाला गायकवाड ही गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर व्हॅनचालकाचा ताबा सुटल्यामुळे व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात व्हॅनमधील चालक तायडे यांच्यासह तीन पोलिस व एक कैदी जखमी झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

जखमी पोलिस व कैदी

या अपघातात पोलिस व्हॅनचे चालक अनिल तायडे, प्रकाश विश्राम काळे (वय ५६, रा. पिंप्राळा), गयासोद्दीन कमरुद्दीन शेख (वय ५७, रा. पोलिस वसाहत), दिलीप प्रकाश केंद्रे (वय २९, रा. पोलिस वसाहत) हे चार पोलिस कर्मचारी व भागवत दामू सूर्यवंशी (वय ५४, रा.साकळी, ता. यावल) हा कैदी असे पाच जण जखमी झाले. या शिवाय पोलिस व्हॅनमध्ये बसलेले गजानन दत्तू जाधव (वय २७), आकाश अरुण मोहने (२२) व आकाश रामचंद्र गोसावी हे तीन पोलिस कर्मचारी आणि सुरेश पंडीत बोदडे (वय ३४, रा.विवरा, ता. रावेर), शेख कलीम शेख सलीम (वय २७, रा.भुसावळ), चंद्रभान शामराव सोनवणे (वय ३०, रा.शेळगाव), सदाशिव पंढरी पवार (वय २१, रा.बोदवड), आनंद महादू वानखेडे (वय २३, चुंचाळे, ता.यावल) व शेख अशरफ शेख चांद कुरेशी (वय ३०, रा.बोदवड) हे सहा कैदी यांना व अन्य पोलिसांना मात्र दुखापत झाली नाही.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयमाला हिचा उजवा पाय मोडला होता. तसेच तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अंबूबॅगच्या मदतीने तिला कृत्रीम श्वासच्छोवास देण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. यानंतर नातेवाइकांनी तिला दोन खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तीचा प्रकृती अत्यंत खराब झाल्यामुळे अखेर तिचा मृत्यू झाला.

उशिरा पटली ओळख

घटनास्थळावरच मृत झालेला उमेश याची ओळख पटलेली नव्हती. दुचाकी क्रमांकावरून मालकाचे नाव शोधण्यात आले. मृत उमेश याने त्याचे काका गणेश शांताराम वारुळे यांची दुचाकी घेऊन मित्राकडे कार्यक्रमास जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर निघाला होता. उमेश महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तर त्याच्या दुचाकीमागे बसलेली तरुणी जयमाला ही बाहेती महाविद्यालयात कॉम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांची चमकोगिरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांसह आमदारांमध्ये सुरू असलेल्या नाट्यावरून विरोधकांनी आता भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून शहरावर कृत्रिम संकटे लादायची अन् स्वत:च पुढाकार घेऊन ती निस्तरण्याचा बनाव रचायचा भाजपचा डाव असून, नाशिककरांच्या भावनांशी खेळ करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. सिडको अतिक्रमण, अवाजवी करवाढ, धार्मिक स्थळांचा आणि गणेश मंडळांचा वाद, अंगणवाडी बंद आणि कालिदास कलामंदिर भाडेवाढीचा वाद प्रशासनाने निर्माण करायचे आणि आमदारांनी मध्यस्थी करून ते मिटवण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. आमदारच महापालिका चालवणार असतील, तर महापौरांसह पदाधिकारी आणि नगरसेवकांचे राजीनामे घ्या, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

महापालिकेतील सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बोरस्ते, खैरे, शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपच्या कारभारावर टीका केली. गेल्या सहा महिन्यांपासून भाजपकडून नागरिकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अस्वस्थ करण्यासाठी नियम दाखवून नोटिसा द्यायच्या आणि आमदारांनी त्यात मध्यस्थी करून प्रकरणे मिटवण्याचा नवा उद्योग भाजपच्या आमदारांनी सुरू केल्याचा आरोप केला. सिडकोतील घरांना नोटिसा दिल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळवली. घरपट्टी प्रकरणातही हाच कित्ता गिरवला जाऊन मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना शिष्टाईचे प्रमाणपत्र देण्यात आले. धार्मिक स्थळे आणि गणेश मंडळांबाबत असलेल्या नियमांबाबतही आमदार देवयानी फरांदे यांनीच पुढाकार घेत सर्व अटी मागे घेण्यास भाग पाडले. प्रशासनाने अंगणवाडी बंद करायची अन् सेविकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना अटक केल्यावर त्यांना सोडवण्यासाठी भाजपच्याच आमदारांनी पुढाकार घ्यायचा, असे सांगत ही सगळी नौटंकी सुरू असल्याचा आरोप बोरस्तेंनी केला. कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून अंसतोष निर्माण झाला असताना आमदारांनीच मध्यस्थी करायची असे सांगत, सत्ता भाजपची असतानाच मग वाद आणि प्रश्न निर्माण करायचेच कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही सगळे चमकोगिरी आणि बनवेगिरी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आता नाशिककर भाजपच्या या राजकीय षडयंत्राला भुलणार नाहीत. भाजपने नाशिककरांच्या भावनांचा अंत बघू नये, असा इशारादेखील बोरस्ते यांनी दिला. या वेळी काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे आणि मनसे गटनेते सलीम शेख उपस्थित होते.

यांच्याकडेही लक्ष द्या

भाजपकडून विकासकामे होत नसल्याने किरकोळ विषय मोठे करून त्यांच्या मिटवामिटवीतच धन्यता मानत असल्याचे सांगत, एकलहरे विद्युत प्रकल्प, वन विभाग कार्यालय आणि हवाई प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर अशा विषयांकडे मात्र भाजपच्या आमदारांकडून डोळेझाक केली जात आहे. शहराचे पाणी आरक्षण कमी होत असताना, आमदार इथे बोलायला तयार नाहीत; परंतु केवळ पालिकेतल्या विषयांवरूनच राजकारण करून नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

मनपा बरखास्त करा

प्रशासनाकडून प्रश्न चिघळवायचा आणि ते सोडवण्यासाठी आमदारांनी धाव घेण्याचा नित्यक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे जनतेचे प्रश्न सोडविताना आमदारांकडून महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि नगरसेवकांनाही पद्धतशीरपणे दूर ठेवले जाते. त्यामुळे आमदारांना पक्षाने पदाधिकाऱ्यांऐवजी पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे काय, असा सवाल उपस्थित करीत, आमदारच महापालिका चालविणार असतील, तर महापौरांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन पालिकाच बरखास्त करा, असे आव्हान भाजपला दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्याकडून पोलिसांना कोर्ट आवारात मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड न्यायालयाच्या आवारात आईला भेटण्यास प्रतिबंध केल्याने संतापलेल्या कैद्याने नाशिक मुख्यालयाच्या पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली. सचिन कन्हैय्यालाल चावरे असे या कैद्याचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्याखाली तो मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

पोलिस आणि कारागृहाच्या सूत्रांनी सांगितले की, चावरेला सुनावणीसाठी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास नाशिकरोड न्यायालयात नाशिक मुख्यालयाच्या कैदी पार्टी पोलिसांनी आणले होते. किरकोळ वादातून त्याने दोन पोलिसांना धक्काबुक्की करीत मारहाण केली तसेच एका महिला पोलिसाला शिवीगाळ केली. सचिनने काही दिवसांपूर्वी कारागृहात वादातून एक कैद्याच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केले होते. त्याच गुन्ह्याची सुनावणीसाठी कैदी पार्टीच्या पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले होते. यावेळी चावरेची आई त्याला भेटण्यासाठी आली होती. पालिसांनी त्याच्या आईला भेटण्यास मज्जाव केला. त्याचा राग आल्याने चावरेने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहाय्यक निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. मध्यस्तीसाठी आलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर व त्यांचे सहकारी तसेच न्यायालयात बंदोबस्तावरील पोलिसांनी चावरेला पकडून पोलिस वाहनात नेले. सुनावनी झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. चावरे हा मानसिक तणावाखाली असल्याचे कारागृह पोलिसांचे म्हणणे असून त्याने यापूर्वी कारागृहात कैदी व कारागृह कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती, असेही समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूकबधीर युवतीस इमारतीवरून ढकलले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील हाडोळा परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय मूकबधीर युवतीशी झालेल्या वादातून दोघा मूकबधिर तरुणांनी तिला तीनमजली इमारतीवरून ढकलून दिले. २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. संशयित विजय पवार व रोहित जाधव या दोघांविरुद्ध मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि ३२५, ३४ प्रमाणे देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हाडोळा परिसरात राहणाऱ्या एका मूकबधीर मुलीला दोघा संशयितांनी २२ ऑगस्ट रोजी तीन मजली इमारतीवरून ढकलून दिले होते. तेव्हापासून ती बेशुद्ध असल्याने काही समजू शकले नाही. शुद्धीवर आल्यानंतर तिने इशाऱ्यांनी सांगितले की, पंचवटी परिसरात राहणाऱ्या विजय पवार व देवळालीत राहणाऱ्या रोहित जाधव या दोन्ही मूकबधिर तरुणांनी तिच्याशी इशाऱ्यांद्वारे बोलत असताना कुरापत काढून भांडण केले. त्यातील संशयित विजय याला तिचा राग आल्याने त्याने तिला उंचावरून ढकलून दिले. या घटनेची माहिती एका रिक्षाचालकाने तिच्या आईला दिल्यानंतर त्यांनी आधी कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल आणि नंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलिशान कारमधून अडीच लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅनडा कॉर्नरजवळ पार्क केलेल्या बीएमडब्ल्यू कंपनीच्या आलिशान कारमधून चोरट्यांनी दोन लाख ६० हजारांच्या रकमेसह लॅपटॉप हातोहात चोरी करून नेला. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी हरिश ऊर्फ रामू प्रेमचंद जैन (बाफना हॉस्पिटलजवळ, साक्रीरोड, धुळे) यांनी तक्रार दिली आहे. बुधवारी (दि. ५) रात्री ८ वाजता ते आपल्या कारने (एमएच १६ एवाय ८२८८) शहरातील कॅनडा कॉर्नर येथे आले होते. त्यांनी कॅनडा कॉर्नर येथील मोबाइलच्या दुकानाजवळ कार पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी कारमधून दोन लाख ६० हजार रुपयांची रक्कम व २० हजार रुपयांचा लॅपटॉप असा दोन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. काही वेळाने ही घटना हरिश जैन यांच्या लक्षात आली. पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या आजूबाजूच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक टी. एम. राठोड पुढील तपास करीत आहेत.

तिघांकडून तरुणास मारहाण

पंचवटीतील अमरधामसमोरून पायी जाणाऱ्या एका तरुणाला तिघा अज्ञात व्यक्तींनी विनाकारण फायटरने मारहाण केली. यात त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी तिघांविरुद्ध पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्योधन रामचंदर कोंगे (३०, रा. गीताईनगर, टाकळी) हा तरुण गुरूवारी (दि.६) दुपारी सव्वाबारा वाजता पंचवटीतील अमरधामच्या समोरून पायी जात होता. याच वेळी ३५ ते ४० व २० ते २५ वयोगटातील तिघे संशयित आले. त्यांनी काहीही कारण नसताना दुर्योधनला अडवून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांच्यापैकी एकाने आपल्याकडील फायटरसारख्या वस्तूने कोंगे याच्या नाक, कपाळ व तोंडावर मारहाण केली. यात कोंगेच्या नाकाचे हाड फ्रॅक्‍चर केले. या घटनेत कोंगेच्या खिशातील दहा हजार रुपये गहाळ झाले. या प्रकरणी कोंगेची बहीण लता दिनकर पवार (रा. कोणार्कनगर, आडगाव) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. एम. सरोदे करीत आहेत.

साड्या, ब्लँकेट घरातून लंपास

उपनगर येथील गंधर्वनगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील साड्या व ब्लँकेट चोरून नेले. या प्रकरणी जयप्रकाश भगवंत गवांदे (७१, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवांदे यांचे उपनगर परिसरातील गंधर्वनगरीत बजरंगबली मंदिराजवळील ममता रेसिडेन्सीत घर आहे. गवांदे व त्यांची पत्नी हे मुंबईला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करीत नऊशे रुपयांच्या दोन पैठणी स्टाईलच्या साड्यांसह अन्य तीन साड्या, दीड हजार रुपयांचे वूलनचे पाच ब्लँकेट व पाचशे रुपयांचा चष्मा असा दोन हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

चोरी प्रकरणी कामगारांना अटक

सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या तिघा कामगारांनी १७ किलो तांब्याच्या टिकल्या चोरून नेल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी अटक केली. गंगाधर बाळू घोटेकर (२३, रा. मु. पो. चांदोरी, ता. नांदगाव), प्रदीप शंकर सोनुने (३१, रा. खंडावा, ता. पुसद, जि. यवतमाळ) व योगेश भुरा भवर (१९, रा. बोडके चाळ, सायखेडा, ता. निफाड, हल्‍ली सर्व रा. शिवाजीनगर, सातपूर) या तिघा संशयितांची नावे आहेत. सातपूर एमआयडीसीतील सचिन इंडस्ट्रीज येथील ज्ञानेश्‍वर रुंजाजी उगले यांनी फिर्याद दिली आहे. कंपनीत काम करीत असताना तिघा संशयितांनी बुधवारी (दि. ५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाच हजार ९५० रुपयांच्या १७ किलो वजनाच्या तांब्याच्या लहानमोठ्या गोलाकार टिकल्या चोरून नेल्या. हा प्रकार उघड झाल्यानंतर सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत अटक केली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

लेखानगरजवळ

नऊ झाडांची कत्तल

सिडकोतील लेखानगरमध्ये असलेल्या मिलिटरी कर्मचारी वसाहतीत चोरट्यांनी नऊ झाडांची कत्तल १३ झाडांचा विस्तार कमी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी प्रकाश चौकुटे (पंचवटी, हिरावाडी) यांनी फिर्याद दिली आहे. लेखानगरच्या मिलिटरी कर्मचारी वसाहतीत दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी तीन आंबा, प्रत्येकी उंबर, सुबाभूळ, पिंपळ, प्रत्येकी एक बोर, अशोका, रामफळ अशा १३ झाडांचा काही प्रमाणात विस्तार कमी करण्यात आला. तर, पाच सुबाभूळ, दोन उंबर व प्रत्येकी एक विलायती चिंच, नीलगिरी अशा एकूण नऊ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गारले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>