Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वंचितांच्या मुलांसाठी झटणारा शिक्षक

$
0
0

शिक्षकदिन विशेष

Tweet : @ashwinikawaleMT

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, नशेच्या आहारी गेलेले पालक, मजुरी करून घराला आर्थिक हातभार लावण्याची चिमुकल्यांवर आलेली वेळ... अशा दाहक परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबांतील मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी झटणारे शिक्षक म्हणजे सुरेश धारराव. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये ते शिक्षक आहेत. धारराव यांनी स्वत:च्या अपंगत्वावर मात करीत समाजविकासाचा आदर्श आपल्या कार्यातून सिद्ध केला आहे.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी गळती, अनुपस्थितीचे प्रमाण आजही मोठे आहे. पालकांमध्ये शिक्षणाविषयी असलेले मागासलेपण ही मोठी समस्या यामागे आहे. यामुळेच आजही हजारो बालके शिक्षणाच्या प्रवाहात येण्यापासून वंचित आहेत. हे चित्र पाहून सोडून देण्यापुरते न ठेवता ते बदलण्याचा ध्यास धारराव यांनी घेतला. जन्मतःच पोलिओबाधित असल्याने त्यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. मात्र, देशाचे भविष्य सुशिक्षित असावे, या हेतूने त्यांनी स्वतःची दुःखे बाजूला सारून वंचित घटकांतील मुला-मुलींना शिकवण्यासाठी काम सुरू केले. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कष्टकरी, मजूर, व्यसनाधीनता यांत गुरफटलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे कार्य ते करीत आहेत. कधीही शिक्षणाच्या वाटेला न गेलेल्या पालकांसमोरून त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन जाणेच मोठे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलत त्यांनी शेकडो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

धारराव यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी शिक्षकदिनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एक मित्र एक विद्यार्थी

'एक मित्र एक विद्यार्थी' दत्तक योजना सुरू करून धारराव यांनी त्यांच्या मित्रांना गरजू मुलांना दत्तक घेण्याविषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शाळांमधील गरीब मुलांना मदतीचा आधार मिळाला. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतही मिळवून दिली. शाळेत बचत बँक स्थापन केली. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाभदायक ठरत आहेत.

जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेच ध्येय अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी त्यांच्या पालकांचाही विश्वास जिंकावा लागतो. शाळा भरण्यापूर्वी त्यांच्या वस्तीतून मुलांना शाळेत आणून त्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. शाळेचे झांज पथक तयार करून त्यातून येणारी रक्कम विद्यार्थीहितासाठी वापरतो. असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी करीत आहे.

- सुरेश धारराव, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींचा पुण्यात उद्या महामोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुणे येथील आदिवासी विकास संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या विविध संघटनांतर्फे गुरुवारी (दि. ६) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चात घटनेचा निषेध नोंदविला जाणार असून, यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे. धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा संस्थेने सर्वेक्षण केलेला अहवाल सरकारला ३१ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला आहे. हा अहवाल जाहीर करण्याासाठी पिचड यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटमही दिला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेले पिचड यांनी मंगळवारी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन महामोर्चाची घोषणा केली. पिचड यांनी सांगितले, की धनगर समाजाने आदिवासी समाजात आरक्षणाचा दावा केल्यानंतर, सरकारने धनगर आदिवासी आहेत की नाही, याचे संशोधन करण्यासाठी केंद्रपुरस्कृत आदिवासी संशोधन संस्था राज्यासह देशात असतानादेखील टाटा या खासगी संस्थेला संशोधनाचे काम दिले. टाटाने चार वर्षांत सर्वेक्षण करून ३१ ऑगस्ट २०१८ रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. सरकारने या अहवालाचा अभ्यास करण्यापूर्वी टाटाने सादर केलेल्या अहवालात नेमके काय आहे ते सर्वांसमोर आणावे. याकरिता तातडीने हा अहवाल सादर करण्याची मागणी पिचड यांनी केली. हा अहवाल सरकार दडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; मात्र त्यांना आमच्या आदिवासींत घुसवू नका, असेही पिचड यांनी स्पष्ट केले. हा अहवाल मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या राज्याच्या जनजाती सल्लागार समितीपुढे ठेवण्यात येऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांनी सरकारला सादर केलेला आदिवासी विकास योजनेतील भ्रष्टाचाराचा अहवाल धूळ खात पडून आहे, त्याप्रमाणे धनगर समाज सर्वेक्षण अहवाल धूळ खात पडू नये. हा अहवाल प्रसिद्ध करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पिचड यांनी या वेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंत शिक्षकांना आज पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता प. सा. सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतींद्र पगार असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम विभागाच्या सभापती मनीषा पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, गटनेते धनराज महाले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, उदय जाधव, यशवंत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या वेतनाची डेडलाइन चुकली

$
0
0

माध्यमिक विभागाचा यंदाचा शिक्षक 'दीन'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांमध्ये रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे वेतनाची डेडलाइन चुकली आहे. परिणामी शिक्षकांना पगाराविनाच शिक्षक दिन साजरा करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे.

शिक्षक दिन बुधवारी साजरा होत असताना ऑगस्ट महिन्याचे वेतन मंगळवारपर्यंत (दि. ४) जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या खात्यावर जमा झालेले नाही. परिणामी यंदाचा शिक्षक दिन वेतनाशिवाय साजरा करण्याची दुर्दैवी वेळ शिक्षकांवर आली आहे. शालार्थ प्रणाली बंद झालेली असल्याने शिक्षकांचे वेतन पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. येत्या मार्च महिन्यापर्यंत शालार्थ प्रणाली बंद राहणार आहे. गेल्या चौदा महिन्यांची महागाई भत्त्याची देयकेही माध्यमिक शिक्षकांना अदा करण्यात आलेली नाही. शेजारील नगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन शिक्षक दिनापूर्वीच बँकखात्यावर जमा झाले. नाशिक जिल्ह्यात मात्र हजारो शिक्षकांना शिक्षक दिनीच वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. वास्तविक बघता शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेलाच करणयचे शासनाचे आदेश आहेत. असे असतांना नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन मात्र अनियमित होत असल्याने शिक्षकवर्गातून प्रचंड नाराजी पसरली आहे.

अधिकाऱ्यांमध्ये मानापमान नाट्य

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे पगार रखडण्यास वेतन पथकाचे अधीक्षक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी या दोघा अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला मानापमानाचा खोखो असल्याची चर्चा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांत सुरू आहे. वेतन पथकाचे अधीक्षकांनी शिक्षकांच्या वेतनाची बिले माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी स्वतः सादर न केल्यावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्याचे समजते. त्यामुळे गेल्या १४ महिन्यांच्या महागाई भत्त्याची पुरवणी बिले आणि ऑगस्टची वेतन देयके वेळे सादर करूनही शिक्षकांचे वेतन रखडले आहे. शालार्थ प्रणाली बंद झाल्याने ऑफलाइन वेतन देयके स्वीकारणे नक्की असतांनाही वेतन पथकाने वेतन देयके स्वीकारण्यासाठी शासनाच्या आदेशांची प्रतीक्षा केली. वेतन पथकाच्या अधीक्षकांच्या आणि शिक्षण विभागाच्या एकूण कामकाजाचा फटका जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज स्मारकात गुंजल्या ‘अटल कविता’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उर्दूमिश्रीत हिंदीतील कविता, प्रत्येक रचना हटके, प्रत्येक रचनेतून दिलेला सामाजिक संदेश, कवितेतील श्रीमंती हे सर्वच गुण असलेल्या अटल कवितांचा स्वर कुसुमाग्रज स्मारकात गुंजला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता अभिवाचनाचा कार्यक्रम झाला.

आओ फिरसे दिया जलाए, हरी हरी दुबपर, पहचान, गीत नहीं गाता हूँ, गीत नया गाता हूँ, उँचाई, कौरव कौन पांडव कौन, उठो द्रौपदी, मौत से ठन गई, राह कौनसी जाऊ में, सपना टुट गया, मोडपर, मनाली मत जईयो, मै सोचने लगता हूँ, आओ मनकी गांठ खोले, अपने ही मनसे कुछ बोले, यक्षप्रश्न, स्वतंत्रता की पुकार, उनकी याद करे, सत्ता, अंतर्द्वंद्व, हम जंग न होने देंगे, कदम मिलाकर चलना है या कविता यावेळी सादर करण्यात आल्या.

कार्यक्रमात केवळ कविता सादर करण्यावरच भर न देता अटलजींविषयी काही विचार यावेळी सांगण्यात आले. त्यांना कवितेचा वारसा आपले वडील कृष्णबिहारी वाजपेयी यांच्याकडून मिळाला. अटलजींनी 'ताजमहल' ही कविता प्रथम त्यांच्या शाळेच्या मासिकासाठी लिहिली. त्यानंतर त्यांना कवी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी एकूण ११ पुस्तके लिहिली. ती वेगवेगळ्या विषयावरील आहेत. अटलजींनी राजकारणदेखील काव्यमय करून टाकले असल्याचे यावेळी निवेदनातून सांगण्यात आले.

कार्यक्रमाची संकल्पना किशोर पाठक यांची होती, कल्पेश कुलकर्णी यांचे संगीत असलेल्या या कार्यक्रमात सदानंद जोशी, किशोर पाठक, पल्लवी पटवर्धन व अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्कॉनमध्ये ‘नंदोत्सव’ उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे मंगळवारी नंदोत्सव झाला. या वेळी उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्यांना मथुरेतून गोकुळात नेण्यात आले. तेथे नंद महाराजांनी उत्सव साजरा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी इस्कॉन मंदिरात नंदोत्सव साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिवसदेखील या वेळी साजरा करण्यात येतो. श्रीमान शिक्षाष्टकम् प्रभूंचे सायंकाळी प्रवचन झाले. यात त्यांनी श्रील प्रभुपदांचे जीवनचरित्र रेखाटले व इस्कॉनच्या स्थापनेत त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची माहिती भाविकांना देण्यात आली. आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अमेरिकेत जाऊन इस्कॉनची स्थापना केली. त्याचा प्रसार संपूर्ण जगात झाला असून, अनेक लोक भक्तिमार्गाला लागले आहेत. प्रवचनानंतर श्रील प्रभुपदांची आरती करण्यात आली व पुष्पांजली अर्पण केली. नंदोत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता मंगल आरतीने झाली. त्यानंतर हरेकृष्णा महामंत्राचा जप करण्यात आला. भजनानंतर महाप्रसादवाटप करण्यात आले. या वेळी दोन हजारांवर भाविक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी शेटे

$
0
0

नाशिक : नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन शेटे यांची एकमताने निवड करण्यात आली. याबाबतची बैठक नुकतीच झाली. उपाध्यक्षपदी रौफ शेख, सरचिटणीस राहुल दुशिंग, खजिनदार भरत काळे अशी या वर्षाची कार्यकारिणी असेल. राजेंद्र नडगे, वासुदेव सोनार, जयवंत माळी, नितीन पाटील, भास्कर निंबाळकर, विजय पवार, बाळा आष्टेकर, शशिकांत कुलकर्णी, अनिल निंबाळकर, पांडुरंग जाधव, दत्ता काळे, विलास जेजुरे, गणेश मेहुतर, गणेश डासे, खंडू लंगरे आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांचा सत्कार

नाशिक : आयर्नमॅन या खडतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेते ठरलेले पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांचा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी सत्कार केला. या वेळी रावसाहेब पोटे, चंद्रकांत बनकर, सुरेश भामरे, रमेश चौधरी, मंडालेश्वर काळे, गजमल पाटील, रामराव देशमुख आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्तांचा या वेळी गौरव करण्यात आला. उपायुक्त विजय मगर, माधवी कांगणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीतील हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुकानासमोर रिक्षा पार्क करण्याच्या किरकोळ कारणावरून एकाची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने चौघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना २१ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हेलबवाडी मशिदीजवळ घडली होती.

अंजुम कुतुबुद्दीन मकराणी (४७), अर्शद कुतुबुद्दीन मकराणी (४४), मकदुमरजा उर्फ दानीश अंजुम मकराणी (२३) आणि अमजद कुतुबुद्दीन मकराणी (४५) अशी कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. रेशन दुकानासमोर रिक्षा लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून वरील आरोपींनी रियाझ गुलाब शेख याच्यावर चाकू व चॉपरने हल्ला केला होता. आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी शेखवर हल्ला करण्यात आला होता.गंभीर जखमी झालेल्या शेखवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. एस. घोडके यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी बाजू मांडली. मिसर यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यात चार प्रत्यक्षदर्शीं आणि पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांनुसार कोर्टाने चौघांना जन्मठेपेची तसेच दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम मयताच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अक्षरब्रह्म’तर्फे गणेशमूर्ती कार्यशाळा

$
0
0

नाशिक : अक्षरब्रह्म सार्वजनिक वाचनालय आणि एचएईडब्लूआरसीतर्फे शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा नुकतीच झाली. जत्रा हॉटेल परिसरातील अक्षरब्रह्म सार्वजनिक वाचनालयात ही कार्यशाळा झाली. ज्योती पाटील यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मीकांत खैरनार, कमलाकर साळवे, जितेंद्र वाळुंज, देवीदास शिंदे, योगेश बागूल, मनोहर ठाकूर, गोपाल भगत, अनुप खैरनार, भारत मधाळे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांचे वाजतगाजत कौतुक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फ्रान्समधील विंची शहरात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फुल ट्रायथलॉन या खडतर स्पर्धेत यश संपादन करून आयर्नमॅन हा मानाचा किताब पटकविणाऱ्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचा मंगळवारी (दि. ४) नागरी सत्कार करण्यात आला. गुलालवाडी ढोल पथक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संध्याकाळी सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगत गेला.

आयुक्तालय ते पोलिस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १७ दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्य कार्यक्रमाचे आयोजन बॅरेक क्रमांक १७ मध्येच करण्यात आले होते. यावेळी सर्व पोलिस अधिकारी, शालेय विद्यार्थी, पोलिस कुटुंबीय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २६ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय फुल ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल व मुलगी रविजा सिंगल यांनी सहभाग नोंदविला होता. ३.८६ किमी पोहणे, १८०.२५ किमी सायकलिंग, ४२.१९५ किमी रनिंग अशी खडतर स्पर्धा आयुक्त सिंगल यांनी १६ तासांच्या आत पार पाडून यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय विजयपर्वानिमित्त मंगळवारी भव्य अभिमान संध्या हा कृतज्ञता सोहळा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नामांकित गुलालवाडी ढोल व लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सत्कार सोहळ्याबरोबरच विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालातीत ६५ हजार खटले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ८ सप्टेंबर रोजी महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६५ हजारांहून अधिक खटले सादर होणार असून, त्यापैकी विक्रमी खटल्यांचा निपटारा होण्याची शक्यता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली. दावापूर्व आणि प्रलंबित खटल्यांतील दोघापैकी एका पार्टीने आताही संपर्क साधल्यास त्यांचा खटला सुनावणीसाठी घेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षापासून नाशिक जिल्हा कोर्टाने लोकअदालतीमध्ये लाखो खटले निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तीन महिन्यांनी होणाऱ्या लोकअदालतीत खटल्यांची संख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर खटले लोक अदालतीत येणे आणि त्यावर तडजोड होणे, ही बाब राज्यपातळीवरील विक्रम ठरत आहे. आता ८ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन होणार आहे. यात जिल्ह्यातील विविध कोर्टांमध्ये दाखल प्रकरणांपैकी चार हजार ८५८ प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. यातील दोन हजार ७९८ फौजदारी, ६३१ चेक बाऊन्सची प्रकरणे, ८० बँकांचे दावे, ३०० मोटार अपघात प्रकरणे, २५९ कौटुंबिक वाद, ५३० दिवाणी प्रकरणांचा यात समावेश आहे. यात चौदाशे प्रकरणे नाशिक जिल्हा कोर्टातील आहे. दाखलपूर्व प्रकरणे ६० हजारांच्या पुढे असून, यात नाशिक कोर्टातील ३० हजार प्रकरणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयवादात तापले हरणबारीचे पाणी

$
0
0

आमदार चव्हाण श्रेय लाटताय; दादा जाधव यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि भर पावसाळ्यातही टँकरची वाट पाहणाऱ्या बागलाण तालुक्यात हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्रमांक ८ साठी पाणी आरक्षित झाल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. या पाणी आरक्षणावरून बागलाण तालुक्याचे आजी-माजी आमदार लक्ष्य झाले असून, ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. वास्तविक जे काम केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर करून आणले आहे, त्याच कामाचे श्रेय हे दाम्पत्य घेत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी केला आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात जाधव म्हणतात, बागलाण तालुक्यासाठी महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी घेतलेले असताना विरोधक मात्र त्यांचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्रमांक ८ साठी पाणी आरक्षित झाल्याचे परिपत्रक ३० ऑगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध झाले होते. मात्र पाणी आरक्षणाचा निर्णय आपल्यामुळे झाला, असे माजी आमदार संजय चव्हाण आणि आमदार दीपिका चव्हाण यांच्याकडून भासविले जात आहे. वास्तविक पाणी आरक्षण झाल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी २७ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसमोर जाहीर केले होते. तशी कागदपत्रेही त्यांनी शेतकऱ्यांना दाखविली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह शेकडो शेतकरी धुळे येथे डॉ. भामरे यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यासाठी जमलेले असताना चव्हाण दाम्पत्य यांनी मंत्रालयात विधानमंडळ समितीची बैठक घेवून आम्हीच हे काम मार्गी लावल्याचे भासविले, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

विशेष म्हणजे जलसंपदा विभागाचे उपसचिव यांनी जे पत्र ३० ऑगस्ट रोजी दिले. तसेच या पत्रावर ५ मार्च २०१८ रोजी डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केल्याचे स्पष्ट म्हटलेले आहे, तेच पत्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी २७ ऑगस्ट रोजी दोनशे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वाचून दाखविले होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी जनतेची दिशाभूल केली असून, त्यांनी पाण्याचे राजकारण थांबवावे, असेही जाधव यांनी म्हंटले आहे.

आधी विरोध, नंतर श्रेय

वास्तविक आमदार दीपिका चव्हाण यांनी या पाणी आरक्षणाला आधी विरोध केला होता. ११ जून २०१८ रोजी चव्हाण यांनी हरणबारी उजव्या कालव्याला विरोध करून या कालव्याचे पाणी ढोलबारी बंधाऱ्यात टाकण्यासाठी जलसंधारणाच्या प्रधान सचिवांना पत्र दिले होते. तसेच १० जुलै रोजी देखील महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रधान सचिवांना हरणबारी उजव्या कालव्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडण्याचे लेखी पत्र दिले होते, अशी पोलखोलही जाधव यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी जीपचा चुराडा

$
0
0

चांदवडजवळ अपघातात दहा प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भरधाव वेगाने नाशिकहून मालेगावकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपला बुधवारी (दि. ५) सकाळी साडे दहा वाजता मुंबई-आग्रा मार्गावर सकाळी चांदवडजवळ आडगाव टप्पा येथे अपघात झाला. जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुढे जात असलेल्या आयशरवर आदळली. या अपघातात जीपमधील दहा प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन प्रवासी गंभीर असून, त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या अपघातप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवासी वाहतूक करणारी जीप (एमएच १६ बी ६९४५) बुधवारी सकाळी नाशिकहून भरधाव वेगाने मालेगावकडे प्रवासी घेऊन जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडनजीक आडगाव टप्पा येथे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे असलेल्या आयशर ट्रकवर ही जीप आदळली. या अपघातात जीपमधील दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे, असून गंभीरमध्ये चालकाचा समावेश आहे. किरकोळ जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यातील आठ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या अपघातात जीपचालक छोटू पाटील (वय ४५ रा. नाशिक) हा तसेच मंगेश जाधव (वय ३५ नाशिक) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नाशिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या आयशर ट्रकला काळी-पिवळी जीपने मागून धडक दिली तो ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. अपघातात भरधाव काळी-पिवळीचा चुराडा झाला आहे. या अपघातप्रकरणी जीप चालक छोटू पाटील याच्या विरोधात चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अपघातातील जखमींची नावे

जीपचालक छोटू पाटील (वय ४५ रा. नाशिक), मंगेश जाधव (वय ३५ नाशिक), गोविंद गव्हाळे (वय ३० रा. नाशिक), धनंजय गव्हाळे (वय ११, रा. नाशिक), संतोष खैरनार (वय ४२, रा. नाशिक), अनुसूया ढोबळे (वय ५५ रा. धोडांबे), विश्वास सोनवणे (वय ४२, रा. नाशिक), अनिता सोनवणे (४० रा. नाशिक), समीर देशपांडे (३० रा. नाशिक) व चेतन गायकवाड (वय ४० रा. नाशिक) आदी जखमी झाले आहेत.

अवैध वाहतूक सुसाट

नाशिक ते मालेगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुसाट सुरू आहे. चौपदीकरण झाल्यापासून नाशिक-मालेगाव अंतर कमीत कमी वेळात कापून जास्तीत जास्त फेऱ्या मारण्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक करणारे बेफाम वेगात वाहने चालवतात. विशेष म्हणजे या वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरलेले असतात. नाशिकमध्ये द्वारकाजवळ आणि मालेगावात मोसम पुलाजवळ ही वाहने थांबलेली असतात.

पोलिसांचे अभय

नाशिकमध्ये द्वारकाजवळ आणि मालेगावात मोसमपुलाजवळ पोलिसांची मोठी फौज असतानाही ही वाहने प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरतात. मात्र वाहतूक पोलिस या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई करीत नाही. विशेष म्हणजे यांची वाहने रस्त्यात लागलेली असल्यामुळे अनेकदा दुचाकी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागते.

प्रवासी कधी बोलणार?

बसभाडे आणि खासगी वाहतुकीचे भाडे यात मोठे अंतर असल्यामुळे बरेच प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देतात. मात्र खासगी वाहतूक करणारे प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरतात. मात्र प्रवासी काहीच बोलत नसल्यामुळे वाहनचालकांचे धैर्य वाढते आणि ते त्याच्या शेजारच्या सीटावरही चार ते पाच प्रवासी बसवतात. वास्तविक वाहनातील प्रवाशांनीच चालकांना यापासून रोखायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती सेनेचे चिखलफास आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाजप आमदार राम कदम यांनी मुलींच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत छत्रपती सेना महाराष्ट्रतर्फे बुधवारी निमाणी बस स्थानकासमोर आमदार कदम यांच्या प्रतिमेला चिखल फासणे आणि जोडे मारण्याचे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारचे विधान म्हणजे मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढावचा नारा केला जात असताना दुसरीकडे मुली पळवून आणण्याचे विधान केले जात आहे. हा महिला सुरक्षेच्या दृष्टीने घातक प्रकार घडणार आहे. अशा आमदाराने खुर्ची खाली करावी, अशी मागणी या आंदोलनच्या माध्यमातून छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, नीलेश शेलार, सुदर्शन निमसे, किरण पाटील, कोअर कमिटीचे अध्यक्ष तुषार गवळी, प्रदेश प्रवक्ता सागर आहेर, जिल्हा प्रमुख राहुल पाटील, अभी वाबळे, डॉ. श्याम थविल, शुभम पवार, मयूर मोरे, किरण भोर, रवींद्र मढे, नाना भोई, कादीर खान, अस्लम लालू, प्रशांत दिघे यांनी केली आहे.

सिडकोत जोडेमारो

सिडको : महिलांविरोधातील आक्षेपार्ह्य वक्‍तव्याच्या निषेधार्थ सावतानगर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने आमदार राम कदम यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कदम यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या आमदारकीचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. संघटेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. यावेळी योगेश आहिरे, सुनील सोनवणे, अक्षय शिरसाठ, योगेश पाटील, सुनील सोनवणे, सागर पवार, सागर जाधव, कल्पेश उदावंत आदींसह छावा संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंधर्व’च्या विद्यार्थ्यांची गुरुवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात १९३१ पासून सुरू असलेल्या गंधर्व महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयाचे गुरुवर्य कमलाकर उर्फ भाऊ जोशी यांच्याप्रती कृतज्ञता साधत गुरुवंदना दिली.

पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सर्व शिष्यांनी गायन, तबला, बासरी, सतार, व्हायोलिन यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंदजी महाराज तसेच महामहोपाध्याय गोविंदराव पलुस्कर उपस्थित होते. प्रारंभी कथक नृत्याद्वारे गणेश वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर अमृता डहाळे हिने गुरुवंदना सादर केली. समूह तबला वादनात सार्थक वावीकर, राघव दीक्षित, रुद्र हिरेमठ, अर्णव मराठे यांनी रुपक ताल सादर केला. कार्तिक गामणे याने हार्मोनियम वाजवून गीत सादर केले. साक्षी अनवडे हिने 'पायोजी मैने' हे भजन सादर केले. समूह गायनात गार्गी गरुड, साक्षी पेशवे, प्रियंका शिंदे, अवधूत हिरेमठ यांनी यमन रागामध्ये झपताल गत व बंदिश, आलाप, ताना सादर केली.

केतकी गोरे हिने राग केदार व क्षितिजा शेवतकर व मितेश जेठवा यांनी सतार व बासरी जुगलबंदीत राग हंसध्वनी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मानसी पाटील, सुरेंद्र जालिहालकर, शशिकांत पाटील, शुभम तायडे यांनी भक्ती गीत, नाट्यगीत, भजन सादर करून सर्वांची मने जिंकली. समूह गायनात साक्षी बेदरकर, मंत्रणा देव, रेणुका शिखरे, सुजाता गायधनी यांनी राग 'मालकंस'मध्ये एकताल गत, बंदिश आलाप ताना याचे सुरेल सादरीकरण केले. अनुराग जोशी यांनी तबला वादन केले. यश चांडक, सुयश मुळे यांनी एकतालमध्ये पेशकार, कायदा, पलटा, चक्रदार, परण, तिहाई, तुकडे यांचे सादरीकरण केले. चिन्मयी जोशी हिने व्हायोलिनवर राग बहार वाजवला.

अलका चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नकुल दायमा, जितेंद्र धर्माधिकारी, स्वानंद चंद्रात्रे, अनुराग जोशी आदींनी परिश्रम घेतले. कमलाकर जोशी यांनी सतारीवर राग कलावती वाजवून कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमास प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सादर केली जाणारी अपूर्ण माहिती दिली जात असल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यंत्रणेला फैलावर धरत मंगळवारी बैठकच रद्द केली. गुणांकनानुसार माहिती न दिल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ खंडित करून त्यांना एकेका महिन्यासाठीच्याच कामाच्या ऑर्डर द्या, असे फर्मान त्यांनी सोडले. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच पुनर्नियुक्तीबाबत निर्णय घेण्याचे आदेशही त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे यांना दिले.

गिते यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यकारी समितीची बैठक होती. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आशा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण न झाल्याचे तसेच अभियानांतर्गत घटकनिहाय झालेल्या खर्चाची माहिती देता न आल्याने डॉ. गिते संतापले. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारात धारेवर धरले. सर्व ग्रामीण रुग्णालयांनी किमान सहा महिन्यातून एकदा सरकारी समितीची बैठक घेणे अनिवार्य असताना बैठकच घेतली नसल्याची माहिती पुढे आली. आढावा बैठकीसाठी तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रनिहाय गुणांकन करून माहिती अपूर्ण आणि त्रोटक स्वरूपात माहिती सादर केल्याने डॉ. गिते संतापले. आरोग्य अधिकाऱ्यांसह संबंधिताकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने गिते यांनी बैठक आटोपती घेतली.

सचिवांना देणार अहवाल

राष्ट्रीय आरोग्य अभियानाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती देता आली नाही. त्यामुळे या बैठकीचे इतिवृत्त आरोग्य विभागाच्या सचिवांना सादर केले जाणार आहे.

बालमृत्यूची कारणे शोधा

जिल्हास्तरीय बालमृत्यू अन्वेषण समिती तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठकही डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील बालमृत्यूचा आढावा घेण्यात आला. कोणत्या कारणामुळे बाळाचा मृत्यू झाला याचे संबंधितांच्या घरी जाऊन अन्वेषण करा अशा सूचना डॉ गिते यांनी दिल्या आहेत.

0000

मूळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सादर केली जाणारी अपुर्ण माहिती आणि समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यंत्रणेला फैलावर धरत मंगळवारी बैठकच रद्द केली. गुणांकनानुसार माहिती न दिल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ खंडित करून त्यांना एकेका महिन्यासाठीच्याच कामाच्या ऑर्डर द्या असे फर्मान त्यांनी सोडले. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच पुनर्नियुक्तीबाबत निर्णय घेण्याचे आदेशही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे यांना देण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यास समितीने सुरूवात केली. प्रारंभी आशा कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत आढावा घेण्यात आला. आशाचे प्रशिक्षण पूर्ण न झाल्याचे तसेच अभियानांतर्गत घटकनिहाय झालेल्या खर्चाची माहिती देता न आल्याने डॉ गिते संतापले. संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारात धारेवर धरले. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेकडेही परिपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. सर्व ग्रामीण रुग्णालयांनी किमान सहा महिन्यातून एकदा सरकारी समितीची बैठक घेणे अनिवार्य असतानाही बैठका घेण्यात आल्या नसल्याची बाब बैठकीत पुढे आली.

आढावा बैठकीसाठी तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रनिहाय गुणांकन करून माहिती सादर करा असे आदेश गिते यांनी दिले होते. परंतु आरोग्य विभागाच्या यंत्रणेने या आदेशाकडे दुर्लक्ष करून अपूर्ण आणि त्रोटक स्वरूपात माहिती सादर केल्याने डॉ.गिते संतापले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह संबंधिताना विचारणा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी बैठक आटोपती घेतली. माहिती तयार करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश तात्काळ खंडित करून त्यांना यापुढे एकेक महिन्यासाठीच पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय कामाचे मूल्यमापन करूनच यापुढे नियुक्ती दिली जावी असे आदेशही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आरोग्य विभागातील सांख्यिकी पर्यवेक्षक पोतदार यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-

..सचिवांना देणार अहवाल..

राष्ट्रीय आरोग्य अभियान हा केंद्र सरकारचा महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्याची प्रभावी अमलबजावणी अपेक्षित असताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती देता आली नाही. पूर्वतयारी न करताच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठकीला बसल्याचे स्पष्ट झाले. या बैठकीचे इतिवृत्त तयार करण्याच्या सूचना दिल्या असून आरोग्य विभागाच्या सचिवांना याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.

-

..बालमृत्यूची कारणे शोधा..

जिल्हास्तरीय बालमृत्यू अन्वेषण समिती तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठकही डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील बालमृत्यूचा आढावा घेण्यात आला. कोणत्या कारणामुळे बाळाचा मृत्यू झाला याचे संबंधितांच्या घरी जाऊन अन्वेषण करा अशा सूचना डॉ गिते यांनी दिल्या आहेत. बालमृत्यूची कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदमांच्या पुतळ्याचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे मुंबईतील आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद बुधवारी नाशिकमध्येही उमटले. मुख्यमंत्र्यांनी कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राजकीय पक्षांसह महिलांच्या संघटनांनी केली आहे. कदम यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करीत काँग्रेसने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले, तर जिजाऊ ब्रिगेडने पक्षातून हकालपट्टीची मागणी केली.

'एखाद्या मुलानं मुलीला प्रपोज केलं असेल. मात्र तिचा नकार असेल आणि त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करेन,' असे वादग्रस्त विधान कदम यांनी बुधवारी दहीहंडी उत्सवात केले. त्यांच्या बेताल वक्तव्याचा नाशिकमध्येही विविध संघटनांनी निषेध नोंदविला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राज्यात स्त्री सन्मानाची परंपरा आहे. २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांच्या नावाने मतांचा जोगवा मागत भाजप सत्तेत आली. परंतु, महाराजांचे विचार त्यांनी अंगीकारले नाहीत. राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. हे अत्याचार थोपविण्याऐवजी महिलांबाबत बेताल व बदनामीकारक वक्तव्य केली जात असल्याबद्दल निषेध नोंदविण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांचा अवमान करतात. आमदार प्रशांत परिचारक सैनिकांच्या पत्नीचा अवमान करतो, तर उपमहापौर छिंदम शिवरायांचा अवमान करतो. हे कमी म्हणून की काय आता कदम यांनी समस्त महिलांचा अवमान करून राज्याची सांस्कृतिक प्रतिमा मलिन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महिलांचा एवढा अवमान होऊनही मुख्यमंत्री कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत ही शरमेची बाब आहे. कदम हा रावणाचा आधुनिक अवतार असल्याची टीकाही करण्यात आली आहे. कदम यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, देशातील भाजपने त्वरित माफी मागावी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने दिला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी रोड येथे कदम यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, ज्युली डिसुझा आदी उपस्थित होते.

जिजाऊ ब्रिगेडचा इशारा

जिजाऊ ब्रिगेडनेही कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. महिला व मुली वस्तू नाहीत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून, देशात महिलांचा आदर केला जातो. महाराज असते तर कदम यांचे हात कलम केले असते, अशी भावना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. लज्जास्पद उद्गार काढायचे व माफी मागायची हा धंदा सध्या राज्यात सुरू आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिजाऊ ब्रिगेडने दिला आहे. कदम यांनी राजीनामा द्यावा व पक्षातून त्यांची हकालपट्टी केली जावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाणे, जिल्हाध्यक्ष डॉ. अनुपमा मराठे, विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे, महानगरप्रमुख चारूशीला देशमुख, अध्यक्ष पूजा धुमाळ आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्याल गायनात बागेश्रीचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पं . विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शास्त्रीय संगीत छोटा ख्याल गायन स्पर्धेत बेळगावच्या उमेश रामदास याने प्रथम क्रमांक तर नाशिकच्या बागेश्री क्षीरसागर हिने तृतीय क्रमांक मिळविला.

राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, औरंगाबाद, जालना, नगर, नाशिक, बेळगाव, विंचूर गवळी, ओझर अशा अनेक गावातून स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेत बेळगावच्या उमेश रामदास याने प्रथम, जालन्याच्या भक्ती पवार हिने दुसरा तर ओझरच्या बागेश्री क्षीरसागर हिने तृतीय क्रमांकाचे मिळविले. उत्तेजनार्थ तीन बक्षिसे अंजली काजळकर (जालना), पूर्वा क्षीरसागर (ओझर) व ओंकार कडवे (नाशिक) यांना मिळाली. परीक्षक म्हणून नाशिकच्या मोमिना चटर्जी व पुण्याचे हर्षद डोंगरे यांनी काम पहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कमलाकर जोशी, अनुराग जोशी, आदित्य जालिहालकर, बिलवेश जालिहालकर, घनश्याम जाधव, प्रकाश गाडगीळ, मृदुला देव, अतुल गोंधळेकर, कलकोटवार यांनी विशेष परिश्रम घेतले. रामनाम आधार आश्रमाचे सुरेंद्र जालिहालकर यांनी आभार मानले.

कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहिरी लेखन कार्यशाळा रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ९ ते सांयकाळी ५ या वेळेत शाहिरी लेखन कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, सिंहस्थनगर, सिडको येथे पार पडेल.

कार्यशाळेत बी. एस. टी. कॉलेजचे प्रा. शाहीर तुळशीराम जाधव आणि सहकारी मार्गदर्शन करतील. कवी व गीतकार विनायक पठारे, दिग्दर्शक दत्ता पाटील आणि प्रा. नागार्जुन वाडेकर यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सायंकाळच्या समारोप कार्यक्रमात शाहिरी जलसा सादर केला जाणार आहे. या सत्रात कवी किशोर पाठक व शाहीर डॉ. भास्कर म्हरसाळे उपस्थित राहतील. कार्यशाळा नोंदणीसाठी इच्छूकांनी नारायण सुर्वे कवी कट्टाचे समन्वयक भीमराव कोते-पाटील (९९२२४४८५५१) किंवा रवीकांत शार्दुल (९९२२४४८५५१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती वाचनालयाचे सचिव राजू नाईक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरही ‘उज्ज्वल’

$
0
0

घरोघरी गॅस आल्याने मालगाव, निफाड तालुके केरोसिनमुक्ती

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : जिल्ह्याला केरोसिनमुक्त करण्याच्या आणि पर्यावरण स्नेह जपण्याच्या दिशेने नाशिकने एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १ लाख ४६ हजार लाभार्थींना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस मिळू लागल्याने आपसूकच केरोसिनची गरज संपुष्टात येऊ लागली आहे. मालेगाव आणि निफाड पाठोपाठ सिन्नरही केरोसिनमुक्त करण्यात यश आले असून धूरमुक्तीच्या दिशेने या तालुक्यांची पाऊले पडू लागली आहेत.

केरोसिन असो किंवा सरपण यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. दारिद्रय रेषखालील कुटुंबाचा रहाणीमानाचा दर्जा उंचावतानाच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागावा यासाठी पंतप्रधान उज्जवल गॅस योजनेची घोषणा करण्यात आली. १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून या योजेनेचा प्रारंभ झाला. दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना केवळ १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर हे कनेक्शन दिले जाऊ लागले. त्यासाठी प्रत्येक गॅस कनेक्शनसाठी १६०० रुपयांचा खर्च सरकार करीत आहे. जिल्ह्यात सव्वा दोन वर्षांमध्ये दारिद्रय रेषेखालील तब्बल १ लाख ४६ हजार कुटुंबांना या योजनेतून गॅस कनेक्शनचा लाभ दिला गेला आहे. त्यामुळे केरोसिनसाठी हेलपाटे मारण्याच्या तसेच लाकडे गोळा करून आणण्याच्या कटकटीपासून महिलावर्गाची सुटका झाली आहे.

केरोसिन वाटपात घट

दारिद्रय रेषेखालील अधिकाधिक कुटुंबांना उज्जवला गॅस कनेक्शन उपलब्ध करून देऊन केरोसिनचे नियतन कमी करण्याचे उद्दिष्ट्य जिल्हा पुरवठा विभागाने ठेवले आहे. जिल्ह्यात तळागाळातील नागरिकांना पंतप्रधान उज्जवला गॅस योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून त्यांनी केरोसिनचा लाभ सोडणे अनिवार्य आहे. त्यामुळे केरोसिन अर्थात रॉकेलचे नियतन कमी कमी केले जात आहे. हे नियतन ऑगस्टमध्ये ४२० किलोलिटरपर्यंत (केएल) आले. सप्टेंबरमध्ये ३३६ केएल एवढीच मागणी पुरवठा विभागाने नोंदविली आहे.

क्रॉस चेकिंगमुळे यश

उज्जवल गॅस योजनेचा लाभ मिळाला असतानाही काही लाभार्थी केरोसिनचा लाभ सोडत नसल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केरोसिन परवानाधारकांकडील लाभार्थीं आणि संबंधित तालुक्यातील उज्जवल गॅस योजनेचे लाभार्थीं यांची पडताळणी पुरवठा विभागाने सुरू केली. दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची माहिती त्यामधून पुढे येऊ लागली. अशा लाभार्थींचा केरोसिनचा लाभ बंद केला जात असून त्यामुळे केरोसिनचे वितरणही घटण्यास मदत होत आहे.

मालेगाव आणि निफाड पाठोपाठ या महिन्यात सिन्नर तालुक्यातही केरोसिनचे मागणीनुसार वितरण ३६ 'केएल'वरून शुन्यावर आणले आहे. पुरवठा विभागासह संबंधित तहसील कार्यालयांचेही यामागे परिश्रम आहेत. पुढील टप्प्यात नाशिक, येवला, चांदवड या तालुक्यांमधील नियतन शुन्यावर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी

..

केरोसिनचे तालुकानिहाय मागणीनुसार वाटप

तालुका........ऑगस्ट (केएल).....सप्टेंबर (केएल)

दिंडोरी................३६........................३६

सुरगाणा..............३६........................३६

येवला................३६........................२४

कळवण..............३६........................२४

पेठ....................३६........................२४

चांदवड..............२४......................२४

त्र्यंबकेश्वर..........२४........................२४

इगतपुरी............२४........................२४

देवळा..............२४........................२४

बागलाण...........१२............................१२

नाशिक...........१२............................१२

नांदगाव...........१२............................१२

धान्य वितरण नाशिक...........१२............०

धान्य वितरण मालेगाव.....६०.................६०

एकूण...............४२०...............३३६

* मालेगाव, निफाड, सिन्नर.....०......०

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images