Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0
0

सिन्नर : जिल्हा परिषदच्या सेस निधीतून समाजकल्याण विभागाच्या योजनांकरिता अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी विविध साहित्यासाठी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन पा. भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदींनी केले आहे. लाभार्थ्यांनी १० सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवकांकडे प्रस्ताव जमा करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रपती भवनाच्या ‘तब्येती’त नाशिकचा वाटा

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : राष्ट्रपती भवनमध्ये असलेल्या आयुष वेलनेस सेंटरमधील पंचकर्म विभागाची पुनर्उभारणी करण्याचा मान नाशिक येथील वैद्य अभय कुलकर्णी यांना मिळाला असून, बुधवार, २९ ऑगस्ट रोजी या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

नाशिक येथे कार्यरत असलेल्या अभय कुलकर्णी यांना आयुष मंत्रालयाकडून २२ जुलै रोजी याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. राष्ट्रपती भवनामध्ये असलेल्या वेलनेस सेंटरच्या पुनर्उभारणीच्या कामासाठी आपली नेमणूक झाल्याचे यात कळविण्यात आले. मागील आठवड्यात राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या बैठकीत कामाची दिशा ठरविण्यात आली. या सेंटरमधील पंचकर्म विभागाच्या उभारणीचे काम अभय कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या वेलनेस सेंटरच्या उभारणीसाठी भारतातील सहा लोकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यात राष्ट्रपती भवनाच्या जॉइंट सेक्रेटरी अंजली बक्षी, आयुष मंत्रालयातील आयुर्वेद विभागाच्या प्रा. डॉ. तनुजा मेहेत्रे, आयुष मंत्रालयाच्या डॉ. राजेश्वरी सिंग, केंद्रीय संशोधन सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुष आणि सिद्धा विभागाचे डॉ. व्ही. के. शाही, पंचकर्म विभागाचे पुनर्उभारणी प्रमुख म्हणून डॉ. अभय कुलकर्णी, सिव्हील इंजिनीअर डॉ. व्ही. के. गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात अभय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतींचा अवलंब करीत नवीन साधनांच्या सहाय्याने या सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या वेलनेस सेंटरचा लाभ राष्ट्रपतींप्रमाणेच त्यांच्या भेटीला येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी केला जाणार आहे. हे सेंटर सामान्य व्यक्तींना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीत याची उभारणी केली जात आहे. राष्ट्रपती भवन हे ऐतिहासिक वारसा लाभलेले स्थळ असल्याने मूळ सेंटरच्या ढाच्यात कोणतेही बदल न करता याची उभारणी केली जात आहे. आयुष मंत्रालयाचा हा पथदर्शी प्रकल्प राहणार असून, या सेंटरप्रमाणेच भारताच्या विविध भागांतही अशाच प्रकारची सेंटर्स साकारली जाणार आहेत.

मनुष्यबळाचे नियोजनही कुलकर्णींकडे

या सेंटरच्या पंचकर्म विभागात लागणाऱ्या साधनांच्या निर्मितीपासून ते मनुष्यबळाची संख्या याचे नियोजनही अभय कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पंचकर्म उभारणीसाठी भारतातून एकमेव वैद्य अभय कुलकर्णी यांची नेमणूक झाली आहे. अभय कुलकर्णी हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे सिनेट सदस्य असून महाराष्ट्र अॅक्युपंक्चर काउंन्सिलचे पदाधिकारी आहेत. राष्ट्रपतींच्या सेवेत काम करण्याची संधी डॉ. कुलकर्णीं यांना मिळाल्याने आयुर्वेद क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

आयुष मंत्रालयाने माझ्यावर जी जबाबदारी दिली, तिचे मी स्वागत करतो. मला हा मान मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. हा प्रकल्प राष्ट्रासाठी कसा पथदर्शी ठरेल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन.

- वैद्य अभय कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी झाली म्हणून काढले घराबाहेर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुलगाच वंशाचा दिवा असतो असा समज असणाऱ्या व आधुनिकतेची झूल पांघरलेल्या समाजात महिलांचा शारीरिक व मानसिक छळ होण्याचे प्रकार आजही सुरूच असल्याचे जेलरोड येथे घडलेल्या घटनेतून उघड झाले आहे. मुलगी झाली म्हणून सासरकडील मंडळींनी पल्लवी कपिले (रा. सिडको) या महिलेस तिच्या आईवडिलांसमोरच मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी पल्लवी कपिले (सध्या रा. सिडको, मूळ रा. ओम रेसिडेन्सी, पवारवाडी, जेलरोड) या महिलेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात कुटूंब कल्याण समितीच्या आदेशानुसार पती अमोल, सासरे रवींद्र, सासू रंजना आणि दीर यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. यानुसार लग्नावेळी पल्लवीचा पती अमोल हा एचएएलमध्ये नोकरीस होता, असे सांगण्यात आले होते. अमोल हा नोकरीस नसल्याची बाब पल्लवीच्या लग्नानंतर उघड झाली होती. पुढे इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी पल्लवीने माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी तिचा सासरा रवींद्र कपिले याने केली होती. पल्लवीने यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. मुलीचा संसार सुरळीत चालावा यासाठी तिच्या वडिलांनी पल्लवीच्या सासऱ्यांना दोन लाख रुपये दिले. पुढे पल्लवीला मुलगी झाली. परंतु, मुलगाच हवा होता यावरून पल्लवीचा पुन्हा तिच्या सासरी छळ सुरू झाला. पल्लवीच्या बहिणीचा विवाह दीर सागरशी करण्याची मागणी तिच्या सासरच्यांनी केली. परंतु, पल्लवीला सासरी छळ सहन करावा लागत असल्याने पल्लवीच्या आईवडिलांनी या मागणीस नकार दिला. त्यानंतर पती अमोलला सराफ व्यवसाय सुरू करण्यासाठी पल्लवीकडे तिच्या सासऱ्याने १० लाख रुपयांची मागणी केली. पल्लवीने या मागणीस नकार दिल्याने तिला पुन्हा मारहाण करण्यात आली. तिने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यावर त्यांनी पाच लाख रुपये दिले.

घरासाठी मागितले पैसे

फ्लॅट खरेदी करण्यासाठीही माहेराहून पैसे आणण्यासाठी सासऱ्याने पल्लवीवर दबाव आणला. परंतु, पल्लवीने त्यास नकार दिल्याने सासरा रवींद्रने राहता बंगलाच विकला. त्यामुळे पल्लवी व तिचा पती अमोल भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास गेले. ऑक्टोबर २०१७ मध्ये फ्लॅट खरेदीसाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी पती अमोलने पुन्हा तगादा लावला. पल्लवीने स्पष्ट नकार दिल्याने पती अमोलने त्याच्या आईवडील व भावाला घरी बोलावून घेत पल्लवीला मारहाण केली. हा प्रकार समजताच पल्लवीचे आईवडील तिच्या घरी आले. यावेळी पल्लवीच्या आईवडीलांसमोर दीर सागरने पल्लवीला मारहाण केली, तर पतीने तिच्याकडील दागिने हिसकावून घेत घराबाहेर काढले. या प्रकारानंतर पल्लवीने महिला सुरक्षा शाखेकडेही तक्रार केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदनबाई सांखला पिंपळगाव बसवंत : येथील श्री

0
0

मदनबाई सांखला

पिंपळगाव बसवंत : येथील श्री स्थानकवासी जैन श्रावक संघातील सुश्राविका मदनबाई सुरजमलजी सांखला यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी संथारा व्रतात गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक येथील जैन श्रावक संघाचे उप संघपती मंगलचंद सांखला यांच्या त्या काकू होत.

00

रत्नगडावरील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

दिंडोरी: तालुक्याची प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या रत्नगडावर बुधवारी रात्री चोरांनी दानपेटी फोडून दानपेटीतील रोख रक्कम लुटून नेली. सकाळी भाविक आरती करण्यासाठी गडावर आले त्यांना मंदिरातील दरवाजा उघडा दिसला व मंदीरातील साहित्य विखुरलेले दिसले. तसेच दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम, ध्वनिषेपक यंत्र चोरी गेल्याचे लक्षात आले. भाविकांनी सरपंच वैशाली बस्ते, पोलिसपाटील व गावकऱ्यांना सांगितले. पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील कोकण गाव येथील सामाजिक आरोग्य (आशा)कार्यकर्ती रुक्मिणी प्रकाश ठेपणे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाल्याची चर्चा असून हल्लेखोरानेही नंतर विषप्राशन केले. त्याच्यावरही सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्याचा आशा संघटना वतीने निषेध करण्यात आला आहे.

कोकणगाव बुद्रुक येथील आशा कार्यकर्त्या रुक्मिणी ठेपणे यांच्यावर बुधवारी (दि. २९) रात्री गावातील गोपाळ पागे याने मोबाइल नंबर देत नाही या कारणावरून घरात घुसून चाकूहल्ला केला. जखमी ठेपणे यांना नाशिक येथे तातडीने सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, संशयित आरोपी गोपाळ पागे हासुद्धा सकाळी सहा वाजेच्या दरम्यान विषप्राशन केल्याचे आढळून आले. त्यालाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. हल्ल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी पागेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आशा व गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, विजय दराडे, शरद नागरे आदींनी सिव्हिलमध्ये ठेपणे यांची भेट घेतली.

वैद्यकीय अधिकारी छत कोसळल्याने जखमी

दिंडोरी : तालुक्यातील वणी-सापुतारा रस्तावरील पांडाणे येप्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानी बुधवारी (दि. २९) रात्री बाराच्या सुमारास छताला लावलेल्या 'पीयूसी सिलिंग'चा काही भाग कोसळला. यात डॉ. घडवजे किरकोळ जखमी झाले. गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विकासकामे निविदेप्रमाणे होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पांडाणे येथे पीयूसी सिलिंग' कोसळल्याने निकृष्ट कामाच्या तक्रारींवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. तीन-चार महिन्यांपूर्वीच पांडाणे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची जिल्हा परिषदेमार्फत दुरुस्ती व छतास 'पीयूसी सिलिंग'चे काम करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमध्ये आढळला देशी मद्याचा साठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रहिवाशी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या कारमधून तब्बल पाच लाख रुपयांचा देशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) हस्तगत केला. बेवारस असलेला हा साठा अनधिकृतपणे वाहतुकीसाठी आणला की अवैध विक्रीसाठी याचा तपास एक्साईज विभाग करीत आहे. ही कारवाई भरारी पथक एक क्रमाकांच्या पथकाने केली.

तपोवनातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने केवडी बनातील शेठ डुंगरशी नागजी ट्रस्ट वृद्धाश्रमामागील योगेश्वर कृपा अपार्टमेंट येथे छापा टाकला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बेवारस कारची (एमएच १५ इपी ३२१५) पथकातील कर्मचाऱ्यांनी झडती घेतली. यात कारमध्ये देशी दारुच्या तीन हजार १२० काचेच्या सिलबंद बाटल्या ५८ खोक्यांमध्ये तसेच तीन प्लास्टिकच्या गोणीत भरलेले आढळून आले. भरारी पथकाने मद्यसाठा आणि कार असा सुमारे ५ लाख १२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन नोंदणीवरून कारमालकाचा शोध घेतला जातो आहे. पथक एकचे निरीक्षक मधुकर राख यांच्या नेतृत्त्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, जवान विरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुवर, विष्णू सानप, विजेंद्र चव्हाण तसेच पूनम भालेराव आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढे एक पाऊल मागे

0
0

निवासी दरात ५० टक्के

अनिवासी दरात २५ टक्के कपात

'अविश्वास'अस्रानंतर निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी भाजपने शनिवारी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपली खुर्ची वाचवण्यासाठी बॅकफूटवर आले असून, त्यांनी निवासी मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात ५० टक्के, तर अनिवासी व व्यावसायिक मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात २५ टक्के कपातीची घोषणा केली आहे. दुसरीकडे पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर कायम ठेवत, तो २० वरून ३ पैशांवर आणल्याने शेतीवरील करधाड कायम राहिली आहे. सोबतच मोकळ्या भूखंडावरील ३ पैसे कर कायम ठेवत, लेआउट आणि एनए झालेल्या प्लॉटवर मात्र २० पैसे कर केला आहे. त्यामुळे नागरिकांवरील करवाढीचे संकट कायम राहिले आहे.

'अविश्वासा'ची भीती नाही!

विकासासाठी तारतम्य ठेवून करकपातीचा निर्णय घेतला आहे. मी बॅकफूटवर आलो की नाही, हे नागरिकांना ठरवू द्या, तसेच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून करकपातीचा निर्णय घेतल्याचे मुंढे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. सोशल मीडियावर करासंदर्भात संभ्रम निर्माण केला जातोय. करवाढ नागरिकांना मान्य नसेल, काही चूक असेल तर नागरिक २१ दिवसांत अपील करू शकतात. करकपातीचा निर्णय अविश्वास प्रस्तावाच्या भीतीने घेतलेला नाही, तर प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागत असल्याने त्यानुसार हा निर्णय घेतला, अशी सारवासारव मुंढेंनी या वेळी केली.

करकपातीनंतर असे असतील दर...

निवासी मालमत्ता करयोग्य मूल्य

प्रकार- पूर्वी- वादग्रस्त करवाढ- सुधारित करवाढ

आरसीसी, इमारत- ५० पैसे- २ रुपये- १ रुपये

कौलारू, पत्रे, छत- ४० पैसे- १.६० पैसे- ८० पैसे

पत्रा, फायबर, लाकूड- २० पैसे- १.१० पैसे- ४० पैसे

अनिवासी, व्यावसायिक मालमत्ता करयोग्य मूल्य

प्रकार- पूर्वी- वादग्रस्त करवाढ- सुधारित करवाढ

आरसीसी, इमारत- १.२० पैसे- ७.२० पैसे- ४.८० पैसे

कौलारू, पत्रे, छत- ७५ पैसे- ४.८० पैसे- ३ रुपये

पत्रा, फायबर, लाकूड- ४५ पैसे- ३ रुपये- १.८० पैसे

-

खुल्या जमिनी, जागा : ३ पैसे करयोग्य मूल्य कायम

बिनशेती, लेआउट मंजूर : ४० पैशांवरून २० पैसे दर

कमी करावरही 'अविश्वास'!....३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता

0
0

रघुनाथ बिडवे

नाशिकरोड : रघुनाथ केरुजी बिडवे (वय ८७, रा. वावी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. वारकरी भजनी मंडळाच्या माध्यमातून काही दशकांपासून रघुनाथ बिडवे यांचे वावी व परिसरातील गावांमध्ये धार्मिक कार्यात कार्यरत होते. वावीतील सामाजिक कार्यकर्ते रमेश बिडवे यांचे ते वडील होत.

सुधा जोशी

जेलरोड : येथील रहिवासी आणि ज्येष्ठ महिला मंडळाच्या संस्थापिका सुधा देवीदास जोशी (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय जोशी यांच्या त्या काकू होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर बिबट्याने घातली असती झडप

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

बुधवारी सकाळची वेळ...निफाड तालुक्यातील महापुरातील शेतातून गेल्या पंधरा दिवसांत तिसरा पकडला गेल्यामुळे नागरिकांनी पिंजऱ्याभोवती गर्दी केली...इतक्यात बिबट्या जेरबंद असलेल्या पिंजऱ्याची कडी आपोआप उघडली अन् बघ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली...आता काय होणार...बिबट्या झडप घालणार...तोच बिबट्याच्याच धक्याने पिंजऱ्याची कडी आपोआप लागली...अन् बघ्यांचा जीव भांड्यात पडला.

गेल्या पंधरा दिवसात महाजनपूर शिवारातील एकाच शेतातून तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी हा बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केलेली असताना हा प्रसंग घडला. वनविभागाच्या पिंजरा कमकुवत झाल्यामुळेच हा प्रसंग उद्भवल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तसेच एकाच शेतातून तीन बिबटे पकडल्यामुळे या परिसरात आणखी बिबट्या असल्याची भीती कायम आहे.

गोदाकाठावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी खूप जागा आहे. महाजनपूर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर बागलवाडी या शिवारात सातत्याने दुष्काळ परिस्थितीमुळे ऊसाचे क्षेत्र नाही. शिवाय टेकडी, डोंगर, दाट झाडी असेही क्षेत्र नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नाशिक महापालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्री पकडून या भागात सोडतात. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर, शेतात फिरताना दिसतात. बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात ते सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील पिकांचे कामे सुरू असल्याने रात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. त्यातच महाजनपुरातून गेल्या पंधरा दिवसात तिसरा बिबट्या पकडला असून, आणखी एक बिबट्या असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. पकडलेले बिबटे पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तरी या भागात बिबटे पुन्हा इकडेच सोडू नयेत, अन्यथा गावातील नागरिक आंदोलन करतील, असा इशारा सरपंच आशा बचवंत फड, भगवान ताडगे, योगेश फड, राहुल फड, संपत फड यांनी वनविभागाला दिला आहे. दरम्यान येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी भैया शेख, विजय टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला निफाडच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत नेले.

मजबूत पिंजरा लावावा

महाजनपुरात बिबट्या पिंजऱ्यात झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली. मात्र तेव्हाच वनविभागाच्या पिंजऱ्याची कडी अचानक निघाल्याने बिबट्या बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र सुदैवाने बिबट्याच्य दणक्याने कडी लागल्याने मोठा अनर्थ टळला. यापुढे वनविभागाने मजबूत पिंजरा लावावा.- योगेश फड, महाजनपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता

0
0

हौशाबाई गोसावी

सिन्नर : शहा येथील हौशाबाई देवगिरी गोसावी (वय ७६) यांचे निधन झाले. त्या शेतकरी कुटुंबातील होत्या. मृत्युपूर्वी आठ दिवस अगोदरच त्यांनी मारुती देवस्थान व राष्ट्रसंत श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी मठ टाकळीच्या जिर्णोद्धारासाठी ५१ हजाराची देणगी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

0
0

वाढदिवस

००००००००००

मंगेश काठे

उद्योजक, नाशिक

विद्याविलास पाठक

लेखक

भास्कर म्हरसाळे

लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीच्या सुरक्षा पर्यवेक्षकाला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचपीटी कॉलेजच्या सुरक्षारक्षकांच्या पर्यवेक्षकाला गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मारहाण झाली. कॅम्पसमध्ये रात्री सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला एक सुरक्षारक्षक मित्रासमवेत गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कॅम्पसमध्ये आला. त्यावेळी ते दोघेही दारू प्यायले होते. त्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून सुरक्षारक्षकांनी रोखले. कॅम्पसमध्ये प्रवेश न दिल्याचा राग आल्याने त्या दोघांनी सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला. सुरक्षारक्षकांच्या पर्यवेक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोघांना कॅम्पसबाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने पर्यवेक्षकास मारहाण करण्यात आली. पोलिसांनी कॅम्पसमध्ये धाव घेत वाद मिटवला. मारहाण करणाऱ्या व्यक्तिच्या विरोधात सुरक्षापर्यवेक्षकाने अर्ज दाखल केला आहे. सुरक्षारक्षकांनाच मारहाण होत असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रणिता भालेरावचे उद्या होणार अरंगेत्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नृत्यशारदा संस्थेच्या वतीने गुरू मीरा गणपती धानू यांची शिष्या प्रणिता भालेराव हिचा अरंगेत्रम अर्थात रंगप्रवेश शनिवारी, १ सप्टेंबर रोजी होणार आहे. गंगापूर रोडवरील, केटीएचएम कॉलेजजवळच्या रावसाहेब थोरात सभागृह सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी भरतनाट्यम, विनायक स्तुती, हंसध्वनी रागातील आदी तालातील पुष्पांजली, हंसध्वनी रागातील तिसराम तालातील गणेश श्लोकम, चतुश्र एकम तालातील अलारिपू, कल्याणी रागातील व रुपक तालातील जतिस्वरम तसेच कलावती रागातील व आदी तालातील देवी पद्म आणि श्री रागातील आदी तालातील वर्णम व बिहाग रागातील आदी तालातील नटराज पदम, मंद रागातील आदी तालातील अभंग, हिंदोलम रागातील आदी तालातील झिल्लाना या रचना नृत्याद्वारे साकारण्यात येणार आहे.

नृत्याची कोरिओग्राफी मीरा धानू यांची आहे. नृत्यसंयोजन एस. कृष्णमूर्ती, गायन शक्तीधरन, व्हायोलिन मंगला वैद्यनाथन, तबला अमोल पाळेकर, रंगभूषा अनिल वासूदेवन, प्रकाशयोजना व ध्वनी ईश्वर जगताप व राजपूत, सूत्र जयश्री शाह, नेपथ्य अवधूत देशपांडे यांचे आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शब्द सूर संवाद’मध्ये रविवारी ‘कृष्णार्पण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री व्यंकटेश बालाजी संस्थान आणि वेणूनाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता शब्द सूर संवाद या मैफलीतील चौथे पुष्प कृष्णार्पण गुंफले जाणार आहे.

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त कापड पेठेतील बालाजी मंदिरात ही कृष्ण गीतांची मैफल होणार आहे. या श्रीकृष्णगीतांना मोहन उपासनी यांनी स्वरबद्ध केलेले असून संगीतही त्यांचेच आहे. या मैफलीचे निरुपण प्रा. डॉ. राहुल पाटील करणार आहेत. गीतांचे गायन स्वागता पोतनीस, पूर्वा क्षीरसागर, पुष्कराज भागवत व मोहन उपासनी करणार असून तबल्यावर सतीश पेंडसे साथसंगत करणार आहेत. ध्वनी पराग जोशी यांचा आहे. मैफलीला मुक्त प्रवेश असून यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चांचे नुसतेच फव्वारे!

0
0

'झूम'च्या बैठकीत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती; उद्योजकांकडून नाराजी व्यक्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल अडीच महिन्यानंतर झालेल्या जिल्हा उद्योग मित्र (झूम) च्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. उद्योजकांचे प्रश्न एकत्रित सुटावे, यासाठी उद्योजक व संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी घेत असतात. पण, मुख्य अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ही बैठक केवळ चर्चेपुरतीच उरली. बैठक सुरू झाल्यानंतर अर्ध्या बैठकीतच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. कामानिमित्त आपल्या दालनात गेल्याने उद्योजकांचाही हिरमोड झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सुरुवातीलाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी यांनी विविध विभागाचे मुख्य अधिकारी गैरहजर असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्याबरोबरच त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर यांना केल्या. कोणत्याही अधिकाऱ्यांना काही कामानिमित्त जायचे असेल तर त्यांनी त्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी असेही सांगितले. तसेच काही अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांना बैठकीत येण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महापालिकेचे व पोलिस अधिकारी हजरही झाले. पण, यावेळी जिल्हाधिकारी नसल्याने ते उपस्थित राहूनही निर्णय मात्र काही झाला नाही.

या बैठकीत सुरुवातीलाच गेल्या बैठकीत ३१ विषयावर चर्चा झाली. त्यातील १६ विषय मार्गी लागल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर यांनी सांगितले. पण, जिल्हाधिकारी यांनी एक-एक विषय वाचण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर उद्योजकांनी अनेक विषय पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत आपला संतापही व्यक्त केला. या बैठकीत 'एमआयडीसी'च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील-भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक सीमा पवार यासह 'निमा'चे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, 'निमा'चे माजी अध्यक्ष धनजंय बेळे, राजेंद्र आहिरे, ललित बुब, जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे रमेश पवार, लघु उद्योग भारतीचे संजय महाजन, एमआयडीसी, महापालिका, पोलिस अधिकारी व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये पाच कोटी रुपये खर्च करून अग्निशमन केंद्र उभे करण्यात आले आहे. पण, स्टाफ व इतर सुविधा नसल्याने ते कार्यन्वित झाले नसल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यानंतर 'एमआयडीसी'च्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत त्यांनी त्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी काय अडचण असल्यास त्या सोडवण्यासाठी काय पाठपुरावा केला, याची माहिती मागितली.

या विषयांवर चर्चा

उद्योगांसाठी जागा उपलब्ध करणे, अंबड येथे मोकळे भूखंड उपलब्ध करून देणे, ड्रेनजची व्यवस्था करणे, पथदीप व लिंकरोडची दुरुस्ती, स्वच्छतागृह व बसथांबे बांधणे, चौकाचे वाईडनिंग करणे, सायकल ट्रॅक निर्माण करणे, उद्योगांना पायाभूत सुविधा मिळाव्या, प्रथमोपचार केंद्र सुरू करणे, यासह २१ विषयांवर चर्चा झाली.

'निमा' सदस्यांनी सोडले सभागृह

अधिकाऱ्यांची गैरहजेरी, जिल्हाधिकारी यांनी अर्ध्यावर सोडलेली बैठक यामुळे या बैठकीच्या चर्चेला सूरच मिळाला नाही. त्यानंतर 'निमा'च्या नवीन पदाधिकाऱ्यांची सातपूरच्या 'निमा' मुख्यालयात बैठक होती. त्यामुळे ते सुद्धा ही बैठक सोडून गेले. 'निमा'चे उपाध्यक्ष शशिकांत जाधव मात्र शेवटपर्यंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आश्वासनानंतर उपोषण अखेर मागे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय स्टेट बँकेकडून फॅमिली पेन्शनची माहिती मिळावी यासाठी सैन्य दलातील कॅप्टनच्या ६४ वर्षीय पत्नी मंदोधरा कापडणीस यांनी गुरुवारी चौथ्या दिवशी सोडले. बँकेने १५ दिवसांत माहिती देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

अगोदर मिळालेली कमी पेन्शन व त्यानंतर दिलेली तफावत यामुळे त्यांनी पेन्शनसंबधी कागदपत्रांची मागणी कापडणीस यांनी केली होती. पण, बँक ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची त्यांची तक्रार होती. सातपूर येथील स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर मुलासह मंदोधरा कापडणीस यांनी सुरू केले होते ते गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थेत अडीच लाखांचा घपला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुदत संपल्यानंतरही ठेवींची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला ठेवीदाराने दिलेल्या तक्रारीत वर्धमान पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध दोन लाख ६५ हजार ३४१ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारवाडा पोलिसांत या प्रकरणी अपहार, फसवणूक व महाराष्ट्र हितसंबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिश शहा, चंद्रशेखर शहा, अल्पेश शहा, अयिन शहा आणि उर्वरित संचालक मंडळाने हा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रज्ञा राजेश शहा (रा. हिंदू सेवा समाज ट्रस्टसमोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा यांनी शहरातील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेत २०१२ मध्ये दोन लाख ९९ हजार ३१७ रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. दरम्यानच्या काळात ३३ हजार ९२६ रुपयांचा पतपेढीच्या वतीने परतावा देण्यात आला. मूळ ठेवीची मुदत संपल्याने शहा यांनी पतसंस्थेशी संपर्क साधला असता त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. पाठपुरावा करूनही रक्कम परत मिळत नसल्याने, तसेच यात संचालक मंडळाचा हस्तक्षेप असल्याने शहा यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.

--

हॉटेलातून मोबाइल लंपास

लॉजमध्ये थांबलेल्या ग्राहकाचा महागडा मोबाइल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना भाभानगर परिसरातील हॉटेल व्टेन्टी फोर ऑफ सेवन येथे घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भसुजीत खाटवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते भाभानगर परिसरातील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. मंगळवारी रात्री रूम नंबर एकमध्ये चोरीचा प्रकार घडला. अज्ञात चोरट्यांनी लॉजिंगच्या मागील दरवाजातून प्रवेश करीत कॉटवर ठेवलेले त्यांचे सुमारे २३ हजार ५०० रूपये किमतीचे पाच मोबाइल चोरून नेले. घटनेचा अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

--

आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पतीसह सासऱ्यास अटक केली. या प्रकरणी सदर महिलेच्या भावाने तक्रार दाखल दिली. अभिषेक बापूराव साळुंके व बापूराव यशवंत साळुंके (रा. विकास कॉलनी, वडाळा-पाथर्डीरोड) असे अटक करण्यात आलेल्या बापलेकाचे नाव आहे. नरेंद्र दादाभाऊ देशमुख (रा. वाढणे कॉलनी, म्हसरूळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. विकास कॉलनीत राहणाऱ्या प्रतीक्षा अभिषेक साळुंके या विवाहितेने मंगळवारी आत्महत्या केली. सदर आत्महत्येस पतीसह सासरची मंडळी जबाबदार असल्याचे देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. नव्याने घेतलेल्या फ्लॅटसाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीसाठी तिचा छळ होत होता. तसेच, पतीचे अनैतिक संबंध असल्याचे पुढे आल्याने संबंधितांनी बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पती सासऱ्यासह सासू सीमा साळुंके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.

--

चेहेडीला भरदिवसा घरफोडी

भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना चेहेडी गावात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर संतू सातपुते (रा. विश्वेश्वराय अपार्टमेंट, चेहेडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सातपुते कुटुंबीय बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेलकर करीत आहेत.

--

जुगार अड्ड्यावर छापा

जुने नाशिक भागातील चव्हाटा परिसरात एका घरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून सहा संशयित जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐहतेशान अली पीरजादे, आसिफ शेख शब्बीर, शेख आसिफ जिमल, शेख अरबाज फजल, अफजल अमीर पठाण आणि सगीर शेख शफिक (रा. सर्व भद्रकाली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. चव्हाटा येथील साईवाडा भागातील घर क्रमांक ३३४४ मध्ये हा अड्डा सुरू होता. बुधवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॉन्स्टेबल वसीम शेख यांच्या तक्रारीनुसार संशयितांवर जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटील तपास करीत आहेत.

--

दहाव्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

बांधकामाच्या साइटवर काम करीत असताना दहाव्या मजल्यावरून पडल्याने ६० वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गोविंदनगर भागात घडली असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधुकर हरी उगले (रा. शनी चौक, सातपूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. वझरेनगर येथे चंद्रमारुती बिल्डर्सतर्फे सुरू असलेल्या बांधकाम साइटवर हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दहाव्या मजल्यावर काम करीत असताना अचानक तोल जाऊन उगले खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने अनिकेत कोठावदे यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.

(लोगो : क्राइम डायरी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

0
0

नाशिक : तालुक्यातील हेगाव येथील योगेश मधुकर नवले (३५) या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. योगेशने बुधवारी (दि. २९) दुपारी अज्ञात कारणातून वालदेवी धरण परिसरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच मित्र गोपाळ गाडे यांनी त्यास तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमंडपांची तपासणी सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाल्याने गावठाणातील गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी सुरू केली आहे. मनपाने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमांची पूर्तता करणे सर्व गणेशोत्सव मंडळांना अनिवार्य आहे. मंडळांना नियमावलीत कोणतीही सूट देण्यात येणार नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकीकडे स्पष्ट केले, तर दुसरीकडे लागलीच मनपा अधिकारी, स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी मंडळांनी उभारलेल्या मंडपांची तपासणी मोहीम हाती घेतली.

महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या नियमावलीत जाहीर केल्यानुसार मनपाची विभागीय कार्यालये, शहर वाहतूक शाखा, स्थानिक पोलिस स्टेशन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी सर्व गणेश मंडळांच्या मंडपांची तपासणी करणार आहेत. तपासणीनंतर सर्व नियमांची पूर्तता केलेल्या गणेश मंडळांनाच मंडप उभारणी व गणेशोत्सवाची परवानगी देण्यात येणार आहे. सर्वाधिक पारंपरिक गणेशोत्सव मंडळे गावठाण भागात आहेत. त्यामुळे सरकारवाडा पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेचे अधिकारी यांसह मनपाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी जुने नाशिक परिसरातील गणेश मंडळांच्या मंडपाच्या जागांची पाहणी केली. अनेक मंडळांनी मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे. हे मंडप नियमांनुसार उभारले गेले की नाही, याची तपासणी करण्यात आली. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी तपासणीवेळी अधिकाऱ्यांनी मोजपट्टीचा आधार घेतला. नियमावलीनुसार मंडळांनी मंडपाच्या सर्व बाजूंनी दहा फूट जागा आहे का याची तपासणी करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये मंडप उभारताना रस्त्याला खड्डे पडलेले नसावेत. मंडप व कमान उभारताना खांब रोवण्यासाठी वाळूच्या ड्रमचाच वापर व्हावा. मंडपापासून १५ मीटरपर्यंतच विद्युत रोषणाई केलेली असावी. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना केलेल्या असाव्यात. या सर्व अटींची पूर्तता मंडळांनी कितपत केली आहे, याबाबतची तपासणी सुरू झाली आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या गणेश मंडळांनाच यंदाच्या वर्षी परवानगी देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एक खिडकी योजना

गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी उपविभाग स्तरावर नाशिक पोलिसांनी एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ हद्दीतील मंडळांसाठी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका आणि गंगापूर हद्दीतील मंडळांसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय विभाग -२ येथे, अंबड, सातपूर आणि इंदिरानगर हद्दीतील मंडळांसाठी अंबड पोलिस स्टेशनमध्ये तसेच नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प हद्दीतील मंडळांच्या परवनागीसाठी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुर्वे पुरस्कार; अर्जांचे आवाहन

0
0

नाशिक : येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे कविवर्य नारायण सुर्वे राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. मराठी साहित्यातील कथासंग्रह, कादंबरी आणि कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येक साहित्यकृतीसाठी रोख पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लेखकांनी आपले १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या आपल्या साहित्याच्या दोन प्रती सचिव, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजिनक वाचनालय, मानव सेवा केंद्र, सिंहस्थनगर, सिडको ४२२००९ या पत्त्यावर पाठवाव्यात. सोबत स्वत:चा परिचय व दोन पासपोर्ट फोटो पाठवावे. पुरस्कार वितरण १६ ऑक्टोबर रोजी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जयंतीदिनी नाशिकला होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images