Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विमानतळ रस्त्याचे काम मार्गी लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावा मैल ते ओझर विमानतळ या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याचा मोठा त्रास विमान प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करावे, असे साकडे 'निमा'च्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घातले आहे.

या मार्गावर ठिकठिकाणी विमानतळाचे दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. 'निमा'चे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, नितीन वागस्कर, 'निमा'च्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष मनीष रावल यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सिद्धार्थ तांबे आणि अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांची भेट घेतली, तसेच त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवर दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे बऱ्याचदा विमानतळाकडे जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. किमान २५ फलक शहरात येणाऱ्या विविध प्रदर्शनी भागात चौकांमध्ये आणि ठिकाणांवर बसविण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. विमानसेवेला प्रतिसाद लाभण्यासाठी विमानसेवेचा प्रचार व जनजागृती आवश्यक असल्याचे रावल यांनी यावेळी सांगितले. विमानतळावरून होणाऱ्या विमान उड्डाणांचे वेळापत्रक शहरातील किमान दहा ठिकाणी बसविण्यात यावे, विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सौंदर्यीकरण व्हावे, आग्रारोड ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिशादर्शक फलकांचे आणि विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सुशोभीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्य अभियंता तांबे आणि अधीक्षक अभियंता हांडे यांनी शिष्टमंडळाला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागपूरला बदली; काम नाशिकमध्ये!

$
0
0

नलिनी पाटील प्रतिनियुक्तीवर कार्यरत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाचखोरीच्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या उंटवाडीरोडवरील बालसुधारगृहाच्या अधीक्षक नलिनी काशिनाथ पाटील यांची पदोन्नतीने नागपूरला बदली झालेली असताना त्या प्रतिनियुक्तीवर नाशिकला कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. पाटील यांना निलंबित करण्याबाबतचे पत्र 'एसीबी'ने महिला व बाल कल्याण विभागाला पाठविले आहे.

बालसुधार गृहातील विधीसंघर्षित बालकास बालन्याय मंडळातून जामीन करून घेण्यासाठी तसेच पीओ लेटर देण्याकरीता कॅरम बोर्डाची मागणी करून तो स्वीकारणाऱ्या पाटील यांच्यासह क्लार्क प्रशांत उत्तम देसले या दोघांना 'एसीबी'च्या पथकाने मंगळवारी (दि.२१) अटक केली होती. नलिनी पाटील काही वर्षांपूर्वी वात्सल्य येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. तेथून त्यांची बदली परिविक्षा अधिकारी म्हणून ठाणे येथे झाली. ठाणे येथून मागील वर्षीच्या अखेरीस पदोन्नतीने त्यांना नागपूर येथे जिल्हा परिविक्षा अधिकारी म्हणून पाठवण्यात आले. मात्र, दोन ते तीन महिन्यांतच त्या प्रतिनियुक्तीने पुन्हा नाशिकला हजर झाल्यात. पदोन्नतीने मिळालेले पद डावलून त्या कमी महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहण्यास इच्छूक होत्या. सहा महिन्यांपूर्वी हजर झालेल्या पाटील यांना 'एसीबी'ने अटक केल्यामुळे प्रतिनियुक्तीचा मुद्दा, त्यात होणारे गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, 'एसीबी'ने कोर्टात हजर केले असता पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर पाटील यांच्यावतीने जामीन अर्ज सादर करण्यात आला.

पीओ लेटरच महत्त्वाचे

गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येते. या विधीसंघर्षित बालकांवर बाल न्याय मंडळासमोरच खटला चालतो. बालकांना जामीन देणे अथवा बालसुधारगृहातच ठेवण्याबाबतचा अहवाल संबंधित अधिकारी देतात. याच पत्राआधारे बाल न्याय मंडळ आपला निर्णय घेते. पाटील यांच्या प्रकरणात हेच कारण महत्त्वाचे ठरले.

नलिनी पाटील यांच्या घराची झडती मंगळवारीच पूर्ण झाली. मात्र, त्यात फारसे काही आढळून आले नाही. पाटील यांना निलंबीत करण्याबाबतचे पत्र महिला व बाल कल्याण विभागाला सादर करण्यात आले आहे.

- पंजाबराव उगले, अधीक्षक, 'एसीबी'

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योजगता विकास’वर फार्मसीत कार्यशाळा

$
0
0

'उद्योजगता विकास'वर फार्मसीत कार्यशाळा

पंचवटी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि उद्योगवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे उद्योजगता विकास या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळेस संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २३) प्रारंभ झाला. या कार्यशाळेत ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळच्या सत्रात रवींद्र झोपे व सौरभ केऱ्हाळकर यांनी, तर दुपारच्या सत्रात उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक यांनी मार्गदर्शन केले. डॉ. महाजन यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. आर. एस. भांबर, उपप्राचार्य डॉ. एस. के. महाजन, डॉ. टी. एन. लोखंडे आदी उपस्थित होते. डॉ. टी. एन. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. आज, शुक्रवारी (दि. २४) वात्सल्य फार्माचे संचालक डॉ. संजीवन देवधर, अमित राठी व पंकज घाडगे मार्गदर्शन करतील.

--

संशयितास कोठडी

नाशिकरोड : पत्नीशी अनैतिक सबंध ठेवल्याच्या रागातून संदीप मरसाळे (वय २९) याचा खून करणारा संशयित आरोपी दीपक पगार (वय ३५) याला गुरुवारी पोलिसांनी नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठ्डी सुनावल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली. दीपक पगार याने बुधवारी संदीप मरसाळे याचा एकलहरे-गंगावाडी रस्त्यावर पवारवाडी परिसरात डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

---

पॉइंटर्स...

---

पदरावरती जरतारीचा... २

खड्ड्यांनी रस्त्याची चाळण... ३

संरक्षक भिंतीसाठी 'दावा'... ४

भीतीचा ज्वालामुखी ...५

नाकावरच्या रागाला औषध काय? ...६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाकरराव देशमानकर

$
0
0

प्रभाकरराव देशमानकर

मनमाड : येथील निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकरराव देशमानकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील व्यावसायिक व भाजप कार्यकर्ते विनोद देशमानकर यांचे ते वडील होत.

फोटो मेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांप्रश्नी उच्च न्यायालयात धाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली असून, विश्वस्तांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे विश्वस्तांनी ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली असून, उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील मोकळ्या भूखंडांवरील ७१ धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी आज, शुक्रवारी (दि. २४) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली. महापालिकेने शहरातील मोकळ्या भूखंडावरील ७१ धार्मिक स्थळे, तसेच सन २००९ पूर्वीची शिल्लक ५७४ धार्मिक स्थळांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, त्यात ७१ धार्मिक स्थळे ही ३१ ऑगस्टपूर्वी काढावी लागणार आहेत, तर ५७४ धार्मिक स्थळांसाठी तीन महिन्यांची मुदत मागण्यात आली आहे. महापालिकेने ७१ धार्मिक स्थळे काढण्याची प्रक्रिया सुरू केल्याने विश्वस्तांनी या कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांना वाचविण्यासाठी थेट उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विश्वस्तांतर्फे विनोद थोरात, प्रवीण जाधव, कैलास देशमुख यांच्याकडून शुक्रवारी उच्च न्यायालयात स्थगिती याचिका दाखल केली जाणार आहे. त्यासाठी सर्व धार्मिक स्थळांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन दिनकर पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी अटलजींचे पाच गुण घ्यावेत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पाच किलोमीटर चालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाच गुण जरी घेतले असते तरी त्याचा १२५ कोटी जनतेला फायदा झाला असता, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींवर केली. 'संविधान बचाओ.. देश बचाओ' कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, की देशात संविधानिक मुद्द्यांना हरताळ फासण्याचे काम होत आहे. देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आरक्षणावर गदा आणण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. देशात महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. बालके सुरक्षित नाहीत. दारिद्र्य व आदिवासींचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज आहे. 'सनातन'चे आरोपी पाच वर्षे सापडले नाहीत, कर्नाटक सरकारने आरोपी पकडल्यानंतर त्याचा सुगावा महाराष्ट्रात लागला. त्यानंतरही त्यावर कोणतेही भाष्य नाही. 'सनातन'च्या लोकांकडे बॉम्ब सापडले. त्यांनी कुणाच्या हत्येचा कट रचला होता, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी.

कुठलेही आरोप सिद्ध झाले नसताना भाजप सरकारने छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबले. सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचेही ते म्हणाले. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

फौजिया खान यांची टीका

माजी मंत्री फौजिया खान म्हणाल्या, की देश उभा करण्यासाठी माणसाला माणूस जोडणे आवश्यक आहे. हे बांधून ठेवण्याचे काम संविधान करते. संविधानाने ते अधिकार दिले आहे. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत द्वेष पसरविला जात असून, माणसाला माणसापासून तोडण्याचे काम होत असल्याची टीका त्यांनी केली. या पद्धतीने सरकारचे काम चालले तर संविधान धोक्यात येईल. त्यामुळे देश टिकण्यासाठी बंधुतेची गरज असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या दोन लेकरांसाठी मला न्याय द्या हो...

$
0
0

शिक्षकांच्या दरबारात फुटली समस्यांची कोंडी

..

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendra@MT

..

नाशिक : अपघाताने अंथरुणाला खिळलेल्या शिक्षकाला विश्वासात न घेता त्याचे परस्पर समायोजन केले गेले. ज्या संस्थेत त्यांना समायोजित केले तेथे अनुकंपा तत्त्वावर त्यांची पत्नी या नात्याने मी केलेला दावाही फेटाळून लावण्यात आला. मला धुणी-भांडी करण्याचा अन् मशिन चालविण्याचा सल्ला दिला गेला. मी अनेक दिवसांपासून ढिम्म व्यवस्थेकडे न्याय मागते आहे. माझ्यासाठी नाही हो; पण माझ्या दोन छोट्याश्या लेकरांसाठी मला न्याय द्या...!, अशी आर्त विनवणी करताना एक अपघातग्रस्त शिक्षक पत्नीच्या अश्रूंचा बांध शिक्षक दरबारातच फुटला.

या प्रकरणी संबंधित संस्थेला शिक्षणाधिकाऱ्यांनी त्वरित भेट देऊन चौकशी करावी, आवश्यकता असल्यास त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मी प्रश्न मार्गी लावेल, असे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी समस्या मांडणाऱ्या महिलेस दिले. यासारख्या अनेक समस्यांची कोंडी ओढा परिसरातील मातोश्री इंजिनीअरिंग कॉलेज येथे आयोजित शिक्षक दरबारात फुटली. प्रशासकीय पातळीवर आवाक्यात असणाऱ्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी दरबारात उपस्थित शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंदी घेतल्या.

एका निवृत्त शिक्षणाधिकाऱ्यावरही यावेळी एका शिक्षकांनी दरबारात जाहीर आरोप केला. त्यांच्या कार्यकाळात या शिक्षकांच्या विद्यालयात त्यांच्या नातेवाईकांचा भरणा केला गेला अन् नियमानुसार सेवाज्येष्ठतेस पात्र असतानाही सलग आठ वर्षांपासून मुख्याध्यापक पदापासून डावलले गेले. संस्थेकडून मानसिक छळ होत असल्याचे सांगताना, या शिक्षकांचा कंठही दाटून आला.

..

डोळे विस्फारणाऱ्या शेकडो तक्रारी

आणखी एका प्रकरणात पतीच्या निधनानंतर एका तालुक्यातील संस्थेने पद नसल्याचा बहाणा करून अनुकंपा तत्त्वावर पत्नीस नोकरी नाकारली व इतर उमेदवाराची शिपाईपदावर वर्णी लावली. एका संस्थेने कर्मचाऱ्याला त्याच्या हक्काची सेवाज्येष्ठता देण्यासाठी दोन लाखांची मागणी केली किंवा लेखाधिकाऱ्यांकडून चिरीमिरीसाठी होणारी मागणी अशा डोळे विस्फारणाऱ्या शेकडो तक्रारी नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित शिक्षक दरबारात जाहीरपणे मांडल्या गेल्या अन् वर्षानुवर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसणाऱ्या शिक्षकांच्या समस्यांची कोंडी फुटली.

- शिक्षकांकडून तक्रारींचा पाऊस...७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक करणारा तरुण अखेर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खोट्या नावानिशी कामाला लागायचे, मालकाचा विश्वास बसला की धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करून पैसे लाटायचे, अशी मोडस आपरेंडी असलेल्या एका संशयित तरुणास भद्रकाली पोलिसांनी ठाणे येथून शिताफीने अटक केली. बिल्डर आणि डेव्हलपर्सला अशा प्रकारे टोपी घातल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध चार ते पाच गुन्हे दाखल आहेत.

रतेश विश्राम कर्डक (३२, रा. शिवतेजनगर, पेठरोड, पंचवटी) उर्फ धीरज मदनराव मत्सागर असे या संशयिताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संशयिताने मस्तागर हे बनावट नाव धारण करून शरणपूररोडवरील कुलकर्णी गार्डनसमोर राहणाऱ्या संजीव नवाल यांची फसवणूक केली. नवाल यांचा धनादेश चोरी करून संशयिताने ६० हजार रुपये परस्पर काढून घेतले होते. या गुन्ह्याचा तपास करताना भद्रकाली पोलिसांनी रतेशला ठाणे येथील नौपाडा येथून अटक केली. संशयित विविध बिल्डर्सकडे ड्रायव्हर अथवा ऑफिस बॉय म्हणून कामाला लागतो आणि नंतर धनादेश चोरी करून पैसे लंपास करतो. त्याच्याविरुद्ध भद्रकालीत तीन, गंगापूरला दोन तर अंबड पोलिस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंत्रणांच्या फसवणुकीची ‘हाइट’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आनंदवली शिवारातील स्वागत हाइट्स या इमारतीला चार वर्षांपूर्वी पूर्णत्वाचा दाखला देताना महापालिकेनेच नियमांची मोडतोड केली आहे. मूळ प्लॅनमध्ये १४ सदनिका असताना, प्रत्यक्ष नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून १६ सदनिका केल्या. तसेच नगररचनाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय घुगे, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक विनोद पटेल, प्रेमजी पटेल व संजय पटेल यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, महासभेत आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी दिला आहे.

चार वर्षांपूर्वी महापालिकेनेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या आनंदवली शिवारातील स्वागत हाइट्स या इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक नियम व एफएसआयचे उल्लंघन झाल्याचे कारण देत महापालिकेने ही इमारत बेकायदेशीर ठरविली. चौदा सदनिकांचा पाणीपुरवठाही बंद केला. त्यामुळे लाखो रुपये बिल्डरला अदा करूनही नागरिकांवर आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने २०१३-१४ मध्ये या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर तेथे रहिवासी वास्तव्याला आले. मूळ प्लॅनमध्ये १४ सदनिका मंजूर असताना, बिल्डरने १६ सदनिकांचे बांधकाम केले. तरीही त्याला नगररचनाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. मात्र, रहिवाशांकडूनच इमारतीचे क्षेत्रफळ मोजण्यात आल्यानंतर दस्तऐवजामध्ये दर्शविलेल्या एकूण क्षेत्रफळापैकी १५६ चौरस फूट कमी आढळून आले. माहितीच्या अधिकारात अपार्टमेंटचे दस्तऐवज मिळविण्यात आले असता, सुधारित नकाशा नगररचना विभागाकडे आढळून आला. त्यात नगररचना विभागाने नियमबाह्य १२५ चौरस मीटरचे अनधिकृत गाळे मंजूर केल्याचे आढळून आले आहे. इमारतीचा भूखंड भोगवटा वर्ग दोनचा असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नजराणा न भरताच बिनशेतीचा दाखला देण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. लिफ्टच्या आजूबाजूचे क्षेत्रफळ व ओपन स्पेसही विकण्यात आले आहे. रहिवाशांच्या विनंतीनुसार अग्निशामक दलाने इमारतीची उंची मोजली असता ती १५.२० मीटर आढळली. त्यामुळे अग्निशामक विभागाने ही इमारत बेकायदेशीर ठरवल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या यंत्रणांचा दोष असताना, नागरिकांना मात्र त्रास दिला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

या प्रकाराला कोण जबाबदार?

संबंधित बिल्डरांवर कारवाई करण्याऐवजी महापालिका मात्र नागरिकांना छळत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व चुकीच्या प्रकाराला नगररचनाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय घुगे, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांचे पाठबळ असून, या यंत्रणांकडून बांधकाम व्यावसायिक विनोद पटेल, प्रेमजी पटेल व संजय पटेल यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप विजय जाधव यांनी केला आहे.

महासभेत आंदोलन : शेख

नगररचना विभागाने संबंधित इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी इमारतीची उंची व एफएसआय क्षेत्रफळ मोजणे अपेक्षित होते; परंतु इमारतीची उंची व एफएसआय क्षेत्र न मोजताच परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी केला आहे. नगररचना विभागाने उंची मोजली असती तर हा सगळा प्रकार अगोदरच समोर आला असता. मात्र, बिल्डर आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून रहिवाशांची फसवणूक केली आहे. अग्निप्रतिबंधक साधने लावली नसताना दाखला दिलाच कसा, असा सवाल शेख यांनी केला. बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप शेख यांनी केला असून, महासभेतच या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अशी ठरली इमारत बेकायदेशीर

१४ सदनिकांना मंजुरी असताना १६ सदनिकांचे बांधकाम

एकूण क्षेत्रफळापैकी १५६ चौरस फूट क्षेत्रफळ आढळले कमी

अनधिकृत १२५ चौरस मीटरचे गाळे नगररचनाकडून मंजूर

इमारतीची उंची १५.२० मीटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधीक्षक पाटील यांचा जेल मुक्काम वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कॅरमबोर्डची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील आणि लिपिक प्रशांत देसले यांचा जामीन अर्ज आज, कोर्टाने फेटाळून लावला असून, अंतिम निर्णयाबाबत २९ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे दोघांचा सेंट्रल जेलमधील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, कोर्टाने आपला आदेश सुनावल्यानंतर पाटील यांच्या तब्येतीत बिघाड झाला असून, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. २१) उंटवाडीरोडवरील बालनिरीक्षणगृहातच सापळा रचून अटक केली होती. 'एसीबी'कडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या मुलास बाल न्यायमंडळाच्या आदेशाने उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले होते़ या मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी बालनिरीक्षणगृह अधीक्षक यांच्याकडून पीओ लेटर देण्यासाठी व जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी अधीक्षका पाटील व लिपिक देसले यांनी कॅरमबोर्डची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने 'एसीबी'कडे तक्रार केली होती़

निरीक्षणगृहाच्या अधीक्षक कार्यालयातच कॅरमबोर्ड स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले होते. या दोघांनाही बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची लागलीच नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आले. पाटील यांच्यावतीने लागलीच कोर्टात जामीन अर्ज सादर करण्यात आला. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने २९ ऑगस्टरोजी पुढील तारीख दिली. दरम्यान, पाटील यांच्यासह देसले यांच्या अटकेने महिला व बालकल्याण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 'एसीबी'ने संबंधितांना निलंबित करण्याबाबत पत्र दिले असून, हा विभाग याबाबत काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नलिनी पाटील मागील १० ते १२ वर्षांपासून नाशिकमध्येच कार्यरत आहेत. यापूर्वी उंटवाडीरोडवरील बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षका म्हणून कार्यरत असताना देखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूचा कहर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकनगुणियासह साथींच्या आजारांनी मुक्काम वाढवत अक्षरश: थैमान घातले आहे. जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचा कहर वाढला असून, तीन आठवड्यांतच डेंग्यूबाधितांची शंभरी पार होऊन बाधितांचा आकडा ११४ वर पोहोचला आहे. संशयितांचा आकडा ३१४ वर गेला आहे. त्यामुळे डेंग्यू महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र असून, सरकारी व खासगी रुग्णालये साथीच्या आजारांमुळे फुल्ल झाली आहेत. साथींच्या आजारांमुळे शहर कोमात गेले असताना सत्ताधारी आणि प्रशासन सत्तेत मशगुल असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू, स्वाइन फ्लू व चिकनगुणियाचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषत: सलग तिसऱ्या वर्षी नाशिकमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाची रिपरीप सुरू झाल्याने डेंग्यूसोबतच चिकनगुणिया, स्वाइन फ्लू, मलेरियासह साथीच्या आजाराने तळ ठोकला असून, संपूर्ण शहरातच या आजारांनी थैमान घातले आहे.

जुलै महिन्यातच सर्वाधिक ८४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने या आजाराचा वाढता प्रादूर्भाव चिंतेचा विषय ठरला होता. जानेवारीत ७८ संशयितांपैकी ९, फेब्रुवारीत ५५ पैकी ११, मार्चमध्ये ३८ पैकी ८, एप्रिलमध्ये २७ पैकी ३, मेमध्ये ५६ पैकी १८, तर जून महिन्यात १४३ पैकी सर्वाधिक ६८ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. जुलै महिन्यात तर डेंग्यूने कहरच माजवला असून, तीन आठवड्यांत डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरीपार गेला आहे. एकूण ३१४ संशयितांपैकी बाधितांची संख्या ११४ वर गेली आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती झाल्याने डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली आहे. सातपूर, सिडको व पंचवटी भागातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यू संशयितांचा आकडा ११६४ पर्यंत पोहोचला असून, बाधितांचाच आकडा ३३४ पर्यंत पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्यात चिकनगुणियाचे ३७ संशयित आढळले असून त्यापैकी १७ जण बाधित असल्याचे समोर आले आहे. स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. मलेरिया, व्हायरल फ्लूसारख्या साथीच्या आजारांनीही थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रशासन, सत्ताधारी मशगुल : बोरस्ते

शहरात एका घराआड साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना महाापलिकेतील सत्ताधारी व प्रशासन सत्तेत मशगुल असून, चमकोगिरी करण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. शहरात आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासन आणि सत्ताधारी बळी जाण्याची वाट पाहत असल्याचा हल्लाबोल बोरस्तेंनी केला. महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन नियोजन करणे अपेक्षित असताना, त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. कर्मचारीसंख्या कमी असेल तर त्याबाबत तातडीने निर्णय घ्या; पण नागरिकांचा जीव वाचवा, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय कार्यालयांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत आहेत. डेंग्यूची माहिती देणाऱ्यांनाच नोटिसा बजावून माहिती बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाते. आरोग्य समिती फक्त नावालाच असल्याचा टोला लगावत, स्मार्ट नको; पण नाशिक स्वच्छ व सुरक्षित करा, असा टोला त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसून, काम जमत नसेल तर पायउतार व्हा, असे आव्हान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

जुलै महिन्यातच सर्वाधिक ८४ जणांना डेंग्युची लागण झाल्याने या आजाराचा वाढता प्रादूर्भाव चिंतेचा विषय ठरला होता.

जानेवारी ७८- ९

फेब्रुवारी ५५- ११

मार्च ३८ - ८

एप्रिल : २७- ३

मे ५६- १८

जून- १४३ - ६८

जुलै ३१४- ११४

११६४ संशयित रुग्ण

३३४ जणांना डेंग्यू

(जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या आठ महिन्यांतील स्थिती)

ऑगस्टमधील स्थिती

१७

चिकनगुणियाचे रुग्ण

०९

स्वाइन फ्लूचे रुग्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिखाण पारदर्शक असावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लेखकाच्या जगण्यात गडबड असावी, मात्र त्याच्या लिखाणात पारदर्शीपणा असावा. लिखाण करताना त्याने रिअॅलिटीचे भान बाळगून नव्हे, तर आपल्याला हवे तसे, जसे वाटते तसे लिहीत जावे, असा सल्ला ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी दिला.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकातील स्वागत सभागृहात या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. लेखक चंद्रकांत पाटील यांनी मुलाखत घेतली. श्याम मनोहर म्हणाले की, आपला आणि बाहेरच्या जगाशी असलेला संबंध कसा असावा यावर काही अवलंबून नाही. एखाद्या गोष्टीवर राग येत असेल तर तो येऊ द्यावा. राग का येतो, तो मेंदूतून येतो की, पायातून येतो याचा विचार करत बसू नये. लेखकानेही लिहिताना रिअॅलिटीचा विचार करू नये. आपल्याला हवं तसं लिहीत जावं. एकवेळ जगण्यात गडबड असली तरी चालेल, मात्र लिखाणात पारदर्शीपणा असायला हवा, असेही ते म्हणाले. कोणत्याही गोष्टीचा विकास हा चिकित्सेने होतो. शास्त्र, अध्यात्म, कला यांच्या निर्मितीत चिकित्सा व्हायलाच पाहिजे. तरच त्यात प्रगल्भता येते. संस्कृती या विषयावर बोलताना ते म्हणाले की, संस्कृतीचे आपल्याकडे अनेक प्रकार आहेत. ब्राह्मणी संस्कृती, आदिवासी संस्कृती. संस्कृतीच्या अनेकांनी विविध व्याख्या केल्या आहेत. पूर्वी सभ्यता हा शब्द आपल्याकडे रुढ नव्हता. काहीतरी चांगलं जगावं, चांगल करावं अशा रुढी होत्या. ती एक जगण्याची पद्धत होती. कुतुहलाचे उत्तर शोधणे म्हणजे संस्कृती असल्याचे ते म्हणाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रास्ताविक सुनील तांबे यांनी केले. पहिली मुलाखत ज्येष्ठ साहित्यिक अशोक शहाणे यांची घेण्यात आली. दुसरा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये होत आहे. दर महिन्याला अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड सारख्या सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यात गेल्या १५ दिवसांत तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. तहसील कार्यालयाने शहानिशा करून त्याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६१ झाली आहे.

बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडकडे यंदा पावसाने पाठ फिरविली आहे. सरासरीच्या निम्मा पाऊसही येथे झालेला नाही. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळू लागला आहे. तालुक्यात ९ ते १९ ऑगस्ट या १० दिवसांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी प्राप्त झाला. यामध्ये रामदास पांडुरंग बिरार (वय ६३, रा. उगाव) आणि योगेश भरत खैरे (वय ३५, रा. नांदुर्डी) यांनी लोहमार्गावर उडी मारल्याच्या घटना ९ आणि १९ ऑगस्टला घडल्या. तर १४ ऑगस्टला शशिकांत पंडित भोसले (वय ३९, रा खडक माळेगाव) या तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६१ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोरूची मावशी’चे नाशिकला सर्वाधिक प्रयोग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्या नाटकाने विजय चव्हाण या नटाला अजरामर केले त्या 'मोरूची मावशी' नाटकाचे नाशिकला राज्यात सर्वाधिक प्रयोग झाले होते. नाशिकला कधी तारीख मागितली आणि विजय चव्हाण यांनी ती दिली नाही, असे कधीच झाले नाही. अशी आठवण नाट्यक्षेत्रातील व्यवस्थापक जागवतात. अशा या अवलिया कलाकाराचे शुक्रवारी निधन झाले. नाशिकमध्ये त्यांच्या अनेक आठवणी आहेत.

कालिदास कलामंदिरात नेहमी नाटकासाठी विजय चव्हाण यायचे तेव्हा अगदी हसून-खेळून रहायचे. त्यांच्या विनोदबुद्धीला सलाम करावा अशी ती होती. कोणत्याही बाबतीत हजरजबाबी, विनोद, हसून खेळून काम करणे हे त्यांचे ठरलेले होते. त्यांचे विशेष सांगायचे म्हणजे मेकअप रूममध्ये त्यांना भेटायला कुणी आले तर त्यांनी कधीही खांद्यावरचा पदरही ढळू दिला नाही इतके ते मोरूची मावशीच्या भूमिकेशी समरस झालेले होते. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सहकारी वृत्तीचा माणूस

साधारण १९९२-९३ च्या कालावधीत आम्ही विजय चव्हाण यांना घेऊन एक टेलिफिल्म केली होती. 'एकच नट; अनेक सम्राट' असे तिचे नाव. त्यात डॉ. श्रीराम लागू, प्रेमा किरण यांच्याही भूमिका होत्या. रात्रीचे शूटिंग होते, पूर्ण रात्रभर शूट म्हटल्यावर सगळ्यांच्या कपाळावर आठ्या होत्या. रात्र जाणार कशी परंतु विजय चव्हाण आले आणि तेथील नूरच बदलला. विनोद सुरू झाले, त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतले. त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. दादा भोईरांनीदेखील त्यांच्यासोबत काम केले होते. त्यांची अत्यंत सहकारी वृत्ती होते.

- नंदा रायते, रंगकर्मी

विनोदाचा बादशहा

एखादी भूमिका एखाद्या नटासाठी जन्म घेते हे 'मोरूच्या मावशी' नाटकावरून सिद्ध केलेले विजय चव्हाण ती भूमिका अक्षरश: जगले. त्यांनी या भूमिकेने महाराष्ट्राला वेगळा आनंद दिला. नोकरी, नाटक आणि सिनेमा हे त्यांनी लिलया सांभाळले. नाटकाला कधीही उशिरा आले नाही. नाशिकला 'मोरूची मावशी'चा आठवड्यातून एकदा तरी प्रयोग असायचाच. असा विनोदाचा बादशहा पुन्हा होणे नाही.

- जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

कुटुंबाप्रमाणे काळजी घेत

'महिमा खंडोबाचा' या चित्रपटात मी त्यांच्या कजाग पत्नीची भूमिका केली होती. पुण्याजवळचे नेर येथे हे शूटिंग झाले होते. त्यांनी मला भूमिकेतील बारकावे समजावून सांगितले. सेटवर काम करताना त्यांनी कधीही ते फार मोठे नट आहेत, असे जाणवू दिले नाही. जेवण, चहा या गोष्टींसाठी त्यांनी कधीही आम्हाला टाळले नाही. शूटिंगमध्ये मी व्यग्र असेल तर मामा जेवणासाठी थांबून रहायचे. कुटुंबातील एखादा सदस्य असावा, अशी काळजी ते घ्यायचे. मी त्यांच्याबरोबर काम केले हे माझे भाग्य होते.

- शुभांगी पाठक, अभिनेत्री

सहृदयी मित्र गमावला

विजय चव्हाण अष्टपैलू अभिनेते होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट भूमिका केल्या. त्यांच्यासोबतचा खूप चांगला अनुभव मला आहे. एक मित्र म्हणून, एक अभिनेता म्हणून त्यांचे योगदान मोलाचे होते. त्यांच्यासारखे विनोदाचे टायमिंग कुणाकडेच नव्हते. चित्रपट तसेच रंगभूमी गाजवणारा माणूस आज गेला.

- राजेंद्र जाधव, नाट्यव्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिओ’ लेकिन जीने न दो!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या 'जिओ' कंपनीने थेट केबलसेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयाने नाशिकमधील बाराशे केबल ऑपरेटर्स आणि त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होणार असून, त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. दरमहा दोन कोटींच्या महसुलावरही पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे जिओविरोधात राजकीय पक्षांनीच दंड थोपटले आहेत. केबल ऑपरेटर्सच्या पाठिशी मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष उभे राहिले असून, या सेवेला नाशिकमध्ये तीव्र विरोध केला आहे. मुंबईत जिओविरोधात आज (दि. २५) शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील केबल ऑपरेटर्सची बैठक होत असून, या बैठकीनंतर राज्यभर तीव्र आंदोलन सुरू केले जाणार आहे.

'जिओ'ने दूरसंचार क्षेत्रात बड्या मोबाइल कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढली असून, मोफत सेवा देण्याच्या निर्णयामुळे कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. आता जिओने ग्राहकांना थेट केबल सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच कनेक्शनमधून दूरचित्रवाहिन्या व इंटरनेट सेवा दिली जाणार असल्याने सध्याच्या केबल चालकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. मुंबईनंतर पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी कंपनीकडून ठिकठिकाणी फायबर ऑप्टिक्स टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 'जिओ'च्या क्रांतीमुळे नाशिकमधील केबल चालक व त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहर व परिसरात तब्बल १२०० केबल ऑपरेटर्स आहेत. त्यांच्याकडे काम करणारे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी आहेत. या सर्वांचे रोजगार धोक्यात आले आहेत. त्यामुळे मनसे, राष्ट्रवादी, शिवसेनेने या केबलसेवेविरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने मुंबईत 'जिओ'च्या केबल उखडून टाकल्या आहेत, तर शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शनिवारी रंगशारदा नाट्यगृहात दुपारी एक वाजता राज्यातील केबल ऑपरेटर्सचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यानंतर जिओविरोधातील आंदोलन राज्यभर तीव्र केले जाणार आहे.

दोन कोटींवर पाणी

नाशिक जिल्ह्यातील केबल ऑपरेटर्सकडून सरकारला दरमहा दोन कोटी रुपयांचा करमणूक कर दिला जातो. जिओकडून सुरुवातीला मोफत सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दरमहा मिळणारा दोन कोटींच्या करमणूक करावरही पाणी सोडावे लागणार आहे. एकाच कंपनीची मक्तेदारी तयार होऊन ग्राहकांना विशिष्ट वाहिन्या बघण्याच्या अधिकारावरही गदा येण्याची शक्यता आहे.

'मेक इन इंडिया'च्या नावाखाली सध्या केवळ बड्या उद्योगपती मित्रांचे पोट भरण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकार राबवत आहे. अशा 'मेक इन अंबानी' धोरणाला आमचा विरोध आहे. कंपनीला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही.

-रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

एकीकडे लाखो रोजगार दिल्याचा दावा केला जातो आणि दुसरीकडे लोकांचेच रोजगार बड्या उद्योगपतींचे पोट भरण्यासाठी हिसकावले जात आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे स्वत: रिंगणात उतरले असून, राज्यभर याविरोधात आंदोलन केले जाणार आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही मनसेची भूमिका आहे. परंतु, बाहेरील कंपन्या स्थानिकांचे रोजगार हिरवण्याचे काम करीत,असतील तर त्यांना मनसेस्टाइल धडा शिकवला जाईल.

- अॅड. राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्ष संघटन मजबूत करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पक्ष संघटन मजबूत असेल, तर आपण निवडणूक जिंकू शकतो. त्यासाठी स्थानिक पातळीवरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने व नि:स्वार्थी भावनेने काम करावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नाशिक जिल्हा पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ पोथारे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख कैलास हळनोर, जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण आव्हाड, शहरप्रमुख डॉ. उल्हास कुटे, डॉ. विजय थोरात, भागवत सापनर, नवनाथ शिंदे, शमशाद खान, महिला अध्यक्षा वनिता जाधव आदींसह जिल्ह्यातील तालुकाप्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचा दि. २९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे पंधरावा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात शिवाजी पार्क, मुंबई येथे अकरा लाख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही जानकर यांनी सांगितले. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ बांधणी करून पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ पोथारे, शहरप्रमुख डॉ. विलास कुटे आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीपात्राची स्वच्छता

$
0
0

\Bनंदिनीपात्राची स्वच्छता\B

जेलरोड : नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजनेच्या विद्यार्थ्यांनी नंदिनी (नासर्डी) नदीची लोकसहभागातून स्वच्छता केली. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या पुढाकाराने नंदिनी रक्षक उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत ही स्वच्छता करण्यात आली. त्याबद्दल प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत खेमनर, दर्शन पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल ताजनपुरे, अमित पवार आदी उपस्थित होते.

--

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

नाशिकरोड : परिसरातील अनेक मोकळ्या भूखंडांवर पावसाच्या पाण्याची डबकी साचलेली आहेत. झाडे-झुडपे आणि रानगवतही फोफावले आहे. काही ठिकाणी प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात पडून आहे. या कचऱ्यात पावसाचे पाणी साचलेले असल्यानेही डासांसह डेंग्यूच्या अळ्यांचा प्रादुर्भाव परिसरात वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरीदेखील मलेरिया विभागाकडूनही शहरातील सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

मुदतीत जातप्रमाणपत्र सादर न केलेल्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचे पद धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामध्ये चांदवडच्या नगराध्यक्षांसह अन्य काही लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना सहा महिन्यांच्या आत जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. कोल्हापूर महापालिकेतील १९ नगरसेवकांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निकालाविरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून पदे रद्द करण्याचे आदेश दिले. नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमधील नऊ नगरसेवकांनाही या आदेशाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामध्ये चांदवडच्या नगराध्यक्षा रेखा गवळी, सटाणा नगरपालिकेतील भारती सूर्यवंशी, मन्सुरी शमा आरिफ, बाळू बागुल व लता सोनवणे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सिन्नर नगरपालिकेतील रखमा मुठे व ज्योती वामने यांचेही पद रद्द होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. येवल्याच्या पुष्पा गायकवाड यांनी प्रमाणपत्रच दिले नसून मनमाडच्या शेख यास्मीन रफीक आणि नांदगावच्या चांदनी खरोटे यांनी प्रमाणपत्राची पोच पावती जमा केल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेने यापूर्वीच या सर्व सदस्यांचे प्रस्ताव सरकारकडे सादर केले असून, सरकार काय निर्णय घेते याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन समुहाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

देवभूमी केरळमध्ये वादळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. वादळीपावसामुळे निम्म्याहून अधिक केरळ राज्याची मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची वानवा झाली. केरळमधील नागरिकांना मानवतावादी मूल्यांतून मदतीचा हात देण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने पुढाकार घेतला आहे.

जैन इरिगेशनच्या माध्यमातून जैन फार्मफ्रेश फुडस लि. आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनद्वारे कांदे, मसाले, फळयुक्त आहार असे खाद्यपदार्थ पाठविले जाणार आहेत. बुधवारी रात्री एर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधून २० हजार किलो मसाले भरलेली एक वॅगन पाठवण्यात आली. २२ हजार किलो निर्जलिकृत कांदे भरलेली दुसरी वॅगन शनिवारी पाठवण्यात येईल. त्यानंतर उद्या आणि परवापर्यंत आणखी ३ वॅगन्स भरून खाद्यपदार्थ पाठविले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजनांसाठी ३६७ कोटींचा निधी

$
0
0

जिल्ह्यात २९४ गावांसाठी २१८ योजनांना मिळाली मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा देत या वर्षी सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये २९४ गावांसाठी २१८ पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. याबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांची दिल्ली येथे लोणीकरांनी २३ डिसेंबर २०१७ रोजी भेट घेतली व ही बंदी उठविण्याची मागणी केली. केंद्र शासनाने सन २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे सन २०१८-१९ चा आराखडा तयार करण्यात आला.

आराखड्यामध्ये जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार एकनाथ खडसे यांनी सुचविलेल्या सर्व योजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणी प्रमाणे योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजना राबविण्यासाठी एकूण ३६७ कोटी ६३ लाख रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे २ वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी २२ कोटी ६३ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा ३१० गावे/वाड्यांसाठी २३३ योजनांसाठी एकूण ३९० कोटी २६ लाख रुपये निधीचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आला आहे.

सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यांमध्ये सर्व गावे हागणदारीमुक्त झाल्यामुळे जिल्ह्यांतील जास्तीत जास्त गावांचा समावेश लोणीकरा यांनी सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात केला आहे. याद्वारे जिल्ह्यातील जवळपास सर्वच टँकरग्रस्त गावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. या प्रकारे या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत बांधलेल्या शौचालयांना निधी असे एकत्रित मिळून जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून ६७१ कोटी ३३ लक्ष रूपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय मंजूर योजना

तालुका-गावे-योजना-किंमत

अमळनेर-७६-२३-७३ कोटी ४६ लक्ष

भडगाव-१६- १५-१५ कोटी ६९ लक्ष

भुसावळ-३-३-३१ कोटी ५१ लक्ष

चाळीसगाव-३३-२८-३७ कोटी १५ लक्ष

चोपडा-२६-१७-५१ कोटी ८३ लक्ष

धरणगाव-१२-११-८ कोटी १७ लक्ष

एरंडोल-१३-१२-५ कोटी ९० लक्ष

जळगाव-१४- १४-१४ कोटी ५२ लक्ष

जामनेर-१९- १८-५३ कोटी ९४ लक्ष

मुक्ताईनगर-५-५-७ कोटी ८५ लक्ष

पाचोरा-४१-४१-४२ कोटी ८३ लक्ष

पारोळा-२३-१८-१८कोटी ७२ लक्ष

रावेर-८-८-४ कोटी ४ लक्ष

यावल-५-५- १ कोटी ९६ लक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images