Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वर्षभर गंगा मैलीच

$
0
0
शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी वाहून जात असल्याने ठिकाठिकाणी ओव्हर फ्लो होऊन सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. नदीपात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण वाढले असून पंपिंग स्टेशन तसेच गंगापूर गावातील सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट पूर्ण होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे.

‘बीआरटीएस’ राबवणार कशी?

$
0
0
महापालिका आयुक्तांसह अधिकारी वर्ग गुजरातच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘बीआरटीएस’ (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) राबविण्यासाठी आग्रही असताना नाशिकमध्ये तसे रस्तेच नसल्याचे सांगत बीआरटीएस राबवणार कशी, असा प्रश्न उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्तांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला आहे.

चिमुकले बसले उपोषणाला

$
0
0
पाचोरा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील आशीर्वाद ड्रिम सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरी तक्रार देण्यासाठी नगरसेवक किशोर बारावकर यांनी पोलिस स्थानक गाठले. मात्र त्यांची तक्रार घेण्याऐवजी तुमच्या मालमत्तेची तुम्हीच काळजी घ्या, असा सला प्रशासनामार्फत देण्यात आला.

त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्याचे काम महिन्याभरात

$
0
0
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्यातील फरशी बदलण्याच्या प्रश्नावरुन निर्माण झालेल्या वादानंतर अखेर हे काम येत्या महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. याठिकाणी अर्धा इंच जाडीची फरशी बसविली जाणार आहे.

लासलगावजवळ दरोडेखोरांचा धूमाकूळ

$
0
0
लासलगाव शहराजवळील निमगाव- वाकडा येथील पोटे वस्तीतील मजुरांच्या घरावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे २४ हजार रुपयांचा ऐवज लुटत घरातील तिघांना मारहाण करीत पोबारा केला आहे. दरोडेखोरांनी आणखी तीन ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

खासदारांचा भयभीत नागरिकांना दिलासा

$
0
0
कळवणसह सुरगाणा, देवळा, बागलाण तालुक्यात दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२१ दरम्यान बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांची खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी आस्तिक पांडेय, तहसीलदार अनिल पुरे यांनी भेट घेवून दिलासा दिला.

तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन होणार

$
0
0
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या कॉलेजांमध्ये समन्वय, सुसूत्रता रहावी यासाठी तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.

शिंगाडा भागात सामूहिक आत्महत्या

$
0
0
शिंगाडा तलाव परिसरातील अपूर्वा सोसायटीत राहणाऱ्या काळे कुटुंबियांपैकी असलेल्या तिघांनी सामुहिक आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी उजेडात आली.

सध्या तरी एकला चलो रे

$
0
0
लोकसभा निवडणुकीत 'फुल्ल अँड फायनल' तयारीनिशी उतरताना 'एकला चलो रे'ची भूमिका योग्य असल्याचा सूर मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

सिंगल स्क्रीनचे जीवदान संकटात!

$
0
0
सिंगल स्क्रीन चित्रपटगृह चालकांच्या या व्यवसायाने तग धरावा यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र जाचक अटींमुळे करमणूक कर माफीची योजना बासनात गुंडाळली जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

ओझर विमानतळासाठी ८४ कोटी

$
0
0
नाशिक शहराजवळील ओझर येथे प्रगतीपथावर असलेल्या पॅसेंजर टर्मिनलसह तेथील सुरक्षा व्यवस्थेसाठी एकूण ८४.५४ कोटी रुपयांच्या निधीला राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) यांच्यात नव्याने सामंजस्य करार होणार आहे.

चार शिक्षण संस्थांची मान्यता रद्द

$
0
0
वैद्यकीय श‌िक्षणासाठी लागणाऱ्या मुलभूत सुव‌िधांची पूर्तता न करू शकणाऱ्या राज्यातील चार वैद्यकीय श‌िक्षण संस्थांची मान्यता महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाने रद्द केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नाश‌िकच्याही नर्सिंग कॉलेजचा यात समावेश आहे.

मोदींवर बरसले राज

$
0
0
‘पंतप्रधान हा देशाचा असतो, कुठल्या एका राज्याचा नाही. त्यामुळे ज्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली; त्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता’, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले.

भाजपही मनसेला भिडला!

$
0
0
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून अंगावर येणाऱ्या मनसेला भाजपनेही शिंगावर घेतले आहे. नाशिक महापालिकेतील मैत्री विसरून भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर बहिष्कार टाकला आहे. राज यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

$
0
0
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात पुकारलेला बेमुदत संप गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे बागलाण तालुक्यातील साडेचारशेहून अधिक अंगणवाड्या चार दिवसांपासून बंदच आहेत.

रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी

$
0
0
सटाणा शहरातील ट्रॉमा केअर सेंटर आणि ग्रामीण हॉस्पिटलमधील मेडिकल ऑफिसरांच्या रिक्तपदांमुळे पेशन्ट्सची हेळसांड होत असल्याने शहर शिवसेना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी संतप्त शिवसैनिकांनी तब्बल तीन तास कुलूप लावत हॉस्पिटल कामकाज बंद पाडले.

'विद्यार्थी राष्ट्रवादी'त बदलाचे संकेत

$
0
0
शहराध्यक्ष बदलाच्या मागणीवरून 'राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामा प्रकरण शिगेला पोहोचले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोरही नाराज पदाधिकारी शहराध्यक्ष हटावसह राजीनामा मागे न घेण्यावर ठाम राहिल्याने वाद चिघळला आहे.

टेलिकॉम सेवेबाबत ग्राहकक्षोभ

$
0
0
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने बोलविलेल्या बैठकीत ग्राहक संघटनांसह ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पडल्याने टेलिकॉम आणि केबल सेवेबाबत ग्राहक प्रचंड असमाधानी असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रेसच्या निवडणुकीचे रणशिंग

$
0
0
आयएसपी-सीएनपी वर्क्स कमिटीच्या निवडणुकीसाठी आपला पॅनेल व कामगार पॅनेलचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. रामभाऊ जगताप प्रणित आपला पॅनल आणि ज्ञानेश्वर जुंद्रेप्रणित कामगार पॅनल यांच्यात थेट लढत रंगणार आहे.

५१ टक्क्यात अडकले जलशुध्दीकरण

$
0
0
निलगिरी बाग येथील प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्राच्या कामासाठी ठेकेदाराने प्राकलन दरापेक्षा(इस्टिमेट) ५१ टक्के अधिक दराने निविदा सादर केल्याने प्रशासनाने नव्याने टेंडर मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images