Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हवाई सुंदरी नोकरीच्या आमिषाने तीन लाखांना गंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

हवाई सुंदरीची (एअर होस्टेस) नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या वडिलांना तीन लाखांना फसविल्याची घटना घडली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जेलरोडच्या सैलानीबाबा स्टॉपजवळील हेरंब अपार्टमेंटमध्ये रणधीरकुमार केशवप्रसाद सिन्हा राहतात. २८ मे ते १९ ऑगस्ट २०१८ या कालावधीत आर. दास नावाच्या व्यक्तीने सिन्हांना फोन करून तुमच्या मुलीला एअर होस्टेस म्हणून नोकरी मिळवून देतो, असे सांगितले. त्याला भुलून सिन्हा यांनी दासच्या बँक खात्यात २ लाख ९१ हजार ३०० रुपये नेट बँकिंगद्वारे जमा केले. चार महिने उलटूनही नोकरी मिळाली नाही. सिन्हा यांनी दासशी संपर्क साधला. मात्र, दासचा मोबाइल सतत बंद होता. फसवणुकीमुळे सिन्हा यांनी दासविरोधात तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भूजल मसुद्यावर सूचना पाठवा’

$
0
0

'भूजल मसुद्यावर सूचना पाठवा'

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ च्या मसुदा नियमांचा बारकाईने अभ्यास करून संबंधितांनी आपले मत किंवा सूचना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शातल सांगळे, उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले, डॉ. दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जलस्वराज्य टप्पा दोनचे उपसंचालक चंद्रकांत भोयर, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते. सुनील महाजन यांनी अधिनियमाच्या मसुदा नियमाबाबत संबंधितांनी दि. ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या सूचना किंवा हरकती अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-१ यांच्याकडे लेखी स्वरूपात किंवाpsec.wssd@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन केले. कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी मनपाला १०० कोटीचा निधी!

$
0
0

मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी; आर्थिक कोंडी फुटण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली. सध्या महापालिकेत आवश्यक कामांचे प्रस्ताव तयार करणे सुरू असल्याने या वृत्ताला बळकटी मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी निवडणुकींच्या प्रचार सभांमध्ये वर्षभरात विकास करणार तसेच २०० कोटी रुपयांचा निधी आणणार असे आश्‍वासन दिले होते. महानगरपालिका गेल्या काही वर्षंपासून हुडको, जेडीसीसी कर्ज आणि गाळ्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांवर आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे शहराचा विकास देखील खुंटला आहे. महापालिकेच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यासाठी गिरीष महाजन आणि आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वर्षांपूर्वी जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला होता. त्यानुसार निधी प्राप्त झाला असून, अद्यापही या निधीतून विकासकामे केली गेलेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. शहराचा विकासासाठी आता मंजूर केलेला १०० कोटीचा निधी खर्च करा, पुन्हा निधी उपलब्ध करून देतो, असे आश्‍वासन देखील त्यांनी दिल्याचे समजते.

प्रलंबित प्रश्नांवरीही चर्चा

घरकुलसह विविध योजनांसाठी तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडकोकडून कर्ज घेतले होते. कर्जामुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे एकरकमी कर्जफेड करण्याच्या यापूर्वीही प्रशासनाने प्रस्ताव दिला होता. परंतु हात प्रस्ताव देखील प्रलंबितच आहे. तसेच ६ वर्षांपासून गाळ्यांचा प्रश्‍नही प्रलंबित आहे. त्यामुळे एकरकमी कर्जफेड आणि गाळ्यांचा प्रलंबित प्रश्‍न निकाली लागल्यास मनपा कर्जमुक्त होईल. त्या अनुषंगाने तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष महाजन व आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभवावरून राष्ट्रवादीत उणीदुणी

$
0
0

बैठकीत कार्यकर्त्यांनी नेत्यावर फोडले खापर

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भूर्इसपाट झाली. या अपयशावर सोमवारी झालेल्या जिल्हा बैठकीत चांगलीच गरमागरमी झाली. निवडणुकीच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांनी नेत्यांवर फोडले तर नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित केल्याने एकमेकांची उणीदुणी काढण्यातच ही बैठक पार पडली.

माजी आमदार अरुण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २०) बैठक पार पडली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, गुलाबराव देवकर, अरुण पाटील, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, वाल्मीक पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सोपान पाटील, जिल्हा परीषद सदस्य शशिकांत साळुंखे, रवींद्र पाटील, राजेश वानखेडे, नितीन तावडे, योगेश देसले, रोहन सोनवणे, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, सरचिटणीस मंगला पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मिनल पाटील, शहराध्यक्षा नीला चौधरी, प्रतिभा शिरसाठ, लता मोरे, ममता सोनवणे, ममता तडवी, सविता बोरसे, युवती प्रमुख कल्पीता पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा बैठकीत मुक्ताईनगर नगरपंचायत आणि जळगाव महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवावर सांगोपांग चर्चा झाली. मात्र ही चर्चा ऐकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याच वाया गेली. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार सविता बोरसे यांनी पक्ष संघटना कार्यकर्त्याच्या पाठिशी उभी राहत नसल्याचा आरोप केला. तसेच नेत्यांनी कार्यकर्त्यांना उभे केले मात्र स्वत: किंवा त्यांच्या घरातील उमेदवार का दिले नाही? असा प्रश्‍न देखील बोरसे यांनी उपस्थित केला. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पक्षात शिस्त नसल्याने आता नेत्यांनी समन्वय साधून कार्यकर्त्यांची बांधणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार दिलीप सोनवणे यांनी कार्यकर्त्यांनी आरोप करण्याआधी त्यांनी काय केले? हे सांगावे उलट सवाल केला. कार्यकर्त्यानेही आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहीजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणूक अवघ्या चार दिवसावर असतांना शहराध्यक्ष निघुन गेले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाचा पराभव होईल याची माहिती आम्हाला आधीच मिळाली होती, असे अरुणभार्इ गुजराथी यांनी सांगितले.

गद्दारांना नारळ देणार

जिल्ह्यात पक्ष अडचणीत आहे. मागच्या काळात काय झाले यावर चर्चा न करता सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले जाईल. बुथ कमेट्यांसाठी संग्राम कोतेपाटील हे २७ ते २९ या कालावधीत जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यादृष्टीने सर्वच तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीत आपलेच महाभाग गेल्याने आपल्याला पराभव पत्करावा लागला. यापुढे गद्दार पदाधिकाऱ्यांना नारळ देऊन मोकळे केले जाईल, असा इशारा नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटा नागमणी विकला दीड लाखांना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

खोट्या नागमणीची विक्री करून तब्बल एक लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात सोमवारी पाच ते सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक करणारे संशयित नांदगाव तालुक्यातील असवलदरा येथील असून, त्यांची नावे माहिती नसल्याने फिर्यादीने नमूद केलेल्या वर्णनानुसार त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. जत (जि. सांगली) येथील धनाजी तुळशीराम इप्परकर यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तालुक्यातील असवलदरी येथील ५ ते ६ जणांनी नागमणी घेण्यास प्रवृत्त केले. तसेच खोट्या नागमणीची विक्री केली. व १ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. याबाबत पोलिस हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजरपाड्याच्या कामासगती देण्यासाठी प्रयत्नशील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील अवर्षणग्रस्त व उत्तर-पूर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पासह पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या अपूर्ण कामास गती देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील भाजप नेते बाबा डमाळे यांनी केले.

पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची प्रातिनिधी बैठक येवला पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तांदूळवाडी फाटा येथे झाली. यावेळी डमाळे बोलत होते. मांजरपाडा प्रकल्प ९० टक्के पूर्ण असून, केवळ तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित काम बंद आहे. मात्र, १० नोव्हेंबर २०१७ रोजी उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत ९१७ कोटी रुपयांच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली असल्याने हा प्रकल्प पुर्णत्वाकरीता दसरा-दिवाळी दरम्यान काम सुरू होईल, अशी अपेक्षा डमाळे यांनी व्यक्त केली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण महत्त्वाचे असून, या कालव्यामुळे ३५८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. त्यातून कालव्याच्या लाभक्षेत्रातील संपूर्ण बंधारे पाण्याने भरून मिळणार आहे. याकरिता मांजरपाड्याचा अर्धवट बोगदा पूर्ण झाल्यास पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. याकरीता लाभक्षेत्रातील शेतकरी व जेष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन आपण प्रयत्न करणार आहे, असेही डमाळे यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात आई ठार; मुलगा बचावला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ट्रकने कट मारल्यामुळे तोल गेल्याने दुचाकीवरील मायलेकांपैकी वृद्ध आई ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. नाशिकरोड येथील उड्डाणपुलावर सोमवारी (दि. २०) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव लक्ष्मीबाई दत्तात्रेय वलवे (वय ७० रा. सामनगाव रोड, गाडेकर मळा, भारतनगर) असे आहे, तर त्यांचा मुलगा संजय वलवे (वय ४७) दैव बलवत्तर म्हणून अपघातातून बचावला. संजय वलवे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

संजय वलवे दुचाकीवरून (एमएच १५/एटी ७५९१) आई लक्ष्मीबाई यांना दाढदुखीचा त्रास होत असल्याने सोमवारी सकाळी नाशिकरोड येथे डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. उपचारानंतर घरी परतत असताना स्वातंत्र्यवीर उड्डाणपुलावर डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने (एमएच १५/एजी ५७६३) कट मारल्याने वलवे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ते विरुद्ध दिशेला पडले, तर त्यांची आई ट्रकच्या बाजूला पडल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. अपघातानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. लक्ष्मीबाई यांच्यावर सायंकाळी गंगापाडळी या त्यांच्या मूळ अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवी मदत औषधांची !

$
0
0

दोन लाख अँटीबायोटिकची मदत

केरळमधील पूरग्रस्तांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत सर्व स्तरांवरून केली जात आहे. मात्र, पूरस्थितीमुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादूर्भाव केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे केरळमध्ये अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंसोबतच औषधांची गरज भासू लागली आहे. यासाठी नाशिकच्या इलाइट सोशल फोरमतर्फे २ लाख अँटीबायोटिक औषधे केरळला उद्या (दि. १९ ऑगस्ट) रोजी पाठविली जाणार आहेत.

नाशिकमधील मराठा हायस्कूल कट्टा आणि इलाइट सोशल फोरमतर्फे केरळला उद्या, बुधवारी (दि. २२ ऑगस्ट) रोजी डॉक्सिसाइक्लिन या अँटीबायोटिक औषधांच्या २० हजार स्ट्रिप्स पाठविल्या जाणार आहेत. केरळमध्ये पूरस्थिती, दुषित पाणी, चिखल तसेच जैविक संसाधनांची नासाडी यामुळे साथीचे आजारांचा प्रादूर्भाव वाढला आहे. अनेकांना साथीच्या रोगांची लागण होत असून, त्यांच्या औषधोपचांरासाठी औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. केरळमधील डॉ. मॅथ्यू यांनी नाशिकच्या डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधून तेथे गरज असणाऱ्या औषधांची यादी दिली आहे. त्यानुसार डॉ. गायकवाड यांच्या पुढाकारने मराठा हायस्कूल कट्टा आणि इलाइट सोशल फोरमद्वारे अँटीबायोटिक केरळला पाठविले जाणार आहेत. त्यासाठी केरळमधील कोचिन येथील सरकारी अधिकाऱ्यांशी डॉ. गायकवाड यांनी संपर्क साधला आहे. डॉ. गायकवाड आणि योगेश आरोटे अँटीबायोटिक औषधे घेऊन बुधवारी केरळला जाणार आहेत. या अँटीबायोटिक औषधांचा खर्च अधिक असल्याने नाशिककरांनी या औषधांच्या खरेदीसाठी हातभार लावावा, असे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंगल कार्यालयावर कोसळली भिंत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील दसक चौकातील सद्गुरू मंगल कार्यालयाच्या शेडवर व्यापारी संकुलाची भिंत कोसळून चार जण जखमी झाले. त्यामध्ये इमारतीचा मालक राजेंद्र डेर्ले (४८, दसक स्टॉप) यांचाही समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेलरोडला दसक चौकात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी गुरूकृपा हे व्यापारी संकुल उभारण्यात आले. रस्त्याच्या बाजूला व्यापारी गाळे आहेत. मागील बाजूला पार्किंगची मोठी जागा आहे. इमारत मालकाने या पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे मंगल कार्यालय सुरू केले आहे. त्यामध्ये विवाह, वाढदिवस आदी कार्यक्रम होतात. इमारतीवर आणखी मजले चढविण्याचे काम सुरू आहे. स्लॅब टाकून झाला आहे. मागील बाजूला विटांची भिंत चढविण्याचे काम सुरू असताना सोमवारी दुपारी बारा वाजता या भिंती मंगल कार्यालयाच्या शेडवर कोसळल्या. कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचे बीमही कोसळले.

दशक्रिया विधीनिमित्ताने किर्तन सुरू होते. ते झाल्यानंतर भोजनाचे नियोजन होते. जेवणाचे टेबलही लावण्यात आले होते. त्याचवेळी इमारतीची भिंत आणि शेड जोरदार आवाज करीत कोसळले. भोजनाचा कार्यक्रम सुरू असता तर जीवितहानी झाली असती, असे रहिवाशांनी सांगितले. या संकुलात ज्युनियर कॉलेजही भरते. आरडाओरड ऐकून नागरिक मदतीला धावले. नाशिकरोड अग्निशमन दलाचे एस. के. गायकवाड, आर. बी. आहेर, ए. के. आडके, व्ही. बी. बागूल, आर. एन. दाते, एस. एम. जाधव आदींनी तातडीने मदतकार्य केले. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, नाशिकरोडचे पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

यापूर्वी केल्या होत्या तक्रारी

सदगुरू मंगल कार्यालय अनधिकृतपणे सुरू होते. त्याची भिंत शेजारील सहारादर्शन इमारतीच्या जागेत बांधल्याची त्या रहिवाशांची तक्रार आहे. भिंतीमुळे घंटागाडी, अग्निशमन बंब आत येऊ शकत नाही. तसेच कार्यालयाच्या भिंतींवर सिमेंटचे बीम ठेवले होते. त्यामुळे हे मंगल कार्यालयच हटवावे, यासाठी रहिवाशी दहा-बारा वर्षांपासून महापालिकेकडे तक्रार करीत आहेत. एकदा महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले परंतु, कारवाई न करताच परतले. लोकशाहीदिनात तक्रार केल्यावर कार्यालय हटविल्याची खोटी माहिती देण्यात आली, असे रहिवाशांनी सांगितले. जेलरोडच्या अनधिकृत बांधकामांचा आणि अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्षम तर्फे दिव्यांगाना मोफत व्यवसाय प्रशिक्षण

$
0
0

सक्षमतर्फे दिव्यांगाना प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सक्षम नाशिक शाखेच्यावतीने गरजू दिव्यांग महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. उद्या (२२ ऑगस्ट) ४ वाजता सक्षम जिल्हा कार्यालय, मंगलनगर, समाज मंदिर, प्रमोद महाजन गार्डनच्या मागे, सखी लेडीज हॉस्टेलजवळ येथे इच्छुक दिव्यांग महिला व मुलींनी संपर्क साधावा. या प्रशिक्षण शिबिरात मोती व इतर तत्सम वस्तूपासून शोभेच्या वस्तू ,माळ इत्यादी तसेच हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याचे शिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर तयार झालेल्या विक्रीक्षम वस्तूच्या विक्रीची हमी प्रशिक्षणार्थीना देण्यात येणार असून इच्छुकांनी ९४२३१७३०७८, ९८६०९५४९०१, ९८८१७६८७८९ या मोबाइल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सक्षमतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स एकवटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महासभेत फेरीवाला समितीच्या संमतीशिवाय जे निर्णय झाले, त्याला तहकुबी मिळावी व ग्राहकांची वर्दळ असलेल्या जागेवर हॉकर्स झोन मंजूर करावे या मागणीसाठी सोमवारी नाशिक जिल्हा हॉकर्स टपरीधारक युनियनच्या वतीने नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालय असलेल्या राजीव गांधी भवनवर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या १५ मार्च २०१६ च्या महासभेमध्ये मंजूर झालेला ठराव फेरीवाला समितीला विश्वासात न घेता मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी जागा मंजूर केल्या आहेत. यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा. त्याचप्रमाणे फेरीवाला समितीची बैठक घेऊन फेरीवाल्यांची नव्याने बायोमेट्रिक नोंदणी करण्यात यावी. मागे झालेल्या नोंदणीत अनेक बोगस व्यक्तींची नोंदणी झाली आहे, याबाबत महापालिकेत अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे महापालिकेने दैनंदिन शुल्क वसुलीचे दर अद्याप निश्चित केलेले नाहीत. ते निश्चित करण्यात यावेत. तसेच महापालिका रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडचा माल जप्त करते, तो परत दिला जात नाही. तो माल परत देण्यात यावा. जप्त केलेला माल परत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. ती तातडीने करण्यात यावी. नाशवंत माल त्याच दिवशी परत द्यावा. जप्त केलेल्या चीज-वस्तूंच्या किमतीपेक्षा जास्त दराने दंडाची रक्कम वसूल केली जाते, ती करण्यात येऊ नये. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तातडीने करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता

$
0
0

नाशिक- निधनवार्ता

000

नर्मदाबाई रास्कर

नाशिक : ओझर येथील नर्मदाबाई मुरलीधर रास्कर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी असा परिवार आहे. ओझर मर्चंट बँकेच्या संचालिका जिजाबाई रास्कर यांच्या सासू व सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक मुरलीधर रास्कर यांच्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवसाचा पगार

$
0
0

महापालिका कर्मचारी

देणार दिवसाचा पगार

……म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत कार्यात खारीचा वाटा म्हणून नाशिक महापालिकेचे कर्मचारी अधिकारी एक दिवसाचा पगार देणार आहेत. हा निर्णय सोमवारी खातेप्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी महापालिकेच्या खातेप्रमुखांची बैठक आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. यावेळी सर्व खाते प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊ केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील बससेवेसाठी ‘राष्ट्रवादी’चा ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेत सुरू असलेल्या मखमलाबाद, मातोरी, मुंगसरा या परिसरातील बसेस काही महिन्यांपासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या बसेस सुरू करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊनदेखील त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष किरण फडोळ यांनी विभाग नियंत्रक अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत बस सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राहुल कदम, उपाध्यक्ष दत्ताजी कुटे, रमीज पठाण, आकाश कोकाटे, देवळालीचे कार्याध्यक्ष राहुल मांदळे, शहर सरचिटणीस संकेत कुलकर्णी, मध्यचे कार्याध्यक्ष अविनाश डुंबरे, शहर संघटक प्रतीक कापडणीस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(पेज फोटोशेजारी २ कॉलम, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा धूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर परिसरात काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ई शॉपी ट्रेड या कंपनीचे संचालक नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा चुना लावून फरारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सुमारे साडेबारा लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आज ही रक्कम काही लाखांत असली, तरी हीच रक्कम कोटींत जाणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील भालचंद्र पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ई शॉपी ट्रेडचे संचालक ज्ञानेश्वर सीताराम पाटील यांनी या कंपनीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे भरून विविध गृहोपयोगी वस्तू देण्याचे प्लॅन तयार केले होते. ८०० रुपयांपासून गुंतवणूक करून सुमारे १५ पायऱ्या पूर्ण केल्यावर २० लाख रुपये खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. कंपनीचे व्यवहार आयसीआयसीआय बँकेतून ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी यात पैसा गुंतविला. ८०० रुपयांपासून ते १२ हजारांपर्यंतची गुंतवणूक करून यात प्रवेश घेता येत होता. दर आठवड्याला पैसे भरा आणि पैसे कमवा, असे सांगून त्यांनी पैसे भरल्यावर अनेक गृहोपयोगी वस्तू देण्याचे आश्वासन दिले होते.

कंपनीत गुंतवणूकदार वाढू लागल्यानंतर पाटील यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गृहोपयोगी वस्तूंचे मॉलसुद्धा सुरू केले होते. मात्र, गत दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना परतावा येणे बंद झाल्याने फिर्यादींनी कंपनीचे संचालक पाटील यांच्यासह कंपनीतील रवी त्रिपाठी व जफर यांना भेटून पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मागील आठवड्यापासून इंदिरानगर येथील मॉलही बंद करण्यात आल्याने संतप्त गुंतवणूकदारांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तक्रार दिल्यावर कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर सीताराम पाटील, सुधाकर घोटेकर, सागर नांद्रे, दिनेश बाविस्कर, रवी त्रिपाठी, जफर, मुकेश पाटील आदींवर गुन्हा दाखल केला आहे.

सल्ल्याकडे दुर्लक्ष भोवले

ई शॉपी ट्रेडच्या कलानगर येथील कार्यालयात होणारी गर्दी किंवा ते कार्यालय बंद असल्यावर त्या ठिकाणी नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे इंदिरानगर पोलिसांनी या कार्यालयास नोटीसही दिली होती. या परिसरातील नागरिकांना या कंपनीकडून फसवणूक होऊ शकते असा सल्लाही पोलिसांनी दिला होता. मात्र, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून कमी गुंतवणुकीत जास्त पैसा मिळविण्याच्या लालसेने यात फसवणूक करून घेतल्याची चर्चा परिसरात आहे.

पोलिसांकडून मॉल सील

इंदिरानगर येथील ई शॉपी ट्रेडमधून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर इंदिरानगर येथील कंपनीचा मॉलदेखील सील केला आहे. नाशिकसह अन्यत्र असलेली कंपनीची कार्यालये आणि मॉल्सदेखील सील करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे गुंतवणूकदार आले पुढे

ई शॉपी ट्रेड कंपनीत फसवणूक झालेल्या अवी गज्जर यांची एक लाख पन्नास हजार, शरद तुंगार यांची दोन लाख ६८ हजार, सचिन कोकणे यांची ५३ हजार, मोसिन खान पठाण यांची दोन लाख १४ हजार, तर रजनी शिंपी यांची तीन लाख ६८ हजारांची फसवणूक झाल्याचे तक्रारी नमूद केले आहे. यात अजूनही काही जणांची नावे पुढे येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'गुंतवणूकदारांनी पुढे यावे'

ई शॉपी ट्रेडच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचे समोर येऊ लागल्यानंतर आता फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी केले आहे. फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने कंपनीच्या बँक खात्यांबाबतही लवकरच निर्णय घेऊन तपास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संस्कृत सप्ताहात विविध स्पर्धा

$
0
0

संस्कृत सप्ताहात विविध स्पर्धा

नाशिक : संस्कृत भारती नाशिकतर्फे संस्कृत सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा होणार आहेत. संस्कृत दिनानिमित्त शनिवारी (दि. २५) व्याख्यान होणार असून, आज, बुधवारी (दि. २२) संस्कृत संवाद स्पर्धा, गुरुवारी (दि. २३) संस्कृत निबंध स्पर्धा, शुक्रवारी (दि. २४) संस्कृत आशुभाषण स्पर्धा, सोमवारी (दि. २७) अनुवादित संस्कृत गीतगायन स्पर्धा, मंगळवारी (दि. २८) संस्कृत प्रश्नमंजूषा स्पर्धा होईल. या सर्व स्पर्धा विनामूल्य असून, मोहिनीदेवी रुंगटा विद्यालयात सायंकाळी ६ वाजता होतील. माहिती आणि नावनोंदणीसाठी ९८२३०७९८३१, ९४२३३६७६३६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदगाह मैदानांवर सज्जता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज, बुधवारी (दि. २२) साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील ईदगाह मैदानासह देवळालीगाव ईदगाह, विहितगाव ईदगाह, देवळाली कॅम्प आणि भगूर ईदगाह मैदानांवर सामुदायिक नमाजपठणाची तयारी पूर्ण झाली आहे. यातील गोल्फ क्लब येथील ईदगाह मैदानावर दर वर्षी २२ ते २५ हजार मुस्लिम बांधव नमाजपठाणासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

ईदमुळे शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिस आणि होमगार्ड्स असे तब्बल हजारपेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बकरी ईद आणि त्यानंतर काही दिवसांतच गणेशोत्सव पार पडणार असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत सणांचा आनंद लुटावा असे, आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देताना केले आहे. आयुक्त डॉ. सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, आठ सहाय्यक आयुक्त, २६ निरीक्षक, ७२ सहाय्यक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षक, ६८३ पोलिस कर्मचारी व १०४ महिला पोलिस कर्मचारी, तीन स्ट्रायकिंग फोर्स, तसेच जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रक पथक, बीडीडीएस पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय अतिरिक्त बंदोबस्तासाठी ७०० पुरुष होमगार्ड्स, २०० महिला होमगार्ड्स, एक एसआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिस मुख्यालयात दोन स्ट्रायकिंग फोर्स व नियंत्रण कक्ष येथे दोन स्ट्रायकिंग फोर्स असे चार स्ट्रायकिंग फोर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. साध्या वेशातील कर्मचारी व अधिकारीदेखील बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

--

सोशल मीडियावर 'वॉच'

बकरी ईदपाठोपाठ गणेशोत्सवाचे वेध सर्वांना लागले आहेत. या काळात समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून, सोशल मीडिया पोलिसांनी रडारवर घेतला आहे. सोशल मीडियावर सायबर पोलिस सातत्याने लक्ष ठेवून असून, सायबर पेट्रोलिंगदरम्यान अनुचित प्रकार आढळून आल्यास लागलीच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

--

त्याग अन् समर्पणाची शिकवण (स्वतंत्र चौकट)

देवळाली कॅम्प : रमजान ईदनंतर ७० किंवा ६८ दिवसांनी आणि इस्लामिक कालगणेतील अखेरचा महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. त्यानुसार शहरात आज बकरी ईद साजरी होत आहे. प्रत्येक इस्लामी वर्षात दोन ईद (ईद-उल-फित्र आणि ईद उल-अजहा) साजऱ्या करण्यात येतात. कुर्बानीचा उत्सव म्हणून बकरी ईदचे महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही गोष्टीची अल्लाहसाठी कुर्बान करावी लागते. एका इस्लामिक मान्यतेनुसार बकरा कुर्बान करण्याचा रिवाज पडला आहे. कुर्बान केलेल्या बकऱ्याच्या मांसाचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिमधर्मीयांच्या घरात किंवा गरजवंताला देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाजपठाणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. कुराण सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करीत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनीच कुर्बानी द्यावी, असे जाणकारांनी सांगितले. बकरी ईदनंतर एक महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहरम साजरा करण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसातही होणार नमाजपठण

$
0
0

पावसातही होणार नमाजपठण

त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या बकरी ईद (ईद-उल-अजहा)निमित्त आज नाशिक शहरातील सर्व मशिदींमध्ये सकाळी ८.३० वाजता व ईदगाह मैदानावर सकाळी ९.४५ वाजता मुख्य नमाज अदा केली जाणार आहे. बकरी ईद २३ ऑगस्ट रोजी साजरी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, चंद्रदर्शन लवकर झाल्याने २२ ऑगस्ट रोजीच बकरी ईद साजरी केली जाणार असल्याची माहिती हाजी वसीम पीरजादे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून शहरात संततधार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर होणारी नमाज कुठे होणार याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पाऊस असला, तरीही याच ठिकाणी नमाज होणार असून, नमाजसाठी येताना प्लास्टिकचे कापड, छत्री, तसेच रेनकोट बरोबर आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा नेहमीप्रमाणे भिवंडी, कल्याण, अहमदनगर, मध्य प्रदेश, गुजरात येथून बोकडांची आवक झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच जनावरांच्या बाजारात बोकड खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा विभागात सहा क्रीडांगणे

$
0
0

क्रीडा धोरणाची अंमलबजावणी होणार; अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या बजेटमध्ये क्रीडा विभागासाठी आरक्षित पाच टक्के निधीचा वापर शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासह क्रीडांगणासाठी वापरला जाणार आहे. शहरातील सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा विभागात सहा क्रीडांगणे उभारण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यामुळे क्रीडांगण विकासासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी शहरातील आरक्षित सयुंक्त पाहणी केली आहे. क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागांचा पाहणी अहवाल आयुक्तांपुढे सादर केला जाणार असून, चालू वर्षात या कामासाठी १५ कोटींचा खर्च केला जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेला आपल्या एकूण बजेटचा पाच टक्के निधी हा शहरातील खेळाडू तसेच क्रीडांगणावर खर्च करण्याचे बंधन असते. नाशिकच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करून नाशिकचेही नाव उंचावले आहे. परंतु, शहरात खेळाडूंना आवश्यक अशा सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. अद्ययावत अशी क्रीडांगणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. चांगल्या दर्जाचे खेळाडू नाशकात निर्माण व्हावेत. त्याद्वारे नाशिकचा लौकिक वाढावा या उद्देशाने मुंढे यांनी आता शहरातील प्रत्येक विभागात एक अद्ययावत क्रीडांगण विकसित करण्याचे धोरण आखले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही मुंढेंनी क्रीडा विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार समाजकल्याण उपायुक्त तथा क्रीडा विभागप्रमुख हरीभाऊ फडोळ, शहर अभियंता संजय घुगे यांनी शहरातील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागांची पाहणी केली आहे. नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडको या विभागातील जागांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे क्रीडांगणांना निधी मिळण्याची शक्यता आहे.

यंदा १५ कोटी

महापालिकेच्या बजेटमध्ये क्रीडा विभागासाठी पाच टक्के म्हणजेच ३१ कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीतून सुमारे १५ ते १६ कोटी रुपये क्रीडांगण विकासासाठी खर्च केले जाणार आहेत. या जागांवर क्रीडासंकुलांची उभारणी केली जाणार असून, या क्रीडांगणांच्या ठिकाणी जॉगींग ट्रॅकसह सर्व प्रकारच्या खेळांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आयुक्तांचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांमुळे जिल्हाध्यक्षपद लटकले?

$
0
0

डॉ. पवार, महाले राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नाशिकला झुकते माप देण्यात आले असून, तब्बल दोन प्रदेश उपाध्यक्षांची पदे नाशिकला देण्यात आली आहेत. डॉ. भारती पवार आणि नाना महाले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. अर्जुन टिळे, विश्वास ठाकूर आणि डॉ. कैलास कमोद यांना सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे. जयंत जाधव आणि दिलीप बनकर यांची कार्यकारिणी सदस्यपदावर वर्णी लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात नाशिकमधून आठ जणांना स्थान देण्यात आले आहे. डॉ. भारती पवार यांच्याकडील प्रदेश उपाध्यक्षपद कायम ठेवतानाच सरचिटणीस असलेले नाना महाले यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती दिली आहे. अर्जुन टिळे यांना बढती देत, त्यांना सरचिटणीसपद बहाल केले आहे. डॉ. कैलास कमोद यांनाही सरचिटणीसपदी संधी दिली आहे. विश्वास ठाकूर यांची सहकोषाध्यक्षपदी वर्णी लावली आहे. संदीप गुळवे यांच्याकडे चिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. माजी आमदार जयंत जाधव आणि दिलीप बनकर यांना कार्यकारिणी सदस्यपद देण्यात आले आहे.

भुजबळांमुळे जिल्हाध्यक्षपद लटकले?

राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसह प्रदेश कार्यकारिणीची घोषणा झाली तरी, नाशिकच्या जिल्हाध्यक्षपदाची घोषणा अद्याप झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अॅड. रवींद्र पगार यांचे पद काढून घेण्याची मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद बिनविरोध झाले असताना जिल्हाध्यक्षपदासाठी माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रकाश वडजे, सुनील वाजे असे सहा जण इच्छुक होते. त्यामुळे प्रदेश पातळीवर हा निर्णय सोपविण्यात आला. परंतु, भुजबळ कारागृहातून बाहेर आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पगार हे भुजबळ समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाला हात लावण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते चाचपडत आहेत. दुसरीकडे पगारांचे पद काढण्यासाठी दुसरा गट सक्रिय आहे. त्यामुळे पगारांच्या पदावरील टांगती तलवार कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images