Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रशासकीय सेवेच्या स्वप्नाला हवे समाजाचे पाठबळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आठवीत असताना उराशी बाळगलेले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही हे पक्के माहिती होते. त्यामुळे वडिलांनी तयार केलेल्या अभ्यासिकेतील कागदावर ९८ टक्के लिहून त्याचा ध्यास धरीत संकेत अहिरे याने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के मिळाल्याने काहीसा निराश असलेला संकेत बारावीत ९८ टक्के मिळवणारच असे सांगतो. संकेतला प्रशासकीय सेवेत जायचे असून, त्यासाठी त्याला समाजाचे आर्थिक बळ हवे आहे.

संकेतकडे हुशारी आहे. अभ्यासाची तयारी व स्वप्न पूर्ण करण्याची जिद्ददेखील त्याच्यात आहे. मात्र, यासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत त्याला व कुटुंबाला चिंता वाटते. वडिलांचे गिरणा टाकी परिसरात असलेले सलूनच्या दुकानाच्या उत्पन्नातून घराचा गाडा चालतो. वडील दगडू अहिरे व आर्इ सरला अहिरे दोघेही अल्पशिक्षित असले तरी त्यांना मुलाच्या हुशारीचे कौतुक आहे. दुसरा मुलगा हर्षल पाचवीत आहे. त्याचा अभ्यासदेखील संकेतच घेतो.

अगदी पहिलीपासूनच शाळेत पहिल्या पाच येणाऱ्या हुशार मुलांमध्ये येण्यासाठी त्याची सारखी धडपड असायची. अनेकवेळा वडिलांच्या दुकानात जाण्याचे प्रसंग यायचे. वडीलदेखील सलूनचे काम शिकून ठेव म्हणायचे. त्यामुळे तो अभ्यासाव्यतिरिक्त वेळा मिळाला की दुकानात जायचा. तिथे अनेक जण भेटायचे काही अधिकारीदेखील तेथे येत असत. त्यांच्या चर्चा ऐकता ऐकताच संकेतला प्रशासकीय सेवेत जाऊन मोठे अधिकारी व्हावे असे मनावर बिंबत गेले. आठवीतच त्याने आयएएस होण्याचा संकल्प केल्याचे त्याचे वडील दगडू अहिरे हे कौतुकाने सांगतात.

गणितात पैकीच्या पैकी गुण
संकेतने दहावीत स्वत:च्या नोटस काढून दररोज ५ तास याप्रमाणे अभ्यास केला. गणिताची विशेष गोडी संकेतला आहे. त्यास गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले. त्याच्या शाळेत वैदिक गणित शिकवण्यासाठी शिक्षकांनी त्याच्यकडे विचारणा केल्याचेही तो सांगतो. चौथीला असताना त्याने स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शाळेत केवळ अभ्यासच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमातही संकेत अग्रसेर असतो. प्रशासकीय सेवत जावून आपल्यासारख्या हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी अशा भावनादेखील त्याने व्यक्त केल्या. प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीचा अडसर तर येणार नाही ना? अशी भीती असलेला त्याचा प्रश्नार्थक चेहरा मन हेलावून टाकतो. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळ हवे आहे.

चेक पाठविण्यासाठी पत्ता :

१२, बळीराम पेठ, साने गुरुजी चौक, अॅक्सिस बँक एटीएमच्यावर, एम. जी. रोड, जळगाव ४२५००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेताच्या परिस्थितीतही संकेतचे ‘नव्वदीपार’ यश!

$
0
0

जिन्याखाली अभ्यास करीत ९३.२० टक्के!

Pravin.chaudhari@timesgroup.com

घरची परिस्थिती बेताची. वडिलांची छोटीशी सलूनची टपरी. त्या अल्पशा मिळकतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याची जाणीव अगदी लहानपणीच झाली. मुलाची हुशारी पाहून वडिलांनी भाड्याच्या घरातील जिन्याच्या खाली स्वत:च्या हाताने अभ्यासिका बनवून दिली. याच अभ्यासिकेत अभ्यास करून संकेत दगडू अहिरे याने दहावीच्या परीक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवले. गरिबीचे चटके सोसलेल्या संकेतला प्रशासकीय सेवेत जायचे आहे.

हरिविठ्ठल नगर परिसरातील रुख्मिणी नगरात संकेत दगडू अहिरे आपल्या कुटुंबासह राहतो. लहानपणापासूनच घराच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असलेल्या संकेतला ही परिस्थिती बदलयाची असेल तर शिक्षणात प्रगती घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने अहिरे कुटुंब सुरुवातीपासून भाड्याच्या घरात राहत होते. मुलगा दहावीत गेल्याने त्याच्या अभ्यासाचा विचार करून पहिल्यांदाच दोन खोल्यांचे घर घेतले. या नव्या घरात आल्यावर संकेत व त्याच्या वडिलांना आवडलेली गोष्ट म्हणजे घराच्या बाहेरून गच्चीवर जाणारा जिना. मुलांच्या अभ्यासासाठी शांतता मिळावी म्हणून वडिलांनी संकेतला जिन्याखाली वस्तुंची जुळवाजुळव करीत एक टेबल करून दिला. कुठून तरी खुर्ची मिळाली. तेथे देवी स्वरस्वतीची प्रतीमा लावली आणि हीच संकेतची अभ्यासिका झाली. दहावीचा पूर्ण अभ्यास संकेतने याच ठिकाणी केला. विशेष म्हणजे, जळगावात उन्हाळ्यातील ४५ अंश सेल्सिअस तापमानात पंख्याशिवाय तासनतास बसून अभ्यास करीत हे यश त्याने मिळविले. आवडत्या गणित विषयात संकेतला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. आता प्रशासकीय सेवेत जायचे असल्याने त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे.

..................................................

SANKET DAGDU AHIRE
संकेत दगडू अहिरे
९३.२० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेंकडून महापालिका नोटीसला केराची टोपली?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर, ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाचं होतो' असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना महापालिकेने नोटीस देऊन १२ दिवस लोटले; परंतु त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे भिडे यांनी महापालिका नोटिसेला केराची टोपली दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, भिडे यांना नोटीस मिळाली की नाही, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेने टपाल कार्यालयाला पत्र पाठविले आहे. भिडे यांना नोटीस मिळाल्याची पोच आता टपाल कार्यालयाकडून मागितली जाणार आहे. त्यानंतरच भिडे यांच्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर, ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाचं होतो' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभर टीका होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. भिडे समर्थकांनी मात्र भिडे यांनी असे वक्तव्य केलेच नाही, असा दावा केला होता. भिडे यांच्या या वक्तव्याची तक्रार गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंब कल्याण विभागाच्या लेक लाडकी या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार, पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भिडे यांच्या या वक्तव्यांसदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील तक्रार बोऱ्हाडे यांनी महापालिकेचा तिढा सोडवत, भिडे यांचा सांगलीतील पत्ता लेखी स्वरुपात महापालिकडे पाठवला होता. भिडे यांच्या वक्तव्याची वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर १९ जून रोजी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांना सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले होते. परंतु भिडे यांना नोटीस देऊन १२ दिवस उलटले असले तरी त्यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने आता टपाल कार्यालयाला पत्र लिहून भिडे यांना नोटीस पोहचली की नाही, याची शाहनिशा सुरू केली आहे.

कारवाईची दिशा ठरणार

संभाजी भिडे यांना स्पीड पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली होती. त्यामुळे नोटीस प्राप्त झाल्याची पोहोच महापालिकेला हवी असून ही पोहोच मिळाल्यानंतरच भिडे यांच्यावर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किन्सिंग्टनला ‘पर्यावरण’ची नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांना हायकोर्टात माफीनामा सादर करण्यास भाग पाडल्यामुळे महापालिका प्रशासनाने ग्रीनफिल्डचे संचालक प्रकाश मते यांच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे. चांदशी शिवारातील त्यांच्या मालकीच्या किन्सिंग्टन क्लबला आपत्ती व्यवस्थापन विभागापाठोपाठ शुक्रवारी पर्यावरण विभागानेदेखील नोटीस बजावली आहे. पर्यावरणाला धोका ठरणारा नदीपात्रातील मलबा आठ दिवसांत न हटविल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. गुरुवारीच मतेंना दीड कोटी रुपये जमा करण्याची नोटीस बजावली होती.

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ग्रीनफिल्ड प्रकरणी झालेली मानहानी जिव्हारी लागली असून, त्यांनी ग्रीनफिल्डचे संचालक असलेल्या मते यांच्या अन्य मालमत्ता लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. चांदशी शिवारातील मते यांच्या मालकीच्या किन्सिंग्टन क्लबची संरक्षक भिंत दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरात कोसळली होती. या संरक्षक भिंतीचा मलबा गोदावरी नदीपात्रात पसरून पात्रालगतचा रस्ता तसेच मनपाने उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाले होते. ग्रीनफिल्ड प्रकरण उद्भवल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी संरक्षक भिंत कोसळल्यानेच मनपाचा रस्ते तसेच गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मते यांना १ कोटी ४० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस देत, ४८ तासांत पैसे भरण्याचा अल्टिमेटम दिले आहे. पाठोपाठ 'किन्सिंग्टन' क्लबची संरक्षक भिंत कोसळून गोदावरी नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी पर्यावरण विभागानेही नोटीस बजावली आहे. गोदावरी नदीपात्रात पूरपरिस्थिती उद्भवल्यास लगतच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्त व जीवितहानी होण्याचा धोका असल्यामुळे नदीपात्रातील मलबा तत्काळ हटविला जावा, नदीलगतच्या मनपाच्या रस्त्याची दुरुस्ती आठ दिवसांत केली जावी. बफर झोनमध्ये उभारण्यात आलेले लॉन्स व अन्य बांधकामे आठ दिवसांत काढून टाकण्यात यावीत, असा इशारा पर्यावरण विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन दुकानांना नोंदणी बंधनकारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा नवीन अधिनियम लागू केला आहे. त्यानुसार नवीन दुकानांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातल्या सर्व दुकाने, हॉटेल, लॉजिंग, विविध प्रकारच्या आस्थापनांनी १० पेक्षा जास्त कामगार असल्यास या अधिनियमांतर्गत क्षेत्रीय सुविधाकार (पूर्वीचे दुकान निरीक्षक) यांच्ययाकडे सूचनापत्रासाठी ऑनलाइन अर्ज करून त्याची पावती घेणे बंधनकारक आहे. सर्व संबंधितांनी विहीत मुदतीत नोंदणी करून सूचनापत्र घ्यावे, असे आवाहन कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांनी केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी LMS.mhaonline.gov.in या वेबसाइटवरील प्रणालीचा वापर करावा. या नवीन अधिनियमामुळे डिसेंबर २०१७ पासून यापूर्वीचा महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ हा निरसित झाला आहे. नवीन अधिनियमांतर्गत संबंधितांनी विहीत मुदतीत अचूक माहिती भरून नोंदणी करावी; अन्यथा संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर मारहाण; सहा जणांना शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

सातपूर एमआयडीसीतील संजोत मेटल कंपनीत वेतनावरून सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या कामबंद आंदोलनादरम्यान कंपनीमालक हेगडे यांनी सातपूर पोलिसात २०१२ मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर सातपूर पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने १६ पैकी ६ जणांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सातपूर पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक के. आर. पोपेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य बाजू मांडल्याने न्यायालयाने सहा जणांना कारावासाची शिक्षा ठोठावल्याचे शहर पोलिसांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. योग्य कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त डॉ. रवींदकुमार सिंगल यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू

$
0
0

मनमाड : नांदगाव येथे दीड वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नांदगाव येथील मल्हारवाडी परिसरात सुफियान मतीन शेख हा दीड वर्षाचा बालक घरात खेळत असताना त्याला विजेचा धक्का लागला. त्याला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. छोट्याशा सुफीयानचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

$
0
0

२९ जुलै रोजी मतदान; ३० ला मतमोजणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) ची द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ही निवडणूक २९ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत नूतन अध्यक्षासह सहा पदाधिकारी व ३४ कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाणार आहे.

व्ही. के. भूतानी हे निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून तर विवके गोगटे आणि निशिकांत अहिरे हे समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या निवडणुकीत लवाद म्हणून आर. वेंकिटाचलम् यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी २९ जुलै रोजी मतदान होणार असून ३० जुलैला मतमोजणी होणार आहे. नवे अध्यक्ष ३१ जुलै रोजी पदभार स्वीकारणार आहे. उमेदवारी अर्ज विक्री १ जुलैपासून सुरू होणार असून मतदान यादी दुरुस्तीसाठी सात जुलै ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. १३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्तीसह मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. वैध उमेदवारांची यादी १५ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ जुलै ही असणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होईल.

अध्यक्षपद मोठ्या उद्योगातून

'निमा'च्या या निवडणुकीत मोठ्या उद्योग गटासाठी अध्यक्षपद राखीव आहे. याशिवाय, दोन उपाध्यक्ष (लहान व मोठे उद्योग गटातून प्रत्येकी एक), मानद सरचिटणीस (कोणत्याही गटातून), दोन सचिव (लहान व मोठे उद्योग गटातून प्रत्येकी एक) आणि खजिनदार (एक जागा, कोणत्याही उद्योग गटातून) अशा पदाधिकाऱ्यांसह एकूण ४१ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवनात झोपड्या भुईसपाट

$
0
0

साधुग्रामच्या जागेतील अतिक्रमण हटविले; साहित्याच्या जप्तीनंतर उडाली पळापळ

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनातील साधुग्रामच्या जागेत उभारण्यात आलेल्या झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला शुक्रवारी पुन्हा कारवाई करावी लागली. या कारवाईत येथील झोपड्या भुईसपाट करण्यासह येथे वारंवार झोपड्या उभारणाऱ्यांचे साहित्यच जप्त करण्यात आले. यापूर्वीही येथे अनेकदा कारवाई करण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच येथे पुन्हा झोपड्या वसत असल्याने येथे शुक्रवारी पुन्हा कारवाई करण्यात आली. त्यामुळे येथील अतिक्रमणांप्रश्नी ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळी येथील अतिक्रमित झोपड्यांत राहणाऱ्यांना त्यांचे साहित्य त्वरित काढून घेण्याचे सांगण्यात आले. मात्र, तेथील रहिवाशांची दिरंगाई बघून पथकाने त्यांचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केल्यानंतर आपापले साहित्य घेऊन त्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी ते औरंगाबादरोडकडे तर काहींनी जवळच आडोशाला नेऊन ठेवले आहे. त्यामुळे येथे पुन्हा झोपड्या वसण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तपोवनातील साधुग्रामच्या जागेत वारंवार झोपड्यांचे अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण काढल्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा येथे ठिय्या देण्यात येत होता. येथील झोपड्या पुन्हा जैसे थे उभ्या राहायच्या. येथे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर वारंवार अतिक्रमण केले जात आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच पुन्हा झोपड्या वसविण्यात येत होत्या. मागील आठवड्यात कारवाई केल्यानंतर शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी पुन्हा झोपड्या जैसे थे झाल्या होत्या. शुक्रवारी (दि. २९) रोजी पोलिस बंदोबस्तात येथील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दिल्या. झोपड्या काढून घेण्यास वेळ दिल्यानंतरही सावकाशपणे झोपड्यांचे बांबू काढणे, वरच्या प्लास्टिकच्या ताडपत्र्या काढण्यात येत होत्या. शेवटी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकांनी त्यांचे बांबूसह भांडी, कपडे आदी साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली, तेव्हा काही महिलांनी आपले जप्त केले जात असलेले साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न केला. काहींनी विनवण्या सुरू केल्या, तर काहींची आपापले साहित्य सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी पळापळ सुरू झाली होती.

वारंवार होतेय अतिक्रमण

तपोवनाची ही जागा वापराविना पडून असल्याने त्यावर भटके लोक अतिक्रमण करीत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. येथे म्हशी, उंट, घोडे, बकऱ्या, कोंबड्या पाळणारे यांना जणूकाही मोकळे रान मिळत आहे. जवळच रस्त्यालगत असलेल्या सार्वनजिक नळावरून त्यांना पाणी घेऊन येणे शक्य असल्यामुळे येथील झोपड्यांची वस्ती वाढत गेली होती. त्यांना हटविल्यानंतर ते पुन्हा ठिय्या देत असल्यामुळे शुक्रवारच्या कारवाईत त्यांचे साहित्यच जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांच्या काचा फोडल्या

$
0
0

सितागुंफा परिसरातील प्रकाराने रहिवाशांमध्ये घबराट

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सितागुंफा परिसरातील शिवाजी चौकाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पार्क केलेल्या तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला. या दहशत माजविण्याचा प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी चौकात शुक्रवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मारुती ओम्नी व्हॅन (एमएच१५, एएस६३३८), मारुती अल्टो (एमएच१५, डीएम७४५४), मारुती ८०० (एमएच१५, एएस१९३०) या तीन वाहनांच्या काचा फोडून काही समाजकंटकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अज्ञात कारणातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी यामुळे परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. याप्रकरणी व्यंकटेश रमेश शिंपी (३२, रा. घर नं. ४३३४, श्रीराम भुवन, सितागुंफाजवळ, पंचवटी) यांनी पंचवटी पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांना आयुक्तांचा इशारा

$
0
0

विकासकामे वेळेत पूर्ण न केल्यास करावाई करणार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेच्या निधीतून शहरात सुरू असलेल्या कामांचा आयुक्त संगीता धायगुडे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा बैठकीत आढावा घेतला. एक ते दीड वर्ष उलटून देखील विकासकामे सुरू न केलेल्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले. या बैठकीस उपायुक्त राहुल मर्ढेकर, लेखाधिकारी कमरुद्दीन शेख, उपायुक्त राजू खैरनार, सचिन मारवाळ, कैलास बच्छाव आदींसह ठेकेदार उपस्थित होते.

शहरात गेल्या दोन वर्षांपासून रस्ते, गटारी अशी २०० हून अधिक विकासकामे प्रलंबित आहेत. यावरून आयुक्त धायगुडे यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निविदा प्रक्रिया पूर्ण होवून देखील विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे मुदतीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचेही आयुक्तांनी बैठकीत सांगितले.

उर्दू घर वाचनालयास भेट

शहरातील अजीज कल्लू मैदान भागात सुरू असलेल्या उर्दू घर वाचनालय इमारच्या बांधकामाची गुरुवारी आ. असिफ शेख व आयुक्त संगीता धायगुडे यांनी पाहणी केली. शेख यांच्या पाठपुराव्याने या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला असून पालिकेमार्फत उर्दू घर वाचनालय निर्मिती सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेले हे काम आता पूर्णत्वास येत आहे. गुरुवारी या इमारतीची पाहणी करून शेख यांनी बांधकाम संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी मैदानात सुरू असलेल्या क्रिकेट स्टेडिअमची देखील पाहणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल्कनीतून पडून वृद्धाचा मृत्यू

$
0
0

नाशिक : तिसऱ्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून तोल जाऊन खाली कोसळलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास मखमलाबादरोडवरील ड्रीम कॅसल या इमारतीत घडली.

नरहरी नामदेव मेधने-पाटील (वय ७३, रा. फ्लॅट क्रमांक, ९०१, ड्रीम कॅसल अपार्टमेंट, मखमलाबादरोड) असे या उंचावरून पडून ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मेधने इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये उभे असताना दुपारी अडीच वाजेच्या त्यांचा अचानक तोल गेला. उंचावरून खाली पडलेल्या मेधने यांना गंभीर दुखापत झाली. मेधने यांचा मुलगा सागर यांनी त्यांना लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकज उधास लाइव्ह कॉन्सर्ट ८ जुलैला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त वाचकांसाठी खास सुप्रसिध्द गजलगायक पंकज उधास लाइव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. ८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही कॉन्सर्ट होणार आहे. पंकज उधास हे गजल गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. चिठ्ठी आयी है, ना कजरे की धार ही त्यांनी गायलेली गाणी तर रसिकांच्या अक्षरश: मनाला भिडली आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स' नाशिक आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त याआधी वाचकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चटक-मटक यमी टिफिन स्पर्धा, तसेच मान्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉप, हेरिटेज वॉक, फोटोग्राफी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच नाशिकमधल्या कलाकारांना वाव देण्यासाठी कलासंगम या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात आले. आता खास कलारसिक नाशिककरांसाठी पंकज उधास यांच्या लाइव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने कल्चर क्लब सदस्य होणाऱ्यांना दोन पासेस फ्री मिळणार आहेत. मात्र हे पासेस सोमवारपासून अर्थात २ जुलैपासून महाराष्ट्र टाइम्स च्या ऑफिसमध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी

अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर अथवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान कोसळल्याने पाच हेक्टरला फटका

$
0
0

पिक नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनास सादर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळलेल्या सुखोई विमान कोसळल्याने सुमारे पाच हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, डाळिंब, मिरची आणि काकडी या शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. 'एचएएल'सह सरकारला जिल्हाप्रशासनाकडून हा अहवाल पाठविण्यात येणार आहे.

'एचएएल'चे सुखोई विमान सराव करतेवेळी तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. बुधवारी (दि. २७) ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता. या दुर्घटनेची चौकशी एचएलच्या बेंगळूरू येथील विशेष गुणवत्ता व नियंत्रण पथकाकडून सुरू करण्यात आल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर घटनास्थळाला सील करण्यात आले. तेथे बंदोबस्तही ठेवण्यात आला. या दुर्घटनेनंतर झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे निफाड तहसीलदार विनोद भामरे यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. डाळिंब, द्राक्ष, मिर्ची आणि काकडीचे नुकसान झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात इंधन पसरले असल्याचेही पंचनाम्यावेळी शेतकऱ्यांकडून प्रशासनाला सांगण्यात आले. तसेच जमीन नापीक होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मातीचे नमुने परिक्षणासाठी घेण्यात आले आहेत.

'एचएएल'लाही पाठिवणार अहवाल

गोरठाण येथील विलास मधुकर निकम यांच्या गट क्र. १६४ मधील २.३ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र या दुर्घटनेमुळे बाधित झाले आहे. तर वावी येथील सुकदेव बाबुराव निफाडे यांच्या गट क्र. २८५ मधील ०.६० हेक्टर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे. योगेश नानाभाऊ ढोमसे यांच्या गट क्र. २८३/४ मधील १.३१ हेक्टरवरील द्राक्षबागेचे नुकसान झाले असून बाळनाथ भागुजी पुरकर यांच्या गट क्र. २४९ मधील ०.८५ हेक्टर क्षेत्रावरील मिरचीचेही नुकसान झाले आहे. तर अलका सुरेश ढोमसे यांच्या गट क्र. २८३/२ मधील ०.३६ हेक्टर क्षेत्रावरील काकडीची हानी झाली आहे. हा अहवाल सरकारसह 'एचएएल'ला पाठविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चौकशी’, ‘मंजुळा’ सादरीकरणाने नाशिककर मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दि जिनीअस या संस्थेतर्फे पसा नाट्ययज्ञात शुक्रवारी 'चौकशी' हा दीर्घांक व 'मंजुळा' ही एकांकिका सादर करण्यात आली. रश्मी काळोखे लिखित व प्रवीण काळोखे दिग्दर्शित या नाटकांसाठी नाशिककर रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही नाटके सादर झाली.

'चौकशी' हा दीर्घांक रश्मी काळोखे यांनी लिहिला असून सुप्रसिद्ध लेखक जयंत पवार यांच्या लघुकथेवर आधारित आहे. हा दीर्घांक सामाजिक असंतुलनावर भाष्य करतो. जन्मभर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या पारी नावाच्या स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून समाजाचा एक मोठा पट उलगडला जातो. या स्त्रीच्या माध्यमातून सामाजिक राजकारण, कौटुंबिक नातेसंबंध, मानसिक ताने बाने, समाजात स्त्रीला दिली जाणारी हीन वागणूक, परंपरा अशा कित्येक घटकांचे पारीच्या आयुष्यातील विविध चौकशीच्या रुपाचे दर्शन हे नाटक घडवते. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली पारी आयुष्यातल्या कित्येक छोट्या मोठ्या घटनांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकत राहते आणि प्रेक्षकांना समाजाचे विद्रूप भयाण रूप दाखवून अंतर्मुख करते. सतत चौकशीने त्रस्त झालेली पारी जेव्हा काळाच्या उदरात गडप होते तेव्हा कुणीही साधी चौकशीही करीत नाही, असा विरोधाभास हे नाटक दाखवून समाजाला त्यांचा विद्रूप चेहरा दाखवून देते.

दीर्घांकाचे नेपथ्य गुलाब पवार, कुणाल पाटील आणि बाळकृष्ण तिडके यांचे तर प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. या दीर्घांकाचे संगीत आनंद ओक, तेजस बिल्दिकर यांचे तर वेशभूषा रश्मी काळोखे, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकाचे सूत्रधार दत्ता पाटील, सुनील जाधव, देवेन कापडणीस व निर्मिती सहाय्य प्रतिभा पाटील शकुंतला जाधव मिथिला कापडणीस यांचे होते. रंगमंच व्यवस्था सागर यलमामे, ज्योती चंद्रमोर यांची होती.

नाटकात भानुदास पाटील, विलास हांडगे, तुषार बनकर, कल्पेश पाटील, कुणाल पाटील, चैतन्य जोशी, सागर बागूल, सनी मिश्रा, नितीन सांगळे, शिवा देशमुख, राहुल पाटील, शुभम कपिले, करिश्मा शिंदे, श्रद्धा उबाळे, रिया लिंबे, पूजा पुरकर, स्मिता प्रभू, वर्षा पटेल, दुर्गा शिवसेन, प्राजक्ता नागपुरे, आदित्य थोरात, आदित्य काळोखे, सागर शेळके, आरती पाटील, अभिषेक पाटील, सुयोग झुर्टे, श्रेया बोराडे यांनी भूमिका साकारल्या.

रोमांच गूढ भयनाट्याचा

दि जिनियस निर्मित 'मंजुळा' ही एकांकिका सादर झाली. 'मंजुळा' हे गूढ भयनाट्य आहे. यातील मंजुळा हे प्रमुख पात्र मानसिकरित्या असंतुलित आहे. मानसिक आरोग्य बिघडलेली व्यक्ती किती भयानक निर्णय घेऊ शकतो याचा अनुभव ही एकांकिका प्रेक्षकांना देते. या एकांकिकेसाठी स्किजोफ्रेनिया या मानसिक आजाराचा आधार घेतलेला होता. मंजुळा एकांकिकेचे लेखन निशिकांत कामत, दिग्दर्शन प्रवीण कांबळे, नेपथ्य - गुलाब पवार, कुणाल पाटील व बाळकृष्ण तिडके, प्रकाश योजना - विनोद राठोड, संगीत - सुदीप मिशाळ, विपुल पाठक, तेजस बिल्दीकर, वेशभूषा - राहुल पाटील, रंगभूषा - माणिक कानडे, नृत्य दिग्दर्शन - सागर बागूल यांची तर रंगमंच व्यवस्था सनी मिश्रा, सागर एलमामे यांची होती. यात भानुदास पाटील, विलास हांडगे, तुषार वनकर, कल्पेश पाटील, कुणाल पाटील, सागर बागूल, सनी मिश्रा, नितीन सांगळे, शिवा देशमुख, राहुल पाटील, करिश्मा शिंदे, शिवानी पाबळे, सागर शेळके, अंकिता चेवले, रिया लिंबे, श्रद्धा उबाळे, पूजा पूरकर, स्मिता प्रभू, वर्षा पटेल यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक ट्रस्टीसाठी दिग्गजांच्या मुलाखती

$
0
0

विश्वास ठाकूरांची उपस्थिती; नीलिमा पवार गैरहजर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर सह अनेक प्रतिष्ठीत उमेदवारांनी मुलाखती दिल्या. आजच्या यादीत नाव असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी मात्र मुलाखत दिली नाही. या मुलाखतीला गुरुवारपासून सुरुवात झाल्यानंतर दोन दिवसात ११३ पैकी ३९ उमेदवारांच्या मुलाखती दिल्या आहेत. मुलाखती ४ जुलैपर्यंत चालणार आहेत.

११३ उमेदवारांच्या यादीत वकील, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे आहे. शुक्रवारी यापैकी विक्रम कदम, विश्वास ठाकूर, संजय कुलकर्णी, मनाली दिघे, मोहन कालेकर, दत्तात्रय जोशी, अंजली धामणे, बाळासाहेब अडसरे, तेजस ढेरगे, श्याम गंगापुत्र, कैलास घुले, अॅड. पराग दीक्षित, हेमंत परदेशी, अॅड. धनजंय देशमुख, श्रीकृष्ण लोणारी, धनजंय गंगापुत्र, दिलीप गोडे, सतीश जोशी यांनी मुलाखती दिल्या.

त्र्यंबकेश्वर ट्रस्टवर नऊ ट्रस्टी असून अध्यक्ष जिल्हा न्यायधीश व सचिव नगरपालिका मुख्याधिकारी हे पदसिद्ध आहेत. तर इतर तीन जागांवर असलेले ट्रस्टी हे पुरोहित संघ सह दोन नियुक्त आहे. त्यामुळे चार ट्रस्टी हे नियुक्त केले जाणार असून त्यासाठी या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जून महिन्यात गुरुवार, शुक्रवारी मुलाखती झाल्यानंतर शनिवारी या मुलाखती होणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात २ ते ४ तारखेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार आहे.

अशी होते मुलाखत

ट्रस्टी पदाच्या या मुलाखतीसाठी प्रत्येकाला दहा मिनिटे दिली जात असून त्यात त्यांनी आपली वैयक्तिक माहिती सांगायची आहे. ट्रस्टी का होऊ इच्छितात, यासह ट्रस्टी झाल्यानंतर काय करणार, यासारखे प्रश्नही विचारले जात आहे. या मुलाखतीतच उमेदवाराचा बायोडाटा घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोची २४ उद्याने पुन्हा महापालिकेकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या २४ उद्यानांच्या देखभालीचे काम ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले आहे. महापालिकेचा उद्यान विभाग या उद्यानांची जबाबदारी घेणार आहे. ठेकेदाराकडे सहा मोठ्या उद्यानांचे कंत्राट देण्यात आले आहे. मनुष्यबळ तोकडे असताना महापालिका या उद्यानांची देखभाल कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकरोडला एकच उद्यान निरीक्षक होता. सध्या नगररचनात काम केलेले अभियंता एजाज शेख यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार आहे. महापालिकेची नाशिकरोडला १२२ उद्याने असून, त्यापैकी ठेकेदाराकडे सोमानीसह ४५ उद्याने कायम ठेवण्यात आली आहेत. त्यात सोमानी, मुक्तिधाममागील आनंदनगर येथील आडकेनगर १, २ व ३, जेलरोडचे महालक्ष्मी उद्यान, चैतन्यनगर उद्यान क्रमांक १ आणि २, चेहेडीचे उद्यान, प्रेस्टिज पार्क, शिखरेवाडी जॉगिंग ट्रॅक आदींचा समावेश आहे. या उद्यानांखेरीज अन्य उद्याने ठेकेदाराकडे होती. त्यातील २४ उद्याने महापालिकेने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहेत. ही उद्याने छोटी म्हणजे चारशे ते पाचशे चौरस मीटर आकाराची आहेत. या उद्यानांमध्ये अनेक वर्षांपासून हिरवळ नाही, पाण्याची सोय नाही. अशी उद्याने महापालिका चालविणार आहे. ठेकेदाराची जबाबदारी फक्त उद्यान स्वच्छतेची असताना त्याच्याकडून पाणी, हिरवळीची अपेक्षा केली जात होती. दरम्यान, मुक्तिधामशेजारील सोमानी गार्डनमधील हिरवळ बऱ्यापैकी टिकून आहे. येथे झाडांचीही निगा राखली जात आहे. झोके, घसरगुंडी व इतर खेळणी बऱ्या अवस्थेत आहेत. लहान मुलांची रेल्वे आणि मनोरंजनाच्या इतर खेळांमुळे असल्याने येथे कायम वर्दळ असते. जेलरोडच्या पार्वताबाई गार्डनची स्थितीही उत्तम असल्याने चांगला प्रतिसाद मिळतो. दुर्गा उद्यानासह चेहेडी गावातही चांगले उद्यान आहे.

महापालिकेने २४ उद्याने पुन्हा ताब्यात घेतली असली, तरी त्यांची देखभाल चांगल्या पद्धतीने होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागात ३४ कर्मचारी आहेत. महापालिकेत अनेक वर्षांपासून भरती झालेली नाही. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेऊन कामे केली जात आहेत. कमी कर्मचारी असल्याने उद्यानांची देखभाल करणे अवघड जाते. नाशिकरोडला अऩेक उद्यानांची जाळीची कुंपणे गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ बाकडे उरली आहेत.

--

या उद्यानांची झालीय दुर्दशा

जेलरोडच्या महापालिका कार्यालयाशेजारील उद्यानात तर जनावरेही जात नाहीत. कारण, येथील झाडे जळाली आहेत. खेळणी तुटलेली आहेत. भीमनगरमधील गार्डनचीही दुरवस्था झालेली आहे. साने गुरुजीनगरमधील गार्डनमध्ये गायी ठाण मांडून बसतात. बहुतांश उद्यानांचे रुपांतर कचराकुंड्यांत झाले आहे. जेलरोडच्या ओमनगरध्येही गवत वाढले आहे. चंपानगरीत गार्डनचा वापर क्रिकेटसाठी होत आहे. समाजकंटकांनी खेळणी गायब केली. जय हनुमाननगरच्या गार्डनमध्ये गाजरगवत वाढले आहे. उपनगरमधील मकरंदनगरसमोरील गार्डनमधील सर्व खेळणी गायब होऊन फक्त मैदान उरले आहे. पवारवाडी, बोराडेनगर, जय भवानीरोड, र. ज. बिटको हायस्कूलसमोरील गार्डनमध्येही सुविधांची वानवा आहे. बहुतांश उद्यानांमध्ये झाडे आहेत, तर खेळणी नाहीत आणि खेळणी आहेत तर झाडे नाहीत. उद्यानांसाठीच्या भूखडांवर कचरा व माणसांचे अतिक्रमण होत आहे. काही गार्डन रात्री मद्यपींचा व प्रेमीयुगलांचा अड्डा बनली आहेत.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

उघड्या घंटागा़डीने 'कचऱ्यावर पाणी' (फोटो) (पेज फोटोशेजारी सिंगल)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा वेगळा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. घंटागाडी कर्मचाऱ्यांकडूनदेखील महापालिकेच्या आदेशाचे पालन केले जाते. परंतु, परिसरात उघड्या घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जात असल्याने घंटागाडीतील सर्वच कचरा ओला होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा संकलनाला अर्थच उरत नसल्याने अशा उघड्या घंटागाड्या बंदिस्त कराव्यात,अशी मागणी परिसरातून होत आहे.

-----

तारवालानगर-पेठरोडवर दुतर्फा होतेय कचराफेक (फोटो) (थोडक्यात)

पंचवटी : मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पापासून जाणाऱ्या तारवालानगर सिग्नल ते पेठरोड सिग्नल या रस्त्याच्या दुतर्फा सर्रासपणे कचरा, मेडिकल वेस्ट, डेब्रिज टाकले जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी असल्याने या झाडांच्या आडोशाला हा कचरा टाकला जातो. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथे रस्त्याने जाताना वाहनातूनच कचराफेक केली जात आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. स्वच्छता कर्मचारी व घंटागाडी कर्मचारी येथील कचरा साफ करीत नसल्याने कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात अले असून, येथे स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

--

रेल्वे सल्लागार समिती

जेलरोड : भुसावळ मंडळांतर्गत नाशिकरोड रेल्वे स्टेशनसाठी रेल्वे सल्लागार समितीच्या दहा सदस्यांची निवड मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि स्टेशन प्रबंधकांनी केली आहे. या समितीत गुरू गोविंदसिंग इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे, प्रवीण आडके, सचिन वाघ, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम, बबन मोरे, संदीप कटारे, पोलिसपाटील समाधान बोडके, महिला सदस्या डॉ. मेघा सायखेडकर, राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे. समितीमध्ये देवळाली कॅम्पच्या पाच जणांची वर्णी लागली असून, समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.

--

उंबराची काढली साल (फोटो)

जेलरोड : जेलरोडच्या माळीनगर कॉलनीतील साईबाबा मंदिरासमोरील उंबराच्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्यानंतर आता या झाडाची साल काढण्यात आल्याने हे झाड सुकले आहे. असा प्रकार करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिराजवळील टेलिफोन कॉलनी येथील नीलगिरीच्या झाडांची सालही अशाच पद्धतीने काढण्यात आली आहे. परिसरातील झाडांची अशी हत्या करण्याचा प्रकार सुरू असूनदेखील कोणतीही यंत्रणा कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅम्ब्युलन्स, पाणी टँकरची वारकऱ्यांसाठी सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकरी बांधवांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रुग्णवाहिकेसह, डॉक्टर, औषधे, पिण्याच्या पाण्याचा टँकर यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि पुन्हा परतीचा प्रवास पंढरपूर ते नाशिक या दरम्यान ही सेवा पुरविण्यात येणार आहे. स्वर्गीय भय्यूजी महाराज व स्वर्गीय आणासाहेब जावळे पाटील यांच्या स्मरणार्थ ही सेवा पुरविण्यात आली आहे. नाशिक पंचायत समितीजवळ हभप भागवताचार्य संतोषा नंदगिरीजी महाराज, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे आदींच्या हस्ते शुक्रवारी रुग्णवाहिका आणि टँकर सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कडवा कालवा कार्यालयाचे स्थलांतर

$
0
0

आमदार छगन भुजबळ यांचा तीव्र आक्षेप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेले कडवा कालवा विभागाचे कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करण्याचा शासनाने २८ जून रोजी निर्णय घेतला आहे. सदर विभागांतर्गत असलेली अनेक कामे अपूर्ण अवस्थेत व प्रगतीत असूनही शासनाने हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने सदर अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेले कडवा कालवा विभाग कार्यालय सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी धुळे येथे स्थलांतरित करण्याचा शासनाने अन्यायकारकरित्या निर्णय घेतला आहे. सदर विभागाअंतर्गत उर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील पुणेगांव, तिसगांव, ओझरखेड, दरसवाडी तसेच वळण योजना या प्रकल्पांची बरीचशी सिंचन निर्मितीची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पामध्ये पुणेगांव-दरसवाडी-डोंगरगांव पोहोच कालव्याचा समावेश असून या कालव्याची बहुतांश कामे अपूर्ण असून सदर कालव्याचे अस्तरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. चांदवड व येवला या दुष्काळी तालुक्यांसाठी हा कालवा जीवनदायी आहे. या कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कडवा विभागाची अतिशय गरज आहे.

त्याचप्रमाणे या विभागांतर्गत झार्लीपाडा, आंबेगण, पिंप्रज, धोंडाळपाडा, चाफ्याचा पाडा, रानपाडा,आंबाड,पायरपाडा व चिमणपाडा या नऊ प्रवाही वळण योजनांची कामे असून या योजनांची कामेसुद्धा प्रगतीपथावर आहेत. विभागांतर्गत काश्यपी प्रकल्प, गौतमी प्रकल्प, ओतूर प्रकल्प असे विविध प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प हा यशस्वी प्रकल्प असून त्यापासून अवर्षणग्रस्त असलेले चांदवड, पूर्व दिंडोरी, निफाड, येवला या तालुक्यास लाभ होत आहे. उपलब्ध पाण्याचा विनियोग चांगल्या प्रकारे होण्यासाठी अस्तित्वातील कालवे सुस्थितीत ठेवण्यासाठी या विभागाची गरज आहे. सद्यस्थितीत कडवा कालवा विभागाअंतर्गत ४७० कोटींची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी या विभागाची गरज आहे. असे असतानाही सरकारने अन्यायकारकरित्या सदर कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील जलसिंचनाची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सदर कार्यालय नाशिक येथेच पूर्ववत सुरु ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रोजेक्ट गोदा’ला चालना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपाठोपाठ लागू झालेली शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता आता निकालानंतर शिथिल झाली आहे. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून स्मार्ट सिटीच्या गोदा प्रोजेक्टसह शहराच्या नवीन विकासकामांच्या अंमलबजावणीतला अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता विकासकामांचा बार उडवला जाणार आहे. पुढील आठवड्यात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या २३० कोटींच्या 'प्रोजेक्‍ट गोदा' प्रकल्पाला गती मिळणार असून, स्मार्ट सिटी कंपनीकडून पुन्हा निविदा काढली जाणार आहे. याशिवाय, स्मार्ट सिटीअंतर्गत येणाऱ्या २८२ कोटींच्या स्काडा मीटर आणि २४ तास पाणीपुरवठा योजनेसह १२० कोटींच्या 'स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी'लाही चालना मिळणार आहे.

महापालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आलेली सर्व कामे आयुक्त मुंढे यांनी रद्द केली असली तरी स्मार्ट सिटी अंतर्गत आणि बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांचा नाशिककरांना दिलासा मिळेल, असे चित्र होते. जानेवारी महिन्यात स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी गोदा प्रोजेक्टचा २३० कोटींचा पहिला फेज मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे या कामांना एप्रिलअखेर सुरुवात होणे अपेक्षित होते. स्मार्ट सिटीअंतर्गत एप्रिलमध्ये पाणीपुरवठ्यासंबंधी पाइपलाइन टाकणे, तसेच स्काडा मीटर बसवणे, २४ तास पाणीपुरवठा यासाठी २८२ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवण्याचे निश्चित झाले होते, तर १२० कोटी रुपये खर्चाचा 'स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी' या एकत्रित प्रकल्पालाही एप्रिलमध्येच चालना मिळणार होती. याशिवाय, स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट रोडसह अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ होणार होता. परंतु, प्रत्यक्षात एप्रिलमध्ये विधानपरिषदेची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे स्मार्ट सिटीसह बजेटच्या कामांना काहीसा ब्रेक लागला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता संपताच पुन्हा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिकच्या विकासकामांमागे आचारंसहितेचे शुक्लकाष्ठ लागले होते. परंतु, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल झाली आहे. आचारसंहिता शिथिल होण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित गोदाप्रोजेक्टसह विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात २३० कोटींच्या गोदा प्रोजेक्टची निविदा काढली जाणार आहे. सोबतच स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटीसह स्काडा प्रणालीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांनाही वेग येणार आहे.

बजेटलाही गती मिळणार

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मंजूर असलेल्या गोदाप्रकल्पासह, स्कोडामीटर, रेट्रोफिटिंगअंतर्गत मंजूर असलेल्या जवळपास सहाशे कोटींच्या कामां सोबतच महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये मंजूर झालेल्या भांडवली कामांच्या सर्व निविदा जून महिन्यातच काढण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.महासभेने बजेटला मान्यता दिल्याने बजेटच्या प्रस्तावांना पुन्हा महासभेवर आणण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्थायीवरही प्रस्ताव सादर केला जाणार नाही. त्यामुळे या विकासकामांच्या प्रारंभाला होणारा उशीर टळणार असून, निविदा मंजूर होताच थेट विकासकामांना सुरुवात होणार आहे.त्यामुळे विकासकामांचा बार जूनमध्ये उडणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच या कामांचा धडाका सुरू होणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images