Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सेवा पुन्हा सुरू करणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तांत्रिक कारणांमुळे राज्यभरातील खंडित झालेली विमानसेवा येत्या १० ते १५ दिवसात पुन्हा सुरू करण्याचा खुलासा एअर डेक्कन कंपनीने केला आहे. विविध प्रकारच्या अडचणींना कंपनीला तोंड द्यावे लागत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

उडान सेवेसाठी मुंबई हे केंद्र असेल असे सांगण्यात आले. मात्र, मुंबईत कुठलीही सुविधा देण्यात आली नाही. अशा स्थितीतही कंपनीने नाशिकला केंद्र बनवून सेवा सुरू केली. त्यातही अनेक अडचणी आल्या. नाशिकमध्ये विमानांसाठी हँगर उपलब्ध नाही. मुंबईत रात्री पार्किंग उपलब्ध नाही. वेळेचाही तेथे विषय आहेच. देशात वैमानिकांची कमतरता आहे. वैमानिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे वैमानिक सेवेत उपलब्ध होत नाहीत. विविध अडथळे दूर करण्याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या १० ते १५ दिवसात महाराष्ट्रातील सर्व सेवा पुन्हा कार्यन्वित करु, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही सर्व माहिती प्रसारित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भय्यूजी महाराज यांचा मोक्षविधी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी (दि. २८) नाशिकरोड येथील मुक्तिधाममध्ये मोक्षविधी केला. याप्रसंगी भैय्यूजी महाराजांचे इंदूरसह नाशिक शहरातील शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी आठ वाजता नवनाथ संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे भैय्यूजी महाराजांच्या कुटुंबीयांनी नवनाथ सिद्धी अनुष्ठान विधी केला. त्यानंतर दत्तात्रय पूजन करण्यात आले. नवग्रह शांती विधीही पार पडला. त्यानंतर मोक्षदेवता विष्णू पूजन आणि शेवटी प्रभू रामचंद्र पूजन करण्यात आले. दुपारी १२.२७ वाजता हा विधी पूर्ण झाला. हा विधी भैय्यूजी महाराजांचे शिष्य विनायक यांनी केला. याप्रसंगी भैय्यूजी महाराजांच्या पत्नी डॉ. आयुषी शर्मा यादेखील उपस्थित होत्या. मोक्षविधीचे पौरोहित्य त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अनिकेत आनंद महाराज आणि मुक्तिधामचे पंडित नागेशशास्त्री देशपांडे यांच्यासह इतर ब्रह्मवृंदांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या तरुणीचा युकेमध्ये करिश्मा

0
0

नाशिक : युकेच्या आरोग्यसेवेतील विशेष योगदानासाठी ज्या बाहेरील देशांमधील सेवाभावी कर्मचाऱ्यांना ७० वर्षांच्या काळात युके सरकारकडून पहिल्यांदाच गौरविण्यात आले त्या कर्मचाऱ्यांमध्ये नाशिकच्या तरुणीचा समावेश आहे. कश्मिरा निवृत्ती आंधळे या पस्तीशीपार फिजीओथेरपिस्ट महिलेचा गौरव त्यांच्या अखंड सेवाकार्याबद्दल युके सरकारच्या वतीने करण्यात आला. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात तेथील पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते नाशिकच्या करीश्मा यांना गौरविण्यात आले.

युकेमध्ये १९४८ च्या दरम्यान स्थापन झालेल्या 'नॅशनल हेल्थ स्कीम' (एनएचएस) च्या सत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त युके सरकारच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच या प्रकारे गौरव समारंभाचे आयोजन केले होते. युकेच्या वैद्यकीय क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या अश्वेत व अल्पसंख्यांक वंशाच्या दहा व्यक्तींची या गौरवासाठी निवड करण्यात आली होती. वैद्यकीय क्षेत्रांतर्गत दहा उपविभाग करण्यात आले होते. यामध्ये फिजीओथेरपिस्ट म्हणून इंग्लंडमध्ये १५ वर्षांपासून योगदान देणाऱ्या कश्मिरा आंधळे यांची निवड करण्यात आली होती. त्यांना तेथील सरकारने 'वाईंडरश ७०' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले. 'एनएचएस'मध्ये दीर्घकाळ योगदान देणाऱ्या जगभरातील दहा देशातील सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामधून कश्मिरा या मूळ नाशिकच्या कॉलेजरोड परिसरातील रहिवासी आहेत. युकेतील ईस्ट बर्कशायर येथे त्या २००३ मध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे पती निवृत्ती सांगळे हे तेथे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत.

गौरव देशासाठी अभिमानास्पद

अठरा महिन्यांच्या दिव्यांग बालकांपासून तर जर्जर अवस्थेतील ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी कश्मिरा यांनी आजवर दिलेल्या अखंड सेवाकार्याचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला. जगभरातील नामांकीत वैद्यकीय तज्ज्ञ एनएचएसमध्ये योगदान देत असताना भारतीय आणि मूळ नाशिकच्या तरुणीचा झालेला गौरव देशासाठी अभिमानास्पद असल्याचे तिचे वडील अॅड. ललित सांगळे आणि निवृत्ती मुख्याध्यापिका मीना सांगळे यांनी 'मटा' शी बोलताना म्हटले आहे. कश्मिरा या आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त भरत आंधळे यांच्या वहिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरातील अतिक्रमणे हटविली

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर येथील म्हसोबा मंदिराजवळील फेरीवाले व भाजीविक्रेत्यांवर गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. या कारवाईत विक्रेत्यांचे हातगाडे, फळे, भाज्या जप्त करण्यात आल्या.

उपनगरच्या या रस्त्यावर नवीन निवासी इमारती झाल्या आहेत. त्यामुळे येथील लोकवस्ती वाढली आहे. या नागरिकांसाठी उपनगर बाजारात भाजीमंडई आहे. परंतु, तेथे पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने भाजीविक्रेते रस्त्यावर बसू लागले आहेत. म्हसोबा मंदिर रस्त्यावर भाजी व फळविक्रेत्यांबरोबरच अन्य व्यावसायिकांनीही बस्तान मांडल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केली. नारायणबापू चौकाजवळील होली फ्लॉवर शाळेच्या रस्त्यावरही भाजी व अन्य विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. मात्र, महापालिकेचे पथक येथे येण्याआधीच या रस्त्यावरील विक्रेते पसार झाले. परंतु, महापालिकेने येथे कारवाई केली नाही. भाजीविक्रेत्यांना मकरंद कॉलनीशेजारील मैदानात, तसेच उपनगर नाक्यावर नो हॉकर्स झोनमध्ये जागा देण्यात आली आहे. परंतु, ते तेथे न बसता म्हसोबा मंदिर व होली फ्लॉवर शाळेच्या रस्त्यावर बस्तान मांडत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेला कारवाई करावी लागली. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

--

२ कॉलम (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत गोडसे यांना राज्याचा वनश्री पुरस्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शहराच्या पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेत गेली पाच वर्षे स्वखर्चातून देवळाली कॅम्पमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून झाडांचे संगोपन करीत सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या चंद्रकांत गोडसे यांना राज्य सरकारचा सामाजिक वनीकरण विभागाचा मानाचा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

चंद्रकांत गोडसे यांनी देवळालीच्या विविध भागात वेळोवेळी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनास चालना दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे लामरोड, भैरवनाथ मंदिर परिसर, तसेच देवळालीतील अनेक ठिकाणे हिरवाईने बहरत आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धन करताना त्यांनी प्रत्येक झाडासाठी स्वखर्चातून ट्री गार्ड बसविले आहेत. शिवाय स्वतःच्या खर्चातून उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई असताना टँकरद्वारे दिवसाआड न चुकता पाणीपुरवठा केला आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावे त्यांनी संपूर्ण शहरात वृक्षारोपण करीत गेल्या पाच शेकडो झाडे जगविली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. राधास्वामी सत्संग व्यास, मुरबाड-कल्याण मार्ग येथे दि. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वने तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, विलास शिंदे, अजय बोरस्ते आदींसह देवळालीतील लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटनांतर्फे स्वागत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पोलिसांकडून पाच गुन्ह्यांची उकल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर पोलिसांनी सराईत धरपकड करीत पाच गुन्ह्यांचा उलगडा केला. या कारवाईत सात संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी तीन लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात बुलेटसह दोन दुचाकी, मोबाइल आणि सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे.

गंगापूर हद्दीत ७ जून रोजी लुटमारीचा प्रकार घडला होता. गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास करून जितेंद्र मधुकर फसाळे (२०), उत्तम मुरलीधर फसाळे (२०) आणि किरण गंगाराम फसाळे (१९, तिघे रा. गंगाम्हाळूंगी, ता. जि. नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी दुचाकीसह (एमएच १५ जीएच ८५६५) मोबाइल असा सुमारे एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान, १५ जून रोजी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संतोष केरबा कांबळे (३५) आणि प्रमोद बाळाजी पाडदे (२१ दोघे रा. नांदेड) या जोडगोळीला अटक करून त्यांच्याकडून ३० ग्रॅम सोन्याची लड आणि मोबाइल असा सुमारे ८८ हजाराचा ऐवज जप्त केला. सोमवारी (दि.१७) दाखल गुन्ह्यात सिद्धेश बाळासाहेब आहेर (२० रा. वडनेर भैरव) याच्या ताब्यातून बुलेट (एमएच १५ एफके ५०३५)तर जगदीश आप्पा जाधव (२१, रा. नरखेड-मेहुनबारे ता. चाळीसगाव) याच्याकडून दुचाकी (एमएच १५ अ‍ेएफ ५००२) जप्त करण्यात आली. ही दुचाकी संशयितांनी वडनेर भैरव पोलिस स्टेशन हद्दीतून चोरली आहे.

वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक समीर वाघ, एएसआय अनिल बागूल, हवालदार विष्णू उगले, माणिक गायकर, पोलिस नाईक दत्तू गायकवाड, शिपाई नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, घनश्याम भोये, तुळशीदास चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी फोटो

शाळा-पालक वाद विकोपाला

0
0

विस्डम हायस्कूलमधील फी वाढीवर सूचनेनंतरही तोडगा नाहीच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल प्रशासन आणि पालक सुषमा गोराणे यांच्यात तीन वर्षांपासून फीवाढीवरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला आहे. शाळा प्रशासन व पालक दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. याचीच प्रचिती गुरुवारी पुन्हा आली. सकाळी आठपासून दुपारी एक वाजेपर्यंत गोराणे यांच्याकडून आपल्या पाल्याला वर्गात बसू देण्याची मागणी करण्यात आली. परंतु, शाळेने त्यांना जुमानले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सुषमा गोराणे यांची दोन्ही मुले गंगापूर रोडवरील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. यातील मोठ्या मुलाला शाळेतून त्रास होत असल्याच्या कारणास्तव गोराणे यांनी गेल्या वर्षी शाळेतून काढून घेतले. मात्र, २०१५ पासून शाळेने केलेल्या फी वाढीविरोधात सुरू केलेले बंड त्यांनी सुरुच ठेवले आहे. त्यांचा लहान मुलगा अद्याप या शाळेत शिक्षण घेत असला तरी त्याचीही दोन वर्षांपासून फी त्यांनी भरलेली नाही. परिणामी, विस्डम प्रशासनाने त्याचा दाखला गोराणे यांना दिला आहे. शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गोराणे या शाळेची बदनामी करत असून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यापर्यंत जाऊन शाळेला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोराणे यांनी फीदेखील भरू नये व दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत प्रवेश करावा, असे सांगितले. तरी त्या वाद मिटवत नसल्याने हैराण झाले असल्याचे मत शाळा प्रशासन व्यक्त करीत आहे.

गोराणे यांनी त्यांच्या पाल्याची दोन वर्षांपासून फी भरलेली नाही. शिवाय, शाळेला या ना त्या कारणांनी बदनाम करणे सुरू आहे. आमच्या संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना आज विनाकारणच कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. हायकोर्टाच्या नियमाप्रमाणे एक वर्षापेक्षा जास्त काळ होऊनही एखाद्या विद्यार्थ्याची फी भरण्यात आली नसेल तर त्या विद्यार्थ्याला दाखला देण्याचा अधिकार आहे. असे असतानाही शाळेने त्याला आतापर्यंत बसू दिले. मात्र, गोराणे यांच्याकडून कोणतेही सहकार्य लाभत नसून आमच्या शाळेची बदनामी करण्याचे कारस्थान त्यांनी रचले आहे. अनेक पालकांनीही गोराणे यांच्या पाल्याविरोधात आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

- मनीष अग्रवाल, विश्वस्त,

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल

शाळा व्यवस्थापन माझ्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. माझा बेकायदेशीर फी भरण्यास विरोध असून कायद्यानुसार फी भरायला मी तयार आहे. परंतु, शाळा मला गेटमध्ये प्रवेशही करू देत नाही. फी भरण्याविषयी विचारणा केल्यास उत्तरे दिली जात नाही. माझ्या मोठ्या मुलाला या शाळेने त्रास दिला; आता लहान मुलाचा निकालही देत नाही. शिवाय, त्याला वर्गातही बसू देत नाही. शिक्षण उपसंचालकांनी वारंवार सूचना देऊनही शाळा कोणताही प्रतिसाद देत नसून गुरुवारीही आम्हाला सकाळी ८ वाजेपासून १ वाजेपर्यंत गेटबाहेर उभे ठेवले.

- सुषमा गोराणे, पालक

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल आणि पालक दोघे मागे व्हायला तयार नसल्याने त्यांच्यातीत वाद विकोपाला गेला आहे. शाळेलाही तीन वेळा नोटीस देऊन विद्यार्थ्याला बसविणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, दोघांकडून कोणतीही सामंजस्याची भूमिका घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

- नितीन उपासनी,

प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग

शाळांच्या फीसंदर्भात कायद्यातच अनेक त्रुटी आहेत. कित्येक शाळांनीही अद्याप व्यवस्थित फी ठरवलेली नाही. शाळा व्यवस्थापनांकडून कोर्टाचे नियम दाखवले जातात; पण काही नियम हे कोर्टाने ठराविक शाळांपुरतेच दिलेले असतात, हे लक्षात घ्यायला हवे. फीबाबत शाळा आणि पालक यांच्यातील वादावर तोडगा निघत नाही, हे व्यवस्थेचे अपयश आहे.

- डॉ. मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एचएएल’कडून तपास सुरू

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुखोई ३० एमकेआय या विमानाच्या झालेल्या दुर्घटनेची हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून सखोल चौकशी सुरू झाली आहे. त्यासाठी विशेष पथक निर्माण करण्यात आले आहे. सध्या विमानाचे विविध अवशेष गोळा करण्यावर 'एचएएल'ने भर दिला आहे.

'एचएएल'कडून निर्माण करण्यात आलेले आणि हवाई दलास सुपूर्द करण्यास सज्ज असलेल्या सुखोई ३० एमकेआय या विमानाच्या काही अखेरच्या चाचण्या घेतल्या जात होत्या. 'एचएएल'चे लढाऊ विमान बुधवारी (दि. २७) सकाळी धावपट्टीवरून हवेत झेपावल्यानंतर त्याने काही फेऱ्या मारल्या आणि अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर वैमानिक आणि सहवैमानिकाने इमर्जन्सीसाठी असलेले बटण दाबले आणि आसनासह ते विमानाच्या खाली आहे. तत्क्षणी पॅराशूट उघडले आणि हे दोन्ही जण जमिनीवर सुखरुप आले. मात्र, विमानाला आग लागली आणि ते शेतात जाऊन कोसळले. विमानाचे विविध सुटे भाग इतस्तत: पसरले आणि जवळपास ८० टक्के विमान जळून खाक झाले. सुखोई विमानाचा गेल्या १६ वर्षांतील हा पहिलाच अपघात आहे. त्यामुळे 'एचएएल'ने याची गंभीर दखल घेतली आहे. सद्यस्थितीत विमानाचे विविध अवशेष गोळा करण्यावर भर दिला जात आहे. सखोल चौकशीसाठी आवश्यक असलेला ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. 'एचएएल'ने एक पथक नेमले आहे. याद्वारे ही चौकशी केली जाणार आहे. सर्वप्रथम वैमानिक आणि सहवैमानिक या दोघांची चौकशी केली जाणार आहे. चाचणीवेळी त्यांना आलेला अनुभव, विमानात काय बिघाड झाला होता, विमानात काय सुधारणा हवी आहे, याबाबत त्यांची चौकशी होणार आहे.

हलगर्जी कुठे झाली?

ओझर 'एचएएल'मध्ये यंदा तयार झालेले हे पहिलेच लढाऊ विमान होते. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते आहे. असे असतानाही अपघात झाल्याने या विमानाची जुळणी कधी आणि केव्हा झाली, विविध भाग जोडण्यात आले त्याचे प्रमाणपत्र, संबंधित विभागांनी मारलेले शेरे, सूचना, विविध भागांची जुळणी आदींबाबत चौकशी सुरू झाली आहे. कुठल्या टप्प्यात काही हलगर्जी झाली का, हे सुद्धा यानिमित्ताने पाहिले जात आहे.

ब्लॅक बॉक्सची तपासणी

संरक्षण विभागाच्या क्वालिटी अॅश्युअरन्स महासंचालक या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही लवकरच नाशकात दाखल होणार आहेत. त्यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची पाहणी आणि त्याद्वारे संशोधन केले जाणार आहे. त्यात या अपघाताची योग्य कारणे समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान-१ साठी

0
0

किशोर दराडे आघाडीवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघासाठी विक्रमी मतदान झाल्याने उत्सुकता लागलेल्या या मतमोजणीत टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला असून, त्यांनी पहिल्या फेरीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसे यांच्यावर ५,९१६ मतांनी आघाडी घेतली. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला २३ हजार ९९० मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण न करू शकल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. विजयासाठी आता दुसऱ्या क्रमांची मतेच निर्णायक ठरणार आहेत.

मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दराडे यांना सर्वाधिक १६,८८६ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे बेडसे यांना १०,९७० मते मिळाली. भाजपचे अनिकेत पाटील ६,३२९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर टीडीएफचे भाऊसाहेब कचरे ५,१६७ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे दराडे यांनी एकूण मतांमध्ये जवळपास ५,९१६ मतांनी आघाडी घेतली. दराडे यांना सर्वाधिक मते मिळाली असली तरी विजयासाठी आवश्यक असलेला कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित वृत्त...३

कोकणात डावखरेंची आघाडी

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लागू शकला नव्हता. पहिल्या पसंतिक्रमाच्या मतमोजणीत भाजपचे निरंजन डावखरे यांनी आघाडी घेतली होती. ७४ हजारांपैकी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ५६ हजार मतांची मोजणी झाली होती. त्यात डावखरे यांना २१ हजार ४६७, तर शिवसेनेच्या संजय मोरे यांना १८,५१९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना १२ हजार मते मिळाली होती. विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कुणालाही ओलांडता येणार नाही हे स्पष्ट झाल्याने निवडणुकीचा निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेला होता.

पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर जी वैध मते ठरतील त्याच्या निम्म्याहून एक मत अधिक मिळविणारा उमेदवार विजयी होणार आहे. पहिल्या पसंतीत ही मते कुणालाही मिळाली नाही. त्यामुळे सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांच्या (चढत्या क्रमानुसार) मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीची मते हस्तांतरित केली जातील. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा जो सर्वांत पहिल्यांदा पूर्ण करेल त्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल. तीन प्रमुख उमेदवारांव्यतिरीक्त अन्य उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर विजयाची भिस्त अवलंबून आहे. पहिल्या पसंतीत डावखरे यांना मिळालेल्या आघाडीच्या जोरावर त्यांना विजयाची सर्वाधिक चिन्हे दिसत आहे. मात्र, दुसऱ्या पसंतीत काही चमत्कार घडल्यास हे पारडे बदलू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

0
0

आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी येथील दोन महिलांच्या बुडून मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी बुधवारी रात्री महिलांच्या सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील मूळडोंगरी येथे २६ जून रोजी वाल्याबाई मोरे व सुमन मोरे या दोघी जावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आधी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र महिलांचे मामा बाबूलाल कारंडे यांनी आपल्या दोन्ही भाचींचा माहेरून ६० हजार रुपये आणावे यासाठी सासरच्या लोकांनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे या छळाला कंटाळून दोघींनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची फिर्याद बुधवारी नांदगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तानाजी मोरे, काळू मोरे, आत्माराम मोरे, बाळू मोरे, साखराबाई मोरे, महादू मोरे, सीताराम मोरे, गजु मोरे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

00

तरुणाची आत्महत्या

मनमाड : चांदवड येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी डावखरनगर भागात घडली. कृष्णा बाळू म्हस्के असे

मयत तरुणाचे नाव असून, त्याने गुरुवारी दुपारी राहत्या घरी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सहाय्यकाने परस्पर विकले बियाणे

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील शेतकऱ्यांना मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून मोफत वितरित होणारे २ क्किंटल मका बियाणे कृषी सहाय्यकाने परस्पर एका व्यापाऱ्याला व काही शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणला आहे.

हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे दिसू लागताच संबंधित कृषी सहाय्यक के. आर. पीठे यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी हा घोटाळा बाहेर आणला आहे.

राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाबीजकडून प्रत्येकी दोन किलो मका बियाणे मका वितरित केले जात आहे. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे गावाच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार गावाला याच योजनेतून २ क्किंटल मका बियाणे आले होते. मात्र कृषी सहाय्यक पीठे यांनी हे मका बियाणे शेतकऱ्यांना मोपत न वाटप करत पिंपळकोठे येथील काही शेतकरी व एक बियाणे विक्रेत्यांशी परस्पर व्यवहार करून विकले.

कृषी सहाय्यक पीठे यांच्या मका बियाणे घोटाळा सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणताच घोटाळेबाज कृषी सहाय्यकाने त्यांना आर्थिक आमीष दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र भामरे यांनी आमिषाला बळी न पडता हा मका घोटाळा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून उघडकीस आणला आहे. सदरचा घोटाळा पिंपळकोठे गावापुरता मर्यादीत नसून, या घोट्याळ्याशी व्याप्ती संपूर्ण तालुकाभर असल्याची शक्यता सरपंच भामरे यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चशिक्षितांकडून वाहनचोरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातून वाहने चोरी करणाऱ्या आणि धुळे जिल्ह्यात त्यांची विक्री करणाऱ्या चौघांना शहर पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने शिताफीने अटक केली. हे चौघे सुशिक्षित असून, यातील एक संशयित बी. एस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो. या टोळीचा मुख्य सूत्रधार फरार असून, संशयितांकडून पोलिसांनी १५ दुचाकी जप्त केल्या.

आकाश अशोक मराठे (मूळ रा. धुळे, हल्ली सिद्धेश्वर मंदिरासमोर, महाराणा प्रताप चौक, सिडको), उमेश उर्फ पप्पू युवराज मोरे (रा. मोहाडी, उपनगर, दंडेवाले बाबानगर, तिखी रोड, धुळे), शरद भरत बुवा (रा. शिरपूर, वाडीगाव, धुळे) आणि राहुल सुभाष वाघ (रा. फुलेनगर, शिंगावे गाव, ता. शिरपूर, धुळे) अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार भुसावळ येथील असून, तो सध्या फरार आहे. यातील मराठे आणि बुवा हे डीएमएलटी झालेले, तर उमेश मोरे याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. राहुल वाघ हा बी. एस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिकतो आहे.

मूळचा धुळ्याचा असलेला आकाश काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये नातेवाइकांकडे राहायला आला होता. त्याची ओळख भुसावळ येथील फरार आरोपीबरोबर होती. त्याने वाहनचोरी कशी करायची आणि त्यातून कसा पैसा मिळतो, याची माहिती मराठेला दिली. यानंतर या दोघांनी रमेश मोरे याला सोबत घेऊन शहरात ठिकठिकाणी तसेच धुळे, चाळीसगाव आणि गुजरात राज्यातही वाहनांची चोरी केली. चोरलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राहुल आणी शरद पाहत होते. यातील आकाशबाबात पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने त्यास काठेगल्ली येथून दोन दिवसांपूर्वी अटक केली. यानंतर उर्वरित टोळीचा छडा लागला. ही मुले सराईत नाहीत. मात्र, वाहनचोरीनंतर मिळणाऱ्या पैशांमुळे एकामागून एक गुन्हे करीत गेले.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की संशयितांकडून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पाचव्या संशयितास अटक झाल्यानंतर आणखी काही वाहने जप्त होतील. मागील महिन्याभरात शहर पोलिसांनी या १५ वाहनांसह ६३ पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. पत्रकार परिषदेला उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, युनिटचे निरीक्षक दिनेश बर्डेकर उपस्थित होते. ही कारवाई सहायक निरीक्षक अभिजीत सोनवणे, पीएसआय रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, एएसआय राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, रमेश घडवजे, शामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सैय्यद, पोलिस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, मोतीलाल महाजन, परमेश्वर दराडे, नितीन भालेराव, ललिता आहेर, योगेश सानप, बाळा नांद्रे, महेंद्र सांळुखे, याद डंबाळे, पोलिस शिपाई जयंत शिंदे, विजय पगारे, संतोष ठाकुर, मधुकर साबळे आदींनी केली.

लॉक सिस्टिम महत्त्वाची

शहरातील बहुतांश वाहनचोरीच्या घटना पार्किंगमध्ये घडतात. सुरक्षित वाटणारे ठिकाणच दगा देते. मुळात नवीन अथवा जुन्या कोणत्याही वाहनांचे हँडललॉक तितके मजबूत नसते. एक जोराचा झटका दिल्यानंतर हँडललॉक उघडते. त्यानंतर चोरटे वाहन स्टार्ट करण्यासाठी वायरी जोडून ते डायरेक्ट करतात व पसार होतात. यासाठी वाहनाला फ्रंट लॉक अथवा इतर मजबूत लॉक सिस्टिमची गरज असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्वत:च्या नंबर प्लेटचा वापर

यातील संशयित आरोपी आपल्याकडील वाहन क्रमाकांचा रजिस्ट्रेशन क्रमाकांची प्लेट चोरी केलेल्या वाहनास वापरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची बाब पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सांगितली. वाहनचोरीनंतर नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या हाती लागले तर फसायला नको म्हणून ही तजवीज करण्यात आली होती. चौघा संशयितांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीने रागविल्याने पत्नीने सोडले घर

0
0

गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने वाद

म. टा. वृत्तसेवा, सिडको

कामटवाडे परिसरातील विवाहित महिलेस मोबाइलवरील गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगणे पतीसाठी तापदायक ठरले आहे. पतीने बोलल्याने घरात वाद होऊन रागावलेली पत्नी घरातून निघून गेली. पतीने दोन दिवस शोध घेऊन पत्नी सापडू शकली नाही. अखेर पतीने अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडे परिसरातील शंभुराजेनगर येथील शंकरभाई भाऊनाथ कापसे (३९) यांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली आहे. प्रिया (२९) यांना घरातील मंडळींनी मोबाइलवरील गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून झालेल्या भांडणाचा राग येऊन प्रिया घरातून निघून गेल्या. पत्नी गेल्याचे लक्षात आल्याने पती शंकरभाई यांनी परिसरात तसेच आपल्या नातेवाइकांकडेही शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाही. अखेर प्रिया यांचे पती शंकरभाई कापसे यांनी अंबड पोलिस धाव घेत घटनेची माहिती देत तक्रार दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास चव्हाण करीत आहेत.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुले, मुली व महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनीही ठोस उपाययोजना राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त केली जात आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टू व्हीलरचे प्रशिक्षण मिळणार मोफत!

0
0

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : रस्ते अपघात ही सध्या प्रमुख समस्या ठरते आहे. या अपघातांमध्ये टू व्हीलरच्या अपघातांची संख्या प्रचंड आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल तर चालकांना वाहतूक नियमांबरोबरच वाहनामधील यांत्रिक दृष्टीने माहिती असल्यास दुचाकी अपघातांचे प्रमाण कमी करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास नाशिक फर्स्ट या संस्थेने व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी १५ मोटर बाइक मिळाल्या असून, एका दिवसीय प्रशिक्षणातून चालकांमध्ये नियमांबरोबरच वाहनांची इत्तंभूत माहिती दिली जाणार आहे.

वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरात नाशिक फर्स्ट ही संस्था सक्रिय आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी, महिला, पुरुष यांना मोफत प्रशिक्षण येथे देण्यात येते. अपघातांची संख्या कमी व्हावी, या उदात्त हेतूने ही संस्था कार्यरत आहे. यंदा मात्र, टू व्हिलरचा स्वतंत्र प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, 'टू व्हीलर राय़डर ट्रेनिंग फॅसिलिटी' असे उपक्रमाचे नाव आहे. औरंगाबाद, पुणे येथील महिला व पुरुष प्रशिक्षकांची नेमणूक त्यासाठी करण्यात आली आहे. वाहतूक नियम, वाहनातील यंत्रांचे काम, रचना, संकटकाळात काय दक्षता घ्यावी, गाडीची ब्रेकिंग सिस्टीम अशा अनेक महत्त्वाच्या बाबी शिकवल्या जाणार आहेत. केवळ वाहन चालवता येते इतकेच पुरेसे नसून, वाहनाचे मेकॅनिझम नागरिकांना माहीत असल्यास वाहनांमधील बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसेल, अशा विश्वास संस्थेला आहे. या उपक्रमासाठी हिरो मोटर कॉर्प या संस्थेचे सहकार्य संस्थेला मिळले आहे.

\Bतुम्हीही व्हा सहभागी!

\Bज्या व्यक्तींना वाहनाच्या यंत्रणेविषयी जाणून घ्यायचे असेल त्यांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक फर्स्टकडून करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी तुमच्याकडे लायसन्स असणे आवश्यक आहे. ते नसल्यास आवश्यक ती प्रक्रिया करण्यासाठीदेखील नाशिक फर्स्ट सहकार्य करणार आहे. त्यासाठी ०२५३ - २३१५९६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

\B

\Bरस्ते अपघात कमी व्हावेत, या भावनेने आम्ही विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. यापूर्वीही त्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण देण्यात आले असून, या उपक्रमात टू व्हीलर चालकांसाठी प्रशिक्षण दिले जाईल.

- अभय कुलकर्णी, चेअरमन, नाशिक फर्स्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमरण उपोषणाला बसलेले रुग्णालयात

0
0

आमरण उपोषणाला

बसलेले रुग्णालयात

महिंद्राच्या दोन बडतर्फ कामगारांचा संताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा अॅण्ड महिंद्रात युनियनचे कामकाज करताना चार वर्षापूर्वी बडतर्फ केलेल्या दोन कामगारांकडे युनियनने पाठ फिरवल्यामुळे नऊ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेल्या कामगारांचे उपोषण मोडीत काढत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे संतप्त झालेल्या या दोन कामगारांनी रुग्णालयातही आपले उपोषण कायम राहणार असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी या उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले आहे.

कामगार उपायुक्तांनी बुधवारी या कामगारांना चर्चेसाठी बोलावले होते. पण, युनियनचे पदाधिकारीच उपस्थित न राहिल्यामुळे यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे या कामगारांनी आपले उपोषण चालुच ठेवले. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी या उपोषण कर्त्यांची दखल घेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपोषण कर्त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांच्या बळापुढे ते हतबल ठरले.

२०१४ या वर्षात युनियचे काम करताना तत्कालिन सरचिटणीस प्रविण शिंदे व उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांनी कंपनीने बडतर्फ केले. त्यानंतर त्यांनी युनियनच्या घटनेप्रमाणे आर्थिक मदत मागीतली. पण, युनियनने ती न दिल्यामुळे त्यांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पण, येथेही त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी विविध मागण्याही केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथींचे विकार बळावले

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये डेंग्यूसदृश आजाराचे तीन रुग्ण आढळल्यानंतर या भागात विविध साथींच्या विकारांचे रुग्णही आढळून आले आहेत. मात्र, सिडको परिसरात साथींचे विकार बळावले असतानाही महापालिका यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील रहिवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोवासीय त्रस्त झालेले असतानाही आरोग्य विभागाकडून प्लास्टिकबंदीची कारवाई सुरू आहे, तर मलेरिया विभाग कोणत्याही प्रकारे फवारणीचे काम करीत नसल्याने या परिसरात विविध आजारांचे रुग्ण आढळून येत असल्याचा आरोप नगरसेवक आणि नागरिक करीत आहेत. प्रभाग २४ मध्ये यापूर्वीही अशा प्रकारे डेंग्यूसदृश व चिकनगुनियाच्या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाने या भागाकडे कटाक्षाने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये एका नववधूसह व एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाला डेंग्यसदृश्य आजार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची माहिती नगरसेविका कल्पना पांडे यांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यानंतरही परिसरात गुरुवारी विविध साथविकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने आरोग्य विभागासह मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना करून, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. याच प्रभागात काही दिवसांपूर्वी चिकनगुनियाचे ३० ते ४० रुग्ण आढळून आले होते. या प्रभागातील खांडे मळा, खोडे मळा व गोविंदनगरमधील काही भागात रस्तेच नसल्याने आणि सध्या पावसाळा सुरू झाल्याने चिखल व पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्वच्छता केल्याचा देखावा

प्रभागात सध्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी येऊन झाडलोट करीत असले, तरी कोणत्याही प्रकारची धूर फवारणी होत नसल्याने नागरिकांना साथींच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. मलेरिया विभागाकडून दररोज या भागात धूर फवारणी होणे आवश्यक असले, तरी याठिकाणी कधीही धूर फवारणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आता डेंग्यूसदृश आणि विविध साथविकारांचे रुग्ण आढळून आल्याचे समजल्यानंतर अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी येऊन पाहणी करून स्वच्छता केल्याचा देखावा निर्माण करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने संपूर्ण सिडको परिसरात धूर फवारणी सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

--

प्रभागात स्वच्छता केली जात असली, तरी धूर फवारणी होत नाही किंवा सर्वच प्रभागांत स्वच्छता होते असे नाही. मलेरिया विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार याबाबत माहिती देऊन काम करण्याची सूचना करूनही ते ऐकत नसल्याने आता थेट आयुक्‍तांकडेच ही समस्या मांडणार आहे.

-कल्पना पांडे, नगरसेविका, प्रभाग २४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेंद्र गुजराथी यांचा अमेरिकत सन्मान

0
0

अकाउंटिंग एज्युकेटर अॅवॉर्ड बहाल

gautam.sancheti@timesgroup.com

नाशिक : येथील प्रसिद्ध दिवंगत चार्टर्ड अकाउंटट आर. आर. गुजराथी यांचे पुत्र डॉ. महेंद्र रमणलाल गुजराथी यांना अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशनचा प्रतिष्ठीत असा अकाउंटिंग एज्युकेटर अॅवॉर्ड मिळाला आहे. अमेरिकेतील तीन हजार बिझनेस युनिव्हर्सिटीमधून त्यांची निवड करण्यात आली. गेल्या ३७ वर्षांपासून ते अमेरिकेत असून त्यांचे एम. कॉम पर्यंतचे शिक्षण नाशिकमधील बी. वाय. के. कॉलेजमध्ये झालेले आहे.

गुजराथी ज्या विद्यापीठात शिकवतात त्या बेंटले युनिव्हर्सिटीमध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले प्राध्यापक ठरले आहे. अमेरिकेत करिअरमधील योगदानांचा समावेश असलेल्यांना हा पुरस्कार दिला जातो. यासाठी शैक्षणिक नवकल्पना, अध्यापनात श्रेष्ठता, प्रकाशने, विद्यार्थ्यांना पदवीधर करण्यासाठी संशोधन मार्गदर्शन, व्यावसायिक आणि शैक्षणिक सोसायटी आणि उपक्रमातील महत्त्वपूर्ण सहभाग याचा विचार केला जातो. डॉ. महेंद्र गुजराथी हे बेंटले विद्यापीठातील लेखाविषयक माहिती आणि आर्थिक अहवाल अभ्यासक्रमाचे समन्वयक आहेत. त्यांनी बेंटल युनिव्हर्सिटीमध्ये अनेक नवीन अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्यांना याअगोदरही संशोधनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहे.

प्राथमिक शिक्षण पेठे विद्यालयात

गुजराथी यांची बहीण सुलभा जामधार या बी. वाय. के. कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका असून त्या नाशिकमध्ये राहतात. इतर दोन बहिणी मुंबई व पुणे येथे आहेत. गुजराथी यांचे पेठे विद्यालयात प्राथमिक शिक्षण झाले. त्यांनी जुन्या मॅट्रिकमध्ये जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळवला. तर एम. कॉम. मध्ये ते पुणे विद्यापीठात प्रथम आले होते. यात अकाउंट विषयात त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले होते.

नाशिकची नाळ तोडली नाही

एम. कॉम. नंतर त्यांनी अहमदाबाद येथे डॉक्टरेट पदवी मिळवली त्यानंतर ते अमेरिकेत गेले. तेथे अनेक विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. अमेरिकेत असतांनाही त्यांनी नाशिकची नाळ तोडली नाही. त्यांनी सिन्नर येथील महालक्ष्मी मंदिराच्या हॉलसाठी ११ लाखाची देणगी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर परिसरात पालखीचे स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सातपूर भागात सर्वपक्षीय स्वागत करण्यात आले. महापालिका प्रशासनाने पालखी स्वागताची प्रथा बंद केल्याने नाराजी व्यक्त करीत शिवसेनेतर्फे त्र्यंबकेश्वररोडवरील सौभाग्य लॉन्स येथे, तर राष्ट्रवादीतर्फे हॉटेल अयोध्या येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. सातपूर गावात मारुती मंदिरात ग्रामस्थ व भाजपतर्फे पालखीचा स्वागत सोहळा पार पडला. पहिल्यांदाच सर्वपक्षीय पालखीचा स्वागत सोहळा घेण्यात आल्याने वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. पंढरपूला होणाऱ्या यात्रेकरिता निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे सातपूर भागात आगमन झाल्यावर हा सर्वपक्षीय सोहळा रंगला. आमदार योगेश घोलप, आमदार सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, मनपा गटनेते विलास शिंदे, सलिम शेख, सातपूर सभापती योगेश शेवरे, नगरसेवक दिलीप दातीर,नगरसेविका सीमा निगळ, हर्षदा गायकर, नयना गांगुर्डे, रंजन ठाकरे, नाना महाले, जयंत जाधव आदी उपस्थित होते.

---

'महिंद्रा'चे आंदोलनकर्ते सिव्हिलमध्ये दाखल

सातपूर : महिंद्रा कंपनीतील बडतर्फ कामगारांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनातील पदाधिकाऱ्यांची प्रकृती गुरुवारी खालावल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या नऊ दिवसांपासून कामगार उपायुक्त कार्यालयासमोर त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आमचे आंदोलन जाणून बुजून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

--

कमानीवर वृक्ष (फोटो)

पंचवटी : तपोवनातील कपिला-गोदावरी संगमावर जाण्याच्या भागात उभारण्यात आलेल्या कमानीवर पिंपळ वृक्षाचे रोपटे जोमाने वाढत आहे. या वृक्षाच्या रोपाची मुळे कमानीत शिरली असल्याने कमानीला भेगा पडल्या आहेत. वृक्षाची जशी वाढ होईल तशा या भेगा मोठ्या होऊन कमानीला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हे रोप नष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुचाकीस्वार जखमी

सिडको : पाथर्डी फाटा येथून अश्विननगरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास दुचाकीनेच धडक दिल्याने तो जखमी झाला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अमित चंद्रकांत पोतदार (वय ३४, रा. आनंदनगर) हे आपल्या आईसह दुचाकी (एमएच १५ एएक्स, ६५६७)वरून जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने (एमएच ४१ एएल, ०८२१) पोतदार यांच्या गाडीस धडक दिली. त्यात अमित पोतदार जखमी झाले आहेत. धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला.

'ईबीसी'बाबत चालढकल (फोटो)

पंचवटी : शहरात काही शैक्षणिक संस्थांत ईबीसी सवलतीअंतर्गत ५० टक्के शिक्षण शुल्क भरून प्रवेश देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसून, काही शिक्षण संस्था व महाविद्यालये १०० टक्के शिक्षण शुल्काची मागणी करीत आहेत. विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याने याबाबत कडक निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. छावा सेनेचे अध्यक्ष करण गायकर, उमेश शिंदे, शिवाजी मोरे, नितीन सातपुते आदींनी ही मागणी केली आहे.

दुचाकी चोरीस

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील मुंगी इंजिनीअरिंग कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरून दुचाकी चोरीस गेल्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ चंदर चंद्रे (३१, रा. विल्होळी गाव) याने त्याची दुचाकी ( एमएच १५ ईआर, ८१६०) ही कंपनीच्या गेटसमोर उभी केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चंद्रे यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निवारा शेडची दुर्दशा (फोटो)

पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथील सिग्नलवर असलेले पोलिसांचे निवारा शेड सध्या फूटपाथवर पडून आहे. गेल्या महिन्यांपासून हे शेड येथे पडल्याने गंजले आहे. फूटपाथवरून जाणाऱ्या नागरिकांनी या निवारा शेडचा अडथळा निर्माण होत आहे. हे निवारा शेड काढून घेण्याची या मार्गावरून जाणारे नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री युतीसाठी सकारात्मक

0
0

जळगावबाबत मुंबर्इत खलबते; मुख्यमंत्र्यांची महाजन, जैनांसोबत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना किंवा खान्देश विकास आघाडीशी युती करण्याबात गुरुवारी (दि. २८) दिवसभर मुंबर्इत खलबते सुरू होते. या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माजी मंत्री सुरेश जैन यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. जागा वाटपासह इतर काही प्रस्तावांवर चर्चा झाली, तसेच मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सकारात्मकता दर्शवित स्थानिक पातळीवर मंत्री महाजन आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांनी निर्णय घेण्याचे सागितल्याची माहिती जळगावातील नेत्यांनी दिली.

महापालिकेची निवडणूक दि १ ऑगस्ट रोजी होत आहे. निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. महापालिकेत सध्या शिवसेनेचे नेते माजी आमदार सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. आगामी निवडणुकीत विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सुरेश जैन यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षालादेखील शिवसेनेशी किंवा खान्देश विकास आघाडीशी युती करण्याचे दोन पर्याय ठेवले होते. यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशीदेखील चर्चा केली होती.

त्यानुसार गुरुवारी, जळगावातून माजी मंत्री सुरेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार चंदुलाल पटेल यांच्यासोबत मुंबर्इत गेले होते. त्यांनी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी २० मिनिटे चर्चा केली. चर्चेत शिवसेना नेते जैन यांनी युतीचा प्रस्ताव ठेवून प्राथमिक भूमिका मांडली. या वेळी जागांच्या सख्येवरदेखील चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनतंर सुरेश जैन यांनी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांनाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे महापौर ललित कोल्हे व खान्देश विकास आघाडीचे गटनेते सुनील महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत युतीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून, स्थानिक पातळीवर मंत्री महाजन आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांनी निर्णय घेण्याचे सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे भाजपचे महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, युतीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. युती न झाल्यास भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images