Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शाहू जयंती

$
0
0

महापालिका कार्यालय (फोटो)

नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, महेशकुमार डोईफोडे, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, मुख्य लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सुरेश निकुंभे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कोठारी, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, प्रशांत मगर, बाजीराव माळी, पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी, विलास खेडलेकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महावितरण कार्यालय

महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थय्क प्रवीण बागुल यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सुरेश रोकडे, मंगेश गाडे, वित्त व लेखा विभागाच्या उपव्यवस्थापक माधुरी कुलकर्णी, विशाल मरकड, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने आदी उपस्थित होते. लहाने यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची महती विशद केली.

--

भुजबळ फार्म (फोटो- समता परिषद)

राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले. भुजबळ फार्म येथील अभिवादनपर कार्यक्रमात ते बोलत होते. समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश पदाधिकारी मुख्तार शेख, मकरंद सोमंवशी, महेश भामरे, भालचंद्र भुजबळ, संदीप सोनवणे, मोहम्मद आरिफ खान, चेतन बागुल आदी उपस्थित होते.

--

राष्ट्रवादी काँग्रेस (फोटो)

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शहराध्यक्ष ठाकरे, बाळासाहेब कर्डक, योगेश निसाळ यांनी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य विशद केले. संजय खैरनार, अर्जुन टिळे, मुख्तार शेख, पुरुषोत्तम कडलग, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, मकरंद सोमवंशी, अरविंद सोनवणे, किरण मानके, अनिता भामरे, अल्ताफ पठाण, सुरेखा निमसे, सुषमा पगारे, रवींद्र गायधनी, प्रफुल्ल पाटील, दिलीपराव सावळे पाटील, राजाभाऊ जाधव आदी उपस्थित होते.

--

फुले विद्यामंदिर (फोटो)

पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापक सुनील शेवाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपशिक्षक मोहन माळी यांनी राजर्षींचे कार्य विशद केले. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील गोष्टी कथन केल्या. प्रकाश खैरनार यांनी प्रास्ताविक केले. संगीता महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती महाले यांनी आभार मानले. विद्या महाजन, जयश्री पवार, नीलिमा पडोळ यांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक प्रमुख वैशाली राजभोज यांनी संयोजन केले.

--

मराठा हायस्कूल (फोटो)

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूररोडवरील मराठा हायस्कूलमध्ये सामाजिक न्यायदिनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक अरुण पिंगळे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक रमेश वडजे, नानाजी देसले, दत्तात्रय पवार, सुनील बस्ते, नितीन शिंदे, सोपान वाटपाडे उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेतर्फे प्रभातफेरी काढण्यात आली. मुख्याध्यापक पिंगळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगितली. के. डी. दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीडीओ मेरी शाळा

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी शाळेत मुख्याध्यापिका आशा डावरे, शिक्षक प्रतिनिधी व शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे, पर्यवेक्षिका कृष्णा राऊत, मुग्धा काळकर यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. विद्यार्थिनी चैतन्या तुपसाखरे, गौरी मोरे, अर्पिता ह्याळीज यांनी मनोगत व्यक्त केले, वेदश्री पवार हिने सूत्रसंचालन केले. वर्गशिक्षिका शोभा भदाणे यांनी संयोजन केले. यावेळी भित्तिचित्रांचे प्रकाशन करण्यात आले

--

खेडगाव महाविद्यालय

मविप्र संस्थेच्या खेडगाव (ता. दिंडोरी) महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एन. कारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. एनएसएस अधिकारी प्रा. विकास शिंदे, विठ्ठल जाधव, डॉ मनीषा आहेर, ज्योती भोर, माधुरी जाधव, अनिल बचाटे, किरण भामरे, संभाजी खरात, दीपक भरसाठ, पंकज सूर्यवंशी उपस्थित होते. कारे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

--

सटाणा नगरपालिका (फोटो)

सटाणा : सटाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्षा संगीता देवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. आरोग्य सभापती दीपक पाकळे, नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, निर्मला भदाणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे, के. यू. सोनवणे, आरोग्य विभागप्रमुख एस. पी. कोर, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस, संजय सोनवणे, मनोहर बोरसे, अनिल कायस्थ, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

--

सिन्नर सार्वजनिक वाचनालय (फोटो)

सिन्नर : सिन्नर सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती भगत यांनी आपल्या मनोगतातून सांगितली. यावेळी उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे , संचालक पी . एल . देशपांडे, मनीष गुजराथी, जितेंद्र जगताप, कर्मचारी आणि वाचकवर्ग उपस्थित होता.

--

कथले विद्यालय, मिठसागरे

सिन्नर : मविप्र समाजाचे पी. बी. कथले माध्यमिक विद्यालय मिठसागरे (ता. सिन्नर) येथील अभिवादनपर कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. येवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची माहिती दिली.

--

नूतन जवाहर विद्यालय

सिन्नर : मविप्रच्या नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव येथे सामाजिक न्यायदिन साजरा झाला. किशोर जाधव अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणूनाथ गायकवाड यांनी केले. संजय नागरे यांनी शिक्षकांतर्फे मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख विद्यार्थ्यांना करवून दिली. किशोर जाधव यांनी सामाजिक न्यायदिन साजरा करण्याचा हेतू विद्यार्थ्यांना सांगितला. सूत्रसंचालन रामदास ढोली यांनी केल. आभार सुदाम वाजे यांनी मानले. प्रवीण पानपाटील, अंबादास जाधव, अशोक हिंगे, मोहन सोनवने, जनाबाई सुडके, शरद सोनवणे, अनंत पानसरे, रावसाहेब तांबे यांनी संयोजन केले.

--

वाजे विद्यालयात (फोटो)

सिन्नर : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात सामाजिक न्यायदिन साजरा झाला. मुख्याद्यापक बी. आर. कहांडळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एस. एन. लोहकरे, भागवत आरोटे, एस. टी. पांगारकर, बी. एस. देशमुख, व्ही. एन. शिंदे, के. एस. शिंदे, एस. बी. चांदोरे, मनीषा बनकर, आर. व्ही. वाजे, वैशाली वाजे, पी. आर. फटांगळे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. संस्थेचे संचालक हेमंत वाजे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांतर्फे ओमकार शेळके, स्नेहा जाधव यांनी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली. मनोहर कासार यांनी सूत्रसंचालन केले. आभार सोमनाथ गिरी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

--

गणूर परिसर

मनमाड : अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे गणूर (ता. चांदवड) परिसरात रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांद्वारे राजर्षी शाहू महाराजांना वंदन करण्यात आले. गणूर येथे प्रतिमापूजन झाले. परविन बागवान, संदीप जाधव, माजी सरपंच पंढरीनाथ ठाकरे, माजी सरपंच रौफ पटेल, एकलाख पटेल, मीनाताई शिरसाठ, रामा जगताप, नितीन ठाकरे, आकाश गांगुर्डे, श्रीधर गोधडे, आप्पा ढाकणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक तालुक्यात १४३ टक्के पाऊस

$
0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यातील सरासरी गाठण्यास मोठा हातभार लागला आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे एक दिवसाच्या संततधारेमुळे ही सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्के पाऊस झाला असून, बागलाण तालुक्यात १४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये धुवाधार पाऊस होतो. तुलनेने जूनमध्ये कमी पाऊस असतो. या महिन्यात जिल्ह्यात २३२४.५० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात १३८३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, २५ ला सायंकाळनंतर आणि २६ जून रोजी दिवसभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात २१२७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच या एक-दोन दिवसांत ७४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जूनच्या सरासरीच्या ९१.५४ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये जूनमध्ये साधारणत: १५४.९७ मिलिमीटर पाऊस होतो. चालू हंगामात १ ते २६ जूनदरम्यान आतापर्यंत १४१.८५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मान्सूनमध्ये होणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत हा पाऊस १४ टक्के आहे.

नाशिकमध्ये १५ पैकी तीन तालुक्यांनी दोन दिवसांपूर्वीच जून महिन्याची सरासरी ओलांडली होती. मात्र, सोमवारच्या पावसानंतर अशी सरासरी ओलांडणाऱ्या तालुक्यांची संख्या सात झाली आहे. यामध्ये बागलाण, मालेगाव आणि येवलापाठोपाठ आता नाशिक, चांदवड, देवळा आणि सिन्नर या चार तालुक्यांची भर पडली आहे. या तालुक्यांमध्येही १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्के पाऊस झाला असून, त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १४० टक्के पाऊस झाला आहे.

तालुका- सरासरी पाऊस (मिमी)- झालेला पाऊस(मिमी)- टक्केवारी

नाशिक -९३.५०- १३३.८- १४३.१

मालेगाव-१०२.३०-११४.०-१११.४

चांदवड-११५.७०-१४२.३-१२३

बागलाण-९९.८०-१४०-१४०.३

देवळा- ११५.४०-१२१.२-१०५

सिन्नर-८९.३०--१०२.८-११५.१

येवला-१२०.४०-१५६.६-१३०.१-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंगापूर’च्या पातळीत चार टक्क्यांनी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातत्याने खालावत चाललेल्या जिल्ह्यातील काही धरणांमधील पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखेरीज जिल्ह्यातील आठ धरणांच्या पातळीत वाढ होण्यास या पावसामुळे मदत झाली आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जिल्ह्यात जोरदार कमबॅक केले आहे. पावसाने रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील ९२ पैकी अनेक मंडळांमध्ये पावसाने जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे नद्यांसह धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आह. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गंगापूर धरणातील पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. धरणामध्ये २४ जून रोजी २४ टक्के पाणीसाठा होता. तो २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच धरणसमूहातील आळंदी धरणातील साठाही ११ वरून १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरणसमूहातील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून, तो १९ वरून २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पालखेड धरणसमूहातील पुणेगाव आणि वालदेवी या धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी एक टक्क्याने, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा तीन टक्क्यांनी वाढला आहे. भावली धरणातील पाणीसाठाही शून्यावरून १० टक्क्यांवर गेला आहे. गिरणा खोऱ्यातील हरणबारी आणि पुनद या दोन धरणांमधील पातळीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालखेड धरणसमूहामधील पाणीसाठा एक टक्क्याने, तर गिरणा धरणसमूहामधील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये दोन दिवसांपूर्वी ७,११८ दशलक्ष घनफूट पाणी होते. मात्र, आता हा पाणीसाठा ४०१ दशलक्ष घनफुटांनी वाढून ७,५१९ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे.

धरण- पाणीसाठा (२४ जून)- पाणीसाठा (२६ जून)

गंगापूर- १४१२ दलघफू-१६०६ दलघफू

आळंदी- १०५ दलघफू -१४५ दलघफू

पुणेगाव- ३०९ दलघफू -३२९ दलघफू

भावली- ० दलघफू --१४५ दलघफू

वालदेवी- ० दलघफू --१४ दलघफू

नांदूरमध्यमेश्वर- २४३ दलघफू -२५३ दलघफू

हरणबारी- ५१ दलघफू --७२ दलघफू

पुनद- ४०१ दलघफू- ४२६ दलघफू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापडी पिशव्यांनी दिले हाताला काम!

$
0
0

शहरातील ४५० महिलांना रोजगार

म. टा. प्रतनिधी, नाशिक

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर कापडी पिशव्यांना मागणी वाढली आहे. शहरातील स्त्री शक्ती बचतगटाने कापडी पिशव्या तयार करण्यासाठी ४५० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

राज्य सरकारने २३ जूनपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली. ज्या व्यक्तीच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसेल त्याला पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा बाळगणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई केली जात आहे. या कारवाईचा धसका घेऊन नागरिकांनी अडगळीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढल्या आहे. तसेच नागरिकांकडून कापडी पिशव्यांची खरेदी केली जात आहे.

शहरातही कापडी पिशव्यांची मागणी अचानक वाढल्याने बचत गटाच्या सभासद महिलांच्या हाताला मोठे काम मिळाले आहे. त्यांना एका पिशवीमागे अडीच रुपये मजुरी मिळत आहे. एक महिला दररोज साधारणत: शंभर पिशव्या तयार करीत असून त्या महिलेला कमीत कमी २५० रुपये रोजगार मिळणे शक्य झाले आहे. २३ जूनपूर्वीही महिला पिशव्या तयार करून विकत होत्या; परंतु त्या विकत घेण्यासाठी नागरिकांना समजावून सांगावे लागायचे. आता मात्र या पिशव्या हातोहात खपत असून सातत्याने मागणी वाढते आहे. या बचतगटाकडे अनेक बँकांनी, मोठ्या स्टोअरने मागणी नोंदवली असून कमी वेळात जास्त उत्पादन घेणे शक्य नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. या पिशव्या तयार करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून कच्चा मालही पुरविला जात आहे.

नागरिकांनी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी स्त्रीशक्ती बचतगटाने सिंहस्थ काळात शहरात आलेल्या भाविकांचे प्रबोधन केले होते. तसेच काही पिशव्या मोफत वाटल्या होत्या. सप्तश्रुंगी वणीच्या गडावर या बचतगटाच्या प्रतिनिधींनी दुकानदारांचे प्रबोधन केल्याने अनेकांनी स्वयंस्फूर्तीने कापडी पिशव्यांच्या वापर सुरू केला आहे.

कापडी पिशव्या घरात शिवणे शक्य होते. त्यासाठी बाहेर कुठेही जावे लागत नाही. दिवसातील चार तास जरी काम केले तरी शंभर पिशव्या शिवता येतात. शंभरपेक्षा अधिक पिशव्या शिवल्यास जादा मोबदला मिळतो.

- सुजाता घोटेकर, महिला

कापडी पिशव्या विकत घ्या, असे नागरिक-व्यापाऱ्यांना पूर्वी समजावून सांगावे लागत होते. मात्र, आता ग्राहकच आमच्याकडे येत आहेत. पिशव्यांची मागणी वाढल्याने महिलांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

- दीपाली कुलथे,

सचिव, स्त्री शक्ती महिला बचत गट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ दुकानातून बांगड्यांची चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या दत्त मंदिररोडवरील बाफना ज्वेलर्समधून सोन्याच्या बांगड्या पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन महिलांनी अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगडया हातोहात लंपास केल्या. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

दुकानातील कर्मचारी प्रदीप जावरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुकानात रविवारी (दि. २४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन महिला आल्या. बांगड्या पाहण्याच्या बहाण्याने ८२ ग्रॅम वजनाच्या सहा बांगड्या घेऊन त्यांनी पोबारा केला. काही वेळानंतर ही घटना जावरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर किलो प्लास्टिक जप्त

$
0
0

सहकार कॉलनीत महापालिकेची कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून सलग चौथ्या दिवशी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. गंजमाळस्थित सहकार कॉलनीतील एका खासगी बंगल्यात महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १०० किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान २३ मार्चपासून आतापर्यंत महापालिकेने २३१ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १२ लाख २४ हजाराचा दंड वसूल केला आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीअंतर्गत प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर करणाऱ्यांविरोधात महाालिकेने कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने सर्वसामान्यांऐवजी प्लास्टिकचा स्टॉक असणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जयेश गोसलिया नावाच्या व्यापाऱ्याने आपल्या सहकार कॉलनीस्थित बंगल्यात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू दडवून ठेवल्याची माहिती नाशिक पश्चिम विभागीय पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने बंगल्यावर अचानक छापा मारला. तेथे त्यांना प्लास्टिकचे पाणीग्लास, चहा कप, कंटेनर व इतर वस्तूंचा मोठा साठा आढळून आला. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित व्यापाऱ्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक दिलीप चव्हाण, स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे, यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आतापर्यंतच्या कारवाईत महापालिकेने शहरातून सुमारे ४०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

२३१ जणांवर कारवाई

महापालिका क्षेत्रात २३ मार्चपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत महाापलिकेने आतापर्यंत प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या २३१ जणांविर कारवाई केली असून १२ लाख २४ हजाराचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पंचवटी विभागात ३८ जणांकडून २ लाख, नाशिकरोड विभागात ५० जणांकडून २ लाख ६३ हजार, नाशिक पश्चिम विभागात ५७ जणशंकडून २ लाख ७७ हजार, नाशिक पूर्व विभागात ४० जणांकडून एक लाख ९२ लाख, नवीन नाशिक विभागात २४ जणशंकडून एक लाख ८२ हजार तर सातपूर विभागात २२ जणांकडून एक लाख १० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या मते नाशिक अस्वच्छच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक महापालिकेने १५१ क्रमांकावरून ६३ व्या क्रमांकांवर यंदा झेप घेतली असली तरी, पहिल्या दहामध्ये येण्याची संधी नागरिकांनीच हुकवली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेची कामगिरी चांगली असली तरी, नाशिककरांचा स्वच्छतेबाबत फिडबॅक चांगला नसल्याचे दिसून आले आहे. केंद्राच्या पाहणी पथकाने नाशिकच्या स्वच्छतेला भरघोस मार्क दिले. मात्र, नाशिककरांनी स्वच्छतेला मार्क देताना हात आखडते घेतले आहेत. त्यामुळे नाशिककर महापालिकेच्या कामावर समाधानी नसल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात देशातील ४७३ शहरे सहभागी झाली होती. त्यात नाशिकची क्रमवारी १५१ व्या स्थानावर घसरली होती. महापालिकेच्या सेवांविषयक नागरिकांच्या प्रतिसादाच्या पातळीवर कमी गुण मिळाल्याने पालिकेची क्रमवारी घसरल्याचे त्यावेळी दिसून आले होते. परंतु, घसरलेला क्रमांक मुख्यमंत्र्यांना पसंत पडला नाही. त्यांनी थेट महापालिकेत येऊन बैठक घेत, पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन कामाला लागले होते. महापालिकेतील अधिकारी व आरोग्य विभागाने स्वच्छतेत चांगली कामगिरी केली. परंतु, तरीही यंदा नाशिकचा क्रमांक हा ६३ पर्यंतच येऊ शकला. १५१ क्रमांकावरून तो बऱ्यापैकी वर आला असला तरी पालिकेचा नंबर ६३ आला असला तरी,नाशिकची स्वच्छतेतील कामगिरी ही पहिल्या दहा शहरांसारखी आहे.परंतु नाशिककरांनी महापालिकेच्या स्वच्छतेच्या कामगिरीला फिडबॅक देतांना हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. स्चव्छ सर्वेक्षणात आवश्यक असलेल्या ४ हजार गुणांपैकी महापालिकेला अवघे २७८६ गुण मिळाले आहेत. यात महापालिकेच्या सेवांबद्दल १४०० गुणांपैकी महापालिकेच्या पदरी जेमतेम ६६७ गुण पडले. केंद्राच्या पथकाने केलेल्या तपासणीत १२०० पैकी १११० गुण मिळाले; परंतु महापालिकेच्या सेवांविषयी नागरिक समाधानी नसल्यामुळे या मुद्द्यासाठी असलेल्या १४०० गुणांपैकी महापालिकेला जेमतेम १००९ गुण मिळू शकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएलओच अनुत्सुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, सिडको

मतदार याद्यांमधील घोळ मिटावा आणि निर्दोष यादीच्या आधारे प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने बीएलओंची (बूथ लेव्हल ऑफिसर) फौज कामाला लावली आहे. परंतु, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तांत्रिक व तत्सम अडचणींची ढाल पुढे करून ही फौज स्वत:ची मान सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सिडकोसारख्या दाट लोकवस्तीत अवघ्या ३० टक्के लोकांपर्यंत बीएलओ पोहोचले असून, अवघे आठ टक्के काम ऑनलाइन होऊ शकले आहे. जिल्हा प्रशासनाचेही या कामकाजाकडे दुर्लक्ष होत असून सिडकोवासियांची अचूक आणि अद्ययावत मतदार यादी बनणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

२०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग झपाटून कामाला लागला आहे. त्यामुळेच अचूक आणि अद्ययावत मतदार यादीचा आग्रह निवडणूक आयोगाने धरला आहे. जिल्ह्यात बीएलओ म्हणून बहुतांश शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यावर मतदार नोंदणीची जबाबदारी सोपविली आहे. २० जूनपर्यंत त्यांनी ही यादी अद्ययावत करणे अपेक्षित होते. परंतु, जिल्ह्यात अद्याप निम्मे कामही होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे सिडको, सातपूरसारख्या दाट लोकवस्तीच्या मतदारसंघात ही माहिती ऑनलाइन अपलोड करण्याचे काम आठ टक्केच झाले आहे. अर्ज भरून घेण्याचे काम ३० टक्केच होऊ शकले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतही येथील मतदार यादी सदोष राहण्याची शक्यता वाढली आहे. शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागांत तुलनेने चांगले काम होत असताना सिडको, सातपूरमध्ये तांत्रिक अडचणी व तत्सम कारणे सांगून या कामातून आपली मान सोडवून घेण्याचा प्रयत्न बीएलओ करीत आहेत.

त्यांनी प्रत्येक घरात जाऊन मतदाराची माहिती घेणे बंधनकारक आहे. मतदार हयात नसेल, मतदार यादीमध्ये त्याचे नाव नसेल किंवा नाव, पत्ता, जन्मतारीख चुकीची नमूद झाली असेल तर या चुका दुरूस्त करणे आवश्यक आहे. ही माहिती आयोगाच्या विशिष्ट अ‍ॅपवर अपलोड करणे बंधनकारक आहे. परंतु, अजूनही अनेक बीएलओ सिडकोतील बहुतांश घरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, हे मटाने घेतलेल्या माहितीत पुढे आले आहे. काही बीएलओंनी तर मतदारांबाबत माहिती असल्याने त्यांच्या घरापर्यंत जाण्याची गरज काय असा अजब सवाल केला आहे.

या मतदारसंघात ९१ हजार घरे असून तीन लाख ६९ हजार मतदार संख्या आहे. अनेक बीएलओंना हे कामच नको आहे. याकरीता त्यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली आहे. मतदान नोंदणीचे कामासाठी कुणी आमच्यापर्यंत आलेले नाही, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग काय भूमिका घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांची उणीव

मतदार संघात ३० ते ३५ हजार अर्ज भरून झाले आहेत. ते अपलोड करण्यासाठी पाच संगणक व तेवढ्याच ऑपरेटरची आवश्यकता आहे. परंतु, केवळ दोन ऑपरेटर व तेवढेच संगणक देण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज ऑनलाइन अपलोड करण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. अनेक बीएलओ संपर्कात राहत नाहीत व फोनही स्वीकारत नसल्याची खंत एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. या परिसरात अंगणवाडी सेविकाही बीएलओ म्हणून काम करीत आहेत. काहींकडे माहिती अपलोड करण्यासाठी अँड्रॉइड मोबाइल नाहीत. तर काहींकडे असूनही त्यांना अपलोड करण्याचे ज्ञान नसल्याने कामावर परिणाम होतो आहे.

हा भार नकोच!

शहरातील सर्व मतदार संघाच्या तुलनेत हा मतदारसंघ दाट लोकवस्तीचा आहे. या भागात सरकारी कार्यालयांची वानवा आहे. त्यामुळे या मतदारसंघात बीएलओ म्हणून फारसे सरकारी कर्मचारी मिळू शकलेले नाहीत. परिणामी दैनंदिन कामाव्यतिरिक्त निवडणुकीच्या या कामाचा अतिरिक्त भार शिक्षकांवर टाकण्यात आला आहे. हा आमच्यावर अन्याय असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘व्यापारी-उद्योजकांच्या अडचणींवर विचार करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याप्रश्नी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर व्यापारी व उद्योजकांनी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेत अडचणी मांडल्या. याप्रश्नी येत्या ३० जून रोजी होणाऱ्या शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकीत विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन कदम यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.

महाराष्ट्र चेंबरच्या मुंबईत याप्रश्नी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कदम यांची भेट घेण्यात आली. प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे व्यापारी व उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणींवर यावेळी प्रकाश शिष्टमंडळाने प्रकाश टाकला. मंत्रालयामध्ये ३० जून रोजी शक्तीप्रदत्त समितीची बैठक होणार असून यामध्ये प्लास्टिक बंदी निर्णयावर विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीत उद्योजक व व्यापाऱ्यांच्या समस्या मांडण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले.

या शिष्टमंडळात खाद्यतेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर ठक्कर, मुंबई ग्रेन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमणी कलाल छेडा, जयंती छेडा, फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर केनिया, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शहा, ऑल इंडिया बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. इरानी, सुरेंद्रपाल सिंग, कर्मवीर सिंग, क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मोहन साधवानी, सायरस बिरानी, श्रेयस गुडका, योगेश शहा, हितेन शहा, इजहार, शाम पोकळे, रवी नाईक, संजय साटम, आशिष शहा, श्रीपाद उपासनी, परेश मेहेता, बाबुभाई अय्यर यांच्यासह व्यापारी-उद्योजकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यूमनमाड :

$
0
0

विहिरीत पडून

दोन महिलांचा मृत्यू

मनमाड : नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी परिसरात पांढरवस्ती येथे विहिरीत पडून दोन महिला मरण पावल्या. सुंदरबाई तानाजी मोरे आणि सुमनबाई महादू मोरे अशी त्यांची नावे आहेत. कपडे धुण्यासाठी त्या विहिरीवर गेल्या होत्या. या दोघी एकाच कुटुंबातील असून, त्या एकमेकींच्या जावा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या दोघी महिला एकाचवेळी विहिरीत कशा पडल्या, हा घात आहे की अपघात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावात पावसाची झडी

$
0
0

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आगमन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरात मंगळवारी (दि. २६) सकाळपासूनच पावसाची झडी सुरू झाल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरासह तालुक्यात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळी सुरू झालेल्या या पावसाने नंतर तीन ते चार तासांची विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली होती.

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी रात्री शहरात पावसाचा शिडकावा झाला होता. हा पाऊस थोड्याच वेळात थांबला होता. मंगळवारी सकाळी मात्र, पावसाने संततधार सुरू ठेवल्याने शेतीकामांना वेग आला आहे. सकाळी साडेसात वाजेपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली होती. पावसाचा जोर दुपारी साडेबारा वाजेपर्यंतही कायम होता. त्यामुळे तालुक्यातील शेततकरी चांगलाच सुखावला असूल, आता पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. दुपारी तीन ते चार तास पाऊस थांबल्याने नागरिकांनी आपापले कामे लवकर आवरली. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना धावपळ करावी लागली. दुपारी पाच वाजेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या झडीमुळे चाकरमान्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागला होता. पावासाची ही रिपरिप सांयकाळपर्यंत सुरूच होती.

धुळ्यातही पावसाची हजेरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे
मंगळवारी (दि. २६) दिवसीार धुळे शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता. शेतकरी शेतीकामाला लागले असून, बि-बियाण्यांच्या दुकानांवरही गर्दी होत आहे.
साक्री, शिंदखेडा तालुक्यात अजूनही पावसाने दडी मारली आहे. धुळे शहर आणि तालुक्यातील काही परिसरात गेल्या दोन पावसाने हजेरी लावली असून, शेती पिकांना जीवदान मिळाले आहे. कापसाला या पावसाने मोठा फायदा झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, अजुनही नागरिक आणि शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, आभाळाकडे नजरा लावून आहेत. शहर परिसरात अजुनही उकाडा जाणवत आहे. वीजपुरवठाही पावसामुळे खंडीत होत असल्यरने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये लष्कराचं विमान कोसळलं

$
0
0

नाशिक:

नाशिक येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लष्कराचं लढाऊ विमान कोसळलं असून या दुर्घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झालं आहे. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नाशिकच्या पिंपळगावजवळ वावी ठुशी गावातील एका शिवारात लष्कराचं सुखोई-३० विमान कोसळलं. आज सकाळी ११. १५ वाजता ही घटना घडली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळलं असून या दुर्घटनेत विमानाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे लष्कराचे विमान होते. या विमानात दोन पायलट होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच या दोन्ही पायलटने पॅराशूटच्या आधारे विमानातून उड्या मारल्या. त्यानंतर हे विमान कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्हा प्रशासनाने वेळीच संबंधित विभागांना सूचना दिल्या असून पोलीस तसेच मदत कार्यासाठी १ हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शिवारात विमान कोसळल्याची माहिती मिळताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यामुळे ग्रामस्थांना आवरताना पोलिसांच्या नाकेनऊ येत होते.

सुखोई ३० विमान हे ओझर एचएएलचे होते. पावणे अकरा वाजता या विमानाने ओझर धावपट्टीवरून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कोसळले. या प्रकरणाची संरक्षण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून एचएएलने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाळे ठोकण्यासाठी गेले; अन् आश्वासनावर परतले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या सेवेचा बोजवारा उडाल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर टाळे ठोकण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आश्वासन मिळाल्यानंतर परतल्या. यावेळी त्यांनी सर्व रुग्णालयाची पाहणी करून चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच लिफ्ट व मशिनरी सुरू करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्या बुधवारी रुग्णालयात गेल्या. येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांनी चांगल्या सेवेचे आश्वासन दिले. राज्य सरकारने २००८ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आधुनिक सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शहरातील शालिमार येथे विभागीय संदर्भ रुग्णालयाची उभारणी केली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संदर्भ रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या रुग्णालयात लिफ्ट, अतिदक्षता विभागात एसी बंद आहे. तर लिप्टही सुरू नाही. दोन आठवड्यांपूर्वी बायपास करण्यासाठी लागणारे यंत्रही बंद पडलेल्या अवस्थेत होते. पण, या भेटीनंतर डॉक्टरांनी रुग्णांना वरील मजल्यावर जाण्यासाठी लागणारी लिफ्ट सुरू केली. त्यानंतर अतिदक्षता विभागाचे एसीचे काम चालू केले. बायपाससाठी लागणारे यंत्र उद्यापर्यंत सुरू होईल, असे आश्वासन डॉ. कोशिरे यांनी दिले.

महिलांनी चांगली सेवा दिली नाही तर टाळे ठोकले जाईल, यावेळी इशाराही दिला. यावेळी वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेविका शमिना मेमन, हीना शेख, रंजना गांगुर्डे, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्ष आशा भंदुरे, सलमा शेख, शाकिरा शेख, सुरेखा निमसे, सुजाता कोल्हे, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सईदा शेख यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड पडले तरी मारल्या फेऱ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागात महिला वडाची पूजा करीत असताना शेजारील वडाच्या वृक्षाची फांदी कोसळली. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. मात्र, झाड पडले तरी महिलांनी त्या झाडाखालून वाकून जात वडाला फेऱ्या मारल्या. सावकरनगर येथील वडाच्या वृक्षाला फेऱ्या मारताना महिलांना दगडांचा त्रास सहन करावा लागला. याबाबत महिलांनी

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर केवळ काही दगड बाजूला केले. मात्र, नेहमी रस्त्यालगत पडून असलेले दगड महापालिका का हटवत नाही असा सवाल महिलांनी केला. सातपूर भागात महिलांनी मनोभावे वडाची पूजा करीत वटपौर्णिमा साजरी केली. पुरोहितांनी मंत्रोच्चारात पूजा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती कक्षांचा तात्काळ समन्वय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका अग्निशमन विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि लष्कर विभागांशी तातडीने संपर्क साधत प्रशासकीय यंत्रणेने आपल्या गतिमानतेचा प्रत्यय दिला. यातून घटनेची वरिष्ठांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती देण्यात येऊन संबंधितांना मदत उपलब्ध करून देणे शक्य झाले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर गायकवाड यांना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निफाड तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थांकडून विमानाच्या दुर्घटनेबाबतची फोनद्वारे माहिती मिळाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला दुर्घटनेबाबत कळविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन अन्य यंत्रणांशी समन्वय साधण्यास सुरूवात केली. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त विमान लष्काराचे असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगितले जाऊ लागल्याने देवळाली येथील लष्कराच्या कार्यालयाशीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपर्क साधला. दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी घटनास्थळाला भेट देत अपघाताची माहिती घेतली आणि या दुर्घटनेची कारणे शोधा, असे निर्देश संबंधितांना दिले. एसबी २१० असे या सुखोई विमानाचे नाव असून त्याची चाचणी घेण्यात येत होती. ओझरपासून साधारण २० किलोमीटरवर गेल्यानंतर विमानामध्ये बिघाड झाल्याचे दोन्ही पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पॅराशुटद्वारे उड्या मारल्या. त्यानंतर हे विमान कोसळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या दुर्घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल माहितीस्तव राज्य सरकारला पाठविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. घटनास्थळावर मदतीसाठी एअर फोर्सने हेलिकॉप्टर पाठविल्याचे सांगितले जात होते. परंतु हेलिकॉप्टर पाठविण्याची आवश्यकता भासली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दुपारी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच एकर बागेचे नुकसान

$
0
0

द्राक्ष-डाळींब शेतीचा पंचनामा करणार; मदत मिळण्याची शक्यता

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील वावी व गोरठाण शिवारातील द्राक्ष आणि डाळिंब बागेवर लढाऊ विमान कोसळले. यात जीवित हानी झाली नसली तरी अडीच एकर द्राक्ष आणि डाळींब बागेचे नुकसान झाले. त्याची पाहणी जिल्हाधिकारी, एचएएलचे अधिकारी, महसूल प्रशासन आदींनी केली. या नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी गावापासून चार किलोमीटरवरील गोरठाण व वावी या गावांजवळ लढाऊ विमान कोसळले. वावी-शिरवाडे, वणी शिवारातील सुखदेव बाबुराव निफाडे व योगेश ढोमसे यांच्या शेतात हे विमान कोसळले. स्फोट झाल्याने मोठा आवाज होऊन आगीचे लोट तयार झाले. त्यामुळे सुखदेव बाबुराव निफाडे यांच्या गट नंबर २८२ मधील नवीन दीड एकर द्राक्षबाग व योगेश ढोमसे यांच्या गट नंबर २८४ मधील एक एकर द्राक्षबागेचे विमानाच्या स्फोटामुळे नुकसान झाले. सुखदेव निफाडे व योगेश ढोमसे यांच्या डाळिंब व द्राक्षबागांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

वैमानिक जखमी

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानातील वैमानिकानी पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेतली यात त्यांना द्राक्षबागाच्या तारा लागल्याने ते जखमी झाले तर कोसळलेल्या विमानाचा काही भाग सुखदेव निफाडे यांच्या मुलाच्या अंगावर पडल्याने त्यालाही दुखापत झाली. त्यास पिंपळगाव बसवंत येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थदाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विमान कोसळले तेव्हा द्राक्षबागेत मजुरही काम करीत असल्याचे निफाडे यांनी सांगितले. वैमानिकानांही वायू दलाने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मोठा अपघात टळला

विमान कोसळले त्या ठिकाणापासून काही अंतरावर २२० केव्हीची विद्युत वाहिनी आहे. कोसळलेल्या विमानाचे काही भाग या विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यावर पडल्या. त्यामुळे विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्या. काही तारा तुटण्याच्या अवस्थेत आहेत. या तारा तुटल्या असत्या तर मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. शिवाय येथून जवळच रसाळ आणि जगताप या शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. विमान थोडे जरी मागे किंवा पुढे असते तर मोठी हानी झाली असती, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला.

बघ्यांची घटनास्थळी धाव

विमान कोसळल्याची बातमी काही क्षणात पसरल्याने घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. प्रशासनाचे अधिकारी, पोलिस यंत्रणा, ओझर वायू दलाचे अधिकारी-कर्मचारी आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी सुरुवातीला मदतकार्यात सहभाग घेतला. त्यानंतर अग्निशमन वाहने, अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीही घटनास्थळी भेट देत प्रशासन व्यवस्थेला सूचना केल्या. शिरवाडे ते वावी या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने मदतकार्यात अडथळे आले. त्यामुळे पोलिसांनी संतापाच्या भरात रस्त्यात उभी असलेली वाहने आडवी पाडली.

विमान कोसळल्याचे समजल्याने तब्बल दहा हजाराच्या आसपास नागरिक घटनास्थळी जमले. गर्दीवर नियंत्रण आणणे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी कळविल्यानंतर दहा मिनिटांच्या आत पोलिसांची मोठी कुमक तेथे दाखल झाली. विमान कोसळले तेथून दीड किमी अंतरावर दोन्ही वैमानिक जमिनीवर आले होते. त्यांना तातडीने मदत पोहचविण्यात आली. एचएएल आणि पिंपळगावच्या अॅम्ब्युलन्स त्वरीत मदतीसाठी आल्या. सुदैवाने विमान शेतात कोसळले. घरावर कोसळले असते तर अधिक हानी झाली असती.

- सुरेश मनोरे, पोलिस निरीक्षक,

पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्तांकडील चर्चा निष्फळ

$
0
0

महिंद्रच्या बडतर्फ कामगारांचे उपोषण सुरुच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा अॅण्ड महिंद्रात युनियनचे कामकाज करतांना चार वर्षांपूर्वी बडतर्फ केलेल्या दोन कामगारांकडे युनियने पाठ फिरवल्यामुळे त्यांनी आठ दिवसापासून बेमुदत उपोषणाला सुरू केले आहे. या कामगारांना कामगार उपायुक्तांनी बुधवारी चर्चेला बोलावले. पण, युनियनचे पदाधिकारीच उपस्थित न राहिल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर या कामगारांनी आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

युनियचे काम करताना २०१४ मध्ये तत्कालीन सरचिटणीस प्रवीण शिंदे व उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांनी कंपनीने बडतर्फ केले. त्यानंतर त्यांनी युनियनच्या घटनेप्रमाणे आर्थिक मदत मागितली. पण, युनियनने ती न दिल्यामुळे त्यांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पण, येथेही त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी विविध मागण्या सुद्धा केल्या. २०११ ला झालेल्या युनियनच्या सर्वसाधारण बैठकीत युनियनचे कामकाज करत असतांना व्यवस्थापनाने बडतर्फीची कारवाई केल्यास सर्व कामगारांनी एक दिवसाचा पगार बडतर्फ केलेल्या पदाधिकाऱ्यास देण्याचा ठराव केला होता. तो युनियन फंडातून देण्यात यावा. युनियनच्या घटनेप्रमाणे कलम २७ मधील ग, घ, ड याप्रमाणे मदत मिळावी. तसेच कोर्टातील केसेस व कोर्टाचे कामकाज चालविण्यासाठी युनियन फंडातून आर्थिक मदत द्यावी, युनियन फंडातून घटनेनुसार बेकारी भत्ता मिळावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा एम्पॉइज युनियनच्या विद्यमान कमिटीने युनियनच्या घटनेचा अवमान करून तीन वर्षांसाठी फेरनिवड करून घेतली आहे. युनियनच्या बेकायदेशीर व गैर कामकाजाची चौकशी करावी. तसेच त्यांनी केलेल्या खोट्या खुलाशावर विश्वास ठेवू नये, असेही निवेदन आंदोलक कामगारांनी उपायुक्तांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकिळेची मृत्यूशी झुंज अपयशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड कोर्टातील उंच वृक्षावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या कोकिळेला वाचवण्याचे प्रयत्न अखेर अपुरे पडले. सुटकेसाठी तीव्र संघर्ष करून या निष्पाप पक्षाने मान टाकल्यानंतर कोर्ट आवारातील उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

नाशिकरोडच्या कोर्टाच्या आवारात उंच झाडे आहेत. एक झाड शेजारी असलेल्या जलकुंभापेक्षा उंच वाढले आहे. त्याच्या वरच्या फांदीवर मांजामध्ये कोकिळेचे एक पंख अडकले. तिने सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र, जोरात फडफड केल्याने ती मांजात आणखी गुरफटत गेली. मांजा उजवे पंख कापत खोलवर रुतला. त्यामुळे तिचा प्रतिकार क्षीण होत गेला.

कोर्टातील अधीक्षक रामेश्वर बैरागी, क्लर्क यशवंत पगारे, दीपक कदम, किरण कर्डिले, किशोर काळे यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी नाशिकरोड महापालिकेचे अग्निशमन अधिकारी ए. यू. जाधव, फायरमन आर. बी. आहेर, व्ही. के. ताजनपुरे यांच्याशी संपर्क साधला. विद्युत विभागाची शिडीची गाडी बोलावण्यात आली. कोर्टापुढील रस्त्यापासून कोर्टापर्यंत वाहनांची गर्दी होती. ही वाहने हटवून गाडी आणेपर्यंत कोकिळा अर्धमेली झाली होती. ती ज्या फांदीवर अडकली होती, त्याच्या खालच्या फांदीवर प्रचंड मोठे आग्यामोहोळ आहे. कोर्टात सकाळपासूनच गर्दी असते. मोहोळाला धक्का लागला तर कोर्टात गोंधळ उडाला असता. काही वर्षांपूर्वी धुराने मोहोळ उठून कोर्ट आवारातील लोकांना धडा मिळाला होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत काळजी घेत शिडी वर नेली. तथापि, कोकिळा सर्वात वरच्या फांदीवर अडकली होती. जमिनीपासून हे अंतर चार मजल्यांइतके होते. तिथपर्यंत काठी पोहचणेही अवघड होते.

अखेर प्राण सोडले

अग्निशमन दलाचे कर्मचारी, नागरिक, पक्षीप्रेमी आदींनी अर्धा तास प्रयत्न केले. मात्र, पक्षापर्यंत पोहचता येत नव्हते. शेजारी दुसरी मजूबत फांदीही नव्हती. कोर्टाचे कामकाज सुरू असल्याने मोहोळाला धक्का न लावता पक्षाला सोडविण्याचे प्रयत्न सुरू होते. पाऊसही सुरू झाला होता. खूप प्रयत्न करुनही या फांदीपर्यंत पोहचता येत नव्हते. अखेर नाईलाजाने प्रयत्न थांबविण्यात आले. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर वाढत गेला आणि कोकिळेची जगण्याची लढाईही क्षीण होत गेली. अखेर तीव्र जखमांनी कोकिळेने प्राण सोडला. नायलान मांजावर बंदी असताना त्याचा वापर यंदाही संक्रातीला झाला. त्याची किंमत पक्षांना चुकवावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा हजार प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांनी गेल्या सहा महिन्यांत १६ हजार १७३ प्रकरणांपैकी १४ हजार ७३० प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रलंबित १३८२ प्रकरणांपैकी ८८२ प्रकरणे अर्जदार यांच्या पातळीवर त्रुटीअभावी प्रलंबित आहेत. उर्वरित ५०० प्रकरणे ८ दिवसांपूर्वी समितीकडे जमा करण्यात आली आहेत. मुदतीत वैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य वंदना कोचुरे यांनी दिली.

तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार २५ जून २०१८ पर्यंत प्राप्त झालेली प्रकरणे निपटारा करण्यासाठी जात पडताळणी समिती स्तरावर अधिक कर्मचारी वृंदाचा वापर करून रात्री उशिरापर्यंत छाननी करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे समितीकडून २५ जूनपर्यंत ९ हजार ८४२ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. उर्वरित प्रकरणांवर निर्णय घेण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचबरोबर समितीत बुधवारी दोन हजार ६५० वैधता प्रमाणपत्रे तयार असून, अर्जदाराने किंवा पालकांनी कार्यालयात येऊन जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

समितीने २१ ते २५ मे २०१८ या कालावधीत कॅम्प घेतले. तसेच त्रुटी पूर्तता करण्याबाबत ३ हजार ७५ दूरध्वनी लघुसंदेश पाठविण्यात आले. त्रुटीपूर्तता कॅम्पमध्ये २ हजार १५८ त्रुटींची पूर्तता करून अर्ज जमा करून घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी मिळूनही शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळूनही एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मालेगाव तालुक्यातील देवघट गावात ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४६ झाली आहे.

शेषनाथ पुंजाराम पगार (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी, २६ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास घरात गळफास घेतला. त्यांच्या नावे देवघट येथील गट क्र. ६४०/२ येथे सामाईक क्षेत्र आहे. या गटावर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्ज असून या शेतकरी कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतला असल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे. पगार यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले. जिल्ह्यात १ जानेवारी ते २६ जून या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या ४६ घटनांची नोंद झाली आहे. जून महीन्यातील ही आठवी घटना असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images