Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

..तो रस्ता तूर्त सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकनाका ते सीबीएस या एकाच बाजूच्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयोग बुधवारी सकाळी शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला. परंतु, या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्याने तूर्तास या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस आले आहेत.

मेहेर सिग्नल ते सीबीएस चौक या रस्त्याला स्मार्ट करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सीबीएस ते मेहेर चौक सिग्नल याच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्र्यंबक नाक्यापर्यंतचा रस्ता स्मार्ट करावयाचा असल्याने याही रस्त्याचे खोदकाम करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन होते. यासाठी पोलिसांनी सीबीएस ते त्र्यंबक नाका हा रस्ता बंद करण्याचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ ते दुपारी १ अशा दोन तासांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार होता. त्यानुसार सकाळी ११ वाजता बॅरिकेडींगद्वारे हा रस्ता बंद करण्यात आला. त्र्यंबकनाका ते सीबीएस या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु, या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने कोंडी होऊ लागली. त्यामुळे अवघ्या तासाभरातच हा प्रयोग गुंडाळून दोन्ही रस्त्यांवरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. येथील एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे तूर्तास तरी शक्य नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे यांनी दिली. त्यामुळे पर्यायी मार्गांचा विचार होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोडला कोसळली झाडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड परिसरात बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी फांद्या तुटून नुकसान झाले. नारायणबापू चौकातील गोदावरी सोसायटीत कारवर झाड पडले. तसेच शेजारी असलेला पथदीप कोसळला. जेलरोडच्या मॉडेल कॉलनी चौकात दुचाकीस्वार बचावला. दुचाकी गेल्यानंतर लगेच फांदी कोसळली. सुदैवाने जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

नाशिकरोडला साडेतीन-चारच्या सुमारास पाऊस झाला. तत्पूर्वी, वादळी वारे सुटले होते. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. बिटको चौकातील आशानगर, जेलरोड, कॅनलरोडच्या श्रमिक नगरमध्ये तसेच पंचक मलनिस्सारण केंद्र या ठिकाणी झाडे कोसळली. डीजीपीनगरमधील टागोरनगरच्या ओरिएन्ट बंगल्याजवळ आणि जेलरोडच्या सिद्धेश्वर मंदिराजवळ झाड कोसळले. जेलरोडची कोयना सोसायटी, सैलानीबाबा चौक, मॉडेल कॉलनी, जेलरोड तसेच नांदूरनाका आदी ठिकाणी फांद्या कोसळल्या. नारायणबापू चौकातील गोदावरी सोसायटीत कारवर झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने झाड हटवले. नाशिकरोड अग्निशमन दलाचे एम. एन. मधे, पी. जी. कर्ड़क, आर. के. मानकर, बी. व्ही. आहिरे, आर. आर. काळे, व्ही. के. ताजनपुरे, एस. एस. पगारे आदी रात्री उशिरापर्यंत मदत कार्य करीत होते.

जेलरोड येथे तळे

जेलरोड येथील चंपानगरीमध्ये प्रांजल बंगल्याजवळ पावसाचे पाणी साचल्याने रस्ता बंद झाला होता. चंपानगरीत महापालिकेचे गार्डन आहे. त्याच्या सुरक्षा भिंतीजवळ पाणी साचते. जोरदार पाऊस झाल्याने येथे तलाव झाला होता. येथे एका बाजूला उंच इमारत आहे, तर दुसऱ्या बाजूला महापालिका गार्डनची सुरक्षा भिंत आहे. पाणी जाण्यास जागा नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचते. बुधवारच्या पावसाने येथील रस्ता बंद झाला होता. गेल्या दहा वर्षांपासून ही समस्या आहे. ती कायमची सोडवण्याची मागणी महेंद्र साळवे, तुळशीदास इंगळे, शशीकांत शिरसाठ, सुरेश भालेराव, गौतमी शिरसाठ, माया शेजवळ, मनोज खैरनार, देवीदास खैरनार, संदीप जाधव आदी रहिवाशांनी केली आहे.

सातपूरला तासभर सरी

सातपूर : परिसरात बुधवारी दुपारी पावसाने एक तासभर हजेरी लावत सातपूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सुखद अनुभव दिला. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने त्याचा नेहमीप्रमाणे वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. दुपारच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे घरी जाताना हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच गोवंशांची वडाळ्यात मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी सकाळी सुटका केली. जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या संशयितालाही पोलिसांनी अटक केली आहे.

इंदिरानगर पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना वडाळागावातील मांगीरबाबा चौकातून कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक विकास लोंढे यांना ही माहिती देण्यात आली. सकाळी सातपासून मांगीरबाबा चौकात पोलीस कर्मचारी सानप, शेख, शिरसाट, सोनार यांनी सापळा रचला. संशयित छोटा हत्ती टेम्पोचालक सद्दाम अन्वर पाटकरी (वय २६, रा. भद्रकाली) याला अडविण्यात आले. पोलिसांनी टेम्पोचे शटर उघडले असता त्यामध्ये जिवंत तीन गाई व दोन गोऱ्हे आढळून आले. पोलिसांनी जनावरे व टेम्पो असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याची तूट अन् चिखलात बूट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्ता 'स्मार्ट' करण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाच्या यातना शालेय विद्यार्थ्यांना नाहकच भोगाव्या लागत आहेत. शाळेत जाण्यासाठी व शाळेतून बाहेर पडण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी की काय म्हणून आता पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामनाही विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. पायवाटेवरुन चालताना चिखलाने जड झालेले बूट सावरत आता त्यांना घरचा रस्ता शोधावा लागत असल्याने रस्त्याच्या निर्माण झालेल्या तुटीचा त्रास कमी होता की काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

अशोकस्तंभापासून त्र्यंबक नाक्यापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू असल्याने या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांना पायवाटेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या वाटेवरदेखील सर्वत्र चिखल झाला होता. यातून वाट काढता काढता विद्यार्थ्यांची दमछाक तर झालीच शिवाय, बुटाला चिकटलेला चिखल काढण्यासाठीही वेळ द्यावा लागला. केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही हे अडथळे पार करून शाळेतून ये-जा करावी लागत आहे.

\Bएम. जी. रोडवर कोंडी

\Bस्मार्ट रोडचे काम सुरू असलेल्या परिसरातील शासकीय कन्या विद्यालय, बिटको शाळा आणि कॉलेज, रत्नप्रभा वैशंपायन रात्र शाळांमध्ये सुमारे साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे हाल पाहता त्यांना शिवाजी स्टेडियमचे एम. जी. रोडवरील गेट खुले करून देण्यात आले आहे. या मार्गाने विद्यार्थी शाळेत ये-जा करू शकतात. पण एम. जी. रोडसारख्या वाहतुकीने गजबजलेल्या ठिकाणी आता विद्यार्थ्यांचीही भर पडल्याने या परिसरात आणखी कोंडी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट शेळ्यांची दुबईला निर्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथून शारजाह येथे हवाई मार्गे होणारी शेळ्यांची निर्यात सुरू झाली आहे. या शेळ्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी केली जात नसल्यामुळ‌े या शेळ्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. परिणामी, दुबईमध्ये भारताचे नाव बदनाम होणार आहे. शिवाय भारताला ब्लॅकलिस्ट केले जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकाराची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने योग्य ती शहानिशा करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

समुद्रमार्गे होणारी बकऱ्यांची निर्यात पावसाळ्यात बंद राहते. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वी या स्थितीवर हवाई मार्गे निर्यातीचा पर्याय शोधण्यात आला. ओझर येथून शारजाह येथे जिवंत शेळ्यांची प्रथमच निर्यात झाली. गेली दोन वर्षे ही निर्यात यशस्वीरित्या होत आहे. मात्र, यंदा अजमेर आणि राजस्थान येथील बाजारातील आजारी शेळ्या स्वस्त दरात खरेदी केल्या जात आहेत. तसेच, त्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता या शेळ्या शारजाह रवाना होत आहेत. पावसाळा असल्याने शेळ्यांना विविधप्रकारच्या रोगांची लागण झालेली असते. शेळ्यांची रक्त तसेच शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, ते होताना दिसत नाही. परिणामी, शारजाह-दुबई परिसरात निकृष्ट दर्जाच्या शेळ्यांची निर्यात होते. परिणामी, भारतीय बाजारपेठ बदनाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने या साऱ्या प्रकाराची दखल घेऊन या शेळ्यांची योग्य ती तपासणी करावी आणि त्यांना निरोगी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे, असे खासदार चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नाशिकसह राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार

$
0
0

सप्तशृंग गडावरील जलस्त्रोतांचा प्रश्न बिकट

म. टा. वृत्तसेवा, कळवण

स्वच्छता सर्वेक्षणात सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीचे सदस्य सचिव तथा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेलकंदे यांनी गडावरील सर्व ११ स्रोतांची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याच्या स्रोत जर व्यावसायीकांमुळे दूषित होत असतील तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा त्यांना दिला.

शेलकंदे यांनी तालुका पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समिती, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व सरपंच यांची संयुक्तीक बैठक घेवून फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. गेल्या आठवड्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलकंदे यांच्या आदेशान्वये कळवणचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, डॉ. सुधीर पाटील यांनी गडावरील सर्व जलस्रोतांची पाहणी केली होती. त्यांना काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यातील काही त्रुटी ग्रामपंचायतीने दूर केल्याने शेलकंदे यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित त्रुटी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन उपसरपंच राजेश गवळी, ग्रामसेवक रातीलाल जाधव यांनी दिले. तसेच जर कोणी जलस्त्रोत दूषित करतांना सापडला तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाना गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. गडावरील सर्व जलस्रोतांचे फेर सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल आठ दिवसात द्या, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य, कर्मचारी यांना टीसीएलचे प्रमाणाबाबत सूचना देवून तत्काळ नियोजन करण्यास सांगितले. पुन्हा ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.

गउावरील स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायत व सप्तशृंगी ट्रस्टच्या माध्यमातून नाशिक येथील अस्तित्व संस्थेला दरमहा पाच लाख रुपये दिले जातात. मात्र त्याचा फारसा फायदा होत नसल्यचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांजवळील परिसरही 'अस्तित्व'ने स्वच्छ करायला हवा. --- राजेश गवळी, उपसरपंच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणकेश्वर मंदिरावर वीज कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील झोडगे येथे बुधवारी पावसाने हुलकावणी दिली असली तरी येथील ऐतिहासिक माणकेश्वर हेमाडपंती मंदिरावर वीज कोसळल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले आहे. यामुळे गावातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या झोडगेकरांना विजेचे भयंकर रूप पाहायला मिळाले. सायंकाळी अचानक विजेचा मोठा कडकडाट झाल्याने क्षणभर हादरून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. विजेचा कडकडाट इतका भयानक होता की त्या हादऱ्याने मंदिराच्या कळसाकडील तकलादू झालेला दगडांचा काही भाग खाली कोसळा. मंदिरातील वीजप्रवाह खंडित होऊन मीटर जळाले. सायंकाळी हेमाडपंती मंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थ गेले असता हा प्रकार समोर आला. तसेच गावातील माणकेश्वरनगरमधील काही घरातील टीव्ही देखील जळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मंदिरावर वीज पडल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

कोठुरेला जोरदार पाउस

तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बुधवारी मात्र बागलाणसीमेवरील वडनेर-कोठुरे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरा झालेल्या या पावसाने परिसरातील नाले पाण्याने भरून वाहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांचे नुकसान केल्यास कारवाई’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बियाणे, दर्जा नसलेली बियाणे तसेच खते व कीटकनाशक छापीलपेक्षा अधिक किमतीत विक्री होत असल्यास भरारी पथकामार्फत कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी कोणतीही कृती केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक बुधवारी रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महाबीजचे प्रतिनिधी, विविध कंपनीचे प्रतिनिधी यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील कृषी निविष्ठाची मागणी, पुरवठा, दर्जा याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनीदेखील यावेळी खरीप हंगामात करावयाच्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगावर वीज पडल्याने सिन्नरमध्ये दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज कोसळून सिन्नर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. मिठसागरे व हिवरगाव येथे या घटना घडल्या. तसेच, झोडगे (ता. मालेगाव) येथे वीज कोसळून हेमाडपंती मंदिराचे नुकसान झाले.

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मिठसागरे या गावातील तरुण प्रवीण गणपत कासार (वय २५) याच्यावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. घरासमोरील साचलेले पाणी काढण्यासाठी प्रवीण बाहेर गेला असता, त्याच्यावर वीज कोसळली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. दुसरी घटना हिवरगाव येथे घडली. येथील संजय विठोबा पोमणर (वय २६) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच बारगाव पिंप्री येथे एका म्हशीचाही विजेमुळे मृत्यू झाला.

झोडगे (ता. मालेगाव) येथे बुधवारी पावसाने हुलकावणी दिली असली तरी वीज पडल्याची घटना घडली. यामुळे येथील ऐतिहासिक माणकेश्वर हेमाडपंती मंदिराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

- सविस्तर वृत्त....?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्लिश पाठिराख्यांना रशिया सुखद

$
0
0

यजमानांनी ठेवली जुनी भांडणे बाजुला

वृत्तसंस्था, व्होलगोग्रॅड (रशिया)

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंग्लंडच्या वर्ल्डकप सलामीच्या लढतीमुळे चाहत्यांमध्ये मागे रंगलेल्या द्वंद्वाची कटू आठवण ताजी झाली. मात्र हॅरी केनने ज्यादा वेळेत गोल केल्याने इंग्लंडने ट्युनिशियावर मात केली अन् चाहते सुखावले. रशिया आणि इंग्लंडमधील फुटबॉल संबंध सहाजिकच सुखद नाही. त्यात इंग्लंडमधील लंडन आणि रशियाच्या मॉस्कोमध्ये छत्तीसचा आकडा आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या पाठिराख्यांना मायदेशातून सावधगिरीचा इशारा देत रशियात जाण्यापासून रोखले जात होते. मात्र प्रत्यक्ष रशियात वेगळेच चित्र अनुभवायला मिळत आहे. 'तुम्ही रशियाला जाऊ नका, कारण तुम्ही इंग्लंडला जीवंत परतण्याची शक्यता कमीच आहे', अशा शब्दात इंग्लिश पाठिराख्यांना मायदेशी ताकीद मिळाली होती. रशियाने मात्र जुनी भांडणे आणि वाद किमान वर्ल्डकपपुरता बाजुला ठेवण्याचा विचार केला आहे.

लंडनचा रहिवासी जोनाथन फिलिप्स वर्ल्डकप बघण्यासाठी रशियात दाखल झाला आहे. तो म्हणतो, 'इथे रशियन शहरांमधील रस्त्यांवरून फिरताना सुरुवातीला धाकदूक होती. मात्र अनुभव वेगळाच आला. आमचे खुल्यादिलाने स्वागत करण्यात आले. मी जेव्हा वर्ल्डकप इथे रशियात येऊन बघायचे ठरवले तेव्हा मला इंग्लंडमधील लोकांनी जाण्यापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला'. रशियातील सूसंवाद पाहून आता जोनाथन उघड इंग्लंडचा झेंडा अंगावर घेऊन फिरतो आहे. लंडनलाच राहणाऱ्या २८ वर्षीय उझी अलाननेही जोनाथन यांची री ओढली. 'रशियन खरोखरच भन्नाट आहेत. त्यांच्याकडे फुटबॉलची संस्कृती आहे', असे तो म्हणाला.

मद्यप्राशनाचा फटका

जोनाथन व उझी यांची स्वतःची वागणूकही उत्तम असल्याने रशियात त्यांचे प्रेमाने स्वागत झाले; पण व्होगलोगोगार्ड येथे दोन इंग्लंड समर्थक मद्यपान करून ट्रेनने प्रवास करत असल्याचे आढळले. यामुळे त्यांना प्रवासातून मध्येच उतरवरण्यात आले अन् त्यांना थोडाफार दंडदेखील झाला. रशियन पोलिसांच्या सांगण्यानुसार या दोघांपैकी एकाला मद्याच्या नशेत दुखापतही झाली होती. ट्रेनमध्ये त्याचा हात कापला गेला, ज्यामुळे त्याला पोलिसांनीच हॉस्पिटलमध्ये नेले.

इंग्लिश उपस्थिती कमी!

इंग्लंड-ट्युनिशिया सामन्याला इंग्लंडच्या पाठिराख्यांची संख्या कमीच होती. आकडेवारीवर नजर टाकल्यास इंग्लंडच्या पाठिराख्यांनी खरेदी केलेल्या तिकिटांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती, असे इंग्लंड फुटबॉल सपोर्टर फेडरेशनकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस कमी, हाल जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या बहुतांश भागात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावत नागरिकांची दाणादाण उडविली. शहरात विविध भागांत १७ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरावर ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेसावध नागरिकांची त्रेधा उडाली. शहरात पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूरसह मध्यवर्ती भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवर झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली. झाडे उन्मळून पडल्याच्या तसेच फांद्या तुटून पडल्याच्या १७ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. या फांद्या हटविण्याचे काम अग्निशमनच्या जवानांकडून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

दिवसभरात २६.४ मिमी पाऊस

शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांमध्ये २६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणक्षेत्रात अवघ्या अर्ध्या तासात सुमारे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बुधवार बाजारातील व्यापाऱ्यांचे हाल

गोदाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. बाजारातील व्यावसायिकांची पावसाने धांदल उडाली. वादळामुळे पथारीवाल्यांचे कागदी तसेच कापडी शेड उडून गेले. त्यामुळे आवरासावर करताना व्यावसायिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग-फास्ट

$
0
0

योग जागृती फेरी

जेलरोड : योग दिनाच्या पूर्वसंध्येला जेलरोड येथील वनिता विकास मंडळ प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. जेलरोड, बिटको दत्तमंदिर व पुन्हा जेलरोड मार्गाने फेरी शाळेत आली. मुख्याध्यापक अनिल नागरे, जगदिश मंडलिक, तुषार बोरसे, सुप्रिया बनसोड, सरिता पाचपांडे, स्वाती झाडे, चेतन पाठक आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. योगाबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एकवरून अँकर

$
0
0

फोटो पान एकवरून घ्यावेत

००००००००००००

कल्याण नेतोय वारसा पुढे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या कल्याण पांडे याचे आजोबा पुरुषोत्तम पांडे हे नाशिकमधील प्रख्यात तबला वादक. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र गिरीष पांडे यांनी पुढे नेला. घरात आजोबा आणि वडील यांचे तबल्याविषयी चाललेले संवाद कल्याणच्या कानी पडत असल्याने कल्याणलाही तबल्याची गोडी निर्माण झाली.

तबल्याचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडे घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पंडित सुरेशदादा तळवलकर यांच्याकडे त्याने गुरूगृही पाच वर्षे तबल्याची तालिम घेतली. तबल्यात अलंकार परीक्षेत भारतात दुसरा येण्याचा मानही त्याने मिळवला. तसेच केंद्र सरकारची सीसीआरटीची स्कॉलरशीप मिळवून बी.ए. म्युझिक ही पदवीदेखील प्राप्त केली आहे.

...अन् सुरू झाला रियाज

सुरेशदादा एका शिष्याला पाश्चात्य संगिताचे शिक्षण देत असताना कल्याण ते पहात होता. त्यांनी सांगितलेले पाश्चात्य तालाचे बोल भारतीय शास्त्रीय संगीतातील पद्धतीनुसार कल्याणने ते अगदी लिलया वाजवले. हे सर्व सुरेशदादा न्याहळत होते. त्याच वेळी त्यांनी 'तू हेच वाद्य वाजव' असे त्याला सांगितले. तेव्हापासून कल्याणचा तबल्याबरोबरच कॅजोनचाही रियाज सुरू झाला. त्यात त्याने विविध प्रयोग केले.

काय आहे कॅजोन?

कॅजोन हे वाद्य मूळ आफ्रिकन आहे. यात एक विशिष्ट लाकडाचा वापर करून एक खोके बनवले जाते. यातील तीन बाजू या जाड लाकडाच्या असतात तर एक बाजू ही पातळ लाकडाची असते. या पातळ बाजूवर ड्रमप्रमाणे स्नेअर असते. त्यामुळे आवाजात विविध प्रकार सादर करता येतात.

प्रयोग करायला आवडेल

कॅजोन हे वाद्य आफ्रिकन संगितातील सांबा तसेच पाश्चात्य संगीत झाज, रॉक, पॉप, ब्लूज, वेस्टर्न क्लासिकल या पद्धतीने वाजवले जाते. मात्र, कल्याणने हेच वाद्य भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून वाजवण्याची पद्धत आत्मसात केली. अनेक वेबसिरीजमध्ये तो सहभागी होत असून, मुंबईतील नामवंत गायकांबरोबर तो साथ करीत असतो. तसेच दिल्ली बनारस येथे झालेल्या अनेक संगीत समारोहांमध्ये तबला आणि कॅजोनचे वादन सादर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लांडग्यांच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

देवपूर शिवारात मंगळवारी रात्री मेंढ्यांच्या कळपावर चार ते पाच लांडग्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार तर सहा मेंढ्या जखमी झाल्या. देवपूर येथील राजेंद्र रामनाथ गडाख यांच्या शेतात ही घटना घडली. वावी येथील दत्तू जाधव यांच्याकडे मेंढ्या आहेत. या मेंढ्यांच्या चारापाण्याच्या शोधात ते चार-पाच महिन्यांपासून देवपूर परिसरात होते. मंगळवारी रात्री देवपूर शिवारात कळप मुक्कामी होता. रात्री जाधव शेजारील घराकडे गेले असता दबा धरून बसलेल्या लांडग्यांनी आठ मेंढ्या ठार केल्या. तर सहा मेंढ्यांचे लचके तोडले. पशुवैद्यकीय अधिकारी मिलींद भनगे यांनी पंचनामा केला. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पी. बी. सोनवणे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, सरपंच गडाख, ग्रामसेवक आदींनी घटनास्थळी भेट दिली. साधारण शंभर ते दीडशे मेंढ्यांचा कळप असल्याने पंधरा एक मेंढ्या लांडग्यांच्या भितीमुळे कळप सोडून फरदापूर, देवपूर शिवारात पळून गेल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलमध्ये २७ टक्के आरक्षण द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या १५ टक्के राखीव जागांमधील केवळ दोन टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून डावलण्याचे शासनाचे अन्यायकारक धोरण यापुढे सहन केले जाणार नाही. राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना त्यांच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भुजबळांनी म्हटले आहे की, शासनाकडून मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररित्या कमी केल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची आकडेवारी लक्षात घेता ओबीसींना राष्ट्रीय कोट्यात एक टक्काही आरक्षण देण्यात आलेले नाही. राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांत ओबीसींना आरक्षणच देण्यात आले नाही. तर मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील वैद्यकीय संस्थांमध्ये राष्ट्रीय कोटा ठेवण्यात आलेला नाही.

देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६३,८३५ जागांमधून १५ टक्के जागा राष्ट्रीय स्तरावर आरक्षित ठेवण्यात आलेल्या होत्या. देशातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयात केंद्राच्या १५ टक्के आरक्षणानुसार एकंदर ३ हजार ७११ जागा आहेत. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा आरक्षित असायला पाहीजे. परंतु केवळ ७४ जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारीही केवळ १.८५ टक्के एवढीच आहे. त्या खालोखाल ५५५ जागा एससी व २७७ जागा एसटीला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी २,८११ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची टक्केवारी ७५.७४ टक्के एवढी आहे, असे भुजबळांनी निदर्शनास आणुन दिले आहे.

मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी २७ टक्के, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के, असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्व निकष, सुचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून केंद्रिय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ७४ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या ९२८ जागांसह एकुण २८११ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे भुजबळांचे म्हणणे आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देवून महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या १००२ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योग दिनाचा मुख्य कार्यक्रम केटीएचएमच्या मैदानावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुष मंत्रालयाने नाशिक शहरात आयोजित केलेला आतंरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ७ वाजता मराठा शिक्षण प्रसारक समाज संचलित केटीएचएम कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. बी. गीते, मराठा शिक्षण प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वैशाली झनकर, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक भगवान गवई, मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणाधिकारी संजय शिंदे व सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा मुख्य कार्यक्रम केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणात होणार असून, एकाच वेळी सर्व शासकीय कार्यालये, तालुका क्रीडा संकुले, योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्था यात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा प्रकरणी दोघांना जळगावातून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्यांवरील कारवाईचे सत्र सुरूच असून नाशिक पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून दोघांना अटक केली आहे. सुरेश रामसिंग बेलदार आणि सुखदेव शहादेव पवार (दोघे रा. पारोळा, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

न्यायालयाने दोघा संशयितांना शुक्रवारपर्यंत (दि. २२) पोलिस कोठडी सूनावली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी अनेकांवर कारवाया केल्या आहेत. १२ जून रोजी ६७१ किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर सिन्नर येथूनही ३९० किलो गांजा ताब्यात घेण्यात आला. राज्यभर गांजा पुरविणाऱ्या अकबर सरवल खान (रा. जयपोर, ओडिशा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमध्ये एका महिलेने दोन व्यक्तींच्या मदतीने गांजा मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत ४२ कोटींची कामे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तपदाचा भार घेतल्यापासून गेल्या चार महिन्यांत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ४२ कोटी ५७ लाखांची विविध विकासकामे मार्गी लावल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. त्यात रस्ते खडीकरण, डांबरीकरण, स्वच्छतागृहे बांधणे व दुरुस्ती अशा ४३ कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे आयुक्त मुंढे येण्यापूर्वीचीच असून, मुंढे यांनी केवळ त्या कामांना गती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे जुन्या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांवरून सत्ताधाऱ्यांकडून त्यांना जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.

मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून केवळ निलंबन, बरखास्तीच्या कारवायांचीच चर्चा सुरू आहे. मुंढे यांच्याकडून विविध विकासकामांचाही आढावा घेतला जात असला तरी, पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कारवाईनेच सध्या पालिकेचा कारभार गाजत आहे. मुंढे यांनी प्रलंबित कामांवर जोर दिला असून, दर आठवड्याला बैठका घेऊन ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विशेषत: बांधकाम विभागाच्या वतीने बऱ्याच कालावधीपासून कामे प्रलंबित ठेवण्यात आली होती. आयुक्तांनी या कामांना चालना देऊन ती चार महिन्यांत मार्गी लावल्याचा दावा केला आहे. त्यात बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले रस्त्यांचे अस्तरीकरण करणे, रस्ते काँक्रिटीकरण अशी सुमारे २८ कोटींची १९ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. डीपी रस्त्याच्या साइडपट्ट्यांना पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक शौचालयांची बांधणी व दुरुस्ती, विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे वॉटरप्रुफिंग, खुल्या जागेस चॅनलिंग फेन्सिंग, पावसाळी गटारी, जॉगिंग ट्रॅक तयार करणे, मनपा शाळा दुरुस्ती, मनपाच्या मोकळ्या जागेत ग्रीन जिम व्यायाम साहित्य बसवणे, गोविंदनगर येथे क्रीडांगण अशी १४ कोटींची २४ कामे केली आहेत. एकूण ४२ कोटी रुपयांची ४३ कामे नाशिक बांधकाम विभागाच्या वतीने कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विविध सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन समाधान व्यक्त केले जात असल्याचा दावा मुंढे यांच्याकडून करण्यात आला आहे.

ही कामे जुनीच

मुंढे यांनी बांधकाम विभागाच्या वतीने ४२ कोटींची कामे चार महिन्यांत मार्गी लावण्याचा दावा केला असला तरी, या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश जुनेच आहेत. मुंढे यांनी बैठकांचा जोर लावत ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे प्रयत्न केले आहेत. यातील अनेक कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते. ठेकेदारांकडूनही वेळेत कामे करून घेण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. मात्र, विरोधकांनी मुंढे यांच्या दाव्यास विरोध केला आहे. आयुक्तांनी या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा दावा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. यावरून महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती संचालकांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, तीन संचालकांसह सचिवावर सरकारी वाहनाचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि संचालकांनी मंगळवारी (दि. ५) बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज आटोपून पिंपळगाव येथील १०० एकर जागेत असलेल्या बाजार समितीला भेट पाहणी दौरा करण्याचे नियोजन केले. यामध्ये सभापती शिवाजी चुंभळे हे आपल्या खासगी वाहनाने काही संचालकांना घेऊन तर उपसभापती संजय तुंगार यांनी संचालक दिलीप थेटे, रवींद्र भोये, युवराज कोठुळे तसेच बाजार समिती सचिव अरुण काळे यांना आपल्यासोबत घेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे वाहनामध्ये (एमएच १५-ईएक्स ३७९५) बसून पिंपळगावकडे प्रस्थान केले. पिंपळगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन बाहेर फोटोसेशन करून पुन्हा त्याच वाहनात बसून बाजार समितीच्या १०० एकर जागेत बांधलेल्या विविध कामकाजांची पाहणी केली. दीड-दोन तासांच्या पाहणी दौऱ्यानंतर पुन्हा सभापती, उपसभापती, संचालक मंडळाने वाहनात बसून नाशिककडे प्रस्थान केले होते.

सध्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी सरकारी वाहनांचा वापर न करता ही वाहने कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना बाजार समितीच्या उपसभापती व अन्य संचालकांनी बाजार समितीच्या वाहनाचा सर्रासपणे वापर करून आचारसंहितेचा भंग केला. याची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी गुरुवारी (दि. १४) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना कारवाईचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीचे चार दिवस कोरडेच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 'ड्राय डे' घोषित केला आहे. या आदेशांमुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत तळीरामांची पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडून आतापासूनच मद्याचा पुरेसा साठा करून 'गैरसोय' टाळण्याची 'सोय' केली जात असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या २५ जून रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या कारणास्तव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये नाशिक जिल्ह्यात 'ड्राय डे'बाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशांनुसार प्रत्यक्ष मतदान संपण्यापूर्वी ४८ तास म्हणजेच दि. २३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून आणि मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजेच दि. २४ जून, मतदानाच्या दिवशी दि. २५ जून रोजी मतदान संपेपर्यंत व दि. २८ जून रोजी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे वरील आदेश जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती, देशी/विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्ती सीएल-३, सीएलएफएलटीओडी-३, एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएल/बीआर-२, ताडी नीरा, एफएलडब्ल्यू-२, नमुना ई आणि नमुना ई-२ या प्रकारातील सर्व अनुज्ञप्तींना लागू असणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे नियम ५४ १ (सी) नुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यात मद्यविक्रीच्या सुमारे ८५० अनुज्ञप्ती असून, या सर्वांना या आदेशांचे पालन करावे लागणार आहे.

मद्यसाठ्यावर भर

शिक्षक मतदार संघ निवडणुकीमुळे चार दिवस जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार असल्याने जिल्ह्यातील तळीरांमांची पंचाईत होणार आहे. मात्र, यातून दिलासा मिळण्यासाठी बहुतेकांनी ड्राय डेपूर्वीच मद्य खरेदी करून पुरेसा साठा करण्यावर भर दिला आहे. आज आणि उद्या मद्य विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ड्राय डेबाबतचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मद्यविक्री परवाने चार दिवस बंद ठेवले जाणार आहेत.

- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images