Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिंदे यांना रोटरीचा नाशिकभूषण पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा 'नाशिक भूषण २०१७-१८' पुरस्कार कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. शुक्रवारी (२२ जून) आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

नाशिक ही ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे आणि ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:बरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले अशा व्यक्तींना 'नाशिक भूषण' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना १९९६-९७ पासून रोटरी क्लब ऑफ नाशिक राबवत आहे. रोटरी क्लबच्या पुरस्काराने याआधी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, शांताबाई दाणी, कुसुमताई पटवर्धन, वसंतराव गुप्ते, दादासाहेब पोतनीस, विनायकदादा पाटील, डॉ. वसंत पवार. बापू नाडकर्णी, बाबुभाई राठी, कृष्णराव वाईकर, बाळासाहेब दातार, सुधाकर भालेराव, बेंजन देसाई, जगुभाई सपट, गोरखभाई झवेरी, बाळासाहेब वाघ, विश्वासराव मंडलिक, डॉ. नरेंद्र जाधव, उत्तम कांबळे, डॉ. विजय काकतकर, देवेंद्र बापट, राजेंद्र बागवे, अमोल चिटणीस, विनायक गोविलकर शिक्षणमहर्षी डॉ. मो. स. गोसावी आदींना सन्मानित करण्यात आले आहे.

शुक्रवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, सचिव मनीष चिंधडे, नाशिक भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीनंदन भालेराव यांच्यासह पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. श्रीया कुलकर्णी, हेमराज राजपूत, स्वाती मराठे, डॉ. जयंत वाघ आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचा पार्ट्यांवर ताव

0
0

शिक्षक मतदारसंघ निवडणूक

उमेदवारांची गाठीभेटीसाठी शक्कल; हॉटेल्स, लॉन्सचालकांचीही चांदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, सर्वच उमेदवारांनी मतदार शिक्षकांच्या गाठीभेटीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. शिक्षक संघटनांना हाताशी धरून शहरांमध्ये शिक्षकांसाठी व्हेज, नॉनव्हेज पार्ट्याच आयोजित केल्या जात असल्याने या निवडणुकांच्या निमित्ताने हॉटेल्स आणि लॉन्सचालकांची चांदी होत आहे. विशेष म्हणजे शिक्षकही या पार्ट्यांवर ताव मारत असून, चंगळ करून घेत आहेत. दुसरीकडे संस्थाचालकांच्या शिरकावामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता असून, कोणाची निवड करायची याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी २५ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत ही सहा ते सात उमेदवारांमध्ये आहे. त्यात भाजपचे अनिकेत पाटील, राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे, भाजपचे बंडखोर माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, टीडीएफचे भाऊसाहेब कचरे पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांच्यासह एस. डी. भिरुड रिंगणात आहेत. निवडणूक प्रचाराला आता अ‌वघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या मतदारसंघाचा विस्तार पाच जिल्ह्यांमध्ये असल्याने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदारांना एकत्रित जमा करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यासाठी हॉटेल्स, लॉन्स बुक केले जात आहेत. या हॉटेल्स आणि लॉन्समध्ये शिक्षक मतदारांची चंगळ होत असून, ओल्या व सुक्या पार्ट्या दिल्या जात आहेत. त्यामुळे हॉटेल्स व लॉन्सचालकांची चांदी झाली असून, सध्या पाचही जिल्ह्यांतील तालुक्याच्या ठिकाणांवरील सर्व हॉटेल्स व लॉन्स बुक आहेत. उमेदवार या पार्ट्यांच्या ठिकाणी जाऊन मला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. शिक्षक मात्र संस्थाचालकाला मदत करायची, की शिक्षकालाच निवडून आणायचे याबाबत मात्र संभ्रमावस्थेत आहेत.

भेटवस्तूंचाही वर्षाव

पार्ट्यांसाठी येणाऱ्या शिक्षकांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून या शिक्षकांवर भेटवस्तूंचाही वर्षाव केला जात आहे. काही ठिकाणी शिक्षण संस्थाचालकाच्या संमतीने भेटवस्तू थेट शाळेवरच पोहचवल्या जात आहेत. या भेटवस्तूंची वाच्यता होऊ नये म्हणून त्या थेट विशिष्ट व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत. तसेच, काहींवर तर गुप्तपद्धतीने लक्ष्मीचा वर्षाव केला जात आहे. या घडामोंडीमुळे प्रथमच या निवडणुकीला वेगळे वलय प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरत्या पीयूसी सेंटरद्वारे सर्रास प्रमाणपत्र वितरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात दुचारी, चारचाकी व अवजड वाहनांना प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील 'पीयूसी' प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. त्यासाठीची अधिकृत केंद्रे ठिकठिकाणी सुरू आहेत. मात्र, सातपूर एमआयडीसीत एकाच नावाने एकाहून अधिक ठिकाणी फिरते 'पीयूसी' केंद्र सुरू असल्याने वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत 'आरटीओ'कडून कारवाई होणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरटीओ प्रमाणित एक 'पीयूसी' केंद्र चालविण्याची मुभा असताना त्याच परवान्यावर फिरते पीयूसी केंद्र स्थापन करीत पीयूसीचे वाटप सुरू असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. त्याकडे आरटीओ विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे. केवळ वाहन पेट्रोलचे आहे की डिझेलचे याची विचारणा करीत हे प्रमाणपत्र दिले जात असल्याची चर्चा आहे. पीयूसी केंद्र घेणाऱ्या संस्थेला पीयूसी मशिन आणावे लागते. या केंद्र चालकाला प्रमाणपत्राची पुस्तके आरटीओतून देण्यात आलेली आहेत. वाहनधारकांना पीयूसी प्रमाणपत्र दिल्यानंतर ही माहिती आरटीओला द्यावी लागते. परंतु, प्रमाणपत्र देण्याची सर्व प्रक्रिया वाहनांची तपासणी न करताच केली जात आहे. दरम्यान, सातपूर परिसरातील एका पीयूसी केंद्र चालकाने नियम धाब्यावर बसवत फिरते पीयूसी केंद्र उभारले आहे. या केंद्रचालकाचे प्रमुख पीयूसी केंद्र सातपूर त्र्यंबकरोडवर आहे. मात्र, याच परवान्यावर हा चालक एमआयडीसी भागात ओम्नी व्हॅनमध्ये फिरून वाहनधारकांना पीयूसीचे वाटप करत आहे. त्यामुळे याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

रस्त्यांवर धावणारी दुचाकी वाहने, तसेच रिक्षा, कार, ट्रक अशा प्रत्येक वाहनाला 'पीयूसी' प्रमाणपत्र आवश्यक असते. संबंधित वाहन वायू प्रदूषण करीत नाही असा या प्रमाणपत्राचा अर्थ असतो. प्रत्येक वाहनाला दर सहा महिन्यांतून एक वेळा असे वाहन प्रदूषणमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (पीयूसी) घ्यावे लागते. वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहने अडविल्यानंतर इतर कागदपत्रांबरोबरच 'पीयूसी'ही दाखवावे लागते. मोटारसायकलसाठी ४० रुपये, तर १०० रुपये घेऊन चारचाकीसाठी पीयूसी दिले जाते. अनेकदा तर केंद्रावर पीयूसी मशिनमध्ये प्रदूषणाची चाचणी न करताच प्रमाणपत्र दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी-चारचाकी वा कोणत्याही वाहनांतून रस्त्याने जाताना काळा धूर सोडला जात असला, तरी त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही, असेही यामुळे स्पष्ट होत आहे.

२ कॉलम (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्यांची रोकडोबावाडीत वरात

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रोकडोबावाडीतील १९ वर्षीय युवतीचा विनयभंग करून तिला पळवून नेण्याची धमकी देत तिच्या आई, बहिण व काकाला मारहाण केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांना अटक करून त्यांची वरात काढली.

पोलिसांकडे युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित युवती आई, लहान बहिणीसमवेत रोकडोबावाडी परिसरात राहते. तेथील संदीप चटोले (२५) आणि सनी चटोले (२१) हे तिचा पाठलाग करायचे. तिला उचलून नेण्याची धमकी देत असत. ते गुंड असल्याने युवतीने घाबरुन तक्रार दिली नव्हती. संबंधित युवती सोमवारी (दि. १८) दुपारी आई, बहिणीसह मामाकडे निघाली असता रोकडोबावाडीतील मते गिरणीसमोर कट्ट्यावर बसलेल्या चटोले बंधूंनी मायलेकींना थांबवले. संदीपने युवतीचा हात धरून ओढले आणि तू मला खूप आवडतेस, मी तुला घरातून उचलून घेऊन जाणार आहे, असे सांगितले. विरोध करताच तिला मारहाण केली. युवतीची आई व बहिण मदतीला आले असता सनीने आईचा हात पिरगळला व लहान बहिणीला धक्काबुक्की केली. युवतीचे काका आल्यावर त्यांनाही लोखंडी राडने मारहाण केली. नागरिक मदतीला आल्यावर दोघा गुंडांनी या युवतीला 'तुला पळवून नेल्याशिवाय राहणार नाही', अशी धमकी देत पळ काढला. युवतीने उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघा गुंडांना अटक करून त्यांची रोकडोबावाडीतून वरात काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ठ बांधकाम पाडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्यामाध्यमातून सुरू असलेल्या येथील नाल्याचे बांधकाम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे तसेच अरुंद होत असल्याने सदर बांधकाम उपसरपंच संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले. याठिकाणी तातडीने रुंद व दर्जेदार बांधकाम करून मनाडी नाल्याचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्धार यावेळी संजय मोरे व गणेश बनकर यांनी व्यक्त केला. या बांधकामाबाबत अनेक नागरिकांनीही ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची गंभीर दाखल घेत उपसरपंच संजय मोरे, गणेश बनकर यांनी कामाची पाहणी करून बांधकाम निकृस्थ व अरुंद असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने हे बांधकाम पडण्याचे आदेश दिले. संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त होईपर्यंत संजय मोरे व गणेश बनकर या ठिकाणी उपस्थित होते.

पिंपळगाव बसवंत शहराच्या मध्यवस्तीसह बाजारपेठेतून जाणारा मनाडी नाला पिंपळगाव शहरासाठी मोठा शाप ठरल्याची भावना येथील व्यापारी व नागरिकांमध्ये आहे. दरवर्षी पावसाळ्यात मनाडी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे जुना आग्रा रोड व बाजार पेठेतील अनेक दुकानात पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने होणारे नुकसान लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय स्थलांतरित केले आहेत. या पाश्वभूमीवर मागील सदस्य मंडळाच्या कार्यकाळात महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या माध्यमातून मनाडी नाला दुरुस्ती व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. त्यानुसार दोन तीन वर्षापूर्वीच मनाडी नाल्याचे रुंदीकरण व जल शुद्धिकरण प्रकल्पाचे प्रारंभ झाला होता. मात्र मंजूर निधीच्या तुलनेत संबंधित ठेकेदाराने मनाडी नाल्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे तसेच अरुंद स्वरुपात पूर्ण करण्याचा धडाका लावला होता यामुळे इतका मोठा निधी खर्च होऊनही मनाडी नाल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता नसल्याने ग्रामपंचायत ने सदर बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला व नव्याने दर्जेदार बांधकाम व रुंदीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ATMमधील पाचपट पैशांचा आनंद क्षणिकच

0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशिनमधून ग्राहकांना पाचपट रक्कम मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकाराच्या मुळाशी पोहोचण्यात बँकेला यश आले असून, ज्या ज्या ग्राहकांना अधिक पैसे मिळाले ते वसूल करण्यासाठीची कार्यवाही सुरू केल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी मंगळवारी दिली.

सिडकोतील विजयनगरमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास या मशिनमध्ये रकमेचा भरणा करण्यात आला. परंतु, रात्री साडेनऊच्या सुमारास या एटीएमवर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली. पैसे काढताना जेवढी रक्कम टाकू त्याच्या पाचपट रक्कम मिळत असल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांचे गर्दीकडे लक्ष गेले. घडणारा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही सजग नागरिकांनीही बँकेला याबाबत कळविले. परंतु, तोपर्यंत ग्राहकांनी तब्बल दोन लाख ६८ हजार रुपयांची रक्कम काढल्याचे समजते. यानंतर येथे तत्काळ पोलिस कर्मचारी तसेच, बँकेचे अधिकारी दाखल झाले. गर्दीला हटवून हे एटीएम केंद्र बंद करण्यात आले.

एटीएममधील दोष दूर

हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा शोध घेऊन त्रूटी दूर करण्यात आल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिली. मशिनच्या ज्या ट्रेमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचा भरणा करावयाचा हवा होता त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे अॅक्सिस बँकेतील विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. बँकेच्या किंवा अन्य बँकांच्या कोणत्या ग्राहकांनी येथून या कालावधीत पैसे काढले याची माहिती संकलित केली जाते आहे. हे पैसे संबंधित ग्राहकांकडून रिकव्हर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

आमच्या गस्तीवरील पोलिसांनी गर्दीबाबत विचारणा केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत खातरजमा केली. बँकेने एटीएम कार्यप्रणालीमधील त्रूटी दूर केल्या आहेत. या एटीएम सेंटरवरून त्या विशिष्ट कालावधीत पैसे काढणाऱ्यांची माहिती बँकेला सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कुणाला अतिरिक्त पैसे मिळाले असतील तरी बँक ती वसूल करू शकेल.

- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याण उपायुक्तच नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातपडताळणी अर्जासाठी विद्यार्थी व पालकांची प्रचंड झुंबड उडाली असून समाजकल्याण विभागात विद्यार्थ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. मात्र, हे पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी नाशिक विभागाला उपायुक्तच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना विहित वेळेवर मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

समाजकल्याण विभागामार्फत जातपडताळणी प्रमाणपत्राची छाननी करण्यासाठी उपायुक्तांची भूमिका महत्त्वाची असते. जातपडताळणीसाठी आलेल्या फायलीची शहानिशा करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त, जातपडताळणी समितीचे अध्यक्ष व संशोधन अधिकारी या तिघांच्या सह्या यावर आवश्यक असतात. त्यानंतर जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात येते. यातील उपायुक्त पदाचा प्रभारी कार्यभार वंदना कोचुरे यांच्याकडे आहे तर समितीचे अध्यक्ष म्हणून पी. व्ही. पाटोळे हे काम पाहतात. राकेश पाटील हे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वंदना कोचुरे यांच्याकडे परभणी जिल्ह्याचीही जबाबदारी आहे. तीन दिवस परभणी व तीन दिवस नाशिक अशी त्यांची धावपळ असते. समितीचे अध्यक्ष हे अपघातात जखमी झाल्यानंतरदेखील कार्यालयात हजर राहून जातपडताळणीची प्रकरणे निकाली काढत असतात. वंदना कोचुरे यांच्याकडे नाशिकचा प्रभारी कार्यभार असल्याने त्या नाशिकमध्ये पूर्णवेळ हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे कामावर परिणाम होतो. राज्यामध्ये सर्वात जास्त कॉलेजांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल नागपूर व त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा नंबर लागतो. त्यानुसार जातपडताळणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्यादेखील त्यानुसारच आहे. सर्वात जास्त अर्ज हे पुण्यात येतात. त्यानंतर नागपूर व नाशिक अशी अर्जांची संख्या असते. नाशिक विभागाला उपायुक्त नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहात नाही. नाशिक विभागात कर्मचाऱ्यांची सख्या अपुरी आहे.

लोक प्रतिनिधींचा दबाव

अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. अनेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून अधिकाऱ्यांवर दाबाव आणत आहेत. या विभागाच्या अडचणी सोडवण्यात लोकप्रतिनिधींना स्वारस्य नाही. फक्त दबाव टाकून लोकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे त्याचा कल आहे. या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

--

माझ्याकडे दोन जिल्ह्याचा पदभार असला तरीही दोन्ही जिल्ह्यांना समान न्याय देत आहे. पहाटे चार वाजता ऑफिसला येऊन प्रकरणाचा निपटारा करीत आहे. आमच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याने दोन आठवड्यापासून सुटी घेतलेली नाही. येत्या दोन दिवसांत जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा होईल.

- वंदना कोचुरे, उपायुक्त, समाज कल्याण जातपडताळणी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन भत्ता द्या!’

0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा पाहता इतर देशांतील कमी किंमत आणि भारतातील कांद्यासाठी लागणारा जादा वाहतूक खर्च पाहता, पूर्ण क्षमतेने कांदा निर्यात होण्यास बाधा निर्माण झाली आहे. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी दिला जाणारा पाच टक्के प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करून तो ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावा, अशी मागणी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

डॉ. भामरे यांनी कांद्याचे दर पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, प्रभुंना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. नाशिकसह राज्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. देशातील इतर राज्यांची तुलना करता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होते. या हंगामात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन असून गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध आहे. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात हा एकमेव मार्ग आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा पाहता इतर देशांतील कमी किंमत आणि भारतातील कांद्याकरीता लागणारा जास्त वाहतुकीचा खर्च पाहता पूर्ण क्षमतेने निर्यात करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पाच टक्के प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करीत तो ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावा, अशी मागणी डॉ. भामरे यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. प्रभू यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

प्रोत्साहन भत्त्यामुळे वाढते निर्यात

काही वर्षांपूर्वी कांदा निर्यातदारांना पाच टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. तेव्हा देशाची वार्षिक कांदा निर्यात ३३ लाख मेट्रिक टनापर्यंत गेली होती, जी गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक होती. यावर्षी प्रोत्साहन भत्ता नसल्याने देशाची निर्यात ५० टक्क्यांनी घटली आहे. ज्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत असून इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करण्यास ते यापुढे विचार करणार नाहीत. असे करणे कोणासाठीही हिताचे नाही, याकडे डॉ. भामरे यांनी प्रभू यांचे लक्ष वेधले. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रपतींच्या उपस्थितीत व्यापारी-उद्योजकांची बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ग्रीस देशाच्या दौऱ्यावर आहेत. अथेन्स येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ग्रीस भारत बिझनेस फोरमतर्फे भारत व ग्रीस दोन्ही देशांमध्ये दरम्यान व्यापार-उद्योग द्विपक्षीय संबंध वाढावेत, यासाठी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत व्यापारी-उद्योजकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी मनोगतातून महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. भारत आणि महाराष्ट्र सरकारने व्यापार-उद्योग वाढीसाठी व सहकार्यासाठी चांगले धोरण आखलेले असून आपण सर्वांनी महाराष्ट्रात व्यापार-उद्योगातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

व्यापार-उद्योग वाढीसाठी बैठक होणार असून सकाळच्या सत्रामध्ये ऊर्जा, पर्यटन, अ‍ॅग्री बिझनेस, फार्मा आणि आयसीटी या क्षेत्रातील पाच समुहांना भेटी दिल्या. त्यानंतर हेलिनिक रिपब्लिक अ‍ॅसेट डेव्हलपमेंट फंड (एचआरएडीएफ) यांच्या प्रतिनिधींसमवेत ऊर्जा, पर्यटन, अ‍ॅग्री बिझनेस, फार्मा आणि आयसीटी या क्षेत्रातील संधीबाबत राउंड टेबल झाली. त्यानंतर ग्रीस पार्लमेंटला भेट देण्यात आली. याप्रसंगी भारताच्या अथेन्स येथील राजदूत शमा जैन, प्रदीपकुमार केरूका, चेंबर्स अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष ललित गांधी, भावेश माणेक, मनप्रीत नागी, जयेश ओसवाल, श्रीकृष्ण गोसावी, राजन ठावकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक संचालक बागूल यांची बदली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वादग्रस्त ठरलेल्या नगररचना विभागाच्या दप्तर दिरंगाईसह संशयास्पद फायलींची तपासणी सुरू केली असतानाच, मंगळवारी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आकाश बागूल यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आहेत. बागूल यांची नगर महापालिकेच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक पदावर बदली झाली असून, नगरचे सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांची नाशिक महापालिकेत याच पदावर बदली झाली आहे. परंतु, ग्रीनफिल्ड लॉन्स प्रकरणासह विभागातील अनियमिततेप्रकरणी बागूल यांच्यासह अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच, आलेल्या बदली आदेशामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बागूल यांना कार्यमुक्त करू नये, असा आग्रह आयुक्तांचा असला तरी शासन आदेशात तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या आठवड्यापासून नगररचना विभागाची झाडाझडती सुरू केली आहे. सर्वाधिक फाइल पेंडन्सी असल्याने तसेच नागरिकांच्याही तक्रारी प्रलंबित राहत असल्याने आयुक्तांनी या विभागाची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे या विभागात जवळपास १८४६ फायली प्रलंबित असल्याचे समोर आले होते. अनेक फायली तीन ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. या फायली प्रलंबित ठेवण्यामागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा संशय आयुक्तांना आहे. अतिरिक्त आयुक्तांसह उपसंचालक प्रतीभा भदाणेंची एक समिती गेल्या आठवड्यापासून नगररचना विभागाची तपासणी करीत आहे. ग्रीन फिल्ड प्रकरणात मुंढे यांना कोर्टात माफी मागावी लागली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला असून, त्या प्रकरणात पाच अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत.

नगररचना विभागाची झाडाझडती सुरू असतानाच, मंगळवारी या विभागाचे प्रमुख सहाय्यक संचालक आकाश बागूल यांची अचानक बदली झाली आहे. बागूल यांची अहमदनगर पालिकेत सहाय्यक संचालक पदावर बदली झाली आहे. नगरचे सुरेश निकुंभे यांची नाशिक महापालिकेत नगररचना विभागात बागूल यांच्या जागेवर बदली झाली आहे. ग्रीनफिल्ड प्रकरणासह फाइल पेंडन्सी प्रकरणात बागूल यांची तपासणी व झाडाझडती सुरू असतानाच, बागूल यांच्या बदलीचे आदेश आल्याने आयुक्तांची कारवाई अडचणीत आली आहे. बागूल यांच्यावर कारवाई व्हावी असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु, त्यांच्या बदलीमुळे समीकरणे बदलली असून त्यांना तपासणी होईपर्यंत कार्यमुक्त करू नये, अशी प्रशासनाची इच्छा आहे. परंतु, शासनाच्या आदेशात त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे असे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

बागूलांची चौकशी?

नगररचना विभागातील सर्व सावळ्या गोंधळाप्रकरणी आकाश बागूल यांच्यावर ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाईची तयारी आयुक्तांकडून सुरू होती. बागूल यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी त्यांची विभागीय चौकशी करावी अशा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासंदर्भात मंगळवारी आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांनी यावर खलबते केली. त्यामुळे बागूल यांची बदली झाली असली तरी त्यांच्या अडचणी मात्र कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

पाच जणांना नोटिसा

ग्रीनफिल्ड प्रकरणात आयुक्त मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेंसह पाच अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. यामध्ये नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आकाश बागूल, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांचा समावेश आहे. ग्रीन फिल्ड लॉन्स प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी या नोटिसा काढण्यात आल्या असून, त्यांना सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रीनफिल्ड प्रकरणात आयुक्तांना माफी मागावी लागली होती, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने २० लाखांचे बांधकाम पुन्हा करून द्यावे लागत होते. उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही, या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेने दोन जण जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना सिन्नर फाटा ते चाडेगाव दरम्यानच्या रस्त्यावरील दत्तमंदिर परिसरात घडली. जखमींपैकी किशोर तुकाराम बोऱ्हाडे (वय ४६, रा. हनुमंतानगर, लोखंडे मळा, जेलरोड) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संजय त्र्यंबक सावंत (५५, रा. धनराजनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे दुसऱ्या जखमीचे नाव आहे. बोऱ्हाडे हे त्यांचे मित्र सावंत यांच्यासोबत दुचाकीवरुन (एमएच १५ डी.एन.११०७) चाडेगाव येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथून चाडेगावच्या दिशेने जात होते. या रस्त्यावर इनोव्हा कारने (एमएच १५ व्हीएक्स ४५६०) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

यात संजय सावंत यांच्या डोक्यास व पायास तर बोऱ्हाडे यांच्या पायास गंभीर इजा झाली. अपघातानंतर दोघाही जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातानंतर तब्बल अठरा दिवसांनंतर जखमींनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात इनोव्हाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात शेतमाल लिलाव होणार ऑनलाइन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात इ नाम योजनेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. इ नामच्या शुभारंभ झाल्याने शेतीमालाचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. बोलतांना जाधव यांनी इ नाम पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतमालाचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केल्याने बाजारभाव चांगला मिळून शेतकरी बांधवाना आर्थिक फायदा होईल. तसेच शेतामालाचे पेमेंट देखील ऑनलाइन होईल. शेतमाल लिलाव ऑनलाइन पद्धतीने व्हावेत यासाठी शेतकरी बांधवांनी बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स व मोबाइल क्रमांक बाजारात शेतमाल लिलावासाठी द्यावा. बाजार समितीच्या नोंदणी कक्षात नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपसभापती सुनील देवरे, वंसत कोर, प्राजक्ता वाडीकर, ऋषिकेश पवार, भिका कोतकर, सचिव अशोक देसले आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

थकीत पेमेंटबाबत आवाहन

येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील कांदा व्यापारी जय भोलेनाथ ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट थकीत आहेत. अशा शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचा मिळालेला चेक व हिशेबपट्टीची झेरोक्स बाजार समितीच्या कार्यालयात तीन दिवसात जमा करावी असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात नऊ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या तसेच, वितरणात अनियमितता असलेल्या मालेगाव तालुक्यातील नऊ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केले आहेत. सन २०१६ पासून आजतागायत १७ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे रॉकेलची मागणी व पुरवठा घटला असला तरी काळाबाजार सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या निळ्या केरोसिनमध्ये केमिकल आणि पावडर टाकून भेसळ केली जात असल्याचा प्रकार अलीकडेच पुढे आला होता. निळ्या रंगाचे कमी दराचे रॉकेल जादा दराने विक्री केले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने रॉकेलच्या काळाबाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पंचवटीत अशा दोन दुकानदारांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातदेखील केरोसिन वितरणात अनियमितता दिसून आली आहे. तब्बल नऊ दुकानांच्या केरोसिन विक्रीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ पासून आजतागायत तब्बल १७ केरोसिन विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. याखेरीज २० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

...यांचे परवाने रद्द

शब्बीरनगर, नयापुरातील अजुन आरा अलतिफ, शेख हमीद शेख इमान, शेख रसुल शेख, नदीमखान अखिलखान, नियाज अलीअकबर अली (बेलबाग, नयापुरा), बी. एम. जाधव (शब्बीरनगर, मेनरोड, नयापुरा), अब्दुल मतीन शरीफ (गोल्डननगर), शेख नवाब शेख इसा (मोमीनपुरा), शकीलाबानो शकील अहमद (रौनकाबाद नयापुरा) यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग शिबिराचा गुरुवारी समारोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त योग विद्या गुरुकुलच्या वतीने शहराच्या विविध भागात १ जूनपासून मोफत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप गुरुवार दि. २१ जून रोजी नाशिकरोडच्या जयभवानीरोडवर असलेल्या आरोग्यधाम येथे योग साधनेने होणार आहे. समारोपाचा कार्यक्रम योग दिनी सकाळी ६ ते ७.३० यावेळेत आरोग्य धाम शेजारी असलेल्या गार्डनमध्ये होणार आहे.

या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्राणायामांचे प्रकारदेखील सादर करण्यात येतील. योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते.

हे शिबिर २१ ठिकाणी सुरू होते. यानंतर ज्या शिक्षकांनी ही शिबिरे घेण्यास मदत केली त्यांच्यासाठीदेखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यधामचे सुनील जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाला साधकांनी व जास्तीत जास्त नागरिकांनी हजर रहावे, असे आवाहन योग विद्याधाम व महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेळ्यांची निर्यात सुरू

0
0

नाशिक : ओझरहून थेट शारजाह येथे शेळ्यांची निर्यात सुरू झाली आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आयएल ७६ या कार्गो विमानाद्वारे १४२१ शेळ्यांची निर्यात करण्यात आली आहे. येत्या बकरी ईदपर्यंत ही निर्यात होणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी निर्यात होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बुधवारच्या दिल्ली विमानाद्वारे सहा टन केशर आंबे लंडनला रवाना होणार आहेत. त्याचे बुकिंग करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस नाईक राजेंद्र मोहितेंचे अपघाती निधन

0
0

दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलिस नाईक राजेंद्र अंबर मोहिते (वय ५०) यांचा मंगळवारी (दि. १९) पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला.

जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी राजेंद्र मोहिते हे गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. ते आपली कामगिरी बजावून मध्यरात्रीच्या सुमारास शिंदखेड्याहून धुळयाकडे येताना नरडाणाजवळ बाभळे फाट्यावर मोहिते यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती समजताच त्यांनी मोहिते यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर आज, सकाळी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे. जिल्हा पोलिस दलातील मनमिळावू आणि बोलके राजेंद मोहिते उर्फ राजू यांनी पोलिस सेवेत अनेक घटनेतील आरोपींचा शोध आपल्या बोलण्याच्या शैलीतून घेतले होता. शहरात एखाद्या घटनेतून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर मोहिते कर्तव्य बजावताना परिस्थिती नियंत्रणात आणत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांना अच्छे दिन

0
0

प्रति क्विंटलला मिळाला हजार रुपयांचा दर

म. टा. वृत्तसेवा, निफाड

उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशात साठवणूक केलेल्या कांदा खराब झाला. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली. लासलगाव बाजार समितीत कांद्याने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. यामुळे येत्या काही दिवसात कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वणी बाजार समितीत सरासरीला जिल्ह्यात सर्वाधिक ११५० रुपये तर जास्तीत जास्तही १३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. इतर सर्व बाजार समितीमध्ये हजार रुपये ते ११०० रुपये असा सरासरी भाव मिळाला.

नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने कांदा साठवणुकीची व्यवस्था नसलेले शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा लिलावाला आणावा लागतो त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बुधवारी कांद्याची आवक वाढली. लासलगाव, चांदवड, वणी, दिंडोरी, पिंपळगाव, निफाड, सायखेडा, उमराणा, विंचूर या ठिकाणी असलेल्या बाजार आवारात झालेल्या लिलावात बुधवारी एकूण एक लाख १५ हजार ११७ क्विंटल आवक होती. या सर्व ठिकाणी सरासरी भाव १००० रुपये इतका होता.

लासलगाव बाजार समितीत बुधवारी १६ हजार ७७५ क्विंटल दर मंगळवारपासून (दि. १९) सरासरी भावातही कांद्याने एक हजाराचा टप्पा पार केला. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त ११९१ तर सरासरी १०८० रुपये असा भाव होता.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या २७ तारखेला उच्चांकी असा उन्हाळ कांद्याला ४ हजार २५१ रुपये तर लाल कांद्याला ३ हजार ९४० रुपये मिळाला होता; मात्र त्यानंतर कांद्याचे मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने सात ते आठ महिन्यांपासून कांदा उत्पादक हा कांदा तोट्यात विकत असल्याने त्यांचे उत्पादन खर्चही निघत नव्हते.

सद्या कांदा भावात गेल्या १५ दिवसात रोज ३० रु ते २०० रुपयांची वाढ झाल्याने १००० रुपयांचा टप्पा पार केला असला तरी एप्रिल आणि मे महिन्यात ५५० रुपयांपर्यंतच्या सरासरीने कांदा विकला आहे. दिवाळी दरम्यान तीन ते चार हजार क्विंटलचा भाव होता; त्या तुलनेत सध्या मिळणारा भाव काहीच नाही या भावात कांद्याचा खर्चही भागत नाही, अशी कांदा उत्पादकांची खंत आहे.

रोख पेमेंटमुळे आवक वाढली

गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या व्यवस्थापन मंडळाने रोख पेमेंट वाटण्याचे जाहीर केल्याने पिंपळगाव बाजार समितीत लिलावाला नेणारे निफाडच्या पूर्व भागातील कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाला आणला. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरापासून तीन किमी

0
0

सटाणा शहरापासून तीन कि.मी. अंतरावरील मुंजवाड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने घरांवर वृक्ष कोसळून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने वाहतुक खोळंबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशिष पेंढसे कॉलम

0
0

ब्ल्यू समुराई

आशिष पेंडसे

जपान... उगवत्या सूर्याचा देश. बर्फाच्छादित ज्वालामुखीच्या फुगियामा पर्वताच्या पार्श्वभूमीवर धावणारी बुलेट ट्रेन, हे जपानचे चित्र आपल्याही बाजारात फेमस! जपानी मार्शल आर्ट आणि सुमो रेसलिंगचे आपल्याला काय ते अप्रूप. हे पूर्वरंग चितारण्याचे कारण म्हणजे वर्ल्ड कपच्या मैदानात जपानने केलेली ऐतिहासिक कामगिरी. कोलंबियावर २-१ अशी मात करीत दक्षिण अमेरिका खंडातील संघावर मात करणारा जपान हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे. जपानचे फिफा रँकिंग ६१ आणि कोलंबियाचे १६! कोलंबिया हा कायमच ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे, चिली अशा मातब्बर देशांसमवेत दोन हात करणारा आणि गेल्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळविलेला देश. जपानने त्यांना धूळ चारत केलेली कामगिरी खरोखरीच लक्षणीय आहे.

पण, एका रात्रीत ही जादू झाली का? किंबहुना, क्रीडाविश्वातील कोणताही तारा एका रात्रीत तयार होत नसतो. त्यामागे खडतर परिश्रम असतात. वर्षानुवर्षे, कित्येक दशके.

आपल्याकडील आय-लीग, आयएसएल यांच्याप्रमाणे जपानमध्ये १९९१ साली जे-लीग ही व्यावसायिक साखळी स्पर्धा अस्तित्वात आली. त्या वेळच्या स्पोर्ट्स चॅनेल्सवरून ती भारतामध्ये प्रसारितदेखील केली जात असे. व्हाईट पेले झिको, ब्राझीलचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार डुंगा, इंग्लंडचा गॅरी लिनेकर असे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू जे-लीगशी जोडले गेले. त्याचबरोबर ग्रासरूट्स आणि अकादमी आदींच्या माध्यमातून जपानने १५ वर्षांखालील सुमारे साडेतीन लाख गुणवान खेळाडूंचा गट तयार केला. जपानमधील शालेय साखळी स्पर्धा जगातील सर्वांत स्पर्धात्मक व गुणवत्तापूर्ण आहे. म्हणूनच की काय, आर्सनेल हा इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीच्या क्लबने रायो मियाची याला थेट जपानी स्कूल लीगमधून आपल्या अकादमीत स्थान देऊ केले! इंग्लिश प्रीमियर लीग जिंकण्याची परिकथा प्रत्यक्षात उतरविलेला लेस्टर सिटी, साउथहॅम्पटन, इतकेच काय तर मँचेस्टर युनायटेड, आर्सनेलमधून जपानी खेळाडूंना स्थान आहे. इटलीमधील इंटर मिलान, पार्मा, स्पेनमधील आयबार, जर्मनीमधील वर्डे ब्रेमेन, स्टुटगार्ड अशा युरोपमधील आघाडीच्या क्लबमधून जपानी खेळाडू चमकत आहेत. जपानमधील अकादमीचे अगदी १२ वर्षांखालील खेळाडू युरोपचे दौरे करून मोलाचा अनुभव घेत आहेत. त्यांच्या जडणघडणीच्या वयातील हे प्रशिक्षण पुढे जाऊन त्यांना जागतिक स्तरावरील खेळाडू बनविण्यास उपयुक्त ठरते आहे. सर्वोत्कृष्ट ग्रासरूट्स प्रोग्रॅम म्हणून जपानमधील फुटबॉल विकासाचा फिफाकडून गौरव करण्यात आला आहे.

वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक कामगिरी ही अशाच अनुभव व युवा प्रतिभेच्या जोरावर रचता येते. आणि त्याला अगदी तळागाळातील छोट्या प्रकल्पापासून राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरपर्यंतच्या सगळ्या उपक्रमांची साथ लागते. अगदी छोट्या मैदानांच्या उभारणीपासून प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाचा राष्ट्रीय कार्यक्रम जपानने किक-ऑफ केला. आणि हो, सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्यासारखे आरंभशूर न राहता तो दशकभराहून अधिक काळ यशस्वीपणे चालविलादेखील! जपानच्या याच फुटबॉल विकासाच्या लौकिकामुळे ला-लिगा या जगप्रसिद्ध स्पॅनिश लीगने जपान फुटबॉल संघटनेशी फुटबॉल विकासासंदर्भात करार केला आहे. त्यानुसार अधिकाधिक जपानी युवा खेळाडूंना स्पेनमधील क्लबच्या अकादमींमध्ये संधी देत युरोपीय व कालांतराने जगभरातील फुटबॉलसंदर्भातील प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच, स्पेन व जपानमधील क्लब सामने खेळण्याबरोबरच फुटबॉल अकादमींमधील प्रशिक्षणासंदर्भातही आदान-प्रदान करणार आहेत. मैदानावरील प्रयत्नांबरोबरच सर्वंकष क्रीडासंस्कृती विकसित करणे गरजेचे ठरते. जपानमधील मांगा ही फुटबॉलची कॉमिक स्ट्रिप १०० हून अधिक देशांमध्ये लोकप्रिय आहे. जपानचा नावाजलेला फुटबॉलपटू त्सुबासा याच्या व्यक्तिरेखेवर आधारित हे कॉमिक अगदी फ्रान्सचा झिनादिन झिदान, स्पेनचा फर्नांडो टोरेस आणि इटलीचा डेल पिएरो या वर्ल्ड कप विजेत्यांना प्रेरित करते आहे.

दक्षिण-कोरिया आणि जपानमध्ये २००२ साली वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. आशियाई स्तरावरील स्पर्धांनंतर जपान आता टोकियो २०२० च्या माध्यमातून ऑलिंपिकचे यजमान बनणार आहे. आपल्याकडेदेखील एशियाड झाले. राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या. १७ वर्षांखालील फुटबॉलचा वर्ल्ड कपदेखील झाला. आय-लीग आणि इंडियन सुपर लीग, खेलो इंडियासारख्या स्पर्धाही सुरू झाल्या. इतकेच काय, फिटनेस चॅलेंजच्या माध्यमातून आपण तंदुरूस्ती आणि क्रीडाप्रेमाचे क्लिकही करतो आहोत. पण, त्याच्या पलिकडे जात आपल्याकडे क्रीडासंस्कृतीमध्ये बदल तो काय झाला? वर्ल्ड कपमध्ये जपानसारखे असे अनेक ऐतिहासिक-स्फूर्तिदायी दाखले आपल्याला मिळतील. त्यांच्यापासून प्रेरणा घेत सक्रिय प्रतिसाद दिला, तर या वर्ल्ड कपचे ध्येय साध्य होईल. अन्यथा, भारीतला टी-शर्ट परिधान करून विजेत्या संघाला चिअर करीत यंदाचा वर्ल्ड कपदेखील आपल्यासाठी इतिहासजमा होईल!

(लेखक व्हिवा फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आफ्रिकन ‘कॅजोन’वर भारतीय तालांचे बोल

0
0

नाशिकच्या कल्याण पांडेचे अनोखे संशोधन

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : भारतीय शास्त्रीय संगीत हे जगात सर्वश्रेष्ठ समजले जाते. याच संगीतात बुजूर्ग कलाकारांनी अनेक प्रयोग केले आहेत. मात्र मूळ आफ्रिकन असलेल्या कॅजोन या तालवाद्यावर, भारतीय संगीताचे बोल वाजविण्याची किमया नाशिकच्या कल्याण पांडे या युवकाने केली आहे. 'कॅजोन' वाद्यावर तबल्याचे कायदे, पलटे, चक्रदार, परण, तिहाई यासारखे बोल वाजवून अनेक देशातील रसिकांना त्याने भुरळ घातली आहे.

कल्याण पांडे याने केलेल्या प्रयोगामुळे मूळ आफ्रिकन असलेले हे वाद्य भारतीय संगीताच्या तालांवर इतके चांगले वाजू शकते, हे आफ्रिकन संगीतकारांनाही अचंबित करणारे ठरले आहे. कल्याणच्या या अनोख्या प्रयोगामुळे त्याला देश विदेशातून बोलावणे येत असून, पंडित बिरजू महाराज, कौशिकी चक्रबर्ती, पं. सुरेशदादा तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ करण्याची संधी त्याला मिळाली आहे. स्पेन सरकारने आयोजित केलेल्या स्पेन म्युझिक फेस्टिव्हलमध्ये वादन केल्यानंतर त्याने अनेक देशांचा दौरा केला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये जर्मनी येथे होणाऱ्या 'बीटहोवन' फेस्टिव्हलमध्येही तो तबला आणि कॅजोन यांचे वादन करणार आहे.

(कल्याण नेतोय वारसा पुढे...???)

संगीत ही न संपणारी कला आहे. त्यात जाकीर हुसेन यांनी विविध प्रकार सादर करून तबल्याला एक वेगळा आयाम दिला. त्यात कुठल्याही घराण्याचे बंधन ठेवले नाही. त्याप्रमाणेच सत्यजीत तळवलकर हे काम करीत असून, मलाही त्यांच्याप्रमाणे प्रयोग करायला आवडेल.

- कल्याण पांडे, कॅजोनवादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images