Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मोबाइल चोरटे जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओझर शहर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून आठवडे बाजारातून नागरिकांचे मोबाइल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर पोलिसांना हे चोरटे पकडण्यात यश आले आहे. आठबडेबाजारात असणाऱ्या अगदी सिनेस्टाइल पद्धतीने पाठलाग करून पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे.

ओझर येथे दर मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारात मोबाइल चोरांची पर्वणीच ठरायची. गेल्या काही महिन्यांपासून मंगळवारच्या आठवडे बाजारातून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपाशे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, अनुपम जाधव, भास्कर पवार, बी. व्ही. हेगडे यांनी साध्या वेशात आपली गस्त वाढवली होती. मंगळवारी गस्त घालत असतांना राकेश केशव चव्हाण (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड) सचिन अरुण भोये (रा. सुर्दशन कॉलनी, नवनाथ नगर, पेठरोड नाशिक), राहुल भिकन कासार (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड, नाशिक) हे तीन तरुण संशयीतरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघेही पळून जाऊ लागले. शोध पथकाचे अनुपम जाधव व अमोल गांगोडे यांनी भर बाजारात त्यांचा पाठलाग करून सीनेस्टाइल पद्धतीने त्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाइल आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदोरीत पाऊस, इतरत्र उघडीप

$
0
0

निफाड : गेल्या आठवड्यापासून लांबलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात दमदार हजेरी लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस लांबल्याने शेतकरी पावसाची रोज आतुरतेने वाट पाहत आहे. ढगाळ हवामान असूनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल होते. सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान चांदोरी ते गोंडेगाव फाटापर्यंत दमदार पाऊस झाला. पावसाचा वेग इतका होता की शेतामध्ये पाणी साचले होते. ऊस व भाजीपाला या पिकांची भरणी या पावसाने झाली. चांदोरीपासून पुढे निफाड व नाशिककडे असणाऱ्या गावांना मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तालुक्यात दमदार पावसाची गरज असून शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्ण अहवाल पडला महागात

$
0
0

विस्तार अधिकाऱ्यास नोटीस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय खाते चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने अपूर्ण अहवाल सादर केल्यामुळे खाते चौकशीत दोषमुक्त ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चांदवड येथे ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेल्या विस्तार अधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा समर्पक खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

इगतपुरी पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागात कार्यरत एका विस्तार अधिकाऱ्याने आपल्या पदाचे कर्तव्य बजावताना गंभीर स्वरुपाची कसुरी केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विभागीय खातेचौकशी सुरू करण्यात आली होती. यासाठी चौकशी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सुनील पाटील होते. या प्रकरणी प्राप्त झालेले आरोपपत्र व त्यानुसार कार्यवाही केलेली नसल्याचे निदर्शनास आले. सादरकर्ता अधिकारी म्हणून चुकीचे स्वरुपात व अपूर्ण अहवाल सादर केल्यामुळे चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यास दोषमुक्त करण्यात आलेले आहे.

या प्रकरणी सादरकर्ता अधिकारी व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तत्कालीन विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) या नियमानुसार नोटीस बजावण्यात आली असून, याबाबत समर्पक खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावोगावी मिळणार शुद्ध अन् सुरक्षित पाणी

$
0
0

जलकुंभ, टाक्या, स्वच्छतेचे काम सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारपासून ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्यासाठी व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉ. गिते यांनी असे नावीन्यपूर्ण अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी निफाड तालुक्यातील चाटोरी, सोनगाव, चांदोरी, शिवडी, विंचूर, रानवड, दारणा सांगवी, दिंडोरी-चास, औरंगपूर, ठाणगाव थडी, पाचोरे बु., टाकळी विंचूर, भुते, महाजनपूर आदी ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये देखील ही मोहीम राबविण्यात आली. तसेच त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख नमूद करण्यात येऊन अंगणवाडी व शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचीही स्वच्छता करण्यात आली. ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच, हातपंपांचेही शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जलसुरक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

.

ग्रामसतरीय यंत्रणेला आदेश

पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक, पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आधारकार्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातून आधार नोंदणी व नूतनीकरण केले जात असले तरी टप्प्याटप्प्याने हे केंद्र बंद करण्याचे संकेत युआयडीने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सध्या सरकारी कार्यालयांमध्ये मुक्काम असलेले आधार केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, बँका आणि टपाल कार्यालयांमधूनच आधार नोंदणी व नूतनीकरणाची तयारी सुरू झाली आहे.

आधारकार्ड ही भारतीयत्वाची ओळख ठरणार आहे. प्रत्येकाला आधारकार्ड काढणे आणि ते सोबत बाळगणे अनिवार्य असून, जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू केले आहेत. महाऑनलाइन केंद्र आणि सीएससी सेंटर्सचालकांना सरकारी कार्यालयांमध्ये आधार केंद्र चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात १३५ ठिकाणी आधार नोंदणी आणि नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ बँका आणि टपाल कार्यालयांमध्येच आधार केंद्र देण्याचे युआयडीच्या विचाराधीन असून, त्या अनुषंगाने युआयडीने कार्यवाहीला सुरुवातही केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून नवीन ऑपरेटर्सची नेमणूक थांबविण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने महाऑनलाइन केंद्रांकडील आधारचे काम काढण्यात येणार असून, ते राष्ट्रीयीकृत बँका आणि टपाल कार्यालयांमधूनच सुरू ठेवण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

२९ महाऑनलाइन केंद्र काळ्या यादीत

आधार सेंटर्स सरकारी कार्यालयांमध्ये कार्यान्वित करण्यात आल्यामुळे या सेंटरचालकांवर वेळेच्या मर्यादा आल्या आहेत. सरकारी कार्यालयांच्या कामकाजाच्या दिवशी आणि कामकाजाच्याच वेळेत आधारची कामे करणे त्यांच्याकडून अभिप्रेत आहे. सुटीच्या दिवशी किंवा सायंकाळी सहानंतर आधार नोंदणी किंवा आधार नूतनीकरण करणाऱ्या २९ सेंटरचालकांना युआयडीने काळ्या यादीत टाकले आहे. आधार नोंदणीसाठी पैसे आकारले जाऊ नयेत किंवा आधार दुरुस्तीसाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जाऊ नयेत याकरिता ही दक्षता युआयडीकडून घेतली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंगळेनगर चौकात सिग्नलमुळे गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

येथील इंगळेनगर चौकातील सिग्नलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. हा दोष त्वरित दूर करण्याची मागणी होत आहे. अपघात झाल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

वाढत्या अपघातांनंतर बसविलेल्या सिग्नलमध्ये वर्षभरातच दोष निर्माण झाला आहे. एकाच वेळी चारही सिग्नल ग्रीन होतात. दोन दिवसांपूर्वी रात्री असा प्रकार घडला. दिवसाही कधीकधी सिग्नलमध्ये अशीच समस्या उद्भवते. पूर्वेकडील सिग्नलचा टायमर खराब झालेला असून, तोदेखील दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. या चौकात वाहतूक पोलिस नसतो. चौकात नाशिकरोड अंकित पोलिस चौकी आहे. परंतु, ती क्वचित उघडी असते. सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईच होत नाही. त्यामुळे बेशिस्त निर्माण झाली आहे. त्यातच सिग्नल खराब झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे सिग्नल दुरुस्तीची मागणी विजय परदेशी, तुळशीदास इंगळे आदींनी केली आहे.

पुलाखालील पाण्यावर तरंगतोय कचरा (फोटो)

पंचवटी : संत गाडगे महाराज पुलाच्या खालच्या बाजूला गोदावरीच्या पात्रात कचरा साचला आहे. वाहून आलेला कचरा येथे पाण्यावर तरंगत असून, त्यावर तेलाचा तंवग असल्यासारखे दिसत आहे. गोदापात्रात प्रदूषण करण्यास मनाई असतानादेखील गोदापात्र अस्वच्छ करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्यापासून ही समस्या गंभीर बनू लागली आहे.

फळे, मिठाईवाटप

देवळाली कॅम्प : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देवळाली शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या लामरोड भागात आज, मंगळवारी (दि. १९) सकाळी १० वाजता मिठाई व फळेवाटप करण्यात येणार आहे. जगदीश गोडसे यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेना शहर पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पेठरोडवर अस्वच्छता (फोटो)

पंचवटी : पेठरोडला कालव्याजवळ लावण्यात आलेल्या मोबाइल टॉयलेटच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी येथे कचरा टाकत असल्यामुळे ही जागा कचराकुंडी बनली आहे. मोबाइल टॉयलेटच्या आडोशाला लक्षात येत नसल्यामुळे येथे कचरा टाकला जात आहे. हा कचरा उचलला जात असला, तरी पुन्हा येथे कचरा टाकला जात असल्यामुळे कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत.

स्क्वॅश निवड चाचणी

नाशिकरोड : नाशिक जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनतर्फे दि. २१ जून रोजी दुपारी ४ वाजता विभागीय क्रीडा संकुल, मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे जिल्हास्तरीय स्क्वॅश रॅकेट निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. त्यात नाशिक जिल्हा संघाची निवड करण्यात येईल. ११, १३, १५,,१७ व १९ वर्षे वयोगटाची मुले /मुली, तसेच सीनिअर पुरुष व महिला या गटांसाठी निवड चाचणी होत आहे. सहभाग व माहितीसाठी स्पर्धा सचिव संजय होळकर (९८९०८१५९९७), प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी (९०४९०८४४९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आनंद खरे, कार्याध्यक्ष अशोक दुधारे, नितीन हिंगमिरे, प्रा. माणिक गायकवाड यांनी केले आहे.

नांदूरला पाणीगळती (फोटो)

पंचवटी : नांदूर नाक्यापासून जवळच असलेल्या नाल्यावरून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीवर बसविण्यात आलेल्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. या व्हॉल्व्हमधून पाण्याचे तुषार उडत असून, वेगाने उडणाऱ्या या फवाऱ्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून, हे पाणी नाल्यात साचत आहे. येथे त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

गुणवंतांचा सत्कार

जेलरोड : पंचक येथील कै. गणेश धात्रक संस्थेच्या एंजल इंग्लिश स्कूलमध्ये ९२ टक्के गुण मिळवून दहावीत प्रथम आलेल्या खुशवंत बोरसे याच्यासह अन्य गुणवंतांचा नुकताच सत्कार झाला. शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय धात्रक आणि मुख्याध्यापिका मनीषा दराडे यांच्या हस्ते सत्कार झाला.

अमरधामरोडवर डेब्रिस (फोटो)

पंचवटी : अमरधामरोडवर डेब्रिस टाकण्यात येत असल्यामुळे त्याचे मोठे ढिगारे साचत आहेत. पंचवटी अमरधामच्या उत्तरेला असलेल्या महापालिकेच्या जागेत हे डेब्रिस टाकण्यात येत आहे. त्याच्यावर कुणाचेही निर्बंध नसल्यामुळे त्याचे ढिगारे वाढत चालले आहेत. शहरातील जुने वाडे, घरे पाडल्यानंतर त्यांचे डेब्रिस सर्रासपणे येथे फेकण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा योगोत्सव २१ जूनला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरराष्ट्रीय योगदिनी (२१ जून) नाशिक योग विद्या केंद्रातर्फे योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून, हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर सकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत होणार आहे. येतांना सोबत योगामॅट किंवा सतरंजी आणावी.

योग दिवस फक्त शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये किंवा योगसंस्था यांच्यापुरताच मर्यादित न रहाता सर्वसामान्य नाशिककर नागरिकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी नाशिकमधील 'नाशिक योग विद्या केंद्र' या संस्थेच्या वतीने येणारा योगदिन हा 'नाशिकचा योगोत्सव' या नावाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात नाशिकमधील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देत नाशिकमधील विविध संस्था २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनात सहभागी होणार आहेत. यामध्ये महिला पतंजली समिती, जैन सोशल ग्रुप, गुन्हा अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, (डी.टी.एस.), देशस्थ ऋग्वेदी संस्था, नीमा, डॉक्टरांची जिल्हा संघटना, बुकसेलर्स असोसिएशन, जीतो लेडीज विंग नाशिक चॅप्टर, आयुष विभाग नाशिक, लायन्स क्लब, नाशिक विभाग, रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्था सहभागी होत आहेत. ज्या संस्थाना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संयोजक उमेश निफाडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषण मुक्तीसाठी शेवगाच्या बियाभेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही हातभार लागावा या सामाजिक भावनेतून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ७५ वर्षाच्या एका शेतकऱ्याने आज जिल्हा परिषदेत स्वखर्चाने ४० किलो शेवग्याच्या बिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचेकडे सुपूर्द केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेस समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून, कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात लोकचळवळ निर्माण झाल्याचे अनिल लांडगे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेचे सूत्रे घेतल्यापासून कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी जिल्ह्यात नव्याने सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली आहे. जिल्हाभरात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांसाठी ग्रामस्तरावर बाल ग्राम विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी आहार तसेच औषध याबरोबरच गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालक यांचेसाठी शेवगा किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबत डॉ गिते यांनी माहिती देत जिल्हा शेवगामय करण्याचा निर्धार केला आहे. अंगणवाडी परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी शेवगा लागवड करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी मोफत बियाणे उपलब्ध करून देत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती मिळालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (ता. शेवगाव) येथील श्रीराम धूत या ७५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्याकडील ४० किलो शेवगा बियाणे जिल्हा परिषदेला मोफत उपलब्ध करून दिले आहे. आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अनिल लांडगे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे आदींच्या उपस्थितीत श्रीराम धूम यांनी ४० किलो शेवगा बियाणे सुपूर्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग एकाच छताखाली

$
0
0

मटा विशेष

vinod.patil@timesgroup.com

Twit : VinodPatilMT

नाशिक : शहरासह आजूबाजूला असलेल्या पर्यटनस्थळांच्या माहितीबाबत सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, पर्यटन विभाग, महापालिका आणि पुरातत्त्व विभागामध्ये एकवाक्यता नसून, त्यांच्याकडे या पर्यटनस्थळांबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा गोधळ दूर करण्याचा विडा स्मार्ट सिटी कंपनीने उचलला आहे. शहर आणि परिसरातील सर्व पर्यटनस्थळांबाबत असलेल्या माहितीबाबत एकवाक्यता आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनी या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एकत्रित करून सर्व संकेतस्थळांसाठी एकच दिशादर्शक माहिती उपलब्ध करून देणार आहे. सोबतच देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पर्यटनस्थळांचा गुगलवर इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स तयार केला जाणार आहे.

धार्मिक, सांस्कृतिक शहर अशी नाशिकची ओळख आहे. उत्तम भौगोलिक स्थिती, अनुकूल हवामान आणि कनेक्टिव्हिटीची त्याला जोड मिळाल्याने नाशिकचा डंका जगभर वाजला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची तर जागतिक वारसायादीत नोंद झाली आहे. नाशिकच्या आजूबाजूला असणारे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना फक्त पावसाळ्यापुरतेच आकर्षित करते, तर मंदिरांचे शहर अशी नाशिकची ओळख असली तरी अन्य राज्यांतील पर्यटनस्थळांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद नाशिकच्या पर्यटनस्थळांना मिळत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नाशिकचे ब्रँडिंग एकाच छताखाली न होणे. राज्य सरकारचा पर्यटन विभाग, महापालिका, पुरातत्त्व विभाग आणि इतिहासातील पुस्तकांमध्ये या पर्यटनस्थळांच्या माहितीबाबत एकवाक्यता नाही. सोबतच खासगी संस्थांकडून या पर्यटनस्थळांबाबत असलेल्या माहितींमध्ये तफावत आढळून येते. पर्यटनासाठी आवश्यक मॅप कोणत्याही संकेतस्थळावर नाही, तसेच या पर्यटनस्थळांचा डिजिटल कंटेंटही उपलब्ध नाही. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा गोधळ होतो.

देश-विदेशातून नाशिकमध्ये येऊ पाहणाऱ्या पर्यटकांचा हा गोंधळ दूर करण्याचा विडा स्मार्ट सिटी कंपनीने आता उचलला आहे. स्मार्ट सिटी कंपनी नाशिकच्या अंतर्गत पर्यटनस्थळांचा विकास व प्रसारासाठी प्रयत्न करणार आहे. शहरासह आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या पर्यटनस्थळांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात येणार असून, त्यासाठी इतिहासतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या सर्व पर्यटनस्थळांची एकत्रित माहिती संकलित करून ती माहिती अधिकृत केली जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून हा संकलित केलेला मजकूर केंद्र, राज्यासह पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर एकाच वेळी झळकणार आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांच्या माहितीमध्ये असलेली तफावत दूर होणार आहे. खासगी संस्थांना गाइड पुस्तके छापण्यासाठीही हाच अधिकृत कंटेंट वापरता येणार आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या माहितीबाबत असलेली तफावत दूर होऊन नाशिककडे पर्यटकांचा ओढा वाढेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

स्टोरी टेलिंग कंटेंटही...

सध्या विविध विभागांच्या संकेतस्थळांसह खासगी संस्थांकडे पर्यटनस्थळांची माहिती कंटेंट स्वरूपातच उपलब्ध आहे. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने या पर्यटनस्थळांचा इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स तयार करण्याचा निर्णय घेतला असून, दृ्श्य स्वरूपातील व्हिडीओ तयार केले जाणार आहेत. हा डिजिटल कंटेंट सर्व संकेतस्थळांवर टाकण्यासह विविध देशांच्या वेबसाइटवरही लिंक केला जाणार आहे. गुगलवरही हा डिजिटल कंटेंट उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोबतच स्टोरी टेलिंग कंटेंटही तयार केला जाणार असून, जगभरातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा त्यामागचा उद्देश आहे.

शहर आणि आजूबाजूला असलेल्या पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग करण्यासाठी माहितीत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी पुढाकार घेणार असून, एकत्रित माहितीसह इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स तयार केला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढेल.

- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा बेमुदत बंद

$
0
0

सीटूचे पोलिस आयुक्तालयासमोर निदर्शने

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सूडबुध्दीने कारवाई झाली असून, गुन्हा मागे न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा सीटू पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नाशिक वर्कर्स युनियन आणि सीटू संलग्न कामगार संघटनांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना निवेदन सादर केले.

कामगार मारहाणीच्या घटनेनंतर दोन दिवसांनी हेतूपुरस्सर डॉ. कराड यांचे नाव गोवण्यात आले. सीटू प्रणित विविध कामगार संघटनांमुळे कामगारवर्गाला जास्त पैसे द्यावे लागतात. यामुळे कारखानदारांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना बरोबर घेऊन हा उद्योग केला आहे. नॅश ग्रुपच्या मालकास मदत करण्यासाठी म्हणून सीटू प्रणित कामगारांनी मारहाण केल्याचा खोटा गुन्हा सातपूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्याचा आरोपदेखील पदाधिकाऱ्यांनी निवदेनात केला आहे. २३ मे रोजी मारहाणीची घटना झालेली असताना गुन्हा २५ मे रोजी दाखल करण्यात आला. न घडलेल्या गुन्ह्याबाबत डॉ. कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे लक्ष्मीकांत पाटील यांना निलंबित करण्याचीही मागणी निवेदनात केली आहे. सीटू जिल्हाध्यक्ष एस. के. ठोंबरे, उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, नगरसेवक तानाजी जायभावे तसेच पदाधिकारी कल्पना शिंदे, संतोष काकडे, सिंधू शार्दुल, भागवत डुंबरे, एन. डी. सूर्यवंशी, अ‍ॅड. भूषण सातळे, खंडेराव झाडे यांच्यासह कामगारांनी पोलिस आयुक्तालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, या ठिकाणी साखळी उपोषण करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. कराडांविरोधात २० पेक्षा अधिक गुन्हे

सीटू संघटनेकडून होत असलेल्या आरोपाबाबत पोलिसांनी सांगितले, की डॉ. कराड यांच्याविरोधात हत्या, हत्येचे प्रयत्न यासारखे तब्बल २० पेक्षा अधिक गुन्हे नाशिक शहरासह ग्रामीण आणि परजिल्ह्यात दाखल आहेत. सातपूर येथील कामगारास झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर ते समोर आलेले नाहीत. चौकशी पूर्ण होईपर्यंत एखाद्या व्यक्तीचे नाव तपासाच्या यादीतून कसे वगळणार असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्याने उपस्थित केला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्वच बाबी स्पष्ट होतील. मात्र, ते टाळून आंदोलने व मोर्चे काढले जात असल्याबाबत पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीसाठी रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च शिक्षणासाठी मागासवर्गीय प्रवर्गातून प्रवेश घेताना २७ जुलैपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे केल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. परिणामी, समाजकल्याण विभागात अर्ज सादर करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. विहीत मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास खुल्या प्रवर्गात प्रवेश घेण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्याच्या समाजकल्याण विभागाचे सचिव नंदकुमार वाघमारे यांनी दिले आहेत. मात्र, हे प्रमाणपत्र मिळणार का, असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाशिक विभागातील अनेक पालकांनी नासर्डी पुलाजवळ असलेल्या समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी होत असून, ती पूर्ण करताना नाकीनऊ येत आहेत. या ठिकाणी जातपडताळणीसाठी हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी लावावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे. समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी विभागात विद्यार्थी व पालक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. फार्मास्युटिकल, आर्किटेक्चर, इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाची नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने कागदपत्रे दाखल करता येत नाहीत. जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हजारो लोकांनी अर्ज केले आहेत. या कागदपत्रांची छाननी करून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. प्रमाणपत्र देणे हे जोखमीचे काम असल्याने अधिकारीदेखील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच प्रमाणपत्र देत आहेत. मात्र, अचानक पालकांचा ओघ वाढल्याने प्रमाणपत्र कसे द्यायचे, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीसंख्येच्या साठ टक्के विद्यार्थ्यांकडे जातपडताळणी प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हे प्रमाणपत्र न मिळाल्यास हजारो विद्यार्थांना सर्वसाधारण गटात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याची झळ बसणार आहे. नवीन निर्णयानुसार इंजिनीअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत जातपडताळणीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज दाखल केल्याची पावती फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जमा करावी लागेल. फार्मसीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख २२ जून देण्यात आली आहे. आर्किटेक्टसाठी २४ जून, हॉटेल मॅनेजमेंटसाठी २६ जून ही तारीख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे २७ तारखेपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्रे कशी मिळतील, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र द्या

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी राज्यातील जातपडताळणी प्रमाणपत्र वाटपाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी अर्ज सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जातपडताळणी प्रमाणपत्र संबंधिताला देण्यात यावे, असे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. जो कर्मचारी कामात कुचराई करील त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आज असलेली पेंडन्सी दुसऱ्या दिवशी संपली पाहिजे. शून्य पेंडन्सी काम करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात अवघी तीन प्रकरणे पेंडिंग असल्याने या विभागाचे त्यांनी अभिनंदन केले आहे. येत्या तीन दिवसांत राज्यात एकही प्रकरण शिल्लक रहायला नको, असेही ते म्हणाले.

जात पडताळणी बाकी असलेली प्रकरणे

नाशिक १ हजार २००

धुळे ३ हजार

अहमदनगर ८००

जळगाव १ हजार २००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींचे अनोखे रंग बनले चर्चेचे विषय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

एरव्ही खडू अन् फळा ही साधने हाताशी घेऊन विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या गुरुजींची प्रतिमा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कधी नव्हे ते यंदा राजकीय पक्षांनी स्वारस्य दाखविल्याने या निवडणुकीस आता अस्सल राजकारणाचे रंग चढले आहेत. मतदार म्हणून गुरुजींनाही मुरलेल्या राजकारणी उमेदवारांनी गळ घातल्याने काही गुरुजींचे अनोखे रंग आता गावोगावी चर्चेचे विषय बनले आहेत.

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तशी मूळ राजकीय प्रवाहापासून दूरचीच मानली जात होती. परिणामी, या निवडणुकीत इतर निवडणुकींसारखे लक्ष्मीदर्शन, प्रलोभनांचे फास अन् मतदारांचे चोचले पुरविण्यावर कधी विशेष भर दिला जात नव्हता. पण यंदा प्रमुख राजकीय पक्षांसह तोलामोलाच्या उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने हे सगळे आजवर न टाकले गेलेले फासे मतदारांसाठी टाकले जात आहेत. परिणामी, आजवर कागदावरच सक्रिय असणाऱ्या गुरुजींच्या अर्धा शेकडा संघटना आणि त्यांचे अंतर्गत गट-तटही रात्री-बेरात्रीपर्यंत प्रचार आणि श्रमपरिहारात व्यस्त आहेत. राजकीय समीकरणांसाठी आपसांतील वैर विसरून काही पुढारी गुरुजींनी गळ्यात-गळे घातले आहेत. काही कार्यकर्ते गुरूजी दिवसभर निवडणुकीची समीकरणे सोडवित आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या गतवेळच्या निवडणुकीतही लक्ष्मीदर्शन घडले होते. यंदा मात्र हा ट्रेण्ड पारंपरिक निवडणुकांप्रमाणे जोरात आहे. विद्यार्थ्यांना नीतिमत्ता अन् संविधान शिकविणाऱ्या गुरुजींच्या तोंडीच आता गिफ्ट, पार्टी अन् लक्ष्मीदर्शनासारखे शब्द रूळत असल्याने जनसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको महाविद्यालयात वर्धापनदिनी गुणगौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध केंद्रांतील दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 'नामदार गोपाळकृष्ण गोखले : जीवन व कार्य' यावर प्रकाश पाठक यांचे भाषण झाले. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, प्राचार्य एस. बी. पंडित, डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. राम कुलकर्णी, डॉ. धनेश कलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाठक म्हणाले, की ना. गोखले यांनी सरस्वतीच्या दालनात ज्ञानाचे अमृतग्रहण करून इतरांनाही आपल्या ज्ञानाचा परिपाठ दिला. गोखले यांच्या ज्ञानसाधनेचे विचार, सूत्रांचे दर्शन, मुक्ती अनेक कृतींतून दिसत होती. डॉ. गोसावी म्हणाले, की बाळासाहेब देशमुख यांच्या सहकार्यातून व प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांच्या शिक्षणाचा वसा व प्रेरणेतून नाशिकरोडमध्ये संस्थेची स्थापना झाली. संस्थेतून अनेक विद्यार्थी घडले. डॉ. दीप्ती देशपांडे म्हणाल्या, की दहावीच्या निकालात २१ पैकी ३ शाळांचा निकाल शंभर टक्के, तर संस्थेचा एकूण निकाल ८६ टक्के लागला आहे. बारावीचा निकाल ९४ टक्के लागला असून, त्यात बीवायके व सर डॉ. मो. स. गोसावी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. डॉ. विजया धनेश्‍वर यांनी सूत्रसंचालन केले. महेश औटी यांनी आभार मानले.

विविध ग्रंथांचे प्रकाशन

वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध ग्रंथांचे प्रकाशन झाले. गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणेच देणगीदार नटवरलाल चव्हाण, विजय चव्हाण, अतुल चांडक, अमर कलंत्री, महेश कलंत्री, मोहनशेठ लाहोटी यांचा सत्कार झाला. माजी प्राचार्य एस.बी. पंडित, डॉ. एस. ए. कुलकर्णी, डॉ. एस. डी. कुलकर्णी, डॉ. एस. एस. लव्हेकर, डॉ. राम कुलकर्णी, प्रा. बी. डी. कुशारे, व्ही. व्ही. मोरजकर, बी. बी. बावधनकर, जी. पी. धोंडगे, सुरेखा पूरकर, विजय संकलेचा, राजू पत्की, विनोद दाणी, दीपाली कुलकर्णी, अजय कनकईकर यांचाही सत्कार झाला.

--

२ कॉलम (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा, मनमाडला पावसाचा दिलासा

$
0
0

मंगळवारी सायंकाळी अर्धा तास पाऊस; जिल्ह्यात इतरत्र मात्र प्रतिक्षाच

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या पंधरवाड्यापासून चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने मंगळवारी सायंकाळी सुखद धक्का दिला. मंगळवारी सटाणा शहरासह परिसरात तब्बल पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैरण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अजून दमदार पावसाची गरज आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या सटाणा शहरवासीयांना मंगळवारी सायंकाळी अचानकपणे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात नामपूर रोड परिसरासह निम्म्या शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याचा सुटताच पावसाने आगमन झाले. सटाणा शहरात जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. सोमवारी तरसाळी परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील इतर भागात मात्र सकाळपासून कडकडीत ऊन होते. मात्र सायंकाळी आलेल्या पावसाने सगळ्यांना आनंद झाला. पाऊस सुरू असतांनाच शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातही काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला.

वीजपुरवठा खंडित

मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. या पावसामुळे शहरातील गटारी, नाले प्रवहित झाले होते.

00

मनमाडला मुसळधार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. कडाकडीत उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पावणे पाच ते पाचच्या दरम्यान शहरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. तब्बल अर्धा ते पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले. काही ठिकाणी गटारी तुंबल्या. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले. शाळेच्या वेळात पाऊस आल्याने मुलांना शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या पालकांची एकच झुंबड उडाली.

चांदवड , नांदगाव ढगाळ

चांदवड व नांदगाव तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते , पावसाने वातावरण निर्मिती केली पण पाऊस सायंकाळ पर्यंत पडला नसल्याने नागरिकांची निराशा झाली.

000

वादळी पावसाने कांदा चाळीचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा,कळवण

जून महिन्याच्या पंधरवड्यात एकदाही न झालेल्या पावसाने सोमवारी दुपारी कळवण शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे दोन शेड कोसळले. या शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. भेंडी येथील मराठी शाळेचे पत्रे उडाल्याने शाळेचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे झालेल्या

नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

सोमवारी दुपारी कळवण शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शिंदे यांचे कांदा साठवणीचे दोन शेड जमीनदोस्त झाले. दोन्ही शेडमधील १६०० क्विंटल कांदा पाण्यात भिजला. मागील पंधरवाड्यात बोरदैवत परिसरातील शेकडो घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाले होते. तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे नुकसान झाले होते. शिवाय घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून शासनस्तरावरून नुकसान भरपाई द्यावी. नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे.

पंचनाम्याच्या सूचना

तहसीलदार कैलास चावडे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याची सूचना केली असून, कांदा शेड बाबत भरपाईची तरतूद नसून अन्य नुकसान ग्रस्तांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांना देणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत मिळाल्या चोरीच्या दुचाकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड औद्योगिक परिसरातील चुंचाळे शिवारातून दोन चोरीच्या दुचाकी शोधण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, आतापर्यंत या चोरीच्या वाहनांची सख्या आठवरून दहावर पोहोचली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत १० जून रोजी घरफोडीची घटना घडली होती. त्यासंदर्भात अंबड पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून वाहनचोर शोधण्यास यश मिळवले.

चोरी व घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी विजय केशव गुप्ता (वय २२, रा. चुंचाळे, अंबड), प्रशिक उर्फ भुऱ्या बाळू भरीत (वय १९, रा. वरचे चुंचाळे, अंबड) व नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे (वय १९ रा. आंबेडकरनगर, वरचे चुंचाळे, अंबड) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी अंबड पोलिस ठाणे हद्दीतील अंबड औद्योगिक परिसरात असलेल्या कंपनीमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून कंपनीमधील चोरी गेलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे पार्ट्स जप्त करण्यात आले होते. तसेच, यातील संशयित आरोपी नवनाथ साळवे याच्याकडून २ लाख ४० हजार किमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीवरून अंबड येथील चुंचाळे शिवारातील एका विहिरीतून आणखी दोन दुचाकी क्रेनच्या साह्याने शोधून काढल्या. यातील एक संशयित आरोपी फरार असून, त्याला पकडल्यानंतर आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीईओंनी घेतला योग दिनाचा आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानिमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून विशेष कार्यक्रमाचे आयो​जन करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करून विद्यार्थी, पालक, नागरिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधत प्रत्येक शाळेमध्ये योगासनांचे प्रात्यक्षिक, प्राणायाम, आदींबाबत तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषण सिन्नर आढावा

$
0
0

कुपोषण निर्मूलनाची राज्यपालांकडून दखल

डॉ. नरेश गीते यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी तीन हजारापेक्षा जास्त ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या कामाची राज्याच्या राज्यपालांनीही दखल घेतली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

सिन्नर तालुक्याची तालुकास्तरीय आढावा बैठक ज्वालामाता मंगल कार्यालयात डॉ. गिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते म्हणाले, की कुपोषणाच्या सर्वेक्षणातून काही बालके सुटली असल्यास पुन्हा सर्वेक्षण करून त्या बालकांना शोधून त्यांना ग्राम बाल विकास केंद्रात आणावे, असे आदेश दिले. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक असून, तीन महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हा देशात २२५ क्रमांकावर होता, मात्र आज १०६ क्रमांकावर आला आहे. या योजनेत सिन्नर तालुका सर्वात मागे असल्याने नाराजी व्यक्त करीत गिते यांनी प्रत्येक ग्रामसेवकाचा आढावा घेऊन घरकुल पूर्ण करण्याचे आदेश दिले. यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाकडून काम पूर्ण होण्याची मुदत लेखी स्वरुपात लिहून घेण्यात आली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बाल विकास केंद्रांचा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी आरोग्य विभागाचा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेलकंदे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला.

ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार

सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी कुपोषण निर्मूलनासाठी पुढाकार घेतला आहे. गावात एकूण ४१७ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात १२ तीव्र कुपोषित तर २९ मध्यम कुपोषित बालके आढळून आली. या बालकासाठी गावात ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले असून, यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार आहार व औषध देण्यात येत आहेत. आहार व औषधांमुळे १२ तीव्र कुपोषित बालके मध्यम कुपोषित श्रेणीत गेली असून, मध्यम कुपोषित बालकांपैकी १४ बालक सर्वसाधारण श्रेणीत गेली आहेत. या कामात योगदान दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांचा शेवग्याचे झाड देऊन सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५६९ जातपडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी तंत्रशिक्षण महामंडळाने जातपडताळणी सक्तीची केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून नाशिक येथील समाज कल्याण विभागाच्या जातपडताळणी विभागाकडे आलेल्या हजारो अर्जापैकी केवळ ५६९ जातपडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या विभागावर न्यायालयाने ताशेरे ओढून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात पडताळणी सक्तीची करा असे आदेश दिले होते. हा निकाल ६ सप्टेंबर २०१७ रोजी लागला होता. या आदेशाबाबत तंत्रशिक्षण मंडळाने सामजकल्याणच्या जातपडताळणी विभागाला कल्पना देणे गरजेचे होते. परंतु, तंत्रशिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी विभागाला ११ जून २०१८ रोजी याबाबत माहिती दिली. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ नसताना समाजकल्याण विभागावर अचानक कामाचा ताण वाढला, अचानक अर्जांचा लोड आल्याने तत्काळ शहनिशा न करता प्रमाणपत्र देता येत नाही तरीही चार दिवसांत जातपडताळणी विभागाने ५६९ प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे.

३ हजार २०० अर्जांमध्ये त्रुटी

जातपडताळणी विभागाकडे आलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रुटी असून, या अर्जांमध्ये काहींचे पत्ते अपुरे तर काही अर्जदारांनी पुराव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, असे तीन हजार २०० अर्ज प्रलंबीत आहेत. या अर्जदारांना कल्पना देण्यात आली असून, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. जातपडताळणी अर्ज भरताना तो ऑनलाइन भरावा लागतो. प्रत्येक अर्जदार स्वत: अर्ज भरीत नाही. तो अर्ज सायबर कॅफेच्या संचालकाकडून भरुन घेतला जातो. काही वेळा त्यात मोबाइल नंबर टाकला जात नाही. त्यामुळे अर्जामध्ये त्रुटी असल्यास अर्जदाराला कळवता येत नाही. असे अनेक अर्ज पडून आहेत.

केवळ दोन कर्मचाऱ्यांवर भिस्त

समाज कल्याण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असली तरीही काम मात्र कासवगतीने सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी सपर्क साधला असता या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी केवळ दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित १५ कर्मचारी कंत्राटी आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकार नसल्याने ते कार्यवाही करू शकत नाहीत. यातील काही कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. त्यामुळे आलेल्या प्रकरणांचे वर्गीकरणही त्यांना व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे काम पुढे सरकत नाही. येणाऱ्या गर्दीचा लोंढा बघता समाजकल्याण विभागाच्या उपायुक्त वंदना कोचुरे यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.

कॅम्पला प्रतिसाद नाही

अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असतात. या त्रुटी पूर्ण केल्याशिवाय पडताळणी प्रमाणपत्र देता येत नाहीत. यासाठी २१ मे ते २५ या कालावधीत विभागाच्या वतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्यांच्या अर्जांबाबत अडचणी आहेत अशा अर्जदारांपैकी बोटावर मोजण्याइतक्या अर्जदारांनी आपल्या अर्जातील त्रुटी पूर्ण केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळ बाद

$
0
0

निवडणूक लढणार नसल्याचे छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

"मी लोकसभा लढवायची, की विधानसभा याचा विचार अद्याप केलेला नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर नाशिककरांनी यापूर्वीच माझी हौस फेडलेली असून, त्यावर आता न बोललेलेच बरे. भविष्यात काय करायचे, मी आता सांगू शकत नाही," असा खुलासा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंग‌ळवारी नाशिकमध्ये केला. माजी खासदार समीर भुजबळ मात्र कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

भुजबळ काका-पुतण्यांच्या राजकीय वाटचालीबाबत बरेच अंदाज बांधले जात होते. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. या पत्रकार परिषेदत समीर भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ म्हणाले, की मी सध्या आजारी आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही. भविष्यात काय करायचे, हे मी आता सांगू शकत नाही. समीर मात्र निवडणूक लढवणार नाही. तसेच, मी पक्ष संघटनेविषयी काय काम करायचे याचा निर्णय पक्ष घेईल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राज्य सरकारच्या कामगिरीवरही टीका केली. सरकारने राज्यावरील कर्ज दुप्पट केले आहे. सरकार चांगले काम करीत असून, सध्या सर्वत्र अदृश्य विकासही दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पालकमंत्र्याकडे अनेक खाती असून, त्यांच्यावर आता उपोषणे सोडवण्याचीही जबाबदारी असल्याचा टोला त्यांनी पालकमंत्री नाशिकला येत नसल्याबद्दलच्या प्रश्नावर लगावला.

खडसेंनाबरोबर घेऊन काम करू!

एकनाथ खडसे यांनी ओबीसी प्रश्नांविषयी छगन भुजबळ यांचे समर्थन केले होते. याविषयी ते म्हणाले, की ओबीसींसाठी एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केले. चर्चा घडवली. त्याद्वारे त्यांनी ओबीसी हितासाठी चांगले योगदान दिले आहे. भविष्यातही त्यांच्या भूमिकेचा विचार करू. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. त्यामुळे भविष्यात ओबीसी व त्यांच्या प्रश्‍नांसाठी खडसेंसह सर्वांनाबरोबर घेऊन काम करता येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

मोठेपणा की अडचण?

विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचाही वाटा असल्याचा दावा केला होता. त्याबाबत विचारले असता, छगन भुजबळ म्हणाले, की कोणीही काहीही वक्तव्य करू शकतो. परंतु, दराडेंनी या वक्तव्यातून मला मोठेपणा दिला, की मला अडचणीत आणण्यासाठी वक्तव्य केले हे मात्र समजले नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगदिनानिमित्त युवा संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहरू युवा केंद्राच्या वतीने चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या कालावधीत गंगापूर रोड येथील समाजकार्य महाविद्यालयात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विलास देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात जिल्ह्यातील गाव व तालुका पातळीवरील सर्व नेहरू युवा केंद्राशी संलग्नित युवा, महिला, क्रीडा मंडळे, व्यायामशाळा व सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी तसेच योग विद्या गुरुकुलचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. युवक-युवतींनी योग दिन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वय भगवान गवई यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images