Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

५६ जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा

$
0
0

कळवणमध्ये सामुदायीक विवाहसोहळा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

आदिवासी विकास विभाग, सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ५६ जोडप्यांचा सामूदायीक विवाहसोहळा व 'एकच लक्ष्य तेरा कोटी वृक्ष संकल्पेतून' वृक्षवाटप उपक्रम कळवण येथील वाणी समाज मंगल कार्यालयात पार पडला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण व आमदार राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याप्रसंगी खा-हरिश्चंद्र चव्हाण सदर जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. 'भाजयुमो'चे तालुकाध्यक्ष हेमंत रावले यांनी उपक्रमांची माहिती दिली.

माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, संघटनमंत्री बापूसाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आदिवासी आघाडीप्रमुख एन. डी. गावीत कळवण भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, रमेश रावले, नंदकुमार खैरनार, गोविंद कोठावदे, निंबा पगार, संगीता आहेर, दीपक खैरनार, डॉ. अनिल महाजन, डॉ. भामरे, सचिन सोनवणे, दीपक वेढणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच टन लाकूड जप्त

$
0
0

मालेगावी विशेष पोलिस पथकाची कारवाई; वनविभाग सुस्त

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव वनपरिक्षेत्रातून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा टेम्पो येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पोलिस पथकाने सोमवारी पकडला. मालेगाव वनपरिक्षेत्रातून अवैध वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी सातत्याने सामाजिक संस्थाकडून होत होत्या. मात्र विनविभागाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. अखेर सोमवारी विशेष पोलिस पथकाने केलेल्या कारवाईत अवैध वृक्षतोडीतील सुमारे पाच टन लाकूड जप्त करण्यात आले आहे.

सोमवारी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी टेम्पो (एमएच १९ ३८५१)मधून अवैध वृक्षतोडीतील लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली होती. दरम्यान विशेष पोलिस पथकाचे उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व त्यांच्या पथकाने शहरातील साठफुटी रोडवर आयडीबीआय बँकसमोर पेट्रोलिंग करीत असताना टेम्पो पकडला. यातील आरोपी सलमान मोहम्मद जाबीर मोहम्मद (वय २४, रा. मिल्लत मदरसा जवळ मालेगाव), साजिद अहमद शेख अमीर (वय ३७, रा. गुलाब पार्क मालेगाव) व लाकूड मालक शेख अनिस शेख नूर (वय ३३, रा. रोशनाबाद) या तिघांकडे चौकशी केली असता कोणत्याही परवानगीचे कागदपत्रे आढळून आली नाहीत. यावरून पोलिस पथकास वाहतूक केले जाणारे लाकूड अवैध वृक्षतोड करून नेले जात असल्याचा संशय बळावला.

पोलिस पथकाने या टेम्पोसह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अवैधरित्या विनापरवाना निंबाचे ओले कापलेले अंदाजे ४ ते ५ टन लाकूड जप्त करण्यात आले. तीनही आरोपींना व टेम्पोपुढील कारवाईसाठी मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या कारवाईत चव्हाण यांच्यासह देवीदास निकम, नितेश खैरनार, नवनाथ सूर्यवंशी, अभिजित साबळे, दिनेश शेरावते यांचा सहभाग होता.

वनविभाग करते काय?

५ जून पर्यावरण दिन साजरा झाला. तसेच वनविभागाकडून कोटी-कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. असे असताना दुसरीकडे मात्र मालेगाव वनपरिक्षेत्रातून होणाऱ्या अवैध वृक्षतोड व वाहतुकीकडे वनविभागाचे लक्ष जात नाही का? असा प्रश्न आता वृक्षप्रेमी नागरिक व सामाजिक संस्था विचारीत आहेत. 'आम्ही मालेगावकर' संघटनेच्या वतीने गेल्याच महिन्यात याबाबत लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी अवैध वृक्षतोड व वाहतूक थांबवण्यासाठी वनविभागाकडून फिरते पथक नेमण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. तर या पथकांचे काय झाले? त्यांच्या नजरेतून बेकायदा लाकूड वाहतूक सुटते कशी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुहास शिंदेनी स्वीकारला पदभार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखाधिकारीपदाचा चार्ज सोमवारी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांनी स्वीकारला. विद्यमान लेखाधिकारी सुभाष भोर यांची मुंबईत उपसंचालक पदावर बदली झाली असून, सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार सोडला. त्यामुळे शिंदेंनी नाशिक मनपाचा पदभार घेतल्यानंतर कामकाजाला सुरुवात केली आहे. सोमवारी आयुक्तांच्या आठवडे बैठकीत उपस्थित राहून कामही सुरू केले आहे. त्यामुळे मुंढे यांना आता थेट तिजोरीवरही वॉच ठेवता येणार आहे.

महापालिकेतील सध्याच्या वातावरणाला कंटाळून सुभाष भोर यांनी राज्य सरकारकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता. महापालिकेत सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाया आणि पदाधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्यांनी महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम सरकारनेही त्यांची विनंती मान्य केली नव्हती. परंतु, नाशिक महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी हे पद उपसंचालक दर्जाचे केले होते. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांची नाशिक महापालिकेत बदली केली होती. परंतु, भोर यांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ४ जून रोजी त्यांच्या बदलीचेही आदेश प्राप्त झाले आहेत. भोर यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची उपसंचालक, (प्रशासन) लेखा व कोषागारे संचालनाय, मुंबई या पदावर बदली केली होती.

तांत्रिक अडचण

भोर यांच्या बदलीमुळे सुहास शिंदे यांचा महापालिकेतील उपसंचालक लेखापदाचा भार घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, शिंदे यांचे पद मुख्य लेखाधिकारी असले तरी, नाशिक महापालिकेतील लेखा विभागातील प्रमुख पद आता उपसंचालक दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शिंदेंना पदभार घेण्यास अडचण होती. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी त्यांना महापालिकेत मुख्य लेखाधिकारी पदावर रुजू करून घेतले आहे. भोर यांना निरोप देण्यात आला. त्यामुळे महापालिकेत आता मुंढेंच्या मदतीला शिंदे धावून आले असून त्यांनी सोमवारपासून कामकाजालाही सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन

$
0
0

शिवसेना आक्रमक; मनमाडमध्ये अघोषित लोडशेडिंग

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेच्या समस्या डोके वर काढत आहेत. त्यातच आता पावसाळा सुरू असल्यामुळे दिवसातून अनेकदा वीज गायब होते. त्यामुळे शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विद्युत महामंडळाचे वरिष्ठ अभियंतांसोबत बैठक घेऊन वीजमंडळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले. विजेच्या प्रश्नांवर लवकर उपाययोजना आखली नाही तर शिवसेनेकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मनमाड शहरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून वीजमंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे सांगत शहर शिवसेना शिष्टमंडळाने विद्युत मंडळाच्या अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बैठक घेतली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीजमंडळाला तक्रारी निवारण्यासाठी अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. या बैठकीत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकारी डोंगरे, जाधव, शिंदे यांनी खंडित पुरवठ्याबाबत दिलगीरी व्यक्त केल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या पाच दिवसात वीजपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शिवसेना मनमाड शहरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला, असे शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी सांगितले. शहरातील विविध भागात येत असलेल्या वीज पुरवठांबाबतच्या अडचणी, नवीन ट्रान्सफार्मर बसवणे, बंद असलेली विवेकानंद नगर, हनुमान नगर तसेच शहरातील वायरिंग काढणे, धोकादायक पोल शिफ्टिंग व नवीन मीटर तक्रारीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या शिष्टमंडळात शिवसेना मनमाड शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक कैलास गवळी, उपप्रमुख जाफर मिर्झा, प्रवीण धाकराव, अनिल दराडे, ग्राहक संरक्षण कक्ष शहराध्यक्ष योगेश इमले, शहर संघटक नीलेश ताठे, महेंद्र गरुड, मिलिंद पाथरकर, युवा सेना शहर सचिव स्वराज देशमुख, प्रफुल्ल चिंधे आदी उपस्थित होते.

वायरमनचे नंबर प्रसिद्ध करणार

प्रत्येक विभागात सेवेत असलेल्या वायरमन यांचे नाव नंबर प्रसिद्ध करण्याचे सांगण्यात आले. तसेच सर्वबाबींत तक्रारींचे लेखी उत्तरही वीजमहामंडळ शहर शिष्टमंडळास देणार असल्याचे ठरविण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता डोंगरे, सहाय्यक अभियंता जाधव, शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी रोडला भरदिवसा दीड लाखांची घरफोडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील कलानगर भागात भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार हिरामण कातकाडे (रा. यमुना व्हिला, विडीकामगारनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कातकाडे यांची मेव्हणी रविवारी (दि. १०) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी संधी साधली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कलानगर येथील गोकुळधाम सोसायटीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. यानंतर, बेडरूममधील कपाटातून २० हजाराची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ४० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

महिलेची पर्स लंपास

अधिक मासातील एकादशीनिमित्त गोदाघाटावरील सांडवादेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. १०) घडली असून, पर्समध्ये रोकडसह दागिने असा सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना दिलीप रामधरणे (रा. लेक होमस, पवर्ई) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. एकादशीनिमित्त रविवारी रामधरणे या देवदर्शनासाठी शहरात आल्या होत्या. गोदाघाटावरील सांडवादेवी मंदिरात त्या देवदर्शनासाठी पोहचल्यानंतर मंदिरातील गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्याची पर्स चोरून नेली. पर्समध्ये १५ हजाराची रोकड आणि सोन्याचे गंठण असा ३५ हजाराचा मुद्देमाल होता. घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

कारखान्यातून लाखाची चोरी

कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपयांची वेगवेगळी यंत्रे पळवून नेली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही घटना शनिवारी (दि. ९) घडली.

योगेश चंद्रकांत हिरे (रा. त्र्यंबक रोड) यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दिली. अंबड एमआयडीसीतील साईनाथ इंडस्ट्रीअल सोसायटीत हिरे यांचा क्लॅरिऑन इंजिनिअर्स अ‍ॅण्ड टेक एलएलपी नावाची कंपनी आहे. शनिवारी कंपनी बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कंपनीचे शटर वाकवून आत प्रवेश केला. तसेच वेल्डींग मशिन, पाइप कटर मशिन, मिक्सर मशिन प्लेट, अन्य अवजारे असा सुमारे एक लाख सात हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय शिक्षण मंडळाची १३ जूनपासून बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय शिक्षण मंडळाच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व सर्वसाधारण सभा १३ ते १७ जूनदरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. १३ व १४ जून रोजी सर्व विस्तारकांचा वर्ग आहे. बैठकीत विस्तारकांना भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्री मुकुल कानिटकर उद्बोधन करणार आहेत, तर १५ जून रोजी डॉ. अनिरुद्ध देशपांडे, धर्मनारायण अवस्थी, डॉ. विश्वेश्वरम, डॉ. सच्चिदानंद जोशी, सुशीला, डॉ. पूरकायस्थ, डॉ. वामनराव गोगटे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या चिंतन बैठकीत आंतरराष्ट्रीय गुरुकुल संमेलन २०१८ चे वृत्त, प्रकल्प व प्रकोष्ठ अभ्यास वर्ग, विस्तारक योजना, आगामी नियोजनाबाबत मार्गदर्शन करतील. १६ व १७ जून रोजी सर्वसाधारण सभेस सुवर्ण जयंती प्रांत योजना, राष्ट्रीय अधिवेशन, आंतरराष्ट्रीय संगोष्ठी २०१९, सदस्यता अभियान, प्रांतीय व क्षेत्रीय अभ्यासवर्ग आदी बाबींवर विचारविनिमय होणार आहे. हे सर्व कार्यक्रम प्रांताचे अध्यक्ष महेश दाबक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील १३ जुगारी थेट तडीपार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जुगार खेळताना वारंवार पोलिसांच्या हाती लागलेल्या संशयितांची कुंडली तयार करून त्यातील १३ जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले असून, यामुळे अवैध धंदे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार काहीच फरक पडत नसल्याचा जुगाऱ्यांचा गैरसमजदेखील पोलिसांच्या कारवाईमुळे दूर होण्यास हातभार लागला आहे.

सलीम पठाण (वय ४७, भद्रकाली) धर्मराज सोनवणे (३५, रा. गंगापूर), अशोक उर्फ सुभाष महाले (४०, फुलेनगर), अहमद खान (२८, मुलतानपुरा), किशोर आहेर (३७, खडकाळी), उत्तम वाघ (५०, बागवानपुरा), भारत भडांगे (३२, सातपूर), परशराम आव्हाड (३३, जुने नाशिक), रियाज शेख (३२, खडकाळी), मच्छिंद्र खांबेकर (४५, बुधवारपेठ), सचिन इंगोले (२०, जुने नाशिक), अजीज शेख (४२, जुने नाशिक), विष्णू आदमाने (२५, निलगिरी बाग) अशी या तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत. या सर्वांना शहर, तसेच जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

२०१५ ते २०१८ या तीन वर्षांत या संशयितांना जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार तब्बल १४ वेळा अटक करण्यात आली. याबाबत परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की तडीपारीची कारवाई शक्यतो शरीराविरुद्धचे, तसेच मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये केली जाते. मात्र, जुगारसारख्या प्रतिबंधक कारवाईमध्ये अटक केल्यानंतर जामीन मिळाल्यामुळे संशयितांचे फावते. सतत कारवाई केल्याचा परिणाम यामुळे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी तडीपारी करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांतील दाखल गुन्ह्यांचा अभ्यास केला असता, या टोळीवर सर्वाधिक म्हणजे १४ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तडीपारीचा कालावधी सहा महिने ठेवण्यात आला आहे. बहुतांश जुगारी कफल्लक असतात. दिवस-रात्र जुगार खेळणे, पैशांसाठी घरातील साहित्यांची विक्री करणे, यासाठी मुलांबाळांना मारहाण करणे, यानंतरही पैसे उपलब्ध झाले नाहीत तर छोट्या-मोठ्या चोऱ्या करणे असे प्रकार यातून घडतात. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे जुगाऱ्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अवैध धंदेचालकांसह त्यात सहभागी होणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दीड वर्षात ८० तडीपार

शहर पोलिसांनी २०१७ मध्ये २३, तर २०१८ मध्ये आतापर्यंत ५७ अशा एकूण ८० जणांना शहरासह जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आणखी नऊ सरायितांवर तडीपारीची चौकशीप्रक्रिया सुरू असून, त्यांच्या विरोधात लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. यात वरील १३ जणांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारिद्र्याचे ‘प्रदर्शन’

$
0
0

विनयनगर परिसर

दारिद्र्याचे 'प्रदर्शन'

विनयनगर-वडाळा-पाथर्डीरोड, शिवाजीनगर येथे भररस्त्यात दारिद्र्याचे असे 'प्रदर्शन' मांडले गेल्याचे दिसते. असे करणारे शहराच्या सौंदर्याचा कधी विचार करणार? काही निष्काळजी व्यक्तींच्या अशा कृत्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होते. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यासाठी वेळ काढणार का?

-हेमंत साळी

इंदिरानगर

चिवट झाडे लावावीत

इंदिरानगर परिसरात गणराज कॉलनी येथे गुलमोहराचे झाड कारवर कोसळल्याने कारचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परंतु, या पार्श्वभूमीवर सांगावेसे वाटते, की वड, पिंपळ, औदुंबर अशी चिवट असलेली झाडे अशा वादळात टिकाव धरतात. सुबाभूळ, नीलगिरी, गुलमोहराऐवजी त्यांना प्राधान्य द्यावे.

-विदुला अष्टेकर

शहर परिसर

कायदे सगळ्यांसाठी

झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबणे हा नियम सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आहे. पण, एसटीसारखे सरकारी वाहन चालविणारे कर्मचारीच हा नियम धाब्यावर बसवून बस झेब्रा क्रॉसिंगवरच बस थांबविताना थांबवतात. अशा कर्मचाऱ्यांना समज दिली पाहिजे, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल.

-मनोहर पवार

एबीबी सर्कल

दुरुस्तीने रस्त्याची दैना

एबीबी सर्कल परिसरात गेल्या वर्षभरापासून कुठले ना कुठले काम सुरू असते. त्यामुळे येथील रस्त्याची फारच वाईट अवस्था आहे. जेथे रस्ता खोदला तो व्यवस्थितही केलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांस परिसरातील नागरिकांना नाहक गैरसोय सहन करावी लागते. महापालिकेने याची दखल घ्यावी.

-वर्षा साळुंके

कॉलेजरोड

रस्त्यातील वाहनांमुळे कोंडी

कॉलेजरोडवर मॉडेल कॉलनी सर्कलच्या ठिकाणी रस्त्यातच वाहने उभी केली जातात. त्यामुळे सायंकाळी या सर्कलच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. असा प्रकार वारंवार घडताना दिसतो. मात्र, तरीदेखील याबाबत उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात दखल घ्यावी.

-वाल्मीक पाटील

उंटवाडी परिसर

दुभाजक का नाहीत?

उंटवाडीकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाताना खेतवाणी लॉन्ससमोर दुभाजकच नाहीत. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात. असे अर्धवट दुभाजक का सोडण्यात आले आहेत? या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, अधिकारीवर्गाचा कायमच वावर असतो, त्यांच्याही लक्षात ही बाब येत नाही का? याबाबत उपाययोजना करावी.

-रत्नाकर गायकवाड

---

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कँटीन, स्वयंपाकगृहात स्वच्छता राखा

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या कँटीनमध्ये जे अन्नपदार्थ दिले जातात, ते आरोग्यवर्धक असावेत, तसेच वसतिगृहांमधील स्वयंपाकगृहांची स्वच्छता काटेकोरपणे पाळली जावी. ही कॉलेज प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, कॉलेज परिसरातील कँटीन आणि स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे सर्व महाविद्यालयांना १५ जूनपर्यंत कॅम्पसमधील कँटीन आणि स्वयंपाकगृहाच्या दर्जाबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाकडे पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे.

नवे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. अनेक महाविद्यालयांच्या कँटीनमध्ये अस्वच्छता असते, तसेच तेथील अन्नपदार्थ आरोग्यास घातक असतात. याबाबतच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विकास मंडळाकडे केल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात या तक्रारी पुन्हा येऊ नयेत म्हणून कॉलेज कँटीन व वसतिगृहातील स्वयंपाकगृह स्वच्छ ठेवावे. आरोग्यवर्धक अन्नपदार्थांचीच विक्री करावी, याकडे महाविद्यालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचना विद्यार्थी विकास मंडळाने केली आहे.

विद्यापीठाच्या या सूचना

- महाविद्यालयांमधील कँटीन व वसतिगृहांमधील स्वयंपाकगृह स्वच्छ असावे.

- अन्नपदार्थ आरोग्यवर्धक असावेत

- पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध असावे

- स्वयंपाकगृहांत निर्जंतुकीकरण केलेले असावे

- सर्व बाबींची कायम तपासणी व्हावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लॅक स्पॉट’ ओसंडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील बहुतेक प्रभागांत घंटागाडी वेळेवर येत नसल्याने ब्लॅक स्पॉटसह ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. कचरा साचलेल्या भागाला बकालपणाचे स्वरूप आले असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीही पसरली आहे. संबंधित यंत्रणांचा कानाडोळा या प्रकाराला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, याप्रश्नी उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

परिसरातील विशाल मॉल, मराठा कॉलनी, मशीदरोड, वास्को चौक, चेहेडी पंपिंग स्टेशन, हनुमान चौक, भगवा चौक, देवळालीगावातील वडारवाडी, गुलाबवाडी, देवळालीगाव राजवाडा, रेजिमेंटल प्लाझा, सिन्नर फाटा स्टेशनवाडी या भागात ठिकठिकाणी कचरा साचून राहत आहे. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने या भागातील कचरा दिवसभर पडून असतो. यातील बहुतांश कचरा वाऱ्याने इतस्ततः उडाल्याने आजूबाजूच्या रस्त्यांवर कचरा पसरत आहे. शहरातील काही भागातील नागरिकांसह बाजारपेठांतील दुकानदारांकडूनही चौकांत उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे असल्याने अशा भागात स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

--

डस्ट बिनची दुर्दशा

कचरा संकलनासाठी काही ब्लॅक स्पॉटवर महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने डस्ट बिन ठेवलेले आहेत. मात्र, या महागड्या डस्ट बिनची अवघ्या काही महिन्यांतच दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणच्या डस्ट बिनची तूटफूट झाली आहे, तर काही ठिकाणचे डस्ट बिन गायबही झालेले आहेत. परिणामी कचरा उघड्यावरच पडून राहत आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने असलेल्या डस्ट बिनची कचरा संकलनाची क्षमता अत्यंत तोकडी ठरली आहे. परिणामी उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

--

पथदीप बंद, हायमास्ट अहोरात्र!

नाशिकरोड : शहरातील सर्वच प्रभागांतील बहुतांक पथदीप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याची ओरड एकीकडे नगरसेवकांकडून होत असली, तरी दुसरीकडे सिन्नर फाटा येथील एकलहरे टी पॉइंटवरील हाय मास्ट दिवसाही सुरूच असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे. नाशिकरोड प्रभागातील चेहेडी पंपिंग स्टेशन, गोरेवाडी, आनंदनगर, गुलाबवाडी, बागुलनगर, विहितगाव, वडनेर गाव, एकलहरेरोड, सामनगावरोड, चाडेगाव, चेहेडी, उड्डाणपूल, जय भवानीरोड, जेलरोडवरील दसक, पंचक, शिवाजीनगर, कॅनॉलरोड, जुना सायखेडारोड, पवारवाडी, आम्रपाली झोपडपट्टी, रोकडोबावाडी, सुंदरनगर या भागातील बहुतांश पथदीप महिनोनमहिने बंद असतात. या ठिकाणचे बंद पथदीप दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक व नागरिकांकडून महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे वारंवार केली जाते. मात्र, या समस्येकडे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असतात. या प्रश्नावर प्रभाग समितीच्या सभेत वारंवार खडाजंगी होत असते. मात्र, तरीही या प्रश्नाकडे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. आता तर आहे ते पथदीप दिवसा बंद करण्याकडेही महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे सिन्नर फाटा येथील हाय मास्ट सुरूच राहत असल्याच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापकांचीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी सांगण्यासाठी संकोच वाटू नये, यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याची व्यवस्था करणे गरजेचे असून, शाळेत कोणतीही अनधिकृत व्यक्ती परवानगीशिवाय बसणार नाही, मुलांचा ताबा त्यांच्या पालकांकडेच देणे यासह विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक जबाबदारी मुख्याध्यापकांनी घेणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.

शिक्षणाच्या मंदिरातच विद्यार्थ्यांना अत्याचाराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेसाठी व इतर महत्त्वाच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने मुख्याध्यापक, शिक्षकांना आपल्या जबाबदारीची जाणीवही यावेळी करून दिली. येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने त्यापूर्वी ही सभा घेण्यात आली. रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी ही सभा झाली.

शिक्षणाधिकारी बच्छाव म्हणाले, की नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापकांशी संबंधित नियमांमध्ये बदल जाणून घेणे शाळेत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. वाहनचालकांना शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांची माहिती, त्यांच्याकडील कागदांची पडताळणी करावी, तसेच पालकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. याशिवाय सेवाज्येष्ठता यादी, वेतनेतर अनुदान, शाळा स्तरावरील वार्षिक नियोजन, शालेय पोषण आहार, नववीची पुनर्परीक्षा, समायोजन, इन्स्पायर अॅवॉर्ड आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

शहरातील मुख्याध्यापकांबरोबरच सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, त्र्यंबक, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक तालुका येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. अनिल शहारे, के. डी. मोरे, उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी रूपाली पाटील, मनीषा पिंगळकर, बी. एम. कळंबे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोई समाजाचे जलआंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भोई समाजाला अनुसूचित जाती-जमातीत समावेश होण्याबाबत, तसेच गोड्या पाण्यातील मासेमारी ठेकेदारी रद्द करण्याबाबत सोमवारी (दि. ११) गोदावरीत जल आंदोलन करण्यात आले. आमदार सीमा हिरे यांना आंदोलकांनी निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची गळ घातली. भोई समाजाच्या मागण्या विधानसभेत मांडणार असल्याचे हिरे म्हणाल्या.

आंदोलकांनी सकाळी दोन तास पाण्यात उभे राहून मागण्यांबाबत घोषणा दिल्या. राष्ट्रीय भोई समाज युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश उखंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुजाता फुलपगारे, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नीलेश वाडिले, जिल्हाध्यक्ष राजेश मोरे, महिला मंचच्या अध्यक्षा धनश्री ढोले आदींसह भोई समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जल आंदोलन केले. महाराष्ट्रात ६० लाखांहून अधिक, तर संपूर्ण भारतात साडेचार कोटींहून अधिक भोई समाज आहे. त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तसेच त्यांची शैक्षणिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पूर्वी हा समाज राजेरजवाड्यांच्या पालख्या उचलण्याचे काम करायचा, तो आता मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. सरकार लिलाव पद्धत परवाना पत्र अशा अनेक अडचणी घालून समाजाला डावलण्याचा प्रयत्न करीत आहे. छोट्या नदी-नाल्यांत जो भोई समाज मासेमारी करतो अशा ठिकाणी लिलाव व परवाना पद्धत रद्द करून भोई बांधवांना न्याय द्यावा.

या आहेत मागण्या

श्रीमंत ठेकेदारांना तलाव जलाशय ठेका देणे बंद करा व नीलकांती योजनेचे १२ कोटी १७ लाख पैकी ९ कोटी ४७ लाख हे पिंजरा पद्धती व खाद्य कारखाना यावरील नियोजित रक्कम रद्द करा, गरिबांसाठी आलेली सबसिडीची रक्कम आहे ती घेऊ जाळे, होड्या, मत्स्यबीज संवर्धन, तळी, यावर खर्च करा, तसेच भूमिहिनांना पडिक जमिनी, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण व कर्ज मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. शासनाकडून भोई समाजाची वारंवार पिळवणूक झाली आहे. समाजाला अनुसूचित जाती-जमातीत प्रवेश द्यावा, अतिक्रमण हटवा पण आमच्या समाजाला उदरनिर्वाह करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, आदी मागण्या मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार संघटनेच्या दहशतीविरोधात एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये नवीन उद्योग व गुंतवणूक यावी व रोजगार वाढावा यासाठी मेक इन नाशिक, मॅग्नेटिक महाराष्ट्र, आयमा इंडेक्स, निमा इंडेक्स यांसारख्या विविध उपक्रमांतून नाशिकचा विकास होण्यासाठी प्रयत्न सुरू असताना कामगार संघटनांचे सहकार्य मिळण्याऐवजी त्यांच्याकडून मारहाण, दहशत, मोर्चे, युनियनबाजी यामुळे उद्योगांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविले जात आहे. त्यामुळे नाशिकचे नाव खराब होण्याची जास्त शक्यता असल्याचे सांगत नाशिकच्या सर्व औद्योगिक संघटनांनी एकत्र येत 'आयमा'च्या हॉलमध्ये बैठक घेतली. बैठकीत पार्किंग शेड, औद्योगिक वसाहतीमधील घरपट्टी या विषयावरही चर्चा झाली.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक प्रश्न सोडविण्यासाठी 'आयमा'चे नूतन अध्यक्ष वरुण तलवार यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नाइस व निवेकचे पदाधिकारी, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन या वेळी उपस्थित होते.

समन्वय समिती स्थापनेवर भर

बैठकीत उद्योग क्षेत्र व कामगार युनियन यांच्यात समन्वय साधता यावा याकरिता औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, कामगार उपायुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी व पोलिस आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन समन्वय समितीची स्थापना करावी व औद्योगिक प्रश्न सोडवावेत. यासाठी नियमित दरमहा बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा व औद्योगिक शांतता ठेवून शहराचा विकास घडवून आणावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पार्किंग शेडवरही चर्चा

बैठकीत औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीकडून होत असलेल्या पार्किंग शेड व मोजमाप करण्याबाबत एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवला जाईल, तसेच महापालिकेकडून घरपट्टी आकारण्यासाठी होत असलेल्या मोजमापाविषयी महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली जाईल व संबंधित प्रश्न सोडविले जातील. बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले, की राज्य पातळीवरचे प्रश्न महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना भेटून सोडविले जातील.

दर सोमवारी बैठक

औद्योगिक प्रश्न सोडवण्यासाठी सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी बैठक घेण्यात येणार असल्याचे 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार यांनी सांगितले. बैठकीत निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, 'आयमा'चे माजी अध्यक्ष जे. एम. पवार, धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, राजेंद्र अहिरे, योगिता आहेर, राजेंद्र पानसरे, श्रीकांत बच्छाव, संजीव नारंग, मनीष कोठारी, संजय महाजन आदी उपस्थित होत. 'आयमा'चे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे गुणवंतांचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना शालेय वस्तूवाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी सत्कार झाला. जेलरोडच्या कुलथे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी आमदार बाळासाहेब सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.

वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, त्यांना विमा संरक्षणाचा लाभ देऊ, नाशिकरोडला आमदार निधीतून बांधलेल्या हॉलचे हस्तांतरण करू, वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापनेचा विषय मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार सानप यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सरचिटणीस बालाजी पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, वर्धा वृत्तपत्र विक्रेता बचतगटाचे अध्यक्ष नरेश शेवडे, नांदेड संघटनेचे सल्लागार चंद्रकात घाटोळ, विभागीय संघटक रवींद्र कुलकर्णी, 'महाराष्ट्र टाइम्स'चे वितरण अधिकारी हेमंत वाल्हे, 'दिव्य मराठी'चे महाव्यवस्थापक रवींद्र मंडलिक, 'पुढारी'चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक संजय जोरे, 'लोकमत'चे वितरण अधिकारी कैलास बडगजुर, 'सामना'चे आर. आर. पाटील, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, सातपूर संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर उपस्थित होते.

सुनील मगर यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष महेश कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार वसंत घोडे, कार्याध्यक्ष अनिल कुलथे, प्रसिद्धीप्रमुख भारत माळवे, सदस्य रवींद्र सोनवणे, योगेश भट, हर्षल ठोसर, उत्तम गांगुर्डे, संदीप परसे, उल्हास कुलथे, जितेंद्र भोसले, बाळासाहेब चंद्रमोरे, सतीश आहेर आदींनी संयोजन केले.

यावेळी लकी ड्रॉमध्ये मंगला सोनवणे, ज्योती कुलथे, वैशाली सोनवणे, सौ. वाडेकर यांना पैठणी मिळाली. प्रतिभा कुलथे, ठोसर, मेघा मगर, म्हस्के, कळमकर यांनीही बक्षिसे जिंकली. आंतरराष्ट्रीय कराटेपटू वैष्णवी जगदाळे, आंतरराष्ट्रीय धावपटू तानाजी भोर, बारावीत ९३ टक्के मिळवणारा राजेश कुलकर्णी, दहावीत ९३ टक्के मिळवणारी साक्षी जाधव आदींसह शंभरावर गुणवंतांचा सत्कार झाला. किशोर सोनवणे, बाळू माळी, संजय चव्हाण, संतोष गवळी, ज्ञानेश्वर गवळी, सोमनाथ माळवे, दीपक डहाळे, संदीप डहाळे, मनोहर खोले, संदीप कळमकर, प्रताप गांगुर्डे, विजय रोकडे, अशोक हुडे, विजय गवारे, कैलास म्हस्के, चंद्रकांत नागरे, नारायण नागरे, मधू सोनार, किरण ठोसर, सचिन शहाणे, बाळासाहेब ओहळ, सुभाष आडभाई यांनी सहकार्य केले. दिवंगत वृतपत्र विक्रेते गणेश मांडे, वृत्तपत्र विक्रेते सतीश आहेर यांच्या मातोश्री रुक्मिणी आहेर यांना आदरांजली वाहण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीडबॉल मेकिंग कार्यशाळेस प्रतिसाद

$
0
0

(पेज फोटोशेजारी वापरणे.)

सीडबॉल बनविणे कार्यशाळेस प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव येथे सोमवारी झालेल्या सीडबॉल मेकिंग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वृक्षारोपण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सीडबॉल ही पद्धत वापरून पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेऊन विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त पर्यावरण संवर्धन जनआंदोलन समिती व श्री साई कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आडगावतर्फेआडगाव येथे उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांकडून सीडबॉल तयार करवून घेतले. त्यांचे रोपण कशा प्रकारे करायचे याची माहिती देण्यात आली. त्यात प्रामुख्याने गडकोट, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे आदी ठिकाणी जाऊन प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली कारखान्यांकडून हवेत काय आणि किती प्रमाणात कोणते वायू सोडले जात आहेत. याचे नियंत्रण असूनही नसल्यासारखे आहे. त्यातूनच आग, स्फोट आणि त्यातून बाहेर पडणारे अतिविषारी वायूचे साम्राज्य वाढले आहे. जंगले नष्ट होऊन जमिनीची धूप होतेय. माती निघून गेली आणि सर्व डोंगर बोडके होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून जंगले कशी वाढवता येतील आणि टिकवता येतील, याचा ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यावरणाचा ध्यास घेऊन सीडबॉलची ठिकठिकाणी पेरणी करण्याचे काम या माध्यमातून होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

०००

(स्वतंत्र सिंगल)

बेटी बचाव जागृती रॅलीसंदर्भात बैठक

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशनतर्फे शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या सहभागातून पंचवटीतून बेटी बचाव जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसंदर्भात सोमवारी गीतांजली सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम थविल, सरचिटणीस डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.

लिंगभेद चाचणी व स्त्रीभ्रूणहत्या या बेकायदेशीर व मानवी नीतिमूल्यांविरुद्ध असणाऱ्या कृत्यांविरोधात जनजागृती निर्माण व्हावी, हा बेटी बचाव रॅलीचा उद्देश असल्याचे डॉ. थविल यांनी सांगितले. डॉ. चारुदत्त कुलकर्णी म्हणाले, की दि. २५ जून रोजी पंचवटीतून ही रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत काढण्यात येईल. रॅलीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वृक्षारोपणाचा संदेश सर्वदूर पसरावा म्हणून औपचारिकतेला फाटा देऊन येणाऱ्या पाहुण्यांना भेट म्हणून रोपे वाटप करण्यात येणार आहेत. या बैठकीस सुनील परदेशी, ज्योती लांडगे, सुवर्णा कोठावदे, चिंतामण उगलमुगले, मंगेश घुगे आदी उपस्थित होते.

०००

(थोडक्यात)

नाशिकरोड बसस्थानकात दोन दिवसांनंतर गजबज

जेलरोड : एसटी कर्मचार्‍यांनी मागण्यांसाठी सुरू केलेला संप दोन दिवसांनी मागे घेण्यात आला. त्यामुळे नाशिकरोड बस स्थानकात पुन्हा गजबज वाढली आहे. सध्या सुटी संपत आल्याने एसटीला गर्दी होत आहे. या स्थानकातून पुणे, नगरसह लांबच्या पल्ल्याच्या एसटी बस धावतात, तसेच विहितगाव, शिंदे, पळसे, देवळाली कॅम्प, पंचवटी, सिडको, सातपूर आदी ठिकाणी शहर बस सुटतात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी असते. स्थानकातून दररोज पाचशे बसफेऱ्या होतात व सुमारे चाळीस हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, संपामुळे स्थानक ओस पडले होते.

देवळालीत इफ्तार पार्टी (फोटो)

जेलरोड : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त देवळालीगाव येथे मोहम्मदिया सोशल ग्रुप, गणेश मित्रमंडळ आणि

नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यातर्फे इफ्तार पार्टी झाली. यावेळी नगरसेवक रमेश धोंगडे, राजू लवटे, श्याम खोले, मनोहर कोरडे, शिवा ताकाटे, उत्तम कोठुळे, अरुण महानुभव, योगेश शिंदे, विकास गाडेकर, ईस्माइल हाजी, रफिक शेख, एजाज शेख, अश्फाफ शेख, जावेद पटेल, अमजद शेख आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

महाराणा प्रताप जयंती

पंचवटी : महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (दि. १६) विविध कार्यक्रम होणार आहेत. शहरातील मोरवाडी, त्रिमूर्ती चौक, मुंबई नाका, द्वारका, वडाळा नाका, पिंपळ चौक, फुलेनगर आदी भागात महाराणा प्रताप यांचे प्रतिमापूजन, मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता बी. डी. भालेकर मैदान येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. समाजातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मातांचा सत्कार (फोटो)

जेलरोड : बिटको रुग्णालयात कन्यारत्न झालेल्या मातांचा नाशिकरोड येथील शिखर स्वामिनी बहुद्देशीय महिला संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा नगरसेविका संगीता गायकवाड, आरती आहिरे, कांचन चव्हाण, मनीषा गायकवाड आदींच्या हस्ते या मातांचा पेढे व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. बेटी बचाव अभियानातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बिटकोचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. २५ जूनला नाशिक डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने बेटी बचाओ जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

साने गुरुजींना अभिवादन (फोटो)

जेलरोड : साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नाशिकरोड येथील साने गुरुजी प्रसारक मंडळाच्या के. जे. मेहता हायस्कूलमध्ये आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, मनविसेचे प्रदेश सदस्य उमेश भोई, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चौधरी, नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, उपाध्यक्ष सागर दाणी, भाऊसाहेब ठाकरे, स्वप्निल विभांडिक, मयूर कटारे, गुड्डू शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलास मारहाण प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

$
0
0

मुलास मारहाण;

ठेकेदाराला नोटीस

सिडको : उत्तमनगर परिसरातील लहान मुलाला मारहाण करणाऱ्या घंटागाडी चालकाची बदली करण्याबरोबरच संबंधित ठेकेदाराला महापालिकेतर्फे नोटीस दिली असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. सिडको परिसरातील घंटागाडीचा ठेका हा वादग्रस्तच ठरला आहे. घंटागाडी अनियमितपणे येण्याबरोबरच घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांबद्दल अनेक तक्रारी होत होत्या. महापालिका ठेकेदारावर नोटीस देवून कारवाई करीत असली तरी प्रत्यक्षात याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. रविवारी उत्तमनगर परिसरातील घंटागाडी चालकाने मद्यधुंद अवस्थेत अविनाश पाटील या लहान मुलास मारहाण केली हेाती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीबाबतचा दावा बेकायदेशीर

$
0
0

धुळे मनपाचा झोटे प्रकरणात खुलासा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तत्कालीन धुळे नगरपालिकेतील १९८९ मधील मागासवर्गीय सरळसेवा भरतीची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी सेवेतून कमी केलेले कर्मचारी बबन यशवंत झोटे यांनी सोमवारी (दि. ११) सकाळी मुंबई येथे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावर धुळे महापालिका प्रशासनाने तातडीने नगरविकास विभागाच्या उपसचिवांना खुलासा सादर करीत झोटे यांनी केलेला दावा बेकायदेशीर ठरविण्यात आला आहे.

बबन झोटे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकारानंतर मंत्रालयाकडून धुळे मनपाकडे या प्रकरणी विचारणा करण्यात आली. तसेच वस्तूनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सूचनेवरून उपायुक्त रवींद्र जाधव, उपायुक्त शांताराम गोसावी यांनी तातडीने अहवाल तयार करून सरकारकडे पाठविला आहे. त्यानुसार, झोटे व इतर दोघांनी सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मागणी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आहे, असेही नगरविकास विभागाच्या उपसचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी बबन यशवंत झोटे यांच्यासह निर्मला गुलाब अहिरे, लक्ष्मी फत्तेसिंग वसावे यांचा सन २००१ पासून पाठपुरावा सुरू आहे. सन १९८९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केलेली मागासवर्गीय सरळसेवा भरती बेकायदेशीर आहे. आस्थापना विभागातील विस्कळीत कारभाराला एन. पी. सोनार हे जबाबदार असून, याबाबत १ महिन्यात सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी व चौकशी न लागल्यास मंत्रालयाच्या कोणत्याही गेटसमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा झोटे यांच्यासह तिघा कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. याबाबत दि. ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने नैराश्यातून झोटे यांनी सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. झोटे यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असे आहे प्रकरणातील टप्पे...

तत्कालीन नगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील मागासवर्गीय अनुशेष पूर्ण करण्यासाठी बबन झोटे, निर्मला अहिरे, लक्ष्मी वसावे यांच्यासह इतर ३३ कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती केली. या भरतीला शासनाची मंजुरी मिळेल, या अपेक्षेने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपाची नियुक्ती दिली.

यासंदर्भात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. ही याचिका १९९६ मध्ये औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग झाली होती. या याचिकेवर दि. २४ जुलै २००२ मध्ये न्यायालयाने निर्णय देत तत्कालीन नगराध्यक्षांनी कर्मचारी भरतीबाबत दिलेल्या आदेशासंदर्भात चार महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०१२ रोजी विभागीय आयुक्तांनी तत्कालीन नगराध्यक्षांचे आदेश रद्द ठरविले.

या विरोधात तत्कालीन नगराध्यक्षांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. यानंतर बबन झोटे व इतर दोघा कर्मचाऱ्यांना दि. ५ जुलै २००१ मध्ये तत्कालीन नगरपालिकेच्या सेवेतून कमी करण्यात आले.

याविरोधात संबंधितांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला. याचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या लाभात गेला तर कामगार न्यायालयाच्या निकालाविरुद्ध महापालिकेने गुणवत्तेच्या आधारे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. हा निकाल मनपाच्या बाजुने लागला.

याबाबत झोटे यांच्यासह तिघा कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले. दि. १० ऑगस्ट २०१७ रोजी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन स्वातंत्र्यदिनी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच मनपासह जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाणा आंदोलन

$
0
0

सुरगाणा तहसीलला किसान सभेचा घेराव

म. टा. वृत्तसेवा, सुरगाणा

किसान सभेच्या झेंड्याखाली हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी सुरगाणा तहसील कार्यालयाला मंगळवारी घेराव घातला. किसान सभेच्या ऐतिहासिक लाँग मार्चच्या यशाने प्रभावित होवून भाजप व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी किसान सभेत लाल बावट्याच्या विजयाच्या घोषणांच्या गजरात प्रवेश केला. लाँग मार्चनंतर राज्य सरकारला मान्य कराव्या लागलेल्या वनाधिकार, नदीजोड, रेशन, पेन्शन, कर्जमाफी, रास्त भाव या मागण्यांची अंमलबजावणी अत्यंत असमाधानकारकरीत्या सुरू असल्याबाबत हजारो शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

सुरगाण्याच्या नगराध्यक्षपदी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोनाली बागुल या निवडून आल्याबद्दल त्यांचा हार्दिक सत्कार करण्यात आला.

आजच्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार जे. पी. गावीत, डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, हेमंत पाटील, सुवर्णा गांगोडे, भिका राठोड, उत्तम कडू, रामजी गावीत, धर्मा शिंदे इत्यादी करीत आहेत. आजच्या आंदोलनात किसान सभेचे मुखपत्र 'किसान संघर्ष'चा किसान लाँग मार्च विशेषांक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र 'जीवनमार्ग'चा कार्ल मार्क्स जन्मद्विशताब्दी व हैदराबाद पक्ष काँग्रेस विशेषांक यांच्या हजारो प्रती हातोहात विकल्या गेल्या. तहसीलदारांनी मागण्यांच्या अंमलबजावणीविषयी ठोस कार्यवाही केल्याशिवाय किसान सभेचा हा घेराव उठवला जाणार नाही असा निर्धार येथे हजारो शेतकऱ्यांनी केला आहे.

000

रिक्त पदांबाबत मागविला अहवाल

विभागीय आयुक्त माने यांची मालेगावी आढावा बैठक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालयातील रिक्तपदांचा प्रश्न गंभीर आहे. त्यापैकी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी पदे भरण्यासाठी आचारसंहितेनंतर जाहिरात देण्यात येईल. मनपा रुग्णालयातील अत्यावश्यक पदे भरण्यबाबतचा अहवाल शासनाने मागवला असल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिली.

येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त माने यांनी मंगळवारी येथे भेट दिली. शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, आयुक्त संगीता धायगुडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे, याचिकाकर्ते राकेश भामरे, नितीन पोफळे, सहायक आयुक्त विलास गोसावी, उपायुक्त अंबादास गरकल, डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर विभागीय आयुक्त माने यांनी सामान्य रुग्णालयास भेट देवून आरोग्य सेवांची पाहणी केली. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, गेल्या काही महिन्यात सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनगृहानजीक विश्राम गृह, मेडिकल वेस्ट, इ मेडिसीन आदी प्रश्न मार्गी लागले आहेत. असे असले तरी आरोग्य सेवेत अजून सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डांगे यांनी मे महिन्यातील रुग्णतपासणी, शस्त्रक्रिया यांची आकडेवारी देत अत्यल्प स्टाफ असून देखील आरोग्य सेवा दिल्या जात असल्याचे नमूद केले.

अधिकारी, कर्मचारी धास्तावले

येथील अधिकारी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत. त्यात शहरातील काही समाजकंटकांकडून त्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत महापौर, आयुक्त, आरोग्य अधिकारी यांनी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांची बैठक घेवून कामावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण कसे मिळेल याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णालयात २४ तास पोलिस संरक्षण मिळावे यासाठी अपर पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत अळ्यामिश्रित पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोत पिण्याच्या पाण्याची समस्या कायमच भेडसावत असते. यंदाही अशीच स्थिती असून, आधीच विस्कळीत पाणीपुरवठा होणाऱ्या या भागात आता अळ्या व जीवजंतूमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिडकोतील प्रभाग २९ मधील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली. साईबाबानगर परिसरात मंगळवारी झालेल्या पाणीपुरवठ्यात चक्‍क अळ्या आढळून आल्याने नागरिकांनी स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

सिडकोत परिसरात दर वर्षी पावसाळा सुरू झाला, की दूषित, गढूळ पाणीपुरवठा होत असतो. यंदा मात्र अद्याप पाऊस पडलेला नसतानाच सिडकोतील प्रभाग २९ मधील साईबाबानगर परिसरात दोन दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्‍त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक शहाणे यांनी परिसरात पाहणी केली असता, पाण्यात अळ्या व अन्य जीवजंतू असल्याचे आढळून आले. या परिसरात ड्रेनेज लाइनचाही प्रश्न प्रलंबित असून, ड्रेनेज लाइन व जलवाहिनी एकत्र झाल्याने हा प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहाणे यांनी यावेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मात्र, यासंदर्भातील कार्यवाहीबाबत ठोस निर्णय न झाल्याने संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संगीता पाटील, सुनंदा हाडोळे, अनिता शेळके, चंद्रकला गायकवाड, सुनंदा जाधव, शिवांगी सोनार आदींसह परिसरात नागरिक उपस्थित होते.

बाटलीबंद पाणी घेण्याची वेळ

परिसरातील दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी करूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या परिसरातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून अक्षरशः पाण्याच्या बाटल्या विकत घेत घ्याव्या लागत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या. या ठिकाणी अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाइन व जलवाहिनी एकत्र झाल्यामुळे दुर्गंधी येत असल्याचा आरोप परिसरातून केला जात आहे. हा दूषित आणि दुर्गंधीयुक्‍त पाणीपुरवठा बंद न झाल्यास थेट महापालिकेवरच मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला.

--

सिडकोत ड्रेनेज लाइनचा प्रश्न प्रलंबित असून, अनेक ठिकाणी या ड्रेनेज लाइन व जलवाहिन्या एकत्र झाल्या आहेत. अधिकाऱ्यांना सांगूनही ते लक्ष देत नसल्याने आता आयुक्‍तांनीच याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रभागातील दूषित पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.

-मुकेश शहाणे, नगरसेवक

--

(लीड, निष्पक्षचा लोगो वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लॅक स्पॉट’ चकाचक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील विविध ठिकाणचे 'ब्लॅक स्पॉट' मंगळवारी महापालिकेकडून चकाचक करण्यात आले. नाशिकरोड प्रभागातील विविध ठिकाणच्या 'ब्लॅक स्पॉट'वर कचऱ्याचे ढीग साचल्याचे वृत्त 'मटा'त मंगळवारी प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने साचलेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ हटविले. नागरिकांनीही या तत्परतेचे स्वागत केले आहे.

नाशिकरोड परिसरातील चेहेडी पंपिंग स्टेशन, सिन्नर फाटा, देवळालीगावातील वडारवाडी, विशाल मॉल या भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलनाला विलंब होत असल्याच्या कारणाने कचऱ्याचे ढीग साचले होते. या साचलेल्या कचऱ्यामुळे परिसराला बकालपणाचे स्वरूप आले होते. काही ठिकाणचा कचरा इतस्ततः विखुरल्याचेही चित्र दिसून येत होते. काही भागात कचरा संकलनासाठी घंटागाड्याच येत नसल्याने दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस 'ब्लॅक स्पॉट' ओसंडून वाहू लागले होते. या समस्येविषयीचे वृत्त 'मटा'मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेत तात्काळ या ठिकाणचे 'ब्लॅक स्पॉट' स्वच्छ करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणचे 'ब्लॅक स्पॉट' मंगळवारी सकाळीच चकाचक झाल्याचे दिसून आल्याने स्थानिक नागरिकांची दुर्गंधीतुन सुटका झाली.

डस्ट बिनची दुर्दशा जैसे थे

परिसरातील बहुतांश 'ब्लॅक स्पॉट'जवळ कचरा संकलनासाठी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने डस्ट बिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या सर्व डस्ट बिनची सध्या दुर्दशा झाली आहे. काही डस्ट बिन फुटलेले असल्याने त्यात कचरा संकलित होत नाही. काही डस्ट बिन खाली पडलेले आहेत, तर काही डस्ट बिन गायब झालेले आहेत. या डस्ट बिनच्या दुर्दशेचा प्रश्न महापालिकेने मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

(लोगो : मटा इम्पॅक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images