Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिक - शेतकरी आंदोलन

0
0

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य किसान सभेने संप पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्तीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. या सर्वप्रकाराला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात राजू देसले, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, विजय दराडे, सुकदेव केदारे, नामदेव राक्षे सहभागी झाले होते.

१० दिवस असणार संप

शेतकरी संपाचा दूध संकलनावर मोठा परिणाम झाला. शुक्रवारी संपामुळे जिल्ह्यातून दररोज होणारे १ लाख ३४ हजार लीटर दुधाचे संकलन झाले नाही.

हमीभावासह, दूधाला भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी किसान महासंघाने १ ते १० जून पर्यंत हा संप असणार आहे. त्यामुळे शहराकडे जाणारे दुधाचे टँकर आणि भाजीपाल्याचे ट्रक रोखून शहरात होणारा दूध, भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा किसान महासंघाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१९,५३८ जणांची अकरावीसाठी नोंदणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालासह इतर मंडळांचेही दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालावर लागून आहे. निकालापूर्वीच अकरावी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी सुरू असून १ जून सायंकाळपर्यंत नाशिक महापालिका क्षेत्रातील १९ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन माध्यमातून करण्यात येते. यंदा या प्रक्रियेतून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड वगळण्यात आले असून केवळ नाशिक महापालिका क्षेत्रातील २७ हजार जागांसाठी ही प्रक्रिया होत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे. १९ हजार ५३८ पैकी ११ हजार ५४१ विद्यार्थ्यांचे अर्जांची शाळांमार्फत पडताळणी झाली असून २ हजार ६८१ अर्ज व्हेरिफाय तर उर्वरित ५ हजार ३१६ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी व्हायची आहे. राज्यभरात अकरावीचे १ लाख ८८ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेने युवकाचा मृत्यू

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव एसयूव्ही कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात वेळूंजे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील १६ वर्षांचा युवक जागीच ठार झाला. या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

सोमेश्वर काळू शिंदे (१६) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धोंडिराम काशिद (२४) आणि सोमेश्वर (दोघे रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर) हे दोघे मित्र नाशिककडून त्र्यंबककडे आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. ब्रह्मा व्हॅली कॉलेज परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला सोमेश्वर शिंदे जागीच ठार झाला, तर दुचाकी चालवित असलेला सचिनही गंभीररित्या जखमी झाला. दोघांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता, डॉक्टरांनी सोमेश्वरला मृत घोषित केले. तर, सचिनची प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी हॉस्पिटल हलविण्यात आले. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात ‘वादळी’ हजेरी

0
0

- सात जनावरे मृत्युमुखी

- येवल्यात भिंत पडल्याने एक जण जखमी

- सटाणा, येवल्यात झाडे उन्मळून पडली

- घर, शाळा, कांदाचाळींचे पत्रे उडाले

- पॉलिहाऊस, शेडनेटचेही नुकसान

टीम मटा

नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. येवला तालुक्यात वादळामुळे झाडे उन्मळून पडली, तर अनेक गावांमध्ये घरांचे पत्रे उडाले. सवंदगाव (ता. मालेगाव) येथे विजेचा खांब कोसळून पाच बकऱ्या व म्हैस, तर येवल्यात डोंगरगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. तसेच शेडनेट, पॉलिहाऊसचेही नुकसान झाले.

यंदा मान्सून केरळमध्ये तीन दिवस आधीच दाखल झाला. महाराष्ट्रात ६ ते ७ जून रोजी मान्सून दाखल होणार आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मालेगाव तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हजेरी लावत दाणादाण उडवली. सर्वाधिक नुकसान येवला तालुक्यात झाले. येवल्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडाले. तसेच झाडे उन्मळून पडली. डोंगरगाव येथे वादळामुळे एका बैलाचा मृत्यू झाला. दुगलगाव येथे शाळेचे पत्रे उडाले. बोकटे येथे शेडनेटचे नुकसान झाले. देवळाणेत पॉलिहाऊसचे नुकसान झाले. ममदापूर, कोळंब येथे हलकी गारपीट झाली. बागलाण तालुक्यातही एक दोन ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली.

मालेगाव तालुक्यात सवंदगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचा खांब कोसळून धर्मा शेवाळे यांच्या पाच शेळ्या व एक म्हैस मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच, नांदगाव तालुक्याही अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉटर्स एज’ने जिंकली २७ सुवर्णपदके

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यातील आरसीबीसी बोट क्लब येथे झालेल्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेत नाशिकच्या वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंनी २७ सुवर्णपदक व ३ रौप्यपदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या स्पर्धेतून वॉटर्स एज क्लबच्या २४ खेळाडूंची ४ १० जूनदरम्यान चेनई येथे होणाऱ्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर वॉटर्स ऍज बोट क्लबचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे, अविनाश देशमुख, पूजा जाधव, मनीष बोरस्ते, स्मिता माळी यांच्या मार्गदर्शनखाली वॉटर्स एज बोट क्लब येथे होत आहे. नाशिकचे माजी महापौर प्रकाश मते, रमेश मते, माजी नगरसेवक विक्रांत मते, अविनाश देशमुख, पूजा जाधव, मनीष बोरस्ते, स्मिता माळी, अनिल काकड, प्रताप देशमुख, शशिकांत टलें, मिलिंद कदम, बापू मानकर, तुषार ठाकरे आदींनी खेळाडूंचा गौरव केला.

निवड झालेले खेळाडू :

पुरुष गट :

डबल सकल : रौप्य- प्रसाद जाधव, आकाश चव्हाण

कॉल्सस पेयर : सुवर्ण- निखिल कानडे, नवनाथ संत

कॉल्सस फोर : सुवर्ण- अनिकेत तांबे, मयूर म्हसाळ, मुकेश राजगुरू, चंद्रकांत काकड

महिला गट

सिंगल स्कल : सुवर्ण- जागृती शहारे

डबल स्कल : रौप्य- वृषाली राऊत, शुभांगी जगझाप (मंडलिक)

कॉल्सस पेयर : सुवर्ण- प्रणाली तांबे, पूनम तांबे

सबजुनिअर मुले :

कॉल्सस पेयर : सुवर्ण- रोशन तांबे, अक्षय कानमहाले

कॉल्सस फोर : सुवर्ण- रोशन तांबे, अक्षय कानमहाले, नीलेश राऊत, अनिकेत कानमहाले

मुली :

कॉल्सस पेयर : सुवर्ण- गायत्री गलांडे, निधी भोसले

कॉल्सस फोर : सुवर्ण- गायत्री गलांडे, निधी भोसले, सिद्धी खैरे, साक्षी राऊत

डबल स्कल : सुवर्ण- सानिका तांबे, आर्या भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ वर्षांनंतर पहिला वीज चोरी गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यातील महावितरणची सर्व पोलिस ठाणी कायमस्वरुपी बंद झाल्याने या पोलिस ठाण्यांतील वीजेविषयीचे सर्व प्रलंबित गुन्हे स्थानिक पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात वीज चोरीचा पहिला गुन्हाही दाखल झाला आहे.

नाशिक शहर मंडळातील वडनेर पाथर्डी रोडवरील बालाजी बेकरी या शॉपचे मालक जसवंतसिंग चव्हाण यांनी मीटरमध्ये वीज चोरीच्या उद्देशाने फेरफार केल्याचे उघड झाल्याने त्यांच्या विरोधात महावितरणच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणच्या नाशिक शहर मंडळाच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या पथकातील सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता डी. जी. पंडारे, कनिष्ठ तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे आदींच्या पथकाने जसवंतसिंग चव्हाण यांच्या केक शॉपच्या वीज मीटरची एप्रिलमध्ये पाहणी केली. त्यांना वीज मीटर वजा ६८.३७ टक्के मंद गतीने फिरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पथकाने पंचक येथील वीज मीटर चाचणी कक्षाकडे तपासणीसाठी पाठविले. या वीज मीटरमध्ये लूप वायर टाकून फेरफार केल्याचे तपासणीतून उघड झाले.

आठ लाखांची फसवणूक

जसवंतसिंग चव्हाण यांनी गेल्या २२ महिन्यांत तब्बल ४७ हजार ६६ इतक्या वीज युनिटची चोरी करून महवितरणचे तब्बल ७ लाख ९० हजार ५८० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरणच्या शहर मंडळाच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे यांनी नाशिकरोड पोलिसात चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉइंटर्स

0
0

अॅक्टिव्ह महिला मंडळ

आम्ही साऱ्याजणी -२

बांधकामांना अभय! ३

पार्किंगच्या जाचातून सुटका? -४

होऊया त्यांचा आधारस्तंभ -५

उसळणाऱ्या लाटांचे दडपण -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांत गर्दी

0
0

नाशिक : संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी शहरातील सर्व गणपती मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी पहाटे पाचपासून मंदिरांत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ढोल्या गणपती मंदिरात पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सोमेश्वरजवळील नवश्या गणपती, अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती, साक्षी गणपती, रविवार कारंजावरील सिद्धिविनायक, उपनगरचा इच्छामणी गणपती आदींसह उपनगरांमधील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईतांविरोधात गुन्हा

0
0

नाशिक : कोर्टाच्या आवारात ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत आरोपींविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विकी सानप, कैलास दराडे, विजय कांदळकर, रमेश चांगले, शेखर पवार अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत दशरथ पांडुरंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. एक जून रोजी दुपारच्या सुमारास पाटील कोर्टात गेले होते. कोर्टातील काम आटोपून ते दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी गेले असता हे संशयित तेथे आले. तिथे त्यांनी पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिली. सुनील चांगले सुटला, की तुझा गेमच करणार अशी धमकी देत संशयितांनी शिवीगाळ केली. पीएसआय डी. वाय. पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठादारास अटक

0
0

नाशिक : मेफेड्रोन अर्थात एमडी या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्याचा पोलिसांचा पाठपुरावा सुरूच असून, एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी क्रुड पावडर तयार करणाऱ्या संशयितास क्राइम ब्रँचच्या युनिट एकने अटक केली. गुजरातमधील अंकलेश्वर येथील जीआयडीसीतील एका कंपनीत हा काळा उद्योग सुरू होता. एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत आठ संशयितांना अटक झाली असून, तब्बल तीन कोटी २९ लाख २७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजीवकुमार बद्रीनारायण झा (प्लॉट क्रमांक ए ४०२, पंचशील रेसिडन्सी, जीआयडीसी, अंकलेश्वर, गुजरात) असे संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मूळ, मुझ्झफरनगर, उत्तर प्रदेश, हल्ली मुंबई) या संशोधकाला क्रुड पावडर पुरविण्यात झा याचा मोठा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित झा यास कोर्टाने ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासिकांसाठी संयुक्त प्रकल्प

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बेकायदा वापर केल्या जाणाऱ्या समाजमंदिर, व्यायामशाळा, वाचनालये, अभ्यासिका आदी मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, आतापर्यंत ९०३ पैकी ३० मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. एकीकडे बेकायदा वापर बंद करण्यासोबतच समाजोपयोगी कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मिळकतींना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून, या मिळकती आता 'संयुक्त प्रकल्प' म्हणून समाजसेवी संस्था, संघटनांना वाटप केल्या जाणार आहेत. या मिळकतींचा व्यावसायिक वापर टाळण्यासाठी 'ना नफा ना तोटा' तत्त्वावरच त्या दिल्या जाणार असल्या तरी त्यांचे भाडे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला असेल. त्यामुळे व्यावसायिक वापराला चाप बसणार आहे.

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिका समाजमंदिर, व्यायामशाळा व वाचनालये अशा जवळपास ९०३ मिळकती वर्षानुवर्षे नाममात्र भाडेदराने सामाजिक संस्था बळकावून बसल्या आहेत. राजकीय नेत्यांच्याच संस्थांना या मिळकती बहाल करण्यात आल्या असून, त्यांचा वापर सामाजिक कार्याऐवजी व्यावसायिक वापरासाठी केला जात असल्याचे समोर आले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. मात्र, डॉ. गेडाम यांची बदली झाल्याने सर्वेक्षणाची फाइलही बंद झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र धूळ खात पडलेली फाइल बाहेर काढत, मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्व मिळकतधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश मिळकतींचे करारनामे संपले आहेत, तरीही त्यांचा बेकायदा वापर सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने त्या ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली असून, आतापर्यंत ३० मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यात सातपूर विभागातील सर्वाधिक १७ मिळकतींचा समावेश आहे, तर सिडकोतील आठ अभ्यासिकांचा समावेश आहे.

आता संयुक्त प्रकल्प

मिळकतींचा सामाजिक कार्यासाठी योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी आता या मिळकती 'संयुक्त प्रकल्प' म्हणून समाजसेवी संस्था, संघटनांना वापरण्यास दिल्या जाणार आहेत. आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर या मिळकतींविषयी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, इच्छुक संस्था, संघटनांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. अर्थात, सध्या ज्या संस्था, संघटनांच्या ताब्यात या मिळकती आहेत, त्यांनादेखील या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत भाडेवाढीचा अधिकार महापालिकेलाच असून, रेडिरेकनरच्या जाचातून त्यांची मात्र मुक्तता होणार आहे. या संदर्भातील भाडेनिश्चितीचा प्रस्ताव आचारसंहिता संपल्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांत गर्दी

0
0

नाशिक : संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी शहरातील सर्व गणपती मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी पहाटे पाचपासून मंदिरांत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ढोल्या गणपती मंदिरात पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सोमेश्वरजवळील नवश्या गणपती, अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती, साक्षी गणपती, रविवार कारंजावरील सिद्धिविनायक, उपनगरचा इच्छामणी गणपती आदींसह उपनगरांमधील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याने नाशिककर त्रस्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व तयारी केली असली तरी मुसळधार पाऊस येण्यापूर्वीच शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा शनिवारी खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वादळवाऱ्यामुळे हा पुरवठा खंडित झाल्याचे बोलले जात आहे. महानगरांबरोबरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याच्या घटना घडल्या असल्याचे महावितरण कंपनीतर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात वादळामुळे चांदवड, वडनेर, दुगाव, म्हैसाणे, शिवरे या गावांत विजेचे खाब कोसळले. लासलगावजवळ खेडलेझुंगे, कोळगावातही अशा घटना घडल्या. पावसाला अद्याप सुरुवात झाली नसली तरी सुरुवातीलाच हा झटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असतो; पण जिल्ह्यात कोठेही मुसळधार पाऊस झाला नाही. केवळ वादळवाऱ्यामुळे वितरण कंपनीला फटका बसला. नाशिकमध्ये दिवसभर काही ठिकाणी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता, तर काही ठिकाणी हा पुरवठा बराच काळ खंडित होता.

शहरात परीक्षा

शहराच्या विविध भागांत दुपारी साडेचारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहत होता. याच वेळी तुरळक पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान शहराच्या जवळपास सर्वच भागांत वीज खंडित झाली. शहरात सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. नाशिकचे शनिवारी कमाल तापमान ३८.१, तर किमान तापमान २४.८ एवढे नोंदले गेले. वीजपुरवठा गायब झाल्याने नाशिककरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात तर दुपारीच वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. सायंकाळी तर तो अनेक तासांसाठी खंडित झाला. त्यामुळे नाशिककर घामाघूम झाले होते. वीजपुरवठा नसल्याने सोसायट्यांमधील लिफ्टही बंद पडल्या होत्या. मुंबई नाका, अशोकस्तंभ, सीबीएस परिसर, शरणपूर रोड, कामटवाडे, डिसुझा कॉलनी, महात्मानगर, त्र्यंबकरोड आदी परिसरात विजेसाठी रहिवाशांना मोठी प्रतीक्षा करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

0
0

नाशिक : शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी झालेल्या पावसाने घरांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. निफाड तालुक्यातील सोनगावमध्ये वीज पडून शिवनाथ गावले या शेतकऱ्याची गाय ठार झाली. शिरवाडे वाकद येथे वादळ वाऱ्यामुळे दोन पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. येवला तालुक्यातही काही घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.

नाशिक शहरात पाऊस

यंदाच्या हंगामातील मान्सूनपूर्व पावसाचे शहरातही आगमन झाले. शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहराच्या बहुतांश भागात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. फेरीवाले आणि अन्य व्यावसायिकांची या पावसाने धांदल उडवली.

क्षणचित्रे

सोनगावात वीज पडून गाय ठार

शिरवाडे वाकद येथे दोन पोल्ट्री शेडचेही नुकसान

वाकद शिरवाडे येथे दोन पोल्ट्री फार्मचे नुकसान

दुंध्ये गावात विजेचे चार खांब कोसळले

शुक्रवारी दिवसभरात येवला तालुक्यात २२ मिमी पावसाची नोंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरूची स्टोरीपेरूमध्ये रंगला कैद्यांचा वर्ल्ड

0
0

पेरूची स्टोरी

पेरूमध्ये रंगला कैद्यांचा वर्ल्ड कप

वृत्तसंस्था, लिमा

तब्बल ३६ वर्षांनंतर फिफा फुटबॉल वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या पेरू देशामध्ये या वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. पेरू देशातील तुरुंगांतील कैद्यांमध्ये वर्ल्ड कपच्या धर्तीवर फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात आली. यातील प्रत्येक संघास वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची नावे देण्यात आली होती.

सुमारे महिनाभर रंगलेल्या या स्पर्धेचा मागील आठवड्यात समारोप झाला. पेरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लुरिगँको तुरुंगाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी रशियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चाइमबोट तुरुंगाला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले. विजेत्यांना चषक, सुवर्णपदके आणि क्रीडा गणवेश बक्षीस म्हणून देण्यात आला. देशातील सोळा महत्त्वाच्या तुरुंगांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. या संघांना विविध देशांच्या नावाबरोबरच त्यांचे गणवेशही देण्यात आले. त्याचप्रमाणे, सामन्याच्या सुरुवातीस संबंधित देशाचे राष्ट्रगीतही वाजवण्यात आले. वर्ल्ड कपप्रमाणेच अँकन, चाइमबोट, इका आणि लिमा या चार गटांमध्ये संघांचे विभाजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सामन्यांसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लिमा स्टेडियम या ६०,००० आसनक्षमतेच्या मैदानावरही स्पर्धेतील सामने खेळवण्यात आले. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्यांसाठी मोजक्याच प्रेक्षकांना उपस्थित राहता आले. तरीही उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रत्यक्ष वर्ल्ड कपचाच सामना पाहात असल्याप्रमाणे उत्साह होता. या कैद्यांच्या नावावर विविध गुन्हे आहेत. मात्र, फुटबॉल सर्व देशवासीयांना एकत्र आणतो आणि या स्पर्धेच्या निमित्ताने कैद्यांमध्येही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाल्याचे पेरूच्या राष्ट्रीय सुधारगृह संस्थेचे प्रमुख कार्लोस वॅस्क्वेझ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदा मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

0
0

शेतकऱ्यांनी घेतला बोंडअळीचा धसका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्यावर्षी कापसावर आलेल्या बोंडआळी व मक्यावर आलेली बुरशीयामुळे यंदाच्या खरीप हंगामात कापूस व मक्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्याएवजी शेतकरी बाजरी, ज्वारी, कांदा पिकांना प्राधान्य देऊ शकतात. कृषी विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या पेरणी लाक्षांकानुसार सर्वाधिक ३३ हजार ३४७ हेक्टरवर मक्याची लागवड होवू शकते. त्याखालोखाल बाजरी पिकाचे क्षेत्र असून २७ हजार ८७० हेक्टर इतका लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. तर कापसाची लागवड १७ हजार ८३५ हेक्टरवर होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे ढग जमू लागले असून, काही ठिकाणी वादळी हजेरी देखील लावली आहे. पावसाचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज आधीच वर्तविण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेत तयार करण्याच्या कामात वेग घेतला आहे. कृषी विभागाकडून ८२ हजार ८७७ हेक्टरवर पेरणीची उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोकुळ खैरनार यांनी दिली.

बोंडआळीचा प्रादूर्भाव गेल्यावर्षी कापसावर झाल्याने शेतकऱ्यांनी त्याचा धसका घेतला आहे. सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. त्यातुलनेत बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा हवामान खात्याने पावसाचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची शेतीकामाची लगबग सुरू आहे. बाजारातही देखील विविध बी बियाणे, खते यांचा ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

पिक सन २०१८ - १९ पेरणी लक्षांक ( हेक्टर )

बाजरी २७, ८१०

मका ३३, ३७४

एकूण कडधान्य २,०८९

भुईमुग १,०८७

एकूण तेलबिया १,१७७

कापूस १७,८३५

एकूण खरीप - ८२,८७७

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊसधार

0
0

त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार

​त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे​ शनिवारी सायंकाळी रोहिणीच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. अधिक महिना असल्याने त्र्यंबकेश्वरला शनिवार भाविकांची वर्दळ जास्त होती. मुसळधार पावसामुळे भाविकांची धावपळ उडाली. बसस्थानक ते मंदिर हाकेच्या अंतरावर असूनही भाविक रिक्षाने बसस्थानकापर्यंत गेले. यामुळे मंदिर परिसरात रिक्षांची रीघ लागली होती. लहान मुलांसह काही नागरिकांनी मात्र पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. येथील बळीराजा पहिला पावसाने सुखावला आहे. मात्र, भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. मेन रोड परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.

कळवण तालुक्यात पाऊस

कळवण : कळवण शहर व परिसरात शनिवारी दुपारी तीनदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अल्पकाळ पाऊस बरसला असला तरी ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. कळवणच्या मेन रोडवर डबकी साचली. तालुक्यातील बोरदैवत व देवळीवणी भागात काही घरांचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्या. आदिवासी बांधवांची वित्तीय हानी झाली असून, कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तहसीलदार कैलास चावडे यांच्यासह महसूल यंत्रणेने या गावांना भेट देत पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय खानझोडे यांना मुद्रण स्पर्धेत रौप्यपदक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे एप्रिलमध्ये 'स्क्रीन प्रिंट इंडिया २०१८' या 'स्क्रीन व डिजिटल प्रिंटिंग' विषयावर अखिल भारतीय स्तरावरील प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शन व स्पर्धेत नाशिक येथील मे. इम्प्रेशन्स या संस्थेचे संस्थापक संचालक संजय खानझोडे यांना 'स्टिकर्स व लेबल्स' गटात रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले. 'मेसे फ्रँकफर्ट' या जर्मन कंपनीतर्फे भारतात दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या शहरांत हे प्रदर्शन भरवले जाते.

खानझोडे गेली ४० वर्षे मुद्रण व्यवसायात असून, मुद्रणतज्ज्ञ म्हणून ते परिचित आहेत. यापूर्वीही २००२ मध्ये त्यांना मुंबई येथे भरलेल्या याच स्पर्धेत रौप्यपदक, २०१४ मध्ये गोव्यातील पणजी येथील स्पर्धेत सुवर्णपदक, तर २००६ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या एफईएसपीए आशियातर्फे भरलेल्या प्रदर्शन व स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. २००४ मध्ये नाशिक जिल्हा मुद्रण संघातर्फे भरवलेल्या मुद्रण स्पर्धेत स्क्रीन प्रिंटिंग या विभागात रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले होते. २००२ मध्ये 'स्क्रीन प्रिंट इंडिया' या अखिल भारतीय पातळीवरील स्क्रीन प्रिंटिंग या विषयाला वाहिलेल्या मासिकाने खानझोडे यांनी मुद्रण क्षेत्रात केलेल्या कामाप्रीत्यर्थ त्यांच्या मासिकात मुखपृष्ठ लेखातून गौरवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड चिंब

0
0

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शहर, परिसरात धुरळा उडाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही ठिकाणचे होर्डिंग्सही कोसळले. हलक्या सरींमुळे उष्णतेच्या काहिलीपासून नागरिकांची सुटका झाली. वेगवान वारे वाहत असल्याने शनिवारी सायंकाळी वीजपुरवठ्याचा पुन्हा एकदा खेळखंडोबा झाला. वारंवार वीज खंडित झाल्याने महावितरणच्या पावसाळापूर्व तयारीचा पुन्हा एकदा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संप जिल्हा एकत्र फाइल

0
0

बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

शेतकरी संपावर ठाम; दुसऱ्या दिवशीही भाजीपाला, दूध संकलनावर परिणाम

टीम मटा

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील बाजार समित्यांसह कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट होता. मात्र शनिवारी जिल्ह्यात कोठेही शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले नाही. मात्र दूध, भाजीपाल्याची आवक मंदावल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये चढ्या दराने भाजीपाला विकला जात होता.

चांदवडमध्ये कांद्याची आवक घटली

मनमाड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व त्यांचा सात बारा कोरा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे अस्त्र उपसले आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदवड बाजार समितीत कांद्याची आवक घटली. एरवी ५०० ते ६०० ट्रॅक्टर कांदा आवक असलेल्या चांदवड समितीत शनिवारी अवघे २२ ट्रॅक्टर आले. त्यामुळे बाजार समितीत दिवसभर शुकशुकाट होता. मोठ्या प्रमाणावर आवक घटल्याने संपाचा प्रभाव दुसऱ्या दिवशीही जाणवला. मात्र चांदवडमध्ये कोणतेही आंदोलन झाले नाही. दरम्यान मनमाड, नांदगाव बाजार समिती शनिवारी बंद असल्याने शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला नाही.

000

मालेगाव बाजार समितीत लिलाव थंडावले

मालेगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाचा शनिवारी दुसरा दिवस होता. शहर व तालुक्यात अद्याप तरी या संपाचा फारसा परिणाम झालेला नाही. मात्र बाजार समितीत शेतमालाची आवक घटली आहे. भुसार मालाचे लिलाव थंडावल्याने बाजार समितीत शनिवारी शुकशुकाट पहायला मिळाला. भाजीपाल्याची २५० क्विंटल आवक झाली. शनिवार, रविवार मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्र बंद असल्याने कांदा आवकही कमी होती. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बाजार समिती सचिव अशोक देसले यांची भेट घेवून बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी १ ते १० जून दरम्यान संप पुकारला असून, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रा. के. एन. अहिरे, शेखर पगार, संजय जाधव, राजेंद्र वाघ, सुकदेव चौरे, अंकुश जगताप आदी उपस्थित होते.

0000

दूध संकलनावर परिणाम

निफाड : गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले असून, सलग दुसऱ्या दिवशीही या भागातील दूध डेअरी, आठवडे बाजार, सायखेडा बाजारात शुकशुकाट होता. गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेला गोदाकाठात यंदाही शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने संपात सहभाग घेतला असून, एकाही शेतकऱ्याने शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणला नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध घरीच ठेवले. त्यामुळे परिसरातील सर्व गावातील दूध संकलन केंद्र बंद होते. परिसरात भाजीपाला, गाजर, मिरची, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात आहे. शेतीमाल तोडणी करण्याचे काम सुरू आहे, परंतु तोडलेला माल मार्केटमध्ये आणण्याचे शेतकऱ्यांनी टाळले आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला. दूध उत्पादनातही सायखेडासह गोदाकाठ भाग आघाडीवर आहे. या भागात अमूल, पंचमहाल, गोवर्धन, थोरात, पराग, वारणा, प्रभात इत्यादी दूध खरेदी-विक्री कंपन्यांच्या संकलन केंद्रावर परिणाम झाला आहे. नियमित सुमारे ४५ हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या डेअरी पॉवरमध्ये शुक्रवारी केवळ दोन हजार लिटर, शनिवारी तीन हजार लिटर दूध संकलन झाले, असे डेअरीचे संचालक भगवान सानप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images