Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हेमांगीने गाठले यशाचे शिखर

$
0
0

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत ७८ टक्के गुणांची कमाई

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेत सटाणा येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या हेमांगी रमेश महाजन हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आणि लोकांची धुणीभांडी करून ७८.३० टक्के गुण मिळविले. केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकाविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सटाणा येथील कॅप्टन अनिल पवार चौकात भाडेत्त्वाने खोलीत वास्तव्यास असलेली हेमांगी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत आहे. वडील रमेश हे येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होते. मात्र, दुर्धर आजाराने त्यांचा २०१० मध्ये मृत्यू झाला. घरातील कर्तबगार मनुष्य गेल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण झाले. दोन मुले व एक मुलगी यांचे पालन पोषण करणे अवघड असल्याने आई पुष्पा महाजन यांनी लोकांची धुणीभांडी करण्याचे काम सुरू केले.

हेमांगी परिस्थितीची जाणीव असल्याने दहावी, अकरावी व बारावी शिक्षण घेत असतांना दुसऱ्यांचे पाठ्यपुस्तके घेऊन व आईसोबत धुणीभांडीची कामे करून अभ्यासावरील आपले लक्ष ढळू दिले नाही. दहावी व अकरावीत मिळालेले गुण व घरातील परिस्थितीची जाणीव शाळेतील सर्वच शिक्षकांसह विद्यार्थीनींनाही असल्याने एकत्र येत त्यांनी हेमांगीला आर्थिक मदतीचा हात दिला. शालेय पाठ्यपुस्तकांपासून तर अपेक्षित व प्रश्नसंच तिला पुरविले. महाविद्यालयात हेमांगी सह तिची मैत्रीण रुपाली सोनवणे या दोघा अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात येत होती. आता निकाल लागल्यानंतर भविष्यात सटाणा कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेऊन एमपीएससी अथवा यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांकडे जाण्याचा तिची इच्छा आहे. उत्कृष्ट व प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी होण्याचे हेमांगीचे स्वप्न आहे.

छंदाचे पैसे घरकामासाठी

घरात आईला आर्थिक मदतीसाठी हेमांगी शिवणकाम व मेहंदीचे छंद जोपासून त्यातून मिळेल ते पैसे घरकामासाठी वापरत होती. सकाळी कॉलेजातून आल्यानंतर आईसोबत धुणीभांडी करणे, शिवणकाम व मेहंदी असे कामे करून घरातील आर्थिक भार उचलण्यात हेमांगी कुठेही कमी पडली नाही. असे असताना तिने दररोज चार ते पाच तास अभ्यासाठी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दीखूणांसाठी १५ वर्षांपासून खेटा

$
0
0

निफाड तालुक्यातील शेतकरी वैतागला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'सरकारी काम आणि चार महिने थांब' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु, निफाड तालुक्यातील एक शेतकरी सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कामाचा गेली १५ वर्षे अनुभव घेत आहे. तीनवेळा जमिनीची मोजणी होऊनही आणि वारंवार पाठपूरावा करूनही त्यांना हद्दखूणांचा अहवालच दिला जात नसल्याची कैफियत या शेतकऱ्याने मांडली आहे.

निफाड तालुक्यातील वडाळी नजिक गावात दिलीप कडलग यांची शेतजमीन आहे. गट क्रमांक ३७२/१, २६२ आणि २६३ या गटांतील जमिनीची मोजणी करून मिळावी यासाठी त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांनी २००३, २०१० आणि २०१४ अशा तीन वेळा जमिनीची मोजणी करवून घेतली. मोजणीनंतर त्यांनी संबंधित विभागाकडे हद्दखूणांची मागणी केली. परंतु, ही माहिती अजूनही देण्यात आली नाही. तसेच मोजणी नकाशाची छायांकित प्रतही देण्यात आली नसल्याची कैफियत त्यांनी मांडली आहे. गटस्किमचा नकाशा चुकीचा असल्याचे सांगत ही माहिती देण्यास भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे तालुका निरीक्षक, याच विभागाचे उपअधिक्षक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडेही पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्यापही त्यांना हद्दखूणांचा तपशील आणि नकाशाच्या छायांकित प्रती देण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या शेतामध्ये अन्य लोक अतिक्रमण करीत असून सुमारे १० फुटांपर्यंत अतिक्रमण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. उताऱ्याप्रमाणे हद्दीखूणा दाखवाव्यात व सातबाराप्रमाणे क्षेत्र मोजून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. कडलग यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांना हद्दखूणांसाठी हेलपाटे मारावे लागत असून शेतकऱ्यांच्या या समस्या प्रशासकीय यंत्रणेने मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार हजार शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रथमच प्राथमिक शिक्षकांसाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन बदल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ६९२ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांना बुधवारी याबाबतचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून याबाबतचे संगणीकृत आदेश जिल्हा परिषदेस प्राप्त झाले. त्यानुसार मराठी माध्यमाच्या ४,५७७ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये ३,८०२ शिक्षक, ५७७ पदवीधर शिक्षक तर १८८ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. उर्दू माध्यमातील ११५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये ७७ शिक्षक, ३५ पदवीधर शिक्षक तर २ मुख्याध्यापक आहेत. शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली असून यासाठी ट्रान्स्फर पोर्टल ही वेबसाइट तयार करण्यात आली. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी असल्याने शिक्षकांवर बदल्यांमध्ये कोणताही अन्याय होत नाही. जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांना बदलीसाठी २० ऑनलाइन विकल्प देण्यात आले होते. त्यानुसारच सदरच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तथापि ५९५ शिक्षकांना दिलेल्या विकल्पातील जागा मिळाल्या नसल्याने त्यांना पुन्हा २० विकल्प भरण्यासाठी शासनाने गुरुवारपर्यंत (दि. ३१) मुदत दिली असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली.

सेवा कालावधी कमी; बदली रद्द

अंतर जिल्हा बदलीने बदली झालेल्या औरंगाबाद येथील उपशिक्षकाचा तेथील सेवेचा कालावधी कमी असल्याने त्यांना परत पाठविण्यात आले असून याबाबत औरंगाबाद जिल्हा परिषदेस पत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. औरंगाबाद येथील भाऊसाहेब सूर्यवंशी यांची आंतरजिल्हा पद्धतीने नाशिक जिल्ह्यात बदली झाली होती. मात्र, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांनी खासगी शाळेतील सेवा कालावधी ऑनलाइन अर्जात भरला असून जिल्हा परिषदेत २०१४ साली त्यांची नियुक्ती झाली आहे. शासन निर्णयानुसार अंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्ह्यात किमान ५ वर्षे सलग सेवा होणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित शिक्षकाने ऑनलाइन अर्जात चुकीची माहिती भरल्याने त्यांना हजर करून घेण्यात आलेले नाही.

मराठी माध्यम

एकूण : ४,५७७

शिक्षक : ३८०२

पदवीधर शिक्षक : ५७७

मुख्याध्यापक : १८८

उर्दू माध्यम

एकूण : ११५

शिक्षक : ७७

पदवीधर शिक्षक : ३५

मुख्याध्यापक : २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचाऱ्यांचा वेतनाढीसाठी संप, निदर्शने

$
0
0

राष्ट्रीयकृत व काही खासगी बँकांनी घेतला सहभाग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेतनवाढीच्या प्रश्नावर देशभर पुकारलेल्या संपात नाशिक जिल्ह्यातील ३५० हून अधिक बँकेचे सहा हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.

वेतनवाढीबरोबरच अनेक प्रश्न व मागण्यासाठी देशभरातील बँकच्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचा संप पुकारला आहे. त्याला जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांना निदर्शने करत आपला संतापही व्यक्त केला. या संपामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व काही खासगी बँकाचे व्यवहार ठप्प झाले तर सामान्य बँक ग्राहकांना मात्र त्रास सहन करावा लागला.

देशभरातील राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या नऊ संघटनेचे दहा लाख कर्मचारी युनायटेड फोरम बँक युनियनच्या झेंड्याखाली एकत्र आले असून त्यांनी हा संप पुकारला आहे. हा संप बँक कर्मचारी, अधिकाऱ्याच्या वेतनवाढीच्या प्रश्नांबाबत सरकारच्या उदासिनतेच्या असल्याचे सांगत कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणाही निदर्शने करतांना देण्यात आल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी मागण्यांचा कापडी फलक हातात घेऊन तो पुढे केला. लवकरात लवकर द्विपक्षीय वेतन करार करावा, पुरेशी वेतनवाढ आणि सेवाशर्तीत सुधारणा कराव्या, वेतनवाढ करारात बँकेच्या स्केल सात अधिकारी वर्गाचा समावेश असावा, अशा मागण्या या या फलकावर लिहिलेल्या होत्या. बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी २ टक्के वाढीचा प्रस्ताव दिल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे सर्व संघटना एकत्र आल्या. बँक कर्मचारी व अधिकारी सुद्धा या संपात सहभाग घेतल्याने बँकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाणा जोड

$
0
0

सुरगाण्यात माकप-शिवसेनेच महिलाराज

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा नगराध्यक्षपदी माकपच्या सोनाली बागुल तर उपनगराध्याक्षपदी शिवसेनेच्या तृप्ती चव्हाण यांची निवड झाली. सुरगाणा नगरपंचायतीवर प्रथमच दोन्ही पदावर महिला विराजमान झाल्या आहेत. नगरपंचायतमध्ये सतरा नगरसेवक असून त्यात भाजपचे सात, शिवसेना पाच, माकप पाच असे बलाबल आहे. तर दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. अडीच वर्षाचा कालावधीनंतर उर्वरित कालावधीसाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री शेजोळे, रेश्मा चौधरी, शिवसेनेच्या पुष्पा वाघमारे, माकपच्या सोनाली बागुल या रिंगणात होत्या. हात उंचावून मतदान घेण्यात आले. जयश्री शेजोळे यांना चार, पुष्पा वाघमारे यांना पाच मते पडली. भाजपच्या रेश्मा चौधरी यांना शून्य मते मिळाली. भाजपच्या काही नगरसेवकांच्या इशाऱ्यायामुळे माकपच्या सोनाली बागुल यांना अकील पठाण, दीपक थोरात, रामकृष्ण पवार, रेश्मा चौधरी, अब्बास (राजू ) शेख अशी सहा मते मिळाली. बागूल यांच्या पक्षाकडे १७ पैकी ५ मते असतांनाही त्याची नगराध्यक्षपदी वर्णी लागली.

उपनगराध्याक्षपदी शिवसेनेच्या तृप्ती चव्हाण यांना पक्षभेद विसरून सर्वांनीच मतदान केल्याने त्यांची उपनगराध्याक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोयंकाच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

गोयंकाच्या पोलिस कोठडीत वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो गुंतवणुकदारांना साडेसात हजार कोटींना गंडा घालणाऱ्या सिट्रस चेकइन्स लिमिटेड आणि रॉयल टिंकल स्टार क्लब लिमिटेड या कंपनीचा चेअरमन ओमप्रकाश बसंतलाल गोयंकाच्या पोलिस कोठडीत बुधवारी एक दिवसांची वाढ करण्यात आली. त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला २० मे रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याला ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी त्याला आणखी एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गोयंकासह त्याच्या संचालक मंडळाने जिल्ह्यातील लासलगाव येथे बस्तान बांधले होते. आकर्षक व्याजदर देण्याच्या बहाण्याने त्याने गुंतवणुकदारांना भुरळ घातली. सुरुवातीच्या काही महिने त्याने ठरल्याप्रमाण पैसेही परत केले. परंतु, गुंतवणुकदारांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे गोयंकाने दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गंडा घातला. त्याच्या कोठे मालमत्ता आहेत, कोठे पैसे गुंतविले आहेत याची माहिती घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत

$
0
0

महाराष्ट्र जमीन महसूल प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम १९७१ मध्ये सुधारणा करणाऱ्या अधिसूचनेचे इंग्रजी व मराठीमधील प्रारुप जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांना काही हरकती किंवा सूचना करायच्या असतील तर त्यांनी त्या १५ जूनपर्यंत कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महापालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रातील भूखंडालगत असलेल्या घराची बोळकांडी, सफाई गल्ली, सरकारी जमीनलगतचा भूखंडधारक ज्या धारणाधिकारावर संबंधित भूखंड धारण करीत असेल त्याच धारणाधिकारानुसार रक्कम देण्याचे त्याला मान्य असल्यास अशा जमिनीचे भोगवटामूल्य कितीही असले तरी जिल्हाधिकारी ती जमीन लगतच्या भूखंडधारकास प्रदान करू शकतील.

लगतच्या भूखंडधारकाने धारण केलेला भूखंड हा सरकारी जमीन असेल व तो भाडेपट्ट्याने धारण केला असेल तर सरकारच्या प्रचलित धोरणानुसार रक्कम आकारून आणि वसूल करून तो भाडेपट्टयाने प्रदान केला जाणार आहे. असा भूखंड संबधितांनी कब्जेहक्काने धारण केला असेल तर कब्जेहक्काची रक्कम आकारून आणि वसूल करून तो भाडेपट्टयाने प्रदान केला जाणार आहे. असा भूखंड संबंधितांनी भोगवटादार वर्ग -१ या धारणाधिकाराने धारण केला असल्यास सरकारच्या प्रचलित धोरणानुसार अशा प्रदानासाठीची देय रक्कम आकारून आणि वसूल करून भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकाराने तो प्रदान करण्यात येणार आहे. याप्रमाणे वसूल केलेल्या रक्कमेशिवाय ज्या दराने लगतचा भूखंडधारक अशा जागेसाठी आकारणी देत असेल, त्याच दराने अशा घराची बोळकांडी किंवा सफाई गल्लीतील जमीनीची आकारणी देय राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेहाची ओळख पटेना

$
0
0

नाशिकरोड : चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात सोमवारी (दि. २८) आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकली नाही. या मृतदेहाच्या हातावर कृष्ण असे शब्द गोंदलेले तसेच मृतदेहाच्या डोक्यावर खोल जखम असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवळा नगराध्यक्षपदी जोत्स्ना आहेर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी जोत्स्ना संजय आहेर यांची, तर उपनगराध्यक्षपदी अतुल अशोक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठी आहेर आणि उपनगराध्यक्षपदासाठी पवार यांचेच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास पवार यांनी जाहीर केले. नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचे जाहीर होताच समर्थकांनी देवळा पाचकंदील येथे फटाके उडवून एकच जल्लोष केला. यावेळी युवानेते संभाजी आहेर, सामाजिक कार्यकर्ते पंकज अहिरराव, पुंडलिक आहेर, अशोक आहेर, दिलीप आहेर, सुनील भामरे, दीपक आहेर, काका आहेर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नित्यानंद हळदीपूर

रायगडावर होणार शिवराज्याभिषेक सोहळा

$
0
0

५ व ६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५४ वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जोरदार साजरा केला जाणार आहे. याबाबत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषदेत माहिती दिली. जून महिन्यातील ५ व ६ तारखेला विविध कार्यक्रम होणार असल्याचे समितीचे सदस्य करण गायकर यांनी सांगितले.

दरवर्षी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो शिवभक्त जातात. यंदाही किमान ५० हजारांहून अधिक शिवभक्त रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला केंद्र व राज्य सरकारचे विविध मंत्री व अधिकारी येणार असल्याचे समितीचे सदस्य गणेश कदम म्हणाले. युवराज संभाजीराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगडला भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून विकास करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

असा होणार सोहळा

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने रायगड प्राधिकरणाच्या वतीने ५ जूनला लोकसहभागातून सकाळी ७ वाजेपासून किल्ले रायगडावर स्वच्छता मोहिम केली जाणार आहे. दुपारी १२ वाजेनंतर शिवभक्तांसह राजे संभाजी भोसले रायगडावर पायी प्रयाण करतील. यावेळी पंचक्रोशीतील २१ गावांमधील सरपंच सहभागी असतील. सायंकाळी ६ वाजेला रायगडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल. यानंतर मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके, शाहिरी कार्यक्रम होईल. शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला होईल. यासाठी सकाळी सहा वाजता ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम होईल. शिवरायांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर संभाजीराजे, युवराज कुमार शहाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड नगराध्यक्षपदी रेखा गवळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रेखा गवळी यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसने या निवडीचे स्वागत करीत एकच जल्लोष केला. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे भूषण कासलीवाल व शिवसेनेचे जगन्नाथ राऊत यांच्या लढतीत भूषण कासलीवाल यांची निवड झाल्याने भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त केला. मालेगावच्या तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपद आदिवासी राखीव (महिला) असल्याने व काँग्रेसच्या रेखा गवळी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदी भूषण कासलीवाल यांची निवड झाली. नगराध्यक्षपदी झालेली निवड सार्थ ठरवीन. चांदवडमध्ये विकास कामे करून जनतेला दिलासा देईन, असे आश्वासन रेखा गवळी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सरपंचाचा विनयभंग

$
0
0

वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील वळवाडे येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचास झाडांना पाणी टाकण्याच्या शुल्लक कारणावरून गावातील एका व्यक्तींनी शिवीगाळ केली. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सरपंच सुरेखा ह्याळीज यांनी फिर्याद दिली आहे. २९ मे मंगळवारी वळवाडे ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असता गावातील राजेंद्र पाटील कार्यालयात येवून सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी वाद घालू लागला. 'गावात मी लावलेल्या झाडांना ग्रामपंचायत पाणी का देत नाही?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महिला ह्याळील यांनी त्याची समजूत काढली असता राजेंद्रने त्यांनाच शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून हात धरून बाहेर काढले. हा प्रकार लक्षात येताच ह्याळीज यांचे पती कार्यालयात धावून आले मात्र पाटील यांनी त्यांनाही धक्क्बुकी व शिवीगाळ केली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेसाठी आज बैठक

$
0
0

सर्व संघटना एकत्र येणार; जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नाशिक-दिल्ली-नाशिक विमानसेवेसंदर्भात शहरातील विविध संस्था-संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. ३१) होत आहे. या बैठकीला जेट एअरवेजचे अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभावा, हा त्यामागचा उद्देश आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जेट एअरवेज या आघाडीच्या विमानसेवा कंपनीकडून येत्या १५ जूनपासून दिल्ली सेवा सुरू होत आहे. आठवड्यातून तीन दिवस ही सेवा बोईंग विमानाद्वारे दिली जाणार आहे. हॉपिंग फ्लाईटद्वारे नाशिककर विविध शहरांशी जोडले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, जेट एअरवेज थेट नाशिक ते दिल्ली अशा सेवेची बुकिंग सरू केले आहे. नाशिककरांवर दाखविलेला हा विश्वासच आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासात नाशिककरांना दिल्ली गाठता येणार आहे. ही बाब खूपच महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीहून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी विमान निघेल आणि ते ओझरला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल. तर, नाशिकहून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी निघेल आणि दिल्लीला दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा मिळेल. ओझर विमानतळावरून पहिल्यांदाच बोईंग विमानाद्वारे सेवा मिळणार आहे. जेट एअरवेजचे बोईंग ७३७ या विमानाची आसन क्षमता १६८ एवढी आहे. यातील ४० आसने ही उडान योजनेअंतर्गत राखीव राहणार आहेत. या ४० आसनांचे तिकीट हे अल्प आहे. २९०० ते ३५०० रुपयांपर्यंत तिकीटाचे दर आहेत.

ट्रॅव्हल व्यावसायिकांशी संवाद

सातपूरच्या निमा हाउसमध्ये गुरुवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध संस्था-संघटनांची बैठक होत आहे. याप्रसंगी जेट एअरवेज कंपनीचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. विमानसेवेविषयीच्या नाशिककरांच्या अपेक्षा, अडचणी, जेट एअरवेज कंपनीला अपेक्षित सेवा व प्रतिसाद आदींबाबत यावेळी चर्चा केली जाणार आहे. तसेच, शहरातील ट्रॅव्हल एजंटसशीही कंपनीचे अधिकारी संवाद साधणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावले

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. वटवाघुळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक असल्याचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांतून झाला. त्यामुळे फळांविषयी माणसांच्या मनात भितीचे वातावरण पसरल्याने आहे. तेव्हापासून निपाहच्या भितीने फळांची मागणी घटली आहे. सध्या अधिकमास आणि रमजान सुरू असूनही फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.

केरळमधील कोझीकोड भागात निपाह विषाणूची साथ तेजीत पसरत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासांमध्ये देशभर पसरली. निपाहावर कोणतीही लस किंवा औषध नाही. या विषाणूचे वाहक म्हणून वटवाघूळ असल्याने तसेच ते फळे खात असल्याने त्यांनी खाल्लेल्या अर्धवट फळांच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. अशा माहितीमुळे बहुतांशी ग्राहक सध्या कोणतीच फळे खरेदी करण्यासाठी सध्या धजावत नाही. सध्या आंब्यांचा हंगाम सुरू आहे. आंबा हा दक्षिण भागातूनच येत असल्याने आणि याच भागात निपाहचे रुग्ण आढळल्याने ही भीती आणखी वाढलेली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याला प्रचंड मागणी असते. त्यातच सध्या अधिकमास सुरू आहे. अधिकमासात सासुरवाडीला जावयास आमंत्रण दिल्यानंतर आमरसाचा बेत हमखास केला जातो. त्यामुळे या अधिकमासात इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त मागणी असते. तसेच, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. रमजानमध्ये फळांना प्रचंड मागणी असते. नेहमीच्या तुलनेत ही मागणी केवळ २५ टक्केच होत असल्याचे पेठरोड बाजार समितीच्या आवारातील घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगड, रत्नागिरी, मद्रास आदी भागातून येणारे कच्चे आंबे पिकविण्याची प्रक्रिया सध्या मंदावली आहे. आंब्याची मागणी कमी असल्यामुळे थोड्याच प्रमाणात आंबे पिकविली जात आहे. सफरचंद, चिक्कू, खरबूज, पेरू, केळी, जांभूळ आदी फळांचीही विक्री थंडावली आहे. ग्राहक नसल्याने फळांचे दरही काही प्रमाणात घसरल्याचे दिसून येत आहे.

आंबा हा नाशिकच्या बाजारात १००० ते १२०० किलोमीटरवरून येतो. तो कच्चा असतानाच तोडला जातो. कच्चाच पॅक करून इतर ठिकाणाच्या बाजारात पाठविला जातो. वटवाघूळ हे काही कच्ची फळे खात नाहीत. असे असतानाही आंब्याच्या बाबतीतही ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ती कमी झाली पाहिजे.

याकूब खान, फळ विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोर्डाच्या छपराला दीड तपानंतर मुहूर्त

$
0
0

वर्षभरात साकारणार विभागीय कार्यालय इमारत

सुमारे २४ कोटी रुपये खर्च अपेक्षित

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीची तब्बल पाच एकर जागा उपलब्ध असतानाही भाडोत्री इमारतीत होणारी एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाची वणवण आता थांबणार आहे. या जागेची निविदा मुंबईतील एका विख्यात कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आली असून आता प्रत्यक्ष कामासही सुरुवात झाली आहे. कार्यालयासाठी बोर्डाच्या ताब्यात जागा आल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर बांधकामास मुहूर्त लागला आहे. दरम्यानच्या काळात कार्यालयाच्या भाडोत्री जागेपोटी कोट्यवधीची किंमत मोजली गेली आहे.

'सरकारी काम अन् थोडे थांब' याचाही प्रत्यय विविध सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळोवेळी येतो. मात्र, या अनुभवास सरकारी कार्यालयही अपवाद नाही, याचेच उदाहरण बोर्डाची नाशिक विभागाची वास्तू बनली आहे. आडगाव परिसरातील मोक्याच्या ५ एकर जागेवर बोर्डाची नवी इमारत साकारण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. या जागेस तीन बाजूने संरक्षक भिंत असली तरीही एक बाजू पूर्णपणे मोकळी होती. याचा फायदा घेत या जागेवर परिसरातील नागरीकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. येथे प्रत्यक्षात बांधकामासही दोनच दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या कामासाठी सुमारे २३ कोटी ७० लाखांवर खर्च अपेक्षित आहे. साधारण वर्षभरात ही इमारत उभी राहणे अपेक्षित आहे. 'देर से आये, दुरुस्त आये...' अशी एक म्हण आहे. पण बोर्डाच्या प्रलंबित कारभारास ती पूर्णत: लागू होत नाही. 'देरसे आये, हे विधान चपखल बसत असले तरीही दुरुस्त आये असे म्हणज उचित ठरणार नाही. कारण, बोर्डाचे कार्यालय १९९६ पासून भाडोत्री इमारतीत चालविले जाते. सद्यस्थितीत या इमारतीत प्रतिमहिन्यास भाड्यापोटी सुमारे पावणेपाच लाख रुपये बोर्डाला जागामालकास द्यावे लागतात. आजवरचा हिशेब केल्यास ही रक्कम काही कोटींच्या घरात जाते. इतक्या पैशांमध्ये इतक्या कालावधीत बोर्डाने टोलेजंग इमारत कधीच साकारली असती. 'बोर्डाला छप्पराची प्रतिक्षा' या मथळ्याखाली 'मटा'ने या विषयाची दखल २ ऑगस्ट २०१६ रोजी घेतली होती.

सध्याचे कार्यालय अपुरे

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय कार्यालय अनेक वर्षांपासून मुंबई नाक्यावरील वाणी हाउस येथे कार्यरत आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयाच्या माथ्यावर आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा गाडा ओढणाऱ्या या कार्यालयास सध्या जागा अपूर्ण पडण्यासोबतच जागेचे भाडे वाढविण्याचे भय आजवर कायम सतावत आले. यामुळे विभागीय कार्यालयाने नव्या इमारतीचा शोधही इतरत्र सुरू केला होता. पण त्यांना द्वारका परिसरात ३० ते ३५ हजार स्क्वेअर फुटांची अपेक्षित इमारत मिळू शकलेली नाही.

एसएससी व एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. तेथील जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. आगामी वर्षभराच्या काळात विभागीय कार्यालयास अधिकारी कक्ष, अतिथी निवास, स्ट्राँग रुमसह प्राथमिक सुविधांनी सज्ज अशी इमारत साकारली जाईल, असे नियोजन आहे. साधारणत: २३ कोटी ७० लाखांवर खर्च यासाठी अपेक्षित आहे.

- राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाच्या छपराला दीड तपानंतर मुहूर्त!

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीची तब्बल पाच एकर जागा उपलब्ध असतानाही भाडेतत्त्वावरील इमारतीत होणारी एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयांची वणवण आता थांबणार आहे. या जागेची निविदा मुंबईतील एका विख्यात बांधकाम कंपनीस देण्यात आली असून, प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे. कार्यालयासाठी बोर्डाच्या ताब्यात जागा आल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर बांधकामास मुहूर्त लागला आहे. दरम्यानच्या काळात कार्यालयाच्या भाडेतत्त्वावरील जागेपोटी कोट्यवधीची किंमत मोजली गेली आहे.

'सरकारी काम अन् थोडे थांब' याचाही प्रत्यय विविध सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळोवेळी येतो. मात्र, या अनुभवास सरकारी कार्यालयही अपवाद नाही, याचेच उदाहरण बोर्डाची नाशिक विभागाची वास्तू बनली आहे. आडगाव परिसरातील मोक्याच्या ५ एकर जागेवर बोर्डाची नवी इमारत साकारण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. या जागेस तीन बाजूने संरक्षक भिंत असली तरीही एक बाजू पूर्णपणे मोकळी होती. याचा फायदा घेत या जागेवर परिसरातील नागरीकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. येथे प्रत्यक्षात बांधकामासही दोनच दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या कामासाठी सुमारे २३ कोटी ७० लाखांवर खर्च अपेक्षित आहे. साधारण वर्षभरात ही इमारत उभी राहणे अपेक्षित आहे. 'देर से आये, दुरुस्त आये...' अशी एक म्हण आहे. पण बोर्डाच्या प्रलंबित कारभारास ती पूर्णत: लागू होत नाही. 'देरसे आये, हे विधान चपखल बसत असले तरीही दुरुस्त आये असे म्हणज उचित ठरणार नाही. कारण, बोर्डाचे कार्यालय १९९६ पासून भाडेतत्त्वावरील इमारतीत चालविले जाते. सद्यस्थितीत या इमारतीत दरमहा सुमारे पावणेपाच लाख रुपयांचे भाडे बोर्डाला जागामालकास द्यावे लागतात. आजवरचा हिशेब केल्यास ही रक्कम काही कोटींच्या घरात जाते. इतक्या पैशांमध्ये इतक्या कालावधीत बोर्डाने टोलेजंग इमारत कधीच साकारली असती. 'बोर्डाला छपराची प्रतीक्षा' या मथळ्याखाली 'मटा'ने या विषयाची दखल २ ऑगस्ट २०१६ रोजी घेतली होती.

सध्याचे कार्यालय अपुरे

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय कार्यालय अनेक वर्षांपासून मुंबई नाक्यावरील वाणी हाउस येथे कार्यरत आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयाच्या माथ्यावर आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा गाडा ओढणाऱ्या या कार्यालयास सध्या जागा अपूर्ण पडण्यासोबतच जागेचे भाडे वाढविण्याचे भय आजवर कायम सतावत आले. यामुळे विभागीय कार्यालयाने नव्या इमारतीचा शोधही इतरत्र सुरू केला होता. पण, त्यांना द्वारका परिसरात ३० ते ३५ हजार स्क्वेअर फुटांची अपेक्षित इमारत मिळू शकलेली नाही.

एसएससी व एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. तेथील जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. आगामी वर्षभराच्या काळात विभागीय कार्यालयास अधिकारी कक्ष, अतिथी निवास, स्ट्राँग रूमसह प्राथमिक सुविधांनी सज्ज अशी इमारत साकारली जाईल, असे नियोजन आहे. साधारणत: २३ कोटी ७० लाखांवर खर्च यासाठी अपेक्षित आहे.

-राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्किल डेव्हलपमेंटसाठी प्राचार्यांची शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर (एनईसी) संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट हबतर्फे नाशिक जिल्ह्यातील विविध नामवंत महाविद्यालयांची प्राचार्यांची शाळा झाली. निमित्त होते 'प्रिन्सिपल मीट २०१८' कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डीटीईचे जॉइंट डायरेक्टर आणि सामनगाव गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. डी. पी. नाथे उपस्थित होते. एनईसीचे सीईओ एस. के. माथूर, एनईसीचे संस्थापक सदस्य के. एस. पाटील, एनईसीचे तंत्रज्ञान सल्लागार ए. आर. राजवाडे प्रमुख पाहुणे होता. दिव्या बोहरा यांनी सूत्रसंचालन केले.

सुरुवातीला के. एस. पाटील यांनी एनईसीच्या स्थापनेविषयी माहिती देतांना एनईसीचे नाशिकच्या उद्योगविश्वातील योगदान अधोरेखित केले. पुढे स्किल डेव्हलपमेंट हबचे फारूख झहेरी यांनी एनईसीत उपलब्ध असलेल्या विविध सुविधांबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्किल डेव्हलपमेंट हबतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसविषयी माहिती दिली. वृषाली कुलकर्णी यांनी एनईसी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे होणारे विविध कोर्सेस व शासकीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेसविषयी माहिती दिली.

नाशिककरांनी विविध औद्योगिक कौशल्ये आत्मसात करून नाशिक आणि सभोवताली अस्तित्वात असणाऱ्या विविध एमआयडीसींमधील संधींचा पुरेपूर फायदा घ्यावा, असा मानस डॉ. नाथे यांनी व्यक्त केला. शैक्षणिक परिक्षांना देण्यात येणाऱ्या अवास्तव महत्त्वाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक अनुभव अधिक उपयोगी असल्याचे त्यांनी संगितले. एईसीचे सीईओ माथूर यांनी औद्योगिक जगातील गरजा आणि महाविद्यालयातील शिक्षण यातील अंतर अधोरेखित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड हजार स्कूलबस चालकांचे समुपदेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

जून महिना सुरू होण्यासोबत स्कूलबस चालकांचीही लगबग सुरू होण्याअगोदरच शहर व जिल्ह्यातील सुमारे दीड हजार स्कूलबस चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत घडलेल्या काही अपघात घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नाशिक फर्स्ट या संस्थेसोबत हा उपक्रम आयोजित केला होता. या अंतर्गत १५०१ स्कूलबस चालकांचे समुपदेशन आणि अपघात विरहीत वाहतुकीसंदर्भात प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

शहरात यापूर्वी शालेय वाहतुकीदरम्यान काही अपघात घडल्याच्या घटना आहे. नव्यानेच शाळा उघडताना अशा प्रकारच्या दुर्घटनांना शहरास सामोरे जावे लागू नये, यासाठी स्कूल बसचालकांशी संवाद साधण्यात आला. गेल्या महिनाभराच्या काळात यासाठी सुमारे ३० प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्कूलबस आणि खासगी स्कूल व्हॅनचालकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

उर्वरित चालकांनीही सहभागी व्हावे

जिल्हाभरात शालेय वाहतुकीशी निगडीत सुमारे २ हजार वाहने आहेत. अद्यापही अनेक स्कूलबस किंवा व्हॅनचालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र वाहनचालकांजवळ असणे गरजेचे ठरणार आहे.

१५ जूनपासून वाहन तपासणी

शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. १५ जूनपासून या तपासणीला सुरुवात करण्यात येईल. शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना किंवा वाहन योग्यता प्रमाणपत्र मिळविताना वाहनचालकांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या वाहनचालकांनी १० जूनच्या अगोदर प्रक्रियेत सहभागी होऊन प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीसह तिघांना वाहनचोरीत अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह इतर जिल्ह्यात वाहनचोरी करणाऱ्या सराईतास सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तब्बल वर्षभरानंतर शिताफीने अटक केली. सराईतच्या चौकशीनंतर आणखी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, त्यात एका २२ वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे.

पूजा किशोर मोरे (२२, रा. आरटीओ, पवार लॉन्स, श्रीधर कॉलनी), प्रकाश कांतीलाल सूर्यवंशी (१९, रा. बंडू वस्ताद तालीम जुनी, तांबट लेन), दीपक साईदास राठोड (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि सागर अनिल देशमुख (रा. चाळीसगाव, जळगाव) अशी या गुन्ह्यात अटक झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यातील दीपक राठोड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात जळगाव जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. शहरात होणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांमध्ये राठोडचा हात असल्याने सरकारवाडा पोलिस मागील वर्षांपासून त्याच्या मागावर होते. गुन्हे शोध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांना राठोडबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाचे कर्मचारी घेऊन त्यांनी चाळीसगाव येथे राठोडला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता प्रकाश सूर्यवंशी आणि पूजा मोरे यांनी एक दुचाकी चोरी करून चाळीसगाव येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मागील वर्षी या दोघांनी मिळून पूजा राहते त्याच ठिकाणाहून एक वाहन चोरी केले होते. यातील देशमुख हा संशयित आरोपी चोरीचे वाहन विकत घेतो.

याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले, की संशयितांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील एक दुचाकी शहरातील असून, उर्वरित दुचाकी जळगाव किंवा चाळीसगाव येथील आहेत. मात्र, वाहनांचा क्रमांक बदलण्यात आला असल्याने प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहनांची खात्री करण्यात येण्यात येत आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणीसह तिचा साथिदाराने यापूर्वी काही गुन्हे केले आहेत काय याचाही तपास सुरू आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणीची कौटुंबिक परिस्थिती तशी ठीक असून, तिने हे कृत्य का केले हे तपासाअंती स्पष्ट होऊ शकेल, असेही भगत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images