Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘जाहिरात चालिसा’चे नाशिककरांना आकर्षण

$
0
0

'जाहिरात चालिसा'चे नाशिककरांना आकर्षण

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिशय वैविध्यपूर्ण बनवलेल्या जाहिराती, आकर्षक स्लोगन, रंगसंगती आणि मॉडेल्स यांचा सुरेख मेळ जाहिरात चालीसा प्रदर्शनात घालण्यात आला आहे. जाहिरात क्षेत्रात गेली ४० वर्षे कार्यरत असलेल्या चित्रकार सुनील धोपावकर यांच्या वैविध्यपूर्ण जाहिरातींचे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी आर्ट गॅलरीत सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानवाला तेजीचा मंत्र देणारी जाहिरात चालिसा ४० श्लोकांमध्ये पोथीच्या स्वरूपात लिहिण्यात आलेली असून, या प्रदर्शनामध्ये ही पॉकेट चालीसा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. प्रेक्षकांनीही ही चालीसा घेऊन त्याचे पठण करीत जाहिरात प्रदर्शनाचा आनंद घेतला. या प्रदर्शनात निवडक ८०० जाहिराती मांडण्यात आल्या आहेत. यातून गेल्या पंधरा वर्षांत जाहिरातींमध्ये होत गेलेले बदल दाखवण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष हिंगणे, मेकअप आर्टिस्ट माणिक कानडे, गीतकार मिलिंद गांधी व छायाचित्रकार संजय कवडे यांच्या कलासाधनेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हे प्रदर्शन दि. २९ मेपर्यंत कुसुमाग्रज स्मारक येथे सुरू राहणार असून, रसिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन सुनील धोपावकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युनियनच्या वादात कामगारास बेदम मारहाण

$
0
0

तीन कामगारांना बेड्या; डॉ. कराडांचे नाव यादीत

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

युनियन कोणती हवी या वादातून एकाच कंपनीतील काही कामगारांनी एका कामगाराला मणका मोडेपर्यंत बेदम मारहाण करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, कोर्टाने त्यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे संशयित आरोपींच्या यादीत डॉ. डी. एल. कराड यांचेही नाव असून, पोलिस काय भूमिका घेतात याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

डॉ. कराड, वैभव भाऊराव जगताप, दीपक भिला पाटील (वय ३३, रा. समर्थ अपार्टमेंट, महादेव मंदिराजवळ, श्रमिकनगर), अनिल भिकाजी समदूर (वय ३१, रा. शुभम पार्क, श्रमिकनगर) रोहित रामचंद्र भालेराव (वय २६, रा. दत्तनगर, श्रमिकनगर) अशी संशयितांची नावे असून, यांच्यासह आणखी सात ते आठ साथिदारदेखील होते. या प्रकरणी प्रवीण वामन मेतकर (वय ३९, रा. शिंदे मळा, कुबेर दर्शन अपार्टमेंट, अशोकनगर) या कामगाराने फिर्याद दिली आहे. मेतकर सीअर्स डाईस अॅण्ड मोल्ड्स प्रा. लि. या सातपूर स्थित कंपनीत कामाला असून, मागील काही महिन्यांपर्यंत येथे इंटरनल युनियन कार्यरत होती. या युनियनचे काम मेतकर पाहतात. काही महिन्यांपूर्वी वैभव जगताप, अनंत पुणेकर, अनिल समदूर तसेच कौशल कुमार सिंग यांनी सीआयटीयुची युनियन सुरू करण्याबाबत मेतकरकडे चौकशी केली. मात्र, व्यवस्थापन चांगले काम करीत असताना बाहेरील युनियनची गरज नाही, असे मेतकरने स्पष्ट केले. यानंतर संशयितांनी मिळून मेतकरला पैसे देण्याचे आमिष दाखवत धमकीही दिली. तरीही मेतकर आपल्या म्हणण्यावर कायम राहिल्याने २३ मे रोजी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या मेतकरला कार्बन नाका येथे संशयित दीपक पाटीलने थांबवले. तिथे जगताप, पाटील, समदूर, वैभव जगताप आदींसह सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. अंतर्गत युनियन संपविण्यासाठी मेतकरला संपवणे गरजेचे असल्याचे म्हणत त्यांनी मेतकरला जबर मारहाण केली. यात मेतकरच्या मणक्याला दुखापत झाली. यानंतर सर्व प्रकार कंपनीचे मालक अजय केवलरमाणी यांना सांगितला. त्यानुसार केवलरमाणी मेतकरला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर मेतकरने पोलिसांना फिर्याद दिली असून, यात डॉ. कराड यांच्या सांगण्यावरून आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संशयित दीपक पाटील, अनिल समदूर आणि रोहित भालेराव यांना अटक केली. कोर्टाने या सर्वांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, युनियनच्या वादात डॉ. कराडांचे नाव आल्याने पोलिस काय कारवाई करणार याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरिय परिवाराचे केरुबुवा यांना अभिवादन व पुस्तक प्रकाशन 

$
0
0

'आंबेडकरांवरील भाषणे'

पुस्तकाचे प्रकाशन

देवळाली कॅम्प : नाशिक येथील समता कॉलनीमधील अरिय परिवाराच्या वतीने केरुबुवा गायकवाड यांना अभिवादन तर डॉ. प्रकाश इंगळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषणे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ना. मु. कांबळे तर प्रमुख अतिथी लोकशाहीर वसंतदादा मानवटकर, कवी भगवंत तायडे, मेजर आर. सी. भगत, डॉ. भास्कर पाटील आणि अरियचे संपादक संजय डोंगरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यभरातून उपस्थित असलेल्या कवींचे संमेलन पार पडले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अमोल शिरसाट यांनी केले तर  आभार डॉ. संजय पोहरे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक धोंगडेंचे सदस्यत्वच पणाला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वॉक विथ कमिशनर उपक्रमात धोंगडे मळ्यातील व्यायामशाळा आणि खोले मळ्यातील गवळीवाडा येथील अभ्यासिकेतील अतिक्रमणाची तक्रार प्राप्त होताच आयुक्त मुंढे यांनी कार्यक्रमानंतर आपला मोर्चा थेट या दोन्ही ठिकाणी वळवला. अभ्यासिकेत राहणाऱ्या कुटुंबाने थेट नगरसेवक रमेश धोंगडे यांनीच ही जागा वास्तव्यास दिल्याची माहिती दिल्याने आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्वच रद्दबातल करण्याबाबत कारवाईचे आदेश दिल्याने खळबळ उडाली.

व्यायामशाळा परिसरातील चित्र पाहून दोन तासांच्या आत या ठिकाणचे अतिक्रमण काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड इशारा त्यांनी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना दिल्याने उपस्थित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर अवघ्या दोन तासांतच या व्यायामशाळेच्या भोवतालचे अतिक्रमण हटविण्यात आले. धोंगडे मळ्यातील व्यायामशाळा बंद असल्याची आणि या व्यायामशाळेच्या जागेत अतिक्रमण झालेले असल्याची तक्रार वॉक विथ कमिशनर उपक्रमादरम्यान दीपक ठाणगे या युवकाने केली होती. या तक्रारीची आयुक्तांनी तात्काळ दखल घेत या व्यायामशाळेला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची परिस्थिती बघून त्यांनी कपाळालाच हात लावला. या ठिकाणच्या शेडचे व गोठ्याचे अतिक्रमण दोन तासांत काढण्याचे आदेश त्यांनी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना दिले. अतिक्रमण काढल्यानंतर येथील फोटो पाठवा, असेही त्यांनी सांगितले. अतिक्रमण न काढल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांवर घामाघूम होण्याची वेळ आली होती. त्यानंतर येथील अतिक्रमण दोन तासांत भुईसपाट करण्यात आले.

इन कॅमेरा पंचनामा

धोंगडे मळ्यानंतर आयुक्तांचा ताफा थेट खोले मळ्यातील गवळीवाडा येथील अभ्यासिकेत येऊन धडकला. येथे तर चक्क बाबूराव मुटकुळे या व्यक्तीचे कुटुंबच वास्तव्याला असल्याचे आढळून आल्याने आयुक्त मुंढे संतप्त झाले. आपल्याला नगरसेवक रमेश धोंगडे यांनी ही जागा वास्तव्यासाठी दिल्याची माहिती या कुटुंबातील महिलांनी आयुक्तांनाच दिल्याने आयुक्तांनी थेट इन कॅमेरा पंचनामा करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे महापालिका मिळकतीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्दबातल करण्याच्या कारवाईचे आदेश दिले. या कुटुंबाला सोमवारी सायंकाळपर्यंत अभ्यासिका खाली करण्याची मुदत दिली. या अभ्यासिकेच्या जागेवर उभी करण्यात आलेली एमएच १५, सीएम ८१८७ या क्रमांकाची काळी-पिवळी व्हॅनही जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या कारवाईमुळे नगरसेवक रमेश धोंगडे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक

महापालिका आयुक्त येणार म्हणून शनिवारी झाडून सारे कर्मचारी सकाळी सहा वाजेपासूनच चोखपणे ड्युटी बजावत होते. सिन्नर फाटा, चेहेडी पंपिंग, बिटको चौक, मुक्तिधाम चौक, अनुराधा चौक, महापालिका शाळा क्रमांक १२५ चे मैदान या भागातील सर्व रस्ते रात्रीच झाडून चकाचक करण्यात आले होते. आयुक्तांनी ऐनवेळी खोले मळा व धोंगडे मळ्यात मोर्चा वळविल्याने ऐनवेळी या भागात स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. खोले मळ्यातील अभ्यासिका आवारातील कचरा तर थेट आयुक्तांच्या उपस्थितीतच साफ करण्यात आल्याने उपस्थित नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

खोले मळ्यातील अभ्यासिकेत वास्तव्यास असलेले कुटुंब या अभ्यासिकेचे केअर टेकर म्हणून संबंधित ठेकेदारानेच ठेवलेले आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. उलट त्यांना उदरनिर्वासाठी कधी-कधी आर्थिक मदत करावी लागते. माझे नाव सांगितले ही त्या कुटुंबाची चूक आहे. महापालिकेने आजवर या मिळकतीची काळजी घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. असे असतानाही माझ्यावर प्रशासनाचा कारवाईचा विचार असेल, तर त्यास सामोरे जाण्याची आपली तयारी आहे.

-रमेश धोंगडे, नगरसेवक

--

वॉक विथ कमिशनर पान ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयाचा गुलालासहदराडे ‘मातोश्री’वर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मताधिक्याने दमदार विजय संपादन करीत गुलालाचे मानकरी ठरलेल्या नरेंद्र दराडे यांनी शुक्रवारी शिवसनेच्या ज्येष्ठ नेतेमंडळींसह मुंबई गाठली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेंसह त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयाची पताका फडकविल्यानंतर नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांनी शुक्रवारी सकाळी 'मातोश्री' गाठली. ठाकरे यांनी दराडे यांचा सत्कार केला. राज्यमंत्री दादा भुसे, नाशिकचे शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, यांच्यासह सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सचिन मराठे, महेश बिडवे, सुहास कांदे, जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार उपस्थित होते.

शिवसेनेच्या या लाटेत येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेचा भगवा फडकणारच, या शब्दात यावेळी ठाकरे यांनी जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. यापुढील प्रत्येक निवडणुकीत इतरांचा विचार न करता शिवसेना स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे सांगत, त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्या.

'शिक्षक'साठी उमेदवार

विधानपरिषदेच्या विजयाबद्दल मुक्त कंठाने कौतुक करतानाच, यापुढील प्रत्येक निवडणुकीत सेनेचा स्वबळाचा नारा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत शिवसेना रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. 'मातोश्री' वरील बंद खोलीत शिवसेनेच्या जिल्ह्यातील काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी चर्चा केली. नरेंद्र दराडे यांचे लहान बंधू तथा जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे हे शिक्षक मतदार संघाची आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची मोठी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकत्र बुडाले बातमी

$
0
0

कालव्यात बुडून मुलाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील बोकडदरे येथील अरुण बबन माळी (वय ९) या मुलाचा पालखेड डाव्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घडना घडली. निफाड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार बोकडदरे येथील बेघर वस्तीजवळून पालखेड डावा कालवा जातो. सध्या कालव्याला पाणी सोडलेले आहे. अरुण या ठिकाणी खेळत होता. खेळता खेळता तो कालव्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

बोकडदरे येथील माजी सरपंच भाऊराव दराडे यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी दुपारी अरुण हा त्याच्या मित्रांसह पालखेड डाव्या कालव्यात पोहायला गेला होता. पाटातील दोरखंडाला पकडून ही मुले पोहत होती. पाण्याचा प्रवाह वाढल्याने अरुणसोबत असलेली मुले बाहेर आली. अरुणचा दोराला असलेला हात निसटल्याने तो वाहून गेला. पाटाच्या कडेला धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळ असणाऱ्या तरुणांनी लगेच पाटात उड्या टाकल्या. तोपर्यंत अरुण पाटालगतच्या खड्ड्यात अडकला होता. अर्ध्या तासाने त्याला बाहेर काढले. नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर निफाड उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अरुणचे आई-वडील यापूर्वीच घर सोडून गेले असून, तो आपल्या आजोबांकडे राहतो.

आरोग्य केंद्राला कुलूप

नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे नैताळे येथील संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे व कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावले.

00

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

मनमाड : चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली असता एका महिल तोल जावून विहिरीत पडली. पाण्यात बुडाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चांदवड पोलस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. मंगरूळ येथील शांताबाई खंडू सोनवणे (वय ३१) असे त्या महिलेचे नाव आहे. शांताबाई या पाणी भरण्यासाठी घरा जवळच्या विहिरीवर गेल्या असता, त्याला तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.

00

शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

मालेगाव : तालुक्यातील चोंढी जळगाव शिवारातील शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सुकदेव ढोणे (वय १८), मेघराज सुभाष पोमनार (वय २०) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवार (दि. २६) सकाळी अकराच्या सुमारास सुभाष पोमनार यांच्या शेततळ्यातील विद्युतपंप नादुरुस्त झाल्याने तो दुरुस्त करून पुन्हा शेततळ्यात टाकण्यासाठी

ज्ञानेश्वर आणि मेघराज दोघे गेले होते. ज्ञानेश्वर आधी शेततळ्यात उतरला. मात्र विद्युतपंप बसवित असतांना त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी मेघराजने उडी घेतली. मात्र शेततळ्यास पाणीसाठा जास्त असल्यामुळे दोघेही बुडाले. काठावर उभ्या असलेल्या विजय ढोणे व ज्ञानेश्वर पोमनार यांनी आरडाओरडा केला. मात्र दोघांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही. दोघे युवक शेततळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच अनेक जण घटनास्थळी धावून आले. त्यानंतर दोघांना बाहेर काढून मालेगाव येथील सामान्य रुग्णालायात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

00

हौदात पडून चिमुरडीचा मृत्यू

मनमाड : भावासोबत अंगणात खेळत असलेल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा पाण्याच्या हौदात पडल्याने मृत्यू झाला. नांदगावनजीक हिंगण देहरे येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनीता गुड्डू पावरा (रा. न्यायडोंगरी) असे त्या मुलीचे नाव असून तिचे वडील हिंगण देहरे येथील मळ्यात सालगडी म्हणून काम करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

$
0
0

गाळ काढण्यास सुरुवात

मनमाड : नांदगाव भागातील हिसवळ खु. 'गावात गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अनुगामी लोकराज्य महाभियानांतर्गंत (अनुलोम) संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे. यावेळी सरपंच रोहिणी आहेर, राजेंद्र आहेर, डॉ. संतोष जगताप, प्रसन्न पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर खरेदीकडे वाढतोय कल

$
0
0

लोगो - प्रॉपर्टी फेस्टिव्हल

प्रॉपर्टी फेस्टिव्हलच्या उद्घाटनाप्रसंगी कोतवाल यांचे प्रतिपादन

-

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम क्षेत्रावरील अस्थिरतेचे मळभ दूर होत आहे. रेरा, नोटबंदी, जीएसटीचा रिअल इस्टेटवर काय परिणाम होणार याची धास्ती बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांनाही होती. अनिश्चितेचे हे वातावरण आता निवळले असून, नाशिकमध्ये घर खरेदीकडे आता कल वाढतो आहे. विकासवाटेवरील या शहरात घरांच्या किमती अजूनही सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे हा घर खरेदीसाठी सर्वोत्तम कालावधी असून, फेस्टिव्हलमधील ऑफर्सचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने नाशिककरांसाठी प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये या दोन दिवसीय फेस्टिव्हलला शनिवारी सुरुवात झाली असून, उद्घाटनाप्रसंगी कोतवाल बोलत होते. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष उमेश वानखेडे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोतवाल पुढे म्हणाले, की ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी हा फेस्टिव्हल नामी संधी आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात अस्थिरतेच वातावरण आहे, असे वारंवार बोलले जाते. परंतु, हे वातावरण बऱ्यापैकी निवळले आहे. महारेरा, जीएसटी, नोटबंदी आणि विकास आराखडा याचा रिअल इस्टेट क्षेत्रावर काय आणि कितपत परिणाम होणार याबाबतचे चित्र बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांनाही स्पष्ट नव्हते. परंतु, अलीकडच्या काळात ते स्पष्ट झाले असून, या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण स्पर्धा निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये सद्यस्थितीत घरांचे दर आवाक्यात असल्याने पुणे, मुंबईचे लोकही येथे गुंतवणुकीला पसंती देत आहेत. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य असणाऱ्यांकडेही स्वत:चे घर नाही. अशा नागरिकांना घर खरेदीसाठी ही अत्यंत योग्य वेळ असून, फेस्टिव्हलमुळे चांगल्या ऑफर्स आणि पर्यायदेखील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ उठवावा, असे आवाहन कोतवाल यांनी केले. हा फेस्टिव्हल बदलाची नांदी ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

ऑफर्सची संधी

या फेस्टिव्हलमध्ये घराचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी बांधकाम व्यावसायिकांनी विशेष ऑफर्स देऊ केल्या आहेत. पहिल्याच दिवशी नागरिकांनी इंद्रप्रस्थ हॉल येथे या फेस्टिव्हलमधील ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली. रविवारीदेखील सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळेत फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. त्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैसे भरण्यास हवी सहा महिन्यांची मुदत

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : कंपाउंडिंगच्या जाचक अटींमुळे लॉन्स, मंगल कार्यालये मालकांना त्यांच्या आस्थापनांच्या नियमितीकरणासाठी २० ते ५० लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. लॉन्स हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने कंपाऊंडिंगच्या दरामध्ये सवलत मिळावी, अशी त्यांची मुख्य मागणी असून, त्यासाठी नगरसेवकांनाही साकडे घालण्यात आले आहे. परंतु, त्यासाठीचा ठराव आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला असून, हा विषय जूनअखेरपर्यंत लांबणीवर पडणार आहे. नियमितीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळावा, अशी अपेक्षा लॉन्स, तसेच मंगल कार्यालय मालकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील तब्बल १६० लॉन्स, तसेच मंगल कार्यालयांवर महापालिकेने अनधिकृत असा ठपका ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ऑक्टोबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने दर निश्चित केले. हे दर वाढीव बांधकामासाठी असून, तेच दर नाशिक महापालिका लॉन्समालकांनाही लावत आहे. एकेका लॉन्सचा व्हॉल्यूम एक ते दीड एकरचा असल्याने लॉन्समालकाला किमान २० ते ५० लाखांपर्यंत आर्थिक भुर्दंड बसत आहे. विशेष म्हणजे पक्की बांधकामे कमी असून, त्यांनी डोम उभारले आहेत. त्यामुळे कंपाऊंडिंगच्या दरात सवलत मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडून होऊ लागली आहे. त्यासाठी महापालिकेत ठराव होणे आवश्यक असून, त्याकरिता लॉन्स आणि मंगल कार्यालये मालकांच्या संघटनेने नगरसेवकांना साकडेही घातले आहे. परंतु, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता उठली की असा ठराव केला जाणार होता. ही निवडणूक होते ना होते तोच शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने ठरावाचा विषय जूनअखेरपर्यंत बारगळला आहे. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार या व्यावसायिकांच्या डोक्यावर कायम आहे. लॉन्स नियमित करून द्यावेत यासाठी २००४ पासून पाठपुरावा सुरू असून, औरंगाबादरोडला लॉन्स झोन जाहीर करावे, अशी मागणीही प्रलंबित आहे.

--

...तर वर्षभर संप

महापालिकेला उत्पन्न मिळायला हवे याबाबत आमचे दुमत नाही. आम्हालाही बेकायदेशीरपणे व्यवसाय करायचा नाही. परंतु, बहुतांश लॉन्स शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झाले आहेत. शेतीमध्ये काही मिळत नाही, म्हणून हा जोडधंदा शेतकऱ्यांनी सुरू केला. कर्ज घेऊन लॉन्स उभारले. या मालमत्ता पिवळ्या पट्ट्यात असल्याने तेथे टोलेजंग इमारती उभारणेही शक्य आहे. राज्यात कोठे नव्हे, ते नाशिकमध्ये नवरदेवाची मिरवणूक काढणे बंद केले आहे. मुंबई, ठाण्यात डीजे वाजविले जात असताना नाशिकमध्ये पूर्णत: डीजे बंद केले आहेत. चांगल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत आम्ही आग्रही आहोत. लॉन्स किंवा मंगल कार्यालये हा आमचा व्यवसाय असला, तरी तो सेवा उद्योग आहे. जाचक अटी रद्द झाल्या नाहीत, तर वर्षभर लॉन्स व मंगल कार्यालये बंद ठेवण्याचा पवित्रा आम्हाला स्वीकारावा लागेल. नागरिकांची गैरसोय होऊ नये ही आमची भावना असून, महापालिका प्रशासनाने मध्यम मार्ग काढून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

(समाप्त)

--

मटा मालिका

शुभमंगल 'सावधान' : भाग ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरही ‘आयमा’चा प्रचार

$
0
0

सोशल मीडियावर 'आयम'चा प्रचार

नाशिक : अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या दि. २९ मे रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली आहे. २६ पैकी २५ जागांची बिनविरोध निवड झाली असली, तरी अध्यक्षपदाच्या निवडीमुळे दोन्ही गटांतर्फे जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आल्यामुळे औद्योगिक संघटनेच्या या निवडणुकीत सदस्यांची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही गटांतर्फे सोशल मीडियाच्या वापराबरोबरच वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकता पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी वरुण तलवार, तर विरोधी गटातर्फे तुषार चव्हाण यांच्यात लढत आहे.

उद्या प्रशिक्षण

नाशिक : मविप्रच्या कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी कॉलेजच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. 'मॉडर्न टेक्निक्स इन सरफेस अॅण्ड सबसरफेस सर्वेइंग' या विषयावर हा प्रशिक्षण कार्यक्रम आधारित आहे. सदरचे प्रशिक्षण दि. २८ ते १ जूनदरम्यान सकाळी ९ ते ३.३० या वेळेत मविप्रच्या केबीटीच्या स्थापत्य विभागातील सेमिनार हॉलमध्ये होईल. या कार्यक्रमात मेरी, मुक्त विद्यापीठ, भूमिअभिलेख या विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत.

पार्किंगमध्ये कचरा (फोटो)

पंचवटी : रामकुंड पार्किंगमध्ये कचऱ्या ढिगारा साचलेला आहे. होळकर पुलाच्या दक्षिणेच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या जागेत आजूबाजूच्या परिसरातील कचरा गोळा करून येथे टाकण्यात आलेला आहे. या ढिगाऱ्यात पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, शहाळे, कपडे आदी वस्तू आहेत. साचलेल्या कचऱ्याची परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा त्वरित उचलून घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

संशोधनास चालना -२

बेधडक प्रश्नांची सरबत्ती! ..3

कारवाईची टांगती तलवार-4

क्रिकेटची कसोटी -५

जिव्हाळ्याचा जिना -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विनोदी कथा श्रोत्यांच्या पसंतीच्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कथाकथन हा प्रकार वक्ता आणि श्रोते मिळून आनंद व्यक्त करणारा आहे. विनोदी श्रोत्यांना विनोदी कथा पसंत पडतात, असे प्रतिपादन कथाकार विवेक देशपांडे यांनी केले. ओम गुरुदेव हास्य सरिता, गुलमोहर नगर, म्हसरूळ यांच्या वतीने सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी विनोदी व गंभीर कथांनी सातवे पुष्प गुंफले.

म्हसरूळ येथे झालेल्या व्याख्यानाप्रसंगी महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, केशवराव गायकवाड, हरिश्चंद्र वाळेकर, अरविंद भामरे आदी उपस्थित होते. विवेक देशपांडे यांनी माझा फर्स्ट क्लास प्रवास या कथेतून एक छोटे कुटुंब फर्स्ट क्लासने प्रवास करताना कशा प्रकारे आनंद लुटतात हे सांगितले. फॉरेन या कथेतून प्रत्येकाचे परदेशी जाण्याचे स्वप्न असते आणि अचानक कुटुंबाला परदेशी जाण्याचा योग आला तर घडणारे मजेशीर प्रसंगाचे कथन केले. मवाली ही एका बेरोजगार तरुणाची कथा असून आई आणि मुलांच्या प्रेमातील राग व लोभाचे प्रसंग कसे घडतात ते त्यांनी सांगितले. प्रेमा विषयीच्या कथेत एक प्रेमवीर मुलीच्या प्रेमात पडायचेच असे ठरवून खूप धडपड करतो. त्यातून घडणाऱ्या मजेदार प्रसंगीची खुमासदारपणे मांडणी केल्याने श्रोत्यांनी कथाकथनाचा आनंद घेतला.

राजेंद्र वानखेडे, मनीषा रौंदड, डॉ. भुषण भुरे, अरुणा कुलकर्णी या प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. रंजना वाळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंविरोधात एल्गाराची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील कामाच्या अतिताणापायी जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांच्यासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी अधिकारी व कर्मचारी संघटना आता एकवटायला लागल्या असून, त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात एल्गार करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांपासून आयुक्त तुकाराम मुंढेंनी शिस्त व गतिमान प्रशासनासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्याने अधिकारी व कर्मचारी धास्तावले असून, तणावाखाली आले आहेत. त्यामुळे एकीकडे कामाचा अतिताण आणि दुसरीकडे कारवाईच्या भीतीने अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. त्यामुळे आता अधिकारी आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहेत.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यापासून शिस्तीचा बडगा उगारला आहे. कामात अनियमितता करण्यासह नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर निलंबनासह बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास १७ अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले असून, डझनभर कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी दडणपणाखाली आहेत. महापालिकेत अगोदरच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा असताना शिल्लक कर्मचारी व अधिकाऱ्यांवरच कामाचा अतिताण आहे. एकेका अधिकारी व कर्मचाऱ्याकडे अधिकाधिक विभागांचा पदभार आहे. त्यातच आयुक्तांनी सुरू केलेल्या एनएमसी ई कनेक्ट या तक्रार निवारण प्रणालीत २४ तासांत तक्रारीची दखल घेणे बंधनकारक केल्याने अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र तणावात आहेत. तक्रारींचा वेळेत निपटारा झाला नाही, तर थेट निलंबनाची व कारवाईची नोटीस हातात पडत असल्याने सर्वच अधिकारी व कर्मचारी दहशतखाली काम करीत आहे.

वारंवारच्या इशाऱ्याने संताप

सकाळी नऊ वाजता घरून निघाल्यावर रात्री किती वाजता घरी परतायचे याची वेळच निश्चित राहिलेली नाही. त्यातच रोज अतिक्रमण, निलंबन, हातोडा, बडतर्फ असे शब्द कानावर पडत आहेत. सुटीचा दिवसही आता महापालिकेलाच द्यावा लागत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून, ते तणावाखाली आले आहेत. या अतितणावाचाच धसका रवींद्र पाटील यांनी घेतल्याने त्यांनी असा प्रकार केल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धमक्या, निलंबन आणि कारवाईचा इशारा दिला जात असल्याने ते संतप्त झाले असून, आता अशा घटना होऊ नये यासाठी एकवटले आहेत. रोजच्या कारवाईच्या धमक्यांना कंटाळल्याने आता वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्याचा विचार अधिकारी संघटनेत सुरू झाला असून, त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले जाणार आहे.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सध्या प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. पाटील यांची घटना वेदनादायी असून, त्यांच्यावर टाकलेल्या दडपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी आयुक्त मुंढेच जबाबदार ठरणार असून, त्यांच्यावर कारवाई केली जावी.

-प्रवीण तिदमे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानहानीच्या बदल्यात सूडबुद्धी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत ग्रीन फिल्ड लॉन्सवरील बेकायदा कारवाई अंगलट आल्याने हायकोर्टात माफीनामा सादर करण्याची नामुष्की ओढावलेल्या महापालिका प्रशासनाने ग्रीन फिल्डचे संचालक प्रकाश मते यांच्या इतर मालमत्तांना नोटिसा पाठवून सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले आहे.

विशेष म्हणजे हायकोर्टातील अपमानाचा बदला घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वीची पावसाळ्यातील पुराची दुर्घटना शोधून काढत त्यांच्यावर नोटिसांचा भडिमार सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी गोदावरीच्या महापुरात मतेंची मालकी असलेल्या केनिंगस्टन क्लबची संरक्षक भिंत कोसळून महापालिकेची गॅबियन वॉल कोसळल्याचा दावा करीत त्यापोटी १ कोटी ४० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी नोटिशीद्वारे महापालिकेने केली आहे. अस्तित्वात नसलेला नदीपात्रातील मलबा चोवीस तासांत न काढल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

उच्च न्यायालयात झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आता आता प्रशासनाने अफलातून कारणे शोधून काढली आहेत. चांदशी शिवारात प्रकाश मते व विक्रांत मते यांच्या मालकीचा केनिंगस्टन क्लब आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गोदावरीला आलेल्या महापुरात या क्लबची संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे महापालिकेच्या नदीपात्रातील गॅबियन वॉलचेही नुकसान झाले होते. प्रशासनातील बाबूंनी आता २०१६ चे प्रकरण उकरून काढले असून, आरसीसी संरक्षक भिंत महापालिकेच्या गॅबियन वॉलवर पडल्याने आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. याबाबत मते यांना नोटीस बजावण्यात आली असून, गॅबियन वॉलच्या नुकसानभरपाईपोटी १ कोटी ४० लाखांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गोदावरी पात्रात पडलेल्या मलब्यामुळे नदीच्या प्रवाहाची रुंदी कमी झाल्याने पूरजन्य आपत्ती निर्माण झाल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी दिलेल्या नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. नदीपात्रात पडलेला हा मलबा २४ तासांत न हटविल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेची ही कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप मते यांच्याकडून करण्यात आला आहे. सोबतच पर्यावरण विभागानेही त्यांच्याविरोधात प्रदूषण प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पालिकेचेच बांधकाम निकृष्ट

सिंहस्थानिमित्त महापालिकेने गोदाकाठी रस्ता बांधला. वास्तविक ही जागा महापालिकेच्या मालकीची नव्हतीच. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे २०१३पासूनच या रस्त्याला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गोदावरीला आलेल्या महापुरात या रस्त्याचा काही भाग, तसेच नदीपात्रातील गॅबियन वॉल ढासळली. याबाबत आपण २३ ऑक्टोबर २०१७ रोजी महापालिकेला पत्राद्वारे सूचितही केले होते; परंतु, पालिकेने दुर्लक्ष केले. महापालिकेच्या पॅनलवरील वास्तुविशारद धुमणे यांनीदेखील या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करीत पुराच्या पाण्यात गॅबियन वॉल वाहून गेल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर केनिंगस्टन क्लबची आरसीसी संरक्षक भिंत बांधली गेली. त्यामुळे पालिकेमार्फत केली जात असलेली कारवाई निव्वळ सूडबुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप मते यांनी केला आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे. महापालिकेची चूक आमच्यावर ढकलली जात असून, आम्ही या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे, असे केनिंगस्टन क्लबचे संचालक विक्रांत मते यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच ड्रग्जनिर्मिती; संशोधकास अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरातल्या प्रयोगशाळेतच मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्जनिर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका संशोधकासह त्याच्या साथीदाराला क्राइम ब्रँचच्या पथकाने अटक केली असून, संशयितांकडून तब्बल एक कोटी ८० लाख ४७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघांनी घरातच एमडी ड्रग्ज निर्मितीचा उद्योग सुरू केला होता. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन कोटी २० लाख रुपयांचे २५ किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे.

अरविंद कुमार (वय ३४, मुंबई) आणि हरिश्चंद्र उर्वादत्त पंत (२४, रा. बोईंसर, ठाणे) अशी या संशियितांची नावे आहेत. अरविंद कुमार एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) झाला असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर येथील आहे. शिक्षणानंतर नोकरीसाठी तो मुंबईत आला. येथे त्याने १० वर्षे वेगवेगळ्या औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये काम केले. शेवटची नोकरी सोडली त्या कंपनीत तो सहाय्यक संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होता. नोकरीत मनासारखे पैसे मिळत नसल्याने अरविंद कुमारने बी.एस्सी.चे शिक्षण अर्धवट सोडलेल्या पंतला सोबतीला घेऊन एमडी ड्रग्जनिर्मितीचा धंदा सुरू केला. मागील तीन वर्षांपासून ते ड्रग्जची बेमालूमपणे निर्मिती करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे, नंदुरबारला साखरेचे वाटप

$
0
0

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पेट्रोल-डिझेलच्या भडकलेल्या दरांमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत शहरातील श्रीराम पेट्रोल पंपावर युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानहून आयात केलेली साखर वाटून अनोखे निषेध आंदोलन केले.

एकीकडे सीमेपार पाकिस्तानकडून गोळीबार केला जाता आहे. भारतीय जवान त्यात जखमी होऊन अनेक नागरिक जायबंदी झाले आहे. देशप्रेम दाखविणाऱ्या भाजपने महिनाभरासाठी बंद केलेल्या दहशतवादविरोधी कारवाई आणि शस्त्रसंधीच्या घोषणेचा फायदा घेत पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. मात्र, आपले केंद्र सरकार त्याच पाकिस्तानची साखर आयात करून देशाला कोणता नवीन संदेश देत आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, उपाध्यक्ष सुरेखा बडगुजर, प्रभा परदेशी, संगीता देसले, बानुबाई शिरसाठ, योगेश विभुते, रफिक शाह, इम्तियाज पठाण, महेश कालेवार आदी उपस्थित होते.

नंदुरबारलाही निषेध
देशाच्या जनतेला मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून केवळ आश्वासने दिली आहेत. एकीकडे देशातील महिलांवर अत्याचार वाढत आहे. तरुणांची फसवणूक होत असून ते बेरोजगार होत आहेत. शेतमजूर, शेतकरी हैराण होऊन आत्महत्या करीत आहेत. याच्या निषेधार्थ नंदुरबारात शनिवारी सकाळी ११ वाजेला धुळे चौफूलीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. आंदोलनात दत्तू चौरे, सभापती विक्रमसिंह वळवी, बी. के. पाटील, डॉ. सयाजी मोरे, कैलास पाटील, रवींद्र पवार, लकी रघुवंशी, कुणाल वसावे, हिरालाल चौधरी, भरत पाटील, पुरुषोत्तम पाटील, अंकुश पाटील, गोपाल पवार, नरेश पवार आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन्ही पॅनलतर्फे आरोप-प्रत्यारोप

$
0
0

जातीयवादी प्रचार, धमक्या दिल्याचेही आरोप

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या २९ मे रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात रविवारी दोन्ही पॅनलने पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप केले. या निवडणुकीत २६ पैकी २५ जागांची बिनविरोध निवड झाली असली तरी अध्यक्षपदाच्या निवडीमुळे दोन्ही गटातर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपही होऊ लागल्याने उद्योजकांच्या संघटनेतील हे 'उद्योग' चर्चेचे ठरले आहेत.

या निवडणुकीत एकता पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी वरुण तलवार, तर विरोधी गटातर्फे तुषार चव्हाण यांच्यात लढत आहे. सुमारे १५०० सदस्य असलेल्या या औद्योगिक संघटनेमध्ये सर्व जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसल्यामुळे अध्यक्षपदासठी ही निवडणूक होत आहे. रविवारी दोन्ही गटांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. एकता पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार वरुण तलवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आयमाचे माजी अध्यक्ष धनजंय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, पी. एस. पाटील, राधाकृष्ण नाईकवाडे, जितेंद्र आहेर, सचिन शर्मा हे उपस्थित होते. विरोधी गटाचे उमेदवार तुषार चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेला संजय महाजन, कैलास आहेर, हिमांशु कणानी, बाळासाहेब गुंजाळ, राजेंद्र नागरे, जयंत पवार, नीलेश पवार उपस्थित होते.

आयमामध्ये एकाधिकारशाही : तुषार चव्हाण

आयमा निवडणुकीत एकाधिकारशाही व घराणेशाहीने प्रवेश केला आहे. त्यामुळे मनमानी वाढली आहे. गेल्यावेळेस अध्यक्षपदासाठी मला शब्द दिला होता. तो पाळण्यात आलेला नाही. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यात उपाध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. पण, त्यालाही मान्यता दिली नाही. त्यामुळे निवडणूक लढवत आहोत. संस्थेचा फायदा व्हावा म्हणून केलेल्या तक्रारीमुळे आयमाला फायदा झाल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

जातीयवादी प्रचार व धमक्या : वरुण तलवार

आयमाच्या निवडणुकीत जातीयवादी प्रचार केला जात आहे. ही उद्योजकांची संघटना असून, येथे जातीवर काहीच ठरत नाही तर कतृत्व व कामावर त्याची निवड केली जाते. गेले अनेक वर्षे मी संस्थेसाठी काम केल्यानंतर मला ही संधी मिळाली असल्याचे एकता पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार वरुण तलवार यांनी सांगितले. विरोधी गट जातीयवादी मेसेज पाठवून निवडणुकीला जातीयतेचा रंग देत आहे. त्याचप्रमाणे काही उद्योजकांना धमक्या सुध्दा दिल्या जात आहेत. धनजंय बेळे यांनी सांगितले, की तुषार चव्हाण यांना आतापर्यंत कोणताच शब्द दिला नाही. ही खासगी संस्था नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता अभियंत्याचा लागेना थांगपत्ता...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या ताणतणावाला कंटाळून जीवन संपवीत असल्याचा उल्लेख असलेली चिठ्ठी ठेवून शनिवारी बेपत्ता झालेल्या महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक अभियंत्याचा रविवारी दुसऱ्या दिवशीदेखील थांगपत्ता लागलेला नाही. संबंधित अभियंत्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

रवींद्र प्रेमनाथ पाटील (वय ४२, रा. डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड) हे शनिवारी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके पाटील यांना शोधण्यासाठी तैनात केली आहेत. मात्र, ठिकठिकाणी तपास करूनही रविवारी सायंकाळपर्यंत त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील आपला मोबाइल वाहनातच ठेवून निघून गेलेले आहेत. शनिवारपासून त्यांचा शोध घेतला जात असून, त्यांचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे.

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जाण्यासाठी म्हणून रवींद्र पाटील शनिवारी पहाटे घराबाहेर पडले होते. काही वेळाने कामानिमित्त त्यांच्या पत्नी घराबाहेर आल्या असता पाटील यांची कार घराजवळच असल्याचे आढळून आले. त्यांच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही कारमध्ये असल्याचे दिसून आले. कारचे दरवाजे उघडले असता मोबाइलसह कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली. या चिठ्ठीमध्ये आपण जात आहोत, कोणाचे वाईट केलेले नाही, तसेच आपला शोध घेऊ नये, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे.

--

शहरासह अन्यत्रही शोध

पोलिसांच्या एका पथकाने रविवारी पुन्हा एकदा गोदावरी नदीवरील धरण ते रामकुंड या परिसरात शोध घेतला. दुसऱ्या पथकाने शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके, तेथील सीसीटीव्ही, शहरानजीक असलेली पर्यटनस्थळे अशा ठिकाणी पाटील आढळतात का, या दृष्टीने तपास केला. पोलिसांनी धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, मुंबई, तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांना त्यांचे छायाचित्र पाठवून शोध घेण्याची विनंती केली आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंतही पाटील यांचा पत्ता लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

--

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

पाटील हे सर्वांत शेवटी नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे शनिवारी सकाळी दिसले होते. तेथील, तसेच शहरातील बस स्थानकांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यानंतर यादरम्यान आलेल्या व गेलेल्या सर्व रेल्वे गाड्यांबाबत पोलिसांनी माहिती घेतली. पोलिसांनी लागलीच मुंबई येथेही पाटील यांच्याबाबत कळविले आहे.

--

सर्व बाबी घेणार रॅकार्डवर

याबाबत सूत्रांनी बोलताना सांगितले, की कार्यालयीन त्रासामुळे पाटील यांनी घर सोडल्याचे सांगितले जात आहे. हायकोर्टाने नुकताच महापालिकेविरोधात निकाल दिला. या सर्व घटना-घडामोडी या केसशी संबंधित असून, तपासाच्या दृष्टीने त्या रेकार्डवर घेतल्या जाणार आहेत. पाटील सापडणे महत्त्वाचे असून, त्यांचे धागेदोरे सापडण्याबाबत अद्याप एकही क्लू समोर आला नसल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्रा चावल्याने बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काही महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या बालकाचा शनिवारी (दि.२६) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अनिल दत्ता बोराडे (वय १२ रा. इंदिरानगर, जेलरोड) असे या बालकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या घरासमोर खेळत असतांना त्यास कुत्र्याने चावा घेतला होता. या घटनेत जखमी झाल्याने त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी अचानक त्याची प्रकृती खालवली. वडील दत्ता बोराडे यांनी त्यास लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुपारच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

संशयितास अटक

नाशिक : चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधारात लपून बसलेल्या सतीश संजय खरात (वय २३, रा. महाकाली चौक, मंदिराजवळ, सिडको) यास पोलिसांनी अटक केली. इंदिरानगर पोलिस स्टेशनचे गस्ती पथक शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना संशयित आरोपी पाथर्डी फाटा परिसरातील शांती निकेतन सोसायटीच्या भिंतीलगत लपलेला दिसला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप देवराम लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस स्टेशला गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रहीन बांधवांकडून रक्तदानरुपी ‘अंजन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सुटीत भासणारा रक्ताचा तुटवडा ध्यानात घेऊन राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या दहा नेत्रहीन बांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सुदृढ डोळस व्यक्तींच्या डोळ्यांत जणू अंजनच घालताना इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित केले आहे.

'ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहात चलो' असा संदेश नेहमीच सर्वांच्या कानी पडत असतो. मात्र, त्याचे अनुकरण करणारे फार कमी असतात. विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना उन्हाळ्यात रक्ताची तीव्र गरज असते, ही गरज ओळखून नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या दहा नेत्रहीन बांधवांनी रक्तदान करून जणू समाजापुढे अनुकरणीय आदर्शच उभा केला आहे.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन, हौसला फाऊंडेशन, अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ मे) दिवंगत समाजसेवक जेम्स अँथनी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून हे रक्तदान शिबिर आयोजित करीत असून, यंदा संस्थेचे मार्गदर्शक हरीश बैजल यांच्या नेतृत्वाखाली योगा हॉल, अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबकेश्वररोड येथे सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनतर्फे दहा नेत्रहीन बांधव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य, हौसला फाउंडेशन, जेम्स अँथनी यांची फुटबॉलप्रेमी मित्रमंडळी यांच्यासह १५० हून अधिक व्यक्तींनी या शिबिरात रक्तदान केले. या व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठीच्या भावनेतून रक्तदान करू शकतात, तर सामान्य नागरिकांनी नक्कीच रक्तदान करायला हवे, असे आयपीएस अधिकारी हरीश बैजल म्हणाले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुटी आणि पर्यावरणीय बदल यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा भासतो. म्हणून या दिवसांत रक्तदान शिबिरे आयोजित व्हायला हवीत, असेही बैजल म्हणाले.

...यांनी घेतला पुढाकार

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर व्यायामासाठी येणाऱ्या अनेकांनी या शिबिरात सहभाग घेतला आणि शिबिर याच ठिकाणी घेण्याचा निर्णय सार्थकी लागल्याची भावना यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी व्यक्त केली. एकूण १५० हून अधिक रक्तपिशव्या संकलित झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सचिव नितीन भोसले, उपाध्यक्ष योगेश शिंदे, मार्गदर्शक शैलेश राजहंस, सदस्य वैभव शेटे, नीता नारंग, पल्लवी पवार यांच्यासह ब्लाइंड वेल्फेअरचे अरुण भारस्कर, हौसलाचे तेजस चौहान, अक्षय जोंधळे, अनिल सिंग आदींनी रक्तदान करीत इतर दात्यांना रक्तदान करण्यास मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग फोटो

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images