Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाद मतांतही दराडेंची आघाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गेल्या वेळी शंकास्पद मतपत्रिकांवरूनच वाद निर्माण झाला होता. या शंकास्पद मतदानामुळे अटीतटीची निवडणूक होऊन वाद शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. त्यामुळे या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम शंकास्पद मते बाजूला काढण्याचा निर्णय दोन्ही उमेदवारांच्या संमतीने घेतला गेला. १३ मते शंकास्पद आढळली. मात्र, या मतांमध्येही दराडे यांची आघाडी होती.

दोन मतपत्रिकांवर दराडे यांना प्रथम क्रमांकाचा पसंतीक्रम देत त्याभोवती बॉक्स करण्यात आला होता, तर आठ मतपत्रिकांवर खाली-वर पसंतीक्रमांक टाकण्यात आला होता. एक मतपत्रिका कोरी आढळली. एका मतपत्रिकेवर दराडे यांच्या नावासमोर एक क्रमांक टाकून पुढे रेषा आखण्यात आल्या होत्या. अन्य एका मतपत्रिकेवर दराडे यांच्या फोटोखाली पसंतीक्रम टाकण्यात आला होता. १३ पैकी १२ मतपत्रिकांवर दराडे यांनाच पसंतीक्रम दर्शविण्यात आला होता, तर एक मतपत्रिका कोरी होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्व मतपत्रिका बाद केल्या.

उमेदवारांसमोर स्ट्राँग रूममधून सकाळी साडेसहाला मतपेट्या केंद्रावर आणण्यात आल्या. मतांची खातरजमा केल्यानंतर सकाळी आठला प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दोन टेबलांवर मतमोजणी झाली. एका टेबलवर उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तर दुसऱ्या टेबलवर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला २५ मतपत्रिकांचे २५ गठ्ठे आणि १९ मतपत्रिकांचा एक असे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते दोन टेबलांवर समसमान वाटण्यात आले. मतमोजणी सकाळी दहा वाजता पूर्ण झाली असली तरी आयोगाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत निकाल घोषित करण्यात आला नाही. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अधिकृत निकाल जाहीर करीत दराडे यांना प्रमाणपत्र दिले.

दराडे-सहाणे-कोकणी एकत्र

मतमोजणीला सुरुवात होताच दराडे आणि सहाणे यांनी एकमेकांजवळ बसून मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत हितगूज केले. दोघांनी बराच वेळ चर्चा करीत हास्यविनोद केले. त्यानंतर अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनीही मतमोजणी केंद्रात हजेरी लावली. नंतर तिघेही हास्यविनोद रंगले. या निवडणुकीत झालेल्या 'लक्ष्मीदर्शना'ची आणि मतदारांकडून आलेल्या कटूगोड अनुभवांच्या शिदोरीची एकमेकांनी देवाण-घेवाण केली.

--

कोट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मी विजयी होऊ शकलो. सर्वच पक्षांतील मतदारांनी मला मते दिली आहेत. सर्वांशी माझे चांगले संबंध असल्याचा फायदा झाला. त्यामुळे पक्षीय समीकरणातून विजय सोपा झाला. जातीपातीचा विचार न करता सर्वच जण पाठीशी राहिले.

- नरेंद्र दराडे, विजयी उमेदवार, शिवसेना

भाजपने धोका देत माझी फसवणूक केली. मी अपक्ष असलो तरी भाजपने मला पाठिंबा दिला असता तर नक्कीच माझा विजय झाला असता. मात्र, आज निकालाकडे नजर टाकली असता भाजपच्या पदरी काय पडले, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे भाजपने स्वत:सह राष्ट्रवादीचा पराभव ओढ‌वून घेतला आहे.

- परवेझ कोकणी, अपक्ष उमेदवार

- पराभव मी मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे. मतदार धनशक्तीच्या मागे उभे राहिले हे स्पष्टच झाले. चांगला सुसंस्कृत, सभ्य आणि निष्कलंक उमेदवार मतदारांना नको होता. दराडे यांना मतदान करणाऱ्यांनी जिल्ह्यातील ४५ लाख जनतेचा अपमान केला आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही माझ्या विरोधात काम केल्याने त्याचाही फटका बसला.

-अॅड. शिवाजी सहाणे, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडको बचाव समिती कारवाईप्रश्नी आक्रमक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या कठोर भूमिकेविरोधात सिडको बचाव संघर्ष कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीतर्फे सोमवारी (दि. २८) राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, समितीच्या कार्यक्रमांत कोणत्याही राजकीय पक्षांचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

गुरुवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. सिडकोतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. त्याला नागरिकांनी विरोध दर्शविला असला, तरी महापालिकेतर्फे सलग तीन दिवस रेखांकनाचे काम करण्यात आले. त्यामुळे या मोहिमेविरोधात सर्वच पक्षांनी आपापल्या परीने भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी सिडको बचाव संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या समितीच्या माध्यमातून उपमहापौर प्रथमेश गिते यांना ही मोहीम स्थगित करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर याच समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून निर्णय घेण्यासाठी गुरुवारी बैठकी घेण्यात आली. यावेळी आमदार डॉ. हिरे यांच्यासह माजी नगरसेवक बळीराम ठाकरे, मुरलीधर भामरे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष वैभव देवरे यांच्यासह मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

यावेळी मुरलीधर भामरे, नितीन माळी, वैभव देवरे, मुकेश शेवाळे, बी. एल. श्रीवास्तव, बाळा भाटिया, डॉ. संदीप मंडलेचा, नाना ठोंबरे, शांताराम देवरे, संतोष हरगोडे, विजय अहिरे, कैलास खैरनार, जिभाऊ बच्छाव, संजय मोरे, ओंकार पाटील, स्वप्निल जाधव, पंकज आरोटे, मयूर साळुंखे, विनायक क्षीरसागर, ज्ञानेश्वर वानसे, रमाकांत देसले, अरुण महाले, भरत रोकडे आदींसह हजारो सिडकोवासीय उपस्थित होते.

सेक्टरप्रमाणे बांधावी मोट

महापालिकेच्या कारवाईविरोधात सेक्टरप्रमाणे मोट बांधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, की सिडकोच्या सुरुवातीच्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत हे आंदोलन पेटले पाहिजे. त्यासाठी २५ हजार घरांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोक या आंदोलनात सहभागी झाले पाहिजेत. सिडकोने अनेक योजना गुंडाळल्या. स्कीम काढून प्लॉट पाडलेत. सिडकोने तरी सिडकोच्या प्लॅनप्रमाणे योजना उभारली आहे का, याची आधी चौकशी करावी आणि मगच अतिक्रमणांना हात लावावा.

प्रसंगी रस्त्यावर उतरणार

आमदार डॉ. हिरे म्हणाले, की सिडकोवासीयांवर अन्याय होऊ नये यासाठी या निष्पक्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोकडून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केलेले असतानाही महापालिका ते अतिक्रमण कसे ठरवू शकते, असा प्रश्न उपस्थित करून महापालिकने ही मोहीम थांबविलीच पाहिजे, असे सांगितले. प्रसंगी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आयुक्त शनिवारी (दि. २६) कोर्टाच्या कामाने बाहेरगावी राहणार असल्याने सर्वांच्या साक्षीने सोमवारी (दि. २८) धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेतेमंडळीची पाठ

निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी चढाओढ करणारी राजकीय नेतेमंडळी सध्या मात्र सिडकोत सुरू असलेल्या मोहिमेबाबत मूग गिळून गप्प बसल्याचे दिसत असून, सिडको बचाव संघर्ष समितीच्या गुरुवारच्या बैठकीकडे सिडकोतील नगरसेवकांबरोबरच राजकीय नेत्यांनीही पाठ फिरविल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणत्याही राजकीय पक्षाचा या समितीला बॅनर नसताना राजकीय नेते किंवा नगरसेवकांनी याकडे पाठ का फिरविली, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून पक्षविरहित एकीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका - स्थगिती

0
0

सिडकोतील वाढीव बांधकामांना अतिक्रमित ठरवून पाडकाम करू पाहणाऱ्या नाशिक महापालिकेच्या कारवाईला जनक्षोभामुळे थेट मुख्यमंत्र्यांनीच स्थगिती दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सिडकोच्या घरकुल योजना गेल्या वर्षीच महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या. तेथील बांधकामांना नगररचनेचे नियम लागू झाल्याचा दावा करीत महापालिकेने तेथील तब्बल पंचवीस हजार घरांचे अतिक्रमण हुडकून काढत पाडकामासाठी रेखांकन सुरू केले होते. त्याविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्याला न जुमानणाऱ्या आयुक्तांना अखेर मुख्यमंत्र्यांचा डोस कामी आलेला दिसतो. अधिकाराच्या दर्पात सारासार विवेकाचा विसर पडू देता कामा नये, हा संदेश यातून सर्वांनीच घ्यायला हरकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ अभियंत्यांच्या बदल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासह शिस्त लागण्यासाठी आता बदलीसत्र सुरू केले असून, गुरुवारी एकाच दिवशी २२ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या सर्व २२ अभियंत्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभारी शहर अभियंता संजय घुगेंकडे सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभाग सोपवण्यात आला आहे, तर पाणीपुरवठा विभागाची दोन विभागांत फोडणी करीत स्वतंत्र दोन विभाग करण्यात आले आहेत.

महापालिकेत मोठ्या प्रमाणावर खांदेपालटाला आयुक्त मुंढेंनी सुरुवात केली आहे. त्यांनी गुरुवारी महापालिकेतील २२ अभियंत्यांच्या एका झटक्यात बदल्या करून मोठा दणका दिला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची बदली नगररचना विभागात करण्यात आली आहे. प्रभारी शहर अभियंता घुगे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग सोपविण्यात आला आहे. शिवाजी चव्हाणके यांच्याकडे पंचवटी, पूर्व व नाशिकरोड विभाग पाणीपुरवठा, तर नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग चव्हाण यांच्याकडे पश्‍चिम, सिडको व सातपूर पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे यांच्याकडे नाशिकरोड, सिडको व सातपूर बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. प्रशांत पगार यांची बदली ट्रॅफिक सेलमध्ये करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या गडावर शिवसेनेचा भगवा

0
0

दराडेंचा सहाणेंवर १६७ मतांनी दणदणीत विजय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राष्ट्रवादीच्या गडाला शिवसेनेने धक्का दिला. प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांचा तब्बल १६७ मतांनी मानहानिकारक पराभव केला. शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीला बळ देणाऱ्या भाजपलाही शिवसेनेने जोरदार ठोसा लगावला असून, मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनाही तोंडघशी पाडले. या निवडणुकीत दराडे यांना ३९९, तर राष्ट्रवादीचे सहाणे यांना २३२ मिळाली.

या विजयाने राष्ट्रवादीचा नाशिकचा गड शिवसेनेने हिसकावला असून, राष्ट्रवादीसह भाजपचीही पीछेहाट झाली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाही तोंडघशी पाडले. त्यामुळे कमी मते असतानाही शिवसेनेने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला नाशिकचा गड खेचून आणला आहे.

नाशिक विधान परिषदेसाठी शिवसेनेचे दराडे आणि राष्ट्रवादीचे सहाणे यांच्यात सरळ लढत होती. सोमवारी झालेल्या मतदानात ६४४ सदस्यांना मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे शंभर टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्कंठा टिपेला पोहोचली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या इमारतीत गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. गेल्या वेळेसारखा वाद होऊ नये म्हणून सर्वप्रथम नोटा व शंकास्पद मते बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ६४४ पैकी १३ मते शंकास्पद आढळली. उमेदवारांच्या संमतीने ही मते अखेर बाद ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण ६३१ मते वैध ठरली. उमेदवारांना निवडून येण्यासाठी ३१६ चा कोटा निश्‍चित झाला. सकाळी दहापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. पहिल्याच फेरीत दराडे यांनी ३१६ चा आकडा पार करीत ३९९ मते मिळवली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सहाणे यांना २३२ मतांवरच समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनी अंतिम क्षणी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने कोकणी खातेही उघडू शकले नाहीत. मात्र, सेनेसाठी कोकणींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे.

सहाणेंचा काढता पाय

गेल्या वेळची संधी हुकल्याने अॅड. शिवाजी सहाणेंनी दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी स्वयंघोषित उमेदवारीमुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत जोर लावला होता. अखेरच्या चरणात सेना, राष्ट्रवादीत झालेल्या दुरंगी लढतीत भाजपच्या पाठिंब्याने अॅड. सहाणेंचे पारडे जड मानले जात होते. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होताच आपणच निवडणूक जिंकणार, या अविर्भावात सहाणे दाखल झाले होते. मात्र, तासाभरात निकालाचा कल लक्षात येताच त्यांनी मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतला. या वेळी त्यानी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही काढता पाय घेतला.

एकूण मते : ६४४

बाद मते : १३

वैध ठरलेली मते : ६३१

विजयासाठी आवश्यक मते : ३१६

उमेदवारांना मिळालेली मते

नरेंद्र दराडे (शिवसेना) : ३९९

अॅड. शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी) : २३२

परवेझ कोकणी (अपक्ष) : ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचारी जाणार संपावर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केवळ दोन टक्के तुटपुंजी वेतनवाढ देण्याचे प्रस्तावित केल्यामुळे बँक कर्मचारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपाअगोदरच नाशिकमध्ये ठिकठिकाणी बँकेचे कर्मचारी विविध मार्गाने निषेध व्यक्त करीत आहेत. स्टेट बँकेच्या कर्मचारी संघटनेने गुरुवारी गंगापूर रोडवरील शाखेसमोर स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन व यूएफबीयूच्या झेंड्याखाली जोरदार निदर्शने केली.

यापूर्वीही आंदोलनाचा भाग म्हणून ८ व ९ मे रोजी देशभर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. बँक कर्मचारी व अधिकारी वर्गाची वेतनवाढ ही दर पाच वर्षांनी होत असते. यात बँक कर्मचारी संघटना व बँक व्यवस्थापन यांच्यात वेतनासंबंधी वाटाघाटी होऊन वेतनकरार अस्तित्वात येतो. याला द्विपक्षीय करार असे म्हटले जाते. गेल्या वेळी वेतनवाढ ही २०१२ ते २०१७ या कालावधीसाठी होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये कराराची मुदत संपली आहे. मागील वेतनकाराराची मुदत संपल्यानंतर अधिकृतपणे बोलणीला सुरुवात झाली. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही सरकारकडून सकारात्मक चिन्हे दिसत नसल्याने शेवटी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख विद्यार्थ्यांना लिंबू-पाणी

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

एमकेसीएलच्या एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना लिंबू-पाण्याची प्रत्येकी शंभर पाकिटे वाटण्याचा अभिनव उपक्रम यंदा राबविण्यात आला. उष्माघातापासून विद्यार्थ्यांचे रक्षण व्हावे, या त्यामागील उद्देश होता. एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक मकरंद बेलगावकर आणि विभागीय समन्वयक सुभाष पाटील यांनी ही माहिती 'मटा'ला दिली.

लिंबू-पाणी ही एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची संकल्पना आहे. यंदाचा उन्हाळा तीव्र होता. मार्च ते मेदरम्यान एमएस-सीआयटीला प्रवेश घेतलेल्या राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना ही पाकिटे देण्यात आली. जिल्ह्यात २५ हजार जणांनी या कोर्सला प्रवेश घेतला आहे. त्यांनाही त्याचा लाभ देण्यात आला. हा कोर्स चालविणारी राज्यात साडेपाच हजार, तर जिल्ह्यात तीनशे केंद्रे आहेत. त्यांच्यापर्यंत लिंबू-पाणी पाकिटाची पोती पोहोचविण्यात आली. कोर्ससाठी विद्यार्थी उन्हाचा सामना करीत येतात. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघात होऊ शकतो. हे लक्षात घेऊन लिंबू-पाण्याची पाकिटे देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला मोठे पाकीट देण्यात आले. त्यात लहान तीस पाकिटे आहेत. ती महिनाभर पुरतात. एका लहान पॅकटमध्ये पाणी टाकल्यावर मोठा ग्लास सरबत तयार होते.

या उपक्रमाचा संपूर्ण खर्च एमकेसीएलने केला. त्याचा भार विद्यार्थ्यांवर येऊ दिला नाही. पॅकेटसोबत प्रत्येकाला विवेक सावंत यांचे दोन पानी पत्र देण्यात आले. त्यात उष्माघात का होतो, त्याची लक्षणे कोणती, त्यावर उपाय काय आदी माहिती आहे.

आता दोन महिने

एमकेसीएल अभ्यासक्रमाचे हे सोळावे वर्ष आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांऐवजी आता दोन महिन्यांचा झाला आहे. नव्या अभ्यासक्रमात तब्बल दोनशे आयटी कौशल्ये शिकवली जातात. ऑनलाइन जातीचा दाखला, जन्मदाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड आदी ही कौशल्ये आहेत. याशिवाय वर्ड एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट आदींबरोबरच इंग्रजी व मराठी टायपिंगचे प्रशिक्षणही दिले जाते. दोन महिन्यांच्या कालावधीत पन्नास सत्रे होतात. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे त्यांची चांगली तयारी होते.

एमकेसीएलला देश-विदेशात पसंती मिळत आहे. अरब देश, इजिप्त, युरोपमध्ये हा कोर्स चालविला जातो. राजस्थान, ओरिसा, हरियाणा, बिहार आदी राज्यांतही त्याला मागणी आहे. बिहार सरकारने एक कोटी विद्यार्थ्यांना हा कोर्स देण्याचे जाहीर केले आहे. कोर्सची फी चार हजारांपर्यंत असून, त्यात पुस्तकांचाही समावेश आहे.

- सुभाष पाटील, विभाग समन्वयक

एमएस-सीआयटीच्या प्रत्येक सेंटरमधील प्रत्येक संगणकावर वेब कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेत पारदर्शकता आली आहे. विद्यार्थी येताना व जाताना बायोमॅट्रिक नोंद करतात. ते करताच पालकांच्या मोबाइलवर संदेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्याची सुरक्षा व नियमितता याबाबत पालक निर्धास्त राहतात.

- मकरंद बेलगावकर, जिल्हा समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निसुरक्षेबाबत शाळांना फेरनोटिसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या शहर परिसरातील ३० ते ४० शाळांना फेरनोटिसा काढण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच शाळांनी या उपाययोजना कराव्यात, असा महापालिकेचा मानस आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता अग्निप्रतिबंधक उपाययोजना शाळांनी करणे गरजेचे आहे. मात्र, शहर परिसरातील बहुतांश सरकारी आणि खासगी शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या सर्व शाळांना नोटीस बजावली आहे. शाळांनी अग्निसुरक्षेसाठीची उपाययोजना तातडीने करावी अन्यथा कारवाई केली जाईल असे त्यात म्हटले आहे. शहरातील ३० ते ४० शाळांनी अद्याप या नोटिशीची दखल घेतलेली नाही किंवा सुरक्षा उपाययोजनाही केलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांना फेरनोटिसा काढण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. पुढील आठवड्यात या फेरनोटिसा शाळांना प्रत्यक्ष मिळतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शाळा उघडण्याच्या तोंडावरच या शाळांवर महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन रेल्वे गाड्या रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

मुंबई विभागातील सायन आणि कुर्ला दरम्यानच्या मार्गावरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी २६ मे रोजी रात्री साडेअकरा ते २७ मेपर्यंत सकाळी साडेतीन वाजेदरम्यान स्पेशल ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही रेल्वे रद्द, तर काही दादरपासूनच माघारी फिरवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे सूत्रांनी दिली. रद्द् करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या तीन गाड्या २७ मे रोजी रद्द केल्या आहेत. यामध्ये मनमाड-मुंबई राज्यराणी, मनमाड-मुंबई पंचवटी आणि मनमाड-एलटीटी गोदावरी या एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. या शिवाय गाडी क्रमांक १०५८ अमृतसर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२८१० हावडा मेल आणि गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत न जाता दादरपर्यंतच जाणार आहेत. पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे बसला गर्दी वाढण्याची शक्यता आहे. उद्या, शनिवारी (दि. २६) सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे नोकरदारांना या गाड्या रद्दचा फारसा फटका बसणार नाही. मात्र व्यावसायीकांना बसेसचा पर्याय शिल्लक असल्यामुळे त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​बेलतगव्हाणच्या सरपंचावर अविश्वास

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

बेलतगव्हाणचे सरपंच श्रीधर धुर्जड हे ​ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज ​करीत असल्याने​ त्यांच्याविरोधात आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्‍वास ठराव ७ विरूद्ध १ मताने मंजूर झाला आहे. यामुळे त्यांना सरपंच पदावर पायउतार व्हावे लागणार आहे.

​सुनील धुर्जड ​यांसह​ सात सदस्यांनी १९ मे रोजी तहसीलदारांकडे ​​अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार २४ मे रोजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच श्रीधर धुर्जड, उपसरपंच प्रतिभा कातोरे, सुनील धुर्जड, निकिता पाळदे, शरद पाळदे, अश्‍विनी महानुभाव, वंदना कुटे, अर्चना दोंदे आदी उपस्थित होते. किरण मोरे अनुपस्थित होते. सात विरूद्ध एक अशा मताने विश्‍वास ठराव मंजूर झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (२) अन्वये श्रीधर धुर्जड यांचे सरपंच पद रद्द​​ झाले​ आहे​. सध्या जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नव्या सरपंचाची निवड होईपर्यंत उपसरपंच प्रतिभा कातोरे ​या प्रभारी सरपंच म्हणून कामकाज पाहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’मधून बहरणार कलेचे विश्व

0
0

७ वा वर्धापनदिन लोगो वापरावा

कलासंगम लोगो वापरावा

'मटा'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रस्थापित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण आणि उभरत्या कलाकारांना व्यासपीठ म्हणजे 'कलासंगम' महोत्सव. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा हा महोत्सव जूनमध्ये होणार आहे. तालवाद्यापासून तर सुशीरवाद्यांपर्यंत साऱ्याचाच समावेश येथे असून, नाशिककर कलाकारांची शिगेला पोहोचलेली उत्कंठा आता पूर्णत्वाकडे गेली आहे.

सातव्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे दोन दिवस हा महोत्सव होणार आहे. 'मटा कलासंगम' महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी नाशिककरांनी महोत्सवाला उदंड प्र्रतिसाद दिला होता.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन वादन, शिल्प, नृत्य नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी हा या 'कलासंगम' महोत्सवाचा उद्देश आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. 'मटा' वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे.

महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरत्या कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयातील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमोस्ट्रेशनही यावेळी होईल. तसेच नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पहाण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवाला हॅण्ड फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे.

कुसुमाग्रज स्मारकात दोन दिवस धमाल

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ९ व १० जून रोजी संपूर्ण दिवस कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन्ही दिवस कलेच्या प्रांतातील मुशाफिरी असून, दोन दिवस धमाल येणार आहे. नाशिकमधील मान्यवर कलाकार यात सहभागी होत असून, मान्यवर शिल्पकार यात डेमो देणार आहेत. तसेच मुंबईहून सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत.

हौशी कलाकारांना आवाहन

या महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांसाठी व्यासपीठ देण्यात येणार आहे. हौशी कलाकारांना आवाहन करण्यात येत आहे की, गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प, फोटोग्राफी, मॉडर्न आर्टमध्ये पीअर्सिंग, नेल आर्ट तसेच आणखीही संबंधीत आर्टमध्ये ज्यांना परफॉर्मन्स सादर करावयाचे असतील त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ०२५३ ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करावा. नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी फेस्टिव्हल

0
0

लोगो - प्रॉपर्टी फेस्टिव्हल

प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आज उद्घाटन

टाइम्स ग्रुपतर्फे आयोजन; सर्वोत्तम ऑफर्ससाठी नामी संधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिककरांसाठी आयोजित प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आज (२६ मे) उद्घाटन होणार आहे. सर्वोत्तम ऑफर्ससाठी नामी संधी असणारा हा फेस्टिव्हल रविवारपर्यंत गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये होणार आहे. शहरातील आघाडीचे विकासक त्यात सहभागी होणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये असंख्य ड्रीम प्रोजेक्टस् व आकर्षक ऑफर्स मिळणार असल्याने नाशिककरांसाठी ही मोठी संधी आहे.

या प्रदर्शनात आवाक्यातील घरे, लक्झरी फ्लॅट, टाऊनशीप, रो हाऊसेस, व्हीला, फ्लॅट, प्लॉट्स, वीक एण्ड होम, कार्यालये आदींच्या खरेदीसाठी माहिती उपलब्ध असणार आहे. इंद्रप्रस्थ हॉल येथे सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळेत या प्रदर्शनाला इच्छुक ग्राहकांना भेट देता येणार आहे. त्याचप्रमाणे विकसकांच्या वतीने आकर्षक योजनाही ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

या प्रदर्शनात रुंगटा ग्रुप, सम्राट ग्रुप, ड्रिम शेल्टर्स, श्रीयोग बिल्डर्स, मालपाणी ग्रुप, अनमोल नयनतारा ग्रुप, परांजपे डेव्हलपर्स, जय डेव्हलपर्स, एचडीएफसी आणि कारडा कन्स्ट्रक्शन्स यांसह विविध ग्रुप सहभाग घेणार आहेत. आपल्या स्वप्नातील घराचं स्वप्न साकारण्यासाठी या प्रदर्शनास भेट देण्याची संधी २६ व २७ मे रोजी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनात ’साफसफाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगररचना विभागाची साफसफाई सुरू केली आहे. शुक्रवारी २७ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यातील १८ जण हे नगररचना विभागातील आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने या बदल्या केल्या असून, त्या रद्द करण्यासाठी राजकीय दडपण आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आतापर्यंत मुंढेंनी बेशिस्त व गैरवर्तन करणाऱ्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, जवळपास डझनभर अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. मुंढेंनी नगररचना विभागातील १८ कनिष्ठ अभियंत्याच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे नगररचना विभाग हादरला असून, वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यावरील कारवाईने खळबळ उडाली आहे. नगररचना विभागात ऑटो डीसीआर यंत्रणेला अभियंतेच अडथळा आणत होते. त्यामुळे मुंढेंनी बिल्डरांशी संधान बांधून कार्यरत असलेल्या अभियंत्याना मोठा दणका दिला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त मुंढेंनी वैद्यकीय विभागातही साफसफाई केली असून तब्बल ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारीची बदलीही डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून डॉ. जयराम कोठारी यांची नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसई बारावीचा आज निकाल

0
0

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज, शनिवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजतानंतर ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निकालाच्या अनेक तारखा सोशल मीडियावर फिरत होत्या. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्याचवेळी, इयत्ता दहावीचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होणार असल्याचेही सीबीएसईने क‌ळवले आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल www.cbseresults.nic.in किंवा www.cbse.nic.in या वेबसाइटवर पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदुरबार-पुणे’ शिवशाहीनेनाशिककरांचंही चांगभलं

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित आरामदायी 'नंदुरबार-पुणे' स्लीपरकोच शिवशाही बस शुक्रवारपासून (दि. २५) सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नंदुरबारकरांबरोबरच नाशिककरांचीही सोय झाली आहे. ही गाडी नाशिकमार्गे असून, मध्यरात्री ती नाशिक थांबा घेईल. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातूनही शिवशाही सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. ती मान्य करीत राज्य परिवहन महामंडळाने 'नंदुरबार-पुणे' या धुळे, नाशिकमार्गे जाणाऱ्या शिवशाहीची सुरुवात केली आहे. यामुळे नंदुरबारसह नाशिकमधील विद्यार्थी, नोकरदार वर्गास फायदा होणार आहे. नंदुरबार बसस्थानकातून ही शिवशाही रोज रात्री ८ वाजता सुटणार असून, पुण्याहून येणारी 'पुणे-नंदुरबार' शिवशाही पुणे बसस्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सुटेल. प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्यात आली असून, तिचे एका बाजूचे भाडे ९७२ रुपये असल्याची माहितीही गावित यांनी दिली.

यापूर्वी शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती. त्यामुळे नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. शिवशाहीचा जाण्याचा मार्ग नंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा राहील, तर परतताना पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा आहे. यामुळे निजामपूर-जैताण्यासह माळमाथा परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांनी फुलला रामकुंड परिसर

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अधिकमास आणि एकादशी असा योग शुक्रवारी (दि. २५) जुळून आल्याने या मुहूर्तावर रामकुंडात स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. स्नानानंतर पूजा, मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या भाविकांच्या लगबगीने पंचवटी परिसर फुलून गेला. गोदेचे मनोभावे पूजन करून अधिकमासाचे वाण आणि दिवे अर्पण करण्यात येत होते.

अधिकस्य अधिक फलम असे अधिक महिन्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. यंदाच्या अधिक मासास बुधवारी (दि.१६) पासून सुरुवात झाली आहे. त्या दिवसापासून रामकुंडावर सकाळपासून स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. काही भाविक ओल्या वस्त्राने मंदिरांचे दर्शन घेत आहेत. स्नानानंतर वयाने मोठे असलेल्या कुटुंबातील तसेच नात्यातील व्यक्तींना सन्मानाने स्नान घालण्यात येत होते.

कपालेश्वर, काळाराम, सीतागुंफा, तपोवन आदी ठिकाणच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये कुपोषणाचा आकडा वाढताच

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार तिव्र कुपोषित ८३ तर मध्यम कुपोषित २५० बालके असल्याची नोंद झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच्या माहितीनुसार तिव्र कुपोषित ५३ आणि मध्यम कुपोषित १९२ अशी संख्या होती. कुपोषितांच्या संख्येत वाढ झालेली असताना संबंधित अधिकारी याबाबत बेदखल असून, अद्यापही गांभीर्याने या समस्येकडे कोणीही पाहत नसल्यामुळे नाराजी पसरली आहे. दोन महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत येथे आले असता व्यासपीठावर जाहीरपणे त्र्यंबक तालुक्यात कुपोषण वाढीस लागल्याची चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी संपूर्ण जिल्ह्यात गावोगाव भेटी देण्यास व आढावा घेण्यास सुरवात केली. बालकांचे वजन घेणे सुरू झाले असताना कुपोषितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अर्थात अद्यापही वास्तव आकडेवारी नसल्याचे बोलले जात आहे. वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आले आहे. पाणीटंचाई, रोजगारासाठी स्थलांतर हे प्रश्न न सुटल्याने तालुक्यातील कुपोषणाचा विळखा वाढत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन बालविकास प्रकल्प आहेत. रोजगाराचा अभाव व त्यामुळे आलेली आर्थिक दुर्बलता आदी कारणांनी कुपोषण वाढते आहे. यामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा यांची जोड लाभल्याने कुपोषणाचा विळखा सहजासहजी सुटणारा राहीलेला नाही. तालुक्यात आमदार निर्मला गावित यांनी उपसा जलसिंजन योजनांचा केलेला प्रयोग या सर्वसमस्यांवर मात करणारा ठरला आहे. उपसा योजना असलेल्या पंचक्रेाशीतील गावांमध्ये बारमाही शेती व त्यामुळे आर्थिक सुबत्ता आणि सकस आहार मिळण्यास अडचण येत नाही. या परिसरात कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांचा तिढा सुटला

0
0

सोमवारपासून मुंगसेत कांदा लिलाव होणार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापारी असोसिएशनमधील तिढा अखेर सुटला आहे. शुक्रवारी बाजार समिती संचालक, प्रशासन व व्यापारी असो. यांच्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे.

मुंगसे येथील केंद्रावरील लिलाव प्रक्रिया गेल्या १५ दिवसांपासून बंद होती. व्यापाऱ्यांचे परवाने नुतनीकरण, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक अशा वेगवेगळ्या कारणाने बाजार समिती व व्यापारी असो. यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान होत होते. व्यापारी असो.ने नुकतीच पत्रकार परिषद घेवून शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट देण्याची तयारी दर्शवली होती.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजार समिती सभागृहात याबाबत माजी सभापती व विद्यमान संचालक प्रमोद बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक प्रशासन व व्यापारी असो. प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यावेळी बैठकीस सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पुरुषोत्तम बच्छाव, वसंत कोर, संग्राम बच्छाव, अनिल बच्छाव, काशिनाथ पवार, विश्वनाथ निकम, सचिव अशोक देसले आदींसह सर्व संचालक मंडळ व व्यापारी असो. अध्यक्ष जितेंद्र कापडणे उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेअंती व्यापाऱ्यांनी परवाना नुतनीकरणसाठी पणन कायद्यानुसार व नियमाप्रमाणे कागदपत्र पूर्तता करणे , शेतकऱ्यांना शेतमालाचे ५ ते १० हजार पर्यंतचे पेमेंट रोखीने देणे, शेतमाल विक्री तारखेचाच चेक देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) मुंगसे येथील कांदा खरेदी विक्री केंद्रावर लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदुरबार-पुणे’ शिवशाहीनेनाशिककरांचंही चांगभलं

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित आरामदायी 'नंदुरबार-पुणे' स्लीपरकोच शिवशाही बस शुक्रवारपासून (दि. २५) सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नंदुरबारकरांबरोबरच नाशिककरांचीही सोय झाली आहे. ही गाडी नाशिकमार्गे असून, मध्यरात्री ती नाशिक थांबा घेईल. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातूनही शिवशाही सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. ती मान्य करीत राज्य परिवहन महामंडळाने 'नंदुरबार-पुणे' या धुळे, नाशिकमार्गे जाणाऱ्या शिवशाहीची सुरुवात केली आहे. यामुळे नंदुरबारसह नाशिकमधील विद्यार्थी, नोकरदार वर्गास फायदा होणार आहे. नंदुरबार बसस्थानकातून ही शिवशाही रोज रात्री ८ वाजता सुटणार असून, पुण्याहून येणारी 'पुणे-नंदुरबार' शिवशाही पुणे बसस्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सुटेल. प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्यात आली असून, तिचे एका बाजूचे भाडे ९७२ रुपये असल्याची माहितीही गावित यांनी दिली.

यापूर्वी शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती. त्यामुळे नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. शिवशाहीचा जाण्याचा मार्ग नंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा राहील, तर परतताना पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा आहे. यामुळे निजामपूर-जैताण्यासह माळमाथा परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून वर्षभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयित तरुणाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिष चंद्रकांत जंगे (वय ३५, रा. डायमंड रो हाउस, गोरेवाडी, नाशिकरोड) असे या संशयिताचे नाव आहे.

पीडित तरुणी आणि अतिषचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी संपर्क वाढवला. १६ एप्रिल २०१७ ते २० मे २०१८ या दरम्यान संशयिताने गोरेवाडी येथील घरी, तसेच उल्हासनगर, कल्याण आणि देवळाली कॅम्प येथे फिरण्यास घेऊन जात वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबध ठेवले. यानंतर तरुणीने विवाहाचा तगादा लावला असता संशयिताने लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण केली, तसेच दमदाटी करीत विवाहास नकार दिला. त्यामुळे तरुणीने संशयिताविरुद्ध फिर्याद दिली. महिला उपनिरीक्षक सरोदे तपास करीत आहेत.

महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न

अनैतिक संबंधाच्या संशयातून दुचाकीस्वाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून, ट्रॅक्टरचालकास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम वाळू जुंद्रे (वय ३४, रा. लोहशिंगवे) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. दत्तू चंद्रभान पाटोळे (वय ३६, रा. लोहशिंगवे) याने फिर्याद दिली आहे. पाटोळे याचे कुटुंबातील महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या संशयातून हा प्रकार घडला.

दत्तू गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रावण पाटोळे यांच्या शेतातील रस्त्याने दुचाकीवर प्रवास करीत असताना समोरून ट्रॅक्टर आला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. अनैतिक संबंधाबाबत राग असल्याने जुंद्रेने पाटोळेचा काटा काढायचा, या उद्देशाने त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. मात्र, पाटोळेने वेळीच दुचाकी रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे तो बचावला. दुचाकीसह जमिनीवर कोसळल्याने पाटोळेच्या पायास दुखापत झाली. दरम्यान, ट्रॅक्टर अंगावर घालूनही पाटोळे बचावल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या जुंद्रेने ट्रॅक्टर थांबवून ट्रॉलीला लावलेला कोयता घेऊन पाटोळेच्या दिशेने धाव घेतली. दुचाकीखाली अडकलेल्या पाटोळे याने कशीबशी सुटका करून घेत दगडांचा मारा सुरू केला. यामुळे जुंद्रेने वाहनासह घटनास्थळावरून धूम ठोकली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जुंद्रेला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

विनयभंग प्रकरणी तिघांना अटक

शाळेच्या मैदानावर फिरत असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. हा प्रकार आनंदनगर येथील मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर घडला असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोएब उमरअली शेख (रा. बागूलनगर, विहितगाव), शिवानी रफी शेख (रा. शेख मंजील, टाऊन हॉल) आणि मुदस्सर अकबर पैठणकर (रा. मराठा कॉलनी, खर्जूल मळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडित तरुणी गुरुवारी मैत्रिणींसमवेत आनंदनगर येथील मनपा शाळेच्या मैदानावर फिरण्यासाठी गेली होती. संशयितांनी तरुणीला गाठून शिवानी शेख याने विनयभंग केला. यापूर्वी संशयितांनी पाठलाग केल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

शौचास गेलेल्या तरुणीला गाठून विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील शंकर सोळे (वय ३०, रा. शंकरनगर, तवली फाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मखमलाबाद रोडवरील पिंगळे मळा भागात राहणारी तरुणी बुधवारी सायंकाळी आळंदी कॅनॉल परिसरात शौचास गेली होती. या वेळी संशयिताने तिला गाठून, माझ्याशी लग्न का करीत नाही, असे म्हणत विनयभंग केला. ही घटना तरुणीने घरी कुटुंबीयांना सांगितली. पालकांनी संशयिताविरोधात तक्रार दिली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. उपनिरीक्षक सावळा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images