Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवसेना पदाधिकाऱ्यास कोठडी

$
0
0
महिलेला मारहाण, विनयभंग आणि घरात कोंडून ठेवल्याच्या आरोपावरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जिल्हा कोर्टाने शिवसेनेच्या सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हेमंत दीक्षित यांच्यासह दहा जणांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

भोंदूबाबा जेरबंद

$
0
0
करणीची बाधा झाल्याची भीती घालून घरातील दोष नाहिसे करण्यासाठी दोन महिलांकडून तब्बल २७ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी जादुटोणाविरोधी कायद्यान्वये अटक केली आहे.

कारवरून शिवसेनेत कुरघोडी

$
0
0
सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास शिंदे यांनी महापालिकेचे वाहन परत केल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत दुफळी उफाळून आली आहे.

‘ग्रेप सिटी’त सोलापूरची द्राक्षे

$
0
0
द्राक्ष म्हटले की राज्यभरात पहिले नाव घेतले जाते ते नाशिक जिल्ह्याचे. मात्र यंदा द्राक्षासाठी अजून संक्रांतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. खुद्द नाशिक शहरात सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षे ८० रुपये किलो दराने विकली जात आहेत.

...तर रेडीरेकनरला कोर्टात आव्हान

$
0
0
राज्यात १ जानेवारीपासून लागू करण्यात आलेली रेडिरेकनरची (जमिनींचे सरकारी मूल्य) दरवाढ ही अन्यायकारक असल्याचे सांगत ही अव्यवहार्य वाढ त्वरित मागे घेण्याची मागणी क्रेडाईने केली आहे.

पहले 'आप' म्हणायला शिका

$
0
0
सर्वांच्या पुढे जाण्याची घाई वाहनचालकांना मृत्यूच्या खाईत ढकलत असते. लवकर पोहोचण्यासाठी वाहन भरधाव चालविणे हा पर्याय नसून तो मृत्यूकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. इतरांना पुढे जाण्याची संधी देत ‘पहले आप म्हणा’, असे आवाहन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शुक्रवारी केले.

घराचे स्वप्न दीड लाखाने महाग

$
0
0
यंदा रेडीरेकनच्या दरात वीस टक्के वाढ करण्यात आल्याने सर्व करांचा आणि बिल्डरच्या नफा-खर्चाचा विचार करता मध्यमवर्गीयांसाठी घर किमान एक ते दीड लाखांनी महाग झाले आहे. बिल्डरांना जेलरोड, पाथर्डी, आडगाव सारख्या कमी विकसीत भागात किमान तीन हजार प्रति चौरस फुट दरानेचे घर विकावे लागणार असल्याने सामान्यांचे घरांचे स्वप्न महागले आहे.

रेडीरेकनरसाठी नियामक आयोग नेमा

$
0
0
राज्यात लागू करण्यात आलेली रेडीरेकनरची वाढ ही अन्यायकारक असून सर्वसामान्यांना त्यामुळे घर घेणे अशक्य होणार असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने दिली आहे. तसेच, वीज नियामक आयोगाप्रमाणे राज्य सरकारने रेडीरेकनरबाबात नियामक आयोग स्थापन करावा, अशी मागणीही पंचायतीने केली आहे.

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवर ‘पॉज’

$
0
0
रेडीरेकनरचे दर वाढल्यामुळे प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. नव्या दरानुसार हे व्यवहार होत नसले तरी ज्यांनी स्टॅम्प गेल्या महिन्यात घेतले आहेत, ते जुन्याच दराने व्यवहार करताना दिसत आहेत.

जनुकीय आरोग्य सेवा प्रकल्पाचे आज उद्‌घाटन

$
0
0
जेनेटिक हेल्थ अँड रिसर्च सेंटरतर्फे राज्यभर उभारल्या जाणाऱ्या जनुकीय आरोग्य सेवा प्रकल्पाची सुरुवात नाशिकमधून होत आहे. या प्रकल्पाचे उद्‌घाटन आज, ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमराल्ड पार्क येथे माजी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव व डॉ. रुमिधन पटेल यांच्या हस्ते होणार आहे.

‘मविप्र’ विद्यापीठ बनावे!

$
0
0
राज्याच्या शैक्षणिक वाटचालीत मराठा विद्या प्रसारक संस्थेचा वाटा बहुमोल आहे. जागतिक परिमाणांनुसार केंद्राकडून शिक्षणाची धोरणेही बदलताहेत. आगामी काळात देशभरात विश्ववविद्यालयांची व्याप्ती तिपटीने वाढणार आहे. या अनुकूलतेचा लाभ घेत ‘मविप्र’ विद्यापीठच बनावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

सहा वर्षांचा बुद्धभूषण... चालता-बोलता विकिपीडिया!

$
0
0
वाचून आश्चर्यचकीत झालात ना! पण हे खरं आहे... पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या बुद्धभूषण बोराडे या चिमुरड्यानं निसर्गतःच मिळालेल्या प्रचंड आकलनशक्तीच्या जोरावर इतिहास मुखोद्गत केला आहे. इतक्या लहान वयात देश अन् राज्याचा इतिहास तोंडपाठ असल्यानं परिसरातल्या नागरिकांनी त्याला ज्युनिअर कौटिल्य अशी उपाधी दिली आहे.

सातपूरमध्ये महापालिकेच्या शाळेला आग

$
0
0
अशोकनगर भागातील विश्वासनगर येथील महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक २२ ला शनिवारी संध्याकाळी अचानक आग लागली. आगीत स्टोअर रुमचे किरकोळ नुकसान झाले असून शाळेला सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नागरीकांनी यावेळी केली.

पुन्हा रखडले बीडीएसचे विद्यार्थी

$
0
0
‘बेस्ट ऑफ टू’च्या संघर्षपूर्ण लढ्यानंतर मेड‌िकलच्या व‌िद्यार्थ्यांना या न‌िर्णयाचा फायदा म‌िळाला खरा; परंतु त्यांच्यासमोर आता नवाच पेच उभा राहिला आहे. टर्म पूर्ण होत नसल्याचे कारण देत या व‌िद्यार्थ्यांच्या परीक्षांचे अर्जच स्वीकारण्यास व‌िद्यापीठाने नकार द‌िला.

लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार

$
0
0
तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी तरुणासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे.

गळक्या बसेस हद्दपार

$
0
0
गळकी बस, तुटलेले पत्रे आणि फुटलेल्या काचा अशा बसेस रस्त्यांवर दिसू नयेत याची काळजी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून घेतली जाणार आहे. १ जूनपासून अशा बसेस राज्यातील रस्त्यांवर दिसणार नाहीत, अशी ग्वाही महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी शनिवारी दिली.

राणेनगर मुख्य रस्त्यांवर CCTV कॅमेरे

$
0
0
नवीन नाशिक सिडको येथील राणेनगरमध्ये मुख्य रस्त्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. प्रभाग ५३ चे नगरसेवक सतीश (बापू) सोनवणे यांनी नागरीकांच्या सुरक्षितेसाठी हे पाऊल उचलले आहे.

दुष्काळी निधीतून आणखी ५ कोटी

$
0
0
दुष्काळग्रस्तांसाठी यापूर्वी मुख्यमंत्री सहायता न‌िधीतून आठ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र नाश‌िक ज‌िल्ह्याची गरज लक्षात घेता या मदतीत आणखी पाच कोटी रुपयांची भर टाकत असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

तुमचा खेळ होतो अन्...

$
0
0
‘शैक्षण‌िक संस्थेत जे घडायलाच नको नेमके तेच कानावर येते. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या संस्थेच्या पायाभरणीसाठी पूर्वजांनी खाललेल्या खस्तांची जाणीव ठेवा अन् खेळीमेळीच्या वातावरणात संस्था चालवा.

चौघा मुलांना भटक्या कुत्र्यांचा चावा

$
0
0
सातपूर भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांपासून त्रास सहन करावा लागत आहे. अंबड-लिंकरोडवरील केवलपार्क भागात रविवारी चार मुलांना एका कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images