Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आव्हान शिबिर निवडीत ११० स्वयंसेवक सहभागी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी झालेल्या निवड चाचणीत जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांमधून सुमारे ११० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि व्ही. एन. नाईक महाविद्यालय यांच्यावतीने शिबिर झाले.

'रासेयो'चे जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र अहिरे यांनी निवड चाचणीचे उद्घाटन केले. यावेळी 'रासेयो'चे विविध महाविद्यालयांमधील अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. आशा ठोके, प्रा. भारत शेळके उपस्थित होते. आव्हान शिबिरातील सहभाग, नियम, सहभाग, शिस्तबद्धता आदीहबद्दल डॉ. डी. के. आहेर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी जिल्हाभरातून २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात दहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी प्रा. समीन शेख , अशोका बी. एड. महाविद्यालयातील प्रा. आशा ठोके यांची संघनायक म्णून निवड करण्यात आली. या निवडीसाठी परीक्षक म्हणून प्रा. रवींद्र आहिरे, प्रा. पी. डी. पाडेकर, प्रा. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. समिन शेख आणि प्रा. मिलिंद सोळंकी यांनी काम पाहिले.

निवड चाचणीच्या समारोप सत्रात प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. एनआरडी आणि एसआरडीच्या उपक्रमांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिबिरात गौरविण्यात आले. प्रा. स्नेहल कासार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास अधिकारी शरद काकड यांनी आभार व्यक्त केले.

असे असेल आव्हान शिबिर

यंदांचे राज्यस्तरीय आव्हान शिबिर औरंगाबाद येथे २५ मे ते ३ जून या काळात होणार आहे. पुणे विद्यापीठांतर्गत पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यांमधून सुमारे ९० विद्यार्थी व ६ संघनायक तसेच राज्यभरातील इतर जिल्ह्यांमधून ५० विद्यार्थी यात सहभागी होतील. शिबिरात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व कलात्मक विकासावर भर दिला जाईल. हे शिबिर पूर्ण करणारे विद्यार्थी सामाजिक आपत्तीच्या स्थितीत पोलिस मित्र म्हणून कार्यरत राहू शकतील. शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना पाच अतिरिक्त गुणही देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोनशे घरांवर रेखांकन

$
0
0

दोनशे घरांवर रेखांकन

सिडको : सिडकोत बुधवारी तिसऱ्या दिवशीही अनधिकृत बांधकामांचे रेखांकनाचे काम सुरूच होते. दिवसभरात सुमारे दोनशे घरांवर रेखांकन करण्यात आले. महापालिकेच्या या रेखांकनाला नागरिकांचा विरोध होत असला, तरी रेखांकनानंतरची महापालिकेची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपासून सिडको विभागीय कार्यालयाच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या नकाशाप्रमाणे नसलेल्या बांधकामांवर रेखांकन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शिवपुरी चौकात नागरिकांनी विरोध केला, मंगळवारी रायगड चौक व तानाजी चौकातही नागरिकांनी विरोध केला होता. मात्र, या विरोधालान जुमानता अधिकाऱ्यांनी बुधवाराही रेखांकनाचे काम सुरूच ठेवताना साईबाबानगर व परिसरातील घरांवर रेखांकन केले. खुले मैदाने व रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरही रेखांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

थेट मुख्यमंत्र्यांना साकडे (फोटो)

सिडको : महापालिकेच्या रेखांकन मोहिमेने धास्तावलेल्या सिडकोवासीयांची आमदार सीमा हिरे यांनी बुधवारी भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही आमदार हिरे यांनी सांगितले. महापालिका यंत्रणा नागरिकांनी विरोध करूनही रेखांकनाची कारवाई सुरूच ठेवत असल्याने धास्तावलेल्या परिसरातील नागरिकांची भेट घेऊन आमदार हिरे यांनी चर्चा केली. महापालिकेच्या कारवाईने नागरिकांत प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सिडकोवासीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडेच मांडण्यात आल्याने लवकरच तोडगा निघेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, सिडको मंडल अध्यक्ष बाळासाहेब पाटील, एकनाथ नवले, मुन्ना हिरे, दिलीप देवांग, चारुहास घोडके, रमेश उघडे, मयूर लवटे आदी उपस्थित होते. नागरिकांनी आमदार हिरे यांना निवेदन देऊन कारवाई त्वरित थांबविण्याची मागणी केली.

'स्थगितीसाठी न्यायालयात जाणार' (फोटो)

सिडको : सिडकोतील सहाही योजनांमध्ये बांधकामे करताना सिडकोने अधिकृत परवानगी दिलेली असतानाही महापालिका आयुक्त असे बांधकाम अनधिकृत ठरवून पाडण्याच्या विचारात असतील, तर वेळप्रसंगी सिडको बचाव कृती समिती स्थापन करून त्याद्वारे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या मोहिमेला महापौर हे स्थगिती देऊ शकतात. मात्र, त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, महापौर हे काम करणार नसतील, तर आता नागरिकांच्या बरोबरीने थेट या स्थगितीसाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी नगरसेवकांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून, या बांधकामांना परवागनी देणारे सिडकोचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी होणे अपेक्षित आहे. काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, त्यात हे अतिक्रमण काढणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे या कारवाईला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे.

'वाढीव बांधकामे नियमित करा'

सिडको : सरकारकडून अनेकदा झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे प्रकार केले जात असतात. असे असतानाही केवळ सिडकोसाठीच वेगळा न्याय का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित करून सिडकोतील सर्व वाढीव बांधकामे सरकारने नियमित करावीत, अशी मागणी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यात अनेक अनधिकृत बांधकामे सरकारने वेळोवेळी नियमित केली आहेत, त्याच धर्तीवर कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोतील २५ हजार घरांचे वाढीव बांधकाम नियमित करावे. सिडकोने ही जागा नागरिकांनी लीजवर दिलेली असून, ती फ्री होल्ड करण्याची मागणी वारंवार होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून थेट येथील बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर हातोडा मारण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. सिडकोचे जाचक हस्तांतरण शुल्क त्वरित रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नगरसेवक तिदमे यांनी राज्य सरकारच्या आपले सरकार पोर्टलद्वारे नगरविकास विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.

उद्या धरणे आंदोलन

सिडको : परिसरातील घरांवरील रेखांकन मोहिमेविरोधात आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या अध्यक्षतेखाली सिडको बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून, संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी (दि. २५) राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सिडकोतील घरांवर महापालिका प्रशासन हातोडा चालविणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. तत्पूर्वीच्या रेखांकन मोहिमेमुळे घाबरलेल्या नागरिकांना धीर देण्याच्या उद्देशाने ही संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रशासनाने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. हिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीची पाठ्यपुस्तके आता अधिक बोलकी

$
0
0

नवीन अभ्यासक्रमाबाबत तज्ज्ञ शिक्षकांची मते

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीचा बदललेला अभ्यासक्रम हा विद्यार्थी विकासकेंद्रीत असून विद्यार्थ्यांमधील विविध क्षमतांचा विकास होण्यासाठी ही पुस्तके मदतशीर ठरणार आहे. पुस्तकाचे बदललेले स्वरुप, रंगसंगती यामुळे दहावीची पाठ्यपुस्तके आता अधिक बोलकी झाली आहेत. तसेच केवळ शिक्षकांनी अध्यापनाऐवजी शिक्षक, विद्यार्थी, वर्गमित्र यांना एकत्रित येऊन अध्ययन करता येईल, अशी रचना अभ्यासक्रमात करण्यात आली आहे, अशी माहिती बालभारतीच्या अभ्यास मंडळातील तज्ज्ञ शिक्षकांनी 'नवीन अभ्यासक्रमाची दहावी' या सेमिनारमध्ये दिली.

जनस्थान सेवा मंडळ व परांजपे प्रोफेशनल अॅकॅडमी यांच्यावतीने दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थी, पालकांसाठी 'नवीन अभ्यासक्रमाची दहावी' या विषयावरील मार्गदर्शनपर सेमिनार झाला. प. सा. नाट्यगृहात बुधवारी झालेल्या या सेमिनारच्या उद्घाटनप्रसंगी जनस्थानचे संस्थापक अध्यक्ष विजय साने, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार सीमा हिरे, परांजपे प्रोफेशनल अॅकॅडमीचे कौस्तुभ परांजपे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर डॉ. माधव भुस्कुटे यांनी संस्कृत या विषयावर मार्गदर्शन केले. दहावीसाठी संस्कृत विषयाच्या पाठांतराच्या विविध पद्धतींचा अवलंब करावा. जे पाठ करायचे आहे ते लिहून काढावे, पडताळून पहावे, इतरांना दाखवावे यात सातत्य असल्यास संस्कृतमधील सुभाषिते, शब्द पाठ होतील. संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमात फार बदल करण्यात आलेला नाही. प्रश्नपत्रिकेत सुगम संस्कृतम्, गद्यम्, पद्यम्, लेखनकौशलम्, भाषाभ्यास:, अपठितम् असे विविध प्रकार करण्यात आल्याचे डॉ. भुस्कुटे यांनी सांगितले.

इंग्रजी विषयावर स्मिता पोरे यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी विषयातील पुस्तक बदलाची माहिती त्यांनी दिली. दहावीचा बदललेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांशी अधिक जुळावा यासाठी विशेष मेहनत त्यावर घेण्यात आली आहे. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाविषयी मोठी उत्सुकता होती. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता या क्षमतांचा विकास व्हावा, यानुसार पुस्तकांचे स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषासमृद्धी हे पुस्तक करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी विषयासाठी डॉ. स्नेहा जोशी, गणित विषयासाठी डॉ. जयश्री अत्रे, विज्ञान विषयासाठी डॉ. सुलभा विधाते व स्व अध्ययनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अर्चिता मडके या बालभारतीच्या अभ्यास मंडळातील तज्ज्ञ शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची ओळख, नवीन अभ्याक्रमाची रुपरेषा, स्व अध्ययनाची गरज, पालकांचा सक्रिय सहभाग, गुण वाढविण्यासाठी विशेष टिप्स दिल्या.

फोटो : पंकज चांडोले

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोचा प्रश्न पेटला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने सिडकोतील अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केल्याने सिडकोतील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तब्बल २५ हजार घरांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालवूच असा पवित्रा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतला आहे. त्यामुळे सिडकोतील नागरिकांपाठोपाठ आता आमदार, स्थानिक नगरसेवकही आक्रमक झाले असून, या रेखांकनाच्या कारवाईविरोधात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

सिडकोतील नागरिक, नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेवर धडक देत आयुक्त मुंढेंची भेट घेऊन कारवाईबाबत विचारणा केली. यावेळी आयुक्त आणि नागरिकांमध्येच शाब्दिक चकमकी उडाल्या. अतिक्रमणांच्या कारवाईपूर्वी नोटिसा का नाहीत, असा प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांनाच आयुक्तांनी फटकारले. त्यामुळे सिडकोचे नागरिक अधिक संतप्त झाले असून, त्यांनी आता न्यायालयीन लढाईसोबतच मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त मुंढेंनी शहरातील अतिक्रमणे रडारवर घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सिडकोतील हजारो घरांमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे सांगून तीन दिवसांपासून अतिक्रमित जागांवर रेखांकन सुरू झाले आहे. त्यामुळे सिडकोवासीय चांगलेच धास्तावले आहेत. महापालिकेडून बुलडोझर चालविण्याची तयारी सुरू झाल्याने सिडकोतील कामगारवर्ग अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या कारवाईविरोधात सिडकोतील स्थानिकांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. सिडकोतील नागरिकांनी बुधवारी आयुक्त मुंढेंची भेट घेतली. यावेळी अर्ज देत घरे नियमित करण्याची मागणी केली गेली, तेव्हा स्थानिकांची ही मागणी आयुक्तांनी फेटाळून लावत बुलडोझर चालविण्याचा उलट इशारा दिला. त्यावर अतिक्रमण काढताना नोटीस का नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांनाच आयुक्तांनी खडसावले. रेखांकन हीच नोटीस समजा असे सांगत कारवाईचा इशारा दिला. बांधकामे नियमित करण्यासाठी कम्पाउंडिंग धोरणात अर्ज करण्याचाही सल्ला दिला. आयुक्तांच्या वर्तनाने नाराज झालेल्या नागरिकांनी बाहेर पडत थेट नागरी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेत मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. महापौर व आमदारांचीही भेट घेत त्यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवाज कमी करा

सिडकोतील अतिक्रमणापूर्वी अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर आणि भागवत आरोटे यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी छोट्या छोट्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी प्रथम भंगार बाजार काढा, अशी मागणी केली. महापालिकेने दहशत पसरवून नागरिकांची घरे तोडण्यासाठी दहशतीचा वापर करू नये, अशी मागणी केली. परंतु, यावेळी संतप्त आयुक्तांनी नागरिकांच्या प्रश्नांसदर्भात गेलेल्या नगरसेवकांनाच कमी आवाजात बोलण्याचा सल्ला दिला. अतिक्रमणांची कारवाई योग्य प्रकारे सुरू असल्याचे सांगत भंगार बाजाराचेही अतिक्रमण काढू, अशी उत्तरे दिली. त्यामुळे या संतप्त नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनातून काढता पाय घेतला.

..तर बुलडोझर अंगावर घेऊ!

आयुक्त मुंढेंना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना आयुक्तांनी कोणत्याही क्षणी सिडकोतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवू असा उलट इशारा दिल्याने सिडकोतील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी आयुक्तांच्या दालनातच तुम्ही बुलडोझर चालवा आम्ही हा बुलडोझर अंगावर घेऊ आणि त्याखाली येऊन जीव देऊ, अशी भूमिका घेतली. महापालिका आक्रमक असेल, तर त्याच्या जास्त आम्हालाही आक्रमक होता येते असा इशारा देत या नागरिकांनी महापालिका सोडली. असे आयुक्त आम्ही पाहिले नाही, नागरिकांशी ते नीट संवादही करीत नाहीत, असा आरोप यावेळी नागरिकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा चैतन्याला दिशा देण्याची गरज

$
0
0

अजितकुमार तेलंग यांचे प्रतिपादन 

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पुढील काळात भारतात युवकांची संख्या जास्त राहणार आहे, याचा गर्व वाटतो. पण या युवा चैतन्याला दिशा नसेल तर ही पिढी रसातळाला जाईल. आज या लाटेवर आपण स्वार झालो आहोत. त्यामुळे या चैतन्याला दिशा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अजितकुमार तेलंग यांनी केले.

९७ व्या वसंत व्याख्यानमालेत कांताबेन शाह स्मृती व्याख्यानात 'नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या समाजापुढील आव्हाने' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.  यशवन्तराव महाराज देवमामलेदार पटांगण येथे झालेल्या व्याख्यानप्रसंगी विवेक केळकर, श्रद्धा काकड, नीतेश सचदे, चंद्रशेखर शहा आदी उपस्थित होते. 

अजितकुमार तेलंग म्हणाले, की आजच्या युवकांची प्रतिमा बऱ्यापैकी डागाळली आहे.  युवा पिढीत खूप बदल झाला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू बऱ्याच अंशी बदलले आहे. या अगोदरच्या पिढीत असलेल्या गोष्टी त्यांच्याकडे नाही. हे घाबरवणारे चिन्ह आहे, या सत्याला सामोरे जावे लागणार आहे. शारीरिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक यांच्यातून माणसाला जगाची प्रचिती येते. माणसाचे मन मरत आहे. पूर्वी गुन्हेगारीमागे काही तर्कशास्त्र असायचे. आजचे गुन्हे बघितले तर गुन्ह्यात विकृती वाढत आहे. आत्महत्या व बलात्कार वाढले आहे. गुणसूत्रात परिवर्तन व रचनात्मक बदल होत आहे. ते जाणूनबुजून गुन्हे करीत नाहीत.त्यांच्या पाच इंद्रियापैकी फक्त एकच इंद्रिय काम करीत असते. ही मुले प्रतिसाद देत नाहीत.

संगीता बाफना यांनी प्रास्ताविक केले. शुभदा गर्गे यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

आजचे व्याख्यान

विषय - माय, बाप - एक कृतज्ञता

वक्ते - कवी राजेंद्र उगले व अरुण इंगळे

स्थळ - य. मा. पटांगण 

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेल गीतांमध्ये रंगली स्वरसंध्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ येथील गुलमोहोरनगरमधील ओम गुरूदेव हास्य सरिता आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या बुधवारी पुष्प चौथे पुष्प गायिका मीना परुळकर-निकम यांच्या बहारदार गायनाने सजले. 'स्वर संध्या' या सुरेल गीतांनी हा कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घेतला.

मीना परुळकर-निकम आणि आनंद अत्रे यांच्या गाण्यांनी सुरेल मेजवानी मिळाली. भक्तिगीते, भावगीते, अभंग, हिंदी गीते, मराठी गीते आदी सर्व प्रकारांना त्यांनी लीलया हात घातला. द्वंद गीतात त्यांना आनंद अत्रे यांनी उत्तम साथ दिली. सत्यम-शिवम-सुंदरम, सांज ये गोकुळी, अजिब दास्ताँ है ये, तुझे गीत गाण्यासाठी, स्वरगंगेच्या काठावरती, टाळ बोले चिपळीला या गीताबरोबरच  'ने मजसी  ने' आणि 'जयोस्तुते' ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची राष्ट्रभक्तीपर गाणी सादर करण्यात आली. 

संत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महापौर  रंजनाताई भानसी, नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार आदी उपस्थित होते.   ऋतुजा देशपांडे  यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी वाळेकर यांनी परिचय करून दिला. 

वसंत व्याख्यानमाला : म्हसरुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात- फक्त फोटो

विवाहबंध जुळविण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमतर्फे येत्या रविवारी (दि. २७) शहरात सर्वजातीय वधू-वर मेळावा (स्वजातीय व आंतरजातीय) होणार आहे.

हॉटेल एमराल्ड पार्क, मायको सर्कल, नाशिक येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे. अनुपमशादी डॉट कॉमतर्फे आजपर्यंत विविध समाजांचे वधू-वर मेळावे, वेडिंग स्वयंवर झाले. या सर्व वधू-वर मेळाव्यांतून अनेकांचे विवाह जुळले आहेत. या पद्धतीने वधू-वर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमने प्रथम नोहेंबर २०१३ मध्ये केले होते. तेव्हापासून झालेल्या सर्व वधू-वर मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उपवधू-वरांना विवाह जमेपर्यंत मदत व वेबसाइटवर नोंदणी ही सेवा मिळणार आहे. या मेळाव्यात ब्राह्मण, मराठा, सोनार, शिंपी, माळी, तेली, सुतार, चांभार, वंजारी, कोळी, जैन, श्वेतांबर व इतर सर्व समाजाचे वधू-वर संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उपवर-वधू यांना आपल्याच समाजातील वा आंतरजातीय विवाहस्थळे बघता येतील, असे संचालक संजय लोळगे यांनी सांगितले.

या मेळाव्यामध्ये स्वजातीय व आंतरजातीय, प्रथम विवाह, घटोस्फोटित, विधूर विधवा, अपंग, अंध इत्यादी सर्व वधू-वर उपस्थित राहणार आहेत. आपणही या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. अंध, अपंग वधू-वरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मुलींसाठी खास पैठणी भेट योजना ठेवली आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.

नोंदणीसाठी साधावा संपर्क

या वधू-वर मेळाव्यामध्ये भाग घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी अनुपमशादी डॉट कॉम, शीतल कॉम्प्लेक्स, आयडीबीआय बँकेसमोर, द्वारा- नाशिक येथे अथवा ७४४७७८७४४७, ८३७८९१०९९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लॉन्सवरील कारवाईने रोजगारात अमंगल

$
0
0

मटा मालिका : शुभमंगल 'सावधान'

--

शहरातील तब्बल १६६ लॉन्स आणि मंगलकार्यालयांवर अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने कारवाईचा फास आवळला आहे. यासंदर्भात मतमतांतरे व्यक्त होत असून, लॉन्स आणि मंगलकार्यालयांवर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायांवर नजीकच्या काळात थेट परिणाम होणार आहे. या कारवाईच्या संभाव्य परिणामांचा वेध घेणारी मालिका आजपासून.

--

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

-

नाशिक : शहरातील १६६ लॉन्स व मंगलकार्यालयांवर अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे लॉन्स मालकांचे धाबे दणाणले असून, या कारवाईचा थेट परिणाम शुभकार्यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायांवर होऊ लागला आहे. त्यामुळे सुमारे २० हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. या कामगारांवर अवलंबून असलेल्या सुमारे एक लाख नाशिककरांच्या चरितार्थाचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे.

कुठल्याही शुभकार्याचे क्षण अविस्मरणीय करण्यात लॉन्स, मंगलकार्यालयांचे योगदान मोलाचे असते. साखरपुड्यापासून विवाह सोहळ्यापर्यंत आणि बाळाच्या वाढदिवसापासून अमृतवर्ष सोहळ्यांपर्यंतच्या अनेक कार्यक्रमांना चार चांद लावण्याचे काम मंगलकार्यालये, लॉन्समध्ये होते. परंतु, लॉन्स आणि मंगलकार्यालयांसाठी नवीन विकास नियंत्रण नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्याद्वारे अनेक बंधने लादली आहेत. संबंधित लॉन्सधारक अनधिकृतपणे व्यवसाय करीत असल्याचा ठपका ठेवून महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. नियमितीकरणासाठी संबंधित व्यावसायिकांना अवधीही देण्यात आला. परंतु, लाखो रुपयांचा दंड भरणे अशक्यप्राय ठरू लागल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. काही लॉन्सवर महापालिकेने बुलडोझर फिरविला असून, काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अन्य व्यवसायांवरही त्याचा थेट परिणाम होऊ लागला आहे. महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला लॉन्सचालक मालकांचा थेट विरोध नाही. परंतु, या कारवाईमुळे ते धास्तावले आहेत. या कारवाईमुळे केटरिंग, डेकोरेटर्स, सुरक्षा एजन्सीज, इलेक्ट्रेशियन्स, बॅन्डपथक, सफाई कर्मचारी अशा सर्वांचाच रोजगार अडचणीत येण्याची शक्यता बळावली आहे. शहरात मंगल कार्यालये, लॉन्स, बँक्वेट हॉल्सची संख्या सुमारे २०० आहे. लग्नसराईसह अनेकदा एकेका कार्यात किमान १०० ते २०० लोकांना रोजगार मिळतो. त्यामध्ये स्वयंपाकी, वाढपी, भांडी धुणारे, सजावट करणारे, लायटिंग करणारे, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, वाजंत्री अशा सर्वांचाच समावेश असतो. परंतु, या लॉन्सवर बुलडोझर फिरला तर त्याचा परिणाम थेट येथील रोजगारावरही होणार आहे.

-

अर्थचक्र

शहरातील लॉन्स, मंगलकार्यालय - २००

एका लॉन्सची उलाढाल - ५० ते ७५ लाख

व्यवसायाचे दिवस - ५० ते ६०

लग्नाचे पॅकेज - ३ ते १० लाखांपर्यंत

केटरर्सची संख्या - ५० ते ६०

डेकोरेटर्सची संख्या - ३० ते ४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंचा शनिवारी नाशिकरोडकरांशी संवाद

$
0
0

जेलरोड : वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी (ता. २६) नाशिकरोडच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुक्तिधाममागील आनंदनगर येथील महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर सकाळी साडेसहाला आयुक्त मुंढे संवाद साधतील. यावेळी महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थितीत राहतील. सकाळी सहाला उपस्थित महापालिका प्रतिनिधीकडून नागरिकांनी टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, त्यानुसार आयुक्तांची भेट घेऊन नागरिकांनी साध्या कागदावर निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

करंजीकरांची नियुक्ती (फोटो)

नाशिक : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, अभिनेते आणि नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांची केंद्राच्या डोमेन एक्स्पर्ट कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी ही नियुक्ती केली आहे. सांस्कृतिक प्रभागाच्या योजना सचिवालयाने देशातील सांस्कृतिक चळवळींचा इतिहास, शोध व संवर्धनासाठी एक योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत ही कमिटी नियोजित कार्याची आखणी करणे, ती प्रत्यक्षात कार्यान्वित करणे वगैरे कामे पूर्णत्वास नेईल. अध्यक्ष करंजीकर केंद्रीय सांस्कृतिक सचिवांना थेट अहवाल देतील.

आता उंच दुभाजक! (फोटो)

जेलरोड : गजबजलेल्या सारडा सर्कल येथील दुभाजक नव्याने बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. येथे दुभाजक नसल्याने वाहनचालक नियम मोडून अचानक रस्त्यावर येत होते. त्यामुळे अपघात होत होते. आता त्याला आळा बसणार आहे. द्वारका सर्कल ते सारडा सर्कलदरम्यान वाहनांच्या नेहमी रांगा असतात. त्यातच दुचाकीस्वार दुभाजकावर वाहने चढवून अचानक समोर येत होते. आता त्याला उंच दुभाजकामुळे आळा बसणार आहे.

पवार यांची निवड (फोटो)

जेलरोड : मविप्रच्या गांधीनगर येथील जनता विद्यालयाच्या शालेय समितीवर साहेबराव पवार यांची सदस्यपदी निवड झाली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी शिक्षक मंडळाचे सदस्य, तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या पतसंस्थेचे ते माजी सचिव आहेत. या निवडीचे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक नाना महाले, नाशिक एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे आदींनी स्वागत केले आहे.

--

पॉइंटर्स

'जुनी पेन्शन'साठी एल्गार -२

रामकुंड परिसराची कोंडी -३

'ते ' पाच रस्ते अखेर खुले -४

दगडफेकीने गारठलो -५

'कान्हा' में खो जा जरा… ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका - पाणी पळविले

$
0
0

कोणीही यावे अन् नाशिककरांना टपली मारून जावे, हे कधी थांबणार आहे? नद्यांचे उगमस्थान असूनही नाशिकचा पाण्याचा वाटा इतर भागासाठी अक्षरश: ओरबाडून घेतला जातो. नाशिक तहानलेले असताना मराठवाड्यातील मद्य कंपन्यांना पाणीपुरवठ्याची काळजी घेतली जाते. आता भावली धरणाचे पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेऊन शासनाने नाशिककरांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. एकीकडे पाणी असे पळविले जात असताना इंडस्ट्रियल कॉरिडोरमधून नाशिकला वगळण्याचा निर्णय घेताना पाण्याची उपलब्धता नसल्याचे कारण दिले जाते. हे निर्णय नाशिकच्या नेत्यांना समजूही नये यातच त्यांच्या दक्षतेची पावती मिळते. हा अन्याय थांबविण्यासाठी आता नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळण्यातला ट्रक जिल्हाधिकाऱ्यांना भेट

$
0
0

'महिला राष्ट्रवादी'कडून इंधन दरवाढीचा निषेध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढी विरोधात प्रतिकात्मक आंदोलन करीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना खेळण्यातला ट्रक भेट दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना ही भेट देण्याबरोबरच निषेधाचे निवेदनही देण्यात आले.�&x1f3ff;��देशभर इंधनाचे भाव वाढल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दरवाढ अशीच राहिली तर इंधन न लागणाऱ्या खेळण्यातील गाड्यांसोबत खेळत बसावे लागेल, अशी टीका त्यांनी केली.

भाजप सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. पण, सत्ता मिळाल्यानंतर महागाईकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व क्षेत्रात महागाईच्या खाईत जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल-डिझेल तसेच गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला असून, संपूर्ण कुटुंबाला आर्थिक झळ बसत असल्याचे यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये पेट्रोल ८५.०७ रुपये लिटर, तर डिझेल ७१.६६ रुपये लिटर आहे. यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन इंधनावरील अवाजवी सेस अधिभार रद्द करून जीएसटी कक्षेत आणावा. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहरातील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. अनिता भामरे यांच्यासह, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, नगरसेविका समिना मेमन, हिना शेख, पुष्पा राठोड, संगिता गांगुर्डे, सलमा शेख, प्रतिभा भुजबळ आदी महिला पदाधिकाऱ्यांनी मंगरुळे यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वर्षांत केवळ आश्वासनेच!

$
0
0

डाव्या संघटनांची टीका; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी डावे पक्ष व कामगार संघटनेच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. डाव्या संघटेना व कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी रोष व्यक्त केला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे (आयटक) निवेदन देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यावर प्रत्येकाला १५ लाख रुपये देऊ, काळा पैसा देशात आणू, अशी आश्वासन दिली होती. पण, ते पाळलले नाही. दर ३० मिनिटांना एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन दिले होते. पण, सरकारने सर्वोच्च न्यायालयात हा आयोग लागू करता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र दिले. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन देऊ ही घोषणाही सरकारने पाळलेली नाही. पेन्शन कामगार कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यावर किमान तीन हजार रुपये व महागाई भत्ता लागू करण्याच्या घोषणेचेही अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी टाका आंदोलकांनी केली.

कामगार कायद्यात मालकधार्जीने बदल करण्यात आले. अशा अनेक घोषणा व धोरणांचा निषेध करीत डाव्या पक्षांनी हे आंदोलन केले. 'आयटक'चे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, अॅड. दत्ता निकम, राज्य सचिव राजू देसले, ज्योती नटराजन, सखाराम दुर्गडे, एस. आर. खतीब, रावसाहेब खतीब, रावासाहेब ढेमसे, माया घोलप, प्रताप भालके, अर्चना गडाख, सुवर्णा मेतकर, विजय दराडे, सुभाष काकड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतार नव्हे, हुदहुद पक्षी!

$
0
0

दि. २३ मे रोजीच्या अंकात 'चला, ओळखू या पक्षी' या सदरात छापलेला फोटो सुतार नव्हे, तर हुदहुद (हुप्पो) पक्ष्याचा आहे. पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांनी याबाबत कळविले आहे.

--

आजारी हत्तिणीसाठी सरसावले प्राणिप्रेमी

--

केरळ अन् आसामच्या डॉक्टरांना करणार पाचारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर बचाव कृती समितीचा मोर्चा

$
0
0

धुळ्यातील पांझरा चौपाटीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनारी महाकाली मंदिर, शितला माता मंदिराचे अतिक्रमण तीन दिवसांत काढून घेण्याच्या अपर तहसीलदार कार्यलयाकडून नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळे आता मंदिर बचाव कृती समितीच्या नावाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बुधवारी (दि. २३) दुपारी याबाबत महाकाली मंदिरात बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयार मोर्चा काढून धार्मिक भावना पायदळी तुडवल्यास आम्ही वेगळ्या पद्धतीने विरोध करू आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जिल्हा प्रशासनास सर्वपक्षीय समितीने दिला आहे.

पांझरा नदीकाठी रस्त्यांना अडथळा ठरणारे महाकाली मंदिर, शितला माता मंदिराचे अतिक्रमण तीन दिवसात काढून घेण्याच्या नोटिसा प्रशासनातर्फे मंदिरांमध्ये मंगळवार दुपारी चिकटविण्यात आल्या. मुदतीत मंदिर व्यवस्थापनाने अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून ते काढण्यात येईल व त्याचा खर्च व्यवस्थापनाकडून वसूल केला जाणार असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे. यामुळे याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. याची प्रशासनास जाणीव करून देण्यासाठी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना इशारा देण्यात आला. मंदिर बचाव कृती समितीच्या नावाखाली एकत्र आलेल्या सर्वपक्षीयांनी बुधवारी सकाळी महाकाली मंदिरात तातडीची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भेटून मनोज मोरे, महेश मिस्तरी, हिरामण गवळी, कल्पना गंगवार आदींनी निवेदन दिले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, शहरातील जनतेचा विचार करून, न्यायालयाचा आदेशाचा भंग होणार नाही. तसेच सर्व परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ प्रश्न सोडविण्यात येईल. मात्र कायदा व सुव्यवस्था बाधित झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुपोषणाची खरी माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या निर्णय आणि कारवाईद्वारे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी पेठ तालुक्यात अनोखा सत्कार करीत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कुपोषित बालकांची जास्त संख्या आढळली की त्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाते. मात्र ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात कुपोषित बालकांची संख्या जास्त आली म्हणून पेठ तालुक्यातील कुळवंडी प्राथमिक केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती या सर्वांचा खातेप्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सीईओ डॉ. नरेश गिते यांच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांना सुखद धक्काच दिला. खरी माहिती उपलब्ध करून देणे हे कुपोषण निर्मुलनासाठीचे पहिले पाऊल असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

पेठ पंचायत समितीची आढावा बैठक डॉ. गिते यांच्या अध्यक्षतेखाली इनामबारी येथील माध्यमिक आश्रम शाळेत झाली. नवीन सर्वेक्षणात पेठ तालुक्यातील कुळवंडी केंद्रांतर्गत सर्वात जास्त कुपोषित बालकांची संख्या आढळून आली. यापूर्वी या केंद्रांतर्गत १० तीव्र कुपोषित तर ९ मध्यम कुपोषित बालक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र नव्या सर्वेक्षणात ७९ तीव्र कुपोषित तर २४९ मध्यम कुपोषित बालक आढळले. जबाबदारीने सदरचे सर्वेक्षण पूर्ण करून खरी माहिती सादर केल्याबद्दल डॉ गिते यांनी कुळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी, पर्यवेक्षिका उत्तरा कुमावत, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांना व्यासपीठासमोर बोलावत त्यांचा सत्कार केला.

तिघा कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

आढावा बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निशांत पाडवी गैरहजर असल्यामुळे त्यांची खातेचौकशी करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. भुवन आरोग्य केंद्रांतर्गत टीसीएल तपासणीसाठी नमुने न पाठविणारे आरोग्य सहायक मगर, तसेच सतत गैरहजर राहणारे आरोग्यसेवक मनोहर खंबाईत यांची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंटांची निर्दयपणे वाहतूक; तिघे ट्रकसह ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने बुधवारी सटाणा रोडवर विनापरवाना निर्दयीपणे ट्रकमधून वाहतूक केले जाणारे सहा उंट पकडून कारवाई केली. गुजरातकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून ही उंट नेली जात होती. पोलिसांनी पाठलागू करून उंटांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पथकाचे पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली. पथकाला मिळालेल्या माहितीनुसार गुजराथकडून मालेगावच्या दिशेने विनापरवाना काही प्राण्यांची वाहतूक केली जात होती. त्यानुसार पोलिस पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात होती. दुपारी चारच्या सुमारास पथकाने सटाणाकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रक (जीजे २४, व्ही ४९०१) ला पोलिसांनी अडवले. मात्र चालकाने ट्रक जोरात पुढे नेला. अखेर पोलिस पथकाने पाठलाग करून इंदिरानगरजवळील गतिरोधकाजवळ त्यास पकडले. ट्रकची झडती घेतली असता त्यात निर्दयीपणे सहा उंट बांधून ठेवलेले होते. याबाबत चालक व त्याच्या साथीदारांना विचारपूस केली असता ही संशयास्पद वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक सुरेश पराखजी ठाकूर (रा. गुजरात) त्याचे साथीदार दिनेश सोमाभाई रावत (रा. गुजरात), अजगर अख्तर तेली (रा. उत्तर प्रदेश) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, सहा उंट व ट्रक असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरा छावणी पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

नाशिक : जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. बारकू चिंधा देवरे (वय ४२, रा. जळकू, ता. मालेगाव) या शेतकऱ्यानेही आत्महत्या केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मंगळवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या नावे एक हेक्टर क्षेत्र असल्याची माहिती तलाठ्याने जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार आरोपींना सोमवारपर्यंत कोठडी

$
0
0

सातपूर : बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या हर्षल साळुंखे या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चौघा संशयितांना कोर्टाने सोमवारपर्यंत (दि. २८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसीतील एका बारमध्ये मद्य पिण्यावरून झालेल्या वादावरून साळुंखे या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. प्रमोद डांगरे, सुनील गांगुर्डे, सुधीर भालेराव व मुकेश मगर अशी संशियतांची नावे आहेत. सातपूर पोलिसांनी त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींना २८ मे रोजी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

देवळाली कॅम्प :

येथील गोडसे मळा परिसरात राहणाऱ्या मजूर कुटुंबातील २२ वर्षीय विवाहितेने सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. वैशाली दीपक सोनवणे असे या विवाहितेचे नाव आहे.

वैशालीने मंगळवारी (दि. २२) सांयकाळी सहा वाजेच्या दरम्यान फाशी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे वडील अर्जुन अण्णा सौंदाणे (रा. देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दिली. त्यावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दीपक सोनवणे (पती), महेंद्र सोनवणे, चैताली सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images