Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रामशेजचा समावेश पर्यटन स्थळात करा

0
0

रामशेजचा समावेश पर्यटन स्थळामध्ये व्हावा

दिंडोरी : विकासासाठी रामशेज किल्ल्याचा पर्यटन स्थळात समावेश व्हावा, अशी मागणी अजिंक्य किल्ले रामशेज महोत्सव छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ पगार, दिंडोरी तालुकाध्यक्ष शुभम बोडके, महानगरप्रमुख तुषार भोसले, संघटक तालुकाप्रमुख विलास गायधनी आदी उपस्थित होते. जून महिन्यात किल्ले रामशेजवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. रामशेजची पाहणी करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी व चिन्मय उदगीरकर यांना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांनी भेट देण्याचे आश्वासन दिल्याचे गणेश कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्त मुंढेंविरोधात सिडकोकरांचे मोहीम

0
0

आयुक्त मुंढेंविरोधात

सिडकोकरांचे मोहीम

सोशल मीडियावरून मुख्यंमत्र्यांना पत्र लिहिण्याचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी घेतल्याने धास्तावलेल्या नागरिकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी सिडकोकरांना सोशल मीडियावर संघटीत केले जात आहे. सोशल मीडियावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आयुक्‍त मुंढे यांना आता आवरा, असा संदेश पाठविला जात आहे. नागरिकांच्या या सोशल हत्याराचा किती उपयोग होतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी सिडकोतील बांधकामे पाडण्यास आयुक्तांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेत ती बांधकामे जमीनदोस्त करण्याचे जाहीर केले आहे. या अनधिकृत बांधकामात सिडकोच्या सहाही योजनांचा सहभाग आहे. सिडको परिसरातच सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असल्याने हे बांधकाम पाडल्यास नागरिकांचे नुकसान होणार असल्याने विविध राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी या बांधकाम पाडण्यास विरोध दर्शविला आहे. सिडकोत सुमारे पंचवीस हजार घरे असून, यातील अनेक घरांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. काही घरांचे चार-चार मजली बांधकामे केल्याच्या तक्रारी नागरिकांनीच वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमात आयुक्‍तांपुढे मांडल्या होत्या. त्यामुळे आयुक्‍त मुंढे यांनी सिडको हे मनपाच्या ताब्यात असून, सिडकोला कोणताही वेगळा न्याय देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिडकोच्या प्लॅननुसार बांधकाम नसल्यास ते पाडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सिडकोतील अनधिकृत बांधकामांवर केव्हाही हातोडा पडू शकतो, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. हे बांधकामे पाडू नये यासाठी आता नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून 'आयुक्‍त मुंढे यांना आवरा,' असा संदेश पाठविला जात आहे. हा संदेश पोस्टकार्डद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्धार काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील या संदेशाची सिडको परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. सिडकोतील नागरिकांनी आता थेट अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतल्याने आता यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे पत्रात

सिडकोकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याचे आवाहन काही नागरिक करीत आहेत. या पत्रात 'स्वत:ला सर्वज्ञ व सर्वेसर्वा समजत कायदा व शिस्तीच्या नावाखाली नाशिकच्या सिडकोमधील सहा योजनेतील २४ हजार ५०० घरे नियमबाह्य ठरविणारे व रोज नवनवे फतवे काढून जनतेला हैराण करणारे नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना आवरा. कायद्यासाठी जनजीवन उद्ध्वस्त करू नका.' असे म्हटले आहे. नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपले दु:ख मांडण्याचे आवाहन केले आहे. तसेच आयुक्तांची कारवाई अन्यायकारक असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दवबिंदू

0
0

'आई, तू रोज सकाळी पूजेसाठी झाडांवरून फुले काढतेस. तुला कधी प्रश्न पडला का, की फुलांवर, पानांवर, गवतावर हे जे दवबिंदू जमा झालेले असतात, ते नेमके कशामुळे आणि का?' परीने तिच्या आईला, माईताईंना प्रश्न केला आणि माईताई मग थोड्या विचारात पडल्या.

'परी म्हणतेय ते अगदी खरे व महत्त्वाचे आहे. मी कधीच त्याविषयी विचार केला नाही, नव्हे असा विचारही कधी मनात आला नाही...' माईताई मनातल्या मनात बोलल्या. त्यांना लेकीचं, परीचं कौतुक वाटलं.

'ठीक आहे. सायंकाळी तुझे पप्पा आले, की विचारू त्यांना, ते शाळेत विज्ञान शिकवतात ते सांगतील अचूक उत्तर,' असे म्हणत माईताईंनी वेळ मारून नेली. परीचे पप्पा म्हणजे मोरे सर.

सायंकाळी तर पप्पांची वाट पाहत परी दारातच बसली. तिला असं झालं होतं कधी पप्पा येतात आणि आई त्यांना प्रश्न विचारते. दूरवरूनच पप्पांना येताना पाहून परीचा चेहरा फुलासारखा फुलला.

पप्पा घरात आले. बैठकीवर बसले आणि परीने माईताईंना खुणावलं.

'अगं, आताच आलेत ते, विचारते...' माईताई.

'काय झालं? कशाबद्दल?' मोरे सर.

'अहो, तुम्ही परीला दवबिंदूविषयी माहिती सांगा, तोवर मी कॉफी करते तुमच्यासाठी.'

'आज मुलीला माहिती हवी म्हणून चहाऐवजी कॉफी, नाही तर रोज घेऊन आलात, की घ्यायचा आहे चहा? असा प्रश्न.' मोरे सरांनीही थोडी गंमत केली.

'तुम्ही काय समजायचं ते समजा. परी, पप्पा माहिती सांगताहेत नीट ऐक,' म्हणत माईताई आत स्वयंपाक घरात गेल्या.

मोरे सर परीला घेऊन बसले आणि माहिती सांगू लागले, 'पहाटेच्या वेळी पानांवर, गवतांवर, पाण्याचे चिमुकले असे बिंदू जे आपण पाहतो त्या बाष्पकणांना दवबिंदू असे म्हणतात. आपल्या भोवताली वातावरणात पाण्याचे बाष्प असते. त्यांचे बाष्पकण गोठून दवबिंदू तयार होतात. काय होतं, थंड हवेपेक्षा उष्ण हवेचा एखाद्या थंड पृष्ठभागाशी स्पर्श होतो तेव्हा बाष्पकणांचे जलबिंदूत रुपांतर होते. हे चिमुकले बिंदू म्हणजेच दवबिंदू. जेव्हा आकाश निरभ्र असते, तेव्हा दव आधिक प्रमाणात तयार होते. निरभ्र आकाशात पाण्याचे बाष्पीकरण अधिक प्रमाणात होते. गवत, झाडे रात्रीला जास्त थंड होतात. सूर्य जसजसा वर येतो तसतशी उष्णता वाढते आणि मग दवबिंदूंचे बाष्पीकरण होते, ते हवेत मिसळतात.'

मोरे सरांनी माहिती पूर्ण केली, तेवढ्यात माईताई कॉफी घेऊन हजर झाल्या. माहिती मिळाल्यामुळे परी पंख लावल्यागत नाचत नाचत अंगणात गेली.

-कमलाकर पाटील, नाशिक

\Bविज्ञान कथा\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतील बेडूक

0
0

दोन टॅडपोल (बेडकाची सुरुवातीची अवस्था) मोठ्या मस्तीत फिरत होते. दोघे आपली शेपूट हलवत आणि बाकीच्या बेडकांना आपला खेळ दाखवत असत. त्यांचा हा वात्रटपणा पाहून एक वयस्कर बेडूक म्हणाला, 'शेपटी जेवढ्या हलवायच्या तेवढ्या हलवून घ्या, काही दिवसांनंतर त्या नाहिशा होतील.'

हाऽ हाऽ... बाकीचे बेडूक हे ऐकूण हसू लागले...

दोन्ही टॅडपोल लगेच आपल्या आईकडे गेले आणि त्या बेडकाचे म्हणणे सांगून विचारले, 'आई, खरंच आमची शेपूट नाहिशी होईल का?'

'होय, हाच निसर्गाचा नियम आहे. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्याला लहानशी शेपूट असते. नंतर काही दिवसांनी आपण विकसित होतो. नंतर ती शेपूट नाहिशी होते आणि आपल्याला पाय येऊ लागतात, तेव्हा आपण विहिरीच्या बाहेरही जाऊ शकतो. लांब उड्या मारू शकतो आणि स्वादिष्ट किडे-मकोडे खाऊ शकतो,' त्यांची आई म्हणाली.

आईचे बोलणे ऐकून पहिल्या टॅडपोलने विचार केला, शेपूट नाहिशी होण्यापूर्वी मी आणखी मस्ती करून घेतो. तलावाला अनेक फेऱ्या मारतो आणि एकापेक्षा एक करामती दाखवतो... असा विचार करून तो पुन्हा मस्ती करू लागला.

दुसऱ्या टॅडपोलने विचार केला, ही शेपूट एक दिवस नाहिशी होणारच आहे, तर मग शेपटीने खेळणे आणि मौजमस्ती करून काय फायदा? जेव्हा पाय येतील तेव्हा मस्ती करू... आणि तो विहिरीच्या एका कोपऱ्यात गुपचूप पडून राहू लागला.

मग एक दिवस असा उगवला, की दोन्ही टॅडपोल बेडकामध्ये विकसित झाले. दोघेही फार प्रसन्न होते. त्यांनी ठरविले, की आता तलावातून निघून बागेत फिरायला जायचे. पहिला बेडूक किनाऱ्यावर पोहोचला आणि वेगाने उडी मारून बाहेर पडला, तर दुसऱ्या बेडकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला उडी मारता आली नाही जणू काही त्याच्या पायात जीवच नव्हता.

तो घाबरून परत आपल्या आईकडे पोहोचला आणि घाबरत घाबरत विचारले, 'माझे पाय काम का करीत नाहीत? माझा भाऊ तर आरामात उडी मारून बाहेर निघून गेला. मग मला तसे का करता आले नाही?'

आई म्हणाली, 'बेटा, हे सर्व तुझ्याचमुळे झाले आहे. तू एक दिवस शेपूट नाहिशी होणार आहे म्हणून तिचा वापरच बंद केला आणि गुपचूप एका कोपऱ्यात पडून राहू लागला. मी पुष्कळ समजावले, तरी तू ऐकले नाहीस. त्यामुळे तुझे शरीर कमजोर झाले. ज्या अवयवांची वाढ व्हायची होती ती झाली नाही आणि आता ज्या पायांची इतक्या दिवसांपासून वाट पाहत होता तेही कमकुवत झाले आहेत. मला दु:ख वाटते. परंतु, तुला आता संपूर्ण आयुष्य विहिरीतच घालवावे लागेल.

\B

-रमेश महाले

--

बालकथा\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’तर्फे जूनमध्ये इएचएस एक्झिबिशन

0
0

पर्यावरण, औद्योगिक सुरक्षा व आरोग्यासाठी व्यासपीठ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) संस्थेतर्फे पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा या विषयावर ६, ७ व ८ जून रोजी 'इएचएस प्रदर्शन'चे आयोजन अंबड येथील नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरच्या सभागृहात होणार आहे. 'निमा'च्या एन्व्हायर्मेंट, सिक्युरिटी व हेल्थ या विषयावर काम करणारी इएचएस कमिटी या प्रदर्शनाचे संयोजन करणार आहे.

जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धात्मक बाजारपेठेत यशस्वी वाटचाल करण्यासाठी उद्योगांना विषेशत: लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व पर्यावरणाच्या निकषांची ओळख व्हावी या उद्देशाने 'इएचएस एक्झिबिशन'चे होणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन ठरणार आहे.

उद्योजकांचे हित जोपासणे, नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्न करणे, येथील उद्योगांना चालना मिळणे, विविध शासकीय विभाग व उद्योजक यांना जोडणारा दुवा म्हणून कार्य करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून निमा १९७१ पासून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. पर्यावरण व आरोग्यदायी मानवी जीवन यांचा घनिष्ठ संबंध असून आजच्या युगात औद्योगिक प्रगती साधत असतांनाच या दोन्ही बाबींमध्ये सुसूत्रता साधणे महत्त्वाचे असल्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निमातर्फे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी दिली.

प्रदर्शनात ३८ स्टॉल

प्रदर्शनात एकूण ३८ स्टॉल्स् असून सर्व स्टॉल्स् बुक झाले आहेत. प्रदर्शनात सुरक्षा सहित्याचे उत्पादन करणारे उद्योजक, रुग्णालये, पर्यावरणीय प्रयोगशाळा, कॉलेजेस, सोलर पॉवर डेव्हलपर्स, एसटीपी ॲण्ड इटीपी मॅन्युफॅक्चरर्स, फायर हायड्रन्ट एजन्सीज्, वर्क ॲट हाईट ॲण्ड डेप्थ इक्विपमेंट्स, नवीन नावीन्यपूर्ण उत्पादने, पीपीईज् एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्ट्स, एसटीपी, ईटीपी मॅन्युफॅक्चरर्स, कन्सल्टंट्स, एनर्जी एफिशियंट प्रॉडक्ट्स, सोलर डेव्हलपर्स, फायर हायड्रन्ट एजन्सीज्, नवीन तंत्रज्ञान, ग्लोबल सॉफटवेअर सोल्युशन्स् प्रोव्हायडर्स, अल्टरनेटिव्ह सप्लायर्स, कन्सल्टंट्स, स्व्हिहस प्रोव्हायडर्स यांचा स्टॉलधारक म्हणून सहभाग आहे.

व्यवसायाची अपार संधी

प्रदर्शन वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, अभियंते, प्लंबर्स, मेन्टेनन्स् व्यावसायिक, फायर फायटर्स, मनुष्यबळ व्यावसायिक, प्रथमोपचार व्यवसायिक, मटेरियल्स्, सोर्सिंग टिम्स्, डॉक्टर्स आदींना या प्रदर्शन लाभदायी ठरणार आहे. प्रदर्शनाद्वारे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य क्षेत्रतील उद्योगांना व्यवसायवाढीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. संबंधित उद्योजक व व्यावसायिकांनी प्रदर्शनास आवश्यक भेट द्यावी, असे आवाहन निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, उपाध्यक्ष उदय खरोटे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, निमा इंडेक्स २०१८ चे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी व कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैविक विविधतेच्या संरक्षणासाठी नोंदवहीची गरज

0
0

मानवी अस्तित्वासाठी सर्वेक्षणाची निकड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, साधनसंपत्तीचा अमर्याद वापर यामुळे राज्याच्या जैविक विविधतेच्या संपत्तीवरही विपरित परिणाम होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जैवविविधतेचे संवर्धन करणे, संरक्षण करणे आदी बाबींसाठी जैविक विविधता नोंदवहीची गरज जैवविविधता अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधन संपत्तीवर मोठ्या प्रमाणात संकट येत असल्याचे दिसून येत आहे. यात शहरीकरण, वाढती लोकसंख्या, जंगलतोड, वन्यजीवांच्या अधिवासांचा ऱ्हास, जैविक संपत्तीचा होणारा अमर्याद वापर यासारख्या धोक्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येवर होत आहे.

भारत सरकारने २००२ मध्ये संमत केलेल्या जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू केली. महाराष्ट्र राज्य जैविक विविधता नियम २००८ नुसार महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूर मुख्यालयाची स्थापना केली असून सर्व जिल्हे, सर्व नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतीच्या समित्या स्थापनाची कार्यवाही होते आहे. प्रत्येक स्थानिक संस्था तिच्या अधिकार क्षेत्रात जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करते. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे स्थानिक लोकांशी चर्चा करून जैविक नोंदवही तयार करणे, संबंधित बहुव्यापक माहिती या नोंदवहीत ठेवणे, महत्त्वाच्या माहितीची गोपनियता ठेवणे असा आहे.

या बाबींची नोंद आवश्यक

पंचायतीच्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीबाबत माहिती, वैदू, वैद्य, हकीम व पारंपरिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांची माहिती, गावातील संसाधनाबाबत माहिती असणाऱ्या व्यक्तींची माहिती, त्या गावांमधील शेतकी जैविक विविधता, यामध्ये त्या गावातील घेतले जाणारे पीक, फळझाडे, गुरांच्या चाऱ्याचे पीक, पिकांवरील कीड, प्रजाती नोंदी, पाळीव प्राणी, लोकजीवन भूमी रचना पाणी उपलब्धतेचा प्रकार, मृदेचे प्रकार, फळझाडे, औषधी वनस्पती, शोभेच्या वनस्पती, झाडे, वेली, इमारत लाकडाची रोपे, झाडे, प्रजाती, पाळीव प्राणी, मत्स्य संवर्धन प्रजाती, झाडे, झुडूप, कंद, गवत, वेल, महत्त्वाच्या वन्य वनस्पती प्रजाती, जलचर, वन्यप्राणी प्रजाती, पीक प्रजाती, रानटी मूळ, शोभेच्या वनस्पती, सागरी प्राणी, प्रजाती, सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे उभयचर कीटक आदी बाबींची नोंद या नोंदवहीत होण्याची गरज जैवविविधता अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.

कायद्याच्या क्षेत्रात लोक जैविक विविधता नोंदवही महत्त्वाचे पायाभूत साक्ष नोंदणीचे साधन असल्यामुळे त्यात काळजीपूर्वक नोंदी आवश्यक आहेत. जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण आणि जैवविविधतेच्या संपदेचे सर्वेक्षण करणे मानवाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

- अनिल माळी, जैवविविधता अभ्यासक

लोगो : जैविक विविधता दिवस विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुजाण नागरिकांनी लिहिते होणे गरजेचे

0
0

सदानंद बोरसे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लिहिते होण्यासाठी प्रक्रिया म्हणजे सुजाण आणि जबाबदार नागरिकत्वाकडे पाऊल टाकणे होय. लिखित शब्दांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक सुजाण नागरिकाने लिहिते होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे यांनी केले.

गुलमोहरनगर, म्हसरुळ येथील ओम गुरुदेव हास्यसरिता यांच्यातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत 'लिहिते व्हा!' या विषयावर ते बोलत होते. माजी नगरसेविका शालिनी पवार, मंडळाचे अध्यक्ष अरविंद भामरे, केशवराव गायकवाड, शामा आहेर, देवकिसन व्यास आदींच्या उपस्थितीत दहाव्या वर्षाच्या व्याख्यानमालेचे रविवारी उद्घाटन झाले. सदानंद बोरसे म्हणाले, की बोललेला शब्द नाकारणे हे आजकाल रुढ झाले आहे. त्यामुळे लिहिलेल्या शब्दांकडे अधिक जबाबदारीने पाहिले जाते, हा आजवरचा इतिहास आहे. आपण लिहिलेल्या शब्दांमधून इतरांपर्यंत पोहचणाऱ्या विचारांची भावनांची सर्वस्वी जबाबदारीही आपलीच असते. ती टाळता अथवा नाकारता येत नाही. सामाजिक अभिसरणासाठी आणि समाजातील विविध घटकांमध्ये सौहार्द राखण्यासाठी एकमेकांचे विचार जाणून, ते विचार लिखाणाच्या माध्यमातून प्रकट केले पाहिजेत म्हणजे ते सर्वांपर्यंत पोहचविता येतील.

लोगो : वसंत व्याख्यानमाला : म्हसरुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोड परिसरात विद्यार्थिनीचा विनयभंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रेमास नकार दिल्याने संतप्त तरुणाने कॉलेज विद्यार्थिनीचा विनयभंग केला. ही घटना कॉलेजरोड भागात घडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये सुस्मित सुनील भट या संशयिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशिकरोड परिसरातील कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयित मागील वर्षांपासून सतत पाठलाग करीत होता. अनेकदा एकट्या युवतीला रस्त्यात अडवून त्याने प्रेमसंबध ठेवण्याची मागणी केली. मात्र, युवतीने त्यास नकार दिला. पुन्हा ५ मे रोजी हा प्रकार पुन्हा घडला. यावेळी कॉलेजरोड भागात समोर आलेल्या संशयिताने युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रार केल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी संशयिताने दिल्याचे युवतीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

वडनेरगेट भागात

तरुणाची आत्महत्या

नाशिक : वडनेर गेट भागातील २८ वर्षाच्या तरुणाने आपल्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकी विजय बहेनवाल (रा. राजपूत कॉलनी, पाथर्डी रोड, वडनेर गेट) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी विकीने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.

फुल दुकानातून

मोबाइलची चोरी

नाशिक : नमाज पठणापूर्वी फुल दुकानातील गल्यात ठेवलेला मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जुने नाशिक भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. इरफान जहूर शेख (रा. बडी दर्गा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी बडीदर्गा येते ते नमाज पठणासाठी गेले होते. दर्गा भागातील फुल दुकानाच्या गल्यात त्यांनी आपला १६ हजार रुपयांचा मोबाइल ठेवला असता चोरट्यांनी चोरून नेला. घटनेचा अधिक तपास काळोगे करीत आहेत.

कारच्या धडकेने बालक जखमी

नाशिक : कारच्या धडकेत वॉल कंपाउंडची भिंत पडून घरासमोर खेळणारा अडीच वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना विहितगाव भागात घडली. या प्रकरणी शेजारी असलेल्या कारचालक अशोक हगवणे याच्याविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आरिश अल्ताफ मन्सुरी (रा. लॅमरोड रो हाउस, शिवशक्ती व्हिला, विहितगाव) असे जखमी बालकाचे नाव आहे. या प्रकरणी बालकाचे आजोबा शेख रशिद हाजीज यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख रशिद यांचे शेजारी असलेले अशोक हगवणे हे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर पार्क केलेली स्विफ्ट कार (एमएच ०१ एसी ९५०९) बाहेर काढत असताना ही घटना घडली. हगवणे आपली कार रस्त्यावर घेत असताना कारने रशिद शेख यांच्या रो हाउसच्या वॉल कंपाउंडच्या भिंतीस धडक दिली. या घटनेत अंगणात खेळणारा आरिश मन्सुरी जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.

देवी चौकात संशयित अटक

नाशिक : नाशिकरोड येथील देवी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या चोरट्यांस पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यात कुलूप तोडण्यासाठी लागणारी लोखंडी कटावणी सापडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम सलीम शेख (२० रा.गुलाबवाडी, मालधक्कारोड) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. नाशिकरोड पोलिसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. रविवारी रात्री पथक देवी चौकातील सराफ बाजार भागात गस्त घालीत असतांना संशयित अष्टेकर ज्वेलर्स या दुकानाजवळ लपलेला आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने चोरीच्या उद्देशाने लपल्याची कबुली दिली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाळी घरफोड्यांना ‘ब्रेक’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना यंदा दिलासा मिळाला आहे. घरफोडी करणाऱ्या बहुतांश गँग जेलमध्ये बंद करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, यंदा सुटीच्या मोसमात घरफोड्यांची संख्या लक्षणीय घटली आहे. लग्नाचा मोसम असताना चेन स्नॅचिंगसारखे गुन्हेही आटोक्यात ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

दिवाळी आणि उन्हाळी सुट्या चोरट्यांसाठी पर्वणी मानल्या जातात. वर्षभरातील २० ते ३० टक्के घटना या काळात होतात. विशेषत: रहिवासी भागांमध्ये उन्हाळी घरफोड्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. यंदा मात्र शहर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या बहुतांश गँग पकडल्याचा चांगला परिणाम दिसून आला. जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांचा विचार करता यंदा घरफोड्यांना अल्पविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपासदेखील गतवर्षापेक्षा वाढला आहे.

याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले, की उन्हाळी सुटी सुरू होण्यापूर्वीच क्राईम ब्रँचच्या तिन्ही युनिटने वेगवेगळ्या गँग पकडल्या. यात अगदी आतंरराज्य घरफोडी करणाऱ्या दिल्ली येथील टोळीचादेखील समावेश होता. बहुतांश गुन्हेगार जेलमध्ये बंद असल्याने घरफोडीच्या घटना यंदा कमी झालेल्या दिसतात. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनीदेखील गुन्ह्याचा तपास लागणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशन पातळीवर घरफोडीचे गुन्हे रोखणे आणि झालेल्या गुन्ह्याचा तपास करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे रोखताना गुन्हेगारांना जेरबंद करणे यावर भर देण्यात आला असल्याचे उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

घरफोडीसारखे गुन्हे कमी होणे आणि चेन स्नॅचिंग अथवा इतर स्ट्रीट क्राईमला ब्रेक लागण्याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की डिटेक्शन, दिवस-रात्र सुरू असलेली गस्त आणि नागरिकांचे सहाकार्य अशा प्रयत्नांचा हा परिणाम आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी वेगवेगळ्या गँग जेरबंद केल्या. परजिल्ह्यांतील, तसेच शहरातील सर्वच गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असून, गुन्हे रोखण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत. नागरिकांनीदेखील सावध राहयला हवे. काही दिवसांपूर्वी एका महिलेला पोलिसांनी दागिने सांभाळण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेलेल्या महिलेच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. गुन्हे थांबविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

--

दोन वर्षांची तुलनात्मक स्थिती

वर्ष २०१७ -२०१८

प्रकार- गुन्हे दाखल-उघड-टक्केवारी गुन्हे दाखल-उघड-टक्केवारी वाढ अथवा घट

चेन स्नॅचिंग-३१-११-३५ ३२-९-२८-१

दिवसा घरफोडी-२०-२-१० १७-५-२९-३

रात्र घरफोडी-८४-१४-१७ ६९-१४-२०-१५

इतर चोऱ्या- १४०-२४-१७ १०९-४२-३९-३१

वाहनचोरी-१८५-३०-१६ १७४-३२-१८-११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठिंब्यावरून भाजपमध्ये गटबाजी

0
0

राष्ट्रवादीला सोबत देण्यास विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने विधान परिषदेत 'राष्ट्रवादी'ची साथ करण्याचा निर्णय भाजपच्या मतदारांनी आपल्याच पक्षावर उलटविला. राष्ट्रवादीचा साथ अनेकांना पचनी पडली नसल्याने तसेच जातीय समीकरणांमुळे भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यास एका गटाने उघडपणे विरोध दर्शविला. त्यामुळे विधान परिषदेत भाजप निर्णायक ठरेल, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांना गटबाजीने तोंडावर पाडले.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीत शिवसेना व भाजपने अघोषित युती करत ३-३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पालघरमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना रिंगणात उतरविण्याची खेळी केल्याने भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस संतप्त झाले. पालघरची परतफेड नाशकात करायची अशा खुणगाठ बांधत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शिवसेनेला शेवटपर्यंत झुंझत ठेवले. मतदानाला २४ तासाचा अवधी असताना रविवारी (दि. २०) रात्री महामार्गावरील हॉटेल ज्युपिटरमध्ये भाजपच्या मतदारांना बैठकीच्या निमित्ताने एकत्र केले. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर येणार होते. मात्र, उशिरापर्यंत पालकमंत्री महाजन नाशकात दाखल झाले नाही. राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतल्याचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कळविले. त्यावर एका गटाने आक्षेप घेतल्याची चर्चा होती. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्यात आला. यात भाजप मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीला मतदान करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयानंतर पक्षातंर्गत दोन गट निर्माण झाले. पक्षातील प्रबळ गटाने 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याचे आदेश धुडकावत या गटाने शिवसेनेच्या उमेदवारामागे अर्थचक्रानुसार उभे राहण्यावर ठाम राहिला. त्याची प्रत्यक्ष झलकही मतदान केंद्रावर दिसून आली. मतदान जातनिहाय विभागले गेले. भाजप आमदार सीमा हिरे आणि प्रा. देवयानी फरांदे यांनी मतदान प्रक्रियेपासून लांब राहणेच पसंत केले.

व्हीप नाही

राष्ट्रवादीला मतदान करावे यासाठी भाजपने व्हीप बजाविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्हीपला पक्षातंर्गत गटबाजी आडवी आल्याची चर्चा आहे. अनेकांनी व्हीप स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे पक्षाला व्हीपचा निर्णय ऐनवेळी मागे घ्यावा लागला. प्रत्यक्षात कायद्याप्रमाणे भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्याने इतर पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप बजाविता येत नाही. त्यामुळे व्हीप बजाविला नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

आमच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठांच्या या निर्णयानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. शिवाजी सहाणे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सहाणे यांचा विजय निश्चित आहे.

- आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळकरांच्या काव्यसंग्रहाचे परस्पर प्रकाशन

0
0

पत्नी असल्याचे भासवणाऱ्या महिलेकडून साहित्यिकांना पुस्तक भेट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नामवंत कवी प्रकाश होळकर यांची पत्नी असल्याचे भासवत होळकरांच्या 'कोरडे नक्षत्र' या काव्य संग्रहाची परस्पर छपाई करून ते पुस्तक राज्यभरातील साहित्यिकांसह कवींना भेट देणाऱ्या महिलेविरोधात कॉपी राइट अॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे साहित्य विश्वात खळबळ उडाली असून, मूळ प्रकाशकदेखील या प्रकरणी हायकोर्टात धाव घेणार असल्याची माहिती होळकर यांनी दिली.

प्रकाश होळकर यांच्या कोरडे नक्षत्र या काव्य संग्रहास अनेक पुरस्कार मिळाले असून, हे पुस्तक चार ते पाच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकातील अनेक कवितांचा चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. पॉप्युलर प्रकाशनने काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे. मात्र, मागील आठवड्यापूर्वी अरुनिमा प्रकाशनाच्या मंदाकिनी प्रभाकर पन्हाळे यांनी सदर पुस्तकाची छपाई केल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे या पुस्तकाच्या प्रती राज्यातील वेगवेगळ्या साहित्यिकांना तसेच कवींना होळकरांच्या पत्नीच्या नावाने पोहोच होत असल्याचे होळकर यांना समजले. त्यांनी प्रत्यक्ष चौकशी केली असता मंदाकिनी पन्हाळे यांनी हे पुस्तकच छापले नसल्याचे सांगितले. मंदाकिनी पन्हाळे यांनी नकार दिल्यानंतर होळकरांनी सातपूर येथील प्रिटींग प्रेसशी संपर्क साधला. त्यावेळी हे काम सविता पन्हाळे या महिलेने केल्याचे स्पष्ट झाले. आपले पती आजारी असल्याची थाप मारून महिलेने प्रेसच्या कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये देत परस्पर पुस्तक छापले. सदर महिलेने पुस्तकाची प्रत आणि एक पत्र साहित्यिकांना पाठवले असून, त्यात आपणच होळकरांची पत्नी असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार होळकरांनी सातपूर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी कॉपी राईट अॅक्टसह फसवणूक आणि इतर कलमांसह गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास सुरू असून, सदर महिला मागील चार ते पाच वर्षांपासून वेगवेगळ्या पध्दतीने छळ करीत असल्याची कैफियत होळकरांनी तक्रारीद्वारे मांडली आहे.

वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये अर्जफाटे

याबाबत होळकरांनी सांगितले, की सदर महिला पोलिस स्टेशन, साहित्यिकांसह इतर कार्यालयात खोट्या नावाने अर्जफाटे करीत असते. मात्र, अर्जांची चौकशी सुरू झाली की ती हजरच राहत नाही. मागील पाच वर्षांपासून याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता नकली पुस्तक छापून ती माझ्या पत्नीच्या नावे वितरित करीत असल्याचे समोर आल्याने थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांच्या चौकशीअंती हा प्रकार थांबून संबंधित महिलेला कठोर शासन होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीच्या महासभेसाठी नगरसेवकांचा दबाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. ३१ मार्च २०१८ रोजी आपल्या अधिकारात काढलेल्या भरमसाट करवाढीच्या अधिसूचनेवरून नागरिकांमध्ये आगडोंब उसळला आहे. आतापर्यंत आचारसंहितेचे कारण पुढे करून नगरसेवक नागरिकांपासून सुटका करून घेत होते. परंतु, आता विधान परिषदेची निवडणूक संपल्याने करवाढीसंदर्भात काय तो एकदाचा निर्णय घ्या, असा दबाव नगरसेवकांकडून सत्ताधाऱ्यांवर येऊ लागला आहे. अन्यथा प्रभागात फिरणे अवघड होईल, अशी धमकी नगरसेवकांकडून पदाधिकाऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडूनही आता तहकूब महासभा बोलावण्याची तयारी सुरू झाली आहे.

महापालिका आयुक्तांनी केलेल्या एकतर्फी करवाढीला शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांकडून तीव्र विरोध होत आहे. आयुक्तांच्या इंच इंच जमीन करधाडीत आणण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद नागरिकांमध्ये उमटत आहेत. या करवाढीविरोधात महासभेबाहेर अन्याय निवारण कृती समितीतर्फे आंदोलनही करण्यात आले. नागरिकांचा करवाढीविरोधातील तीव्र असंतोष पाहता सत्ताधारी भाजपने घाईगडबडीत महासभा बोलावत यात करवाढीला स्थगिती दिली होती. परंतु, आयुक्तांनी पुन्हा आचारसंहितेचे भूत उभे करीत सत्ताधाऱ्यांना पिछाडीवर लोटले होते. एकीकडे प्रशासनाने या करवाढीची अंमलबजावणी सुरू केली असतानाच दुसरीकडे आचारसंहितेमुळे नगरसेवक कोंडीत सापडले आहेत. आचारसंहितेची ढाल त्यांच्याकडून पुढे केली जात होती. परंतु, आता येत्या २५ मे रोजी आचारसंहिता संपत आहे. त्यामुळे लगेचच शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आचारसंहिता लागण्यापूर्वी काय तो निर्णय घ्या, असा दबाव पदाधिकाऱ्यांवर टाकण्यास नगरसेवकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे नगरसेवकांचा वाढता दबाव लक्षात घेता महापौरांनीही तहकूब महासभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात पुन्हा स्थगितीचे अस्त्र उगारले जाण्याची शक्यता आहे.

--

...तर फिरणेही अवघड

विधान परिषदेचे मतदान संपल्यानंतर महापालिकेत पदाधिकारी आणि नगरसेवक आता परतायला लागले आहेत. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मंगळवारी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. करवाढीचा नव्याने अभ्यास सुरू केला आहे. अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन, 'साहेब, करवाढीचा काय तो सोक्षमोक्ष लावा अन्यथा आम्हाला प्रभागात फिरणे अवघड होईल,' अशी विनवणी करीत आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनाही धडकी भरली असून, महासभेत फैसला होईल, असे आश्वासन त्यांच्याकडून दिले जात आहे.

(अँकरशेजारी २ कॉलम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामातेचा सन्मान...

0
0

गोदामातेचा सन्मान...

गंगादशहरा उत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे मंगळवारी रामुकंडावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगापूजन सोहळ्याद्वारे गोदामातेचा सन्मान करण्यात आला. पर्जन्यराजास साकडेही घालण्यात आले. यावेळी शेकडो समर्थ सेवेकऱ्यांसह लोकप्रतिनिधी व गोदाप्रेमी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट पान तीन

0
0

सहा फूट लांबीची

भलीमोठी 'धामण'

येवला : येवला शहरातील पारेगाव रोडवरील लोणारी फार्मजवळ 'धामण' जातीचा अगदी भला मोठा सर्प सापडला. ही धामण लोणारी यांच्या घरानजीक एका चाऱ्यात लपल्याचे लक्षात येताच तत्काळ सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. सर्पमित्र गणेश मांडे यांने ही धामण पकडली. ही धामण जवळपास ६ फूट लांबीची अन् ३ इंच गोलाकार जाडीची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रासारखे शब्द वापरणे बंद करा

0
0

सुसंवादक रत्नाकर अहिरे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी फार मोठे हृदय लागते. शब्दांमध्ये फार मोठी ताकद असते, आपल्या शब्दांद्वारे एखाद्याला आनंदी करून त्याला समाधान देणे हा खरा मनाचा मोठेपणा असून शस्त्रासारखे शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सुसंवादक रत्नाकर अहिरे यांनी केले.

गोदाघाटावर वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी २२ वे पुष्प अहिरे यांनी गुंफले. 'शब्द हेच अस्त्र, सुखी जीवनाचे मानसशास्त्र' या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान सुभाष सुराणा यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. अहिरे म्हणाले, की मनाच्या गाभाऱ्यात शांतता होत नाही तोपर्यंत तेथे शब्द येऊ शकत नाही. शब्द हे सर्वात ताकदवान आहेत. शब्द आपण किती जपून वापरतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपण सौहार्दपूर्ण शब्द वापरतो का, हे आपण स्वत:च्या मनाला विचारले पाहिजे. कोणतेही युद्ध हे शस्त्राने नव्हे तर शब्दाने सुरू होते. त्यामुळे आपण नकारात्मक विचार करीत असू तर तसेच शब्द बाहेर पडतात. जसा शब्द तसे विचार, जसे विचार तशा सवयी, जशा सवयी तसा स्वभाव हे गणितच आहे असेही ते म्हणाले.

मंचावर शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव, नितीन बच्छाव, बेबीलाल संचेती यांची उपस्थिती होती. परिचय संगीता बाफणा यांनी करून दिला. डॉ. तुषार चांदवडकर यांनी सुराणा यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

आजचे व्याख्यान

वक्ते : अजितकुमार तेलंग

विषय : नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या समाजापुढील आव्हाने

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण डाक सेवक संघटना संपावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना (मालेगाव विभाग) डाक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवार सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. मालेगाव विभागातील १०० ते १२५ डाक कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, मनमाड पोस्ट कार्यालयासमोर त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामुळे डाक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन डाक वितरण ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. कमलेश चंद्रा कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारसी त्वरित लागू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी मालेगाव विभागातील डाक कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात संघटनेचे सचिव ए. पी. सोनार, उपाध्यक्ष पी. पी. गोसावी व विभागातील सर्व ग्रामीण डाक सेवक मालेगाव विभाग सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डाक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या प्रलंबित असून, आजवर केवळ मागण्या पूर्ण करण्याची आश्वासने मिळाली. मात्र आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे घटनेचे पदाधिकारी सोनार व गोसावी यांनी सांगितले. संपात डाक कर्मचारी महिला देखील सहभागी झाल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा संघटनेने निर्धार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैळझर धरणात पाणी सुटणार

0
0

सटाणा : शहरवासीयांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू नये यासाठी केळझर धरणातून ९० दशलक्ष घनफूट पाणी आरम नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यामुळे सटाणा शहरवासीयांना या वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. केळझर धरणाचे आवर्तन सोडल्यामुळे आरम नदीकाठच्या गावांना देखील याचा फायदा होणार आहे. मे महीना व जून महिन्यातील पंधरा दिवस या आवर्तनाचा लाभ होणार असल्याचेही नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेसमुळे पेट्रोल, डिझेल महाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात महाराष्ट्रात इंधन सर्वांत महाग आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने इंधनाचा खर्चही वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नाशिकपेक्षाही मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात इंधनाचे दर अधिक असल्याची माहिती इंधन विक्रेत्यांकडून देण्यात आली. वेळोवेळी लावलेले 'सेस' जैसे थे ठेवले गेल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल महाग असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

किल्लारी येथे भूकंप झाला त्यावेळी पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर एक रुपया सेस लावण्यात आला. तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊन कितीतरी वर्षे लोटली. परंतु, तरीही अद्याप हा सेस हटविण्यात आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ होता. त्यावेळीही सेस लावण्यात आला. गेली दोन वर्षे चांगला पाऊस होऊनही सेस कायम आहे. महामार्गालगतचे वाइन शॉप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हादेखील दोन ते अडीच रुपये वाढविण्यात आले. परंतु, हे वाढविलेले दर सरकारने पुन्हा कधीच मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याखेरीज अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅटदेखील अधिक आहे. त्यामुळे राज्यात इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत असून, नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

कर्नाटक निवडणूक काळात काहीशी रोखलेली दरवाढ आता सैल करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८५ रुपये सात पैशांपर्यंत पोहोचले असून, डिझेलसाठीदेखील नागरिकांना ७१ रुपये ६६ पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या सलग नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असून, त्यामुळे नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. दररोज १२ ते १३ पैशांनी होणारी दरवाढ आता २५ ते ३० पैशांनी होत आहे.

वेगवेगळ्या पंपांवर वेगवेगळे दर

विशेष म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या पंपांवर वेगवेगळे दर असल्याचा अनुभवही नाशिककरांना येत आहे. मंगळवारी (दि. २२) त्रिमूर्ती चौकातील विशाल पेट्रोलपंपावर पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपये सात पैसे दराने विक्री होत होते. परंतु, गंगापूररोडवर पोलिस आयुक्तालयाजवळील सद्भावना पेट्रोलपंपावर हाच दर ८४ रुपये ९८ पैसे प्रतिलिटर होता. डिझेलही ७१ रुपये ६६ पैसे दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. नाशिक शहरात भारत, हिंदुस्थान पेट्रोलियमसह तीन कंपन्यांचे एकूण ६० पेट्रोलपंप आहेत.

कंपन्यांशी चर्चेची अपेक्षा

जागतिक बाजारपेठेतील क्रूड ऑइलच्या किमतींवर देशात इंधनाची किंमत ठरत आहे. कंपन्यांचे प्रॉफिट मार्जिन कमी केले गेल्यास इंधनाचा दर कमी होऊ शकतो. परंतु, त्यासाठी सरकारने कंपन्यांशी चर्चा करून हे दर कमी करवून घ्यायला हवेत, अशी अपेक्षा इंधन विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे सिद्धता प्रमाण वाढवा!

0
0

महासंचालकांचे पोलिस प्रमुखांना आदेश

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : गुन्हा सिद्ध होणे हेच गुन्हेगारी रोखण्याचे मोठे अस्त्र आाहे. त्यामुळे गुन्हा सिद्धतेचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबतचे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिस प्रमुखांना दिले आहेत.

राज्यात २००० मध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणे १२.६ टक्के इतके कमी होते. २०१४ मध्ये हे प्रमाण २८ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचले. यानंतर गृह विभागाने गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण ३३ टक्क्यापर्यंत वाढवण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार राज्यात सुधारणा झाली. पोलिस महासंचालकांनी दोन दिवसांपूर्वी नव्याने आदेश दिले असून, हे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आवाहन पोलिस प्रमुखांसमोर ठेवले आहे. नाशिकचा विचार करता सेशन तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (जेएमएफसी) कोर्टांमध्ये २०१६ मध्ये तब्बल एक हजार १२८ खटले निकाली निघाले होते. चोरी, दुखापत, किरकोळ हाणामारी अशा साधारणतः तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या खटल्यांचा यात समावेश असतो. एक हजार १२८ पैकी ४५३ खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध झाले होते. तर, ६७५ खटले निर्दोष सुटले. २०१५ मध्ये हेच गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण २५.३१ इतके होते. २०१७ मध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण थेट ३८.१२ टक्क्यांवर पोहचले आहे. सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकतात, अशा गुन्ह्यांची सुनावणी सेशन कोर्टात होते. २०१६ मध्ये या प्रकाराच्या १५३ खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली. त्यातील ३३ खटल्यांमधील आरोपींना शिक्षा ठोठवण्यात आली तर १२० गुन्ह्यात सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. २०१५ मध्ये १५.५८ टक्के आणि २०१४ मध्ये गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अवघे ९.४० टक्के इतके होते. चालू वर्षातही हे प्रमाण वाढत असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.

फिर्यादी फितुरतेचे प्रमाण अधिक

गुन्ह्याची उकल करणे, त्यादृष्टीने पुरावे संकलित करणे आणि कोर्टात आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी पुराव्यांची मांडणी करणे ही मोठी प्रक्रिया असून, तसे प्रशिक्षण वेळोवेळी पोलिस अधिकाऱ्यांना वा कर्मचाऱ्यांना देण्यात येते. यात, तपासाधिकारी, सरकारी वकील पैरवी अधिकारी तसेच कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिक व्हॅन यांचा प्रत्येक घटनेत खुबीने वापर केला जातो. सरकारी पक्षाच्या वकिलांसोबत सतत संवाद सुरू असतो. 'पोस्को'सह काही गुन्ह्यांमध्ये फिर्यादी फितूर होण्याचे प्रमाण असून, ते कमी करण्यासाठी काय उपाय गरजेचे आहेत, याचा आढावा घेतला जात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.

२०१५ ते एप्रिल २०१८ पर्यंतचा दोष सिद्धतेचे प्रमाण

वर्ष - जेएमएफसी - सेशन कोर्ट

२०१५ - २५.३१ - १५.५८

२०१६ - ३३.२६ - २१.५७

२०१७ - ३८.२१ - २५.७४

२०१८ - ३९.३९ - २७.७८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क अभियान समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. द्वारका येथील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.

लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, नगरसेवक राहुल दिवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की भाजप सरकार केंद्रात आल्यावर वेळोवेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ होत गेली. नुकतीच केलेली दरवाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी व अन्यायकारक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झालेली असतानाही पेट्रोल ८५ रुपये प्रति लिटर दराने विकण्याचा विक्रम मोदी सरकारने केला आहे. प्राईस रिव्हाईज या पद्धतीप्रमाणे गत ७२ दिवसांत पेट्रोलच्या भावात तब्बल २० रुपयांनी झालेली ही वाढ म्हणजे विकासाच्या नावाखाली सुरू असलेली लूट असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशभरातील पेट्रोलच्या किमती व महाराष्ट्रातील पेट्रोलची किंमत यात आढळणारी तफावतही अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले.

शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅùड. आकाश छाजेड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढ अशीच मनमानी पद्धतीने सुरू ठेवल्यास काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून देशभर आंदोलन उभे करतील, असा इशारा दिला. यावेळी नगरसेविका आशा तडवी, रफीक तडवी, नाशिक जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्ष कुशल लुथरा, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील आव्हाड, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन भुजबळ, प्रदेश युवक काँग्रेस सचिव स्वप्निल पाटील, प्रदेश एनएसयूआय सचिव सागर दाते, विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष संजय सोनवणे, शहर काँग्रेस सरचिटणीस संजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images