Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदार संख्या

$
0
0

नाशिक महापालिका १२७

मालेगाव महापालिका ८९

जिल्हा परिषद ७३

मनमाड नगरपालिका ३५

सिन्नर नगरपालिका ३२

येवला नगरपालिका २८

सटाणा नगरपालिका २४

इगतपुरी नगरपालिका २१

भगूर नगरपालिका २०

नांदगाव नगरपालिका २०

त्र्यंबकेश्वर नगरपालिका १९

चांदवड नगरपालिका १९

निफाड नगरपालिका १९

सुरगाणा नगरपालिका १९

दिंडोरी नगरपंचायत १९

पेठ नगरपंचायत १९

कळवण नगरपंचायत १९

देवळा नगरपंचायत १९

पंचायत समिती १५

देवळाली कॅन्टोन्मेंट ०८

----

पक्षीय बलाबल

शिवसेना २०७

भाजप १६७

राष्ट्रवादी १००

काँग्रेस ७१

मनसे ६

उर्वरित ९३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधान परिषदेसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, सोमवार (दि. २१) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य तालुक्यांच्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले असून, अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसला असून, उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतपेटीमध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी सहाणे, शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांनी दंड थोपटले आहेत, तर अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी हेदेखील अपक्ष उमेदवारी करीत आहेत. विधान परिषदेमध्ये या तिघांपैकी कोण नाशिकचे प्रतिनिधित्व करणार हे ठरविण्यासाठी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ६४४ सभासदांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पसंतीक्रमानुसार ते मतदान करू शकणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य रविवारी पोलिस बंदोबस्तात तालुक्यांच्या ठिकाणांवरील तहसील कार्यालयांमध्ये रवाना करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतदान प्रक्रियेविषयी यंत्रणेला माहिती देण्यात आली. मतदान केंद्र अधिकारी आणि सूक्ष्म निरीक्षकांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, सर्व तहसीलदार उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे लक्ष द्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी आठपासूनच सरकारी वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला होता. पोलिसांचा फौजफाटाही येथे तैनात होता. दुपारी एकच्या सुमारास हे सर्व साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले.

...येथे होणार मतदान

नाशिक तालुका व शहरातील सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजनेचे दालन येथे मतदान केंद्र राहणार आहे. याखेरीज प्रत्येक तालुक्यातील नगरपंचायतीचे सर्व सदस्य, नगरपरिषदेचे सर्व सदस्य, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि मालेगाव महापालिकेचे सर्व सदस्य संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात मतदान करणार आहेत.

केंद्रनिहाय चार पोलिस

मतदानासाठी एकूण १०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये पेन, मोबाइल, कॅमेरा किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू नेण्यास मज्जाव राहणार आहे. उमेदवारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात बूथ उभारता येणार नाही. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी याकरिता प्रत्येक केंद्रावर एक पोलिस अधिकारी आणि तीन कर्मचारी राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर भारत सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष देणार असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपला अहवाल सादर करतील. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून, यंदा प्रथमच वेबकास्टिंगही केले जाणार आहे.

यंदा बोटाला शाई नाही

कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यांनतर संबंधित मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या निवडणुकीत मतदारांसाठी शाईचा वापर केला जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदान करणाऱ्यांची नोंद मतदार केंद्रामध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे एकदा मतदान करणारा मतदार पुन्हा मतदान करू शकणार नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

---

स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदारांची संख्या

नाशिक महापालिका १२७

मालेगाव महापालिका ८९

जिल्हा परिषद ७३

मनमाड नगरपालिका ३५

सिन्नर नगरपालिका ३२

येवला नगरपालिका २८

सटाणा नगरपालिका २४

इगतपुरी नगरपालिका २१

भगूर नगरपालिका २०

नांदगाव नगरपालिका २०

त्र्यंबकेश्वर नगरपालिका १९

चांदवड नगरपालिका १९

निफाड नगरपालिका १९

सुरगाणा नगरपालिका १९

दिंडोरी नगरपंचायत १९

पेठ नगरपंचायत १९

कळवण नगरपंचायत १९

देवळा नगरपंचायत १९

पंचायत समिती १५

देवळाली कॅन्टोन्मेंट ०८

----

पक्षीय बलाबल

शिवसेना २०७

भाजप १६७

राष्ट्रवादी १००

काँग्रेस ७१

मनसे ६

उर्वरित ९३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव @ ४४.८

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मे महिना मालेगावकरांसाठी चांगलाच तापदायक ठरतो आहे. रविवारीदेखील येथील तापमानाचा पारा ४४ अंशांवर गेला. रविवारी येथे कमाल ४४.८, तर किमान २६.४ इतके तापमान नोंदवले गेले. या मोसमातील हे दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमान आहे. याआधी २७ एप्रिल रोजी ४४.६ अंश तापमान होते.

शहर व तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके सोसत नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक रुमाल, टोपी, स्कार्प आणि पाणी बाटली सोबत घेऊन निघत आहेत. उष्णता वाढत असल्याने आता मालेगावकर पावसाची वाट पाहत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले असले तरी घरात मात्र उन्हामुळे उकाडा असह्य होतो आहे.

या मोसमातील सर्वोच्च तापमान

२७ एप्रिल : ४४.८

२ मे : ४४.६

५ मे : ४४.६

६ मे : ४४.४

२० मे : ४४.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीची ‘मतदान शाळा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी सापुतरा येथे 'मतदान शाळा' भरली होती. यावेळी मतदारांची हजेरी घेऊन त्यांना मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून सरावही करवून घेण्यात आला. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान असल्यामुळे त्यात चूक झाली, तर ती उमेदवाराला भारी पडणार आहे. त्यामुळे अगोदरच दक्षता घेत हे मतदान घेण्यात आले.

राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह अपक्ष नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती गेल्या काही दिवसांपासून सहलीला गेलेले आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला त्यांची सहल सापुतरा येथे दाखल झाली. त्यानंतर येथे या मतदारांकडून सराव करवून घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली असून, त्यामुळे त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट नाशिकला येऊन मतदारांशी संवाद साधला.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. पण, वर्षभरात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या घटली. त्याचप्रमाणे त्यांचे मित्रपक्षही फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीची अडचण वाढली होती. पण, काँग्रेसह विविध गट व अपक्षांनी त्यांना मदतीचा हात दिल्यामुळे त्यांनीही या निवडणुकीत व्यूहरचना आखत निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावला. या निवडणुकीत ६४४ मतदार असून, त्यात राष्ट्रवादीचे १००, तर काँग्रेसचे ७१ मतदार आहेत. त्यात मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून, अपक्ष व इतर सदस्यही बरोबर असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

सदस्यांची हजेरी

राष्ट्रवादीच्या कॅम्पमध्ये किती सदस्य हजर आहेत, याची हजेरीसुद्धा घेण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रात्यक्षिक दाखवीत त्यांचा सराव करवून घेण्यात आला. हजेरी घेत असताना महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषद सदस्य अशी वर्गवारी करण्यात आली होती.

मोठ्या नेत्यांची भेट

सापुतरा येथे असलेल्या कॅम्पला राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे अनेक आजी-माजी आमदारांनीसुद्धा मतदारांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची राष्ट्रवादीला चाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या पालघर जागेवर दावा ठोकून भाजपला डिवचणाऱ्या शिवसेनेला नाशिकमध्ये धडा शिकवण्याच्या निर्णयाप्रत भाजपचे नेते आले असून, रात्री उशिरापर्यंत भाजपच्या गोटात कोणाला मतदान करायचे याबाबत खलबते सुरू होती. पाठिंब्यासाठी शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवत ठेवत ऐनवेळी भाजप राष्ट्रवादीला चाल देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेनेही शेवटच्या क्षणापर्यंत जुळवाजळव करत विजयाचा दावा केल्याने नाशिक विधान परिषदेची निवडणूक रंजक झाली आहे. अपक्ष कोकणींचा भ्रमनिरास झाल्यानंतर आता शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यामध्येच सरळ लढत होत असून, भाजपच्या पाठिंब्यावरच विजय सुकर होणार असल्याचे चित्र आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून, शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची बनली आहे. भाजपने अपक्ष उमेदवार परवेझ कोकणींबाबत हात वर केल्याने आता मुख्य लढत शिवसेनेचे दराडे आणि राष्ट्रवादीचे सहाणे यांच्यात होत आहे. ६४४ मतदार असलेल्या या निवडणुकीत विजयासाठीचा ३२२ चा आकडा कोण गाठते याकडे लक्ष लागले आहे. भाजपची १६७ मते निर्णायक ठरणार असून, भाजपकडून शेवटपर्यंत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय न घेतल्याने एकाच वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना वेटिंगवर आहे. त्यातच पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत दगाफटका केल्याने भाजप नाशिकमध्ये त्याचा बदला घेण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पालघरमध्ये पणाला लागली आहे. त्यामुळे पालघरचा बदला नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. भाजपची निर्णायक मते राष्ट्रवादीच्या सहाणेंच्या पारड्यात पडण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, भाजपने शेवटपर्यंत निर्णय न घेतल्याने भाजप राष्ट्रवादीलाच चाल देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या सर्व मतदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेचाही दावा

भाजपकडून होणारा संभाव्य दगाफटका ओळखत विजयाचे गणित जुळवण्यासाठी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत रविवारीच नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. एक्सप्रेस इन हॉटेलात शिवसेनेच्या समर्थक व मतदारांना एकत्रित करण्यात आले असून, खासदार राऊत नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही भाजपविनाच नाशिक आणि परभणीची जागा जिंकू, असा दावा राऊत यांनी केला असून, आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती चार वर्षांपासूनची असल्याचा आरोप त्यांनी केला असून, आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपविनाही दराडे यांचे विजयाचे गणित झालेले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार उतरविल्याने त्यांचा बदला नाशिकमध्ये भाजप घेणार याबाबत विचारणा केली असता, खासदार राऊत यांनी राजकारणात बदला नसतो. कोणत्याही पक्षाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार सेनेने उमेदवार दिलेला आहे. लोकसभा आणि विधान परिषदेची निवडणूक वेगळी असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

बेबनाव पथ्यावर

शिवसेना आणि भाजप युतीतला बेबनाव राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला असून, ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकूच, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. पालघरच्या वादामुळे शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी भाजपने नाशिकमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप दिले आहे. त्यामुळे विजयाच्या गणितात राष्ट्रवादीचे बळ वाढले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फाटाफूट न झाल्यास राष्ट्रवादीचे विजयाचे गणित सोपे होणार आहे. त्यामुळे दोघांमधील पाडापाडीचे राजकारण राष्ट्रवादीसाठी लकी ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयाचे गणित अगोदरच जुळल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आजच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा शिवार खरेदी-विक्रीवर कारवाई

$
0
0

बाजार समिती संचालक व प्रशासनाकडून आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बेकायदेशीर शिवार खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत पत्रकान्वये कळविण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समिती आवारात विक्री करावा, असे आवाहन केले आहे.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात शिवार खरेदी सुरू असल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जे शेतकरी शेतमालाची विक्री शेतात करतील तसेच, अनधिकृत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले यांनी केले आहे.

व्यापाऱ्यांना आवाहन

मालेगाव बाजार समितीतील व उपमुख्य बाजार असलेल्या झोडगे, मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील शेतमाल खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांनी पणन कायद्यांच्या नियमानुसार परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे तातडीने बाजार समितीकडे जमा करावीत. व्यापाऱ्यांनी नियमानुसार व पणन कायद्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करूनच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्याचे आवाहन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिशकालीन पूल बनतोय धोकादायक

$
0
0

दगडी पूल ११३ वर्षे जुना

●●म. टा. वृत्तसेवा, घोटी

शंभरी ओलांडली तरीही वाढत्या रहदारीचा भार सोसणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अस्वली स्टेशनजवळील दगडी पुलाला धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहने गेल्यास पुलाला हादरे बसल्याचे जाणवत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अरुंद असलेला हा पूल जवळपास ११३ वर्षांचा झाला आहे. ब्रिटिश काळात १९०६ मध्ये दारणा धरणाची निर्मितीवेळी हा पूल बांधण्यात आला. दोन वर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पुलाची दुर्दैवी घटना बघता शासनाने राज्यातील सर्व जीर्ण पुलांचे अहवाल संबंधित विभागाला सादर करायला सांगितले होते. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनीही पाहणी करीत या पुलाचा अहवाल सादर करावा, असे आदेश संबंधितांना दिले होते. मात्र तरीही स्थानिक पातळीवरून या पुलाचा अहवाल शासनापर्यंत गेला कसा नाही असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून साकूरफाटा ते वाडीवऱ्हे (व्हीटीसी) या चौदा किमी राज्यमार्गाची नव्याने निर्मिती झाली. दारणा धरणाखाली नवीन उड्डाणपूल झाला. त्यामुळे मुंबईकडून मुंढेगाव तसेच नाशिककडून अस्वली स्टेशनमार्गे या राज्य मार्गावर हजारो अवजड वाहनांची ये-जा सुरू झाली. मात्र याच मार्गावर महत्त्वाची भूमिका बजावणारा हा जुना पूल अजूनही अरुंद स्थितीत जसाचे तसाच तग धरून उभा आहे.

वाढत्या रहदारीमुळे पुलाच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला असून, या पुलाची पाहणी करून हा पूल अजून किती दिवस वाहतुकीयोग्य आहे किंवा नाही याचे परीक्षण होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औंदाणेला पाणीटंचाईची झळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

औंदाणे (ता. बागलाण) गावात गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रचंड उन्हामुळे परिसरातील पाण्याच्या स्रोतांवर परिणाम झाला असून, सर्व पाणीसाठे कोरडेठाक झाले आहेत. ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी प्रशासनाने केळझर धरणातून तत्काळ आरम नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी औंदाणे ग्रामपंचायतीने केली आहे.

औंदाणे गावाची लोकसंख्या २०११-१२ च्या जणगणनेनुसार २६८० इतकी आहे. गेल्या सहा वर्षांत गावाच्या लोकसंख्येत वाढ होऊन आता तीन हजारावर झाली आहे. गावात आठ कूपनलिका असून, भूजलपातळी खालावल्याने चार कूपनलिका बंद अवस्थेततच आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्याने उपलब्ध शिल्लक असलेल्या इतर चार कूपनलिकांमधून आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठा होत नाही. आरम नदीपात्रात मळगाव पंथ्याजवळ विहीर खोदण्यात आली. मात्र या भागात पाण्याचे असलेले जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी हत्ती नदीत विहीर खोदली आहे. याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. या विहिरीच्याही पाण्याच्या पातळीत तीव्र उन्हामुळे घट झाल्याने गावाला पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. या सर्व योजना पाण्याअभावी कुचकामी ठरल्या आहेत. गावात सात-आठ दिवसांनंतर पाणी येत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होते, परंतु धुणीभांडी, आंगोळीसाठी वापराचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरम नदीपात्रात आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे.

पाण्याअभावी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे पडल्याने गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. आरम नदीपात्रात लवकर पाण्याचे आवर्तन सोडून महिलांची पायपीट थांबवावी.

- सविता निकम, सरपंच, औंदाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टाकेदमध्ये तलवारधारक जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात बांबळेवाडीत तलवार घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यास घोटी पोलिसांनी अटक केली आहे. भगवान पांडुरंग बांबळे (रा. बांबळेवाडी, टाकेद) असे तलवारधारक संशयिताचे नाव आहे.

भगवान हा गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच घोटी पोलिस ठाण्याचे कर्मचारी डी. एस. जगताप, प्रकाश कासार, पाटील, सानप, कोकाटे, सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास घेराव घालून तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच पथकाने टाकेद बुद्रुक गावातील हॉटेल साई दरबारपाठीमागे परिसरात छापा टाकून विनापरवाना बेकायदा देशी व विदेशी दारूचा जवळपास सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दगडू भोरू साबळे (वय २७, रा. अडसरे बुद्रुक) या हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरबड येथे आदिवासींचा संस्कृती संवर्धन मेळावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आजवर देशातील जल, जंगल व जमिनीचे संरक्षण आदिवासी बांधवांनी केले आहे. त्यामुळे त्यावर आधी आदिवासी बांधवांचाच हक्क आहे. आदिवासी हे या देशाचे वनवासी नसून, मूळनिवासी असल्याचे आपण विसरायला नको, असे प्रतिपादन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम यांनी केले.

तालुक्यातील गरबड येथे रविवारी आदिवासी संस्कृती संवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पेंदाम बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य चिंतामण भांगरे होते. या मेळाव्याच्या प्रारंभी आदिवासी बांधवांनी ताराफा व बोहाडा नृत्यप्रकार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यास आदिवासी केंद्रीय व राज्य कमर्चारी संघटनेचे राज्याध्यक्ष गमन सोनवणे, पोलिस निरीक्षक बारकू जाधव, नामदेव माळी, भारत कावळे, सरपंच जलाबाई सोनावणे आदींसह परिसरातील अदिवासी बांधव उपस्थित होते. विष्णू गुमाडे यांनी प्रास्ताविक केले. मधु गुमाडे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम गुमाडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांढऱ्या गळ्याचा नर्तक

$
0
0

चिमणीच्या आकाराचा हा पक्षी धूरकट, तपकिरी रंगाचा असतो. याच्या भुवया पांढऱ्या असतात, छातीवर पांढरा भाग असतो अन् पोटही पांढरे असते. हा पक्षी शेपूट पंख्याप्रमाणे पसरवून उभे करत असल्याने हीच त्याची मुख्य ओळख बनली आहे. जंगलात, बागांमधून, शहरातील घरांभोवतालच्या झाडांमधून हा पक्षी दिसून येतो. माणसांना तो घाबरत नाही. हा पक्षी शेपूट पंखाप्रमाणे पसरवून उजवीकडे-डावीकडे अशा उड्या मारून नाचत फिरत असतो. उडणाऱ्या किटकांना हवेतच पकडण्यासाठी हे पक्षी कोलांटउड्या मारत उडत असतात. चक-चक असा आवाज ते काढतात. डास, माशा व इतर उडणारे कीटक हे त्यांचे भक्ष्य आहेत. हे पक्षी पेल्याच्या आकाराचे सुरेख घरटे बनवतात. पान, गवत आणि धागे यांनी तयार केलेले घरटे आतून व बाहेरून कोळिष्टकांनी विणलेले असते.

-बाबासाहेब गायकवाड, निवृत्त वनाधिकारी

--

चला, जाणून घेऊ या पक्षी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण रक्षण

$
0
0

नका तोडू वृक्ष आणि जंगले

करा रक्षण पर्यावरणाचे आणि

आपले जीवन जगा चांगले

नका करू अभक्ष भक्षण

प्राणिमात्रांचेही करा रक्षण

जगण्या शांत आणि स्वस्थ जीवन

शुद्ध हवा आणि स्वच्छ परिसराचे करा संयोजन

परिसर आपला स्वच्छ राखा

सुखी जीवनाची फळे चाखा

नका साचवू सभोवती केरकचरा

स्वच्छतेची सवय सदा आचरा

पाण्याचीही बचत करा

सुखी समृद्ध जीवनाचा हाच मंत्र खरा

जर बिघडले पृथ्वीचे संतुलन

तर धोक्यात येईल मानवी जीवन!

\B-\Bविभाकर कुलकर्णी, नाशिक

--

\Bबालकविता\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर संपूर्ण शहरच ठरणार अनधिकृत

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

tweet-vinodpatilMT

नाशिक : महापालिकेने नवीन मिळतींपाठोपाठ जुन्या मिळकतींचेही नव्याने अॅसेसमेंट सुरू केल्याने कपाटकोंडीतून बाहेर पडणारे नाशिक पुन्हा कपाटकोंडीत अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील सर्वच इमारतींचे अशा प्रकारे अॅसेससमेंट झाल्यास संपूर्ण शहरच अनधिकृत ठरेल, असा दावा आता नगररचना विभागाकडून केला जात आहे. केवळ आयुक्तांच्या तोंडी आदेशाच्या बळावर घोडदौड करणाऱ्या घरपट्टी विभागाच्या अडचणी त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे.

वाढीव करआकारणीच्या टप्प्यात न आलेल्या जुन्या इमारतींचेही नव्याने अॅसेसमेंट करून त्यांच्यावर दंडात्मक दराने करआकारणी करण्यासह या इमारती अनधिकृत ठरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे नगररचना सहसंचालकांनी दिलेले भोगवटा प्रमाणपत्र अतांत्रिक अशा घरपट्टी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अनधिकृत ठरवून व करआकारणीतून मालामाल होण्याचा नवा फंडा महापालिकेने शोधून काढला आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या अडवणुकीत भर पडण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेने दि. १ एप्रिल २०१८ पासून शहरातील मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात बदल केला असून, नव्या व जुन्या मिळकती अधिसूचना क्रमांक ५२२ च्या जाळ्यात आणल्या आहेत. या अधिसूचनेत १ एप्रिलपासून नव्याने अस्तित्वात येणाऱ्या इमारतींनाच हा दर लागू असेल, असा दावा केला गेला असला, तरी या अधिसूचनेची मोडतोड करून तो जुन्या मिळकतींना लागू करण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. गंगापूररोडवरील लिबर्टी लोट्स या इमारतीला २०१२ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र असताना त्या इमारतीला घरपट्टी विभागाने आपल्या अधिकारात अनधिकृत ठरवून त्यांना करआकारणीची नोटीस बजावली आहे. नगररचना सहसंचाकांनी अधिकृत ठरवलेली ही इमारत घरपट्टी विभागाच्या अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी मोजमाप करून अनधिकृत ठरवली आहे. भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या, परंतु करआकारणी न झालेल्या शहरात आजमितीस जवळपास ३ ते ५ हजारांच्या आसपास मिळकती आहेत. त्यामुळे या सर्व मिळकती अनधिकृत ठरणार आहेत. शहरात कपाटकोंडीची सुरुवात २०१४ पासून झाली. त्यापूर्वी शहरातील सर्व इमारतींमध्ये कपाट हे अलहिदा समजले जात होते. कपाटासहीतच भोगवटा प्रमाणपत्र दिले जात होते. त्यामुळे या मिळकतींचेही नव्याने अॅसेसमेंट केले, तर त्यांचे क्षेत्रफळ वाढीव ठरणार आहे. त्यामुळे या सर्व इमारतीही घरपट्टी विभाग अनधिकृत ठरविणार काय, असा प्रश्न नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे घरपट्टी विभागाच्या अतिशहाणपणावरून नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

वस्तुस्थिती मात्र वेगळीच

जे मिळकतधारक बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र सादर करणार, अशा मिळकतीला कलम २६७ (अ) अन्वये घरपट्टी विभागाला दंडात्मक दराने करआकारणीचा अधिकार आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या मिळकतीला भोगवटा प्रमाणपत्र आहे, अशा मिळकतींचे चटईक्षेत्र घरपट्टी विभागाकडून मोजून त्यात एक किंवा दोन चौरस मीटर वाढीव चटईक्षेत्र आढळल्यास अशा इमारतीला अनधिकृत ठरविण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. केवळ आयुक्तांच्या तोंडी आदेशाने संपूर्ण इमारतच अनधिकृत ठरवून करआकारणी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

घरपट्टी, नगररचनात वाद

शहरातील मिळकतींना बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र नगररचना विभागाकडून दिले जाते. नगररचना विभागाचे प्रशिक्षित, तांत्रिक कर्मचारी व अभियंते प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप घेऊन मिळकतीला पूर्णत्वाचा दाखला देतात. नगररचना विभागाच्या सहसंचालकांच्या सहीने ही संपूर्ण मिळकत अधिकृत ठरते. परंतु, घरपट्टी विभागाचे कर्मचारी अंतात्रिक असून, त्यांना कोणतेही प्रशिक्षण नसताना त्यांच्याकडून चटईक्षेत्राचे मोजमाप केले जाते. मोजमापाची तांत्रिक माहिती नसतानाही त्यांच्याकडून मोजमाप करताना एक किंवा दोन चौरस मीटर क्षेत्रफळ इकडे-तिकडे होऊ शकते. घरपट्टी विभागाला मिळकत मोजण्यासह ती अनधिकृत ठरविण्याचे कोणत्या कायद्यान्वये अधिकार आहेत, असा सवाल नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे या दोन विभागांतच आता वाद सुरू झाले आहेत.

--

मटा मालिका

करवाढीचा खेळखंडोबा : भाग २

(अँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांचं चांगभलं!

$
0
0

'निमा इंडेक्स'मधून ४५९ बीटूबी मीटिंग; २५ ते ३० टक्के वृद्धी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या निमा इंडेक्स या औद्योगिक प्रदर्शनात बिझनेस टू बिझनेस अर्थात 'बीटूबी' या मीटिंगमधून २५ ते ३० टक्के उद्योगवाढीसाठी फायदा झाल्याची माहिती 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर व मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनात तब्बल ४५९ 'बीटूबी मीटिंग' झाल्या. या मीटिंगमुळे एकमेकांच्या उद्योगांना त्यातून फायदा झाला असून अनेकांना ठिकठिकाणाहून ऑर्डर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकमधील उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंच उपलब्ध करून देत व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ३ ते ५ मे दरम्यान मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे निमातर्फे 'निमा इंडेक्स २०१८' हे औद्योगिक प्रदर्शन झाले होते. दर तीन वर्षातून एकदा होणारे हे औद्योगिक प्रदर्शन यंदा पहिल्यांदाच नाशिकबाहेर झाले. त्याला नाशिकला चांगला फायदा झाला असून त्यामुळे नाशिकचे ब्रँडिगही झाले, गुंतवणूकवाढीच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.

प्रदर्शनात 'बीटूबी'द्वारे सहभागी स्टॉलधारकांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे याआधी झालेल्या निमा इंडेक्स प्रदर्शनांपेक्षा हे प्रदर्शन वेगळे असून व्यापक दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला होता. केवळ स्टॉल उपलब्ध करून न देता लघुउद्योजकांना ब्रँडिंगचे इतरही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले.

प्रदर्शनात पहिल्या दिवशी बोटस्वानाच्या इंडस्ट्रियल ॲण्ड ट्रेड सेंटरच्या कॉन्सुल जनरल मिस जेमा, कॉन्सुलेट जनरल ऑफ कॅनडाचे किशोर मुंदरगी, जपानमधील वाकायामा प्रिफेक्चुरल गव्हर्नमेंटच्या डायरेक्टर तातसुनोरी ओनीशी, मॅनेजर सिझो त्सुजी, इसा कोही, तसेच कॉन्सुलेट ऑफ द रिपब्लिकन ऑफ मॉरिशच्या कॉन्सुल ॲण्ड हेड ऑफ मिशन बी. नापॉल, घाना इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट सेंटरचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर टेडी गुह यांनी प्रदर्शनास भेट दिली. 'निमा'च्या माध्यमातून नाशिकमधील उद्योगांच्या ब्रँडिंगसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्न व उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रशंसा केल्याची माहिती निमातर्फे देण्यात आली. यावेळी निमाचे उपाध्यक्ष उदय खरोटे, मनीष कोठारी, आशिष नहार उपस्थित होते.

रेल्वेचाही प्रदर्शनात सहभाग

रेल्वेने प्रथमच प्रदर्शनात सहभाग घेतला. यावेळी रेल्वेचे आरडीएसओ विभागाचे संचालक सचिन दिघडे यांनी प्रेझेन्टेशन सादर केले. रेल्वेसाठी व्हेंडरशिप रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केले जाते याची सविस्तर माहिती देण्यात आली. गुणवत्ता नियंत्रण कक्षेत जी जी उत्पादने येतात त्या संबंधीचे विश्लेषणही केले. फोर्जिंग उत्पादने, इलेक्ट्रिकल्स उत्पादने, जोडणीसाठी वापरण्यात येणारे नट बोल्ट आदी उत्पादनांचा यादीत समावेश होता. या संदर्भातील उद्योजकांनी सदर प्रेझेन्टेशनचा फायदा घेतला. व्हेंडर रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या फी बद्दलदेखील सविस्तर चर्चा केली व या प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती दिली.

वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रेझेन्टेशन महत्त्वाचे

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ॲडव्हायझर जयंत घाटे यांनी प्रेझेंटेशन सादर केले. वर्ल्ड ट्रेड सेंटरची जगातील व्याप्ती विषद केली. जगातील महत्त्वाच्या देशांमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १२७ शाखा आहेत. परदेशी प्रतिनिधी त्यांच्याबरोबरच्या मीटिंग्ज, कॉन्फरन्स या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या माध्यमातून होतात. निर्यात आणि सर्व प्रकारचे मार्गदर्शन, व्यवसायाच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषद - जिल्हा

$
0
0

जिल्ह्यात शंभर टक्के मतदान

विधान परिषद निवडणूक

टीम मटा

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या एका जागेसाठी शांततेत मतदान पार पडले. मालेगाव, बागलाण, येवला, कळवण, निफाड, इगतपुरी, नांदगाव, चांदवडसह सर्व तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले. कुठेही अनूचित प्रकार घडला नाही. आता २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

मालेगाव :

मालेगाव : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी येथील मतदान केंद्रावर सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्वच ९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने १०० टक्के मतदान झाले. भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळाली. येथील तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्र होते. केंद्राध्यक्ष म्हणून मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी काम पाहिले. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास काँग्रेसचे महापौर रशीद शेख आपल्या सर्व २८ नगरसेवकांसह मतदानकेंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासात ९७ पैकी २४ इतके मतदान झाले होते. दुपारपर्यंत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.

----

निफाड :

निफाड : येथील तहसील कार्यालयात मतदान झाले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या निफाड नगरपंचायतीच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान केले. शिवसेनेचे नगराध्यक्ष मुकुंद होळकर यांच्यासह नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांनी दुपारी दोनच्या सुमारास मतदान केले. यानंतर भाजप, बसप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. दुपारी पावणेचार वाजता सर्व २९ मतदारांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले.

---

इगतपुरी :

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्व २७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ वाजेनंतर मतदारांनी टप्प्याटप्प्याने येऊन मतदान केले. इगतपुरी तालुक्यात एकूण २७ मतदार होते. त्यात इगतपुरी नगराध्यक्षासह २१ नगरसेवक, पाच जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सभापती असे मतदार होते. त्यात १५ पुरुष, तर १२ महिला मतदार होते. जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ, जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव, नगरसेवक नईमखान आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

---

कळवण :

कळवण : कळवण तालुक्यातही सर्व २४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक्केवारी १०० ठरली. कळवण नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर प्रथमच मतदानाचा हक्क मिळालेल्या दोन स्वीकृतसह १९ नगरसेवक, चार जिल्हा परिषद सदस्य, तर एक पंचायत समितीच्या सभापती महिलेने मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमध्ये २४ पैकी २० आघाडीचे, एक शिवसेनेचा व ३ भाजपचे मतदार आहेत. कळवणच्या प्रशासकीय इमारतीत तहसीलदार कार्यालयात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारी १ ते २ :३० पर्यंत सर्वांनी मतदान केले. प्रशासकीय इमारतीच्या बाहेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तळ ठोकून होते.

----

बागलाण :

सटाणा : बागलाणमधून १०० टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी दिली. तहसीलदारांच्या दालनात सकाळी आठ वाजता मतदान प्रकियेस सुरुवात झाली. यामध्ये सटाणा नगरपरिषदेचे २४ नगरसेवक, ७ जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती मिळून ३२ मतदान असलेल्या मतदारांमध्ये १३ पुरुष व १९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वप्रमथ स्विकृत नगरसेवक मनोहर देवरे यांनी मतदान केले, तर शेवटचे मतदान भाजपचे नगरसेवक मुन्ना शेख यांनी ३.३० वाजता केले. यावेळी सनपा मुख्याधिकारी हेमलता डगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी मतदान अधिकारी म्हणून कामकाज बघितले.

--

नांदगाव व चांदवड

मनमाड : नांदगाव व चांदवड तालुका तहसील येथे सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. चांदवड व नांदगावमध्ये १०० टक्के मतदान झाले. नांदगाव व मनमाड पालिका या दोन्ही ठिकाणच्या नगरसेवकांचे मतदान असल्याने एकूण मतदार संख्या ६० होती. चांदवडमध्ये २४ मतदार होते. दुपारनंतर मतदानाचा जोर वाढला. नांदगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने सकाळ सत्रात, तर शिवसेना-भाजप सदस्यांनी दुपार सत्रात मतदान केले. नांदगाव येथे तहसीलदार योगेश जमधाडे, मुख्याधिकारी व्ही. बी. दातीर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. चांदवडमध्ये संथगतीने मतदान झाले. मात्र सर्व २४ मतदारांनी हक्क बजावल्याने चुरस दिसून आली. तहसीलदार शरद मंडलीक, नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

--

येवला

येवला : येवला तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर अगदी शांततेत मतदान पार पडले. दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी शेवटचे मतदान झाले. नगरपालिकेच्या सर्व २८ नगरसेवक मतदारांसह तालुक्यातील ५ जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सभापती अशा एकूण ३४ मतदारांनी येवला तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रमोद सस्कर यांनी ३.४० च्या सुमारास शेवटचे मतदान केले. येवला तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी केंद्राध्यक्ष, तर पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर-शहाणे, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख व तहसीलचे संतोष तरटे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूखंडाची विक्री; ७१ लाखांना गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकच भूखंड अनेकांना विक्री करत एकाने आपल्या मित्राची तब्बल ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आदिश दिलीपकुमार शहा (रा. लब्धी अपार्ट. गुरूद्वारासमोर, शिंगाडा तलाव) असे संशयिताचे नाव आहे. कुलकर्णी गार्डन परिसरातील जयेश जितेंद्र सराफ आणि संशयित आरोपी शहा हे दोघे मित्र असून, २०११ पासून दोघे एकत्रित जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. या काळात अनेक व्यवहार यशस्वी झाल्याने जयेश यांचा आदिशवर विश्वास बसला होता. जानेवारी २०१६ मध्ये आदिशने खडकजाम शिवारातील फायनल ले आउट असलेले गट नंबर ३३६, ३३७, ३३८ मधील अंदाजे ५० ते ५५ प्लॉटची विक्री करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार जयेश सराफ यांनी प्रारंभी सात लाखाची रोकड गुंतविली होती. त्यानंतर या व्यवहारापोटी संशयित शहा यांना टप्प्या-टप्याने ७१ लाख ३५ हजार रुपये धनादेशाद्वारे अदा केले. तसेच पैसे दिल्याने जमीन खरेदीसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज तयार करण्यास सांगितले. यावेळी खरेदीखत चांदवड सब रजिस्टर कार्यलयात करण्याचे ठरले. परंतु, कालांतराने त्याने टाळाटाळ केली. पूर्ण पैसे हाती पडताच शहा याने जयेश यांचे फोन घेणे बंद केले. त्यामुळे जयेश यांनी वकिलामार्फत रितसर नोटीस बजावली. मात्र, शहाकडून कुठलेही उत्तर प्राप्त झाले नाही. जयेश यांनी त्याच्याविरोधात निफाड येथील दिवाणी कोर्टात दावा दाखल केला. याच दरम्यान संशयित आदिश शहाने जयेशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच खरेदी करून देण्याचे कबूल केलेले ४८ प्लॉटस इतर नऊ जणांना मोठी रक्कम घेऊन परस्पर विक्री करून टाकले. त्यामुळे जयेश यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक आत्माराम शेळके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विखे पाटील बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

$
0
0

खात्यातून एक हजार रुपयेच काढता येणार

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑप बँकेवर रिझर्व बँकेने सहा महिन्यासाठी निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना एक हजारपेक्षा जास्त रक्कम आता खात्यातून काढता येणार नाही. निर्बंध काळात नवीन कर्जवाटपही बँकेला करता येणार नसल्याने खातेदार व ठेवीदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान बँकेने हे निर्बंध मार्च २०१७ च्या आर्थिक परिस्थितीनुसार ठरविले असून सद्यस्थितीत बँकेची स्थिती चांगली असल्याचे म्हटले आहे.

नाशिकमध्ये गंगापूर रोडवर या बँकेची एकच शाखा असून शहरात चार हजार सभासद आहे. बँकेचे २०१६-१७ या आर्थिक वर्षात अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) ३० टक्के झाल्याने निर्बंध लादण्यात आले आहे. पण, २०१७-१८ मध्ये बँकेचा एनपीए कमी होऊन तो १८ टक्केपर्यंत आला तर नेट एनपीए हा ८ टक्के आहे. त्यामुळे बँकेची स्थिती चांगली असल्याचा दावा बँकेचे चेअरमन डॉ. शोधन गोंदकर यांनी केला आहे. बँकेकडे आजही ६ कोटी ७८ लाख रुपयांच्या ठेवी असून बँकेने ३ कोटी ५० लाख कर्जवाटप केले आहे.

चांगल्या कारभाराची अपेक्षा

बँकेचा कारभार सुस्थितीत चालवा, यासाठी काही वर्षांत रिझर्व बँकेने आपले नियम कडक केले आहे. त्यातही बँकेच्या कारभारात फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे रिझर्व बँकेने चांगली कामगिरी न करणाऱ्या बँकेवर कारवाईचे पाऊल उचलले असून त्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑप बँकेचा समावेश झाला आहे.

बँकेवर मार्च २०१७ च्या आर्थिक स्थितीवरून निर्बंध लादले आहेत. पण, त्यानंतर बँकेची स्थिती सुधारली असून एनपीएचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे बँकेवरील हे निर्बंध उठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे खातेदारांनी घाबरण्याचे कारण नाही.

- राहुल सोनारीकर, व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच तलवारींसह तरुणास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे तलवारी विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला थाळनेर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यात असलेल्या पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ऋषीकेश उर्फ कमलेश रमणसिंग राजपूत (वय २०, रा.अहिल्यापूर ता. शिरपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अहिल्यापूर गावातील आर. सी. पटेल हायस्कूलमागे रविवारी सायंकाळी ही कारवाई झाली असून, आरोपीविरुद्ध विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यातून पिस्तूल जप्त
तालुक्यातील नवलाणे गावातून सोनगीर पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलातर्फे सध्या अवैध शस्त्र शोध मोहीम राबविण्यात येत आहे. नवलाणे ता. धुळे गावात राहणारा समाधान प्रभाकर मासुळे (२८) याने नाशिक येथील एकास गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री केले होते. त्यावरून त्यास सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने हे पिस्तूल चार महिन्यापूर्वी सातपूर, नाशिक येथील राहूल महादू भोई-मोरे (२८) यास विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक नाशिक येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने राहूल मोरे यालाही ताब्यात घेतले. पण पिस्तूल काही मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली. तेव्हा पिस्तूल नवलाणे येथे समाधान मासुळे याच्या घरात लपवून ठेवल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी रविवारी समाधान मासुळे यांच्या घरातून २५ हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी बनावट पिस्तूल मॅगझिनसह ताब्यात घेतले. समाधान मासुळे व राहूल मोरे या दोघांना अटक करण्यात आली.

..

शिवशक्ती नगरात घरफोडी

चाळीसगाव : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, शिवशक्तीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली ३८ हजाराची रोकड लंपास केली. रविवारी, सकाळी ११.३० ते सोमवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भडगाव रस्त्यावरील शिवशक्ती नगर भागात ही घटना घडली. सचिन मगन भदाणे हे आपल्या कुटुंबासह शिवशक्ती नगर भागात राहतात. रविवारी त्यांच्या घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबांसह धुळे जिल्ह्यातील निमखेडी येथे कार्यक्रमाला गेले होते. यादरम्यान रात्री घरात कोणी नसल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत कपाटातील ३८ हजाराची रोकड लंपास केली. गेल्या दोन दिवसातील शहरात घरफोडीची ही दुसरी घटना असून, पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला नोकरीतून मुक्तता द्या

$
0
0

जवान चंदू चव्हाणचा वरिष्ठांना अर्ज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नजरचुकीने भारतीय सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला सैन्यदलातील जवान चंदू चव्हाण याने सैन्यदलाची नोकरी सोडण्यासाठी वरिष्ठांकडे अर्ज सादर केला आहे. या अर्जाद्वारे चंदूने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत सरकारने त्याला परत आणल्यानंतर पुन्हा देशसेवा करणार असल्याचे चंदूने म्हटले होते. मात्र, सतत होणाऱ्या चौकशी, राजकीय चिखलफेक सुरू असल्याने आणि त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे चंदूने हा निर्णय घेतल्याचे त्याचा भाऊ भूषण चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

दीड वर्षापूर्वी चंदू नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर चंदू चव्हाण याच्या सैन्यदलामार्फत विविध पातळींवर चौकशी सुरू आहेत. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रियेचाही सामना चंदूला करावा लागत आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय शस्त्र घेऊन कॅम्प सोडल्यामुळे चंदूला शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर चंदूला अहमदनगर येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. प्रकृतीवर परिणाम झालेला असल्याने चंदूवर काही महिन्यांपासून मनोचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चंदू चार महिने पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर सुखरूप भारतात परतला होता.

सामान्य जीवन जगण्याची इच्छा
तीन दिवसांपूर्वी वरिष्ठांना दिलेल्या पत्रात चंदूने म्हंटले आहे, की मी वीस दिवसांपासून मिलिटरी हॉस्पिटलच्या मनोचिकित्सा वॉर्डमध्ये आहे. माझ्यासोबत जे घडले आहे, त्यानंतर माझ्या अडचणी आणखी वाढल्या असून, सर्वसामान्य जीवन जगण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला नोकरीतून मुक्त करण्यात यावे. चंदू २०१२ मध्ये सैन्यात भरती झाला असून, ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. चंदूचा मोठा भाऊ भूषण हादेखील लष्करात ९ मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ची तिसरी लॉटरी ४ जूननंतर

$
0
0

पुन्हा अर्ज करण्याची २६ मेपासून संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्यातील सुधारित धोरणानुसार अधिकाधिक विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांतर्गत प्रवेश मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होणार असून २६ मे ते ४ जूनपर्यंत वंचित घटकांमधील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. या कालावधीनंतर तिसरी लॉटरी काढली जाणार असल्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात ४६६ शाळांमधील ६ हजार ५८९ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत दोन फेऱ्या या प्रक्रियेसाठी पूर्ण झाल्या असून ६ हजार ५८९ पैकी ३ हजार ३८१ प्रवेश पूर्ण झाले आहेत. उरलेल्या जागांसाठी तिसरी फेरीची लॉटरी काढण्यात येणार आहे. मात्र, नवीन शासन निर्णय व परिपत्रकानुसार पालकांकडून उर्वरित जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्यांचाही समावेश

जिल्ह्यातील रिक्त जागांमध्ये सुधारित कार्यपद्धतीमुळे एचआयव्हीग्रस्त बालकांनाही आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश मिळू शकणार आहे. एचआयव्ही बाधित, एचआयव्ही प्रभावित अशा दोन्ही गटांमधील बालकांना यात समावेश आहे. या बालकांना केवळ जिल्हा शल्य चिकित्सक किंवा समकक्ष अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती(ड), इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील बालकांच्या पाल्यांनाही उत्पन्नाच्या दाखला देणे बंधनकारण नाही. त्यांना केवळ जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images