Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सुरगाण्यात ‘आयपीएल’वर सट्टा

$
0
0

दोघा अटक; अन्य संशयितांचा शोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरातून शनिवारी (दि. १९) अटक केली.

विशाल सुधाकर शिरसाठ (३३) आणि तुषार उल्हास आहेर (२६, दोघे रा. ग्रामपंचायतरोड, कृष्णानगर, सुरगाणा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सध्या आयपीएल टी २० क्रिकेट सामन्यांची धूम सुरू असून, सट्टेबाज याचा फायदा घेत आहेत. मोठ्या शहरांपाठोपाठ छोट्या शहरांसह गावातही सट्टेबाजीला उत आला असल्याचे या कारवाईमुळे समोर आले आहे. पांचाळ गल्लीत आयपीएलवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी एका घरावर छापा मारून दोघा संशयितांना जेरबंद केले. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाचा क्रिकेट सामना शनिवारी सुरू होता. या सामन्यावर सट्टा घेण्याचे आणि लावण्याचे काम दोघे संशयित करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाइल, एक लॅपटॉप, सात हजार ८८० रुपयांची रोकड, बेटींचे अंक आकडे लिहिलेले रजिस्टर असा ३८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागल्याने संशयितांचे काही साथिदार फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर दोन दिवसांनी नवीन सीमकार्ड

दोन्ही संशयित वेगवेगळ्या मोबाइल फोनद्वारे दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे सीमकार्ड बदलून ग्राहकांना कॉल करीत होते. ग्राहकांनी अॅडव्हान्स पैसे दिल्यानंतर सट्टा लावण्याचे काम सट्टेबाज करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. अतिदुर्गम भागात आयपीएलवर सट्टेबाजी करण्याचा प्रकार प्रथमच उघड झाला असून, आगामी काळात अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोलवे प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील पीएनजी टोल-वे कंपनीकडून सातत्याने महिला कर्मचाऱ्यांचा होणारा मानसिक छळ, स्थानिक महिला कर्मचाऱ्यांना डावलून जबरदस्तीने परप्रांतीय पुरुष कर्मचाऱ्यांना टोल बुथवर बसविणे याच्या निषेधार्थ टोल प्लाझाच्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि. २०) दुपारी दीड वाजेपासून व्यवस्थापनाच्या विरोधात असहकार आंदोलन पुकारले होते.

या आंदोलनात सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे दुपारी दीड वाजेपासून पिंपळगाव टोल प्लाझा वाहनासाठी विनाशुल्क सुरू होता. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत टोल प्लाझा वसुली बंदच राहील, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे टोल प्रशासन पुरते हतबल झालेले दिसून आले. त्यामुळे रविवारी टोल कंपनीचे किमान ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या वेळी कामगार संघटनेचे पांडुरंग भडांगे, डॉ. अजय लोढा, रामेश्वर भावसार, मीनाक्षी गांगुर्डे, सुवर्ण बोरसे, शारदा बोरस्ते, सुनंदा भालेराव आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

जुन्या महिला कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी न करणे तसेच बेकायदेशीरपणे कर्मचारी संघटनेच्या १० ते १२ कर्मचाऱ्यांना कुठलीही लेखी सूचना न देता गत सहा महिन्यापासून कामावरून कमी केल्याची तक्रारही काही कर्मचाऱ्यांनी या वेळी बोलताना केली. तालुक्यातील यतीन कदम, वैकुंठ पाटील, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील आदींनी आंदोलनाचे वृत्त कळताच टोल नाक्यावर धाव घेत कर्मचाऱ्यांना पाठिंबा व्यक्त करीत स्थानिक टोल व्यवस्थापक प्रताप भोईटे यांची भेट घेतली. मात्र, भोईटे यांनी याबाबत हात वर करत आपले अधिकार मर्यादित असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवून लवकरच निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक स्थिती सुधारल्यास लाभ

$
0
0

शिवाजी चुंभळे यांचे आश्वासन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही विरोधकांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून समितीला अडचणीत आण्याचे उद्योग सुरू केले आहेत. बाजार समितीची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विरोधकांच्या भूलथांपाना बळी पडू नये, असे आवाहन सभापती शिवाजी चुंभळे यांनी केले आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यास नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

राज्य सरकारच्या पणन व सहकार विभागाच्या आदेशाप्रमाणे वेतनवाढ व पदोन्नती मिळावी, अशी मागणी समितीतल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु यामुळे बाजार समितीची बदनामी होत असल्याचे सांगत, सभापती शिवाजी चुंभळे यांनी कर्मचाऱ्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. तसेच सद्यस्थितीत बाजार समितीची आर्थिक स्थिती योग्य नसल्याचा दाखला दिला आहे. समितीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह पदोन्नतीचा लाभ देणे शक्य आहे. परंतु, कर्जामुळे बाजार समिती आर्थिक संकटात असतानाही, आपण कर्मचाऱ्यांच्य ग्रॅच्युईटीचे दोन कोटी, भविष्य निर्वाह निधीचे थकीत सव्वा कोटी व कर्मचाऱ्यांनी अन्य देणी मिळून जवळपास साडेतीन कोटी रुपये जमा केले आहेत. सध्यस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सर्व देण्या नियमाप्रमाणे दिली जात आहे. मात्र, काही विरोधक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून समितीची बदनामी केली जात आहे. आर्थिकदृष्ट्या ज्या बाजार समित्यांना वाढीव वेतन व पदोन्नती देणे शक्य आहे, त्यांनीच द्यावे असे राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर नियमानुसार सर्व लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही भुलथापा तसेच प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन चुंभळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या २९ मे रोजी २६ पदांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी रविवारी ३८ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले. एकता पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी वरुण तलवार, तर विरोधी गटातर्फे तुषार चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत.

ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने अनेक उद्योजकांनी या निवडणुकीत उडी घेतली असली, तरी अध्यक्षपद सोडल्यास सर्व उमेदवार एकता पॅनलचेच आहे. या निवडणुकीसाठी ४५ इच्छुकांनी अर्ज नेले असले, तरी ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, दोन सेक्रेटरी व खजिनदारबरोबरच २० कमिटी सदस्य निवडले जाणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता सोमवारी वैध, अवैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. अवैध ठरलेल्या नामनिर्देशनपत्रांवर २२ मे रोजी सुनावणी करून ११ वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास २९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी सकाळी ७ नंतर मतमोजणी केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी एकता पॅनलतर्फे वरुण तलवार यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी 'आयमा'चे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी अध्यक्ष धनजंय बेळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. तुषार चव्हाण अर्ज दाखल करताना भाजप आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर, नगरसेवक व उद्योजक शशीभाऊ जाधव, लघु भारतीचे संजय महाजन, योगेश कानाणींसह त्यांचे समर्थक उद्योजक उपस्थित होते. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. जी. जोशी काम पाहत आहेत.

अध्यक्षपदासाठीच निवडणूक

अध्यक्षपदासाठी वरुण तलवार व विरोधी गटातर्फे तुषार चव्हाण यांच्यातच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. इतर २५ पदांसाठी एकता पॅनलचेच उमेदवार असल्यामुळे त्यातील अतिरिक्त अर्ज मागे घेतले जाणार आहेत. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. पदनिहाय पुढीलप्रमाणे अर्ज दाखल झाले असून, सर्व उमेदवार एकता पॅनलचेच आहेत. उपाध्यक्ष- निखिल पांचाळ, ललित बूब, जनरल सेक्रेटरी- उन्मेश कुलकर्णी, निखिल पांचाळ, सेक्रेटरी (दोन पदे पाच अर्ज)- राधाकृष्ण नाईकवाडे, जितेंद्र आहेर, राजेंद्र पानसरे, योगिता आहेर, विजय जोशी, खजिनदार- उन्मेश कुलकर्णी, एन. पी. गाजरे. त्याचप्रमाणे आयमा निवडणूक कमिटी सदस्यपदासाठी एकता पॅनलच्याच विजय जोशी, एन. डी. ठाकरे, प्रकाश ब्राह्मणकर, सौमित्र कुलकर्णी, एन. टी. गाजरे, विनायक मोरे, प्रमोद वाघ, नीलिमा पाटील, जयदीप अलीमचंदाणी, राजेंद्र पानसरे, सुनील जाधव, अविनाश बोडके, राजेंद्र कोठावडे, सुदर्शन डोंगरे, अनिल डिंगरे, उत्तम दोंदे, अविनाश मराठे, दिलीप वाघ, गोविंद झा, जितेंद्र आहेर, एस. एस. भोगल, जयदीप पाटील, प्रेरणा बेळे, राधाकृष्ण नाईकवाडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

आयमा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण, हेकेखोरपणामुळे प्रयत्न निष्फळ ठरले. संस्थेची प्रतिमा खराब होणार नाही असा प्रचार करणार आहोत. आरोप-प्रत्यारोप टाळण्याचा प्रयत्न करू

-धनजंय बेळे, माजी अध्यक्ष, आयमा

आयमा निवडणुकीत अध्यक्षपदासाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. या पदासाठीच आम्ही निवडणूक लढवणार आहे. बाकी सर्व पदांसाठी आमचेच मित्र आहेत. त्यामुळे ती बिनविरोधच होईल.

-तुषार चव्हाण, अध्यक्षपदाचे उमेदवार

--

लोगो : आयमा निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिनाम चिंतन तपपूर्ती सप्ताह

$
0
0

देवळाली कॅम्प : नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर पाटबंधारे वसाहतीतील महाबली हनुमान मंदिरात गेल्या ११ वर्षांपासून नियमित आयोजित केल्या जाणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा तपपूर्ती होत असून, उद्या मंगळवार दि. २२ पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २२ रोजी सकाळी आठ वाजता वीणा पूजन, संत प्रतिमा, कलश, ग्रंथ पूजन, पंचपदीने प्रारंभ होईल. रोज सकाळी ६ ते ७ काकडा भजन, ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ४ गाथाभजन, सायं. ५ ते ६ हरिपाठ, सायं. ७ ते ९ हरी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ह. भ. प. पंडित महाराज कोल्हे, राजेंद्र महाराज खुळे, रामनाथ महाराज शिलापूरकर, वाल्मिक महाराज गीते, तुकाराम महाराज मुळीक, गीताताई महाराज घोरवडकर, महंत पंडित गुरुजी या महात्म्यांच्या कीर्तन सेवा सप्ताहकाळात आयोजित केल्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांना गंडविणारा अटकेत

$
0
0

सिट्रस चेकइन्ससह रॉयल टिंकल स्टारचा गोयंका पोलिसांच्या ताब्यात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो गुंतवणुकदारांना साडेसात हजार कोटींना गंडा घालणारा सिट्रस चेकइन्स लिमिटेड आणि रॉयल टिंकल स्टार क्लब लिमिटेड या कंपनीचा चेअरमन ओमप्रकाश बसंतलाल गोयंकास ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले. संशयित गोयंकास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, गुंतवणूकदारांची पैसे परत मिळण्याची अपेक्षा यामुळे उंचावली आहे.

गोयंकासह त्याच्या संचालक मंडळाने जिल्ह्यातील लासलगाव येथे बस्तान बांधले होते. आकर्षक व्याजदर देण्याच्या बहाण्याने त्याने गुंतवणुकदारांना भुरळ घातली. सुरुवातीच्या काही महिने त्याने ठरल्याप्रमाण पैसेही परत केले. यामुळे गुंतवणुकदारांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, पैशांचा ओघ वाढल्यानंतर संशयितांनी कामात अनियमितता करण्यास सुरुवात केली. एकट्या लासलगावमधूनच एक कोटी ८४ लाख ५५ हजार २०१ रुपयांना गोयंकाने दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून गंडा घातला. या प्रकरणी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही कंपन्यांचे मिळून मुंबई, पुणे, नाशिक, गोवा अशा विविध ठिकाणी १८ लाख गुंतवणूकादार असून, संशयितांनी साडेचार हजार कोटींच्या ठेवी स्वीकारल्या असून, त्यापोटी अंदाजे साडेसात हजार कोटी रुपये ठेवीदारांना देणे असल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित गोयंका पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला होता.

३० मेपर्यंत कोठडी

पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक मुंबईला रवाना करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे व तपास पथकाने गोयंकाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून त्यास रविवारी (दि. २०) मुंबईच्या लोअर परेल भागातून अटक केली. त्यास कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मुंबईतील या दोन कंपन्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली असेल आणि अद्याप पोलिसांशी संपर्क साधला नसेल, अशा नागरिकांनी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंग्राड’मध्ये लीड करतेय नाशिकची शिरीन

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

मराठी चित्रपटांमध्ये नाशिकचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला असून, नेहा जोशी, मृणाल दुसानीस, अनिता दाते, कल्याणी मुळेनंतर आता नाशिकची शिरीन पाटील मराठी चित्रपटात चमकणार आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या 'यंग्राड' या मराठी चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत शिरीन दिसणार आहे. शिरीन ही प्रसिद्ध नाट्यलेखक दत्ता पाटील यांची कन्या आहे.

अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण न घेतलेली शिरीन के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मकरंद माने यांच्या पारखी नजरेने शिरीनमधील कलागुण हेरले आणि त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी प्रमुख भूमिका करणारी नायिका मिळाली. समोर बडी स्टारकास्ट असूनही त्यांनी सांभाळून घेतल्याचे शिरीन म्हणते.

सहज परिणाम होईल अशा वयातील मैत्री, निष्पापपणा, प्रेम, कुटुंब आणि मूल्ये यांचे महत्त्व 'यंग्राड'मध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. 'यंग्राड' हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द. नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी हा शब्द वापरला जातो. एखाद्यासोबत भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीसोबत सूत जुळवायला मदत करणे यासाठी चार मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण, या कुमारवयीन मुलांसमोर चुकीचे आदर्श असल्याने ते नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात, की त्यांचे आयुष्याच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वतःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात... अशा आशयाची चित्रपटाची कथा आहे. अनुराग कश्यपची फँटम फिल्म्स, फ्यूचर वर्क्स मीडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स यांची ही फिल्म असून, चित्रपटाचे दिग्दर्शन 'रिंगण'फेम मकरंद माने यांनी केले आहे.

---

ही निवड दीड वर्षापूर्वीची आहे. मकरंददादाने चान्स दिला. पहिल्यांदाच फिल्म करतेय. खूप भीती वाटत होती. सविता प्रभुणे, शरद केळकर, शशांक शेंडे यांच्यासारखे दिग्गज समोर होते. परंतु, त्यांनी प्रत्येक क्षणाला सांभाळून घेतले.

-शिरीन पाटील, अभिनेत्री

--

या कथेतून प्रेक्षकांना स्वतःच्या व इतरांच्या आयुष्यात काही धडे घेण्याची व त्याप्रमाणे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. एखाद्या गोष्टीत आपली चूक नसते. पण, ती चूक सुधारण्यासाठी आपण जे करतो त्यातून आपली ओळख बनत जाते, ही बाब कथेतून अधोरेखित होते.

-विठ्ठल पाटील, निर्माता

लोगो : मटा विशेष

(अँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल दर

$
0
0

इंधन दरवाढीचा

भडका

इंधन दरवाढीमुळे सामान्यांना बसणार झळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे/नाशिक

सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी सलग सातव्या दिवशी इंधनांच्या दरांत वाढ केल्याने संपूर्ण देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी उच्चांकी पातळी गाठली. या दरवाढीमुळे नाशिकमधील पेट्रोलचा एक लिटरचा दर ८४.५० रुपये, तर डिझेलचे दर ७१.२७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २०१३ नंतर गेल्या पाच वर्षांतील पेट्रोल-डिझेलचे हे सर्वाधिक दर असून, राज्य सरकारच्या विविध करांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना इंधनासाठी अधिक दाम मोजावे लागत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे सरकारी कंपन्यांनी सलग तीन आठवडे इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती; परंतु निवडणुका संपताच गेल्या आठवडाभरातच इंधनाच्या दरांनी उच्चांकी झेप घेतली आहे. रविवारी पेट्रोलच्या दरांमध्ये ३३ पैशांनी, तर डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर २६ पैशांची वाढ झाली. यापूर्वी २०१३ च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये इंधर दर भडकले होते. हे दरही आता मागे पडणार असून, शहरात रविवारी एक लिटर पेट्रोलसाठी नाशिककरांना तब्बल ८४ रुपये ५० पैसे मोजावे लागले.

आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये इंधनाचे दर प्रतिबॅरल ८० डॉलरच्या पुढे पोहोचले आहेत. नोव्हेंबर २०१४ नंतरचे हे सर्वाधिक दर असून, त्याची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून इंधनावर सर्वाधिक कर गोळा केले जात असल्याने प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये तफावत दिसून येते. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलवर विविध करांचा बोजा सर्वाधिक असल्याने राज्याच्या सर्वच शहरांमध्ये पेट्रोलचे राज्यातील इतर शहरांच्या तुलनेने अधिक आहेत. राज्याने करांमध्ये कपात करावी, अशी सूचना यापूर्वी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली होती; पण इंधनावरील करांतून मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडण्यास सरकार तयार नाही. तसेच, पेट्रोल-डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) केला जावा, अशी मागणीही सातत्याने होत आहे; पण त्यावरही निर्णय होत नसल्याने नागरिकांना चढ्या दरांने इंधन खरेदी करावी लागत आहे.

चौकट १

नाशिकमधील दर

पेट्रोल डिझेल

रविवार ८४.५० ७०.२७

..............

चौकट २

देशाच्या प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल डिझेल

नवी दिल्ली ७६.२४ ६७.५७

मुंबई ८४.०७ ७१.९४

कोलकाता ७८.९१ ७०.१२

चेन्नई ७९.१३ ७१.३२

हैदराबाद ८०.७६ ७३.४५

भोपाळ ८१.८३ ७१.१२

पणजी ७०.२६

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केवडीबन

$
0
0

केवडीबनात भाविक दंग

विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी भाविकांच्या प्रचंड गर्दीने केवडीबन म्हसोबा महाराज यात्रौत्सव रविवारपासून सुरू झाला. जनार्दन स्वामी आश्रमाचे माधवगिरी महाराज, आनंद आखाड्याचे सागरानंद महाराज, संतोषगिरी महाराज आदींच्या उपस्थितीत ध्वज स्थापना करण्यात आली.  पालखी मिरवणूक, दशावतारी सोंगे बोहाड्याचा कार्यक्रम यासह रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी असे सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिंद नार्वेकरांनी घेतली भुजबळांची भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांची शनिवारी शिवसेनेच सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्यामुळे अनेक तर्क काढण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या भेटीमागे नाशिकचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. भुजबळांचे नाशिक हा बालेकिल्ला असून त्यामुळे त्यांच्या समर्थकांचे मत शिवसेनेला पडावे यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना पक्षाने नुकतीच सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. कायम पडद्यामागे राहून सूत्रे हलविणारे मिलिंद नार्वेकर यांनी मात्र भुजबळांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमागे तब्येतीची विचारपूस हे कारण सांगितले जात असले तरी ही भेट निवडणुकीसाठीच असल्याचा दावाही केला जात आहे. शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील आहे. त्यांचे समर्थक म्हणूनही त्यांनी भुजबळांना अनेक वेळा मदत केली. गेल्या वेळेस जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यातही दराडे यांच्या पाठीशी भुजबळ उभे राहिले होते. त्यामुळे या संबंधाला उजाळा देत ही भेट घेतल्याची बोलले जात आहे.

भेट ठरली चर्चेची

भुजबळ अटकेत असतांनाही शिवसेनेने त्यांच्या विरोधात सौम्यता दाखवित त्यांना मदत होईल, अशीच भूमिका घेतली होती. त्यामुळे भुजबळ यांची तुरुंगात सुटल्यानंतर त्यांचे आमदार पुत्र पंकज भुजबळ यांना आभार मानण्यासाठी थेट मातोश्रीत पाठवले होते. त्यामुळे या सर्व घडामोडीवर ही भेट ऐन निवडणुकीत चर्चेची ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने नाशिक भागातील बाजारपेठ फुलली

$
0
0

नाशिक : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली असून, धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या महिन्यामुळे जुने नाशिक परिसरातील बाजारपेठ फुलली आहे. नमाजसाठी होणारी गर्दी आणि त्यानंतर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी भरणारी बाजारपेठ यामुळे परिसरात जणू 'रौनक' अवतल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा शाकाहारी व मांसाहारी प्रकारांतील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांना विशेष मागणी दिसून येत आहे.

शिबिराचे आयोजन

नाशिक : विवेकानंद केंद्राच्या वतीने दि. २४ ते २९ मे या कालावधीत भावबंधन कार्यालय, मखमलाबादरोड, पंचवटी येथे व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना यात सहभागी होता येणार आहे. इच्छुकांनी विवेकानंद केंद्र, पाण्याच्या टाकीसमोर, आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सिदाजीआप्पांना वंदन (फोटो)

देवळाली कॅम्प : श्री सिदाजीआप्पा पुण्यतिथीनिमित्त गवळी समाजाच्या वतीने रेजिमेंटल प्लाझा येथे प्रतिमापूजन झाले. यावेळी सुरेश हुच्चे, जगन गवळी, संजय घुले, उत्तम हुच्चे, शंकर हुच्चे, सुनील गडाप्पा, राजू लंगोटे, शंकर हरबा, सिदाप्पा औशिकर, महादू हुच्चे, दत्तू हिरणवाळे आदी उपस्थित होते.

प्रस्तावाचे आवाहन

नाशिक : महिला व बालविकास विभागाकडून नाशिक जिल्ह्यासाठी वन स्टॉप क्राइसेस सेंटर मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी दि. ३० मेपर्यंत सिद्धार्थ परिसरातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भगूरदर्शन अभ्यास मोहीम

नाशिक : स्वा. वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त दि. २८ मे रोजी सकाळी ११ वाजता सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे भगूरपुत्र स्वांतत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने भगूरदर्शन अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात सावरकर बंधूंचे भगूरमधील बालपण, इतिहास सांगण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यात येणार असून, यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक मनोज कुवर, प्रशांत लोया, पवन आंबेकर यांनी केले आहे.

मातंग वधू-वर मेळावा

कॉलेज क्लब रिपोर्टर : विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनतर्फे रविवारी परशुराम सायखेडकर सभागृहात मातंग समाजाचा वधू-वर मेळावा झाला. समाजातील सुमारे सातशेहून अधिक वधू-वरांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. यावेळी वधू-वरांचा परिचय करवून देण्यासाठी डिजिटल स्क्रीनचा वापर करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ, वधू-वर परिचय मंडळाचे अध्यक्ष मनोहर आरणे, उपाध्यक्ष सुरेश केंदाळे, अनिल शिरसाठ, कार्याध्यक्ष गोकुळ पगारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मविश्वासातून आनंदमार्गाची निर्मिती

$
0
0

अंजली तापडिया यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

स्वतःला बदलता आले पाहिजे. आणि मनापासून हास्य केले पाहिजे. आनंदी राहणं हा स्वभाव बनला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून आंनद घेता आला पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी शरीर व मन आनंदी राहणे अत्यंत गरजेचे आहे. आत्मविश्वास हा आनंदाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यासाठी चित्त प्रसन्न असले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील उद्योजिका अंजली तापडिया यांनी केले.

नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या स्व.माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात त्या बोलत होत्या. यशवंतराव महाराज देवममलेदार पटांगणावर रविवारी झालेल्या विसावे पुष्प गुंफताना 'जीवन एक आनंद यात्रा' या विषयावर त्यांनी विचार मांडले. नाशिकचे उद्योजक अविनाश गोखले, चंद्रशेखर शहा, संगीता बाफना आदी उपस्थित होते. अंजली तापडिया म्हणाल्या, की व्यायामाचा अनेक जण संकल्प करतात; परंतु सुरुवात करीत नाही. आनंदी राहिल्याने आळस नाहीसा होऊन मैत्रीपूर्ण स्वभाव तयार होत असतो. हास्ययोगाने शरीरातील असंख्य आजार नाहिसे होतात. प्रत्येकाने रोज सकाळी टाळ्या वाजवल्यास 'अॅक्यू प्रेशर' दबले जाऊन, रोग दूर होण्यास मदत होते. आज माणसाजवळ सुख असूनही वेळ नसल्याने आनंद घेता येत नाही.

शब्द हे तलवारीपेक्षाही धारदार असतात. तलवारीने मान कापली जाते, तर शब्दाने मन कापले जाते. शब्दाने माणसे जोडले जातात तसे शब्द तोडण्याचे काम करतात; यामुळे शब्द जपून वापरावे. हास्याने हे सहज शक्य असून, हास्यात कंजुसी नको. भांडण विसरून एकमेकांचे नाते जपले पाहिजे, असे अंजली तापडिया यांनी सांगितले. राजेंद्र बाफना यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. हिरालाल परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

वसंत व्याख्यानमाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनही उमेदवार मतदानाला मुकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असले, तरी त्यांना इतरांच्याच मतांवर स्वत:साठीचा किल्ला लढवावा लागणार आहे. हे तीनही उमेदवार कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने या निवडणुकीत ते स्वत: मात्र मतदान करू शकणार नसल्याची स्थिती आहे.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी सोमवारी जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देण्यासाठी तीनही उमेदवारांनी बाह्या सरसावल्या आहेत. परंतु, या तिघांचीही भिस्त इतरांच्याच मतांवर अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॅन्टोनमेंट बोर्डचे सदस्यच मतदान करू शकणार आहेत. विधान परिषदेची निवडणूक लढविणारे तीनही उमेदवार सध्या कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचे निर्वाचित सदस्य नाहीत. त्यामुळे ते निवडणूक लढवित असले, तरी त्यांना स्वत:ला या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, ही शोकांतिका आहे. गत निवडणुकीत शिवाजी सहाणे यांना मतदानाचा हक्क बजावता आला होता. परंतु, प्रतिस्पर्धी उमेदवार जयवंत जाधव कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने त्यांना स्वत:ला मतदान करता आले नव्हते. यंदा मात्र तीनही उमेदवारांना मतदान करता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

दोन मतदार निरक्षर

ही मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशिनवर न राबविता ती बॅलेट पेपरच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना बॅलेट पेपरवर पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. परंतु, मतदार निरक्षर असल्यास त्याला उमेदवाराचे नाव वाचणे, तसेच त्याचा पसंतीक्रम नोंदविणे शक्य होणार नाही. हीच अडचण लक्षात घेऊन दोन निरक्षर मतदारांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. मालेगाव महापालिकेतील नगरसेविका हमीदाबी साहेब अली आणि सटाणा नगरपालिकेतील सदस्य आशा भामरे यांनी निरक्षर असल्यामुळे मतदान करताना सहायक सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार त्यांना सहायक सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मतदान कक्षात गेल्यानंतर सदस्य संबंधित सहायकाच्या कानात ज्याला मतदान करावयाचे आहे त्याचे नाव सांगेल. त्यानुसार सहायक बॅलेट पेपरवर पसंतीक्रम नोंदवू शकणार आहे. अशा दोनच निरक्षर मतदारांचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असले, तरी ग्रामीण भागात आणखी काही मतदार ऐनवेळी सहायकाची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिप’ला समायोजनाचे बनावट पत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय पुरस्कृत अंपग एकात्मिक शिक्षण योजनेतंर्गत परिचर या पदावर समायोजनाकरिता अवर सचिवांचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. मात्र, प्राथमिक चौकशीअंती हे पत्र बनावट असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज संतोष पाटील (रा. नाशिक) असे हे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. केंद्रीय पुरस्कृत अंतगर्त एकात्मिक शिक्षण योजेनतंर्गत परिचर या पदावर समायोजनासाठी संशयित पाटीलने ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव भरत पाटील यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करून ते टपालाद्वारे जिल्हा परिषदेला पाठवून दिले. या पत्राची शहानिशा करताना जिल्हा परिषदेला यातील बनावटपणा दिसून आला. पंकज संतोष पाटील नावाची व्यक्तीच 'जिप'च्या रेकॉर्डवर नसून, या नावाच्या व्यक्तीचे कागदपत्रेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणीतरी मुद्दामहून हा प्रकार केल्याचे मानले जात आहे. 'जिप'चे कर्मचारी रणजीत अरुण पगारे यांनी भद्रकाली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत चौकशी सुरू केली आहे. सदर पत्रात पत्ताही अर्धवट असून, तशी व्यक्तीही अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे सर्वप्रथम हे पत्र कोणी आणि का पाठविले याचा शोध घेतला जात असल्याचे तपासाधिकारी पीएसआय काळे यांनी सांगितले.

संशयिताविरोधात अदखलपात्र गुन्हा

कोर्टाने वॉरंट बजावल्यानंतरही हजर न झाल्याबद्दल मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अजय वासुदेव क्षत्रिय (रा. दीपालीनगर, विनयनगर) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जानेवारी २०१७ पासून अजय यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, ते हजर झाले नाहीत. कोर्टाच्या वॉरंटनुसार पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी शोध घेतला. कोर्टात जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याने अजयविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जे. एन. कंडारे करीत आहेत.

..

महिलेच्या घरावर कब्जा

महिलेच्या घराचे कुलूप तोडून त्यात दुसऱ्या महिलेचे संसारोपयोगी साहित्य ठेवणाऱ्या ११ संशयितांविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दीपाली भगवान कांगणे (रा. टागोरनगर, नाशिकरोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिता प्रशांत नागरे, मयूर बोडके, मेघराज धात्रक, रोशन गायकवाड, मनोहर बोडके, राधिका गोमासे, वैशाली शेळके, सिंधुबाई बोडके, स्वाती बोडके, सुनील नागरे, संगिता नागरे (सर्व रा. सायखेडा, ता. निफाड) यांच्याविरोधात घरात बळजबरीने प्रवेश करून ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. टागोरनगर येथील घरात मागील २० वर्षांपासून राहत असल्याचे कांगणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. संशयितांनी शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी सातच्या सुमारास दीपाली यांच्या घराचे कुलूप तोडले. तसेच घरातील त्यांचे साहित्य बाहेर काढून अनिता नागरे यांचे घरगुती साहित्य घरात ठेवले. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. ए. कांबळे करीत आहेत.

महिलेच्या दागिन्यांची चोरी

पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या संशयितास सातपूर पोलिसांनी अटक केली. देविदास अशोक वाघ (३०, रा. श्रमिकनगर, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे. लता सुरेश पाटील (रा. सातपूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित देविदासने गुरुवारी (दि.१७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाटील यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी त्या घरात गेल्या असता संशयित देविदास याने स्टीलच्या वाटीत ठेवलेले सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना समजल्यानंतर लता यांनी सातपूर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून देविदासला शनिवारी (दि.१९) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली.

पत्नीवर हल्ला

पत्नीवर कोयत्याने वार करून तिला दुखापत करणाऱ्या पतीस भद्रकाली पोलिसांनी अटक केली. भागवत किसन साठे (रा. मातंगवाडा, द्वारका) असे या पतीचे नाव आहे. अलका भागवत साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास पती भागवत यांनी विनाकारण शिवीगाळ करीत कोयत्याने वार केला. यात फिर्यादीच्या हातास दुखापत झाली. या प्रकरणी भागवत विरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेचा मोबाइल रोकड लंपास

गर्दीचा फायदा घेत शहर बसमध्ये चढणाऱ्या महिलेचा मोबाइल आणि रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास करण्यात आला. नाशिकरोड बसस्थानकात ही घटना घडली. या प्रकरणी प्रतिभा गौरीशंकर हांडे (रा. चंद्रपूर) यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. प्रतिभा हांडे या शनिवारी (दि.१९) सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकात सातपूरला जाण्यासाठी शहर बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हांडे यांच्या बॅगमधून पाच हजार रुपयांचा मोबाइल आणि ५०० रुपयांची रोकड लंपास केली.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे मागितल्याने कामगाराची हत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वडिलांकडे सतत पैशांची मागणी करून त्रास देत असल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका कामगाराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इगतपुरी तालुक्यात हा प्रकार घडला असून, ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सिडकोतील त्रिमूर्ती चौकातून तिघा संशयितांना अटक केली आहे.

अजिंक्य भागवत पाटील (२३, रा. शिवशक्ती चौक, सिडको), पंकज रामदास देशमुख (२३) आणि योगेश पोपट आहिरे (२३, दोघे. रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) अशी हत्येप्रकरणी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांनी मिळून बाळू अशोक मोरे (रा. अंबडगाव शिवार, मूळ, रा. फुलेनगर, पंचवटी) या कामगाराची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बाळू हा लेबर कॉन्ट्रक्टर भागवत पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी कामाला होता. बाळू सतत पैशांची मागणी करून त्रास देतो, याची चिड अजिंक्य पाटीलच्या मनात होती. बाळू १४ मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे पैसे मागण्यासाठी पाटील यांच्या घरी गेला. मात्र, ते घरी नव्हते. यावेळी बाळू आणि संशयित आरोपी अजिंक्य यांच्यात वाद झाला. त्यामुळे अजिंक्यने आपल्या दोन साथिदारांना सोबत घेतले. बाळू आणि तिघे संशयित लान्सर कारमध्ये बसून इगतपुरीच्या दिशेने गेले. रस्त्यात या तिघांनी बाळूला दारू पाजली. मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारात तिघांनी मिळून बाळूच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करून हत्या केली. दुसऱ्या दिवशी बाळूचा मृतदेह आढळून आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. शहरासह इगतपुरी तालुक्यातील मिसिंग व्यक्तींचा शोध पोलिस घेत असताना अंबड पोलिस स्टेशनमध्ये बाळूच्या वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी पुढील पुराव्यांची सांगड घालून संशयितांना बेड्या ठोकल्या. गुन्ह्यात वापरलेली लान्सर कार देखील जप्त करण्यात आली आहे.

कामगाराविरोधातही गुन्हे दाखल

कामगार बाळूविरोधातही पंचवटीसह वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समजते. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना मध्यरात्री घडलेल्या गुन्ह्यास वाचा फोडण्याचे काम पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक करपे, सहायक निरीक्षक आषिश आडसूळ, सहायक उपनिरीक्षक नवनाथ गुरूळे, उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, रवींद्र शिलावट, हवालदार शिवाजी जुंद्रे, बंडू ठाकरे, कॉन्स्टेबल संदीप हांडगे, सचिन पिंगळ आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅडव्हान्समध्येही गणिताने लावला कस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील आयआयटी, एनआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई अॅडव्हान्स ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन माध्यमातून रविवारी सुरळीत पार पडली. नाशिकमधील संदीप फाऊंडेशन व आयटी पार्क, वडाळा या दोन केंद्रांवर ही परीक्षा झाली. यामध्ये संदीप फाऊंडेशन येथील केंद्रावर ५५० विद्यार्थ्यांनी, तर आयटी पार्क येथील केंद्रावर ७०० विद्यार्थ्यांनी अशा एकूण १२५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जेईई मेन्सप्रमाणेच अॅडव्हान्समध्ये गणित विषय विद्यार्थ्यांचा कस लावणारा ठरला. पेपर २मधील गणित विषय कठीण तर फिजिक्स, केमिस्ट्री विषय विद्यार्थ्यांना तुलनेने सोपे गेले. हीच परिस्थिती पेपर १बाबत मात्र उलट ठरली.

इंजिनीअरिंग, फार्मसीसारख्या शाखांमध्ये देशभरातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 'जॉइंट एंट्रन्स एक्झाम' देणे बंधनकारक असते. गेल्या ८ एप्रिल रोजी जेईई मेन्स ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने तर १५ व १६ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेला देशभरातून साडेअकरा लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये नाशिकमधील १० हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षेची काठिण्यपातळी जास्त असल्याने जेईई अॅडव्हान्ससाठी देशभरातून दोन लाख ३१ हजार २४ विद्यार्थीच जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले होते. नाशिकमधील १२५० विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. सकाळी ९ ते १२ पेपर १ तर दुपारी २ ते ५ यावेळेत पेपर २ पार पडला. फिजिक्स, केमिस्ट्री विषयांच्या तुलनेत गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असल्याने हे प्रश्न सोडविताना कस लागल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहनिर्माण संस्था कराव्यात पुनर्जीवित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुक्यात २४०० गृहनिर्माण संस्था अवसायनात गेल्या असून, त्यांच्यावर सहकार विभागाने अवसायकांची नियुक्ती केलेली आहे. अवसायनात गेलेल्या संस्थेने आपल्या संस्था पुनर्जीवित करून घेऊन नुकसान टाळावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेच्या महासंघाचे अध्यक्ष अॅड. वसंतराव तोरवणे यांनी केले आहे.

या संस्था पुनर्जीवित केल्या नाहीत, तर संस्थेचे टायटल डिफेक्टिव होईल, सभासदांमध्ये सहकार्याची व एकोपाची भावना राहणार नाही, व्यवस्थापन वर्गणी थकविणाऱ्या फ्लॅट, प्लॉटधारकांविरुद्ध वसुलीची कारवाई करणे शक्य होणार नाही. पर्यायाने इमातरतीची देखभाल व व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होतील. बेशिस्त फ्लॅटधारकांवर अंकुश ठेवता येणार नाही अथवा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील करता येणार नाही, तसेच सहकार खात्याचा अंकुशही राहणार नाही. फ्लॅटधारकांच्या लिकेजेस, पार्किंग, पाण्याची गैरसोय, कलरिंग, वॉटरप्रूफिंग, केबल, ड्रेनेज, साफसफाई इत्यादी बाबींचे निरसन करणेही शक्य होणार नाही.

त्यासाठी अशा संस्थांनी पुनर्रचना अर्ज करार्त, त्यासाठी संस्थेचा २०१७-१८ या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व त्यातील दोषांची पूर्तता करून 'ओ' नमुना अहवाल तयार करावा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(१) अ प्रमाणे ३१ मार्च २०१८ अखेरची विवरणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आर्थिक विवरणपत्रे १ ते ६ नमुन्यात सहकारी खात्यांच्या संकेतस्थळामधील संस्थेच्या संगणक स्थळावर ऑनलाइन भरणा करून व त्या माहितीचे व्हॅलिडेन करून घ्यावीत. ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने संस्थेचे आदर्श उपविधी स्वीकारणे आवश्यक आहे.

...तर नोंदणी होणार रद्द

संबंधित संस्थांनी सर्व कागदपत्रांच्या पुराव्यांसह अवसायकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संस्थेमध्ये पुनर्जीवितबाबतचा ठराव संमत करून अवसायकामार्फत उपनिबंधक कार्यालयात सादर करावा. अवसायनात गेलेल्या गृहनिर्माण संस्थेने पुनर्रचनेसाठी अर्ज केला नाही, तर नोंदणी रद्द होईल, असेही अॅड. तोरवणे यांनी सांगितले. काही अडचण असल्यास संस्थेच्या ११३, पटेल चेंबर्स, झेडपीजवळ, नाशिक या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

-----

'झेडपी'त ई-निविदा नियंत्रण कक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या निर्देशानुसार ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद स्तरावर मध्यवर्ती ई-निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व निविदांबाबतचे काम या कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी, तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या वतीने ई-निविदा काढण्यात येतात. मात्र, त्यामध्ये सुसूत्रता यावी व एकाच ठिकाणाहून सदरचे काम व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी पुढाकार घेऊन ई-निविदा नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. डॉ. गिते या समितीचे अध्यक्ष असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सनियंत्रक तथा सहअध्यक्ष, कार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव व सर्व विभागांचे प्रमुख सदस्य राहणार आहेत. या कक्षाच्या वतीने विविध विभागनिहाय प्राप्त निविदांची नोंद ई-निविदा आवक नोंदवहीत करणे, निविदा अपलोड करणे, निविदा उघडणे आदी निविदेशी संबंधित सर्वप्रकारची कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव वर्ग, तुकड्यांना विनाअट अनुदान द्या!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे १८ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा व नैसर्गिक विनाअनुदानित वाढीव वर्ग-तुकड्यांवर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या विनाअनुदानित वर्ग-तुकड्या यांच्या अनुदानासाठी जाचक अटी घालून नैसर्गिक वाढीव विनाअनुदानित तुकडी-वर्ग यावर नियुक्त शिक्षकांवर मोठा अन्याय केला आहे. शंभर टक्के अनुदानित नैसर्गिक वाढीव विनाअनुदानित वर्ग-तुकड्याना कोणत्या आधारावर अनुशेष, भौतिक साधन सुविधा, इयत्ता नववी-दहावीचा निकाल,पटसंख्या अशा अनाठायी अटी घालून नैसर्गिक वाढीव विनाअनुदानित वर्ग-तुकड्याना पुन्हा अपात्र का ठरवले जात आहे, असा सवाल अध्यापक भारतीने केला आहे.

यापूर्वीच विना अनुदानित शाळा, तुकड्या, वर्ग यावर ज्ञानदान करूनही आता १८ वर्षांपासून नैसर्गिक वाढीव विनाअनुदानित वर्ग-तुकड्यांवरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयातील नियुक्त व जिल्हा परिषद शिक्षण विभाग पद मान्यता मिळूनही विनावेतन काम करावे लागत आहे. शिक्षकांच्या पिढ्या सरकारकडून उद्ध्वस्त होत असून शिक्षण हक्क कायदा डावलला जात आहे. विविध संस्था संघटनांनी शेकडो आंदोलने करूनही आंदोलकांमध्येच फूट पाडणे आणि सर्वच शिक्षक संघटनांना भ्रमित आणि निष्क्रिय बनविण्यात सरकार पूर्ण यशस्वी झालेले आहे. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक अशी सारीच संकटे आणि विवंचनाने शिक्षक कर्मचारी ग्रासला आहे. समान काम समान दाम सुत्राचे काय झाले? एका बाजुस सातवा वेतन आयोग आणि दुसऱ्या बाजूला कायम-विनाअनुदानित उपाशी? या विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी अध्यापक भारतीने ही मोहीम हाती घेण्याचा निश्चय केला आहे. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीसाठी आजपासून विशेष मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या निकालाचा संभाव्य कालावधी जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतशी विद्यार्थी व पालकांची धावपळही सुरू झाली आहे. हा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांची संभाव्य कागदपत्रांची गरज लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाने या विद्यार्थ्यांसाठी जातपडताळणीची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहिम २१ ते २५ मे दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांच्यावतीने २१ ते २५ मेदरम्यान विशेष मोहिमेद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. अर्जदारांनी या प्रकरणांवर समितीला लवकर निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी नियमांनुसार कागदोपत्री पुरावे, शपथपत्रे इतर आवश्यक दस्तऐवज अद्याप दाखल केले नसल्यास दाखल करून समितीकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करावी.

शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयांच्या वतीने जात पडताळणी समिती कार्यालयात प्राप्त झालेले आहेत. मात्र, ज्यांना समितीकडून त्रुटी कळविलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी २१ ते २५ मे या काळात कार्यालयात येऊन त्रुटींची पूर्तता करावी. वारंवार संपर्क करूनही जे अर्जदार प्रकरणांची त्रुटी पूर्तता करणार नाही, त्यांचे अर्ज नियमानुसार निकाली काढण्यात येणार असल्याचेही समितीने कळविले आहे.

अर्जदारांची स्वउपस्थित हवी

जात पडताळणीच्या या विशेष मोहिमेंतर्गत ज्यांचे स्वत:चे जातपडताळणी प्रकरण आहे अशा विद्यार्थ्याने प्राधान्याने स्वत: उपस्थित रहावे. काही कारणास्तव स्वत:स येणे शक्य नसल्यास आई-वडील किंवा भाऊ-बहिण यांची उपस्थितीही ग्राह्य धरली जाईल. मात्र, या नात्यांव्यतिरिक्त इतर कुणाच्याही माध्यमातून समितीशी संपर्क साधू नये, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर चोरट्यांची ‘दिवाळी’

$
0
0

वर्षभरात तब्बल चार कोटींवर डल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंटरनेट अथवा मॅसेजेसबाबत काही क्षणांसाठी दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारण्याची एकही संधी सायबर चोरटे सोडत नाही. १ मे ते ३० एप्रिल या १२ महिन्यांच्या कालावधीत या भामट्यांनी तब्बल सव्वाचार कोटी रुपयांवर डल्ला मारला. एक लाखांच्या आतील फसवणुकीचे गुन्हे लक्षात घेतले हा आकडा मोठ्या स्वरूपात वाढू शकतो.

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता शहर पोलिसांनी १ मे २०१७ रोजी नवीन सायबर पोलिस स्टेशन सुरू केले. पोलिस आयुक्तालयात हे पोलिस स्टेशन सुरू झाले. नुकतेच हे पोलिस स्टेशन पोलिस मुख्यालयातील नव्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले. पोलिस स्टेशनच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले असून, मागील वर्षात आर्थिक फसवणुकीच्या तब्बल २४ केसेस समोर आल्यात. एक लाख रुपयांपेक्षा अधिक मोठ्या रक्कमेची फसवणूक असल्यास असे गुन्हे सायबर पोलिस स्टेशनला दाखल होतात. तर, यापेक्षा कमी रकमेचे गुन्हे पोलिस स्टेशनमध्ये नोंदवले जातात. अवघ्या १२ महिन्यात सायबर चोरट्यांनी दिवसाला सव्वा लाख रुपये या सरासरीने चार कोटी २५ लाख ५५ हजार ६८६ रुपयांवर डल्ला मारला. परदेशात नोकरी, बक्षिस लागले, स्किममध्ये वाहन मिळणार आहे, अशा वेगवेगळ्या कारणांनी चोरट्यांकडून हे पैसे उकळले जातात. गुजरात राज्यात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीस दुबई येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवत चोरट्यांनी तब्बल दोन लाख ७८ हजार रुपयांना फसविले होते. याबरोबर विनयभंग तसेच इतर आयटी अॅक्टनुसार १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहुतांश फसवणुकीच्या प्रकारात अनोळखी क्रमाकांवरून आलेला कॉल्स महत्त्वपूर्ण ठरला. बँक, इन्शुरन्स, आधारकार्ड यांच्याशी संबंधित माहितीबाबत विचारणा करून फसवणुकीचा प्रकार केला जातो.

गुप्तता पाळणे आवश्यक

ऑनलाइन फसवणूक करणारे भामटे भारतातच नाही तर जगात कोठेही असू शकतात. त्यांचा मार्ग काढून पैशांची वसुली होणे अनेक दृष्टिकोनातून आव्हानात्मक असते. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेऊन आपली कोणतीही माहिती फोनवर शेअर करू नये. तसेच इमेल वा इतर ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक ठरते, असे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. आपला कार्डक्रमांक, ओटीपी क्रमांक यासह बँक खात्याबाबत गुप्तता पाळली गेली नाही तर फसवणुकीची शक्यता १०० टक्क्यापर्यंत वाढते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images