Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आजीचे गाणे

0
0

मधुर स्वराने आजी गाते

स्तोत्रे आरत्या म्हणत राहते

सारी सकाळ देवापुढे जाते

थकलेली आजी दुपारी झोपते

गुडघे तिचे दुखतात, तरी

शाळेत जाताना खाली उतरते

रिक्षा जाईस्तो हात हलवते

शाळेतून आल्यावर पापा घेते

माझ्या छमीला अभ्यास किती?

काळजी तिला फार

जवळ घेते मला गोंजारते

जेव्हा आई देते मार

गोष्टी रामाच्या, शिवाजीच्या

रोज रात्री सांगते

पाय चेपत चेपत माझे

आजी झोपी जाते…

-सुभाष सबनीस

--

बालकविता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅलिग्राफी कार्यशाळेत अक्षरांचा आविष्कार

0
0

कॅलिग्राफी कार्यशाळेत अक्षरांचा आविष्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षरांचे स्वभाव, अक्षरांचे कलात्मक आविष्कार कागदावर येतांनाचे रूप, अक्षरांची कविता होते, चित्रे होतात. यांचा अनोखा अनुभव आणि कल्पकता साधण्याची अनोखी अनुभूती कॅलिग्राफी कार्यशाळेत आली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या कॅलिग्राफी कार्यशाळेचे आयोजन क्लब हाऊस, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. सुप्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेची संकल्पना विश्वास ठाकूर यांची होती. सुलेखन अक्षरांचे, शब्दांचे अर्थ नव्या जाणीवेतून उलगडून दाखवण्याची कला आहे. लिहिण्यात सातत्य, कागदावरील शब्दांचे कलात्मक रूप यांचा समन्वय एकप्रकारे चित्रकलेचीच ओळख करून देतो. वळणदार सुंदर अक्षर हे स्वभावाचेच प्रतिबिंब असते. त्यावरून व्यक्तिमत्वाच्या अंदाज बांधता येतो. कार्यशाळेत नंदू गवांदे यांनी विविध कविता, उतारे यांवर सप्रयोग मार्गदर्शन केले व लेखनासाठी लागणाऱ्या विविध माध्यमांची माहिती दिली. शब्दांचे आकार यातून प्रतित होणारे आशयगर्भ अर्थ शिबिरात उलगडले. या वेळी सहभागींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचक किंवा ढोकरी

0
0

डबकी, तलाव, नदी किनारे, नाल्याचे किनारे व दलदलीच्या ठिकाणी \Bवंचक किंवा ढोकरी \Bहा पक्षी आढळून येतो. याला हिंदीमध्ये अंधा बगुला म्हणतात. कोंबडीच्या आकाराच्या या पक्ष्याचा रंग मातकट तपकिरी असून, त्यावर बदामी रंगाच्या रेषा असतात. विणीच्या हंगामात त्याच्या पाठीवर सुबक पिंगट किरमिजी रंगाची केसासारखी पिसे येतात. डोक्यावर लांब पांढऱ्या रंगाचा पिसांचा तुरा उगवतो. हा पक्षी पाणथळ जागी बेडूक, मासे, खेकडे हे प्राणी भरपूर प्रमाणात असतात अशा ठिकाणी एकटक समाधी लावून बराच काळ उभा असतो. जेव्हा त्याला बेडूक, पाला वगैरे दिसतो, त्याक्षणी चोचीने झडप घालून तो भक्ष्य पकडतो. काही वेळा तो पाण्यातून चोरून चालतो. चालताना तो प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकतो व पुढे पळणारे भक्ष्य बेडूक अथवा मासे पकडतो. हे पक्षी झाडावर सायंकाळी निवाऱ्यास येतात. कावळ्यासारखी घरटी ते बांधतात. त्यात मादी तीन ते पाच अंडी घालते.

-बाबासाहेब गायकवाड, निवृत्त वनाधिकारी

\Bचला, ओळखूया पक्षी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा पाणी टँकरचीच प्रतीक्षा

0
0

जिल्ह्यात ७२ टँकर भागवताहेत २२४ ठिकाणी तहान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडूनही यंदा जिल्ह्यातील २२४ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.

जिल्ह्यात गतवर्षी मे अखेरीस जेवढे टँकर सुरू होते त्यापेक्षा अधिक टँकरद्वारे आताच पाणीपुरवठा करावा लागत असल्याने यंदा पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रकर्षाने बसू लागल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ टँकरद्वारे ग्रामीण भागातील रहिवाशांची तहान भागविली जात असून गतवर्षी मे च्या पंधरवड्यात ५३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता.

उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील रहिवाशी होरपळत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९६ गावे आणि १३६ वाड्या तहानल्या असून, टँकरद्वारे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी सरकारी आणि खासगी टँकर्सची मदत घेण्यात येत आहे. गतवर्षी याच महिन्यात ८१ गावे, ७० वाड्यांना ५३ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत होते. यामध्ये खासगी २८ तर सरकारी २५ टँकरची मदत घेण्यात येत होती. यंदा येवला, बागलाण, सिन्नर, मालेगाव, नांदगाव या पाच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टँकरवाऱ्या सुरू आहेत. याखेरीज नांदगाव, देवळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांमधील काही गावे आणि वाड्यांवरही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच टँकरची संख्या ७२ पर्यंत गेली आहे. विशेष म्हणजे यंदा सरासरीहून अधिक पाऊस आणि जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणावर कामे होवूनही टँकरची संख्या वाढल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. साधारणत: दरवर्षी १ जूनपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतरही टंचाईची समस्या कमी झाली नाही, तर टँकर सुरू ठेवण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

----

तालुका गावे वाडी टँर

येवला ३८ २० २३

बागलाण २० ०१ १५

सिन्नर १० १८ ०७

मालेगाव ०७ २२ ०७

नांदगाव ०७ ४७ ०६

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील दुर्गा मंदिराजवळील कुलस्वामिनी ज्वेलस् हे सराफी दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. महेंद्र खरोटे यांचे हे सराफी दुकान असून, मध्यरात्री चोरांनी कुलूप तोडले. पण मजबूत लोखंडी दरवाजा तोडता आला नाही. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर खरोटे यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास निरीक्षक चव्हाण व गवळी करीत आहेत. अन्य सराफ बांधव तसेच विक्रम खरोटे, विनोद खरोटे व बाळासाहेब खरोटे आदींनी महेंद्र खरोटे यांची भेट घेतली. परिसरात सीसीटीव्ही लावावेत आणि रात्री पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. याआधी या भागात एका सराफाला लुटले होते, तर एकावर गोळीबार झाला होता. सराफ व्यवसायिक पोलिसांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध, दिव्यांग व्यक्तींना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर दी ब्लाइंड अँड डिसेबल्ड व एनेबल्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय विद्यालय, नेहरूनगर या ठिकाणी अंध व दिव्यांग व्यक्तींकरिता आधुनिक सहाय्यक तंत्रज्ञान चर्चासत्राचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. अंध व्यक्तींपुढील असलेली आव्हाने, उपाय आदींविषयी चर्चासत्रात विवेचन करण्यात आले. 'निपम' संस्थेचे एन. डी. बांधल यांच्या हस्ते व सचिन चाफळकर यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

या चर्चासत्रात लिहिणे व वाचण्याचे अंधांपुढील आव्हान, अंध असूनही वाचन-लिखाण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही, लेखन व वाचन यांची समस्या दूर कशी करावी, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक, सामान्य वाचन व लेखन करण्यासाठी साधन सामग्री, अँड्रॉइड मोबाइल कसा हाताळावा, वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून स्वत:ची कामे स्वत कशी करावीत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ६५ अंध विद्यार्थी, नोकरदार, शिक्षक यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. नाशिकमधील अंध व्यक्तींची गरज ओळखून ओम साई वेल्फेअर या संस्थाने बेंगळूरूच्या एनेबल्ड इंडिया व दिल्लीच्या बूकशेअर या संस्थेचे मार्गदर्शकांच्या सहाय्याने एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.

एन. डी. बांधल यांनीही संस्थेला कशी आर्थिक मदत करता येईल याविषयी चर्चा केली. या चर्चासत्रास अंध व अंध शिक्षकांव्यतिरिक्त पालकही उपस्थित होते. यावेळी दुलार गिरी, गणपत सोनवणे, कॅप्टन सामंता यांना अध्यक्ष विकास शेजवळ यांनी चर्चासत्राच उद्देश सांगून संस्थेचा परिचय करून दिला. सचिव बाळासाहेब लोंढे यांनी पार्श्वभूमी विशद केली. संस्थेचे उपाध्यक्ष डी. एन. महाले यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्र यशस्वीतेसाठी केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक छायडे, डी. पी. सोनवणे, एकनाथ पगारे, प्रमोद पाटील, सोनाली शेजवळ, मयुरी अहिरे, विद्या जगताप, निमिता शेजवळ, अनिता पठारे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व आपत्ती आराखडा तयार

0
0

बचावासाठी २३० बटालियन, चॉपरही सुविधा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अद्यावत यंत्राचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात केली असून एक आराखडाही तयार केला आहे. या आराखड्यात जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे नियोजन केले आहे. तसेच सिमनिक व महारेन या वेबसाइटवर पावसाची अद्यावत माहिती भरण्यात येणार आहे. पूर व्यवस्थापनाचाही स्वतंत्र आराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यातील महसूल मंडळात असलेल्या ९२ पर्जन्यमापन यंत्राद्वारे पावसाची माहिती गोळा केली जाणार आहे. ही सर्व यंत्र अॅटोमॅटिक असल्याने अचूक माहिती मिळणार आहे. जिल्हा नियंत्रण कक्षात इंटरनेट, प्रिटंर,संगणक, टीव्ही आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. तर हॅम रेडिओ, वॉकीटॉकीचा उपयोग आपत्कालीन काळात केला जाणार आहे. १ जूनपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे. त्यासाठी १०७७ हा टोल क्रमांक व जिल्हा नियंत्रण कक्षाचा (०२५३)२३१७१५१, २३१५०८० हा क्रमांक संपर्कासाठी असणार आहे.

शोध व बचाव पथके असणार

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून लष्कराची २३० बटालियन तसेच एनडीआरएफ, एसटीआरएफ, पथके जिल्ह्यात कुठेही परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी चॉपरसह सुसज्ज राहणार आहे. तसेच १५० स्वयंसेवकांचे प्रशिक्षित पथक असून नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, पोहणारे स्वयंसेवक, गिर्यारोहक, सर्पमित्र, पक्षीमित्र, हॅम रेडिओ पथक, वैद्यकीय पथक हे सुद्धा तैनात राहणार आहे.

बचाव साहित्याची सज्जता

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महापालिका व सामाजिक संख्या यांच्याकडे एकूण ६ रबरी बोटी, २ फायबर बोटी उपलब्ध आहेत. तसेच इन्फ्लोटेबल टॉवर, कटर, सर्च लाइट, लाइफ बॉईज, लाइफ रिंग, दोरखंड, व्हिक्टिम कॅरीबॅग, स्ट्रेचर, लिफ्टिंग बॅग, मेगा फोन, टेंट, प्लोटिंग पंप आदी अद्यावत साहित्य सुद्धा तयार ठेवले आहे.

तक्तेही तयार

आपत्ती व्यवस्थापन करताना जिल्ह्यातील सर्व माहिती असावी, यासाठी तक्ते तयार करण्यात आले आहे. त्यात २८ वर्षांच्या पावसाचा तक्ता सुद्धा आहे. तसेच पूरनियंत्रण तक्ता, गिराणा नदी पूर नियंत्रण तक्ता, नाशिक जिल्हा पूरबाधित गावांची माहिती त्यात देण्यात आली आहे. या माहितीसह जिल्ह्यातील दरड कोसळण्याचे प्रवण क्षेत्र कोणते यासाठी त्या गावांची नावे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारी शाळेचा १०० टक्के निकाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील आयजीसीएसई, केंब्रिज बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला. शाळेचा सार्थक देवरे हा विद्यार्थी ९१.७५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला असून त्याला सहा विषयात 'ए स्टार' मिळाला आहे.

संस्कृती मोकळ हिने ९०.६२ टक्के गुण पटकाविले. तिला सात विषयात 'ए स्टार' आहे. रुपेश पेखले याने सहा विषयात 'ए स्टार' तसेच ८९.७५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. या व्यतिरिक्त आर्या सारडा हिला चार विषयात 'ए स्टार' मिळाले असून कौस्तुभ लोहकरे आणि प्रकृती चौटालिया या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे तीन आणि एक विषयात 'ए स्टार' प्राप्त केले. रासबिहारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी सर्वांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून रमजानपर्वास सुरुवात

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लामिक कालगणनेनुसार आठवा महिना असलेल्या शआबान महिन्याची १७ मे रोजी सांगता होऊन आज दि. १८ पासून रमजानपर्व सुरू झाले आहे.

नाशिक परिसरात आज (दि. १८) पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांच्या पहिला रोजा प्रारंभ होत आहे. गुरुवारी (दि. १७) सायंकाळनंतर खास तराविहची नमाज अदा करण्यात आली. समाजबांधवांनी एकमेकांना आलिंगन देत रमजान महिन्याच्या मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांत हा महिना पवित्र समजला जातो. आज पहिली सहेरी पहाटे ४:३३ वाजता तर पहिला इफ्तार ७ वाजून ०८ मिनिटांनी होणार आहे. मुस्लिम बांधव महिनाभर पाण्याचा एका थेंबही सेवन न करता हे उपवास करतात.

प्रत्येक मशिदीमधून रमजानबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, स्थानिक मशिदींमधून त्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार मुस्लिम बांधव महिनाभरात धर्मग्रंथाचे वाचन करणे, दिवसातून पाचवेळा नमाज अदा करणे, रात्रीच्या वेळी होणाऱ्या सहाव्या तराविहच्या नमाजाचे पठण करण्यास भर देत असतात. सूर्योदयापूर्वी पहाटे ४ वाजता जेवण केल्यानंतर १४ ते १५ तास काहीही खाणे, पाणी पिणेदेखील वर्ज्य असते. त्यामुळे रमजान महिन्यात आधीचे दहा दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील दहा दिवस भक्तीचे मानले जातात. शेवटच्या दहा दिवसांमध्ये अल्लाहकडून रोजा पाळणाऱ्यांचे संरक्षण केले जाते, अशी मान्यता आहे. आजारी, वृद्ध व्यक्ती, प्रवास करीत असलेले बांधव, गर्भवती व बाळंतीण महिलांना या उपवासातून सूट देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नवाढीसाठी नियमबाह्य करआकारणी

0
0

मटा मालिका

करवाढीचा खेळखंडोबा-भाग १

vinod.patil@timesgroup.com

tweet-@vinodpatilMT

नाशिक : महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी प्रचलित नियमांचीच 'ऐशी की तैशी' करून थेट नाशिककरांवर दरोडा टाकण्याचे उद्योग सुरू केले आहेत. महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात काढलेल्या करवाढीच्या अधिसूचना क्र. ५२२ मुळे नाशिककरांमध्ये संभ्रम असतानाच, पालिकेने आता मालमत्ता सर्व्हेक्षणात आढळलेल्या व करआकारणी झालेल्या ५८ हजार मालमत्तांवरही या अधिसूचनेची बेकायदेशीरपणे मात्रा लागू केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आयुक्तांनी मात्र आपण कायद्यानेच काम करीत असल्याचा दावा केला असला तरी, कोणत्या कायद्यान्वये याची अंमलबजावणी केली हे स्पष्ट केलेले नाही.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्या अधिकारात ३१ मार्च २०१८ रोजी ५२२ क्रमांकाची अधिसूचना काढत, शहरात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यात भरमसाठ वाढ केली. ही अधिसूचना नव्याने अस्तित्वात येणाऱ्या मिळकतींसाठी असताना, महापालिकेने मिळकत सर्व्हेक्षणात सापडलेल्या, पंरतु त्यांच्याकडे पूर्णत्वाचा दाखला असलेल्या इमारतींनाही आता या अधिसूचनेच्या टप्प्यात बेकायदेशीरपणे आणले आहे.

अशाच स्थितीत सापडलेल्या गंगापूर रोडवरील 'लोटस' या इमारतीला महापालिकेने २५ लाखांची नोटीस पाठवून जबर दणका दिला आहे. सदर मिळकत ही ३१ मार्च २०१८ पूर्वी अस्तित्वात असताना, तसेच त्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र असतानाही, महापालिकेने आपल्याच ५२२ क्रमांकाच्या आदेशातील कमल १९ चे उल्लंघन केले आहे. १ एप्रिल २०१८ पूर्वी अस्तित्वात असलेल्या परंतु बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसतानाही, वापर सुरू असलेल्या इमारतींचे कलम भोगवटा प्रमाणपत्र असलेल्यांनाही लागू करून पालिकेने नागरिकांची लूट सुरू केल्याचे चित्र आहे. मिळकत सर्व्हेक्षणात सापडलेल्या जवळपास ५८ हजार मिळकतींमध्ये अशा इमारतींची संख्या ३ ते ५ हजारांच्या आसपास असल्याने त्यांचे नव्याने असेसमेंट करून त्यांच्याकडून आता थेट ५.५० रुपये प्रतिचौरस मीटर दराऐवजी चक्क ६६ रुपये दराने घरपट्टीची वसुली केली जाणार आहे. त्यामुळे नियमानुसार काम करणाऱ्या आयुक्तांच्या अधिपत्याखाली असलेला कर विभाग नियमबाह्य पद्धतीने शहरातील नागरिकांना घरपट्ट्या पाठवून तिजोरी भरण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे.

पाच हजार इमारती अनधिकृत?

एनजीटीच्या बंदी आदेशामुळे महापालिका हद्दीत सन २०१३ ते २०१५ या कार्यकाळात उभ्या राहिलेल्या इमारतींना वेळेत पूर्णत्वाचा दाखला मिळू शकलेला नाही. उशिरा दाखले मिळाल्याने त्यांची असेसमेंट करण्याचे काम महापालिकेने करणे अपेक्षित होते. परंतु, पालिकेने ते केले नसल्याने आता त्याचे खापर ग्राहकांवर फोडले जात आहे. अधिसूचनेनुसार या इमारतींचे असेसमेंट झाले तर शहरातील जवळपास ३ ते ५ हजार इमारती अनधिकृत ठरवून त्यांच्याकडून नव्या वाढीव दराने घरपट्टीची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व इमारतींमधील रहिवाशी संकटात सापडले आहेत.

कलम काय म्हणते?

आदेश ५२२ चे कलम १९ नुसार ज्या मिळकती १.४.२०१८ पासून नव्याने निर्माण होतील, त्या व ज्या मिळकतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त न करता अधिकृतपणे वापर सुरू करतील अशा जमिनी व इमारतींचे मूल्यांकन पूर्वलक्षी प्रभावाने (कलम १५० 'अ' नुसार) केल्यास अशा मिळकतींचे मूल्यांकनाचे दर सन २०१८-१९ मधील निश्चित केलेल्या दराप्रमाणे करयोग्य मूल्य निश्चित करण्यात यावे.

वस्तुस्थिती

महापालिकेने कलम १९ नुसार कारवाई न करता, १.४.२०१८ पूर्वी अस्तित्वात असलेल्या व बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही मिळवलेल्या इमारतींना नव्याने असेसमेंट करीत असल्याचे सांगून नवीन वाढीव दंडासहीत कर आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे या अंमलबजावणीमुळे अधिसूचनेतल्या नियमांचीच मोडतोड केली गेली असून, नागरिकांकडून जबरदस्तीने करवसुलीचा फंडा अवलंबला जात आहे.

आयुक्त हे आपल्याच अधिसूचनेतल्या नियमांची मोडतोड करून बेकायदेशीरपणे कामकाज करीत आहेत. आदेश क्र. ५२२ हा नवीन अस्तित्वात येणाऱ्या मिळकतींसाठी असताना, त्याची जुन्या मिळकतींवर कोणत्या कायद्यान्वये अमंलबजावणी करता येते, याची स्पष्टता करावी. अशा प्रकारचा कायदाच अस्तित्वात नसताना, आयुक्त बेकायदेशीरपणे कामकाज करून नागरिकांना वेठीस धरीत आहेत. त्यामुळे आता कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही.

- उन्मेश गायधनी, समन्वयक, अन्याय निवारण कृती समिती, नाशिक

मिळकत सर्वेक्षणात सापडलेल्या मिळकतींचे नव्याने असेसमेंट करून त्यांना दंडासह करयोग्य मूल्य लावून घरपट्टी लावली जात आहे. तसेच असेसमेंटमध्ये बांधकाम अधिक आढळले तर, त्या इमारतींना अनधिकृत ठरवून सहापट दंडाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे लोटससह इतर इमारतींवरील करआकारणी आपल्या अधिकारात नियमानुसार आहे.

- तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉन्सवर सोमवारपासून हातोडा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची परवानगी न घेताच शहरात उभी असलेली तब्बल १६६ अनधिकृत लॉन्स, तसेच मंगल कार्यालये आता महापालिकेने रडारवर घेतली आहेत. नगररचना विभागाच्या वतीने नियमबाह्य व अनधिकृतपणे सुरू असलेल्या या सर्व लॉन्स, तसेच मंगल कार्यालयांच्या मालकांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर सोमवारपासून त्यांच्यावर हातोडा चालविण्याची तयारी पालिकेने केली आहे. सोमवारपासून गंगापूर रोडवरील लॉन्सपासून कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे लॉन्सचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. १६६ पैकी पंचवटीत सर्वाधिक ६५ अनधिकृत लॉन्स व मंगलकार्यालये असल्याने पंचवटीत मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार आहे.

शहर व आजूबाजूच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर लॉन्स आणि मंगल कार्यालये असून, लॉन्समालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर जागामालकांनी मंगल कार्यालये व लॉन्स सुरू केली आहेत. त्यातील बहुतांश लॉन्स, तसेच मंगल कार्यालये महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी न घेताच सुरू करण्यात आली आहेत. अशी सर्व लॉन्स, कार्यालये अनधिकृत व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. त्याबाबतच्या तक्रारी नगररचना विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सर्व लॉन्स व कार्यालयांचे विभागनिहाय सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरात तब्बल १६६ लॉन्स व कार्यालये अनधिकृत असल्याचे आढळले आहे. त्यामध्ये पंचवटीतील सर्वाधिक ६५ लॉन्स, कार्यालये असून, त्यापाठोपाठ नाशिकरोड (२४) आणि सिडकोचा (१९) समावेश आहे. नगररचना विभागाने आता या लॉन्समालकांना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, मुदतीत केवळ पाचच लॉन्सचालकांनी आपले लॉन्स नियमित करून घेतले. नियमितीकरणातून पालिकेला जवळपास ३५ ते ४० कोटींचा महसूल अपेक्षित होता. परंतु, त्याला वेळेत प्रतिसाद मिळाला नसल्याने पालिकेने आता सोमवारपासून या लॉन्सवरील कारवाईला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. गंगापूर रोडवरील बड्या लॉन्सवर प्रथम बुलडोझर चालविले जाणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

बंदोबस्ताबाबत प्रश्नचिन्ह

या मोहिमेसाठी पोलिसांकडून सुरक्षेसाठी बंदोबस्त मिळणे मात्र अवघड आहे. पोलिस बंदोबस्त आणि निवडणुकीतल्या भत्त्यावरून महापालिका आणि पोलिसांमध्ये तणाव आहे. त्यातच पोलिसांनी 'आधी पैसे भरा मगच बंदोबस्त मिळेल' अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालिकेच्या मागणीला पोलिसांकडून केराची टोपली दाखवली जाणार आहे. त्यामुळे पालिकेला आपल्याच सुरक्षारक्षकांच्या बळावर कारवाई करावी लागणार आहे. या लॉन्स व मंगलकार्यालयांची मालकी दादा व भाईंची आहे, त्यामुळे पोलिस बंदोबस्ताविना कारवाई पालिकेसाठी आव्हानच ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्या प्रकरणात तिघांना कारवास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनैतिक संबंधातून एकाची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने तिघांना दोषी ठरवित चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. हत्येचा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी विंचूर गवळी परिरसरातील नवजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर घडला होता.

बाळू विश्वनाथ खिल्लारे, त्याचा चुलतभाऊ प्रदीप ज्ञानबा खिल्लारे तसेच बाळूचा मित्र गजानन कुराडे अशी शिक्षा ठोठावलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी मिळून अनैतिक संबंधाच्या कारणातून राजू लिंबाजी हिंगोले (३०, रा. हाताळे, ता. शेणगाव, जि. हिंगोली) यास जबर मारहाण केली होती. जखमी राजूला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयितांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. ए. पिंपरे यांनी केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांच्या कोर्टात पार पडली. खटल्यातील साक्षिदार, पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे याआधारे सरकारी वकील अॅड. संजयकुमार पाटील तसेच वाय. डी. कापसे यांनी युक्तिवाद केला. समोर आलेल्या पुराव्यानुसार कोर्टाने तिघांना कलम ३०४ नुसार दोषी ठरवित चार वर्षे सश्रम कारवास तसेच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट्टा बाळगणारा तरुण अटकेत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास शुक्रवारी दुपारी राणेनगर परिरसरातून अटक करण्यात आली. ही कारवाई क्राइम ब्रँचच्या युनिटच्या दोन पथकाने केली असून, हा कट्टा संशयित आरोपी कोणाला देणार होता किंवा त्याच्यापर्यंत कसा पोहचला याचा तपास पोलिस करीत आहे. संशयितांविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश उर्फ भोला सुरेश आहिरे (२७, सद्गुरू अपार्ट. फ्लॅट क्र. ३, गांधीनगर, उपनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. राणेनगर परिसरात एक तरुण गावठी कट्ट्यासह येणार असल्याची माहिती युनिटचे पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांना मिळाली होती. त्यानुसार, पीएसआय रवींद्र सहारे, हवालदार श्रीराम सपकाळ, पोलिस नाईक परमेश्वर दराडे, पोलिस शिपाई यादव डंबाळे, जयंद शिंदे यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राणेनगर परिसरातील भिकुबाई विद्यालयाजवळील मैदानासमोर सापळा रचला. संशयित आहिरे सदर ठिकाणी पोहचताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा आढळून आला. आहिरेविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीने हा कट्टा कोठून आणला किंवा तो हा कट्टा कोणाला देणार होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ीदिीहदि

0
0

पालिकेचे अधिकारी, कर्मचारी दोन दिवसांपासून मोठया लवाजम्यासह 'जेसीबी' मशिन घेवून रस्त्यावर उतरत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्याधिकारी नांदुरकरांनी शहराच्या विविध भागातील दुकाने व घरांसमोरील कामे तोडण्याची कारवाई केली. बुधवारी, गुरुवारी शहरातील विविध भागात मुख्याधिकाऱ्यांनी कारवाईचा हातोडा सुरुच ठेवला होता. अनेक ठिकाणी या कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार होत आहे. मात्र, नांदुरकरांनी कुणालाही न जुमानता कारवाई सुरू ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड

0
0

वाहनाच्या धडकेने

पोलिस कर्मचारी जखमी

मनमाड : चारचाकी वाहनाने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कानडगाव येथे घडली. या अपघातात जखमी झालेल्या पोलिसाला मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल तुकाराम मोरे असे जखमी झालेल्या पोलिसाचे तर विकास वाघ (रा. मनमाड) असे वाहनचालकाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी संवर्धन चळवळीत मोठे योगदान

0
0

भारतीय जैन संघटनेच्या कार्याची अमिर खानकडून दखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात केवळ जेसीबी, पोकलेनसारखी यंत्रणा उपलब्ध करून न देता भारतीय जैन संघटनेच्या सभासदांनी श्रमदानालाही प्राधान्य दिले आहे. गावोगावी त्यांनी पाणी बचतीबाबत प्रबोधनाची मोहीम हाती घेतली असून अभिनेता अमिर खाननेही त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे.

पाणी फाउंडेशनने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये एकूण १३ तालुक्यांत दुष्काळमुक्तीसाठी अभियान सुरू केले आहे. या अभियानात भारतीय जैन संघटनेनेही पोकलेन, जेसीबीसारखी यंत्रणा पुरवून मदतीचा हात पुढे केला आहे. या पाचही जिल्ह्यातील तसेच तालुका पातळीवरील संघटनेचे प्रकल्प संचालक आणि कार्यकर्त्यांचे चर्चासत्र धुळे येथे नुकतेच झाले. यावेळी अमिर खान, किरण राव यांच्यासह नाशिकचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, विनय पारख, डॉ. कांतिलाल टाटिया, विजय दुगड, आदेश चंगेडिया, प्रकाश छाजेड, सुभाष रांका, रमेश चोरडिया, नरेश कांकरिया, सचिन कोठारी, चंद्रकांत डागा, प्रमोद गोलेछा, मनोज भंडारी, प्रवीण चोरडिया, सुभाष रांका, अमित बोरा, चंदन भळगट आदी उपस्थित होते. शांतीलालजी मुथ्था यांचे पाणी संवर्धनाबाबतचे विचार ऐकून प्रेरणा मिळत असल्याचे, समस्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, अशी भावना अमिर खान यांनी यावेळी व्यक्त केली. दुष्काळाविरोधातील लढा जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी संघटनेने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारनगरी ‘आऊट ऑफ रेंज’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारनगरी सातपूरमधील बहुतांश परिसर 'आऊट ऑफ रेंज' झाल्याने परिसरातील रहिवाशांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. केवळ काही ठराविक कंपन्यांच्या टॉवरलाच परिसरात परवानगी दिली गेल्याने अन्य कंपन्यांचे मोबाइल वापरणारे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येथे पुरेसे मोबाइल टॉवर उभारावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सातपूर परिसरातील श्रमिकनगर, चुंचाळे शिवार, ध्रुवनगर, शिवाजीनगर आदी भागात मोबाइल कंपन्यांच्या टॉवरला परवानगी मिळत नसल्याने घराच्या छतावर जाऊन मोबाइलवर बोलण्याची वेळ अनेकांवर येत आहे. त्यामुळे किमान घरात मोबाइलची रेंज येईल याकरिता नवीन टॉवरची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रेंजच मिळत नसल्याने महागडे मोबाइलदेखील निकामी ठरत असल्याची भावना कामगार व्यक्त करीत आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांत पायपीट करावी लागू नये म्हणून सर्वच व्यवहार ऑनलाइन करण्याचे ठरविले आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार असला, तरी मोबाइल टॉवरची संख्या पाहिजे त्याप्रमाणात नसल्याने कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात अनेकांचे मोबाइलच आऊट ऑफ रेंज राहत असल्याने ते ऑनलाइन व्यवहारांना मुकत असल्याचे चित्र आहे.

येथील रहिवासी त्रस्त

सातपूर भागात सातपूर कॉलनी, अंबड लिंकरोडवरील जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, आशीर्वादनगर, पिंपळगाव बहुला मळे परिसर, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुवनगर आदी भागात मोबाइल टॉवर कमी असल्याने रेंजच मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. सातपूर भागात ठराविक मोबाइल कंपन्यांनाच टॉवरची परवानगी देण्यात आल्याने ही स्थिती उद्भवली असून, इतर कंपन्यांनाही महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी सातपूरकरांनी केली आहे.

मर्यादित टॉवरचा फटका

सातपूर भागात अनेकांनी मोबाइल टॉवरची मागणी केली आहे. परंतु, केवळ परवानगीसाठी महापालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जातो. काहींनी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करून मोबाइल टॉवरचे कामही सुरू केले. महापालिकेकडून मात्र टॉवरची परवानगीच दिली जात नसल्याने केवळ टॉवरचे केवळ सांगाडेच उभे असल्याचे चित्र पाहायला मिळते. सातपूर भागात मोबाइलचे ४० टॉवर आहेत. त्यात मोजक्याच कंपन्यांचा समावेश असल्याने अन्य कंपन्यांचे सिम कार्ड वापरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्वच कंपन्यांच्या टॉवरसाठी परवानगी देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

सातपूर भागात नव्याने मोबाइल टॉवर उभारावेत, अशी मागणी सातत्याने महापालिकेकडे केली जाते. परंतु, बंगले भागात राहणाऱ्यांकडूनच मोबाइल टॉवरला विरोध केला जात असल्याने गैरसोय होत आहे. पुरेशा मोबाइल टॉवर्ससाठी परवानगी दिली जावी.

-स्वप्निल आव्हाड, नागरिक

---

देवळाली कॅम्पमध्येही समस्या

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरात अनेक मोबाइल कंपन्यांची रेंजच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देवळाली परिसरासह अनेक ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत मोबाइल कंपन्यांचे ग्राहक प्रचंड वाढले आहेत. मात्र, अनेक कंपन्यांची पुरेशी रेंजच मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. घरामध्ये रेंज गायब होण्याचे प्रकार होतात. काही खासगी कंपन्या फायबर ऑप्टिकल केबल टाकून ग्राहकांना ४ जी सेवा देत आहेत. मात्र, बऱ्याचदा ४ जी नव्हे, तर ३ जी व २ जीचे नेटवर्क सेलफोनमध्ये दिसून येते. स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार-चार कंपन्यांचा संसार सुरू आहे. कंपन्यांच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कोठेही तक्रार केली, तरी काही फरक पडत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शिंगवे बहुला, वडनेररोड, लामरोड, रेस्ट कॅम्परोड, विजयनगर परिसरात अशी समस्या दिसनू येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुवांशिकतेमुळे वाढतो लठ्ठपणा

0
0

डॉ. जयश्री तोडकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात लहान मुलांमधील लठ्ठपणाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनुवांशिकता, आहारातील वाईट सवयी, शारीरिक क्रिया आदी बाबींमुळे लठ्ठपणाचा आजार जडतो, असे प्रतिपादन पुणे येथील आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे अठरावे पुष्प 'करू या लठ्ठपणावर मात' या विषयावर डॉ. तोडकर यांनी गुंफले. मानेवर काळेपणा, मानेला कुबड, पोटाचा वाढता घेर ही लठ्ठपणा वाढत असल्याची लक्षणे आहेत. लठ्ठपणा हा वय, जात, लिंगभेद पाहत नाही. लवकर झोपून लवकर उठणे, मोकळ्या मैदानात खेळणे, फास्ट फूडऐवजी फळे खाणे या चांगल्या सवयींमुळे लठ्ठपणाला अटकाव घालता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. तोडकर यांनी दिली. आजवर अनेक वेडगळ समजुतींमुळे लठ्ठपणाकडे समृद्धीचे लक्षण म्हणून पाहिले गेले. त्यामुळे हा आजार साथीच्या आजाराप्रमाणे फोफावत आहे. भारतात पाचपैकी तीन व्यक्ती लठ्ठ असल्याचे समोर आले असून, लठ्ठपणात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. लठ्ठपणा हे ताकद नव्हे, तर अशक्तपणाचे लक्षण आहे. स्थूलत्वामुळे क्षयरोग, मधुमेहासारख्या अनेक आजारांची सुरुवात होते, असेही त्या म्हणाल्या.

व्याख्यानाच्या प्रारंभी लघुपट दाखविण्यात आला. मंचावर पंचवटी ग्रुपचे व्यवस्थापक नीलेश भुतडा, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते. मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी चांडक यांना आदरांजली अर्पण केली. श्रीकांत येवलेकर यांनी परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

वक्ते : रुपाली शाईवाले (डोंबिवली)

विषय : पर्यावरण

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

लोगो : वसंत व्याख्यानमाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातप्रमाणपत्रांसाठी पालकांची फरफट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातीचे दाखल्यांवर स्वाक्षरी होत नसल्याने असे सुमारे ४५० दाखले नाशिक प्रांतधिकारी कार्यालयात अडकून पडले आहेत. शैक्षणिक प्रवेशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही जीव या दाखल्यांअभावी टांगणीला लागला आहे.

दहावी, बारावीसह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले, की पुढील शैक्षणिक प्रवेशासाठीची धावपळ सुरू होते. प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जातीचा दाखल्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अन्य दाखल्यांचे वितरण सुरळीत सुरू असले तरी प्रशासनाकडे सद्यस्थितीत तब्बल ४५० जातीच्या दाखले स्वाक्षरीअभावी वितरीत होऊ शकलेले नाहीत. नाशिकचे प्रभारी प्रांतांधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सोपान कासार यांच्यावर या दाखल्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तसेच ग्रामपंचायत विभागाचाही पदभार आहे. विधान परिषद निवडणुकीबाबतच्या कामातही कासार यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. परंतु, या सर्व कामाचा परिणाम दाखल्यांच्या निपटाऱ्यावर होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजे संभाजी स्टेडियमची ‘अशीच’ व्हावी साफसफाई!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात उभारण्यात आलेल्या राजे संभाजी स्टेडियमची स्थापनेनंतर प्रथमच अगदी कानाकोपऱ्यासह साफसफाई करण्यात आली. केवळ आयुक्त येणार म्हणून झालेली साफसफाई वारंवार केली, तर निश्चितच या मैदानाचा वापर वाढू शकेल, असे मत नागरिकांसह क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले आहे.

महापालिका आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सिडकोतील महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी राजे संभाजी स्टेडियमच्या स्वच्छता मोहिमेला जुंपल्याचे दिसून आले. राजे संभाजी स्टेडियमची उभारणी केल्यानंतर या ठिकाणी काही वर्षांतच जॉगिंग ट्रॅक करण्यात आला. त्यानंतर ग्रीन जिम उभारण्यात आली. मात्र, या सर्व बाबी केवळ देखाव्यापुरत्याच उभारल्या असून, या मैदानावर कधीही स्वच्छता विभागाचे कर्मचारी फिरकतच नसल्याचे दिसून येते. या ठिकाणी असलेले इनडेाअर स्टेडियमसुद्धा कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र होते. मात्र, आज, शनिवारी (दि. १९) वॉक विथ कमिशनर उपक्रम येथे होणार असल्याने या स्टेडियमची साफसफाई करण्यात आली. येथील झाडांना कधी पाणीसुद्धा घातले जात नाही. मात्र, दोन दिवसांपासून येथील झाडांना पाणी घालण्यात येत आहे. स्टेडियमच्या आवारात असलेला कचरा, पालापाचोळा उचला गेल्याने त्याचे रुपडेच पालटले आहे. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्ययुक्त समाधान व्यक्त करीत केवळ आयुक्त येणार असल्याने या स्टेडियमची झालेली स्वच्छता अशीच कायमस्वरूपी होत राहिली, तर निश्चितच फायदा होईल, असे मतही व्यक्त केले आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

(पेज फोटोशेजारी घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images