Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साडेपाच लाखांचे ड्रग्ज जप्त

$
0
0

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई; तिघा तरुणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमडी हा घातक अंमलीपदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि. १६) पहाटे पाथर्डी परिसरात अटक केली़ त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीच्या २६५ ग्रॅम अंमली पदार्थासह टाटा सफारी वाहन जप्त करण्यात आले आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्यापैकी दोघे सराईत गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी दोघे मोक्काच्या गुन्ह्यात निर्दोष सुटले आहेत.

रणजित गोविंदराव मोरे (वय ३२, रा़ २०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (वय ३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (वय ३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच लाख ३० हजार रुपयांचे २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, टाटा सफारी व ४६ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल असा एकूण १५ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबईहून टाटा सफारी वाहनातून (एमएच १५, ईक्यु ५००५) एमडी ड्रग्ज पाथर्डी फाट्यावरील रायबा हॉटेलजवळ विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली. त्यानुसार वाघ यांनी पोलिसांची दोन पथके तयार केली. सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, सहायक उपनिरीक्षक जाकीर शेख, दिलीप मोंढे, विशाल काठे, आदींचा या पथकात समावेश होता. पथकाने रात्री एकपासून परिसरात सापळा लावला. रात्री पावणेदोनच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाणारे संशयित सफारी वाहन पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. कारचा पाठलाग करून हॉटेल रायबाजवळ तिघांना ताब्यात घेण्यात आले. संशयित मोरे आणि दुंडे यांच्याकडे प्रत्येकी ९० ग्रॅम तर माळोदे याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ मिळून आला. हवालदार रवींद्र बागूल यांच्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे एमडी ड्रग्ज?

मेफेड्रोन असे नाव असलेल्या या ड्रग्जला 'म्याव म्याव ड्रग्ज' असेही म्हटले जाते. हे ड्रग्ज खूप महाग असून प्रतिग्रॅमसाठी दोन हजार रुपये मोजावे लागतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. हे ड्रग अतिशय दुर्मिळ आहे. मात्र, ते नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई कनेक्शन अन् टिपर गँगशी संबंध

मुंबई येथून हे ड्रग्ज आणले जात असावे अशी प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. शहरातील कॉलेजरोड, गंगापूर रोड परिसरात या ड्रग्जची विक्री होते. कॅनडा कॉर्नर परिसरात या ड्रग्जची नशा केलेल्या एका तरुणीला काही वर्षांपूर्वी धावत्या वाहनातून ढकलण्यात आले होते़ संशयित दुंडे आणि माळोदे हे टिप्पर गँगशी संबंधित असून त्यांच्यावर दरोड्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाने सिडकोतील कुख्यात टिप्पर टोळीतील नऊ जणांना २१ फेब्रुवारी २१०८ रोजी मोक्काअन्वये शिक्षा ठोठावली होती. तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यामध्ये माळोदे आणि दुंडे यांचा समावेश आहे. सिडकोतील भोळे मंगल कार्यालयाजवळील यश आर्केडच्या शिल्पा स्टॉक ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात २७ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी टिप्पर गँगने नियोजनबद्धरित्या शस्त्रास्त्रासह दरोडा टाकून एक कोटी तीन लाख ५० हजारांची रोकड लुटून नेली होती. अंबड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल होता. यानंतर या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आला.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सौरऊर्जा विजेसाठी पावणे तीन रुपयांचा दर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर (२ रुपये ७१ पैसे) मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी एक हजार मेगावॅट सौरऊर्जा दीर्घकालिन निविदाद्वारे खरेदी करण्यासाठी निविदा प्रकियेला सुरुवात करण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या नवीकरणीय मंत्रालयाने कर व शुल्क यांच्या कायद्यातील बदल करारामध्ये समाविष्ट करण्याबाबतचे स्पष्टीकरण जारी केल्यानंतर या निविदेची उलट बोली ही 'टीसीआयएल'च्या वेबसाइटवर १४ मे रोजी झाली. यात आठ निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता आणि त्यांची एकूण क्षमता सुमारे १,४५० मेगावॅट होती. त्यापैकी एक हजार मेगावॅटसाठी खालील निविदाकार पात्र ठरले. यामध्ये जेएलटीएम एनर्जी (२० मे.वॅ.) व माहोबा सोलार,(२०० मे.वॅ.) हे सर्वात कमी बोली लावलेले निविदाकार ठरले असून त्यांनी २ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट इतक्या कमी दराची बोली लावली. रिन्यू सोलार पॉवर,(२५० मे.वॅ.) एक्मे सोलार होल्डिंग्‌स लि.,(२५० मे.वॅ.) टाटा पॉवर रिन्युयबल एनर्जी,(१५० मे.वॅ.) आणि अजुरे पॉवर (इंडिया), (१५० मे.वॅ.) यांनी २ रुपये ७२ पैसे प्रतियुनिट इतकी बोली लावली होती. या वर्षात 'एनटीपीसी'ने व देशातील इतर राज्यांनी काढलेल्या निविदांमध्ये न्यूनतम दर ठरला आहे. सौरऊर्जेमधील निविदाकारांनी महाराष्ट्र शासन व महावितरणवर विश्वास दाखविला याबद्दल महावितरण व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांना फायदा

या प्रकल्पांतून उपलब्ध होणाऱ्या सौरऊर्जेमुळे महावितरणला महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध देण्यासाठी तसेच अपारंपारिक ऊर्जा खरेदीच्या बंधनाची पूर्तता करण्यासाठी मदत होणार आहे. महावितरणने राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी' योजने अंतर्गत राज्यातील कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी प्राबल्य असलेल्या २० जिल्ह्यांतील सुमारे २१८ तालुक्यात २ मेगॅवॅट ते १० मेगावॅट इतक्या क्षमतेचे एकूण १ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्पर्धात्मक निविदा काढलेली असून त्याची प्रकिया चालू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेक अकाऊंट्सचा फेसबुकवर सुळसुळाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकचा वापर करताना अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे हे धोक्याचे ठरू शकते. कारण सध्या फेसबुकवर फेक अकाउंट्सचा सुळसुळाट झाला असून फेक अकाऊंट कसे ओळखायचे, फेक अकाउंटमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध कसे राहावे, याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ ओंकार गंधे यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे झालेल्या 'सायबर सुरक्षा जनजागृती भाग २' या व्याख्यानात ते बोलत होते. ऑनलाइन शॉपिंग करताना आपले अकाउंट कसे हॅक होऊ शकते, कोणतीही साइट कशा पद्धतीने हॅक होते, सीसीटीव्हीसुद्धा कसे हॅक केले जातात हे त्यांनी करून दाखविले. अगदी आपली गाडी, कारही हॅक कशी होऊ शकते, त्यातून ब्रेक फेल करणे, स्टेरिंग लॉक करणे आदी प्रकार कसे होऊ शकतात, याबद्दलही गंधे यांनी माहिती सांगितली. तसेच नवीनच प्रचलित झालेल्या 'इलूमिनाटी' संघटना, धोके आदी विषयांबद्दलही माहिती दिली. शिवाय, यासारख्या अनेक जनजागृती व्याख्यानांची गरज समाजाला आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, मनीष चिंधडे, नीलेश सोनजे, पराग जोशी, संतोष साबळे, गौरव सामनेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

अडीच महिन्यानंतर महाडला सासरच्यांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील सरवड येथे माहेर असलेल्या विवाहिता शीतल पाटील हिचा रायगड जिल्ह्यातील महाडला संशयास्पदरित्या मृत्यू झाला. विवाहितेचा पती विनीत पाटील व इतरांनी तिचा घातपात केल्याचा संशय शीतलच्या नातलगांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी मध्यरात्री महाड शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरवड येथील शीतल भीमराव पाटील या उच्चशिक्षित तरुणीचा विवाह विनीत ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी ६ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच पती विनीत पाटील, सासरे ज्ञानेश्वर दामू पाटील, सासू निर्मला ज्ञानेश्वर पाटील, नणंद वृषाली अशोंक मुंगसे, अलका संभाजी पाटील यांच्याकडून छळ सुरू झाला. तिच्याशी संभाषण केले जात नसे तसेच तिला उपाशी ठेवण्यात येऊ लागले. तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून माहेरी पाठविण्यात देण्यात येत होते. ती एम. ए. बी. एड. असल्यामुळे तिच्याकडे नोकरीचा आग्रह धरला जात होता. दरम्यानच्या काळात विनीतला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी औषधी निर्माण कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे सुमारे एक वर्ष नऊ महिने सासरी सिन्नर येथे राहिल्यानंतर शीतल महाड येथे आली. महाड येथे असताना दि. १ मार्च २०१८ रोजी हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. शीतलचा भाऊ रोशन भीमराव पाटील (जळगाव) यांच्या तक्रारीवरून महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धुळे बंद’ला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

मंदिर मुद्दा तापला; शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांचा सहभाग

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनाऱ्यावरील मंदिरे हटवून तेथे साडेपाच किमीचे रस्ते तयार करण्याची संकल्पना आमदार अनिल गोटे यांनी मांडलेली आहे. त्यास विरोध करीत बुधवारी (दि. १६) शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांनी धुळे बंदची हाक दिली. या बंदमध्ये शहरात काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत होते, तर तुरळक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना जिल्हाप्रमुखांसह हिंदूत्ववादी संघटनांनी अतिक्रमण करून उभारलेली मंदिरे पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे आमदार गोटे यांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे, की जर शहराचा विकास हवा असेल तर अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. यानंतर धुळे बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदमध्ये आग्रारोड, फुलवालाचौक, चैनीरोड, मुख्य बाजारपेठ पाचकंदिल चौक परिसरात तुरळक बंद होती. काही ठिकाणी शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यात वाद झाल्याने भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरामण गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे, संजय वाल्हे, अरुण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. शहरातील जमनालाल बजाज रोडवर पोलिस चौकीजवळील दुकांनावर काही जणांनी अचानक दगडफेक केली. यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळाच्या कार्यालयातील जुगार अड्डा उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मित्रमंडळाच्या कार्यालयात राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत आठ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून रोकड, तसेच जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. वाल्मीकनगर परिसरात क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनिट एकचे शिपाई स्वप्निल जुंद्रे यांना या अड्ड्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी युनिटच्या पथकाने वाल्मीकनगर भागातील दोस्ती मित्रमंडळाच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी शेखर जाधव (रा. एकलव्य सोसायटी, पांडवनगरी) व त्याचे सात साथीदार पत्त्यांच्या कॅटवर तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून, अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

ऑफिस फोडून कॉम्प्युटर लंपास

एकाच इमारतीत असलेली दोन खासगी कार्यालये फोडून चोरट्यांनी कॉम्प्युटर आणि मोबाइल असा ८६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना संभाजी चौकात घडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज उदयनारायण यादव (रा. शकुंतला बिल्डिंग, संभाजी चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यादव आणि त्यांचे शेजारी किशोर पाटील यांची देवकी बिल्डिंगमध्ये व्यावसायिक कार्यालये आहेत. मंगळवारी रात्री चोरट्यांनी या दोन्ही कार्यालयांचा कडी-कोयंडा तोडून कॉम्प्युटर, प्रिंटर आणि मोबाइल असा सुमारे ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार गायकर करीत आहेत.

महिलेचा विनयभंग

घरासमोरील अंगणात मच्छरदाणीत झोपलेल्या महिलेचा एकाने विनयभंग केला. ही घटना पिंपळगाव बहुला येथील सहावा मैल भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे.

पंकज ऊर्फ नितीन देवराम लहारे (वय २६, रा. सहावा मैल, चंद्रभागा लॉन्सशेजारी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. उकाड्यामुळे सहावा मैल भागात राहणारी विवाहिता बुधवारी रात्री आपल्या घरासमोरील अंगणात मच्छरदाणी लावून झोपलेली असताना हा प्रकार घडला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

दुकान फोडून २३ हजारांची चोरी

फ्लेक्स, बॅनर तयार करण्याचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे २३ हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना राणेनगर परिसरात घडली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजरत्न मुरलीधर केदार (रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. केदार यांचा राणेनगर परिसरातील लक्ष्मीनारायण हाइट्स या इमारतीत फ्लेक्स, बॅनर बनविण्याचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या शॉपच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी एलईडी टीव्ही आणि फ्लेक्स बोर्डचे रोल व शाईचे डबे असा सुमारे २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार भोजने करीत आहेत.

चक्कर येऊन वृद्धे मृत्यू

देवदर्शन आटोपून घराकडे पायी परतताना चक्कर येऊन पडल्याने ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना काळाराम मंदिर परिसरात घडली. सुंदराबाई भिला चौधरी (रा. गजानन चौक, गुरुद्वारारोड) असे या महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री चौधरी देवदर्शनासाठी काळाराम मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे निघाल्या असता मंदिर आवारातच त्यांना चक्कर आली. जमिनीवर कोसळलेल्या चौधरी यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत.

दुकानदार महिलेची पोत खेचली

सिगारेट घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून धूम ठोकली. ही घटना शिवाजीनगर येथील धारबळे मळा परिसरात घडली असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा राजेंद्र वडजे (रा. तुलसीनमन रो-हाऊस, माऊली कॉलनी, धारबळे मळा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. वडजे यांचे आपल्या घराला लागूनच साईनाथ किराणा नावाचे दुकान आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन ग्राहकांपैकी एक व्यक्ती त्यांच्या दुकानात सिगारेट घेण्यासाठी आली. सिगारेट घेऊन त्याने नंतर साबण आणि शाम्पूची मागणी केली. दुकानात वर टांगलेली शाम्पूची पुडी तोडण्यासाठी वडजे काउंटरजवळ उभ्या राहिल्या. याचाच फायदा घेत चोरट्यांपैकी एकाने वडजे यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची पोत तोडली. त्यानंतर चोरटे दुचाकीवर बसून फरार झाले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेलकर करीत आहेत.

(क्राईम डायरी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक बूथ, दहा यूथ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले संघटन मजबूत करण्यासाठी 'एक बूथ दहा यूथ' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी युवक शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. येत्या महिनाभरात प्रत्येक बूथवर युवकांची नेमणूक करणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. त्यात युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे पक्षाकडे असावे यासाठी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादीची युवक शाखा एका बूथवर दहा युवक कार्यकर्त्यांची फळी महिनाभरात तयार करणार आहे. बूथप्रमुख व त्यासोबत असणाऱ्या युवकांनी बूथवर कसे लक्ष दिले पाहिजे याचे मार्गदर्शन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले. अॅड. चिन्मय गाढे, नवराज रामराजे, रोहन नहिरे, किरण पानकर, विशाल कोशिरे, किरण माणके, स्वप्नील चव्हाण, डॉ. संदीप चव्हाण, सागर बेदरकर, भूषण गायकवाड, सोमनाथ सानप, मनोज चव्हाण, राहुल तुपे, विशाल डोखे, मितेश राठोड, सुनील घुगे, रितेश जाधव, स्वप्नील सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जल, जंगल, जमीन सत्ताशोषणाचे अड्डे

$
0
0

जल, जंगल, जमीन सत्ताशोषणाचे अड्डे

तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी-नापिकी आणि कोसळवलेला शेतमालाचा बाजार भाव यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्या त्वरित थांबल्या पाहिजे. जागतिकीकरणात जल, जंगल, जमीन हे सत्ताशोषणाचे अड्डे बनले आहेत, अशी टीका तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी केले.

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, डायमंड मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित जलशाहिरी परिषदेत अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. उद्योगपती उद्योगाला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करत नाही, मग शेतकऱ्यांनवरच का ही वेळ येते. आज शेतकरी उद्ध्वस्त करून उद्योगपतींना संरक्षण दिले जात आहे. शेतकरी हा वीजबिल, बँक कर्जा करता नाडवला जातो तर भांडवलदार उद्योग, व्यावसायिक यांना हे सरकार संरक्षण देते, असा आरोपही त्यांनी बोलताना केला.

शेती, पाणीबचतीबाबत मार्गदर्शन

या वेळी प्रा. अशोक सोनवणे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी व जलधोरण' या विषयावर व्याख्यान दिले. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे कुणब्याचा शेताची आणि जनावरांच्या चाऱ्याची केवळ चिंता न करता ते कुणब्याचा मुबलक आणि परवडेल असेच कसे उपलब्ध होईल हे सांगत, असे ते म्हणाले. या वेळी कवी गायक सुनील खरे यांनी जलप्रबोधन गीत सादर केले. कवी प्रा. शिवाजी भालेराव, कवी लक्ष्मण बारहाते, सचिन सताळकर, सोमनाथ गायकवाड, अभिषेखा गांगुर्डे शेती व पाणी विषयावरील कविता सादर केल्या. जलशाहिरी परिषदेचे प्रास्ताविक आयोजक प्रा. शरद शेजवळ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बक्षिसाच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महागडी कार बक्षीस म्हणून देण्यात येत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, फसवणुकीचा हा प्रकार वारवांर घडत असल्याचे दिसते.

या प्रकरणी स्मिता किरण पाटील (३८, रा. वास्तुछाया बिल्डींग, घोडेबाबनगर, तपोवनरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, ६ ते १६ मे या काळात फसवणुकीचा प्रकार घडला. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीने ७८३५०३३९८८, ९६५४४७५०९० तसेच ९७७३७५९९०५ या मोबाइल क्रमांकावरून पाटील यांच्याशी संपर्क साधला. एका योजनेत तुम्हाला महागडी कार लागल्याचे आरोपीने पाटील यांना सांगितले. जवळपास आठ लाख रुपयांची कार असून, ती मिळवण्यासाठी थोडासा खर्चही करावा लागेल, असे आरोपीने सांगितले. यानंतर आरोपीने वेगवेगळ्या मार्गाने अवघ्या १० दिवसात पाटील यांच्याकडून एक लाख ९१ हजार ८९६ रुपये उकळले. बँक खात्यावर पैसे जमा केल्यानंतरही आरोपीची मागणी वाढतच असल्याचे लक्षात आल्याने पाटील यांनी विचारपूस केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अॅक्टमधील कलम ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पैसे देण्यापूर्वी खात्री करा

असे गुन्हे करणारे संशयित परराज्यातील दुर्गम भागातून हा उद्योग करतात. वेगवेगळ्या आणि महागड्या वस्तू फुकट अथवा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून आरोपी नागरिकांकडून पैसे उकळतात. एकदा पैसे दिले की नागरिक बक्षिसाच्या आमिषाने पुन्हा पुन्हा पैसे देतात. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता, पैसे देण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिग बॉस’विरोधात पोलिसांत तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अश्लिल दृश्ये आणि संवादामुळे चर्चेत आलेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधील दोन कलाकारांसह इतरांविरोधात कायद्याच्या विद्यार्थ्याने पंचवटी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. पोलिस याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'कलर्स' या मराठी वाहिनीवर 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो सुरू आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या कलाकारांनी सहभाग घेतला असून, यातील रेशम सेठ टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे या दोघा विवाहितांमध्ये प्रेमसंबंध फुलले आहेत. १४ मे रोजी प्रसारीत झालेल्या शोमध्ये या दोघांत अश्लिल संवाद झाला. तसेच दोघांचे हावभावदेखील अश्लिल होते. याबाबत तक्रार देणाऱ्या ऋषिकेश देशमुख यांनी सांगितले की, रेशम आणि राजेश दोघेही विवाहीत असून, त्यांना मुलेही आहेत. कौटुंबिक जबाबदारी पार पडणाऱ्या या दोघांच्या प्रेमसंबंधामुळे अनैतिक संबंधांना खतपाणी मिळणार आहे. ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी असल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली. देशमुख कायद्याचे विद्यार्थी आहेत. एका राज्यस्तरीय वाहिनीवर अश्लिलतेचा प्रचार आणि प्रसार अगदीच सहज होतो, हे कोठेतरी थांबायला हवे म्हणून पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली. रेशमसह राजेश, कलर्स वाहिनी, व्हॉयकॉम १८ अॅण्ड ईटीव्ही नेटवर्क, इंडेमोल तसेच या संबंधित सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २९२, २९३, २९४ तसेच आयटी अॅक्टनुसार कारवाई करून, यापुढे अश्लिल दृष्ये प्रसारीत करणे रोखावे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाला असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारीची चौकशी होईल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य अभियंतापदी जनवीर रुजू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महावितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदाचा पदभार ब्रिजपालसिंह जनवीर यांनी गुरुवारी स्वीकारला. यापूर्वी, ते जळगाव परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर जनवीर यांची वर्णी लागली आहे.

जनवीर यांनी आयआयटी, मद्रास येथून १९८७ मध्ये एम. टेक. या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. महावितरणमधील आपल्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. यापूर्वी, त्यांनी नाशिक येथे तत्कालीन राज्य विद्युत मंडळ आणि महावितरणमध्ये पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच मुख्य सामग्री भांडाराचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, औष्णिक विद्युत केंद्रात उपकार्यकारी अभियंता या पदांवर जवळपास १० वर्षे कार्यरत होते. त्यामुळे नाशिक परिमंडळातील विजेच्या समस्यांशी ते परिचित आहेत. उस्मानाबाद आणि हिंगोली येथे अधीक्षक अभियंता या पदावर काम करतांना वसुली व वीजगळतीचे आव्हान स्वीकारून प्रगती साधली. नागपूर येथे मुख्य अभियंता-गुणवत्ता व नियंत्रण, प्रकाशगड या मुख्य कार्यालयात खरेदी विभागाचे कार्यकारी अभियंता, मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोंदिया व जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्यांनी विशेष कामगिरी केली. वीज क्षेत्रातील निर्मिती, गुणवत्ता व नियंत्रण, संचालन व सुव्यवस्थापन, खरेदी व भांडार, पायाभूत आराखडा या विभागात कामाचा बहुआयामी अनुभव आहे.

नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी रुजू झाल्यानंतर जनवीर यांचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे व भुजंग खंदारे, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागूल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम, धनंजय आहेर, मनीष ठाकरे, मधुसूदन वाढे, प्रेरणा बँकर, वित्त व लेखा विभागाचे प्रभारी सहायक महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने आदींसह अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधींनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १५ हजारात कट्ट्यांची विक्री

$
0
0

तस्करांचे रॅकेट मोडण्याचे पोलिसांपुढे आव्हान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या ४ ते १० हजार रुपयांमध्ये तयार होणारे गावठी कट्टे वा पिस्तुल १५ ते ४० हजार रुपयांपर्यंत नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये विक्री केले जातात. पाच जिल्ह्यांमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरूच असून, यातील तस्करांचे रॅकेट मोडून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भाग दुर्गम असून, याचाच फायदा घेत तेथे गावठी कट्टे वा पिस्तुल शिताफीने तयार केली जातात. एक लोखंडी पाइप अथवा रॉड तसेच रॉड तपावून त्यास बंदुकीचा आकार देण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री असली की मागणीनुसार अवघ्या ४ ते १० हजार रुपयांमध्ये कट्टे तयार केले जातात. मात्र, हे कट्टे उत्पादकाकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. या व्यवहारात एक मध्यस्थ असतो. मध्यस्थाशिवाय कट्टे सीमावर्ती भागातून बाहेर पडत नाही. तयार झालेला माल रेल्वे, बस अथवा खासगी वाहनांमधून वेगवेगळ्या ठिकाणी पोहचवला जातो. विक्री करताना कट्ट्यांच्या किंमती फिनिशिंगनुसार १५ ते ४० हजार रुपयांपर्यंत पोहचतात. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात सध्या अवैध शस्त्रास्त्रांची शोध मोहीम सुरू असून, आतापर्यंत १४८ शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. याच मोहिमेदरम्यान धुळे पोलिसांनी एका मध्यस्थास अटक केली होती. पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याचा वावर सतत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये असल्याचे समोर आले. एकाच्या अटकेनंतर इतरही काही मध्यस्थ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलिसांचे सर्च ऑपरेशन आणि मध्यस्थांची धरपकड सुरूच राहणार असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सांगितले. अतिदुर्गम आणि जंगल असा सीमावर्ती भाग असून, येथे पोलिसांची कारवाई सहजतेने होत नाही. अनेकदा पोलिसांवरही हल्ले झाले आहेत. अवैध शस्त्रास्त्रांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी थेट पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, त्या व्यक्तीचे नावही गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे चौबे यांनी स्पष्ट केले.

बॉर्डर मिटिंगद्वारे आखणा व्यूहरचना

सीमावर्ती भागातून होणारी शस्त्रांची तस्करी आणि इतर गुन्हेगारीच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातर्फे लवकरच राज्य बॉर्डर मिटिंग घेतली जाणार आहे. या बैठकीस मध्य प्रदेश, गुजरात राज्यासह नाशिक परिक्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी हजेरी लावतील. या बैठकी लवकरच होणार असल्याचे चौबे यांनी स्पष्ट केले. अशी बैठक यापूर्वी वर्षभरापूर्वी पार पडली होती. आता आयोजीत होणाऱ्या बैठकीत अवैध शस्त्र तस्करीबाबत व्यूहरचना आखली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनएसडी’साठी प्रवेशसंधी

$
0
0

पात्रता परीक्षा २६ मे पासून; नाट्यक्षेत्रातील करिअरसाठी कवाडे खुली

म. टा. प्रतिनिधी, नशिक

अभिनयासह नाट्य क्षेत्रातील पूरक बाबींचे सूक्ष्म मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) प्रवेश परीक्षेस २६ मे पासून सुरुवात होणार आहे. गेल्या महिन्यात नाट्य क्षेत्रातील या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज दाखल केलेले विद्यार्थी आता या प्रवेश परीक्षेच्या पूर्व तयारीत गुंतले आहेत.

एनएसडीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या तीन वर्षे कालावधीच्या या पदवी अभ्यासक्रमाला नव्या शैक्षणिक वर्षात १६ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी निवासी रहावे लागते. या अभ्यासक्रमात नाट्यशास्त्रातील व्यावसायिक शिक्षण, नेपथ्य, दिग्दर्शन आणि अभिनय, नाट्यक्षेत्राशी निगडित मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात मिळते. हिंदी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये ही पदवी विद्यार्थी पूर्ण करु शकतात. या अभ्यासक्रमांसाठी ८ हजार रुपये प्रति महिना स्कॉरलशिप विद्यार्थ्यांना देण्यात येते.

पात्रतेच्या अटी

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी (भारत किंवा भारताबाहेरील), किमान सहा वर्षे थिएटर प्रॉडक्शन्समध्ये सहभाग, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान, तीन थिएटर्स तज्ज्ञांचे शिफारस पत्र, थिएटर्स अनुभवाची डॉक्युमेंट्री, वय १८ ते ३० असावे , या निकषांवर एनएसडीसाठी प्रवेश देण्यात येतो. एकूण २६ जागांवर या पदवीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. यामध्ये विविध वर्गांसाठी आरक्षणाचीही तरतूद आहे.

प्रवेश परीक्षा अन् मुलाखतीचा टप्पा

येत्या २६, २७, २८ आणि २९ मे रोजी मुंबईमध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात मुलाखतीस समोरे जावे लागेल. मुलाखतीनंतर निवड चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाविषयीची अधिक माहिती विद्यार्थ्यांना www.onlineadmission.nsd.gov.in या वेबसाइटद्वारे घेता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसरभोळी खारूआजी

$
0
0

मे महिन्यातला चिंचा पिकण्याचा हंगाम संपून चिंचवनातल्या झाडांवर मऊ-मऊ लुसलुशीत कोवळी पालवी फुटू लागली होती. हिरव्याकंच पालवीवर पिवळ्या अन् हलक्या गुलाबी फुलांच्या माळा व गजरे फुलारून सजू लागले होते. पायाखालच्या जमिनीवर सारखा फुलांचा वर्षाव होऊ लागला होता. अशा धुंद भरल्या रानात खारींच्या छोटूकल्या पिलांची काय धम्माल रंगली होती!

च्चिर्र चिर.. चिर्र चिर्र चिर्र…

चिर.. चिर.. चिर चिर्र…

कोणीच कोणाला जुमानत नव्हते. पोरांच्या मस्ती अन् आवाजाने घरा-घरांतल्या न्रूताई पार वैतागल्या होत्या. सरसर सरसर या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून या झाडावर पाठशिवणीचा खेळ रंगला होता. कोणी मध्येच धडपडायचे, तर कोणाची टक्करच होऊन जायची.

'आता बस करा रे पोरांनो! पडाल तंगड घसरून,' म्हातारी खारूताई ओरडली.

'सकाळपासून या पोरांनी काय शिमगा माजवला बाई, डोक उठलंय नुसतं,' वैतागलेल्या चार-पाच खारूताई एकस्वरात ओरडल्या. सैराट उधळलेली पोरं काही ऐकायला तयार नाहीत हे पाहून सर्वांत वयस्कर असलेली खारूआजी काठी टेकत हळूच सर्वांत मोठ्या चिंचेच्या झाडावर जिथे खूप फांद्या फुटल्या होत्या त्या चौकात आली अन् जोरजोरात पोरांना हाक मारत म्हणाली, 'ए रंभा, ये गं इकडं..' छोटूकली रंभा संकोच करीत थांबली.

'ए बाळू, तिकडे कुठं पळत चालला, थांब जरा..' खारोबा बाळू घुटमळला.

'ए फुलमती, बबली, गोटू, रांझा थांबा रे जरा पोरांनो, मी एक छान गोष्ट तुम्हाला सांगणार आहे..' 'काय, गोष्ट? खरंच? अरे वा! किती मज्जा! सांगा ना आजी लवकर..' सगळी पोरं खारूआजीला गोष्ट सांगण्याचा आग्रह करू लागली. चिंचेवरच्या चौकात एकदम शांती पसरली. तेवढ्यात धावत-पळत शेंड्यावर लपलेली चिमुकली फाल्गुनी आली अन् चिर्र..चिर्र..चिर्र.. आवाज करू लागली. बाळूने पुढे येऊन एक धपाटा घातला फाल्गुनीच्या पाठीत अन् म्हणाला, 'चूप बैस गं जरा, आजी गोष्ट सांगतेय आपल्याला.' फाल्गुनीलाही खूप आनंद झाला. 'सांग ना गं आजी लवकर,' ती लाडावल्या स्वरात म्हणाली.

एक मोठा उसासा टाकून खारूआजी म्हणाली, 'बाळांनो, तुम्हाला माहिती आहे हे चिंचवन कुणी लावले?'

'नाही,' सगळी पोरं एकस्वरात म्हणाली.

'बाळांनो, हे चिंचवन जिथे तुम्ही एवढी मस्ती करता, आंबट-गोड चिंचा खाता, थंडगार सावलीत झोपता, असे हे सुंदर चिंचबन लावलंय आपल्याच एका वयोवृद्ध वसुमती आजीने..'

'खरंच? आपल्या वसुमती आजीने हे वन लावले?' सर्वांनी एका स्वरात विचारले.

'होय बाळांनो, वसुमती आजीचीच ही पुण्याई आहे.'

'म्हणजे हे वन माणसांनी नाही लावले?' गोटूने प्रश्नांकित मुद्रेने विचारले.

'तर बाळांनो, वसुमती आजीला बियांचा संग्रह करण्याची खूप आवड होती. पिकलेली फळे खाल्ली की साऱ्या बिया तोंडात कोंबून जमिनीवर उतरायची अन् मातीत पुरून द्यायची. आंबट चिंचा तिला खूप आवडायच्या चिंचोकोपण ती चवीने खायची अन् खूप साऱ्या मातीत खोल पुरून ठेवायची. दुसऱ्या दिवशी किंवा भूक लागल्यावर खाण्यासाठी. पण, नंतर जेव्हा चिंचोके शोधायला जायची, कालची ती जागाच विसरून जायची अन् म्हणायची, 'विसरले गं बाई!' वर्षानुवर्षे व महिनोनमहिने वसुमती आजी असेच करीत राहायची अन् पुरलेल्या बिया विसरून जायची. तिच्या सोबतच्या खारी गमतीने तिला विसरभोळी वसुमती म्हणायच्या.

दर वर्षी मृगाचा पाऊस पडला, की मातीला घमघमीत सुगंध यायचा, ओल्याशार मातीत बिया रुजायच्या अन् जागोजागी चिंचेची कोवळी रोपे तरारून यायची. पाहता-पाहता सारी उघडी जमीन चिंचेच्या छोटूकल्या रोपांनी हिरवीगार अन् शोभिवंत व्हायची. हे सगळं पाहून कोण आनंद व्हायचा वसुमती आजीला, आनंदाने टुणूक-टुणूक उड्या मारीत सुंदर गाणे गात चिंचबनातून ती विहार करीत असे.

एकदा तिच्या ज्येष्ठ-वरिष्ठ आणि बरोबरीच्या खारूताई आणि खारूबाबांनी तिने उगवलेल्या सर्वांत विशाल चिंचेच्या झाडावर वसुमती आजीचा सन्मान करण्याचे ठरविले. आजीला अत्यानंद झाला. आपल्या सन्मानाला उत्तर देताना वसुमती आजी एवढंच म्हणाली होती, 'अच्छे करम करो और भूल जाओ..!''

-संजीव आहिरे, नाशिक

--

बालकथा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १५ केंद्रे सज्ज

$
0
0

लोगो

विधान परिषद निवडणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्व‍िवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी, २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

प्रत्येक तालुका स्तरावरील तहसील कार्यालये, तसेच नाशिक तालुका व शहरातील सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे दालन येथे मतदान केंद्रे असतील. प्रत्येक तालुक्यातील नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि महापालिकेतील सर्व सदस्य हे संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात मतदान करतील.

जिल्ह्यात ६४४ मतदार

जिल्ह्यात एकूण ६४४ सदस्य मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नाशिक महापालिका, भगूर नगरपरिषद, देवळाली छावणी परिषद, नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सर्व सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती असे १६० मतदार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) दालनातील केंद्रावर मतदान करतील.

केंद्रनिहाय जिल्ह्यातील मतदारसंख्या

दिंडोरी तहसील कार्यालय : २६

पेठ तहसील कार्यालय : २२

इगतपुरी तहसील कार्यालय : २७

त्र्यंबकेश्‍वर तहसील कार्यालय : २४

निफाड तहसील कार्यालय : २९

सिन्नर तहसील कार्यालय : ३९

येवला तहसील कार्यालय : ३४

मालेगाव तहसील कार्यालय : ९७

नांदगाव तहसील कार्यालय : ६०

चांदवड तहसील कार्यालय : २४

कळवण तहसील कार्यालय : २५

देवळा तहसील कार्यालय : २३

बागलाण तहसील कार्यालय : ३२

सुरगाणा तहसील कार्यालय : २२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्राची जागा

$
0
0

अमृता सिनकर, इयत्ता चौथी

चित्राची जागा

०००

प्रश्न एकदा, उत्तर दोनदा

१) हळूहळू चालणारा प्राणी २) लढाई ३) डाळीचा पदार्थ

उत्तर

१) कासव २) समर ३) वरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर- फक्त फोटो

‘चाइल्ड लाइन’तर्फे रेस्क्यू व्हॅनची सेवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलांसाठी कार्यरत असलेल्या चाइल्ड लाइन या संस्थेसाठी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नवजीवन वर्ल्ड पीस अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्या हस्ते या वाहनाचे अनावरण करण्यात आले.

शोषित, अनाथ, वंचित संकटात सापडलेल्या मुलांसाठी महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयातर्फे चाइल्ड लाइन १०९८ ही राष्ट्रीय पातळीवरील २४ तास चालणारी मोफत फोन सेवा असून, मागील १५ वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. या माध्यमातून मुलांना निवासी व्यवस्था, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत, विधी संघर्षित मुलांचे पुनर्वसन, व्यसनाधीन मुले, बाल कामगार, बालविवाह आदी प्रकारात संस्था काम करते. अनेकदा मुलांच्या मदतीसाठी गेलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची तसेच पोलिस वाहनांची मदत घ्यावी लागते. याचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम आणि चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशन यांच्यातर्फे रेस्क्यू व्हॅन देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक महेंद्र विंचूरकर यांनी दिली. यासाठी समन्वयक प्रवीण आहेर तसेच प्रणिता तपकिरे यांचेही सहाकार्य लाभले. यावेळी मंगल पवार, प्रिती कुलकर्णी, अरुण भालेराव, डिंपल पाटील, सुवर्णा शिंदे, शीतल चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमधील अन्नपदार्थांवर ‘जीएसटी’चा भार नकोच!

$
0
0

देशभरात प्रवासासाठी प्राधान्याने वापर होणारे वाहतुकीचे साधन म्हणून रेल्वेची ओळख आहे. सर्वसामान्यांकडून लांबपल्ल्याचा प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य दिले जाताना दिसते. मात्र, अगोदरच रेल्वेत दिले जाणारे अन्नपदार्थ योग्य नसल्याचा आरोप प्रवाशांकडून सातत्याने केला जात असतानाच आता रेल्वेत अथवा स्टेशनवर दिले जाणारे अन्नपदार्थ व शीतपेयांवर १८ टक्के 'जीएसटी'चा भार टाकला गेल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर 'जीएसटी'चा भार टाकू नये, असे मत रेल्वे प्रवाशांनी मांडले असून, रेल्वेतील व स्टेशनवरील अन्नपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणीही केली आहे.

निर्णयाचा व्हावा पुनर्विचार

कमी पैशात लांबपल्ल्याचा प्रवास रेल्वेच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होत असतो. या पार्श्वभूमीवर रेल्वेत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १८ टक्के जीएसटी लावणे योग्य ठरणार नाही. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा विचार करीत कमीत कमी जीएसटी आकारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

-विजय भंदुरे

दर्जा सुधारण्यास द्यावे प्राधान्य

रेल्वेत दिले जाणारे खाद्यपदार्थ योग्य नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जादेखील फारसा चांगला नसल्याचे प्रवासी सांगतात. या अन्नपदार्थांचा दर्जा सुधारण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वेतील खाद्यपदार्थ व शीतपेयांवर 'जीएसटी'चा भार लावणे अयोग्य आहे.

-गणेश मौले

सर्वसामान्यांच्याच खिशाला झळ

देशभरात लांबपल्ल्याचा प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांकडून रेल्वेचा सर्वाधिक वापर केला जातो. लांबवर प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेकडून जेवणाची सुविधा देण्यात येते. मात्र, रेल्वेत दिले जाणारे खाद्यपदार्थ दर्जेदार नसल्याचा आरोप प्रवासी करतात. आता जीएसटीच्या निर्णयाने सर्वसामान्यांच्याच खिशाला झळ पोहोचणार आहे.

-विवेक सोनवणे

नाममात्र 'जीएसटी'ची गरज

आतापर्यंत केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात केवळ पाच टक्के जीएसटी खाद्यपदार्थ व शीतपेयांवर होता. त्यामुळे प्रवाशांनादेखील ते परवडणारे होते. रेल्वेने खाद्यपदार्थांवर जीएसटी नाममात्र ठेवला पाहिजे. रेल्वे स्थानकांवरदेखील विक्री केले जाणारे खाद्यपदार्थ स्वतः दिल्यास त्याचा सर्वसामान्य प्रवाशांनाच लाभ मिळू शकणार आहे.

-विजय आहिरे

अन्नपदार्थांची दरवाढ अयोग्यच

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या रेल्वेच्या प्रवास भाड्यात अगोदरच वाढ करण्यात आलेली आहे. त्यात पुन्हा रेल्वेत दिले जाणारे खाद्यपदार्थही महागणार असल्याने त्याचा सर्वांनाच फटका बसणार आहे. सर्वसामान्यांना कमी पैशात प्रवासाची देणारी सुविधा म्हणून रेल्वेची ओळख आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांवर वाढविण्यात आलेला जीएसटी कमी करावा.

-अतुल पाटील

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीसाठी नाशिकची जागा प्रतिष्ठेची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवस बाकी असताना राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येऊन तब्बल तीन तास जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन त्यात ही जागा आपल्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचा संदेश दिला आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा जिंकून विधान परिषदेचे संख्याबळ वाढवण्याचेही त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यानंतर पाटील यांनी हा दौरा केल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे.

राष्ट्रवादी भवनात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील आमदार, प्रमुख पदाधिकारी व माजी खासदार, आमदार उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी तालुकानिहाय परिस्थिती समजून घेतली. बैठकीत मतांचा आकडा कसा वाढवता येईल, त्यासाठी काय करावे याबाबत त्यांनी सूचना केल्या. या वेळी सर्व नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान खेचून आणण्याचे आश्वासन दिले. बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, अपूर्व हिरे, हेमंत टकले, जयवंत जाधव, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, नगरसेवक गुरुमित बग्गा, गजानन शेलार आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेविका हेमलता पाटील, लक्ष्मण जायभावे, मनसेचे राहुल ढिकले, सलीम शेख उपस्थित होते.

पाटलांचे भाजपशी गुफ्तगू

जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हिरे कुटुंबीयांच्या पंचवटी कॉलेजमध्ये गेले. तेथे त्यांनी प्रमुख नेत्यांबरोबर जेवण घेतले. त्यानंतर त्यांनी आमदार अपूर्व हिरे यांच्याशी चर्चा केली. त्याच वेळी जयंत पाटील यांची भाजपच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी निवडणुकीसंदर्भात गुफ्तगू केले. मात्र, त्यांच्यात काय बोलणे झाले हे कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images