Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एकाच रात्री चार दुकाने फोडली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोविंदनगर, सद्गुरूनगर आणि शिंगाडा तलाव भागात एकाच रात्रीत चोरट्यांनी चार दुकाने फोडली. त्यात दोन मेडिकल्स, तसेच आइस्क्रीम आणि ऑटोमोबाइल दुकानाचा समावेश आहे. या दुकानांतील १२ हजार ४०० रुपयांची रोकड आणि काही वस्तू असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ऋषिकेश यादवराव गवळी (रा. श्रीसंत अपार्टमेंट, सद्गुरूनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री चोरीची घटना घडली. गवळी यांचे राहत्या इमारतीतच तळमजल्यावर श्री गणेश मेडिकल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील रोकड व कॉस्मेटिक वस्तू चोरून नेल्या. दुसरी घटना सद्गुरूनगर परिसरात घडली. आवारे हॉस्पिटल भागातील अमोल आइस्क्रीम आणि नंदिनी मेडिकल फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड व महागड्या वस्तू चोरून नेल्या. शिंगाडा तलाव भागात ओमकार गोविलकर यांचे ऑटोमोबाइलचे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड चोरून नेली. एकाच रात्री झालेल्या या घरफोड्यांमध्ये चोरट्यांना १२ हजार ४०० रुपये हाती लागले. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काशीनाथ राठोड करीत आहेत.

कारचे चाक लंपास

उभ्या केलेल्या कारचे चाक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाटील लेन भागात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप गोपीनाथ निळकंठ (रा. वरद अपार्टमेंट, इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची कार कार (एमएच १५, डीएम २७५१) दि. २१ एप्रिल रोजी रात्री कॉलेजरोड भागातील पाटील लेन क्रमांक एक येथील स्वाती बंगल्यासमोर पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्यांनी या कारच्या डाव्या बाजूचे सुमारे १८ हजार रुपये किमतीचे चाक काढून नेले. या घटनेचा अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

दानपेटीप्रकरणी संशयितास अटक

मंदिरातील दानपेटी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोल्हापूर येथील एकास पोलिसांनी अटक केली. ही घटना रोकडोबा तालीम परिसरात घडली. पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न होत असल्याची बाब लक्षात आल्याने नागरिकंनी संशयितास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम बळवंत जोरे (रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. रोकडोबा तालीम परिसरातील मंगळगृह मंदिरात गुरुवारी पहाटे संशयित दानपेटी चोरी करताना आढळून आला. घटनेचा अधिक तपास जमादार लवांड करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

गळफास लावून घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शरणपूर भागात घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दाविद दिनकर वाघमारे (वय २८, रा. शरणपूर)याने गुरुवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार पळशीकर करीत आहेत.

--

क्राईम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नालेसफाईची जबाबदारी आता सफाई कर्मचाऱ्यांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यांच्या साफसफाईसाठी सफाई कर्मचाऱ्यांना कामाला लावल्यानंतर आता याच कर्मचाऱ्यांकडे पावसाळ्यात नाल्यांची सफाईदेखील सोपविली आहे.

सध्या महापालिकेडून पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरू असून, कंत्राटदाराऐवजी महापालिकाच सफाईचे काम करीत आहे. पावसाळा संपल्यानंतर या नाल्यांच्या सफाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्तांनी नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे पावसाळ्यापुरती सोपविली आहे. पावसाळ्यात आरोग्य विभागांतर्गत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना एकाच वेळी रस्ते आणि नाल्यांची साफसफाईही करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक खर्चाचीदेखील बचत होणार आहे.

महापालिकेकडून दर वर्षी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. आतापर्यंत बांधकाम विभागाकडून ठेकेदारामार्फतच मे व जूनमध्ये साफसफाईचे काम केले जात असे. परंतु, यंदा मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फतच हे काम केले जात असून, विविध यंत्रणा १ एप्रिलपासूनच जुंपण्यात आल्या आहेत. जेसीबीच्या सहाणे व ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही नालेसफाई केली जात आहे. बांधकाम विभागामार्फत जूनपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण होणार असली, तरी पावसाळ्यात कचरा आणि वाहून येणाऱ्या घाणीमुळे नाले तुंबण्याचे प्रकार वाढतात. गेल्या वर्षी यामुळेच शहरात पाणी तुंबले होते. त्यामुळे यंदा पावसाळ्यातही नाल्यांची दैनंदिन साफसफाई केली जाणार आहे. पावसाळ्यात चार महिने नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविली जाणार आहे. पावसाळ्यात रस्ते सफाईचे काम कमी असते. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना रस्त्याऐवजी नालेसफाईचे अतिरिक्त काम दिले जाणार आहे. अनेकवेळा रस्त्याचा कचरा हा नाल्यांमध्ये टाकला जातो. परंतु, रस्त्यांबरोबरच नालेसफाईचीही जबाबदारी सफाई कामगारांवर टाकल्यास त्यांच्याकडून कचरा टाकला जाणार नाही. त्यामुळे नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेची बचत

गेल्या वेळी नालेसफाईवरून शहरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तत्कालीन शहर अभियंत्यांनी परस्पर नालेसफाईचे काम कंत्राटदारांना दिले होते. परंतु, प्रत्यक्षात नालेसफाईच झाली नसल्याचा दावा नगरसेवकांनी केला होता. महापौरांनी नालेसफाईच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, कालातंराने हा आदेशच फिरला होता. गेल्या वर्षी नालेसफाई व आरोग्यावर जवळपास दोन कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाला होता. परंतु, आयुक्त मुंढेंनी यावर्षी मात्र महापालिकेच्याच यंत्रणांमार्फत हे काम करून घेत महापालिकेची आर्थिक बचतही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकवी स्मारकाच्या कामाला गती देऊ

$
0
0

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

बालकवींच्या जन्मगावी होणारे त्यांचे स्मारक काही तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहे. या कामातील त्रुटी दूर करून बालकवी स्मारकाच्या कामाला गती देऊ, असे आश्वासन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

बालकवींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला पाटील यांच्या हस्ते औदुंबराचे रोपण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उमवि सिनेट सदस्य दिलीप पाटील, तहसीलदार चंद्रजितसिंह राजपूत, गटविकास अधिकारी एस. डी. जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेस प्रदेश चिटणीस डी. जी. पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, माधुरी अत्तरदे, ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे आदी उपस्थित होते.

येथील धरणी ओढ्याच्या काठावर असलेला बालकवींच्या कवितेतला १५० वर्षांपूर्वीचा औदुंबर दोन वर्षांपूर्वी उन्मळून पडला होता. त्याच जागेवर नवीन औदुंबराचे रोपण राज्यमंत्री पाटील यांनी केले. या औदुंबर परिसराचे सुशोभीकरण करण्याची सूचना समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी मांडली. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष सलीम पटेल, वासुदेव चौधरी व पप्पू भावे यांनी दिले. कार्यक्रमास भानुदास विसावे, कैलास माळी, संजय महाजन, राजेंद्र महाजन, उपसभापती प्रेमराज पाटील, दीपक सोनवणे, शिरीष बयस, धिरेंद्र पुरभे, विनोद रोकडे आदी उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बालकवींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जयंतीदिनी ऑगस्टमध्ये 'बालकवी पुरस्कारांचे वितरण' व 'एक दिवस कवितेसाठी' असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. मंचचे कार्याध्यक्ष डी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

स्मृती रहाव्या जाग्या

धरणगाव हे बालकवींचे जन्मगाव आहे. या जन्मस्थळाला व औदुंबर परिसराला भेट देण्यासाठी राज्यसभरातून असंख्य मराठी रसिक येतात. त्यांचा अपेक्षाभंग होऊ नये, बालकवींच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी स्मारक होणे गरजेचे असल्याचे मत साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांनी मांडले. बालकवींच्या साहित्यासंदर्भात अभ्यास करणाऱ्यांसाठी उमविच्या वतीने बालकवी अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत यापूर्वी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी आपण नव्याने प्रयत्न करू, असे आश्वासन उमविचे सिनेट सदस्य दिलीप पाटील यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ फार्मवर फटाक्यांची आतषबाजी

$
0
0

सिडको : भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याचे वृत्त माहीत होताच कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्मवर गर्दी केली. फटाक्यांची आतषाबजी करीत आणि ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले भुजबळ फार्म मागील दोन वर्षांपासून शांत होते. मात्र, शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने भुजबळ फार्मचा परिसर दुमदुमून गेला.

बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांना सुमारे दोन वर्षांपासून अटक झाली होती. तेव्हापासून जामीन मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्याचे वृत्त शहरात दाखल होताच भुजबळ समर्थकांनी भुजबळ फार्म येथे गर्दी केली. त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली आणि ढोलताशांच्या गजरात आनंद साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, प्रकाश वडजे, बाळासाहेब कर्डक, उदय जाधव, संतोष कमोद, नाना पवार, मुक्तार शेख, अमर मोरे, योगेश कमोद, भालचंद्र भुजबळ, मंगेश काठे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आडगाव नाक्यावर जल्लोष

पंचवटी : राष्ट्रीय ओबीसी नेते भुजबळ यांना तब्बल २५ महिन्यानंतर जमीन मंजूर होताच माळी सेवा समितीच्या वतीने समितीच्या जुना आडगाव नाका येथील कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष विजय राऊत, ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव तांबे, उपाध्यक्ष उत्तमराव बडदे, कार्याध्यक्ष प्रभाकर क्षिरसागर, सरचिटणीस अण्णा विधाते, महेश गायकवाड, सचिन दप्तरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन आडगाव नाका येथील माजी नगरसेवक समाधान जाधव यांच्या कार्यालयात पेढे वाटप करण्यात आले. फटाके फोडण्यात आले. जनार्दन स्वामीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळाच्या अमोल तांबे, हरीश माळी, नाना तिदमे, किशोर भास्कर आदींनी पेढेवाटप केले.

नाशिकरोडला घोषणाबाजी

नाशिकरोड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवाजी पुतळ्याजवळ जल्लोष साजरा केला. यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ, जिल्हा संघटक जयप्रकाश गायकवाड, शहर सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांच्यासह राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे स्वप्निल फुले, राजाभाऊ जाधव, समर सोनार, विधानसभा अध्यक्ष राहुल तुपे, वाल्मिक बागुल, नकुल काश्मिरे, निखील भागवत,वैभव तुपे,बाळासाहेब जाधव, असिफ शेख,गणेश गांगुर्डे आदींनी भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

मालेगावात गुलालाची उधळण

मालेगाव : भुजबळ समर्थकांनी मालेगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, गणेश खैरनार, विनायक माळी, मधुकर वडगे, ज्ञानेश सोनवणे, आबासाहेब साळुंखे, बाळासाहेब बागूल आदींसह शेकडो समर्थक उपस्थित होते .

नांदगावमध्ये पेढेवाटप

मनमाड : नांदगाव येथील आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ भुजबळ समर्थकांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला. वाल्मीक टिळेकर, डॉ. सुरेश गायकवाड, सोमनाथ पाटील, विजय जाधव, गणेश पवार, महेंद्र गायकवाड, कचरू त्रिभुवन, सचिन जेजुरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मनमाडमध्ये जल्लोष

मनमाड : भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यचे वृ्त समजताच शहरात राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सदस्य व हितचिंतकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, गटनेते नगरसेवक कैलास पाटील, नगरसेवक अमजद पठाण, नगरसेविका रुपाली पगारे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र जाधव, प्रदेश सचिव रईस फारुकी, तालुकाध्यक्ष हबीब शेख, महिला शहराध्यक्षा अपर्णा देशमुख, लविना मोतीयानी आदी उपस्थित होते.

निफाडमध्ये आनंदोत्सव

निफाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व भुजबळ प्रेमींनी शहरातील शांतीनगर चौफुली येथे फटाके फोडत व पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, शहराध्यक्ष तनवीर राजे, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, अल्पसंख्यांक सेलचे तौसिफ मन्सुरी, आरिफ मणियार, वकील शेख, प्रदीप तिपायले, प्रकाश कुऱ्हाडे, पंडित गोलाईत, प्रतीक वाढवणे, मयूर काळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी भवनावर जल्लोष

$
0
0

कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पक्षाने नाशिकमध्ये जल्लोष केला. जामीन मंजूर झाल्याचे वृत्त कळताच पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी भवन येथे गोळा झाले. त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करीत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी ढोल ताश्यांच्या तालावर नृत्य केले.

गेल्या दोन वर्षात अनेकदा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे शुक्रवारी कार्यकर्ते निर्णयाकडे लक्ष लावून होते. दुपारी निर्णय येताच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे धाव घेतली. राष्ट्रवादीचा झेंडा व भुजबळांचा फोटो असलेला पिवळा झेंडा फडकावित कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी 'कोण आला रे, कोण आला, राष्ट्रवादीचा वाघ आला' यासारख्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसरही दणाणून सोडला. पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ज्येष्ठ नेते नाना महाले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी मिठाई वाटप केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढत गेली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, महापालिकेतील गटनेते गजानन शेलार, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, अशोक सावंत, राजेंद्र महाले, अंबादास खैरे, धनजंय गोवर्धने, नगरसेविका शोभा साबळे, सुषमा पगारे, समीना मेमन, महिला पदाधिकारी अनिता भामरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजश्री चुंबळे,यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला.

भुजबळ समर्थक मुंबईत

राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे यासह अनेक भुजबळ समर्थक मुंबईला गेल्याने त्यांची अनुपस्थिती या जल्लोषावेळी दिसून आली. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत 'राष्ट्रवादी'ने शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदविली होती. त्याची सुनावणी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते येथे अडकले.

मी भुजबळांच्या टोप्या

भुजबळांचा जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी 'मी भुजबळ' नाव असलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. तसेच भुजबळांचे फोटो असलेले मोठे डिजिटल पोस्टरही कार्यकर्त्यांनी समोर लावले होते.

भुजबळ यांचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने आम्हाला आनंद झाला. आता जिल्ह्याला उसनवार पालक नको, जिल्ह्याचा पालक आला आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

भुजबळ यांच्या जामीन मिळायला उशीर झाला असला तरी त्यांना न्याय मिळाला आहे. जिल्हा पोरका झाला होता. आता जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा चालना मिळेल. त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाल्याचा आनंद आहे.

- नाना महाले, ज्येष्ठ नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थीच तारणहार...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

विद्यार्थ्यांना एकाच छताखाली अभ्यासाची सोय व्हावी, या हेतूने महापालिकेने नीलकंठेश्वरनगर येथे अभ्यासिका उभारलेली आहे. सन २००६ मध्ये उभारण्यात आलेल्या या अभ्यासिकेवरून स्थानिक पातळीवर वाद झाल्याने काही वर्षे ती बंद होती. अखेर परिसरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत ही अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या या अभ्यासिकेत रोज किमान पन्नासहून अधिक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. विशेष म्हणजे कुणाचाही आधार न घेता विद्यार्थी स्वखर्चातून ही अभ्यासिका चालवित असल्याचे देखभाल करणारा विद्यार्थी कृष्णा राजगिरे यांने सांगितले.

या अभ्यासिकेचे दरवाजे व खिडक्या नादुरुस्त झाल्या आहेत. याबाबत महापालिकेकडे मागणी करूनदेखील दुरुस्ती केली जात नाही, तसेच येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक अशोक गवळी यांच्या पुढाकाराने नीलकंठेश्वरनगरात नीलकंठेश्वर अभ्यासिका उभारण्यात आली. शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उभ्यासिकेचे उद्घाटन २००६ मध्ये करण्यात आले होते. सातपूर कॉलनी व अशोकनगर परिसरातील विद्यार्थ्यांची त्यामुळे चांगली सोय झाली होती.

दरम्यान, कालांतराने ही अभ्यासिका अचानक बंद करण्यात आली. ज्यांनी अभ्यासिकेसाठी पुढाकार घेतला होता त्यांच्यातच वाद झाल्यामुळे ती बंद झाली. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने अखेर मनसेचे गटनेते सलिम शेख यांच्याकडे विद्यार्थ्यांनी अभ्यासिका ताब्यात देण्याची मागणी केली. महापालिकेकडे अर्ज सादर करून विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा ताबा आपल्याकडे घेतला. आता ही अभ्यासिका विद्यार्थी स्वखर्चाने चालवित आहेत. सध्या रोज किमान पन्नासहून अधिक विद्यार्थी येथे येतात. अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच वीजबिल भरले जाते, तर अभ्यासिकेची स्वच्छता विद्यार्थीच श्रमदानातून करतात. या अभ्यासिकेचे दरवाजे व खिडक्यांची तोडफोड झाली असून, त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. येथे पिण्याचे पाणीही नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागते. स्थानिक नगरसेवकांनी अभ्यासिकेची पाहणी करून योग्य त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

नीलकंठेश्वरनगरमध्ये बंद असलेली नीलकंठेश्वर अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज विद्यार्थी स्वखर्चातून अभ्यासिकेची देखभाल करतात. महापालिकेने किमान दुरुस्तीची कामे करावीत, अशी आमची मागणी आहे.

-कृष्णा राजगिरे, देखभाल करणारा विद्यार्थी

अभ्यासिकेत लावण्यात आलेले महावितरण कंपनीचे मीटर हिवाळ्यातही अधिक वीजबिल देत असल्याने ते बदलण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या अभ्यासिकेत प्रमुख वृत्तपत्रे विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत.

-जितेंद्र बच्छाव, विद्यार्थी

नीलकंठेश्वर अभ्यासिकेत सर्वच क्षेत्रांत शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या अभ्यासिकेतील शांत वातावरणात योग्य रीतीने होत असल्याने विद्यार्थ्यांची कायम गर्दी असते. येथील काही किरकोळ दुरुस्तीची कामे महापालिकेने करावीत.

-अमोल पाटील, विद्यार्थी

---

नीलकंठेश्वर अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरबळीची शक्यता घोटी

$
0
0

नरबळीसाठी चिमुकलीचे अपहरण?

त्र्यंबक तालुक्यातील प्रकार; बेशुद्ध अवस्थेत सापडली मुलगी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर/घोटी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे येथील पाचकुंडल्याची वाडी येथे चार महिन्यांच्या चिमुरडीचे नरबळीसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. घरापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात ही चिमुरडी बेशुद्धावस्थेत सापडली. घटनास्थळी पडलेले हळद-कुंकू तसेच पूजेचे इतर साहित्य पाहून तिच्या पालकांना धक्काच बसला.

गुरुवारी रात्री ही चिमुरडी आईच्या कुशीत झोपलेली असताना अज्ञात इसमांनी तिला उचलून नेले. त्यानंतर तिला घरापासून तीन किमी अंतरावर जंगलात सोडून दिले. जेथे ही चिमुकली सापडली तेथे हळद, कुंकू, कोबंडीचे पिलू,नारळ असे साहित्य सापडल्याने नरबळीसाठी तिचे अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. दापुरे पाचकुंडल्याची वाडी येथील मंगला चौधरी ही महिला गुरुवारी रात्री आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह घराच्या पडवीत झोपलेली असताना रात्री दोनच्या सुमारास अज्ञातांनी मुलीला चोरून नेले. मंगला यांना पहाटे जाग आली असता, मुलगी नसल्याने त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी परिसरात मुलीचा शोध सुरू केला असता, सकाळी सातच्या सुमारास जवळच्या जंगलात मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिच्यावर त्र्यंबक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्रभर रडून चिमुरडी बेशुद्ध झाली असावी. उपचारानंतर ती शुद्धीवर आली. दुपारी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, दापुरे हे घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. तेथील पोलिसांनी खबर मिळताच पंचनामा केला. पालकांनी मुलगी मिळाल्याने आपली तक्रार नसल्याचे सांगितले आहे. या चिमुरडीला बळी देण्याच्या उद्देशाने चोरले असावे, असा संशय श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींच्या कारला लागली आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव-नाशिक महामार्गावरील सौंदाणे येथे शुक्रवारी बर्निंग कारचा थरार घडला. एका लग्नसमारंभासाठी आलेल्या पाहुणे मंडळीने पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाने वेळीच आग विझविल्याने जवळची अन्य वाहने वाचली. तसेच गाडीतही कोणी नसल्याने जीवित हानी टळली. पार्किंगच्या ठिकाणी विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी जवळच्या चाऱ्यावर उडाली आणि त्यामुळे कारनेही पेट घेतल्याचे अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्यातील सौंदाणे येथील शुभमंगल लॉन्स येथे धनंजय देवरे यांच्या विवाहसाठी वडनेर खाकुर्डी येथील रवींद्र सोनू अहिरे हे आपल्या कार (एमएच ४१ व्ही २४०१) ने विवाहासाठी आले होते. दरम्यान लॉन्सनजीक असलेल्या मोकळ्या जागी त्यांनी गाडी पार्क केली. दुपारी तीनच्या सुमारास या कारने अचानक पेट घेतला. काही क्षणात आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कार लपेटली गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे सुधाकर अहिरे, रवींद्र महाले, सुनील बागुल, संदीप सुळे घटनास्थळी बंबासह दाखल झाले. याचवेळी आजूबाजूला असलेली वाहने तत्काळ सुरक्षित अंतरावर हलविण्यात आली. तासभरानंतर हा बर्निंग कारचा थरार थांबला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावटी कट्टे तस्करीचा लवटेच मुख्य सूत्रधार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावठी कट्टे विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आदेश चंद्रकांत लवटे हाच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, गुन्ह्याची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी आदेशच्या भावासह त्याच्या इतर साथीदारांची चौकशी पोलिस हाती घेणार आहेत. आदेशविरोधात तडीपारीसह प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हालचालीदेखील सुरू असून, नागरिकांना माहिती द्यायची असल्यास त्यांनी क्राईम ब्रँचसह पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गत काही दिवसांत शहर पोलिसांनी गावटी कट्टे बाळगणाऱ्यांना एकापाठोपाठ अटक केली. परराज्यांतून येणारे कट्टे अगदी स्वस्तात खरेदी करून शहरात विक्री केले जातात. दोन गटांतील वैर, बडेजाव मिरविण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती अवैध शस्त्रे बाळगतात. अवैध शस्त्रांचा वापर झाल्याची उदाहरणे कमी असली, तरी त्यांची खरेदी-विक्री अगदी सहज होते, हे पोलिसांच्या तपासावरून स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा विक्री करणाऱ्या एजंटकडे वळवला. त्यात नाशिकरोड भागातील आदेश चंद्रकांत लवटे, त्याचा मित्र संग्राम बिंदूमाधव फडके आणि आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत माहिती देताना क्राईम ब्रँचचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की अवैध शस्त्र विक्री करण्याच्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लवटे हाच असून, संग्राम फडके हा त्याच्यासाठी काम करतो. लवटेविरोधात यापूर्वी अनेक तक्रारी आल्या आहेत. विशेषत: महिला आणि मुलींची छेड काढणे, दहशत निर्माण करणे अशा तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लवटेविरोधात तडीपारी अथवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या भागात संशयितांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, नागरिकांनी कोणासही न घाबरता थेट क्राईम ब्रँचसह पोलिस ठाणे किंवा वरिष्ठांकडे तक्रार करावी, असे आवाहन नखाते यांनी केले आहे. अवैध शस्त्र विक्री प्रकरणात आदेशचा भाऊ संदेश याच्यासह इतर काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले.

--

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींना अटक होते. त्यांच्याकडील शस्त्रे जप्त होतात म्हणजे पोलिस आपले काम करीत आहेत. संशयितांना तपासासाठी देवळालीगावात नेण्यात आले होते. संशयितांबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांना थेट संपर्क साधावा.

-श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरती पाणपोई भागवतेय तृष्णा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या काही  दिवसांत नाशिक शहराचे वाढते तापमान लक्षात घेऊन  नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने नाशिकरोड येथील प्रकाश लखमियानी यांनी  देवळाली कॅम्पसह नाशिकरोड भागात चारचाकी वाहनांद्वारे मोफत शुद्ध पाणी पुरविणाऱ्या पाणपोईची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे अनेक तहानलेले नागरिक, व्यावसायिकांची तृष्णा भागविली जात आहे.

नाशिकरोड येथे रेल्वे स्टेशन व मुक्तिधामशेजारील सोमाणी उद्यान,  देवळालीतील  लेव्हिट मार्केट परिसरातील वडनेररोडवरील गुरुनानी कॉम्प्लेक्स परिसरात  दिवसभर नागरिक, व्यावसायिकांना मोफत शुद्ध पाणी (आरओ वॉटर) पुरविले जात आहे. उन्हाने त्रस्त नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून नाशिकरोड परिसरात दोन छोटा हत्ती, तर देवळालीत एका अॅपे वाहनामध्ये पाण्याच्या टाक्या बसवून एकूण तीन वाहनांद्वारे नाशिकरोड व देवळाली भागात दिवसभरात हजारो लिटर शुद्ध पाण्याचे मोफत वाटप केले जात आहे.

एका वेळेस ७५० लिटर शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात येते.  परिसरातील व्यावसायिकांसह  सुमारे ३०० नागरिक या पाण्याचा लाभ घेऊ शकतात. पाणी संपल्यानंतर पुन्हा आरओ मशिनद्वारे पाणी भरून आणण्याची सोय असल्याने हवे तेव्हा पाणी भरून पुन्हा  ही वाहने परिसरात उभी केली जातात. या वाहनांवर नळांच्या चार तोट्या व ग्लास बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची तृष्णा भागविली जात आहे. शंकर एज्युकेशन सोसायटीचे संचालक लखमियानी यांनी सेवाभाव जोपासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

हा उपक्रम राबविण्याची प्रेरणा गुरुद्वारातून मिळाली. कुठल्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात  केवळ  पिण्याचे पाणी प्रत्येकाला मिळावे एवढाच उद्देश आहे.

-प्रकाश लखमियानी, व्यावसायिक

 

देवळालीत रविवारी भरणाऱ्या आठवडेबाजारासाठी  येणाऱ्या शेतकरी बांधवांसह नागरिकांची  होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे वाहन या दिवशी हौसनरोडवर उभे केले जाणार आहे.

-नवीन गुरुनानी, व्यावसायिक 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेसह मुलाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

पतीला अटक; सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील कासारी येथे एकवीस वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन तर तिच्या एक वर्षाच्या मुलाचा विषारी औषध सेवनाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलीचा व नातवाचा आपला जावई, सासरच्या मंडळींनी खून केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी नांदगाव पोलिस ठाण्यात दिली. विवाहितेचा पती, सासू व नणदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यातील कासारी येथे गुरुवारी रात्री सुवर्णा ज्ञानेश्वर काळे ही विवाहिता व तिचा एक वर्षाचा मुलगा स्वरूप हे दोघे घरात मृतावस्थेत आढळले. सुवर्णाचा मृत्यू गळफासाने तर स्वरूपचा मृत्यू विष प्राशनाने झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सुवर्णाचे वडील चिंतामण देवरे (रा. मनमाड) यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आपल्या मुलीला चारित्र्याच्या संशयावरून तिचा पती ज्ञानेश्वर काळे व सासरच्या लोकांनी गळफास देऊन तर नातू स्वरूप याला विष पाजून ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी विवाहितेचा पती, ज्ञानेश्वर काळे, सासू सखुबाई काळे, नणंद हौसबाई काळे उर्फ भारता बाई शिंगाडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा बाजार समितीसाठी दोन जागा बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा,

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील माघारीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी वीरगाव गणातून दोन पैकी प्रत्येकी एक अर्ज माघारी घेतल्याने सुनीता देवरे या महिला गणातून बिनविरोध विजयी झाल्या. तर ठेगोंडा गणातील सहा पैकी पाच अर्ज बाद झाल्याने दऱ्हाणे येथील शेतकरी सरदारसिंग जाधव यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा जागासाठी येत्या २७ मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी सुमारे १३१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. प्रारंभी अर्ज छाननी प्रक्रियेत भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ठेगोंडा गणातील सहा पैकी पाच जणांचे अर्ज बाद झाल्याने सरदारसिंग जाधव यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या वीरगांव गणातून विमल देवरे यांनी अर्ज मागे घेतल्याने वीरगांवचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांच्या पत्नी सुनीता देवरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तळवाडे दिगर गणात देखील कपालेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे व बाजीराव वामन अहिरे या दोघांचे अर्ज असून, दोघेही नातेवाईक असल्यामुळे ही जागाही बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पठावे दिगर गणात देखील बाजार समितीचे माजी संचालक तुकाराम देशमुख व माजी पंचायत समिती सदस्य मधुकर ठाकरे हे मित्र आमने सामने असल्याने त्याच्यातही एकमत होवून एकच उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात चालकाचा मृत्यू

$
0
0

दाभाडीजवळील घटना; चार जण जखमी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव-दाभाडी रस्त्यावरील मधुबन हॉटेलजवळ कारला झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगावहून दाभाडीकडे जाणाऱ्या कार (एमएच १५ सीएम ८३८६)ला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने कट मारला. यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार आदळली. कारचालक रोहिदास सुभाष देशमुख (वय, ३० रा. दाभाडी) हा तरुण जागीच ठार झाला. तर कारमधील अन्य चौघांपैकी स्वप्नील महाजन व सुनील जाधव गंभीर जखमी झाले. खुशाल महाजन व काळू मानकर किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कारचालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. अपघातप्रकरणी येथील छावणी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदी असलेला मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रशासीत प्रदेशात निर्मित आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला तब्बल तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. तस्करांनी मद्य वाहतुकीसाठी वाहनात स्वतंत्र कप्पा केल्याचे समोर आले आहे. गिरणारे शिवारात ही कारवाई झाली. यात दोघांना अटक करण्यात आली.

अन्वर फत्तेसिंग चौहाण (रा. दादूनगर ता. तरसाली, जि. बडोदरा) आणि इकबाल जलील शेख (रा.नानपुरा, सुरत) अशी मद्यवाहतूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. केंद्रशासीत दिव दमण, दादरा-हवेली या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची तस्करी होत असल्याची माहिती उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात तपासणी केली जाते आहे. ही कारवाई सुरू असताना मद्याची वाहतूक करणारे वाहन पथकाच्या हाती लागले. भरारी पथक क्रमांक एकचे कर्मचारी वाघेरा गिरणारे रोडवर गस्त घालीत असतांना मालवाहतूक करणारे वाहन (एमएच ०४ एफडी ३२३४) कर्मचाऱ्यांच्या नजरेत आले. संशयित वाहन थांबवून पथकाने तपासणी केली. यात लाखो रुपये किमतीचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. वाहन तपासणीनंतर एका कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्याने चोरट्या वाहतुकीचा प्रकार समोर आला. पथकाने चालक अन्वर चौहाण आणि त्याचा साथीदार इकबाल शेख यास ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील वाहनासह मद्यसाठा असा सुमारे सात लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रवीण मंडलिक, दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, जवान विष्णू सानप, विलास कुवर, सुनील पाटील आणि महिला जवान पुनम भालेराव आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी भरली काँग्रेस भवनची नामुष्की टळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने थकबाकी जमा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालतमत्तांचा लिलाव सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा लिलाव केल्यानंतर आता पुन्हा शंभर बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात या मालमत्ता लिलावाची जाहीर नोटीस काढली जाणार आहे. दरम्यान काँग्रेस भवनावर असलेली २६ लाख थकबाकीपैकी स्थानिक नेत्यांनी १५ लाखाचा एक हप्ता जमा केला आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेस भवनवरील लिलावाची नामुष्की टळली आहे.

महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या बड्या थकबाकीदारांना रडारवर घेत जवळपास साडेचारशे मालत्ता जप्त केल्या. या सर्वांना अंतिम नोटिसा देवून थकबाकी जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. बहुतांश थकबाकीदारांनी थकबाकी जमा केली आहे. मात्र अजूनही बहुसंख्य बड्या थकबाकीदारांनी थकबाकी जमा करणाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. या थकबाकीदारांमध्ये शहरातील काँग्रेस भवनाचाही समावेश होता. या भवनावर जवळपास २६ लाखांची थकबाकी होती. परंतु स्थानिक नेत्यांमध्ये ही रक्कम कोणी भरायची यावरून वाद सुरू होता. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत ही थकबाकी भरली न गेल्याने महापालिकेने ही मालमत्ता जप्त केली होती. महापालिकेने थेट राष्ट्रीय पक्षाचे कार्यालयच जप्त केल्याने खळबळ उडाली. तर स्थानिक नेत्यांसाठी ही शरमेची बाब ठरली होती. प्रदेश पातळीवरून वर्गणी करून अखेर ही रक्कम जमा केल्याची चर्चा आहे. शहर काँग्रेसकडून २६ लाख थकबाकीपैकी पहिल्या टप्प्यात एकूण १५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे कर संकलन विभागाने तुर्तास काँग्रेस भवनला लिलावाच्या यादीतून वगळले असल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

शंभर मालमत्तांचा लिलाव

पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा जाहीर लिलाव केल्यानंतर कर संकलन विभागाने दुसऱ्या टप्प्यात आणखी शंभर मालमत्तांच्या लिलावाची प्रकिया सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर नोटीसही काढली जाणार आहे. थकबाकी भरण्यासाठी शेवटची संधी दिली जाणार असून, लिलावाच्या तारखे आधी रक्कम न भरल्यास या मालमत्तांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. या थकबाकीदारांमध्ये शहरातील बड्या हस्तींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू चोरट्यांकडून पोलिसांना धमकी

$
0
0

वाळू चोरट्यांकडून पोलिसांना धमकी

मालेगावी रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या द्याने रमजानपुरा पोलिस पथकाला शिवीगाळ करून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येथील रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर व परिसरात गौण खनिजाची अवैध वाहतूक, उत्खनन अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिस व महसूल प्रशासनाकडून याला आळा घालण्यासाठी कारवाई होत असली तरी वाळू चोर मुजोर झाल्याचेच या प्रकारातून समोर आले आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शहरातील अक्सा कॉलनी, रमजानपुरा चायना ग्राऊंड येथे हा प्रकार घडला. अक्सा कॉलनी परिसरात शासनाचा कोणत्याही प्रकारचा गौण खनिज वाहतूक परवाना नसताना बेकायदा वाळू वाहतुकीच्या खोट्या व बनावट पावत्या बनवून ट्रक (एमएच ०४ एचडी ७०८६)मधून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

द्याने रमजानपुरा पोलीस पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता आरोपी अशोक पाटील, पावन कचरे, रोहीत बोरसे, कुंदन खानविलकर, सुदर्शन बडगुजर, विलास शिंदे (सर्व रा. धुळे) यांनी शासकीय कामात अडथळा आणला. शिवीगाळ व दादागिरी करून ट्रकमधील वाळू खाली करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिस शिपाई दीपक कोकणी यांच्या फियादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन बनावट पावत्या, अंदाजे ३ हजार ३०० रु किमतीची ७ ब्रास वाळू व ट्रक असा एकूण १५ लाख २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिगारेट कारवाईचा दिवसभर ‘धुरळा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ठिकाणांवर सिगारेटचा झुरका मारणाऱ्यांसह अवैध सिगारेट आणि गुटखा विक्रेत्यांवर शहर पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर कारवाई केली. सकाळी ११ ते १ या कालावधीत तब्बल १०० हून अधिक धूम्रपान करणाऱ्यांवर, तसेच सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेनंतर सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी या प्रकरणी आदेश दिले असून, यापुढे सतत कारवाई होणार असल्याने सार्वजनिक जागी सिगारेट फुंकणाऱ्यांची पंचाईत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी, तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाऱ्यांवर 'सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३' (कोटपा) अंतर्गत ही कारवाई केली जाते आहे. शुक्रवारी नाशिक शहर पोलिसांनी कारवाई हाती घेतली. सकाळी ११ ते १ या कालावधीत शहरातील सर्वच पोलिस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे पोलिसांनी रडारवर घेतले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना २०० रुपयांचा दंड आकारला जातो. दरम्यान, ही मोहीम हाती घेताना शहरातील सर्वच पान स्टॉल्स तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे वैधानिक इशारा न छापणाऱ्या विदेशी सिगारेटसह सुगंधित तंबाखू आणि गुटखा पोलिसांच्या हाती लागला. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३ (कोटपा) कायदाचे खास प्रशिक्षण शहर पोलिस आयुक्तालयाने संबंध हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक पोलिसांना दिले आहे. शाळा परिसरात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायदाचे उल्लंघन करणारे आहे. तरीदेखील नाशिक शहरातील एसटी डेपो, बसस्थानके, शाळा-महाविद्यालये, बाजार, तीर्थस्थळ परिसरात खुलेआम सिगारेट पिणे, सुट्या सिगारेटची विक्री करणे, अवैध गुटखा विक्री होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी 'कोटपा' कायद्यांतर्गत प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मोहीम हाती घेण्यात आली आहे.

--

सर्वांत मोठी कारवाई

हा कायदा २००३ मध्ये अस्तित्वात आला. मात्र, कायद्याची अंमलबजावणी करणे हीच एक डोकेदुखी ठरल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, मागील काही महिन्यांपासून गृहराज्यमंत्री रणजित पाटील, तसेच पोलिस महासंचालकांनी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्यातील पोलिसांना निर्देश दिले. त्यानुसार आता कारवाईला वेग देण्यात येत आहे. २०१६ मध्ये या कायद्यानुसार फक्त दोन वेळा कारवाई झाली होती. २०१७ मध्ये ही संख्या आठ होती. यंदा मात्र पहिल्या तीन महिन्यांतच हा आकडा ४२पर्यंत पोहोचला. आज दिवसभरातदेखील १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर कारवाई झाली.

--

या महिन्यात कारवाईचा धडका सुरूच राहणार आहे. विशेषत: शाळा कॉलेज परिसरात १०० मीटर कायद्याचे उल्लंघन होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

-अशोक नखाते, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितास अटक

$
0
0

संशयितास अटक

नाशिक : रोकडोबा तालीम परिसरातील मंगळगृह मंदिरात गुरुवारी पहाटे विक्रम बळवंत जोरे (रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) हा संशयित दानपेटी चोरी करताना आढळून आला. त्याला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. जमादार लवांड अधिक तपास करीत आहेत.

---

...तर प्रवेश होणार रद्द -२

वापरलेल्या पाण्यातून स्वच्छता -३

विद्यार्थीच तारणहार -४

कूल कुल्फी -५

भेटला माणसातला देव -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची वाढली धाकधूक

$
0
0

विधान परिषदेचे गणिते बिघडण्याची भीती

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नाशिकमधील राजकारणाला कलाटणी मिळणार असून विधान परिषदेच्या निवडणुकीचेही गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुजबळांना मिळालेल्या जामिनाने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचे 'बळ' वाढणार असल्याने शिवसेनेची धाकधूक मात्र वाढल्याचे मानले जात असून भाजपचीही चिंता वाढली आहे.

एकेकाळी नाशिकच्या राजकारणावर भक्कम पकड असलेल्या भुजबळांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १४ मार्च २०१६ रोजी कारागृहात जावे लागले. त्यामुळे दोन वर्षांपासून नाशिकच्या राजकारणावरील भुजबळांची पकड ढिली झाली. त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक राजकारणात भाजप व शिवसेना वरचढ ठरली. भुजबळ समर्थक आणि राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये मरगळ निर्माण झाली होती. त्यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न झाले. पण ते फोल ठरले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडीवेळीही त्यांना जामीन मिळेल, अशी आशा होती. मात्र, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेची निवडणूक सुरू असताना शुक्रवारी भुजबळांना जामीन मिळाल्याने नाशिकच्या राजकारणासोबत विधान परिषद निवडणुकीची गणिते बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वेळी भुजबळांनाच तुल्यबळ लढत देणाऱ्या शिवसेनेचे शिवाजी सहाणे हे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित आहेत. तर भुजबळांचे कधी काळचे समर्थक असलेले नरेंद्र दराडे हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत. दराडे हे भुजबळांच्या अनुपस्थितीत येवल्यात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील होते. कधी काळी त्यांनी भुजबळांनाही आव्हान दिले. परंतु, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी त्यांनी भुजबळांशी जुळवून घेतले होते.

दोन वर्षात परिस्थिती बदलली. जिल्ह्यात शिवसेना, भाजपची घौडदौड सुरू असताना राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळत गेला. गेल्या वेळची विधान परिषद निवडणूक भुजबळांमुळेच फिरली होती. या निवडणुकीच्या दरम्यान भुजबळांना जामीन झाल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. शिवसेना आणि भाजप विरोधातील वाढत्या असंतोषाला हात घालण्याची हातोटी भुजबळांकडे आहे. युतीचा चौखूर उधळणारा वारू रोखला जाण्याची शक्यता आहे. त्याचा पहिला फटका शिवसेनेला विधान परिषद निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या मदतीने अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले परवेझ कोकणीही भुजबळांचेच समर्थक होते. आता भुजबळांमुळे कोकणीही मैदानाबाहेर जाण्याची शक्यता आहे.

सहाणेंना भुजबळांचे 'बळ'?

२०१२ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार शिवाजी सहाणे हे सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. गेल्या वेळेस सहाणेंनी भुजबळांची दमछाक केली होती. जयंत जाधव राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी ही निवडणूक भुजबळ विरुद्ध सहाणे अशी रंगली होती. सहा वर्षात परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादीने पराभूत केलेला उमेदवारच आता राष्ट्रवादीचा उमेदवार बनला आहे. त्यामुळे भुजबळांना सहाणेंच्या विजयासाठी कितपत जोर लावलीत याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनच्या धडकेने मोरचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

खेरवाडी (ता. निफाड) येथील रेल्वे स्थानकावर कांदा व्यागन घेण्यासाठी मनमाडहून आलेल्या रेल्वे इंजिनच्या जाळीत मृतावस्थेतील मोर आढळला.

रेल्वे कर्मचारी राहुल केदार यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. येथील स्थानक प्रमुख कहारिनार यांनी वनविभागाला याबाबत कळविले.

वन विभाग अधिकारी विजय पाटील घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वनविभागाचे अधिकारी मृत मोराला घेऊन गेले. मनमाडहून खेरवाडीला येत असताना समीट स्थानकांच्या दोन किलोमीटर पुढे एक मोर उडत असताना इंजिनला धडकला. चालकाला वाटले तीव्र धडकेने मोर जखमी होऊन पडला किंवा उडाला असेल. मनमाडसाठी निघालेली इंजिन पुढे खेरवाडी स्थानकांवर थांबल्यावर रेल्वे कर्मचाऱ्याने हा प्रकार उघडकीस आणला. मृत मोराला पाहून उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. याआधीही रेल्वेरुळावर अनेकदा मृत मोर आढळले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images