Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

यंत्रमागात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

$
0
0

मालेगाव : येथील रमजानपुरा भागातील एका महिलेचा यंत्रमाग कारखान्यात ओढणी अडकून गळा कापला गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अरफानबानो शेख सरदार ( वय ६०, रा. रमजानपुरा) असे या मृत महिलेचे नाव आहे. दुपारी यंत्रमाग कारखान्यात काम करीत असताना अचानक ओढणी यंत्रात अडकल्याने ती आत ओढली गेली. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेस येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेच्या बैठकीकडे भाजपची पाठ

$
0
0

युतीत बेबनाव कायम

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती जाहीर झाल्याची चर्चा असली, तरी त्याबाबत युतीची अद्याप घोषणा न झाल्याने गुरुवारी शिवसेनेने आपल्या उमेदवारासाठी बोलवलेल्या बैठकीकडे भाजप नेत्यांसह मतदारांनाही पाठ फिरवली आहे. त्यातच भाजपच्या गोटात असलेल्या जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष परवेझ कोकणी यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने स्थानिक पातळीवर सेना-भाजपमधील बेबनाव कायम असून, शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. स्थानिक भाजप नेत्यांचा युतीला विरोध असल्याचा संदेश फिरवला जात असून, कोकणींना भुजबळ गटाचे पाठबळ असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे युतीचे समिकरणे नाशिकमध्ये बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी असली तरी, काँग्रेसच्या उमेदवारांनीही अर्ज भरल्याने युती आणि आघाडीतल्या बेबनावाची चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेच्या वतीने नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीतर्फे शिवाजी सहाणे, अपक्ष म्हणून परवेझ कोकणी यांच्यासह सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात शिवसेनेचे संख्याबळ २०७ इतके तर भाजपचे १६७ पर्यंत पोहचले आहे. सेना भाजप मध्ये युती होणार असल्याने दराडेंनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र शिवसेनेने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपने एकत्रित शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाजप नेत्यांसह नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये स्नेहभोजन व बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीकडे भाजप नेत्यांनी प्रदेश पातळीवरून निरोप नसल्याचे सांगत पाठ फिरवली. त्यामुळे भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण वगळता अन्य नेत्यांनी अर्ज भरण्यासह बैठकीकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे ऐनवेळी भाजपच्या गोटात असलेले परवेझ कोकणी यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

राऊतांची दांडी

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत उपस्थित राहणार होते. परंतु नाशिक शिवसेनेतील एका गटाने राऊत यांच्या विरोधात थेट बंड पुकारले असून, त्यांच्या बैठकांकडेही पाठ फिरवली होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या उमेदवाराला दगा फटका होवू नये याची काळजी घेतली जात आहे. मातोश्रीवरून शिवसेनेच्या नगरसेवकांशी फोनवर संपर्क करण्यात येवून गटबाजी होवू नये असा संदेश दिला जात आहे. त्यामुळे राऊतांना नाशिकपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.

आघाडीतही असमन्वय

शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव असतांनाच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही असमन्वय दिसून आला. प्रदेश पातळीवरून आघाडीचा निरोप आल्यानंतरही काँग्रेसच्या दुही निर्माण झालेली असतांना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी एबी फॉर्म माघे घेतला असला तरी, अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला. तो अर्ज माघारी घेतला जाईल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायव्यवस्था दंतहीन बनली आहे

$
0
0

न्यायमूर्ती रवींद्र चव्हाण यांचे मत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एखादा भ्रष्टाचारी पकडला गेला तर त्याचे अपील न्यायालयात येण्यासाठी दहा-पाच वर्षे जातात, शिक्षेची सुनावणी करताना दहा-पाच वर्षे म्हणजे २५-३० वर्षे तो उजळ माथ्याने वावरू शकतो. त्यानंतर त्याला शिक्षा होते तोपर्यंत त्याचे वय ८० पेक्षाही अधिक झालेले असते. अशी ही न्यायव्यवस्था दंतहीन बनली आहे, असे मत न्यायमूर्ती रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

वसंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुरूवारी 'कायद्याचे राज्य : बहिष्कृत न्यायालयात कायद्याची उपेक्षा' या विषयावर गुंफण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती चव्हाण बोलत होते. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. चव्हाण म्हणाले, की सर्वेाच्च न्यायलयाला प्रचंड अधिकार आहे; परंतु लोकप्रतिनिधींविरुद्ध कोणताही खटला चालत नाही हेदेखील तितकेच खरे आहे. सरकारमधल्या गैरव्यवस्थेवर न्यायालय बोट ठेवू शकते; परंतु तसे होताना दिसत नाही. कोणतेही न्यायालय राजकीय खटल्यांना हातसुद्धा लावत नाही. त्यामुळे गुन्हेगार राजरोसपणे फिरत असतात. म्हणतात की, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. न्यायव्यवस्थेचे वासे फिरले आहेत हे सांगण्यासाठीच त्या चार न्यायमूर्तींनी मीटिंग घेतली. आमच्या घरात काही ठीक नाही हे सांगण्यासाठीच ती मीटिंग होती, असेदेखील न्यायमूर्ती चव्हाण म्हणाले. प्रारंभी श्रीकांत येवलेकर यांनी अशोक देशमुख यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. अॅड. अजय निकम यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

आजचे व्याख्यान

वक्त्या : डॉ. अनुराधा श्रीखंडे

विषय : सिकल सेल आजारासाठी दिलेली झुंज

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

लोगो : वसंत व्याख्यानमाला पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिलसाठी दहा सिरींज पंप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील कमी वजनाच्या नवजात बालकांवर उपचारासाठी लागणारे दहा सिरींज पंपांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दीड मिलीलीटर इतक्या प्रमाणाचे औषध नवजात बालकास देण्यासाठी या सिरींज पंपाच्या वापरामुळे सुमारे दीड तास वेळ लागणार आहे. यामुळे बालकाच्या प्रकृतीवर पडणारा ताण कमी होऊ शकतो.

रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्या एकसष्ठी निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाालेल्या कार्यक्रमात पंपाचे वाटप झाले. या सोबतच नवजात बालकांसाठी बारामती अॅग्रो महिला बचतगटाने तयार केलेल्या कपड्यांचेही वाटप झाले. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंत्रणा धोक्यात आली असून आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्त असल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. यापूर्वीही नाशिक सिव्हिल हॉस्पिटलसाठी सामाजिक बांधिलकीतून नऊ इनक्यूबेटर्स दिले आहेत. आता दहा सिरींज पंप दिले आहेत. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, हॉस्पिटलचे बाह्य विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार, नवजात बालक अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. पंकज गाजरे, अर्जुन टिळे, पुरुषोत्तम कडलग, हिरामण खोसकर, यतीन कदम, सोमनाथ खताळे, बाळासाहेब वाघ, सचिन पिंगळे, आकाश पगार, कैलास मोरे, कमलेश भंडारे, जयराम शिंदे, गौरव ढोकणे, धीरज मुठाळ, दीपक लहामगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शुक्ल यजुर्वेद’तर्फे आज पुरस्कार वितरण

$
0
0

'शुक्ल यजुर्वेद'तर्फे आज पुरस्कार वितरण

पंचवटी : शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्थेतर्फे आज, शुक्रवारी (दि. ४) सकाळी १० वाजता आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सकाळी ११ वाजून ३१ मिनिटांनी सामुदायिकक व्रतबंधदेखील करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम यजुर्वेद मंदिर, रामसेतूसमोर, पंचवटी येथे होणार आहेत.

--

रेल्वे स्थानकावर स्वच्छता (फोटो)

देवळाली कॅम्प : एनसीसीच्या ७ महाराष्ट्र बटालियनतर्फे देवळाली हायस्कूल येथील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम राबविली. ट्रूप कमांडर योगेश्वर मोजाड यांनी २० कॅडेट्ससोबत रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्र परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी यावेळी परिसरातील विटा, वाळू, फरशांचे तुकडे आदी साहित्य उचलून स्वच्छता केली.

--

कॅम्पमध्ये बंबच आगीच्या भक्ष्यस्थानी!

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील एअर फोर्सच्या जंगलात वाढत्या उन्हामुळे गुरुवारी गवतास लागलेल्या आगीत चक्क फायर ब्रिगेडचा बंबच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या गवताने पेट घेतला. एअर फोर्सच्या फायर ब्रिगेडचा एक बंब आग विझविण्यासाठी पुढे गेला असता प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या धुरात काही लक्षात यायच्या आत थेट या बंबालाच आग लागून तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे उठणारे धुराचे लोट पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अखेर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, सप्लाय डेपो, स्कूल ऑफ आर्टिलरी, नाशिक महापालिका आदींच्या आठ बंबांद्वारे सहा तासांत ही आग विझविण्यात आली.

पदवी अभ्यासक्रमांची गरज -२

थेट मुख्यमंत्र्यांना साकडे -३

गर्दीवर उताऱ्याची गरज -४

प्रेरणादायी मांगीतुंगी -५

स्विटी आणि आम्ही -६

थोडक्यात...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाच्या नादात ‘तिची’ धूम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियात झालेल्या ओळखीमुळे 'तिचे' एकतर्फी प्रेम झाले. युवकाच्या शोधात 'तिने' मुंबई आणि पुढे दिल्ली गाठली. रेल्वे प्रवासात एका लष्करी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीने काहीतरी गडबड असल्याचे ओळखले. 'तिला' मदतीचा हात दिला. एवढेच नव्हे, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे 'तिचा' १४ दिवस सांभाळ केला. आडगाव पोलिसांचा तपास सुरूच असताना या मुलीचा एक क्लू मिळाला अन् तिला परत नाशिकला आणण्यात पोलिसांना यश मिळाले. दिल्लीसारख्या शहरात त्या लष्करी अधिकाऱ्याच्या कुटुंबाने मदत केली नसती तर... हा प्रश्न 'तिच्या' पालकांच्याच नाही, तर पोलिसांच्याही मनाचा ठोका चुकवितो...

आडगाव परिसरातील ही युवती सज्ञान असून, एप्रिल महिन्यात १४ तारखेला ती घर सोडून निघून गेली होती. सोशल मीडियाद्वारे एका तरुणाशी ओळख झाल्यानंतर ती युवती त्याच्या एकतर्फी प्रेमात पडली. बडोदा येथील मुलाला भेटून विवाह करण्यासाठी आतूर झालेली युवती घरातून बाहेर पडल्यानंतर थेट नाशिकरोड रेल्वे स्टेशनला गेली. तेथून मुंबई आणि पुढे दिल्लीला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ती पोहोचली. तिचा प्रवास सुरू झाला, त्यावेळी दिल्ली येथीलच एका लष्करी अधिकाऱ्यासह त्याची पत्नीही त्या युवतीच्या बोगीमध्येच होती. मुलीच्या हालचाली लक्षात घेता काहीतरी गडबड असल्याचे त्या दोघांनी ओळखले. लष्करी दाम्पत्याने तिचे समुपदेशन केले. मुलीचे काही बरेवाईट होऊ नये, यासाठी त्यांनी तिला सोबत घेतले. तब्बल १४ दिवस ही युवती लष्करी अधिकाऱ्याच्या घरीच सदस्य म्हणून राहिली. या काळात युवतीने एक कामही शोधले. दरम्यान, या प्रकरणी युवतीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांनी तपास सुरू केला होता. बडोदा येथील संशयित मुलालाही बोलावून घेतले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. दरम्यान, युवतीचा संपर्क झाल्यास लागलीच माहिती कळविण्याबाबत आडगाव पोलिसांनी युवकाला तंबी दिली. दोन-तीन दिवसांपूर्वी सदर युवकाने ती युवती बडोद्याला येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार आडगाव पोलिसांनी बडोद्यापासून २०० किलोमीटर दूर असलेल्या म्हैसाना रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी लागलीच कारवाई करीत बडोद्याकडे जाणाऱ्या युवतीला ताब्यात घेतले. आडगाव पोलिसांनी म्हैसाना येथून या युवतीला आणून पालकांच्या स्वाधीन केले. या मुलीची पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी बुधवारी कार्यालयात भेट घेतली. सोशल मीडिया दूर सारून आपल्या भविष्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी युवतीला केले.

--

दिल्लीसारख्या महानगरात कोणतीही ओळख नसताना लष्करी अधिकारी कुटुंबाने या मुलीला मदतीचा हात दिला. ते कुटुंब देवदुताप्रमाणे ठरले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हा सर्व घोळ झाला असून, मुलांनी यापासून योग्य अंतर राखणे कधीही चांगले!

-सुनील पुजारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

-----------------

चिमुकली विसावली पालकांच्या कुशीत!

--

सोशल मीडियामुळे सापडली हरवलेली बालिका

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिरे विद्यालय परिसरातील अकरा वर्षांची चिमुकली खेळताना घरापासून दूर गेल्याने चुकली. ती रडताना आढळल्यावर नागरिकांनी तिला अंबड पोलिस ठाण्यात आणले. यादरम्यान काही जणांनी तिचा फोटो परिसरात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, तसेच पोलिसांनीही तपासाला गती दिल्याने काही तासांतच ही चिमुकली तिच्या आई-वडिलांच्या कुशीत विसावली.

रायगड चौक येथील हिरे विद्यालय परिसरातील चिमुकली खेळत खेळत घरापासून दूर गेली. ती रडताना आढळल्यावर काही नागरिकांनी तिला माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला काहीही सांगता न आल्याने अखेरीस तिला अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी तिची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही जणांनी या चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पोलिसांनीही ही बालिका ज्या ठिकाणाहून आणण्यात आली त्या ठिकाणी जाऊन चौकशी सुरू केली. ती सापडली होती त्या भागातही सोशल मीडियावर ही बातमी पसरल्याने काही तासांतच या बालिकेच्या आई-वडिलांचा छडा लागल्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. या चिमुकलीला तिचे आई-वडील मिळाल्याने पोलिसांनीही समाधानाचा सुस्कारा सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रीकर निरीक्षक बातमीचे फोटो

पत्नीच्या मृत्युच्या कारणांचा पतीकडून ‘शोध’

$
0
0

पत्नीच्या मृत्यूच्या कारणांचा पतीकडून 'शोध'

तब्बल आठ वर्षांपासून पाठपुरावा; अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर आजाराची लागेना तड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजारी का पडलो, या कारणांचा शोध घेऊन तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी रुग्णासह त्याचे कुटुंबीय प्रयत्न करतात. त्यामुळे आजार जातोच, तसेच इतरही त्याबाबत सजग होतात. पाथर्डी फाटा येथे राहणारे रमेश कार्लेकर गत आठ वर्षांपासून अशाच अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर या आजाराच्या कारणांचा शोध घेत आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी दगावली. डॉक्टर, विविध सरकारी विभाग एवढेच काय, तर अगदी कोर्टातही कार्लेकर यांनी हातपाय मारून पाहिले. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध माहिती सरकारी कागदांवर उतरविण्यास कुचराई केली जात आहे.

दोन मुले, पती-पत्नी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चांगल्या ठिकाणी कार्यरत अशी कार्लेकर कुटुंबाची १५ वर्षांपूर्वीची परिस्थिती. कार्लेकरांची पत्नी उषा या ब्लू क्रॉस या अंबड परिसरातील एका फार्मास्युटिकल कंपनीत कामास होत्या. जवळपास २२ वर्षे इमानइतबारे काम केल्यानंतर २००७ मध्ये त्यांना वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासले. हायपरटेन्शन, अॅनेमिया, सर्व्हिकल स्पाँडिलिसीस अशा एक नव्हे, तर तब्बल १६ आजारांनी उषा यांना घेरले. कार्लेकर यांनी तीन ते चार खासगी हॉस्पिटलमध्ये, तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले. कंपनीने सुरुवातीस मदतही केली. मात्र, उषा यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. या आजारांच्या समूहास अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर म्हणतात. सिव्हिल हॉस्पिटलच्या एका रिपोर्टमध्ये तसा उल्लेखही आहे. उपचार सुरू असताना २०१० मध्ये उषा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कार्लेकरांनी हा आजार कशामुळे होऊ शकतो, याचा शोध सुरू केला. यात धक्कादायक माहिती समोर आली. कंपनीत कार्यरत असताना उषा ज्या विभागात कार्यरत असायच्या तिथे त्या सतत विविध केमिकल्सच्या संपर्कात यायच्या. अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर होण्यासाठी हीच स्थिती महत्त्वपूर्ण असते हे कार्लेकरांनी शोधून काढले. याबाबत त्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र, व्यवस्थापनाने हात वर केले. विविध ठिकाणांहूनही अपेक्षित मदत मिळू शकली नाही. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणी अंबड पोलिसांनी चौकशी केली. मात्र, हा दिवाणी स्वरूपाचा दावा असल्याचे कारण सांगत कार्लेकरांना कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

...तर इतरांच्या आरोग्याचे काय?

उषा कार्लेकर यांच्यावर उपचार करणाऱ्या विविध डॉक्टरांकडे कार्लेकर यांनी मदत मागितली. सिव्हिल हॉस्पिटल, सहाय्यक कामगार आयुक्त, मेडिकल कौन्सिल, कामगार न्यायालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, गुजरात येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी अॅण्ड हेल्थ विभागासह मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. अनेकदा तर उत्तरच देण्याचे टाळण्यात आले, तर काही ठिकाणांहून प्रतिसाद मिळाला, पण तोही तोकडाच! वास्तविक कार्लेकरांनी केलेला आरोप गंभीर असून, याची दखल घेऊन कंपनीसह संबंधित विभागांनी यातील तथ्य समोर आणणे गरजेचे होते. पण, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. उषा यांचा व्यावसायिक मृत्यू असेल, तर इतर कामगारांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

आर्थिक मदत केली नाही म्हणून आम्ही दोघे उपोषणास बसला होतो. त्यावेळी व्यवस्थापनाने मदतीचे आश्वासन देत फसवणूक केली. कंपनीने उषाच्या उपचारांकडे लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर हा आजार रसायनांच्या संपर्कामुळेच होतो. पण, कंपनीसह संबंधित सरकारी विभाग ही बाब अधोरेखित करू इच्छित नाहीत.

-रमेश कार्लेकर, दिवंगत उषा यांचे पती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुहेरी हत्याकांडात १२ जणांना जन्मठेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या पाकिटमारीतील धंद्यात एकच गँग असावी आणि त्या गँगची दहशत शिर्डीत प्रस्थापित व्हावी, यासाठी दोन तरुणांचे अपहरण करून त्यांचा निर्घृन खून करणाऱ्या पाप्या शेख व त्याच्या ११ साथीदारांना विशेष कोर्टाने (मोक्का) गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित १२ जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा यांनी निर्दोष सोडले. प्रत्येक आरोपीस ११ लाख याप्रमाणे एक कोटी ३२ लाख रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठवला आहे.

भाविकांचा राबता आणि त्यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल यामुळे राज्यासह देशभरातील अनेकजण रोजगारासाठी शिर्डीकडे आकर्षित होतात. यात चोर भामट्यांचाही समावेश असतो. २०१० मध्ये पाप्या शेख हे नाव शिर्डीच नव्हे तर पंचक्रोशीत माहीत झाले होते. शिर्डीतील पाकिटमारी आणि त्यातून मिळणारा पैसा यावर पाप्याने कब्जा मिळवला होता. स्थानिक व्यावसायिक भीतीमुळेच या भानगडींपासून दूर राहत होते. त्यामुळे पाप्याचे फावले. चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या मुलांना सोबत घेऊन त्याने आपली गँग तयार केली. या गँगचे शिर्डीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने प्रवीण विलास गोंदकर आणि रचित पटणी या दोन तरुणांची २०११ मध्ये निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर दोघांचे मृतदेह शिर्डीत सर्वांना दिसतील अशा ठिकाणी आणून टाकले. विकृतपणाचा कळस गाठणाऱ्या पाप्यासह त्याच्या साथीदारांची यामुळे दहशत निर्माण झाली. अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह पथकाने गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना जेरबंद केले. मात्र, यातील पाच आरोपी कोपरगाव येथील सबजेलचे गज कापून फरार झाले होते. यादरम्यान तब्बल ४३ साक्षीदारांसह सुनील कडासने यांनाही संरक्षण पुरवावे लागले. कोर्टातही सुनावणीदरम्यान साक्षीदार आणि आरोपींमध्ये पडदा लावून साक्षी नोंदविण्यात आल्या. तब्बल २२ गुन्ह्यांची नोंद असलेल्या या टोळीविरोधात मोक्का लावण्यात आला. हायकोर्टाच्या आदेशानुसार, सुटीचे दिवस वगळता दररोज कोर्टाचे कामकाज पार पडले. कोर्टासमोर आलेले मेडिकल रिपोर्ट, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांनी दिलेले जबाब तसेच एका माफीच्या साक्षीदाराने दिलेली कबुली याआधारे कोर्टाने आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे मोक्का आणि भादंवि कलमांनुसार सर्वच आरोपींना एकत्रितपणे एक कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, यातील प्रत्येकी १० लाख रुपये मृतांच्या वारसांना देण्यात येणार आहेत.

यांना झाली शिक्षा

पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (३२), विनोद सुभाष जाधव (३१), सागर मोतीराम शिंदे (१९), सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (२६), माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ गुंजाळ (२२), गनी मेहबुब सैयद (३०), चिंग्या उर्फ समीर निजाम पठाण, रहीम मुनावर पठाण (२३), सागर शिवाजी काळे (२०), नीलेश देवीलाल चिकसे (१९) आणि निसार कादीर शेख (२४)

यांची निर्दोष सुटका

पाप्याची पत्नी बिस्मिल्ला मर्द सलिम शेख (२५), राजेंद्र किसन गुंजाळ (३३), इरफान अब्दुल गनी पठाण (२०), मुबारक उर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (३२), वाल्मिक पावलस जगताप (४२), दत्तात्रय बाबुराव कर्पे (३५), भरत पांडुरंग कुरणकर (४९), संदीप शामराव काकडे (२४), हिराबाई शामराव काकडे (४९), मुन्ना गफूर शेख (२४), राजू शिवाजी काळे (२१), प्रकाश सुरेश अवसरकर (२२)

संशयित आरोपींनी हत्येपूर्वी संबंधित तरुणांचा अतोनात छळ केला होता. हा प्रकार एका शेतात घडला. या टोळीची दहशत असताना एकही साक्षीदार फितूर झाला नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. परिस्थितीजन्य पुरावे तसेच एका आरोपीचा कबुली जबाब यामुळे १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली.

- अजय मिसर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील

टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराद्याने आरोपींनी हे कृत्य केले होते. आरोपी सराईत असून, त्यांनी दोन हत्यांच्या माध्यमातून शिर्डीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी केलेला तपास, ४३ साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद यामुळे १२ जणांना जन्मठेप मिळाली.

- सुनील कडासने, तत्कालीन तपासाधिकारी

दोन मुलांच्या मारेकऱ्यांना खरेतर फाशीची होणे अपेक्षित होते. तरीही १२ जणांना जन्मठेप मिळाली हे कमी नाही. माथेफिरूंना समाजात जागा मिळूच शकत नाही, हे या निकालाने स्पष्ट केले.

- विलास पंढरीनाथ गोंदकर, मृत प्रवीणचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाड्यांवर संक्रांत

$
0
0

अंगणवाड्यांवर संक्रांत

--

बचतीसाठी महापालिकेचा १०१ अंगणवाड्या बंदचा प्रस्ताव; विरोध होण्याची चिन्हे

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बचतीच्या नावाखाली गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एकमेव व्यवस्था असलेल्या मराठी शाळा आणि अंगणवाड्यांवर वक्रदृष्टी फिरविली आहे. महापालिकेने ३७ शाळांचे विलीनीकरण करण्यापाठोपाठ आता शहरातील १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा घाट घातला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण देत या अंगणवाड्या इतर अंगणवाड्यांमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

अंगणवाड्या बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लहानग्यांचीही आता शिक्षणासाठी परवड होणार आहे. सरकार एकीकडे मराठीचे धोरण अवलंबत असताना महापालिकेकडून मात्र बचतीच्या नावाखाली गोरगरीब विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढेंनी त्रिसूत्री अवलंबत बचतीचा सपाटा लावला आहे. नगरसेवकांच्या विकासकामांना 'ब्रेक' लावण्यापाठोपाठ त्यांनी प्रशासनाकडून खर्च केल्या जाणाऱ्या अनावश्यक बाबींनाही कात्री लावली आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने शहरात मराठी शाळा चालविल्या जातात, तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्याही चालविल्या जातात. गोरगरीब मुलांना व बालकांना त्यांच्या घराजवळ मोफत शिक्षण मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु, महापालिकेने आता या उद्देशालाच हरताळ फासण्याचे उद्योग सुरू केले आहेत. खर्चाच्या बचतीसाठी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३७ शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय गेल्याच पंधरवड्यात घेण्यात आला होता. पाठोपाठ आता गोरगरीब बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या अंगणवाड्यांवरही संक्रांत आली आहे.

शहरात सरकार आणि महापालिकेच्या मिळून जवळपास ४१३ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये जवळपास १२ हजार बालके शिक्षण घेतात. या अंगणवाड्यांमध्ये मुलांना शिक्षणाच्या बाराखडीसह पोषण आहारही दिला जातो. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाणही कमी होते. परंतु, महापालिकेने बचतीच्या नावाखाली ४१३ पैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या अंगणवाड्यांच्या सर्वेक्षणात १११ अंगणवाड्यांची पटसंख्या निर्धारित पटसंख्येपेक्षा कमी आढळून आली. त्यापैकी १० अंगणवाड्यांमधील पटसंख्या मिळतीजुळती असल्याने उर्वरित १०१ अंगणवाड्या येत्या १ जूनपासून बंद करण्याचा निर्णय आयुक्त मुंढे यांनी घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही तयार केला जात आहे. दहा मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करून ती मुले जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असून, किती अंगणवाड्यांना मुदतवाढ द्यायची यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे.

--

सर्वेक्षणातील त्रुटींमुळे निर्णय

महापालिकेच्या माध्यमातून नाशिक पूर्व विभागात ९१, नाशिक पश्चिम विभागात ५२, पंचवटी ७८, नाशिकरोड ७२, सिडको ६७ तर सातपूर विभागात ५३ अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांचे महापालिकेने फेब्रुवारीत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १११ अंगणवाड्यांमध्ये प्रत्येकी केवळ ४ ते १४ विद्यार्थीच असल्याचे आढळून आले. काही अंगणवाड्यांमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधादेखील उपलब्ध नव्हती. खासगी जागेतील अंगणवाड्यांची अवस्था तर अत्यंत वाईट होती. त्यापैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक पूर्व विभागातील २३, पंचवटी विभागातील १८, नाशिकरोड १९, सिडको २, सातपूर ७, नाशिक पश्चिम विभागातील ३२ अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमधील २०२ सेविका व मदतनीस यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

--

आचारसंहितेची अडचण

अंगणवाड्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासभेकडून मंजूर केला जातो. परंतु, सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने प्रशासनाची मात्र कोंडी झाली आहे. १०१ अंगणवाड्या बंद करून उर्वरित अंगणवाड्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेवर ठेवावा लागणार आहे. परंतु, आचारसंहिता सुरू असल्याने हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यास अडचण आहे. त्यामुळे या अंगणवाड्या याच हंगामात बंद होणार, की पुढच्या वर्षापासून बंद होणार याबाबतच्या निर्णयाबाबत संभ्रमावस्था आहे.

--

शिक्षणाचा प्रश्न होणार गंभीर

३७ शाळांपाठोपाठ १०१ अंगणवाड्यांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला महासभेत विरोध होण्याची शक्यता आहे. एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धानाचे प्रयत्न केले जात असताना आणि दुसरीकडे गोरगरिबांच्या शिक्षणाचे एकमेव केंद्र असलेल्या या अंगणवाड्याच बंद करण्याच्या निर्णयामुळे बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे खर्चापेक्षा शिक्षणाला जास्त महत्त्व देण्याचा विचार नगरसेवकांकडून मांडला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमांचा धडाका लावला असून, गुरुवारी शहरातील मध्यवर्ती व प्रमुख बाजारपेठांमध्ये असलेल्या अतिक्रमणांवर जेसीबी फिरवण्यात आला.

नाशिक पश्चिम विभागातील महात्मा गांधीरोड, सीबीएस, मुंबई नाका ते त्र्यंबक नाका, कॉलेजरोड आणि नेहरू उद्यानाबाहेरील अतिक्रमणे काढण्यात आली. शेड, ओटे, जाळ्या, टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात येऊन चार ट्रक साहित्य जप्त करून ओझर जकात नाका येथे जमा करण्यात आले. नेहरू उद्यानातील अतिक्रमित टपऱ्या थेट जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आल्या.

शहरातील बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमित बांधकामे काढून घेण्याबाबतचे आवाहन महापालिकेने केले आहे. सहाही विभागांमध्ये ना फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ, चौकांमघ्ये अतिक्रमणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या कडक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. महापालिकेडून दररोज शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्रमुख बाजारपेठा व चौकांमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम राबविली. नाशिक पश्चिम विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मुंबई नाका, त्र्यंबक नाका, शालिमार, सीबीएस, एम. जी. रोड ते मेहेर सिग्नलपर्यंतच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अनधिकृत अतिक्रमणे, शेड, ओटे, जाळ्या, टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात येऊन चार ट्रक साहित्य जप्त करून ओझर जकात नाका येथे जमा करण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या सूचनेनुसार नाशिक पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी ही कारवाई केली.

--

दिव्यांगांच्या टपऱ्याही तोडल्या

महापालिकेने गुरुवारी राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत शहरातील दिव्यांगांच्या टपऱ्यांवरही बुलडोझर फिरविण्यात आला. लायन्स क्लबच्या वतीने दिव्यांगांसाठी देण्यात आलेल्या टपऱ्याही तोडण्यात आल्यात. नेहरू उद्यानाजवळ वारंवार अतिक्रम करणाऱ्या टपऱ्या व हातगाड्या, तर थेट जेसीबीने तोडण्यात आल्या. दुसऱ्यांदा अतिक्रमण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकत्र येऊन साधावा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चर्मकार समाजातील चांभार, डोहार, मोची आदींसह अन्य पोटजातींनी एकत्र येऊन आपला विकास साधावा. सर्व चर्मकारांमध्ये रोटी-बेटी व्यवहार व्हावा. आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून स्वत:सह समाजाला पुढे न्यावे. समाजातील अनेक तरुण-तरुणी चांगल्या स्थानावर नोकरीला असून, त्यांनी समाजविकासासाठी पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार समाजाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.

गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात वीरशैव डोहार कक्कया समाजाचा मेळावा नुकताच पार पडला. त्यावेळ ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, वीरशैव डोहार समाजाचे नाशिक जिल्हाध्यक्ष पिंटू गांधले, आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्या अलका साळुंखे, परशुराम इंगोले, मालेगावच्या नगरसेविका तुळसाबाई साबणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार गोडसे म्हणाले, की समाज मेळावे घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे समाज संघटित होतो. चर्मकार समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे. अन्य मान्यवरांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच मेळाव्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

लोगो : सोशल कनेक्ट

फोटो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शन अॅकॅडमीच्या शिक्षकांचे  श्रमदान

$
0
0

दर्शन अॅकॅडमीच्या शिक्षकांचे  श्रमदान (फोटो)

देवळाली कॅम्प : येथील आनंदरोडवरील दर्शन अॅकॅडमीच्या शिक्षकांनी नुकतेच श्रमदान केले. मुख्याध्यपिका ऊर्मिला शर्मा, मिलिंद देशमुख, राधा नायडू आदींसह १७ शिक्षकांनी पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित वादळ आलंया या उपक्रमात औंधेवाडी येथे पाच मोठे चर खोदून खारीचा वाटा उचलत श्रमदान केले. खेड्यापाड्यांतील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी या हेतूने शिक्षकांसह या उपक्रमात सहभाग घेतल्याचे मुख्याध्यपिका शर्मा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटीआय’मध्ये नाशिकचे यश

$
0
0

दत्तू शेवाळे, ऋषाली बारकसे, हिराबाई जाधव, खुशाल पवार उत्तीर्ण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये नांदेड येथील शिवाजी जाकापुरे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून नाशिकमधील विद्यार्थ्यांनीही यात यश मिळवले आहे. यामध्ये युनिव्हर्सल फाउंडेशनच्या दत्तू शेवाळे, ऋषाली बारकसे यांचा समावेश आहे. तसेच हिराबाई जाधव व कळवण तालुक्यातील खुशाल पवार यांचा समावेश आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक संयुक्त परीक्षेत पास झालेल्या ४ हजार ४३० विद्यार्थ्यांनी विक्री कर निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा दिली होती. गेल्या ७ जानेवारी रोजी २५१ जागांसाठी ही परीक्षा झाली. यामध्ये मूळ बीड जिल्ह्यातील परंतु, नाशिकमध्ये शिक्षण घेणाऱ्या ऋषाली बारकसे हिने १८४ वे तर दत्तू शेवाळे याने १३६ वा क्रमांक पटकावला. कळवण तालुक्यातील खुशाल याने १२३ वे स्थान तर हिराबाई जाधव हिने २४७ वे स्थान मिळविले.

परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणीची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून या काळातच गुण पडताळणी करायची आहे.

- खुशाल बनला, विक्रीकर निरीक्षक

एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सध्या सातत्य दिसून येत असून निकालही वेळेत जाहीर केले जात आहेत. नाशिकचा टक्का यात वाढत आहे ही आनंदाची बाब असून येत्या काळात ही संख्या आणखी वाढेल. विद्यार्थ्यांची मेहनत या निकालांतून दिसून येते.

- प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्हर्सल फाउंडेशन

खुशालची कुशल कामगिरी

कळवण : कळवणसारख्या ग्रामीण व आदिवासी तालुक्यातील बेज येथील हा तरुण विक्रीकर निरीक्षकपदी पोहोचल्याने खुशाल पवारसह त्याच्या कुटुंबातील प्रत्येक घटकांचे कौतुक होत आहे. खुशाल हा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा सहकार महर्षी स्व. मोतीराम हरी पाटील यांचा नातू, बेजचे माजी सरपंच चंद्रकांत पवार यांचा पुत्र आणि कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांचा पुतण्या आहे.

खुशालचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेज येथील प्राथमिक शाळा आणि नंतर महात्मा फुले विद्यालयात झाले. दहावीत त्याने ८१ टक्के गुण मिळविले. यानंतर त्याने सामनगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटी डिप्लोमा केला. नंतर पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे पदवी पूर्ण केली. पुण्यात चांगली नोकरी चालून आलेली असताना खुशालने दिल्ली गाठले आणि यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. दोन वेळा मुख्य परीक्षेपर्यंत धडक दिल्यानंतरही अपयश आल्याने त्याने खचून न जाता एमपीएससी परीक्षांकडे लक्ष केंद्रीत केले. राज्यात त्याने खुल्या वर्गात १२३ वा तर इतर मागासवर्गात १५ वा क्रमांक मिळविला आहे.

शेतकऱ्याच्या मुलाचे यश

मालेगाव : विक्रीकर निरीक्षक परीक्षेत तालुक्यातील टाकळी येथील दत्तू शेवाळे याने हालाखीच्या परिस्थितीवर मात करीत राज्यात खुल्या वर्गातून १३६ वा तर इतर मागासमधून २५ वा क्रमांक मिळविला. टाकळी सारख्या छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात दत्तूचा जन्म झाला. वडील बाळू केवळ शेवाळे यांची कोरडवाहू शेती असून आजही ते साध्या झोपडीवजा घरात राहतात. शालेय शिक्षण टाकळी येथे पूर्ण केल्यानंतर दत्तूने मालेगावी शासकीय वसतिगृहात राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. गुणवत्तेच्या बळावर राहुरी येथे बी. एस्सीची पदवी घेतली. काही वर्षापासून तो सातत्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता. विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा २०१७ मध्ये त्याने दिली होती. अखेर या परीक्षेत त्याने यश मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यू. बी. पवारांना निवृत्तीनंतर नोटीस

$
0
0

शहर अभियंत्यांना निवृत्तीनंतर नोटीस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सेवेतून गेल्याच महिन्यात निवृत्त झालेले शहर अभियंता यू. बी. पवार आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर आले असून, ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीवर तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्त मुंढेंनी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच ठेवल्याने अधिकारी व कर्मचारी चांगलेच वठणीवर आले आहेत.

महापालिकेचे तत्कालीन शहर अभियंता यू. बी. पवार दि. ३० एप्रिल रोजी महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. परंतु, त्यांच्या सेवाकाळात अनेक तक्रारी असल्याने, तसेच महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या एनएमसी ई कनेक्ट या ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यांना अगोदरही एक नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना निवृत्तीनंतरही महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाईही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, निवृत्त होऊनही पवार मुंढेंच्या कारवाईतून सुटले नसल्याचा संदेश अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये गेला आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी ताळ्यावर आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवेसाठी दिल्लीत बैठक

$
0
0

लोकप्रतिनिधींकडून गंभीर दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विमानसेवेसंदर्भात 'मटा'ने वृत्त मालिकेद्वारे प्रकाश टाकलेल्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. यासंदर्भात लवकरच दिल्लीत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात एअर डेक्कनकडून होणाऱ्या असुविधेबाबत चर्चा होणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून नाशिकसाठी एअर डेक्कन कंपनीने सेवा सुरू केली आहे. पहिले दोन महिने मुंबई आणि पुणे शहरांसाठी सेवा देण्यात आली. ती खंडित झाली. त्यानंतर केवळ मुंबई सेवाच सुरू झाली आहे. पुणे सेवेला मोठा प्रतिसाद मिळूनही ती बंदच आहे. त्याशिवाय एअर डेक्कनकडून मिळणाऱ्या सेवेविषयी तक्रारीही वाढल्या आहेत. विमानसेवा रद्द होणे, विलंब होणे या नित्याच्याच झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. याचा परिणाम प्रतिसादावर होणार आहे. त्यामुळे पुन्हा सुरू झालेली नाशिक विमानसेवा पुन्हा संकटात सापडल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. विमान सेवेच्या या सर्व तक्रारी आणि असुविधांबाबत 'मटा'ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकला. त्याची गंभीर दखल खासदार हेमंत गोडसे, खासदार हरीश्चंद्र चव्हाण आणि आमदार देवयानी फरांदे यांनी घेतली आहे. नाशिक विमान सेवेसंदर्भात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात या तिन्ही लोकप्रतिनिधींनी पत्र दिले आहे. नाशिक विमानसेवा सुरळीत सुरू व्हावी याबाबत त्यात मागणी केली जाणार आहे. तसेच, उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सेवा नाशिकला सुरू व्हाव्यात, याबाबतही ठोस निर्णय अपेक्षित आहे.

एअर डेक्कनच्या सेवेबाबत मोठ्या तक्रारी आहेत. प्रवाशांना असुविधेला तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिले आहे. याबाबत लवकरच बैठक होईल.

- हेमंत गोडसे, खासदार

काही दिवसांपूर्वीच मंत्री सुरेश प्रभू यांना भेटलो. सर्वाधिक प्रतिसाद असलेली पुणे सेवा बंद झाली आहे. त्यामुळे विमानसेवेविषयी बैठक घेण्याचे विचाराधीन आहे. येत्या काही दिवसातच ती होईल.

- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार

नाशिक विमानसेवा सुरळीत होत नाही तोच पुन्हा काही तरी तक्रारी पुढे येतात. ही सेवा आवश्यकच आहे. त्यामुळेच दिल्लीत बैठक घेण्यासाठी मी पत्र दिले आहे.

- देवयानी फरांदे, आमदार

लोगो : मटा इम्पॅक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदित कथालेखकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

$
0
0

नवोदित कथालेखकांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवोदित कथालेखकांच्या पहिल्या कथासंग्रहाला देण्यात येणाऱ्या 'बाबुराव बागूल कथा पुरस्कार २०१८' साठी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.

नवोदित कथालेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुक्त विद्यापीठातर्फे २१ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप असलेला 'बाबुराव बागूल कथा पुरस्कार' दिला जातो. या वर्षासाठी कथालेखक अथवा त्यांच्या प्रकाशकांनी कथासंग्रह या पुरस्कारासाठी पाठवायचा आहे. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह असावा, अशी अट असून १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या काळातच तो प्रकाशित झालेला असावा, अशीही यासाठीची अट आहे. कथालेखक अथवा प्रकाशकांनी कथासंग्रह पाच प्रतीत पाठवाव्यात. कथासंग्रह पहिलाच असल्याचे प्रतिज्ञापत्र लेखकाच्या परिचयासह ९ जूनपर्यंत डॉ. विजया पाटील, द्वारा, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन शिवार, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी (०२५३)२२३०१२७ किंवा ९४०३७७४६१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. भोंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती, महिला ठरले मानवी व्यवस्थेचे बळी

$
0
0

उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निसर्गदत्त निर्मितीची क्षमता असलेली स्त्री हीच शेतीव्यवस्थेची मूळ निर्माती आहे. तिनेच सृजनाची ही व्यवस्था उदयाला आणली. पण शेतीतून मानवाच्या फायद्याचे काहीतरी निर्माण होते आहे हे बघून निसर्गाने मनगटात दिलेल्या बळाच्या जोरावर पुरूषांनी शेतीवर वर्चस्व स्थापन केले. या वर्चस्ववादातूनच वर्ण आणि जाती व्यवस्थांचा उदय होत गेला. पण मूळच्या उपकारक असणाऱ्या स्त्री आणि शेतीच्या बाबतीत माणूस कृतज्ञ राहू शकला नाही. हे घटक कायम स्वार्थी व्यवस्थेचे बळीच बनत आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे डिसुझा कॉलनीतील समाजमंदिर सभागृहात झालेल्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'कृषी पर्व' या विषयावर त्यांनी विचार मांडले. कांबळे म्हणाले, की शहरी माणसे प्रत्यक्षात शेती करत नसली तरीही त्यांचा शेतीशी काहीच संबंध नाही असे समजू नका. शेती न करणाऱ्यांचा शेतीशी अप्रत्यक्षपणे संबंध हा असतोच. माणसाच्या हव्यासातूनच शेताच्या बांधांवर कृषी संस्कृतीमधील देवतांचा जन्म झाला. या देवता निसर्गावर नियंत्रण ठेवणाऱ्या असाव्यात या श्रद्धेपोटी नवसायास करण्याच्या प्रथा परंपरांचा जन्म झाला. कृषी संस्कृतीच्याच आश्रयाला यज्ञ संस्कृती आली. आणि निसर्गातील शक्तीमान देवतांच्या उपासनेतून स्वार्थाची प्राप्ती होईल, हा विचार त्यामागे होता असे कांबळे म्हणाले.

पूर्वी शेतीवर टोळ्यांची मालकी असायची. टोळीवर टोळीप्रमुखाची मालकी असायची. यातून राजसत्तांचा उदय झाला आणि काही ठिकाणी शक्तीचा चुकीच्या उद्देशांसाठी उपयोग होऊन शक्तीशाली सत्ता पद्धती या शोषणाला प्रोत्साहन देत गेल्याने निसर्गातील सर्जनशील घटकांची सर्वात मोठी हानी झाली. या सत्तांनी शेतीवर हजारो वर्षे स्वत:ची मालकी अबाधित राखली. पण शेती करणारा श्रमजीवी वर्ग हा मुळात वेगळाच होता. हा वर्गही सत्ताधारी आणि व्यवस्थेतील शक्तीमान केंद्रस्थानांच्या वर्चस्ववादाला बळी पडला, असे कांबळे म्हणाले.

चंद्रकांत जामदार यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्तविक केले. शारदा भंडारी यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष अनंतराव साळी यांनी कांबळे यांचा सत्कार केला. डॉ. शरद पाटील यांनी आभार मानले. यावेळ विजया पंडित, सतीश कुलकर्णी, रमेश देशमुख, मधुकर गुजराथी, अरविंद कोरान्ने आदी उपस्थित होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्मकार समाज मेळावा (फोटो )

पान तीन फास्ट

$
0
0

लाक्षणिक उपोषण

येवला : ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षांऐवजी ६० वर्ष इतके करावे, ज्येष्ठ नागरिक संबंधित नियोजित धोरणाकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात यावी यासह ज्येष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला शहरातील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ व जगदंबा माऊली महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुरुवारी येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्या ज्येष्ठांच्या वतीने प्रांताधिकारी भिमराज दराडे यांना निवेदन देण्यात आले.

रामेश्‍वर कंलत्री, रावसाहेब दाभाडे, उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images