Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवैध मद्याचे वितरण फसले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात विक्रीस बंदी असलेल्या आणि केंद्रशासित दमन, दादरा, नगर-हवेली येथे निर्मित होणारा मद्यसाठा सीमावर्ती भागात दडवून दोन टप्प्यांत जिल्ह्यात वितरित होत असल्याची बाब समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागास चकवा देण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. त्याचाच हा एक भाग आहे. सुरगाणा तालुक्यातील केळीपाडा येथील कारवाईतून ही बाब समोर आली असून, येथील एका डोंगराच्या पायथ्याशी गवताच्या गंजी खाली लपवून ठेवलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा एक्साइज विभागाच्या हाती लागला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. कर चुकवून आर्थिक लाभ उचलण्यासाठी परवानाधारक आणि बेकायदा विक्रेते मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याची विक्री करतात. यासाठी शेजारील केंद्रशासित प्रदेशांमधून तस्करी केली जाते. कारवाई टाळण्यासाठी तस्कर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मद्यसाठा आणून ठेवतात. आवश्यकतेनुसार नाशिकसह इतर ठिकाणी मद्यपुरवठा केला जातो. या माहितीच्या आधारे कळवण भरारी पथकाने केळीपाडा सुरगाणा तालुक्यातील पांगारणे शिवारात छापा मारला असता तब्बल एक लाख नऊ हजार ५६० रूपयांचा मद्यसाठा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गवताच्या गंजीत लपविलेला आढळला. यात ३१२ बाटल्यांच्या ३६ बॉक्सचा समावेश आहे. हा मद्यसाठा जेस्सू किसन कणसे या शेतकऱ्याच्या शेतात आढळला असून, या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत पथक तपास करीत आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक दुय्यम निरीक्षक मनोहर गरूड, जवान संतोष कडलग, पांडुरंग वाईकर, अवधूत पाटील, वंदना मरकड आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनसाठी एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), शिक्षण संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पुरस्कृत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.

तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाने दि. ३१ ऑक्टोबर २००५ रोजीच्या बैठकीत निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९८२ची पेन्शन योजना रद्द केली व डीसीपीएस योजना लागू केली. या निर्णयाला महाराष्ट्र कायदे मंडळाची मान्यता मिळालेली नसताता किंवा कोणताही प्रस्ताव सभागृहात पारित झाला नसतानाही अंशदायी पेन्शन योजना जबरदस्तीने थोपण्यात येत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. या योजनेच्या कायदेबाह्य सक्तीमुळे १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना शिक्षक, शिक्षकेतरांकडून व्यक्त केली जात आहे. या आंदोलनातून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी नीलेश ठाकूर, मंगेश सूर्यवंशी, संजय देसले, दिनेश अहिरे, अशोक सोमवंशी आदी उपस्थित होते.

१७ मेपासून लाँग मार्च

प्रशासनाने त्वरित आंदोलनाची दखल घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा १७ मेपासून शहापूर ते आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब लाँग मार्च काढतील, असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला. त्यानंतरही लेखी आश्वासन न मिळाल्यास या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी ६५१ मतदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६५१ मतदार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी केले. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत, तर माघारीची मुदत ७ मेपर्यंत आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधान परिषदेच्या राज्यातील सहा मतदारसंघांमध्ये शुक्रवारपासून (२० एप्रिल) आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघांसाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये विधान परिषदेचे आमदार जयवंत जाधव यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने निवडणूकप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लागू झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणुका शांततेच्या मार्गाने पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. निवडणूक जाहीर होताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, तहसीलदार गणेश राठोड उपस्थित होते. विधान परिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी नाशिक व मालेगाव महापालिकेचे २१६ मतदार असतील. मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड नगर परिषदेचे मिळून २१७ मतदार आहेत. पेठ, सुरगाणा, देवळा, कळवण, दिंडोरी आणि निफाड नगर पंचायत समितीचे एकूण ११४ मतदार आहेत. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे १६, जिल्हा परिषदेचे ७३ आणि पंचायत समितीचे सभापती (पदसिद्ध सदस्य) १५ असे एकूण ६५१ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात. यात मतदारांची संख्या कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्यासाठी मुदत : २६ एप्रिल ते ३ मे

छाननी : ४ मे

अर्जमाघारीची तारीख : ७ मे

निवडणूक : २१ मे (सकाळी ८ ते दुपारी ४)

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंख्या

नाशिक महापालिका १२७

मालेगाव महापालिका ८९

मनमाठ नगर परिषद ३५

येवला नगर परिषद २८

नांदगाव नगर परिषद २०

सटाणा नगर परिषद २२

सिन्नर नगर परिषद ३२

इगतपूरी नगर परिषद २१

भगुर नगरपरिषद २०

त्र्यंबक नगर परिषद २०

चांदवड नगरपरिषद १९

पेठ नगरपंचायत १९

सुरगाणा नगर पंचायत १९

देवळा नगर पंचायत १९

कळवण नगर पंचायत १९

दिंडोरी नगर पंचायत १९

निफाड नगर पंचायत १९

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड १६

जिल्हा परिषद ७३

पंचायत समिती सभापती १५

एकूण ६५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बलात्काराच्या घटनांनी देशाची बदनामी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशातील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने जगभरात देशाची बदनामी होत आहे. अनेक ठिकाणी याविरोधात निदर्शने होत असून, संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी यांनी देखील याबाबत उचित पावले उचलून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. मात्र देशातील भाजप सरकार व त्यांचे मंत्री बलात्कारातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी रॅली काढत आहेत. हे खेदजनक असल्याचे सांगत आमदार असिफ शेख यांनी कठोर शब्दात केंद्र शासनावर टीका केली.

येथील जमाते-ए-उल्मा संघटनेच्या वतीने देशभरातील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेख बोलत होते. कॅम्प रस्त्यावर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, नगरसेवक अस्लम अन्सारी, गिरीश बोरसे, मौलाना हमीद जमाली, शाकीर शेख, हाफीज अनिस अजहर, कारी अकलाख अहमद, सोहेल अहमद, इस्माईल जमाली आदीसह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शेख यांच्यासह विविध मौलानांनी केलेल्या भाषणातून बलात्कार घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बलात्कारात बळी पडलेल्या मुलीना न्याय मिळावा अशी मागणी करणारे फलक लक्षवेधी ठरले. यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगराध्यक्षपदीनूरजहाँ पठाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नुरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त पदावर पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भांमरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम बघितले. पठाण यांच्या अर्जावर सूचक म्हणून अलका पवार तर अनुमोदक म्हणून राजाभाऊ शेलार यांच्या सह्या होत्या. नगराध्यक्ष मुकुंद होळकर, मुख्याध्याधिकारी किशोर चव्हाण, अनिल कुंदे, किरण कापसे, जावेद शेख, आंनद बिवलकर, बसपाचे जिल्हाध्यक्ष आसीफ पठाण उपस्थित होते. नगरपंचायतीवर शिवसेना-भाजपची सत्ता आहे. दोन्ही पक्षाकडून ठरल्याप्रमाणे या वेळी नगराध्यक्ष सेनेचा तर उपनगराध्यक्ष भाजपचा होता. मात्र वाघ यांचे निधन झाल्याने उर्वरित काळासाठी पठाण यांना संधी चालून आली. पठाण यांनी सुरुवातीपासून सेना-भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ एक नगरसेवक असूनही या पक्षाला उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण यांच्या त्या आई आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसगत झालेल्याशेतकऱ्यांचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून गंडा घालताना फसवणुकीचे आजवर अनेक प्रकार समोर आले आहेत. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दिलेले 'धनादेश' न वटल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येवला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. शनिवारी दुपारी उपोषण मागे घेण्यात आले. येवला बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, सचिव डी. सी. खैरनार तसचे संचालक मंडळाने उपोषणस्थळी भेट दिली. येत्या ३० एप्रिलपर्यंत संबंधित व्यापाऱ्याकडून पैसे परत मिळवून देवू असे लेखी आश्वासन दिले.

अंदरसूल उपबाजार आवारातील राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाऱ्याने दिलेले धनादेश बँकांमार्फत शेतकऱ्यांना परत मिळाले. या सर्व प्रकारातून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याचे 'पेमेंट' मिळावे यामागणीसाठी शुक्रवारी उपोषण सुरू केले होते. जवळपासू ६० शेतकऱ्यांची या प्रकरणी फसवणूक झाली आहे. धुमाळ यांनी दिलेले धनादेश हे 'बाऊन्स' झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी येवला सहाय्यक निबंधक यांना लेखी निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते. संपत आहेर, जगन्नाथ एंडाईत, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे आदी शेतकरी उपोषणासाठी बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटमुळे आग;तीन झोपड्या खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रुई (ता. निफाड) येथील मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांच्या तीन झोपड्या शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झाल्या. यात जीवित हानी टळली असली तरी मजुरांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

रुई येथे मराठवाडा जलद कालवा व नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्यामधील जागेत काही शेतमजूर झोपडी बांधून राहत होते. हे मजूर शेतात कामाला गेलेले असताना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झोपडीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक वायरच्या शॉर्टसर्किटमुळे झोपड्यांनी अचानक पेट घेतला. यात संजय जगन माळी, शंकर वामन सोनवणे, जगन रामा माळी या तिघांच्या झोपड्यांसह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. तलाठी किरडे यांनी पंचनामा केला असून, प्रत्येकी सहा हजारांचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. तिन्ही झोपड्यांतील कुटुंब उघड्यावर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी साखळी

$
0
0

सकल मराठा समाजातर्फे

मानवी साखळी

पंचवटी : मुली-महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी पंचवटी कारंजा येथे शनिवारी मानवी साखळी तयार करण्यात आली. सकल मराठा बहुजन मराठा समाजातर्फे ही मानवी साखळी करण्यात आली. यात योगेश कापसे, पद्माकर इंगळे, बापू पवार, मंगेश कापसे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नी नांदत नसल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नी नांदत नाही. माहेरी गेल्यानंतर मुलांनाही परत पाठवत नाही. पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा होत नसल्याने नैराश्याने ग्रासलेल्या एकाने शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास शहर पोलिस आयुक्तालयात घडली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून, संबंधित व्यक्तीविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश देवानंद सोनवणे (रा. शिवाजीनगर, सातपूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. सोनवणे विवाहित असून, त्यांना मुलेही आहेत. मात्र, सात ते आठ महिन्यांपूर्वी काही कारणांमुळे त्यांची पत्नी पिंपळगाव येथे माहेरी निघून गेली. ती माहेरी मोलमजुरीचे काम करते, तर सोनवणे सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. माहेरी गेलेल्या पत्नीस अनेकदा विनंती करूनही ती नांदण्यास तयार झाली नाही. तिने मुलानांही पाठविले नाही. या कालावधीत सोनवणे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्जफाटे केले. मात्र, पती-पत्नीच्या वादात पोलिसच नव्हे, तर कोर्टही सहसा सहभागी होत नाही. सोनवणे यांच्याबाबतही तेच झाले.

सोनवणे यांची पत्नी शनिवारी सातपूर पोलिस ठाण्यात पोहोचली. या सर्व नैराश्यातून रॉकेलचा डबा घेऊन सोनवणे पोलिस आयुक्तालयात पोहोचले. कार्यालयात पोहोचल्याबरोबर त्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी सोनवणेंना अटक करून त्यांच्याविरोधात कलम ३०९ नुसार गुन्हा दाखल केला. निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले, की पती-पत्नीच्या नैराश्यातून हा प्रकार घडला आहे. पत्नी नांदण्यास तयार नसल्याने, तसेच मुलेही पाठवीत नसल्याने संशयिताने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनवणे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पोलिस आयुक्तालयात सकाळच्या सुमारास चांगलाच गोंधळ उडाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्या बिनविरोध

$
0
0

पश्चिमचे सभापतिपद मनसेकडे; तर पूर्व, पंचवटीत भाजपकडे सभापतिपद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या तीनही प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली. नाशिक पश्चिममध्ये मनसेच्या अॅड. वैशाली भोसले यांची, तर नाशिक पूर्वमध्ये भाजपच्या सुमन भालेराव यांची बिनविरोध निवड झाली. पंचवटीतही भाजपच्या पूनम धनगर यांची बिनविरोध झाली. त्यामुळे सहा प्रभाग समित्यांपैकी भाजपकडे तीन, मनसेकडे दोन तर शिवसेनेकडे एक प्रभाग समिती गेली आहे.

शनिवारी नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम या तीन प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक झाली. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपच्या सुमन भालेराव यांचा एकमेव अर्ज आला होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी यांनी भालेराव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नाशिक पश्चिममध्ये कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसले तरी, मनसे, शिवसेना आणि काँग्रेसच्या बळावर मनसेने पश्चिमचे सभापतिपद मिळवले आहे. या ठिकाणी अॅड. वैशाली भोसलेंचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. पंचवटीतही भाजपच्या पूनम धनगर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तीन सभापतिपदांच्या निवडणुकांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडीची औपचारिकता शनिवारी पूर्ण करण्यात आली.

सहा प्रभाग समित्यांपैकी तीन सभापतिपद भाजपने राखले असून दोन मनसे, तर एका ठिकाणी शिवसेनेला संधी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादरोड भागात पैठणींचे दुकान फोडले

$
0
0

मखमलाबादरोड भागात पैठणींचे दुकान फोडले (फोटो)

पंचवटी : मखमलाबादरोडवरील जगझाप मार्गाजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या पैठणी साडीचे दुकान शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. या दुकानातील दीड ते दोन लाख रुपयांच्या साड्या चोरट्यांनी लंपास केल्या. मखमलाबादरोडवरील वैशाली अपार्टमेंटमधील राहुल तानाजी फडोळ यांच्या येवलेकर पैठणी या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून पैठणी लंपास केल्या. पैठणींची खोकी फेकून केवळ साड्याच घेऊन चोरटे पसार झाले. राहुल फडोळ सकाळी दहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. हा रस्ता निर्मनुष्य असतो. येथे पोलिसांची गस्तही कमी असते. त्याचा फायदा घेत ही चौरी झाली.

--

हातमाग कापड स्पर्धा

नाशिक : राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या उत्पादित वाणाला सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून राज्यात विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीसपात्र नमुन्याकरिता अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपयांचे प्रत्येकी एक बक्षीस देण्यात येईल. हातमाग कापडाचे नमुने विहित कालावधीत दाखल करून सोबत संपूर्ण नाव व पत्ता, वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार तसेच कापडाचे विवरण किमतीसह देणे आवश्यक आहे. कमीत कमी एक नग व कमीत कमी दोन मीटर कापड प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई, सातवा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, मावळी मंडळरोड, ठाणे (पश्चिम)- ४००६०१ येथे पाठवावे. ०२२- २५४०५३६३ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

--

घंटागाडी उलटली (फोटो)

सातपूर : परिसरात कचरा संकलन करून खत प्रकल्पाकडे निघालेली घंटागाडी पपया नर्सरीच्या वळणावर अचानक उलटली. त्यामुळे घंटागाडीतील कचरा रस्त्यावर पसरून वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रॅक्टरला लावण्यात येणारी स्टीलची प्लेट फिरल्याने घंडागाडीची स्ट्रॉली पलटल्याचे चालकाने सांगितले. ट्रॅक्टरचे स्टेअरींग चालकाच्या छातीला लागल्याने दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर नंतर दुसऱ्या घंटागाडीत कचरा भरून खत प्रकल्पावर नेण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने स्ट्रॉली सरळ करीत रस्ता मोकळा करण्यात आला.

---

पॉइंटर्स

--

कॅम्पसच्या पदरी उपेक्षाच -२

चेन स्नॅचर वरचढ -३

तलाव तसा चांगला, पण आकाराने तोकडा -४

कौशल्याची 'परीक्षा' -५

स्वच्छ, सुंदर दिवेआगर -६

---

(लीडखाली सिंगल)

उंटवाडीत म्हसोबा यात्रेने रंगत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवाला जयघोषात सुरुवात झाली असून, शनिवारी पहिल्याच दिवशी ग्रामस्थांसह भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी श्री दत्तगिरीबाबा भजन, भारुड, कला, नाटक पथकाने भारुडाद्वारे समाजप्रबोधन केले. हा यात्रोत्सव ९१ वर्षांपासून अखंडितपणे साजरा केला जातो. यंदाही सिटी सेंटर मॉललगतच्या म्हसोबा महाराज देवस्थान येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात यात्रोत्सवाला सुरुवात झाली. दोन दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार असून, श्री म्हसोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीने यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता महाराजांची महापूजा करण्यात आली. कमिटीचे पदाधिकारी विठ्ठल तिडके, मधुकर तिडके, सदाशिव नाईक, फकिरराव तिडके, राजेश गाढवे, विलास जगताप, दिनकर तिडके, अॅड. राहुल तिडके, संतोष कोठावळे आदी उपस्थित होते. यात्रोत्सवांतर्गत आज, रविवारी (दि. २२) दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत येथील श्री म्हसोबा महाराज देवस्थान पटांगणावर कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अनेक नामांकित पहिलवान या फडात हजेरी लावणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराध्यक्षपदी ठाकरे?

$
0
0

एकमेव अर्ज; राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांतर्गत शनिवारी शहराध्यक्षपदासह विधानसभा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्या. शहराध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष रंजन ठाकरे यांचेच एकमेव नाव आले असून, सर्वानुमते त्यांच्या नावाची शिफारस प्रदेशस्तराकडे करण्यात आली आहे. त्यामुळे रंजन ठाकरेंच्या गळ्यात दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदाची माळ पडणार असून, निवडीची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. दरम्यान, विधानसभा आणि सहा ब्लॉक अध्यक्षांसाठी जास्त नावे आल्याने, त्यांच्या निवडीचा फैसला आता प्रदेश पातळीवर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सध्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी नाशिकच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तात्रय महसूरकर यांची नियुक्ती केली असून, शनिवारी त्यांच्या उपस्थितीत शहराध्यक्षासह विधानसभा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचेच एकमेव नाव समोर आले. शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली. निवडणूक निर्णय अधिकारी महसूरकर यांनी शहराध्यक्ष पदासाठी रंजन ठाकरे यांचे एकमेव नाव आले असले तरी, त्यांच्या निवडीची घोषणा केली नाही. शहराच्या बैठकीचा अहवाल प्रदेशकडे सादर केला जाणार आहे. प्रदेश पातळीवरून त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे ठाकरेंची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.

ब्लॉक अध्यक्षपदासाठी चुरस

विधानसभा आणि ब्लॉक अध्यक्षपदासाठीही निवडणूक घेण्यात आली असून सातपूर, पश्चिम विधानसभा अध्यक्षांसह नाशिकरोड ब्लॉकसाठी मोठी चुरस आहे. अन्य चार विधानसभा व आणि पाच ब्लॉक अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आले आहेत. त्यामुळे यांच्याही नावांची शिफारस प्रदेशकडे करण्यात आली आहे. यावेळी बैठकीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे, खासदार देवीदास पिंगळे, गजानन शेलार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा बाजार समितीसाठी दोन अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ८५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यापैकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा चांदवडचे प्रातांधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ गणांसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाली आहे. शेतकरी गटासाठी सटाणा, अजमीर सौंदाणे, व ब्राम्हणगांव गणातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत. आज अखेर ८५ उमेदवारी अर्ज विक्री झाली असून चौगाव गणातून शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अनिल हरी सोनवणे यांनी तर ब्राह्मणगाव गणातून नरेंद्र उखाजी अहिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान बागलाण तालुका काँग्रेसच्या वतीने सटाणा व नामपूर बाजार समिती निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यरंगात रंगले नाशिककर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग आणि नांदेड मित्रमंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नाट्यसंगीताच्या उज्ज्वल परंपरेची वाटचाल मांडणारा नाट्यरंग कार्यक्रम रंगला. यावेळी सूरमणी धनंजय जोशी (नांदेड) यांनी शास्त्रीय गायन आणि नाट्यगीत सादर केले. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ही मैफल झाली.

प्रारंभी जोशी यांनी 'राखो पत मोरी' हे पद असलेली बंदिश सादर केली. त्यानंतर 'जागो जागो श्याम कन्हैय्या' ही छोटी बंदिश सादर केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी नाट्यसंगीत सादर केले. त्यात १३६ वर्षांची परंपरा असलेले, संगीत सौभद्र नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित व संगीतबद्ध केलेले गुरूची महिमा कथन करणारे 'कोण तुज सम सांग मज गुरूराया कैवारी सदया' हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित नाटकातील 'सुखसंचारक पवन असे मी, समता सांभाळी' हे पद सादर केले. त्यानंतर त्यांनी काही प्रसिद्ध नाटकातील पदे सादर केली. त्यांना तबल्याची साथ पंडित नितीन वारे यांनी संवादिनीची साथ पंडित सुभाष दसककर यांनी केली. कार्यक्रमाचे निरूपण गोविंद पुराणिक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता करवाढीच्या पथ्यावर

$
0
0

महासभेत निर्णय घेण्यास बंदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या भरमसाठ करवाढीच्या विरोधातील आंदोलनाला आता विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेची झळ बसली आहे. येत्या सोमवारी(२३ एप्रिल) होणारी महासभाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून मतदारांना आकर्षित करता येईल, असा निर्णय घेता येणार नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे करवाढी विरोधात होणाऱ्या महासभेत केवळ चर्चाच झडणार असून, आचारसंहिता मुंढेंच्या पथ्यावर पडली आहे. महिनाभर आता करवाढीबाबत कोणतीच घोषणा पालकमंत्र्यांसह महापौरांना करता येणार नसल्याने भाजपचीही कोंडी झाली आहे.

आयुक्त मुंढेंनी त्यांच्या अधिकारात मालमत्ता करयोग्य मूल्यदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात मोकळे भूखंड, पार्किंग व सामासिक अंतरातील जागांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतीवर देखील कर लागू करण्यात आला आहे. तीन पैसे प्रतिचौरस फुटावरून तो दर चाळीस पैसे करण्यात आला. नंतर पन्नास टक्के दरवाढ मागे घेण्याची घोषणा आयुक्तांनी केली असली तरी कर नकोचं, अशी भावना शेतकरीवर्गातून व्यक्त होत आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. गावोगावी बैठकांमधून भाजप विरोधात संताप व्यक्त होत असल्याने नगरसेवकांसह भाजपचे तीनही आमदार धास्तावले आहेत. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे व अन्य राजकीय पक्षांनी करवाढी विरोधाच्या आंदोलनात उडी घेतली आहे. या आंदोलनात नाशिककरांसोबत असल्याचे जाहीर करताना महासभेला विश्‍वासात न घेता करवाढ केल्याने सत्ताधारी भाजपने २३ तारखेला विशेष महासभा बोलावली. महासभेबाहेर या दिवशी मोठे आंदोलन उभारले जाणार आहे. या महासभेत आयुक्तांना घेरण्याची तयारी केली असतानाच शुक्रवारी विधानपरिषद निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे करवाढी विरोधातील आंदोलनाला या आचारसंहितेचा फटका बसला आहे. या महासभेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी पत्र पाठवत नागरिकांवर प्रभाव पडणार नाही, असा निर्णय न घेण्याचे बंधन घातले आहे. यामुळे या महासभेत केवळ चर्चा होणार असून, आदेश किंवा ठराव करता येणार नसल्याचे चित्र आहे. करवाढीसंदर्भात पालकमंत्र्यांनाही बैठक घेता येणार नसल्याचे चित्र आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्रीसुध्दा करवाढ मागे घेऊ शकणार नसल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. महिनाभर आता करवाढीत कोणाचाही हस्तक्षेप होणार नसल्याने मुढेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

करवाढीच्या विरोधात येत्या २३ रोजी होणाऱ्या महासभेबाहेर अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जनआंदोलन होणार आहे. भाजपसह शिवसेनेनेही पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे. माकपही या आंदोलनात सहभागी होणार असून, पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जनआंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्र काढून जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या आंदोलनाचे बळ वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या चालीवर शिवसेनेच्या विजयाचे गणित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आचारसंहिता जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी भाजपच्या मदतीशिवाय विजयाचा आकडा गाठणे अशक्य असल्याने युतीच्या निर्णयाकडे इच्छुकांचे डोळे लागले आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. भाजपच्या चालीवरच विजयाचे गणित अवलंबून असले तरी गेल्या वेळेप्रमाणेच या वेळीही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या शिवाजी सहाणे आणि नरेंद्र दराडे यांनी गाठीभेटींना जोर दिला आहे. जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी शिवसेना- भाजप यांची युतीत शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार जयंत जाधव यांची मुदत ३१ मे २०१६ ला संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नाशिकसह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर २०१२ मध्ये राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांनी शिवसेनेचे ॲड. शिवाजी सहाणे यांचा पराभव करत बाजी मारली होती. राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्तीचे असतानाही सहाणेंनी जोरदार टक्कर देत, छगन भुजबळांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, सहा वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदललेली असून, जिल्ह्यात भाजप, शिवसेनेचा बोलबाला आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६५१ मतदार आहेत.

युतीबाबत संभ्रमावस्था

पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे सर्वाधिक २०७ मतदार असून, त्यापाठोपाठ भाजपचे १६७ मतदार आहेत. काँग्रेसकडे ७१, राष्ट्रवादी १००, तर अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सख्याबळ हे शंभरच्या आसपास आहे. गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजप युतीत शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली होती. मात्र, सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले असून, भाजप आणि शिवसेनेतील वितुष्ट वाढले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती न करण्याची घोषणा केली आहे. युतीवरून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने युतीसंदर्भात सध्या संभ्रमावस्था आहे.

राज्यात युतीबाबत संभ्रमावस्था असताना, नाशिकमध्ये मात्र युतीसाठी देव पाण्यात घातले जात आहेत. शिवसेनेला भाजपच्या मदतीशिवाय आपला उमेदवार विजयी करता येणार नाही. स्पष्ट बहुमत नसतानाच उमेदवारीवरून शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली. सहाणेंनी हकालपट्टीनंतरही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे प्रबळ दावेदार असून, त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपने निवडणुकीची तयारी ठेवली असून, त्यासाठी माजी आमदार वसंत गिते, माणिकराव कोकाटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, परवेझ कोकणी यांच्या नावांची चर्चा आहे. सहाणेही राष्ट्रवादी व भाजपच्या संपर्कात आहेत. या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती होते की नाही, यावर भाजपचा उमेदवार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या हातातच शिवसेनेचा विजय आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाबल तुलनेने कमी आहे. मात्र, प्रदेश पातळीवर दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. आघाडी करून इतर छोट्या पक्षांची मूठ बांधण्याचे काम सुरू असल्याचे कळते.

चौकट

पक्षीय बलाबल

शिवसेना : २०७, भाजप : १६७, राष्ट्रवादी : १००, काँग्रेस : ७१, मनसे : ५, बसप : १, आरपीआय : ५, एमआयएम : ७, जनता दल : ६, शहर विकास आघाडी : १८, जनशक्ती पॅनल : ५, माकप : १३, अपक्ष : ३८.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढे आले अन् लगेच गेले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी शनिवारी गोल्फ क्लबवर आयोजित केलेला 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. आयुक्त मुंढेंच्या मातोश्रींची प्रकृती अचानक बिघडल्याने हा उपक्रम स्थगित करण्यात आला असून, आता येत्या शनिवारी (दि. २८) हा उपक्रम याच मैदानावर होणार आहे.

नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी स्वत: दोन मिनिटांसाठी उपक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावून दिलगिरी व्यक्त करीत उपस्थितांना संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी व सूचना देण्याचे आवाहन केले. या उपक्रमांतर्गत ६९ नागरिकांकडून १०६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, या तक्रारींचा निपटारा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यापासून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यावर भर देतानाच कामकाजाला शिस्त लावण्यासाठी मुंढे यांनी नाठाळ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होण्यासाठी त्यांनी एनएमसी ई कनेक्ट अॅप सुरू केले आहे. परंतु, करवाढीच्या मुद्द्यावरून मात्र राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आयुक्त मुंढे नवी मुंबईच्या धर्तीवर थेट जनतेच्या दरबारात उतरले आहेत. नवी मुंबईत हिट ठरलेला वॉक विथ कमिशनर हा उपक्रम त्यांनी नाशिकमध्येही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर साडेसहा वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता गोल्फ क्लबवर उपक्रमाची तयारी करण्यात आली होती. तक्रारी आणि सूचना देण्यासाठी नागरिकही दाखल झाले होते. तक्रारदार नागरिकांना टोकन दिले जात होते. यावेळीच तेथे मुंढे यांचे आगमन झाले. मुंढेंनी व्यासपीठावर जाऊन आपल्या मातोश्रींची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती उपस्थितांना देऊन आजचा उपक्रम पुन्हा एकदा पुढील शनिवारी (दि. २८) घेण्याचे जाहीर केले. मुंढेंनी दोन मिनिटे नागरिकांशी संवाद साधत दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर ते मातोश्रींच्या उपचारांसाठी निघून गेले. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि रमेश पवार यांच्या उपस्थितीत तक्रारी स्वीकारण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत ६९ नागरिकांकडून १०६ तक्रारी व सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून संबंधितांना त्याची माहिती दिली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. करवाढ, पाणीपुरवठा, अतिक्रमण,पथदीपांसंदर्भात तक्रारी घेऊन नागरिक मोठ्या संख्येने आले होते.

अतिक्रमण, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी

वॉक विथ कमिशनर उपक्रमाअंतर्गत शनिवारी करण्यात आलेल्या सर्व तक्रारींचा रोख पाणीपुरवठा, अतिक्रमण व नगररचना विभागाकडेच होता. अनेक ठिकाणी पाणी येत नसल्याच्या तक्रारी होत्या, तर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तक्रारी सर्वाधिक होत्या. टपऱ्या, शेड काढण्यासंदर्भातील तक्रारींचा त्यात समावेश होता. अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी लावलेल्या शुल्कासंदर्भातही नागरिकांचा आक्षेप होता. काही तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या होत्या. आयुक्तांनी दिवसभरात या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश दिल्याने प्रशासन दिवसभर या तक्रारी सोडविण्यात व्यग्र होते.

अधिकाऱ्यांची झाडून हजेरी

आयुक्त मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्तांपासून सर्व विभागप्रमुख, विभागीय अधिकाऱ्यांसह महापालिकेतील सर्व अधिकारी या उपक्रमासाठी झाडून उपस्थित होते. नागरिकांच्या किरकोळ तक्रारींचा निपटारा तात्काळ घटनास्थळीच होण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी सर्व जय्यत तयारी केली होती. विशेष म्हणजे आयुक्त या मैदानावर येणार असल्याने पूर्ण मैदानाची पूर्णपणे साफसफाई करून मैदान चकाचक करण्यात आले होते.

सावजीं मुंढेंच्या समर्थनार्थ!

दरम्यान, करवाढीच्या मुद्द्यावरून एकीकडे भाजपसह सर्वच पक्षांनी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या लढाई सुरू केली असतानाच भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी मुंढेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजपचे दोन आमदार, महापौरांनी मुंढेंच्या करवाढीला विरोध करीत थेट मुंढेंनाच आव्हान देण्यासाठी महासभा व जनआंदोलन करण्याची तयारी केली असतानाच मुंढेंच्या चांगल्या कामाच्या समर्थनार्थ सावजी मैदानावर उतरले आहेत. अनेक नागरिकही यावेळी मुंढेंना समर्थन देण्यासाठी आले होते. आपण आयु्क्तांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाच्या पाठीशी असून, करवाढीचा अधिकार महासभेचा असल्याचा दावा सावजींनी केला. भाजपचे आमदार व महापौरांनी मुंढेंविरोधात मोहीम सुरू केली असतानाच सावजींच्या या भूमिकेमुळे भाजपमध्येच गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे.

--

मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने आजचा उपक्रम स्थगित करण्यात आला आहे. गैरसमज होऊ नये म्हणून मी येथे आलो आहे. येथे आलेल्या सर्व नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार असून, त्यांचा तातडीने निपटारा केला जाईल. येत्या शनिवारी याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.

-तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ चेन स्नॅचर पोलिसांना वरचढ

$
0
0

पाच दिवसांत तीन लाखांहून अधिकचे दागिने लंपास; महिलांमध्ये भीती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकटा फिरणारा, रात्री ७ ते १० या वेळेत महिलांना लक्ष करणारा एक चेन स्नॅचर्स सध्या पोलिसांना वरचढ ठरला आहे. या महिन्यात त्याने पाच दिवसांत सात वेळा चेन स्नॅचिंग करून तब्बल तीन लाखांहून अधिक रकमेचे दागिने हातोहात लंपास केले. इंदिरानगर, उपनगर, आणि मुंबईनाका भागात वरचेवर हात साफ करणारा हा भामटा पोलिसांच्या हाती केव्हा लागणार, असा प्रश्न सर्वांना सतावतो आहे.

शहरात वरचेवर चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी गँग, काही स्थानिक सराईत तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या चोरट्यांना पोलिसांना पायबंद घातला. मागील वर्षी चेन स्नॅचिंगचे सर्वाधिक गुन्हे उघडकीस आणणाऱ्या शहर पोलिसांसमोर मागील काही दिवसांपासून एका २५ ते २७ वयोगटातील तरुणाने आव्हान निर्माण केले आहे. हा चोरटा दर दोन दिवसांआड एक किंवा दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील आभूषण ओरबाडून अंधारात बेपत्ता होतो.

छोट्या रस्त्यांवर जास्त घटना

विशेष म्हणजे, तो एकटाच गुन्हा करतो. सडपातळ असलेला चोरटा कधी हेल्मेट, कधी डोक्याला स्कार्फ तर कधी मास्क लावतो. शक्यतो मोठ्या रस्त्यांना संलग्न असलेल्या छोट्या रस्त्यांवर महिलांना टारगेट करतो. अशोकामार्ग, बोधलेनगर, भाभानगर अशा ठिकाणी तो अधूनमधून दिसतो. शक्यतो वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याकडे कल असलेला हा एकमेव चोरटा पोलिसांना सतत चकवा देण्यात यशस्वी ठरतो आहे.

फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर हा चोरटा कार्यभाग साधतो. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिस स्टेशनसह क्राईम ब्रँचही प्रयत्नशील असून, आज ना उद्या तो पोलिसांच्या हाती लागेल, असे क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महिला घराबाहेर पडतात किंवा बाहेरून घराकडे येतात. या काळात महिलांनी शक्यतो दागिने वरच्यावर दिसणार नाही, याची खबरदारी घ्यावी. हा आरोपी एकटाच असून, तो महिलेच्या समोरून येतो. अचानक वेगात येताना दुचाकीचा तीव्र प्रकाश महिलेच्या डोळ्यात पडला की संधी साधून तो एका हाताने चेन ओढून धूम ठोकतो. चोरट्याने काही ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचे व्हिडीओ फुटेज सापडले असले तरी ते पुरेसे स्पष्ट नाही. हायवेलगत असलेल्या रहिवाशी भागात महिलांनी काळजी घ्यावी, तसेच या भागातील तरुणांनी अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवल्यास फायदा होऊ शकतो, असेही नखाते म्हणाले.

१ ते २१ एप्रिलदरम्यान केलेले गुन्हे

पोलिस स्टेशन.....दागिन्यांची किंमत.....महिलेचे वय.....वेळ.....ठिकाण

उपनगर.....६० हजार.....६२.....सकाळी ७.४५.....बोधलेनगर

मुंबई नाका.....६० हजार.....३५.....रात्री ९.१५.....अशोकामार्ग

इंदिरानगर.....५४ हजार.....५१.....रात्री ८.३०.....चार्वाक चौक रस्ता

गंगापूर.....२८ हजार.....४०.....रात्री ९.२०.....आकाशवाणी केंद्रासमोर

अंबड.....६० हजार.....५०.....रात्री ८.००.....शिवाजीचौकाकडे जाणारा रस्ता

इंदिरानगर.....२५ हजार.....३९.....रात्री ८.००.....राजीवनगर, गणपतीमंदिराजवळ

इंदिरानगर.....२१ हजार.....३७.....रात्री ८.४५.....पाथर्डी फाटा, ज्ञानेश्वरनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा फेकून महिलांसोबत हुज्जत

$
0
0

कचरा फेकून महिलांसोबत हुज्जत

कचरा विलगीकरणाचे प्रबोधन करणाऱ्या महिलांना धमकावले

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून संकलित करण्यात यावा, असे आदेश आरोग्य विभागाला दिले आहे. त्यानुसार म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या वसाहतीत शनिवारी (दि. २१) घंटागाडीजवळ कचरा विलगीकरणाबाबत दोन महिला सांगत होत्या. या वेळी एका पुरुषाने त्या महिलांशी हुज्जत घालत डस्टबिन घेण्यासाठी पैसे, द्या अशी मागणी केली. तसेच त्याच्याजवळ असलेला कचरा महिलांच्या समोर टाकून निघून गेला. तसेच पुन्हा कचरा घेतला नाही, तर पुन्हा रस्त्यावर टाकेल, असे महिलांनाच धमकावले. याबाबत घंटागाडी चालकाने तत्काळ आरोग्य विभागाकडे तक्रार केली. परंतु, यावर आरोग्य विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सातपूर कॉलनीतील जुन्या म्हाडा वसाहतींच्या इमारती भागात शनिवारी (दि. २१) घंटागाडी कचरा टाकताना ओला व सुका वेगळा करून टाकावा, असे महिला प्रबोधन करत होत्या. याप्रसंगी एका महिलेने ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिनच आणली नसल्याने संबंधित महिलेला ओला कचरा डस्टबिनमध्येच जमा करून तो घंटागाडी देण्याचे सांगितले. यानंतर संबंधित महिलेच्या पतीने प्रबोधन करणाऱ्या महिलांशी हुज्जत घातली. कचरा घ्यायचा तर घ्या नाही, तर रस्त्यांवरच टाकेल, असेही त्याने महिलांना धमकावले. यानंतर मुजोर पुरुषाने चक्क महिलांच्या समोरच कचरा टाकत निघून गेला. याबाबत घंटागाडी चालकाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. मात्र, त्या पुरुषावर कारवाई करण्यात आलेली नाही.

घरोघरी प्रबोधन सुरू

'घंटागाडी आली दारा कचरा टाका भरा, भरा' अशी म्हण घेत नाशिक महापालिकेने घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची अभिनव योजना सुरू केली. यामुळे रस्त्यांवर टाकला जाणारा कचरा थेट घंटागाडीतून खत प्रकल्पावर टाकला जातो. नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडी टाकण्याबाबत सूचना आरोग्य विभागाला केल्या. आरोग्य विभागानेदेखील घंटागाडीत कचरा टाकतांना येणाऱ्यांना कचरा वेगळा करून टाकावा, अशी विनंती केली. यासाठी दोन स्वतंत्र डस्टबिनचा वापर करावा, असे प्रबोधनही महिलांकडून केले जात आहे.

ढकलगाडीतही कचरा

महापालिकेतील गल्लीबोळात स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. स्वच्छता झाल्यावर कचरा संकलन करतांना कर्मचाऱ्याला ढकलगाडी दिली जाते. परंतु, या गाडीतही महिलांकडून कचरा टाकला जातो. घंटागाडी नियमित येऊनदेखील केवळ वेळ मिळाला नाही याचे कारण सांगत ओला व सुका एकत्रित असलेल्या कचरा ढकलगाडीत टाकला जात असल्याने गाडी ढकलताना महिला कर्मचाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७ शाळांचे विलीनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांची पटसंख्या, प्रत्यक्ष उपस्थिती, शिक्षक व विद्यार्थ्यांचे गुणोत्तर प्रमाण, उपलब्ध इमारती, वर्गखोल्या, दोन शाळांमधील अंतर लक्षात घेऊन महापालिकेने ३७ शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ मे २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे समायोजन, कागदपत्रे, मूळ रेकॉर्ड, भौतिक साहित्य समायोजित करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेच्या सद्य:स्थितीत १०९ मराठी, ४ हिंदी आणि १३ ऊर्दू माध्यमाच्या अशा एकूण १२६ शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये २९ हजार ०६ विद्यार्थी शिक्षण घेत असून, ९४० शिक्षक अध्यापनाचे काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पडताळणी केली असता या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ही पटावरील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात अत्यल्प असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रतिविद्यार्थी दरमहा दोन हजार रुपयांची बचत होणार आहे. त्याचबरोबर इमारत दुरुस्ती, रिक्त पदे भरणे आदी प्रकारचा खर्चदेखील वाचणार असून, महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना क्रीडांगण, पुरेशा वर्गखोल्या, संगणक सुविधा, डिजिटल रूम उपलब्ध नव्हत्या अशा विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे त्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील, असेही संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे.

शाळा संख्या होणार ८९

महापालिकेच्या शाळांची १२६ असलेली संख्या या निर्णयामुळे आता ८९ वर येणार आहे. येत्या १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, समायोजित विद्यार्थ्यांना १५ जून रोजी संबंधित शाळांमध्ये उपस्थित राहण्याविषयी सूचना दिल्या जाणार आहेत.

या शाळांचा समावेश

या विलीनीकरणात महापालिका शाळा क्रमांक ५१, ८९, ३०, १५, ७१, ९, १२, ९३, ७४, ६४, ६७, ९८, ५९, ६२, १०४, १०५, १११, ११३, १२६, १३३, ५०, ३, २०, १०८, ४८, ६८, ८, ८२, १२५, ९६, ४५, ७०, महापालिका शाळा विद्यानिकेतन १५, महापालिका शाळा विद्यानिकेतन २२, महापालिका शाळा विद्यानिकेतन १४, महापालिका शाळा क्रमांक १२२ चे पहिला ते पाचवीचे विद्यार्थी, महापालिका शाळा क्रमांक १२२ चे सहावी ते सातवीचे विद्यार्थी याप्रमाणे शाळांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images