Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डीजे प्रकरणी २१ मंडळांना दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी २१ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे चालकांवर गुन्हा दाखल केला. मध्यरात्रीच पोलिसांनी डीजे जप्तीची कारवाई केली आहे. आवाजाची मर्यादा भंग केल्याप्रकरणी सलग दुसऱ्या वर्षी पोलिसांनी कारवाई केल्याने डीजे चालकांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी परिमंडळ एकमध्ये १३, तर परिमंडळ दोनमध्ये आठ मंडळांविरोधात कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी डीजेच्या ध्वनीमर्यादेबाबत हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले असून, त्याचे पालन करण्याबाबत पोलिसांनी यापूर्वीच आदेश दिले आहेत. मात्र, वेगवेगळ्या मिरवणुकींदरम्यान कायद्याचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दोन ते तीन वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी सक्त पद्धतीने केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, तसेच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि श्रीकृष्ण कोकाटे यांनी डीजेच्या आवाजाबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केल्या होत्या. मात्र, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणे वाजवले. शहरातील मोठा राजवाडा ते शिवाजीरोड मार्गावरील पारंपरिक मिरवणुकीत सुमारे २० मंडळांनी सहभाग घेतला होता. नाशिकरोड येथे १६ मंडळांचा सहभाग होता. अशा दोन मोठ्या पारंपरिक मिरवणुकांसह नवीन नाशिक, सातपूर व इतर भागात लहान- मोठ्या मिरवणुका झाल्या. या मिरवणुकांमध्ये सहभागी मंडळांना ध्वनिक्षेपकाची परवानगी घेताना पोलिसांनी ध्वनीमर्यादा ठरवून दिली होती. मात्र, मिरवणुकीचा प्रारंभ होताच पोलिसांनी आवाजाची तीव्रता तपासली असता सर्व मंडळांनी ध्वनीमर्यादा ओलांडून अधिक आवाजात गाणी वाजवल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचनादेखील केल्या. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री मिरवणुकीची सांगता होताच पोलिसांनी डीजे जप्तीची कारवाई सुरू केली. १२ ते २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी डीजेसह वाहने जप्त केली. आज, रविवारी सकाळी संबंधित मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. या सर्वांवर कलम २९०, २९१, १८८, १०९, ११४, ३४, १३१, १३४, १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हापुसचे प्रमाण यंदा कमीच

$
0
0

फोटो : सतिश काळे

यंदा हापूस खातोय भाव

उत्पादन तब्बल ७० ते ८० टक्क्यांनी घटले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय तृतिया अवघ्या दोन दिवसांवर आली असून, फळांच्या राजा हापूस बाजारात दाखल झाला आहे. बदलत्या हवामानाचा यंदा हापूस आंब्याला मोठा फटका बसला असून, देवगड आणि रत्नागिरी हापूसचे उत्पादन तब्बल ७० ते ८० टक्क्यांनी घटले आहे. त्यामूळे हापूस यंदा अधिक भाव खात आहे. चार ते सात डझनच्या पेटीमागे ग्राहकांना यंदा एक ते दीड हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

सालाबादाप्रमाणे यंदाही सीबीएस येथील नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या तळघरात कोकण आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.१५) एप्रिल रोजी महोत्सवाला सुरूवात झाली. गतवर्षी आंबा विक्रेत्यांना स्टॉल लावण्यासाठी येथे जागा तोकडी ठरत होती. यंदा मात्र आंब्याचे उत्पादनच घटल्याने विक्रेत्यांची संख्याही ५० टक्क्यांनी रोडावल्याचे पहावयास मिळते आहे. कोकणात मोहोराचे रुपांतर फळात होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळून पडले. त्यानंतर उष्णतेचे प्रमाण वाढल्याने आंब्याचा देठ सुकण्यास सुरूवात झाली. त्यामुळेही आंब्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती येथील स्टॉलधारक विक्रेत्यांनी दिली.

गतवर्षी ज्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी ५०० पेट्या माल आणला होता ते यंदा उणेपुरे ७० ते ८० पेट्या एवढाच माल आणू शकले आहेत. त्यामध्येही विक्रीसाठी आलेल्या देवगड हापूसचे प्रमाण खूपच कमी आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस ४५० ते ९०० रुपये डझन या दराने यंदा विक्री होतो आहे. आवक कमी झाल्याने हापूसचे दर चार ते सात डझनच्या पेटीमागे हजार ते दीड हजार रूपयांनी कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी या महोत्सवामध्ये गर्दी केली. दररोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हा महोत्सव सुरू राहणार असून, सोमवारी (दि.१६ एप्रिल) रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मुख्य उपस्थितीत या महोत्सवाचे औपचारीक उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजक दत्ता भालेराव यांनी दिली.

यंदा हापूसचे प्रमाण ८० टक्क्यांनी घटले आहे. गतवर्षीपेक्षा अक्षय तृतिया यंदा लवकर असून, त्यामुळे देखील हव्या तेवढ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल होऊ शकलेला नाही. तिसऱ्या मोहोराचा आंबा चांगला असेल पण तो पाच मे नंतर बाजारात दाखल होईल. यंदा आंब्याचे प्रमाण मात्र कमीच राहणार आहे.

- दत्ता भालेराव, आयोजक कोकण आंबा महोत्सव

गेल्यावर्षी मी ५०० पेट्या देवगड हापूस विक्रीसाठी आणला होता. यंदा केवळ ७० पेट्या हापूस विक्रीसाठी आणू शकलो. यंदा आंब्याचे उत्पादनच कमी झाले असून पुरेसा माल उपलब्ध नाही. ४ ते ७ डझनच्या पेटीच्या दरात हजार ते दीड हजार रूपये वाढ झाली आहे.

- सागर देसाई, आंबा उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर औद्योगिक वसाहत पोटभाडेकरूंना आंदण!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील औद्योगिक भूखंडांबाबत तक्रारी वाढल्यानंतर 'एमआयडीसी'ने दीड महिन्यापूर्वी सातपूर औद्योगिक वसाहतीत सुरू केलेल्या सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणात पोटभाडेकरू असल्याचे आढळले आहे. 'एमआयडीसी'ने आतापर्यंत ९० टक्के सर्व्हे पूर्ण केला असून, त्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे आढळलेले अनेक बेकायदेशीर प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.

या सर्व्हेमधून प्रत्येक उद्योगाची स्वतंत्र माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतली जात आहे. चार टीमकडून करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये उद्योगांच्या जागेची मोजणी, अतिक्रमण झालेले आहे का, पोटभाडेकरू आहेत का, ज्या उद्योगासाठी भूखंड दिला तो सुरू आहे का, उत्पादनातील वापर, बंद कारखाने आदी बाबींची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. त्यामुळे हा सर्व्हे महत्त्वाचा मानला जात आहे. मार्च महिन्यापासून या सर्व्हेला सुरुवात झाली. सहा दिवसांत हा सर्व्हे पूर्ण करणे अपेक्षित होते. पण, दीड महिन्यानंतरही विविध अडचणींमुळे हा सर्व्हे पूर्ण झालेला नाही. यासाठी सर्व्हेअर कमी पडत असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व्हेमुळे अनेक उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व्हेमध्ये प्रत्येक टीममध्ये सहा ते सात अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांना २०० हून अधिक भूखंडांचे काम दिले आहे. सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी असल्यामुळे हा सर्व्हे अचूक व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक उद्योजकांनी भूखंड औद्योगिक कामासाठी घेतले व त्या जागेवर व्यापारी वापर सुरू केलेला आहे. असंख्य उद्योजकांनी पोटभाडेकरू भरले आहेत. त्यामुळे या सर्व्हेनंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नाशिक औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन उद्योगांना संधी मिळत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक जण ही तक्रार करीत आहेत. त्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली गेल्याने सर्व्हेचे काम सुरू झाले आहे.

अंबडचा सर्व्हे केव्हा?

सातपूर औद्योगिक वसाहतीप्रमाणेच अंबड औद्योगिक वसाहतीचा सर्व्हे केव्हा होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. सातपूरच्या सर्व्हेला जर दोन महिने लागणार असतील, तर अंबडचा सर्व्हे सुरू केल्यानंतर त्यालाही मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सातपूरच्या सर्व्हेमध्ये अनेक उद्योगांना मोठ्या जागा दिल्या असल्या, तरी त्यांचे उद्योग मात्र छोटे आहेत. त्यामुळे उर्वरित जागा पुन्हा ताब्यात घ्यावी, अशी मागणीदेखील होत आहे.

(लीडशेजारी घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चारित्र्यावरील संशयावरून चांदवड येथे भैरवनाथनगर परिसरात राहणाऱ्या रमेश शिंदे (वय २७) याने पत्नीचा चारित्र्यावरील संशयामुळे साडीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी रविवारी दुपारी चांदवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रमेशला अटक केली आहे.

रमेश चांदवड येथे गॅस व स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय करतो. हे कुटुंब जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून रोजीरोटीसाठी चांदवड येथे आले. रमेशला दारूचे व्यसन आहे. तो त्याची पत्नी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. रमेशने शनिवारी सकाळी झोपडीसाठी कुडं आणण्याचे कारण सांगून पत्नीला मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल राजश्रीमागे जागी नेले. तेथे तिचा साडीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी स्वतःचा शर्ट काढून तो प्रेतावर झाकून त्याने पलायन केले. चांदवड पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून रमेशची चौकशी केली, असता त्याने खुनाची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयतृतीयेसाठी बाजारपेठ सजली

$
0
0

अक्षयतृतीयेसाठी बाजारपेठ सजली

नाशिक : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अक्षयतृतीयेसाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली असून, त्यासाठी बाजारपेठ सजली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाला 'कॅश' करण्यासाठी विविध व्यावसायिकांकडून अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. या दिवशी सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने व रिअल इस्टेटमध्ये मोठी उलाढाल होण्याची आशा संबंधित व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कोटीचा निव्वळ नफा

$
0
0

'प्रेस कामगार'ला

चार कोटींचा नफा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड प्रेस कामगारांच्या आयएसपी सोसायटीला २०१७-१८ या वर्षात तीन कोटी ९१ लाख रुपयाचा विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे, सचिव विष्णू जगताप यांनी दिली.

संचालक भगवान मोरे, गणेश काळे, राजेंद्र चंद्रमोरे, साहेबराव गाडेकर, हिरामण आव्हाड, रमेश जाधव, संदीप गांगुर्डे, मंगला खर्जुल, सुनंदा कडाळे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले, की पतसंस्था स्थापन होऊन ५९ वर्षे झाली असून संस्थेला ऑडिटमध्ये सतत अ वर्ग मिळाला आहे. ३१ मार्च २०१८ अखेर भाग भांडवल १९.९६ कोटी असून खेळते भांडवल १९७.९५ कोटी आहे. सभासद संख्या २,६९८ इतकी असून स्वनिधी २७.०६ कोटी आहे. १५७.२७ कोटीस सभासद ठेवी जमा असून ९६.२६ कोटी कर्ज वितरित करण्यात आले. एनपीए शून्य टक्के तर सीडी रेशो ५४ टक्के आहे. संस्थेने तरलतेपोटी ६४.८० कोटीची गुंतवणूक केली आहे. संस्थेचा सीआरआर १.७९ टक्के असून संस्था बँक कर्जमुक्त आहे. चालू वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे नियोजन आहे. संस्था स्थापनेपासून संचालक मंडळाने व्यवसायवृद्धी व सभासद समाधानासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत. सभासदांचे सहकार्य, विश्‍वास व सेवकवर्गाची तत्पर सेवा यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थी सत्कार होतो. सभासदांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सभासदांच्या मागणीचा विचार करून कर्ज मर्यादा १० लाखावरून १५ लाखापर्यंत करण्यात आली आहे. संस्थेस बँको पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत गोरा कुंभारांना शिवसेनेतर्फे आदरांजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

श्री संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्या पुण्यतिथिनिमित्त देवळालीगावात खासदार हेमंत गोडसे व आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

नाशिकरोड बँकचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सुनिता कोठुळे, शिवसेना उपविभाग प्रमुख योगेश शिंदे, किरण डहाले, चंदू

महानुभाव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन दिनेश शिंदे, संतोष शिंदे, काशिनाथ क्षिरसागर, मधुकर शिंदे, शरद शिंदे, अरुण गोरे, सखाहरी जोंधळे, राजेंद्र

शिंदे, तुषार शिंदे, मयूर शिंदे ,प्रतिक शिंदे, केशव शिंदे, वाल्मीक शिंदे, सागर शिंदे, दीपक शिंदे, अजिंक्य शिंदे, नीलेश कोल्हापूरे, आनंद शिंदे, सचिन शिंदे, अमोल अल्हाट, विकास गिते आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक गुन्हेगारीत नगरपाठोपाठ नाशिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी कारवायांसाठी अहमदनगर जिल्हा सर्वांत पुढे आहे, तर त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्याचा क्रमांक लागतो. विशेषत: खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, सरकारी नोकरांवर हल्ले या प्रमुख चार गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली असून, ती चिंताजनक आहे. नाशिकखालोखाल जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. धुळे आणि नंदुरबार हे दोन जिल्हे तुलनेने कमी प्रभावित आहेत.

दोन शिवसैनिकांचे झालेले खून आणि त्यापूर्वी सोनई हत्याकांड, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण यामुळे अहमदनगर जिल्ह्यात गुन्ह्यांचा आलेख विभागात सातत्याने उंचावल्याची बाब समोर आली आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, तसेच नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. २०१७ या वर्षात पाचही जिल्ह्यांचा विचार करता, सर्वाधिक खुनाच्या घटना अहमदनगरमध्ये, तर त्यानंतर नाशिक ग्रामीणचा क्रमांक येतो. या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ९३ आणि ८४ खून झाले. पाचही जिल्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे वाढले असून, १२२ च्या संख्येने अहमदनगर सर्वांत पुढे आहे. नाशिक परिक्षेत्रात २०१७ मध्ये एकूण २२ हजार ४१५ गुन्हे दाखल झाले. यातील ५,६७१ गुन्हे खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, मारहाण आणि सरकारी नोकरांवर हल्ला या प्रकारातील आहेत. बऱ्याच वादावादीच्या प्रकरणांनंतर पोलिस अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण थंड करण्यावर भर देतात. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गट काही वेळ शांत होत असले तरी त्यांच्यातील विस्तव जात नाही. परिणामी, खून किंवा खुनाचा प्रयत्न असे प्रकार घडतात. वास्तविक पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते. पाच जिल्ह्यांत तब्बल ३६६ गुन्हे दाखल झाले आहेत.

गुन्ह्याचा प्रकार-अहमदनगर-जळगाव-नाशिक-धुळे-नंदुरबार-एकूण

खून-९३-५७-८४-४१-३५-३१०

खुनाचा प्रयत्न-१२२-६४-६५-५४-३१-३३६

दंगे-५६१-२५८-४७१-१७८-१२२-१५९०

दुखापत-८८६-६०४-१०३७-३३६-१७५-३०३८

सरकारी नोकरांवर हल्ला-१४६-११७-६८-४९-१७-३९७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका येथील श्री अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने दानपेटीतील रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. शनिवारी चोरीची घटना घडली असून, या प्रकरणी चेरियिल रामय्यन राजप्पन (६५, रा. नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे. मंदिरातील दानपेटीचा पत्रा उचकटून चोरट्याने ४०० रुपये लंपास केले. राजप्पन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक आर. एस. काळोगे तपास करीत आहेत.

किरकोळ वादातून मारहाण

मागील भांडणाची कुरापत काढून पाच जणांनी मिळून दोन भावांसह घरातील इतर तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड परिसरातील स्टेशनवाडी परिसरात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी सुनील बर्वे, तेजस कडवे, आकाश कडवे, हर्षद मोरे आणि ए. मोरे या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. दिलीप हरिभाऊ साळवे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास साळवे घरी असताना, त्यांच्या घरासमोर संशयितांनी वाद घातला. संशयितांनी दिलीप यांना शिवीगाळ केली. दिलीप यांचा भाऊ विनायकने संशयितांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी दिलीप आणि विनायक या दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी घरातील दोन महिलांसह एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक शंकर होनमाने तपास करीत आहेत.

बुलेटसह दुचाकीची चोरी

मुंबई नाकासह इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका बुलेटचा समावेश आहे. सुनील सखाराम कंखरे (रा. बिग बाजार झोन, मूळ, भडगाव, जिल्हा जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची २० हजारांची दुचाकी १३ एप्रिल रोजी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रात्री पावणेदहाच्या सुमारास गोल्फ क्लब ग्राउंडच्या गेटवर घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आवारे तपास करीत आहेत. मेहबूबनगर परिसरातील प्लास्टिक गोडावूनबाहेर बुलेटचोरीचीही घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी शेख रिजवान अब्दुल रौफ याने फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुलेट लंपास केली. इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हवालदार भामरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवासेनेच्या सराव परिक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

$
0
0

\Bयुवासेनेच्या सराव

परिक्षेला प्रतिसाद\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुढील महिन्यात विविध विषयांच्या सीईटी परीक्षा होणार असून, या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी युवासेना, नाशिकतर्फे रविवारी सीईटी सराव परीक्षा घेण्यात आली. कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक कॉलेज येथे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहरात ही परीक्षा घेण्यात आली.

बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी सीईटी परीक्षाचा अभ्यास करण्यात सध्या व्यस्त आहेत. या विद्यार्थ्यांना या परीक्षांचा सराव व्हावा व त्यांनी मुख्य परीक्षेत यश मिळवावे, या उद्देशाने सराव परीक्षा घेण्यात आली. पीसीबी, लॉ, नीट, पीसीएम या विषयांवर ही परीक्षा आधारित होती. यामध्ये आठशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. युवसेनेमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना महानगर प्रमुख आदित्य बोरस्ते यांनी प्रयत्न केले. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, उपमहानगरप्रमुख गणेश बर्वे, विशाल खैरनार आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी सहकारी बँकेतर्फे अभिवादन

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेत अध्यक्ष दिलीप भागवत थेटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शक रमेश राख, महेश आव्हाड, उपाध्यक्ष दीपक अहिरे, संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, बाळासाहेब ठाकरे-पाटील, शिरीष भालेराव, प्रशांत कवडे, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने, संदीप पाटील, प्रवीण भाबड, महेश मुळे, अशोक शिंदे, मंगेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यजीवनावर वास्तुशास्त्राचा प्रभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वास्तुशास्त्र या विज्ञानाचा हजारो वर्षांपूर्वी विस्तृतपणे भारतीय संस्कृतीत अभ्यास केला गेला आहे. वास्तुशास्त्र हे वैदिक शास्त्र असून, वास्तुशास्त्राची निर्मिती मानवी कल्याण व जीवन समर्थ करण्यासाठी झाली आहे, असे प्रतिपादन वास्तुविशारद जयंत बोधे यांनी केले.

आयादि वस्तू व ज्योतिष मार्गदर्शनतर्फे झालेल्या दोन दिवसीय सेमिनारमध्ये बोधे बोलत होते. महाशक्ती ही कालीच्या स्वरूपात, तर शिव हे रुद्र स्वरूपात आल्यामुळे, तसेच प्रारब्धातील संचित कर्मानुसार तयार झालेल्या पत्रिकेमुळे वास्तुदोष तयार होतात. जग हे दोन तत्त्वांमध्ये विभागले गेले आहे आणि ती तत्त्वे म्हणजे शिव आणि शक्ती ही होत, असेही ते म्हणाले. ज्योतिष व वास्तूविषयी आयोजित या सेमिनारमध्ये वास्तुविशारद बोधे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अनेक उपायदेखील सांगितले. याबरोबरच अंकशास्त्र ही एक गूढ विद्या आहे, असेही ते म्हणाले. वास्तुविशारद शुभांगिणी पांगारकर यांनी भूगर्भातील अशुद्ध ऊर्जा याविषयी मार्गदर्शन केले. ऑफिस व प्लॉट यांची वास्तू निवड याविषयी सागर गोसावी यांनी मार्गदर्शन केले. वास्तुविशारद श्यामला वाघ यांनी वास्तुशास्त्रात रंग व चित्र या उपायांनाही महत्त्व आहे, असे सांगताना स्वतः तयार केलेले चित्रकर्म उपस्थितांसमोर ठेवले. श्यामला वाघ यांनी सूत्रसंचालन केले. भावना बोधे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारनगरला मोबाईल दुकानात चोरी

$
0
0

मोबाइल दुकानात चोरी

सातपूर : सातपूर भागातील कामगारनगर येथे मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी १२ लाख रुपयाचे महागडे मोबाइल लंपास केले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगारनगर येथील मोबाइल एक्सपर्टिजचे दुकान असून, शुक्रवारी (दि. १२) रात्री शटरचा पत्रा वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

दुकानातील आयफोन, समसंग या कंपनीचे महागडे ८९ मोबाइल व एक लॅपटॉप असा १२ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. चोरीची घटना

सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भावेश दुगड यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजयकुमार मगर, सहायक आयुक्त सचिन गोरे, पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागातील गुन्ह्यांची संख्याअहमदनगर १८०८नाशिक

$
0
0

विभागातील गुन्ह्यांची संख्या

अहमदनगर १८०८

नाशिक १७२५

जळगाव ११००

धुळे ६५८

नंदुरबार ३८०

एकूण ५६७१

(खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, दुखापत, सरकारी नोकरांवर हल्ला या गुन्ह्यांची एकत्रित आकडेवारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनाचा प्रयत्न; तिघांना कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी तिघा संशयितांना एक वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. ही घटना २७ एप्रिल २०१४ रोजी अमरधामरोड येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती.

अमर कृष्णकांत जंजाळ (२७), विवेक कृष्णकांत जंजाळ (२३) आणि योगेश भाऊसाहेब अमोलिक (२५) अशी शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील अमरधामरोडवर आरोपींचे आणि फिर्यादीचे भांडण झाले होते. जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी शिवीगाळ केल्यानंतर फिर्यादीने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग आल्याने आरोपींनी आपल्याकडील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पाठीवर माने वार केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. के. गायकवाड यांनी केला. सर्व पुरावे संकलित केल्यानंतर या खटल्याची सुनावणी न्यायाधिश शिंदे यांच्या कोर्टात पार पडली. सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी परिस्थितीजन्य पुरावे कोर्टासमोर मांडले. पैरवी सेलचे हवालदार आय. एस. पिरजादे तसेच एस. बी. गोडसे यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. समोर आलेले पुरावे, साक्षीदार या आधारे कोर्टाने तिघा आरोपींना दोषी ठरवत १ वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगणवाडीही आता रडारवर

$
0
0

पालिकेच्या नोटीसमुळे स्थानिकांमध्ये रोष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्पन्न वाढीसाठी चांगलेच झपाटले असून, त्यांनी महापालिकेच्या जागेवर असलेल्या अंगणवाड्यांनाही नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. कन्नमवार पुलाशेजारी असलेल्या एका अंगणवाडीलाच नाशिक पूर्व विभागाने नोटीस बजावत जागा खाली करण्याचे फर्मान काढले आहे. सात दिवसांच्या आत खुलासा केला नाही, तर अंगणवाडी खाली करण्यासाठी खर्चवसुली करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्वमालकीच्या मिळकतींच्या करात वाढ करण्याबरोबरच नूतनीकरण न झालेल्या मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मनपाच्या जवळपास ९०३ मिळकती असून, त्या ताब्यात घेताना अंगणवाडीसाठी देण्यात आलेल्या मिळकतींना देखील नोटिसा पाठविण्यात येत आहेत. कन्नमवार पुलाजवळील संत गाडगे महाराज वसाहतीच्या सर्वे नं. ३९८ मध्ये अनेक वर्षांपासून अंगणवाडी चालवली जाते. या अंगणवाडीत सध्या ३० ते ३५ विद्यार्थी शिकत आहेत. सध्या महापालिकेने स्वमालकीच्या करार न झालेल्या इमारती ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून, त्यात या अंगणवाडीला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा न झाल्यास अंगणवाडी खाली करून घेताना त्याचा खर्चदेखील वसूल करण्याचे नोटिसीत म्हटले आहे. अंगणवाडी महापालिकेचीच असताना कारवाई झाली तरी पालिका कोणाकडून सदरचा खर्च वसूल करेल, असा प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे. या नोटीस सत्रातून अंगणवाड्याही सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातही आता वॉक विथ कमिशनर

$
0
0

नवी मुंबईच्या धर्तीवर राबविणार उपक्रम; शनिवारपासून प्रारंभ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीच्या निर्णयावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह नगरसेवक आणि विविध संघटनांनी आयुक्तांविरोधात संघर्षाची भूमिका घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता थेट जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंढेंनी येत्या शनिवार (२१ एप्रिल) पासून 'वॉक विथ कमिशनर' उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात आयुक्तांकडे थेट तक्रारी करून त्या सोडविण्याचे जागेवरच निर्देश दिले जाणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, या उपक्रमातून नगरसेवकांच्या प्रभागात जाऊन त्यांनाच राजकीयदृष्ट्या आव्हान दिले जाणार असल्याने आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम चांगलाच हिट झाला होता. नाशिकमध्ये आल्यानतर मुंढेंनेही हा उपक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. आयुक्तांच्या करवाढीच्या निर्णयाने शहरभर वातावरण ढवळून निघाले आहे. आयुक्त मुंढे यांनी केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात येत्या २३ एप्रिलला विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. यात नगरसेवकांकडून आयुक्तांच्या भूमिकेला कडाडून विरोध होणार आहे. त्यामुळे महासभेआधीच आयुक्तांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी, २१ तारखेला सकाळी साडेसहा वाजता अनंत कान्हेरे मैदानावर या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. लोकप्रतिनिधी व आयुक्त यांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे नगरसेवकांचा रोष वाढत असताना थेट जनतेच्या दरबारात जावून त्यांच्या तक्रारी उपक्रमाच्या माध्यमातून सोडविण्याची भूमिका घेतल्याने नगरसेवक विरुध्द आयुक्त संघर्ष वाढणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे.

टोकन घ्यावे लागणार

या उपक्रमाची घोषणा करताना आयुक्तांनी प्रशासनासाठी आचारसहिंता आखून दिली असून, या उपक्रमाचा प्रचार, प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात जिथे जिथे हा उपक्रम होईल, त्या भागात होर्डिंगद्वारे माहिती देण्याचे बंधन घातले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळी सहा वाजेपासून नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहेत. उपक्रम स्थळावर पाच बाय दहा फूट आकाराचा लाकडी स्टेज, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफरची व्यवस्था करणे, विभागनिहाय तक्रारींचे चार्ट तयार करणे आदी कामांचे वाटप करण्यात आले आहे. शनिवारपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून उपक्रमाला सकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ गावांना मिळणार तीन लाखांपर्यंत बक्षीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वॉटर कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन म्हणून दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. संबंधित गावांना डिझेलसाठी ही बक्षिसाची रक्कम वापरता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी सोमवारी दिली.

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यात १०० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५१ गावे सिन्नर तालुक्यातील असून, चांदवड तालुक्यातील ४९ गावांचाही या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली असून, ती २४ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने जलसंधारणाचीच कामे होणार आहेत. पाणी अडविण्यासाठी तसेच ते भूगर्भात जिरविण्यासाठीची कामे गावाने स्वयंस्फूर्तीने एकत्रितरित्या करणे अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी निवडलेल्या गावांमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी स्वत: करणार आहेत. या गावांना ते भेट देणार असून, उल्लेखनीय कामे करणाऱ्या गावांना प्रोत्साहन म्हणून दीड ते तीन लाख रुपये इंधनाच्या खर्चासाठी देण्यात येतील, अशी घोषणा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांची धग

$
0
0

टीम मटा

शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला कामगार आणि शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा घोषणांद्वारे निषेध केला. त्याचप्रमाणे महापालिकेने नवीन मिळकतींसह मोकळे भूखंड आणि शेतीवर लावलेल्या भरमसाठ करवाढीविरोधात 'आप'ने महापालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केले, तर 'मनविसे'ने महापालिका प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून निषेध नोंदवला. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता झालेल्या या आंदोलनांची धग शहरवासीयांना दिसून आली.

--

'लाल बावटा' रस्त्यावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. उन्हातान्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला कामगार आणि शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा घोषणाबाजीद्वारे निषेध केला.

सरकारकडे अनेक मागण्या प्रलंबित असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विभागीय मोर्चाची साद दिली होती. मोर्चासाठी नाशिकसह, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर येथून शेकडो महिला आणि पुरुष गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाले. दुपारी एकच्या सुमारास हा मोर्चा गोल्फ क्लब येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. रणरणत्या उन्हात लाल, तसेच जांभळ्या साड्या परिधान केलेल्या महिला, डोक्यावर लाल टोपी, हातामध्ये लाल बावटा व विविध मागण्यांचे फलक घेऊन शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेले शेतकरी व कामगार शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. गोल्फ क्लब मैदान-त्र्यंबक नाका-खडकाळी सिग्नल-शालिमार-नेहरू गार्डन-रेड क्रॉस सिग्नल-एमजीरोड-सीबीएस चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. तेथे प्रवेशद्वारावर सभा घेण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच बैठक मारली. शेतकरी, कामगार, तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

त्यानंतर 'आयटक'चे राज्य सचिव राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने आशा, आशा गटप्रवर्तक, ग्रामरोजगारसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी यांनीही त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनात तुकाराम भस्मे, भास्करराव शिंदे, दत्तात्रय गांगुर्डे, अॅड. राजपाल शिंदे, दत्तू तुपे, व्ही. डी. धनवटे, बाबासाहेब कदम, सुनीता कुलकर्णी, सुवर्णा मेतकर, चित्रा जगताप, माया घोलप आदी सहभागी झाले होते.

...या आहेत प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, वृद्धांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, 'मनरेगा'अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश रोजगार हमी योजनेंतर्गत करावा, आशा, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, ग्रामरोजगार सेवक, घंटागाडी सफाई कामगार, अंशकालीन स्त्री परिचर कामगार आदींना १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे, समृद्धीबाधितांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, 'नारपार'च्या पाणीवाटपात नांदगाव आणि चांदवड तालुक्यांचा समावेश करून समन्यायी पद्धतीने पाणीवाटप करावे, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, आशा व गटप्रर्वतक महिलांना कामाच्या ठिकाणी स्वतंत्र खोली द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, संजय गांधी वृद्धापकाळ पेन्शन रक्कम वाढवावी आणि सरकारी सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे आदी मागण्यांप्रश्नी हे आंदोलन करण्यात आले.

---

'मनसे'चे क्रिकेट खेलो!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळे भूखंड आणि शेतीवर लावलेल्या भरमसाठ कराचे पडसाद शहरात तीव्र स्वरुपात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाविरोधात शहरभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या करवाढीविरोधात शेतकरी संघटित होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पक्षाने थेट रस्त्यावर उतरत करवाढीविरोधात निषेध आंदोलन केले आहे. 'मनसे'च्या विद्यार्थी सेनेच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून करवाढीचा निषेध करण्यात आला.

महापालिका आयुक्तांनी नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्य दरात चारपट वाढ करण्यासह शेतीलाही कर लागू केला आहे. हरित पट्ट्यातील शेती वगळली असली, तरी पिवळ्या पट्ट्यातील शेती आणि जुन्या इमारती व बंगल्याशेजारील सामासिक अंतराच्या जागेत करवाढ लागू केल्याचे आता तीव्र पडता उमटत आहेत. या करवाढीला तीव्र विरोध सुरू झाला असून, शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. पाठोपाठ राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महापालिकेच्या वतीने अवाजवी करवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. शहरातील महाविद्यालये, मराठी शाळेच्या मैदानांवर कर लावल्यास शाळा व महाविद्यालयांकडून तो कर फीच्या स्वरुपात पालकांकडून वसूल केला जाईल. त्यामुळे शिक्षण महागेल अशी भीती व्यक्त करीत, क्रीडांगणे वाचविण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून दरवाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहाराध्यक्ष श्याम गोहाड, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शशिकांत चौधरी, सौरभ सोनवणे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

'आप'ने वाजवले ढोल

महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयास आम आदमी पक्षाच्या वतीने पहिल्या दिवसापासून विरोध करण्यात येत आहे. या करवाढीचा निषेध करण्यासाठी 'आप'च्या वतीने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. जीएसटीमुळे महापालिकेच्या उत्पादनात घट झाली आहे. जीएसटी अनुदानातील दीडशे कोटी रुपयांची तूट येत असल्याने त्या वसुलीसाठी ही घरपट्टी लादण्यात आली आहे. दीडशे कोटींसाठी पाठपुरावा करण्याऐवजी नाशिककरांकडून ते वसूल केले जाणार आहेत. भाडेकरू असलेल्या मिळकतींवर तिप्पट घर आकारणी केल्यास घरमालक व भाडेकरूंची आर्थिक कोंडी होईल. शाळा, मोकळ्या भूखंडांवरील घरपट्टीत वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार असल्याने आयुक्त स्मशानभूमीलादेखील घरपट्टी लावणार का, असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे. पक्षाचे जितेंद्र भावे, जगबीर सिंग, प्रभाकर वायचळे, स्वप्निल घिया, अनिल कौशिक, विनायक येवले, एकनाथ सावळे, गिरीश उगले-पाटील आदींनी संपूर्ण करवाढ मागे घेण्याची मागणी या आंदोलनावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू आपले आदर्श असतात

$
0
0

गुरू आपले आदर्श असतात

विजय कौशल महाराज यांचे विचार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गुरू दलाल नसतात, गुरू दयाळू असतात, गुरू आदर्श असतात. गुरू करावे लागत नाही, ते शोधावे लागत नाहीत. त्यांचे दर्शन केले जाते, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथेच्या पाचव्या पुष्पात ते बोलत होते.

गुरूंच्याजवळ बसल्याने मन शांत होते, मनातील प्रश्नांचे समाधान होते, मन प्रसन्न होते, दुर्गुण सोडण्याची इच्छा होते, असे विचार धनदाई लॉन्स येथे सोमवारी (दि. १६) रोजी झालेल्या श्रीरामकथेत विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. भगवन्त भजन करावेसे वाटते, रडावेसे वाटते, त्यांच्या जवळून उठावेसे वाटत नाही. याशिवाय मोठा गुरू महिमा नाही. प्रभूने मनुष्यास सर्व काही दिले आहे, असेही ते म्हणाले.

प्रेम झाल्यावर मन व्याकूळ होते

शरीर, फळे, फुले, धान्य, सत्संग, दर्शन, तीर्थक्षेत्र असे खूप काही दिले आहे. भगवान प्रतीक्षा केल्याने मिळतो. मात्र, मनुष्य हा परीक्षा करीत बसतो. जसे शबरी प्रभू श्रीरामाची प्रतीक्षा करीत बसली होती. प्रतीक्षा करीत ती म्हातारी झाली होती. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचीच प्रतीक्षा केली जाते, असेही विजय कौशल महाराज यांनी स्पष्ट केले. संबंध होतो तेव्हाच प्रेम होते. ज्याच्याशी प्रेम होते तेव्हा मन बसता, उठता, येता, जाता, बेचैन, व्याकुळ राहते, असेही ते शेवट ते म्हणाले. या कथेतील विविध प्रसंगांना अनुसरून भजन गायनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले होते. भजनांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images