Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महसूलमध्ये लवकरच बदल्या अन् पदोन्नतीही

$
0
0

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूलमध्ये गेल्या काही वर्षांत बदल्या झाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रमोशनमध्ये रिझर्व्हेशन करता येणार नाही या हायकोर्टाच्या निर्णयामुळे बदल्यांबाबत कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु आता पदोन्नतीमधील आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेऊन बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एप्रिल अखेरपर्यंत नायब तहसीलदारापासून अपर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तब्बल दोन हजार अधिकाऱ्यांच्या बदल्या आम्ही करत आहोत, अनेकांना पदोन्नतीही दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली.

महसूल विभागाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या पाटील यांनी 'मटा' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमधील अनेक अधिकारी वर्षानुवर्ष जिल्ह्यामध्येच तळ ठोकून आहेत. अनेकजण पदोन्नतीस पात्र असूनही ती मिळत नसल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी ते म्हणाले, महसूलमधील नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदांपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याने आमच्याकडेही संशयाने पाहिले जाते. परंतु प्रमोशनमध्ये रिझर्व्हेशन नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिल्यामुळे बदल्या आणि पदोन्नतीबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला. नऊ राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. परंतु महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. मागासवर्गीय वगळता इतरांचा या निर्णयाला विरोध होऊ लागला. त्यामुळे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बढतीमधील आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेऊन बदल्या आणि पदोन्नत्या द्या, असा निर्णय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत धुव्वाधार बदल्या होणार असून, अधिकाऱ्यांना पदोन्नत्यांचा लाभही मिळणार असल्याची शुभवार्ता पाटील यांनी दिली. तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याबाबतच्या ऑर्डर निघतील असेही ते यावेळी म्हणाले.

बांधकाम विभागाला लावली शिस्त...

सार्वजनिक बांधकाम विभागात विभागीय अभियंत्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर सरकार काढते. परंतु अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या १०-१० वर्ष होत नव्हत्या. कनिष्ट अभियंता व स्थापत्य अभियंता सहायकांच्या बदल्या मुख्य अभियंत्यांनी कराव्यात असे निर्देश देण्यात आले असून, दोन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होत आहे. या बदल्या मुख्य अभियंता करीत असले तरी त्याची माहिती त्यांनी सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक चंद्राकंत दादा

$
0
0

जिर्णोद्धारासाठी १५ कोटींचा निधी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संत निवृत्तीनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी राज्य सरकार १५ कोटी रूपयांचा निधीसह तांत्रिक मदत करण्याची ग्वाही राज्याचे बांधकाम व महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहिती श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी दिली.

त्र्यंबकेश्वर येथे बुधवारी राज्याचे बांधकाम व महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देवदर्शनार्थ भेट दिली. त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळी ६ वाजेच्या सुमारास आगमन झाले. त्यांनी गर्भगृहात जाऊन अभिषेक पुजा केली. येथे त्यांचे स्वागत नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, नगरसेवक तथा विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक शामराव गंगापुत्र, विश्वस्त ललिता शिंदे आदिंनी केले. विश्वस्त ललिता शिंदे यांनी पुजेनंतर येथील ट्रस्टच्या जमिनींच्या घोटाळयांचे प्रकरण त्यांच्या कानावर घातले. तेव्हा आपण चौकशी करणार आहोत, असे सांगितले. छावा संघटनेने निवेदन दिले ते त्यांनी स्विकारले. त्यानंतर त्यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात संजीवन समाधीची सपत्नीक पुजा केली. येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय धोंडगे आणि सचिव पवन भुतडा, विश्वस्त व पुजारी जयंत महाराज गोसावी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा वाऱ्यावर

$
0
0

मालेगाव महासभेत रुग्णवाहिकाचा विषय गाजला

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या जुन्या सभागृहात बुधवारी आयोजित महासभेत रुग्णवाहिकाची दूरवस्था, शौचालयची दुरुस्ती, संकीर्ण कर वसुलीचा ठेका आदी विषय गाजले. महापालिकेच्या केवळ दोनच रुग्णवाहिका असून, त्या सध्या कार्यरत नसल्याने नागरिकांना सेवा मिळणार कशी? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. शहरातील १९ शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असल्याने मक्तेदार शौचालय दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

येथील महापालिकेच्या जुन्या सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त अंबादास गरकल, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेच्या प्रारंभीच सत्ताधारी नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी रुग्णवाहिकांचा मुद्दा उपस्थित केला. दोनच दिवसापूर्वी मुंबई येथे जात असताना पालिकेच्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला तर दुसरी रुग्णवाहिका नादुरुस्त असून तिचे बिल अदा करण्यात न आल्याने ती देखील कार्यरत नाही. अशा परिस्थितीत शहररातील गोरगरीब जनतेस रुग्णवाहिकेच्या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. दुरुस्तीस असलेल्या रुग्णवाहिकेचे बिल अद्याप अदा का करण्यात आले नाही? तीन रुग्णवाहिका चालक असताना देखील एका चालकास आठ आठ तास ड्युटी का? असा सवाल उपस्थित करीत प्रशासनास धारेवर धरले. यावर महापौर शेख यांनी दुरुस्तीस असलेल्या रुग्णवाहिकेचे बिल तत्काळ अदा करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. मागील महासभेत चार नव्या रुग्णवाहिका घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून, त्यावर देखील कारवाई करावी असे आदेश दिलेत.

शहरातील शौचालय, रुग्णवाहिका यासह महापालिकेत ठेका पद्धतीने कर्मचारी नेमणूक, संकीर्ण कर वसुली या विषयांवर चर्चा झाली. यात बाजार फी खासगी लोकांकडून केली जात असल्याचा आरोप नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी केला. तर पालिका प्रशासन स्वतः अस्थापना खर्च वाढवत असून, कर्मचारी ठेकापद्धतीने भरण्यास त्यांनी विरोध दर्शवला. यावेळी चर्चेत नगरसेवक युनुस इसा, डॉ. खालिद परवेज, ज्योती भोसले, नीलेश आहेर, भीमा भडांगे, विठ्ठल बर्वे, सलीम अन्वर, बुलंद इक्बाल आदींनी सहभाग घेतला.

शौचालयकडे मक्तेदारांचे दुर्लक्ष

महासभेत यानंतर नगरसेवक मोह. सुलेमान यांनी स. न. ५५ मधील शौचालयांच्या अवस्थेवर प्रकाश टाकला. मक्तेदार याकडे लक्ष देत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर सभागृहात सर्वच नगरसेवकांनी आपापल्या भागातील सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. शहरात १९ शौचालये मक्तेदार पद्धतीने दिले असून, त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक होत प्रश्न विचारले. याबाबत शहर अभियंता बच्छाव यांनी संबंधित मक्तेदारास वीस दिवसांची मुदत देण्यात आली असून, दुरस्तीचे काम केले जाईल असे स्पष्टीकरण दिले.

सभागृहात दोनवेळा मतदान

बुधवारी झालेल्या सभागृहात सर्वे न. १६३ व १६० या जागा एका संस्थेस उद्यान विकसित करण्यास देण्याचा प्रस्ताव आला. यावर विरोधी महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांनी जोरदार विरोध दर्शविला. सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नाही असा आरोप नेहमीच होत असल्याने यावेळी महापौर शेख यांनी या प्रस्तावांवर मतदान घेतले. त्यामुळे सभागृहात दोन वेळा मतदान होवून बहुमताने हे दोन्ही प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरीही रिचले मद्यांचे पेग!

$
0
0

मंदीचे सावट असूनही विक्रीत तुरळक घट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदी, जीएसटीसह विविध करपद्धतीत व कायद्यात बदल झाल्याने उद्योग व व्यापार क्षेत्रात मंदीचे सावट आहे. पण, गेल्या आर्थिक वर्षात पाच महिने निम्म्याहून अधिक दुकाने बंद असूनही दारुच्या विक्रीत फारसा फरक पडला नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी दारू व वाईनच्या विक्रीत फक्त २ ते ८ टक्केच घट झाली आहे. बिअरची विक्री मात्र २१ टक्क्यांनी कमी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटरवर मद्य दुकानांना बंदी केल्यानंतर मार्च २०१७ मध्ये जिल्ह्यात १,११६ पैकी फक्त ३५३ दुकाने सुरू होती. त्यानंतर पाच महिन्यानंतर महापालिका व नगरपालिक क्षेत्रातील दुकाने सुरू झाली. आता ग्रामपंचायत क्षेत्रातील दुकाने हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ १३४ दुकानांचा या निर्णयाचा फटका बसणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे दारू विक्रीत मोठी घट होणे अपेक्षित होते. परंतु, त्यात फारसा फरक नसल्याचे आकडे समोर आले आहेत.

देशी-विदेशी दारू विक्रीची घट तुरळक

२०१६-१७ मध्ये देशी दारुची विक्री १ कोटी ८३ लाख ५० हजार २६४ लिटर होती. पण, २०१७-१८ मध्ये ही विक्री १ कोटी ७९ लाख ६० हजार ८५६ लिटर झाली. केवळ ३ लाख ८९ हजार ४०८ लिटर दारू कमी विकली गेली असून तिची टक्केवारी २.१२ टक्के आहे. विदेशी दारुची विक्रीही गेल्या वर्षाच्या तुलनेत ७.९२ टक्केने घट झाली असून ती तुलनेत खूपच कमी आहे. या आर्थिक वर्षात ८१ लाख ३९ हजार ३१८ लिटर या दारूची विक्री झाली आहे. २०१६-१७ मध्ये ही विक्री ८८ लाख ३९ हजार ८१८ होती.

बिअर विक्रीला फटका

देशी व विदेशी दारूच्या विक्रीत मोठा फरक पडला नसला तरी बिअर विक्री मात्र मोठी घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये बिअरची विक्री १ कोटी १९ लाख ३४ हजार ६२१ लिटर होती. २०१७-१८ मध्ये ही विक्री ९३ लाख ४० हजार २१७ लिटर झाली आहे. जिल्ह्यात वाईनच्या विक्रीतही फारसा फरक पडला नाही. तिच्या विक्रीत ५.२५ टक्के घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये वाईनची विक्री ५ लाख ८५ हजार १५६ लिटर होती. या आर्थिक वर्षात वाईन ५ लाख ५४ हजार ४२८ लिटर विकली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५७ कांदा शेतकऱ्यांची ३२ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील तीन कांदा व्यापाऱ्यांनी शहर परिसरासह नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील १५७ शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाख ४३ हजार १९७ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बाजार समितीतर्फे मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड बाजार समितीत केवळ शहरच नव्हे तर वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकरी कांदा, मका, भाजीपाला यासह इतर शेतमाल लिलावासाठी घेऊन येतात. शेतमाल मिळाल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांना कधी रोख तर कधी चेकने पैसे अदा करतात. बाजार समितीतील अंबादास लष्करे (चामुंडा इंटरप्रायझेस), सागर गुंजाळ (शशिकांत ट्रेडिंग कंपनी), मनोहर गोसावी (श्रीहरी ओम ट्रेडर्स), राजू दातकर व मोहनलाल चौधरी या पाच व्यापाऱ्यांनी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये कांदा खरेदी करीत १५७ शेतकऱ्यांना चेक दिले. शेतकऱ्यांनी ते चेक आपापल्या बँक खात्यांमध्ये जमा केले; मात्र व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने चेक बाउंस झाले. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना माहिती दिली. लवकरच तुमचे पैसे अदा करू, असे या व्यापाऱ्यांनी आश्वासन दिले. परंतु, वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या. बाजार समिती प्रशासनानेही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनी काही मुदत मागितली. मात्र, त्यानंतरही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे अखेर या व्यापाऱ्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

... अन्यथा सोमवारपासून उपोषण

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. त्यांनी १५ तारखेपर्यंत पैसे अदा न केल्यास सोमवार, १६ एप्रिलपासून बाजार समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार संजय पवार, नागापुरचे माजी सरपंच अशोक पवार यांच्यासह इतरांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसम चौपाटीलासमाजकंठकांचे ग्रहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मोसम नदीची स्वच्छता व सुशोभीकरण करून उभारण्यात आलेल्या आलेल्या मोसम चौपाटीची शहरातील समाजकंटकांनी नासाधूस केली आहे. चौपाटीवर असलेल्या वस्तू, मनोरंजनाची खेळणी चोरीस जात असल्याचा प्रकार रोजच घडत आहे. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून युवा सेनेने पुढाकार घेत ही चौपाटी साकारली आहे.

शहरातील मोसमपुलानजीक मोसम चौपाटी साकारण्यात आली आहे. दिमाखदार सोहळ्यात या चौपाटीचे लोकार्पणही झाले. त्यानंतर रोजच सायंकाळी येथे नागरिकांची गर्दी होत असून, चौपाटीचे स्वागतच होत आहे. शहरातील लहान मुले, वृद्ध, महिला यांना क्षणभर विरंगुळा म्हणून चौपाटीस लोकांची पसंती मिळत आहे. असे असताना शहरातील काही अज्ञात समाजकंठकांकडून येथील साहित्याची तोडफोड, चोरी होत आहे. चौपाटीवर बसविण्यात आलेला शेतकऱ्याचा पुतळा चोरीला गेला असून, रिक्षा, रंगीत टायर्स, यंत्रमाग मशिनची तोडफोड करण्यात आली आहे. चौपाटीवर अशा प्रकारे तोडफोड व चोरी झाल्याच्या घटनेने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, आता चौपाटीचे व्यवस्थापन व देखरेखीच प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. पालिका आयुक्तांनी सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकर घेण्याचे आवाहन केले असले तरी याबाबत कारवाई झालेली नाही. तर लोकार्पण सोहळ्यात भुसे यांनी चौपाटीचे सौंदर्य टिकून राहावे यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आर्मस्टाँग’चा प्रतीकात्मक ताबा

$
0
0

\Bथकीत कर्जामुळे नामकोची कारवाई

पंकज, समीर भुजबळ संचालक

\B

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चन्ट बँकेचे थकीत कर्ज न फेडल्यामुळे आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीचा प्रतीकात्मक ताबा जाहीर नोटीस देऊन बँकेने घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व केसकर सत्येन आप्पा हे या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीवर ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांचे कर्ज थकीत आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ओढा येथे ही कंपनी आहे. बँकेने या अगोदर १ एप्रिल २०१७ पासून कर्ज संपूर्ण परतफेड होईपर्यंतच्या तारखेपर्यंतचे व्याज व इतर खर्चाची रक्कम मागणी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आता भरण्यास कळवले होते. पण, या नोटीसनंतर हे कर्ज न फेडल्यामुळे बँकेने जाहीर नोटीस देऊन या कंपनीचा ताबा घेतला आहे. या कर्जावर दिलीप खैरे, विशाखा पंकज भुजबळ, नितीन राका, शेफाली समीर भुजबळ हे जामीनदार आहेत. या कंपनीची जागा शेफाली समीर भुजबळ यांच्या नावावर असून, ती ४२५० चौरस मीटर आहे. तर ऑफीस क्षेत्र हे ६००.४७ चौरस मीटर आहे. मर्चन्ट बँकेने थकबाकीसाठी मोहीम उघडली असून त्यात, भुजबळ यांच्या कंपनीचेही नाव पुढे आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात छगन भुजबळ व समीर भुजबळ हे अटकेत आहे. त्यातच थकीत कर्जापोटीची बँकेने घेतलेला प्रतीकात्मक ताबा त्यांच्या अडचणीत वाढ करणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगल फॉर्मला शाळांचा ठेंगा

$
0
0

मुदतवाढ देण्याची शिक्षण विभागावर नामुष्की

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय कामकाज पेपरलेस होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'गुगल फॉर्म'ला प्रचार, प्रसाराअभावी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गुगल फॉर्मवर माहिती भरण्यास २० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असली तरी तशा स्पष्ट सूचना शाळांना प्राप्त झालेल्या नव्हत्या. त्यामुळे गुगल फॉर्म या गुगल विकसित सेवेकडे अनेक शाळांनी दुर्लक्षच केले. शाळांना माहिती भरण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून शाळांशी निगडीत माहिती सर्व आवश्यक माहिती त्यात भरणे बंधनकारक असणार आहे.

शालेय शिक्षण विभागांतर्गत सरकारला आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्याकडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सूचना जारी केल्या जातात. या सूचना कागदपत्रांद्वारे शाळांपर्यंत पोहोचवणे असो किंवा त्यानंतरच्या माहितींचे संकलन असो यामध्ये सर्वांचाच मोठा वेळ खर्ची होत असतो. हा वेळ वाचवून आवश्यक माहिती तत्काळ संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी गुगलद्वारे विकसित केलेल्या गुगल फॉर्मचा लाभ घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची व्यापक स्वरुपात प्रसिद्धी न केल्या गेल्यामुळे शाळांनी या सेवेवर आपली माहिती अद्याप संकलित केलेली नाही. अशा शाळांनी ३० एप्रिलपर्यंत माहिती भरण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

३० एप्रिलपर्यंत मुदत

स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या नवीन शाळा सुरू झाल्या आहेत की नाही याविषयीची माहिती शिक्षण विभागाला हवी आहे. ज्या शाळा माहिती भरणार नाही त्यांना शाळेची गरज नाही असे समजून त्यांना दिलेली परवानगी रद्द झाल्याचे समजण्यात येणार आहे. त्यामुळे या शाळांना ३० एप्रिलपर्यंत वेळेत माहिती भरणे आवश्यक असणार आहे. गुगल लिंकबाबत अडचण असल्यास जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी केले आहे.

या लिंकवर भरा माहिती

शाळांना http://goo.gl/forms/7UkfADDgPie34lcol या लिंकवर तर राज्यातील विनाअनुदानित शाळांनी http://http://goo.gl/forms/ho2Qx4g5v0ntwao82 या वेबसाइटवर माहिती भरायची आहे. २ मे २०१२नंतर नियुक्त केलेल्या परंतु चौकशीत असलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यताप्रकरणी शाळा, मुख्याध्यापकाची माहिती http://goo.gl/forms/FHClnF62iu2AReBI2 या वेबसाइटवर माहिती भरायची आहे. तर संस्थांनी नियुक्त केलेल्या परंतु वैयक्तिक मान्यता प्रलंबित असलेल्या शाळा मुख्याध्यापकांनी http://goo.gl/forms/1JrHt91yJVolkadd2 या वेबसाइटवर माहिती भरायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शोभायात्रेमध्ये ‘जय जोती, जय क्रांती’चा गजर

$
0
0

(फोटो : पंकज चांडोले)

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची १९१ वी जयंती शहरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जय जोती, जय क्रांतीचा गजर करण्यात आला.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री १२ वाजता शहरातील गणेशवाडी, टाकळी रोड, सिन्नरफाटा, महालक्ष्मी चाळ, फुले मंडई येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांचा जयघोष करण्यात आला. जुने नाशिक येथील महालक्ष्मी चाळ येथील बुधवारी जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मान्यवरांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या बग्गीमध्ये महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेषभूषा केलेले युवक युवती बसले होते. या शोभायात्रेत फेटेधारी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सहभागी झालेल्या प्रत्येकाचा फेटा बांधून सन्मान करण्यात येत होता. मिरवणुकीत 'महात्मा' असे लिहिलेला मोठा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पाथर्डी फाटा येथील महात्मा फुले विचार मंचचा चित्ररथ सुरुवातीला होता. संत सावतामाळी फाउंडेशन त्यानंतर दंडे हनुमान मित्रमंडळाचा चित्ररथ असे तीन चित्ररथ रहभागी झाले. चित्ररथात महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा विराजमान केला होता. दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे मर्दानी खेळ सादर करण्यात आले. शोभायात्रा पंचवटीतील गणेशवाडी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ विसर्जित झाली. सातपूर परिसरातही शोभायात्रा काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लग्न जमण्याच्या आशेने एका अविवाहित महिलेने आपले नाव विवाहासंदर्भातील वेबसाइटवर नोंदविले होते. या माहितीच्या आधारावर ओळख झालेल्या व्यक्तीने वेळोवेळी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन या अविवाहितेकडून सुमारे साडे सात लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दिलेल्या फिर्यादीनंतर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक पुणे महामार्गावर राहणाऱ्या एका अविवाहित महिलेने आपले लग्न जमावे या आशेने विवाहासंदर्भातील एका वेबसाइटवर नावनोंदणी केली. या माहितीच्या आधारे या विवाहितेस अंकित वर्मा (पूर्ण नाव व पत्ता फिर्यादीस माहित नाही) या व्यक्तीने प्लस १५ ने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत ओळख निर्माण केली. या संशयित व्यक्तीने या अविवाहितेस मागील आठवड्यात मंगळवारी (दि.३) ते गुरुवारी (दि.५) या काळात वेगवेगळे बँक खात्याचे नंबर देत पैसे भरण्यास सांगितले. लग्न होण्याच्या आशेने या अविवाहितेने पेठ नाका येथील भारतीय स्टेट बँक येथून वेळोवेळी या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात सुमारे सात लाख ५७ हजार पाचशे रुपये भरणा केला. बँक खात्यात पैसे वर्ग झाल्यानंतर या संशयित व्यक्तीने संपर्क करणे बंद केले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे या महिलेस लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी पंचवटी ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीची चोरी

नाशिकरोड : शिवाजीपुतळा येथे उड्डाणपुलाखाली उभी केलेली मोटारसायकल अज्ञात इसमांनी चोरून नेल्याप्रकरणी शरद जगन्नाथ गिते (वय ३३, रा. ग्रीन सँडो सोसायटी, नेहरुनगर, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शरद गिते यांनी आपली हिरो होंडा कंपनीची चाळीस हजार रुपयांची मोटारसायकल (एमच १५ एफ एक्स २९५६) उड्डाणपुलाखाली उभी करून ते भाजीपाला खरेदीसाठी गेले. खरेदी करून आल्यावर त्यांना दुचाकी जागेवर मिळाली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतर दुचाकी न मिळाल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन विभागाचे नाशिकरोडला मॉकड्रिल

$
0
0

नाशिकरोड : अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त नाशिकरोड अग्निशमन केंद्रातर्फे आर्टिलरी सेंटर रोडवरील साईश्रद्धा हॉस्पिटल येथे बुधवारी मॉकड्रिल घेण्यात आले. लीडिंग फायरमन एस. बी. निकम, एम. एन. मधे, एस. के. गायकवाड, फायरमन पी. जी. कर्डक, एस. के. आडके, आर. बी. आहेर, आर. आर. काळे, एस. एस. नागपुरे आणि आर. एन. दाते यांनी या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले. एखादी आकस्मित दुर्घटना घडली तर अग्निशमन दल सुसज्ज असल्याचे यातून सिद्ध झाले. याप्रसंगी नागरिकांनीही प्रात्यक्षिके बघण्यासाठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम डायरी

$
0
0

मद्यासाठी महिलेवर ओतले पेट्रोल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्य सेवनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून महिलेला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतल्याची घटना संत कबीरनगरमध्ये घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

गणेश दशरथ उफाळे (रा. संतकबीरनगर,गंगापूररोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. चंद्रभागा मेढे (वय ३९) या महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित उफाळे सोमवारी (दि. ९) सायंकाळी महिलेच्या परतवाडी चौकातील घरी गेला. तिच्याकडे मद्यासाठी पैसे मागितले. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिला. संशयिताने तिला शिवीगाळ व बेदम मारहाण केली. सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून पोबारा केला. ही महिला संशयिताची जवळची नातलग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेची पोत खेचली

नाशिक : शतपावली करणाऱ्या महिलेची सोन्याची पोत हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. गंगापूर रोड जवळील आकाशवाणी केंद्र परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा सुनील सूर्यवंशी (वय ४०, रा. जाधवमळा, गंगापूर पोलिस ठाण्याजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्या मंगळवारी (दि. १०) रात्री शेजारी राहणाऱ्या महिलेसमवेत शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या. रात्री सव्वा नऊच्या सुमारास आकाशवाणी केंद्रासमोरून पायी जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील २८ हजार रुपययांची सोन्याची पोत हिसकावून नेली.

सिडकोत भरदिवसा घरफोडी

नाशिक : सिडकोतील राजरत्ननगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये सोने चांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये रंजना राजेंद्र पवार यांनी तक्रार दिली आहे. त्या मंगळवारी (दि. १०) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडल्या. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व बारा हजाराची रोकड असा सुमारे ६० हजाराचा ऐवज चोरून नेला.

रिक्षाच्या धडकेने मृत्यू

नाशिक : भरधाव ऑटोरिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिरेंद्र रामदेव पंडित (वय ५१, रा. श्रमिकनगर, सातपूर) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीएट कंपनीजवळ अपघात झाला होता. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंडित हे मंगळवारी (दि. १०) रात्री सीएट कंपनी समोरून जात होते. त्यावेळी रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कार्यालयात चोरी

नाशिक : हिंदुस्थान क्रेन कार्यालयातून चोरट्यांनी रोकडसह चांदीचे शिक्के चोरून नेले. ही घटना वडाळानाका भागात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलिम सदरूद्दीन टारवाला (रा. टाकळीरोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. टायरवाला यांचे वडाळानाका भागातील आशा आर्केड या इमारतीत हिंदुस्थान क्रेन नावाचे कार्यालय आहे. सोमवारी (दि. ९) रात्री चोरट्यांनी कार्यालयाच्या गाळ्याचे कुलूप बनावट चावीने उघडले. ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक केंद्रातून मिळेना सेवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

स्टेट बँक ऑफ इंडियाचे देवळा येथील ग्राहक सेवा केंद्र १ एप्रिलपासून बंद असल्याने बँकेशी संलग्न असलेल्या सर्व ग्राहकांसह जनधन योजना, पेन्शनर्सच्या खातेदारांचे हाल होत आहे. स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची नाळ राष्ट्रीयकृत बँकांशी जोडली जावी म्हणून २०१० पासून सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी दोन हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहे. जनधन योजना असो किंवा शालेय विद्यार्थ्यांचे नवीन खाते उघडणे, निराधारांचे मानधन, निवृत्त कर्मचाऱ्यांची कामे तसेच पैशांचा भरणा करून घेणे आदी कामे ग्राहक सेवा केंद्रातून केली जात होती. बँकेतील बहुतांश कर्मचारी परप्रांतीय असल्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा ग्राहक सेवा केंद्राला ग्राहकांनी पसंती दिली होती. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवळा येथील कर्मचाऱ्यांचा बराचसा त्रास कमी झाला होता. मात्र देशभरातील सर्व ग्राहक सेवा केंद्रे बंद करण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतल्याने ग्राहकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवळा येथील ग्राहक सेवा केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार यांच्यासह ग्राहकांनी केली आहे.

राष्ट्रीयकृत बँकेत आर्थिक व्यवहार करताना, नवीन खाते उघडताना ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राचा मोठा फायदा होत आहे. मात्र अनेक वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आम्ही ग्राहकांना सेवा देत आहोत. मात्र स्टेट बँकेने १ एप्रिलपासून देशातील सर्वच ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

-रवींद्र गुंजाळ, संचालक, ग्राहक सेवा केंद्र, देवळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिकायत-ए-हस्ती : तन्वी अमितसुनी

$
0
0

हिकायत-ए-हस्ती :

तन्वी अमित

सुनी हिकायत-ए-हस्ती तो दरमियाँ से सुनी

न इब्तिदा की ख़बर हैं न इंतिहा मालूम

अस्तित्वाचा, आयुष्याचा किंवा एकुणातच या कालप्रवाहाचा (हिकायत-ए-हस्ती) एक लहानसा अधलामधला भाग फक्त माझ्या परिचयाचा आहे. या प्रवाहाची सुरुवात (इब्तिदा) आणि अंत (इंतिहा) याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञ आहे. दोन ओळी, काही मोजके शब्द आणि एक परिपूर्ण आशयगर्भ तत्त्वज्ञान स्वत:त प्रभावीपणे सामावणारे हे असे शेर ऐकल्या ऐकल्या मनात पक्के रुजतात. जागृतीच्या विचारांचा एक भाग होत जातात.

हिकायत-ए-हस्तीचा हा अवाढव्य पसारा सामान्य नजरेच्या आवाक्याच्या कित्येक योजने दूर, आपलं अस्तित्व या अनंत विश्वातला एक कणभर फक्त, हे विचारांच्या पातळीवर जाणवलं, मान्य केलं तरी जगण्याच्या ओघवत्या रेट्यात कळत नकळत अवघं विश्व म्हणजे केवळ आपण आणि आपला भोवताल असं आटून जातं. अस्तित्वाचं असं संपूर्ण भान नसणं हे आपल्या नजरेचं तोकडेपण किंवा जाणीवेचं अलगद हरपत जाणं, हे हा पसारा पुढे रेटण्याच्या योजनेतला एक रचनात्मक भाग असं असावं काहीसं.. कोण जाणे, पण होतं असं हे मात्र खरं!

छोटंसं आयुष्य मोठमोठ्या ध्येयांभोवती बांधलं जातं. राग, लोभ, हेवा, आनंद, दु:ख काय काय व्यापून उरतं माणसांना. लहान असताना बरचसं सोपं वाटणारं शहाणपण मोठं होत काठिण्याची नवनवी पातळी गाठत जातं, असण्याच्या जाणीवेतला 'मी' घट्ट रुजतो आणि त्याची पाळंमुळं खोलवर रुजत जातात. 'उम्र भर मिलने नहीं देती अब तो रंजिशें, वक़्त हम से रुठ जाने की अदा तक ले गया', असे नकळत बदल होत जातात.

वक़्त की मौज हमें पार लगाती कैसे

हम ने ही जिस्म से बाँधे हुए पत्थर थे बहुत

असं काहीसं होत जातं आपलं. 'वक़्त' नावाचा हा गुरू सतत गुरुदक्षिणा घेत नवनवे धडे देत जातो. 'तमन्नाओं में उलझाया गया हूँ, खिलौने दे के बहलाया गया हूँ' असे सगळेच निघतात एका वाटेवर.

कालचंच जगणं आज असतं बरेचदा तरी त्याचे अन्वय नवे. व्यापकातून वैयक्तिक असा प्रवाह वळतो. प्रत्येकाचा वेग वेगळा आणि जगण्यातला आवेग वेगळा. उत्कट उर्मीची व्याख्या सतत बदलती. ढोबळ मानाने समान वाटणाऱ्या आयुष्याच्या टप्प्याला जरा उलगडू जाता अनेक अंत:स्वर ऐकू येतात. ही वाट चालणारा प्रत्येकजण वेगळा, प्रत्येकातच एक अवघं विश्व सामावलेलं. अनुभव वेगळे, निर्णय वेगळे, परिणामांना सामोरं जाणं वेगळं. खूप कमावलं, खूप गमावलं तरी आयुष्य नावाच्या कोड्याची उकल रोज नव्याने करावी लागते. या वाटेवर कित्येकदा कोसळतो आपण आणि स्वत:च्याच असण्याचे विखुरलेले तुकडे स्वत:च सावरून एकत्र करतो. दरवेळेस त्यांच्या उचलण्याच्या क्रमानुसार घडतो एक नवेच आपण. आयुष्यातल्या जमाखर्चाचा ताळेबंद स्वत:शी मांडता यावा असा विसावता क्षण येतो तेव्हा चाललेल्या वाटेकडे बघताना धामणकरांच्या ओळी आठवतात-

तुझ्या इच्छेप्रमाणेच

वणवण केल्यानंतर

जरा मागे वळून पाहिले तर

या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना

यदृच्छ्या चिकटलेल्या परागकणांतून

बरेच काही उगवून आलेले….

इथे गर्दीतूनही एकटेपण येऊन पुन्हा पुन्हा खुणावू लागतं, 'मी' ची धडपड, पडझड समंजस सजगतेने उमजत जाते. हा प्रवास प्रातिनिधिक एकटेपणातून पुन्हा सगळ्यांचा व्हावा असा वळत जातो. या बिंदूवर वाटा पुन्हा एकवटतात, जगण्याच्या आकाशात कमी अधिक उंचीवर भरारी घेणारे सगळेच पुन्हा आरंभाशी एकवटतात, 'हजारों साल सफ़र कर के फिर वहीं पहुँचे, बहुत जमाना हुआ था जमीं से चले'. 'मी' ची इथे पुन्हा गाठ पडते आणि एक शांत प्रगल्भ ओळखीचं छानसं हसतो आपण एकमेकांशी, 'हिकायत-ए-हस्ती' नावाची गंमत स्वत:त अनेक रहस्य दडवून आहे ही जाणीव मनात असताना शेर पुन्हा सामोरा येतो आणि म्हणतो,

न इब्तिदा की ख़बर है न इंतिहा मालूम

रहा ये वहम के हम है, सो ये भी क्या मालूम!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेनस्नॅचिंग सांजवेळी जोमात

$
0
0

नाशिक पोलिसांनी शोधला चेन स्नॅचर्सचा ट्रेंड


म. टा. प्रतिनिधी, नाशिक


सायंकाळी सहा ते रात्री १० या वर्दळ असलेल्या वेळेतच चेन स्नॅचर्स महिलांना लक्ष्य करतात. मुंबई नाका, इंदिरानगर आणि पुढे उपनगर अशा हायवेलगत परिसरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सौभाग्य लेणे हिसकावून चोरटे अंधारात गुडप होतात.

शहरात २०१७ या वर्षात चेन स्नॅचिंगच्या १०२ घटना घडल्या आहेत. यातील सर्वाधिक घटना सायंकाळी ६ ते ८ आणि ८ ते १० वाजेदरम्यान अशा चार तासात झाल्या आहेत. वास्तविक ही वेळ वर्दळीची मानली जाते. मात्र हीच वेळ चोरट्यांच्या फायद्याची ठरल्याचे दिसते. हायवेलगत असलेल्या रहिवाशी भागातील रस्त्यांवर एकट्या किंवा ग्रुपमध्ये असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला गेला.

याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले की, संध्याकाळी ६ ते रात्री १० या चार तासात ४५ चेन स्नॅचिंग झाल्या. यातील बहुतांश चेन स्नॅचिंग हायवेलगत झाल्या आहेत. याबाबत जिओ मॅपिंगदेखील करण्यात आले असून, इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील वडाळा पाथर्डी रोड, कलानगररोड, बजरंग सोसायटी रोड अशा ठिकाणी या घटना घडल्या आहेत. तेच मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतील गोविंदनगर, अशोक मार्ग, भाभानगर आणि पुढे उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतदेखील हायवे किंवा हायवेपासून जवळ असलेल्या रस्त्यांवर चेन स्नॅचिंग झाल्या आहेत.

नेमक्या सायंकाळच्या सुमारास महिला कामावरून परतात, देवदर्शनासाठी मंदिरात जातात, काही जेवण केल्यानंतर शतपावलीसाठी घरातून बाहेर पडतात. अंगावर दागिने असले की संधीच्या शोधत असलेले चोरटे संधी साधतात. यासाठी महिलांनी शक्यतो जास्त दागिने परिधान करू नये. दागिने असल्यास शक्य ती काळजी घ्यावी, असे नखाते यांनी स्पष्ट केले.

महिलांनी घ्यावी काळजी

सध्या काही दिवसांपासून एक आरोपी रात्री ८ ते १० या वेळेत चेन स्नॅचिंग करतो आहे. काळ्या तसेच लाल रंगाची दुचाकी वापरणारा चोरटा शतपावलीसाठी निघालेल्या किंवा थोडाफार अंधार असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट करतो. कधी हेल्मेट तर कधी स्कार्फ बांधलेला चोरटा शक्यतो समोरील बाजुने येऊन चेन ओढतो. या आरोपीने आजवर वेगवेगळ्या ठिकाणी स्नॅचिंग केली असून, पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. हायवेलगत परिसर असलेल्या रहिवाशी भागातील महिलांनी थोडीशी काळजी घेतली. तसेच या भागातील तरूणांनी अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवल्यास फायदा होऊ शकतो. सीसीटीव्ही हा एक चांगला पर्याय असून, त्याचाही वापर वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेबल टेनिस बातमी

$
0
0

मनिका बत्रा

उपांत्य फेरीत

टेबल टेनिस

गोल्ड कोस्ट : भारताच्या मनिका बत्राने राष्ट्रकुलमधील टेबल टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मौमा दासला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

दिल्लीच्या मनिकाने सिंगापूरच्या यिहान झ्होयूवर ११-५, ११-६, ११-२, ६-११, ११-९ असा विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत सिंगापूरच्या यू मेन्ग्यूने मौमावर १५-१३, ११-७, ११-५, ७-११, ११-५ असा विजय मिळवला. तत्पूर्वी, एकेरीत मनिकाने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेसी फेंगवर ११-६, ११-६, ९-११ असा, तर मौमा दासने इंग्लंडच्या टिन-टॅन होवर ११-७, ७-११, ९-११, ११-८, ११-१३, ११-७, ११-८ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. मधुरिका पाटकरला मात्र उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या सिब्लेने मधुरिकाचे आव्हान ११-९, ११-८, २-११, ११-३, ८-११, ११-६ असे परतवून लावले. पुरुष एकेरीत शरथ कमलने ऑस्ट्रेलियाच्या हेमिंग हू याला ११-८, १२-१०, ८-११, ११-६, ११-५ असे, तर हरमीत देसाईने मलेशियाच्या ची फेंग लिआँगला ११-५, ११-७, ११-५, ७-११, ११-४ असे पराभूत केले. महिला दुहेरीत मनिका बत्रा-मौमा दासने श्रीलंकेच्या हन्सनी - ईशरा जोडीवर ११-४, ११-४, ११-१ असा विजय मिळवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मनिका-मौमा जोडीने इंग्लंडच्या हो टीन टीन- मारिया जोडीवर १२-१४, ११-३, ११-७, ११-६ अशी मात केली. यानंतर सुतिर्था - पूजा जोडीने अॅलिसिया - मो जोडीवर ११-६, ११-७, १४-१२ असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत शरथ कमल- मौमा दास जोडीने इंग्लंडच्या डेव्हिड - केली जोडीवर ११-५, ११-९, ११-९ असा, तर साथियन- मनिका जोडीने कॅनडाच्या मार्को - अॅलिसिया जोडीवर ११-८, ११-१३, १०-१२, ११-८, ११-४ असा विजय मिळवला. सानिल - मधुरिका जोडीने मॉरिशसच्या टाउकूरी - एलोडीए जोडीवर ११-४, ११-५, ११-६ अशी मात केली. पुरुष दुहेरीत शरथने साथियनच्या साथीने आगेकूच केली. यानंतर हरमीत देसाई आणि सानिल शेट्टी जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोल्डन बॉइज’

$
0
0

सुशीलकुमार, राहुल आवारेला सुवर्ण, बबिताला रौप्य, किरणला ब्राँझ

कुस्ती

वृत्तसंस्था, गोल्ड कोस्ट

मूळचा बिडचा आणि सध्या पुण्यात सराव करत असलेल्या राहुल आवारेने राष्ट्रकुलमधील कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या सुशीलकुमारनेही (७४ किलो) आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व राखून सुवर्णयश मिळवले. बबिता फोगटला (५३ किलो) रौप्यपदक, तर किरणला ब्राँझपदक मिळाले. कुस्तीमध्ये पहिल्याच दिवशी भारताने चार पदकांची कमाई केली.

स्पर्धेतील ५७ किलो गटातील पहिल्या लढतीत राहुलने इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला ४-०ने नमविले. यानंतर राहुलने ऑस्ट्रेलियाच्या थॉमस सिचिनीवर मात केली आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. या फेरीत राहुलने पाकिस्तानच्या महंमद बिलालला अस्मान दाखविले आणि अंतिम फेरी गाठली. या फेरीत त्याच्यासमोर कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीचे आव्हान होते. ताकाहाशीदेखील त्याच्याच तोडीचा मल्ल होता. पण, याचे दडपण न घेता राहुलने आश्वासक सुरुवात केली. त्याने ६-४ अशी आघाडी घेतली. यानंतर त्याच्यासमोर ताकाहाशीचा निभावच लागला नाही. राहुलने ही लढत १५-७ अशी जिंकली. तिरंगा हातात घेताच, त्याचे डोळे भरून आले. एकाच दिवसात त्याने चार मल्लांना लोळविले. तो म्हणाला, 'सलगच्या कुस्त्यांनी पायाला वेदना जाणवत होत्या. हे पदक मी माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांना अर्पण करतो. माझ्या मेहनतीचे फळ आज मला मिळाले. कुटुंबीयांचे स्वप्न साकार करू शकलो, याचा आनंद आहे.'

स्पर्धेतील ७६ किलो गटात किरणने पहिल्या लढतीत कॅमेरूनच्या डॅनिएल सिन्हो गुएमदेवर विजय मिळवला. किरणला उपांत्य फेरीत नायजेरियाच्या ब्लेसिंग ऑनयेबुचीकडून पराभव पत्करावा लागला. पण ब्लेसिंगने अंतिम फेरी गाठल्याने किरणला रिपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ब्राँझपदकाच्या लढतीत त्याने मॉरिशसच्या कातोयुस्किया परिधावेनला पराभूत केले.

बबिताचे सुवर्णयश हुकले

स्पर्धेतील ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये बबिताने पहिल्या फेरीत नायजेरियाच्या बोस सॅम्युएलला नमविले. यानंतर दुसऱ्या फेरीत बबिताने श्रीलंकेच्या दीपिका दिलहानीवर ४-०ने मात केली. यानंतर बबिताने ऑस्ट्रेलियाच्या कॅरिसा होलँडलाही हरविले. अंतिम फेरीत बबिताला कॅनडाच्या डायना वेस्केरकडून २-५ पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१४च्या राष्ट्रकुलमध्ये बबिताने सुवर्णपदक, तर २०१०मध्ये रौप्यपदक मिळवले होते. 'माझ्यापरीने मी सर्वोत्तम प्रयत्न केले. पण, आक्रमकता कमी पडली,' असे बबिता म्हणाली.

सुशीलचा धडाका

- ३४ वर्षीय सुशीलला सुवर्णपदक मिळवण्यासाठी अवघ्या एक मिनिट, २० सेकंदांचा वेळ पुरेसा ठरला.

- दिल्लीच्या सुशीलचे हे राष्ट्रकुलमधील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.

- त्याने २०१०मध्ये ६६ किलो, तर २०१४मध्ये ७४ किलो गटात सुवर्णपदक मिळवले होते.

- स्पर्धेतील ७४ किलो गटातील पहिल्या लढतीत सुशीलने कॅनडाच्या जेव्हॉन बल्फोरला सहज नमविले.

- दुसऱ्या फेरीत सुशीलने पाकिस्तानच्या महंमद असद बटला सहज लोळविले.

- उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा कोन्नोर एव्हन्स सुशीलला आव्हान देऊ शकला नाही.

- सुशीलने सुवर्णपदकाच्या लढतीत अवघ्या काही सेकंदांत आफ्रिकेच्या योहाना बोथाला नमविले.

...

मागील दहा वर्षांपासून या पदकाची प्रतिक्षा करत होतो. त्यामुळे या पदकाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेला निवड चाचणी न होताच, संघ पाठविण्यात आला होता. त्यामुळे मला त्यात संधीच मिळाली नाही. सरतेशेवटी पदकाचे स्वप्न साकार करू शकलो, याचा आनंद आहे.

- राहुल आवारे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना सूर्य बनवण्याचे काम करा

$
0
0

ज्येष्ठ कवियत्री नीला सत्यनारायण यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात अनेक महिला या धाडसाने काम करीत आहेत. केवळ चूल आणि मूल ही संकल्पना न धरता बहुविध क्षेत्रामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. अशा महिलांना समोर आणून त्यांना सूर्य बनवण्याचे काम करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवियत्री व राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले. मधुरा वुमन एम्पॉवरमेंट अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प. सा. नाट्यगृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात मधुरा ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या 'सखी सुखप्रदा' या त्रैमासिकाचे प्रकाशन, मधुरा ट्रस्टच्या वेबसाइटचे अनावरण व गौरवशाली महिलांच्या सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, स्मिता हिरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे, योगिता हिरे, अद्वय हिरे, संपदा हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण म्हणाल्या, की महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य ते व्यासपीठ नाही. आज घराघरांमध्ये संवाद होत नाही. सखी सुखप्रदा या त्रैमासिकाच्या निमित्ताने हा संवाद साधला जाणार आहे. या त्रैमासिकात सर्व क्षेत्रातील महिलांना स्थान देण्यात आले आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती आहे. हे शक्तीरूप एकत्र येण्याची आवश्यकता आहे. महिला या नेटवर्किंगमध्येही कमी पडतात. ते या व्यासपीठाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यावेळी माजी मंत्री प्रशांत हिरे म्हणाले, की आज शाळांमधेये योग्य ते शिक्षण दिले जात नाही. कुटुंबाची व्याख्या बदलत चालली आहे. यातून समाज घडत नाही. आज ज्या कर्तत्ववान महिला आहेत त्यांना पुढे आणण्याचे काम मधुरा ट्रस्टने केले आहे. पुढील वर्षी या सत्कारात रोख रक्कमेचा समावेश करावा, असाही सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपदा हिरे यांनी केले.

यांचा झाला सन्मान

यावेळी समाजसेवेसाठी वासंती दीक्षित, उज्ज्वला जगताप, शिक्षण क्षेत्रासाठी मंगला गायवान, स्वाती सावंत, उद्योग क्षेत्रासाठी मनीषा धात्रक, अरुणा जाधव, क्रीडा क्षेत्रासाठी मोनिका आथरे, निकिता काळे, कला क्षेत्रासाठी शुभदा तांबट, अर्पिता लाड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देतांना वासंती दीक्षित म्हणाल्या, की तपस्विनी हा शब्द खूप मोठा आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना, समाजात वावरताना माणुसकी समजावून घेण्याचे काम केल्यास यश मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमारतींमधून होते संस्कृतीची ओळख

$
0
0

आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात आर्किटेक्चरच्या उत्तमोत्तम कलाकृतींचे दर्शन घडविणाऱ्या अनेक इमारती असून या इमारतींमधूनच देशाची आणि संस्कृतीची ओळख होत असते, असे मत नाशिकचे प्रसिद्ध आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांनी व्यक्त केले.

विद्यावर्धन ट्रस्ट संचलित आयडिया कॉलेजच्या आर्किटेक्चरची 'परिचय' यावर आधारित 'एक्सक्लेम २०१८' या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात १५ एप्रिलपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. यावेळी आर्किटेक्ट शिंदे म्हणाले, की देशामध्ये यापूर्वीही अनेक मानवंत आर्किटेक्ट लोकांनी उत्तम काम केले आहे. मात्र, अजून उत्तम वास्तूची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात स्वत:ला झोकून देत कार्य करावे. तसेच जुन्या वास्तूंच्या कलाकृतींमधून प्रेरणा घेत लोकपयोगी वास्तू निर्माण केल्या पाहिजे. आधुनिक भारतीय आर्किटेक्चरचे शिल्पकार म्हणून कै. आर्किटेक्ट अच्युत कानविंदे, आर्किटेक्ट बाळकृष्णा दोशी आणि कै. आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांना ओळखले जाते. यांच्या कामावर आधारित असलेले आणि त्यांच्या नावाच्या आद्याअक्षराने सुरुवात करत आर्किटेक्चरची एबीसी अर्थात 'परिचय' यात 'आधुनिक भारतीय आर्किटेक्चरची पायाभरणी' या विषयावर आधारित एक्सक्लेम हे प्रदर्शन आहे.

प्रसिद्ध इमारतींचे सादरीकरण

एक्सक्लेम या प्रदर्शनात प्रसिद्ध व वेगळी ओळख निर्माण केलेल्या इमारतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये अरण्या हौसिंग, प्रेमाभाई हॉल, आयआयटी कानपूर, पिनॅकल, डक्सटोन-सिंगापूर एआरसी स्टुडियो २००९, स्काय हॅबिटाट सिंगापूर-मोशे सफादी, डब्ल्यू ५७-मॅनहेटन न्यूयॉर्क, कॅप्सूल टॉवर, द इंटरलास सिंगापूर, कांचनजंगा अशा विविध संस्कृती व शैलीने नटलेल्या इमारती या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिकेसाठी बाजार, सायन्स सेंटर, बिजनेस सेंटर आणि गरीब लोकांना परवडतील अशी कमी खर्चातील घेरे याबाबत विद्यार्थ्यांनी तयार केलेले आराखड्यांचाही प्रदर्शनात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिशात नाही आणा, अन् बाजीराव म्हणा

$
0
0

जिल्हा बँकेच्या सुरक्षेसाठी २१ गनधारी सुरक्षारक्षक; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य ग्राहकांना बँकेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क मुख्यालयासह केंद्रीय शाखांची सुरक्षा गनधारी सुरक्षारक्षकांच्या हातात सोपवण्याची तयारी सुरू केली आहे.

रोजच्याच आंदोलनाला कंटाळलेल्या जिल्हा बँकेने महापालिकेचा कित्ता गिरवत आता २१ गनधारी सुरक्षारक्षकासह एकूण ४१ सुरक्षारक्षकांची नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या तिजोरीत खळखडाट असताना गनधारी सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीने खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा अशी गत झाली आहे. त्यामुळे वादग्रस्त सुरक्षारक्षकांची भरती वादात सापडली असताना अध्यक्षांच्या या नवलाईने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या या अफलातून निर्णयाने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याचे अर्थकेंद्र आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक अशी जिल्हा बँकेची ओळख आहे. परंतु, आर्थिक स्थिती खालावलेल्या जिल्हा बँकेने आता आपली ओळख पुसण्याची तयारी सुरू केली आहे. कर्जबाजारीपणाच्या आर्थिक दृष्टचक्रात कोंडल्या गेलेल्या जिल्हा बँकेत सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचीही वानवा आहे. तीन हजार कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेचे जवळपास २७०० कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना देण्यासाठी तिजोरीत खणखणाट असताना बँकेने आता ४१ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून त्यात २१ गनधारी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आधीच्या सुरक्षारक्षकांच्या भर्तीचा वाद सुरू असतांना आता खासगी एजन्सीमार्फात भर्ती केली जाणार आहे. जिल्हा बँकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह केंद्रीय शाखांसाठी २१ गनधारी सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहेत. तर महापालिकेने जप्त केलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रेणुकादेवी यंत्रमाग संस्थेच्या सुरक्षेसाठी २० साध्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. बँकेच्या तिजोरीत रुपयाही नसतांना गनधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती कशासाठी, असा सवाल आता शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या निर्णयावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुघलकी निर्णयाची परंपरा

जिल्हा बँकेसह शाखांमध्ये येणारा बहुसंख्य वर्ग हा गोरगरीब शेतकरी आणि नोकरदार असा वर्ग आहे. सध्या बँकेची अवस्था खराब असल्याने त्यांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींसह जमा होणारे पगारही बँक परत करू शकत नसलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे अशा संकटसमयी बँकेने घेतलेल्या या तुघलकी निर्णयाने काय साध्य होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आधीही नरेंद्र दराडे अध्यक्ष असताना जवळपास चारशे कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भर्ती करण्यात आली होती. त्यात सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. त्यामुळे आधीच सुरक्षारक्षक असताना नव्याने गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कर्जवसुलीच्या विरोधात रोज मोर्चे आंदोलने होत आहेत. तर, आपल्या पैशांसाठीच ग्राहकांना बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे यांना दूर ठेवण्यासाठीच हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images