Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘पंचवटी’तील प्रवास ठरणार सुखावणारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिककर रेल्वे प्रवाशांना प्रतीक्षा असलेली संपूर्ण नव्या कोऱ्या 'आदर्श पंचवटी एक्स्प्रेस'च्या २१ बोगी येवला येथे दाखल झाल्या आहेत. या आठवड्यात ही नवी गाडी 'मनमाड ते मुंबई'दरम्यान प्रवाशांच्या सेवेत धावण्याची शक्यता असून, त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुकर होणार आहे. या सर्व २१ सुसज्ज बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत झाली आहे.

नाशिककरांच्या कुटुंबाचा भाग झालेली पंचवटी एक्स्प्रेस दि. १ नोव्हेंबर १९७५ पासून धावत आहे. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटरचे अंतर ती वेगात पार करते. नाशिक हे औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक केंद्र असल्याने हजारो नाशिककर रेल्वेने रोज प्रवास करतात. मनमाड ते मुंबई प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांच्यासाठी पंचवटी सोयीची आहे. त्यामुळे ही गाडी, रेल्वेला भरघोस महसूल मिळवून देते. पासधारकांसाठी 'पंचवटी एक्स्प्रेस' दुसरे घरच आहे. या प्रवाशांमध्ये कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. रेल परिषदेने 'आदर्श कोच सी-३'च्या माध्यमातून पंचवटी एक्स्प्रेसला पाच वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून दिलेले आहे. सुविधांयुक्त गाडी धावत नाही तोपर्यंत रेल परिषेदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांनी रेल्वे प्रवासादरम्यान अन्नत्याग केला आहे. नवीन बोगींसाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा, डी. वाय. नाईक, सुनील जोशी, रुपेश कोहली, एल. सी. त्रिवेदी, डॉ. अब्दुल्लाह, भुसावळचे डीआरएम आर. के. यादव, रेल परिषदेचे गुरमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी आदींनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्स

या एक्स्प्रेसला ४२ वर्षांनंतर नवे रंगरूप मिळाले आहे. नव्या गाडीत प्रवाशांची बैठक व्यवस्था अधिक आरामदायक असून, बोगींची अंर्तबाह्य रंग-रचना व कार्य नावीन्यपूर्ण आहे. सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्स आहेत. या गाडीच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकार घेणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी येवला येथे जाऊन २१ नवीन बोगींची पाहणी केली. या बोगींसाठी रेल परिषदेच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी झाली आहे.

'आदर्श ट्रेन'चा संकल्प

महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर २०१७ )पासून रेल्वे प्रशासन व प्रवाशांच्या सहकार्याने पंचवटी एक्स्प्रेसला 'आदर्श ट्रेन' करण्याचा संकल्प रेल परिषदेने केला आहे. इंटरसिटीचा दर्जा असलेली मध्य रेल्वेची प्रतिष्ठेची पंचवटी एक्स्प्रेस वेळेवर पोहोचावी, प्रवाशांना चांगली सोय मिळावी, प्रवास सुकर व्हावा, कोच स्वच्छ असावेत, कोणीही विनातिकीट प्रवास करू नये, अनधिकृत खाद्यविक्रेते नसावेत, पाकीटमार नसावेत, भिकारी नसावेत, तसेच अन्य समस्या दूर करून गाडीला आत्मसन्मान मिळवून द्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे. रेल प्रशासनाशी या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

(अँकर, लोगो शुभवार्ता)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नरला होणार विशेष क्रीडा संकुल

$
0
0

शुभवार्ता

अन्य तालुक्यांना एक कोटी, सिन्नरला ९ कोटी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात विशेष बाब म्हणून सिन्नर येथे साकारण्यात येणाऱ्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामाला मुहूर्त लागला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ६ कोटी २६ लाख ४ हजार ६३८ रुपये कामाच्या निविदा नुकत्याच काढल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सिन्नरकरांचे क्रीडा संकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. तालुक्यासाठी नऊ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्रिस्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. यात विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांचा समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलांना मान्यता देण्यात आली होती. येवला, पेठ, दिंडोरी, नांदगाव, सय्यद पिंप्री, त्र्यंबकेश्वर, बागलाण या तालुक्यांतील क्रीडा संकुले पूर्ण झाली असून, कळवण, सटाणा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, इगतपुरी, सुरगाणा या क्रीडा संकुलांची कामे अपूर्ण आहेत. जिल्ह्यातील सिन्नर आणि देवळा तालुक्याच्या क्रीडा संकुलांना सुरुवात झालेली नव्हती. आता मात्र सिन्नर तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, कामाची निविदा काढण्यात आली आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात क्रीडासंकुलाची भिंत बांधण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यात मुख्य ग्राऊंडचा विकास होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी इनडोअर गेमसाठीही सुसज्ज हॉल बांधण्यात येणार असून, त्या ठिकाणी विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू आहेत. त्यांना सरावासाठी नाशिकच्या गोल्फ क्लब ग्राउंडवर यावे लागते. त्यांचीही गैरसोय या ग्राउंडमुळे टळणार आहे. या ग्राउंडचा विकास झाल्यास या ठिकाणाबहून अनेक आंतरराष्ट्रीय धावपटू तयार होण्यास मदत होणार आहेत. परिसरातून पोलिस भरतीसाठी अनेक तरुण नाशिक येथे येत असतात. त्यांचीदेखील या ग्राउंडमुळे सोय होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्या असून, कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील अद्ययावत क्रीडा संकुल ठरणार आहे. यासाठी विशेष बाब म्हणून ९ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीलगतचे होर्डिंग्ज जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीपात्रालगत असलेल्या होर्डिंग्जचे लोखंडी स्‍ट्रक्चर मंगळवारी महापालिकेने पूर्णपणे हटविले असून, या ठिकाणी पुन्हा असे होर्डिंग्ज उभारता येणार नसल्याचे सांगितले आहे. मुंबई नाका व उंटवाडी परिसरातील सुमारे पाच होर्डिंग्ज यावेळी काढून टाकण्यात आले.

महापालिकेकडून सध्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू असून, त्याचबरेाबर होर्डिंग्ज, फलक उभारणीवरही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन नंदिनीला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्याचवेळी असे होर्डिंग्ज काढण्याचीही मागणी करण्यात आली होती. यापूर्वी उंटवाडी येथील काही नागरिकांनीही हे होर्डिंग्ज उभारणीस विरोध केला होता. मंगळवारी महापालिकेने उंटवाडी येथील दोन व मुंबई नाका येथे नदीपात्रालगत असलेले काही होर्डिंग्ज हटविले.

या ठिकाणी असलेले सर्वच लोखंडी साहित्य महापालिकेने जप्त केले असल्याचे समजते. ही कारवाई अतिक्रमणचे उपायुक्‍त आर. एम. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी राबविली. यावेळी कोणताही विरोध होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नदीपात्रालगत असलेले हे सर्वच होर्डिंग्ज काढण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आल्याने ही कारवाई केली असली, तरी पुन्हा होर्डिंग्ज उभे राहणार नाहीत, यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

$
0
0

नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियांतर्गत वाजवड (ता. पेठ) गावाला टँकरमुक्त करण्यात आले असून, शनिवारी, १४ एप्रिल रोजी या पाणी प्रकल्पाचे सकाळी साडेदहा वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. अनेक अडचणींवर मात करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणखी एका गावाला टँकरमुक्तीच्या दिशेने सोशल नेटवर्किंग फोरमने नेले आहे. पाण्याची समस्या सुटत असलेले हे नववे गाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सहकार क्षेत्राची विश्वासार्हता महत्त्वाची’

$
0
0

सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनतेचा विश्वास संपादन केल्यास सहकार क्षेत्राच्या विकासाबरोबरच ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राची विश्वासार्हता जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सिन्नर येथे केले. येथील कुंदेवाडी येथे श्री जगदंबामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे, विजय करंजकर, भास्कर कोठावदे आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले, की सहकार क्षेत्राशी अनेक नागरिकांचा विश्वास जोडला गेला आहे. त्याबरोबर नागरिकांचा आर्थिक विकासही या क्षेत्रावर अवलंबून आहे. सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली असून, या क्षेत्राला पुढे नेणे आणि उत्तम व्यवहाराच्या माध्यमातून जनतेचा विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड ड्रायपोर्टसाठी जागेचा तिढा सुटणार?

$
0
0

१०५ कोटींत निफाड साखर कारखान्याची जागा घेण्याची जेएनपीटीची तयारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड साखर कारखान्याची जागा १०५ कोटींना खरेदी करण्याची तयारी 'जेएनपीटी'ने दर्शविली आहे. ही जागा कर्जबाजारीपणामुळे जिल्हा बँकेकडे तारण असून बँकेच्या संचालक मंडळाने या व्यवहाराला संमती दिल्यास निफाड तालुक्यात डायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शेतमालाच्या जपणुकीसाठी निफाड तालुक्यात ड्रायपोर्ट उभारण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे. त्यासाठी निफाड तालुक्यात सरकारला जागेची आवश्यकता आहे. कर्जबाजारीपणामुळे बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याकडे १०० ते १५० एकर जागा आहे. ही जागा घेण्यासाठी हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. परंतु, या कारखान्याकडे १०८ कोटी रुपयांची कर्जवसुली होणे बाकी असून ही जागा जिल्हा बँकेकडे तारण आहे. कर्जवसुलीसाठी बँकेने तीनवेळा या जागेच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. मात्र, एवढी रक्कम देऊन कारखान्याची जागा खरेदी करण्यास कुणी पुढे आलेले नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला यश येऊ शकले नाही. 'जेएनपीटी'लाही ड्रायपोर्टसाठी जागा हवी असल्याने त्यांनी १०५ कोटी रुपयांत ही जागा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, बँकेला १०८ कोटी रुपये येणे अपेक्षित असल्याने पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक बोलावण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, निफाडचे प्रांताधिकारी महेश पाटील, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून 'जेएनपीटी'ने १०५ कोटी रुपयांत कारखान्याची जागा खरेदीची तयारी दर्शविली आहे. या किंमतीत जागा देण्यास कारखाना राजी असेल तर तसे पत्र जिल्हा बँकेला द्यावे, अशी सूचना या बैठकीत जिल्हा प्रशासनाने केली. या पत्रामधील प्रस्ताव मान्य अथवा अमान्य करण्याबाबत जिल्हा बँकेचे संचालक मंडळ निर्णय घेईल. १०८ ऐवजी १०५ कोटी रुपये स्वीकारण्यास जिल्हा बँक राजी असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 'जेएनपीटी'कडे पाठविला जाईल. त्यानंतर बँकेला पैसे अदा करून कारखान्याची जागा ड्रायपोर्टसाठी ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसे झाल्यास कारखाना कर्जमुक्त होणार असून ड्रायपोर्ट उभारणीचा मार्गही मोकळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी रोडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाजवळ खुशबू ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकून सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेने २ लाख रुपयांचा गुटखा व सिगारेट जप्त केली आहे. याप्रकरणी दुकानमालकावर म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुशबू ट्रेडर्स या दुकानात प्रतिबंधित गुटखा व परदेशी सिगारेटचा साठा व विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांना मिळाली. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नखाते यांच्यासह त्यांच्या टीमने ट्रेडर्सवर छापा टाकला. दुकानात जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी विजय भागचंद बाफना ही व्यक्ती अवैध गुटखा व सिगारेटचा साठा व विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर म्हसरुळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी तेथे हजर झाले. अन्न व औषध प्रशासनाचे विवेक पाटील यांनाही तेथे पाचारण करण्यात आले. त्यांनी संपूर्ण मालाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला. या कारवाईत विविध कंपन्यांचा १ लाख ९२ हजार २४५ रुपयांचा गुटखा पानमसाला तर विविध ब्रँडचे संवैधानिक इशारा नसलेले १७ हजार ७९५ रुपयांचे सिगारेट मिळून आले. सिगारेट पोलिसांनी जप्त करुन त्यावर कोटपा कायद्याप्रमाणे म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे यांच्यासोबत महाजन, बोडखे, निगळ, भदाणे हे कर्मचारी सहभागी झाले. सदर दुकान व वरच्या मजल्यावर असलेले गोडाउन सील करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर उलटून हजारो लिटर डिझेल वाया

$
0
0

मनमाड : नांदगाव- औरंगाबाद मार्गावर पोखरी शिवारात डिझेल इंधनाचा टँकर उलटल्याने हजारो लिटर डिझेल वाहून गेले. अपघातात चालक, वाहक किरकोळ जखमी झाले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. इंधन वाहत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी बादल्या, विविध भांड्यांतून इंधन वाहून नेले. टँकरचालक समाधान भापकर यांनी पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून १५ हजार लिटर डिझेल व ५ हजार लिटर पेट्रोल टँकरमध्ये (एमएच ०४/ईबी १९६७) भरून ते औरंगाबादच्या दिशेने मंगळवारी दुपारी निघाले असता पोखरी शिवारात मण्याड नदीवरील पुलाजवळील वळणावर टँकर उलटला. त्यातून डिझेलची गळती झाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी नागरिकांना हटवून इंधन दुसऱ्या टँकरमध्ये टाकले.

ज्येष्ठ नेते सोनजे यांचा

उष्माघाताने मृत्यू

मनमाड : नांदगाव शहर परिसरात नांदगाव येथील सुरेश वामनराव सोनजे (वय ५२) यांचे मंगळवारी दुपारी उष्माघाताने आकस्मिक निधन झाले. ते कम्युनिस्ट पक्षाचे जुने जाणते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. मंगळवारी दुपारी जेवण करून नांदगाव तहसील कार्यालयाकडे जात असताना कडाक्याच्या उन्हाने ते चक्कर येऊन पडले. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू

मनमाड : रेल्वेखाली सापडून नांदगाव येथे मनोज मोकळ या २२ वर्षीय तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढीविरोधात लढा!

$
0
0

(निष्पक्ष लोगो)

करवाढीविरोधात लढा!

सर्वपक्षीयांची एकी; अन्याय निवारण कृती समितीही मैदानात

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शहरातील शेतजमीन व मोकळ्या भूखंडावर नव्याने कर लावण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. शेतकरी व मिळकतधारकांवर झालेल्या या अन्यायाविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे व्यापक लढा उभारला जाणार आहे. समितीतर्फे आज जेलरोडच्या राजराजेश्वरी मंगल कार्यालयात बाधीत शेतकरी व मिळकतधारकांचा मेळावा झाला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

मेळाव्यास भाजपचे आमदार बाळासाहेब सानप हेही उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी महापालिकेतील सत्ताधारी मंडळींविरोधात गरळ ओकल्याने सानप यांची या वेळी चांगलीच गोची झाली. तथापि, पक्षभेद विसरून मी शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. करवाढीचा प्रश्न पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेणार असल्याचे सांगत सानप यांनी वेळ मारून नेली. समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, उन्मेष गायधनी, व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, बाजीराव भागवत, रंजन ठाकरे, गुरुमित बग्गा, गजानन शेलार, रमेश औटे, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. मनिष बस्ते आदींसह शेतकरी व मिळकतधारक उपस्थित होते.

निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, १३ पटीने केलेली करवाढ चुकीची आहे. सत्ताधाऱ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत. संघटित होऊन नागरिकांपर्यंत हा प्रश्न तीव्रतेने पोहचविणे गरजेचे आहे. करवाढ म्हणजे लोकांच्या जगण्याचा प्रश्न झाला आहे. दत्ता गायकवाड यांनी करवाढीविरुध्द व्यापक लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. उन्मेष गायधनी म्हणाले, की या आंदोलनात कोणा एकावर आर्थिक भार येणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वांनी सामूहिकपणे लढा द्यावा. पक्षीय राजकारण येऊ देऊ नये. नाशिकच्या सहाही विभागात मेळावे घेऊन लोकजागृत्ती केली जाणार आहे. निमा, आयमासारख्या संघटनांचाही सहभाग घेतला जाणार आहे. बाजीराव भागवत म्हणाले की, मी दोन गावांची जबाबदारी घेतो. माजी नगरसेवक जे. टी. शिंदे यांनीही नाशिककरांवर दुसऱ्यांदा अन्याय झाल्याचे सांगत लढा उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

मुंढे अन् गुंडे सारखेच!

मुंढे आणि गुंडे सारखेच असतात. शिक्षण संस्थांना मालमत्ता करातून सूट मिळावी. लोक अदालतीमध्ये मुंढे यांच्याविरुध्द तक्रार दाखल करावी, अशी सूचना नगरसेवक गजानन शेलार यांनी केली. नगरसेवक गुरुमित बग्गा म्हणाले, की शेतकऱ्यांवर जे कर लादले आहेत, त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. जेवढी करदात्यांची क्षमता आहे, तेवढाच कर घेतला पाहिजे. करवाढ केल्यावर नागरिकांना तक्रारी दाखल करता येतात. या मार्गाचा अवलंब करावा.

करयोग्य मूल्याबाबत प्रशासन दुटप्पी

शहरातील नव्या मिळकती आणि जमिनीच्या करयोग्य मूल्य वाढवण्याबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. शासनाच्या अधिनियमानुसारच तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नव्या मिळकती व जमिनींच्या करयोग्य मूल्यात ४० टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ करता येत नसल्याचा दावा करवाढीच्या प्रस्तावात केला असताना नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र नव्या मिळकतींचे करयोग्य मूल्यात तब्बल पाचपट वाढ केल्याने नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनातील दोन अधिकाऱ्यांमधील या भूमिकेमुळे नाशिककर संभ्रमात सापडले असून, यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. कृष्णा यांनी करयोग्य मूल्याबाबत ४० टक्क्यांची भूमिका घेतली असताना वर्तमान आयुक्त मुंढेंनी मात्र आपण केलेली भरमसाठ करवाढ योग्यच असल्याचा दावा केला आहे. प्रशासनातीलच दोन अधिकाऱ्यांमध्ये मनपाच्या अधिनियमांबद्दल वेगवेगळी भूमिका घेतली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंढे हे शासनाचे नियम काटेकोरपणे पाळतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे करयोग्य मूल्य ठरविण्याबाबत कृष्णा यांनी घेतलेली भूमिका योग्य की, मुंढे योग्य याबद्दल नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांमध्येच कायद्याचा किस वेगवेगळ्या पद्धतीने पाडला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे महासभेच्या अधिकारालाही तिलांजली दिली जात असल्याने दत्तक नाशिककरांचाच आता अभिमन्यू झाला आहे.

करधाड बससेवेसाठी

आयुक्त मुंढे यांच्याकडून सध्या नाशिककरांवर टाकलेली करधाड ही सीटीबस सेवा सुरू करण्यासाठीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून केला जात आहे. सिटी बससेवा सुरू करून खासगी ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी नाशिककरांवर कराचा बोझा लादला जात असल्याचा आरोप या पक्षांकडून केला जात आहे. सिटी बससेवेची व्यवहार्यता न तपासताच मुख्यमंत्र्याच्या स्वप्नपूर्तीसाठी हा आटापिटा सुरू असून, बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी नाशिककरांच्या खिशांवर भार टाकला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समता दौडने भिमोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'भिमोत्सव २०१८' चा शुभारंभ बुधवारी 'समता दौड' या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. निवृत्त पोलिस अधीक्षक संजय अपरांती यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. जिल्ह्यातील स्पर्धकांनी समता दौडमध्ये सहभाग घेतला.

सकाळी ७ वाजता मालेगाव नाका चौफुली येथून स्पर्धेला सुरवात झाली. पाच किमी अंतर असलेल्या स्पर्धेत सात वर्षाच्या लहान मुलांपासून ते ७८ वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत स्पर्धक सहभागी होते. मालेगाव चौफुली, कॉलेज रोड, भवानी चौक, स्टेडिअम, शिवाजी नगर, गुरुद्वारा, शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर पुतळा असा पाच किमी अंतर असलेल्या मॅरेथॉनचा एकात्मता चौकात समारोप करण्यात आला. संजय अपरांती, खेळाडू निकिता काळे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत शाम वाघ, देवीदास पवार, श्रीकांत शिंदे, शिवानी दाभाडे, सपना आहेर, वैष्णवी शिंदे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

भगरच्च कार्यक्रम

या भिमोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, शाहीर यांची शहरात मांदियाळी असणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक सांस्कृतिक उपक्रमातून अभिवादन करण्याचा आगळा प्रयत्न मनमाडमध्ये या उत्सवातून होणार आहे. शहरातील एकात्मता चौकात दररोज संध्याकाळी व्याख्यान, होणार असल्याचे संयोजन समितीने स्पष्ट केले आहे. या भिमोत्सवात अॅड वैशाली डोळस, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, प्रा डॉ. विजयकुमार वावळे यांची व्याख्याने, होतील. शाहीर निशांत शेख यांचे पोवाडे, एल्गार मंच मुंबईचा जागर समतेचा कार्यक्रम, भीमशाहीर ललकार बाबू यांची मैफल तसेच राहुल अनवीकर यांची भीमगीते असा भरगच्च होणार आहे. संयोजन समितीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, रवी गायकवाड, सतीश केदारे, अनिल निरभवणे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - अस्मिता योजना

$
0
0

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत

आज महिलांचा मेळावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानावर अस्मिता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अस्मिता योजना सुरू केल्यानंतर पहिलाच महामेळावा नाशिकमध्ये होत असून, यामुळे अस्मिता योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहचण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

मेळाव्यासाठी जिल्हाभरातून २० ते २५ हजार महिला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या नियोजनासाठी विविध विभागांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक जिह्यातील ९ तालुके सन २०१७-१८ मध्ये हागणदारीमुक्त झाल्याबद्दल त्यांचा पंकजा मुंडेच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेने तयार केलेल्या विकास प्रेरणा या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी 'अस्मिता' ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेतून मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, सभापती अपर्णा खोसकर, सुनिता चारोस्कर, यतींद्र पगार, मनीषा पवार आदी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

२५ हजार महिलांची नोंदणी

अस्मिता योजनेतंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार किशोरवयीन मुलींची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. राज्यात मुलीच्या अस्मिता नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात पहिला क्रमांकावर आहे. तसेच, आतापर्यंत जिल्ह्यातील ६१० बचतगटांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असून, १३९ गटांनी शासनाकडे मागणी नोंदवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेळावा

$
0
0

शहर कृती समितीचा

आज पाथर्डीत मेळावा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शेतजमिनी आणि खुल्या भूखंडांसह सोसायटीची साईट मार्जिन जागा, पार्किंगची जागा आदींसाठी महापालिकेने नव्याने कर आकारणी सुरू केली आहे. त्याविरोधात शहरविकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती जनजागृती मेळावे घेत आहे. जेलरोडला १० एप्रिल रोजी पहिला मेळावा झाला. दुसरा मेळावा गुरुवारी (ता. १२) सायंकाळी पाचला पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्स येथे होणार आहे. संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, त्र्यंबकराव गायकवाड, उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, सुनील बोराडे, नितीन ठाकरे, मनीष बस्ते, प्रतापदादा सोनवणे आदींनी केले आहे.

१५ एप्रिल रोजी सकाळी नऊला आडगाव मारुती मंदिरात, तर सकाळी अकरा वाजता मखमलाबादच्या श्रीराम मंदिरात मेळावा होईल. १६ एप्रिल रोजी सायंकाळी सहाला द्वारका येथील खरबंदा पार्कमध्ये, १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहाला विहीतगावच्या विठ्ठल मंदिरात, १८ एप्रिल रोजी सकाळी नऊला सातपूरच्या सौभाग्य मंगल कार्यालयात, १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाचला चेहेडीतील म्हस्के गार्डनमध्ये, २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाचला खुटवडनगरमधील सीटू भवनमध्ये मेळावा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे उकळणारा हवालदार निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती असतानाही पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांना अडवून चालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी हवालदार संजय मुरलीधर शिंदे याला निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शिंदे याची ओझर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात वाहतूक पोलिस म्हणून नेमणूक आहे. सोमवारी (दि.९) सायखेडा फाटा येथे त्याला ड्युटीवर नेमले होते. परंतु, नेमणुकीचे हे ठिकाण सोडून तो पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोकणगाव फाटा येथे वाहने अडवू लागला. सरकारी पावती पुस्तक नसताना तो वाहनचालकांकडे पैशांची मागणी करून ते स्वीकारत होता. काही वाहनचालकांनी या प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रण केले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस अधीक्षक दराडे यांनी तात्काळ चौकशी करून त्याच्यावर पोलिस दलाची प्रतिमा मलिन व अशोभनीय कृत्य केल्याचा ठपका ठेवला. त्याच्या निलंबनाचे बुधवारी आदेश काढले. शिंदे याला राखीव पोलिस निरीक्षकाकडे दिवसातून दोन वेळा हजेरी द्यावी लागणार आहे. तसेच उप अधीक्षकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोचिंग क्लासेसच्या नियमावलीत तडजोड नको

$
0
0

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी कोचिंग क्लासेसमार्फत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक असूनही क्लासचालकांवर टाकलेले निर्बंध दूर सारण्यासाठी सर्व खासगी क्लासचालक संघटनेकडून आतोनात प्रयत्न केले जात आहे. मात्र, हे निर्बंध विद्यार्थी व पालकहिताचे असल्याने त्याच्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. याविषयीचे निवेदनही उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना बुधवारी देण्यात आले.

सरकारच्या वतीने पावसाळी अधिवेशनात खासगी क्लासेसविषयीच्या नियमावलीचा कायदा मांडण्यात येणार आाहे. त्यामुळे खासगी क्लासचालकांचे धाबे दणाणले आहे. या कायद्यात क्लासेसमार्फत पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, पार्किंग व्यवस्था, मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, विश्रांतीकक्ष, अग्निशमन यंत्रणा या सुविधा पुरविण्यात याव्यात तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या किमान प्रत्येक बॅचला काही विद्यार्थ्यांना मोफत व फीमध्ये सवलत असावी, शाळा, कॉलेजातील शिक्षक, प्राध्यापकांनी क्लासेस घेऊ नये, अशा प्रकारच्या अटींचा समावेश आहे. तसेच पायाभूत सुविधांसह शुल्क नियंत्रणात असावे अशा तरतुदी कायद्यात असाव्यात हा कायदा पावसाळी अधिवेशनात मांडून तो मंजूर करत विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा, अशा मागण्या मनविसेने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, उमेश भोई, जिल्हा सरचिटणीस शशी चौधरी, पंचवटी विभागाध्यक्ष मनविसे सौरभ सोनवणे, सिडको विभागाध्यक्ष मनविसे संदेश जगताप, सातपूर विभागाध्यक्ष एजाज शेख, नाशिकरोड विभागाध्यक्ष नितीन धानापुने, मध्य नाशिक विभागाध्यक्ष किरण बेलेकर, शहर सचिव रोहन कोकरे, शहर सरचिटणीस संदीप पैठणपगार, नाशिकरोड विभाग उपाध्यक्ष सागर दानी, सागर निगळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलव्यावसायिकावर खंडणीसाठी हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दरमहा खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका हॉटेल व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबियांवर नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चेहेडी जकात नाका येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात हॉटेल व्यावसायिक रितेश संजय कोठुरकर गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिकरोडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या हल्लेखोरांना महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी स्वतःहून पुढाकार घेत बदडून काढल्याने त्यांना पळता भुई थोडी झाली. हे हल्लेखोर ज्या चार वाहनांतून आले ती वाहने घटनास्थळीच टाकून जीव वाचवत पळ काढण्याची नामुष्की ओढवली.

या हल्ल्याच्या प्रकारानंतर हॉटेल चालक धनंजय संजय कोठुरकर (वय २२, रा. फुलेनगर, पळसे) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोठुरकर यांचे नाशिक-पुणे महामार्गावर चेहेडी जकातनाका येथे नवनाथ टी स्टॉल नावाचे छोटेसे हॉटेल आहे. या हॉटेलवर मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान चहा पिण्यासाठी आलेल्या ज्ञानेश्वर बबन हुल्लुळे आणि अमोल खंडेराव मानकर दोघेही रा. चाडेगाव यांनी हॉटेलचालक धनंजय कोठुरकर यांच्याकडे मोफत चहाची मागणी करून शिवीगाळ केली. येथे हॉटेल व्यवसाय करायचा असेल तर दरमहा पाचशे रुपयांच्या खंडणीचीही मागणी केली. त्यांच्या दमबाजीला घाबरुन कोठुरकर यांच्या आई-वडिलांनी हल्लेखोरांना पाचशे रुपये दिले व त्यांची बोळवण केली. परंतु, सायंकाळी हे दोघे पुन्हा पांढऱ्या रंगाच्या ब्रेझा (एमएच १५, २६२७) कारमधून आले. कोठुरकर यांच्या हॉटेलवर त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. या प्रकारास धनंजयच्या आईवडिलांनी विरोध केल्याने ज्ञानेश्वर हुल्लुळे व अमोल मानकर यांनी त्यांच्या आणखी नऊ साथीदारांना बोलावून घेत या सर्वांनी नवनाथ टी-स्टॉलची नासधूस करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीसह त्याचे आईवडील व भाऊ रितेश कोठुरकर या सर्वांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्वांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. यावेळी ज्ञानेश्वर हुल्लुळे याने आणलेल्या लाकडी दांडक्याने रितेशच्या डोके, हात, छाती आणि पायावर वार केले. त्याच्या आईवडिलांवरही हल्ला करून त्यांनाही जखमी केले. हल्लेखोर हिंसक झाल्याने फिर्यादीच्या कुटुंबियांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे महामार्गाने जाणारे काही प्रवाशी त्यांच्या मदतीला धावून आले. या प्रवाशांनी हल्लेखोरांना पकडून चोप दिल्याने सर्व हल्लेखोरांना आपली वाहने सोडून पलायन करावे लागले. संतप्त जमावाने हल्लेखोरांच्या ब्रेझा कारची (एमएच १५, २६२७) तोडफोड केली. याशिवाय हल्लेखोरांनी ॲक्टीव्हा (एमएच १५, एफवाय ८१५५),पॅशन मोटारसायकल एमएच १५, एफए ८८९५) आणि आयस्ट्रो मोटारसायकल (एमएच १५, इएम ०६२२) या तीन दुचाकीही घटनास्थळीच सोडून पळ काढला. ही चारही वाहने नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. हा हल्ला घडून चोवीस तास उलटल्यानंतरही हल्लेखोरांना शोधून काढण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आलेले नव्हते. हल्लेखोरांपैकी मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर हुल्लुळे व अमोल मानकर हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डमीप्रकरणी कोठडी

$
0
0

पंचवटी : ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी पकडलेला डमी उमेदवार देवसिंग अमरसिंग जारवाल (२१, रा. बदलापूर, जि. जालना) यास शुक्रवारपर्यंत (दि. १३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मूळ उमेदवार वीरसिंग भागचंद कताळे (रा. लासूर स्टेशन, सांगवी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यास बुधवारी (दि. ११) आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया सुरू असून, मंगळवारी (दि.१०) लेखी परीक्षा देते वेळी डमी उमेदवारास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कताळे यास आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहाप्रश्नी उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कारागृहाची निविदा प्रक्रिया ऑनलाइन करावी यासह अन्य मागण्यांसाठी नाशिकरोड कारागृहाबाहेर व्यावसायिक विजय भालेराव यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.

कारागृहात चाललेल्या ऑफलाइन निविदा ऑनलाइन कराव्यात, कारागृहात मोबाइल सापडल्या प्रकरणी अधीक्षकांचे निलंबन करावे, त्यांचे सीडीआर रिपोर्ट तपासावेत आदी मागण्यांसाठी भालेराव यांनी उपोषण सुरू केले होते. औरंगाबाद विभागाचे अधीक्षक बी. आर. मोरे आणि तुरुंगाधिकारी चंद्रकिरण तायडे यांनी भालेराव यांची बुधवारी भेट घेतली.

त्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण सोडत आहे. माझ्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करेल. या संदर्भात मी कारागृह प्रशासनाशी पुन्हा चर्चा करून भ्रष्टाचारमुक्त कारागृह आणि ऑनलाइन निविदेसाठी आग्रही आहे, असे भालेराव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शाळेतून पुन्हा ज्ञानदान

$
0
0

'त्या' शाळेतून पुन्हा ज्ञानदान

देवळालीत उर्दू शाळेचा सशर्त डीएमपीएम ट्रस्टकडे ताबा

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील मुस्लिम बांधवांना प्राथमिक शिक्षण देणारी सव्वाशे वर्ष जुनी उर्दू शाळेची इमारत आहे. मात्र त्या इमारतीचा ताबा मिळविण्यासाठी येथील डीएमपीएम ट्रस्टचा पाठपुरावा करीत होता. त्याला आता यश आले असून, वक्फ बोर्डाच्या आदेशानंतर ही शाळा पुन्हा ज्ञानदान करण्यासाठी सज्ज होणार आहे.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने या इमारतीचा ताबा केवळ शैक्षणिक कार्यासाठी वापर केला जावा, या एकमेव अटीवर मोहम्मद अली दोस्त मोहम्मद पीर मोहम्मद ट्रस्टचे अध्यक्ष सलीम खान यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, इमारतीच्या नूतणीकरणानंतर येथून पुन्हा ज्ञानादानाचे कार्य सुरू होणार आहे.

येथील तत्कालीन मोहम्मद अली दोस्त मोहम्मद पीर मोहम्मद यांनी सन १८७२ साली या शाळेची स्थापना केली होती. १९३५ पर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून येथे पहिली ते सातवीपर्यंत सर्व धर्मियांसाठी शिक्षण दिले जात असे. १९९७ सालापर्यंत येथे सर्व धर्मियांसाठी प्राथमिक शिक्षण दिले जात होते. गेल्या २१ वर्षांपासून ही शाळा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यात आहे. मात्र येथे भरणारी उर्दू प्राथमिक शाळा इमारत धोकादायक बनल्याने आनंद रोडवरील प्राथमिक शाळेत सुरू केली होती. त्यामुळे ही वास्तू पडीक होती.

केवळ शैक्षणिक कार्यासाठीच निर्णय

याबाबत येथील सलीम खान याकुब खान, निसार खान, मोहम्मद पिरजादे, इरफान सलीम खान यांनी पुढाकार घेत वक्फ बोर्डाकडे कैफियत मांडली. राज्य वक्फ बोर्डाने जिल्हा बोर्डाला आदेश करत वस्तुस्थिती समजून घेण्याचे सांगितले. याबाबत चौकशी होऊन वक्फ बोर्डाने कॅन्टोन्मेंट प्रशासनाला ३ मार्च रोजीच्या पत्राद्वारे या शाळेचा ताबा सलीम खान यांच्याकडे देणेबाबत स्पष्ट केले. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने या ठिकाणी फक्त शैक्षणिक कार्य केले जाईल या अटीवर शाळेचा ताबा देण्याचे मान्य केले. विश्‍वस्तांना शकील सिद्दीकी, उमर खान, अस्लम सिद्दीकी, युसूफ शेरखान, फारूक अब्दुल शेख, शौकत काझी, लियाकत काझी, मोहम्मद पिरजादे, हैदर खान, अब्दुल गनी, जफर खान, इज्राइल खान, फिरोज शेख, अन्वर मुल्ला, सय्यद निसार इस्माईल यांनी या शाळेतून पुन्हा ज्ञानार्जनाचे कार्य व्हावे यासाठी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उटीची वारी

$
0
0

(फोटो आहे.)

पावले चालती

निवृत्तिनाथांची वाट

उटीच्या वारीसाठी त्र्यंबकेश्वर गजबजले

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आज गुरूवारी चैत्र वद्य एकादशी म्हणजेच वरूथिनी एकादशीस उटीची वारी संपन्न होत आहे. संत निवृत्तिनाथ महाराज हे साक्षात शिवाचे अवतार मानले जातात. चैत्र सरतो आणि वैशाख महिना सुरू होतो तेव्हा संजीवन समाधी घेतलेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांना हा उन्हाळा सहन व्हावा म्हणून शीतल चंदनाचा लेप लावण्याची परंपरा शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून आहे. यास उटीची वारी असे म्हणतात. या वारीसाठी त्र्यंबेकश्वरमध्ये बुधवार सायंकाळपासूनच भाविकांच्या पायी दिंड्या दाखल होत होत्या.

ठाणे, नगर, धुळे आदि जिल्ह्यातून व गुजरातमधून अधिक संख्येने भाविक येत असतात. बुधवारी सायंकाळपासून शहरात पायी दिंड्यांनी भाविक दाखल होत आहेत. मागच्या गुरूवारच्या पंचमीपासून मंदिरात चंदन उगाळण्यास प्रारंभ झाला होता. बुधवारपर्यंत एक पिंपभर चंदनाचा लेप तयार झाला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्यादरम्यान उटी लावण्यास प्रारंभ होईल. सभामंडपात भजन कीर्तन अभंगसेवा रूजू करण्यात येत असते. उटी लावण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. संजय महाराज धोंडगे आणि इतर विश्वस्त व पुजारी गोसावी बंधू उपस्थित असतात. दुपारी लावलेली उटी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विधीवत पूजनाने उतरवण्यात येईल व त्यानंतर ती प्रसाद रूपाने भाविकांना वाटण्यात येते. येथे वारकरी दशमी ते एकदशीची रात्र असे दीड दिवस उपस्थित असतात. सभा मंडपात ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. मध्यरात्री उटी वाटपप्रसंगी दाटी होत असते. एक लाखाच्या आसपास भाविक येथे आलेले असताना त्यांच्या सुविधेसाठी स्थानिक प्रशासनाने केलेली तयारी पुरेशी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक उटीची वारी

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images