Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पोटनिवडणुकीत ‘इंजिन’ सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ 'क'च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले यांनी दणदणीत विजय संपादित केला. दोन हजार ३२२ मतांची आघाडी घेत त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारली.

शिवसेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपच्या विजया हरीश लोणारी यांना पराभवाची चव चाखावी लागली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे मनसेचे इंजिन सुसाट सुटल्याचे मतमोजणीवेळी पाहावयास मिळाले. मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उणेपुरे ३९ टक्के मतदान झाले होते. कमी मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उमेदवार डॉ. चव्हाण यांना ६९५, तर अॅड. भोसले यांना ३७३ मते मिळाली. डॉ. चव्हाण यांनी पहिल्या फेरीत ३२२ मतांनी आघाडी घेतली. तिसऱ्या आणि सातव्या फेरीत भाजपच्या उमेदवार विजया लोणारी यांनी आघाडी घेतली. परंतु, एकूण ११ पैकी आठ फेऱ्यांमध्ये मनसेचे इंजिन मतांची आघाडी घेत सुसाट सुटल्याचे पाहावयास मिळाले. एकूण १८ हजार ७५४ मतांपैकी ७,४५३ मते मिळवून अॅड. भोसले यांनी मनसेचा गड राखला. डॉ. चव्हाण यांना ५,१३१ मतांवर समाधान मानावे लागले. महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपच्या विजया लोणारी ४,८१० मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. निवडणुकीच्या रिंगणात एकूण आठ उमेदवार होते. त्यापैकी ज्योती पाटील (डोके) यांना ४४२, रंजना पवार यांना ४३९, समीना पठाण यांना १५५ मतांवर समाधान मानावे लागले. शमीना खान यांना ४०, तर अवंतिका घोडके यांना अवघी ३४ मते मिळाली.

आसू आणि हसू...

निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांनी अॅड. वैशाली भोसले यांच्या विजयाची घोषणा करताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. दिवंगत नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या आठवणी दाटून आल्याने अॅड. वैशाली भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. अॅड. भोसले यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याने आनंदित झालेले कार्यकर्ते, तर सुरेखा भोसले यांच्या आठवणीने त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात तरळेलेली आसवे असे दृश्य मतमोजणी केंद्राच्या बाहेर पाहावयास मिळाले.

मनसे, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी

मतमोजणीवेळी मनसेच्या उमेदवार अॅड. वैशाली भोसले यांनी आघाडी घेताच मनसेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर अशोक मुर्तडक, विद्यमान शहराध्यक्ष अनिल मटाले, माजी शहराध्यक्ष राहुल ढिकले, डॉ. प्रदीप पवार, काँग्रेसचे शाहू खैरे, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका हेमलता पाटील, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार आदींनी अॅड. भोसले यांना शुभेच्छा दिल्या.

२५० मतदारांनी नाकारले उमेदवार

या पोटनिवडणुकीतही मतदारांना 'नोटा'चा पर्याय वापरण्याची मुभा होती. आठपैकी एकाही उमेदवाराला मतदान देण्याची इच्छा नसलेल्या मतदारांनी वरीलपैकी एकही नाही अर्थात, 'नोटा'चा पर्याय वापरला. विशेष म्हणजे समीना पठाण, शमीना खान आणि अवंतिका घोडके या तीन उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षाही 'नोटा' वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पाहावयास मिळाले.

पाच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने आठपैकी पाच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले. विजयी उमेदवाराला प्राप्त एकूण मतांच्या १० टक्के मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त केले जाते. ७०० हूनही कमी मते मिळालेल्या ज्योती पाटील, रंजना पवार, समीना पठाण, शमीना खान आणि अवंतिका घोडके यांचे डिपॉजिट जप्त झाले.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून मतमोजणी केंद्रात आणि बाहेरही तणावाचे वातावरण होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासह गंगापूर, पंचवटी, आडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी असा ५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मतदान केंद्राच्या आवारात तैनात होता. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता एकूणच मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी ६ टेबल लावण्यात आले होते. मोजणीसाठी ८ पर्यवेक्षक नेमण्यात आले होते. १६ सहाय्यक मतमोजणी अधिकाऱ्यांनी या मतमोजणीवर लक्ष ठेवले. रोहिदास बहिरम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

--

मतदारांनी मला विजयी करून सुरेखा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली आहे. काझी गढीच्या संरक्षक भिंतीच्या प्रश्नासह जुने नाशिक भागातील अनेक समस्या मार्गी लागाव्यात यासाठी त्या पाठपुरावा करीत होत्या. त्यांचे प्रभागाच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

-अॅड. वैशाली भोसले, नवनिर्वाचित नगरसेविका

--

प्रभागातील मतदारांनी सुरेखा भोसले यांना ही मतदानरुपी आदरांजली वाहिली आहे. या पोटनिवडणुकीत मनसेने विजयाची गुढी उभारली असून, राज ठाकरे यांनी दिलेल्या मोदीमुक्त भारताची सुरुवात नाशिकमधून करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र आल्यामुळेच जातीयवादी शक्तींचा पराभव झाला.

-नितीन भोसले, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुनी पेन्शन लागू करा

नियोजनबद्ध चोरीने तपासाला मिळेना गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहा रुपयांच्या पाच नोटा खाली पडल्याचे सांगत सहा ते सात चोरट्यांनी अगदी नियोजित पध्दतीने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास करून पाच दिवस उलटले. गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी वेगवेगळ्या पध्दतीने तपास केला. मात्र, पैशांसह बँकेतून बाहेर पडलेले चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असले तरी परागंदा होण्यात यशस्वी ठरले आहेत.

चोरीची घटना मंगळवारी (३ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील मॉर्डन कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली होती. कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ या दुकानामधील कर्मचारी प्रशांत भास्कर वाणी (वय ३७) आपल्या सहकाऱ्यांसमवेत बँकेत पैसे जमा करीत असताना बॅग लिफ्टिंगचा प्रकार घडला होता. अवघ्या १० रुपयांच्या पाच नोटा खाली टाकून चोरट्यांनी कर्मचाऱ्यास तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. यानंतर अवघ्या तीन ते चार सेकंदात चोरटे २८ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वेगवेगळ्या टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. मात्र, एखाद्या पिक्चरमध्ये शोभावे या पध्दतीने सहा ते सात चोरटे कोणताही मागमूस न ठेवता परागंदा झाले. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समोर आलेल्या फोटोग्राफ्सची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी कळविण्यात आली आहे. आरोपीने अगदी नियोजनपूर्वक गुन्हा केला असून, सराईत गुन्हेगाराच अशा प्रकारे काम करू शकतो. तपासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्यात घरभेदी असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. क्राईम ब्रँचसह वेगवेगळे पथक गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी झटत असून, या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे नखाते यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथेफिरुसह युवक, महिलेवर अंत्यसंस्कार

$
0
0

माथेफिरुसह युवक, महिलेवर अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, सुरगाणा

वांजुळपाडा येथे एका माथेफिरुने शुक्रवारी संध्याकाळी एका युवकासह महिलेचा खून केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना संबंधित माथेफिरूचाही शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. शनिवारी तीन वाजेच्या सुमारास तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, पोलिस उपनिरीक्षक माने आदींसह पोलिस कर्मचारी तैनात होते. ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.

गुलाब पालवी व त्याची तीन वर्षाची मुलगी चांदनी पालवी शेतातून घराकडे येत आसताना माथेफिरु भास्कर जोपळे याने गुलाब यांच्या डोक्यात फावड्याने वार करुण कले. हे कृत्य श्याम पवार याने पाहिल्यावर त्याने घटनास्थळावरून कसाबसा पळ काढला. गावातील नागरिकांनी सुरगाणा पोलिस ठाणे येथे घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले असताना माथेफिरुला पकडण्यास कोणीही पुढे येत नव्हते. जवळच्याच शेतात राहिबाई बागुल (वय ४५) ही महिला काम करीत असताना माथेफिरुने त्या महिलेच्या डोक्यात दगडा टाकला. या आघाताने संबंधित महिलाही जागीच ठार झाली होती. त्यानंतर माथेफिरूला जमावाने बेदम मारहान केली. जखमी अवस्थेत असलेल्या माथेफिरुला वणी ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा ही मृत्यू झाला. शनिवारी गावात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात राखीव पोलिस दल तैनात होते. दुचारी तीनच्या सुमारास तिन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिहिनांना जमीन द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेनुसार सरकारकडील पडिक जमिनींचे भूमिहिनांना वाटप करावे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पॅँथरने जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला. निदर्शनांद्वारे राज्य सरकारचा निषेध करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी हे निवेदन स्वीकारले. त्याद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, याकरिता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील संशयित संभाजी भिडे यांना अटक करावी, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, आदिवासी व दलितांना वनजमिनी व गायरान जमिनींचे ताबडतोब वाटप करावे, बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात अथवा बेरोजगार भत्ता द्यावा, महापालिकेकडून हॉकर्सवर होत असलेली अन्यायकारक कारवाई थांबवावी, हॉकर्स झोनचे पुनर्सर्वेक्षण करावे आदी मागण्या संघटनचे अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांनी केल्या आहेत.

--

जुनी पेन्शन लागू करा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन लागू करावी, तसेच २३ ऑक्टोबर २०१७ रोजी काढण्यात आलेला शासननिर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घंटानाद आंदोलनाद्वारे केली. या मागणीसाठी संघटनेने शनिवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले. शहरातही असे आंदोलन झाले.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटल्यानुसार, राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी हक्काची जुनी पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक परिभाषेत अंशदायी पेन्शन योजना लागू केली. शालेय शिक्षण विभागाने २३ ऑक्टोबर २०१७ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणीबाबतचा अन्यायकारक शासननिर्णय काढला. त्यामुळे ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी १२ वर्षे पूर्ण होऊन ज्यांना हक्काची वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार होती त्या हक्कावरसुद्धा सरकारने गदा आणली. या शासननिर्णयामुळे २००५ नंतर नियुक्त झालेल्या ८० टक्के शिक्षक कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा गाऱ्हाणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन वडजे यांनी मांडले. सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रवीण गायकवाड, एल. एल. भंडारे, गौरव देवढे, योगेश माकोने, सौरभ अहिरराव, किरण शिंदे, नीलेश नहिरे, माणिक घुमरे आदी सहभागी झाले होते.

--

पॉइंटर्स

गोदाकाठ तहानलेलाच -२

आरोग्यम् धनसंपदा -३

विविधरंगी दुबईवारी - ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंचा कारवाईचा दणका

$
0
0

अग्निशमन अधिकाऱ्याला एक लाखाचा दंड

दोन कर्मचारी बडतर्फ, तर एकाचे निलंबन

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनातील कामचुकारांना शनिवारी मोठा दणका दिला. महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना तब्बल एक लाखाचा दंड ठोठावत दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई, तर एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची मोठी कारवाई झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

धडाकेबाज कामकाजासाठी ख्यात असलेल्या आयुक्त मुंढे यांनी कठोर कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. महापालिकेचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन हे सुद्धा त्यातून सुटलेले नाहीत. महाजन यांनी हॉस्पिटलच्या संदर्भातील परिपत्रक दडवून ठेवल्याची तक्रार नगरसेवक संजय चव्हाण यांनी केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीचा अहवाल तपासल्यानंतर मुंढे यांनी महाजन यांना कर्तव्यपरायणता आणि गैरशिस्त वर्तनाबाबत तब्बल एक लाख रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीस महाजन यांना बजावण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच क्लास वन अधिकाऱ्याला इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

नवीन नाशिक विभागीय कार्यालयातील स्लम विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक संपत दगडू भालेराव यांना बडतर्फ करण्यात आले आहे. वरिष्ठांशी वाद घालणे, कार्यालयात गैरहजर राहणे, कामकाज अपूर्ण ठेवणे, कामकाजात दिरंगाई करणे अशा तक्रारी त्यांच्याबाबत होत्या. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पश्चिम विभागीय कार्यालयातील वायरमन संजय चिमण पगार यांनाही बेशिस्त वर्तन भोवले आहे. त्यांनाही बडतर्फ करण्याचे आदेश मुंढे यांनी काढले आहेत. पंचवटी विभागीय कार्यालयातील शिपाई दत्तात्रय मुरलीधर पोळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त मुंढे यांच्या या कठोर कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. क्लासवन अधिकाऱ्यापासून खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यावर अशाप्रकारे कारवाई झाल्याने अन्य अधिकारी व कर्मचारीही धास्तावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडचा झिशान खेळणार बँकाकमध्ये

$
0
0

आंतरराष्ट्रीय सॉफ्ट बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील गुड शेफर्ड शाळेचा विद्यार्थी झिशान कुरेशी याची  बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सॉफ्ट बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. झिशानचे क्रीडा शिक्षक दिवाकर दोंदे व व्यंकटेश देशपांडे यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मनमाड शहराला कबड्डीची पंढरी मानले जाते. वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या सुवर्ण कन्यांनी शहराचे क्रीडा विश्व दैदिप्यमान केले आहे. कराटे मध्येही येथील विद्यार्थी चमकत आहेत. त्यातच  सॉफ्ट बेसबॉल या खेळात गुड शेफर्ड विद्यालयाने आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे.

सांगली येथे  नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सॉफ्टबेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र  संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय  स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले. या महाराष्ट्र संघात मनमाडच्या झिशानने चमकदार कामगिरी केली होती.  राष्ट्रीय स्पर्धेचा बेस्ट हीटर म्हणून झिशान कुरेशी ची निवड झाली आहे. ३० एप्रिल ते ४ मे रोजी बँकॉक येथे होणाऱ्या 'सॉफ्टबेसबॉल एशियन चैंपियनशिप'मध्ये तो खेळणार आहे. झिशानच्या या यशाबद्दल  सी.एम.ई.एफ  ट्रस्टचे  अध्यक्ष  डॉ. डेविड व इतर पदाधिकारी, प्राचार्य रॉल्फि मसक्रेनस, उपप्राचार्य मजहर शेख, उपप्राचार्य वनिता नायर यांनी त्याचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुगल संगीत सभेत सरोदवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवंगत प्रा. अरुण वसंत दुगल स्मृती संगीत सभेत शंकराचार्य संकुलात शनिवारी सेनिया मैहर घराण्याचे पुणे येथील सरोदवादक अनुपम जोशी यांनी सरोदवादन केले. दुगल संगीत सभेचे यंदाचे सहावे पुष्प होते.

उस्ताद अकबर अली खान व पं. रविशंकर यांचा प्रिय राग 'श्री' जोशी यांनी प्रारंभी सादर केला. पारंपरिक पद्धतीने राग वाजवताना त्यांनी अनेक नजाकती पेश केल्या. जोशी यांचे वादन उत्तरोत्तर रंगत केले. त्यांना फरुखाबाद घराण्याचे उन्मेष बॅनर्जी यांनी तबल्यावर साथसंगत केली. कार्यक्रमात विद्या दुगल यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. अभिराम दुगल, हर्षा दुगल यांनी नियोजन केले. राजा पुंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकीवर खासगीकरणाचा उतारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीजहानीचे प्रमाण रोखण्यासाठी आणि थकबाकी वसुलीसाठी हरतऱ्हेचे उपाय योजनूही उपयोग न झाल्याने अखेरीस महावितरणच्या नाशिक परिमंडळातील मालेगाव शहरातील वीज वितरण व्यवस्था खासगी कंपनीच्या हाती सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने नुकताच घेतला. येत्या जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील मालेगाव शहराच्या वीज वितरणाचा भार खासगी कंपनीच्या ताब्यात दिला जाणार आहे.

मालेगाव शहरात वीजहानीबरोबरच थकबाकीचे प्रमाण कोट्यवधींच्या घरात आहे. येथील वीजहानीचे प्रमाण रोखण्यासाठी महावितरणने यापूर्वी हरतऱ्हेचे प्रयत्न केलेले आहेत. याशिवाय थकबाकीची वसुली करण्यासाठीही थकबाकीधारकांना विविध योजनांचे गाजर दाखवूनही त्याचा काहीही फायदा झाला नाही. परिणामी थकबाकीचा डोंगर वाढतच गेला. थकबाकीधारकांमध्ये मालेगाव शहरातील हँडलूमधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वीज बिलमाफीच्या अपेक्षेने येथील वीजग्राहकांनी महावितरणच्या सर्व प्रयत्नांना आणि योजनांना ठेंगा दाखविल्याने मालेगाव विभागातील थकबाकीचा डोंगर तब्बल २१० कोटी १२ लाख ५९ हजारांवर पोहचला आहे. यात एकट्या मालेगाव शहरातील तिन्ही विभागांत तब्बल ८ कोटी ९९ लाख ७२ हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांना वारंवार आवाहन करूनही मालेगावमध्ये सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी मालेगाव शहराची वीज वितरण सेवा खासगी कंपनीच्या हाती सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ऊर्जा खात्याने नुकताच घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा आणि विदर्भातील अकोला शहराचाही समावेश आहे. मालेगाव शहरातील वीज वितरण सेवेचे खासगीकरण झाल्यावर थकबाकीदार वीज ग्राहकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मालेगाव विभागातील थकबाकी

मालेगाव विभागात तब्बल ३४ हजार ५१ घरगुती वीज ग्राहकांकडे ६ कोटी ५९ लाख २ हजार ६४९ रुपये, वाणिज्यिक ग्राहकांकडे १ कोटी ५३ लाख ६५१ रुपये, औद्योगिक ग्राहकांकडे ८९ लाख ४० हजार २१८ रुपये, कृषी ग्राहकांकडे १८६ कोटी २८ लाख १०५ रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांकडे २ कोटी १० लाख ३९८ रुपये, पथदीप ग्राहकांकडे ५ कोटी ६६ लाख ३ हजार २०१ रुपये, हातमागधारक ग्राहकांकडे ६ कोटी ९ लाख अशी २१० कोटी पेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यापैकी तब्बल सुमारे ९ कोटी रुपये केवळ मालेगाव शहरातील वीजग्राहकांकडे आहेत.

मालेगाव शहरातील ग्राहकनिहाय थकबाकी (रुपये लाखात)

ग्राहक प्रकार - ग्राहक संख्या - थकबाकी

घरगुती १९९३२ - ४०६.५१

वाणिज्यिक १७१३ - ७७.५३

औद्योगिक १३८ - १२.३७

कृषी ६६ - १८.६३

सार्वजनिक पाणिपुरवठा ०० - ०.००

पथदीप ७३- ०.६६

हातमाग यंत्रणा - १८३६- ३४२.१०

इतर ६४ - ४१.९१

एकूण २३८२२- ८९९.७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकेण्डलाही होणार मोसमची स्वच्छता

$
0
0

पालिका प्रशासनासह मंत्री दादा भूसेंचा पुढाकार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील युवा सेना व पालिका, पोलिस, महसूल प्रशासनाकडून शहरातील सामान्य रुग्णालय ते आंबेडकर पूल दरम्यान मोसम नदी पात्राची स्वच्छता व सुशोभिकरण मोहीम राबविण्यात आली. त्यातूनच मोसम नदीचे रूप पालटले आणि मोसम चौपाटीचे लोकार्पण नुकतेच पार पडले. आता नदीचा अन्य अस्वच्छ असलेला भाग देखील स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शनिवार आणि रविवारी ही मोहीम राबविली जाणार असून शनिवारी या मोहिमेस प्रारंभ झाला. 

मोसम चौपाटीने नदीचे अस्वच्छ आणि बकाल चित्र बदलू शकते असा विश्वास निर्माण झाला असल्याने आता पालिका प्रशासनाने देखील मोसम नदी स्वच्छतेसाठी मोहीम सुरू केली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामान्य रुग्णालय ते आंबेडकर पूल दरम्यान स्वच्छता करून नदी पात्र सुशोभित केले आहे. त्या पुढील नदी पत्रातील घाण, कचरा, प्लास्टिक हटविण्यास पालिकेने शनिवारी सुरुवात केली. 

सकाळी १० वा. स्वतः ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, युवासेना, शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी नदी स्वच्छता मोहिमेत

सहभागी झाले होते. पालिकेच्या वतीने नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा, घाण काढण्यासाठी ५ जेसीबी, १५ ट्रॅक्टर तसेच दोन डंपर उपलब्ध करून देण्यात आले होते. दुपारी उशिरापर्यंत हा नदीपात्रातील कचरा काढण्याचे काम सुरू होते. मोसम नदी स्वच्छतेची मोहीम निरंतर स्वरूपात राबविण्याचा पालिकेचा मानस असून यातून मोसम नदीचे पूर्ण पात्र स्वच्छ व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले. 

नागरिकांना आवाहन

शनिवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जेसीबीच्या सहाय्याने आंबेडकर पूल ते गणेश कुंड दरम्यान पत्रातील कचरा हटविण्यात आला. उद्या, रविवारीही ही मोहीम सुरू राहणार असून गणेशकुंडाच्या पुढील भागात असलेल्या नदी पत्रातील प्लास्टिक हटविले जाणार आहे. शनिवारी राबविलेल्या मोहिमेमुळे सांडावा पुलापासून नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. मोसमनदी स्वच्छतेसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन भुसे तसेच पालिका प्रशासनाने केले आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांताधिकारी, तहसीलदारांना द्यावा टँकर सुरू करण्याचा अधिकार

$
0
0

सटाणा येथे आमसभेत एकमुखी निर्णय

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे तक्रारी दाखल येत असतांना टँकर सुरू करण्याचे अधिकार प्रातांधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे देण्यात यावेत, असा एकमुखी ठराव सटाणा पंचायत समितीतील आमसभेत करण्यात आला.

आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दीपिका चव्हाण होत्या. बागलाण पंचायत समिती आवारात शनिवार आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. आमसभेच्या व्यासपीठावर माजी आमदार संजय चव्हाण, पंचायत समिती सभापती विमल सोनवणे, जि. प. सदस्य लता बच्छाव, डॉ. विलास बच्छाव, माजी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, रामचंद्र पाटील, राघो अहिरे, यशवंत पाटील, भिकानाना सोनवणे, यशवंत अहिरे, प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी, डी. के. कापडणीस, वनपरीक्षेत्र अधिकारी विलास पाटील, अशोक शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख, सरपंच, व सदस्य उपस्थित होते.

आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या, गत तीन ते साडेतीन वर्षात सरकारदरबारी बागलाण तालुक्यातील हरणबारी, केळझर कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा या सिंचनाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध केला आहे. मात्र काही ठिकाणी जनतेचा विरोध असल्यामुळे योजना पूर्णत्त्वास जाण्यास अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत तालुका पाणी टंचाईचा सामना करीत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देखील आपण हरणबारी व चणकापूरचे आवर्तन सोडण्या संदर्भात निवेदन दिले आहे. तालुक्यातील पाणी, आरोग्य व वीज प्रश्नांवर आमसभेत जोरदार चर्चा झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरील थकीत वीजबिले वुसलीस स्थगिती देण्यात यावी अशी सूचना चव्हाण यांनी केली.

पाण्यासाठी सभेत टाहो

प्रा. के. एन. अहिरे यांनी वांजुळपाणी योजना सर्व्हेसाठी शासनाने ३.५ कोटी रुपये मंजूर करण्यासाठी आमसभेत एकमुखी ठराव मांडला. त्यास आमसभेने मान्यता दिली. काँग्रेस तालुकाध्यक्ष नारायण खैरनार यांनी बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली. अजमीर सौंदाणे येथील जितेंद्र पवार यांनी गावात १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गावासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी केली. टेभें येथील भाऊसाहेब चिला यांनी वीजतारा बदलण्याची मागणी मांडली. मुंजवाडचे सरपंच प्रमिला पवार यांनी मुंजवाड गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मागणी मांडली. यासह नवेनिरपूरचे सरपंच शितल पवार,नामपूरचे सरपंच कविता सावंत यांनीही पाणीटंचाईबाबत योजना मंजूर करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७ एप्रिल युवा उर्जा फाऊंडेशनच्या वतिने नेत्र तपासणी शिबिर सातपूर

$
0
0

नेत्र तपासणी शिबिर

सातपूर : जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने युवा ऊर्जा फाउंडेशनच्या वतिने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका लता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नेत्र तपासणी केलेल्या क्लपतरू लायन्स व्हिजन सेंटरच्या वतिने दारिद्र रेषेखालील गरजूंचे मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शरद पाटील यांनी सर्व प्रकारची यंत्रणा त्याच्या रुग्णालयातून उपलब्ध करून दिली.

---------

अऩिल सावळेंना पी.एचडी. प्रदान

जेलरोड : नाशिकरोड येथील चांडक बिटको कॉलेजातील अर्थशास्त्र विभागातील प्रा. अनिल सावळे यांना पी.एचडी. पदवी प्रदान करण्यात आली. 'नाशिक जिल्ह्यातील फळ उत्पादकांच्या आर्थिक स्थितीचा तौलनिक अभ्यास' हा त्यांचा विषय होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डा. पी. पी. पाटील यांच्याहस्ते जळगाव येथे त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. संस्थेचे सचिव सर डा. मो. स. गोसावी, प्राचार्या डा. दिप्ती देशपांडे, प्राचार्य डा. राम कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याची गरज - बर्डी

$
0
0

'विद्यार्थ्यांमधील गुणांना वाव द्या'

इंदिरानगर : आजची पिढी ही अत्यंत संवेदनशील असून त्यांची आकलन शक्‍ती प्रभावी असते. या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणे ही गरज असल्याचे, असे प्रतिपादन गुरुगोविंद फाउंडेशनचे अध्यक्ष जी. एस. बर्डी यांनी केले.  भारत सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या अटल इनोव्हेशन मिशन योजनेअंतर्गत अटल टिंकरिंग प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेही बर्डी आणि सेंटरच्या मुख्य अधिकारी कांता दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रयोगशाळेत नाशिक शहरातील सुमारे शंभरहून अधिक शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या प्रयोगशाळेत सातवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विविध इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व त्‍यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग, एस. कुलजीत बर्डी, प्राचार्य जे.ए. गुजराल, पुनीत दुग्गल, शोभा कारवा यांचेसह महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित हेाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव, चांदवड, मनमाडमध्ये पाऊसकांदाचाळीचे

$
0
0

मालेगाव, चांदवड,

मनमाडमध्ये पाऊस

कांदाचाळीचे नुकसान; तरुण जखमी

टीम मटा

नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे पावसाचे संकेत मिळत असतानाच शनिवारी सायंकाळी मालेगाव, चांदवड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाडमध्येही वादळवाऱ्यासह पाऊस झाला असून, रेल्वेस्थानकाच्या पादचारी पुलाचे पत्रे निखळले. जिल्ह्याच्या तापमानात घट झाली असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. मनमाडमध्ये कांदा चाळीच्या पाच शेड कोसळून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर एका घराचे छप्पर उडाले, तरुण जखमी झाला आहे.

मालेगाव शहरात शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. मनमाडमध्ये वादळी वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावरील पत्रे निखळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शहरात दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे किरकोळ विक्रेत्यांची धांदल उडाली, तर चांदवड परिसरात गारा कोसळल्या. चांदवडजवळील सुतारखेडे येथे पंधरा ते वीस मिनिटे पाऊस सुरू होता. नांदगावातही शनिवारी ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, सायंकाळपर्यंत पाऊस झाला नाही.

सविस्तर वृत्त...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला उद्यापासून कांदा लिलाव

$
0
0

चांदवडला उद्यापासून कांदा लिलाव

व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संचालक मंडळाचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड बाजार समितीच्या आवारात मंगळवार (दि. १०) पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून व्यापारी वर्गाच्या मनमानी व आडमुठे धोरणाचे कारण दाखवून संचालक मंडळाने हे कांदा लिलाव बेमुदत बंद केले होते.

येथील व्यापारी वर्गाने कांदा लिलाव नियमित व पूर्ववत सुरू करण्यासाठी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर कांदा लिलावाबाबत बाजार समिती संचालक मंडळाची तातडीची सभा घेण्यात आली. सभेत झालेल्या निर्णयानुसार बाजार समितीच्या नियमाप्रमाणे व्यापाऱ्यांची नियमित कामकाज करण्याचे आश्वासन दिल्याने मंगळवारी (दि. १०) सकाळी ९.३० वाजेपासून नियमित कांदा शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. बैठकीस संचालक शिरीषकुमार कोतवाल, पंढरीनाथ खताळ, विलास ढोमसे, निवृत्ती घुले, आण्णासाहेब आहेर, राजेंद्र वानखेडे, संजय जाधव, चंद्रकांत व्यवहारे, सुरेश जाधव, इंदुबाई वाघ व कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भूषण पलोड यांच्यासह सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते. बाजार समिती आवारात आता नियमित कांदा शेतीमालाचे लिलाव सुरू होत असल्याने शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल प्रतवारी करून मोठ्याप्रमाणात चांदवड येथे विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकार सदैव ज्येष्ठांच्या पाठीशी

$
0
0

आमदार राहुल आहेर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

ज्येष्ठ नागरिकांच्या कौटुंबिक समस्या लक्षात घेऊन विधिमंडळात सर्वपक्षीय पातळीवर सामंजस्याने भूमिका घेतली जात असून, सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्षे ६० करण्याची सरकारची भूमिका आहे, असेही डॉ. आहेर यावेळी म्हणाले.

येथील श्री यशवंतराव महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ, वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या नगर-नाशिक प्रादेशिक अधिवेशनाचे रविवारी (दि. ८) झालेल्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश बागड होते. व्यासपीठावर माजी खासदार प्रताप सोनवणे, माजी आमदार दीपिका चव्हाण, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उद्योजक वर्धमान लुंकड, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, सतीश कलंत्री, स्वागताध्यक्ष जिभाऊ सोनवणे उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने यशवंत स्मरणिकेचे प्रकाशन माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस विभक्त कुटूबंपद्धतीमुळे वाढू लागल्या आहेत. एकत्रित कुटूंब प्रणाली हद्दपार होत असल्याने ज्येष्ठांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र संस्कार असलेल्या पिढीने आजही ज्येष्ठ नागरिकांना मानसन्मान बहाल केलेला आहे, असे मत आमदार डॉ. आहेर यांनी व्यक्त केले. अध्यक्ष सुरेश बागड यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने वयोमर्यादा घटविण्याचे आवाहन केले. तसेच शासनदरबारी आमच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय चौधरी, ग्रामीण अध्यक्ष अनंत घोलप, सचिव केदूपंत भालेराव, बाबुलाल मोरे, एन. व्ही. राणे, बाबुलाल नेरकर, केशव सोनवणे, भास्कर सोनवणे, वि. रा. पंडित, राजेंद्र बंब, विश्वनाथ येवला आदींसह नगर नाशिक विभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई जाचकच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीबीएसईकडून देशभरात रविवारी जेईई मेन्स ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या महत्त्वाच्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणारे लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या वर्षीही विद्यार्थ्यांची अगदी कैद्यांसारखी तपासणी करण्यात आली. दप्तर, पेन, रायटिंग पॅड, रुमाल, कंबरेचा बेल्ट इतकेच काय मुलींच्या कानातील दागिनेही केंद्राबाहेरच काढून ठेवण्यात आले.

रविवारी सकाळी ९.३० वाजता जेईईचा पहिला पेपर होता. सकाळी ७ वाजेपासूनच केंद्र खुली करण्यात आली होती. अनेक विद्यार्थी बाहेरगावांहून पालकांसोबत आल्याने केंद्रांबाहेर पालक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. पालकांना कॉलेजच्या आवारात बसण्यास नाकारण्यात आल्याने त्यांच्यावर वणवण फिरण्याची वेळ आली. जेईई मेन्स परीक्षेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सीबीएसईकडून अगदी छोट्या वस्तूही वर्गात नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जात होती. याचा विद्यार्थ्यांना त्रास झाला. कानातले दागिने, ब्रेसलेट, कंबरेचा बेल्ट, पाण्याची बाटली, हातरुमाल, रायटिंग पॅड, इतकेच काय तर पेन नेण्याचीही परवानगी देण्यात आली नाही. वर्गात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरने विद्यार्थ्यांना तपासण्यात आले. शिवाय, अनेक ठिकाणी दप्तरही गेटमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आल्याने बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. त्यामुळे परीक्षेपूर्वीचा हा तपासणीचा टप्पाही विद्यार्थ्यांना टेन्शन देणारा ठरत होता.

सायंकाळी ५ वाजता पेपर-२ संपल्यानंतर केंद्राबाहेरच अनेक विद्यार्थी प्रश्नांचे विश्लेषण करत होते. यामध्ये पेपर-१ हा पेपर- २ च्या तुलनेत सोपा असल्याची मते विद्यार्थी व्यक्त करत होते. पेपर-२ मध्ये अॅप्टिट्यूड, ड्रॉइंग व गणित या विषयांचा समावेश होता. गणित व फिजिक्स या विषयांनी टेन्शन दिल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. येत्या १५ व १६ एप्रिलला देशभरात ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

\Bजेईई अॅडव्हान २० मे रोजी

\Bजेईई मेन्ससाठी देशभरात ११ लाख ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या वर्षीदेखील १२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील केवळ दोन लाख जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र होतात. २४ एप्रिल किंवा त्यानंतर 'आन्सर की' जाहीर केली जाणार असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मेन्सचा निकाल लागणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी २० मे रोजी होणाऱ्या जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरणार आहेत.

\B

\Bगणित असलेला पेपर-२, पेपर-१पेक्षा कठीण वाटला. प्रश्नांची उत्तरे खूप मोठी असल्याने लिहिण्यास पुरेसा वेळदेखील मिळाला नाही. \B

\B- आकांक्षा वसावे, विद्यार्थिनी

मागील दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला होता. त्या तुलनेत यावर्षीचे पेपर सोपे वाटले.

- मिलिंद पगारे, विद्यार्थी

या परीक्षांची सोय सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्येही केली पाहिजे. बाहेरगावाहून परीक्षा द्यायला येणे व परीक्षांच्या जाचक अटींचा सामना करणे कठिण जाते. दप्तर कुठे ठेवायचे, अशा प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागत होते. थोड्या कॉपीबहाद्दरांमुळे देशातील सर्वच विद्यार्थ्यांना नियमांचा जाट सहन करावा लागत आहे.

- प्रसाद कुलकर्णी, पालक

दरवर्षी ही परीक्षा होते. यामध्ये कोणत्याही प्रश्नाची कधीही पुनरावृत्ती होत नाही. परीक्षेची काठिण्यपातळी जास्त आहे. फिजिक्स हा विषय जेईईत नेहमीच कठीण जातो. यावेळी गणितही कठीण होते.

- प्रमोद पाटील, स्मार्ट एज्युकेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलाशिक्षकांना प्राधान्य देणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलाशिक्षकांना अतिरिक्त असण्याच्या भावनेचा सामना करावा लागत असून, त्यांना यापासून मुक्तता मिळावी व नियमित शिक्षकांची मान्यता मिळावी, यासाठी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रयत्न केली जातील, असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले.

व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघ, नाशिक जिल्हातर्फे कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. एएम वेतनश्रेणी, कलाशिक्षकांच्या मान्यता, कलेशिवाय इतर विषयांचा भार त्यांना देऊ नये, अशा मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. कलाशिक्षकांना अपेक्षित सहकार्य करण्याचे आश्वासन विश्वास प्रबोधिनीचे विश्वास ठाकूर यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंडाजीमामा आव्हाड होते. दत्तात्रय सांगळे व संदीप पांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चित्रकार अशोक ढिवरे यांच्या निसर्ग चित्रणाचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते. व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाकडून या कार्यक्रमात दीडशे शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कलाक्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या शिक्षकांचा यात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया लेखन स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी नियतकालिकांच्या इतिहासात एकेकाळी लिहिले गेलेले आणि आजही ज्यांचा संदर्भ कायम आहे असे अनेक लेख जुन्या दिवाळी अंकांमध्ये, ग्रंथालयांमध्ये दडलेले आहेत. त्यांचा शोध घेऊन आजच्या वाचकांपर्यंत ते लेख पोचवत असलेल्या 'पुनश्च'ने सोशल मीडिया लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. 'पुनश्च'वरील लेख वाचून आपला प्रामाणिक आणि प्रभावी अभिप्राय लिहिण्याची ही स्पर्धा आहे. आलेल्या प्रवेशिकांमधून १० विजेते निवडण्यात येतील. पहिल्या क्रमांकास रुपये ३००० आणि दुसऱ्या क्रमांकास रुपये २०००चे पारितोषिक मिळेल. तसेच पुढच्या ८ विजेत्यांना प्रत्येकी १००० चे पारितोषिक मिळेल. अधिक माहिती http://punashcha.com या वेबसाइट आणि फेसबुकपेजवर मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हाय-वे’पेक्षा शहरातील रस्ते धोकादायक

$
0
0

मटा विशेष

तिमाहीत ४७ पैकी ३२ जणांचा शहरातंर्गत रस्त्यांवर मृत्यू

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : जड वाहनांचा भरधाव वेग आणि वाहनांची घनता लक्षात घेता राष्ट्रीय व राज्य महामार्ग धोकेदायक वाटतात. मात्र, मागील तीन महिन्यात शहर पोलिसांकडे नोंद झालेल्या अपघातांचा विचार करता शहरातंर्गत रस्त्यांपेक्षा हायवे सुरक्षित असल्याचे दिसते. तीन महिन्यात रस्ते अपघातांमध्ये एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला असून, यात शहरातंर्गत रस्त्यांवर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२ इतकी मोठी आहे.

शहरात डीपीरोडचे मजबुत जाळे पसरले असून, कॉलनीरस्त्यांबरोबर शहराच्या विकासात अंतर्गत रस्त्यांची रूंदी व लांबी वर्षागणिक वाढत आहे. शहरातून मुंबई-आग्रा हायवे, नाशिक-पुणे हायवे, नाशिक-औरंगाबाद हायवे, नाशिक-डहाणूरोड, नाशिक-पेठरोड, नाशिक-दिंडोरी रोड असे प्रमुख आणि मोठे रस्ते गेले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर जड वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. तसेच रस्त्यांवरील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मोठे हायवे धोकेदायक ठरू शकतात. मात्र, शहराचा विचार करता सर्वाधिक रस्ते अपघात शहरांतर्गत रस्त्यावर झाल्याचे दिसते. जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या काळात शहर तसेच शहर हद्दीतील हायवेंवर जीवघेणे, गंभीर तसेच किरकोळ दुखापतीचे असे १५८ अपघात झाले. यात ४२ पुरूषांसह पाच महिला मृत्युमुखी पडल्या. सर्वाधिक अपघात आणि मृत्यू शहरातंर्गत रस्त्यावर झाले असून, स्पीड ब्रेकर्स, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, सुसाट वेग, रस्त्यावरील अडथळे यामुळे हायवेपेक्षा शहरातंर्गत रस्ते जास्त धोकादायक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरातील रस्त्यांवर एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला. ८४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. तर ३० जणांना किरकोळ दुखापत झाली. कोणतीही दुखापत नसलेल्या अपघातांची संख्या ११३ इतकी मोठी आहे.

शहरातील प्रमुख रस्ते व त्यांचे अंतर

- मुंबई-आग्रा हायवे : २५ किलोमीटर

- नाशिक-पुणे हायवे : १८ किलोमीटर

- नाशिक-औरंगाबाद : १६ किलोमीटर

- नाशिक-डहाणूरोड : १२ किलोमीटर

- नाशिक-दिंडोरीरोड : १२ किलोमीटर

- नाशिक-पेठरोड : ११ किलोमीटर

प्रकार-मृत्यू-जखमी

- पादचारी-१२-२८

- सायकलस्वार-१-५

- अॅटोरिक्षा चालक वा प्रवासी-०-४

- हलकी वाहने चालक वा प्रवासी-१-९

- ट्रकचालक-०-२

- ट्रक क्लिनर-०-२

- इतर-३३-१०८

- एकूण-४७-१५८

रस्ता-मृत्यू-गंभीर जखमी-किरकोळ-दुखापत नाही- एकूण

राष्ट्रीय महामार्ग-१३-२३-५-१-३६

राज्य महामार्ग-२-७-१-०-९

इतर रस्ते-३२-८४-३०-२-११३

एकूण-४७-११४-३६-३-१५८

म्हणून हेल्मेट आवश्यक

रस्ता कोणताही असो, अपघातानंतर डोक्याला मार बसला की मृत्यू होण्याची शक्यता वाढते. सर सलामत तो पगडी पच्चास, असे म्हणतात ते खोटे नाही. या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलिस सातत्याने प्रयत्त्न करीत आहेत. हेल्मेटबाबत होणारी कारवाई हा त्याचाच महत्त्वपूर्ण भाग आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images