Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कारवाई अधिक कठोर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करवाढीमुळे सध्या रोषाचे धनी ठरत असलेले महापालिका प्रशासन आता थकबाकीदार आणि मालमत्ताधारकांबाबत आक्रमक झाली आहे. त्यामुळेच महापालिकेने स्व मालकीच्या आणि अल्प भाडे भरणा-या गाळ्यांचा ताबा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीच ११०० गाळेधारकांना त्यासंबंधीची नोटिस बजावण्यात आली असून या महिनाअखेरीस हे गाळे ताब्यात घेतले जाणार आहेत. तर, घरपट्टी वसुलीची थकबाकी असलेल्या ४१९ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. म्हणूनच जप्त मालमत्तांचा लिलाव १५ एप्रिल पासून करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहापूर्वी युवतीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाहासाठी अवघे १५ दिवस असताना २२ वर्षांच्या नियोजित वधूने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील आंबे जानोरी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात गुन्ह्याची नोंद केली असून, शवविच्छेदन झालेले नसल्याने काही बाबी स्पष्ट होऊ शकलेल्या नाहीत.

मेघा विधाते (२२, रा. आंबे जानोरी, ता. दिंडोरी) असे या युवतीचे नाव आहे. एमबीए झालेल्या मेघाचा २२ एप्रिल रोजी विवाह निश्चित झाला होता. मात्र, विवाहाच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वी मेघाने गळफास घेतला. दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकारामुळे मेघाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. नियोजित दाम्पत्य गुरूवारी (दि. ५) फिरण्यासाठी गेले होते. मेघाच्या संमतीनेच विवाह ठरला होता. सर्व काही सुरळीत असताना हा प्रकार का आणि कसा झाला, हेच समजेना असे काहींनी स्पष्ट केले. दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय तपासणी शुक्रवारी झाली नाही. मेघाने गळफास का घेतला, याचा तपास पोलिस करीत असून, शवविच्छेदन अहवालानंतर यातील महत्त्वाचे तथ्य समोर येऊ शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकांचे ‘सोशल वॉर’

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे एकलहरे येथील मातोश्री इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापक उद्बोधन शिबिराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन्ही मुख्याध्यापक संघांत सोशल मिडीयावर चांगलेचे वाकयुद्ध रंगल्याचे दिसून आले. आज शनिवारी (दि. ७) हे शिबिर राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्या उपस्थितीत होणार आहे. मूळ जिल्हा मुख्याध्यापक संघातून फुटून बाहेर पडलेल्या संघात आणि मूळ संघाच्या पदाधिकाऱ्यांत विळ्या-भोपळ्याचे संबंध निर्माण झालेले असल्याने आजच्या शिबिरात वर्चस्ववादाची ठिणगी भडकण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे एकलहरे येथील मातोश्री इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आज (दि. ७) मुख्याध्यापक उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या दोन्ही गटांत शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलेच वाकयुद्ध रंगल्याचे बघायला मिळाले. एस. के. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा मुख्याध्यापक संघ अधिकृत व मूळ मानला जातो. याच संघातुन फुटून के. के. आहिरे, साहेबराव कुटे यांनी आणखी एका जिल्हा मुख्याध्यापक संघाची स्थापना केल्याचे काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. मातोश्री कॉलेजला आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापक उद्बोधन शिबिराची शुक्रवारी झालेल्या नियोजन बैठकीस फुटीर गटाचे कोणीही प्रतिनिधी हजर नव्हते. शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर मूळ जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि फुटीर गटाच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांतील गटबाजीला उधाण आल्याचे चित्र दिसून आले. दोन्ही गटांतील प्रतिनिधींकडून एकमेकांवर चिखलफेक केल्याने आजच्या शिबिरात दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यास वर्चस्ववादाची ठिणगी भडकण्याची शक्यता आहे. या शिबिराची पूर्वतयारी व नियोजन बैठक शुक्रवारी मातोश्री कॉलेजला झाली. या बैठकीस संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाट, सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्षा शुभलक्ष्मी कुलकर्णी, विद्यासचिव बी. डी. गांगुर्डे, एम. व्ही. बच्छाव आणि किशोर पालखेडकर आदी उपस्थित होते. मात्र फुटीर गटाने या बैठकीकडे पाठ फिरवली.

आमचा मुख्याध्यापक संघ मूळ व अधिकृत आहे. नाशिकमध्ये झालेल्या राज्य मुख्याध्यापक अधिवेशनाच्या हिशेबात घोळ करणाऱ्यांची संघातून सर्व सदस्यांनी एकमताने हकालपट्टी केली. त्यानंतर हकालपट्टी केलेल्यांनी समांतर मुख्याध्यापक संघ स्थापन केल्याचा दावा केला. शिबिराच्या नियोजनाशी या फुटीर संघाचा कोणताही संबंध नाही.

- एस. बी. देशमुख, सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांमुळे बिबट्या जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील निंबाळे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रसंगधावनामुळे मोरीच्या पाइपमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले. मनमाडजवळील वागदर्डी धरण परिसरासह चांदवड तालुक्यातील काही भागात धुमाकूळ घालणारा हाच बिबट्या असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी दुपारी या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. मनमाड-लासलगाव मार्गावर निंबाळा गावाजवळ एका मोरीच्या पाइपमध्ये बिबट्या लपून बसल्याचे या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत धावत जाऊन ग्रामस्थांना बिबट्या लपून बसल्याची बातमी दिली. ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला याबाबत कळविले. वन विभागाचे कर्मचारीही विनाविलंब पिंजरा घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी बिबट्या बसलेल्या पाइपाची एक बाजू पलंग बांधून बंद केली. दुसऱ्या बाजुला पिंजरा लावला. नंतर फटाके फोडले. फटाक्यांच्या आवाजाने घाबरून बिबट्या पिंजऱ्यात जाताच दरवाजा बंद करण्यात आला. पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठक व्यवस्थेत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी (८ एप्रिल) राज्य सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार असून, दोन परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात आल्याची जिल्हा प्रशासनाने दिली.

आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला नाशिक जिल्ह्यातून १० हजार ८४८ परीक्षार्थी सामोरे जाणार आहेत. जिल्ह्यात २८ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडावी याकरिता ७३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. काही कारणास्तव दोन केंद्रांवरील बैठक व्यवस्थेत बदल केला आहे. उपकेंद्र क्रमांक २ के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड रिसर्च सेंटर, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी नाशिक येथील बैठक क्रमांक NS002001 ते NS 002480 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी नाशिक या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. तसेच उपकेंद्र क्रमांक १६ एस. एम. आर. के. बी. ए. के. महिला महाविद्यालय, कॉलेजरोड, नाशिक येथील बैठक क्रमांक NS016001 ते NS016360 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सर डॉ. मो. स. गोसावी महाविद्यालय, कृषीनगर, जॉगिंग ट्रॅक शेजारी नाशिक येथे करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये सुधारीत प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांना आयोगाकडील नोंदणीकृत मोबाइल दूरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येत असल्याची माहितीदेखील खेडकर यांनी दिली.

संबंधित दोन केंद्रावरील परीक्षार्थिंना काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय फिरके (९८९००३१८११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दीने नाटक करत रहा

0
0

ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटक ही रंगकर्मीला मिळालेली मोठी देणगी आहे, कितीही अडचणी येवोत त्याने नाटक करीत राहिले पाहिजे. जिद्दीने नाटक करत रहा, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, नटसम्राट उपेंद्र दाते यांनी केले.

नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना नाट्यमहर्षी केशवराव दाते पुरस्कार मिळाल्याबद्दल नम्रता कलाविष्कार संस्थेतर्फे त्यांचा सत्कार झाला. मुंबई नाका येथील भगवंतनगर सामाजिक संस्थेच्या हॉलमध्ये झाालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मंचावर विश्वास ठाकूर, रवींद्र ढवळे यांची उपस्थिती होती. दाते म्हणाले की, नाटकाच्या तालमी मुंबईला होत असत तेव्हाचा काळ कठीण होता. त्यातून तावून सुलाखून निघालो. आताही एक नाटक पाहून आलो आहे, सत्कार स्वीकारला आता पुन्हा एक नाटक पहाण्यासाठी मुंबईला जाणार आहे. रवींद्र म्हणाला, नाटक करू म्हणून यात पडलो नंतर नाटकाचा ध्यास निर्माण झाला. खूप जणांनी सहकार्य केले. कलावंतांना साथ देणारे कुणीतरी हवे असते. ते त्यांच्यासाठी खूप मोठे काम करते. नाट्यनम्रतेविषयी मला फार काही वाटते, संस्था निद्रितावस्थेत होती आता पुन्हा कार्यरत झाली आहे. गरज लागेल तेव्हा मी या संस्थेसाठी येण्यास तयार आहे. रंगभूमीसाठी मी फार काही केलेले नाही त्यामुळे हा सत्कार स्वीकारताना मी नम्र आहे, असेही दाते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन झाले. संस्थेचे सचिव नंदकुमार देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. पूनम पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. राजेश टाकेकर यांनी सूत्रसंचालन केले. कैलास डीडवाणी यांनी आभार मानले.

प्रयासच्या कलावंतांचा गौरव

यावेळी प्रयास नाटकाला कामगार कल्याण मंडळ नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल नाटकातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. हे माझे एकट्याचे नसून सांघिक यश आहे, यावेळी मला सलाईन घेऊन काम करणारी रश्मी आठवते आहे, रवींद्र ढवळे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांनी कधीही दिग्दर्शनात मला असे करू नको, किंवा असे कर हे सांगितले नाही. मला स्वतंत्रपणे काम करू दिले, असेही पटवर्धन म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४१९ मालमत्तांवर टाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने घरपट्टीवसुलीबाबत कडक धोरण अवलंबले असून, ज्यांची थकबाकी आहे अशा मालमत्ता धारकांच्या ४१९ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहेत. या जप्त मालमत्तांचा लिलाव १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली.

नाशिक महापालिकेची शहरातील अनेक मोठ्या आस्थापनांकडे थकबाकी आहे. या आस्थापनांनी घरपट्टी भरावी अशा वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ४१९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यातील काही मालमत्ताधारकांनी थोडी रक्कम भरून जप्तीची कारवाई टाळली होती. मात्र, यावेळी तसे होणार नसल्याने पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतरच कारवाई टळली जाणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले असून, मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी थकबाकीची रक्कम तातडीने भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नाशिक महापालिकेने सार्वजनिक वाचनालय व काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई केली. त्यातील सार्वजनिक वाचनालयाने त्यांच्याकडे असलेली १२ लाख रुपयांची थकबाकी भरली. मात्र, काँग्रेस कमिटीकडे असलेली थकबाकी अद्याप मिळालेली नाही. शहरात असे अनेक थकबाकीदार असून, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी करविभागाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज हटविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

 कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सदर  बाजार भागासह लामरोड, रेस्ट कॅम्प रोड  परिसरातील  कॅन्टोन्मेंटच्या जागे­त व  रस्त्याच्या दुतर्फा  अनधिकृतपणे लावण्यात आलेले होर्डिंग्ज व इतर जाहिरात फलक हटविण्याच्या मोहिमेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला.

दुपारी १ वाजल्यापासून प्रारंभ झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बाजार भागासह लामरोडवरून एक टपरी, चार होर्डिंग्ज, २५ छोटे-मोठे जाहिरात फलक, तर दुसऱ्या टप्प्यात रेस्ट कॅम्परोडवरून एक होर्डिंग, १२ छोटे-मोठे फलक जप्त करण्यात आले.  शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण करणारे फलक, मोठाले होर्डिंग्ज, तसेच रस्त्यांवर अडचणीचे ठरणारे दुकानदारांचे फलक काढण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे, कर अधीक्षक दीपक पारकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस ताफ्यासह कॅन्टोन्मेंट अधिकारी प्रभाकर दोंदे, रजिंदर ठाकूर, युवराज मगर आदींसह ३० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महसूल कर्मचाऱ्यांनी जपली बांधिलकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा ५९ वा वर्धापनदिन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी महसूलमधील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण्ण बी यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उन्हाळ्यात रक्ताचा तुडवडा निर्माण होतो. गरजू रुग्णांना सहजतेने रक्त उपलब्ध व्हावे, याकरिता दरवर्षी सरकारी रक्त पेढीसाठी रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात येते. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. शिबिर यशस्वीतेसाठी पी. वाय. देशपांडे, सहसचिव गणेश लिलके, नाना पर्वते, दिनेश वाघ, जीवन राठोड, अरुण तांबे, दिनेश पाडेकर, धनश्री कापडणीस, प्राजक्ता ओहोळ आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे नागरिकांची रक्तशर्करा तपासणी

0
0

अडीचशे नागरिकांची रक्तशर्करा तपासणी (फोटो)

नाशिकरोड : जागतिक आरोग्य दिनानिमित्त जेसीआय नाशिकरोड शाखा आणि अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे शनिवारी झालेल्या रक्तशर्करा तपासणी शिबिराचा २५० नागरिकांनी लाभ घेतला.महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर झालेल्या या मोफत तपासणी शिबिरात डॉक्टर जयेश पाटील, डॉ. ऐश्वर्या आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, आनंद जॉगर्स क्लबचे रावसाहेब पोटे, नाना नगरकर, अॅड. सुशील जैन आदी उपस्थित होते. जेसीआय नाशिकरोडचे अध्यक्ष भरत निमसे, सचिव आनंद भागवत, श्रीकांत कटाळे, अंकुश सोमाणी आदींनी संयोजन केले.

--

'निमाणी'बाबत निवेदन

पंचवटी : निमाणी बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पंचवटी डेपोच्या आगारप्रमुख श्रीमती शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीही निमाणी बसस्थानकाच्या दुरवस्थेविषयी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी सुधारणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन आगारप्रमुखांनी दिले होते. मात्र, अजून सुविधा मिळाल्या नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाजर भेट देऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. चिन्मय गाढे, शिवराज ओबेरॉय, किरण पानकर, नवराज रामराजे आदी उपस्थित होते.

--

हायमास्ट कामास प्रारंभ

देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्रमांक १ मधील चौकात कॅन्टोन्मेंट निधीमधून हायमास्ट बसविण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. कॅम्प परिसर एलईडीमय होत असताना हाडोळा भागातील चौकात हायमास्ट बसविण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. बोर्डातदेखील तशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर येथील कामास नगरसेविका प्रभावती धिवरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नगरसेवक भगवान कटारिया, तसेच विश्वनाथ काळे, आर. डी. जाधव, सुरेश निकम, अशोक साळवे, गौतम भालेराव आदींसह नागरिक उपस्थित होते.

--

झाडे कोमेजली

जेलरोड : शहर, तसेच नाशिकरोडच्या बहुतांश रस्ता दुभाजकांमधील झाडे उन्हाच्या तडाख्याने कोमेजली आहेत. देवळालीगावापासून बिटकोपर्यंत आणि बिटकोपासून जेलरोडच्या पुलापर्यंतच्या दुभाजकांमधील झाडे पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. शहरातील अन्य मार्गांवरील दुभाजकांमधील झाडांचीही अशीच परिस्थिती आहे. उद्यान विभागाने या झाडांना पुरेसे पाणी मिळेल यादृष्टीने नियोजन करण्याची मागणी होत आहे.

--

शांतता समिती बैठक (फोटो)

नाशिकरोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त शहरात उभारण्यात येणाऱ्या होर्डिंग्जसाठी महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काला उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांकडून शांतता समितीच्या बैठकीत विरोध करण्यात आला. नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्यांच्या शांतता समिती सदस्यांची बैठक नाशिकरोड पोलिस ठाण्यात झाली. त्यात समस्या आणि सूचनांचा पाऊस पडला. आदर्शवत उत्सव साजरा करा,असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांनी केले. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, प्रभाकर रायते यांनीही मार्गदर्शन केले. महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय वांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षा दीक्षा सोनवणे आदी उपस्थित होते.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत केमोथेरीपी सुविधेने दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्करोगावरील उपचारांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केमोथेरीपीची मोफत सुविधा जून महिन्यापासून जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल) सुरू होणार आहे. अत्यंत महागडी उपचारपद्धती अगदी मोफत मिळणार असल्याने सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

राज्यात नाशिकसह नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या जिल्ह्यांत असे मोफत केमोथेरीपी उपचार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईत केली. या योजनेच्या तपशीलाबाबत बोलताना डॉ. जगदाळे यांनी सांगितले, की कर्करोगावर उपचार करताना शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया आणि केमोथेरीपी, तसेच औषधौपचार अशा पद्धतींचा वापर करण्यात येतो. यात केमोथेरीपीची पद्धत महागडी ठरते. कर्करोगाचे निदान झाले, की रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांची ऊर्जा यातच खर्ची पडते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूपच दिलासादायक ठरणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रथमदर्शनी २५ हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबईत होणार प्रशिक्षण

एखाद्या रुग्णाचे कर्करोगाबाबत निदान झाल्यास तो थेट जिल्हा रुग्णालयात केमोथेरीपीसाठी येऊ शकतो. सर्वच गरजू रुग्णांवर हे उपचार मोफत करण्यात येतील. त्यासाठी पुढील महिन्यापासून रुग्णालयाचे एक फिजिशियन आणि स्टाफ नर्स यांना मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून, जून महिन्यापासून ही सुविधा कार्यान्वित होईल. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोगावरील उपचार केले जातात. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत केमोथेरीपी सुविधेने दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्करोगावरील उपचारांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केमोथेरीपीची मोफत सुविधा जून महिन्यापासून जिल्हा रुग्णालया (सिव्हिल)मध्ये सुरू होणार आहे. अत्यंत महागडी उपचारपद्धती अगदी मोफत मिळणार असल्याने सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

राज्यात नाशिकसह नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या जिल्ह्यांत असे मोफत केमोथेरीपी उपचार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईत केली. या योजनेच्या तपशीलाबाबत बोलताना डॉ. जगदाळे यांनी सांगितले, की कर्करोगावर उपचार करताना शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया आणि केमोथेरीपी, तसेच औषधौपचार अशा पद्धतींचा वापर करण्यात येतो. यात केमोथेरीपीची पद्धत महागडी ठरते. कर्करोगाचे निदान झाले, की रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांची ऊर्जा यातच खर्ची पडते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूपच दिलासादायक ठरणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रथमदर्शनी २५ हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबईत होणार प्रशिक्षण

एखाद्या रुग्णाचे कर्करोगाबाबत निदान झाल्यास तो थेट जिल्हा रुग्णालयात केमोथेरीपीसाठी येऊ शकतो. सर्वच गरजू रुग्णांवर हे उपचार मोफत करण्यात येतील. त्यासाठी पुढील महिन्यापासून रुग्णालयाचे एक फिजिशियन आणि स्टाफ नर्स यांना मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी आटोपला, की जून महिन्यापासून ही सुविधा कार्यान्वित होईल. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोगावरील उपचार केले जातात. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - किमान कौशल्य

0
0

रोजगार एचआर

मिटचे आयोजन

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांचेतर्फे १० एप्रिल रोजी अंबड औद्योगिक वसाहतीतील किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शासकीय योजनांचा बेरोजगार उमेदवार आणि नियोक्ते यांना कौशल्य विकास, रोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण कार्यक्रम, महास्वयंम् वेबपोर्टलवरील सेवा-सुविधा आणि सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० यामधील तरतूदी याबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि नियोक्ता आस्थापनांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - वेतनपटावरील मनुष्यबळाची माहिती द्या

0
0

वेतनावरील मनुष्यबळाची

माहिती ऑनलाइन द्यावी

कौशल्य विकास, रोजगार विभागाचे निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यवसाय, उद्योग, खाजगी आस्थापनांनी मार्च २०१८ या तिमाही अखेर आपल्या वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती तात्काळ ई-आर-१ वरील वेबसाईटवर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. यात कसूर केल्यास आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकाताचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी दिला आहे.

सर्व आस्थापनांनी त्रैमासिक ई-आर १ विवरणपत्र ३० एप्रिल पूर्वी https:// rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावी, असे सांगितले. रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती कायदा १९५९ अंतर्गत नियम १९६० अन्वये तिमाही संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत हे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे.

जिल्हा कौश्ल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडील सर्व नियोक्त्यांचा डाटा या संकेतस्थळावर साठवण्यात आला असून, संबंधितांनी एम्पॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लिक करुन युजर आयडी पासवर्ड वापरुन लॉग इन करावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहे. अधिक माहिती व तांत्रिक सहाय्यासाठी rojgar chat helpline सुविधेचा वापर करण्यात यावा अथवा कार्यालयाच्या ०२५३- २५००६५३ या दूरध्वनी क्रमांकावर सुटीचे दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहनही चाटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरावर महिलांची पोलिसांना हुलकावणी

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहरात गेल्या २७ वर्षांत गुन्हा करून तब्बल एक हजार ३९० संशयित आरोपी फरार आहेत. त्यात १०४ महिला संशयितांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलांचा अद्याप कुठलाही थांगपत्ता पोलिसांना मिळालेला नाही. विशेषत: फसवणूक आणि चोरीच्या घटनांमधील या महिला आहेत. अर्धवट पत्ते, खोटी ओळख सादर करणारे संशयित आणि अस्पष्ट कागदपत्रे या साऱ्यांमुळे या महिला परागंदाच असल्याने संबंधित गुन्ह्यांच्या तपासालाही खीळ बसली आहे.

एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिस पुरावे संकलित करून आणि संशयितांना अटक करून कोर्टासमोर सादर करतात. अनेकदा संशयित आरोपी गुन्हा घडल्यानंतर अनेक वर्षे पोलिसांच्या हाती लागत नाहीत, तर कधी कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर ते परागंदा होतात. १९९१ पासून विचार करता शहर पोलिस अशा एक हजार ३९० संशयित आरोपींच्या मागावर आहेत. पोलिसांना हव्या असलेल्या या संशयितांवर खून, अपहरण, फसवणूक, पीटा, दरोडा, हाणामारी, बलात्कार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे यात १०४ महिलांचा समावेश आहे. फसवणूक या गुन्ह्यात सर्वाधिक महिला फरार आहेत. त्या खालोखाल चोरी, गैरकायद्याची मंडळी अशा गुन्ह्यांचा क्रमांक येतो. कौटुंबिक हिंसाचार कलमाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातदेखील महिलांना अटक बाकी असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. आता या कायद्यातील तरतूदच बदलण्यात आली असली, तरी पोलिसांचे रेकॉर्ड कायम असल्यामुळे हा आकडा वाढतो. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा सतत शोध सुरूच असतो. रात्र गस्तीदरम्यान सतत ही मोहिम राबविली जाते. अगदी १९९१ पासून गुन्हेगारांचा शोध बाकी असला, तरी अर्धवट पत्ते, त्यावेळी समोर आलेली चुकीची माहिती ही तपासात मोठी अडचण ठरते. शक्यतो परराज्यांतील नागरिक फसवणुकीसारखे प्रकार करून परागंदा होतात. त्यांचे खरे पत्ते समोर येत नाहीत. आता परिस्थिती बदलली असून, भाडेकरूसह व्यावसायिकांची नोंद होते. आरोपी म्हणून पोलिसांना हव्या असलेल्या महिलांची संख्या शंभरच्या पुढे असली, तरी यातील बहुतांश गुन्हे फसवणुकीचे असल्याचे दिसते. हे गुन्हे अगदी १५ ते २० वर्षांपूर्वीचेही असून, सर्वच आरोपींच्या तपासासाठी नियमित मोहीम हाती घेतली जात असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले.

--

अंबडसह नाशिकरोड टॉप

अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील सर्वाधिक म्हणजे २९० संशयित आरोपी पोलिसांना हवे आहेत. त्यानंतर सरकारवाडा पोलिस स्टेशनचा क्रमांक लागतो. या पोलिस स्टेशन हद्दीत २६१ आरोपी गुन्हे करून परागंदा झालेले आहेत. त्यानंतर नाशिकरोड २०६, पंचवटी १३७, भद्रकाली १०८ असा क्रम असल्याचे दिसते.

--

गुन्हे आणि महिलांची संख्या

फसवणूक- ३९

चोरी- २१

गैरकायद्याची मंडळी- १२

कौटुंबिक हिंसाचारासह इतर- १४

बलात्कार- ३

खून- १

पीटा- १

दरोडा- १

इतर- १२

एकूण- १०४

--

(अँकर - मटा विशेष)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिलिंडर गॅसनळीने तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूररोडवरील दादाजी कोंडदेवनगर येथील सात रेखांकित येथे राहणाऱ्या तरुणाने चक्क गॅसची नळी तोंडात घालत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अजिंक्य उदय खरोटे असून, निमा औद्योगिक संघटनेचे सरचिटणीस अॅड. उदय खरोटे यांचा तो लहान मुलगा होता. गॅसची नळी तोंडात घालून आत्महत्या केल्याचे उदाहरण शहरात प्रथमच घडल्याने चर्चेचा विषय ठरला.

आईवडिलांसोबत राहणाऱ्या अजिंक्यने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गॅसची नळी तोंडात टाकून सिलिंडरचा स्वीच सुरू केला. गॅस शरीरात गेल्याने जीव गुदमरून तो बेशुद्ध पडला. यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करीत अजिंक्यला मृत घोषित केले. अजिंक्य इंजिनीअर झाला होता. तसेच बासरी वादनाची आवड असल्याने सायंकाळी किंवा वेळ मिळेल तेव्हा बासरी वाजविण्याचा आनंद घेत असे. होतकरू तरुण अचानकपणे निघून केल्याने उद्योग वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे. पहिल्यांदाच अशा प्रकार गॅसची नळी तोंडात घालून आत्महत्या केल्याचे उदाहरण घडल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ए. आर. महाले करीत आहेत. घटनेची माहिती कळताच उद्योजकांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात शेतकरी ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चांदवड गणूर मार्गावर घडली.  या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गणूर येथील शेतकरी दिलीप निवृत्ती ठाकरे हे कामानिमित्त मोटारसायकलवरून चांदवड येथे गेले होते. तेथून घरी परतत असतांना सायंकाळी पाचच्या सुमारास  कोतवाल वस्ती येथे भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने ठाकरे यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दिलीप ठाकरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चांदवड पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार दाखल असून पुढील तपास सुरू आहे. ठाकरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात वनमजूर जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील ताहाराबाद-मुल्हेर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील झुडूपांमध्ये लपून बसलेल्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या वनमजुरावर बछड्याने हल्ला केला. यात वनमजूर जखमी झाला असून, बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. कैलास देवरे असे जखमी वनमजुराचे नाव असून त्याच्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताहाराबाद-मुल्हेर रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला बिबट्याच्या बछडा दिसला. त्याने लगेच परिसरातील शेतकऱ्यांना ही माहिती दिली. शेकडो शेतकरी घटनास्थळी जमा झाल्याने बछडा झुडूपात लपून बसला. या घटनेचे माहिती वनविभागाला मिळताच ताहाराबाद वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह हजर झाले. सुरुवातीला या बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिली असावी आणि तो जखमी झाला म्हणून एकाच ठिकाणी लपून बसला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. दोन तास उलटूनही हा बछडा एकाच जागेवर बसून असल्याने वनविभागाने त्याच्यावर जाळी टाकून पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या बछड्याने वन कर्मचारी देवरे यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यानंतर लगेचच बछड्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. वरीष्ठांचे आदेश येईपर्यंत बछड्याला ताहाराबाद येथेच ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्रह्मसावित्री’च्या लिलावाला स्थगिती

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील ब्रह्मसावित्री ट्रस्टची लिलाव प्रक्रिया अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ब्रह्मसावित्री ट्रस्टची तळेगाव काचुर्ली शिवारात २४ एकर जमीन आहे. ट्रस्टने त्र्यंबकेश्वर येथील संस्थेच्या गोशाळा उपक्रमासाठी तसेच अत्यावश्यक  सुविधा निर्माण करण्यासाठी ही जमीन लिलाव पद्धतीने  व्रिकी करण्याचे ठरविले होते. त्याबाबत जाहीर नोटीसही देण्यात आली होती. त्यानुसार २२ मार्चला टेंडर काढण्यात आले. त्यानंतर पुढील प्रक्रिया आज, ७ एप्रिलला नियोजीत केली होती. मात्र अशा प्रकारचा लिलाव करणे संशयास्पद असल्याचे  वृत्त प्रसिद्धिस आल्याने शनिवारच्या लिलाव प्रक्रियेला विश्वस्तांनी स्थगिती दिली. याबाबत त्यांना विचारणा केली असता धर्मदाय आयुक्त कार्यालयाने दुरध्वनीवरून वर्तमान पत्रातील वृत्ताबाबत विचारणा केली असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबतचे कोणतेही अधिकृत पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामळे लिलाव प्रकिया राबविणे संयुक्तिक नाही. या प्रकरणातील संदिग्धता दूर होईपर्यंत तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून मागर्दशक सूचना मिळाल्यानंतरच लिलावाची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

पुजारी असल्याचा नवा वाद

ट्रस्टने जमीन व्यावसायिकांशी संगनमत करून लिलाव करण्याचा फार्स केला, असा आरोप होत असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत पाठक यांनी आपण सन १९९५ ते २००० पर्यंत येथे पुजारी असल्याचे म्हटले आहे. तसेच विश्वस्त मंडळ बेकायदेशीर असल्याने बरखास्त करा, असा अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिला आहे. विद्यमान विश्वस्तांनी मात्र पाठक येथे पुजारी म्हणून कधीही नव्हते असे म्हटले आहे.

ब्रह्मसावित्री संस्था येथे गोशाळा चालविते. संस्थेला कोणतेही ठोस उत्पन्न नाही. केवळ दानधर्मावर सर्वव्यवस्था सुरू आहे. त्याकरिता विश्वस्त मंडळाने जमीन व्रिकीसाठी नोटीस दिली होती. परंतु अद्याप खरेदी विक्री व्यवहारच  झालेला नसल्याने गैरव्यवहाराचे आरोप चुकीचे आहेत.- अॅड. पंकज भुतडा, सचिव

--

केशव वाळू ढोन्नर

 ञ्यंबकेश्वर जि.नाशिक

9822816242

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भधारणापूर्व काळजीचा पहिला प्रकल्प नाशकात

0
0

डॉ. अर्चना पाटील यांचे प्रतिपादन

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गर्भधारणापूर्व घ्यावयाच्या काळजीबाबत पथदर्शी प्रकल्प राबविणारा नाशिक हा देशातील पहिला जिल्हा असून, सिन्नर व पेठ तालुक्यात याची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या अतिरिक्त आरोग्यसेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, आरोग्य सभापती यतीन पगारे, सभापती सुनीता चारोस्कर, भारती पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. डॉ. पाटील पुढे म्हणाल्या, की सर्वांपर्यंत महत्त्वाच्या आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 'युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज'च्या मानांकनातील अनेक सेवा दिल्या जात आहेत. पण, जन्मानंतर होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी अधिक उपाययोजनांची गरज आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात पावसाळ्यामध्ये याबाबत समस्या वाढतात, त्यासाठी पावसाळापूर्व कालावधीत कार्यवाही सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. आदिवासी भागातील अर्भक मृत्यू रोखण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी सभापती यतीन पगार, डॉ. पी. पी. डोके आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. वाकचौरे यांनी सादरीकरणाद्वारे जागतिक आरोग्य दिन व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची माहिती दिली. कार्यक्रमास युनिसेफ, आरोग्य संचालनालय, जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, वैद्यकीय, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images