Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एमआयडीसी’त गाळेधारकांची कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत दोन हजार सातशेहून अधिक कारखान्यांचे जाळे आहे. एमआयडीसीची स्थापना झाल्यावर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी लघु उद्योजकांसाठी प्लॉटेड गाळ्यांची संकल्पना सन १९७८ मध्ये राबविण्यात आली. एमआयडीसीने तरुण अभियंत्यांकरिता अगदी नाममात्र दराने २६ फ्लॉटेड गाळे लघु उद्योग सुरू करण्यासाठी दिले. परंतु, आता या गाळ्यांमध्ये काम करताना उद्योजकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

जीर्ण झालेल्या फ्लॉटेड गाळ्यांच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी लघु उद्योजकांसह कामगारांनी केली आहे. विशेष म्हणजे गाळ्यांच्या बाजूला एमआयडीसीची चारपट जागा पडून आहे. त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी, असे मत गरजू उद्योजकांनी व्यक्त केले आहे. तरुण अभियंत्यांनी उद्योगांकडे वळावे या हेतूने एमआयडीसीने स्वतःखर्चातून २६ फ्लॉटेड गाळ्यांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. केवळ उद्योगांच्या वाढीसाठी नाममात्र दराने तरुण उद्योजकांना गाळ्यांची विक्री करण्यात आली होती. कालांतराने उद्योगांची संख्या वाढल्यावर एमआयडीसीतील प्लॉटचे भाव सोन्यापेक्षाही अधिक झाले आहेत. दिवसगणिक एमआयडीसीकडे जागा अथवा गाळे मिळावेत, अशी मागणी वाढत आहे.

दरम्यान, एमआयडीसीने उभारलेले जुन्या प्लॉटेड इमारतीतील गाळेधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. इमारतीला गाजरगवत व काटेरी झाडाझुडपांनी वेढले असून, एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. जीर्ण झालेल्या प्लॉटेड इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न कामगारांना पडतो. शौचालयांचीही दयनीय अवस्था झालेली आहे. इमारत परिसरात स्वच्छता केली जात नसल्याने बकाल रूप आले आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष घालत जुन्या इमारतीच्या बाजूला पडून असलेल्या जागेवर नवीन इमारत उभारावी, तसेच जुनी इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून टाकावी, असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले. याबाबत एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

गाळे उभारल्यापासूनचेच रस्ते!

तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता उभारण्यात आलेल्या गाळ्यांसाठी केवळ एकदाच रस्ते करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांच्या काळ लोटला गेला असताना नव्याने रस्तेच करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. खेडेगावातील रस्ते कदाचित चांगले असतील, परंतु एमआयडीसीच्या जुन्या गाळे इमारतीचे रस्तेच दिसेनासे झाले आहेत. पायवाटेसारख्या रस्त्यांची अवस्था प्रत्यक्ष गेल्यावर निदर्शनास येते. त्यामुळे येथील असुविधा दूर करण्याची मागणी जोर धरत आहे.

एमआयडीसीने तरुण अभियंत्यांसाठी फ्लॉटेड गाळ्यांची इमारत उभारली होती. आजही अनेक लघु उद्योजक तेथे माल उत्पादित करीत आहेत. परंतु, जुन्या इमारतीत एखादी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे एमआयडीसीने काळजी घेतली पाहिजे.

-सुनील गायकवाड, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हे शाखेकडून दरोडेखोर जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबक

नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या सहा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केले आहे. संशयितांनी चिंचवड (ता. त्र्यंबक) येथील रहिवासी हिरामण खेडुलकर त्यांचा जळावू लाकडे घेऊन जाणारा ट्रक अंजनेरी शिवारात सोमवारी (दि. २) लुटला होता. आरोपींनी ट्रकला दोन दुचाकी आडव्या उभ्या करीत ड्रायव्हर व क्लिनरला धमकावत रोख ३३ हजार रुपये व मोबाइल लुटला होता.

तुषार मंगळू टोपले, संदीप दत्तू बोडके (दोघे रा. राजेवाडी), मयूर दत्तू बोडके (ता. तळवाडे), अनिल रंगनाथ भगत, भूषण पंढरीनाथ कसबे (दोघे रा. माळेगाव), काळू भडांगे (रा. गोरठाण) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे व अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांनी कारवाई केली. त्यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना खबऱ्यांमार्फत संशयित तळवाडे गावातच असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तुषार टोपले आणि मयूर बोडके यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापर केलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रकुलमध्ये आज भारत

$
0
0

राष्ट्रकुलमध्ये

आज भारत

बॅडमिंटन

सकाळी ९.३०पासून - मिश्र सांघिक - वि. स्कॉटलंड

...

बॉक्सिंग

सकाळी ९ पासून - पुरुष ९१ किलो - नमन तन्वर वि. हरुणा

दुपारी २.३२ पासून - पुरुष ४६ ते ४९ किलो - अमित वि. सुलेमनू

...

हॉकी

सकाळी १० पासून - महिला - वि. मलेशिया

...

स्क्वॉश

सकाळी ९.३० पासून - पुरुष एकेरी - विक्रम मल्होत्रा वि. निक मॅथ्यू

दुपारी १.३० पासून - महिला एकेरी - जोश्ना चिनप्पा वि. तमिका

दुपारी १.३० पासून - महिला एकेरी - दीपिका पल्लीकल वि. अॅलिसन वॉटर्स

...

वेटलिफ्टिंग

सकाळी ९.३० पासून - पुरुष ६९ किलो - दीपक लाथेर

पहाटे ५ पासून- महिला ५३ किलो - के. संजीता चानू

दुपारी २ पासून - महिला ५८ किलो - सरस्वती

...

टेबल टेनिस

दुपारी २ पासून - पुरुष सांघिक

सकाळी ११.३० पासून - महिलांच्या उपांत्यपूर्व लढती

...

(आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकची महिला सांघिकची अंतिम फेरीही होणार आहे.)

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे हटविली

$
0
0

नाशिकरोड : पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारीही (दि. ५) अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. शहरातील दुर्गा गार्डनजवळील 'नो हॉकर्स झोन'मधील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. याठिकाणी वीस हॉकर्सचे अतिक्रमण होते. अतिक्रमण निर्मूलन पथक आल्यावर येथील हॉकर्सनी स्वतःहून आपले साहित्य रस्त्यावरून हटविले. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने नाशिकरोड रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारापुढील हॉकर्सचेही अतिक्रमण काढण्यात आले. येथील अनधिकृत टपऱ्याही हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बिटको रुग्णालयाच्या प्रवेशद्वापुढील रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या भाजीपाला व्यावसायिकांनाही हटविण्यात आले.

देवळालीगावात पोस्टमनच नाही

जेलरोड : देवळाली गावात पोस्टमन नियमित येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. देवळाली गावाची लोकसंख्या वाढलेली आहे. पोस्टमनचा फेराच होत नाही. त्यामुळे महत्त्वाचे टपाल मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. मनविसेतर्फे नाशिकरोड पोस्टमास्तरांना निवेदन देणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शाम गोहाड यांनी दिली. पोस्टकार्ड, पत्रे, सरकारी कार्यालयांचे दस्तऐवज अजूनही पोस्टाने पाठवले जातात. त्यामुळे देवळालीगावातील अनेक लोक पोस्टावर अवलंबून आहेत. बेरोजगार युवकांना नोकरीचे तसेच अन्य पत्रे मिळत नसल्याची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मान सिटिझन रिपोर्टर्सचा

$
0
0

सन्मान सिटिझन रिपोर्टर्सचा

दर आठवड्याप्रमाणे निवडक सिटिझन रिपोर्टर्सचा सन्मान करण्यात आला. अमृतधाम येथील पथदीपांची समस्या मांडणारे शिवाजी वंजारी आणि एम. जी.रोडवरील वारंवार नादुरुस्त राहणाऱ्या 'एटीएम'चा प्रश्न पाठविणारे योगेश कस्तुरे या दोघांना 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिठ्ठीने लावली ढगेंची वर्णी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत 'आपलं पॅनल'ने वर्चस्व प्रस्थापित केले असून, प्रसाद कांबळी अध्यक्षपदी निवडून आले आहेत. २०१८ ते २०२३ असा पाच वर्षे कांबळी यांचा कार्यकाळ असणार आहे. नाशिकचे सुनील ढगे हे सहकार्यवाहपदी निवडून आले आहेत.

सहकार्यवाहपदासाठी ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी, दिलीप कोकरे व सुनील ढगे यांना समसमान ३० मते पडली. त्यामुळे त्यांच्यात टाय होऊन सुनील ढगे यांचे नाव चिठ्ठीत निघाल्याने सहकार्यवाहपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

सुनील ढगे, आनंद खरबस व गिरीश महाजन हे मोहन जोशी पॅनलचे तिघे निवडून आले असून, खरबस व महाजन यांना कार्यकारिणी समिती सदस्य पदावर समाधान मानावे लागले आहे. या कार्यकारिणीत सतीश लोटके आणि सुनील ढगे हे दोघेच सर्वात जुने असून, गेल्या कार्यकारिणीतही या दोघांचा समावेश होता. गेल्या कार्यकारिणीमध्ये सुनील ढगे हे कार्यकारी सदस्य होते, तर या कार्यकारिणीमध्ये त्यांना सहकार्यवाहपदाचा मान मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल ७ मार्च रोजी प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी जाहीर केला होता. अध्यक्ष व उर्वरित कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. विश्वनाथ कामथ, किरण वालावलकर, किशोर रांगणेकर, दिवाकर दळवी, शिल्पा रेळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी प्रकरणाचा २२ दिवसात निकाल

$
0
0

आरोपीला दीड महिन्यांच्या कारावास ाची शिक्षा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस आवारातून एक लाख रुपये चोरी केल्याप्रकरणी आरोपीस येथील न्यायालयाने एक महिने १७ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी जलद गतीने निर्णय होऊन आरोपीच्या अटकेनंतर अवघ्या २२ दिवसात शिक्षा सुनावली आहे.

तालुक्यातील तिसगाव येथील कारभारी रघुनाथ पवार यांनी १३ सप्टेंबर २०१७ रोजी शहरातील एका बँकेतून पैसे काढून ते पोस्टातील खात्यात भरण्यासाठी मुख्य पोस्ट कार्यालयात आले होते. आपल्या दुचाकीच्या डिक्कीत १ लाख रुपये रोख रक्कम ठेवून ते पोस्टातील श्री. वाणी यांना भेटण्यास गेले असता. अज्ञात चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरी प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एम. के. माली यांनी १५ मार्च रोजी आरोपी नागराजन बी. राजेंद्रप्रसाद (रा. पिलीयारनगर, चेन्नई, तमिळनाडू) यास अटक केली. त्यानंतर आरोपीने चोरीची कबुली देत सदर रक्कम खर्च केल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर तपास पूर्ण करून पोलिसांनी खटला दाखल केला. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील गिरीश पवार यांनी युक्तिवाद केला. सरकर पक्षाच्या वतीने भक्कम पुरावे व युक्तिवाद न्यालायात करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शुक्रवारी सदर आरोपीस शिक्षा सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीकडे मतदारांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ 'क' ची पोटनिवडणूक शुक्रवारी पार पडली. पोटनिवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरवल्याने ४० टक्केदेखील मतदान झाले नाही. मतदान कमी झाल्याचा फायदा नक्की कोणत्या उमेदवारास होईल हे आज, शुक्रवारी मतमोजणी दरम्यान स्पष्ट होईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. मात्र, मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली. कोणतीही सार्वजनीक सुटी नसल्याने मतदारांनी आपआपल्या कामांना प्राधान्य दिले. सकाळी १० वाजेच्या सुमारास मिळालेला प्रतिसाद वगळता ६१ बुथवर गर्दीच झाली नाही. दीड वाजता १७.१९ टक्के मतदान झाले. त्यानंतर ३.३० वाजता २५.४२ टक्के मतदान पार पडले. या वेळेपर्यंत ४७ हजार २२८ मतदारांपैकी १२ हजार ५ मतदारांनी मतदान केले होते. दिवसाअखेर मतदानाची टक्केवारी अवघी ३९.७३ टक्के राहिली. मतदानासाठी २५० कर्मचारी आणि ७० व्होटिंग मशीनचा वापर करण्यात आला. मनसेकडून अॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपच्या विजया हरीश लोणारी या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होती. अपक्षही रिंगणात होते. अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मनसे, शिवसेना आणि भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची समजली जात होती. या तीनही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, ६० टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा, हे मतमोजणीत स्पष्ट होईल. मतदान संपल्यानंतर सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला असून, कार्यकर्ते आकडेमोड करण्यात गर्क झाले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मुंबई येथे गेल्याचा परिणाम मतदानादरम्यान जाणवला. भाजपाच्या बुथजवळ कार्यकर्त्यांची गर्दी तुलनेत कमी होती.

महिला मतदारांचा निरुत्साह

महिला उमेदवारांसाठी राखीव असलेल्या या प्रभागात मतदानादरम्यान मात्र महिलांनीच पाठ फिरवली. या प्रभागात एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. यातील ४३. १३ टक्के म्हणजे १० हजार ४११ पुरुषांनी तर, ३६. १४ टक्के म्हणजे आठ हजार ३४४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

दहा वाजेपासून मतमोजणी

प्रभाग क्रमांक १३ क च्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी ६ टेबल लावण्यात आले आहे. मतमोजणीसाठी ८ पर्यवेक्षक नेमण्यात आले असून, १६ सहाय्यक मतमोजणी अधिकाऱ््यांची नोमणूक करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ८ कर्मचाऱ्यांची नोमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीला शिवसत्य मंडळाच्या सभागृहात सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी संकेतस्थळे कोलमडली!

$
0
0

हॅकिंग नव्हे, बिघाड झाल्याचा दावा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय संरक्षण मंत्रालय, गृहमंत्रालयाससह डझनभर सरकारी संकेतस्थळे (वेबसाईट) शुक्रवारी 'हॅक' झाल्याने खळबळ उडाली. प्रथम संरक्षण मंत्रालयाच्या https://mod.gov.in या संकेतस्थळावर 'चिनी' अक्षरे दिसू लागल्याने हे संकेतस्थळ चिनी हॅकर्सकडून हॅक झाल्याचा संशयही व्यक्त झाला. मात्र, कोणतेही सरकारी संकेतस्थळ 'हॅक' झालेले नसून, हा हार्डवेअरशी संबंधित बिघाड असल्याचे दिवसभराच्या गोंधळानंतर राष्ट्रीय सायबर सुरक्षा प्रमुख गुलशन राय यांनी रात्री स्पष्ट केले.

संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळाचे व्यवस्थापन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयातर्गत येणाऱ्या राष्ट्रीय माहिती केंद्राकडून (एनआयसी) केले जाते. दुपारी हे संकेतस्थळ 'हॅक' झाल्याचे लक्षात आले. ते पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न या केंद्राने सुरू केले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या 'हॅकिंग'ला दुजोरा दिला आणि 'संकेतस्थळ लवकरच सुरू होईल', असे त्यांनी ट्विटरवरून आश्वस्त कले. प्रत्यक्षात संरक्षण मंत्रालयच नव्हे तर, डझनभर सरकारी संकेतस्थळांमध्ये बिघाड झाल्याचे नंतर लक्षात आले. ही सर्व संकेतस्थळे 'एनआयसी'तील सर्व्हर्ससी जोडलेली असून, तेथील बिघाडामुळे ती कोलमडली, असे राय यांनी स्पष्ट केले. हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिसलेली चिनी अक्षरे ही प्रत्यक्षात 'द्रुपाल' या कन्टेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा लोगो असल्याचा दावाही राय यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनं चांदी

गैरकारभाराविरोधात उपोषण

$
0
0

आदिवासी विकास महामंडळ संचालकांचे उपोषण

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळाच्या गैरकारभाराबाबत प्रश्न उपस्थित करून महामंडळाच्याच सात संचालकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी आदिवासी भवन येथे या संचालकांनी उपोषण सुरू केले असून, महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या व अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आज, शनिवारीही उपोषण सुरू राहणार आहे.

आदिवासी विकास महामंडळाची स्थापना १९७२ साली झाली. त्यानंतर २०१६ नंतर महामंडळाचे काम ठप्प झाले. आदिवासी विकासमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष विष्णू सावरा, व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे, महाव्यवस्थापक आदिनाथ दगडे यांनी अनेक योजना बंद केल्या, असा आरोप या संचालक मंडळाने केला आहे. एकाधिकार योजनेत खरेदी झालेला कोट्यवधी रुपयाचा कृषीउपज माल गेल्या तीन वर्षांपासून विक्री झालेला नाही. अत्यल्प खरेदी दाखवून ही योजना बंद करण्याचे कारस्थान चालू आहे. त्याचप्रमाणे ऑइल इंजिन व पाइपवाटप योजनेपासून गेल्या तीन वर्षापासून वंचित ठेवले. खावटी योजनाही बंद आहे. त्यामुळे दारिद्रये रेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या योजनेसाठी आलेले १०० कोटी शासनाला परत करण्यात आले. यासारखे विविध आरोप करीत हे संचालक उपोषणाला बसले आहेत. या उपोषणात संचालक भरसिंग दुधनाग, मीनाक्षी वट्टी, धनराज महाले, विकास वळवी, मधुकर काठे, अशोक मंगाम, मगनदास वळवी, प्रकाश दडमल यांनी सहभाग घेतला आहे.

सभा घेत नाही

महामंडळाच्या अध्यक्षांनी दर तीन महिन्याला संचालक सभा घेणे आवश्यक असताना ही सभा घेतली गेलेली नाही. संचालक मंडळाची मान्यता नसताना बारदान खरेदी करणे, संचालकांनी तक्रार करूनही बिल अदा करणे, संचालकांना विश्वासात घेतले जात नाही. त्याचप्रमाणे निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७५ टक्के पगार दिला जात आहे. त्यामुळे त्यांना कामावर घेण्याचा ठराव करूनही त्यांना कामावर घेतले जात नाही. मर्जीतील अधिकारी यांची चौकशी न करता क्लीन चीट देऊन त्यांना कामावर घेतले आहे. महामंडळाकडे असलेला निधी खर्च न केल्यामुळे २०० कोटी शिल्लक निधी शासनास परत गेला, असा आरोपही या संचालकांनी केला आहे.

नोकर भरतीचे अधिकारी मोकाट

सन २०१४ मध्ये महामंडळात भरती झाली. या भरतीमध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका एजन्सीच्या कार्यालयात भरून घेतल्या हे सिध्द झाले. त्या गैरप्रकारात सामील असलेले व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे व एजन्सीचे संचालक अजूनही मोकाट असल्याचा आरोपही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गड विकासासाठी २५ कोटींचा आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने सप्तशृंग गडाला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र घोषित केले असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी लवकरच २५ कोटींचा विकास आराखडा सादर करून त्यास सरकारची मंजुरी देण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी वणी येथे केले.

वणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल ई-लर्निंग क्लासरूम व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या आर. ओ प्लॅन्टच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कैलास चावडे, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष रावसाहेब शिंदे, उपसरपंच राजेश गवळी, गिरीश गवळी आदी उपस्थित होते. भुसे म्हणाले, की इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी टिकला पाहिजे या हेतूने येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल ई-लर्निंग क्लासरूम सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील हजार शाळांमध्ये अशी सुविधा पुरविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा सरकारचा उद्देश आहे.

वणी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र शुद्धीकरण प्रकल्प येत्या काळात उभारण्यात येईल. तसेच, वनविभागाकडून अडीच एकर जागा उपलब्ध करून व्यावसायिकांसाठी डोमची व्यवस्था आणि भाविकांसाठी उद्यानाची व्यवस्था करण्याचा देखील प्रयत्न नव्या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 'निर्मल वारी'च्या संकल्पना गडावर राबविण्यात येऊन येथील स्वच्छता व पावित्र्य राखण्याचा प्रयत्न, सर्वांनी मिळून करावा, असे आवाहन भुसे यांनी केले. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त नीलेश भामरे यांचा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्याशाखा सदस्यांची विज्ञान विद्यापीठात निवड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, पॅरा-क्लिनिकल विद्याशाखेसाठी अध्यक्ष, पदव्युत्तर शिक्षक, प्राध्यापक वगळता शिक्षक आणि परीक्षा मंडळाकरीता सदस्य निवडण्यात आले. विविध विद्याशाखेच्या अभ्यास मंडळाकरीता अध्यक्ष व विविध विद्याशाखांवर अभ्यासमंडळ निहाय प्रत्येकी तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

प्री-क्लिनीकल वैद्यकीय अभ्यास मंडळावर डॉ. सुषमा पांडे, डॉ. दीपक जोशी, डॉ. प्रमोद इंगळे, डॉ. पंकजा नाईक, पॅरा-क्लिनीकल वैद्यकीय अभ्यासमंडळ डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. नितीन गंगणे, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. संजयकुमार मोरे, क्लिनिकल-मेडिसीन आणि अलाइड वैद्यकीय अभ्यास मंडळावर डॉ. राजेश सिंग, डॉ. सुमित कर, डॉ. शेखर प्रधान, डॉ. अमरिश सक्सेना तर क्लिनिकल-सर्जरी आणि अलाइड वैद्यकीय अभ्यास मंडळावर डॉ. उदय मोहिते, डॉ. प्रकाश गुरव, डॉ. गिरीषचंद्र बारटक्के नर्सिंग अभ्यासक्रमात नाशिकचे गोखले एज्युकेशन नर्सिंग कॉलेजचे डॉ. मोहम्मद हुसेन यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चे २,०११ प्रवेश पूर्ण

$
0
0

राज्यात ३५ हजार ३८१ प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरटीई प्रक्रियेला १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर प्रवेशाला वेग आला असून शुक्रवार अखेपर्यंत २ हजार ११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक म्हणजे १० हजार ४१६ अर्ज या प्रक्रियेत दाखल झाले आहेत. त्यात पहिल्या सोडतीत ३००१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून येत्या १० तारखेपर्यंत त्यांना प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार अनुदानित खासगी शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली व पूर्वप्राथमिक वर्गात २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांबरोबरच सीबीएसई, आयबी, आयसीएसई व आयजीसीएसई अशा स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित यातील पात्र शाळांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) व प्राथमिक म्हणजे इयत्ता पहिलीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असते. शाळांची नोंदणी, विद्यार्थ्यांचे प्रवेश यामध्ये पालक, शाळा यांच्या उदासीनतेमुळे अनेकवेळा मुदतवाढ द्यावी लागत असल्याची उदाहरणे समोर येतात. हे वर्षही त्यास अपवाद नसून पहिल्या टप्प्यात शाळा व आता प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाकडून प्रक्रियेच्या सुरुवातीला येणारे वेळापत्रक हे देखील केवळ नावापुरते मर्यादित राहताना दिसते.

पालकांचा हट्ट कायम

आवडीची शाळाच मिळावी, या हट्टापायी अनेक पालक सोडतीत विद्यार्थ्यांचे नाव येऊनदेखील प्रवेश घेत नसल्याचे समोर येत आहे. विभागाशी संपर्कच न केल्यामुळे पालक प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट होते, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजग्राहकांना मनस्ताप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील महावितरण कंपनीच्या विद्युत भवन या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील वीजबिल भरणा केंद्रातील एटीपी मशिन तांत्रिक समस्यांमुळे वारंवार बंद होत असल्याने या ठिकाणी वीजबिल भरणा करण्यास येणाऱ्या नागरिकांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महावितरण कंपनीने आयटेक कंपनीला वीजबिल भरणा केंद्र चालविण्याचा ठेका दिलेला आहे. या आयटेक कंपनीमार्फत शहरात विविध ठिकाणी एटीपी मशिन्सद्वारे वीजबिलांचा भरणा स्वीकारला जातो. नाशिकरोड येथेही महावितरणच्या विद्युत भवन या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच वीजबिल भरणा केंद्र असून, तेथे आयटेक कंपनीचे एटीपी मशिन आहे. या केंद्रावर दररोज वीजबिल भरणा करण्यासाठी वीजग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, गेल्या १ तारखेपासून या वीजबिल भरणा केंद्रातील एटीपी मशिनमध्ये वारंवार बिघाड निर्माण होत असल्याने वीजबिलांचा भरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. सर्व्हर डाऊन होण्याबरोबरच एटीपी मशिन हँग होत असल्याची माहिती या केंद्रावरील महिला ऑपरेटरकडून वीजग्राहकांना दिली जाते. मात्र, हे एटीपी मशिन वारंवार बंद पडत असल्याने वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टार्गेट पूर्ण झाल्याने दुर्लक्ष!

या केंद्रावरील एटीपी मशिनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने कंपनीकडून या मशिनची दुरुस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध करण्याविषयी विचारणा केली असता मार्चअखेरीस वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले असल्याने आता कंपनीकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे उत्तर या वीजबिल भरणा केंद्रावरील ऑपरेटरने रांगेत उभ्या असलेल्या वीजग्राहकांना दिल्याने उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

महावितरणच्या विद्युत भवन इमारतीतील वीजबिल भरणा केंद्रावरील एटीपी मशिनमध्ये काही दिवसांपासून वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे दोन ते तीन तास रांगेत उभे राहून नंबर लावावा लागतो. जास्त वेळ थांबणे शक्य नसल्याने वीजबिल न भरताच माघारी जावे लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा बिल भरण्यासाठी आलो. परंतु, परिस्थिती जैसे थे होती.

-अभय टिल्लू, वीजग्राहक

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलतरण तलावांवर उसळतेय गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पालिकेच्या येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सुट्यांमुळे बच्चे कंपनीचीही पोहण्यासाठी गर्दी उसळल्याने येथील जलतरण तलाव फुल्ल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास दरवर्षी नागरिकांची गर्दी होते. गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने नाशिकरोड येथील पालिकेच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलावावर पोहण्यासाठी नागरिकांची रीघ लागली आहे. बच्चे कंपनीचीही पोहण्यासाठी सकाळच्या वेळी झुंबड उडू लागली आहे. या जलतरण तलावावरील सर्व बॅचेस फुल्ल झाल्या असल्याने पालिकेला मिळणाऱ्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. नवशिक्यांची गर्दी वाढल्याने येथील जलतरणतलाव कमी पडू लागला आहे.

सर्व बॅचेस फुल्ल

 नाशिकरोडचा राजमाता जिजाऊ जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. त्यामुळे या जलतरण तलावावर नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असतात. त्यामुळे या तलावावर पोहण्यास नागरिक प्राधान्य देतात. यंदाही मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा भडका उडाल्याने पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. एप्रिलमध्येही तापमान टिकून असल्याने या तलावावरील सर्व बॅचेस आता फुल्ल झाल्या आहेत.

प्रशिक्षकांना ड्रेसकोड

या जलतरणतलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिक आणि बच्चे कंपनीची गर्दी वाढल्याने नवशिक्यांना प्रशिक्षकांची ओळख व्हावी यासाठी या जलतरण तलावावरील प्रशिक्षकांना ड्रेस कोड दिला गेला आहे. पालिका आयुक्तांच्या शिस्तबद्ध कारभाराला प्रतिसाद देत या तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप यांनी सर्व प्रशिक्षकांना ड्रेस कोड उपलब्ध करून दिला आहे.

 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक

$
0
0

भाजपच्या मेळाव्यात

२२ हजार कार्यकर्ते

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाचा ३८ वा स्थापना मेळाव्यात नाशिकहून २२ हजार कार्यकर्ते सामील झाल्याचा दावा भाजपने केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर शुक्रवारी हा मेळावा होता. या मेळाव्यासाठी नाशिकसह राज्यभरातून लाखो कार्यकर्ते आले होते.

नाशिक येथे पोटनिवडणुकीमुळे दोन प्रभाग सोडले तर २९ प्रभागांतून १० हजार कार्यकर्ते या मेळाव्यासाठी गेले होते. त्यासाठी १५० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यात रेल्वे, कार व टेम्पो ट्रव्हल्स द्वारेही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मेळाव्यात सहभागी झाल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून १२ हजार कार्यकर्ते या मेळाव्याला गेल्याचा दावा जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी केला आहे. ७५० गाड्यांतून हे कार्यकर्ते दाखल झाले. त्याचप्रमाणे नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड व इगतपुरी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रेल्वेने आल्याचेही जाधव यांनी सांगितले. स्थापना दिवसानिमित्त शक्तीप्रदर्शन करण्यासाठी महिनाभरापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बैठक घेऊन दिली होती. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांना मुंबईला नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. अनेक पदाधिकारी गुरुवारीच मुंबईल दाखल झाले तर काहींनी शुक्रवारी सकाळी मुंबई गाठली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज हटविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

 कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सदर  बाजार भागासह लामरोड, रेस्ट कॅम्प रोड  परिसरातील  कॅन्टोन्मेंटच्या जागे­त व  रस्त्याच्या दुतर्फा  अनधिकृतपणे लावण्यात आलेले होर्डिंग्ज व इतर जाहिरात फलक हटविण्याच्या मोहिमेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला.

दुपारी १ वाजल्यापासून प्रारंभ झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बाजार भागासह लामरोडवरून एक टपरी, चार होर्डिंग्ज, २५ छोटे-मोठे जाहिरात फलक, तर दुसऱ्या टप्प्यात रेस्ट कॅम्परोडवरून एक होर्डिंग, १२ छोटे-मोठे फलक जप्त करण्यात आले.  शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण करणारे फलक, मोठाले होर्डिंग्ज, तसेच रस्त्यांवर अडचणीचे ठरणारे दुकानदारांचे फलक काढण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे, कर अधीक्षक दीपक पारकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस ताफ्यासह कॅन्टोन्मेंट अधिकारी प्रभाकर दोंदे, रजिंदर ठाकूर, युवराज मगर आदींसह ३० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चेतील बातमी-पान-३

$
0
0

सर्वाधिक वाचलेली बातमी

शहांचा राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधी हे भाजप सरकारकडे साडेचार वर्षांचा हिशेब मागत आहेत. पण त्यांच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केले, असा सवाल करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार निशाणा साधला.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएमए’चा आज पदग्रहण सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचा २०१८-१९ या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि. ७) सायंकाळी ७ वाजता, रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, येथे होणार आहे.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, सचिव डॉ. हेमंत सोननीस यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आयएमए पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गृह, नगरविकास, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून चांदवड विधानसभा आमदार डॉ. राहुल आहेर तसेच नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित राहणार आहेत.

नूतन अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले की, १९४० सालापासून आयएमए ही संस्था काम करीत असून, यामध्ये स्व. श्रीमती सविता देसाई बालरुग्णालयाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांवर उपचार केले जातात. महाराष्ट्र टीबी सॅनिटोरियम हे क्षयरोगी रुग्णांना सेवा देणारी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव संस्था कार्यरत असून, यात आयएमएचा पुढाकार महत्त्वाचा ठरतो. डॉक्टर आणि पेशंटमधील संवाद अधिक दृढ करून सकारात्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या पेशंटला या सॅनिटोरियमच्या माध्यमातून मानिसक आधार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी २०१८-१९ या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. पलोड तर सचिव डॉ. नितीन चिताळकर यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. नीलेश निकम, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. प्रशांत देवरे, खजिनदार डॉ. विशाल गुंजाळ, महिला विभाग प्रमुख डॉ. सुषमा दुगड, डॉ. वैशाली काळे, सहसचिव डॉ. पंकज भदाणे, सांस्कृतिक सचिव डॉ. प्राजक्ता लेले, सहसचिव डॉ. विशाल पवार यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images