Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पेट्रोल दरवाढीविरोधात रायुकाँचे आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्रिमूर्ती चौकातील पेट्रोल पंपाजवळ निषेध फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.

पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, नाशिकमध्ये लागू असलेला दर मुंबईपेक्षा जास्त आहे. फेब्रुवारी २०१८ नंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलेला आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करीत असतात. गेल्या वर्षभरात तर पेट्रोल ९ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी महागले आहे. शहरातही प्रत्येक पेट्रोलपंपावर वेगवेगळे दर असून, त्यात पाच पैशांच्या आसपास फरक आहे. तसेच पंपावर होणारी अप्रत्यक्ष इंधन चोरी, भेसळयुक्त इंधन व वाढलेले इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी असल्याचे मत राष्ट्रवादी युवकचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा. पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू व सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी चिन्मय गाढे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, शिवराज ओबेरॉय, दीपक पाटील, मकरंद सोमवंशी, किरण पानकर, भूषण गायकवाड, कुणाल बागडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जीपीआरएस’ला स्थगितीचे साकडे

0
0

'जीपीआरएस'ला स्थगितीचे साकडे

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

देशातील सर्व व्यावसायिक वाहनांना जीपीआरएस पॅनिक बटण ही प्रणाली बंधनकारक केली आहे. मात्र, ती खर्चिक आणि अन्यायकारक असल्याने तिला स्थगिती द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साधारण वाहनमालकांना ही प्रणाली आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. स्थानिक बाजारपेठेत ती उपलब्ध नाही. सध्यस्थितीत तिचा काही उपयोग नाही. कारण, आपल्याकडे त्यासाठी कंट्रोल रूमच उपलब्ध नाही. यापूर्वी वाहनमालकांनी पूर्वीचे जीपीआरएस किट लावलेले आहे. मात्र, पॅनिक बटण नाही ते किट मान्य करून पॅनिक बटण लावून घेण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. १ एप्रिलपासून वाहनांचे पासिंग थांबल्याने वाहनधारकांचे नुकसान होण्यासह सरकारचा महसूलही बुडत आहे. हा कायदा रद्द करावा अथवा त्याला स्थगिती मिळावी. नवीन कायदे बनविण्यापूर्वी किंवा अमंलात आणण्यापूर्वी पूर्ण देशातील लोकल आरटीओकडून संघटनांशी त्याविषयी चर्चा करावी. त्यात योग्य ते बदल करून मगच ते अंमलात आणावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन चौधरी, योगेश दुसाने आदी उपस्थित होते.

--

उघड्यावर कचराफेक थांबेना

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहर स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानादेखील काही व्यक्तींकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरविण्याचे काम केले जात आहे.

अशोकनगरच्या भाजीमंडईबाहेर असाच प्रकार होत आहे. येथे उघड्यावर कचरा टाकला जाऊ नये याकरिता ड्रम ठेवण्यात आले. परंतु, या ड्रमच्या बाहेरच कचरा टाकला जात असल्याने रस्त्यांवरून जाणारे व परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नेहमीच उघड्यावर घाण, कचरा टाकू नये असे प्रबोधन केले जात असतानाही अशी उघड्यावर कचराफेक सुरूच असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी रमेश गाजरे यांनी सांगितले. ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी घाण, कचरा टाकणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पती व पत्नी कामावर जात असलेल्या कुटुंबांकडून, तसेच अन्य काही कुटुंबांकडून असा उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. रोजच घंडागाडी कर्मचाऱ्यांकडून उघड्यावरील कचरा संकलित केला जातो. परंतु, रात्रीच्या वेळी पुन्हा घरातून फेरफटका मारण्यासाठी जाणारे कचरा टाकत असतात. आपल्या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उघड्यावर घाण, कचरा टाकू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या अदलाबदलीतून सव्वा लाखाला गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची आदला बदल करीत आरोपीने एकाकडील तब्बल सव्वा लाख रुपये काढून घेतले. ही घटना गणेशवाडीत घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

युवराज दामू गायकवाड (रा. वीर सावरकर, जेलरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गायकवाड मंगळवारी दुपारी गणेशवाडी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तिथे एका अज्ञात आरोपीने मदतीच्या बहाण्याने गायकवाड यांच्यांशी संवाद सुरू केला. तसेच बोलण्यात असताना गायकवाड यांचे कार्ड आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने इंदूमती धोंगडे नावाच्या महिलेचे एटीएम कार्ड गायकवाड यांच्या हातात टेकवले. कार्डची अदलाबदल होताच आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली. गायकवाड यांच्या कार्डच्या मदतीने आरोपीने शहरातील वेगवेगळ्या एटीएम सेंटर्समधून बँक खात्यातील तब्बल एक लाख २५ हजार ३४० रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा माग काढीत आहेत. घटनेचा अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

खिडकीतून मोबाइलची चोरी

उघड्या असलेल्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरून नेला. ही घटना कलानगर भागात घडली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चंद्रकांत देविदास सोनवणे (रा. म्हाडा कॉलनी, कलानगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. सोनवणे यांनी बुधवारी सकाळी आपल्या घरातील बेडरुममध्ये मोबाइल चार्जिंगला लावला होता. अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकीत हात घालून मोबाइल काढून धूम ठोकली. घटनेचा अधिक तपास हवालदार विसे करीत आहेत.

ट्रॅक्टरच्या बॅटरी लंपास

पार्क केलेल्या ट्रॅक्टरमधून बॅटऱ्या चोरी झाल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरातील मिस्तरी मार्गावर घडली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुरेश रघुनाथ कुसाळकर (रा. विजयनगर, भगूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुसाळकर यांचे तीन ट्रॅक्टर मंगळवारी रात्री स्टेशन रोडवरील मिस्तरी मार्गावर पार्क केले होते. ट्रॅक्टरजवळ कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सुमारे २२ हजार रुपयांच्या ट्रॅक्टरच्या तीन बॅटऱ्या काढून घेतल्या. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

दोन दुचाकी पळविल्या

दोन दुचाकींची चोरी झाल्या प्रकरणी भद्रकाली आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अफजल रियाज अहमद शहा (रा. शिवनेरी झोपडपट्टी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहा यांची (एमएच १५ एझेड ००९३) दुचाकी सोमवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार मुंढे करीत आहेत. दुसरी घटना खोलेमळा भागात घडली. रावसाहेब दादा सोनवणे (रा. आर्टलरी सेंटर रोड, खोलेमळा) यांची अमोपेड (एमएच १५ एफ आय ८७१०) १४ मार्च रोजी सकाळी त्यांच्या घरानजिकच्या दीपक किराणा दुकानाशेजारी उभी केलेली असताना चोरट्यांनी हातोहात लांबविली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिंगला चालना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस अडचणीची होत चालली असताना त्यावर पर्याय म्हणून स्मार्ट सिटीअंतर्गत विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने खासगी कंपनीद्वारे नागरिकांना सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महानगरपालिका, फुलोरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक महापालिकेने सुरुवातीला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू केला होता. यावेळी स्मार्ट सिटीअंतर्गत शहराच्या इतरही भागांत हा उपक्रम सुरू केला जाईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागांत २०० सायकली उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. एका ठिकाणाहून सायकल घेऊन निघाल्यावर ती दुसऱ्या ठिकाणी जमा करता येणार आहे. यासाठी पालिकेकडून नाममात्र भाडे आकारले जाणार आहे. यासाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात एक हजार सायकली शहरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या यासाठी शहरातील १५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे शहरातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार असून, इंधनाचीदेखील मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

सायकल ट्रॅक विकसीत करणार

शहराच्या विविध भागांतून सुरू होणाऱ्या या सुविधेसाठी मुख्य रस्त्यालगत सायकलसाठी ट्रॅक आखला जाणार आहे. त्याचप्रमाणे जे लोक जागा देतील, त्यांना महापालिकेतर्फे मोबदलादेखील दिला जाणार आहे. ही सायकल घेण्यासाठी प्रतितास भाडे आकारणी केली जाणार आहे. नेहमी वापरणाऱ्यांना काही दिवसांनंतर महिन्याचे शुल्क भरण्याची सोयदेखील केली जाणार आहे.

येथे असतील सायकली

अशोकस्तंभ, गंगापूर रोड, सिटीसेंटर मॉल, सिव्हिल हॉस्पिटल, महात्मा गांधी रोड, राजीव गांधी भवन, मुंबई नाका, रविवार कारंजा, शालिमार, महामार्ग बसस्थानक, महात्मानगर, कॉलेजरोड, इंडिगो पार्क, गोविंदनगर, जेहान सर्कल, सीबीएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी संघटनेतर्फे महिलांचा सत्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनेक दुकांनामध्ये पुरुषांच्या पाठीशी उभ्या राहत महिलाही मदत करतात. पण, त्यांच्या कामाची दखल कधी घेतली जात नाही. हाच धागा पकडत नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेने 'व्यापार सहयोगिनी' असा पुरस्कार देऊन अशा महिलांचा सन्मान करण्यात आला.

सोहळ्यात धान्य किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते, उपाध्यक्ष महेंद्र पटेल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या महिला उपसमितीच्या चेअरपर्सन प्रमुख वक्त्या सोनल दगडे, प्रेमलता मिश्रा, विजया देशमुख उपस्थित होत्या. बेबीताई कर्डिले, श्रीमती व्यवहारे, मनीषा गांगुर्डे, उषा धामणे, मेघा सोनजे या महिलांचा व्यापार सहयोगिनी नारी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष शेखर दशपुते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघटनेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली तसेच संघटना केवळ सभासदांसाठीच काम न करता सभासदांच्या कुंटुंबाचेही हीत जपते. व्यवसायात कुंटुंबातील सदस्यांची कशी मदत होते हे सांगून त्यासाठीच सहयोगिनी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिकुल परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जाऊन उदर निर्वाहासाठी किराणा किंवा धान्य व्यवसायाद्वारे प्रापंचिक समस्या सोडविणार्‍या स्वाभिमानी, स्वावलंबी व्यापार सहयोगिनी महिलांचा नारी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले. एकट्याने काम करून यश मिळविण्यात मर्यादा असतात. त्यासाठी टिमवर्क खूप महत्त्वाचे आहे, टिमवर्क केल्याने काम सोपे व जास्त होते असे सांगत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे यांनी पुरस्कारार्थी महिलांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजखांबांप्रश्नी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड परिसरातील इंगळेनगर ते ढिकले मळादरम्यानच्या कॅनॉलरोडवरील विजेचे दोन डझन खांब त्वरित न हटविल्यास महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी निसाळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने या खांबांना हार घालून आरती केली होती. स्थानिक नागरिकांनीही तीन महिन्यांपूर्वी वर्षश्राद्ध घातले होते. हे खांब न हटविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. हे खांब हटविण्याची जबाबदारी महापालिकेची की महावितरणची, या वादात हे काम रखडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांशी समोरासमोर फोन लावल्यानंतरही दोघांनी जबाबदारी ढकलली. अखेर महावितरणने खुलासा करून ही जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर निसाळ यांनी महापालिका विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

या रस्त्याचे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण केले. रुंदीकरणामुळे रस्त्यामध्येच आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेने महावितरणकडे अर्ज केला होता. त्या अर्जावर महावितरणने तातडीने कार्यवाही केली. महावितरणने दीड वर्षापूर्वी खांब व वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाला मंजुरी व कामासाठीचे कोटेशन दिले. हे काम महापालिकेकडून प्रलंबित असून, महावितरणने या कामाबाबतची कार्यवाही पूर्वीच पूर्ण केल्याची माहिती नाशिक शहर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिली. कॅनॉलरोडचे रुंदीकरण झाल्यामुळे पूर्वी रस्त्याच्या बाजूला असणारे विजेचे खांब रस्त्यात आले आहेत. या ठिकाणी ११/३३ किलोव्होल्टच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत. महापालिका हद्दीत नवीन रस्त्याचे काम किंवा रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यात येणाऱ्या वीजवाहिन्या व खांब महापालिकेकडून स्वखर्चाने रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येतात. त्यानुसार कॅनॉलरोडच्या रुंदीकरणाचे काम झाल्यानंतर महापालिकेने महावितरणच्या नाशिक शहर उपविभागीय कार्यालयाकडे स्वखर्चाने वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याबाबतचा अर्ज केला. त्याला महावितरणने २०१६ मध्येच मंजुरी दिली आहे.

(२ कॉलम, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोजकुमार

0
0

मनोजकुमारचा विजय

गोल्ड कोस्ट : भारताच्या मनोजकुमारने राष्ट्रकुल बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने पुरुषांच्या ६९ किलो गटात नायजेरियाच्या ओसिता उमेहवर ५-० असा विजय मिळवला. मनोजकुमारने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. ३१ वर्षीय मनोजकुमारने सुरुवातीपासूनच १९ वर्षीय ओसितावर वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत मनोजकुमारच्या उजव्या हाताच्या ठोशांना ओसिताकडे प्रत्युत्तरच नव्हते. दुसऱ्या फेरीत ओसिताने चांगली लढत दिली. पण मनोजकुमारचा अनुभव कामी आला. तिसऱ्या फेरीतही मनोजकुमारने वर्चस्व राखून आगेकूच केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांचा हॉकीत पराभव

0
0

वेल्सकडून भारताचा पराभव

महिला हॉकी

वृत्तसंस्था, गोल्ड कोस्ट

तुलनेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या वेल्सवर मात करून गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेला विजयाने सुरुवात करण्यात भारतीय महिला हॉकी संघाला अपयश आले. वेल्सने भारतीय संघावर ३-२ने मात करून 'अ' गटात विजयी सलामी दिली.

लढतीच्या सातव्याच मिनिटाला लिसा डिलेने गोल करून वेल्सला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ही आघाडी वेल्सने कायम राखली. यानंतर दुसऱ्या सत्रात सिआन फ्रेंचने (२६ मि.) गोल करून वेल्सची आघाडी वाढवली. मध्यंतराला वेल्स संघ २-०ने आघाडीवर होता. उत्तरार्धात भारतीय महिलांनी आक्रमक चाली रचल्या. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच कॅप्टन राणी रामपालने (३४ मि.) गोल करून भारताची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर ४१व्या मिनिटाला निक्की प्रधानने गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. ही लढत बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच, ५७व्या मिनिटाला नताशा मार्क-जोन्सने गोल करून वेल्सला विजय मिळवून दिला. खरेतर या लढतीत भारतीय महिलांना वर्चस्व राखण्याची चांगली संधी होती. मात्र, खेळाडूंच्या विस्कळीत खेळाचा भारताला फटका बसला. या लढतीत जवळपास १४ पेनल्टी कॉर्नर मिळवण्याची भारताला संधी होती. याबाबत प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनीही नाराजी व्यक्त केली. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतरीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वेल्सची गोलकीपरनेही भक्कम बचाव केला. त्यामुळे भारताला विजय मिळवण्यात अपयश आले.

...

निकाल

वेल्स - ३ वि. वि. भारत - २

...

आम्ही अगदी सोपे गोल स्वीकारले, ही चिंतेची गोष्ट आहे. आम्ही गोल करण्याच्या संधी गमावल्या. अर्थात वेल्सची गोलकीपर रोसीने थॉमसचेही कौतुक करायला हवे. तिने उत्तम बचाव केला. आता पुढील काही लढतींमध्ये आमच्यावर दबाव असणार आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्हाला सज्ज रहावे लागणार आहे.

- हरेंद्रसिंग, भारताचे प्रशिक्षक

..

दृष्टिक्षेप....

- महिलांच्या जागतिक हॉकी क्रमवारीत भारतीय संघ दहाव्या स्थानी

- वेल्स संघ २६व्या स्थानावर आहे.

- २००६च्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिलांनी रौप्यपदक जिंकले आहे.

- मागील दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला पाचव्या स्थानी.

- भारताची शुक्रवारी मलेशियाविरुद्ध लढत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभाग सभापतिपद नामधारी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहराच्या विविध विभागांत प्रभाग समित्या असून, वर्षभराच्या कालावधीसाठी प्रभाग समिती सभापतींची निवड केली जाते. मागील वर्षाची मुदत संपत आल्याने नव्याने प्रभाग समिती सभापतींची निवड होईल. मात्र, ही निवड आता केवळ पदापुरती मर्यादित राहणार असल्याचे दिसते. पूर्वी लाखो रुपयांच्या कामांची मंजुरी या प्रभाग समित्यांच्या सभांमध्ये घेण्यात येत होती. आता तर एकही विषय सभेवर मंजुरीसाठी येत नसताना विषयांविनाच सभा होत असल्याचे चित्र अनेकदा बघायला मिळत आहे.

एप्रिल महिना आला, की प्रभाग समितीच्या सभापतींची नव्याने निवड केली जाते. पूर्वी या निवडीसाठी मतदानाची प्रक्रिया घेण्याची वेळ येत होती. या पंचवार्षिकमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळालेली आहे. पंचवटीत तब्बल १९ नगरसेवक भाजपचे असल्यामुळे पाचही वर्षी भाजपचेच सभापती राहणार असल्याचे निश्चित आहे. भाजपने प्रत्येक नगरसेवकाला पदांची संधी देण्याचा दृष्टिकोन ठेवला असल्याने पाच नगरसेवकांनी ही संधी मिळणार आहे. मागील वर्षी प्रियंका माने यांना ही संधी मिळाली होती.

पंचवटीतील वाढत्या लोकवस्तीमुळे गरज आणि समस्या यांच्यातही वाढ होऊ लागली आहे. असे असताना समस्या सोडविण्यासाठी अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारींचा पाढाच या सभांमध्ये वाचला जात असतो. त्यात अनेकदा ज्या विभागाविषयीच्या नगरसेवकांच्या तक्रारी जास्त आहेत, त्याच विभागाचे अधिकारी गैरहजर असतात. मग त्यावरच चर्चा रंगते, फोनाफोनी सुरू होते. मग ते अधिकारी नाहीत म्हणून सभा तहकूब करून पुन्हा सभा घेण्याचा घाट घातला जातो, समस्या तशाच राहतात. अधिकारी ऐकत नसल्याच्या तक्रारींचा पाढा नगरसेवक वाचत राहतात. पंचवटीतील भाजपच्या नगरसेवकांपैकी रंजना भानसी यांना महापौरपद, सुनीता पिंगळे, जगदीश पाटील, उद्धव निमसे, शांता हिरे यांना स्थायी समिती सदस्यपद, शीतल माळोदे यांना विधी समिती सभापतिपद, प्रियंका माने यांना पंचवटी प्रभाग समिती सभापतिपद देण्यात आलेले आहे. आगामी सभापतिपदी पूनम धनगर यांच्या नावाची चर्चा आहे.

त्याच तक्रारी अन् तीच उत्तरे!

पंचवटी प्रभाग समितीच्या सभांमध्ये वर्षभरात फारच कमी विकासकामे मंजुरीसाठी मांडण्यात आली. त्यात एका विषयासाठी तर दोनदा प्रभाग सभा घेतली गेली. माने यांच्या कार्यकाळातील शेवटी सभा तर एकही विषय सभेवर नसतानाही घेण्यात आली. सभेत नगरसेवकांच्या त्याच त्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांची तीच ती उत्तरे असे जणू ठरूनच गेलेले आहेत.

(महापालिका इमार, निष्पक्षचा लोगो घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ हत्या अनैतिक संबंधातून

0
0

पत्नीसह पाच जणांना अटक

म. टा. वृत्तसेवा, निफाड

बोकडदरे शिवारात (ता. निफाड) ओझर येथील चंपालाल जाट याची बुधवार (दि. ४) झालेली हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पत्नीसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

चंपालालची पत्नी निर्मला हिचे रमेश सोनवणे (२६, रा. समता नगर, ओझर) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान आढळले. यामुळे जाट पती-पत्नीमध्ये वाद होता. निर्मला व तिचा भाऊ कैलास पुणेकर (५५, रा. जेलरोड, नाशिकरोड) यांनी चंपालालला ठार मारण्यासाठी प्रियकर रमेश सोनवणे याला १५ हजार रुपयांची सुपारी दिली. रमेशने त्याचे मित्र आकाश शंकर गांगुर्डे (१९, रा. मुल्ला वाडा) व संजय कारभारी बाविस्कर (४२, रा. समतानगर, ओझर) यांच्यासोबत चंपालालच्या हत्येचा कट रचला. रमेशने मनमाड रेल्वे स्टेशनवर नातेवाइकांना आणयचे असल्याचे कारण सांगत चंपालालला सोबत घेत त्याची व्हॅन (एमएच १५ बी डब्ल्यू ५८६६) भाडे तत्वाने घेतली. ओझर येथून रमेशसह आकाश गांगुर्डे, संजय बाविस्कर हे चंपालालसोबत मंगळवारी (दि. ३) रात्री ११ वाजता व्हॅनने औरंगाबाद नाशिक मार्गाने मनमाडकडे निघाले. रेल्वे उशिरा येणार असल्याचे कारण सांगून ओझरला परतत असताना रमेशने लघुशंखेसाठी बोकडदरे शिवारात गाडी थांबविण्यास चंपालालला सांगितले. गाडी थांबल्यानंतर आकाशने त्याच्या बॅगमधून चॉपर काढून बेसावध असलेल्या चंपालालच्या गळ्यावर वार केला. तसेच रमेशने आकाशकडून चॉपर घेऊन विरोध करणाऱ्या चंपालालच्या डोक्यावर वार केले.

चंपालालचा मृतदेह गाडीतून बाहेर काढत नाल्यात टाकला. आकाशने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल चंपालालच्या मृतदेहावर टाकून पेटवून दिले. मारेकरी निर्मलाचा भाऊ कैलास पुणेकर याला घेण्यासाठी उगाव येथे गेला. त्यानंतर सगळेजण ओझर येथे परतले. या गुन्ह्यात पोलिसांनी रमेशसह आकाश गांगुर्डे, संजय बाविस्कर, कैलास पुणेकर, निर्मला जाट यांना अटक केली आहे.

१२ तासाच छडा

पोलिस अधीक्षक संजय दराडे व अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक कर्पे यांनी तपास केला. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासात खुनाचा छडा लावल्याबद्दल पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी तपास पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिबंदीच्या अंमलबजावणीने सामाजिक हिताची जोपासना

0
0

राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आला आहे. या निर्णयाबाबत सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, हा निर्णय घेतला गेलेला असला, तरी मंत्रालयात मात्र अजूनदेखील प्लास्टिकबंदी झालेली दिसत नाही. यासंदर्भातील निर्णयप्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी व मंत्री आपल्या दालनात अद्यापही प्लास्टिकबंदी करू शकलेले नाहीत. त्यादृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. विश्वास कुणावर ठेवावा ही चिंता आता सर्वसामान्य जनतेला पडली आहे. प्लास्टिकबंदी हा निर्णय प्रदूषण व वातावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असला, तरीही या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी झाल्यावरच सामाजिक हित जोपासले जाईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मंत्री, अधिकाऱ्यांचे अपयश

मंत्रालयातील कारभाराचे राज्यातील कार्यालयांकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे मंत्रालयात जर प्लास्टिकबंदी होत नसेल, तर ते राज्याच्या व कायदे तयार करणाऱ्या मंत्री आणि प्रशासकीय अधिकारीवर्गाचे मोठे अपयशच म्हणावे लागेल. प्रथम मंत्रालयात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करायला हवी, तरच ती इतरत्र होईल.

-अंबादास कोठावदे

सर्वच घटकांनी घ्यावा पुढाकार

पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरची हानी होऊन कचरा मोठ्या प्रमाणात तयार होण्यास मदत होते. प्लास्टिकचे विघटन होण्यास वेळ लागत असल्याने प्लास्टिकबंदी गरजेचीच होती. आता त्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

-अंगद नानकर

कठोर अंमलबजावणी गरजेची

कोणत्याची प्रकारची बंदी करीत असताना मोठ्या प्रमाणात गाजावाज केला जातो. मात्र, काही काळानंतर पहिले पाढे पंचावन्न अशी गत होते. अनेक ठिकाणी अशा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात धरसोडपणा केला जातो. सरकारही अशा बाबींकडे कानाडोळा करते. सध्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केल्यास सर्वांचे हित जोपासले जाईल.

-वैभव नदाळे

उत्पादनालाच घालावा आवर

दारूबंदी, गुटखाबंदी यांसारखे लोककल्याणकारी निर्णय घेत असताना सरकार मुळावरच घाव का घालत नाही, हा मोठा प्रश्न आहे. बंद करण्यात आलेली अथवा बंदी घालण्यात आलेली वस्तू बाजारातच येऊ नये अशी भूमिका घेण्यासाठी थेट त्या वस्तूचे उत्पादनच बंद करणे याबाबत खऱ्या अर्थाने सरकारने निर्णय घ्यायला हवा.

-तेजस वाघ

मुदतवाढ देण्याची आवश्यकता

प्लास्टिकबंदीमुळे अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्लास्टिकच्या वस्तू एका रात्रीतून तयार झालेल्या नाहीत. अनेक व्यावसायिकांची गुदामे प्लास्टिकच्या वस्तूंनी भरलेली आहेत. त्यामुळे अशा मालाची विक्री होण्यासाठी सरकारणे चार-सहा महिन्यांची मुदत देण्याची गरज वाटते.

-राजेंद्र देवरे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतीविरोधात अटकपात्र वॉरंट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार, त्यांचे पती बांधकाम व्यवसायिक गिरणा इनफ्रा प्रोजेक्टचे संचालक रत्नाकर पवार तसेच अन्य एक संचालक रामचल पांडे यांच्याविरोधात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टाने पुन्हा एकदा अजामीनपात्र पकड वॉरंट जारी केले आहे.

पवार दाम्पत्य गिरणा इनफ्रा प्रोजेक्टचे संचालक असून, त्यांनी प्रोजेक्टबाबत जाहिरात एजन्सीमार्फत स्थानिक दैनिकामधून जाहिरात प्रसिद्ध केल्या. या जाहिरातीच्या बिलापोटी दिलेला धनादेश न वाटल्याने संबंधित एजन्सीने पैशांची वारंवार मागणी केली. मात्र पवार यांनी पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एजन्सीने कोर्टात दावा दाखल केला. या प्रकरणात यापूर्वीही पवार दाम्पत कोर्टात सतत अनुपस्थित राहिल्याने अटक वॉरंट काढले होते. आता पुन्हा कोर्टासमोर येण्यास टाळाटाळ होत असल्याने कोर्टाने पुन्हा अटक वॉरंट जारी केले असून, १२ एप्रिल रोजी दोघांना कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश मुंबई नाका पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी फिर्यादी तर्फे अॅड. दीपक केदारे हे काम पहात आहेत. मनीषा पवार या जिल्हा परिषदेत भाजप सदस्या आणि बांधकाम सभापती आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट पार्किंगचे आज सादरीकरण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट पार्किंग या प्रकल्पाचे सादरीकरण महापालिकेमध्ये शुक्रवारी केले जाणार आहे. यासंदर्भात दोन कंपन्यांनी महापालिकेच्या पार्किंगमध्ये प्रकल्पाचा डेमो सादर केला. या महिनाअखेरीस स्मार्ट पार्किंग कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

शहरातील वाहतूक आणि वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनतळांसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. नाशिक शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात निवड झाल्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात ४१ ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारली जाणार आहे. यामध्ये ३४ ठिकाणी रस्त्यांच्या कडेला तर ७ ठिकाणी खुल्या मैदानात स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टिम उभारली जाणार आहे. पार्किंगची जागा शोधणे सोपे होणार आहे. वाहनतळांच्या जागेचा शोध व डिजिटल पेमेंटला चालना देणे हेच उद्दिष्ट नसून, या माध्यमातून शहरातील पार्किंगच्या मालमत्तेत सुधारणा करणे हाही हेतू आहे. जागतिक दर्जाचे पार्किंग सेन्सॉर, डॅश बोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे स्मार्ट या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत. प्रस्तावित स्मार्ट पार्किंगची सुविधा कॅशलेश असणार आहे. वेब आधारित आणि मोबाइल अॅपचा वापर करून वाहनचालकांना पार्किंगची जागा शोधणे सहजसोपे होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे. यासंदर्भात ट्रायजन आणि इन्स्पिरा या दोन कंपन्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या ठिकाणी डेमो सादर केला आहे. या कंपन्यांनी चेन्नई व गोवा येथे सेवा दिली आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी देण्यात येणार आहे. त्यास स्मार्ट सिटी कंपनीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंचवटीतील सीतागुंफा, एमजीरोडवरील शिवाजी स्टेडिअम आणि रविवार कारंजा येथील यशवंत मंडई येथे मल्टिलेव्हल पार्किंग साकारली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किनारा’बाबत परस्पर विरोधी दावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने मुंबई नाका येथील किनारा हॉटेलचे अतिक्रमण काढल्यानंतर परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. नगरसेवक गजानन शेलार यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचे हॉटेलचे मालक प्रताप गायकवाड यांचे म्हणणे होते. तर या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असा खुलासा शेलार यांनी केला आहे. याबाबत गायकवाड यांनी गुरुवारी प्रसिद्धपत्रक दिले. नासर्डी नदीपात्रात हॉटेल बांधण्यात आलेले नाही. ही जागा आमच्या मालकीची असून आम्ही कोणत्याही प्रकारचा भराव टाकलेला नाही. याठिकाणी नाशिक महापालिकेने रिटेन्शन वॉल बांधली आहे. आमचे हॉटेल रिटेन्शन वॉलच्या आत होते. कच्चे बांधकाम सुद्धा केलेले नाही. टेल काढून टाकण्यात शेलार यांचा हात आहे, असे गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे. तर, गायकवाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत माझा कोणताही हात नाही. याबाबत मी कुठेही अर्ज केलेला नाही. हेतूपुरस्सर माझे नाव गोवण्यात आले आहे, असे शेलार यांनी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेसच्या घरपट्टीचा फैसला लोकअदालतीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील नोटप्रेस व नाशिक महापालिका यांच्यातील घरपट्टीबाबतचा वाद येत्या काही दिवसांत संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत असून, १४ एप्रिल रोजी होणाऱ्या लोक अदालतीत यावर सुनावणी होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्याकडे नाशिक महापालिकेची सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी प्रेसने भरावी यासाठी अनेक वेळा महापालिकेच्या वतीने प्रेसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र केंद्र सरकारच्या कारखान्यांना घरपट्टी लागू होत नाही, असा पवित्रा घेत प्रेसच्या अधिकाऱ्यांनी घरपट्टी भरण्यास नकार दिला. २००६ मध्ये अर्थ मंत्रालयाकडून प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर ही केंद्र सरकारची मालमत्ता नसून, ते महामंडळ आहे असे नाशिक महापालिकेच्या वतीने प्रेसला सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळात महापालिकेकडून प्रेसला जप्तीच्या नोटिसादेखील देण्यात आल्या. यातील इंडिया सिक्युरिटी प्रेसकडे ५५ लाख ६८ हजार रुपये, तर करन्सी नोट प्रेसकडे ५ कोटी ४३ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी आहे. नाशिक महापालिकेकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे विकास कामे होऊ शकलेली नाहीत. नगरसेवकांसाठी राखीव असलेला निधीदेखील मिळालेला. नाही नाशिक महापालिकेने यंदाच्या वर्षात २५३ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले असून, त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी सावर्जनिक वाचनालयाच्या इमारतीवर व काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरदेखील जप्तीची कारवाई करण्यात आली होती. महापालिकेने ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे अशांकडे मोर्चा वळवला असून, १४ एप्रिल रोजी लोक अदालतीमध्ये यावर तोडगा निघाल्यास महापालिकेला सहा कोटी मिळणार आहेत.

... तर कर लावला नसता

महापालिकेच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारची मालमत्ता असती तर आम्ही कर लावला नसता. परंतु, महामंडळाला कर लावायचा नाही, अशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे प्रेसने महापालिकेला सहा कोटी रुपये द्यावेत. याबाबत न्यायालयात खटला सुरू होता. मात्र, प्रेस प्रशासनाने हा खटला न्यायालयातून काढून लोकअदालतीत चालवण्याचा निर्णय घेतला. त्याची सुनावणी १४ एप्रिल रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाचा हलकासा दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा आलेख चढताच आहे. मात्र, गुरूवारी दुपारी ढगाळ हवामान झाल्यामुळे बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात दोन अंशांची घट झाली. आठवडाभर उन्हाचा पारा चढताच असल्याने नाशिककर हैराण झाले आहेत. एरव्ही दिवसभर गजबजलेले रस्ते, बाजारपेठांमध्ये उन्हामुळे शुकशुकाट असून, दुपारी बारा वाजण्यापूर्वी व संध्याकाळीच महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडण्यास प्राधान्य दिले जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात एक-एक अंश सेल्सियसची वाढ होत होती. बुधवारी ४० अंशांवर पोहचलेला पारा बुधवारी दोन अंशांनी उतरून ३८.१ अंश सेल्सियसवर स्थिरावला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिक प्रखर असल्याच्या चर्चा सध्या शहरात रंगत आहेत. सकाळी साडेआठ-नऊ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. एप्रिल महिन्याचा पहिलाच आठवडा असा चटका देणारा ठरत असल्याने ऐन मे महिन्यातील उन्हाळा कसा असणार, याचा अंदाज बांधला जात आहे. हिवाळ्यात राज्यात तापमानाचा नीचांक गाठल्यानंतर आता नाशिकमधील उन्हाळाही प्रखरतेची जाणीव देत असल्याने शहरवासिय हैराण झाले आहेत.

\Bएप्रिलमधील तापमान

\Bदिनांक - कमाल तापमान

५ एप्रिल ३८.१

४ एप्रिल ४०.१

३ एप्रिल ३९.२

२ एप्रिल ३९.२

१ एप्रिल ३८.६

\B

सोशल मीडियावर जनजागृती

\Bप्रखर उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या काळात तब्येतीची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांच्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नये, पुरेसे पाणी पिणे, सौम्य रंगांचे कपडे परिधान करणे, उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी गॉगल, स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा, अशी माहिती विविध माध्यमांतून पोहोचवली जात आहे. यामध्ये सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. तसेच पाणी बचतीचा संदेशही जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - मनसेने लावला उत्तर महाराष्ट्राचा जोर

0
0

निवडणूक बातमीला जोड

मनसेसाठी उत्तर महाराष्ट्राचा फौज

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ क पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उत्तर महाराष्ट्रतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची फौज नाशकात दाखल झाली आहे. या निवडणुकीत मनसेच्या उमेदवार अॅड. वैशाली भोसले यांच्या मदतीसाठी या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी मनसेच्या राजगड या कार्यालयात झाली. त्यावेळेस विजयासाठी व्युहरचना आखण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारिणी व धुळे, नंदुरबार, जळगांव येथील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मनसेचे नेते दिपक पायगुडे, संजय चित्रे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी महापौर अशोक मुतर्डक, अॅड. राहुल ढिकले, हेमंत गडकरी, राजा चौघुले, प्रविण मर्गज, विजय तडवळकर, बाळा शेडगे, रणजित शिरोळे, आनंद एंबडवार, बाबू वागस्कर, अॅड. रतनकुमार इचम, अनिल मटाले, गटनेते सलिम शेख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत उत्तर महाराष्ट्राच्या १७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यांविषयी चर्चा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रात मनसेचे नेते दिपक पायगुडे, संजय चित्रे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर हे दौरा करणार आहेत. मनसेचे संघटन वाढावे यासाठी हा दौरा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीच्या

0
0

चिट फंडच्या नावाने फसविणारे अटकेत

तिघांना बेड्या; अहमदनगर, पुण्यात कोट्यवधींची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून नाशिकमध्ये नव्याने चिट फंड कंपनी स्थापन करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांना क्राइम ब्रँचने अटक केली आहे. संशयितांविरोधात कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याने लागलीच त्यांची रवानगी तिकडे करण्यात आली. संशयित आरोपींनी नाशिकमध्ये काय उद्योग केला याचा तपास पोलिस करीत आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील गुंतवणूकदारांनी सोमवारी (दि. २) भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सदर प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश युनिट दोनच्या पथकास दिले होते. त्यानुसार, सहा पथके तयार करून पोलिसांनी मुंबई नाका परिसरातून प्रवीण वरगुडेला अटक केली. त्यानंतर दिगंबर बैरागी आणि राजू जेजुरकर यांनाही जेरबंद करण्यात आले. ही कामगिरी निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे, पीएसआय विजय लोंढे, हवालदार श्रीराम सपकाळ, राजाराम वाघ, योगेश सानप, बाळ नांद्रे, राहुल सोळसे यांनी केली. संशयितांची लागलीच कोपरगाव पोलिसांकडे रवानगी करण्यात आली. या संशयितांना नाशिकमध्येही एक कंपनी सुरू केली होती. त्यामुळे येथे फसवणुकीचा प्रकार झाला आहे काय याचा तपास पोलिस करीत आहे.

असे आहे प्रकरण

पुणे जिल्ह्यातील विठ्ठल धुमाळ यांनी भद्रकाली पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार संशयित प्रवीण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुखदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी (रा. संवत्सर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांनी जानेवारी २०१६ मध्ये धुमाळ यांच्याशी संपर्क साधला होता. व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास वर्षभरात दामदुप्पट परतावा मिळणार असल्याचे आमिष तिघांनी दाखवले. लष्करातून निवृत्त झालेल्या धुमाळ यांनी विश्वास ठेवून पैसे गुंतवले. तसेच निवृत्ती व्यंकटराव धुमाळ, सावळा विठ्ठल धुमाळ, दीपाली सावळा धुमाळ, विकास निवृत्ती धुमाळ, स्वप्निल विठ्ठल धुमाळ, दादाभाऊ रघुनाथ पोखरकर, दत्तात्रय जयवंत उबाळे, निर्मला भाऊसाहेब धुमाळ, रामदास पोपट धुमाळ, दत्तात्रय दादाभाऊ बरबटे, किरण बाजीराव धुमाळ, मच्छिंद्र साकोरे, बाळासाहेब रामभाऊ नाणेकर, महादेव सुभाष फंड, प्रमोद महादेव मोरे यांनी सुमारे २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना रकमेच्या मोबदल्यात व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस, साई प्रणव सर्व्हिसेस या नावाने क्रेडिट व्हाऊचर्स देण्यात आले. वर्ष संपण्यापूर्वी धनादेश देण्यात आले. मात्र, धनादेश बॅँकेत टाकण्यापूर्वी पुन्हा परत घेत पुढील वर्षाचे धनादेश देण्यात आले़ आता तर गुंतवणूकदारांना एप्रिल २०१८ चे धनादेश देण्यात आले आहे. संशयितांनी काही दिवसांपासून द्वारका परिसरातील बोडके प्लाझामध्ये 'सक्सेस ट्री फार्म' नावाने कंपनी सुरू केली आहे़ नवीन ठिकाणी नवीन कंपनी सुरू झाल्याने धुमाळ यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक आडगाव शाखेला ठोकले टाळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आडगाव शाखेतून खातेदारांना पैसे मिळत नसल्याने गुरुवारी (दि.५) रोजी टाळे ठोकण्यात आले. खातेदारांनी बँकेसमोर ठिय्या मांडला. जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेकडून त्वरित पैसे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. सभासदांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सुमारे दीड तासानंतर बँक उघडण्यात आली.

जिल्हा बँकेच्या आडगाव शाखेतून खातेदारांना पैसै मिळत नसल्याने खातेदारांना आर्थिक अडचणींना सामना करण्याची वेळ आली आहे. या बँकेत शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची खाती मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल लागत असल्याने तसेच शेतमजुरांना वेळेत पैसे दिले गेले नाही तर ते काम बंद करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना बँकेत पैसे शिल्लक नसल्याचे कारण सांगितले जाते. वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. तसेच ज्यांचा घरी लग्न कार्य आहे, त्यांना पैशाची गरज असतानाही त्यांना टाळाटाळ केली जात आहे, लग्न असलेल्या कुटुंबीयांनी थेट लग्नपत्रिकाच बँक खात्यात घेऊन हजेरी लावली तरी त्यांना पैसे मिळत नव्हते, ज्येष्ठ नागरिकांनी फिक्स्ड डिपॉझिट केलेल्या पैशातूनही त्यांना पैसे मिळत नसल्याची तक्रारी वाढल्या. अशा सर्व प्रकारांमुळे नितीन माळोदे, त्र्यंबक शिंदे, दशरथ मते आदींनी बँकेच्या शाखेस सकाळी साडे दहाच्या सुमारास टाळे ठोकले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँक उघडल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून बँकेचे शटर खाली ओढून कुलूप लावले. त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेला हा प्रकार कळविल्यानंतर तेथून पैसे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. आलेल्या सभासदांना पैसे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर बँक उघडण्यात आली. ज्या खातेदारांच्या घरी लग्न कार्य आहे त्यांना अधिक व प्राधान्याने पैसे देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरी चोरी; एकास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जबरी चोरी प्रकरणात फरार असलेल्या संशयित आरोपीस क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने कॉलेजरोडवर सापळा लावून अटक केली. संशयितास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

आकाश भास्कर फलके (वय १८, रा. घाटोळ मळा, दुर्गा चौक, कामगारनगर, सातपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सातपूर पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी कॉलेजरोड परिसरात येणार असल्याची माहिती युनिट एकचे कर्मचारी स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे यांना मिळाली होती. हे कर्मचारी गस्तीवर असतानाच माहिती समोर आल्याने लागलीच ही माहिती युनिटचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना देण्यात आली. त्यानुसार, बिग बाजार येथे सापळा लावण्यात आला. संशयित फलके या ठिकाणी पोहचताच युनिटच्या कर्मचाऱ्यांनी त्यास अटक केली. पुढील तपासासाठी संशयितास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images