Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

माजी सैनिकाला ३६ हजाराला गंडा 

$
0
0

देवळाली कॅम्प : पैसे निघत नसल्याने एकाची मदत घेतल्याने सेवानिवृत्त लष्करी जवानास ३६ हजार रुपयांचा भुर्दंड बसला. शिवाजीनगर, सातपूर येथील माजी सैनिक ब्रिजलाल रामदास पवार हे २६ फेब्रुवारी रोजी लष्कराच्या रुग्णालयात उपचाराकरिता आले होते. औषधे घेण्यासाठी गेले असता स्टेट बँकचे कार्ड स्वॅप न झाल्याने रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन वडनेर रोडवरील एटीएमला गेले. तेथेही एटीएम कार्ड  रीड होत नसल्याने उपस्थित अज्ञात व्यक्तीने मदतची विचारणा करीत खात्यातून २५०० रोख रक्कम काढण्यास मदत केली. पण, त्याच व्यक्तीने परत त्या कार्डचा वापर करून खात्यातून न विचारता ३६ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वार्थी मानसिकतेचा परिणाम!

$
0
0

अनिल जोगळेकर, मटा वाचक

'मटा'मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'उदासीनतेचा भुर्दंड' या वृत्त मालिकेत 'सम-विषम' असून अडचण, नसून खोळंबा' हे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याबाबत ९० टक्के नागरिक सहमत असतील. दुर्दैवाने जनतेमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये आपण आणि फक्त आपलीच सोय बघण्याची वृत्ती वाढत आहे. स्वार्थी मानसिकतेचा प्रकार वाढत असून, त्यामुळे सम-विषम पार्किंगचा बट्ट्याबोळ होण्यासह वाहतुकीच्या इतर समस्या व्यापक स्वरूपात पुढे येत आहेत.

शहरातील वकीलवाडी, गोळे कॉलनी अशा अरुंद रस्त्यांच्या जागेत सम-विषम पार्किंगमुळे भरपूर जागा उपलब्ध होऊ शकते. व्यापाऱ्यांनी त्यांची वाहने दुकानासमोर लावण्यासाठी हरकत नाही. पण, नियमाप्रमाणे वाहने पार्क केली, तर काय फरक पडणार आहे? बरेचसे दुकानदार आपल्या दुकानासमोर पार्किंग होऊ नये म्हणून लोखंडी जाळ्या टाकून ठेवतात. यामुळे पार्किंगची जागा अडते. त्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी.

अशोक स्तंभ ते रविवार कारंजा रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. त्यावेळी नो एंट्रीमधून वाहने नेण्यास परवानगी देण्यात आली होती. आता रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी वाहनचालक राँगसाइडनेच जातात. नागरिक नियम धाब्यावर बसवून वाहतुकीस अजूनच अडथळा निर्माण करीत आहेत. यावर कडक कारवाई करीत राहणे हाच उत्तम पर्याय ठरतो. यात वाहतूक पोलिसही तितकेच जबाबदार ठरतात. आपणच आपल्यात सुधारणा केली, तर खूप प्रश्न सुटतील. खडकाळी, सह्याद्री हॉस्पिटल, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, फेम परिसर, उपनगर, सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक अशा सिग्नल्सवर वाहनचालक वेळेच्या आधीच पुढे जाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे ज्यांचा सिग्नलत्सुरू आहे त्यांची पंचाईत होते. यामुळे आपणच अपघातांना निमंत्रण देतो, असे वाटते. बहुतेक सिग्नल्सवर दुचाकी आणि रिक्षाचालकांमध्ये सिग्नल्स मोडण्याची स्पर्धा करतात. ट्रिपलसीट वाहन चालविणे हा जणू कायदाच झाला आहे. इंदिरानगर बोगद्याच्या येथे पोलिस असताना सर्व सुरळीत असते. मात्र, पोलिस हटताच वाहनधारक नियम तोडून नो एंट्रीमध्ये प्रवेश करतात. वाहतुकीचे नियम पोलिसांसाठी आहेत, की आपल्या सुरक्षिततेसाठी हे प्रत्येकाने नियम तोडताना लक्षात घ्यावे.

लोगो- प्रतिसाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांविरोधात बिगुल

$
0
0

हुकुमशहा असल्याचा आरोप; संघटनांकडून कृती समितीची स्थापना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून काही दिवसापासून सफाई कर्मचारी, महापालिकेतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर सुरू केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात महापालिकेतील सर्व कर्मचारी, कामगार संघटना एकत्र आल्या असून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

आयुक्तांकडून सध्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाई चुकीची असून सोमवारी संघटनांच्या बैठकीत त्यांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. तसेच आयुक्तांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी कृती समिती स्थापन करून त्याद्वारे आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आयुक्त विरुद्ध कर्मचारी असा संघर्ष उभा राहणार आहे.

महापालिका आयुक्त मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून शिस्तीचा बडगा उगारला असून कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. सफाई कर्मचाऱ्यांना शिस्तीचा धडा देत, त्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहे. आयुक्तांच्या या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसत असून नागरिकांच्या तक्रारींचे वेळेवर निरसन होते. एकीकडे आयुक्तांच्या या कामाचे स्वागत होत असतानाच आयुक्तांनी कामचुकार कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात निलंबंनाचे सत्र सुरू केले. त्यामुळे कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये अंसतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारी पंडित कॉलनी येथील लायन्स क्‍लब सभागृहात विविध संघटना तसेच कर्मचारी, कामगारांची बैठक झाली. त्यात आयुक्तांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. आयुक्त मुंढे यांच्यावर व्यक्ती म्हणून रोष नाही; परंतु त्यांची काम करून घेण्याची पद्धत हुकूमशहासारखी असल्याचा आरोप यावेळी कर्मचारी संघटनांनी केला. कामगारांकडून काम करून घ्या; मात्र कायद्याचा धाक दाखवून निलंबन, बडतर्फीची कारवाई नको अशी भूमिका मांडण्यात आली. रात्रपाळी स्वच्छता बंद करू नये, कर्मचारी, कामगारांचे निलंबन मागे घ्यावे, रिक्त पदांची भरती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आयुक्तांकडून सफाई कर्मचारी काम करत नसल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु, यामुळे सफाई कर्मचारी नाहक बदनाम होत असल्याचा आरोप मेघवाळ, वाल्मीकी संघटनेचे सुरेश मारू यांनी केला. बैठकीला महापालिका कर्मचारी, कामगार सेनेचे प्रवीण तिदमे, मेघवाळ वाल्मीकी संघटनेचे सुरेश दलोड, सुरेश मारू, मागासवर्गीय संघटनेचे नेते माजी महापौर अशोक दिवे, रिपब्लिकन फेडरेशनचे संतोष वाघ, सेवास्तंभचे प्रकाश अहिरे तसेच ताराचंद पवार, रमेश मकवाना, विजय बेहनवाल आदी उपस्थित होते.

आज पुन्हा बैठक

आयुक्तांनी सुरू केलेल्या धडक कारवाईविरोधात कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. आयुक्तांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची मंगळवारी (दि. ३) दुपारी बारा वाजता महापालिका कर्मचारी, कामगार सेनेच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या कृती समितीच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे सुरेश मारू यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा असूनही रस्त्यावर बाजार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबादरोडलगतच्या भागात असलेल्या नीलगिरीबाग येथील भाजीबाजारात मुबलक जागा असूनही हा बाजार थेट रस्त्यावर भरविला जात आहे. बाजार रस्त्यावर आल्यामुळे वाहनांना त्याचा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. वाहने थेट अर्ध्या रस्त्यावर पार्क केली जाऊ लागली आहेत. रस्त्यावरील हा बाजार मोकळ्या जागेत भरविण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसल्यामुळे त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे.

औरंगाबादरोडलगत असलेल्या नीलगिरीबागेची सुमारे दहा एकर जागा असून, या जागेत तीन वर्षांपासून दर रविवारी आणि बुधवारी भाजीबाजार भरविण्यात येतो. ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या सोयीमुळे थोड्याच दिवसांत या भाजीबाजाराची व्याप्ती वाढली. येथील विक्रेत्यांची संख्या वाढली असली, तरी भाजीबाजारासाठी जागा मुबलक आहे. मात्र, विक्रेते बाजाराच्या रस्त्यावरच नव्हे, तर थेट डांबरी रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी ठेवू लागले आहेत. ज्या जागेवर ग्राहकांची वाहने पार्क करता येत होती, त्या जागेवर हे विक्रेते ठाण मांडू लागल्यामुळे ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर पार्क केली जाऊ लागली आहेत. नांदूर, मानूर, आडगाव, शिलापूर, ओढा, दसक, पंचक आदी गावांतील शेतकरी या बाजारात भाजीपाला विक्रीस आणतात. ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला उपलब्ध होतो. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागा असूनही तेथे भाजीपाला विक्री करण्याच्या सोडून रस्त्यावर जवळच ग्राहक येतील, अशा चढाओढीत हा बाजार कधी रस्त्यावर येऊन पोहोचला हे कळलेदेखील नाही. या बाजारामुळे सोयीऐवजी गैरसोयीच होऊ लागली आहे, हे कळत असूनदेखील भाजीविक्रेते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे हा भाजीबाजार डोकेदुखी ठरू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांनाही व्यावसायिक घरपट्टी

$
0
0

शिक्षणही महागणार; महापालिकेसाठी सर्वसामान्यांची लूट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या करवाढीच्या फेऱ्यात शहरातील सर्व खासगी शाळा, मैदानेही आली आहेत. मुंढेंनी या सर्वांना व्यावसायिक पट्ट्यात आणले असून, त्यांच्या घरपट्टीत अव्वाच्या सव्वा वाढ होणार असल्याने नाशिककरांचे शिक्षणही महाग होणार आहे. तसेच, अनिवासी अर्थात व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या खासगी खुल्या जागा, मैदाने, मंगल कार्यालये, लॉन्स, भंगार दुकाने, गोदाम, क्रशर, नर्सरी, ग्रीन हाऊस, वखारी, पेव्हर ब्लॉक व सिमेंट पाइप आदींवर आता आरसीसी अनिवासी दराच्या ३० टक्के भाडेमूल्य दर विचारात घेऊन घरपट्टी आकारली जाणार आहे. आयुक्तांच्या दांडपट्ट्यामुळे महापालिकेचे चांगभलं होणार असले तरी, सर्वसामान्यांची मात्र लूट होणार आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची 'ड'मधील प्रकरण ८(कराधन नियम) नियम ७ व ८ अन्वये २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून नव्याने निर्माण होणाऱ्या मिळकती, वाढीव बांधकामे, वापरात बदल, भाडेकरू व जमिनी आदींचे कर योग्य मूल्य अर्थात घरपट्टी आकारणी करताना नव्या मूल्यांकन दरानुसार आकारणी केली जाणार आहे. पक्क्या निवासी बांधकामांसाठी यापूर्वी घरपट्टीकरिता करयोग्य मूल्यांकन दर ५० पैसे प्रति चौरस फूट होते. त्यात पाच पट वाढ करण्यात आली असून, आता घरपट्टी आकारणी करताना २ रुपये प्रति चौरस फूट या दराने आकारणी केली जाणार आहे. अनिवासी अर्थात व्यावसायिक इमारतींसाठी हेच दर आता ३ ते ७.२० रुपये प्रति चौरस फूट आकारले जाणार आहेत. त्यामुळे अनिवासी मिळकतींच्या दरात जबर वाढ होणार आहे. शहरातील शाळा आणि वसतिगृहांकरिता अनिवासी अर्थात व्यावसायिक दराने भाडेमूल्य आकारले जाणार आहे. त्यामुळे खासगी शाळांकडून त्याचा बोझा हा सर्वसामान्य नागरिकांवरच टाकला जाणार आहे. ही वसुली या शाळांकडून फी वाढीच्या रुपानेच केली जाणार असल्याने शहरातील नागरिकांचे शिक्षणही महागणार असल्याचे चित्र आहे. वापरात बदल असलेल्या मालमत्तांना अनिवासी दराच्या पाचपट, सिनेमागृहांसाठी एकूण उत्पन्नाच्या ७.५ टक्के रक्कम वार्षिक भाडेमूल्य दर म्हणून निश्चित करण्यात आली आहे. भाडेकरू असलेल्या मालमत्तांना तिप्पट, तर भाडेकरू असल्याची माहिती न देणाऱ्या मालमत्ताधारकांना त्यांच्या वापरानुसार एक पट अधिक दंड विचारात घेऊन एक वर्ष कालावधीसाठी जादा कर आकारणी केली जाणार आहे.

-

लॉन्स, वखारींवरही कर

अनिवासी अर्थात व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या खासगी खुल्या जागा, मैदाने, मंगल कार्यालये, लॉन्स, भंगार दुकाने, गोदाम, क्रशर, नर्सरी, ग्रीन हाऊस, वखारी, पेव्हर ब्लॉक व सिमेंट पाइप आदींवर आता आरसीसी अनिवासी दराच्या ३० टक्के भाडेमूल्य दर विचारात घेऊन घरपट्टी आकारली जाणार आहे. यात भाडेकरू आढळून आल्यास त्यात तीनपट वाढ केली जाणार आरे. तळघरातील पार्किंगकरिता निवासी, अनिवासी वापराच्या दराच्या २० टक्के, गृहनिर्माण संकुलांतील जलतरण तलावांसाठी निवासी आरसीसी दराच्या ३० टक्के, तसेच हॉटेल, मॉल आदी अनिवासी वापराच्या मिळकतींमधील जलतरण तलावांकरिता अनिवासी आरसीसी दराच्या ५० टक्के मूल्यांकनाचे दर विचारात घेऊन घरपट्टी आकारली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांच्या खिशावर डल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नवीन मालमत्तांच्या भाडेमूल्यकरात ४० पैशांवरून दोन रुपयांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयातून नाशिककर सावरत नाहीत, तोच जुन्या मिळकतदारांना करवाढीचा नवा जबर डोस महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रिकामे भूखंड कराच्या जाळ्यात आले असून, इमारती, बंगल्याच्या आवारातील जमिनींवरही आता कर लादले आहेत. या करात तब्बल १३ पट वाढ केल्याने नाशिकमधील वास्तव्य आता चांगलेच महागणार आहे. मोकळ्या भूखंडावरील दर ३ पैसे प्रतिचौरस फुटांवरून ४० पैशांवर नेल्याने घरपट्टीसोबतच रिकाम्या जमिनीचाही मोबदला महापालिकेला अदा करावा लागणार आहे. हे नवे दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. नाशिककरांना आपल्या घराच्या इंचन् इंच जमिनीवर महापालिकेला कर अदा करावा लागणार आहे.

एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या या दराने निवासी वापराच्या इमारतीच्या मूल्यांकन दरात पाच पटीपर्यंत, तर अनिवासी अर्थात व्यावसायिक मालमत्तांच्या मूल्यांकन दरात चौपट वाढ करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील मोकळे भूखंड आणि इमारत, सोसायटी, बंगल्यालगतची जमीन व बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी सोडलेल्या रिकाम्या जमिनीवरही आता घरपट्टी लागू करण्यात आली आहे. सोबतच इमारतीच्या आवारात पार्किंग असेल तर त्यावरही घरपट्टी आकारली जाणार आहे. सोबतच महापालिका क्षेत्रातील शेतीवरही आता घरपट्टी आकारण्याचा तुघलकी निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी महासभेला थेट 'ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

महासभेत आयुक्त मुंढेंनी शहरातील ९० टक्के जमिनींवर कर लागत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याची अंमलबजावणी आता आयुक्तांनी सुरू केल्याचे चित्र आहे. शहरात सद्य:स्थितीत ४ लाख १२ हजार मालमत्ता असून, मोकळ्या भूखंडाची संख्या ही १७ हजारांच्या आसपास आहे. या मोकळ्या भूखंडांना यापूर्वी ३ पैसे प्रतिचौरस फूट दरमहा या दराने घरपट्टी आकारणी केली जात होती; परंतु महापालिकेने आता या दरात १३ पट वाढ करत, मोकळ्या भूखंडांचे दर ३ पैशांवरून ४० पैशांवर नेले आहेत. त्यामुळे सध्याच्या घरपट्टीचेच दर या मोकळ्या भूखंडाना लागू होणार असल्याने भूखंडधारकाचे कंबरडेच मोडणार आहे. इमारत, बंगले आणि सोसायटीचे बांधकाम करताना आजूबाजूला पार्किंग, उद्यानासाठी जागा सोडली जात होती. महापालिकेने आता इमारत, सोसायटी, बंगल्यांच्या आवारातील रिकाम्या जमिनीवरही ४० पैसे प्रतिचौरस फूट दराने प्रतिमाह करआकारणी सुरू केल्याने नाशिककरांचे जगणेच आता महागणार आहे.

शेतीलाही बसणार फटका

दत्तक नाशिकच्या योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेने मिळेल तिथून कराची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, महापालिका हद्दीत असलेल्या शेतीलाही घरपट्टीप्रमाणेच कराची आकारणी केली जाणार आहे. रिकाम्या भूखंडाच्या धर्तीवर शेतीलाही आता प्रतिचौरस फूट ४० पैसे दराने दरमहा कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पूर्ण उत्पन्नच महापालिकेच्या तिजोरीत जमा करावे लागणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या या निर्णयाने शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हा निर्णय महापालिकेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला आज पाणीपुरवठा बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी १२०० मीटर व्यासाची जलवाहिनी इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (३ मार्च) सकाळ, दुपार व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे. तसेच, बुधवारी (४ मार्च) सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे.

प्रभाग १६ मधील उपनगर, शांतीपार्क, शिवाजीनगर, मकरंद कॉलनी, इच्छामणी मंदिर परिसर, प्रबाग १७ मधील कॅनॉल रोड, नारायणबापू नगर, एमएससीबी कॉलनी, प्रभाग १८ मधील शिवाजीनगर, अयोध्या कॉलनी, इंगळो चौक, सायखेडा रोड, शिवशक्तीनगर, प्रभाग १९ मधील गोरीवाडी, चेहेडी परिसर, नाशिक-पुणे हायवे, एकलहरा रोड, सामानगाव, प्रभाग २० मधील पुणारोड, डावखर वाडी, जयभवानी रोड, अश्विन कॉलनी, जेतवननगर, बिटको कॉलेज, तरणतलाव, प्रभाग २१ मधील जयभवानी रोड, सहाणे मळा, लवटेनवगर, रोकडोबा कॉलनी, आर्टिलरी रोड, दत्तमंदिर रोड, प्रभाग २२ मधील सौभाग्यनगर, लामरोड, वडनेरगाव परिसर, वडनेररोड परिसर, प्रभाग २३ मधील दीपालीनगर, शिवाजीवाडी, भारतनगर, साईनाथनगर, अशोकामार्ग, लिंगायत कॉलनी, कल्पतरूनगर, पखालरोड, वडाळारोड, जयदीपनगर, साईनाथनगर, प्रभाग ३० मधील वडाळागाव व वडाळागावठाण परिसर येथे पाणीपुरवठा होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनान्स कंपनीकडून फसवणूक

$
0
0

नाशिक: फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास १२ महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सक्सेस ट्री फॉर्म या कंपनीविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिस तक्रारीचा तपास करून पुढील कार्यवाही करणार आहे. या प्रकरणी लष्करातील निवृत्त सुभेदार विठ्ठल व्यंकटराव धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. संशयित कैलास धुमाळ, प्रवीण वरगुडे, राजेंद्र जेजुरकर, दिगंबर बैरागी आदींनी वेगवेगळ्या बोगस कंपन्या स्थापन करून अहमदनगर, पुणे येथील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. आता संशयितांनी द्वारका येथील काठेगल्ली परिरसरात कार्यालय थाटले असून, नाशिकमधील गुंतवणूकदारांना फटका बसू शकतो, अशी भीती फिर्यादी धुमाळ यांनी व्यक्त करीत कारवाई करण्याची मागणी भद्रकाली पोलिसांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामांना गती

$
0
0

घोटी :  इगतपुरी तालुक्यासाठी जनसुविधा योजनेअंतर्गत जवळपास ९२  लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना प्रत्यक्षपणे सुरुवात होणार असल्याचे आमदार निर्मला गावीत यांनी सांगितले. इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघासाठी जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड  आदी कामे करण्यासाठी १७ गावासाठी जवळपास ९२ लाख रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. त्यात इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, खंबाळे सांजेगाव, कऱ्होळे, येथे स्मशानभूमी बांधकाम तर कोरपगाव, कुरनोली, बलायदुरी, माणिकखांब, वाळविहीर येथे स्मशानभूमी अनुषांगिक काम (प्रत्येकी पाच लाख रुपये) मंजूर झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला अतिक्रमणे उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंगळवारीदेखील परिसरातील विविध भागांतील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. शहरातील अतिक्रमणे काढण्याचा महापालिकेचा धडाका कायम असल्याने शहरातील रस्ते, चौक व महापालिकेचे भूखंड मोकळे होऊ लागले आहेत.

मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने चेहेडी गावातील भिल्ल समाज स्मशानभूमीजवळील सार्वजनिक जागेवरील अनधिकृत सात घरांवर बुलडोझर फिरविला. देवळालीगावातील सुन्नावाडा येथील महापालिकेच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामही मंगळवारी हटविण्यात आले. जेलरोडच्या दसक चौकात अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जेलरोड भागात विविध ठिकाणी पथदीपांवर लावण्यात आलेले सुमारे १२५ झेंडेही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढून घेतले. ही कारवाई विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सोनार, गावित या अधिकाऱ्यांनी केली. या कारवाईत विभागाची पाच पथके, एक जेसीबी, वाहनांचा सहभाग होता.

४० घरांवर डिमार्केशन

सिन्नर फाटा येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोरील महापालिकेच्या जागेवरील सुमारे ४० घरांवर डिमार्केशन केले. या ठिकाणच्या नागरिकांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.

---

२०७ नागरिकांना पालिकेच्या नोटिसा (अँकरशेजारी)

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरणासंदर्भात रविवारपासून कारवाई सुरू केली असून, मंगळवारी महापालिकेतर्फे २३ नागरिकांकडून ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कचरा विलगीकरण केले नाही म्हणून शहरातील २०७ नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीअंतर्गत ३२ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६, तसेच महाराष्ट्रÑ महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा याप्रमाणे विलगीकरण न करणाऱ्यांवर कारवाईचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. महापालिकेने कचऱ्याचे विलगीकरण करून न देणारे, तसेच प्लास्टिकबंदी असतानाही कॅरिबॅगचा वापर करणाऱ्यांवर १ एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असून, मंगळवारी ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली. दिवसभरात कचरा विलगीकरणांतर्गत २३ नागरिकांकडून ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २०७ नागरिकांना कचरा विलगीकरणप्रकरणी नोटिसाही देण्यात आल्या आहेत. प्लास्टिकबंदी कायद्यांतर्गत महापालिकेने सोमवारी ३२ हजारांचा दंड वसूल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला दोन दिवस पाणीबाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी पूर्ण होऊ न शकल्याने आज, बुधवारी (दि. ४)देखील नाशिकरोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकणार नसल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. याशिवाय गुरुवारी (दि. ५)देखील सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतानाच अशा प्रकारे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना दोन दिवस पाणीबाणीचा सामना करण्याची वेळ आली आहे.

गंगापूर धरणातून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास रॉ वॉटरचा पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात आले. परंतु, ऐनवेळी या कामाचे स्वरूप वाढल्याने आता बुधवारीही नाशिकरोड भागात दोन्ही वेळचा पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मंगळवारी रात्रीही या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.

या भागात नसणार पाणी

प्रभाग १६ : उपनगर, शांती पार्क, अयोध्यानगर, मातोश्रीनगर, शिवाजीनगर, आरटीओ कॉलनी, समतानगर, टाकळी गाव, उत्तरानगर, आदिवासी वाडा, जय भवानीनगर, पगारे मळा, रामदास स्वामीनगर, श्रमनगर १ व २, सिंधी चाळ इच्छामणी मंदिर परिसर, मकरंद कॉलनी, रघुवीर कॉलनी. प्रभाग १७ : कॅनॉलरोड, नारायणबापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसक गाव, शिवाजीनगर, एमएसईबी कॉलनी. प्रभाग १८ : शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गाव सायखेडारोड, भगवा चौक, शिवशक्तीनगर. प्रभाग १९ : गोरेवाडी, चेहेडी परिसर, नाशिक-पुणे हायवे, एकलहरेरोड, सामनगाव. प्रभाग २० : पुणेरोड, डावखरवाडी, जय भवानीरोड, अश्विन कॉलनी, जेतवननगर, बिटको कॉलेज, तरणतलाव परिसर. प्रभाग २० : जय भवानीरोड, सहाणे मळा, लवटेनगर १ व २, रोकडोबा कॉलनी, आर्टिलरी सेंटररोड, दत्त मंदिररोड. प्रभाग २२‍ : ‍विहितगाव, सौभाग्यनगर, लामरोड, वडनेर गाव परिसर, वडनेररोड परिसर. प्रभाग २३ : दीपालीनगर, शिवाजीवाडी, भारतनगर, साईनाथनगर, अशोका मार्ग, लिंगायत कॉलनी, कल्पतरूनगर, पखालरोड, वडाळारोड, जयदीपनगर, साईनाथनगर. प्रभाग ३० : वडाळा गाव, वडाळा गावठाण.

गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला इंडिगो पार्क येथे गळती लागली होती. या कामाची दुरुस्ती करताना प्रत्यक्ष खोदकाम केल्यावर कामाचे स्वरूप वाढले. गळती रोखण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा ब्लॉक तोडावा लागल्याने मंगळवारी काम पूर्ण होऊ शकले नाही-अविनाश भोये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक अपघातात रोझेचे दाम्पत्य ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव- चाळीसगाव महामार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात  तालुक्यातील रोझे येथील तरुण दाम्पत्य जागीच ठार झाले. सुधाकर मधुकर सानप (वय ३७), ज्योती सुधाकर सानप (३४) अशी या दाम्पत्याची नावे आहेत.  कळवाडी शिवारात आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत  हे दाम्पत्य ठार झाले.  शेती करणारे सानप दाम्पत्य कळवाडी येथील महाराष्ट्र बँकेत कामानिमित्त गेले होते.  मालेगाव- चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ ते कळवाडीदरम्यान असलेल्या अपघाती वळणावर भरधाव आयशर ट्रकने (एमएच १९/झेड ५५०९) हिने सानप दाम्पत्याच्या दुचाकीला (एमएच ४१/ एल ६०४८) हिला जबर धडक दिली. यात सानप दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला. सानप दाम्पत्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकच्या गोळीबारात परभणीचा जवान शहीद

$
0
0

वृत्तसंस्था, जम्मू

जम्मू-काश्मीरमधील पूँच जिल्ह्यात ताबा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात मंगळवारी परभणीतील जवान हुतात्मा झाला आहे. शुभम मस्तपुरे (२०) असे या जवानाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी होते.

ताबा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सैन्यातील जवान शुभम सूर्यकांत मस्तपुरे हुतात्मा झाले. शुभम यांच्या पश्चात आई सुनिता आहेत. दरम्यान, शहीद शुभम यांचे पार्थिव बुधवारी सकाळी कोनेरवाडी येथे आणण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी सकाळी पाकच्या गोळीबारात भारतीय सैन्यातील चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका लेफ्टनंटचा समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या वर्षभरात पाकिस्तानने ६५०वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडेंचा धडाका; भाजपची सीएमकडे दाद!

$
0
0

मुंडेंचा धडाका; भाजपची सीएमकडे दाद!

महापालिकेत आल्या दिवसापासून कर्मचाऱ्यांपासून ते अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना धडाकेबाज कामगिरीने सळो की पळो करून सोडणारे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मंगळवारी पंचवटी विभागीय कार्यालयाची झाडाझडती घेतली. तेथील बाबूशाहीला धारेवर धरत बेशिस्त आणि कामात कुचराई केल्याप्रकरणी दोघांना निलंबन नोटिसा, तर चौघांची वेतनवाढ रोखण्याचा झटका त्यांनी दिला. दुसरीकडे, मागील दीड-दोन महिने सावध असलेले भाजपचे महापालिकेतील धुरिण आता घरपट्टीतील भरघोस वाढीच्या निमित्ताने मुंडे यांच्या एककलमी कारभाराविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडणार आहेत.

(निष्पक्ष लोगो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाभाजप मेळाव्याला नाशिकचे बळ

$
0
0

दहा हजार कार्यकर्त्यांची फौज जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या शुक्रवारी (दि. ६) या स्थापनादिनी राज्यात आतापर्यंत झालेला नाही, असा राजकीय महामेळावा होणार असून मुंबईत होणाऱ्या महा भाजप मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते येणार आहेत. नाशिकमधूनही दहा हजार कार्यकर्ते येणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

मुंबईत होणाऱ्या भाजपच्या महाभाजप मेळाव्यासाठी पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात भंडारी यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी भंडारी म्हणाले की, भाजप महा मेळाव्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्याची तयारी करण्यासाठी मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विभागात ११ बैठका घेण्यात आल्या. मेळाव्याचे नियोजन पूर्ण झाले असून राज्यातून १० ठिकाणाहून या मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. भाजपचे राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य असून प्रदेश ते मंडलस्तरापर्यंत दोन लाखापेक्षा अधिक पदाधिकारी आहेत. खासदार, आमदार, नगरसेवक, नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच अशा सर्वच बाबतीत भाजप राज्यात पहील्या क्रमांकाचा पक्ष आहे. मेळावा अभुतपूर्व ठरेल अशा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, मनपा गटनेते संभाजी मोरूस्कर, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, विजय साने, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, पवन भगुरकर, सुजाता करजगीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खर्चाबाबत कानावर हात

भाजप महामेळाव्याला नागरिकांना आणण्याची जबाबदारी नगरसेवकांवर टाकण्यात आल्याने या आर्थिक भाराने नगरसेवक दबले आहेत. त्यामुळे हा खर्च कोण देणार, असे विचारले असता, भंडारी यांनी या स्थानिक नेत्यांचा प्रश्न असल्याचे सांगत, पालकमंत्र्याशी नगरसेवक चर्चा करतील असे सांगून वेळ मारून नेली. नगरसेवकांना टार्गेट देण्यात आले आहे. ते पूर्ण करतांना त्यांची दमछाक होत असल्याने स्थानिक नेतेच त्यावर तोडगा काढतील, असे भंडारी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हा अतिरिक्त भार नगरसेवकांनाच पेलावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेत गटबाजी

$
0
0

राऊत-चौधरी गट आमने-सामने

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्र. १३ च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने संपर्कप्रमुख अजय चौधरींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शिवसेनेत एकोप्याऐवजी बेदिलीचेच दर्शन घडले. माझ्या बदलाची वाट बघू नका, मला शंभर वर्षे आयुष्य असून, व्यक्तिद्वेष आणि व्यक्तिनिष्ठेवर राजकारण होत नसल्याचा टोला आमदार चौधरी यांनी खासदार संजय राऊतांच्या समर्थकांना लगावला. शिवसेनेतील बदनामी करणाऱ्या बातम्या कोण देतो, याचाही शोध घेण्याचे आदेश चौधरी यांनी दिले.

प्रभाग क्र. १३ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा असला तरी, या प्रचाराकडे कुणीच फिरकत नसल्याने नाशिकचे संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी शिवसेना कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत सेनेतील एकोप्याऐवजी राऊत आणि चौधरी गटातील गटबाजीचेच दर्शन अधिक घडले. चौधरींनी नाशिककडे पाठ फिरवताच खासदार संजय राऊत गटाच्या पदाधिकाऱ्यांना सुरू केलेल्या प्रयत्नांना विलास शिंदे यांनी वाचा फोडत आपण नाशिकमध्ये बैठका का घेतल्या नाहीत असा सवाल केला. तसेच, आपल्या अनुपस्थितीत रोज माध्यमांमध्ये सेनेविषयी उलटसुलट बातम्या छापून येत असल्याचे सांगितले. अन्य पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील गटबाजी बोलून दाखवली.

अजय चौधरी यांनी राऊत गटाच्या वाढलेल्या जोरावर थेट भाष्य करीत नाशिकमध्ये आल्यावर आपले जोमाने स्वागत केले गेल्याचा अर्थ मला समजला नसल्याचे सांगितले. माझ्याविषयी अनेक बातम्याही छापून आल्या आहेत. महानगरप्रमुख बदलल्यापाठोपाठ संपर्कप्रमुखही बदलतील अशी वाट अनेक जण पाहत आहेत. परंतु, माझ्या आयुष्याची चिंता कुणीही करू नका, तसेच माझ्या बदलाची वाटही पाहू नका असे सांगत महानगरप्रमुख पदावर नियुक्ती झाल्यानंतर फोन न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली. शिवसेनेत बदल आणि गच्छंतीचा अधिकार हा फक्त पक्षप्रमुखांचाच असल्याचे सांगत पक्षाची बदनामी करणाऱ्याचा शोध घ्या, असे आवाहनही केले. तसेच, पक्षाचा उमेदवार निवडून येण्याासठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

बडगुजर-चौधरी वाद

शिवसेनेच्या महाबळेश्वर येथील मेळाव्यादरम्यान झालेल्या एका वादग्रस्त कार्यक्रमासंदर्भात बोलताना चौधरी यांनी थेट सुधाकर बडगुजर यांनाच खुलासा का केला नाही, असा जाब विचारला. त्यावर बडगुजर यांनी याच्याशी माझा काय संबंध असा प्रतिसवाल केला. त्यावर तुम्ही सीनिअर आहात असे चौधरींनी सांगितले. यावेळी बडगुजर आणि चौधरी यांच्यातच वाकयुद्ध सुरू झाले. त्यामुळे शिवसेनेत आता राऊत विरुद्ध चौधरी गटातील संघर्ष उफाळून येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णांना मानसिकही आधाराची गरज

$
0
0

डॉ. भरत केळकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिरिया आणि येमेन हे देश यादवी युद्धांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या घरावर बॉम्ब पडतो त्या कुटुंबापैकी एक दोघे जण जागीच ठार होतात. एक दोघे जण हॉस्पिटलमध्ये आल्यावर मृत्युला कवटाळतात तर उरलेल्या प्रचंड जखमी झालेल्यांना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आधार द्यावा लागतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ऑर्थेापेडिक डॉ. भरत केळकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने मंगळवारी 'सीमेवरची वैद्यकीय सेवा' या विषयावर डॉ. केळकर यांचे अनुभव कथन झाले. त्यावेळी ते बोलत होते. रोटरीच्या गंजमाळ येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. सिरियाला सीमेवर डोळ्यात अंजन घालून अहोरात्र संरक्षण करणाऱ्या जवानांच्या वैद्यकीय मदतीसाठी नाशिकमधील डॉक्टरांचे पथक जाऊन आले. सामाजिक बांधिलकी जपून तेथील जवानांवर जात, धर्म आणि पंथ या गोष्टींचा विचार न करता डॉ. केळकर यांनी 'डॉक्टर्स बियोंड बॉर्डर्स' या विषयांतर्गत ही मोहीम राबवून सातासमुद्रापर जाऊन मदतीचा हात दिला. याविषयी त्यांनी अनुभव कथन केले. यावेळी मंचावर रोटरी क्लबचे उपाध्यक्ष मिलिंद जहागिरदार, सचिव अॅड. मनीष चिधडे, मंथ लीडर सुधीर जोशी आणि वैशाली रावत यांची उपस्थिती होती.

'दीड दिवसांच्या मुलाखतीनंतर सिरियात जाण्यासाठी माझी निवड झाली. त्यात बराचसा मोठा भाग मानसिक सक्षम असण्याचा होता, त्यासाठी मी भीष्मराज बाम यांचा ऋणी आहे. ज्यादिवशी मी तेथे गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या आवाजाने जाग आली. शेजारीच बॉम्ब पडला होता, तेथील अधिकाऱ्याने सांगितले, बॉम्बने तुमचे स्वागत झाले आहे. त्यानंतर जे अनुभवले ते विलक्षण होते, असे डॉ. केळकर यांनी सांगितले. ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली त्यांना डिस्चार्ज देऊन कुठे जायला सांगायचे हा मोठा प्रश्न होता. नर्सेस खूप समजावून सांगायच्या तुम्ही येथून गेले तर तुमच्या बांधवांना उपचार देता येतील. तेव्हा कुठे ती ऐकायची,' असा अनुभव डॉ. केळकर यांनी सांगितला. दरम्यान, कार्यक्रमात प्रारंभी एका शेतकरी बांधवास शेळीपालनासाठी ३० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे कॅलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांकडून झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पंचवटी विभागीय कार्यालयास मंगळवारी सकाळी अचानक भेट देऊन सर्व विभागांत कशा प्रकारे कामकाज चालते याची पाहणी केली. यावेळी कामामध्ये त्रुटी आढळलेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. कामात कुचराई करणाऱ्या आणि दोषी आढळणाऱ्या दोन जणांना निलंबनाच्या नोटिसा देण्यासह चार जणांची वेतनवाढ त्यांनी रोखल्याची चर्चा सायंकाळी महापालिका वर्तुळात होती.

कार्यालयात पाहणी करताना अपडेट नसलेल्या फायली, कामाचा निपटारा न करणाऱ्या, माहिती सांगता न येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी चांगलेच धारेवर धरले. फाइल तपासताना त्यात लोकप्रतिनिधींच्या चिठ्ठ्या आढळलेल्या ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी झापले. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कामात दोष आढळल्याने त्याची, तसेच  विविध कर विभागातील अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले.

ऑडिट विभागातील कर्मचाऱ्यांना ऑडिट कशाप्रकारे केले, त्याच्या फायली दाखविण्यास सांगितले. त्या कर्मचाऱ्याला नेमके सांगता आले नाही. आवश्यक ती फाइल वेळेवर सापडली नाही. जन्म-मृत्यू दाखला विभागात लोंबकळणाऱ्या वायर बघून विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. दाखल्यांचे रेकॉर्ड तपासणीत त्याच्या नोंदी योग्य पद्धतीने केल्या की नाही, याची पाहणी केली. त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या कामाचे इन्स्पेक्शन करण्याच्या सूचना दिल्या. स्वच्छतागृहाजवळच्या भिंतींचे निघालेले पोपडेदेखील आयुक्तांच्या नजरेतून सुटले नाहीत. बांधकाम विभागाच्या सी. बी. आहेर यांना ते दाखवित हे काय आहे, अशी विचारणा केली. खिडक्यांच्या काचांवर पक्ष्यांची विष्ठा पडल्याने खराब झालेल्या काचांची स्वच्छता का केली जात नाही, असे विभागीय अधिकाऱी आर. आर. गोसावी यांना विचारले. स्मार्ट सिटीच्या ऑफिसच्या फर्निचरच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करीत त्यात करण्यात येत असलेले पार्टिशन, नव्याने करणारे प्रवेश मार्ग सुधारण्याविषयीच्या सूचना केल्या. पाहणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आयुक्तांनी सूचना केल्या. 

अन्यत्रही करणार पाहणी

महापालिकेची हॉस्पिटल्स, शाळा, उद्याने आदी ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी करणार आहे. अशा भेटीत पहिल्या विभागीय कार्यालयास भेट दिली. येथील कामाच्या त्रुटी शोधल्या. कशा प्रकारे सेवा दिली जाते ते नागरिकांशी प्रत्यक्ष बोलून माहिती करून घेतले. काही विभागांत चांगली कामे होत आहेत, काही ठिकाणी सुधारणा अपेक्षित आहेत. कामात दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल. सर्वांची कामे शासकीय नियमाप्रमाणेच करणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने कामे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले.

फाइलमध्ये आमदारांची चिठ्ठी

आयुक्तांनी पाहणी करताना प्रत्येक विभागातील कपाटांमधील फायली उघडून बघितल्या. अशा फायली बघत असताना एका फाइलमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांची चिठ्ठी आढळून आली. अशी चिठ्ठी बघितल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला इथे कशाला काम करता, आमदारांकडेच जाऊन काम करा, असे झापल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

नागरिकांना बसवून का ठेवले?

जन्म-मृत्यू नोंदणी विभागात पाहणी करताना तेथे बसून असलेल्या नागरिकांना बघून यांना इतका वेळ का बसवून ठेवले, असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी विचारला. तेथील कामकाजाची पाहणी करीत आलेल्या नागरिकांच्या अर्जांची तारीख, त्यांच्या नोंदी, दाखले देण्याच्या कालावधी याची बारकाईने पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या नोंदींची तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

तक्रारींची दखल घ्या

पाहणी सुरू असताना एका नागरिकाने तक्रारी करूनही त्या सोडविल्या जात नसल्याचे आयुक्तांना सांगितले. आरोग्य विभागात केलेल्या तक्रारींची नोंद केल्याचे ते सांगत होते. मात्र, तक्रारी नोंदींचे रजिस्टर सापडत नाही. त्या नागरिकाच्या तक्रारी आयुक्तांनी ऐकून घेतल्या.  तेथील अधिकाऱ्यांना तक्रारींची दखल घेण्याचे सांगण्यात आले.

दोघांना निलंबनाच्या नोटिसा (स्वतंत्र चौकट)

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेशिस्तीप्रकरणी पंचवटी विभागीय कार्यालयातील दोघांना निलंबनाच्या नोटिसा काढण्याचे आदेश दिले आहेत. उशिरा येणे आणि कामात हलगर्जीपणा केल्यामुळे चार जणांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिल्याचीदेखील चर्चा आहे. मुंढेंनी मंगळवारी सकाळपासूनच पंचवटी विभागीय कार्यालयात विभागप्रमुखांसह ठिय्या मांडला होता. त्यावेळी अनेक कर्मचारी उशिराने आल्याचे आढळून आले, तर अनेकांनी आपल्या फायली व्यवस्थित लावल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वारंवार सांगूनही कामकाजात सुधारणा न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी युवकतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरात सुरू असलेल्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सिडकोतील भाजी बाजारांमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी प्लास्टिक वापराच्या घातक परणिमांची नागरिकांना माहिती देण्यात आली.

प्लास्टिक बंदीनंतर महापालिकेतर्फे सध्या सिडको परिसरात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनेकवेळा या प्लास्टिक बंदीमुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात वादविवाद सुद्धा होतात. यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतील पवननगर, शिवाजी चौक, राणेनगर व पाथर्डी फाटा येथील भाजी बाजार परिसरात प्लास्टिक बंदला पाठिंबा दर्शवित कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

प्लास्टिकच्या नैसर्गिक विघटनाला शेकडो वर्षे लागतात. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते, याबाबत चित्रफित दाखविण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गणेश जाधव, रवींद्र गामणे, अजय पाटील, मिलिंद भामरे, राजू उशीर, निखिल पवार, योगेश शेवाळे, राहुल शेवाळे, उमेश चौधरी, यश सुपारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी याना अटक करावी, या प्रकरणात बौद्ध बांधवांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे नांदगाव तहसील कार्यालयावर मंगळवारी दुपारी मोर्चा काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

बौद्ध बांधवाना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात येऊ नये, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, तालुकाप्रमुख राज पवार, अविनाश केदारे, प्रशांत पवार, अन्वर मन्सूरी, उमेश भालेराव, यशवंत बागुल, शकील शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images