Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फक्त आश्वासने, अंमलबजावणी मात्र शून्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करतात; पण त्याची अमंलबजावणी करीत नाही. मी अकोला येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. त्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. डिसेंबरमध्ये ते पूर्ण केले जाणार होते; पण अद्याप ते झाले नाही. नाशिकहून मुंबईला आलेल्या आदिवासी मोर्चालाही असेच आश्वासन दिले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतरही असेच लेखी आश्वासन दिले. मात्र, त्याची अमंलबजावणी होईल का, असा खोचक प्रश्नही माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी उपस्थित करून राज्य सरकाच्या सर्व मागण्या मान्य करण्याच्या फॉर्म्युल्याची खिल्ली उडवली. 'वादे बडे बडे .. पर, इंम्प्लिमेंट नहीं', असेही ते म्हणाले.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीतर्फे तीन दिवसीय व्याख्यानमालेत 'भारतीय आर्थिक वाटचाल व दिशा' या विषयावर सिन्हा बोलत होते. भाजप सरकारचा टाइम संपला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आता कर्नाटकच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर राजस्थान व मध्य प्रदेशाच्या निवडणुका होतील. त्या झाल्या, की लोकसभा निवडणुका होतील. त्यामुळे आता काही करायची वेळ संपलेली आहे. या सरकारचा सर्वांत मोठा चुकीचा निर्णय म्हणजे नोटांबदी. यापेक्षा मोठी चूक दुसरी कोणतीच नाही. त्यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे घाईघाईत जीएसटीच्या निर्णयाचाही फटका बसला आहे. जीएसटीतून मिळालेल्या उत्पन्नाची आकडेवारी तर धक्कादायक आहे, असेही त्यांनी सांगितले.

विकासदराचा फॉर्म्युला बदलला

भाजप सरकारने विकासदराचा फॉर्म्युला बदलल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले आहे. जी गोष्ट नाही ती स्वीकारून त्याच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा या सरकारने आकड्यांचा घोळ घातला, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विकासदर वाढलेला वाढतो. अर्थव्यवस्थेला गती मिळाली असेल तर इतर सेक्टर मागे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'प्राप्तिकर'कडे १८ लाख केसेस

नोटांबदीनंतर प्राप्तिकर विभागाकडे १८ लाख केसेस प्रलंबित आहेत. ज्या खात्याकडे रिटर्नच्या फायली गोण्यांत भरल्या जातात, त्या या पेंडिंग केसेसची कशी चौकशी करेल. त्यांच्याकडे इतके मनुष्यबळ आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

जेटलींवर टीका

सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही थेट नाव न घेता जोरदार टीका केली. ज्यांचे राजकीय आयुष्य राज्यसभेत गेले, त्यांना वास्तव प्रश्न कसे कळतील, असेही ते म्हणाले. त्यामुळे जीएसटी व नोटाबंदीचा निर्णय फसला, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हंस कल्याण धाममध्ये उद्या सत्संग सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानव धर्म प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत श्री हंस कल्याण धाममध्ये रविवारी (दि. १ एप्रिल) सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धेय श्री विभूजी महाराज यांचे अध्यात्मावर आधारित विचार भाविकांना श्रवण करता येणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागांतून मानव धर्मप्रेमी नाशिकमध्ये येणार आहेत.

आज, शनिवारी (दि. ३१) विभूजी महाराज यांचे नाशिक-पुणेरोडवरील शिवाजीनगर येथील श्री हंस कल्याण धाममध्ये आगमन होणार आहे. मानव उत्थान सेवा समितीच्या नाशिक शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आश्रमाच्या प्रबंधक साध्वी हिराजी यांनी दिली. रविवारी दुपारी एक ते चार या वेळेत सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विभूजी महाराज यांचे अध्यात्मावर आधारित आत्मकल्याणकारी विचार भाविकांना श्रवण करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या बातमी

0
0

गणपतीचे नाव

तांबडी जोगेश्वरी गणपती, पुणे

प्रेषक : सुनील काजारे। नालासोपारा

तीन विद्यार्थ्यांच्या

शहरात आत्महत्या

टीम मटा

जेलरोडच्या गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी सोळावर्षीय मुलीने, तर जुना कथडा भागातील कोळीवाड्यात १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. सिडकोत अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या तिन्ही घटना शुक्रवारी उघडकीस आल्या. जेल रोडमधील मुलीच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सिडको परिसरातील विशाल संतोष नागोरी (वय १९, रा. त्रिमूर्ती चौक) या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी नोंद केली आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही लांबणीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात आता निधीची अडचण समोर आली आहे. महापालिकेने सीसीटीव्ही जाळे बसविण्यासाठी ४९ कोटींचा निधी मंजूर केला असला तरी, एवढ्या निधीने हा प्रकल्प मार्गी लागणार नाही. या प्रकल्पासाठी जवळपास साडेचारशे कोटींच्या निधीची गरज आहे. त्यामुळे हा प्रकल्प शासनाच्या मदतीशिवाय पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूर्तास सीसीटीव्हीचे भविष्य लांबणीवर पडले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी शहरात कायदा व सुव्यवस्थेसाठी तात्पुरते साडेचारशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. परिणामी सिंहस्थात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे शहरात कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु, सीसीटीव्ही कोणी बसवायचे व त्याचा आर्थिक भार कोण उचलणार यावरून वाद सुरू होता. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी शहरात सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा केली होती. महापालिकेकडूनही स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेने ४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाकडून कॅमेरे बसविले जाणार असल्याने त्यासाठी संयुक्त कमांड कन्ट्रोल सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने यासाठी खासगी संस्थेला सर्वेक्षणाचे काम सोपविले होते. तसेच लिडार प्रणालीद्वारे स्वतंत्र जागांच्या निश्चितीचेही काम सुरू झाले आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला असून, तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात ७७६ ठिकाणी ३११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यात पोलिसांसाठी ३४३ जागांवर ११०६ कॅमेरे, तर महापालिकेच्या ४३३ जागांवर १८४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. सोबतच पोलिस आणि महापालिकेचे स्वतंत्र कंट्रोल आणि कमांड सेंटर राहणार आहे. त्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या ईमारतीच्या वरच्या मजल्यावर कामदेखील सुरू करण्यात आले होते.

सर्वेक्षण होऊनही काम थंडावले

महापालिका व पोलिसांकडून संयुक्तपणे कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शासनाने नागपुरच्या धर्तीवर महा-आयटीच्या वतीने ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वेक्षणदेखील सुरू झाले होते. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण होऊन शहर सुरक्षित होईल, अशी अपेक्षा असतानाच, अचानक निधीअभावी कमांड कंट्रोल रूमसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही तूर्त थंडावली आहे. सीसीटीव्हीसाठी साडेचारशे कोटींपेक्षा अधिक रकमेची गरज आहे. त्यामुळे मनपाने मंजूर केलेल्या ४९ कोटींच्या निधीने हा प्रकल्प पूर्ण होणार नसल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे यासाठी लागणाऱ्या उर्वरित निधीसाठी शासनाकडे दाद मागण्यात आली आहे. त्याला शासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे शासनाच्या निधीवरच आता शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रकल्प अवलंबून राहणार आहे.

निविदा प्रक्रिया थंडावली

शहरात ३११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी शासनाच्या महा-आयटी विभागाच्या वतीने ४७० कोटींची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी खासगी आयटी कंपन्यांनी देकारही भरले आहेत. परंतु, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याने ही निविदा प्रक्रियाही आता थंडावली आहे. शासनाकडून निधीबाबत हिरवा कंदील न आल्याने ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिककरांचे सुरक्षित नाशिकचे स्वप्न लांबवणीवर पडल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथडा येथे युवतीची आत्महत्या

0
0

कथडा येथे युवतीची आत्महत्या

नाशिक : जुना कथडा भागातील कोळीवाड्यात राहणाऱ्या १७ वर्षीय युवतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भद्रकाली पोलिसांनी मृत्यूची नोंद घेतली आहे. शुक्रवारी सकाळी तिने राहत्या घरात गळफास घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोडला पाणी वाया

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडला कालव्यावरच्या पुलाजवळ एका झोपडीजवळून पाण्याच्या फुटलेल्या पाइपलाइनमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तीन दिवसांपासून हे पाणी वाया जात आहे. हे पाणी पेठरोडवर साचू लागले आहे. पाणी पुरवठा विभागाने याची दखल न घेतल्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची गरज वाढू लागली आहे.  शहर परिसरात अनेक भागात पाणी टंचाई आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पाण्याचा वापर जपून करण्याची गरज असताना पाण्याचा अशाप्रकारे अपव्यय होत असल्यामुळे या पाइपलाइनवर अवलंबून असलेल्या नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. 

या फुटलेल्या पाइपलाइनमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात येथील महिला कपडे धुणे, भांडी घासणे, लहान मुलांना आंघोळ घालणे आदी कामे उरकत आहेत. पेठरोडला फुलेनगर या झोपडपट्टीच्या भागात पाण्याचा वापर बेसुमार केला जातो. कालव्याच्या वरून गेलेल्या पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच येथील पाइपलाइन फुटली होती. या भागातील पाइपलाइन फुटते की फोडली जाते हा प्रश्न आहे. सध्या फुटलेली पाइपलाइन ही एका झोपडीजवळ असल्याने याबाबतही शंका उपस्थित होत आहे.

पेठरोडला याच भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यावर आळा घालण्यासाठी येथे मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या टॉयलेटकडे जाण्याच्या मार्गातच या पाइपलाइनचे पाणी साचले आहे. त्यामुळे या टॉयलेटचा वापर करणे मुश्किल होत आहे. पाइपलाइनच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगल्या गुणांचा सत्कार करा

0
0

बाळासाहेब गामणे यांचा सत्कार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जो चांगले काम करतो, ते मान्य केले पाहिजे. प्रत्येक माणसात असा गुण असतो, अश्या चांगल्या गुणांचा सत्कार करा, असे प्रतिपादन डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. लोकमित्र बाळासाहेब गामणे नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. 

श्रध्दा लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमास महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, पोपटराव पवार, खासदार हरिशचंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते. डॉ. लहाने म्हणाले, लोकमित्र होण्यासाठी मनाची श्रीमंती असली पाहिजे. सर्वगुण संपन्न होण्यासाठी त्याग करण्याची वृत्ती असावी लागते.  बाळासाहेब गामणे यांनी सत्काराला उत्तर देताना लोकसंग्रहामुळेच यश मिळत गेल्याचे सांगितले.  शिवाजी मानकर यांनी स्वागत केले. प्रकाश आंधळे यांनी मानपत्र वाचन केले. पल्लवी पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी बिरारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष विलास बिरारी यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नाशिकचेच रामेश्वर मालानी यांची सचिवपदी व संजय पाठकर यांची कोशाध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष गोपाल अटल यांनी दिली.

मूळचे बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील रहिवासी असलेले विलास बिरारी अनेक वर्षांपासून नाशिक येथे हर्ष कन्स्ट्रक्शनचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून बांधकाम व्यवसायात कार्यरत असून, अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. बांधकाम क्षेत्रतील आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. बांधकाम व्यवसायापुढील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था व बिल्डर्स असोसिएशन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करणार असल्याचे बिरारी यांनी निवडीनंतर सांगितले. अरविंद पटेल, अविनाश पाटील, मोहनलाल कटारिया, राजेंद्र मुथा व राहुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भजनसंध्येमुळे ‘नवरंग’मध्ये बहर

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रामभक्त हनुमान चालिसासह विविध भक्तिगीते आणि भजनांनी नवरंग कॉलनीतील बहारदार भजनसंध्येत भाविक मंत्रमुग्ध झाले.

हनुमान जयंतीनिमित्त उपनगरच्या नवरंग कॉलनीमधील हनुमान मंदिरात रामदेवबाबा सत्संग भजनी मंडळाच्या भजनसंध्येचे आयोजन केले होते. त्यात प्रा. पांडुरंग जाधव यांनी आ लौट के आजा हनुमान... राम चले, कोई कारण होगा... हे भोळ्या शंकरा... बोलो राम, सांजसकाळी... अशी एकापेक्षा एक सरस भजने सादर केली. सुभाष काजळे यांनी कानडा राजा पंढरीचा... अबीर-गुलाल उधळीत रंग... प्रल्हाद राठोड यांनी विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत... हे भक्तिगीत सादर करून मैफल रंगविली. गुलाब पवार (तबला), शिवाजी सूर्यवंशी, जगन्नाथ जाधव (तालवाद्य), यमुना जाधव, चंद्रकला राठोड यांनी उत्तम साथसंगत केली. कवी रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेतील सरकारने अजेंडा पाळला नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'भाजप सरकारने विकासाच्या अजेंड्यावर मते मिळवली; मात्र गेल्या चार वर्षांत विकास केल्याचे दिसत नाही. बुद्धिवादी मतदारांनी मोदी सरकारची विकासाची हाक ऐकून त्यांना साथ दिली. मात्र, त्यांनी अजेंडा पाळला नाही,' असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केले.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध विचारवंतांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यात 'महाराष्ट्र आणि देशाची सद्य:स्थिती' या विषयावरील दुसरे पुष्प पाटील यांनी गुंफले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही व्याख्यानमाला सुरू आहे.

पाटील म्हणाले, की भाजपने विकास याच मुद्द्याचा विचार करून आणखी एक वर्ष जरी विकास केला तरी मतदार मोदी यांना पुढील पाच वर्षे सत्ता देण्यात कुचराई करणार नाहीत. मोदींच्या आश्वासनांचा लेखाजोखा प्रत्येक माणूस आता घेत आहे. सध्याची माणसे मोबाइलमुळे प्रचंड हुशार झाली असून, चर्चा करण्यात त्यांना अधिक रस निर्माण झाला आहे. पूर्वी लोक राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत. आता तेच लोक सवाल उपस्थित करतात. जे आवश्यक आहे ते मोबाइलद्वारे बरोबर लोकांच्या कामात पोहोचवले जात आहे. त्यामुळेच लोक साक्षर झाले असून, त्यांना प्रत्येक गोष्टीची चर्चा करायची आहे. काही लाख कोटींचे बजेट काही मिनिटांत मंजूर होते. चर्चेविना हे लोकांना आता पटत नाही. त्यांना चर्चा करायची आहे. माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार जयंत जाधव, माजी खासदार माधवराव पाटील, अर्जुन टिळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. प्रारंभी गौतम सुराणा यांनी प्रास्ताविक केले. आमदार जयंत जाधव यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी बिरारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष विलास बिरारी यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नाशिकचेच रामेश्वर मालानी यांची सचिवपदी व संजय पाठकर यांची कोशाध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष गोपाल अटल यांनी दिली.

मूळचे बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील रहिवासी असलेले विलास बिरारी अनेक वर्षांपासून नाशिक येथे हर्ष कन्स्ट्रक्शनचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून बांधकाम व्यवसायात कार्यरत असून, अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. बांधकाम क्षेत्रतील आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. बांधकाम व्यवसायापुढील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था व बिल्डर्स असोसिएशन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करणार असल्याचे बिरारी यांनी निवडीनंतर सांगितले. अरविंद पटेल, अविनाश पाटील, मोहनलाल कटारिया, राजेंद्र मुथा व राहुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिऱ्हाड मोर्चा स्थगित

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करण्यासाठी अक्कलकुवा येथून नाशिक येथे येत असलेला बिऱ्हाड मोर्चा अखेर स्थगित करण्यात आला आहे.

मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासोबत गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलकांना तूर्तास तीन महिने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शनिवारी नाशिकमध्ये धडकणारा हा मोर्चा शुक्रवारीच सोग्रसहून माघारी परतला. त्यामुळे नाशिकमधील प्रशासनासह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील जवळपास तीन हजारपेक्षा जास्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. तासिका तत्त्वावरच त्यांना वेतन दिले जात होते. शाळांच्या सोयीने या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. परंतु, त्यांना सेवेत मात्र कायम करण्यात आले नाही. या सर्वांनी सेवेत कायम करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना थेट समावून घेण्यास नकार दिला आहे. या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी अक्कलकुवा ते नाशिक असा थेट पायी बिऱ्हाड मोर्चा काढला होता. शनिवारी हा मोर्चा नाशिकमध्ये आयुक्तालयावर धडकणार होता. परंतु, सोग्रसमध्ये मुक्कामाला असतानाच राज्य सरकारने या मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटनेने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर शुक्रवारी आंदोलक माघारी परतले. आंदोलकांना आपआपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक प्रकल्पासाठी एक एसटी बस देण्यात आली होती. दरम्यान, बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमधील प्रशासन व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

बैठकीत झाला निर्णय

राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी बैठक झाली. यात आंदोलकांचे प्रतिनिधी कमलाकर पाटील आणि आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आला. त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही मलिक यांनी वर्मा यांना दिले. त्यामुळे सरकारला तीन महिन्यांचा अवधी देण्याच्या निर्णयावर रात्री उशिरा येऊन आंदोलकांनी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीची मालिका सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून, तीन मोटारसायकली चोरीस गेल्याचे गुन्हे भद्रकाली, सरकारवाडा व इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. भगूर येथील शशिकांत वासुदेव खर्डे कामानिमित्त द्वारका परिसरात आले होते. त्यांची हॉटेल द्वारकाजवळ लावलेली अ‍ॅक्टिव्हा चोरट्यांनी चोरून नेली. भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत. दुसरी घटना कॉलेजरोड भागात घडली. पाटील लेन येथील स्मिता सोसायटीत राहणारे अक्षय संजय पल्ले यांची पल्सर मोटरसायकल सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीस गेली. सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील जितेंद्र काशीनाथ आहेर यांची स्प्लेंडर शुक्रवारी रात्री सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीस गेली. इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

चार जुगारी गजाआड

वडाळागावात राजरोसपणे जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. संशयितांकडून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. वडाळागावात काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली. त्यांनी दुपारच्या सुमारास छापा टाकला. मोसिन शेख व त्याचे तीन साथीदार पत्त्यांचा अंदर-बाहर जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या जवळील रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

एटीएम बुथमध्ये मारले पाकीट

एटीएम बुथमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एकाचे पाकीट हातोहात लांबविले. पेठ फाटा परिसरात हा प्रकार घडला. पाकिटात साडेदहा हजार रुपयांची रोकड होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ बाळू गाढवे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे. ते पैसे काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम बुथमध्ये गेले होते. त्यावेळी तेथील गर्दीचा फायदा घेऊन दोघांनी त्यांच्या खिशातील पाकीट हातोहात लांबविले. पाकिटात १० हजार ४०० रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे होती.

दुचाकीस्वारांनी लांबविला मोबाइल

मोबाइलवर बोलत पायी चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल मोटारसायकलवरील भामट्यांनी हिसकावून नेला. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन सुदाम वाघमारे (रा. खोडेनगर, भुजबळ फार्ममागे) यांनी फिर्याद दिली आहे. ते गुरुवारी दुपारी ट्रॅक्टर हाउसकडून तिगरानिया कंपनीकडे पायी चालले होते. टाकळी फाट्याकडून भरधाव आलेल्या मोटारसायकलवरील तिघांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला.

बॅग चोरून पोबारा

पार्क केलेल्या मोटारसायकलला टांगलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेली. गोळे कॉलनीत हा प्रकार घडला. बॅगेत आयपॅडसह महत्त्वाची कागदपत्र असा सुमारे साडेतीस हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सागर विजय निळकंठ (रा. घोडकेनगर, पिंपळगाव बसवंत) यांनी फिर्याद दिली आहे. ते बुधवारी दुपारी कामानिमित्त गोळे कॉलनीत आले होते. तेथे त्यांनी मोटारसायकल उभी केली. चोरट्याने मोटारसायकलला लावलेली बॅग चोरून नेली.

\Bलोगो- क्राईम डायरी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवानिमित्त गडावर फडकला कीर्तिध्वज

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त शुक्रवारी गडावर कीर्तिध्वज फडकला. हा ध्वज लावण्याचा हा मान वंशपरंपरेने कळवण तालुक्यातल्या दरेगाव (व) येथील गवळी पाटील कुटुंबाकडे आहे. एकनाथ लक्ष्मण गवळी व गवळी परिवारातील सदस्यांकडून हा कीर्तिध्वज गडाच्या शिखरावर फडकवण्यात आला.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात येथील भाविक मोठ्या संख्येने दर वर्षी गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. वर्षातून चैत्र महिन्यात आणि नवरात्रात देवीचा यात्रोत्सव भरतो. या दोन्ही वेळेस चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकवला जातो.

भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

सप्तशृंग संस्थानच्या मुख्य कार्यालयापासून १० फूट लांब काठी आणि १२ मीटर केशरी कापडाचा कीर्तिध्वज असलेल्या ध्वजाची विधिवत पूजा करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर मानकरी असलेले एकनाथ गवळी पाटील व सदस्य कीर्तिध्वज घेऊन शिखराकडे रवाना झाले. सहा ते सात तासांनंतर शिखरावर पोहोचून त्यांनी मध्यरात्री कीर्तिध्वज फडकावला. सकाळी भाविकांना कीर्तिध्वजाचे दर्शन झाले. शुक्रवारी दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फोडणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरातील एफसीआय रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून २९ हजार रुपये चोरुन नेणाऱ्या व  सीडीआर तसेच एटीएमची तोडफोड करून बँकेचे जवळपास अकरा लाखांचे नुकसान करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने २४ तासात अटक केली आहे. २९ मार्च रोजी दुपारी चोरट्यानी  एटीएम व सीडीएम मशिन लोखंडी रोडचे साहाय्याने फोडून २९ हजार रुपये लंपास केले होते. पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने गुरुद्वारा परिसरातून हरप्रीतसिंग अठवाल (वय २८, रा. चिठी, पंजाब), हरमलसिंग तालीवाल, (वय २८, रा. बिलिचाव, पंजाब) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी काही दिवसांपासून नांदेड व मनमाड येथे गुरुद्वारामध्ये सेवा करण्याचे बहाण्याने वास्तव्यास होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवला तहसीलवर ‘हंडा मोर्चा’

0
0

सायगावच्या महिला प्रशासनापुढे आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, येवला 

तालुक्यातील दुष्काळी उत्तरपूर्व भागातील तहानलेली जनता हंडाभर पाण्यासाठी टाहो फोडत असतानाच त्यातीलच एक सायगावमधील महादेववाडीच्या महिलांनी शनिवारी (दि. ३१) रिकाम्या हंडयानिशी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला तहसीलवर धडक मारली. गेल्या अडीच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची मागणी करूनही पदरात केवळ निराशाच पडल्याने यावेळी सायगांवकर महिलांनी हे आंदोलनचे हत्यार उगारले. 

सायगावनजीकची जवळपास चारशे लोकसंख्या असलेल्या महादेववाडीतही पाण्याची समस्या आहे. वाडीवरील दोनही कुपनलिकांचा यंदाच्या कडक उन्हाळ्यात घसा कोरडाठाक झाला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी या महादेववाडीला स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. मात्र एकाच टँकरने इतक्या मोठ्या लोकवस्तीची कायमची तहान भागणार कशी? म्हणूनच या महादेववाडीतील संतप्त महिलांनी शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रथमतः सायगाव ग्रामपंचायतीवर आणि त्यानंतर तहसीलवर हंडा मोर्चा काढला. सायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मीना खुरसणे यांनीच या मोर्चाचे नेतृत्व केले. ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य सुनील देशमुख, दिनेश खैरनार यांना संतप्त महिलांनी जाब विचारल्यानंतर या सदस्यांनी ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या पाणीटँकर संदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाची प्रतच महिलांसमोर ठेवली. पुढे हे सदस्य संतप्त महिलांना घेऊन येवला येथे तहसील कार्यालयावर थडकले. तहसीलदारांच्या दालनाबाहेर बराच वेळ ठिय्या दिला. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांचे आल्यावर महिलांनी त्यांना अद्याप टँकर का सुरू झाला नाही, असा जाब विचारला. दोनच दिवसांपूर्वी महादेववाडीची पाहणी करण्यात आली असून, येत्या सोमवारपर्यंत महादेववाडीला पाणीटँकर सुरू होईल, असे यावेळी तहसीलदारांनी सांगितले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर परिसरातील मंदिरांबाहेर रांगा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम झाले. बहुतांश मंदिरांबाहेर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सातपूर भागातील गंगापूर, आनंदवली, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, राज्य कर्मचारी वसाहत, जाधव संकुल, विश्वासनगर, सावकरनगर, सातपूर कॉलनी, अंबड लिंकरोड, चुंचाळे शिवार, खुटवडनगर, जयप्रकाशनगर, सातपूर गाव, गणेशनगर, एमआयडीसी आदी भागात हनुमान जयंतीला भाविकांनी हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना भाविकांसह राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्लास्टिक बंदी असल्याने केळीच्या पानांवर भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा, याकरिता नीलय इंडस्ट्रीच्या वतीने खास व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांत ‘मार्चएण्ड फीवर’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस सलग सुटी आल्यामुळे शनिवारी शहरातील खासगी व सरकारी बँकांमध्ये 'मार्चएण्ड फीवर' दिसून आला. बहुतांश बँकांत खातेदारांची प्रचंड गर्दी झाली होती. काही बँकामध्ये मोठ्या रांगाही लागल्याचे दिसून आले.

आज, रविवारची सुटी असल्यामुळे पुन्हा बँक बंद राहणार असून, सोमवारी बँका सुरू राहणार असल्या, तरी ग्राहकांसाठी मात्र त्या बंद राहणार आहेत. या दिवशी आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करायचे असल्यामुळे त्याची धावपळ येथे असणार आहे. वर्षभराचा आर्थिक ताळेबंद करून बँकांचे ऑडिटही सुरू होणार आहे.

महावीर जयंती व गुड फ्रायडेनिमित्त बँकांना गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस सुटी होती. त्यामुळे दोन दिवस बँका बंद असल्यामुळे अनेकांचे व्यवहार ठप्प झाले. या सुटीमुळे मार्चअखेरचे काम करण्यावरही त्याचा परिणाम झाला. शनिवारी बँक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांची पैसे काढणे व डिपॉझीट करण्यासाठी गर्दी झाली होती. दुसरीकडे ३१ मार्चपर्यंतचे सर्व व्यवहार पूर्ण करण्याची व्यापाऱ्यांची लगबगही दिसत होती. दोन दिवस सुटी असल्यामुळे बँकेतील बहुतांश कर्मचारी मात्र आपले राहिलेले काम पूर्ण करीत होते. त्यामुळे मार्चअखेरच्या सलग सुटीचा आनंद बँक कर्मचाऱ्यांना घेता आला नाही.

बहुतांश एटीएम बंद

बँकांना सुटीमुळे सर्व ताण एटीएमवर पडल्यामुळे अनेक ठिकाणी 'नो कॅश'चे फलक दिसत होते. दुपारनंतर अनेक एटीएममध्ये कॅश शिल्लक नसल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी एटीएम नादुरुस्त असल्याचे सांगितले जात होते. पण, या सर्व एटीएमवर कॅश संपली होती व त्याचे फारसे नियोजन केले नसल्याचेही स्पष्ट झाले.

दोन दिवस पुन्हा अवघड

दोन दिवसांच्या सुटीनंततर एटीएम बंद पडले. पण, आता रविवारी, सोमवारीसुद्धा बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएमवर पुन्हा ताण पडणार आहे. त्यामुळे याचे नियोजन करणे गरजेचे आहे. हे नियोजन न केल्यास पुन्हा अनेकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

--

सरकारी कार्यालयांत लगबग

दोन दिवसाच्या सुटीनंतर सुरू झालेल्या सरकारी कार्यालयांत शनिवारी दिवसभर मार्चएण्डची लगबग सुरू होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे कामही बाजूला ठेवण्यात आले होते. आर्थिक वर्षातील सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी बैठका, चर्चा व आकडेमोड असे चित्रही सर्वत्र दिसत होते. दुसरीकडे व्यापारी, उद्योजकांची धावपळही दिसून आली. कर सल्लागार मात्र सगळीकडे आर्थिक ताळेबंद करण्यात व्यस्त होते. सर्वसामान्य माणूस घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभा होता. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्वच ठिकाणी हे काम केले जात होते. सरकारी कार्यालयांबरोबरच इन्शुरन्स कंपन्या आणि अन्य संस्थांतही आकडेमोड सुरू होती.

'टार्गेट पूर्ण'वर लक्ष!

अनेक सरकारी संस्थामध्ये वसुलीचे टार्गेट आर्थिक वर्षात दिले. ते बहुतांश जण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आता हे टार्गेटचे आकडेही एक-दोन दिवसांत पुढे येणार आहेत. त्यामुळे कोणत्या कार्यालयाची किती वसुली झाली हे समजणार आहे. महापालिका घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करते, तर वीज कंपनीही आपली थकबाकी वसूल करते. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा विविध करांची वसुली याच काळात करते. व्यापारी वर्षभरात केलेला खर्च व जमा झालेल्या रकमेवरून नफा-तोटा पत्रक काढतात. त्यातून वार्षिक वर्षाची उलाढाल समोर येते. प्राप्तिकर विभागाची रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे त्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती.

(लीड, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाक विधेयकास विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही' अशा आशयाचे फलक झळकावून 'तिहेरी तलाक'संदर्भातील विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने सहभागी होत महिलांनी एकजुटीचे दर्शन घडविले. मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांकडून मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

तिहेरी तलाक विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी शरियत बचाव कमिटीने मोर्चाची साद घातली होती. त्याला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने महिला या मूक मोर्चात सहभागी झाल्या. दुपारी अडीच वाजता जुन्या नाशिकमधील बडी दर्गाच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली़ दूध बाजार, खडकाळी, जिल्हा परिषद, त्र्यंबकनाकामार्गे मोर्चा गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाला. त्यानंतर 'शरियत बचाव' कमिटीतील फरहात आसिफ हरणेकर (महिला धर्मगुरू, मदरसा सरकारे कला), सायमा खानम (महिला धर्मगुरू, सुन्नी दावते इस्लामी), हुमेरा सय्यद (महिला धर्मगुरू, मदरसा कथडा), इनामदार नुसरत, देशमुख इरम फातेमा, अन्सारी मुनाफ, शेख नाझफातेमा, शेख कश्मिरा या महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले़ इस्लाम धर्मात महिला कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली इस्लामी कायद्यात सरकार ढवळाढवळ करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. 'इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही' अशा आशयाचे फलक झळकावून शरियतमध्ये कोणीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही देण्यात आला़

शिक्षेची तरतूद कशासाठी?

भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, प्रत्येक धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे़ 'तिहेरी तलाक'संदर्भात पूर्वीपासून कायदा अस्तित्वात असताना सरकारने नव्याने विधेयक सादर करण्याची गरज नाही, असे 'शरियत बचाव' समितीने निवेदनात म्हटले आहे. तलाक हा पूर्णत: वैवाहिक स्वरुपाची बाब असून, ती दिवाणी स्वरूपाची आहे. देशातील सर्वधर्मियांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही. मग नव्या विधेयकानुसार मुस्लिम धर्मियांना तलाकबाबत (घटस्फोट) शिक्षेची तरतूद कशासाठी, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला. यानंतर त्र्यंबकरोडवरील शहाजहांनी ईदगाह मैदानावर मुस्लीम महिला धर्मगुरूंची प्रवचन सभा झाली़ सायंकाळी पाच वाजता शहरे ए खतिब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रार्थनेने या मोर्चाचा समारोप झाला़

वाहतुकीची कोंडी

महिलांची प्रचंड गर्दी झाल्याने त्र्यंबक नाक्याकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरील वाहतूक सुमारे एक तास बंद करण्यात आली. परिणामी द्वारका सर्कल, मुंबईनाका, जुने सीबीएस, शालिमार, महात्मा गांधी रोड, चांडक सर्कल या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली. पायी चालणाऱ्या नागरिकांना मोर्चा मार्गातून येण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे पोलिस आणि पादचारी यांच्यातही वाद झाले.

चोख बंदोबस्त

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे ५५० अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर होते. त्यामध्ये पोलिस उपायुक्त - २, सहायक पोलिस आयुक्त - २, पोलिस निरीक्षक - १०, उपनिरीक्षक - ३२, पुरुष कर्मचारी - ३०२, महिला कर्मचारी - १७५, स्ट्रायकिंग फोर्स - २, निर्भया पथक - १, वाहतूक पोलिस - १७५ यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील भाजी विक्रेते हटविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रविवारी महापालिकेने स्वामी विवेकानंदनगर, लेखानगर व शिवाजी चौक भागात विनापरवानगी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. विक्रेत्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. पुन्हा अशा प्रकारे अनधिकृतपणे विक्रीसाठी न बसण्याच्या सूचना पालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत. 

सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर या भागातील अतिक्रमण काढल्यानंतर आता महानगरपालिकेने सिडकोत रस्त्यात ठिकठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. हॉकर्स झोनव्यतिरिक्‍त विक्री करण्यासाठी बसणाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले. या कारवाईत भाजीचे कॅरेट, हातगाड्या लोखंडी स्टॅण्ड यांसारखे साहित्य जप्त करण्यात आले. भाजी विक्रेत्यांचा भाजीपालाही जप्त करून तो निरीक्षण गृह व बालगृहात पाठविण्यात आला आहे. यावेळी भाजी विक्रेत्यांनी विरोध करण्याचा किंवा स्वतःहून काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकदा सूचना देऊनही सूचनेची अंमलबजावणी होत नसल्याने महानगरपालिकेने थेट साहित्यच जप्त केले. ही कारवाई विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. यावेळी डॉ. कुमावत यांनी सांगितले की, यापुढे अशा प्रकारे सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्रमण करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर व्यावसायिकांविरोधात कारवाई राबविण्यात येणार असून, वेळप्रसंगी पोलिस ठाण्यात गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images