Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आदर्श कोचचा वर्धापनदिन

$
0
0

जेलरोड : पंचवटी एक्सप्रेसमधील सी-३ आदर्श कोचचा अकरावा वर्धापना दिन रेल परिषदेतर्फे आज साजरा झाला. कोचमध्ये केक कापून तो प्रवाशांना वाटण्यात आला. या कोचची लिम्का बिक आफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मुख्य मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, विद्युत अभियंता एन. के. अग्रवाल, अजयकुमार दुबे, मुख्य वाणिज्य

निरीक्षक जीवन चौधरी, स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, रेल्वे सुरक्षा बलचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, रेल परिषदचे अध्यक्ष बिपीन गांधी, उपाध्यक्ष

व्ही. जे. आर्य, गुरुमितसिंग रावल, पी. के. घुगे, सागर कासार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयएमए’चा संप; ‘निमा’ मैदानात

$
0
0

रुग्णांच्या सोयीसाठी दोन एप्रिलपासून देणार पूर्णवेळ सेवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेडिकल कमिशन बिल अर्थात 'एनएमसी'विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमए) २ एप्रिलपासून बेमुदत देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. यामुळे रुग्णाची हाल होण्याची शक्यता असून, रुग्णांना दिलासा देण्यासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) मैदानात उतरली आहे. सर्वच बीएचएमएस, युनानी तसेच आयुर्वेदिक डॉक्टर अधिक वेळ २ एप्रिलपासून सेवा पुरविणार आहेत.

आयुष डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनच्या वापराचा अधिकार प्रस्तावित बिलात दिला आहे. याबाबत नाशिक 'निमा'चे अध्यक्ष डॉ. राहुल पगार यांनी सांगितले की, देशात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा फक्त आयुष डॉक्टरांमुळे सक्षम आहे. आज राज्यात १०८ ची सेवा १०० टक्के फक्त आयुर्वेद व युनानी पदवीधारकांमुळे सक्षमपणे समाजापर्यंत पोचवली जाते. तळागाळात, दुर्गम आदिवासी भागात हेच पदवीधर वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. शासकीय सेवेत सुद्धा सर्व वैद्यकीय पदवीधर सेवा देत आहेत. त्यासाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने कायदा दुरुस्ती करून तसे अधिकारही प्रदान केले आहेत. असे असताना समाज हिताचा विचार न करता 'आयएमए'ने आयुष डॉक्टरांना मॉर्डन मेडिसिनचा वापर करण्यास विरोध करणे किती योग्य आहे याचे त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. पगार यांनी व्यक्त केले.

'आयएमए'च्या संपाला 'निमा'च्या केंद्रीय शाखेने विरोध केला असून, सर्व आयुष डॉक्टरांना विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत निरंतर आरोग्य सेवा सुरू ठेवून समाजाची पिळवणूक करणाऱ्या संघटनेला विरोध दर्शविणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यातील निमा महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी, प्रचार तसेच प्रसिध्दी प्रमुख डॉ. अनिल निकम, नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार, माजी अध्यक्ष डॉ. भूषण वाणी, सेक्रेटरी डॉ. ललित जाधव, खजिनदार डॉ. तुषार निकम, संघटक डॉ. व्यंकटेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व संघटनांना आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याते आवाहन केले आहे. पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे, सातपूर अंबड मेडिकलचे अध्यक्ष डॉ.अमोल वाजे, 'एफपीए'चे अध्यक्ष डॉ. कांबळे, इतर संघटनांनी सदर संपास विरोध दर्शविला आहे. त्यांनी ही सर्व आयुष डॉक्टरांना शिबिरांमार्फत तसेच अधिक काळ सेवा देऊन समाजाला आरोग्य सेवा पुरविण्याचे आवाहन केले आहे.

आयुष डॉक्टरांमुळे अल्पदरात सेवा

ग्रामीण तसेच आदिवासी भागात किती एमबीबीएस डॉक्टर वैद्यकीय सेवा देतात? अल्पदरात आयुष डॉक्टर समाजाला वैद्यकीय सेवा देतो. ही सेवा जर बंद झाली तर समाजाची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होईल. या पिळवणुकीला जबाबदार कोण असणार, असा प्रश्न निमा'ने उपस्थित केला आहे.

सुरक्षित आणि किफायतशीर वैद्यकीय सेवेसाठी निमा सदैव काम करते. गरजू व्यक्तींना वैद्यकीय सेवा पुरविणे आमची जबाबदारी असून, २ एप्रिलपासून 'निमा'चे सर्वच सदस्य अतिरिक्त काम करून गरजुंना मदत करतील.

- डॉ. राहुल पगार, अध्यक्ष, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘युवा संवाद’

$
0
0

मालेगावी शुक्रवारी पोलिस दलातर्फे अभियान

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 'महाराष्ट्र पोलिस युवा संसद अभियान' सुरू करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी येथील आयएमए हॉलमध्ये  या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २४ शाळांचे विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. समाजातील ज्वलंत  विषयांवर विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार  आहेत. या विचार मंथनातून सूचना व उपाय सुचविले जाणार असल्याची  माहिती अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

राज्यात अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय असून, बाल गुन्हेगारी वाढीची कारणे शोधतांना त्याचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात आले. थेट पोलिसांचा मुलांशी संवाद होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण घटून सुमारे १५ लाख शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चोबे, जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर या पाच जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे.

परिक्षेत्रीय स्पर्धा एप्रिलमध्ये

या अभियानात विद्यार्थी भ्रष्टाचार, जातीयवाद, विद्यार्थी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, दहशतवाद, आतंकवाद, महिला अत्याचार, नक्षलवाद आदी विषयांवर विद्यार्थी भाष्य करून चर्चा करतील. विद्यार्थ्यांच्या विचारातून व्यक्त होणाऱ्या सूचना तसेच उपाययोजनांची योग्य दखल घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पहिले तीन संघ परिक्षेत्रस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातील. परिक्षेत्रीय स्पर्धा नाशिक येथे १५ एप्रिलला होईल. यातून विजेता संघ निवडला जाणार असल्याचे पोद्दार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेतील आठ मुलींना विषबाधा

$
0
0

त्र्यंबक तालुक्यातील देवगाव येथील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील सर्वात जुन्या देवगाव  येथील शासकीय आश्रमशाळेतील आठ  मुलींना मंगळवारी रात्री विषबाधा झाली. या घटनेमागचे निश्चित कारण  अद्याप समजलेले नाही. सर्व मुलींवर वैतरणानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर पालघर जिल्ह्यातील खोडाळा येथे व बुधवारी सकाळी नाशिक जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री या मुलींना त्रास जाणवू लागला तेव्हा देवगाव आश्रमशाळेतील एकही कर्मचारी, शिक्षक मुख्यालयात नव्हते. या गंभीर घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी समजताच त्यांनी देवागाव येथे धाव घेतली. त्यांनी त्वरित सर्व मुलींना वैतरणानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.  या  आरोग्य केंद्रात एकही  वैद्यकीय अधिकारी नसल्याने मुलींना योग्य उपचार मिळण्यास अडचण निर्माण झाली. 

विषबाधा झालेल्या इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या साक्षी अस्वले, ज्योती वारे,  नंदिनी जाखेरे, चिऊ सराई, शकुंतला गोहिरे,  मंजुळा हंबीर, निर्मला पारधी, कमल गोहिरे  या मुलींचा समावेश आहे. वैतरणानगर येथे या मुलींना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना पालघर जिह्यातील खोडाळा येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 आश्रमशाळेची सुरक्षितता वाऱ्यावर 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथे आदिवासी मुलींसाठी असलेल्या निवासीआश्रम शाळेत ५१४ मुली शिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा, आरोग्याचा प्रश्न या आधीही चर्चेत आला आहे. आश्रम शाळेत शिक्षक मुक्कामी राहात नसल्यामळे पालकांमध्ये सतत भीती असते.

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वैतरणा आरोग्य केंद्रात मुलींना दाखल केले असता एकही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबत आदिवासी उपायुक्त यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. मनमानी कामकाज करणाऱ्या शिक्षकांचेही निलंबन करायला हवे.-भगवान मधे, सरचिटणीस, श्रमजीवी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीमुळे ‘महावितरण’ला ताप

$
0
0

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे करोडो रुपये थकले 

म. टा. वृत्तसेवा, येवला 

       मार्चअखेरमुळे महावितरण कंपनीच्या सादेला प्रतिसाद देत एकीकडे सर्वसामान्य वीजग्राहक आपल्याकडील वीजबिलांचा अगदी इमाने इतबारे भरणा करीत असताना, दुसरीकडे मात्र शासकीय, निमशासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वीजबिलांपोटी करोडो रुपये थकले आहेत. येवला तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये देखील यास अपवाद नसून, सातत्याने मागणी करूनही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली थकबाकी भरण्याबाबत या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची उदासिनता दिसत आहे.

मार्चअखेरमुळे गेल्या महिनाभरात महावितरणचे अधिकारी अन् कर्मचारी थकीत वीजबिले वसुलीसाठी एकीकडे रात्रंदिवस परिश्रम करीत असताना या मोहिमेत अडचण ठरली आहे. ती तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडील मोठी वीजबिल थकबाकी या वीजबिले वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून थकबाकीदार शासकीय कार्यालये व संस्थांचे उंबरठे झिजवूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला जात नसल्याने महावितरण समोरील डोकेदुखी कमी होताना दिसत नाही.

यांच्याकडे थकले हजारो

येवला शासकीय विश्रामगृह ५३ हजार

तहसील कार्यालय १६६५०

बीफ मार्केट ३६२०

आरोग्य अधिकारी कार्यालय २१७०

बीडीओ कार्यालय ३०७०

एमआरईजीएस कार्यालय ३२९०

जिल्हा परिषद कार्यालय १५००

महात्मा फुले नाट्यगृह १४३२०

शहर पोलिस स्टेशन ६२ हजार

तालुका पोलिस स्टेशन १६ हजार

पथदिपांचे थकले तब्बल सव्वाचार कोटी 

 नगरपालिकेच्या येवला शहरातील पथदिपांसह जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील गावोगावच्या गावकुसातील पथदिपांचे तब्बल ४ कोटी २१ लाख रुपये वीजबिल थकले आहे. येवला नगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात बसविलेल्या पथदिपांचे जवळपास ३३ लाख रुपये थकलेले असून, महावितरणने याबाबत वारंवार पत्रव्यवहार, नोटीस देवूनही पालिकेने गांभीर्याने घेतले नाही. तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतीच्या गावहद्दीत बसविण्यात आलेल्या पथदिपांच्या वीजबिलाचा गेल्या काही वर्षभरात भरणाच न झाल्याने या पथदिपांची थकबाकी तब्बल ३ कोटी ८८ लाखांवर गेली आहे.

विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित 

येवला तालुक्यात महावितरण कंपनीने सुरू केलेल्या थकीत वीजबिले वसुलीचा पहिला दणका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येवला शहरातील शासकीय विश्रामगृहाला बसला आहे. गेल्या जानेवारीपासून ते आजवर असलेले याठिकाणचे ५३ हजारांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने अदयापही अदा न केल्याने महावितरणने बुधवारी (दि. २८) शासकीय विश्रामगृहाच्या वीज कनेक्शनवर 'पकड' चालवली. परिणामी, याठिकाणचा वीजपुरवठा खंडित होताना शासकीय विश्रामगृह काळोखाच्या साम्राज्यात गेल्याचे चित्र समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्कींग जाहीर झाले, कोणी नाही पाहिले!

$
0
0

मटा सीरिज : उदासीनतेचा भुर्दंड १

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

वाढती वाहनसंख्या आणि कमी पडणारे रस्ते यामुळे शहराच्या मुख्य भागात वाहतुकीची पुरती दैना उडते. पोलिस प्रशासनाने गेल्या काही वर्षांत नियोजन करताना तब्बल १४५ पार्किंग व नो पार्किंगची ठिकाणे घोषित केली; पण या ठिकाणांना महापालिकेने कधीही गांभीर्याने घेतले नाही. आज साइनबोर्ड नसलेल्या ठिकाणाहून वाहन उचलले, की सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसते. महापालिकेची ही उदासीनताच भुर्दंडास कारणीभूत ठरत आहे. त्यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून.

नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ आणि त्या जवळ नव्याने विकसित झालेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची सतत वर्दळ असते. शहरातील नव्हे, तर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील ग्राहक खरेदी-विक्रीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. दुर्दैवाने रस्त्यावर पडणारा वाहनांचा भार हलका करताना ठोस नियोजन हाती घेण्यात आले नाही. पोलिस, तसेच महापालिकेने पार्किंग किंवा नो पार्किंगची ठिकाणे टप्प्याटप्प्याने घोषित केली. एकदा अधिसूचना जाहीर झाली, की वाहतूक पोलिस आपल्या सोयीनुसार या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचतात. मागील दोन वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती कायम होती. मात्र, टोइंग व्हॅनची कारवाई सुरू होताच पार्किंग, तसेच नो पार्किंग, सम-विषम तारखांच्या पार्किंगची ठिकाणे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. आज, एमजी रोड, सिटी सेंटर मॉलसमोरील रस्ता, तसेच अन्य एखादे ठिकाण सोडून नो पार्किंगची ठिकाणे कुठे आहेत, हे ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही. दुसरीकडे पार्किंगच्या ठिकाणांचा पुरता बट्ट्याबोळ असून, जाहीर केलेल्या ठिकाणी बोर्ड लागणार नाही, याची काळजी घेतली जाते. पार्किंगसाठी आवश्यक असलेले पिवळे पट्टे शोधूनही सापडत नाहीत. एखादा व्यावसायिक अशी फुकटची जागा बळकावून तिचा वापर आपल्याच ग्राहकांसाठी करतो. पोलिसांनी घोषित केलेली बहुतांश नो पार्किंगची ठिकाणे अत्यंत अरुंद रस्त्यावर असून, तेथील वाहने हटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. परिणामी, कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरतच नाही.

--

पोलिस प्रशासन जनतेच्या तक्रारी, तसेच वाहतुकीचे नियोजन या आधारे नो पार्किंग क्षेत्र घोषित करीत असते. तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात येतात. ही प्रक्रिया सतत सुरू असते. पार्किंगच्या ठिकाणी फलक लावणे किंवा त्या अनुषंगाने पट्टे मारण्याचे काम पोलिसांचे नाही. याबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातो.

- अजय देवरे, सहायक पोलिस आयुक्त

क्रमश:

ही आहेत नो पार्किंगची ठिकाणे

टिळकवाडीतील गुप्ता मार्ग पवन व्हिला ते गुप्तावाडीपर्यंत

जिल्हा कोर्टाची संरक्षक भिंत ते सीबीएस सीबीएस ते पोलिस मुख्यालयाचे मेनगेट

भद्रकालीतील फाळके रोडवरील फुले मार्केटचे दक्षिण गेड ते महाराष्ट्र स्टील ट्रेडरचे दुकान

सीबीएस सिग्नल ते डॉ. आंबेडकर पुतळा, तसेच शिवाजी गार्डनच्या कंपाउंडलगत

रविवार कारंजा ते हिरालाल लेन कॉर्नर (पेठे हायस्कूलसमोरील बाजू)

गडकरी सिग्नल ते सारडा सर्कल या दरम्यान रणदिवे मोटार ड्रायव्हिंग स्कूल ते मधुमालती मार्केट सारडा सर्कलपर्यंतची दक्षिणेकडील बाजू

सीबीएस ते शालिमार, सीबीएस ते मेहेर सिग्नल, सीबीएस ते राजीव गांधी भवन, सीबीएस ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर स्कूल व एसटी बस वगळता सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी

कॅनडा कॉर्नर ते टेलिफोन एक्स्चेंज पुढे करवा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या वळणापर्यंत रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस

कुलकर्णी गार्डनच्या उत्तरेकडील कंपाउंडलगत, तसेच पश्चिमेकडील शरणपूर रस्ता ते श्रद्धा हॉस्पिटल

सराफ बाजार चौकातील आडगावकर ज्वेलर्स ते टकले बंधू ज्वेलर्स, पुढे शुभअलंकार ज्वेलर्स ते समतीलाल चुनीलाल सराफ दुकान असा पूर्ण सराफ बाजार चौक

रविवार कारंजा ते अहिल्यादेवी होळकर पुलादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस, तसेच दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर

पेठे हायस्कूल ते रामवाडी पूल या रस्त्यावर दोन्ही बाजूंना

अशोकस्तंभ ते रामवाडी पूल दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर

त्र्यंबक नाका सिग्नल ते किटकॅट चौफुली या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर

अहिल्याबाई होळकर पूल ते सांगली बँक सिग्नल या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी

त्र्यंबक नाका ते सीबीएस सिग्नल या दरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी

कॉलेजरोडवरील पाटील लेन एक ते तीन या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी

कॅनडा कॉर्नर सिग्नलच्या चारही बाजूंनी १०० मीटरच्या आत दोन्ही बाजूंनी

मालेगाव स्टँड सिग्नल ते मखमलाबाद नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर, पंचवटी कारंजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच रविवार कारंजाकडे जणाऱ्या रस्त्याच्या फक्त डाव्या बाजूस १०० मीटरच्या आत

महात्नानगररोडवरील आयडिया शोरूमच्या डाव्या बाजूलगत १०० फूट अंतरावर, तसेच युनायटेड अॅव्हिन्यू ते श्रीविहार रो हाऊसच्या गेटपर्यंत

राका गार्डनच्या पश्चिम बाजूकडील कंपाउंड ते दक्षिण बाजू कॉर्नर कंपाउंडलगत, तसेच राका नर्सरी ते शीतल बंगल्यापर्यंत

भद्रकाली टॅक्सी स्टँड ते बादशाही कॉर्नर रस्त्याच्या दोन्ही बाजूस

धुमाळ पॉइंट ते दहीपुलापर्यंत दोन्ही बाजूस

दहीपूल चौक ते सरकारवाडा सराफ बाजारपर्यंत

सांगली बँक सिग्नलपासून धुमाळ पॉइंट रस्त्याच्या दोन्ही बाजूस

सांगली बँक सिग्नलपासून सुयोजित रतन मॉल, राजेबहाद्दर लेन कॉर्नर रस्त्यावर पश्चिम बाजूस

पसा नाट्यगृह ते सांगली बँक कॉर्नर या रस्त्याच्या पश्चिम बाजूस

शालिमार येथील सुमंगल रेडिमेड दुकान ते दिलखूश दुकानापर्यंत डाव्या बाजूला

नेहरू गार्डन मागील टिळकपथ रोडवरील व्हिडीओ हॉल कॉर्नरपर्यंत

श्रीकृष्ण बिल्डिंग ते शालिमार प्लाझा बिल्डिंगपर्यंतच्या रोडच्या उजव्या बाजूस

शालिमार प्लाझा ते कैलास एजन्सीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस

महामार्ग बस स्थानकासमोर मानवता क्युरी कॅन्सर हॉस्पिटल ते जगदीश मोटार गॅरेजपर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस

हॉटेल संदीप ते चांडक सर्कल या रस्त्यावर हॉटेल संदीप ते प्रेसिडेंट हाइट व महापालिका गार्डन ते जगोटा आर्केड या रस्त्याच्या दोन्ही बाजूस

शरणपूररोड टिळकवाडी सिग्नल ते बिर्ला हॉस्पिटल ते सुयोजित मॉडर्न टॉवरपर्यंत दोन्ही बाजूस

शरणपूररोडवरील हॉटेल पतंग ते विराज कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नरपर्यंत दोन्ही बाजूस

पेठनाका सिग्नलच्या चारही बाजूंना रस्त्याच्या १०० मीटरपर्यंत

निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या आर्केड ते देना बँक या पूर्व पश्चिम रस्त्यावर

निमाणी मंगल कार्यालय ते निमाणी बसस्थानक

दिंडोरी नाका रूपश्री कार्यालय ते निमाणी मंगल कार्यालयपर्यंत दक्षिण, उत्तर रस्त्यावर

दिंडोरी नाका तुळशीदास मजेठिया वखार ते प्रभात प्लाउड दुकानापर्यंत दक्षिण- उत्तर बाजूस

शरणपूर रोडवरील (कै.) शांताराम बापू चौक (टिळकवाडी सिग्नल) ते राकानर्सरी दोन्ही बाजूस

द्वारका सर्कल चौकातून येणाऱ्या मुंबई आग्रा रोडवर दोन्ही बाजूस

द्वारका सर्कल चौकातून येणारा व जाणाऱ्या नाशिक-पुणे रोडवरील दोन्ही बाजूंना

द्वारका सर्कलकडून शालिमारकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंना

सारडा सर्कलकडून द्वारका सर्कलकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंना

द्वारका सर्कल चौकातून जाणाऱ्या मुंबई आग्रा हायवेलगत असलेल्या दोन्ही सर्व्हिस रोडच्या बाजूंना

द्वारका सर्कलकडून महात्मा फुले पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना

त्र्यंबक रोडवरील एबीबी सिग्नलपासून पुढे विश्वतारा अपार्टमेंटपासून महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या संरक्षक भिंतीचे टोक ते हॉटेल पंचवटी इलाइटपर्यंत

दिव्या अॅडलॅबच्या तिन्ही बाजूंना २०० मीटरपर्यंत

पवननगर भाजी मार्केटचा पश्चिम व दक्षिण भागात २०० मीटरपर्यंत

घोरपडे पेट्रोलपंप ते त्रिमूर्ती चौक आणि पुढे दिव्या अॅडलॅबपर्यंतच्या भाजीबाजारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना

गरवारे चौक ते सेवा अॅटोमोबाईल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंत

संतोष हॉटेल, पाथर्डी फाटा कॉर्नर या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक २०० मीटरपर्यंत

सातपूर गाव भाजीबाजार ते टाऊन पोलिस चौकीसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅक्सिस’ला सात लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहन खरेदीच्या नावाखाली अॅक्सिस बॅँकेकडून कर्ज मंजूर करून वाहन खरेदी न करता परस्पर सात लाख रुपयांची रोकड हडप केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी कर्जदाराविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक अरुण उगले (वय २२, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) याने जून २०१६ मध्ये बँकेकडे वाहन खरेदी करण्यासाठी कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी त्याने कांचन मोटर्स या वितरकाचे कोटेशन, तसेच कागदपत्रांसह जामीनदारांचीही पूर्तता केली होती. त्यानुसार बँकेने ६ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून त्यास कार खरेदीसाठी पे ऑर्डर दिली होती. या पे ऑर्डरचा गैरवापर करून संशयिताने कार खरेदी न करता अंबड शाखेत कांचन मोटर्स नावाने बनावट खाते उघडून स्वत:च प्रोपरायटर असल्याचे भासवून सदरची रक्कम परस्पर काढून घेत बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेच्या अंबड शाखेचे व्यवस्थापक शेखर कानडे (रा .जुने नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. उपनिरीक्षक घुगे तपास करीत आहेत.

वाळूचोरी करताना अटक

म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील एका नाल्यात गौणखनिजाची चोरी करणाऱ्या छोटा हत्ती वाहनचालकाविरुद्ध म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता संशयित आपल्या वाहनात वाळू भरताना आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तू एकनाथ ठाकरे (रा. हिरावाडी, पंचवटी) हा एका नाल्यात असलेली वाळू छोटा हत्ती (एमएच १५, सीके ८६२०) या वाहनात भरताना आढळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली. पोलिस बुधवारी दुपारी म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवर गस्त घालीत असताना ही घटना उघडकीस आली. हवालदार जाधव तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

ढिकलेनगर भागात राहणाऱ्या विनोद डॅनियल पवार (वय २४, रा. ढिकलेनगर, पंचवटी) या तरुणाने राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पंचवटी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद पवार याने बुधवारी रात्री आपल्या घराजवळ अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात येताच त्यास कुटुंबीयांनी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. हवालदार थेटे तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगल्याने एकास अटक

गंगाघाटावरील रामसेतू परिसरात छापा टाकून पोलिसांनी लक्ष्मण ऊर्फ काळू पांडुरंग जाधव (वय ३३, रा. गजानन चौक, पंचवटी) याला पिस्तूल बाळगल्याबद्दल अटक केली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली असून, संशयिताकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा साडेतीस हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट एकचे शिपाई स्वप्निल जुंद्रे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सायंकाळी रामसेतूखाली थांबलेल्या एका तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती जुंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या सापळ्यात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयिताच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज मिळून आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पी. पी. मुंढे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाप्रमुखपद बदल लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेनेत निर्माण झालेल्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह नगरसेवक सुधारक बडगुजर यांनी गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नाशिकच्या सध्याच्या डॅमेज कंट्रोलवर चर्चा झाली. परंतु, सध्या सुरू असलेल्या वादावरून जिल्हा प्रमुखपदाचा फेरबदल पक्षश्रेष्ठींनी तूर्तास लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. पांडे यांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी, या दौऱ्यातून दोन महानगरप्रमुख दूर राहिल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच शिवसेनेत उमेदवारीवरून बंडाळी उफाळून आली आहे. शिवसेनेकडून इच्छुक असलेले अॅड. शिवाजी सहाणे यांना टाळून नरेंद्र दराडेंना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू असतानाच, सेनेकडून अॅड. सहाणेंची हकालपट्टी केल्यानंतर सेनेतील गटबाजीला ऊत आला आहे. निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांसाठी शिवसेना नेत्यांचा सुरू असलेला आटापिटा पाहून शिवसेनेतील खदखद वाढत चालली आहे. महानगरप्रमुख पदावरील खांदेपालटानंतर शिवसेनेत आलेली एकी सहाणेंच्या हकापट्टीनंतर लगेच भंग पावली आहे. शिवसेनेतील निष्ठावान गटाचा नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीला विरोध आहे. दराडेंच्या उमेदवारीवरूनच महानगरप्रमुख पदाचा खांदेपालट झाला होता. पाठोपाठ जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचेही पद काढून तेथे मर्जीतलाच जिल्हाप्रमुख देण्याची तयारी राऊत गटाकडून सुरू होती. परंतु, सहाणेंच्या हकालपट्टीनेच सेनेत वादळ निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम बुधवारी दोन्ही महानगरप्रमुखांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत दिसून आला. या बैठकीला ३७ पैकी जेमतेम ७ ते ८ नगरसेवकांनी हजेरी लावल्याने बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती.

शिवसेनेतल्या या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर विनायक पांडें यांच्या पुत्राच्या विवाहाच्या आमंत्रणाचे औचित्य साधत, गायकवाड, पांडे, बडगुजर यांनी गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी सिनेटवरील विजयामुळे आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देण्याची संधीही या पदाधिकाऱ्यांनी साधली. राऊत गटाकडून सध्याच्या परिस्थितीबाबत ठाकरेंना अवगत करण्यात येऊन यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कारवायांचा पाढा वाचण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय, जिल्हाप्रमुख बदलावरही चर्चा झाली. परंतु, ठाकरेंनी आपल्याकडे इच्छुकांची नावे असल्याचे सांगत, जिल्हाप्रमुख बदलाचा विषय टाळला. महानगरप्रमख पदापाठोपाठ जिल्हाप्रमुख बदल केला जाणार होता. परंतु, सध्या निर्माण झालेली गटबाजी आणि वादावादीच्या पार्श्वभूमीवर हा बदल टाळण्यात आल्याची चर्चा आहे.

महानगरप्रमुख दूरच

दरम्यान पांडे यांच्या पुत्राच्या विवाहाचे आमंत्रणानिमित्त मातोश्रीवर पोहचलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत नव्याने नियुक्त झालेले महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवेंनी अंतर राखले. पक्षात बडगुजर आणि पांडे यांची सक्रीय भूमिका वाढल्याने काही नगरसेवकांसह पदाधिकारीही नाराज झाले आहेत. मराठे आणि बडवे यांच्या माध्यमातून पांडे आणि बडगुजरच पक्ष चालवत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे मराठे आणि बडवेंनी या दौऱ्यात अंतर राखल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जप्तीची मात्रा वर्मी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बड्या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्याची मात्रा लागू पडली आहे. जप्तीच्या पालिकेत थकबाकीचा भरणा सुरू केला आहे. काँग्रेस, सावाना, नाशिकरोड स्थित आयसीआयसीआय बँकेसह वाणी हाऊसची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी सावाना, वाणीहाऊस आणि आयसीआयसीआय बँकेने पालिकेची थकबाकी अखेर जमा केली आहे. तर काँग्रेसने वर्गणीसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेडून अवधी मागून घेतला आहे.

महापालिकेने वारंवार जप्तीच्या नोटिसा देऊनही मालमत्ता कर, पाणीपट्टी कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कारवाईचा फास आवळला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावला आहे. मोठे थकबाकीदार असलेल्या शहरातील ३९४ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांमध्ये काँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालय, आयमा कार्यालय, सिडको डाकघर, जिल्हा सहकार भवन, हॉटेल वूडलॅँड, नाशिकरोड आयसीआयसीआय बॅँक, माथाडी कामगार मंडळ

य संस्थांचाही समावेश आहे. या सर्व संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. २१ दिवसांत थकबाकी भरणा केला नाही, तर थेट या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या अनपेक्षित कारवाईने भांबावलेल्या संस्थांनी थकबाकी भरण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. सावानाने आपल्याकडे असलेल्या १२ लाखांच्या थकबाकीचा चेक महापालिकेकडे जमा केला आहे. तर वाणी हाऊस चालकांनेही १२ लाखांची थकबाकी पालिककडे सुपूर्द केली आहे. नाशिकरोड स्थित आयसीआयसीआय बँकेनेही १२ लाखांचा चेक घरपट्टी विभागाकडे सुपूर्द केला आहे. अन्य बड्या संस्थांनाही घरपट्टीचा भरणा करण्याची तयारी दर्शवली असून पालिकेकडून त्यासाठी वेळ मागून घेण्यात आली आहे.

काँग्रेसला वर्गणीचा हात

काँग्रेसकडे असलेल्या २६ लाखांच्या थकबाकीसाठी महापालिकेने काँग्रेस भवन जप्त केल्याच्या कारवाईचा धसका काँग्रेसने घेतला आहे. महापालिकेने बजावलेल्या जप्ती नोटीस बजावल्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर वरिष्ठांनीच पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारीच आता वर्गणीतून हा निधी जमा करणार असून, त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या निधीसाठी आवाहन केले जाणार आहे. त्यामुळे वर्गणीतून काँग्रेस भवनाची थकबाकी भरण्याचे प्रयत्न सुरू असून महापालिकेडून थकबाकी भरण्यासाठी अवधी मागून घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया ‘आयपीएस’च्या आवळल्या मुसक्या

$
0
0

……म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एका व्यक्तीने आपल्या वडिलांचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, तो त्यात अपयशी ठरला. आयपीएसच्या परीक्षेत अपयश आल्याने त्याने बनावट कागदपत्रे तयार केली व आयपीएस असल्याचे भासवून नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून, सध्या तो सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात आहे.

अमित अंबिका सिंग असे या संशयित भामट्याचे नाव आहे. २५ वर्षांचा असलेला अमित मुंबईच्या मुलुंड येथील पत्रा चाळ येथे राहत असून, त्याच्याविरोधात सरकारवाडा, तसेच मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी जगप्रसाद रामदिन मौर्या (रा. ग्रँटरोड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. एका टॅक्सी सेवेत काम करणाऱ्या मौर्या यांची टॅक्सी संशयित सिंगने १६ मार्च रोजी बुक केली होती. आपल्याला नाशिक येथे जायचे असल्याचे त्याने सांगितले. यावेळी एक व्यक्तीही त्याच्यासोबत होती. नाशिकमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन ते तीन दिवस मुक्काम केल्यानंतर एक कोटी रुपये आणण्यासाठी आपल्याला शिर्डी येथे जायचे असल्याचे सिंगने सांगितले. त्यानुसार तिघे शिर्डी येथे पोहोचले. दोन ते तीन दिवसांनी हॉटेलमध्ये चेक आउट न करता सिंग सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे मौर्या यांना संशय आला. पण, सतत फोनवर इंग्लिश बोलणे अन् कमरेला खोटे बंदूक असलेला सिंग आपली ओळख लपवून ठेवण्यात यशस्वी ठरला. शिर्डी येथून एक बंद खोके आणून सिंगने कारमध्ये ठेवले. त्यात एक कोट रुपये असून, मॅडम येऊन घेऊन जातील, असे त्याने सांगितले. समोरील पार्टीला २० हजार रुपये द्यायचे असून, खोके फोडता येणार नाही, असे म्हणत त्याने मौर्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी खिशातील १० हजार रुपयांची रोकड सिंगला दिली. नाशिकला गेल्यानंतर भाड्याचे सर्व पैसे, तसेच हे १० हजार रुपये देण्याचे आश्वासन सिंगने दिले. परत आल्यानंतर हे तिघे वकीलवाडीतील दुसऱ्याच हॉटेलमध्ये पोहोचले. त्यामुळे मौर्य यांना संशय आला. त्याने सिंगबरोबर असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली. त्यावेळी आपणही टॅक्सी ड्रायव्हर असून, आपल्याला लाखो रुपयांचे भाडे घ्यायचे असल्याचे त्याने सांगितले. १६ ते २९ मार्च या कालावधीतील मौर्या यांना भाड्याचे एक लाख ७२ हजार रुपये, तसेच १० हजारांची हातउसनी रोकड सिंगकडून घ्यायची असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे या दोघांच्या लक्षात आले. या दोघांनी एकत्र येऊन पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सध्या संशयित सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात आहे.

राजनाथसिंहांच्या खोट्या सहीचे पत्र

या संशयिताकडून अनेक बनावट कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून, त्यात केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांच्या बनावट सहीचे पत्र मिळून आले आहे. मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलचे ४० हजार रुपयांचे बिल चुकते न करता ही व्यक्ती पळून जाण्याच्या तयारीत होती. या प्रकरणीदेखील त्याच्यावर मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चअखेरमुळे सुटीलाही कोशागारांचे काम सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चअखेर आल्याने यंदा लागून आलेल्या सुट्यांचा आनंद बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांना घेता आलेला नाही. गुरुवारी महावीर जयंतीची सुटी असल्याने सरकारी कार्यालयांमध्ये इतरत्र शुकशुकाट असला, तरीही लेखा कोशागार व उपकोशागार कार्यालये सुरूच होती.

गुरुवारच्या महावीर जयंतीच्या सुटीस लागूनच आज गुड फ्रायडे आला आहे. आजचा दिवसही शासकीय सुटीचा आहे. पण, आज मार्चअखेर असल्याने वित्त विभागाच्या सूचनेनुसार लेखा कोशागार आणि उपकोशागार कार्यालये सुरूच राहणार आहेत. मार्चअखेरीस सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी ३१ मार्चअखेर कोशागार, उपकोशागार कार्यालयांमध्ये देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असते. त्यामुळे या कालावधीत देयकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढते. परिणामी संबंधित यंत्रणेवर येणारा संभाव्य ताण लक्षात घेता शासकीय सुटीच्या दिवशीही कोशागार कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेच चित्र त्रुवारी महावीर जयंतीच्या शासकीय सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालयांच्या आवारात दिसून आले.

(फोटो सतीश काळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली रेल्वे स्टेशन जपणार ऐतिहासिक वारसा

$
0
0

\B​प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प​ 

 मध्य रेल्वेच्या मार्गावरील लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या देवळाली रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचा अनोखा प्रयोग ​करण्यात  येणार आहे.   या कामासाठी  हँड फाउंडेशन आपली चित्र काढण्याची परंपरा मोडीत काढून स्कल्प्चर, कार्विंगच्या  माध्यमातून देशातील पहिला प्रयोग येथे करणार आहे. त्याद्वारे देवळाली रेल्वे स्टेशनचा ऐतिहासिक वारसा जपण्यास मदत होणार आहे.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी लष्कराच्या साहित्याची ने-आण व आपल्या अधिकाऱ्यांना ये-जा करण्याची विशेष सोय असावी, या उद्देशाने या स्थानकाची निर्मिती केली. या ठिकाणी असलेली  रेल्वे स्थानकाची वास्तू ही आपले ब्रिटिशकालीन वैभव टिकवून आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांखेरीज इतर प्रवासीवर्ग कमी असून,  येथे येणारा प्रवासीवर्ग देशाच्या विविध भागातील असल्याने किमान या स्थानकाचे महत्त्व वाढावे या उद्देशाने दोन टप्प्यांत भुसावळ विभागामार्फत या स्थानकाचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्य्यात  प्रवाशांच्या दृष्टीने असणाऱ्या स्वच्छता व मूलभूत  सुविधा मध्य रेल्वेकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात या स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, काही कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. यात लष्कराच्या स्कूल ऑफ आर्टिलरीचे सहकार्य लाभणार आहे. ​त्यासाठी नुकतेच येथे भुसावळ मंडलातील​ विभागीय रेल्वे प्रबंधक आर. के. यादव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. 

 असे होणार सुशोभीकरण

 नाशिक येथील स्वयंसेवी संस्था असलेल्या हँड फाउंडेशनतर्फे येथील सुशोभीकरण  फेब्रुवारी २०१९ च्या पंधरवड्याअखेर पूर्ण करण्यात येणार असून, जुन्या लाकडावर पॉलिश व कार्विंग करण्यात येईल, तर येथे असलेल्या दगडांचा वापर करीत त्यावर संपूर्ण कोरीवकाम केले जाणार आहे. संपूर्ण दगडीकामात विविध प्रकारचे स्कल्प्चर बनवीत ते स्टेशनच्या परिसरात ठेवण्यात येणार आहे. हे सर्व करताना देवळाली कॅम्प व परिसराचे महत्त्व जपण्यात येईल. याशिवाय फायबरचे म्युरल साकारत परिसराशी निगडित विविध प्रसंग साकारण्यात येतील. परिसरातील मोकळ्या जागेवर शिल्पकलेच्या माध्यमातून मूर्ती घडविण्यात येऊन त्या येथील उद्यानात ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.  नाशिकरोड स्थानकावरही कोरीवकाम केले जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली स्टेशनची ही वास्तू आपले वैभव जपून आहे. येथील ऐतिहासिक महत्त्व पुढील पिढ्यांना  कळावे, या उद्देशाने हे सुशोभीकरण केले जाणार आहे.

- आर. एस. बागुल, स्टेशन प्रबंधक

देवळाली  स्टेशन हे आपले ऐतिहासिक वैभव आहे. ते  जतन करण्याच्या उद्देशाने आम्ही हे सुशोभीकरणाचे काम मध्य रेल्वे व काही खासगी कंपन्यांच्या सहकार्याने करणार आहोत.

-ललित महाजन, अध्यक्ष, हँड फाउंडेशन

--

नाशिकरोड स्थानक 'वायफाय'

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा मिळण्याची प्रवाशांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी बुधवारी प्रत्यक्षात उतरली. बुधवारपासून येथे प्रवाशांसाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशन आता वायफाय फ्री स्टेशन ठरले आहे. प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर फ्री इंटरनेट ॲक्सेस करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना आपला मोबाइल नंबर साइन इन करावा लागणार आहे. प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वायफाय सिस्टिमशी कनेक्ट झाल्यानंतर नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळणार असून, हा ओटीपी क्रमांक वायफाय सिस्टिममध्ये नोंदविल्यानंतर तात्काळ लॉगइन होणार आहे. कोणत्याही प्रवाशाला ३० मिनिटांसाठी फ्री इंटरनेटचा वापर करता येईल. पहिल्या ३० मिनिटांनंतर प्रवाशांना केवळ रेल्वेशी संबंधित माहिती ॲक्सेस करण्यासाठीच या वायफाय सुविधेचा वापर करता येणार आहे. रेल्वे स्टेशनवर ३० ठिकाणी हॉटस्पॉट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तिकीट बुकिंग ऑफिस, प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वरील पादचारी पूल व जिने या ठिकाणी हॉटस्पॉट्स आहेत. ही सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लामरोड येथे उद्या म्हसोबा यात्रोत्सव

$
0
0

 म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

विहितगाव येथील लामरोडच्या महाराजा बसस्थानक  येथे असणाऱ्या  जागृत देवस्थान  श्री  म्हसोबा  महाराज यांचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे शनिवारी ( दि. ३१) साजरा  होत आहे.  त्यानिमित्त  शनिवारी सकाळी ६ वाजता मूर्तीस अभिषेक, ८.३० वाजता मंदिरात मांडव-डहाळ्यांचा कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता सत्यनारायण पूजन, ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे. मंदिराला  रंगरंगोटी, आकर्षक  ­विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिराच्या आवारात मंडप टाकण्यात आला आहे. यंदा प्रथमच कुस्त्यांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवासाठी संजय कोठुळे, संतोष भामरे, शरद अरिंगळे, प्रमोद सुजगुरे, स्वामी कोठुळे, सुशांत बागुल, प्रतीक गायकवाड, शुभम हगवणे आदींसह परिसरातील नागरिक प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनश्री पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेlर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी राज्यस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनश्री पुरस्कार हा महसूल विभाग स्तर व राज्य स्तरावर व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, व ग्राम/विभाग/जिल्हा या संवर्गांत देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप असे आहे, अ) महसूल विभाग स्तर : वरील प्रत्येक संवर्गामध्ये २ पुरस्कार, प्रथम रुपये ५० हजार व द्वितीय रुपये ३० हजार, ब) राज्य स्तर : वरील प्रत्येक संवर्गामध्ये ३ पुरस्कार, प्रथम रुपये एक लाख व द्वितीय रुपये ७५ हजार व तृतीय रुपये ५० हजार असे आहे. यासाठी किमान योग्यता कमीत कमी ३ वर्षे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेले कार्य ही आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी त्वरित आपल्या जिल्ह्याचे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याशी संपर्क साधून पुरस्कारासंबंधी माहिती प्राप्त करून ३१ डिसेंबर २०१७ अखेरच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-२०१७ साठीचे प्रस्ताव विहित प्रपत्रात योग्य पूर्ततेसह संबंधित उपसंचालक यांच्याकडे १५ जूनपर्यंत पाठवावेत. अर्जदारांनी योग्य संवर्गात प्रस्ताव सादर करावेत, असेही विभागीय वन अधिकारी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणगावात दीक्षाविधी सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला 

 महानुभावपंथाचे अनुयायींसह भाविकांची गर्दी अन् पांढऱ्याशुभ्र अश्वरथांमध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीसह महानुभाव पंथीय सतंमहात्म्ये असं चित्र येवला शहरानजीकच्या अंगणगावात येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिरात वर्धापन दिन आणि दीक्षा विधी सोहळयाच्या निमित्ताने दिसून आले. सुसंस्कृत व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिराची नितांत गरज आहे, असे विचार मोहनराज अमृते यांनी मार्गदर्शनपर कीर्तनसमयी व्यक्त केले.

शहरानजीक असलेल्या अंगणगाव येथे येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिरात नुकताच हा सोहळा संपन्न झाला. वर्धापन दिन व दिक्षाविधी सोहळ्यातील पाच दिवशीय कार्यक्रम, तसेच असंख्य कीर्तनकारांच्या अमृतवाणीतून महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानाचा केला गेलेला प्रचार व प्रसार सर्वांचेच लक्ष वेधून गेला. आजच्या विज्ञान युगातील वाटचालीत आजची पिढी व्यसनाकडे वळलेली दिसते. अंधश्रद्धा वाढीस लागतानाच माणसा माणसातील दरी अधिक रुंदावत जाऊन हिंसेचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. या सर्वांपासून दूर करण्यासाठी चक्रधर स्वामींचे समतेचे व अहिंसेचे तत्वज्ञान लोकापर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मोहनराज अमृते यांनी केले. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष मनोहरशास्री सुकेणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण ज्ञानमंदिराचे संचालक दत्तराज बाबा चिरडे यांनी केले. श्रीकृष्णमुर्तीसह संत महंतांची भव्यदिव्य शानदार मिरवणूक सोहळयाचे मुख्य आकर्षण ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास उडाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सत्ताधारी पक्षांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे आपण जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविल्या पाहिजे असे सांगत, येणारा काळ आपलाच असून त्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले. राज्यासह महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या मुजोरपणामुळे व लहरी कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे आता जनता आपल्यासोबत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडली. बैठकीत आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, माजी खासदार देवीदास पिंगळे, मनपा गटनेते गजानन शेलार, कैलास कमोद, माधवराव पाटील, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार आदि उपस्थित होते. यावेळी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारीही उपस्थित होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींना अवघ्या वर्षाचाच कालावधी असताना या निवडणुकींना सामोरे जाण्याच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विभाग अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी जनतेच्या हितासाठी केलेल्या कामाचा तसेच आगामी निवडणुकींसाठी बूथ कमिटीसंदर्भातील आढावा यावेळी पक्ष प्रभारी आमदार जयंत पाटील यांना सादर केला. प्रभाग अध्यक्षांनी आपल्या मतदार केंद्रातील बूथ यादी आमदार पाटील यांना दिली.

येणारा काळ आपलाच...

यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील यांनी राज्यातील भाजप सरकारची लक्तरे काढली. सत्ताधारी पक्षांनी केलेल्या घोटाळ्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असून, आपण जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. येणारा काळ हा आपलाच आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन पाटील यांनी केले. कार्यकत्यांमधील उत्साह वाढविण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. यावेळी आमदार जाधव, मनपा गटनेते गजानन शेलार यांनी आपली मते मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा दंडुका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

शहर वाहतूक शाखेने बेशिस्त व रहदारीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत नाशिकरोडमध्ये १६६ बेशिस्त रिक्षाचालकांसह इतर वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलला. या कारवाईत शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल ३३ हजार रुपयांचा आर्थिक दंड या वाहनधारकांकडून वसूल केला.

बिटको कॉलेज, बिटको चौक, नाशिकरोड पोलिस ठाणे आणि रेल्वे स्टेशन या गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त रिक्षाचालकांसह रहदारीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या इतर वाहनधारकांचा नेहमीच सुळसुळाट असतो. शहर वाहतूक शाखेतर्फे बुधवारी या चारही ठिकाणी रहदारीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या ७४ रिक्षाचालकांसह ८७ इतर अशा १६१ वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला. या कारवाईदरम्यान या वाहनचालकांकडून तडजोडीची रक्कम म्हणून तब्बल ३३ हजार रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. यापैकी १७ हजार रुपयांचा आर्थिक दंड केवळ रिक्षाचालकांकडून वसूल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एन. डी. पटेल रोडवर मॉकड्रील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी काळात शहरात साजरे होणारे सण, उत्सव, राजकीय सभा अशा ठिकाणी बॉम्ब सापडल्यास आपत्कालीन यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी गुरुवारी एन. डी. पटेलरोड येथे मॉकड्रील घेण्यात आले.

मॉकड्रील घेत असताना अनेक यंत्रणा या सक्षम नसल्याचे यावेळी आढळून आले. त्यामुळे मॉकड्रीलचे नाटक कशासाठी करण्यात आले, असा सवाल नागरिक यावेळी विचारत होते. मॉकड्रील करताना आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, पोलिस यंत्रणा किती सक्षम आहे, याची चाचपणी केली जाते. घटना घडल्यानंतर ते वेळेवर येतात की नाही, हेदेखील तपासले जाते. त्यावरून निष्कर्ष काढून उशिरा येणाऱ्या यंत्रणेला समज देण्यात येते. गुरुवारी झालेले मॉकड्रील सर्व कर्मचाऱ्यांना माहित असल्याने याकडे कुणीही फारसे गांभीर्याने पाहिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी ऑनलाइन लोकशाहीदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (दि. २ एप्रिल) सकाळी ११ वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री समिती कक्ष येथे ऑनलाइन लोकशाहीदिन आयोजित करण्यात आला आहे.

मंत्रालय लोकशाहीदिनी ज्या अर्जदारांनी अर्जाच्या विहित प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे, अशा मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाहीदिनी मुख्यमंत्री यांच्या समक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांतील संबंधित अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांतील दालनात दि. २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहावे. ज्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत आणि ज्या अर्जदारांना दूरध्वनीद्वारे दूरचित्रवाणी परिषदेकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशा अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांचा फोटो अखेर बजेटवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र बजेटमध्ये छापण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. बजेटची छपाई थांबवण्यात येऊन गुरुवारी सावरकर यांच्या छायाचित्राचा बजेटमध्ये समावेश करण्यात आल्यानंतरच बजेटची पूर्ण छपाई करण्यात आली आहे. नगरसेवकांना स्थायीचे बजेट वाटण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राचा बजेटच्या पुस्तिकेत समावेश करावा, असे पत्र भाजपचे नगरसेवक योगेश हिरे यांनी २६ तारखेला स्थायी समितीला दिले होते. यापूर्वीच्या बजेटच्या पुस्तिकांमध्ये सावरकरांचे छायाचित्र नसल्याने या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु, हिरेंच्या पत्रामुळे मात्र भाजपची कोंडी होऊन वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हिरेंच्या पत्राकडे प्रारंभी दुर्लक्ष करणाऱ्या स्थायी समिती सभापतींनी संभाव्य वाद लक्षात घेऊन हे पत्र बुधवारी छपाई विभागाकडे पाठवले. यावरून दिवसभर भाजपमध्ये धावपळ व गोंधळ सुरू होता. महासभेच्या बजेटमध्ये सावकरांच्या छायाचित्राचा समावेश करू असे स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आले होते. पंरतु, संभाव्य गोंधळाचा अंदाज घेऊन भाजप नेत्यांनी बजेटच्या छपाईचे काम थांबवत त्यांचे छायाचित्र समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी बजेटमध्ये सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला. त्यामुळे सावकरांवरून निर्माण झालेल्या वादावर तुर्तास पडदा पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images