Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी आरती

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसकडून

रस्त्यातील खांबांची आरती

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोडच्या इंगळेनगर-पवारवाडी रस्त्याच्या मध्यभागी असलेले विजेचे धोकादायक दोन डझन खांब तीन वर्षापासून कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी या खाबांची आरती करून त्यांना हार अर्पण करीत अनोखे आंदोलन केले. त्वरित कार्यवाही न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आंदोलनावेळी जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, सुनिता निमसे, जयप्रकाश गायकवाड, राजाभाऊ जाधव, प्रफुल्ल पाटील, बाळासाहेब जाधव, गौतम पगारे, गणेश गांगुर्डे, राहुल तुपे, सौरभ पवार, किरण मानके आदी उपस्थित होते.

जेलरोडच्या इंगळेनगर चौकातून पवारवाडीकडे जाताना कॅनल रोड लागतो. त्याचे तीन वर्षापूर्वी रंदीकरण करण्यात आले. परंतु, दोन दोन डझन विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत. हे खांब रस्त्याच्या मध्यभागी आहेत. रात्री त्यावर रिक्षा, दुचाकीस्वार आदळून अपघात होत आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक खांबांचे प्रातिनिधिक वर्षश्राद्ध घातले आहे.

चालढकल सुरूच

कार्यकर्त्यांनी महावितरणचे अधिकारी थोरात यांची आज भेट घेतली असता, त्यांनी खांब हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले. निसाळ यांनी तेथूनच महापालिका अधिकारी कुलकर्णी यांना त्वरित फोन लावला असता त्यांनी ही जबाबदारी महावितरणची असल्याचे सांगितले. त्यामुळे ही जबाबदारी नेमकी कोणाची हे लेखी देण्याची मागणी करत त्वरित कार्यवाही न झाल्यास दोन्ही कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा निसाळ यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपसभापतींवरअविश्वास ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

पंचायत समितीचे उपसभापती वसंत थेटे यांच्या अविश्वास ठराव अपेक्षेप्रमाणे मंजूर झाला आहे. उपसभापती विश्वासात घेऊन काम करत नसल्याचा ठपका शिवसेना, राष्ट्रवादीकडून ठेवण्यात आला होता.

अविश्वास ठराव दाखल करण्यात थेटे यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. मात्र त्याला उशीर झाल्याने त्यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास ठराव ठरावसाठी बुधवारी सभा घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या सभेत मतदान घेवून थेटे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी ठराव दाखल केलेले आठ व काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले कैलास पाटील ठरावाच्या बाजूने होते तर उपसभापती वसंत थेटे यांच्यासह तीन सदस्य अनुपस्थित होते. दिंडोरी पंचायत समितीत माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तीन सदस्य होते. सुरवातीला शिवसेना काँग्रेस युती होत काँग्रेसचे उपसभापतीपद वसंत थेटे यांना मिळाले होते. मात्र नगरपंचायतमधील सत्तांतरानंतर शिवसेनेने पंचायत समितीत काँग्रेससोबतची युती तोडत स्वबळावर सत्ता आणण्यासाठी वसंत थेटे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. यानंतरच्या घडामोडीत काँग्रेसचे दोन सदस्य शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्याचा काँग्रेसच्या काही सदस्यांनी नकार देत तीनही सदस्य रामदास चारोस्कर यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र दोनच दिवसात कैलास पाटील यांनी त्यांची साथ सोडत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. उपसभापती यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आता या पदासाठी निवडणूक होणार असून, शिवसेना कुणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी कार्यालयांचे रुपडे पालटणार

$
0
0

बांधकामांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील एकूण १३ गावातील तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकामासाठी एकूण २ कोटी ९३ लाख ५० हजार रुपये  मंजूर झाल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये तलाठी कार्यालयाला कामकाजासाठी पुरेशी जागा नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत होता. त्यामुळे तलाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकाम हे एकाच ठिकाणी व्हावेत यासाठी भुसे यांचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यास यश आले असून १३ गावांत तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रत्येक तलाठी कार्यालयासाठी २२ लाख ५७ हजार रुपये मंजूर केल्याचे  भुसे यांनी सांगितले.

तालुक्यातील दाभाडी, पाटणे, चिखलओहोळ, अजंग, रावळगांव, निमगाव, करंजगव्हाण, सौंदाणे, झोडगे, वडनेर, डोंगराळे, कळवाडी व चंदनपुरी गावांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्हा बँकेला दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नाशिक जिल्हा बँकेतील २१ कोटींच्या नोटा रद्दीत काढण्याच्या नाबार्डच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. नाशिकसह राज्यातील आठ जिल्हा बँकांना या निर्णयाने दिलासा मिळाला असून, सर्व बँकांचे बुडीत खात्यात गेलेले १२२ कोटी वाचले आहेत, अशी माहिती अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.

या निर्णयाने जिल्हा बँकांकडे सव्वा वर्षापासून पडून असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनात येणार असल्याने बँकेच्या आर्थिक स्थितीला हातभार लागणार आहे. नोटाबंदीच्या काळात आदेश देऊनही जिल्हा बँकांनी रद्द नोटा स्वीकारल्या होत्या. त्यात नाशिक जिल्हा बँकेच्या २१ कोटी ३२ लाखांचा समावेश होता. नाबार्डने जिल्हा बॅँकांना एक पत्र पाठवून या शिल्लक रकमा बुडीत खाती जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बँकांमध्ये खळबळ उडाली होती. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेली नाशिक जिल्हा बँक आणखी गोत्यात आली. यावर जुन्या नोटांच्या प्रश्नावर सर्व बँका एकवटल्या अन् त्यांनी नाबार्डच्या आदेशाविरोधात अध्यक्ष केदा आहेर यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने नाबार्डच्या आदेशाला स्थगिती दिली. तसेच, जिल्हा बँकांनी ही रक्कम ३१ मार्च २०१८ च्या ताळेबंदात बुडीत खाते दाखवू नये, असेही आदेश यावेळी देण्यात आले आहेत. त्यामुळे बँकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत बंडाचे निशान?

$
0
0

महानगरप्रमुखांच्या बैठकीला २५ नगरसेवकांची दांडी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषद निवडणुकीवरून झालेल्या फेरबदलावरून नाशिक शिवसेनेतील बेदिली वाढत आहे. अॅड. शिवाजी सहाणे यांच्यापाठोपाठ आता पक्षातील सध्याच्या घडामोडींवरून नगरसेवकही बंडाच्या पावित्र्यात असल्याचे समजते. प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना भवनात बोलाविण्यात आलेल्या बैठकीकडे ३७ पैकी अवघ्या सात ते आठ नगरसेवकांनी हजेरी लावली. वारंवार दूरध्वनी करूनही २५ पेक्षा अधिक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने पक्षातील गटबाजीला पुन्हा उधाण आले आहे. नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीची या गटबाजीला किनार असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी खासदार संजय राऊत यांच्या नियुक्तीपासून शिवसेनेत धूसफूस सुरू होती. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही धुसफूस पुन्हा उफाळून आली. या निवडणुकीसाठी गेल्यावेळचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे पुन्हा इच्छूक असताना पक्षातील एका गटाने नरेंद्र दराडे यांचे नाव पुढे केले आणि पक्षातील खांदेपालटाने गटबाजीला जोर धरला आहे. महानगरप्रमुख पदावरून अजय बोरस्ते यांना हटवून सचिन मराठे व महेश बडवे यांच्याकडे विभागून महानगरप्रमुख पदाचा कार्यभार देण्यात आला. अॅड. सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. अॅड. सहाणे यांनी खासदार राऊत हे हे मराठाद्वेषी असल्याचा आरोप केला. या आरोपाने घायाळ झालेल्या शिवसेनेतील नेत्यांना दुसऱ्या दिवशी तातडीने पत्रकार परिषद घेऊन अॅड. सहाणे यांच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले.

राऊत आणि सहाणे यांच्या वाद थांबत नाही तोच प्रभाग क्र. १३ च्या पोटनिवडणुकीवरून अंतर्गत गटबाजी उफाळून आली. पोटनिवडणुकीसाठी मराठे व बडवे यांनी बुधवारी नगरसेवकांची तातडीने बैठक बोलवली होती. दोन्ही महानगरप्रमुख शिवसेना भवनात दाखल झाले. परंतु, या बैठकीकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली. केवळ चार ते पाच नगरसेवकांनी प्रथम हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा फोनाफोनी करण्यात आली. त्यावेळी हा आकडा दोनने वाढला. तसेच दोन 'झेरॉक्स' नगरसेवक आल्यानंतर कसाबसा हा आकडा आठच्या पुढे गेला. महापालिकेत शिवसेनेचे निवडून आलेले ३५ व स्वीकृत दोन असे ३७ नगरसेवक आहेत. परंतु त्यातील २५ नगरसेवकांनी विविध कारणे देत, बैठकीपासून लांब राहणेच पसंद केले. त्यामुळे पहिल्याच शक्तीप्रदर्शनात दोन्ही महानगरप्रमुख यशस्वी झाले नसल्याची चर्चा आहे. नगरसेवकांनी गैरहजेरी लावल्यानंतर व नगरसेवक फिरकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बैठक निवडक नगरसेवकांचीच असल्याचा दावा सेना कार्यालयाने केला.

दराडेंची उमेदवारी कारणीभूत

शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी शिवसेनेत दाखल झालेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. दराडे यांनी शिवसेनेकडून नगरसेवकांच्या भेटीगाठीही घेत आहेत. त्यांची तयारी सुरू असताना अॅड. सहाणे यांच्या प्रचाराची पक्षाने दखल घेतली आणि सहाणे यांची हकालपट्टी केली. दराडे यांना लादण्यासाठीच हा कट रचल्याचा नगरसेवकांचा आरोप असून निष्ठावंताना डावलले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बहुसंख्य नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवत, नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांची बदली

$
0
0

अहमदनगरचे नितीन मैद घेणार पदभार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता नितीन मैंद हे कार्यभार सांभाळणार आहे. तर नाशिक विभागात वाहतूक नियंत्रक असलेले राजेंद्र जगताप यांनाही पदोन्नती मिळाली असून ते यवतमाळ येथे विभाग नियंत्रक म्हणून नियुक्त होणार आहे.

राज्यातील १५ नियंत्रकाच्या बदल्या झाल्या आहेत. मैंद हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी असून ते अहमदनगर येथे विभाग नियंत्रक होते. राज्यातील बदल्यामध्ये यामिनी जोशी (पुणे), चेतन खिराडकर (वर्धा), राजेंद्र देवरे (जळगाव), नितीन मैंद (नाशिक), मनीषा सपकाळ (धुळे), राजेंद्र जगताप (यवतमाळ) यांचा समावेश आहे. यातील सपकाळ आणि जगताप यांना विभागीय वाहतूक अधिकारी पदावरून विभाग नियंत्रक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

यामिनी जोशी यांच्याकडे नाशिक विभागाच्या पदभार सांभाळताना त्यांच्या काळातच सिटी बसचा विषय गाजला. त्यांच्या कारकिर्दीत मात्र बस पोर्ट व इतर विकास कामे सुरू झाली तर अनेक नव्या बसही सुरू झाल्या. आता नव्याने रुजू होणाऱ्या नितीन मैद पुढे अनेक आव्हाने असली तरी त्यांना जिल्ह्याचीमाहिती असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडाच्या सदनिकांचे अखेर वाटप

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

म्हाडाने कामगारवस्ती असलेल्या सातपूर कॉलनीत त्र्यंबकेश्वर रोडवर भव्य इमारत उभारली आहे. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण पैसे म्हाडाला भरूनदेखील सदनिका ताब्यात दिल्या गेल्या नसल्याने सुवर्णा सांगळे यांनी माध्यमांकडे तक्रार केली होती. 'मटा'ने म्हाडा लाभार्थींची वणवण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यावर तत्काळ सदनिकांचे वाटप करण्यात आल्याचे लाभार्थी सांगळे यांनी सांगितले. त्र्यंबकरोडवर मुख्य रस्त्याला लागून असलेल्या इमारतीत गेल्या चार महिन्यांपासून सदनिकांचा ताबा मिळावा यासाठी सांगळे म्हाडा कार्यालयात खेट्या मारत होत्या. अखेर 'मटा'च्या वृत्ताने सांगळे यांना सदनिका वाटपपत्र देण्यात आल्याने त्यांनी 'मटा'चे आभार मानले.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या अगदी मध्यभागी असलेल्या ठिकाणी म्हाडाने कामगारांना परवडतील अशा दरात घरकुलांची उभारणी केली होती. कारखान्यांची वाढलेली संख्या पहाता पुन्हा नव्याने घरकुले उभारावीत अशी मागणी कामगारांकडून केली जात होती. त्र्यंबकेश्वररोडला लागून असलेल्या जागेवर म्हाडाने कामगारांसाठी इमारतीची उभारणी केली. परंतु, शासकीय कामातील त्रुटीमुळे संपूर्ण पैसे भरूनदेखील लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात आले नसल्याने बँकेचे कर्ज व घराचे भाडे देण्याची वेळ आली होती.

यात तक्रारदार सांगळे यांनी वेळोवेळी म्हाडाकडे सदनिका मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. याकडे मात्र म्हाडाचे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याने सांगळेंनी प्रसारमाध्यमांकडे तक्रार करत सदनिका मिळण्याबाबत मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकीय साफसफाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावल्यानंतर आणि कर्मचाऱ्यांना शिस्तीचा धडा शिकवल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा बड्या अधिकाऱ्यांकडे वळविला आहे. एनएनसी ई-कनेक्ट अॅपच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने मुंढे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पंचवटीचे प्रभारी विभागीय अधिकारी तथा अधीक्षक भीमाशंकर यल्लाप्पा शिंगाडे यांना निलंबित केले आहे.

आरोग्य विभागातील अनियमिततेप्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना पदावनत करण्यात आले असून त्यांना नवीन नाशिक विभागातील स्वामी समर्थ (मोरवाडी) रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. कामावर गैरहजर राहिल्याचा दोषारोप विभागीय चौकशीत सिध्द झाल्याने नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील शिपाई सुनील शांताराम मिंधे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. मुंढेंच्या या दणक्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवसापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिस्तीला प्राधान्य देत, मुख्यालयापासूनच साफसफाईला सुरुवात केली होती. मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामात सुधारणेसाठी आयुक्तांनी महिनाभराचा अवधी दिला होता. या मुदतीनंतरही कामात हलगर्जीपणा दाखविणाऱ्यांवर आता थेट कारवाईचे अस्त्र मुंढे यांनी उगारले आहे. आतापर्यंत पालिकेतील जवळपास दहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, साडेतीनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पाठोपाठ महापालिकेमार्फत नागरिकांना जलद विविध सेवा-सुविधांबाबत तसेच तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी महापालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीत मोठे फेरबदल केले होते. एनएमसी ई-कनेक्ट हे नवे मोबाइल ॲप मुंढे यांनी सुरू केले आहे. या तक्रारींचा आढावा घेताना पंचवटी विभागातील तक्रारींचा आलेख अन्य विभागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे आयुक्त मुंढे यांच्या निदर्शनास आले होते. पंचवटी विभागातून घंटागाडीच्या अनियमिततेच्या तक्रारीही सर्वाधिक असून पथदीपाच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या तक्रारी कमी करण्यासाठी शिगांडे यांना पूर्वीही समज देण्यात आली होती. परंतु, तरीही कामात सुधारणा झाली नसल्याने पंचवटीचे प्रभारी विभागीय अधिकारी शिंगाडे यांना जबाबदार धरत आठवडाभरापूर्वी निलंबनाची नोटीस बजावली होती. तरीही कामकाजात सुधारणा न झाल्याने अखेर बुधवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील पचंवटी विभागाचा पदभार नगरसचिव आर. आर. गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. निलंबनाच्या काळात त्यांना कर विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. याबरोबरच नाशिक पश्चिम विभागातील शिपाई सुनील मिंधे हे १७ नोव्हेंबर २००५ पासून अनधिकृतपणे कामावर गैरहजर होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. परंतु, मिंधे यांनी खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई मुंढे यांनी केली आहे. बड्या अधिकाऱ्यांवरील या कारवाईने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ. बुकानेंची गच्छंती

महापालिकेत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्यावरही आयुक्त मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. डस्टबिन घोटाळ्यासह, घंटागाडी ठेकेदारांना पाठिशी घालणे, सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी डॉ. बुकाने यांना पदावनत करण्यात आले आहे. नवीन नाशिक विभागातील स्वामी समर्थ (मोरवाडी) रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आरोग्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार सहायक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. बुकाने यांच्या कारभाराविषयी मुंढे नाराज होते. तसेच त्यांच्याबाबत अनेक तक्रारीही आल्या होत्या. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, सफाई कर्मचाऱ्यांचे नियोजनातील त्रुटी आणि शहर स्वच्छतेच्या कामातील अडचणी याबाबी आरोग्याधिकारी बुकाने यांची पदावनती करण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

धडाका सुरूच

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाकाच लावला असून, यापूर्वी घरपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नाशिकरोड विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनायक मोहन साळवे व सातपूर विभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सागर रघुनाथ साळवी तसेच सफाई कर्मचारी कामावर हजर नसताना, त्यांची हजेरी लावल्याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक एकनाथ ताळे, मुकादम युवराज जाधव आणि सफाई कर्मचारी वैशाली नाठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिकरोड विभागातील सहायक अधीक्षक बाळू रमेश काळे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात चांडक सर्कलजवळ कचरा आढळून आल्याने स्वच्छता निरीक्षक, मुकादम तसेच सफाई कर्मचाऱ्यास निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देण्यात आली आहे.

नगरसचिवपदी आव्हाळे

पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी शिंगाडे यांच्या निलंबनानंतर त्यांच्याकडील पदाचा कार्यभार आर. आर. गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे सहाय्यक नगरसचिव गोपीनाथ आव्हाळे यांना बढती देण्यात आली असून, गोसावी यांच्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे नगरसचिव होण्याची आव्हाळेंची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिडे गुरूजींवर आकस!

$
0
0

राजकीय स्वार्थातून कारवाई केल्याचा हिंदुत्ववाद्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकाविल्याचा आरोप असलेले श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'हिंदू सन्मान' मोर्चा काढण्यात आला़ भिडे गुरूजी यांना राजकीय स्वार्थापोटी यात गोवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संभाजी भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत अशा घोषणा देत हिंदुत्व संघटनेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यभरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, जळगाव, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग,बेळगाव आणि पणजी येथे भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ एकाच वेळी मोर्चे काढण्यास सुरुवात झाली.

नाशिकमध्येही गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी बंदोबस्त मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त होता. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटल्यानुसार, कोरेगाव-भीमा हिंसाचारात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, भिडे गुरूजी यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा संघटनेने केला. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी भिडे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी यावेळी केला. संभाजी भिडे यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे सांगत, या सर्व प्रकाराची नि:पक्ष चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात अखंड हिंदू परिषद, श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

संघटनेच्या मागण्या

संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत

मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपांतून मुक्तता करावी

पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी

कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा

३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडून घ्यावी

हिंसाचारामागे नक्षली हात आहे का, याची चौकशी व्हावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट-३

$
0
0

नेत्र चिकित्सालयाचे उद्घाटन

नाशिकरोड : भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्त श्री वर्धमान श्वेतांबर जैन स्थानकवासी श्रावक संघ संचलित स्व. अमरचंदजी केसरीमलजी शहा यांच्या स्मरणार्थ धमार्थ नेत्र चिकित्सालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २९) रोजी सकाळी साडे दहावाजेला आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी तपस्वी योग साधनाजी, उत्तम साधनाजी, जैन श्रावक संघाचे संघपती डॉ. राजेंद्र मंडलेचा, सचिव राजेंद्र धाडीवाल, लोक संकल्प ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र शहा, शोभा वाजे, मनिश शहा, परेश शहा आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेपूर्वीच ३० टक्के उमेदवारांची माघार

$
0
0

८२ जागांसाठी साडेदहा हजार उमेदवारांमध्ये चुरस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या ८२ पोलिस शिपाई पदांसाठी तब्बल २१ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले. मात्र, त्यापैकी ३० टक्के उमेदवारांनी मैदानापर्यंत येण्याचे टाळले आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. यातील १० हजारांपेक्षा अधिक उमेदवार पहिल्या फेरीत पात्र ठरले आहेत.

ग्रामीण पोलिस दलातील शिपाई पदासाठी महा ई सेवा केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. अवघ्या ८२ जागांसाठी तब्बल २१ हजार ८६ उमेदवारांनी अर्ज सादर केले. या उमेदवारांच्या शारीरिक मोजमाप, कागदपत्र तपासणी आणि शारिरीक तपासणीसाठी १२ मार्चपासून कार्यवाही सुरू झाली आहे. उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता उंची, छाती व कागदपत्रे तपासणीसाठी दररोज बाराशे उमेदवारांना बोलवण्यात येते. १२ ते २८ मार्च या काळात १७ हजार २५ उमेदवार आले. त्यापैकी ११ हजार ९३१ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी मैदानावर उपस्थित राहिले. तर, जवळपास ३० टक्के म्हणजे पाच हजार ९४ उमेदवार मैदानापर्यंत पोहचलेच नाही. उपस्थित राहिलेल्या उमेदवारांपैकी एक हजार १७३ उमेदवार छाती-उंचीमध्ये अपात्र ठरले. तसेच आठ जणांनी मैदानातच माघार घेतली. १० हजार ७५० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी २ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

सीसीटीव्हीची नजर

भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी पोलिस अधीक्षक संजय दराडे तसेच अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या निगराणीखाली काम सुरू आहे. भरती प्रक्रिया पूर्णत: सीसीटीव्हीच्या टप्प्यात असून, उमेदवारांकडून अनुचित प्रकार घडल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे ग्रामीण पोलिस दलाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ही भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे पार पडते असून, कोणी काही आमिष दाखवल्यास किंवा इतर मार्गांचा अवलंब केल्यास नागरिकांनी लागलीच ग्रामीण पोलिस नियत्रंण कक्षाच्या ०२५३-२३०३०८८, २३०३०२१ तसेच २३०३०४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीतील सूत्रधारांना अटक करा

$
0
0

ॲट्रॉसिटी समर्थनार्थ आरपीआय एल्गार मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात केलेल्या कायद्याचा पुनर्विचार व्हावा तसेच कोरगाव भीमा दंगलीतील सूत्रधारांना अटक करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे बुधवारी दुपारी येथील विभागीय आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आरपीआय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोर्चात पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्यासह अर्जुन पगारे, गुफाताई भदरंगे, संतोष पाटील, कैलास आहिरे, राजेंद्र गांगुर्डे, रामबाबा पठारे, समाधान जगताप, संतोष वाघ, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागूल आदींसह आरपीआय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नाशिकरोड बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. पुढे शिवाजी पुतळा, नाशिकरोड पोलिस ठाणे जवळून विभागीय आयुक्त कार्यालयापुढे मोर्चाची सांगता झाली.

मोर्चेकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयात उपायुक्त रघुनाथ गावडे यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. झोपडपट्टीधारकांना आहे त्याच जागेवर घरकुल उभारुन द्यावे, शासकीय वनजमिनी व गायारान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्या, रेल्वे भरती आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावीत, शेतकऱ्यांचा सात-बारा कर्जमुक्त करावा, कोरेगाव भीमा दंगलीच्या सूत्रधारांना अटक व्हावी, ओझर विमानतळाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड असे नामकरण करावे, शेतकरी व झोपडपट्टीवासीयांना वीज बिलमाफी मिळावी आणि एकलहरे येथील ६६० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प लवकर उभारण्यात यावा या प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, अशा मागण्या लेखी निवेदनाद्वारे मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आप्पासाहेब पवार कृषीतंत्र पुरस्कार पाटोळेंना जाहीर

$
0
0

आप्पासाहेब पवार कृषीतंत्र पुरस्कार पाटोळेंना जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. तर्फे अखिल भारतीय पातळीवर कृषी क्षेत्रातील अग्रगण्य व अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असलेल्या 'पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार' वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जैन हिल्स आकाश सभागृहात शुक्रवारी (दि. ३०) दुपारी पाववणेबारा वाजता होणार आहे. या वेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहतील. पुरस्काराचे मानकरी प्रगतीशील शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे (रा. वडनेर भैरव ता. चांदवड जि. नाशिक) येथील आहेत.

आप्पासाहेब पवार कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो. या पुरस्काराचे यंदा १४ वे वर्ष असून, सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये व पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट अशा पाच महसूल विभागातून शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यावर्षी उत्तर महाराष्ट्रातून ही निवड करण्यात आलेली आहे.

पाटोळे यांनी उच्च कृषी तंत्रज्ञान, सुक्ष्मसिंचन पद्धती, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग त्याचप्रमाणे विविध पिकांचे अधिक उत्पादन घेऊन शाश्वत शेती केली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीला अधोरेखित करून पुरस्कारासाठी ही निवड झालेली आहे. या पुरस्कार सोहळ्यास शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, कविवर्य ना. धों. महानोर यांनी केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेश जैन, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर ललित कोल्हे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ अधिकाऱ्यांनावाहनधारकांचा घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन विभागाच्यावतीने वाहने परवाना देण्यासाठी भरविण्यात येणारा आरटीओ कॅम्पची जागा स्थलांतरित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या वाहनधारकासह राष्ट्रवादी काँग्रेसने परिवहन अधिकारी जमीर तडवी व एम. एम. चौधरी यांना घेराव घातला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराधश राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सटाणा शहरातील जुन्या शासकीय विश्रामगृह असलेल्या जलसंपदा विभागच्या विशाल पटांगणावर ३० ते ४० वर्षांपासून मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने दुचाकीपासून तर लहान मोठ्या वाहनांचे नोंदणी करणे, परवाना देणे, नूतनीकरण करणे आदी कामांसाठी आरटीओ कॅम्प भरविण्यात येत आहे.

ही जागा मद्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वसामान्यांना सोईची होती. गत तीन महिन्यांपासून मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाने कोणतीही पूर्व सूचना न देता सदरचा कॅम्प शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्वजनिक बांधकाम विभागच्या चिनार या शासकीय विश्रामगृह शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर स्थलांतर केला. परिणामी या उजाड माळरानावर सर्वसामान्य जनतेला वाहन नोंदणीसाठी अवघड होत आहे. त्यामुळे

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दत्तू बैताडे, नंदकिशोर सोनवणे, यशवंत कात्रे यांनी परिवहन अधिकारी तडवी, चौधरी यांना घेराव घालून निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याची प्रतीक्षा संपणार?

$
0
0

रस्त्याची प्रतीक्षा संपणार?

दत्त नगरवासींयाची ड्रेनेज लाइनीत रस्ता मिळण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत वयोवृद्धांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या बाजूला रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पडून होते. तसेच दत्तनगर भागात स्वतंत्र ड्रेनेज लाइन नसल्याने चोकअपच्या समस्या रहिवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अखेर ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी महापालिकेने जागा ताब्यात घेत काम सुरू केले. परंतु, दत्तनगरवासीयांना घराकडे जाण्यासाठी रस्ता कधी मिळणार, असा सवाल कायम आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शहरातील अनेक डीपी रस्त्यांचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. यामुळे वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे जुन्या रस्त्यांवर त्याचा ताण येत असतो. अशोकनगर भागातील दत्तनगर कॉलनी उभी राहिल्यापासून रहिवाशांना फेरा मारून मुख्य रस्त्यावर यावे लागते. याचे कारण म्हणजे आरक्षित जागेच्या बाजूला एका खासगी विकसकाने रहिवाशांचा रहदारीचाच रस्ता तार कुंपणात अतिक्रमण करत अडकवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ही रस्त्याची समस्या या परिसरात होती. त्यातच स्वतंत्र ड्रेनेज लाइन टाकली गेली नसल्याने चोकअपचीही समस्या रहिवाशांना सहन करावी लागली.

समस्या मार्गी लागण्याची आशा

दत्त नगर परिसरातील रहिवाशांनी याबाबत सातत्याने महापालिकेकडे मागणी केल्यानंतर ड्रेनेज टाकण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, आता ड्रेनेज लाइनचे काम झाल्यावर त्याठिकाणी तत्काळ रस्त्याचीही व्यवस्था करण्याची मागणीही होत आहे. येथील रहिवाशांनी सभापती बोलकर यांच्याकडे ही समस्या मांडली त्यावर बोलकर यांनी, ड्रेनेज लाइन टाकून झाल्यावर तत्काळ खडी, मुरूम टाकून रस्ता करण्याबाबत बांधकाम विभागाला आदेशीत केले आहे. त्यामुळे आता अनेक वर्षांपासूनची दत्त मंदिर परिसरातील नागरिकांची समस्या मार्गी लागण्याची आशा व्यक्त होत आहे.

सातपूरमधील दत्तनगर भागात असलेल्या ड्रेनेज लाइनीच्या कामातच महापालिकेने रस्त्याचे काम करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यावर आपण, तत्काळ बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत.

माधूरी बोलकर सभापती सातपूर प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपमधील गटबाजीचा सावरकरांना फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीने महासभेकडे पाठविलेल्या सुधारीत बजेटमध्ये स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यावरून सत्ताधारी भाजपमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. भाजपचे नगरसेवक योगेश हिरे यांनी पत्र देऊनही सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश न केल्याने बुधवारी महापौर, स्थायी समिती सभापतींसह पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. छायाचित्राच्या वादावरून काही काळ बजेटचीही छपाई थांबवण्यात आली. परंतु, आता वेळ हातातून गेल्याचे सांगून महासभेच्या बजेटमध्ये समावेश करू असा खुलासा करून भाजपकडून हा वाद सावरण्याचा प्रयत्न झाला. परंतु, विरोधकांकडून या मुद्द्यावरून भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

नाशिकचे भूमीपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राचा बजेटच्या पुस्तिकेत समावेश करावा, असे पत्र भाजपचे नगरसेवक योगेश हिरे यांनी २६ तारखेला स्थायी समितीला दिले होते. बजेट पुस्तिकेत राष्ट्रपुरुषांसह, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांचे फोटो छापले जातात. यापूर्वीच्या बजेटच्या पुस्तिकांमध्ये सावरकरांचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे या बजेटमध्येही ते छापण्यात आले नाही. परंतु, हिरेंच्या पत्रामुळे मात्र भाजपची कोंडी झाली. हिरेंच्या पत्राकडे प्रारंभी दुर्लक्ष करणाऱ्या स्थायी समिती सभापतींनी संभाव्य वाद लक्षात घेऊन हे पत्र बुधवारी छपाई विभागाकडे पाठवले. छपाई विभागाने हे पत्र लेखा विभागाकडे सादर केले. त्यावर लेखाधिकाऱ्यांनी विचार करण्याचा शेरा मारत नगरसचिवांकडे पत्र पाठवले. बजेटला आधीच उशीर झाल्याने बुधवारी बजेटची छपाई सुरू करण्यात आली होती. परंतु, या पत्रामुळे वाद उद्भवू नये म्हणून थेट छपाईच थांबवण्यात आली. परंतु, अर्ध्यापेक्षा जास्त बजेटच्या पुस्तिकांची छपाई पूर्ण झाल्याने पदाधिकाऱ्यांची पंचाईत झाली. त्यातच भाजपच्याच नगरसेवकाचे पत्र असल्याने बोंबाबोंब होण्याचा धोका अधिक असल्याने महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर आणि स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संबंधित नगरसेवकाला महासभेच्या बजेटमध्ये सावरकरांच्या प्रतिमेचा समावेश करू, असे उत्तर देण्याचे फर्मान काढून वाद शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विरोधक घेरणार

महापालिकेत भाजपची सत्ता असूनही नाशिकच्या भूमिपुत्राची उपेक्षा करून स्थायीच्या बजेटमध्ये सावरकरांच्या प्रतिमेचा समावेश न झाल्यावरून शिवसेनेसह विरोधी पक्ष भाजपचा घेरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच नगरसेवकाने पत्र देऊनही त्याची कारवाई पूर्ण न केल्याने शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपमधील गटबाजीचा फटका सावरकरांनाही बसल्याने विरोधकांकडून महासभेत हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सव्वातीनशे रुग्णालये रडारवर

$
0
0

५७६ पैकी २५१ रुग्णालयांची फक्त नोंदणी

रुग्णालय महापालिका वाद चिघळणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालये नूतनीकरणासाठी ३१ मार्चचा अल्टिमेटम देऊनही अद्याप ५७६ पैकी २५१ रुग्णालयांनीच नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. अजूनही ३२५ रुग्णालयांनी नोंदणी तसेच, नूतनीकरणासाठी अर्ज केले नसल्याने ही रुग्णालये कारवाईच्या रडारवर आले आहेत. येत्या तीन दिवसांत या रुग्णालयांनी नूतनीकरण केले नाही, तर महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान आयमानेही याबाबत कठोर भूमिका घेतली असून, महापालिकेने कारवाई केल्यास थेट रुग्णालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

पश्चिम बंगालमधील रुग्णालयातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारनेही राज्यातील रुग्णालयांसाठी नियमावली कडक केली आहे. रुग्णालयासाठी अग्निशमनचा दाखला, पार्किंगचे नियम, दोन जिन्यांच्या व्यवस्थेसह विविध जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व रुग्णालयांना या नियमांचे पालन सक्तीचे केले असून, त्यासाठी नूतनीकरण करणे किंवा नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी ३१ मार्चचा अल्टिमेटम देण्यात आला असून, हार्डशीप प्रीमियम व दंड भरून ही नोंदणी करता येणार आहे. शहरात ५७६ रुग्णालये असून, त्यापैकी निम्मे रुग्णालये नियमांची पूर्तता करू शकत नाहीत. २७ तारखेपर्यंत केवळ २५१ रुग्णालयांनी नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी अर्ज केला असून, नव्याने ७० रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. अजूनही ३२५ पेक्षा जास्त रुग्णालयांनी अर्ज केलेले नाहीत. अर्जासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. ३१ मार्चपर्यंत नोंदणी व नूतनीकरण केले नाही, तर थेट रुग्णालय सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय आणि महापालिकेतील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - विमानसेवा १५ एप्रिलनंतरच

$
0
0

विमानसेवा आता

१५ एप्रिल नंतरच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकहून मुंबई आणि पुणे शहरांसाठी एअर डेक्कनच्या वतीने दिली जाणारी विमानसेवा आता १५ एप्रिलनंतर सुरू होणार आहे. यापूर्वी ही सेवा २७ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. पायलटमुळे ही सेवा रखडली आहे.

अगोदर तांत्रिक कारणास्तव कंपनीने ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला व २८ मार्चपासून पुन्हा सुरळीत सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे १५ दिवस नाशिककर विमानसेवेला मुकावे लागले आता पायलट नसल्यामुळे ही सेवा रखडली आहे. पायलट प्रशिक्षण घेत असल्याचे बोलले जात असले तरी वेगवेगळी कारणे देऊन ही सेवा खंडित होत असल्याने नाशिककरांमध्ये संताप आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत एअर डेक्कन कंपनीने १८ आसनी विमानाद्वारे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई आणि पुणे शहरांसाठी सेवा सुरू केली. सोमवार वगळता सहा दिवस ही सेवा आहे. मात्र, १५ मार्चपासून तांत्रिक कारणास्तव ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. आता ही सेवा १५ एप्रिलल नंतर सुरु होईल. त्यामुळे महिनाभर ही सेवा नाशिकरांना मिळणार नाही.

नाशिकहून मुंबई आणि पुणे शहरांसाठी एअर डेक्कनच्या वतीने स्थगित केलेली सेवा २८ मार्चपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण, पायलटचे प्रशिक्षण कारण दिले असून ही सेवा १५ एप्रिलनंतरच सुरू होईल.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला अपघात; तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर गावाजवळील रिझविया मशिदीसमोर रस्ता ओलडाताना महामंडळाच्या बसने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पांडुरंगराव कंधारकर (३७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नांदेड येथील केटरिंग चालकाकडे काम करणाऱ्या ते काम करीत होते. बसचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्र्यंबक रोडवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी सातपूरवासीयांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशवाडी रस्त्यावरील बाजार हटविला

$
0
0

पंचवटी : नाशिकचा बुधवारच्या बाजाराला दिवसेंदिवस जागा कमी पडू लागली आहे. हा बाजार म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, रोकडोबा मैदान या जागेवर भरत आहे. ही जागा कमी पडू लागल्याने हा बाजार थेट गणेशवाडी रस्त्यावर भरू लागला होता. रस्त्यावरील या बाजारामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत होता. हा बाजार बुधवारी (दि. २८) रोजी भाजी मार्केटच्या मोकळ्या जागेत भरविण्यात आल्याने गणेशवाडीचा रस्ता मोकळा झाला. बुधवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी गणेशवाडी रस्त्याने वाहन चालविणे मुश्किल होत असे, भाजीपाला विक्रेते थेट रस्त्यातच ठिय्या मांडीत असल्यामुळे अर्धा अधिक रस्ता या बाजाराने व्यापला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images