Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हॉकर्स झोनचे होणार बायोमेट्र‌िक सर्व्हेक्षण

0
0
शहरातील हॉकर्स झोनचे बायोमेट्रीक पध्दतीने सर्व्हेक्षण होणार आहे. त्यापूर्वी महापालिका प्रशासन फेरीवाला समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नाशकात सेंद्रिय शेतीचा स्टॉल

0
0
मुंबईनंतर नाशकातही सेंद्रिय शेतीचा पहिला स्टॉल लवकरच सुरु होत आहे. रासायनिक औषधांना फाटा देत उत्पादित करण्यात आलेला भाजीपाला आणि फळे नाशिककरांना दर शनिवारी उपलब्ध होणार आहेत.

बचत गटांनी तारले संसार

0
0
काही नेहमीच चूल आणि मूल सांभाळणाऱ्या, काही सतत बुरख्यात राहणाऱ्या तर काही आपल्याला जमेल का हा व्यवसाय या चिंतेने घाबरलेल्या बहुसंख्य महिलांचा संसार बचत गटाच्या परीसस्पर्शाने विकासाच्या मार्गावर धावत आहे.

केळझर कॅनालच्या गळतीने शेती संकटात

0
0
बागलाण तालुक्यातील केळझर धरणातून रब्बीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याची डाव्या कॅनोलमधून मोठया प्रमाणात गळती होत आहे. यामुळे पाणी वाया जाण्याबरोबरच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

अन् साईटवर धडकले मनरेगाचे आयुक्त

0
0
बागलाण तालुक्यातील मनरेगाअंतर्गत येणाऱ्या कामाची शुक्रवारी मनरेगाचे आयुक्त मुथ्थू कृष्णन यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. अपूर्ण कामे पूर्ण करून मजूरांचे पेमेंट तातडीने अदा करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

रेल्वेकडून सुविधांचा अभाव

0
0
रेल्वेच्या तिकीटात भाड्यासह वीमा सुरक्षिततेसाठी पैसे वसूल करणारे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे. नाशिकरोडसह अकरा स्टेशनचे फायर ऑडिट झाले आहे की नाही, याची माहितीच रेल्वे प्रशासनाला नसल्याची बाब समोर आली आहे.

नाशिकरोडला चला, जीव मुठीत धरून

0
0
उड्डाणपूल होऊनही नाशिकरोडचा वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी एक तरुण परिचारिका नासर्डी पुलाजवळ ट्रकखाली सापडून ठार झाली. चार महिन्यांपूर्वी उपनगर जवळ बसच्या मागील चाकाखाली सापडून गृहिणी मृत्यू पावली होती. उपनगरात वेगाने गाडी चालविल्यामुळे एका युवकाचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता.

पर्यटनवाढीसाठी किऑस्कचा स्टॅण्ड!

0
0
राज्यातील विविध पर्यटनस्थळांचा प्रचार, प्रसार करतानाच पर्यटनाला चालना देण्यासाठी किऑस्क सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसह महत्त्वाच्या ठिकाणी एकूण ३०० किऑस्क येत्या महिनाभरात लावले जाणार आहेत.

सातपूर प्रभाग सभापतींनी केले वाहन परत

0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे स्पष्ट करीत सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास शिंदे यांनी महापालिकेचे वाहन परत केले आहे.

बेकायदा बांधकामांची चौकशी करा

0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांच्या ‘मटा’तील वृत्तमालिकेची दखल घेत निफाड तहसिलदारांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पिंपळगावातील अनेक नियमबाह्य कामे उजेडात येण्याची चिन्हे आहेत.

५ लाखांच्या अपहारप्रकरणी एकावर गुन्हा

0
0
मेसर्स एस. आर. संकलेचा यांच्या बँक खात्यातून बनावट धनादेशाद्वारे परस्पर ५ लाख रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. रमेश माधव निकम असे आरोपीचे नाव आहे.

लाच घेताना कारकुनाला पकडले

0
0
सरपंचांना अपात्र ठरविल्याची निकालप्रत व सर्टिफाईड कॉपी देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अव्वल कारकुनाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कोण असेल शिवसेनेचा उमेदवार?

0
0
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज(शनिवार) नाशिकला येणार आहेत.

अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन जानेवारीमध्ये

0
0
पाचव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साह‌ित्य संमेलनाचे आयोजन जानेवारीच्या पह‌िल्या आठवड्यात नाश‌िकमध्ये करण्यात आले आहे. या दोन द‌िवसीय संमेलनात विविध व‌िषयांवर अभ्यासकांच्या उपस्थ‌ितीत विचारमंथन होणार आहे.

द्वारका परिसरात वाहनांचा ठिय्या

0
0
आधीच अरूंद असलेल्या रस्त्यावर तासनतास उभी राहणारी अवजड वाहने, संध्याकाळी रस्त्यालगत लागणाऱ्या चायनीजच्या गाड्या आणि त्यात रिक्षासह प्रवाशी वाहनांची रांग! ही अवस्था कुठल्या मार्केट परिसरातील किंवा मोकळ्या जागेतील नसून द्वारकाहून टाकळीरोडला जोडणाऱ्या सर्व्हिसरोडची आहे.

घरफोडीत १९ लाखांचे दागिने लंपास

0
0
घर बंद असल्याचा फायदा घेत संरक्षण विभागातून निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ अधिकारी महिलेच्या घरातून चोरट्याने हिरेजडीत दागिन्यांसह तब्बल १९ लाखांचा ऐवज चोरून नेला. जनरल वैद्यनगरमध्ये गुरूवारी दुपारी तीन ते साडेचार या दीडतासात हा प्रकार घडला.

नाशिकला ‘४ जी’चा स्पीड

0
0
झपाट्याने विकासाकडे झेपावत असलेले नाशिक हे लवकरच ४ जीच्या नकाशावर येणार आहे. रिलायन्स कंपनीच्या ४ जी सेवेमुळे शहरातील इंटरनेट, मोबाईलचा स्पीड वाढण्याबरोबरच येथील आयटी इंडस्ट्रीलाही बूस्ट मिळणार आहे.

मोरांचे अस्तित्व धोक्यात

0
0
तालुक्याचे कोकण म्हणून समजल्या जाणाऱ्या पश्चिम डोंगराळ भागातील निसर्गसंपन्न परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापी, जंगलातील शिकाऱ्यांकडून त्यांची सर्रासपर्ण शिकार होत असून, या राष्ट्रीय पक्ष्याचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे.

स्मशानभूमीच्या टेंडरचा घोळ

0
0
महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेसंदर्भात टेंडर देताना महापालिका प्रशासनाने अप्रमाणित कागदपत्रांच्या आधारे ठेका देण्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशी आहे आम आदमी योजना

0
0
आम आदमी विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविली जाते. भूमिहीन, शेतमजूर, २.५ एकर बागायत किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेला शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images