Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...तर त्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीला सहाय्यक निबंधकांनी उपस्थित राहणे अनिवार्य असले तरी बहुतांश सहाय्यक निबंधकांनी वर्षभर अशा बैठकींकडे पाठ फिरविण्यातच धन्यता मानल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले. शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी प्रतीक्षा करावयास लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा देशमुख यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले जिल्ह्यात १५ बाजार समित्या असून, त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकी होत असतात. सहाय्यक निबंधक या समित्यांचे पदसिद्ध संचालक असून, त्यांनी बैठकींना उपस्थित असणे कायद्यानेही बंधनकारक आहे; परंतु जिल्ह्यात अशा बैठकींना संबंधित अधिकारी उपस्थितच राहत नसल्याचे आढावा बैठकीत आढळून आले. चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, पिंपळगाव येथील सहाय्यक निबंधकांनी एकदाही बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीला हजेरी लावलेली नाही, तर लासलगाव व नाशिक येथे फक्त एकाच बैठकीला हजेरी लावली आहे. उमराणे, कळवण आणि मनमाड येथे दोन वेळा उपस्थिती लावण्यात आली. सहाय्यक निबंधकच बैठकींना उपस्थित राहणार नसतील तर बाजार समित्यांच्या कारभारावर वचक कसा राहणार, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला. अशा दांडीबहाद्दर सहाय्यक निबंधकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

संस्थांनी व्यवसायाकडे वळावे

गावोगावी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांची निर्मिती करणे आवश्यक असून, त्यांना आर्थिक स्थैर्यदेखील प्राप्त व्हायला हवे. अशा संस्थांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे, याकरिता त्यांनी व्यवसायाचे मार्ग शोधायला हवेत. या संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या तर शेतकऱ्यांना कर्जासाठी जिल्हा बँकांकडे धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मंत्री देशमुख म्हणाले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील आठ जिल्हा बँकांचे नोटबंदीच्या काळातील पैसे आरबीआयने स्वीकारलेले नाहीत. हा जिल्हा बँक व रिझर्व्ह बँक यांच्यातील अंतर्गत प्रश्न असून, तो न्यायालयीन स्तरावर आहे. पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी कायद्यात बदल केले असून, यासाठी स्थैर्य निधी निर्माण करण्यात येईल. सहकारी संस्थांवर नियंत्रणासाठी नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीदेखील देशमुख यांनी दिली.

'आरटीजीएसचा वापर करावा'

शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांना वेळेत पैसे दिले जात नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. जिल्ह्यात कांदा उत्पादकांच्या बाबतीत असे प्रकार सातत्याने घडतात. कांदा उत्पादकांच्या खात्यात रक्कम थेट जमा करण्यासाठी व्यापारी व बँकांनी आरटीजीएस पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. शेतकऱ्यांना दिले जाणारे धनादेश वटण्यामध्ये वेळ जाऊन रक्कम थकीत राहण्याचे प्रमाण वाढते. पुढील तारखेचा चेक देऊन शेतकऱ्यांचे पैसे महिनोन् महिने लटकवण्याचे प्रकार काही बाजार समित्यांमध्ये सुरू आहेत. या पुढील काळात शेतकऱ्यांची अशा प्रकारे अडवणूक केल्यास संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देशमुख यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांचा ६ मार्चला लाँग मार्च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी प्रवास करीत लाँग मार्च विधानसभेवर काढण्यात येणार आहे. त्यात राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा असून, त्याची सुरुवात ६ मार्च रोजी नाशिकहून होणार आहे. हा मोर्चा मुंबईला गेल्यानंतर विधानभवनाला घेराव घालणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव राहणार असून, ही आरपारची लढाई असल्याची माहिती किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष आमदार जे. पी. गावित यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी त्यांनी नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून ६० हजार, तर उर्वरित राज्यांतून ४० हजार शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगितले. या लाँग मार्चमध्ये सर्व शेतकरी आपल्या शिध्याची व्यवस्था करणार आहेत. सरकारने अटक केली, जेलमध्ये टाकले व लाठीमार केला तरी आम्ही मागे हटणार नसल्याचेही या वेळी गावित यांनी सांगितले. शेती संकटामुळे शेतकरी हलबल झाला आहे. सरकार मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फसव्या घोषणा करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे किसान सभेचा हा आरपार लढा आहे.

मोर्चात वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शिधापत्रिका बदलून द्या, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा, विविध योजनांचा तत्काळ लाभ द्या, वीजबिल माफ करा, विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी उपस्थित होते.

शालिमार चौकातून मोर्चा

शालिमार चौकातून सहा मार्च रोजी मोर्चा निघणार आहे. त्यामुळे शहारात वाहतूक कोंडीचा धोका आहे. नाशिकहून मुंबईकडे निघणाऱ्या या मोर्चात किसान सभेबरोबर विविध संघटना सामील होणार आहेत.

विधानसभेत घुमणार आवाज

नाशिक ते मुंबई लाँग मार्चचे प्रश्न विधानसभेतही घुमणार असून, त्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे या पक्षाचे नेतेही या मोर्चात ठिकठिकाणी भेट देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद द्यावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'राणेंचे सुटत नसेल कोडं.. तर कुठे अडलं घोडं' अस सांगत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरवर आपली भूमिका मांडली. राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी व भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिपद द्यावे, असेही ते म्हणाले. नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या ८८ व्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला ते आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आठवले यांनी अनेक विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली. त्यात राणेंचा प्रश्न आल्यानंतर त्यांनी राणेंना राज्याच्या मंत्रिमंडळात घेतले, तर शिवसेना पाठिंबा काढून टाकेल असेही सांगितले. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही कोसळेल, अशी भीती व्यक्त केली. यावेळी त्यांनी राणे यांना कोणतीच ऑफर मान्य नसले, तर त्यांनी रिपाइंमध्ये यावे असे आवाहनही केले.


शिवसेनेला बरोबर घेणे गरजेचे

गेल्या आठवड्यात दिल्ली येथील भाजपचे नेते रामलाल यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रात राजकारण मजबूत करायचे असेल, तर शिवसेनेला बरोबर घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांना केंद्रात अजून मंत्रिपद द्यावे असेही सांगितले. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, अशी सूचनाही केली. या आठवड्यात मी शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

-

जातीयवादाला काँग्रेस जबाबदार

काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत होती. त्यामुळे जातीयवादाला काँग्रेस जबाबदार आहे. हा पक्ष धर्मनिरपेक्षेची भूमिका मांडत असला तरी त्यांच्यात जातीयवाद आहेच. भाजपला जातीयवादी ते म्हणत असले तरी यातील अनेक नेत हे धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेतात. राज्यात भाजपने आपल्या नेत्यांना संधी न देता दलित, ओबीसी नेत्यांना राज्यसभेत संधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.


दलित ऐक्याचा फॉर्म्युला हवा

दलित ऐक्याची केव्हाही तयारी आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी यायला हवे. त्याचप्रमाणे सर्व पक्षातील दलित नेते व छोटे मोठे गट एकत्र यायला हवे. त्यासाठी एक फॉर्म्यूला तयार करायला हवा. ऐक्यासाठी मंत्रिपद केव्हाही सोडायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.


मराठा-दलित ऐक्य महत्त्वाचे

मराठा-दलित वाद महाराष्ट्राला परवडणारा नाही. दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे. राजकीय फायद्यासाठी कोणी हा वाद घालत असले, तर ते थांबवणे गरजेचे आहे. मराठा समजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे दोन्ही समाजात चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टूरटूर नाटकाला नाशिककरांची गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई विद्यापीठ प्रस्तुत टूरटूर नाटकासाठी प्रेक्षकांनी अमाप उत्साह दाखवत कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृह तुडुंब भरले. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रशांत दामले, विजय चव्हाण अशा दमाच्या कलाकारांना ज्या नाटकाने घडवले, त्यासाठी प्रेक्षकांनी ही उपस्थिती दाखवली.

मुंबईहून कर्नाटकला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची टूर निघते आणि वाटेत जी धमाल होते, त्याविषयी हे नाटक आहे. नाटकात अखिल तिवारी, वासुदेव मदाने, प्रज्ञा चव्हांदे, प्रथमेश जाधव, प्रथमेश चेऊलकर, उपलक्षसिंग कोतवाल, शुभम जिते, अलक्षेंद्र प्रभाकर, सतीश कुमार, भाऊसाहेब सोनवणे, प्रवीण मडके, समीर तभाने, सुमित सासणे यांनी भूमिका केल्या. नीलेश पाटील यांनी गीते लिहिली. की बोर्डवर मिलिंद चंद्रा, निर्मितीप्रमुख डॉ. मिलिंद इनामदार होते.

प्रेक्षकांची प्रचंड गर्दी

नाटकाची वेळ साडेसहाची असूनही सहापासूनच कुसुमाग्रज स्मारकात विशाखा सभागृहाबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावल्या होत्या. टूर टूर हे नाटक ३५ वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर आलेले असून, त्याचा लौकिक मोठा असल्याने त्यासाठी प्रेक्षक उभे होते. विशाखा सभागृह भरून तिन्ही दरवाजांबाहेर प्रेक्षक उभे होते. सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत स्क्रीनची व्यवस्था असती तर आणखी प्रेक्षक येथे उभे राहू शकले असते, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाकार्यानेच बदलले त्रिपुरातील जनमत

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com / Twitter : @jitendratartemt

नाशिक : 'हे कार्यकर्ते आमच्या मुलांसाठी शाळा चालवितात...तुम्ही तर सरकारी शाळाही बंद पाडल्या आहेत. तुम्ही आमच्या लेकरांसाठी काय करतात...असे एका माऊलीने जीवाची पर्वा न करता एका अतिरेक्याला सुनावत त्याच्या तावडीतून माझी सुटका केली... ती माऊली आमच्या एका विद्यार्थ्याची आई होती. त्यावेळी त्याच विद्यार्थ्याच्या घराकडे मी निघालो होतो. त्रिपुरातील माझ्या वास्तव्याच्या काळात एका अतिदुर्गम भागातील सन १९९६ नंतरच्या कालावधीतला प्रसंग आजही माझ्या स्मरणात आहे. त्या माऊलीची आक्रमकता बघून अन् आर्त सवाल ऐकून तो दहशतवादी उलटपावली पसार झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या यासारख्या अनेक आठवणी वनवासी कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री संजय कुलकर्णी यांनी जागविल्या.

कुलकर्णी हे सन १९९६ ते २००३ या कालावधीत वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून सेवाकार्यासाठी त्रिपुरामध्ये होते. ईशान्येकडील राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मटा' ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्रिपुरातील वास्तव्यातल्या असंख्य आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 'सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत मी सध्या असल्याने निवडणूक विषयक भाष्य मी करणार नाही. पण, भारताचाच भाग असणाऱ्या या राज्यांमध्ये एकेकाळी अराजकतेचा कळस झाला होता. सन १९९६ च्या दरम्यानचा तो काळ अतिरेक्यांच्या क्रौर्याची परिसीमा म्हणता येईल. आमच्या सोबतच्या चार प्रचारकांचे अगोदर अपहरण करण्यात आले. तब्बल दोन वर्षे त्यांना सोडविण्यासाठी आश्रमाने टोकाचा संघर्ष केला. पण अखेरीला या चारही प्रचारकांची हत्या या अतिरेक्यांनी केली. स्थानिक दोन समाजात असणारी तेढही तेव्हा एवढा टोकाला गेला होता की अपहरण आणि हत्या या बातम्यांशिवाय दिवसच पूर्ण होत नव्हता. पण, इतक्या टोकाच्या प्रतिकूलतेतही आदिवासी बांधवांची आणि भारतमातेची सेवा वनवासी कल्याण आश्रमाने थांबवली नाही. याच सेवाकार्याने आदिवासी बांधवांच्या मनात विश्वासाचे नाते तयार केले आहे. हा कंगोराही महत्त्वाचा आहे,' या मुद्द्याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

विकासाच्या आयामांवर चार दशके काम

अतिरेक्यांच्या कारवायांपुढे मान न तुकविता ईशान्येतील आदिवासी बांधवांसाठी शिक्षण आणि आरोग्यासारख्या खऱ्या विकासात्मक Ḥआयामांवर वनवासी कल्याण आश्रमाने चार दशकांपासून अथक काम केले आहे. या सेवाकार्याच्या परिणामी आदिवासी बांधवांची मने जिंकली गेली. आश्रमाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी या प्रांतात तन-मन आणि धनाने दिलेल्या योगदानाच्या परिणामी त्रिपुरातील जनमत परिवर्तीत झाले, असा अशी अनुभूती कुलकर्णी यांनी 'मटा' शी बोलताना नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो डीसीआर प्रणालीने मनस्ताप

$
0
0


मटा मालिका, ऑनलाइनचा बोजवारा : ४

vinod.patil.timesgroup.com

tweet-vinodpatilMT

नाशिक : महापालिकेने नागरिकांना गतिमान सेवा व सुविधा देण्यासाठी ऑनलाइन नागरी सुविधा केंद्रे, तसेच ऑटो डीसीआर प्रणाली सुरू केली असली, तरी कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि यंत्रणेतल्या त्रुटींमुळे या सेवांना अद्यापही गती मिळालेली नाही. विशेषत: ऑनलाइन नागरी सुविधा केंद्रे आणि ऑटो डीसीआर प्रणालीच्या यशस्वीतेसाठी कुशल मनुष्यबळ नसल्याने नागरिकांसाठी या सेवा मनस्ताप देणाऱ्या ठरत आहेत.

शहर विकासाशी संबंधित ऑटो डीसीआर प्रणालीतल्या त्रुटी आणि पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ नसल्याने बांधकाम व्यावसायिकांना परवानग्यांसाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. नाशिक महापालिकेने गतिमान, पारदर्शक व पेपरलेस कारभाराला चालना देण्यासाठी नागरिकांना घरबसल्या सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांचा त्रास कमी होऊन यंत्रणेतला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ऑनलाइन सेवांना अधिक बळ दिले आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अभिषेक कृष्णा, तसेच विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढेंनीही त्याच दिशेने पावले उचलली आहेत. नागरिकांच्या तक्रारी असोत वा दाखले, त्यांचे घरबसल्या निदान होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्वांत वादग्रस्त व भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या नगररचना विभागातील बांधकाम परवानग्याही ऑनलाइन केल्या आहेत. स्मार्ट नाशिक अॅप, १९ ऑनलाइन सुविधा केंद्रे सुरू केली आहेत, तसेच नगररचना विभागात ऑटो डीसीआर यंत्रणाही कार्यान्वित केली. त्यातील ऑनलाइन नागरी तक्रारी आणि नागरी सुविधा केंद्रांची कामगिरी चांगली असली, तरी ऑटो डीसीआर यंत्रणेने बांधकाम व्यावसायिक मात्र बेजार झाले आहेत. बांधकाम परवानग्यांमध्ये गतिमानता आणण्यासाठी नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार मे २०१७ पासून महापालिकेच्या नगररचना विभागात ऑटो डीसीआर संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. परंतु, सॉफ्टवेअरमधील त्रुटी, तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता यामुळे ऑटो डीसीआरचे भवितव्य अंधारात लोटले गेले आहे. आतापर्यंत बांधकाम परवानगीची ७३० प्रकरणे सादर झाली, त्यापैकी फक्त १६४ प्रकरणांना ऑनलाइन मंजुरी मिळाली. त्रुटीमुळे जवळपास ३२४ प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत, तर २४२ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. परिणामी अनेकांना ऑनलाइन बांधकाम परवानग्यांसाठी मोठा द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील गुंतागुंत आणि तांत्रिक मनुष्यबळ व यंत्रणेतल्या त्रुटींमुळे ऑटो डीसीआर यंत्रणाही बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्टसाठी मनस्ताप देणारी ठरली आहे.

१५ हजार अर्ज पडून

स्मार्ट नाशिक अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जोमात झाला असला, तरी ऑनलाइन नागरी सुविधा केंद्रांचे काम धीम्या गतीने सुरू आहे. मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, नळजोडणी, डॉग लायसन्स, जन्म-मृत्यूचे दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, अग्निशमन दल परवाने, हॉस्पिटल्स नूतनीकरण दाखले अशा विविध प्रकारच्या ४५ सेवा ऑनलाइन दिल्या जातात. जुलै २०१७ पासून सुरू झालेल्या या ऑनलाइन केंद्रांचा ७९ हजार ९० नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यापैकी ६४ हजार नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. परंतु, त्यात सर्वाधिक घरपट्टी, पाणीपट्टी भरणा आणि जन्म-मृत्यूच्या दाखल्यांचा समावेश आहे. अन्य सेवा जलद पुरविण्यासाठीचे आवश्यक कुशल मनुष्यबळ नसल्याने महत्त्वाच्या दाखल्यांसंदर्भातील जवळपास १५ हजार दाखले अजूनही प्रलंबितच आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्सचा ‘आक्रोश’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात हॉकर्स झोनच्या बळपूर्वक अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यावरील टपरीधारक, फेरीवाले, हॉकर्सविरोधात सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई, तसेच घरपट्टी करवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय हॉकर्स व टपरीधारक कृती समितीतर्फे महापालिका मुख्यालय अर्थात, थेट राजीव गांधी भवनावरच शनिवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

नूतन आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहर फेरीवाला धोरणाची जोरदार अंमलबजावणी सुरू केली असून, त्यासाठी बळाचाही वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांसह फुलवाले, हॉकर्स यांच्यावर कारवाई केली जात आहे. या कारवाईला सर्वपक्षीय हॉकर्स व टपरीधारक संघटनेने विरोध केला आहे. महापालिकेच्या कारवाईविरोधात आणि करवाढीच्या निषेधार्थ शनिवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय हॉकर्स संघटनांनी महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढून कारवाई थांबविण्याची मागणी केली. महापालिकेच्या कारवाईच्या निषेधाच्या घोषणा देत राजीव गांधी भवनावर हा मोर्चा धडकला. तेथे मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला.

शहर फेरीवाला समितीची मंजुरी नसताना दि. १५ मार्च २०१६ रोजीच्या महासभेत मान्यता देण्यात आलेल्या हॉकर्स झोनच्या ठरावाची अंमलबजावणी स्थगित करण्यात यावी, शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण केले जावे, हॉकर्स, नो हॉकर्स झोनविषयी संघटनेने सुचविलेल्या पर्यायांची तातडीने अंमलबजावणी केली जावी, हॉकर्स नोंदणी व दैनंदिन करवसुली शुल्काबाबत शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन चर्चा करावी, तोपर्यंत महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत जप्त केलेला हॉकर्स, टपरीधारक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा ऐवज त्वरित परत करावा, वाढीव घरपट्टीचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात सय्यद युनूस, नवनाथ ढगे, शशिकांत उन्हवणे, शिवाजी भोर, संदीप जाधव, अजय बागूल, पुष्पाताई वानखेडे यांचा समावेश आहे.

घोषणांनी दणाणला परिसर

बी. डी. भालेकर मैदानापासून काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चादरम्यान मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला. मुंढे साहेब गो बॅक, स्मार्ट सिटीची लई घाई, गरिबांच्या पोटावर पाय देई, हातगाडी, टपरी वहीं लगाएंगे, करवाढ रद्द करा... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. फेरीवाल्यांना विश्वासात घेऊनच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, तोपर्यंत हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांविरोधात सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचे कामे अर्धवट

$
0
0

वास्को परिसरात खड्डे कायम; वाहतुकीला अडथळा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील वास्को चौक परिसरातील रस्त्यांची कामे अर्धवट व दर्जाहीन करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांनी याबाबत लक्ष देऊन रस्ते चांगल्या दर्जाचे कसे होतील हे पाहण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या भागातील मुक्तिधाम समोरून मशिद रोडने वास्को हॉटेल चौकात जाता येते. हा रस्ता काही दिवसांपूर्वी खड्ड्यांनी भरला होता. या रस्त्याने वाहन चालवणेही अवघड झाले होते. आता या रस्त्यावरील खड्डे बूजवून रस्ता अर्धा का होईना डांबरीकरण करण्यात आला आहे. मात्र, दिव्या दुकानासमोरील चौकातून वास्को हॉटेलकडे जाताना रस्ता दुरुस्तच केलेला नाही. येथील खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. हा रस्ता अरुंद असून, येथील वाहतूक वाढलेली आहे. त्यातच खड्ड्यांमुळे वाहतूक काही तासांसाठी खोळंबून अपघात होत आहेत. अशा परिस्थितीत या अर्धवट रस्त्याच्या कामांना केव्हा मुहूर्त लागणार, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.


याच परिसरातून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे जाताना राजेंद्र चौक लागतो. त्याशेजारीच अण्णा हजारे मार्ग आहे. राजेंद्र चौकाच्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडलेले आहेत. रिक्षासारखी वाहने खड्डा आल्यावर गती कमी करूनच जातात यावरून रस्त्याची दुरवस्था लक्षात येते. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. इतक्या लवकर हा रस्ता उखडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे तातडीने करण्यात आलेली ही रस्ता दुरुस्तीची कामे दर्जाहीन असल्याचा आरोपही नागरिकांनी करीत आहेत. येथील तसेच वास्को चौक परिसरातील रस्ते तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

विक्रेत्यांची सोय केल्यास प्रश्न सुटेल

वास्को चौक, मशिदरोड, राजेंद्र चौक, मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमण निर्मूलन, अनधिकृत पार्किंग यामुळे वाहनांच्या वाहतुकीला अडथळा येत आहे. वास्को चौकातील टपऱ्यांची अतिक्रमणे महापालिकेने नुकतीच हटवली होती. त्यामुळे रस्ते मोकळा श्वास घेतील, असे वाटले होते. मात्र, खड्ड्यांमुळे परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. नाशिकरोड उड्डाणपुलाखाली भाजी व फळविक्रेते यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे जागा न मिळालेले विक्रेते या तिन्ही चौकांतच व्यवसाय करतात. त्यांची सोय करण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास या परिसरातील फेरीवाल्यांची संख्या कमी होऊन वाहतुकही सुरळीत होईल. नागरिकांच्या जीवाला असलेला धोका टळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमृतधाम परिसरात नवविवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अमृतधाम परिसरातील एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. यामागील नेमके कारण समजू शकले नसून, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाता रूपेश मालुंजकर (वय २८, रा. गोपाळनगर, अमृतधाम, पंचवटी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. गेल्या महिन्यात २२ फेब्रुवारी रोजी सुजाताचे लग्न जवळच्या नातेसंबंधात करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. या नवविवाहितेने शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी या नवविवाहितेस अमृतधाम परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत नवविवाहितेला मृत घोषित केले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी नवविवाहिता मृतावस्थेत असून, गळ्यावर गळफास घेतल्याच्या खुणा असल्याचे डॉ. नितीन जाधव यांनी पंचवटी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हंटले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस उपनिरीक्षक योगेश उबाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्विंकल’चे पाय खोलात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनी विरोधात फसवणूक झालेल्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. आतापर्यंत ३२ तक्रारदार पुढे आले असून त्यांच्या तक्रारीनुसार एक कोटी ७० लाख रुपयांच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली. या दोन्ही कंपन्यांविरोधात सर्वप्रथम गुरुवारी एका विधवा महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी या दोन्ही कंपनींविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक ठेवीदार व गुणवणूकदारांनी शुक्रवार व शनिवारी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये येऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. सुमारे ९० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार या दोन दिवसात दाखल झाल्याने फसवणुकीचा आकडा आता एक कोटी ७० लाखांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्या विरुद्ध लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कमी वेळात जास्त व्याज या आमिषाला भुलून नागरिकांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यासाठी स्थानिक एजंट्सला हाताशी धरून घसघशीत कमिशनही दिले. स्थानिक एजंट्सनी आपल्याच नात्यातील व ओळखीच्या लोकांचे यात पैसे गुंतवून दिले. एकट्या लासलगाव परिसरातून शंभर कोटींच्या आसपास ठेवी गुंतवल्याचे समजते. त्यामुळे मात्र आतापर्यंत केवळ दीड ते दोन कोटींच्या तक्रारी आल्या आहेत. येत्या काही दिवसात तक्रारदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून, फसवणुकीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे

गुंतवणूकदार रडकुंडीला

या कंपन्यांमध्ये पैसे अडकविण्यासाठी गळ घालणाऱ्या एजंट्सला अटक करावी, त्यांच्याकडील वाहने जप्त करावीत अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. गुरुवारी लासलगाव पोलिस ठाण्यात या कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तक्रारींचा वाढता ओघ पाहता याप्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. ट्विंकल कंपनीने गुंतवणूकदारांना व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखविले. तसेच मुंबई येथील या चिटफंड कंपनीने राज्यात मोठा घोटाळा केला. त्यानंतर कंपनीने नाव बदलून सिट्रास या नावाने कंपनी उघडली. त्याद्वारे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये ठेवीदारांना गंडा

सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे नाशिक शहरातही अनेक एजंट व कार्यालये आहेत. तेथेही अनेक लोकांना फसविल्याची माहिती आहे गांगुर्डे नावाच्या एजंटच्या सांगण्यावरून लोकांनी गुंतवणूक केली. कंपनीचे अशोक स्तंभावरील कार्यालयात मूळ पॉलिसी व कॅन्सल चेक २२ जून २०१७ एनइएफटीद्वारे जमा केले. फेब्रुवारी २०१८ ला रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्याआधीच फसवणूक झाल्याचे गुणवणूकदार अशोक देवरे (जाणता राजा कॉलनी, नवीन दत्तनगर, पेठ रोड नाशिक) यांनी 'मटा'ला कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आय लव्ह नाशिक’ रुजविणाऱ्या नेहा...

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet :@bharvirkarPMT

स्त्री ज्या वातावरणात वाढते त्याच ठिकाणी तिला आयुष्यभर राहायला मिळाले, तर तिच्याकडून नक्कीच काही तरी नवीन घडते. नव्या जागी जाऊनही ती नवे घडवते. परंतु, त्यासाठी काळाची मर्यादा तिचा वेग मंदावणारी ठरू शकते. म्हणूनच नवे काही घडविण्यासाठी ओेळखीचा परिसर, ओळखीची माणसे, मार्गदर्शक यांचा अनुकूल परिणाम होतो. नेहा महाजन यादेखील त्याला अपवाद नाहीत. रंगांच्या माध्यमातून नाशिक शहराचा कायापालट घडविण्याचा त्यांचा मानस असून, गेल्या वर्षी त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशन रंगवले आणि यंदा सीबीएस बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलवला आहे.

नाशिकचेच माहेर व सासर लाभलेल्या नेहा इंटेरिअर डिझायनर असून, काही तरी नवे करण्याची उर्मी त्यांना हँड फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदापर्यंत घेऊन गेली आहे. हँड फाउंडेशन ही एक वेगळी संकल्पना घेऊन त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या. कामाची धडाडी आणि प्रामाणिकपणा यामुळे कमी कालावधीत त्यांच्या फाउंडेशनने नाशिककरांवर गारुड केले आहे.

नेहा यांचे शालेय शिक्षण के. एन. केला शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी एनडीएमव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. बॅचलर ऑफ डिझाइन (इंटेरिअर डिझाइन) झाल्यानंतर पती ललित महाजन यांच्यासमवेत त्यांनी २०१३ पासून इंटेरिअर डिझाइनचे काम सुरू केले. घरात उद्योगाची कोणताही पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला. हळूहळू कामाचा दर्जा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांना लोकांचा पाठिंबा आणि कामही मिळत गेले. आतापर्यंत नेहा यांनी ७० प्रोजेक्ट पूर्ण केले असून फ्लॅट्स, बंगले, हॉस्पिटल, सलून, हॉटेल यांचा त्यात समावेश आहे.

हँड फाउंडेशन हे शहरातील विविध समस्यांमध्ये सुधारणा करणे आणि शहरातील कलाकारांना पाठिंबा देऊन त्यांना त्यांना आयुष्यात यशस्वी करण्यासाठी काम करते. या फाउंडेशनची स्थापना गतवर्षी ८ जानेवारी २०१७ रोजी पती ललित महाजन आणि नेहा यांनी केली. ललित व नेहा महाजन यांचा आंतरजातीय विवाह असूनसुद्धा घरातील सर्वांनी पाठिंबा दिला. त्यामुळे काम करण्याचे बळ मिळाले. अनेकदा आपली शक्ती समोरच्याला समजावण्यात खर्च होते. परंतु, नेहा यांना तसे काही करावे लागले नाही. त्यांनी हँड फाउंडेशनच्या माध्यमातून प्रचंड काम केले आहे. हँड फाउंडेशन यंदाच्या वर्षी असा काही उपक्रम राबविणार आहे, की नाशिकमध्ये हा उपक्रम झाल्यास संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधले जाणार आहे, असा आत्मविश्वास नेहा यांना आहे. हँड फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण शहराला नैसर्गिकरीत्या सजावून एक नवे रूप देण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.

उत्कट प्रेमाचा संदेश

हँड फाउंडेशनने मागील वर्षी व्हॅलेंटाइन डेनिमित्त आय लव्ह नाशिक हा उपक्रम सुरू केला. त्यात त्यांनी असा विचार केला, की व्हॅलेंटाइनचा अर्थ केवळ प्रियकर-प्रेयसीपुरताच मर्यादित न ठेवता आपण आपल्या शहरावर तितकेच उत्कट प्रेम करू शकतो. हाच संदेश देण्यासाठी हँड फाउंडेशनने आय लव्ह नाशिक या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले. त्यात गेल्या वर्षी नाशिकरोड रेल्वे स्थानक रंगवले. तेथील सर्व भिंतींवर विविध विषयांवर ग्राफिटी करून रेल्वे स्टेशनचा कायापालट करून स्टेशनला एक आकर्षक रूप प्राप्त करून दिले. नाशिकला आणि नाशिककरांना ही प्रेमाची आगळीवेगळी भेट होती.

सीबीएसचे पालटले रुपडे

यंदाच्या वर्षी हँड फाउंडेशनने जुन्या मध्यवर्ती बसस्थानकचे नूतनीकरण करून नाशिकला पुन्हा एक सुंदर भेट दिली. अत्यंत वाईट अवस्थेत असलेले जुने बस स्थानक स्वच्छ करून संपूर्ण इमारतीला पूर्ण वेगवेगळ्या रंगांनी रंगवून त्यावर ग्राफिटी करण्यात आली. बसस्थानकाच्या परिसरातील सर्व भिंती निवडून त्यासाठी निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवर समाजप्रबोधनपर ग्राफिटी करण्यात आल्या आहेत. नेहा यांनी कलाकार निवडून हे काम त्यांना सुपूर्द केले. त्यांचा विश्वास होता, की जुन्या सीबीएसचे रूप बदलून जाणार आणि त्याप्रमाणेच झाले. आज सीबीएसवर जाणारा प्रत्येक जण हँड फाउंडेशनचे कौतुक करताना दिसत असून, याचे सर्वस्वी श्रेय नेहा महाजन यांचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत नळजोडणीला चाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरात अनधिकृत नळ कनेक्शनची शोधमोहीम सुरू केली असून, या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १२९ अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीत नळ कनेक्शन नियमित केले नसल्याने पाणीपुरवठा विभागाने या सर्व १२९ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.

महापालिकेने पाणीगळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी अभय योजना सुरू केली होती; परंतु या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने २१ फेब्रुवारीपासून शहरात सहा विभागांत अनधिकृत नळ कनेक्शनची शोधमोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. याअंतर्गत अनधिकृत नळजोडण्या बंद करणे व अनधिकृत नळजोडणीधारक व त्यास जबाबदार असलेले नळ कारागीर (प्लंबर) यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व विभागांतील पाणीपुरवठा अभियंत्यांमार्फत कारवाई सुरू असून, आतापर्यंत १२९ अनधिकृत नळजोडण्या शोधण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे. या अनधिकृत नळजोडणीधारकांवर वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ श्वानाला मिळाली ‘शरण’ची ऊब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

प्राणियोमे सद्भावना हो, विश्व का कल्याण हो...हे सुभाषित आपण सर्वत्र ऐकतो, वाचतो. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराविक घटकच पुढे येतांना दिसून येतात. नाशिकमधील शरण फॉर अॅनिमल या संस्थेने थेट कळवण गाठत आजारी व सर्वांनी दुर्लक्षित केलेल्या श्वानाला पकडून त्याला उपचारासाठी नाशिकला हलविले आहे. मुक्या प्राण्याप्रति असलेले प्रेम, सद्भावना बघून कळवणकरांना मात्र गोड धक्का बसला.

शनिवारी, ३ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास कळवण बस स्थानकात एक जखमी कुत्रे बसलेले होते. त्याच्या अंगावर केसही नव्हते. हे कुत्रे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात भटकत होते. मात्र शनिवारी त्याला नाशिकच्या 'शरण फॉर अॅनिमल' या संस्थेने जाळी टाकून ताब्यात घेण्यात. त्याला वातानुकूलित वाहनात टाकून नाशिक नेण्यात आले.

पुण्याहून कळवणला लग्नसमारंभासाठी आलेल्या एका महिलेने नाशिकच्या या संस्थेच्या देविका भागवत, श्रीदेवी चाफेकर, प्रथमेश पाटील यांना चार दिवसांपूर्वी संपर्क साधून कळवण बस स्थानक परिसरात बेवारस फिरत असलेल्या या कुत्र्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार ही टीम शनिवारी सकाळी १० वाजता कळवणला आली. दोन तासाच्या शोधानंतर हे आजारी कुत्रे त्यांनी ताब्यात घेतले. या कुत्र्याची शारीरिक अवस्था अत्यंत बिकट असून, अंगावर एकही केस नाही. आठवडाभर उपचार करून त्यास संपूर्णपणे सक्षम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीकडे त्याला संगोपनासाठी सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती शरण फॉर अॅनिमल संस्थेच्या देविका भागवत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईचा रंगोत्सवात जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील उपनगरांमध्ये शहरातील मध्यवर्ती परिसरात शुक्रवारी (दि. २) धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण जळगावनगरीत रंगोत्सवाची धूम दिसून येत होती. शहरातील विविध सामाजिक मंडळ व संस्थांकडून आयोजित रंगोत्सवात डी. जे. च्या गीतांवर नृत्य करीत रंगोत्सवात न्हाऊन निघाले.

होळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी सपूंर्ण खान्देशात धूलिवंदन साजरे केले जाते. शुक्रवारी (दि. २) सकाळपासूनच संपूर्ण जळगावात रंगोत्सवाला सुरुवात करण्यात आली. कॉलेजेसच्या हॉस्टेल, नगर, कॉलनी, चौक अशा प्रत्येक ठिकाणी धूळवड साजरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. रेन डान्सवर जरी बंदी असली, तरी अनेक ठिकाणी डी. जे. वर गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी अनेक युवक व युवतींनी सहभाग घेतला. होळी मोठ्या उत्साहात साजरी केल्यानंतर यंदा धूळवडचे सेलिब्रेशनही तितक्याच उत्साहात झाले. विकेण्डला आलेल्या धूळवडमुळे या सेलिब्रेशनला चारचाँद लागले होते. सकाळपासूनच रस्त्यावर एकमेकांना रंगाने माखवून टाकण्यासाठी युवकांच्या टोळ्या फिरत होत्या.

कॉलेजांमध्येही धूम

सध्या परीक्षांचे दिवस चालू आहेत. त्यामुळे सलग चार दिवस सुट्या असल्या, तरी विद्यार्थ्यांनी घरी न जाता हॉस्टेलमध्ये राहणे पसंत केले. त्यामुळे एम. जे. कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी धूळवडचा आंनद घेतला. धूलिवंदनाच्या दिवशी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलिस अधीक्षक दत्तात्रय कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या सणादरम्यान तळीराम व मोटार वाहन कायद्याअंतर्गत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शहरातील मंडळांकडून ठिकठिकाणी डि. जे. लावण्यात आले होते. दरम्यान त्याठिकाणी काही टवाळखोंरांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होती.

रेन डान्सचे विशेष आकर्षण

रंगोत्सव साजरा करण्यासाठी सामाजीक संस्थाकंडून नेहरु चौकात व सागरपार्क, नुतन मराठा महाविद्याल यासह ठिकठिकाणी कॉलन्यांमध्ये डि.जे. लावण्यात आले होते. दरम्यान डि.जे.च्या तालावर व रेन डान्स मध्ये पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद लुटत डि.जेच्या तालावर तरुणाईने प्रचंड धूम केली.

बुरा ना मानो होली है!

नूतन मराठा महाविद्यालयात साहस फाउंडेशनतर्फे ‘सप्तरंग नारीशक्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सहभागी झालेल्या महिलांनी एकमेकांना रंग लावून डिजेच्या तालावर ठेका धरून जल्लोष केला. तसेच लहानग्यांनी मोठ्यांना कलर लावत ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत रंगोत्सवात चांगलीच धम्माल केली. पूर्वी रंगपंचमीला केमिकलयुक्त रंगाची उधळण केली जायची. परंतु, या रंगांमूळे शरीराला इजा होत असल्यामुळे नागरिकांकडून कोरड्या पारंपरिक इको फ्रेंडली रंगांना अधिक पसंती दिली जात होती. तसेच त्यांच्याकडून केमिकलयुक्त रंगांची खरेदी न करता त्यांनी पारंपरिक असलेल्या कोरड्या रंगांची उधळण करीत व लाखो लिटर पाण्याची बचत करून इको फ्रेंडली रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली.

नंदुरबारला ‘काठी होळी’ चा उत्साह

धुळे : खान्देशातील आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रागांमधील काठीची राजवाडी होळी शुक्रवारी (दि. २) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. ढोल,बासरी, शिट्ट्यांच्या सुमधूर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भूरळ घालत होता. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरांवर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी होळी पेटवून होलिकोत्सव साजरा केला. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजवाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या ‘काठी’ संस्थांची होळी याहीवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झाली. कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही. तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामिल झाले होते. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांची नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील आदिवासी बांधव सर्वांचे लक्ष वेधत होते. आदिवासी समाजजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचे म्हटले जाते. सन १२४६ पासून सुरू झालेल्या होलिकोत्सवाने आजही आपले पारंपरिक रूप कायम ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सरसकट १८ टक्के करवाढ

$
0
0

आयुक्तांचा भरमसाट करवाढीचा प्रस्ताव फेटाळला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेवर ठेवलेला ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंतच्या मालमत्ता करात भाडेमूल्याच्या आधारे भरमसाट करवाढीच्या प्रस्तावाला सर्वच स्थरावरून विरोध झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने करवाढीसंदर्भात नमते घेतले आहे. मुंढेंनी ठेवलेला करवाढीचा तीन टप्प्यातील ठराव महापौरांनी फेटाळून लावला असून, स्थायी समितीच्या सरसकट १८ टक्के भाडेमूल्यावर आधारीत करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, आयुक्त मुंढेंना मात्र जोरदार झटका बसला आहे.

नव्या करवाढीच्या प्रस्तावामुळे महापालिकेच्या तिजोरीत १२ कोटी ६० लाखांची भर पडणार आहे. परंतु, या ठरावावरून महापालिकेत पुन्हा मुंढे विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहणार आहे. नूतन आयुक्त तुकाराम मुंढेंनी सूत्रे हाती घेताच तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळातील प्रस्तावात सुधारणा करीत त्यात भरघोस वाढ केली होती. निवासी मालमत्ता करात ३३ टक्के, अनिवासी मालमत्ता करात ६४ तर औद्योगिक मालमत्ता करात तब्बल ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यााच प्रस्ताव ठेवला होता. तसेच, भांडवली मूल्यावर आधारित करवाढीचा आग्रह प्रस्तावात धराला होता. मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावत सरसकट १८ टक्के करवाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिककरांना थोडा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षांनीही महापौरांचे या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रशासनाने प्रथम ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. करवाढीसंदर्भात सर्वंकष विचार करूनच निर्णय घेण्यात आला असून, सर्वसामान्य नागरिक ते उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पन्न वाढविण्याचेही प्रयत्न केले आहेत.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकूर समाजबांधवांसाठी आज कायदेविषयक कार्यशाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या १५ ते १८ वर्षांपासून वैधता प्रमाणपत्रासाठी ठाकूर समाजाचा प्रचंड संघर्ष सुरू आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या समाजबांधवांना कायदेविषयक अडचणी आणि सरकारच्या वतीने अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यांची माहिती होण्यासाठी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा ठाकूर समाज मंडळाच्या वतीने आज ( दि. ४) सकाळी १०:३० वाजता गंगापूर रोड येथील विश्वास लॉन्स येथे हे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, त्या अनुषंगाने येणारे आदेश व समाजाच्या विविध विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ विधीत्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्यात अॅड. रामचंद्र मेंदाळकर, अॅड. महेश देशमुख, अॅड. अनिल गोळेगावकर, अॅड. आनंदसिंग बायस, अॅड. सुशांत ऐरमवार आदी मार्गदर्शन करतील. या वेळी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आपल्या अडचणींवर ते मार्गदर्शन करणार असून, त्यासाठी लिखित स्वरूपात आपले प्रश्न कार्यशाळा सुरू होण्याआधी द्यायचे आहेत.

तांत्रिक अडचणींचे शंका निरसन होणार

ठाकूर समाजबांधव जमातीच्या सवलतीचा शासकीय नोकरी, शालेय शिक्षण, व्यवसायासाठी लाभ घेत असून, त्यामध्ये येणाऱ्या कार्यान्वित केल्या जात असून त्यासाठी जातीचे वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. बऱ्याच समाजबांधवांकडे १९५० पूर्वीचे दाखले आहे त्या आधारे सवलतींचा मिळविण्यासाठी ते वैधता प्रमाणपत्रात तांत्रिक अडचणींचे शंका निरसन करण्यासाठी या कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, अधिकाधिक समाजबांधवांनी यावेळी उपस्थित राहत आपल्या शंकाचे निरसन करून घ्यावे. या कायदेविषयक कार्यशाळेचा लाभ सर्व समाजबांधवानी घेण्याचे आवाहन ठाकूर समाज मंडळाचे राज्य सरचिटणीस रणजीत शिंदे, राज्य अध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर, कायदे सल्लागार दीपक चव्हाण, जिल्हा सरचिटणीस नीलेश ठाकूर आदींनी केले आहे.


‘समाज कल्याण’कडून सामाजिक कायद्यांवर मंगळवारी कार्यशाळा

जेलरोड : समाज कल्याण विभाग व समाजकार्य महाविद्यालय यांच्यातर्फे मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेदहा वाजता ‘नागरी हक्क संरक्षण, विविध सामाजिक कायदे व धोरणा’ यावर गंगापूर रस्त्यावरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात एक दिवसीय विभागीय कार्यशाळा होणार आहे. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल, प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, प्राचार्य विलास देशमुख, सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पहिल्या सत्रात बारापर्यंत सी. एल. थूल यांचे ‘नागरी हक्क संरक्षण अधिनियम-१९५५ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-१९८९’ या विषयावर व्याख्यान होईल. बारा वाजता जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे ‘सामाजिक कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ यावर तर दुपारी दोन वाजता अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’वर मार्गदर्शन करतील, असे आयोजकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाघाटचा श्वास मोकळा

$
0
0

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाकडून स्वच्छता

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाघाटाच्या पार्किंगच्या जागेत वाहने थांबविण्याबरोबरच नदीपात्रातील पाणी घेऊन वाहने धुण्याचे प्रकार सुरू होते. या भागाला सर्व्हिस सेंटरचे स्वरूप आले होते. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने महापालिकेला आदेश काढल्यानंतर गोदापात्रात धुणी धुणे, भांडी घासणे, जनावरे धुणे, वाहने धुणे हे प्रकार बंद करण्यात आले. गोदाघाटाच्या परिसरात वाहने धुणे बंद झाल्यामुळे येथील प्रदूषण होण्यास आळा बसला आहे.

गोदाघाटाचा गाडगे महाराज पूलाच्या दक्षिणेचा भागात शहर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या आणि पर्यटकांच्या वाहनांची पार्किंग केले जाते. या पार्किंगच्या जागेतच वाहने थांबल्यानंतर ती वाहने धुतली जात असत. तसेच रिक्षा, दुचाकीस्वार वाहने थांबवून येथे वाहने धुत होते. काही मुलांनी तर येथे पैसे घेऊन वाहने धुण्याचे कामे सुरू केली होती.

या भागातून अवैधरित्या वाळू काढण्यात येत होती. ही काढलेली वाळू याच पाण्याच्या उपयोग करून धुतली जात होती. हे प्रकारही आता बंद करण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या गोदाघाट पाहणीच्या दौऱ्यानंतर येथील वाळूचे ढिगारे ठेऊन त्याची विक्री करणाऱ्यांवर हाकलण्यात आल्यानंतर येथील सर्व परिसर मोकळा झाला आहे. आता खऱ्या अर्थाने गोदाघाट मोकळा श्वास घेत असल्याचे दिसते.

कारवाईनंतर वाहने धुणे बंद
वाहने धुतली जात असल्यामुळे वाहनांवरची धूळ, चिखल, ग्रीस, ऑईल हे गोदापात्रात मिसळले जात होते. दिवसभरात शेकडो वाहने धुतले जात असल्यामुळे गोदावरीचे प्रदूषण वाढत होते. या विषयाकडे महापालिका दुर्लक्ष करीत होती. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना केली. या कक्षाच्या स्थापनेनंतर गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. या कारवाईमुळे येथे वाहने धुण्याचे प्रकार बंद झाले. त्यामुळे गोदावरीत ऑईल, धूळ आदींचे होणारे प्रदूषण रोखले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये बिबट्या आल्याची अफवा!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथे सिद्धिविनायक नगर परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चेने शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी नागरिकांत अस्वस्थता पसरली. पोलिसांनाही कोणीतरी दोन बिबटे परिसरात आल्याबाबातचा निनावी फोन केल्याने पोलिसांनी रात्री या भागात गस्त घातली नागरिकांत घबराहट पसरली. दरम्यान परिसरात एका शेळीला हिंस्त्र श्वापदाने जखमी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी येवला येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वनविभागाने परिसरात शोध घेवूनही कोणताही हिंस्त्र प्राणी आढळून आला नाही.

मनमाड येथील सिद्धिविनायक नगर परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या आल्याच्या वृत्ताने नागरिकांत खळबळ उडाली. काही नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये फोन करून बिबट्या आल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण काहीही आढळून आले नाही. येवला येथील वन अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. त्यांनही परिसर पिंजून काढले. कोठेही बिबट्या अथवा त्याच्या पायाचे ठसे दिसले नाही. दरम्यान परिसरातील एका शेळीवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे नागरिकांचा संशय बळावला. हा हिंस्त्र प्राणी बिबट्या नसून तरस असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. दरम्यान सिद्धिविनायक नगरात नागरिकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. अद्यापही नागरिकामध्ये घबराहट पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविस्मरणीय बाइक रॅलीचे व्हा साक्षीदार!

$
0
0

लोगो व फोटो

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील विविध महिला मंडळे, ऑफिस ग्रुप, किटी पार्टी ग्रुप्स, तसेच कॉलेजियन्सचे ग्रुप्स या सर्वांनी 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅली'मध्ये सहभागासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. महिलांची एकजूट अन् जल्लोष असणाऱ्या रॅलीत सहभागी होण्यासाठी बाइकर्णींची उत्सुकता वाढली आहे. खास बाब म्हणजे, ११ मार्च रोजी होणाऱ्या अविस्मरणीय आणि हक्काच्या ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी होण्यास आतुर झाल्याची मते बाइकर्णींनी व्यक्त केली आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने 'ऑल वुमेन्स बाइक रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रांत महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. यासोबतच विविध प्रकारच्या बाइक्स चालवण्यातदेखील महिला वर्ग माहीर झालेला दिसतो. महिलांची एकजूट आणि रोजच्या धकाधकीच्या व्यापातून वेळ काढत धम्माल अनुभवण्यासाठी या रॅलीचे खास आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये ११ मार्च रोजी ही रॅली होणार आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, तसेच मोपेड बाइकपासून तर बुलेट, स्पोर्ट्स बाइक आणि व्हिंटेज बाइकसह महिला सहभागी होणार आहेत. यासाठीची तयारी आतापासूनच महिलांनी सुरू केली आहे. आपली बाइक सजवण्यापासून ते खास ड्रेसअपची तयारी या खास बाइक रॅलीनिमित्ताने केली जात आहे. ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅलीसाठी महिला वर्ग ग्रुप्सने आपले रजिस्ट्रेशन करीत आहेत. तुम्हीदेखील लवकरात लवकर ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे रजिस्ट्रेशन करीत या अविस्मरणीय बाइक रॅलीचे साक्षीदार व्हा.

वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी झाल्यावर नारी शक्तीचा सन्मान होतोच. सोबतच अतिशय उत्साहवर्धक आणि जल्लोषपूर्ण वातावरणामुळे महिलादिन यादगार ठरतो. गेल्या तीन वर्षांपासून आमचा ग्रुप वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी होत आहे.

- संध्या पवार-ठाकूर

असे करा रजिस्ट्रेशन

ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्या. तेथे रजिस्ट्रेशन या सेक्शनला भेट दिल्यानंतर नावनोंदणी करता येईल. मोबाइल एसएमएसद्वारेसुद्धा नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी PowerrallyNSK हा मेसेज टाइप करून तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवायचा आहे.

तयारी फॅशनेबल ड्रेसअपची...

ऑल वुमेन्स बाइक रॅली केवळ बाइक चालवण्यापुरतीच मर्यादित नाही, तर या निमित्ताने खास ड्रेसअपदेखील सहभाग घेणाऱ्या महिलांना करता येणार आहे. नऊवारी साडी, फेटे यांपासून वेस्टर्न आउटफिटपर्यंत ड्रेसअप करीत महिला बाइक रॅलीत सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे, यासाठीची खास खरेदी महिलांनी सुरू केली आहे. आपला पेहराव सगळ्यात हटके असावा, यासाठी प्रत्येक बाइकर्णी नियोजन करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कर भरती घोटाळा विशाखापट्टणमपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिकसह जळगाव आणि इतर ठिकाणी शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीने देशभरातील विविध राज्यांमध्ये हातपाय मारल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या विशाखापट्टणम येथील आठ मुलांनी तशी कैफीयत पाचोरा (जळगाव) पोलिसांकडे मांडली आहे. या मुलांची जवळपास साडे एकोणतीस लाखांची फसवणूक झाली आहे.

लष्करी सेवेत असलेला सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख हा मागील वर्षी सुटीवर आल्यानंतर पुन्हा सेवेत हजरच झाला नाही. तेव्हापासून लष्काराने त्यास भगोडा घोषित केले होते. हुसनोद्दीन लष्करी सेवेत असल्यापासून तरुणांकडून पैसे घेऊन बेकायदा भरती प्रक्रिया राबवित असावा, असा पोलिसांना अंदास आहे. मात्र, लष्कारातून पळून आल्यानंतर हुसनोद्दीनने आपले बेकायदा काम वाढविले. अहमदनगर जिल्ह्यात दोन घरे असलेल्या हुसनोद्दीनने लष्करात नोकरी देण्याचे आमिष दाखवून शेकडो मुलांकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. या प्रकरणी संशियतासह त्याची पत्नी रेश्मा आणि मुलगा वजीर याच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तसेच अन्य एका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती देताना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, संशयिताविरोधात जवळपास ४५० तक्रारी आल्या असून, फसवणुकीचा आकडा सात कोटी रुपयांच्या पुढे सरकाला आहे. संशयित आरोपीने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी याच पद्धतीने बेरोजगारांची फसवणूक केल्याचा पोलिस कयास असून, फसवणूक झालेल्या विशाखापट्टणम येथील आठ तक्रारदारांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. नोकरी लावून देण्याच्या बदल्यात संशयित आरोपीने या तरुणांकडून साडे एकोणतीस लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरीचे काम होत नसल्याने मुलांनी पैशांसाठी तगादा सुरू केला. यातील साडेचार लाख रुपये परत केल्यानंतर संशयित हुसनोद्दीनने हात वर केले. जळगाव पोलिसांनी हुसनोद्दीनसह त्याच्या पत्नी व मुलास अटक केली होती. हे दोघे त्याची बँक खाते सांभाळण्याचे काम करीत होते. सध्या या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. हुसनोद्दीनच्या बँक खात्यांमध्ये फारसे काही मिळून आले नाही. एका ठिकाणाहून पैशांची मागणी वाढली की संशयित आरोपी दुसऱ्या ठिकाणी बैठक घेऊन बेरोजगारांकडून पैसे उकळत होता. दरम्यान, हुसनोद्दीन सर्वात शेवटी पुणे येथे कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडे असून, याबाबत एक पथक प्रत्यक्ष पुणे येथे पोहचून तपास करीत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. नाशिक तसेच जळगाव जिल्ह्यातच फसवणुकीचा आकडा १० कोटी रुपयांच्या पुढे सरकाला आहे.

--

नाशिकच्या तपासाला वेळ

हुसनोद्दीनसह त्याच्या कुटूंबियांनी मिळून नाशिकमधील बेरोजगारांना तब्बल अडीच कोटी रुपयांपर्यंत गंडा घातला आहे. तक्रारदार वाढत असून, फसवणुकीचा आकडाही वाढू शकतो. या प्रकरणी गुन्हा दाखल असला तरी हुसनोद्दीन सध्या पाचोरा पोलिसांच्या कोठडीत आहे. यानंतर उर्वरित तीन पोलिस स्टेशनचा तपास संपल्यानंतरच त्याचा ताबा नाशिक पोलिसांना मिळू शकतो. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार असून, तक्रारदारांनी इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images