Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

होळी रे होळी

0
0

काठीची राजवाडी होळी

विनोद पाटील

सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी काठीची राजवाडी होळी ही दिवाळीच असते. आदिवासींसह देशभरातील अनेकांना भूरळ घालणाऱ्या काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवाडी होळीला आज (दि. १) प्रारंभ होत आहे. सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यांत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असणाऱ्या होलिकोत्सवाचा शाही क्षण असणाऱ्या काठीच्या होळीला साडेसातशे वर्षांची परंपरा असून, आदिवासी आजही आपली ही परंपरा जपून आहेत.
--
पांरपरिक वेशभूषा, नृत्य, गीते आणि त्याला पांरपरिक वाद्यांची रात्रभर साथ लाभत असल्याने होळीच्या दिवशी सातपुड्यात वेगळ्याच चैतन्याची लाट पहायला मिळते. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील झालेले आदिवासी बांधव येणाऱ्या प्रत्येकाला भूरळ घालतात. पंधरा दिवस चालणाऱ्या होलिकोत्सवात आदिवासी बांधवांचे जीवन, संस्कृती आपल्याला अनुभवास येत असते. हिंदू संस्कृतीत ज्याप्रमाणे दिवाळी या उत्सवाला विशेष महत्त्व असते, त्याचप्रमाणे आदिवासी जमातींत होळीला विशेष महत्त्व असते. विशेषत: सातपुड्यात वसलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेली काठी संस्थानची राजवाडी होळी प्रसिद्ध असून, या होळीसाठी देशभरातील आदिवासी बांधव एकत्र जमून तो साजरा करतात. सातपुड्यातील काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांनी १२४६ पासून या ऐतिहासिक परंपरेला सुरुवात केली असून, ही परंपरा आजही टिकून आहे. काठी संस्थानचे वारस महेंद्रसिंग पाडवी व ग्रामस्थ ही परंपरा चालवीत असून, सातपुडा परिसरातील व आदिवासी संस्थानात पारंपरिक पद्धतीने हा शाही क्षण परंपरेनुसार मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही. तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सामील होतात. या काठीच्या होळीत आपापल्या कला पथकांसह सामील होण्यासाठी सातपुड्यात १५ दिवस आधीपासून आदिवासी बांधवांनी तयारी केलेली असते. घुंगरू, टोप, ढोलकी, मोठा ढोल, मोरपिसांची बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून होलिकोत्सवात सहभागी होतात. त्यांचा हा पेहराव येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो. होळीसाठी नवस ठेवून खास बुध्या, बावा, घेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी आदि प्रकारच्या पांरपरिक होळीच्या प्रतिकांचा पेहराव आदिवासी करतात. यासाठी होळीच्या सात दिवस आधीपासूनच ब्रम्हचर्यत्व धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते. होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह हे सरकारच्या राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून, गादीची माती कपाळाला लावतात. सर्वप्रथम होळी मातेची पूजा वडाच्या वृक्षाखाली ढोलताशांच्या गजरात केली जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यांवर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार तर महिला गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साजशृंगार करतात. होळीसाठी नवस फेडणारे मोरबी बाबा, कहानका ढोको, शिकारी मोडवी आदी ढोलाच्या तालावर बेधुंद होऊन फेर धरतात. आदिवासी संस्कृतीची लोकगीते, डफ, पावा, बासरी, तुतारी वाजवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्यामुळे घुंगरांचा आवाज, ढोल ताशांच्या गजराने सातपुड्यात वेगळेच चैतन्य पहायला मिळते. रात्रभर होळीचा गजर सुरू असतो. पहाटे पाचला काठी संस्थानच्या वारसाला होळी पेटविण्याचा मान दिला जातो. विविध रुपे धारण केलेले आदिवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकात्सव साजरा करतात. पुढील अनेक दिवस मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, काकर्दे, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा अशा सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यांत विविध ठिकाणी हा होळीचा उत्सव साजरा केला जातो.

भोंगऱ्या बाजार
भोंगऱ्या हा होळी सणाच्या अगोदर येणारा व आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला बाजार. हा बाजार म्हणजे आदिवासींची जत्राच असते. होळीची चाहूल लागताच आदिवासींना भोंगऱ्या बाजाराचे वेध लागतात. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगऱ्या बाजाराची परंपरा चालत आली आहे. होळीच्या एक दिवस अगोदर भरणाऱ्या या बाजारात आदिवासी बांधवांची जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येत असते. होलिकोत्सवाच्या पंधरा दिवस आधी ठिकठिकाणी हा बाजार भरतो. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. प्रत्येक आदिवासी पाड्यांचे प्रमुख नदीकाठी एकत्र येऊन बाजार भरविण्याबाबत निर्णय घेतात. होळीअगोदर एक दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरविला जातो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव ढोल, पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला येतात. आदिवासी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या बाजारात सहभागी होतात. भोंगऱ्या बाजारात गावातील पोलिसपाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आदींना मान दिला जातो. भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधव हातात तलवार, कुऱ्हाड, भाला, धनुष्यबाण यासह विविध परंपरागत शस्त्रांसह मिरवणुकीत सहभागी होतात. भोंगऱ्या बाजारात होळीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी केले जाते. गूळ, साखरेचे हार, नारळ, खोबरे, दाळ्या, कपडे, रंगीत कागद, रंग आदी वस्तूंची खरेदी करून आदिवासी बांधव आपाआपल्या गावात परततात.

दांड्याचे धार्मिक महत्व
होळीसाठी लागणाऱ्या दांड्यालाही आदिवासींमध्ये विशेष महत्त्व असते. काठी येथील राजवाडी होळीसाठी ७० फूट उंचीचा बांबूचा दांडा आणला जातो. या दांड्याचा शोध हा महिनाभर आधीच लावला जातो. त्यासाठी विशिष्ट तरुणांवर ही जबाबदारी सोपवली जाते. त्यांच्यासाठी विशेष नियम आखून देण्यात आलेले आहेत. जंगलातून विधीवत पूजा करून होळीच्या दिवशी हा दांडा गावात आणला जातो. होळीच्या दांड्याला जांभूळ, आंब्याची पाने, खोबऱ्याची वाटी, हार-कंगण, खजूर, डाळ्यांचा नैवेद्य चढविला जातो. तो गाडण्यासाठी टिकाव किंवा फावड्याचा वापर न करता नवस फेडणारे म्होरके जागा हाताने कोरतात. त्याच ठिकाणी दांडा गाडून रात्री जागरण करून पहाटे पाचला होळी पेटवितात. होळीचा दांडा ज्या दिशेला झुकला किंवा खाली पडला, त्या दिशेला जास्त सुख-समृद्धी नांदते होते अशी आख्यायिका सांगितली जाते. होळी पेटताच क्षणी सर्व मोरबी, बाबा, ढाण, डोंडे हे सर्वजण होळीच्या आजूबाजूला फेर धरून ढोलाच्या तालावर गोल- गोल फिरून नाचतात. त्यानंतर होळीची राख घेऊन ते आपापल्या घरी परतात.

त्र्यंबकचा शिमगा

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणि शहरात पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा होत असतो. कोकणात जसे गणेशोत्सवासाठी मुंबईचे चाकरमाने घरी परततात, अगदी तसेच तालुक्यातील विशेषत: हरसूल, ठाणापाडा परिसरातील रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले आदिवासी बांधव गावी येत असतात. ग्रामीण भागात होळी आणि धुलिवंदन हे दोन शिमग्याचे प्रमुख दिवस मानले जातात. काही ठिकाणी होळीचा आदला दिवस म्हणजेच कोकट होळीदेखील केली जाते. होळीचा सण म्हणजे ग्रामीण जीवनातील कुळाचार आहे. या दिवशी बाजारात मिळणारे विविध रंगांचे साखरेचे हारकडे पूजेसाठी घेतले जातात. होळी करताना त्यामध्ये करवंदे, काष्टी, एरंड अशा रानवनस्पती जाळल्या जातात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. घरामध्ये असलेल्या कुलदेवतांची तळी भरण्याचा प्रघात बहुतेक ठिकाणी आढळतो. होळी अथवा शिमगा म्हणजे रंगांची उधळण करणारा सण शहरी भागात साजरा होत असताना ग्रामीण जीवनात वर्षाकाठी या दिवशी नवीन कपडे घेतले जातात. अर्थात होळीच्या दुसच्या दिवशी धुळवड सर्वत्र सारख्याच पद्धतीने साजरी होत असते. वीरांची मिरवणूक काढणे, त्यांचा नैवेद्य करणे आदि जवळपास सर्वत्र केले जातात.
सायंकाळी होळी पेटविल्यानंतर खऱ्या अर्थाने शिमगा सुरू होतो. धुलिवंदन ते रंगपंचमी असा पाच दिवसांचा हा उत्सव असला तरीदेखील धावत्या जीवनशैलीत काही बदल झाले आहेत. पूर्वी होणारी लाकूड आणि गौऱ्यांची पळवापळवी कमी झाली आहे. मात्र शब्दा-शब्दांतून उधळण होणारा शिमगा आजही अबाधित आहे. सायंकाळी होळी पेटली की मग भल्या भल्यांच्या उरात धडकी भरलीच पाहिजे. वर्षभराचा लेखाजोखा पाजळून निघणार. स्थानिक मंडळी आणि बऱ्याच काळापासून नोकरी व्यवसायानिमित्त त्र्यंबकच्या लोकजीवनाशी एकरूप झालेले नागरीक यांना तशी सवयही झालेली असते. मात्र नव्याने गावात आलेला बावरून जातो. वर्षभर खडूस वागणारे लोक तरुणांचे खास गिऱ्हाईक ठरलेलेच असायचे. त्याचप्रमाणे खोडकर विद्यार्थीवर्ग शाळेत वर्षभर शिकवणाऱ्या शिक्षकाला हैराण करण्यासाठी शिमग्याची नामी संधी सोडत नसत. चौका चौकात होळी शेजारी बसून बोंबाबोंब केल्यानंतर पुन्हा टोळक्याने गल्लोगल्ली बोंब मारत फिरणे हे शिमग्याचे आकर्षण लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही मोहीत केल्याशिवाय राहात नाही. शिमग्याच्या पाचही रात्रीत हातगाडे छोट्या टपऱ्या कोठे हलवल्या जातील याचा नेम नाही. तसेच हॉटेलचा बोर्ड कोणाच्या दारावर तर येथे स्वच्छतागृह आहे असा फलक कोणाच्या घरावर लटकलेला सकाळी पहावयास मिळतो. त्र्यंबकचा असा हा शिमगा स्पेशलच आहे. कारण या सर्व गदारोळात सभ्यपणाच्या मर्यादा कटाक्षाने पाळल्या जातात. महिला वर्गाची मानमर्यादा चुकूनही ढळणार नाही याची काळजी प्रत्येकजण घेतो, हे विशेष.

इगतपुरी- हारकड्यांचा गोडवा

विजय बारगजे, घोटी
होळीचा सन म्हटला की आदिवासी भागात जणूकाही दिवाळीचा सणच समजला जातो. त्यात इगतपुरी तालुक्याला जोडूनच शहापूर, अकोले, त्र्यंबक हे आदिवासी तालुके असल्याने इगतपुरी तालुक्यातही होळीचा सण अतिउत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. होळीच्या सणाला आदिवासी भागात आवश्यक समजला जाणाऱ्या हारगाठी-कडे इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. आदिवासी बांधवांच्या या सणाला गोडी आणण्याचे काम इगतपुरी तालुका करतो.
संस्कृती व आदर्श परंपरा जपण्याचे काम हा तालुका करतो. अध्यात्माचा वारसा व निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्याने या तालुक्यातील आदिवासी बांधव होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. या इगतपुरी तालुक्यातील अनेक लोक कामानिमित, नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे तसेच नाशिक विभाग अर्थात बाहेर गावी असल्याने हे सर्वच नोकरदार वर्ग हक्काची सुटी टाकून सणाला आपल्या मूळगावी येतात. इगतपुरी तालुक्याबरोबरच शेजारच्या खोडा, मोखाडा, वाडा, शहापूर, त्र्यंबक, राजूर, अकोला या भागातही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. होळीचे आकर्षण म्हणजे हारगाठीचे उत्पादन घोटीत चांगले होत असल्याने महिनाभरापासूनच या तयारीला उत्पादक लागतात.

बागलाणची होळी
कैलास येवला, सटाणा
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सर्वाधिक प्रमाणात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कोकणा समाजात होळी हा सण हुताशनी अर्थात होळी पौर्णिमेला मार्च महिन्यात मोठ्या उत्साहात व धार्मिक तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असतो. नव्याने उत्पादन झालेल्या धान्यांची मांडणी करून कन्सारा माऊली या देवीची प्रतिकात्मक पूजा करण्यात येते. या पूजेला निसर्गाची पूजा म्हणूनदेखील ओळख असते. आदिवासीबहुल भागात होळी सण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. निसर्गातील बदलाला या ऋतूत प्रारंभ होत असल्याची भावना आहे. निसर्गातील विविध बदल, पानगळ सुरू असते, तर नव्याने पालवी फुटत असते. घरात नव्याने दाखल झालेल्या बाजरी, नागली या सारख्या धान्याची पूजा केली जाते. पौर्णिमेच्या चंद्राचा पहिला किरण दिसल्यावर खोंडे (खोड्या) बाळाने (जाळणे) चालू होते. खोंड्या जाळल्यानंतर ते जमिनीत गाडून लपून ठेवतात. जर कोणाला खोड्या (लाकडाचा न जळलेला भाग) सापडला तर ते फाग (पैसे) मागतात. हा उत्सव होळीपूर्वी १५ दिवस अगोदर साजरा होत असतो. होळीच्या पहिल्या दिवशी वाळलेली लाकडे घेण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीला यावे लागते. वाळलेली लाकडे जमा करून दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या व्यक्तीने लवकर अशी लाकडे आणून टाकली त्याला १ नारळाची वाटी व गूळ दिला जातो. होळीच्या दिवशी रामप्रहरी उठून घरातील व्यक्ती होळी सजविण्यासाठी गावाबाहेर येऊ लागतात. होळी बेहडा, (पेहडा) सावर, पळसाची फुले, सूर्यफूल, आंब्याची पाने इत्यादी झाडांचा वापर ते करतात. होळी सजावटीसाठी गेल्यावर गूळ आणि नारळ वाटतात. सजावटीनंतर सर्वजण फाग धरतात. फाग अर्थात अडवून पैसे जमा करतात. यानंतर सायंकाळी होळीची मिरवणूक काढून मध्यवर्ती जागेवर त्यांची रचना करून जोरात ओरडून वाटी पापड्या बांधण्यासाठी आमंत्रण दिले जाते. ज्याचा मान असेल त्याने होळीजवळ येऊन अनुमती घेतली जाते. मग पापड्या बांधायला सुरुवात होऊन होळी पेटविली जाते. होळी पेटविल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची परंपरा आजही सर्वत्र टिकून आहे.

कळवण : होळीला दंतकथेची जोड

दीपक महाजन, कळवण

होळी आली की होळीसाठी लाकडं, गोवऱ्या गोळा करणारी मुलं गल्लीबोळातून गात सुटतात, ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ किंवा ‘होळीला गवऱ्या पाच पाच…, डोक्यावर नाच नाच’. लाकडे गोवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्याभोवती लाकडे-गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं-मुली, मोठी माणसे सर्वजण होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.
कोकणात ह्या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी : एका गावांत एक राक्षसीण आली. ती गावांतल्या लहान मुलांची हत्या करू लागली. गावावरच्या या संकटावर काय उपाय करायचा म्हणून सारा गाव एकत्र जमला. त्यांनी गावाच्या वेशीवर आणि प्रत्येक घराच्या अंगणात होळ्या पेटवल्या. साऱ्या गावात होळ्या पेटलेल्या पाहताच ती राक्षसीण जरा घाबरलीच तरीही ती पुढे पुढे येऊ लागली. मग लोकांनी नाचायला, बोंबा मारायला, वाद्य वाजवायला, त्या राक्षसिणीला शिव्या द्यायला सुरुवात केली. लोक तिच्याभोवती कोंडाळे करून नाचू लागले. तो आवाज, दारादारांतला अग्नी, लोकांचा राग, त्यांचे बोंबा मारणे हे सर्व पाहून ती राक्षसीण घाबरली. तिने त्या गावातून काढता पाय घेतला.
राक्षसीण गावातून जाताच लोक त्याच होळी भोवती आनंदानं नाचू लागले. गावाचं संकट दूर करणाऱ्या त्या अग्नी देवतेचं सर्वांनी पूजन केले. तिला गोडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून कोणत्याही दुष्ट असुरी शक्तीने गावात, घरात इतकेच नव्हे तर माणसाच्या मनातही प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा रूढ झाली.
खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची, ती कां? तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा यासाठी. पण हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं ह्या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला.
या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठवून टाकणार्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत. आजच्या लोकोत्सव ‘होलिकोत्सव (होळी)’, ‘धूलिकोत्सव’ (धूळवड) आणि ‘रंगोत्सव’ (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या अपवृत्ती भस्मसात करुन त्यांच्या नावाने ‘शिमगा’ करीत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.

पेठ-सुरगाणा : शेकडो वर्षांची परंपरा

जितेंद्र तरटे, नाशिक
आगळ्या-वेगळ्या प्रथा आणि परंपरांच्या पिढ्यान-पिढ्या पालनातून आदिवासी संस्कृतीने एकूणच लोकसंस्कृतीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाशिक जिल्ह्यात पेठ आणि सुरगाणा हे प्रामुख्याने आदिवासीबहुल तालुके आहेत. या तालुक्यांमधील आदिवासी बांधवांमध्ये दिवाळीप्रमाणेच होळी सणाचाही उत्साह असतो. विशेष म्हणजे वर्षभरातील आदिवासी परंपरांमधील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सणासाठी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले आदिवासी बांधव पुन्हा पेठ-सुरगाण्याकडील गावांची वाट चालू लागतात.
शिमगा या नावाने येथे परिचित असणाऱ्या या सणाच्या निमित्ताने पेठमध्ये यात्राही भरते. येथे साजरी होणारी होळी ही लोकसहभागातून साजरी होत असल्याने या उत्सवाचे स्वरूपही मोठे आहे.
होळीच्या निमित्ताने पारंपरिक संगीत अन् नृत्याचेही सादरीकरण या परिसरात होते. या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये पाडवी, पावरा, गावित, भिल्ल आदी आदिवासी जमाती आहेत. येथे होळीनिमित्त भरणाऱ्या विशेष यात्रोत्सव आणि बाजारामध्येही आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. आदिवासी बांधवांकडून सपत्नीक होळीचे प्रज्वलन केले जाते. यानंतर कुटूंबांकडून होळीचे पूजन होते. यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालात आनंदोत्सव साजरा करून पारंपरिक नृत्याचा ठेका धरला जातो. या भागात काही ठिकाणी ‘बोहाडा’ म्हणजे सोंगे धारण करण्याचीही प्रथा आहे. सोंगे धारण करून नृत्य सादर केले जाते. होळीसमोर नवस बोलण्याचीही प्रथा या परिसरात काही ठिकाणी आहे. होळी संदर्भात येथे काही लोककथाही प्रचलित आहे. या परिसरात खास होळीउत्सवासाठी भरणाऱ्या बाजाराला भोंगऱ्या बाजार असेही म्हणतात. होळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची रेलचेल प्रामुख्याने या बाजारात असते. येथे होळीसाठी आदिवासी बांधवांकडून गोवऱ्या, पालापाचोळा, बांबू आणि विशिष्ट लाकडे गोळा केली जात असली तरीही वृक्षांना मात्र होळीसाठी धक्का लावला जात नाही. जंगलात मिळून आलेल्या व होळीसाठी निवडलेल्या लाकडांचे अगोदर पूजनही केले जाते. होळीच्या दिवशी पारंपरिक ढोलवाद्यांवर नवे चामडे चढविले जाते.
या तालुक्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात विशेष पर्जन्यमान असल्याने त्या काळात प्रामुख्याने इतर व्यवहार ठप्प असतात. शिवाय या तालुक्यांमध्ये स्थलांतरणाचेही प्रमाण मोठे आहे. दिवाळीप्रमाणे या सणाचे महत्व या भागात असल्याने रोजगार किंवा शिक्षण आदी कारणांच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेले स्थानिक नागरीक गावाकडे परततात. पारंपरिक लोकगीते-होळीगीते, पारंपरिक वाद्य वादन-नृत्य सादरीकरण, होळी पूजन, बोहडा, यात्रोत्सव आदी परंपरांमुळे या परिसरातील होळीतही रंगत येते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महेश झगडेंची तडकाफडकी बदली

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शासनाच्या गतिमान आणि पारदर्शी प्रशासकीय कामकाजाच्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारे नाशिक विभागाचे आयुक्त महेश झगडे यांची शासनाने अचानक मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी तडकाफडकी बदली केली. महेश झगडे यांची अशा प्रकारे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आणि सेवानिवृत्तीसही अवघे तीन महिने बाकी असताना अचानक बदली झाल्याने बुधवारी दिवसभर त्यांच्या बदली प्रकरणावर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्र्यंबकेश्वर येथील कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणल्याचे प्रकरण त्यांना भोवल्याची चर्चा बुधवारी महसूल आयुक्तालयासह शहरात चर्चेत होती.

गेल्या मे महिन्यात झगडे यांनी नाशिक विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. गतिमान आणि पारदर्शी प्रशासनाला प्राधान्य दिल्याने विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हा ते तालुका स्तरावरील प्रशासन यंत्रणेचे धाबे दणाणले होते. त्यांनी पाचही जिल्ह्यांतील महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्धन्यायिक निकालांची पडताळणीसह गाव दप्तरांची तपासणी मोहीम सुरू केली होती. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य देत निधीचा योग्य ठिकाणी वापर करण्यासाठी भर दिला होता. मनरेगा योजनेतील जॉब कार्डधारकांना उशिरा मजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही झालेली चूक दुरुस्त न झाल्यास वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याची तंबी दिली होती.

-

माने आज सूत्रे स्वीकारणार

महेश झगडे यांची मंत्रालयात बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक राजाराम रघुनाथ माने यांची नियुक्ती झाली आहे. आज गुरुवारी राजाराम माने नाशिक विभागीय आयुक्तपदाचे सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. ते २००१ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील तुकडीचे अधिकारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत सेवा देत कुलींचा अनोखा संप

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

विविध मागण्यांसाठी देशभरातील रेल्वेस्थानकांतील कुलींनी बुधवारी एक दिवसाचा संप केला. नाशिकरोड स्थानकातील कुलींनी मोफत सामान वाहून विधायक मार्गाने संपात सहभाग घेऊन आदर्श घालून दिला.

नाशिकरोड स्थानकातील काशीनाथ मानकर, पांडुरंग मानकर, वसंत मानकर, किसन येवले, अशोक साळवे, रामदास काकड, प्रकाश बोडके, संतोष तुरभणे, शरद बिन्नर, संतोष बरके, रंगनाथ गरे, जगन हरळे, समाधान पाटील, गोरख वाघ, दत्तू आव्हाड, संजय काळे, मच्छिंद्र ढोणे, प्रकाश मानकर, लखन टिळे, विलास जाधव, गोकुळ सानप, नवनाथ वडाळकर, राजू ढोणे आदी कुली संपात सहभागी झाले होते.

नाशिकरोड स्थानकात पन्नासच्या आसपास कुली आहेत. ते तीन पाळ्यांत काम करतात. सामान उचलण्याबरोबरच अन्य सेवा ते देतात. त्यांना दिवाळीचा बोनस, पगार, वैद्यकीय सुविधा आदी काहीच मिळत नाही. दिवसाला हमालीचे कसेबसे तीनशे रुपये मिळतात. रेल्वे प्रशासन फक्त त्यांना भारत भ्रमंतीसाठी वर्षातून एकदा पास देते. पोलिस, रेल्वे अधिकारी सांगतील ती कामे कुली विनामूल्य करतात. रेल्वेखाली तुकडे झालेल्या मृतदेहाचे अवशेष असो की, स्थानकातील बेवारस मृतदेह असो, कुली ही कामे सेवाभावाने करतात.

नाशिकरोडच्या कुलींनी एक दिवसाचा संप करताना आदर्श घालून दिला. त्यांनी गोरखपूर, गोदावरी, हावडा आदी गाड्यातील प्रवाशांना मोफत सेवा दिली. अरुण अग्निहोत्री या ज्येष्ठ नागरिकाला व्हिल चेअरवर बसवून सामानही वाहून नेले. गोदावरी एक्सप्रेसमधील एस. के. छड्डा, मनिलाल केनिया या ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत सेवा दिला. हावडा मेलमधील अनिल कुमार सिन्हा यांना अस्थमा व लकवा झाला होता. त्यांनाही मोफत सेवा दिली.

..या आहेत मागण्या

बढती देऊन ट्रॅकमन किंवा गँगमन पदावर घ्यावे ही कुलींची मुख्य मागणी आहे. सन २००८ मध्ये अनफिट हमालांना अन्य पदांवर घ्यावे, वृद्ध हमालांचा समावेश ड गटात करावा, हमालांना पेन्शन योजना लागू करून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागण्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको हॉस्पिटलची आयुक्तांकडून ‘सर्जरी’

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

फुटकी अन गळकी शौचालये, उखडलेल्या अन् फुटलेल्या टाइल्स, ठिकठिकाणच्या भिंतींवर देवदेवतांचे फोटो, बंद लाइट अन् तुटलेल्या वायरी, डिस्पेन्सरीतील तुटक्या खुर्च्या अन् कचरा, रामभरोसे सोडलेले आयसीसीयू युनिट...ॲप्रनशिवाय फिरणारे निवासी वैद्यकीय अधिकारी... एवढेच काय, स्त्री सर्जिकल वॉर्डातील पडदे नसलेल्या खिडक्या आणि एकाही पेशंटजवळ वैद्यकीय उपचाराची फाइल नाही....बिटको रुग्णालयातील हे चित्र पाहून 'इज इट अ हॉस्पिटल?' असा सवाल करीत आयुक्त मुंढे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.

सामान्य जनतेची सेवा नियमानुसार करता येत नसेल तर घरी पाठवण्याची तंबीही बिटको रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांना त्यांनी दिली. आयुक्तांच्या या रौद्रावतारामुळे बिटको रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः पाचावर धारण बसली. रुग्णालयात काही काळ केवळ धावाधाव सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. तब्बल तीन तास बिटको रुग्णालयाची आयुक्तांकडून 'सर्जरी' सुरू होती.

पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा धडाकाच लावला आहे. नेहमीच्या बेधडक शैलीत बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक नाशिकरोड येथील पालिकेच्या बिटको रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता येथील अनागोंदी आणि अव्यवस्था बघून आयुक्तांना भोवळ यायचीच बाकी राहिली होती. रुग्णालयातील भोंगळ कारभार बघून मुंढे संतापले. या पाहणी दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील रक्त तपासणी विभाग, स्त्री व पुरुष सर्जिकल विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, ओपीडी, एक्सरे आणि सोनोग्राफी विभाग, केसपेपर काऊंटर, एनयूएचएम सेंटर, जळीत विभाग, बालरुग्ण विभाग, प्रसुतीगृह, डिस्पेन्सरी विभागांना भेट देऊन येथील व्यवस्थेची अगदी बारकाईने केली. विशेष म्हणजे आयुक्तांनी या सर्व विभागांच्या शौचालयांतील प्रत्येक युनिटची पाहणी केल्यावर त्यातील अस्वच्छता बघून त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर, शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह पाणीपुरवठा आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सामान्य जनतेची सेवा करणे शक्य नसेल तर घरी बसा, अशी तंबीच त्यांनी या सर्व अधिकारी व डॉक्टरांना दिली.

लाइट बंद, वेतनवाढ रोखली

ठिकठिकाणचे लाइट बंद असल्याचे आढळून आल्याने विद्युत विभागाच्या दोन अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेशही त्यांनी जागीच दिले.संपुर्ण हॉस्पिटल स्वच्छ ठेवण्याचा, रुग्णांच्या बेडवरील बेडशिट्स बदलण्याचा, लहान बाळांना सांभाळण्याचा नर्सचा केविलवाणा प्रयत्न, सर्व स्टाफ हजर ठेवण्याचा बिटको रुग्णालय प्रशासनाचा निव्वळ फार्स असल्याचे आयुक्तांनी उघड केले. याप्रंसंगी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

डॉ. फुलकर यांची बोलती बंद

एरव्ही रुग्णांचे नातेवाईक आणि लोकप्रतिनिधींशी मनमानीपणे उत्तरे देणारे बिटको रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांची आयुक्तांनी चांगलीच झाडाझडती घेतल्याने त्यांची बोलती बंद झाली. त्यांनी ॲप्रन परिधान केलेले नसल्याचे बघून 'व्हॉट इस धिस? किती वर्षांपासून कामे करता? लाजा वाटत नाही का?' अशा प्रश्नांची सरबत्तीच आयुक्तांनी केली. प्रसुती विभागातील अस्वच्छ खिडक्या बघून खिडक्यांची साफसफाई का होत नाही, असा सवाल केला. बालरुग्ण विभागातील खिडक्यांना नवे कोरे पडदे अडकवलेले आयुक्तांच्या लक्षात आल्याने त्यांनी ते उचकवून पाहिले असता बिटको रुग्णालय प्रशासनाची लबाडी त्यांनी उघड केली. कोणत्याही रुग्णाजवळ वैद्यकीय उपचारांची फाइल आढळून न आल्याने आयुक्त संतापले.

प्रत्येक ठिकाणी फ्रॉड का?

स्त्री प्रसुती विभागाच्या भेटीप्रसंगी आयुक्तांनी एका महिलेची आस्थेने विचारपूस केली. तिच्या नवजात बाळाचे पेपर जागेवर आढळून न आल्याने आयुक्तांनी डॉक्टरांना धारेवर धरले. बाळाचे वजन विचारले असता उपस्थित इनचार्ज सिस्टरने दिलेले उत्तर पडताळून पाहण्यासाठी आयुक्तांनी संबंधित बाळाचे प्रत्यक्ष वजन करून पाहिले. यावेळी वेईंग मशिनवर बाळासाठीचे ग्लोव्ह्ज नसल्याने 'प्रत्येक ठिकाणी फ्रॉड का? कपडे घरी न्यायचेत का?' असे सवाल करीत साहेबीपणा कमी करा, असे सुनावले.

मेंटेनन्सचा अहवाल द्या!

बिटको रुग्णालयातील स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, दुर्गंधीयुक्त आणि गळकी स्वच्छतागृहे, उखडलेल्या टाइल्स बघून मेंटेनन्सचे काम करण्याची मुदत २०१६ पर्यंतच होती तर रुग्णालयाची दुरवस्था कशी झाली, असा प्रश्न आयुक्तांनी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व बिटकोच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवरच विचारला. स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिंगचे कर्मचारी नेमलेले आहेत, अशी पुष्टी यावेळी डॉ. जयंत फुलकर यांनी करताच 'त्यांच्या चेकवर सही तुम्हीच करता ना?' असा थेट प्रश्न आयुक्तांनी डॉ. फुलकर यांना केला. मेंटेनन्सच्या निधीच्या खर्चाचा हिशेब तत्काळ देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. स्वच्छतागृहांची दुरवस्था बघून 'तुमची ऑफिसेस इथे शिफ्ट करू का?' असा सज्जड दमही आयुक्तांनी उपस्थित डॉक्टर्स आणि विभाग प्रमुखांना भरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वुमन्स बाइक रॅलीची धूम ११ मार्चला

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित केली जाणारी वुमन्स बाइक रॅली यंदा ११ मार्च रोजी होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली निघणार आहे. आयटीपासून सोशल सर्व्हिसपर्यंत आणि शिक्षिकांपासून मेडिकल-इंजिनीअरिंगपर्यंत… समाजाच्या विविध क्षेत्रांतील व सर्व वयोगटांमधील महिलांना सहभागाची यात संधी आहे. रॅलीची नोंदणी सुरू झाली आहे.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने नाशिकसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त वुमन्स बाइक रॅलीचे आयोजन केले जाते. यंदा ही रॅली ११ मार्च रोजी होणार आहे. यंदाच्या रॅलीचे घोषवाक्य 'ऑल वुमन पॉवर रॅली' ही आहे. यापूर्वीच्या 'वुमेन बाइक रॅली'ला नाशिककर महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या 'बाइक रॅली'मध्ये मोटरसायकल व दररोजच्या वापरातील स्कूटरेट-मोपेडवरून महिलांना या रॅलीत सहभागी होता येणार आहे. कॉलेज युवतींपासून गृहिणींपर्यंत आणि भिशी मंडळांपासून ऑफिसमधील ग्रुपपर्यंत सर्वच क्षेत्रांमधील महिलांनी या रॅलीसाठी सहभागाची संधी मिळते. त्यामुळेच महिला दिनानिमित्त होणाऱ्या या रॅलीची मोठी उत्सुकता महिला आणि तरुणींना असते. याच रॅलीत सहभागी होण्यासाठीची नोंदणी सुरू झाली. त्यामुळे वेळ न दवडता ऑनलाईन किंवा एसएमएसद्वारे त्वरीत नोंदणी करायची आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी

रॅलीत सहभागी होण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्यावी. तेथे रजिस्ट्रेशन या सेक्शनला भेट दिल्यानंतर नाव नोंदवता येईल. मोबाइल एसएमएसद्वारे नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी PowerrallyNSK हा मेसेज टाइप करुन तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवायचा आहे.

ही रॅली केवळ बाइक चालवण्यापुरतीच मर्यादित नाही, तर यानिमित्ताने तरुणी-महिलांना फॅशनचीही संधी मिळणार आहे. त्यामुळे चारचौघांत वेगळं ठरायचं असल्यास पेहराव, मेकअप आणि बाइक सजावटीवर विशेष भर द्या. पारंपरिक पेहराव करा, वेस्टर्नमध्ये मिरवा किंवा फ्यूजनचे प्रयोग करा.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिपूर्ण ग्रंथसंपदेचे माहेरघर

0
0

वाचनसंस्कृतीचे दुवे : के. ज. म्हात्रे वाचनालय

वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतुने वाचनालय तात्यासाहेबांनी सुरू केले. वाचनालयाची सनदशीर नोंदणी करून घेतली. सर्वांगिण वेगवेगळ्या साहित्याची पुस्तके प्रत्येक व्यक्ती खरेदी करू शकत नाही. त्यांना वाचनाची गोडी लावून शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने व साक्षर करण्याच्या उद्देशाने वाचनालयाची निर्मिती झाली. त्यामुळे हे वाचनालय म्हणजे परिपूर्ण ग्रंथसंपदेचे माहेरघर आहे.


कुसुमाग्रज प्रतिष्ठान (के. ज. म्हात्रे) वाचनालय पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वाचनालयाची स्थापना १३ नोव्हेंबर १९९३ रोजी झाली. कुसुमाग्रजांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन झाले. त्यासाठी आपल्याकडील उत्तमोत्तम ग्रंथ देऊन स्वत: कुसुमाग्रजांनीच या वाचनालय चळवळीस सुरुवात केली. त्यानंतर अनेकांनी मौल्यवान ग्रंथ देणगीदाखल देऊन वाचनालयात ग्रंथवाढीस हातभार लावला. शिवाय लेखकांचे ग्रंथ भेट येतच असल्याने ग्रंथसंख्या वाढतच गेली. वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतुने वाचनालय तात्यासाहेबांनी सुरू केले. वाचनालयाची सनदशीर नोंदणी करून थोड्याच दिवसात वाचनालयास शासनाची मान्यता मिळाली. कै. ग. ज. म्हात्रे यांचे बंधू के. ज. म्हात्रे यांच्या स्मरणार्थ देणगी देऊन वाचनालयास मोलाचा सहभाग दिला.
त्यावेळचे अध्यक्ष डॉ. किशोर पवार यांच्या काळात ‘ब’ दर्जा मिळाला होता.

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिारवाडकर यांना समाजाच्या संवेदना जाणवत होत्या. विविध समाजाचा आढावा घेतांना शिाक्षणाचे प्रमाण कमी आहे तर काही ठिकाणी निरक्षरता आहे. तेव्हा स्वत:चा उत्कर्ष करावयाचा असल्यास शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यातून समृध्दीकडे वाटचाल करु शाकतो. वाचक पुस्तकांना आपले मित्र संबोधतात. वाचनाची आवड वाढवावी म्हणजेच स्वत:ची प्रगती माणूस साधू शकतो.

पुस्तकांची देवाण-घेवाण बरोबरच विचारांची देवाण-घेवाण आणि एकमेकांच्या संपर्क अभियान यातून संस्कार मिळण्याची सुवर्ण संधी वाचनालयातून मिळते. गंगापूर रोड परिसरातील वाचकांसाठी कुसुमाग्रज स्मारकात स्वतंत्र वाचनालय असून, या वाचनालयासही वाचकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाचन संस्कृतीचा विस्तार व विकास व्हावा या उद्देशाने विनासायास व विनामोबदला वाचन साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना सुरू केलेली असून, या योजनेस वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कुसुमाग्रज (के. ज. म्हात्रे) प्रतिष्ठान शासनमान्य वाचनालय असून, ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे.

- सभासदांना हवी असलेली संदर्भीय पुस्तके वाचनालयात उपलब्ध होतात.
- के. ज. म्हात्रे वाचनालयात मुक्तद्वार पद्धत असल्याने वाचकांना आपल्या पसंतीचे पुस्तक घेता येते.
- दरवर्षी ग्रंथसंपदा ही वाढतच गेली आहे.
- वाचनालयास देणगी ग्रंथही मिळतात. त्यामुळे ग्रंथसंपदा वाढत जाते.
- वाचनालयातील सर्व ग्रंथसंपदेची नोंद संगणक प्रणालीत केली असून, वाचनालयात इंटरनेट सेवा आहे.
- आवश्यकतेनुसार सभासदांना मोबाइलवर माहिती कळविली जाते.


नवीन विषयांच्या पुस्तकांसाठी वाचकांची मागणी असते. त्याच प्रमाणे तत्त्वज्ञान, धार्मिक व बालसाहित्य यांनाही सभासदांची मागणी आहे. विविध संदर्भ शोधण्यासाठी अभ्यासक संदर्भ ग्रंथांची वेळोवेळी मागणी करतात.
-विनायक रानडे, अध्यक्ष

वाचनालयातील सभासदांना नेहमी सेवा देत असतो. वयोग्रस्त सभासदांना पुस्तके काढून देण्यास मदत करणे. सभासदांना हवी असलेली पुस्तके मिळाल्याचे समाधान वाटते.
-शोभा कानडे, ग्रंथपाल


मागणी केलेल्या विषयाप्रमाणे आवश्यक ते वाचनसाहित्य व संदर्भ ग्रंथ आणि नवीन पुस्तके वेळोवेळी उपलब्ध करून दिली जातात. वाचनालयाने घरपोच सेवा द्यावी.
-कल्पेश उघाडे

आवश्यक त्या ठराविक विषयांची अद्यावत पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. वाचनालयाची ग्रंथसंपदा प्रचंड असल्याने हवी ती पुस्तके मिळतात. तसेच संगणकाच्या माध्यमातून वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून दिल्यास अधिक सोईचे होणार आहे.
-नरेश सोनवणे

संकलन : प्रशांत भरवीरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ भूखंडावर शौचालय

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या हद्दीत सुलभ शौचालये अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आली आहेत. परंतु, महापालिकेने चक्क एमआयडीसीच्याच भूखंडावर शौचालय उभारत अतिक्रमण केले असल्याचे समोर आले आहे. जुन्या शौचालयांचा वापर गरजूंकडून केला जात असताना आता नव्याने उभारलेले शौचालय बंद का, असाही प्रश्न उभा राहतो.

विशेष म्हणजे, महापालिकेने याबाबत योग्य माहिती न घेता केवळ नगरसेवकांच्या हट्टापायी शौचालय उभारले असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच महापालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागालाच नव्याने उभारण्यात आलेले शौचालय बंद असल्याचे माहितीच नसल्याचे समोर आल्याने अधिकारी नेमके काम काय करतात, असा सवाल उपस्थित होत आहे.

औद्योगिक विकास महामंडळाने सेवा सुविधा क्षेत्रासाठी अंबड गावालगत भूखंड आरक्षित केला होता. एमआयडीसीने संबधित भूखंड प्लेटिंग उद्योगांच्या सांडपाणी प्रक्रिया उद्योगासाठी दिलाही होता. परंतु, त्याकडे कारखान्यांनी दुर्लक्ष केल्याने मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणांसाठी चढाओढ सुरू झाली.

महापालिकेचा खर्च वाया

आजमितीस आरक्षित असलेल्या सेवा, सुविधा भूखंडांवर दुकान व झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यातच महापालिकेनेदेखील भूखंडांच्या एका बाजूला शौचालय उभारले होते. परंतु, वाढत्या लोकसंख्येसाठी नव्याने दुसरेही शौचालय महापालिकेने उभारले आहे. यात दुसरे शौचालय एमआयडीसीच्या भूखंडांवर अतिक्रमण करून उभारण्यात आल्याने याबाबत एमआयडीसी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचे समजते. महापालिकेचा आरोग्य व बांधकाम विभागाला मात्र संबंधित उभारलेल्या शौचालयाची योग्य माहितीच नसल्याने लाखो रुपयांचा महापालिकेचा खर्च वाया गेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने नवीन शौचालय उभारले असताना जागेची माहितीच घेतली नसल्याचे उघड झाले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले शौचालय विनावापर पडून आहे. बंद असलेले अंबड गावातील शौचालय तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी गरजूंनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंता अन् कर्मचाऱ्यांना कोंडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड पाटबंधारे विभागाच्या येवला उपविभागीय कार्यालयाचे सहायक अभियंता मनमानी कारभार करीत असून, सध्या सुरु असलेल्या शेती सिंचनासाठीच्या आवर्तनातील हक्काच्या कोट्यातील आरक्षित पाणी मिळणे अवघड झाले आहे. पालखेड डाव्या कालव्यावरील क्रमांक ३६ वितरीकेला सोडण्यात आलेले पाणी अचानक बंद केले गेले, याकडे लक्ष वेधत या वितरिकेवरील ७ पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी पालखेडच्या येवला उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी कार्यालयातील एका दालनास टाळे ठोकून दालनात असलेले शाखा अभितांसह कर्मचाऱ्यांना कोंडले.

उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सध्या रब्बीसाठी सुटलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनातील पाणी देखील पेटले आहे. पालखेड प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे पालखेडच्या या चालू आवर्तनातून हक्काच्या कोट्यानुसार पाणी मिळत नसल्याची मोठी ओरड येवला तालुक्यातील पाणीवापर सहकारी संस्थांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मोठा चर्चेचा विषय ठरला असतानाच तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६ वरील पाणी बंद केले गेल्याने ठिणगी पडली. पाणीवापर संस्थांना पाणी उचलणे बाकी असतानाच पाणी बंद झाल्याचा आरोप करीत शेतकरी आक्रमक झाल. संतप्त शेतकऱ्यांसह पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पालखेडच्या येवला उपविभागीय कार्यालयाकडे मोर्चा वळवला. कार्यालयातील एका दालनास टाळे ठोकले. वितरिका क्रमांक ३६ वरील पाणी बंद का केले? याचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच निवेदन देण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास उपविभागीय कार्यालयात थडकलेल्या शेतकऱ्यांचा पारा पालखेडचे सहायक अभियंता वैभव भागवत नसल्याने अधिकच चढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभियंत्यांच्या दालनाशेजारील दुसऱ्या दालनास टाळे ठोकले. दालनातील मंगल शर्मा व अनिता सरवदे या दोघा शाखा अभियंत्यांसह कनिष्ठ लिपिक मनोज शिंगाडे, शिपाई रंजना शिंदे असे चौघे कोंडले गेले होते. जोपर्यंत वितरिका क्रमांक ३६ चे बंद केलेले पाणी पुन्हा सोडण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी देत नाहीत, तोवर टाळे न खोलण्याचा ठाम पवित्रा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी घेतला होता.

अगस्ती मुनी पाणी वापर संस्था (निमगाव), श्रीकृष्ण पाणी वापर (पारेगाव), आदर्श पाणी वापर (चिचोंडी), गुरुदत्त पाणीवापर (बदापूर), शिवशंकर पाणी वापर (नाटेगाव), संत जनार्धन पाणी वापर (निमगाव) व दत्त दिगंबर पाणी वापर सहकारी संस्था (नाटेगाव) या सात संस्थांचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

साडे तीन तासांनंतर आंदोलन मागे

अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी कोंडल्याची माहिती मिळताच येवल्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, तहसीलदार नरेश बहिरम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. फोनवर वैभव भागवत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भागवत यांनी चर्चेला तयार असल्याचे सांगितले. तेव्हा शेतकऱ्यांनी कार्यालयाचे कुलूप काढले. दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाचपर्यंत कार्यालयाला कुलूप ठोकले होते.

'यंदा रब्बी पिकांसाठी एकरी ५० हजार रुपये खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. आता पाण्याअभावी पिके करपून चालल्याने पाण्याची नितांत गरज आहे. त्यातच पाणी बंद करून पालखेडच्या अधिकाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे.

- शामराव मढवई, चेअरमन, पाणीवापर सहकारी संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्त’मुळे ९६ टक्के जलपूर्ती

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जलयुक्त शिवार योजनेमुळे २०१६-१७ या वर्षी निवडलेल्या विभागातील ९०० पैकी तब्बल ९६ टक्के म्हणजेच ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे जलपरिपूर्ण झाले आहे.

जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात मावळते विभागीय आयुक्त महेश झगडे बोलत होते. यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. जलपूर्ती झालेल्या गावांमधील लोकांचे आयुष्यमानच बदलले. या वर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. या गावांत प्रस्तावित २५ हजार ८०५ इतक्या कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली. ८६१ गावांची टंचाईतून मुक्तता झाली. पूर्ण झालेल्यापैकी २१,१३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम क्षमतेची पाणीसाठा निर्मिती झाली असून त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एक पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. पेयजल संबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाऱ्यांमार्फेत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी झगडे यांनी सांगितले.

जलयुक्तचा लेखाजोखा (२०१७-१८)

गावांची निवड : ८४७

प्रस्तावित कामे : २१,३६७

आराखडा निश्चिती :४८९ कोटी रुपये

कार्यारंभ आदेश : ३,५९५ कामे

प्रत्यक्ष सुरुवात : ९७९ कामे

क्षेत्रीय स्तरावर नियोजन

मजगीमुळे रब्बी व उन्हाळी हंगाम असुरक्षित होणार असेल तरीही अशी कामे आता होणार नाहीत. या पुढील वर्षाचा आराखडा व उद्दिष्ट आता शासनाकडून दिले जाणार नाही. क्षेत्रीय स्तरावरच नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया भरारी पथकाचा उधळला कट

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

दहावीच्या परीक्षेचे भरारी पथक (स्क्वाड) असल्याचे सांगून दोन तरुणांनी जेलरोड येथील अभिनव शाळेत प्रवेश केला. पेपरला एक तास असताना आवारात विद्यार्थ्यांची तपासणीही सुरू केली. मात्र, जागरूक पालकाने गुगलवरून शिक्षण उपसंचालकांसह बोर्डातील अधिकाऱ्यांचे फोन नंबर मिळवून त्यांना खबर दिल्याने तोतया स्क्वाडचा कट उधळला. दोघांचा शोध सुरू आहे.

दहावीची आजपासून परीक्षा सुरू झाली असून, सकाळी अकरा वाजता मराठीचा पेपर होता. जेलरोडच्या नारायणबापू चौकातील अभिनव मराठी शाळेत सकाळी नऊनंतर विद्यार्थी येण्यास प्रारंभ झाला. या केंद्रावर चार शाळा जोडलेल्या आहेत. खबरदारी म्हणून दोन पोलिस नियुक्त आहेत. मात्र, त्यांच्या ड्युटीस वेळ होता. सुरक्षा रक्षकही नाश्ता करायला गेले होते. पेपरला तासभर उशीर असतानाच २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोन तरुण शाळेत आले. त्यांनी आपण एसएससी बोर्डाचे स्क्वाड पथक असल्याचे सांगून शाळेत प्रवेश मिळवला. मुख्याध्यापिका उर्मिला भालके व केंद्र संचालिका जयश्री ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या टेबलवर आपल्याकडील खडू ठेवत बोर्डातून आल्याचे सांगितले. या दोघींनी त्यांना पॅनकार्ड, आधारकार्ड, बोर्डाचे ओळखपत्रे दाखविण्यास सांगितले. या दोघांनी ती नसल्याचे सांगून साधे ओळखपत्र दाखवले. आपला मोबाइल नंबरही दिला. आसपासच्या शाळांतील शिक्षकांची नावे संदर्भासाठी सांगितली, तसेच एसएससी बोर्डाची व अन्य शाळांची झेरॉक्स कागदपत्रे दाखवली. त्यामुळे दोघींचा विश्वास बसला. कॉपीमुक्त अभियान राबवायचे असून, मुलांची तपासणी करायची आहे. शिक्षकांशीही संवाद साधायचा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, पेपरला वेळ असल्याने शिक्षक आले नसल्याचे भालके यांनी सांगितले.

जागरूक पालक

दोन्ही तरुणांनी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. निवृत्त उपजिल्हाधिकारी पवार दहावीतील नातवाला सोडण्यासाठी आले होते. त्यांना दोघांचा संशय आला. त्यांनी मोबाइलमध्ये गुगलवर जाऊन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, तसेच एसएससी बोर्डाचे चेअरमन मारवाडे यांचा फोन नंबर मिळवला व त्यांच्या कानावर प्रकार घातला. दोन्ही अधिकाऱ्यांनी अभिनव शाळेत स्क्वाड पथक पाठवले नसल्याचे सांगितल्यावर पवार सतर्क झाले. त्यांनी हालचाल करायच्या आधीच हे तरुण फरार झाले. केंद्र संचालिकेने तरुणांच्या फोनवर संपर्क साधला. मात्र, प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी रामचंद्र जाधव यांना माहिती दिली.

पुढील कट उधळला

हे तरुण जयरामभाई हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल व अन्य शाळांत जाणार होते. मात्र, त्यांचा कट वेळीच उधळला. रामचंद्र जाधव आणि बोर्डाचे अधिकारी एम. व्ही. कदम तातडीने शाळेत आले. त्यांनी प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र संचालकांना उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. जाधव यांनी अन्य शाळांच्या केंद्र संचालकांना एसएमएस व मेल करून सावधगिरी बाळगण्याची सूचना केली. या संशयितांना काही विद्यार्थ्यांनी ओळखले. दोघे चेहेडी पंपिंग येथील असल्याचे समजते.

लुटण्याचा उद्देश

'मटा'शी बोलताना रामचंद्र जाधव म्हणाले, की आम्ही ओळखीचे अधिकारीच स्क्वाड पथकावर देतो. शाळांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. बोर्डाचे स्क्वाड पथक आल्यावर त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्राची व कागदपत्रांची मागणी करा. खात्री झाल्यावरच त्यांना प्रवेश द्यावा. अभिनव शाळेत आलेल्या दोन भामट्यांचा उद्देश मुलांचे पैसे, मोबाइल आदी ऐवज लुबाडणे हा असू शकतो. दरम्यान, जाधव यांनी निवृत्त उपजिल्हाधिकारी पवार यांच्या सतर्कतेचे कौतुक केले.

तोतयांच्या नावांची चौकशी

जेलरोडच्या अभिनव आदर्श हायस्कूलमध्ये गेलेल्या तोतया भरारी पथकातील दोघांची नावे घेऊन उपशिक्षण संचालक रामचंद्र जाधव यांनी शाळेला पत्र पाठवले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. या तोतयांची नावे एस. ए. सय्यद व एस. एस. चव्हाण असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रत उपनगर पोलिसांना देण्यात आली आहेत. ही नावे खरी आहेत की खोटी, याची शहानिशा पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला भेळभत्ता क्लस्टर

0
0

मटा विशेष

Gautam.Sancheti@timesgroup.com

Twitter - SanchetigMT

नाशिक : नाशिकच्या चिवड्याने अनेकांना भुरळ घातल्यानंतर आता चांदवडला भेळ भत्त्याचे क्लस्टर होणार आहे. भेळ भत्त्याचे ब्रॅडिंग करून त्याची राज्यभर विक्री करण्यासाठी हे क्लस्टर बनवण्यात येणार आहे. त्यासाठी १३१ पेक्षा अधिक भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून रेणुका भेळभत्ता क्लस्टर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या क्लस्टरचा डीपीआरही तयार करण्यात आला असून, आता तो मंजुरीच्या अखेरच्या टप्यात आहे.

उद्योगांना सामूहिक सोयी-सुविधा त्यांच्या गरजेनुसार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक उद्योगांच्या क्लस्टरसाठी मदत करते. केंद्र सरकारसारखीच राज्य सरकारने यासाठी आपली योजना तयार केली असून, त्यासाठी पाच कोटींपर्यंत निधी दिली जातो. त्यात २० टक्के निधी हा विशेष हेतू वाहन (एसपीव्ही) कंपनीने टाकायचा असतो. त्याचप्रमाणे जागाही कंपनीने उपलब्ध करून द्यायची असते. चांदवड येथे भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून हे क्लस्टर सुरू करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी भेळभत्ता प्रसिद्ध आहे; पण उर्वरित महाराष्ट्रात भत्ता हा प्रकार फारसा माहीत नाही. त्यामुळे त्याचे आधुनिक पद्धतीने पॅकेजिंग करून त्यात नवीन तंत्रज्ञानाचे या क्लस्टरच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मिळणार आहे.

राज्य सरकारने डी, डी प्लस, विनाउद्योग व नक्षलग्रस्त भागासाठी अशा क्लस्टरची योजना तयार केली आहे. सूक्ष्म व लघु उद्योगाला बळ मिळावे या त्यामागे हेतू आहे. किमान दहा सभासद यासाठी असावे ही अट आहे. जिल्ह्यात याअगोदर केंद्र सरकारच्या मदतीने नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर व मालेगाव येथे टेक्स्टाइल्स क्लस्टर कार्यान्वित झाले आहे. पैठणी क्लस्टरचा विषयसुद्धा प्रगतीवर आहे. त्याचप्रमाणे अनेक उद्योगांच्या क्लस्टरचे प्रपोजल उद्योग संचालनालयाच्या कार्यालयात आले आहे. त्यात चांदवडच्या भत्ता क्लस्टरचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. या क्लस्टरच्या सभासदांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी याअगोदरच त्यांना हल्दीरामच्या प्लँटला भेट देऊन माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हैसूर येथे सीएफटीआरआयमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. या क्लस्टरसाठी जागाही निश्चित झाली आहे. क्लस्टरसाठी उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख, महाव्यवस्थापक पी. व्ही. रेंदाळकर व व्यवस्थापक सीमा पवार यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहे.

भेळभत्ता हा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण तो सर्वत्र प्रसिद्ध व्हावा यासाठी क्लस्टर केले जाणार आहे. त्यासाठी १३१ सभासद एकत्र आले आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, आधुनिक पॅकेजिंग मशिनरी, स्टीकर यांसारख्या सामूहिक गोष्टी केल्या जाणार आहेत.

- सुनिशा गिते, चेअरमन रेणुका भेळभत्ता क्लस्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर गोवरच्या लशी मिळाल्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन महिन्यांपासून गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गोवर प्रतिबंधक लशींची तत्काळ जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

वर्षापर्यंतच्या लहान बाळाला सक्तीने द्यावयाची असलेली गोवरची लस दोन महिन्यांपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब 'मटा'ने समोर आणली होती.

जिल्हा परिषद नाशिकच्या आरोग्य विभागाकडून या वृत्ताची गंभीर दखल घेऊन अवघ्या दोनच दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी शंभर लशींचे वाटप करण्यात आले. एकूण १२ हजार लशी आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राप्त झाल्या आहेत. निफाड तालुक्यातील ९ आरोग्य केंद्राना ९०० लस उपलब्ध झाल्या आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांनी सांगितले

निफाड तालुक्यात गोवरच्या लस नुकत्याच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाल्या आहेत. 'मटा'ने हा प्रकार समोर आणला. त्यामुळे आम्हीही तातडीने याबाबत पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पाठपुरावा करायला सांगितले. - पंडितराव आहेर, सभापती,निफाड पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंड अळीग्रस्त शेतकरी वाऱ्यावर

0
0

मदतनिधीसाठी साडेसातशे कोटींची गरज

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

ओखी वादळाने पीडित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा निधी सरकारकडून नुकताच मिळाला असला तरी बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी मात्र अजूनही प्रतिक्षेत आहे. नाशिक विभागात बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार २६५ असून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतील तरतुदींनुसार त्यांना ७५२ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपये इतक्या निधीची गरज आहे.

विभागातील नाशिकसह खानदेशातील चारही जिल्ह्यांमध्ये कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. कापूस पिकाखालील एकूण ८ लाख ९५ हजार ५२९ हेक्टरपैकी तब्बल ७ लाख ९३ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावरील पिक बोंड अळीने फस्त केले. यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार विभागातील पीडित ८ लाख ६१ हजार २६५ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त कापूस पिकाचा पंचनामा केला होता. मात्र, या शेतऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. विभागातील जळगाव जिल्ह्यात बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे.

शासनाने मागविला अहवाल

बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादकांच्या नुकसान भरपाईची रक्कम सरकारने शुक्रवारी निश्चित केली. त्यासंदर्भातले आदेश कृषी सहसंचालक कार्यालयाला प्राप्त झाले. या शेतकऱ्यांना 'एनडीआरएफ'मधील तरतुदींनुसार शासनाने जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ६८०० रुपये तर बागायती क्षेत्रासाठी १३५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई जाहीर केली. ही मदत अधिकाधिक दोन हेक्टर क्षेत्रासाठी लागू होणार आहे. 'एनडीआरएफ'च्या तरतुदींनुसार आतापर्यंत पिकाच्या नुकसानाची अट ५० टक्के इतकी होती. मात्र, शासनाच्या ताज्या अध्यादेशानुसार ही अट शिथिल केली असून आता ३३ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. याशिवाय पिकविमा योजना आणि कॉटन ॲक्ट जीएसाआयमधील तरतुदींनुसार मदत मिळणार आहे. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या निधीची मागणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिक कापणी प्रयोग झालेले असून त्यानुसार ३३ टक्के नुकसान झालेल्या बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफमधील तरतुदींनुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांचाच या नुकसानभरपाईसाठी विचार होईल.

- दिलीप झेंडे, सहसंचालक, कृषी विभाग


जिल्हा.....कापूस उत्पादक शेतकरी....३३ टक्केपेक्षा अधिक बाधित शेतकरी....अपेक्षित निधी (रु. लाख)
जळगाव.............५,२६,८४१..........................५,२३,७१४............................४६,६२७.९१
धुळे.................२,१८,०८९...........................१,९८,२६३............................१७,००९.८५
नंदुरबार...............९१,९९८..............................८५,८९५..............................८,९६५.२२
नाशिक...............७१,९८१..............................५३,३९३..............................२,६३३.४६
एकूण...............९,०८,९०९...........................८,६१,२६५.............................७५,२३६.४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका अॅप झाले अधिक ‘स्मार्ट’!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यासह नागरिकांना अधिक गतिमान सुविधा देण्याचा चंग बांधला आहे. यासाठी त्यांनी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीत अमुलाग्र बदल केले आहेत. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले 'स्मार्ट नाशिक अॅप' हे नव्याने अपडेट करून अधिक सुटसुटीत व सोयीचे करण्यात आले आहे. तसेच स्मार्ट नाशिक अॅपचे नाव बदलून ते 'एनएमसी ई-कनेक्ट' (NMC e-Connect) करण्यात आले आहे. विकासकामांप्रमाणेच मुंढे यांनी या अॅपलाही पारदर्शकता, दायित्व आणि वेळेचे बंधन अशी त्रिसूत्री लावली आहे. कोणत्याही तक्रारीचे निराकरण सात दिवसांत करण्याचे बंधन घातले आहे. वेळेत तक्रारी न सोडविणाऱ्या अधिकाऱ्यांना अॅपमधूनच आपोआप 'कारणे दाखवा नोटीस' जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे घरबसल्या निरसन होऊन पालिकेच्या कारभाराला गतिमानता येणार असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

नागरिकांना सोयी सुविधा देण्यासह त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी 'स्मार्ट नाशिक' अॅप सुरू केले होते. परंतु, या अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याने तक्रारींचा निपटारा वेळेवर होत नव्हता. तसेच त्याची रचना सहज व सुलभ नव्हती. त्यामुळे नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण कार्यप्रणालीत अधिक सुलभता व अचूकता येऊन तक्रारींचे परिणामकारक निवारण करण्यासाठी कार्यप्रणालीत अमुलाग्र बदल केले आहेत. ती सहज, सोपी व नागरिकांना हाताळता येईल अशी करण्यात आली आहे. नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार सिलेक्ट केल्यानंतर विभाग सिलेक्ट करण्याची गरज नाही. ती तक्रार आपोआप संबंधित विभागाकडे वर्ग होईल. यातून वेळ वाचणार आहे.

आयओएस व अँड्रॉइडवर उपलब्ध

NMC e-Connect नावाने हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. आयओएस व अँड्रॉइड या दोन्ही सिस्टिमवर ते उपलब्ध आहे. नागरिकांना तक्रारींबाबत फिडबॅक देणे, रेंटीग देणे, तक्रार रिओपन करणे इत्यादी सुविधा ॲपमध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अशी करा तक्रार

या नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारदारास प्रथमत: स्वत:ची नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीची प्रक्रिया तक्रारदारास एकदाच करावयाची आहे. नोंदणी झाल्यानंतर तक्रारदारास त्याचा प्राप्त लॉगीन आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन केल्यानंतर तक्रार रजिस्टर करता येणार आहे. सर्व तक्रारींचा लॉग मेंटेन होणार आहे. तसेच तक्रारीचे ट्रॅकिंगही करता येणार आहे. सात दिवसांत तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर अॅपला रेंटींगही द्यावे लागणार आहे. तक्रारीचे समाधान झाले तर तक्रार बंद होईल किंवा तक्रारीबाबत समाधान झाले नाही तर तक्रार आपोआप पुन्हा संबंधित अधिकाऱ्याकडे जाणार आहे. तक्रारदाराने पहिल्या तक्रारीचे रेटींग दिल्याशिवाय दुसरी तक्रार करता येणार नाही.

जबाबादारी अन् कालावधी निश्चित

तक्रारींबाबत या अॅपमध्ये जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी तक्रारी संबंधित कर्मचाऱ्यांकडे निराकरणासाठी वर्ग व्हायच्या. नवीन प्रणालीनुसार तक्रार निराकरण करण्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित खातेप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तक्रार नोंदणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तक्रार २४ तासांच्या आत बघून कार्यवाही सुरू करावयाची आहे. तसेच संबंधित तक्रारीचा निपटारा हा सात दिवसांत करणे बंधनकारक केले आहे. सात दिवसांनंतरही निवारण झाले नाही तर ती खातेप्रमुखाकडे वर्ग होणार आहे. खातेप्रमुखानेही ती सोडवली नाही तर अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त असा तक्रारीचा प्रवास होणार असल्याने अधिकाऱ्यांना त्याचे निराकरण करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

स्वंयंचलित नोटिसा

नव्या प्रणालीमध्ये तक्रार निराकरण करावयाचा कालावधी हा ७ दिवस इतका निश्चित करण्यात आला आहे. २४ तासांमध्ये तक्रार ओपन करून कार्यवाही सुरू न झाल्यास तक्रार ती तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होईल. तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यास वर्ग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास सिस्टिमद्वारे ऑटोमॅटिक कारणे दाखवा नोटीस प्राप्त होणार आहे. सात दिवसात ओपन करून कारवाई केली नाही, तर तीच पद्धत वरिष्ठ अधिकाऱ्याला लागू होणार आहे.

रेटिंगचे बंधन

संबंधित विभागाने तक्रारीचे निराकरण करून ती बंद केल्यानंतर, नागरिक जेव्हा दुसरी तक्रार रजिस्टर्ड करतील त्यावेळेस यापूर्वी क्लोज केलेल्या तक्रारींसाठी नागरिकांना रेटिंग तसेच फिडबॅक देण्याची सुविधा नवीन कार्यप्रणालीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे रेटिंग तक्रार निवारण करणाऱ्या विभागास व अधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेल्या रेटिंगचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांचा फरफॉर्मन्स कसा आहे याबाबतची नोंद घेण्यात येणार आहे.

संकेतस्थळातही बदल

महापालिकेचे संकेतस्थळ आधिकाधिक लोकाभिमुख व्हावे तसेच मनपाच्या कामकाजाची नागरिकांना आधिक सुलभतेने माहिती व्हावी तसेच संकेतस्थळावर विविध विभागांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, कार्यासने, संरचना तसेच मनपा विविध ऑनलाइन सेवा, नवीन तक्रार निवारण प्रणाली, नो अवर वर्कस, आर. टी. आय, सिटिझन चार्टर तसेच महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक तसेच इतर महत्वाच्या शासकीय संकेतस्थळांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करा भरा, अन्यथा जप्ती!

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगर परिषदेने नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. सात दिवसांच्या आत हा कर भरला नाही तर स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती कारवाई होणार आहे. त्याच सोबत थकबाकीदारांची नावे जाहीर प्रसिद्ध करणे, नळकनेक्शन तोडणे आदी पर्याय वापरण्यात येणार आहेत.

नगर परिषद प्रशासनाने पालिकेच्या कर वसुलीच्या बाबत नागरिकांनी नेहमीच सहकार्य ठेवले आहे. किंबहुना गत काही वर्षांपासून पूर्वीची आणि नव्याने हद्दीत समावेश झालेल्या मालमत्तांच्याबाबत अवास्ताव दराने कर आकारणी करण्यात आली आहे. सन २००७ पासून दरसाल मार्च ते जून असे सरासरी चार महिने एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येतो. दररोजचा पुरवठा देखील समाधान कारक नसतो. शहरात डासांचा प्रादुर्भाव बाराही महिने कायम राहीला आहे. पथदिपाबाबत ऐन दिवाळीत अंधार होता. सफाई ठेकेदाराचे बील वेळेत आदा न केल्याने सणासुदीत घंटागाडी आली नाही. अशा एक ना अनेक समस्या असतांनाही नागरिक कर भरत होते. परंतु पालिकेने आता थेट जप्तीच्या कारवाईचा इशारा दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉटर मशिन अखेर सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील आरओ पाणी देणारे वॉटर वेडिंग मशिन अखेर सुरू झाले आहेत. तीन महिन्यांची वीजबिले मशिन्सच्या ठेकेदाराने भरली नव्हती. त्यामुळे रेल्वेने त्याचा पुरवठा खंडित केला होता. ठेकेदाराने आज वीजबिल भरल्याने ही मशिन्स सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकरोड स्थानकात प्लॅटफार्म एक, दोन व चारवर वॉटर वेडिंगचे प्रत्येकी एक मशिन आहे. अत्यंत कमी दरात स्वच्छ पाणी देणाऱ्या या मशिन ठेकेदार चालवतो. मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी ‘मटा’ ला सांगितले की, मशिन्सची प्रत्येकी चार ते पाच हजाराची वीजबिले होती. ठेकेदाराने ती तीन ते चार महिन्यांपासून भरलेली नव्हती. प्रशासनाने बुधवारी (दि. २८) सायंकाळी वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. अखेर ठेकेदाराची कानउघडणी केल्यावर त्याने वीजबिले भरली आणि मशिन्स पुन्हा सुरू झाल्या आहेत.

अद्ययावत मशिन येणार

नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये ही मशिन आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध मिळते. फन्टुस कंपनीने ही मशिन बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफार्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन बसविण्यात आल्या आहेत. सर्वात मोठ्या प्लॅटफार्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण तेथे प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिनची वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. सध्याच्या मशिनच्या जागी अत्याधुनिक मशिन येणार आहेत. या मशिनमधील पाणी घेण्यासाठी कर्मचाऱ्ंयाची गरज भासणार नाही. मशिनमध्ये नाणे टाकून प्रवाशी पाणी घेऊ शकतील. तसेच चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे.

हाताळण्यास सोपे

वेडिंग मशिनच्या विक्रेत्याकडे मागणी केल्यास पाणी उपलब्ध होते. प्रवाशी पैसे टाकूनही पाणी घेऊ शकतो. एक आणि पाच रुपयांचे नाणे टाकल्यास पाणी मिळते. पाणी शुद्ध कसे होते ते दाखविणाऱ्या आकृत्या मशिनवर आहेत. पाण्यावरच आरोग्य अवलंबून आहे. मात्र अनेक प्रवासी वेडिंग मशिनचे पाणी घेण्याचे टाळतात. त्यामुळे येथे पाणी सेवा देणारा कर्मचारी अडकून पडतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने आताची सर्व आधुनिक मशिन हटवून अत्याधुनिक मशिन बसविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅटफार्म एकवरील मशिन हटवून ते दोनवर हलविण्यात आले आहे. आता त्याजागी अत्याधुनिक मशिन येणार आहे.

नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील ई-क्लास दर्जाच्या सात स्थानकांना वॉटर प्युरिफायरच्या सहाय्याने शुद्ध पाणी देण्यात येत आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे प्युरिफायर बसविण्यात आले आहेत. प्रवाशांची उन्हाळ्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्युरिफायरला पाचशे लिटरची सिंटेक्सची टाकी जोडण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर नेहमीच्या टाक्यांची स्वच्छता करणे अवघड असते. त्यामुळे पाणी पिऊन आजारी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वॉटर प्युरिफायरमुळे आजाराला प्रतिबंध होत आहे. नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टॅन्ड आहे. ज्यांना वॉटर वेडिंग मशिन्सचे पाणी नको असेल त्यांना जलकुभांचे पाणी मोफत मिळते.

नागरिकांना परवडणारे दर (रुपयांमध्ये)

पाणी................................................स्वतःची बाटली.........बाटलीसह पाणी
तीनशे मिलीलिटर ..........................१ ........................२
पाचशे मिलीलिटर..........................३ .........................५
एक लिटर ...................................५ .........................८
दोन लिटर ..................................८ ........................१२
पाच लिटर ...................................२०........................२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांना चुना

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ढोकेश्वर मल्टिस्टेट पतसंस्था आणि हरी ओम ग्रुपचे प्रकरण ताजे असतानाच लासलगाव शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये सीट्रस् कंपनीचे चेरमन ओमप्रकाश गोयंका, सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीविरोधात ८० लाखांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दरवर्षी अनेक घोटाळे उघड होत असतानाही लासलगाव व परिसरातील सुशिक्षित एजंट्सला कमिशनचे आमिष देऊन गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळेल असे स्वप्न दाखविले जात आहे. 'सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार' या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंकासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात ८० लाख रुपयांची फसवणूक व अपहार प्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुंतवणूकदारांना तिप्पट-चौपट पैसे देण्याचे आमिष दाखवून ट्विंकल कंपनीने लासलगाव व परिसरातील नागरिकांना चुना लावला आहे. ही रक्कम अंदाजे १०० कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या कंपनीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असून यानंतर अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कार्यालय बंद

लासलगाव येथील कविता पगार यांनी पती अनिल पगारे यांच्या निधनानंतर मिळालेले विम्याचे १५ लाख रुपये या कंपनीत गुंतविले. तसेच परिवारातील इतरही सदस्य नातेवाइक यांचीही रक्कम विविध नावाने गुंतवणूक केली. परंतु ही रक्कम मुदत पूर्ण होवूनही परत मिळाली नाही. पगार यांनी लासलगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनूसार त्यांनी लासलगाव येथील रुपेश पांडे, पंकज सुर्वे, संतोष जगताप, संतोष खाडे, अनिल गवळी, विजय भोर, तसेच देवळा येथील दीपक पगार व डॉ. भूषण आहेर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर एजंट्समार्फत ही रक्कम गुंतविली. लासलगाव येथील कोटमगाव रोडवर सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीची शाखा आहे. या शाखेत वारंवार चकरा मारुनही त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या हे कार्यालयही बंद आहे.



एजंट्सचा झगमगाट

तीन चार वर्षांपूर्वी ट्विंक॔ल या नावाने लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात ील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. लासलगाव परिसरातील एजंट्सनी प्रचंड कमिशन घेऊन महागड्या गाड्या खरेदी केल्या. त्यांचा झगमगाट पाहून अनेक गुतवणूकदार भुलले. अशा सर्व एजंट्सला पोलिसांनी अटक करून त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी अशी मागणी त्रस्त गुंतवणूक दारांनी केली आहे.

आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता या गुन्ह्याची व्याप्ती वाढून करोडो रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा उघडकीस येईल. गुंतवणूकदारांनी कोठेही गुंतवणूक करताना आधी संपूर्ण माहिती घ्यायला हवी.-जनार्दन सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक, लासलगाव

पती अनिल यांच्या निधनानंतर विम्याचे १५ लाख रुपये मिळाले अशी माहिती एजंट्सला मिळाली.त्यांनी अनेक आमिष दाखवत माझी सर्व रक्कम या स्कीममध्ये गुंतवणूक करून घेतली. दीड वर्षांपासून त्यावरील व्याज ही नाही आणि रक्कम देण्यासही टाळाटाळ करीत आहेत. आता कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न समोर उभा आहे.- कविता पगार, तक्रारदार



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात प्रमाणपत्र वाटपासाठी मार्गदर्शक सूचना जारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात जातीचे प्रमाणपत्र देताना मागास प्रवर्गातील नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यात आता विविध प्रांत कार्यालये, सेतू केंद्र याठिकाणी जात प्रमाणपत्र मिळण्यात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यापूर्वी राज्य सरकारने कुटुंबातील रक्तनाते संबंधात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी नियमात दुरुस्ती करण्याबाबतची अधिसूचना काढली होती. तीन वर्षांपासून विविध जाती प्रवर्गाच्या तसेच मराठा समाजातील तसेच कुणबी जातीच्या प्रमाणपत्रे वाटपासंबंधी सेतू केंद्रे, उपविभागीय कार्यालये यांच्यामार्फत सरकारकडे विविध तक्रारी व मागण्या येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले.

राज्यातील जातींच्या प्रवर्गांचा समावेश अनुसूचित जातीसाठी १० ऑगस्ट १९५०, विमुक्त व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१ व इतर मागास प्रवर्गासाठी १३ ऑक्टोबर १९६७ या तारखा आहेत. यापूर्वीचे पुरावे जात प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असले तरी मागासवर्गीय व्यक्तींना अडचणी येतात. त्याच ओळखून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

जातींसंदर्भात समाजात ज्या रुढ नावाने, आडनावाने, जातीने संबोधित अशा नोंदी जुन्या अभिलेख्यात अभिलिखित झाल्याचे आढळल्यास, जातीबाबत काही अपभ्रंशित उल्लेख होत असल्यास, तशा जुन्या नोंदी असल्यास उदा. ले. पा - लेवा पाटीदार, कु, कुण - कुणबी - इ. अशा जुन्या नोंदी अर्जदाराच्या इतर पुराव्यांशी सुसंगतता तपासून जाती प्रमाणपत्राबाबत योग्य निर्णय सक्षम प्राधिकाऱ्याने घ्यावा, असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

प्रकरणानुसार निर्णय घ्यावा

एखाद्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय हा कोणत्या संदर्भात दिलेला आहे, त्याचा अभ्यास करून व इतर न्यायालयीन निर्णय आणि इतर कागदपत्रे व परिस्थितीजन्य पुरावे यांचा सांगोपांग विचार करून या प्रकरणी सक्षम प्राधिकारी यांनी प्रकरणानुसार उचित निर्णय घ्यावा, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका सुरूच

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिडकोतील अतिक्रमण हटाव मोहिमेत गुरुवारी दुर्गानगर येथील कॉर्नरसह परिसरातील सुमारे ५० हून अधिक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी काही दुकानदारांनी कागदपत्रे दाखवून या मोहिमेस विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु;Ḥ अधिकाऱ्यांनी त्यास न जुमानता संपूर्ण अतिक्रमण काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिडकोत मागील आठवड्यापासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला त्रिमूर्ती चौक ते दुर्गानगर या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पवननगर ते उत्तमनगर या रस्त्यावरील सुमारे दोनशेहून अधिक दुकाने व घरांच्या समोरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानुसार आज सकाळी दुर्गानगर येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दुर्गानगर येथे सिडको प्रशासनाने उभारलेल्या इमारतीच्या सामाईक जागेत पत्र्याचे शेड उभारून काही व्यवसाय सुरू असल्याने ही दुकाने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी येथील व्यवसायिकांनी ही जागा सिडकोने आम्हाला दिली असल्याचे सांगून काही कागदपत्रे दाखविली. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी सिडकोचे प्रशासक झोपे यांच्याशी संपर्क साधून या इमारतीची माहिती ताबडतोब देण्याची सूचना केली. त्यानंतर पंधरा मिनिटांनी सिडको प्रशासकांनी हे अतिक्रमण असल्याचे सांगितल्यावर महानगरपालिकेने कोणालाही न जुमता ही मोहीम पूर्णच केली. यावेळी माजी नगरसेवक पुंजाराम गामणे व विभागीय अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याठिकाणी असलेले हॉटेल, पानटपरी, गॅरेजचेही अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर कामटवाडे रोडवरील दुकाने व हॉटेल्सच्या पुढे असलेली सर्व शेडही जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी काही व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यास मुदत मागितली परंतु; अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता ही मोहीम सुरूच ठेवली. या मोहिमेत दोन जेसीबी, पन्नास कर्मचाऱ्यांसह पेालिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुर्गानगरच्या 'त्या' अतिक्रमणावरही जेसीबी

दुर्गानगर येथे असलेल्या अतिक्रमणामुळे बसला वळण घेणेसुद्धा अवघड होत होते. सिडकोने उभारलेल्या इमारतीच्या सामाईक जागेत हे अतिक्रमण करण्यात आले होते. आजपर्यंत अनेक मोहिमा राबविण्यात आल्या, मात्र या अतिक्रमणाला हात लावण्यात आला नाही. मुंढे आल्यानंतर हे अतिक्रमणही जमीनदोस्त करण्यात आले. हे येथील अतिक्रमण काढताना एका वकिलानेसुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून काही कागदपत्रे सादर केली. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे सांगून ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी सिडको प्रशासकांना या जागेची फाईल मागितल्यावर प्रशासकांनी वेळ लागेल असे सांगितले होते, मात्र विभागीय अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन तातडीने ही फाइल पाठवा, अशी सूचना केल्यावर प्रशासक स्वतः ही फाइल घेऊन घटनास्थळी आले. त्यांनीही ही सामाईक जागा असल्याचे सांगताच या अतिक्रमणावर जेसीबी चालविण्याची सूचना करण्यात आली. कामटवाडे रोडवरील एका हॉटेलचे अतिक्रमण काढतानाही काही प्रमाणात विरोध झाला होता. मात्र, त्यासही अधिकाऱ्यांनी न जुमानता अतिक्रमण हे अतिक्रमणच असते, असे सांगून ते काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगवैखरी स्पर्धेत ‘बीवायके’चा झेंडा

0
0

'ताटी उघडा'ला तृतीय पारितोषिक

बागेश्री पारनेरकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित 'रंगवैखरी' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत नाशिकच्या बी. वाय. के. कॉलेजला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. चषक आणि १ लाख रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते.

रंगवैखरी या कलाविष्कार नाट्यस्पर्धेची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी या केंद्रांवर प्राथमिक व विभागीय फेरीतून निवडलेले ६ उत्कृष्ट नाट्यविष्कार महाअंतिम फेरीसाठी निवडले होते. या स्पर्धेचे हे पहिले वर्ष होते. या वर्षी 'महाराष्ट्री ते मराठी' या विषयावरील विविध कलांच्या म्हणजे नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य यांच्या एकात्म नाट्यविष्कारातून मराठी भाषेचे स्वरूप उलगडले. स्पर्धेसाठी प्रतिमा कुलकर्णी, प्रदीप मुळे, संदेश कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम केले.

बी. वाय. के. कॉलेजच्या 'ताटी उघडा' या कलाविष्कारामध्ये कॉन्व्हेंट शाळेतील मुलांमध्ये मराठी कशी रुजली पाहिजे, मराठीचा समृद्ध इतिहास मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, याविषयी भाष्य केले आहे. सुजित जोशी यांच्या मूळ कथेचे प्रिया जैन हिने नाट्यरुपांतर केले होते. कृतार्थ कन्सारा यांनी दिग्दर्शन केले होते. कॉलेजच्या २४ विद्यार्थ्यांचा या नाट्यविष्कारात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images