Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तपासणी फी अव्वाच्या सव्वा

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: डॉक्टरी पेशा अनुभवाने समृद्ध होतो, याच अनुभवाचा आधार घेत कन्सल्टंट फीमध्ये जबरदस्त वाढ करण्यात आली आहे. कन्सलटंट फीच्या मदतीला डायग्नोस्टिक कीटही असल्याने एका वेळी पेशंटकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यात येत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे.

नाशिकमध्ये जनरल प्रॅक्टिस करणाऱ्यांच्या बरोबरीने तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. याशिवाय वेगवेगळी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स नाशिकमध्ये दाखल झाली आहेत आणि होत आहेत. एकाच आजाराबाबत किती तपासणी शुल्क असावे, याबाबत काही वर्षांपूर्वी कायदा करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, मेडिकल असोसिएशनने त्यास हरकत घेतली. वकील तसेच आर्किटेक्ट आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून वेगवेगळी फी आकारून ग्राहकहिताचे काम करतात, अगदी त्याच पद्धतीने डॉक्टरांचे काम असून, त्यांना आपल्या कामाचा मोबदला ठरविण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. आयएमएकडून होणारा विरोध लक्षात घेता सरकारने हा संभाव्य कायदाच बासनात गुंडाळून ठेवला. यामुळे आज एकाच आजाराबाबत तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळे शुल्क आकारताना दिसतात. या तपासणी शुल्काला कोणताही आधार नसल्याने डॉक्टरांना वाटते तितके शुल्क आकरले जाते. याचा ताण पेशंटच्या खिशावर पडतो. गरजवंताला अक्कल नसते, या म्हणीचा प्रत्यय प्रत्येक पेशंटला येत असतो. कॉर्पोरेट अथवा भव्य दिव्य हॉस्पिटल्समध्ये चालणाऱ्या या प्रकारांचा परिणाम मध्यम अथवा अगदीच लहान क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांवर पडत आहे. पैसे कमावण्याची अहमहमिका थांबविण्यासाठी आजमितीस कायदा अपुरा असून, यात भरडल्या जाणाऱ्या पेशंटचे दुखणे वाढतेच आहे. उपनगरांमध्ये लहान-मोठे क्लिनिक थाटलेले डॉक्टर्स संदर्भ देण्याचे काम करतात. आवश्यकता असो की नसो पेशंटला अमूक एका स्पेशालिस्टला दाखवून घ्या, असे म्हणत दुसऱ्या ठिकाणी धाडले जाते.

असे आहे तपासणी शुल्क

बीएएमएस किंवा बीएचएमएस डॉक्टर - ५० ते १०० रुपये

एमबीबीएस डॉक्टर - २०० ते ५०० रुपये

एमडी डॉक्टर - ५०० ते ८०० रुपये

एखाद्या रोगाचे विशेष तज्ज्ञ - १००० ते १५०० रुपये

डॉक्टरांचे शुल्क हे त्यांच्या अनुभवानुसार तसेच येणाऱ्या रिझल्टवर अवलंबून असते. कोणी किती शुल्क आकारावे आणि जास्त शुल्क असलेल्या डॉक्टरांकडे जावे की न जावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधा, डॉक्टरांचा अनुभव याचा परिणाम शेवटी तपासणी शुल्कावर होणारच.

- डॉ. मंगेश थेटे, अध्यक्ष आयएमए, नाशिक


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी भाषेबाबत तरुणाईचे ‘अगाध’ ज्ञान

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

'श्यामची आई' पुस्तक सावरकरांनी लिहिले, पहिले ज्ञानपीठ 'बा.बा.' आमटेंना मिळाले, शिवकालिन मराठी शिवलिपीत लिहिले गेले, 'तळे राखील तो पाणी चाखेल' या म्हणीचा अर्थ सेल्फिश होणे असा आहे... ही साध्या प्रश्नांची ही गजब उत्तरे आहेत महाविद्यालयीन तरुणाईची. मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या प्रश्नोत्तरांमध्ये तरुणाईकडून मराठी भाषेच्या या 'अगाध' ज्ञानाचा उलगडा झाला आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांची नावे धड माहीत नाहीत, ना साहित्यिकांची. बाबा आमटे यांच्या नावातील 'बाबा' ही आद्याक्षरे (बा.बा) आहेत, असाही शोध या तरुणाईकडून लागला!

मराठी भाषेवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे. ग्लोबल स्तरावर पाहिले तर मराठीच्या तुलनेत इंग्रजी भाषा अधिक प्रभावी ठरत असून, ती बोलणे अधिक सन्मानाचे समजले जात आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन तरुणाईमध्ये मराठी भाषेची सद्य:स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. विचारलेल्या एकूण २० प्रश्नांपैकी केवळ चार-पाच प्रश्नांची अचूक उत्तरे आली.

आळंदी ही तुकाराम महाराजांसाठी प्रसिद्ध आहे, श्यामची आई हे पुस्तक वीर सावरकरांनी लिहिले आहे, ज्ञानपीठ व. पु. काळे व ना. धों. महानोरांना मिळाले आहे, शाळा कादंबरी ग. दि. माडगुळकरांनी लिहिली आहे, लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ, तमाशातील काळूबाळू हे साहित्यातील विनोदवीर आहेत, सुमित राघवन हाच फास्टर फेणे आहे ही व यांसारखी भयावह उत्तरे तरुण-तरुणींनी दिल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

मराठी भाषेविषयी तरुणाईला आस्थाच नाही, असे सर्वेक्षणाअंती आढळून आले. कारण आज मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्किंग साइटचा वापर होत असूनही त्यावर मराठी भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण अल्प आहे. मराठीतील पाच कादंबऱ्या, पाच लेखक किंवा पाच नाटके तरुणाईला माहीत नाहीत हे मराठीचे मोठे दुर्दैवच 'मटा'ने घेतलेल्या प्रश्नोत्तरांतून अधोरेखित झाले.

नाशिकची तरुणाई नेटसॅव्ही

नाशिकच्या तरुणाईची भाषेविषयी अतिशय बिकट परिस्थिती असताना ते शंभर टक्के नेटसॅव्ही आहेत, ही बाब मात्र सकारात्मक आहे. ई-मेलवर मराठी टंकलेखन (टायपिंग) करीत नसले तरीही मराठी ब्लॉग वाचण्यात मात्र ते आघाडीवर आहेत. भलेही ब्लॉग्सची नावे ते सांगू शकत नसतील, परंतु त्यावरील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक वाचन त्यांना खुणावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रौर्याची गाठली परिसीमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रौर्याची परिसीमा गाठत आईसह तिच्या प्रियकाराने अवघ्या सहा वर्षांच्या बालकाची हत्या केल्याची धक्कादायक बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. निरंजन उर्फ साहील चतुर्वेदी आणि सोनूबाई उर्फ सोनाली थोरात अशी संशयितांची नावे आहेत.

सोनाली थोरातचे यापूर्वी दोन विवाह झाले असून, पहिल्या पतीपासून तिला दोन मुलगे आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. सध्या ती एक वर्षापासून शरणपूररोडवरील मिशन मळा येथे एका भाड्याच्या घरात निरंजनसोबत राहते. निरंजनबरोबर तिचा विवाह झालेला नाही. सोनालीबरोबर नकूल थोरात (वय ६), नंदिनी (वय १०) आणि विघ्नेश ही मुले राहत होती. सोनालीने त्यांना महिरावणी परिसरातील एका आश्रमशाळेत टाकले होते. शनिवार, रविवारी सुटी असल्याने ही दोन्ही बालके आईकडे आली होती. सोनाली जेव्हापासून निरजंनसोबत राहते तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे निरंजन या मुलांना बेदम मारहाण करीत होता. सतत मारहाणीमुळे ही मुले दहशतीखाली वावरत होती. या क्रौर्याची परिसीमा गाठत रविवारी दोघांनी जबर मारहाण करीत चिमुकल्या नकूलचा जीव घेतला.

सजग नागरिकांमुळे उघड झाली हत्या

सकाळी दोघे नकूलला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर सोनालीसह निरजंन नकूलचा मृतदेह घेऊन घरी परतले. रात्री झालेल्या हाणामारीच्या प्रकाराबाबत शेजारी अवगत होते. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधून परतलेल्या दोघांची देहबोली लक्षात घेता, शेजारी राहणारे सतीश दलाल, सुमन खरे, कविता गाडे, सुरेखा मोजेस, सुवंदिता मकासरे, शॉरलेट गोम्स असे इतर नागरिक थेट घरात घुसले. तिथे निपचित पडलेल्या नकूलला पाहून सरकारवाडा पोलिस स्टेशनला माहिती कळवण्यात आली. त्याचे पूर्ण शरीर हाणामारीची साक्ष देत होते. दुसरीकडे पलंगाखाली क्षीण झालेली नंदिनी शेजाऱ्यांना दिसली. प्रचंड ताप आलेली नंदिनी घाबरलेली होती. नागरिकांनी १०८ अॅम्ब्युलन्सला बोलावून तिला औषधोपचारासाठी दवाखान्यात हलवले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी पुढील कार्यवाही करून सुरुवाम्ला सोनालीला, तर काही वेळातच निरंजनलला अटक केली. या प्रकरणी सतीश दलाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिसांनी दोघांविरोधात हत्या, तसेच हत्येचा प्रयत्न या कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांच्या गुरुंचा साकारला पुतळा

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
tweet : @FanindraMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू व सहकार चळवळीत योगदान देणारे लक्ष्मणराव इनामदार यांचा अर्धकृती पुतळा नाशिकमध्ये साकारण्यात आला आहे. इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राजधानी दिल्लीतील सहकार भारतीच्या राष्ट्रीय सहकारी अनुसंधान आणि विकास अकादमीत तो बसविला जाणार आहे. हा पुतळा नाशिकचे शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारला असून, सरसंघचालकांच्या हस्ते त्याचे अनावरण बुधवारी होणार आहे.

इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार सहकार भारतीच्या कार्यालयात मोठे तैलचित्र लावावे, असे काही पदाधिकाऱ्यांनी सुचवले; परंतु सहकार भारतीचे सतीश मराठे यांनी डोंबिवली येथील लोकमान्य गुरुकुलात लोंढे यांनी साकारलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा पाहिला होता. त्यावरून लोंढे यांच्याकडूनच हा पुतळा तयार करून घेऊ, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांनीही लगेच होकार दिला. दीड महिन्यापूर्वी लोंढे यांना फोनवरून माहिती देण्यात आली. पुतळा तयार करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असलेले फोटो व त्यांच्या संबंधित पुस्तकाचे वाचन करून तो पुतळा दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय संवयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह उपस्थित रहाणार आहे. यावेळी मूर्तीकार संदीप लोंढे यांचा मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

असा आहे पुतळा

हा पुतळा ब्रांझ धातूत तयार करण्यात आला असून, अवघ्या दीड महिन्यात तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला हा पुतळा मातीत बनवण्यात आला होता. त्यावरुन त्याचा मोल्ड तयार करण्यात आला. या मोल्डवरून ब्रांझचा पुतळा तयार करण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरुन हा अर्धकृती पुतळा दिल्ली येथे नुकताच रवाना करण्यात आला.

कोण आहेत इनामदार?

मूळचे सातारा जिल्ह्यातील खटावचे रहिवासी असलेल्या लक्ष्मणराव इनामदारांनी गुजरातेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रुजविला होता. आपल्याला संघाच्या शाखेत आणणारे आणि संघ संस्कार करणारे लक्ष्मणरावच होते, असे मोदी आवर्जून सांगतात आणि तसे त्यांनी ‘ज्योतिपुंज’ या पुस्तकामध्ये लिहिलेदेखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या सेतुबंध या पुस्तकात नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मणराव इनामदार यांचा सातत्याने उल्लेख केलेला आढळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक पत्नीवर पतीचा चाकूहल्ला

$
0
0

नाशिक:

नाशिक उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेवर त्यांच्या पतीनंच चाकूनं हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तारा मधुकर मोरे (वय ५४) असं या मुख्याध्यापिकेचं नाव आहे. त्या नेहरूनगर येथे राहणाऱ्या आहेत. शाळेच्या आवाराच्या बाहेर असताना पती मधुकर मोरे यानं त्यांच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर धारदार चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तारा मोरे गंभीर जखमी झाल्या आहेत. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. हल्ल्यानंतर मधुकर मोरे फरार झाला असून उपनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोपर्यंत मराठीत स्वप्न तोपर्यंत मराठी सुरक्षित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भाषा जपण्याचे किंवा वाढविण्याचे काम साहित्यिक नव्हे, तर सर्वसामान्य करतात. जोपर्यंत आपण मराठीत बोलू, भांडू किंवा जोपर्यंत आपली स्वप्ने मराठीतून येतील तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही. भाषा जपणे आणि ती वाढविणे यात सर्वसामान्यांचे योगदान मोठे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन विशाखा पुरस्कारप्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

उत्तमनगर येथील वावरे महाविद्यालयात मराठी गौरवदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी शिंदे बोलत होते. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ. नितीन पाटील, डॉ. ए. के. शिंदे, डॉ. किरण रकिबे, प्रा. सोमनाथ घुले, डॉ. के. एम. खालकर, प्रा. दिलीप जाधव, डॉ. राहुल पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी गणेश फडोळ आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेची माहिती दिली. विद्यापीठ प्रतिनिधी फडोळ याने मनोगत व्यक्त केले. मराठी गौरव दिनानिमित्त आयोजित निबंध, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी गौरविण्यात आले. यात कावेरी भालेराव, अर्चना कुमावत, जागृती शिंदे, स्नेहा वाणी, हर्षदा आहेर, पूनम पवार आदींना पारितोषिके मिळाली. प्रा. सोमनाथ घुले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. एम. खालकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निगडोळ येथे आढळले बिबट्याचे बछडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली असून, ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

शेतात ऊसतोडणी सुरू असताना कामगारांना एक बिबट्या व दोन बछडे आढळले. कामगारांना बघून बिबट्या मादी नदीकडे निघून गेली, तर बछडे ऊसातच राहिले. शेतकऱ्यांनी ही माहिती उपसरपंच शरद मालसाने यांना दिली. त्यांनी वनाधिकारी सुनील वाडेकर यांना कळविले. वाडेकर यांनी तातडीने वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तेथे एक बछडा आढळला. त्यास मादी ज्या भागात गेली त्या कोलवन नदी परिसरातील झाडाझुडपांकडे सुरक्षित हुसकून लावण्यात आले. या मादी बछड्यांना घेऊन जंगलात जाण्याचा अंदाज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. तूर्तास वनविभागाने येथे बंदोबस्त तैनात करीत ग्रामस्थांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

बिबट्याचे बछडे हे अंदाजे एक महिन्याचे असून, त्यास पकडून अन्यत्र नेले तर सदर मादी त्याच्या शोधात परिसरात येत बछडा न सापडल्यास हल्ला करू शकते. त्यामुळे बिबट्याला तेथेच सुरक्षित सोडले आहे. पिंजरा लावण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. नागरिकांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

- सुनील वाडेकर, वनाधिकारी दिंडोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीचा जयघोष

$
0
0

जिल्हाभरात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथदिंडी, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामूहिक वाचन उपक्रम, अभिमान गीताचे समूह गायन आदी उपक्रम राबवत मराठीचा जागर करण्यात आला.

मालेगावात विविध उपक्रम

मालेगाव : येथील शाह विद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य संजय बेलन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक ए. डी. तावडे, के. पी. मुसळे, एन. के. गायकवाड, एस. पी. बेलन, व्ही. पी. आर्विकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. या निमित्ताने प्रारंभी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केली होती. यानंतर सभागृहात मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले. यावेळी निबंध, अक्षरलेखन स्पर्धा, वाचन उपक्रम राबविण्यात आले. पी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

उज्ज्वल प्राथमिक विद्यालय

संगमेश्वर भागातील उज्ज्वल प्राथमिक विद्यालयातील चिमुरडे विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रंथदिंडी काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मराठी वेशभूषा परिधान करून हातात घोषवाक्य घेत विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष केला. मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांनी अध्यक्षस्थान भूषविले. संस्थेचे सचिव रईस शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले.

काकाणी वाचनालय

प. बा. काकाणी नगर वाचनालय येथे संदर्भ ग्रंथ व कोष वाङ्मय प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मराठी विश्वकोष, महाराष्ट्र सांस्कृतिक कोष, वृत्तपत्रीय परिभाषा कोष, ज्ञानकोष, भूगोल कोष, शब्दकोष, चरित्र कोष, देविकोष, शासकीय पदनाम कोष, ऐतिहासिक शब्दकोष असे विविध प्रकारचे कोष, वाङ्मय, पुस्तके व ग्रंथ वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे ग्रंथप्रदर्शन काकाणी वाचनालयात रसिकवाचक व अभ्यासकांसाठी दोन दिवस विनामूल्य खुले राहील, असे आयोजकांनी कळविले आहे.

व्ही. जे. हायस्कूल

मनमाड : मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांचे स्वरचित काव्यवाचन घेण्यात आले. मयंक वाघ, सुहास सूर्यवंशी, ओम परदेशी यांच्या काव्यवाचनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. कवी बापू गोविंद यांनी ज्ञानपीठ पुरस्कारासंबंधी माहिती दिली. सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, उपमुख्याध्यापक संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मनमाड वाचनालय

मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त व स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयात वाचनासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते. छत्रे न्यू इंग्लिश स्कूल व मरेमा विद्यालयमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सलग तीन तास आपल्या आवडीची पुस्तके निवडून सामूहिक वाचनाचा उपक्रम राबविला. सर्वप्रथम इंडियन हायस्कूलची विद्यार्थिनी नूपूर आहेर व छत्रे न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी संजीवनी मोरे यांच्या हस्ते कवी कुसूमाग्रज व स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी आदी उपस्थित होते.

बेज विद्यालय

कळवण : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेज येथे आयोजित मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्राचार्य पी. एम. बागूल अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून अभिनवचे मुख्याध्यापक भिमराव रौंदळ उपस्थित होते. यावेळी विलास शेवाळे, जीवन बागूल, दीपक कापडणीस, प्रभाकर पवार आदी उपस्थित होते. कैलास हिरे यांनी सूत्रसंचालन केले.

दिंडोरीत गौरव दिन

दिंडोरी : येथील मविप्र महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. देवीदास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आर. आर. झोमन, एन. के. नवले, सुधीर मुरकुटे, बलराम कांबळे, डॉ. ज्योती पवार उपस्थित होते.

कुसुमाग्रज विद्यालय

निफाड : निफाड तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या तात्यासाहेब शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांच्यामुळे शिरवाडे गावाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. त्याचा अभिमान बाळगून शिक्षणक्षेत्रात गावाने नावलौकिक मिळवावा, असे आवाहन निफाड पंचायत समितीचे सभापती पंडित आहेर यांनी केले.

मविप्रच्या कविवर्य कुसुमाग्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आहेर बोलत होते. यावेळी येथे असणाऱ्या कुसुमाग्रज ग्रंथालयात राज्यसेवा व लोकसेवा आयोगाचे अभ्यासपुस्तके स्वखर्चाने देणार असल्याचे आहेर म्हणाले. यावेळी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन सभापती आहेर, मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, उत्तम भालेराव, उपजिल्हाधिकारी पाटील, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, वैशाली झनकर, मुख्याध्यापक व्ही. आर. थोरात यांनी केले

रानवड विद्यालय

निफाड : रानवड कारखाना येथील क. का. वाघ विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कवि ऐश्वर्य पाटेकर, प्राचार्य विकास शिरसाट, प्राचार्य पगार, पर्यवेक्षक ढोमसे उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी मराठी भाषा काल आणि आज व कविवर्य कुसुमाग्रज या विषयावर मार्गदर्शन केले.

सटाणा नगरपालिका

सटाणा : येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे सभापती शमा अरीफ मन्सुरी, माजी उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते राकेश खैरनार, बांधकाम सभापती सुनीता मोरकर, उपसभापती शमिम शफीक मुल्ला, नगरसेविका भारती सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, सोनाली बैताडे, संगीता देवरे, नगरसेवक बाळू बागूल, मुख्याधिकारी हेमलता डगळे, दीपक नंदाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आप’चा निफाडमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सुकेणे येथील आदिवासी वस्ती कायम करावी व इतर मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने निफाड तालुकाध्यक्ष उत्तम निरभवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात 'आप'चे जिल्हाप्रमुख अॅड. बायचले सहभागी झाले होते. सुकेण्यातील आदिवासी वस्ती कायम करण्यात येऊन त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व २०११चा शासन निर्णय लागू करावा, अनागोंदी कारभार करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मोर्चात अनिल कौशिक, अल्ताफ शेख, सुरेश देवकर, संतोष पगारे, संतोष गांगुर्डे, भारत पवार, राजाराम गोटरणे, सुनंदा गांगुर्डे, मीरा पवार, शीतल पवार, लता हिंगमिरे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’साठी धावाधाव

$
0
0

शिवाजीनगर केंद्रात गर्दी; उर्वरित भागात नवीन केंद्र सुरू करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक जिल्हा प्रशासनाने गरजेचे असलेले आधार कार्ड काढण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र सुरू केले होते. परंतु, यात आधार कार्ड केंद्र चालकांकडून चुकीचे कामे केली जात असल्याचे समोर आल्याने अनेक आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. यामुळे सातपूर भागातील शिवाजीनगर या एकमात्र शिल्लक आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असून, नागरिकांची धावपळ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सातपूर भागात प्रशासनाकडून तीन आधार केंद्र देण्यात आली होती. त्यात दोन केंद्रांवर चुकीचे काम होत असल्याने त्या केंद्रांना कुलूप ठोकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एकाच शिवाजीनगरच्या आधार कार्ड केंद्रावर नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी गर्दी केलेली आहे. अशात एकाचवेळी अनेकजण आधार कार्ड काढण्यासाठी येत असल्याने येथील केंद्र चालकही हैराण झाले आहेत. प्रशासनाने नवीन आधार केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गैरसोय दूर करावी

शासकीय कामकाजात आधार कार्ड सरकारने सक्तीचे केले आहे. यामुळे सहाजिकच ज्यांनी आधार कार्ड काढलेले नाही. ते कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर येत असतात. सातपूर भागात तीन ठिकाणी आधार कार्ड काढण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे दोन आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. यात केवळ शिवाजीनगर भागात एकमेव आधार केंद्र सुरू असल्याने त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सोयीकरीता नव्याने आधार केंद्र सुरू करीत होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी आता केली जात आहे.

चुकीच्या कामामुळे केंद्र बंद

बंद करण्यात आलेल्या आधार केंद्रांवर चुकीचे कामे होत असल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. त्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अव्यवस्था तसेच चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळेच जे केंद्र बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. कुठलाही पुरावा नसताना आधार कार्ड काढले जात असल्याने प्रशासनाने आधार केंद्र बंद करण्याचा निर्णय़ घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवननगरला हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
नाशिक महानगरपालिकेने सध्या सिडकोतील अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष दिल्याचे दिसत असून, मागील आठवड्यात सलग तीन दिवस त्रिमूर्ती चौक परिसरात अतिक्रमण मोहीम राबविली होती. मंगळवारी सिडकोतील पवननगर ते उत्तमनगरच्या मुख्य रस्त्यावरील सुमारे दीडशे ठिकाणांचे अतिक्रमण काढले. काहीजणांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतल्याचेही दिसून आले. आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सिडको परिसरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक अतिक्रमण झाले असून, वाहने चालविणेसुद्धा अवघड होत असते. त्यामुळे महानगर पालिकेने सुरुवातीला त्रिमूर्ती चौक भागातील भाजीबाजाराचा प्रश्न सोडवून प्रशासनाने त्रिमूर्ती चौक ते दुर्गानगर या मुख्य रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण काढले. त्यानंतर मंगळवारी पवननगर येथून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. दुकानांच्या समोर असलेले पक्के ओटे, पत्र्यांचे शेड यांसह अतिक्रमणे प्रशासनाने हटविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने कोणालाच न जुमानता संपूर्ण रस्त्यावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढले. पवननगर हा अत्यंत वर्दळीचा चौक असून या चौकात भाजी बाजारही असल्याने सायंकाळी या ठिकाणी चौकात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यावर उपाय म्हणून हे अतिक्रमण प्रशासनाने काढले. परंतु, हे अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेत दीडशे अतिक्रमणे काढण्यात आली. ही अतिक्रमण मोहीम दोन जेसीबींसह पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी राबविली.

गल्लीबोळातील अतिक्रमणांचे काय?

महापालिकेने सिडकोतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सिडकोतील गल्लीबोळातील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अनेकदा अनेक राजकीय नेत्यांचे सिडको परिसरात अतिक्रमण असताना प्रशासनाकडून त्याकडे काणाडोळा केला जात असून, सर्वांना समान न्याय प्रशासनाने दिला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सिडकोत आजही अनेक ठिकाणी रिक्षासुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिक्रमणांकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

ओटे तोडले

सिडकोत महापालिकेने राबविलेली ही मोहीम प्रथमच अशा पद्धतीने राबविण्यात आली आहे. प्रत्येक दुकानाचा ओटा काढण्याबरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढल्याने हा रस्ता ओळखूच येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच उत्तमनगर येथे एका राजकीय माजी पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमणसुद्धा प्रशासनाने काढल्याने नवनियुक्त आयुक्तांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासऱ्याचा खून करणारा जावई पाच वर्षांनी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलीला नांदायला पाठवत नाही, या कारणातून सासऱ्याचा खून करून परागंदा झालेल्या जावयाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच वर्षांनी शोधून बेड्या ठोकल्या. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे १९ ऑगस्ट २०१३ मध्ये खुनाची घटना घडली होती.

सोमनाथ फुलाजी मोरे (रा. खंबाळे, ता. सिन्नर) असे या संशयिताचे नाव आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवत नाही या कारणातून मोरेने सासरे आत्माराम सूर्यवंशी यांची नांदूरशिंगोटे शिवारात हत्या केली होती. हत्येच्या घटनेपासून संशयित आरोपी वेगवेगळे नाव धारण करून नंदूरबारसह इतर ठिकाणी लपून राहत होता. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी फरारी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवी वानखेडे, पोलिस नाईक दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने मोरेचा शोध घेतला. मोरेला चांदवड तालुक्यातील बोपाणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासाका, निसाकाला संजीवनी?

$
0
0

अभ्यासगटाकडून कारखान्यांची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांपैकी दहा साखर कारखान्यांना जीवदान देण्यासाठी सहकार खात्याने पुढाकार घेतला असून, या कारखान्यांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नासाका आणि निसाका या दोन साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील या दहा साखर कारखान्यांचे बॉयलर पुन्हा पेटविण्यासाठी वास्तव परिस्थितीच्या अभ्यासासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाचीही स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाकडून आज (दि.२८) बुधवारी नाशिक सहकारी साखर कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

अवाढव्य कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता मावळली असल्याचे चित्र आहे. या साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देखील कोणीही तयार होत नसल्याने आता शासनानेच या साखर कारखान्यांपैकी निवडक दहा साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी या निवडक दहा साखर कारखान्यांच्या सद्यपरिस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी दि.२१ फेब्रुवारी रोजी पुणे येथे साखर आयुक्तांच्या कार्यालयात या दहा साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकही झाली. तत्पूर्वीच राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या साखर कारखान्यांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका अभ्यासगटाचीही स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटात वसंतदादा पाटील शूगर इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे. जिल्ह्यातील नासाका आणि निसाका या दोन साखर कारखान्यांचा या दहा साखर कारखान्यांत समावेश आहे. जिल्ह्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याचीही या पथकाकडून मंगळवारी (दि.२७) पाहणी करण्यात आली आहे.

नासाकाला आज भेट देणार

आज (दि.२८) बुधवारी वसंतदादा पाटील शूगर इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांचे एक पथक नाशिक सहकारी साखर कारखान्याचा पाहणी दौरा करणार आहे. या पाहणी दौऱ्यानंतर हे पथक राज्याच्या साखर आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार असून, या दहा साखर कारखान्यांचा एकत्रित अहवाल पुढे राज्याच्या सहकारंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानुसार या साखर कारखान्यांचे भवितव्य ठरणार आहे. आज पाहणीसाठी येणाऱ्या पथकाने नासाकाच्या बाबतीत अनुकूल अहवाल सादर केल्यास नासाकाचा बॉयलर पुढील गळीत हंगामात धगधगण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतारेमुळे डाळिंबबागेचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

चौगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोगदरा शिवारातील लताबाई वसंत शेवाळे, भास्कर रतन शेवाळे यांच्या शेतातील डाळिंबबागेस दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीजतारेची ठिणगी पडल्याने बाग जळून अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

चौगाव शिवारातील भोगदर येथे वीज वितरण कंपनीच्या तारा शेतातून गेल्या आहेत. तारांच्या झोळामुळे शॉटसर्किट होऊन लताबाई शेवाळे यांच्या शेतातील डाळिंब बागेचे नुकसान झाले. डाळिंबाची झाडे, ठिबक, पाइपलाइनला आगीचा फटका बसला आहे. तीन वर्षांपूर्वी लताबाई त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या आपल्या दोन मुलांसह शेती कसतात. लताबाई यांनी बँकेकडून सात लाख रुपयांचे कर्ज व तीन लाख रुपयांचे सोने तारण ठेवत डाळिंब बाग लावली. पाण्याचा तुटवडा असतानादेखील व्याजाने पैसे घेऊन डाळिंब बागेस सटाणा परिसरातून पाणी विकत घेत डाळिंब पिकास टँकरने पाणी देत होत्या. दोन महिन्यात डाळिंब बाग काढणीवर येणार असताना अचानक बागेस आग लागून सर्व झाडे, ठिबक, पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे.

शेजारील भास्कर शेवाळे यांच्यादेखील दीड एकरमधील साडेपाचशे डाळिंबाची झाडे जळून खाक झाली. प्रभाकर गांगुर्डे यांच्या शेततळ्यातील प्लास्टिक कागदालादेखील बहुतांश ठिकाणी छिद्रे पडलेले आहेत. या आगीमुळे सुमारे आठ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तलाठी व कृषी सहायक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना

$
0
0

वाचन संस्कृतीचे दुवे – न्यायमूर्ती रानडे वाचनालय

न्या. रानडे मोफत वाचनालय हे नाशिकमधील शंभर वर्षे पूर्ण केलेल्या वाचनालयांपैकी एक. १९०७ साली म्हणजेच इंग्रज काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत वाचकांच्या वाचनप्रेरणेला प्रोत्साहन देणारे असे हे वाचनालय आहे. दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ असो वा आजच्या लेखकांची पुस्तके यांचा खजिना या वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.


महाराष्ट्रात नागरिकांना ग्रंथालय सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रात जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयांची स्थापना केली. त्यामुळेच नाशिकमध्ये वाचनालयांची खरी परंपरा त्यांनी सुरू केली, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्याच नावाने नाशिकला केतकर टाऊन हॉलमध्ये एक सार्वजनिक ग्रंथालय १९०७ साली सुरू करण्यात आले. नाशिकमध्ये गंगाधर नरसिंह केतकर यांच्या स्मरणार्थ रविवार पेठेत केतकर टाऊन हॉल सभासृह बांधण्यात पुढाकार घेतला. याच इमारतीत वाचनालय सुरू केले. त्याला रानडे मोफत वाचनालय नाव देण्यात आले. पूर्वी या वाचनालयात ग्रंथसंपदा कमी होती. परंतु, वाचकांचा प्रतिसाद, मागणी यानुसार ग्रंथसंपदेत हळूहळू वाढ झाली. ही ग्रंथसंपदा आज अठरा हजारांवर पोहोचली आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात वाचनालय सुरू असते.


ऐतिहासिक पार्श्वभूमी

महाराष्ट्रात अठराव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजी साम्राज्य होते. ग्रंथालय, वाचनालय सुरू करण्याची प्रेरणा इंग्रजी अधिकारी वर्गाने दिली. राज्यात जी जिल्हा ग्रंथालये आहेत त्यांना नेटीव्ह जनरल लायब्ररी असे त्यावेळी म्हणत. त्यावेळी ग्रंथालयांमध्ये इंग्रजी वाड्.मय जास्त असे. तर विद्वान व साहित्यिकांना लाभदायक ठरतील, असे मोजके मराठी भाषेतील ग्रंथांचा समावेशदेखील त्यात असत. प्रादेशिक भाषांमधून शिक्षणाचा प्रसार व त्यामुळे इंग्रजी ग्रंथांबरोबर मराठी भाषेतील ग्रंथवाचनाची आवड वाचकांमध्ये वाढत राहिली. त्यादृष्टीने न्या. रानडे यांनी ग्रंथालय चळवळीत काम केले आणि त्यांची स्थापनादेखील केली. नाशिकमधील न्या. रानडे मोफत वाचनालयही त्यापैकीच एक आहे. मुंबईचे सुप्रसिद्ध व्यापारी शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला, त्यांच्या उदार देणगीने रानडे यांनी हे मोफत वाचनालय सुरू केले.


सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

न्या. रानडे मोफत वाचनालयात सांस्कृतिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते. दरवर्षी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आंबेडकर, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, विवेकानंद जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होतात. आजच्या पिढीपर्यंत या महान व्यक्तींचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. तसेच एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जाणारा वाचन प्रेरणा दिनही वाचनालयात मोठ्या उत्साहात साजरा होतो.


शिरवाडकरांच्या आठवणी..

थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्याही न्या. रानडे मोफत वाचनालयाशी अनेक आठवणी निगडीत आहेत. वाचनालयाच्या १९०७ ते १९८१ या स्मरणिकेत त्यांनी वाचनालयाशी निगडित आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘हायस्कूलचा विद्यार्थी असताना कितीतरी संध्याकाळ मी केतकर टाऊन हॉलमधील रानडे वाचनालयात घालवलेल्या आहेत. गंगेच्या दूरस्थ घाटाजवळ असलेल्या जुन्या इमारतीतील या वाचनालयासंबंधी मला विशेष आकर्षण वाटायचे. क्रिकेटचा हंगाम नसला किंवा गावाबाहेरचे माळ तुडवीत कोठे फिरायचे नसले तर माझे पाय आपोआपच टाऊन हॉलच्या रस्त्याकडे वळत. केव्हा एकदा आपण त्या प्रशस्त हॉलमध्ये जाऊन एखादे पुस्तक नोंदवतो आहोत आणि खिडकी लगत असलेली खुर्ची काबीज करून दीडदोन तास एकाग्र वाचनासाठी स्थानापन्न होत आहोत, असे मला होऊन जात असे,’ अशा शब्दात त्यांनी या वाचनालयाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

दुर्मिळ ग्रंथांपासून संदर्भ ग्रंथांपर्यंत

या वाचनालयात अठरा हजार पुस्तके आहेत. यामध्ये दुर्मिळ ग्रंथ, ३०५२ संदर्भ ग्रंथ, राजकीय, नाट्य, प्रवासवर्णन, काव्यसंग्रह, ललितलेख, रचरित्र, आत्मचरित्र, वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, समाजशास्त्र, खगोलशास्त्र याबरोबरतच इतर वाचने, दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिकांचाही समावेश आहे. संशोधन करणाऱ्या अनेक व्यक्ती माहिती संकलनासाठी, संदर्भांसाठी वाचनालयात येत असतात. बच्चेकंपनीची आवडीची चंपक, ठकठक, चांदोबा अशा अनेक गोष्टीच्या पुस्तकांचाही यात समावेश आहे. तसेच जुने अप्राप्त पुस्तक, अहवाल, वृत्तांत, मूल्यमापनाचे संग्रह उपलब्ध आहेत. त्यामुळे सुट्यांमध्ये वाचनप्रिय बच्चेकंपनीही वाचनालयाला पसंती देत असते. आताच्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचीही यादी करून तेदेखील वाचनालयाकडून खरेदी केली जातात. दर आठवड्यात नित्यनेमाने ही यादी अद्ययावत केली जाते.

कामकाज मात्र ऑफलाइनच

न्या. रानडे मोफत वाचनालयाचे सर्व काम ऑफलाइन पद्धतीनेच चालते. सभासदांची नोंदणी, पुस्तकांची देवाणघेवाण आदी प्रकारच्या सर्व प्रक्रियांचा यात समावेश आहे. एसएमएस, इंटरनेट या आजच्या काळातील सुविधा मात्र पुरवल्या जात नाही. तर पत्र पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. सभासदांना फी, डिपॉझिट किंवा अन्य एखादी सूचना देण्यासाठी वाचनालयाकडून पत्र पाठविण्यावरच भर दिला जातो.

आकडे बोलतात..

दैनिके - ९

पाक्षिके - २

साप्ताहिके - ६

मासिके – २

--

एकूण सभासद – ६०० ते ७००

नियमित सभासद – १०० ते १५०

दररोज वाचनालयात येणारे सभासद – ४० ते ४५

--

ठळक बाबी

वाचनालयातून सभासदांनी नेलेली पुस्तके वाचनालयात वेळेत आणून दिली जातात.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुमारे तीस हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली जातात.

वाचकांना पुस्तके हवी असतील तर पुस्तक खरेदीपूर्वी वाचनालयाबाहेर बोर्ड लावला जातो.

जर कोणाची फी देणे बाकी असेल किंवा डिपॉझिट वाचनालयाकडे राहिले असेल अशा सभासदांना पत्र पाठवून कळविले जाते.
--
प्रतिक्रिया

सर्व प्रकारच्या ग्रंथांनी हे वाचनालय समृद्ध आहे. वाचकांना अपेक्षित सर्व पुस्तके मिळावीत याकडे आमचा कल असतो. त्यामुळे पुस्तक खरेदी करतानाही आम्ही आवाहन करतो व त्यानुसार खरेदी करतो. वाचनालयाचे अनेक जुने सभासद आजही वाचनालयाशी जोडून आहेत.
-शिरीष केतकर, कार्यकारी विश्वस्त

वाचकांची व्यवस्थित नोंद ठेवून त्यांना वाचनसंबंधित आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो.
-वैष्णवी वाडेकर, मुख्य ग्रंथपाल

मी नियमित वाचनासाठी वाचनालयात येते. सर्व प्रकारची ग्रंथसंपदा उपलब्ध असल्याने वाचनतृप्ती मिळते.
-राजश्री देवभाणकर, नियमित वाचक

(संकलन - अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल २ मार्चपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाइनच्या ब्रँडिंगसाठी वाइन क्लस्टरतर्फे इंडिया ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवलमध्ये चौथ्या टप्प्यातील कार्यक्रम २ मार्च रोजी भावली धरणाजवळील व्यंकटेशनगर येथे होणार आहे. त्यानंतर ३ मार्च रोजी दिंडोरीतील मोईत शॉर्देन वाइनरी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. सुरगाणा येथे रविवारी, ४ मार्च रोजी विविध आदिवासी कलांचा आनंद पर्यटकांना घेता येणार असल्याची माहिती इंडिया ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पर्यटन विकास महामंडळाचे नितीन मुंडावरे, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यासह जिल्ह्यातील वाइनरीचे संचालक उपस्थित होते. या वेळी होळकर यांनी या फेस्टिवलबद्दलची माहिती देताना सांगितले, की इंडिया ग्रेप हार्वेस्टच्या माध्यमातून वाइनबाबत जनजागृतीसाठी ९ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान वाइन फेस्टिवल होत आहे. यात आतापर्यंत चार कार्यक्रम झाले आहेत. वाइनबरोबरच नाशिकच्या कृषी क्षेत्राचे ब्रँडिंग व्हावे, यासाठी 'नाशिक व्हॅली' या नावाने ब्रँड जगभर जावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी वाइन हे केंद्रबिंदू ठेवले आहे. या फेस्टिवलमध्ये प्रत्येक वीकेंडला नाशिक व जवळच्या वाइनरी, कृषी व द्राक्षप्रक्रिया उद्योग, विनियार्ड वाइन रिसॉर्ट अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे अनेक पर्यटकांनी त्यात सहभाग घेतला. परदेशातील पर्यटकांचे अनेक ग्रुपनेही या फेस्टिवलला भेट दिली. शेवटच्या सत्रात ९ ते १० मार्च रोजी हॉटेल ग्रेप काउंटी येथे शेतकरी फार्म फ्रेश मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम ग्रेप कार्निवलने केला जाणार आहे.

'सोमा'मध्ये वाइन महोत्सव

सोमा वाइन येथे मराठी तडका हा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम झाला. अनेक लावणी कलाकारांनी एकापेक्षा एक दिलखेच लावण्या सादर करून उपस्थित वाइनप्रेमींना आपल्या तालावर ठेका धरायला लावले. याच वेळी सोमा वाइनच्या 'लावणी' या वाइनच्या नवीन उत्पादनाचे लॉचिंग करण्यात आले. याप्रसंगी वाइन असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच फ्रान्समधून आलेले अनेक पर्यटक व सोमाचे प्रदीप पाचपाटील उपस्थित होते. एक्सप्रेस इन येथे झालेल्या डॉक्टर्सच्या कार्यक्रमातही आरोग्य आणि वाइन या विषयावर चर्चा झाली. वाइन नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास उत्तम पेय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुला वाइनरीच्या अलीकडे असलेल्या कोंबल स्ट्रीट येथे रविवारी 'वॉक इन द क्लाउड' हा वाइनरीवरील चित्रपट दाखविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत शिक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मऱ्हळ बुद्रुक शिवारात मानोरी रस्त्यावर एका विहिरीत मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास शिक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अरुण सुकदेव कर्डेल (वय ४०, रा. मानोरी, ता. सिन्नर) असे या शिक्षकाचे नाव आहे. वावी पोलिस ठाण्यात मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मऱ्हळ बुद्रुक शिवारातील सोमनाथ देविदास सहाणे यांच्या मालकीच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसपाटील अशोक सोमनाथ कुटे यांनी वावी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. खिशातील कागदपत्रांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मृताचे हातपाय गोण्या शिवण्याच्या दोरीने बांधलेले आढळून आल्याने हा घातपात असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र मृताच्या शरीरावर प्रतिकाराच्या कुठल्याही खुणा आढळल्या नसल्याने तपासाअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक आंधळे यांनी सांगितले.

अरुण कर्डेल कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील प. पू. विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रमाच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नीदेखील त्याच संस्थेत कार्यरत असल्याचे समजते. गेल्या बुधवारी कर्डेल कोकमठाण येथून मानोरी (ता. सिन्नर) येथे मूळ गावी जातो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, दोन-तीन दिवसांनंतरही घरी न परतल्याने कोपरगाव पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याबाबत शुक्रवारी तक्रार नोंदविण्यात आली. कर्डेल यांचा मृतदेह मंगळवारी आढळल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनीदेखील घटनास्थळी पाहणी केली. विहिरीच्या बाजूला कर्डेल यांची बजाज मोटारसायकल (एमएच १५/ईव्ही ५८२५), चपला, तसेच दारूच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने संशय वाढला आहे. वावी पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक निरीक्षक आंधळे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान शांततेत, आज मतमोजणी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, मंगळवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, ६९.५५ टक्के मतदान झाले. आज, बुधवारी मतमोजणी होत असून, निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या ६४ जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. अर्ज छाननी, माघार प्रक्रियेनंतर १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी १७ मतदान केंद्रांची उभारणी करून प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निमगाव, लेंडाणे, वऱ्हाणे, पळासदरे, ज्वार्डी बुद्रुक, करंजगव्हाण, नगाव दिगर, लोणवाडे, झोडगे, नाळे, दसाणे, साजवाळ येथे १७ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे १७ ईव्हीएम मशिनचा वापर केला गेला.

पोटनिवडणूक असल्याने अनेक गावात मतदानासाठी फारसा उत्साह नसल्याचे पाहायला मिळाले. झोडगे, करंजगव्हाण, निमगाव यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मात्र मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला. सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा होत्या. मात्र, काही मतदान केंद्रांवर दुपारनंतर शुकशुकाट पहायला मिळाला. सायंकाळी शेवटच्या एक तासात मतदारांनी गर्दी केली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन सहायक मतदान अधिकारी, एक शिपाई असे कर्मचारी तैनात होते.

पोलिस बंदोबस्त तैनात

आज, बुधवारी लगेचच येथील तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी देखील प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, निकाल देण्यासाठी ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. वीस जागांवर कोण बाजी मारतो याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिताच्या आधारे पावसाचे अनुमान शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वातावरणात होणारे सूक्ष्म बदल, मेघ आणि विजेचा रंग पशू-पक्षी आणि वनस्पतींमधील सूक्ष्म बदल यांच्या निरीक्षणासह गणितीय अभ्यासाच्या आधारावर पर्जन्यमानाचे पूर्वानुमान काढणे शक्य आहे. या संदर्भात प्राचीन ऋषी-मुनींनी सू्क्ष्म मार्गदर्शन केले आहे, असे प्रतिपादन सिद्धांज ज्योतिष विषयाचे अभ्यासक पं. सुधाकर जोशी यांनी केले.

वैदिक शिल्प संशोधन मंडळातर्फे 'तुम्हीही होऊ शकतात पर्जन्यतज्ज्ञ' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत पं. जोशी यांनी मार्गदर्शन केले. श्री बालाजी मंदिर, दुग्धस्थळी येथे ही कार्यशाळा झाली. पं. जोशी म्हणाले, की गणिताच्या आधारावर पावसाचे पूर्वानुमान काढणे शक्य आहे. आपल्या वातावरणात होणारे बदल, पशू-पक्षी-वनस्पती यांच्या हालचालींत जाणवणारे बदल, मेघांचा रंग आणि आकार, विजेचा रंग, आवाज आणि आकार, वाऱ्याची दिशा इत्यादी गोष्टींच्या निरीक्षणातून पावसाचा अचूक अंदाज बांधता येतो. याबरोबरच आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रात नोंदविलेल्या भौम, अंतरीक्ष आणि दिव्य या पावसाचा पूर्वानुमान काढण्याच्या पद्धतीही सांगितल्या आहेत. या पद्धतींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस श्री शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, इतिहास संकलन समितीचे जयंत गायधनी, विविध महाविद्यालयांतील अध्यापक आणि विद्यार्थी, तसेच मुंबई येथील अभ्यासक, नाशिक जिल्ह्यातील काही गावांतून आलेले उद्योजक आणि शेतकरी सहभागी झाले होते. श्री शंकराचार्य न्यासाचे डॉ. कुलकर्णी, प्रमोद भार्गवे आणि श्री बालाजी मंदिर येथील राजेंद्र जोशी यांनी कार्यशाळेला जागा उपलब्ध करून दिली आणि सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भाची अनावश्यक वाढ अन सिझेरीयनचा उपाय

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: मूल जन्माला येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यादरम्यान निसर्ग गर्भासह मातेचे संरक्षण करतो. क्वचितच केसमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यास शस्त्रक्रियेसारखा पर्याय पुढे येऊ शकतो. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नैसर्गिक वरदानाची जागा शस्त्रक्रियेने घेतली असून, यात पैसे उकळण्याच्या नवनव्या वाटा शोधल्या जात आहेत.

मातेचे वजन, तिची प्रकृती यापलिकडे जाऊन औषधोपचारामुळे गर्भाची वाढ केली जाते, ही सिझेरीयनची पहिली पायरी ठरते. ज्या मातेच्या कुशीतून जितक्या वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकते, तिथे औषधांच्या डोसांमुळे गर्भाचे वजन एक ते दीड किलो किंवा त्यापेक्षा जास्त वाढते. व्यायाम किंवा तत्सम कामे करण्याची जीवनशैली केव्हाच बाद ठरली असून, महिलांसाठी अशा बाळाला नैसर्गिकरित्या जन्म देणे त्रासदायक ठरते. महिलांची त्रास सहन करण्याची क्षमताच नसल्याचा फायदा थेट डॉक्टरांना होतो. याशिवाय नाळ गळ्यात अडकणे किंवा बाळाने शी करणे अशा कारणांमुळे सिझेरीयन करण्याकडे डॉक्टरांचा कल वाढला आहे. एका नैसर्गिक बाळंतपणासाठी महिलेच्या प्रकृतीनुसार अगदी १५ मिनिटांपासून एखाद्या तासापर्यंत वेळ लागतो. तसेच हॉस्पिटलमधील सुविधांनुसार अगदी १० हजारांपासून २५ हजारांपर्यंत खर्च येतो. पण तेच सिझेरीयनचा पर्याय वापरला गेला तर हा खर्च ५० ते ७५ हजारांच्या घरात पोहचतो. सिझेरीयन होण्यासाठी जीवनशैली हे महत्त्वाचे कारण ठरत असले तरी गर्भाच्या होणाऱ्या अनावश्यक वाढीबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

मेडिकल कौन्सिलरच नाही

उशिरा विवाह होण्याच्या मुलभूत कारणांमुळे किंवा जाणिवपूर्वक मातृत्व लांबवण्याच्या धोरणांमुळे अनेकदा गर्भधारणा होत नाही. अशावेळी टेस्ट ट्यूब बेबीसारख्या महागड्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यासाठी कोणताही तणाव महत्त्वाचा ठरतो. त्यात अगदी तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करूनही गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव महिलांना असल्यास तणाव वाढतो. यामुळे गर्भधारणा न होणे, काही आठवड्यांनी गर्भपात होणे असे प्रकार घडतात. मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही यश पदरी पडत नसल्याने अशा महिलांची मानसिक स्थिती आणखी खालावते. अशावेळी सदर हॉस्पिटलमध्ये मेडिकल कौन्सिलर असणे आवश्यक आहे. मात्र, आज काही ठिकाणी हे काम समुपदेशनाचा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्ती करतात. या सुमपदेशनात फक्त पॅकेजच्या माहितीवर जोर दिला जातो. यामुळे गर्भधारणा होणे, गर्भ व्यवस्थित वाढणे आणि त्यानंतर बाळंतपण होणे याचे प्रमाण अवघे १०० पैकी १० इतके कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images